राममंदिर २ श्रीधर तिळवे नाईक PRASHANT NILKUND ह्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे
आमच्या लहानपणी मला आठवते त्याप्रमाणे रामाची पूजा, कृष्णाची पूजा घरात नसे. मूर्तीही नसे आणि फोटोही. राम, कृष्ण वगैरे "वैष्णवांचे" असे सांगण्यात येत असे. त्यांच्या गोष्टी एकतर आधी आजीकडून आणि नंतर चांदोबा वगैरे मासिके, रामायण सिरीयल, आणि शेवटी रामानंद सागर कृपेने समजल्या.
रामाचे नाव प्रॉमिनंटली येऊ लागले ते "राम मंदिर आंदोलन" सुरु झाले, बाबरी पडली त्यानंतर. पण तरीही घरात रामाची पूजा झाल्याचे आठवत नाही. दरवाजांवर "वि हीं प" वाल्यांनी स्टिकर लावेपर्येंत रामाचा फोटो नव्हताच.
फक्त पणजोबांच्या जमान्यातील शाळीग्राम एक होता. नाहीतर सर्व काही देवी, शिव, नवनाथ, साईबाबा प्रा. लि. होते.
आमच्या गल्लीतही, जवळपास सुद्धा राम मंदिर नाही. माहित असलेले एक पार्ल्याला होते. मुंबईत जसे उत्तर भारतीय येत गेले तसे दशहरा इत्यादी आणि राम वगैरे मंडळींची पूजा आसपास सुरु झाली. दहीकाला होत असे पण त्यात पूजेपेक्षा गंमतीचा भाग अधिक होता.
मग प्रश्न असा पडतो कि राम या "देवते"ला दक्षिण भारतात, शैव, शाक्त समुदायांत, सर्वसामान्य जनतेत कितपत स्थान आहे? आणि राम मंदिर आंदोलनाचा मुख्य मुद्दा "रामाचे मंदिर उभारणे" हा होता कि "गर्व से कहो" मधून मुस्लिम विरोधी अस्मिता निर्माण हा होता?
प्रशांतजी
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे राम आणि श्रीकृष्ण हे शैव देव न्हवेत आणि त्यामुळेच त्यांना शैवांच्या पंचायतनात जागाच नाही शिव पार्वती गणपती स्कंद आणि सूर्य हे शैवांचे पंचायतन आणि ह्यांचीच पूजा शैवांच्यात केली जाते आर्य संस्कृती यज्ञ प्रधान तर शैव पूजाप्रधान शैवांच्यात द्रविड नाग राक्षस असुर यक्ष दैत्य दानव भूत पिशाच्च असे अनेक गण येतात असुर आर्य असले तरी त्यांनी कधीही आर्य संस्कृती स्वीकारली नाही त्यांची मूळ संस्कृती त्यांच्या गणागणिक वेगवेगळी होती जी पुढे शैव म्हणून एक झाली असुरांचे सूर्य व द्रविड नागांचा सूर्य ह्यांची कालांतराने सरमिसळ होऊन एक सूर्यपूजा उदयाला आली शैवांच्यात एक सूर्याची कल्पना असली तरी असुरांच्यात अनेक सूर्यांना स्थान होते एक सूर्य ही कल्पना आर्यांच्यात नंतरची कल्पना आहे पूर्वी वेगवेगळ्या अवस्थेतील सूर्य वेगवेगळे मानले जात
शैव असुरांनीच पुढे आर्यांच्यात सांख्य , अवेस्तन(पारशी ) , जैन व बौद्ध असे चार मुख्य धर्म जन्माला घातले आणि देव सुर आर्यांनी ह्या धर्मांना कायमच अवैदिक म्हणून मान्यता देणे नाकारले अस्सल देव सूर दर्शन एकच जैमिनी दर्शन बाकी सगळी ढापाढापी आहे टिळकांच्यावर चर्चा करताना मी देवसुर सूर्याची चर्चा केलेली आहे
ह्या असुर शैवांच्यात पाच सूर्य होते
१ ब्रम्ह
२ राम
३ नारायण
४ श्याम
५ असुर
आणि असुर हा सर्वांचा स्वामी होता त्यामुळेच असुर ह्या शब्दाचा अर्थच मुळी स्वामी असा होतो ऋग्वेदात त्यामुळे हा शब्द इंद्राला उद्देशूनही वापरला आहे सर्व वैदिक देव सुरवातीला असुरच होते पण नंतर सूर होत गेले
ह्यातील ब्रम्ह शब्दावरूनच ब्रम्हमुहूर्त हा शब्द तयार होतो हा पहिला सूर्य आहे त्यामुळेच तो निर्मितीचा प्रकाशाचा कारक आहे रामप्रहर हा शब्द आपणाला परिचित आहे कारण हा रामाचा कालखंड असतो राम हे सूर्याचे नाव आहे आणि ज्या आफ्रिकेतून असुर व राक्षस आले तिथेही त्याचा अर्थ सूर्य असाच होता अत्यंत्य कडक सूर्य म्हणजे नारायण हा दुपारचा सूर्य आहे तर श्याम म्हणजे संध्याकाळचा सूर्य त्यामुळेच श्याम हा शब्दाचा अर्थच मुळी संध्याकाळ असा रूढ झाला आहे संध्याकाळ झाली कि रात्री हे सगळे सूर्य स्वामी असुराच्या ताब्यात असतात आणि तोच पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांना पाठवतो अशी ही कल्पना आहे जगभरात असुर असीर अस अशा अनेक नावांनी प्रचलित होता व ज्याला आपण असिरियन साम्राज्य म्हणतो तेही असुरांनी स्थापन केले होते
वैदिक काळात सूरही असुरांची थोडी इज्जत करत पण नंतर त्यांनी त्यांची चेष्टा करायला सुरवात केली वैदिक सूर्याऐवजी पावसाळा पाठवणाऱ्या इंद्राला महत्व देत आणि इंद्र हीच त्यांची मुख्य देवता होती त्यांनी असुरांच्यापेक्षा अवेस्तापेक्षा स्वतःचा वेगळा धर्म स्थापन केला ज्याला आपण वैदिक धर्म म्हणतो पुढे वैदिक विजयी झाले तसे ब्राम्हणांचे वर्चस्व वाढले व त्यांनी दुसरा धर्म जन्माला घातला तो म्हणजे ब्राम्हण ग्रंथांना व स्मृतीला केंद्रस्थानी ठेवणारा ब्राम्हणधर्म पाचव्या शतकापर्यंत ब्राम्हणधर्मच देव सूर आर्यांचा मुख्य धर्म होता त्यामुळे सर्वत्र ह्याचा उल्लेख ब्राम्हणधर्म असाच आहे ह्या ब्राम्हणधर्माविरुद्ध पहिला असुरांचा दैत्यांचा उठाव हा हिरण्यकशिपू व हिरण्याक्ष ह्या शैव बंधू राजांच्या नेतृत्वाखाली बळिवंशाने केला ह्यातील हिरण्यकशिपूची कथा पदमपुराणांत आली असून खुद्द शिवनेच पार्वतीला सांगितली आहे कारण हिरण्यकशिपू हा परम शिवभक्त होता ह्या दोघांची ब्राम्हणांनी हत्या घडवली पुढे ह्यांच्याच नातवाने म्हणजे कपिलने सांख्य दर्शन मांडले ह्या दर्शनाचा आत्मा शैव होता आणि भाषा असुर आर्यांची होती बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म ह्यात म्हंटल्याप्रमाणे ह्या कपिलच्या विचारांचा सखोल परिणाम गौतम बुद्धावर झाला आहे पुढे बौद्ध झालेल्या ब्राम्हणांनी शैव प्रभाव नाकारण्यासाठी बुद्धाच्या शाक्त गणाचे नाव बदलून शाक्य असे केले पण बुद्धाच्या आईचे नाव मात्र पार्वतीचेच म्हणजे मायादेवी राहिले कपिलवास्तूचे नाव कपीलवास्तूच राहिले ह्या कपिलचा नातू किंवा पणतू होता बळी ज्याला ब्राम्हणांनी गाडले तरीही शैवांचा व सांख्यांचा प्रभाव ओसरेना उलट त्यात आता जैन व बौद्धांची भर पडली तेव्हा ह्यांना शह देण्यासाठी म्हणून ब्राम्हणांनी तिसरा धर्म जन्माला घातला वैष्णव त्याला प्रतिसाद मिळेना म्हणून ब्राम्हणांनी राम पासून रचले रामायण श्यामपासून रचले महाभारत जे यश वैदिकांना वेद रचून मिळाले नाही ब्राम्हणग्रंथ रचून मिळाले नाही ते यश त्यांना रामायण व महाभारत ह्या महाकाव्यांच्या रचनेनंन्तर मिळाले कारण ही महाकाव्ये अतिशय यशस्वी व प्रभावी होती ह्या महाकाव्यात त्यांनी राम कृष्णांना शिवभक्त दाखवून शैवांना सामावून घेतले शांतिपर्वात सगळा बुद्ध उपदेश सामावून घेतला व गीतेद्वारा अख्खे सांख्य तत्वज्ञान शोषून घेतले
आणि ह्यांच्यातूनच पुढे हिंदू धर्म निर्माण केला हिंदू धर्माचे मुख्य देव राम कृष्णच आहेत विष्णू फार दुय्यम आहे
आणि महेशही !
कृष्णाने सांगितलेली गीता हा हिंदूंचा मुख्य धर्मग्रंथ आहे म्हणजे महाभारतच हिंदूंचा मुख्य धर्मग्रंथ आहे कारण गीता महाभारतात आहे आणि ती शंकराचार्यांनी लिहिली आहे म्हणूनच शंकराचार्य हे हिंदूंचे पोप आहेत शंकराचार्य जातीव्यवस्थेला नकार देतो म्हणून सनातन धर्म जातिव्यवस्थेला नकार देतो लोकमान्य टिळक जातिव्यवस्थेला नकार देतात मात्र वर्णव्यवस्था ह्या सर्वांना मान्य आहे पुण्ययोनी पापयोनी अयोनी ही योनिव्यवस्था ह्यांना मान्य आहे मागच्या जन्मात पुण्य केल्याने ब्राम्हण व क्षत्रिय वर्ण प्राप्त होतो व मागील जन्मात पाप केल्याने वैश्य शूद्र व अतिशूद्र व आदिवासींचा जन्म मिळतो हे ह्यांना मान्य आहे त्यामुळेच ब्राम्हण व क्षत्रिय हे पुण्यवान लोक आहेत तुमच्या मागील जन्माच्या कर्मामुळेच तुम्हाला ह्या जन्माचा वर्ण मिळाला आहे असे श्रीकृष्ण म्हणतो ह्या अर्थाने कर्माप्रमाणे वर्ण मिळतो आणि मी वर्ण देतो असे श्रीकृष्ण म्हणतो
ह्या सगळ्या विवेचनावरून मला वाटते सर्व स्पष्ट व्हावे तुम्ही म्हणता
आमच्या लहानपणी मला आठवते त्याप्रमाणे रामाची पूजा, कृष्णाची पूजा घरात नसे. मूर्तीही नसे आणि फोटोही. राम, कृष्ण वगैरे "वैष्णवांचे" असे सांगण्यात येत असे. त्यांच्या गोष्टी एकतर आधी आजीकडून आणि नंतर चांदोबा वगैरे मासिके, रामायण सिरीयल, आणि शेवटी रामानंद सागर कृपेने समजल्या.
जर तुम्ही शैव असला तर रामकृष्णाची मूर्ती मिळणार कुठून ? असुरांचे राम और श्याम ब्राम्हणांनी रामायण व महाभारताद्वारे गिळले आणि नवीन राम और श्याम तयार केले ज्यांचा बहुजनांशी किंवा शैव ब्राम्हण क्षत्रियांशी काही संबंधच नाही त्यामुळे जे घडले ते स्वाभाविक आहे अनेकांना रामनवमी माहित असते पण रामनवमीचा मूळ अर्थ माहित नसतो राम ह्या शब्दाचा मूळ अर्थ आहे पूर्वज कोकणात त्यामुळेच आपल्या मूळपुरुषाला रामपुरुष म्हंटले जाते ह्या पुरुषाची पूजा रामनवमीला केली जाते कारण चैत्रात गुडीपाडव्याला नवीन वर्षाचे स्वागत होते मग आठ दिवसांचा आठवडा गुडीपाडवाच साजरा केला जातो एकदा पृथ्वीची व सूर्याची पूजा संपली त्यांचे नववर्षाचे पहिले मिलन साजरे झाले नववर्षाचे स्वागत पूर्ण संपन्न झाले कि मान येतो तो आपल्या सर्व पूर्वजांच्या पूजेचा पूर्वज म्हणजे पूर्वेकडून येणारा प्राचीन आत्मज ह्यात बायकांनी प्राचीन बायका व पुरुषांनी प्राचीन पुरुषांना आठवणे अभिप्रेत आहे आपण आता जे आहोत ते आपल्या पूर्वजांच्यामुळे आहोत ही जाणीव सर्वच संस्कृतीत असते शैव संस्कृतीत ही जाणीव व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राम नवमी राम फक्त पुल्लिंगी नाही स्त्रीलिंगीही आहे प्राचीन काळी ह्या दिवशी बायका आपल्या आईने व आजीने दिलेले दागिने व सासू व आजेसासू व तिच्या आधीच्या बायकांचे दागिने पूजत व घालत व रात्री ते उतरवून पुन्हा आपल्या घराण्याच्या पेटीत ठेवत त्यामुळे आपल्या आधी होऊन गेलेल्या स्त्रियांशी एकप्रकारची कनेक्टिव्हीटी निर्माण होई ही प्रथा आता लोप पावलेली दिसते ह्याला शिवीपूजन म्हंटले जाई शिव पुल्लिंगी शिवी स्त्रीलिंगी आता शिवी हा शब्द काय अर्थाने वापरला जातो हे मी सांगायला नकोच कट्टर व हट्टाहासाने शेणवी (मूळ शब्द शंभवी ) ब्राम्हण राहिलेल्या घराण्यांत ही प्रथा १९७० पर्यंन्त होती मराठवाडा विदर्भ नागपुरात ही प्रथा ब्राम्हणांच्यात टिकली पण दिवस बदलला
तुम्ही म्हणता
रामाचे नाव प्रॉमिनंटली येऊ लागले ते "राम मंदिर आंदोलन" सुरु झाले, बाबरी पडली त्यानंतर. पण तरीही घरात रामाची पूजा झाल्याचे आठवत नाही. दरवाजांवर "वि हीं प" वाल्यांनी स्टिकर लावेपर्येंत रामाचा फोटो नव्हताच.
फक्त पणजोबांच्या जमान्यातील शाळीग्राम एक होता. नाहीतर सर्व काही देवी, शिव, नवनाथ, साईबाबा प्रा. लि. होते.
हे स्वाभाविकच नाही काय ? खरेतर घरोघरी हीच स्थिती आहे पण स्वतःचा देवारा बघण्याऐवजी रामायण महाभारत बघितल्यावर काय होणार ? आपण कशाची पूजा करतो किंवा आपले पूर्वज कशाची पूजा करत होते ह्याचंही बहुजन समाजाला भान उरलं नाही भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही वैष्णवांनी पूर्णपणे आपल्या नावाने केली आहे हे सहजासहजी लक्ष्यात येत नाही गांधीजींच्या प्रार्थनेत शिव पार्वतीची एकही प्रार्थना न्हवती हे कोणीही सांगत नाही अल्ला आणि गॉड नीट दिसणाऱ्या गांधींना स्वतःच्या अनुयायांचे शिव पार्वती का दिसत न्हवते कि बहुजन शैव फक्त मरायला आणि ब्रिटिशांचा मार खायाला ठेवले होते ?
पुरोगाम्यांनी शैव स्वीकारले असते तर जी रिकामी जागा होती ती नीट भरली गेली असती पण दुर्देवाने हे झाले नाही आणि मग ही रिकामी असलेली जागा मोदीनां पुढे करून भाजपने बळकावली आणि शैवांनी हर हर महादेव म्हणत आपली सारी ताकद मोदींच्यामागे उभी केली
पुरोगामी भाजपप्रणीत शैवांच्याकडून पराभूत झालेत हे कळण्याइतकीही अक्कल पुरोगामी लोकांना उरलेली नाही जोपर्यंत भाजपकडे गेलेला हा शैव पुन्हा परतत नाही तोवर पुरोगाम्यांना विजय मिळणे शक्य नाही खरेतर हे सर्व काय होणार म्हणून नंतर काय होते आहे म्हणून आणि काय झाले म्हणून मांडत होतोआणि आता काय करता येईल म्हणून मांडतो आहे राहुल गांधींनी गुजरात विधानसभा निवडणुकीत मीही शैव काश्मिरी ब्राम्हण आहे म्हणून सांगितल्या सांगितल्या टेबल फिरले होते पण मणिशंकर अय्यरसारख्या कट्टर वैदिक सेक्यूलर असलेल्या लोकांच्या नादाला लागून पुन्हा राहुल गांधी बदलले आणि बदललेली टेबलं पुन्हा भाजपकडे फिरली
तुम्ही म्हणता
आमच्या गल्लीतही, जवळपास सुद्धा राम मंदिर नाही. माहित असलेले एक पार्ल्याला होते. मुंबईत जसे उत्तर भारतीय येत गेले तसे दशहरा इत्यादी आणि राम वगैरे मंडळींची पूजा आसपास सुरु झाली. दहीकाला होत असे पण त्यात पूजेपेक्षा गंमतीचा भाग अधिक होता.
हे खरे आहे
तुम्ही म्हणता
मग प्रश्न असा पडतो कि राम या "देवते"ला दक्षिण भारतात, शैव, शाक्त समुदायांत, सर्वसामान्य जनतेत कितपत स्थान आहे? आणि राम मंदिर आंदोलनाचा मुख्य मुद्दा "रामाचे मंदिर उभारणे" हा होता कि "गर्व से कहो" मधून मुस्लिम विरोधी अस्मिता निर्माण हा होता?
टिळकांनी शिव जयंती उत्सव व गणेश उत्सव सुरु करून हिंदुत्ववादी आंदोलनांची त्यामागच्या स्ट्रॅटेजीची पायाभरणी केली १९८५ पर्यंत हिंदुत्व आरएसएस प्रणित हिंदुत्व अजमावत होते पण यश मिळेना तेव्हा पुन्हा ह्या लोकांनी टिळकांच्या हिंदुत्वाच्या मार्गाने जाण्याचे निश्चित केले व टिळकांच्या शिव जयंती व गणेश उत्सवासारखे राम जन्मभूमी आंदोलन सुरु केले शाहबानो प्रकरणाने हवा हलवली होती ह्या आंदोलनाने वादळ निर्माण केले
शाहबानो व बाबरी मस्जिद ही मुस्लिम अस्मितेची प्रतीके बनली व त्याविरुद्ध हिंदुत्व ही हिंदू अस्मिता तयार करण्यासाठी राम जन्मभूमी वापरण्यात आली आणि ही खेळी यशस्वी झाली गुलाम जेव्हा आपल्या मालकांच्या बाजूने आपल्याच बंधूंच्याविरुद्ध लढतात तेव्हा ती गुलामाची हाईट असते हे काही आजचे नाही रामायणातही शैव असलेला हनुमान रामाला मदत करतो ह्याही आंदोलनात विटा घेऊन अनेक शैव गेलेच होते ही नव्या युगाची वानरसेना होती
मध्ययुगीन वैष्णव संतांच्या चळवळीने व भारतीय स्वातंत्र्य चळवळीने व साठोत्तरी देशीवादी चळवळींनी बहुजन शैवांची मानसिकता हिंदू बनवली होती (महाराष्ट्रात वारकरी )तिला हिंदुत्ववादी बनवले ते राम जन्मभूमी चळवळीने टिळकांचे हिंदू राष्ट्र मिशन एका अर्थाने पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले हे अत्यंत महत्वपूर्ण पाऊल आहे जी अयोध्या फक्त शैव देवतांना पूजत होती तिथे राम मंदिर उभे राहणे हा वैष्णवांचा शैवांवरचा सर्वात मोठा विजय आहे गर्वसे कहो हम हिंदू है ही वैष्णव संतांच्या भक्ती चळवळीने सुरु केलेल्या आरंभाचा मध्य आहे आणि रामराज्य हा शेवट आहे तुम्ही विचाराल श्रीकृष्णराज्य का नाही ह्याचे उत्तर श्रीकृष्ण कधीही राजा झाला न्हवता म्हणून ! श्रीकृष्णाने जे राज्य निर्माण केले ते द्वारका पण त्याचा अधिपती श्रीकृष्ण न्हवता तर बलराम होता आणि शेवटी यादव दारू पिऊन आपापसात लडून मेले व द्वारका बुडाली त्यामुळे द्वारका आदर्श होऊ शकत नाही म्हणून श्रीकृष्णराज्य नाही तर अयोध्येतून रामराज्य ! आणि रामराज्य हवे म्हणून रामजन्मभूमीआंदोलन व राम मंदिर !
हिंदुत्ववाद्यांना मठ्ठ समजणारे लोक मठ्ठ आहेत हिंदुत्ववादी आपणाला प्रथम काय करायचे हे ठरवतात व मग अत्यंत एकसंधपणे त्यांची टीम काम करते एकगठ्ठा ब्राम्हणांचा एकगठ्ठा टोळीवादी अटॅक ही विचारपूर्वक केली जाणारी झुंडशाही असते मुस्लिमही हेच करतात फरक एकच मुस्लिम अधिक धर्मांध आहेत अन्यथा दोन्ही धर्माध लोकांचे समूह आहेत त्यांच्यापुढे ना जैन टिकले ना बौद्ध त्यांच्यापुढे फक्त शैव टिकले आणि ख्रिश्चन !
खरेतर मुस्लिमांनी बाबरी मशिदीमागे मुस्लिम अस्मिता उभी करून तिला मुस्लिम अस्मितेचे प्रतीक बनवून फार मोठी घोडचूक केली मुस्लिमांच्या दृष्टीने ही मशीद होऊच शकत नाही आणि ह्या जागी ते मशीद बनवणार पण नाहीत पण प्रश्न अस्मितेचा झाला आणि आता ती पराभूत झाली
हा प्रश्न शाहबानो प्रकरणामुळेच पेटला जर काँग्रेसने हे अल्पसंख्यांकी लाडाचे पाऊल उचलले नसते तर भाजपला एव्हढा सपोर्टच मिळाला नसता
असो जे झाले ते झाले खुद्द मुस्लिम बहुमतानेही राम मंदिर व्हावे असा कौल दिल्याने मीही नंतर त्याला पाठिंबा दिला मात्र लोकशाहीचा आदर म्हणून हा पाठिंबा दिला आहे माझ्यासाठी आजही अयोध्येचा देव शिवच आहे आणि राम आर्य असूनही शिवभक्त ज्याने कुठेही विष्णूच्या मूर्तीची स्थापना न करता शिवलिंग मात्र स्थापन केले
आणि ज्याचा वापर सनातन आर्य धर्माचा पाईक म्हणून झाला .
श्रीधर तिळवे नाईक
खरेतर मुस्लिमांनी बाबरी मशिदीमागे मुस्लिम अस्मिता उभी करून तिला मुस्लिम अस्मितेचे प्रतीक बनवून फार मोठी घोडचूक केली मुस्लिमांच्या दृष्टीने ही मशीद होऊच शकत नाही आणि ह्या जागी ते मशीद बनवणार पण नाहीत पण प्रश्न अस्मितेचा झाला आणि आता ती पराभूत झाली
हा प्रश्न शाहबानो प्रकरणामुळेच पेटला जर काँग्रेसने हे अल्पसंख्यांकी लाडाचे पाऊल उचलले नसते तर भाजपला एव्हढा सपोर्टच मिळाला नसता
असो जे झाले ते झाले खुद्द मुस्लिम बहुमतानेही राम मंदिर व्हावे असा कौल दिल्याने मीही नंतर त्याला पाठिंबा दिला मात्र लोकशाहीचा आदर म्हणून हा पाठिंबा दिला आहे माझ्यासाठी आजही अयोध्येचा देव शिवच आहे आणि राम आर्य असूनही शिवभक्त ज्याने कुठेही विष्णूच्या मूर्तीची स्थापना न करता शिवलिंग मात्र स्थापन केले
आणि ज्याचा वापर सनातन आर्य धर्माचा पाईक म्हणून झाला .
श्रीधर तिळवे नाईक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा