ज्ञानाचा प्रबोधनात्मक प्रोजेक्ट आणि गणपती , कपिल , महावीर , बुद्ध श्रीधर तिळवे नाईक
प्रबोधनाच्या केंद्रस्थानी दोन गोष्टी आल्या
१ धर्माला पदच्युत करून राज्य
२ श्रद्धेला पदच्युत करून ज्ञान
साहजिकच ज्ञानाच्या अंगाने असलेले दैवतशास्त्र खंगाळले गेले आणि त्यात गणपतीचा नम्बर लागला शैवांच्यातील पंचायतनात शिव सर्वगामी पार्वती तंत्रशक्तीगामी कुमारस्कंद कर्मगामी आनंदी (नंदी) भक्तिगामी होते फक्त गणपतीच एक असा होता जो ज्ञानगामी होता साहजिकच शैव ब्राम्हणांनी ज्ञानाचे प्रतीक म्हणून गणपतीची निवड केली आणि शैव ब्राम्हणांच्या देव्हाऱ्यात गणपती मुख्य देवता बनला साहजिकच सुरवातीला पेशवे शैव असल्याने त्यांचीही कुलदेवता गणपती होती आणि गणेशउत्सव तेही साजरा करत बाजीराव पेशवे नंतर पुण्याच्या ब्राम्हणधर्मी ब्राम्हणांनी मस्तानीच्या मुलाला सत्ता मिळेल असे भय घालून नानासाहेब पेशव्यांना वैदिक करून टाकले आणि पेशवाई मनुस्मृतीग्रस्त व्हायला सुरवात झाली ब्राम्हणांचे भय हे कायमच मोठे हाथियार होते ते यशस्वी झाले पण त्याचा एक दुष्परिणाम झाला गणपती संकटे आणेल ह्या भयाने अनुष्ठाने आणि व्रते वाढली गणपती ही देवता जाणीवपूर्वक वाढवण्यासाठी महादेव खंडोबा ज्योतिबा अंबा आणि भवानी ह्यांना साईडलाईन करण्याचे प्रयत्न सुरु झाले जे आजही संपलेले नाहीत गणपती व्हेज तर महादेव अंबा नॉनव्हेज अशी प्रतिमा मोदकांच्याद्वारे सेट करण्यात आली आणि गणपती पूर्ण शाखाहारी बनला शाखाहारी ब्राम्हणांनी शैव देवतेचे शाखाहारीकरण केले मात्र गणपतीच्या विद्याशाखांची कलाशाखांची कसलीही उपासना ब्राम्हणांनी केली नाही उलट सगळे ब्राम्हण मांत्रिक बनले व त्यांनी मांत्रिक बुवाबाजी सेटल केली
१८५० नंतर प्रबोधनाच्या प्रोजेक्टमुळे प्रगती होऊन जगभर साम्राज्य उभी करणाऱ्या ब्रिटिशांच्या राजवटीमुळे इतिहास उत्खननीत करतांना बुद्ध हाताशी आला चीनजपानद्वारा तो आधीच युरोपात पोहचला होता आणि आर्थर शॉपेनहॉवर ह्या बुद्धिस्ट ख्रिश्चनाने बुद्धाची महती सेट केली होती साहजिकच जेव्हा बौद्ध वाङ्मय मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायला लागले तेव्हा आर्यांच्यात फक्त देवसुर धर्म न्हवते तर असुर धर्मही होते हे स्पष्ट व्हायला लागले सांख्य , जैन , बौद्ध संहिता उपलब्ध व्हायला लागल्या सुरवातीला महावीर हा बुद्धाचा अनुयायी आहे असा गैरसमज होता पण पुढे पुराव्यांनी सिद्ध झाले कि महावीर आधी होता आणि अहिंसा ही महावीराची देणगी आहे आणि बुद्ध ह्याबाबत त्यांना फॉल्लो करतो आहे उपाय वैग्रे बुद्धाची भाषा ही कपिलची भाषा आहे आणि कपिल महावीर आणि बुद्ध ह्यांच्या आधीचा होता हे सिद्ध झाल्यावर अचानक वैदिकांनी पलटी मारून सांख्य तत्वज्ञान प्रथम दर्शन म्हणून प्रमोट करायला सुरुवात केली ज्या कपिलचं नावसुद्धा वैदिकांना आठवत न्हवतं तो अचानक मोठा झाला कारण गीतेत मी सिद्धांच्यात कपिल असे श्रीकृष्णाने म्हंटले आहे
ह्या धर्मात स्टेजेस होत्या हेही स्पष्ट झाले
म्हणजे सांख्य धर्मात
१ कपिलपूर्व
२ कपिलिक
३ कपिलोत्तर
अशा तीन अवस्था होत्या
जैनांत
१ आदिजैन महावीरपुर्व
२ मूलजैन महावीर
३ आर्य जैन महावीरोत्तर
अशा तीन अवस्था आहेत
बौद्धांच्यात
१ मूलयान (ह्याला ब्राम्हणांनी हिणवण्यासाठी हीनयान असा शब्द वापरला )
२ महायान
३ वज्रयान
अशा तीन अवस्था आहेत
गाणपत्य , सांख्य , जैन बौद्ध हे चारही धर्म ज्ञानकेंद्री आहेत साहजिकच भारतीय प्रबोधनाच्या केंद्रस्थानी हे आले लोकमान्य टिळकांनी ही दिशा बदलली त्यांनी सगळंच भक्तिमय केले स्वतःला कर्ममार्गी समजणारा हा नेता स्वतः मात्र सामान्य जनतेला अडाणी समजत होता आणि तिला भक्तीच योग्य आहे असे शंकराचार्यांच्याप्रमाणे मानत होता त्यामुळे भारतीय प्रबोधनांत ज्ञानाचीही पूजा सुरु झाली गणपतीपूजनाचा व गणेशोत्सवाचा हा दुष्परिणाम होता साहजिकच कालांतराने फुले आंबेडकर सावरकर टिळक आगरकर शिंदे ह्या ज्ञानवीरांची चिकित्सा करण्याऐवजी पूजा सुरु झाली ती इतकी बळावली कि संविधानावर गणपती बसला हे चुकीचे आहे कारण धर्मनिरपेक्षतेत हे बसत नाही इथे कळत नकळत संविधानाच्यावर गणपती आहे दोघे शेजारी शेजारी असते तर कदाचित हा विवाद झाला नसता दुसरी गोष्ट ह्या देशात नवबौद्धांचे पुन्हा शैवीकरण होते आहे का असा हा प्रश्न आहे संविधानाची किंमत देऊन हे शैवीकरण होणार असेल तर मला ते मान्य नाही संविधानात बदल मलाही हवे आहेत पण हे बदल नवतेच्या दिशेने व्हायला हवेत जूनतेच्या दिशेने न्हवे तरडे ह्यांचे सिम्बॉल जूनतेच्या दिशेने न्हेणारे आहे म्हणून ते मला मान्य नाही
मात्र जे लोक प्रवीण तरडेंना दोष देतायत त्यांनी तो दोष दिला पाहिजे पण हा दोष ते परंपरेतून अधिक व नवतेतून कमी देतायत माझा स्वतःचा प्रश्न असा कि ज्ञानपूजा तुम्हाला मान्य आहे का ? मला ती मान्य नाही पण संविधानात ती धार्मिक स्वातंत्र्य म्हणून मान्य असल्याने मी माझे वैयक्तिक मत बाजूला सारून तिला पाठिंबा देतो पण उद्या जर का कुणी ज्ञानपूजाविरोधी भूमिका मांडत असेल त्याला माझा फुल्ल पाठिंबा असेल
आता आपण सगळे चिकित्सेला महत्व देत असू तर आपण बसवेश्वर , फुले , शिवाजी , शाहू ,आंबेडकर ह्यांना कठोर चिकित्सेपासून वाचवणार आहोत कि त्यांची ज्ञानपूजा करणार आहोत ? आपण बसवेश्वर , फुले , शिवाजी , शाहू ,आंबेडकर ह्यांना कठोर चिकित्सेपासून का वाचवत आहोत किंवा ह्यांची चिकित्सा का टाळत आहोत हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा जग कार्पोरेट युगात उभं आहे आणि आपण धड प्रबोधन सुद्धा चिकित्सेच्या आणि विश्लेषणाच्या दारात घेऊन येत नाही आहोत सगळा मामला इमोशनल चाललाय सर्वात प्रथम तो बुद्धिप्रधान व ज्ञानकेंद्रित व्हायला हवा तरडेंना झालेला विरोध हा परंपराकेंद्रित विरोध आहे ही पद्धत हिंदुत्ववाद्यांच्या जवळ जाणारी आहे म्हणजे परंपरेत काय बसतं आणि काय बसत नाही वैग्रे ही ज्ञानपूजाच झाली आणि ज्ञानपूजेने आपण पुढे सरकणार नाही तर चिकित्सेने आपण पुढे सरकू बाबासाहेब आंबेडकरांनी फुले ह्यांना गुरु मानले पण त्यांचे सगळेच सिद्धांत स्वीकारलेले नाहीत हे लक्ष्यात घ्यायला हवे
एक गोष्ट बीसी ओबीसींनी लक्ष्यात घ्यावी ती म्हणजे ब्राम्हण परदेशगमन करतायत त्यांना तुमच्या टीकेने काही फरकच पडणार नाहीये लक्ष्यात ठेवा येत्या शंभर वर्षात किमान एक ब्राम्हण अमेरिकेचा अध्यक्ष व इंग्लंडचा पंतप्रधान झालेला असेल तेव्हा ब्राम्हण विरोधाच्या पिचकाऱ्या जरूर उडवाव्यात पण त्यामुळे वर्णजातिव्यवस्थेचा खारा समुद्र निघून जाईल ह्या भ्रमात राहू नका कारण समुद्र जितका ब्राम्हणांच्यात आहे त्यापेक्षा अधिक तुमच्यात आहे उठसूट ब्राम्हणांना शिव्या घालण्यापेक्षा आपलेही आत्मनिरीक्षण आत्मपरीक्षण करावे हे उत्तम कसोटी ही असली पाहिजे कि आपण किती खालच्या लोकांना हात दिला किती वरच्या लोकांचा हात पकडला ही नाही पूर्वाश्रमीच्या महारांनी व इतरांनी आपल्या खालच्या जातीतील किती पुरुषांना आपल्या मुली दिल्या ह्याचीही एकदा आकडेवारी समोर आली पाहिजे नुसती ब्राम्हणी कन्यादाने किंवा ती झाली नाहीत म्हणून आक्रोश किती काळ पाहणार ?
दुसरा प्रश्न कार्पोरेट युगात ह्या विचारवंतांना किती स्थान द्यायचे हेही निश्चित करायला हवे बहुजन समाज आपल्या जुन्या नेत्यांच्यात इतका अडकून पडलाय कि त्याला नवीन वैचारिक पुढारी नको झालेत आपली चॅनेल्स पण इतकी भुक्कड कि जातीनिहाय विचारवंतांना बोलावलं जातंय ह्यातून चुकीचे संदेश जातात कार्पोरेट युगात मराठी माणूस कुठाय ?
कि प्रबोधनाच्या कोव्हिडने शिंका येऊन मराठी संस्कृती मरणार आहे ?
श्रीधर तिळवे नाईक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा