वार्ता शैवांची व वार्ता आर्यांची श्रीधर तिळवे नाईक
सध्याचे जग हे तंत्रज्ञानाचे आहे साहजिकच तंत्रज्ञानाची भारतीय भूतजालकी काय होती असा प्रश्न अनेकांना पडतो भारतात विज्ञान नसले तरी शैवांच्यात वार्ता म्हणजेच तंत्रज्ञान होते कौटिल्याचे अर्थशास्त्र सापडल्यानंतर त्यात वार्तेची चर्चा असल्याने आपल्याकडे वार्तेची चर्चा सुरु झाली हा ग्रंथ इसवीसन तिसऱ्या शतकात लिहिला गेला असल्याने व ह्या शतकात आर्य संस्कृतीत वर्णव्यवस्था स्थिर झाल्याने कौटिल्याची मांडणी ही आर्य संस्कृतीची मांडणी म्हणून पुढे आली ह्याचा लेखक हा गुजरात व उत्तर महाराष्ट्राचा असल्याने गुजरात महाराष्ट्रात कौटिल्य सर्वाधिक फोफावला अश्मक अवंतीशी असलेला परिचय कर्क वृत्ताशी निगडित असलेल्या भोगोलिक घटनांचा उल्लेख फक्त ह्याच प्रदेशात अस्तित्वात असलेले ग्रामकूल ह्यामुळे आता हा लेखक गुजराती वा मराठी असल्याचे सर्वमान्य झाले आहे पण त्यामुळेच मगध राज्याच्या अमात्याशी म्हणजेच विष्णुगुप्तशी ह्याचा थेट संबंध नसावा हेही स्पष्टच दिसते चाणक्य ही दंतकथा नंतर ब्राम्हणांनी तयार केली असावी
ह्या ग्रंथात आर्यांची वार्ता काय होती हे स्पष्ट झाले आहे
आर्यांची वार्ता
पशुपालन , शेती व व्यापारउद्योग ह्यांचे व्यवहार म्हणजे वार्ता अशी आर्यांची व्याख्या आहे वार्ता हे वैश्य शूद्रांचे काम आहे अशी आर्यांची समजूत असल्याने व कौटिल्य हा अर्धवट ज्ञानाचा ब्राम्हण असल्याने त्याला ती कळलीच नाही कारण वैश्य काय करतात हेच माहित नाही विष्णुगुप्त ज्याने मूळ अर्थज्ञान लिहिले त्याला मात्र धनविद्या दंडनीती आणि समाजविद्या नीट अवगत होती कारण तो धनसमुदायातला होता
शैवांची वार्ता
शैवांच्या मते वार्ता म्हणजे पशुपालन ,शेती , व व्यापारउद्योग ह्यांच्यातील तंत्रज्ञान व व्यवहारज्ञान आजही ह्या तीन क्षेत्रातील लोक चला मग व्यवहाराचं बोलूया किंवा तो व्यवहाराला वाईट आहे किंवा बेभरवशाचा आहे असे उद्गार काढत असतात ह्यातील तंत्र हा शब्द आध्यत्मिक क्षेत्रात एक उपाय म्हणून वापरला जात असला तरी प्राचीन काळी त्याला आज ज्या अर्थाने तंत्रज्ञान हा शब्द वापरला जातो त्याही अर्थाने तो वापरला जात असे सर्वसाधारण वार्ता ही सात लोकांच्याकडून हाताळली जात असे १ शेठ किंवा सेठ किंवा दक्षिणेत शेट्टी २ कलावंत ३ पणी , ४ वाणी ५ व्यापारी ६ भटके
१ ह्यातील शेठ व सेठ हा शब्द शेत ह्या शब्दापासून तयार झालेला आहे ह्याला ब्रिटिशांनी बदनाम केला कारण ब्रिटिशांना शेठ पद्धत पूर्ण बंद पाडून आपल्या ताब्यात घ्यायची होती फुले ह्याला बळी पडले पण गंमत म्हणजे खुद्द फुल्यांना लोक सेठ म्हणायचे उत्पादन करणाऱ्या लोकांचा प्रमुख हा पशुपालक शेती व्यापारउद्योग असा तिन्ही क्षेत्रात होता
२ कलावंत ह्याचे दोन प्रकार होते १ कलाकार हा कलेत माहीर असायचा काहीवेळा नवीन काही शोधायचा २ कारागीर हा कलावंताने शोधलेला साचा गिरवून उत्पादन करायचा उदा लोहार चांभार प्राचीन काळी शैवांच्यात कलेला उद्योग म्हणूनच पाहिले जात होते
३ पणी पाण्यावरून जगभरातले सामान आयात निर्यात करणारा हे सेठकडून त्यांचे उत्पादन खरेदी करायचे
४ वणी वा वाणी स्थानिक देशात सामान स्टोअर करून दुकानात विकणारा
५ व्यापारी पणींकडून माल खरेदी करून वाणींना विकणारा
६ भटके व्यापाऱ्याकडून माल खरेदी करून भटकंती करून ते विकणारे आजही फेरीवाले गाडीवाले म्हणून हे अस्तित्वात आहेत एकेकाळी वंजारी ही आदिवासी जमात ह्यामुळे खूप श्रीमंत झाली होती ह्याशिवाय कासार वैग्रे लोक ह्यात येतात
७ श्रमिक जे श्रमाची कामे ह्या लोकांच्या हाताखाली करत
आजही ह्या व्यवस्थेत फार फरक पडलेला नाही फक्त आर्यही ह्या व्यवस्थेत पडतायत एव्हढेच
वार्तेत खालील गोष्टींचा समावेश होतो
१ तंत्रविद्या प्राचीन काळापासून अनेक विद्या ह्यात येतात उदा लोहारांची रसविद्या सुताराची सुतारविद्या रसदर्शनांसारखी शैव दर्शनही ह्यातून जन्मलेली आहे प्रत्येक कलावंताला कलाकाराला कारागिराला तंत्रविद्या येणे आवश्यक असे
२ व्यवहार प्रत्येक वार्ता क्षेत्रात असणाऱ्याला व्यवहार येणे आवश्यक होते ह्या व्यवहाराच्या तीन बाजू होत्या
१ व्यवस्थापन ह्यात धनविद्या , राजविद्या(दंडनीती ) आणि समाजविद्या (पंचायतविद्या किंवा पंचानन विद्या )ह्यांच्या आधारे पशुपालन , शेती व व्यापारउद्योग , राज्य , आणि स्वतःचा समाज चालवणे
२ आस्थापन ह्यात कमावलेल्या संपत्तीचे वितरण कसे करायचे त्याचे व्यवहार येतात ह्यातच दार्शनिक व्यवहार येतात ज्यात दान करणे वैग्रे व्यवहार यमनियमाचे व्यवहार येतात
३ प्रबंधन इंतजाम प्रबंध म्हणजे तात्कालिक व्यवहार म्हणजे त्या त्या वेळचे तात्कालिक व्यवहार
मी स्वतः वार्तेत वाढवला गेलेला मुलगा होतो त्यामुळे हिच्याशी माझा घनदाट परिचय होता व आहे वार्ता सांभाळणाऱ्यांना पाप योनीत टाकणाऱ्या आर्य संस्कृतीला काय म्हणायचे हा आजही प्रश्न आहे
श्रीधर तिळवे नाईक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा