गणपतीचं जानवं शैवांचे सुत्त सूत्र आणि आर्यांचे उपनयन श्रीधर तिळवे
हल्ली गणपतीच्या जानव्यावरून वाद सुरु आहे म्हणून हे लिहितोय
जगाच्या प्राचीन इतिहासात कापसाचा शोध ज्या देशात लागला त्यापैकी एक भारत होय दुसरा पेरुमेक्सीको प्रदेश कमीतकमी सात हजार वर्षांपासून भारत कापूस व कापसापासूनचे तयार होणारे पदार्थ जसे कपडे बटणे (हा तर भारतीयांचा शोध असावा )वापरतो आहे साहजिकच कापडापासून तयार होणारे वेळू वेळूपासून तयार होणारे सुत्त सूत्र आणि सुतापासून तयार होणारे सुती कपडे व दोर हे कायमच आकर्षणाचे विषय आहेत भारतात सुत नावाचा एक समाजच प्राचीन काळापासून वावरतो आहे सूत्र पुढे न्हेणे म्हणजे परंपरा पुढे न्हेणे त्यातूनच कथा कविता गीते सांगणारे लोकही सूत म्हणून ओळखले जाऊ लागले आणि भगवान शिवाच्या वचनांना सुत्त म्हंटले जाऊ लागले पुढे सूत्रवांग्मय हे स्पेशल वाङ्मय बनले साहजिकच सूत्राचा वापरही पवित्र बनला
शैवांच्यात
१ मळसूत्र
२ लिंगसूत्र व
३ मंगल सूत्र
ही सुत्ते कायमच महत्वाची मानली जातात ह्यातील मंगळसूत्र आता सर्वांनाच माहित आहे पण अनेकांना हे माहीत नाही कि मंगल सूत्र पती पत्नी दोघांनीही घालायचे असते आपण हल्ली पतिराजांना चेन घालतो तो पुरुषी मंगळसूत्राचा आधुनिक अवतार आहे जेव्हा शैव धम्म स्वीकारलेल्या आर्यांनी विशेषतः असुर आर्यांनी अनार्य स्त्रियांशी विवाह करायला सुरवात केली तेव्हा अनार्य बायकांनी मंगळसूत्र फेकायला नकार दिला आणि आर्य पुरुषांनीही बायकांची गोष्ट म्हणून त्याकडे दुर्लक्ष्य केले पुढे आर्यांच्यात ह्याचीच रूढी झाली
शैवांच्यात व्यक्ती जन्मल्या जन्मल्या नामकरण करतांना मळसूत्र घातले जाते आणि जेव्हा व्यक्ती विद्यार्थी बनते तेव्हा मळसूत्र काढून इष्टलिंग सूत्र घालायची पद्धत आहे ह्यात सूत्र गळ्यात घालून त्यात लिंग किंवा ओम ह्यांचे चित्र वा शिल्प ओवले जाते मोक्षाला व ज्ञानाला पात्र झाल्याचे ते लक्षण असते हे मरेपर्यंत काढता येत नाही आणि दफन वा दहन वा शवविसर्जन करतांना ते देहासोबत ठेवले जाते मात्र ज्याला मोक्ष मिळतो त्याच्या गळ्यात कसलेही सूत्र ठेवण्याची पद्धत नाही कारण त्याचा कापूस आणि पाश मरणापूर्वीच जळाले नाहीसे झाले हे आकलन असते
ह्या मळसूत्रावरूनच पुढे माळ बनली
आर्यानी जेव्हा हे मळसूत्र पाहिले तेव्हा त्यांनाही असे काहीतरी करावेसे वाटले त्यातून जानवे जन्मले गणपती हा ज्ञानोपायाने मोक्षाला पोहचलेला सिद्ध शिवपुत्र होता त्याला जानवे सोडाच पण कुठलेही मळसूत्र घालणे हे शिवविरोधी गणपतीविरोधी आहे त्यामुळे जानवे घातलेली मूर्ती शैव धम्मीयांनी खरेदी करू नये हे उत्तम बाकी तरीही आर्य धर्मीय म्हणून खरेदी करायची असेल तर ते स्वातंत्र्य आहेच गणपतीची मिरवणूक व उत्सव ही शैव पद्धत आहे पण गणपतीचे विसर्जन ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे कृपया ती करू नका ती शैव धम्माला धरून नाही प्राचीन काळी गणपती हा यज्ञात विघ्न आणणारा म्हणून आर्यांना विघ्नकर्ता वाटत होता म्हणून त्याला संतुष्ट करण्यासाठी जेणेकरून त्याने अडथळे आणू नयेत म्हणून आर्यांच्या घरी काही तासांसाठी वा दिवसासाठी गणपती आणला जाई जेणेकरून यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडला जावा ह्या तात्पुरत्या आणलेल्या गणपतीचे काय करायचे म्हणून त्याचे विसर्जन सुरु झाले तेव्हा विसर्जन ही आर्य पद्धत आहे अनार्यांच्यात फक्त मिरवणूक आहे तेव्हा मिरवणूक काढा पण विसर्जन करू नका आता ह्या वर्षासाठी मिरवणूक काढावी का तर नाही कोव्हीडची साथ असल्याने कृपया ह्यावर्षी मिरवणूक काढू नका पुढच्या वर्षी काय करायचे ते पुढच्या वर्षी पाहू
श्रीधर तिळवे नाईक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा