चौथी नवता  आणि धर्म मोक्ष श्रीधर तिळवे नाईक 

काही लोकांचा माझ्याबाबत गोंधळ उडालेला आहे म्हणून हे लिहितोय

मोक्षाने प्रबोधनाने धर्म मुळापासून उखडण्याचा प्रयत्न केला खरा पण प्रत्यक्षात धर्म उखडला गेला नाही त्यामुळे आधुनिक विचाराची सुरवातच मुळी गॉड इज इल्लोजिकल म्हणूनच मी त्याचा स्वीकार करतो ह्या किर्केगार्दच्या वाक्याने झाली आधुनिकतेने  धर्म स्वीकारला आणि शेवटी उत्तराधुनिकतेने धर्म अक्षरशः केंद्रस्थानी आणला आणि आज जगभर धार्मिक राजवटी यायला सुरवात झाली ह्याचा प्रतिकार फक्त चौथ्या नवतेचे लोक करत होते आणि त्यांनी केला पाहिजे 
चौथ्या नवतेची सात  तत्वे आहेत 
धर्म मूळापासून उखडणे 
हे शक्य नसेल तर पारलौकिकता पूर्णपणे नाकारून अस्तीत्वात असलेले धर्म अधिकाधिक विज्ञाननिष्ठ तंत्रज्ञानप्रवण चिन्हज्ञानप्रवण चिन्हतंत्रज्ञानप्रवण बनवणे 
धर्म आणि धम्म ह्यांच्यातील फरक सतत सांगणे 
मूळ दर्शने सतत मूळ रूपात मांडणे उदा शिवाचा ,बुद्धाचा वा महावीराचा मूळ उपदेश लोकांना सांगणे मी शैवाचार्य म्हणून शिवाचा मूळ उपदेश मांडत असतो एखादा ब्राम्हणधर्मी असेल तर त्याने ब्राम्हणधर्माचा मूळ उपदेश काय ते मांडावे जर एखादा नास्तिक आहे तर त्याने नास्तिकवाद मांडावा जर एखादा गोंधळलेला असेल तर त्याने आपला गोंधळ मांडावा प्रामाणिक मांडणी ही सद्या खूप गरजेची बनली आहे 
  मोक्षावर वा निर्वाणावर विश्वास नसेल तर समाज  किमान स्वावलंबन ,स्वातंत्र्य ,अबद्धता म्हणजे दास्यापासून सुटका , मुक्तता , मुक्ती निःपाश ह्यांच्या दिशेने न्हेणे 
ह्यानंतर मोक्ष येतो जर मोक्षावर विश्वास असेल तर स्वावलंबन ,स्वातंत्र्य ,अबद्धता म्हणजे दास्यापासून सुटका , मुक्तता  मुक्ती , निःपाश ह्यांच्यासह मोक्षाच्या दिशेने न्हेणे 
मोक्षावर धर्मावर विश्वास नसलेल्या विचारांचा आदर  करणे नास्तिक विचार हा समाजाला अधिक पुढे घेऊन जातो त्यामुळे कुराणापेक्षा वेदांपेक्षा रिचर्ड डॉकिन्स महत्वाचा आहे 

मोक्ष त्यांनाच मिळतो जे धर्म आणि देव मूळापासून उखडतात पण काही लोक मोक्षाच्या मागे जात नाही मात्र त्यांना  मोक्षाचाच शोध असतो  कारणं प्रत्येकाला शेवंटी  आपल्या दुःखाचे मूळ असोशीत म्हणजे भूक तृष्णा निकड ह्यांच्यात आहे हे कळते मोक्षाचा मूळ कणा संयम आहे आणि समाज संयमाच्या आधारेच उभा राहतो 
त्यामुळे संयम शिकवणे ही गरज आहे 

श्रीधर तिळवे नाईक 
चौथी नवता  आणि धर्म मोक्ष

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट