सण , उत्सव आणि डे श्रीधर तिळवे नाईक

अलीकडे डे च फॅड प्रचंड वाढलंय जे स्वाभाविक आहे पण त्यामुळे आपल्या जुन्या गोष्टींचे खरे अर्थ आपण विसरून गेलो आहोत आर्यांच्या संस्कृतीत व्रत वैकल्य व यज्ञ तर शैवांच्या संस्कृतीत सण , उत्सव व पूजा ह्यांचे प्रचंड महत्व भारतीय संस्कृतीत व्रत वैकल्य  यज्ञ  सण , उत्सव व पूजा ह्या सहाही गोष्टींचे त्यामुळे अतोनात महत्व आहे ह्यातील व्रत हे असुर लोकांचे किंबहुना व्रत पाळणारे ते व्रात्य असे आर्य म्हणत आजही दबंग मुलामुलींना व्रात्य वा वात्रट म्हणतो ते त्यामुळेच ! महाभारताचा नायक नसलेला मूळ असुर श्रीकृष्ण हा व्रात्य होता व गुजरातचा अधिपती ! त्याचा आणि महाकाव्याचा काडीचाही संबंध न्हवता  व्रात्य हे पुढे जैन बनले आणि व्रत ठेवणे ही जैन धर्माची खासियत बनली ह्या व्रात्य श्रीकृष्णाची आणि महाभारतातल्या श्रीकृष्णाची सांगड घातली गेली आणि गुजराती श्रीकृष्ण तयार झाला गुजरातमध्ये व्रतांचे आजही प्रचंड फॅड आहे जे पुढे भारतभर पसरले

यज्ञ हे उत्तरभारतीय हिमालयाच्या पायथ्याशी आग हवी म्हणून सुरु झालेले ! जशीजशी आग पवित्र होत गेली तशी तशी ती धर्माचा आधार बनत गेली ह्यातूनच पुढे आगीला पवित्र मानणारा व सूर्याला पुजणारा पारशी धर्म तयार झाला साधारण इसवीसनपूर्व ५०००च्या  आसपास असं काही घडलं कि आर्य हिमालयावरून पन्जाबात व ऊत्तर अफगाणिस्तानात  उतरले तसे इंद्राचे महत्व वाढले कारण पशुपालनासाठी कुरण व कुरणासाठी पाऊस महत्वाचा होता पुढे इसवीसन १६०० च्या आसपास आर्य आणि शैव दोघांनाही दक्षिणेत उतरावे लागले आर्यांनी दक्षिणेत वेद रचले परीस्थिती पुन्हा बदलल्यावर हे लोक पुन्हा उत्तरेकडे वेद घेऊन सरकले त्यामुळे यज्ञ भारतभर पसरले

शैवांच्यात ह्या काळात उत्सव तयार झाले उत्साह वाढवतात ते उत्सव म्हणून ! शिव शक्ती गणपती कार्तिकेय नंदी यम यक्ष कुबेर ह्यांची पूजा सुरु झाली शैवांच्यात क्षणाचे व स्पंदांचे महत्व खूप  स्पंदांची बनतात स्पंदने धडकन
ठोके ! जेव्हा क्षण आध्यत्मिक होतात तेव्हा सण होतात उत्सवात पूजा तर सणात अध्यात्मिक साधना महत्वाची त्यामुळेच गुरुपौर्णिमा ज्या दिवशी सप्तर्षींना शिवांनी  पहिला उपदेश केला वा महाशिवरात्र ज्या दिवशी शंकराला मोक्ष प्राप्त झाला व तो शिव बनला हे सण आहेत उत्सव न्हवेत तर वसंतपंचमी हा उत्सव आहे कारण ह्यादिवशी पार्वतीने शिवाला प्रपोज केले ( शैवांच्यात प्रपोज करण्याचा हक्क स्त्रीला आहे आणि आजही अनेक आदिवासी जमातीत स्त्री तिच्या पसंतीच्या पुरुषाला माळ घालते ) आणि त्याने ते प्राप्त झाले तर लग्न करीन असे वचन दिले
कामदहन दिन ज्याला आज आपण होळी म्हणतो हाही कामवासनेवर नियंत्रण मिळवण्याची साधना करण्याचा सण आहे उत्सव न्हवे शन्कराने साधनेत अडथळा आणणारा काम जाळला म्हणून होळी कामवासना जाळण्यासाठी त्यासाठी लाकडं जाळणं हा मूर्खपणा दुर्गापूजा हा शाक्त सण आहे शक्तीची साधना करण्याचा सण त्याउलट गणेश उत्सव हा गणाचा आपल्या मंडळाचा अधिपती गणपती अध्यक्ष निवडण्याचा उत्सवच आहे दीपावली हा यम कुबेर बळी कार्तिकेय व पार्वती ह्यांचा उत्सवच आहे

डे हे नाहीश्या होत चाललेल्या गोष्टींचे त्या नाहीश्या होऊ नयेत म्हणून केले जाणारे सेलिब्रेशन आहे म्हणजे मदर्स डे आईवरचे आपले प्रेम नाहीसे होत चाललंय म्हणून ते नाहीसे होऊ नये म्हणून साजरे होणारे सेलिब्रेशन हत्ती डे हा हत्ती  नाहीसे होत चाललेत  म्हणून ते नाहीसे होऊ नये म्हणून साजरे होणारे सेलिब्रेशन फादर्स डे म्हणजे बापावरचे प्रेम नाहीसे होत चाललंय ते नाहीसे होऊ नये म्हणून साजरे होणारे सेलिब्रेशन फ्रेंड्स डे म्हणजे फ्रेंड्स वरील प्रेम नाहीसे होत चाललंय म्हणून ते नाहीसे होऊ नये म्हणून साजरे होणारे सेलिब्रेशन वैग्रे ! कार्पोरेटशाही मग ती अमेरिकेसारखी भांडवलवादी असो वा चायनासारखी कम्युनिस्ट असो प्रथम जीवघेणी स्पर्धा निर्माण करून ह्या गोष्टी नाहीश्या करतं आणि मग त्या नाहीश्या झाल्यानंतर आपल्या मनाचा तोल बिघडेल म्हणून त्या सावरण्यासाठी त्यांच्या सेलिब्रेशनचे डे ही साजरे करते हा एक सायकॉलॉजिकल विरोधाभास आहे आणि तो नव्या अर्थव्यवस्थेतून जन्माला येतो बरे ह्यातून निर्माण होणारा पैसा पुन्हा कॉर्पोरेट्स कडे येतो त्यामुळे लॉसही नाही
मी त्यामुळे डे साजरे करत नाही पण कुणी साजरे करत असेल तर विरोधही करत नाही कारण अनेकदा ती सायकॉलॉजिकल गरज असते कामाचे प्रेशर व गिल्ट दोन्ही रिलीज होतात

आपणाला आता ह्या सगळ्या गोष्टींसकट जगायला हवे

श्रीधर तिळवे नाईक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट