धर्मनिरपेक्षता , धर्ममुक्ती , नास्तिकता आणि कम्म्युनिझम १० श्रीधर तिळवे नाईक
धर्मनिरपेक्षतेत राज्यशासन धर्मनिरपेक्ष आणि नागरिक धर्मसापेक्ष अशी विषमता अपरिहार्यपणे निर्माण होते कारण धर्माबाबत काही कृती करण्याचा हक्क धार्मिक पातळीवर शासन गमावून बसते ह्या विरोधाभासाचे मूळ युरोपच्या इतिहासात आहे शासनाची पारलौकिकतेपासून काल्पनिक सुटका होते पण शासकीय अधिकारी स्वर्गनरकावर विश्वास ठेवतात ह्यामागे कळत नकळत माणूस मशीन समजण्याची प्रबोधनाची युक्ती असते
फ्रान्सिस बेकनने धार्मिक ज्ञान व वैज्ञानिक ज्ञान ह्या दोन भिन्न कॅटेगरीज केल्या कारण त्याकाळात विज्ञान कुठवर मजल मारेल ह्याचा अंदाज कुणालाच आलेला न्हवता बेकन एक स्वतःच व्हिलन टाईप मनुष्य होता ज्याने आपल्या गरिबीत आपला मेंटॉर असलेल्या उमरावाचा काटा काढला होता तर आयुष्यभर भ्रष्टाचार करून वयाच्या साठाव्या वर्षी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून जेव्हा अटक झाली तेव्हा सर्वच भ्रष्टाचार करतात मी केला तर काय बिघडले असे उद्गार काढले होते त्याच्या ह्या चारित्र्यहीनतेमुळेच आधुनिक तत्वज्ञानाचा जनक हा मान त्याला देण्याऐवजी देकार्त ला दिला जात असे कारण तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार होईल अशी ब्रिटिशांना साधार भीती होती आजही मराठी विश्वकोशात आधुनिक तत्वज्ञानाचा जनक म्हणून देकार्तचाच उल्लेख होतो कारण कलोनियल मानसिकता
आता अशा माणसाला देव म्हातारपणी आठवणे साहजिकच मानले पाहिजे त्याने ह्या दोन वेगळ्या कॅटेगरीज करून शासनाला धार्मिक झंझटीपासून वाचवले पुढे जेव्हा लॉक आला तेव्हा तो बेकनच्या इंद्रियप्रामाण्यवादाचा अनुयायी म्हणूनच आला व त्याने देकार्तचे गणिती बुद्धिप्रामाण्यवादी ज्ञान ,बेकनचे इंद्रियप्रामाण्यवादी ज्ञान आणि ईश्वराविषयीचे ज्ञान अशा ज्ञानाच्या तीन कॅटेगरीज केल्या व शासनाने ईश्वरविषयक ज्ञानात ढवळाढवळ करू नये अशी भूमिका घेतली त्याच्या ह्या भूमिकेत फ्रान्सिस बेकनी धर्मनिरपेक्षतेचे जे बीज होती त्याचे रोपटे झाले
व्हीकोने इतिहासाची विभागणी धार्मिक युग हिरॉईक युग आणि मानवी युग अशी विभागणी करून धार्मिक युग होऊन गेले अशी मांडणी केली आणि एका अर्थाने धार्मिक युगाला इतिहासजमा केले
ह्यातूनच पुढे होलिओकची गाजलेली पाच तत्वे विकसित होतात
1. Science as the true guide of man.
2. Morality as secular, not religious in origin.
3. The reason the only authority.
4. Freedom of thought and speech
5. Owing to the “uncertainty of survival” we should direct our efforts to this life only.
भारतीय धर्मनिरपेक्षतेलाही ह्याच पाच गोष्टी अपेक्षित आहेत
हा सगळा आटापिटा धर्माने विज्ञानात हस्तक्षेप करून मोडता घालू नये म्हणून होता
के एम पणिक्कर जेव्हा म्हणतात कि आपले राज्य आपल्या प्राचीन परंपरावर आधारित नाही तेव्हा ते खरंच असतं डी इ स्मिथ ह्यांचे इंडिया ऍज अ सेक्युलर स्टेट हे पुस्तक ह्या प्रश्नांची चांगली चर्चा करतं The Secular State is a State which guarantees individual and corporate freedom of religion, deals with the individual as a citizen irrespective of religion is not constitutionally connected to a particular religion nor does it seek either to promote or interfere with religion.
ही त्यांनी दिलेली व्याख्या आहे आणि आजही ही व्याख्या व्याख्या आहे कि भारतीय धर्मनिरपेक्षतेचं वर्णन आहे असा प्रश्न पडतो
थोडक्यात काय धर्मनिरपेक्षता ही एक युरोपियन गोष्ट भारताने विज्ञानाबरोबर आलेले पॅकेजडील म्हणून स्वीकारलेले आहे मात्र आजही भारतीय अंतःकरणाशी त्याचे नातेगोते संशयास्पद आहे
श्रीधर तिळवे नाईक
धर्मनिरपेक्षतेत राज्यशासन धर्मनिरपेक्ष आणि नागरिक धर्मसापेक्ष अशी विषमता अपरिहार्यपणे निर्माण होते कारण धर्माबाबत काही कृती करण्याचा हक्क धार्मिक पातळीवर शासन गमावून बसते ह्या विरोधाभासाचे मूळ युरोपच्या इतिहासात आहे शासनाची पारलौकिकतेपासून काल्पनिक सुटका होते पण शासकीय अधिकारी स्वर्गनरकावर विश्वास ठेवतात ह्यामागे कळत नकळत माणूस मशीन समजण्याची प्रबोधनाची युक्ती असते
फ्रान्सिस बेकनने धार्मिक ज्ञान व वैज्ञानिक ज्ञान ह्या दोन भिन्न कॅटेगरीज केल्या कारण त्याकाळात विज्ञान कुठवर मजल मारेल ह्याचा अंदाज कुणालाच आलेला न्हवता बेकन एक स्वतःच व्हिलन टाईप मनुष्य होता ज्याने आपल्या गरिबीत आपला मेंटॉर असलेल्या उमरावाचा काटा काढला होता तर आयुष्यभर भ्रष्टाचार करून वयाच्या साठाव्या वर्षी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून जेव्हा अटक झाली तेव्हा सर्वच भ्रष्टाचार करतात मी केला तर काय बिघडले असे उद्गार काढले होते त्याच्या ह्या चारित्र्यहीनतेमुळेच आधुनिक तत्वज्ञानाचा जनक हा मान त्याला देण्याऐवजी देकार्त ला दिला जात असे कारण तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार होईल अशी ब्रिटिशांना साधार भीती होती आजही मराठी विश्वकोशात आधुनिक तत्वज्ञानाचा जनक म्हणून देकार्तचाच उल्लेख होतो कारण कलोनियल मानसिकता
आता अशा माणसाला देव म्हातारपणी आठवणे साहजिकच मानले पाहिजे त्याने ह्या दोन वेगळ्या कॅटेगरीज करून शासनाला धार्मिक झंझटीपासून वाचवले पुढे जेव्हा लॉक आला तेव्हा तो बेकनच्या इंद्रियप्रामाण्यवादाचा अनुयायी म्हणूनच आला व त्याने देकार्तचे गणिती बुद्धिप्रामाण्यवादी ज्ञान ,बेकनचे इंद्रियप्रामाण्यवादी ज्ञान आणि ईश्वराविषयीचे ज्ञान अशा ज्ञानाच्या तीन कॅटेगरीज केल्या व शासनाने ईश्वरविषयक ज्ञानात ढवळाढवळ करू नये अशी भूमिका घेतली त्याच्या ह्या भूमिकेत फ्रान्सिस बेकनी धर्मनिरपेक्षतेचे जे बीज होती त्याचे रोपटे झाले
व्हीकोने इतिहासाची विभागणी धार्मिक युग हिरॉईक युग आणि मानवी युग अशी विभागणी करून धार्मिक युग होऊन गेले अशी मांडणी केली आणि एका अर्थाने धार्मिक युगाला इतिहासजमा केले
ह्यातूनच पुढे होलिओकची गाजलेली पाच तत्वे विकसित होतात
1. Science as the true guide of man.
2. Morality as secular, not religious in origin.
3. The reason the only authority.
4. Freedom of thought and speech
5. Owing to the “uncertainty of survival” we should direct our efforts to this life only.
भारतीय धर्मनिरपेक्षतेलाही ह्याच पाच गोष्टी अपेक्षित आहेत
हा सगळा आटापिटा धर्माने विज्ञानात हस्तक्षेप करून मोडता घालू नये म्हणून होता
के एम पणिक्कर जेव्हा म्हणतात कि आपले राज्य आपल्या प्राचीन परंपरावर आधारित नाही तेव्हा ते खरंच असतं डी इ स्मिथ ह्यांचे इंडिया ऍज अ सेक्युलर स्टेट हे पुस्तक ह्या प्रश्नांची चांगली चर्चा करतं The Secular State is a State which guarantees individual and corporate freedom of religion, deals with the individual as a citizen irrespective of religion is not constitutionally connected to a particular religion nor does it seek either to promote or interfere with religion.
ही त्यांनी दिलेली व्याख्या आहे आणि आजही ही व्याख्या व्याख्या आहे कि भारतीय धर्मनिरपेक्षतेचं वर्णन आहे असा प्रश्न पडतो
थोडक्यात काय धर्मनिरपेक्षता ही एक युरोपियन गोष्ट भारताने विज्ञानाबरोबर आलेले पॅकेजडील म्हणून स्वीकारलेले आहे मात्र आजही भारतीय अंतःकरणाशी त्याचे नातेगोते संशयास्पद आहे
श्रीधर तिळवे नाईक
धर्मनिरपेक्षता आणि धर्मफारकतता ११
श्रीधर तिळवे नाईक
धर्मनिरपेक्षततेच्या इतिहासात जे काही अकादमीक घोळ आहेत त्यातील एक घोळ म्हणजे युरोपियन धर्मफारकततेला धर्मनिरपेक्षता समजणे
सर्वात प्रथम एक गोष्ट आपण लक्ष्यात घ्यायला हवी भारतीय परंपरा मग आर्य असो कि शैव मोक्ष आणि धर्म ह्यांना भिन्न गोष्टी मानतात आर्यसुद्धा ह्यांना दोन भिन्न पुरुषार्थ म्हणून मान्यता देतात मोक्षाची संकल्पना ज्युडायिक धर्मात नसल्याने तिथे धर्माची चर्चा अधिक चांगली होते ते उगाच मोक्ष मधेमधे आणून घोळ घालत नाहीत मोक्ष म्हणजे फक्त धर्माचाच अंत नसतो तर तथाकथित अध्यात्माचाही अंत असतो ह्या पार्श्वभूमीवर युरोपियन धर्मफारकततेची चर्चा करता येते
ग्रीक धर्म हा महाधर्म न्हवता त्यामुळे तो अधिक मोकळा होता ग्रीकांची नाटकेही शैवांच्या गोंधळ यक्षगान वैग्रे नाटकांच्याप्रमाणे धर्मनाट्येच होती मात्र ग्रीकांच्यातली वॉर्स ही धार्मिक न्हवती ह्याउलट वैदिकांची सर्वच युद्धे धार्मिक होती कि काय अशी शंका वेद वाचून येते रोमन बादशहा तर स्वतःचीच देव म्हणून पूजा करून घेत देवाचा अवतार बिवतार भानगडच नाही थेट मीच देव आणि तरीही क्षत्रिय लोक इनोसन्टच
रिलिजिओ ह्या लॅटिन शब्दाचा मूळ अर्थ देवतेची वैयक्तिक पूजा असा होता धर्मग्रंथ वैग्रे गोष्टी नंतरच्या हीच गोष्ट अरेबियन दिन ह्या शब्दाबाबत त्याचा मूळ अर्थ कायदा होता पुढे तो धर्म ह्या अर्थाने रूढ झाला भारतातही धर्म ह्या शब्दाचा मूळ अर्थ कायदा असाच होता आर्य ,ज्यू आणि ख्रिश्चन धर्माने नंतर धर्माला जगण्याची पद्धत बनवले आणि धार्मिक कायद्याची व्याप्ती वाढवत न्हेली
सुरवातीला ख्रिश्चन धर्मगुरू खूप गोडीगुलाबीने राहत त्यांनी प्रथम धार्मिक स्वातंत्र्याची मागणी केली आणि आमच्या धार्मिक पूजा आम्हाला करता आल्या पाहिजेत असे सांगितले पुढे ३१२ मध्ये एडिक्ट ऑफ मिलॅनद्वारा सर्व धर्मांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पूजाअर्चा करण्याचे स्वातंत्र्य बहाल करण्यात आले पण पुढे ३३७ मध्ये कॉन्स्टंटाइन ह्या रोमन बादशहाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि ख्रिश्चन धर्मगुरूंचे असली दात बाहेर आले ह्या रोमन बादशहाला ख्रिश्चन धर्मगुरूंनी कसं फासलं त्याची वर्णने आता पुढे येतायत आणि ती वाचून पूर्वीचे राजे किती भयग्रस्त होते ते कळतं कॉन्स्टंटाईनच्या ह्या फॉलनंतर नऊ वर्षातच ३४६ साली इतर धर्मियांच्या धर्मावर व देवतापूजनावर बंदी घालण्यात आली आणि जो ख्रिश्चनेतर देवाची पूजा करेल त्याला मृत्युदंडाची शिक्षा जाहीर झाली हजारो ख्रिश्चनेतर लोक मारले गेले त्यानंतर अवघ्या १०० वर्षांनंतरच ज्यांच्या धर्मपरिवर्तनामुळे ख्रिश्चनिटीला जागा मिळाली त्यांच्या राज्यसत्तेला चॅलेंज देण्यात आले आणि वरचढ सत्ता कुणाची धर्माची कि राज्याची असा प्रश्न निर्माण केला गेला पुढे ख्रिश्चन हा जसजसा महाधर्म बनत गेला तसतसा तो अधिक कर्मठ बनत गेला संत पॉलने ह्या ऐहिक जगाच्या ज्ञानाला मूर्खपणा म्हंटले तर नंतर टर्ट्युलियन सारख्या काहींनी भ्रम ह्यामुळे बुद्धिमान माणूस मूर्ख झाला आणि मूर्ख माणूस चांगला भक्त म्हणून ओळखला जाऊ लागला .
मात्र नवीन शतकात कर्मठपणा ढिला झाला ऍरिस्टोटल ,गॅलेन , टॉलेमी ह्यांना स्वीकारण्यात आले सीझरचे सीझरला व गॉडचे गॉडला हे तत्व पुन्हा स्वीकारण्यात आले पाचव्या शतकात पोप पहिला गॅलिशियस ने दोन तलवारीचा सिद्धांत मांडला समाजातील अध्यात्मिक कल्याणाची स्वर्गनरकाची काळजी पोपने व ऐहिक कल्याणाची शांतता सुव्यवस्था व न्यायाची काळजी राजाने घ्यावी असा हा सिद्धांत होता त्याचे आता पुरुज्जीवन झाले अलबर्ट्स मॅग्नसमुळे उदयाला आलेले डॉक्ट्रीन ऑफ टू फोल्ड ट्रुथ स्वीकारण्यात आले तत्वज्ञान आणि धर्मज्ञान वेगवेगळे ठेवावेत असा हा सिद्धांत होता थॉमस ऍक्विनसने त्याची अधिक पद्धतशीर मांडणी केली
आठव्या शतकात पोप हा ईश्वराचा प्रतिनिधी असल्याने त्याचीच सत्ता श्रेष्ठ असा सिद्धांत पुढे आला इसवीसन ८०० ला पोपने होली रोमन एम्पायर स्थापन केले व पोपने राज्याभिषेक केल्याशिवाय राजाला मान्यता मिळणार नाही असे फर्मान काढले ह्याचा परिणाम असा झाला कि एखाद्या धर्मगुरूंकडून कायदा मोडला गेल्यास त्याला शिक्षा करण्याचा हक्क राजाकडे राहिला नाही ह्यातूनच मग चौथा हेन्री व पोप ह्यांच्यात संघर्ष उद्भवला ह्या संघर्षात पोपने राजाला तीन दिवस बर्फात उभे केले शेवटी राजाला नमते घ्यावे लागले आपल्याकडे ब्राम्हणाला शिक्षा करण्याचा हक्क राजाला नाही असे म्हणणारे ब्राम्हण व धर्मगुरूला शिक्षा करण्याचा हक्क राजाला नाही असे म्हणणारे ख्रिश्चन धर्मगुरू ह्या दोघांचीही भाषा एकाच रीतीची !
खरेतर पोपकडे सैन्यबळ न्हवते तरीही पोप विजयी झाले कारण लोकांची धर्मश्रद्धा खोल व अफाट होती १०० वर्षाच्या इहलोकापेक्षा लाखो वर्षाचा स्वर्ग लोभदायक होता आणि ह्यापेक्षाही भीतीदायक होता लाखो वर्षाचा नरक हे काल्पनिक नरक व स्वर्ग पोपची खरी शस्त्रे होती ज्यांना राजाही घाबरत होता कारण पोपच्या नजरेतून उतरलेल्या बहिष्कृत राज्यावर व राजावर हल्ला करण्याचा आदेश पोप देत आणि धर्मश्रद्ध राजे ते पाळत पृथ्वीला स्मशान बनवण्याचे हे धंदे विजयी होत होते ह्याचे आता आश्चर्य वाटते
आणि मग एक आक्रीत घडले इसवीसन १००० साली जी कयामत येणार म्हणून लोक वाट बघत ती कयामत आलीच नाही आणि लोकांची धर्मश्रद्धा डळमळायला लागली ह्याचवेळी उदयाला आलेल्या इस्लामने अनेक ख्रीसचनांना
मुसलमान बनवायला सुरवात केली आणि पोप ह्या धर्मांतराबाबत काहीच करू शकले नाहीत साहजिकच पोपच्या सर्वंकष सत्तेवरचा विश्वास उडायला लागला क्रुसेड्स सुरु झाली आणि त्यामुळे अनेक ग्रीक व रोमन ग्रंथ नव्याने उपलब्ध व्हायला लागले ग्रीक तत्वज्ञानाचा अभ्यास सुरु झाला
ख्रिश्चन धर्मगुरूंनी काढलेली मुक्तीपत्रे व ती विकून त्याद्वारे कमावलेल्या प्रचंड जमिनी व पैसे व त्याआधारे धर्मगुरूंनी सुरु केलेली प्रचंड ऐश आता खटकू लागली स्वतः भोगविलासात रमलेली धर्मसंस्था त्याविरोधात महम्मद पैगंबरांनी बंड केले आता ख्रिस्चनांनाही खटकू लागली
ह्याचवेळी पश्चिम युरोपात इंग्लंड फ्रान्समध्ये इंग्लिश व फ्रेंच ह्या स्थानिक भाषा विकास पावायला लागल्या व लोकांना ह्या भाषा आवडायला लागल्या ह्या लोकभाषांच्या मागे राजे व लोक सारख्याच प्रेमाने उभे राहायला लागले युरोपियन प्राकृत भाषांचा उदय हा हळहळू राष्ट्रवाद वाढवायला लागला बोलोना सॅलोन ऑक्सफर्ड ह्यासारख्या विद्यापीठांची उभारणी झाली ग्रीक वैद्यकशास्त्र , कायदेशास्त्र , लोकशाही ह्यांचा अभ्यास सुरु झाला फिलिप द फेअर ह्या फ्रान्सच्या राजाने पोपच्या वाट्टेल अव्हान दिले पोपने कर भरु नका सांगितले पण धर्मगुरूंनी राजाला कर दिला पोपने सारंजामदारांना दिलेल्या आज्ञा पाळल्या गेल्या नाहीत पुढे तर राजाने चक्क पोपलाच कैद करून फ्रान्सला आणले ह्यामुळे पोपची प्रतिष्ठा लयाला गेली राजाने १३०९ पासून १३७६ पर्यंत पोपना फ्रान्समधूनच कारभार चालवणे भाग पाडले पोपची शरणागती न आवडलेल्या इटलीने दुसरा पोप बसवला व मी खरा कि तू खरा असा वाद सुरु झाला मग तिसरा एक अलेक्झांडर नावाचा तिसरा पोप दोघांना पदच्युत करून आणला गेला आणि तीन पोप झाले
ह्या एपिसोडमुळे पोप ही संस्थाच कॉमिक झाली
आणि मग गटेनबर्गने प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आणली आणि जर्मनच्या मार्टिन ल्यूथरने प्रोटेस्ट करून ख्रिश्चनिटीत प्रोटेस्टंट नावाचा नवा धर्म आणला आणि ह्या धर्मक्रांतीने नवीन दिशा निर्माण केल्या
श्रीधर तिळवे नाईक
इंग्लंडचा बसवेश्वर ज्ञानेश्वर - जॉन व्हायक्लिफ , धर्मनिरपेक्षता आणि धर्मफारकतता १२
श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर तिळवे नाईक
रॉजर बेकनला आदर्श मानणाऱ्या फ्रेंच पंडित पिअरी दुबाईसने Summaria, brevis et compendiosa doctrina felicis expeditionis et abbreviationis guerrarum et litium regni Francorum, मध्ये राजसंस्था ही दैवी नसून ती परिस्थिती व मानवी गरज ह्यांच्यातून निर्माण होते असे १३०० ला सांगितले ग्रीक तत्ववेत्यांनी राज्याचे मूळ मानवाच्या सहकारी भावनेत आहे असे सांगितले होतेच पिअरीने ते काळानुरूप केले त्याचे पॅम्फ्लेटी लिखाण त्याकाळी खूपच खळबळ उडवणारे होते तो पोपच्या विरोधात राजा फिलिपच्या बाजूने ठाम उभा राहिला वकिलांचे राजकारणातील वर्चस्व त्याच्यापासून सुरु झाले ते थेट भारतीय राजकारणातील सात वकील बॅरिस्टरांच्यापर्यंत चालले (रानडे , टिळक , गोखले , सावरकर , गांधी , नेहरू , आंबेडकर )
दांते अलिगरींने (Dante Alighieri,) लिहिलेला द मोनार्किया (१३१२ -१३ )हा राज्यसत्ता आणि धर्मसत्ता ह्यांची फारकत करणारा ग्रंथ धर्मफारकतीचा मध्ययुगीन आद्य ग्रंथ होय कवीची कल्पना वाटणारा हा ग्रंथ पुढे धर्मनिरपेक्षतेच्या आधी आलेल्या धर्मफारकतीचा टोन सांगणारा ग्रंथ होता फ्लोरेन्सच्या सिटी सरकारच्या डिफेन्स साठी दांते पोपविरुद्ध उभा टाकताना दांतेने हे लिखाण केले होते टेम्पोरल कालिक सेक्युलर स्पिअर राजाकडे व एटर्नल अक्षरअमर डिव्हाईन स्पिअर पोपकडे अशी विभागणी त्याने सुचवली होती पोपची पॉवर आणि राजाची पॉवर ह्या दोन्ही सारख्याच समान देवाकडून आल्याने पोपने आपल्याकडून राजाला पॉवर देणे हे तात्विकदृष्ट्या चुकीचे आहे असे दांतेचे निरीक्षण आहे पोप व राजा दोघेही मनुष्य आहेत हे दोघांनी लक्ष्यात घेणे आवश्यक आहे असे दांतेला वाटते ह्या दोन्ही तलवारीचं जजमेंट तो परमपिता गॉड करेलच तेव्हा दोघांनीही आपापल्या तलवारी नीट सांभाळावेत हे उत्तम असे त्याचे प्रतिपादन होते.
पदुआ नगरीचा मर्सिगलीओ Marsilius of Padua ह्याचा डिफेन्सर पासिस Defensor pacis (The Defender of Peace ) हा १३२४ सालचा ग्रंथ प्रबोधनाच्या युगाला आरंभ देणाऱ्या ग्रंथांपैकी एक ग्रंथ होय ह्या ग्रंथाने प्रबोधनाची दुसरी केंद्रीय संस्था म्हणून राज्याची स्थापना केली Louis IV, Holy Roman Emperor and Pope John XXII. ह्यांच्यातील संघर्षाची पार्श्वभूमी ह्या ग्रंथाला होती दैवी कायदे आणि मानवी कायदे अशी विभागणी त्याने केली सिव्हिल लॉ व सोविरिणीटी ह्या दोन्ही पॅपसी पासून स्वतंत्र असल्या पाहिजे असे त्याने सांगितले लोकांच्यात शांतता निर्माण करण्याची व शांततेचे संरक्षण करण्याची जबाबदारी शासनावर आहे असे त्याने सांगितले त्याने फक्त पोपवर हल्ले केले नाहीत तर बिशॉप्स आणि क्लर्जी ह्यांच्यावरही हल्ले करून ह्यांना सेक्युलर राज्याच्या कायद्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाकारला इतकेच न्हवे तर चर्चच्या प्रॉपर्टीज जप्त करण्याचा अधिकार राजाला आहे असे प्रतिपादन केले थोडक्यात पोपने पवित्र पण नामधारी राजा म्हणून काम करावे अशी ही योजना होती
ह्यानंतर ज्याने प्रोटेस्टंट पंथाचा पाया घातला तो जॉन वाय क्लिफ येतो इतिहास मार्टिन ल्यूथरला प्रॉटेस्टंट पंथाचे श्रेय देत असला तरी प्रत्यक्षात हे श्रेय जॉन वॉयक्लिफ ह्याचे आहे त्याचा जन्म १३२० साली झाला तो ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत सेमिनरी प्राध्यापक होता
De civili dominio ("On Civil Dominion").ह्या पुस्तकात त्याने चर्चच्या संपत्तीच्या डिव्हेस्टमेन्टची मागणी केली जिने खळबळ उडवली आरोप झाले पुढे व्हायक्लिफने लोकांनी फक्त बायबलवर विश्वास ठेवावा ईश्वर आणि भक्त ह्यांच्या दरम्यान कुठल्याही पोपची वा धर्मगुरूंची गरज नाही असे प्रतिपादन करायला सुरवात केली पोपच्या धर्मसत्तेला ईश्वराचा किंवा बायबलचा पाठिंबा असल्याचा कसलाही पुरावा बायबलमध्ये नाही हे त्याने पद्धतशीरपणे सिद्ध केले १३७९ मध्ये त्याने लिहिलेल्या De ecclesia ("On the Church"), ह्या ग्रंथात त्याने राजा व राज्यसत्ता ह्या धर्मसत्तापेक्षा सुप्रीम असतात असे प्रतिपादन केले त्याने शुद्धी (पर्गटरी) , संतांना केल्या जाणाऱ्या प्रार्थना , धर्मयात्रा आणि ब्रह्मचर्य ह्यांना नकार दिला
आणि बायबल हीच एकमेव ऑथॉरिटी मानली त्याने 1380 च्या Objections to Friars ह्या ग्रंथात धर्मगुरूंना न्यूसन्स , धर्मशत्रू , प्रत्येक गुन्ह्याचे निर्माते , तात्कालीन लाभासाठी आत्मा विकणारे असे म्हंटले व मोनॅस्टरीजच्या विसर्जनाची मागणी केली रोमच्या सत्तेशी राजकीय संघर्ष ते थेट धार्मिक संघर्ष अशी त्याची वाटचाल स्पष्ट दिसते सुरवातीला चर्चची थोडी तरी कदर करणाऱ्या वायक्लीफने नंतर पोपला अँटीख्राईस्ट म्हणण्यापर्यंत मजल गाठली शेवटी त्याच्या लक्ष्यात आले कि ज्या बायबल वाचनांविषयी आपण बोलतोय त्या बायबलची मक्तेदारी चर्चेसकडे आहे कारण लॅटिन भाषा सामान्य माणसाला कळत नाही ही गोष्ट त्याच्या लक्ष्यात आल्यावर त्याने बायबलच्या भाषांतराची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि बायबल इंग्लिशमध्ये भाषांतरित केले आणि त्याच्या प्रति वाटायला सुरवात केली निकोलस हेरफोर्डने जुन्या व वायक्लीफने नव्या टेस्टामेन्टची जबाबदारी घेतली होती हे भाषांतरित बायबल झपाट्याने पसरायला सुरवात झाली आणि त्याने अनेकांना बायबल आपल्या व्हर्नाक्युलर भाषेत अनुवादित करायला प्रोत्साहन दिले त्यामुळे बायबल सामान्य माणसाला उपलब्ध झाले वायक्लीफ इथेच थांबला नाही त्याने गरीब वर्गातून आपले प्रीचर निर्माण केले जे अत्यंत साधे रहात ज्यांना पुढे लोलार्ड असे नाव मिळाले धर्मगुरूंनी निष्कांचन रहायला हवे अशी त्याची शिकवण होती जी त्याच्या अनुयायांनी पाळली प्रभुभोजनावरच्या त्याच्या टीकेने शेवटची काडी टाकली ख्रिश्चनांच्या मते प्रभुभोजन ह्या धार्मिक विधीवेळी जे भाकरी व मद्य वापरण्यात येते ते ख्रिस्ताच्या मांसात व रक्तात रूपांतरित होते वायक्लिफच्या मते ही अंधश्रद्धा आहे वायक्लिफने बायबलचाच आधार घेऊन ते सिद्ध केल्याने त्याचे म्हणणे नाकारणे कठीण झाले रोमन धर्मपीठाला हे पाखण्ड वाटले
शेवटी वॉयक्लिफवर खटला दाखल करण्याची तयारी सुरु झाली पण पार्लमेंटच्या पाठिंब्याअभावी ती बारगळली मात्र राजा फिरला व त्याने चुकलेल्याना शिक्षा देण्याची ऑर्डर काढली मात्र वायक्लीफला हात लावण्याची कुणाला हिंमत झाली नाही २८ डिसेम्बर१३८४ ला चर्चला स्ट्रोक देणाऱ्या ह्या बंडखोरांचा मृत्यू स्ट्रोकने झाला त्याच्या मृत्यूनंतर राजा हेनरी ह्या प्रतिगामी राजाने १४०१ ला लोलार्डच्या विरोधात कायदा केला आणि त्यांना जिवंत जाळून मारण्याची शिक्षा देण्याची तरतूद केली आपल्या मताचा व तत्वांचा त्याग न करता लोलार्ड पंथीयांनी ही शिक्षा भोगली जॉन सॉट्रे हा पहिला हुतात्मा ठरला
१४ मे १४१५ ला वायक्लिफच्या पुस्तकांच्यावर बंदी आली
ह्याच वर्षी जॉन हस ह्या बोहेमियाच्या प्राग विद्यापीठात प्राध्यापक असणाऱ्या चारित्र्यसंपन्न धर्मनिष्ठ असणाऱ्या वायक्लिफच्या अनुयायाला १४१५ साली जिवंत जाळण्याची शिक्षा ठोठावली गेली आणि ती अंमलात आणली गेली हा कडेलोट होता आणि त्यामुळे भडका उडाला हसच्या अनुयायांनी युद्ध पुकारले तब्बल १२ वर्षे हे युद्ध चालले आणि शेवटी तह होऊन अटी ठरल्या
१ इहलोकावरील पोपची सत्ता नाहीशी करावी वा पोपने सोडावी
२ धर्मप्रवचन कुणालाही देता यावे
३ धर्मगुरूंनी वैराग्य पाळून अधिकतम संपत्तीचा लोभ धरू नये
४ धर्मगुरूंनाही ऐहिक जीवनात राज्याचे ऐहिक कायदे लागू होऊन राज्यशासनाच्या खटल्यात त्यांचा न्याय व्हावा
ह्या विजयाने युरोपचा धार्मिक इतिहास कायमस्वरूपी बदलला आणि राज्य व धर्म ह्यांची फारकत झाली
श्रीधर तिळवे नाईक
धर्मनिरपेक्षता, आधेअधुरे पक्ष आणि मॅडनेस ऑफ सिव्हिलायझेशन १३
श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर तिळवे नाईक
व्हायक्लीफने स्थापन केलेल्या पहिल्या प्रोटेस्टंट धर्माची माहिती आपण घेतली ह्या धर्माच्या विजयाने झाले काय ?
रॉजर बेकनने नैसर्गिक कायदे वेगळे काढले होतेच अशा तऱ्हेने प्रबोधनात
१ नैसर्गिक कायदे ज्याच्या आधारे विज्ञान उभे होते
२ नागरी कायदे ज्याच्या आधारे राज्य उभे होते
३ धार्मिक कायदे ज्याच्या आधारे धर्म उभा होता
स्वतंत्र करण्याची योजना पुढे यायला लागली धर्मनिरपेक्षतेकडे पडलेले हे पहिले पाऊल होते धर्माची विज्ञान व राज्य ह्यांच्यापासून फारकत करण्याची ही योजना होती ती वायक्लीफमुळे फळाला आली
आज आपण धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्षतावाद ह्या दोन गोष्टी भिन्न मानतो वैयक्तिक पातळीवर सेक्युलर होणे म्हणजे सेक्युलॅरिटी पण सेक्युलॅरिझम म्हणजे संपूर्ण समाज वा राज्य धर्मनिरपेक्ष सेक्युलर होणे वायक्लीफने ह्या बाबतीतली पहिली कृती केली त्याने बायबल हे सार्वजनिक धर्मतेकडून सोडवले व ते वैयक्तिक केले ईश्वर हा ज्याचा त्याचा एहसास बनवला आणि राज्याकडे ऐहिक कायदे पूर्णपणे फिरवून धर्मगुरूंना राज्याच्या कायद्याच्या चौकटीत बसायला भाग पाडले बायबलचीच ऑथॉरिटी आणि कायद्यावरची ऑथॉरिटी गेल्यावर चर्चकडे काय उरते ?
धर्मनिरपेक्षता ही सायकॉलॉजिकल असते आणि ती जोवर तुमच्या अनकॉन्शसचा भाग बनत नाही तोवर ती उथळ असते महात्मा फुलेंनी जे बहुधर्मीय कुटुंबाचे स्वप्न पाहिले ते ह्या अनकॉन्शस माईंण्डपर्यंत पोहचलेल्या त्यांच्यातील धर्मसहिष्णुतेमुळे ह्यामुळे शैव आपोआपच धर्मनिरपेक्षतेकडे कलले त्याला १९८० नंतर धर्मसापेक्षतेने घेरले ते काँग्रेसने अल्पसंख्याकांच्या केलेल्या लाडामुळे! शाहबानो प्रकरणात काँग्रेसची धर्मनिरपेक्षता पुढे सरकण्याऐवजी मागे सरकली आणि काँग्रेस ही बहुसंख्याक हिंदूंची सेक्युलर संघटना आहे हे गृहीतक कोसळले ही तीच चूक होती जी वॉयक्लीफबाबत राजा हेनरीने केली होती ह्यामुळे ओबीसी असलेले शैव प्रथमच बिथरले आणि भाजपला जाऊन मिळाले धर्मनिरपेक्षतेचा काहीही उपयोग नाही मुस्लिम लोक कधीही धर्मनिरपेक्ष बनणे शक्य नाही हे आज बहुतांशी हिंदूंचे व शैवांचे मत आहे आणि हे मत बदलण्याची जबाबदारी मुस्लिम समुदायावर आहे हिंदू व शैवांच्यावर नाही हाच घोळ आता युरोप अमेरिकेत झाला आहे ख्रिश्चन धर्मियांना आता प्रामाणिकपणे वाटतंय कि मुस्लिम धर्मनिरपेक्ष होऊच शकत नाहीत उलट हे युरोपने केलेली प्रगती मागे फिरवून युरोपमध्ये इस्लामिक राज्य आणण्याचे कारस्थान रचत आहेत ही अमेयुरोपियन ख्रिश्चनांची भावना आहे आणि मुस्लिम लोक ह्या भावनेची दखल न घेता जणू काय आपणच खऱ्या धर्माचे पालक आहोत अशा थाटात जगू पाहतायत प्रॉब्लेम अस्तित्वात आहे हे स्वीकारण्याची त्यांची तयारी नाही १९७० पासून ख्रिश्चन्स सेक्युलॅरिझमकडे मोठ्या प्रमाणात सरकायला लागले होते पण मुस्लिम देशातील इस्लामिक क्रांतीने १९९० नंतर सेक्युलर ख्रिश्चनही चर्चमध्ये न जाताही मी ख्रिश्चन आहे असे म्हणू लागले १९९५ नंतर भारतातही शैव आगम वा गीता न वाचताच षष्टीषण्मासि मंदिरात जाणारे लोक गर्वसे कहो हम हिंदू है म्हणायला लागले आपण मागासलेल्या लोकांशी लढता लढता मागासलेले बनत जाऊ ह्याची ह्यांना जाणीवच नाही आपल्याला इस्लामिक स्टेट सारखे मागासलेले स्टेट आणायचे आहे काय ? ते आणणे आपणाला परवडणार आहे काय ? पाकिस्तानने राजकीय आत्महत्या केली म्हणून आपणही ती करावी हा मूर्खपणा नाही काय ? त्यापेक्षा समान नागरी कायद्याचा आग्रह धरणे व तो आणायला भाग पाडणे योग्य नाही काय ?
कुठल्या कष्टातून आपण धर्मनिरपेक्ष झालोय ह्याची नवीन पिढीला जाणीवच नाही आणि ही जाणीव देण्यासाठी आज धर्मनिरपेक्षतेचा खर्राखुर्रा इतिहास सांगण्याची वेळ आली आहे आपल्याकडचे बहुतांशी सेक्युलर हे भंपक आहेत ते सरळ सरळ मुस्लिमधार्जिणे आहेत त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचा इतिहास ट्विस्ट करून सांगण्यात वाकबगार आहेत औरंगजेबासारख्या नराधम माणसाची भलावणी तुम्ही पुरोगामीपणाच्या नावाखाली करणार असाल तर बहुसंख्याक हिंदू व ओबीसी बीसी आदिवासी शैव तुमच्याकडे पाठ करणे अटळ आहे
ह्यातला सर्वात मोठा घोळ दिसतोय तो असा कि समान नागरी कायदा काँग्रेस आणणार नाही आणि भाजप पराभूत झाला तर भाजपकडूनही तो येऊ शकणार नाही मोदींच्या आर्थिक धोरणांनी ह्या देशाची वाट लावली ही वस्तुस्थिती आहे धर्मनिरपेक्षतेबाबत काँग्रेस खोटं बोलायची आर्थिकबाबत मोदीसमर्थक खोटं बोलतायत देशातील सामान्य जनतेला दोन्ही गोष्टी परवडणार नाहीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर्थिक बाबतीत मोदींना काही कानपिचक्या देईल अशी अपेक्षा होती ती आता धुळीस मिळाली आहे संघच आता मोदींचा गुलाम बनलाय कि काय अशी आता शंका येते आहे मोदींनी चायना पाकिस्तान काश्मीर बाबत जे धाडसी निर्णय घेतले त्याचे मी नेहमीच कौतुक केलंय पण आर्थिक आघाडीवर मोदी अपयशी ठरलेत ही वस्तुस्थिती हे आर्थिक अपयश मोदींना आगामी निवडणुकीत पराभूत करू शकते दुर्देवाने मोदींना ह्याची जाणीव दिसत नाही बहुदा हिंदूंच्या धार्मिक उन्मादावर त्यांचा जास्त विश्वास दिसतो दुसरीकडे काँग्रेसचा स्युडोसेक्युलॅरिझम कंटिन्यू राहील हे आता स्पष्टच दिसते आहे नरसिंहराव आणि मनमोहनसिंग हे दोन्हीही माझे आवडते पंतप्रधान त्यांनी आर्थिक बाजू अतिशय चांगली सांभाळली होती पण सेक्युलरायझेशनबाबत काय घडतंय ह्याचा ह्या दोघांना अजिबात अंदाज आला नाही
ह्यामुळे भारतीय जनतेची अवस्था आधे अधुरे नाटकातील नायिकेसारखी झाली आहे दोन्ही पक्षात थोडे थोडे पुरुषार्थ आहेत पण कम्प्लिट पुरुष एकही नाही
भय एकच आहे हे सर्व मॅडनेस ऑफ सिव्हिलायझेशन मध्ये कन्व्हर्ट झाले तर ? क्लॅश हा क्लॅश असतो तोवर ठीक असते पण तो मॅडनेस झाला तर त्या मॅडनेसमध्ये सिव्हिलायझेशनच्या सिव्हिलायझेशन नाहीश्या होतात हा इतिहास आहे आय होप आपण ह्या मॅडनेसच्या काळ्या विवराकाठी उभे नाही आहोत
श्रीधर तिळवे नाईक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा