मी टिळकांच्याविषयी का लिहितो : प्रस्तावना २ श्रीधर तिळवे नाईक १

टिळकांच्या मृत्यूशताब्दीविषयी टिळकांच्याविषयी लिखाण करायला घेणे ही खरीतर वैचारिक रिस्क आहे वातावरण पूर्ण ब्राम्हणविरोधी आहे इतके कि महाराष्ट्र सदनात शिवाजी महाराज फुले शाहू महाराज आंबेडकर व यशवंतराव चव्हाण ह्या सर्वांचे पुतळे उभारले  गेले पण टिळकांचा पुतळा उभारला  गेलेला नाही टिळकांना ब्राम्हण असण्याची आपण शिक्षा देत आहोत हे स्पष्टच आहे वास्तविक टिळक जर ब्राम्हणधर्माचे असतील तर त्यांची मते खोडून काढणे अत्यंत आवश्यक आहे पण ते करण्याऐवजी त्यांच्या कर्तृत्वालाच नाकारणे ही ब्राम्हणी चाल झाली आणि ती जशास तशे म्हणून खेळली गेली तरी ब्राम्हणेतरांच्या भल्याची नाही टिळकांनी फुल्यांची दखल घेतली नाही भगवान शिव वा बसवेश्वर ह्यांची दखल घेतली नाही वा अशैव (टिळकांच्या भाषेत द्रविड ) संस्कृतीविषयी बोलणे शक्यतोवर टाळलं हे सर्व खरं असलं तरी वैचारिक क्षेत्रात हे न्यायाला धरून नाही आर्यांनी गाय मारली म्हणून आपण वासरू मारावे हे बरे न्हवे

टिळकांच्या जन्मशताब्दीला मिळणारा प्रतिसाद मृत्यूशताब्दीला मिळणार नाही हे उघड आहे कारण टिळकांचे काम राजकीय होते व ते १९४७ साली संपले अशी असलेली गैरसमजूत ! प्रत्यक्षात टिळकांना अभिप्रेत असलेले हिंदुत्ववादी राज्य हे आता सत्तेवर आले आहे टिळक संपलेत ते हिंदुत्ववाद्यांनी त्यांच्याकडे केलेल्या दुर्लक्ष्यामुळे पण असे दुर्लक्ष्य फक्त टिळकांच्याच न्हवे तर सावरकर , हेडगेवार ह्यांच्या वाट्यालाही आले आहे कारण ह्यांच्या कुणाचेच नातेवाईक सद्य राजकारणात महत्वाच्या जागी नाहीत आणि हे लोक व्होटिंग पुलर नाहीत काँग्रेसला टिळक प्रतिगामी वाटतात म्हणून प्रमोट करावेसे वाटत नाहीत अशीही एक गैर समजूत आहे असे असेल तर मग काँग्रेस आगरकरांना का प्रमोट करत नाहीये ते तर नेहरुं विचाराचे आद्य पुरुष आहेत वस्तुस्थिती अशी आहे कि काँग्रेस आणि भाजप ह्या दोघांनाही कुठलाच दाक्षिणात्य विचारवंत प्रमोट करायचा नसतो ज्यात मराठीही येतात
अपवाद फक्त ऑक्सफर्ड केम्ब्रिज कोलंबिया सारख्या युरो अमेरिकन विद्यापीठातले आर्य असलेले वा आर्याळलेले दाक्षिणात्य ! महाराष्ट्रात ब्राम्हण ब्राम्हणेतर वादात वेदोक्त प्रकरणामुळे टिळक कायम ब्राम्हण पक्षाचे पुढारी म्हणून पाहिले गेले हे आणखी एक कारण ! शिवाय चित्पावनांची व उत्तर -पेशवाईची टिळकांनी केलेली भलावण म्हणजे रानडेंनासुद्धा टिळक नाना फडणवीस म्हणतात

टिळक हे पहिले राजकीय राष्ट्रीय पुढारी होते आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील दोन युगांपैकी एक युग एक  पर्व हे त्यांच्या नावाने ओळखले जाते जे योग्यच आहे दुसरे अर्थातच गांधी युग वा गांधी पर्व होते भारतीय स्वातंत्र्य युद्धाचे पाच प्रवाह  होते

१ पारंपरिक बंडे व उठाव : १८५७ ते बिरसा मुंडा
२वासाहतिक मवाळ राज्य : राजाराम रॉय दादाभाई नौरोजी रानडे टिळक ते सुरेंद्रनाथ बॅनर्जी , गोपालकृष्ण गोखले
३ स्वराज्य : टिळक बिपीनचंद्र पाल लाला लजपत राय अरबिंदो घोष
४ स्वातंत्र्य व पूर्ण स्वतंत्र राज्य : गांधी ते नेहरू
५ सशस्त्र क्रांती : सावरकर , बिरेंद्र दत्त , खुदिराम , चंद्रशेखर आझाद , भगतसिंग ते गदर व सुभाषचंद्र बोस

टिळकांनी ह्यातील तिसऱ्या प्रवाहाचे व टप्प्याचे  नेतृत्व केले पाचव्याला उत्तेजन दिले आणि स्वराज्य ही संकल्पांना एक राजकीय संकल्पना म्हणून विकसित करण्यात  सिंहाचा वाटा उचलला  स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य ह्या संकल्पना टिळकांच्यापूर्वी फक्त वैचारिक ज्ञानशास्त्रीय होत्या टिळकांनी त्यांना प्रत्यक्ष अंमलबजावणीत व चळवळीत आणून त्यांना एक व्यवस्थित राजकीय स्वरूप दिले व त्यांचे हत्यारात रूपांतर केले गांधी खरोखर टिळकांच्या पुढे गेले होते का हा प्रश्न आता विचारावा लागेल गांधींनी नैतिक साधनांनी लढाई लढली वैग्रे हे सर्व चले जाव आंदोलनापर्यंत ठीक आहे चले जाव मध्ये गांधीही टिळकांच्याप्रमाणे हिंसेकडे दुर्लक्ष्य करायला शिकलेले दिसतात गांधींचा वेगळेपणा हा सामाजिक बाबतीत त्यांनी टिळकांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या धोरणाच्या केलेल्या स्वीकारात आहे टिळकांनी आंतरजातीय(एकाच वर्णातील दोन जातीतील विवाह )  विवाहाला पाठिंबा दिला कारण खुद्द शंकराचार्यांनी जात हा घटक सनातन धर्माचा भाग नाही म्हणून टिळकांच्या काळातच पूर्ण नाकारला व आंतरजातीय  विवाह करा असे सांगितले मात्र आजही आंतरवर्णीय  विवाहाला शंकराचार्यांचा पाठिंबा नाही गांधिजिंच्यावेळीही न्हवता पण गांधीजींनी शंकराचार्यांचा आदेश धुडकावून आंतरवर्णीय ( म्हणजे दोन वर्णातील विवाह ) विवाहालाही पाठिंबा दिला मात्र गांधीजींचा आंतरधर्मीय विवाहाला पाठिंबा न्हवता त्यामुळे त्यांनी मुस्लिम सून स्वीकारायला नकार दिला जी माझ्या मते चूक होती

टिळकांच्याविषयी बोलायला नवीन काहीही राहिलेले नाही ही जवळ जवळ सर्वांनाच खात्री आहे विशेषतः गंगाधर गाडगीळ ह्यांची दुर्दम्य ही कादंबरी ही ललित लेखनातील व सदानंद मोरे ह्यांचे लोकमान्य ते महात्मा हे वैचारिक पुस्तक वैचारिक लेखनातील ही दोन्ही पुस्तके टिळकांच्याविषयीचे अंतिम लेखन आहे असा अनेकांचा समज आहे समजा हे खरं असलं तरी टिळकांच्याबाबत मला काही वेगळं दिसत असेल तर ते मी मांडावं कि नाही ?

माझी स्वतःची मांडणी टिळक हे आद्यहिंदुहृदयसम्राट होते अशी आहे हिंदुत्ववादाची पहिली समग्र मांडणी टिळकांनी केली हे मी इथे त्यांच्याच लेखनातले पुरावे घेऊन सिद्ध करणार आहे हा आद्य हिंदुत्ववाद आणि मग त्याला जोडून आलेले चार हिंदुत्ववाद असे हे मांडणशिल्प आहे हिंदुत्ववाद ही एकरेषीय विचारधारा आहे हा एक गैरसमज आहे ज्याप्रमाणे वैष्णवकेंद्री हिंदुवाद एकरेषीय नाही व रानडे , गोखले , गांधी , विनोबा ,  नरसिंहराव ह्या प्रत्येकाचा हिंदुवाद वेगळा आहे त्याचप्रमाणे टिळक , सावरकर , ठाकरे , हेडगेवार , गुरुजी , नानाजी  देशमुख , दीनदयाळ , प्रमोद महाजन ह्या प्रत्येकाचा हिंदुत्ववाद वेगळा आहे हे दोन्ही विचारप्रवाह हिंदू धर्मातील नवहिंदुवाद व नवब्राम्हणवाद ह्यांचे  प्रतिनिधी आहेत  ह्यांना शह म्हणून डाव्यांच्या नवलोकायतवादी व आंबेडकरांची नवबौद्धवाद  अशा धारणा निर्माण झाल्या तरी त्यांना लोकांचा पाठिंबा मिळालेला नाही लोकायतांनी मोक्ष व धर्म दोन्ही नाकारले तसे कम्म्युनिस्टानी व काही समाजवाद्यांनी नाकारले तरी पुरातन चार्वाकांच्याप्रमाणे धर्म आणि मोक्षांच्यावर अत्यंत आक्रमक अशी टीका ह्यांनी करायला हवी होती ती ह्यांनी केली नाही आता तर असे वातावरण आहे कि भले भले डावे लोक स्वतःचा धर्म सांगायला लागलेत मुस्लिम धर्माला ठाम नकार देणे ह्यांना जमले नाही त्यामुळे विश्वासार्हता सम्पली चार्वाकांच्या काळात मुस्लिम ख्रिश्चन धर्म न्हवतेच त्यामुळे त्यांनी ह्यांच्यावर वैचारिक हल्ले चढवले नाहीत नवलोकायतवाद्यांनी हेच केले त्यांनी भारतीय धर्मांच्यावर टीका केली खरी पण ज्युडायिक धर्मानी जणू ह्यांना खरेदी केल्यासारखे हे लोक वागले नवबौद्ध तर एकजातीयच झाला बाबासाहेब सर्वांचेच आहेत ही गोष्ट हे लोक विसरले आणि आता नवबौद्ध हे ह्या देशातील एक टक्का लोकांचे वैचारिक राजकारण बनून वावरत असल्याने त्याचा परिणाम सम्पल्यात जमा आहे वंचित आघाडी ही शेवटची संधी होती पण ती नीट घेतली गेली नाही

अशा परिस्थितीत हिंदूवादी काँग्रेस वा आप  विरुद्ध  हिंदुत्ववादी भाजप व शिवसेना अशी द्विध्रुवात्मकता अटळ आहे अशावेळी करायचे काय ? निराश व्हायचे ? तर नाही ! एक तिसरा पर्याय आहे शैववादाचा !

ज्यावेळी शंकराचार्यांच्या वावटळीपुढे सगळे झोपी गेले तेव्हाही तिला थांबवणारे बसवेश्वर , नानक , शिवाजी महाराज  , बाजीराव पहिले , होळकर , रणजितसिंग ह्यांचे वादळ शैव होते  ! राजाराम मोहन रॉय , रानडे ह्यांनी हिंदुवाद उभा केल्यावर त्याला आव्हान देणारे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य शैव होते ! ह्या देशात जेव्हा जेव्हा वैष्णव व ब्राम्हणधर्म ह्यांनी अधर्म निर्माण केलाय तेव्हा तेव्हा त्याला शह फक्त शैवांनी दिलाय लोकायत तर ह्या देशात कायमच अल्पसंख्याक होते त्यामुळे त्यांनी कधीही शैवांना साथ दिली नाही हे लोक अंतिमतः आर्य विचारवंत होते आर्यत्वाची मिठी त्यावेळीही सैल झाली नाही आत्ताही ती होत नाहीये  हर्षवर्धन ह्या शैव सम्राटाने ब्राम्हणधर्म  व बौद्ध धर्म ह्यांचा वाद समोर आला तेव्हा तुम्ही दोन्ही आर्य धर्म म्हणून आपापसात दोघे तोड काढा म्हणून सांगितले तेव्हा ब्राम्हणधर्माच्या ब्राम्हणांनी बौद्धांनाही सवलती द्या फक्त अट एकच सर्व बौद्ध भिक्षूंनी जानवे घालावे अशी अट ठेवली तेव्हा तत्कालीन बौद्धानी ती अट स्वीकारली बौद्ध धर्माचा पराभव  तिथेच निश्चित झाला शंकराचार्य हे निमित्त झाले आजही हे जानवे अदृश्यपणे वावरत असते ही चूक सुधारता येण्याजोगी आहे पण बौद्ध धर्म स्वीकारल्यांनंतर आपोआप निर्माण होणारा आर्य अहंकार बाजूला ठेवायला लागेल अपवाद वगळता शैवांनी बौद्धांना कायमच पाठिंबा दिलाय मग ते सातवाहन असो कि वाकाटक कि वर्धन आजही बौद्ध व जैन आम्हाला हवेतच कारण त्यांच्याशिवाय ही लढाई लढतांना पूर्णत्व पावणार नाही पण ह्यापुढे टाळी एका हाताने वाजणार नाही

आणि ही लढाई लढायची असेल तर हिंदुत्ववाद व हिंदुवाद मुळापासून समजून घ्यावे लागतील खरेतर ही लढाई लढायची आमची इच्छा न्हवती शैवांनी गेली १२५  वर्षे ह्या दोघांना आलटून पालटून पाठिंबा दिलाय गांधींची चळवळ यशस्वी करण्यात शैवांचा प्रचंड वाटा होता पुढे शैव नेहरूंच्या मागे ठामपणे उभे होते  पण दोघांनीही
अपेक्षाभंग केला शैवांनी मायावतींनाही पाठिंबा दिला होता पण तो फळला नाही बाईसाहेब सिम्बॉलिक पॉलिटिक्स खेळत बसल्या आता नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला तर त्यांनीही ओबीसींच्या उद्योगधंद्यांची शेतीची व नोकऱ्यांची वाटच लावलीये शैवांना पुन्हा एकदा नवी वैचारिकता निर्माण करण्याखेरीज पर्यायच नाहीये आपला शिवाजी आता आपणच तयार करून सत्तेवर आणलेला बरा

टिळकांचे डिनेटेशन त्यासाठी आवश्यक आहे त्यांनी निर्माण केलेल्या संहितांचे पुनर्वाचन आवश्यक आहे हिंदुत्ववाद हे टिळकांनी निर्माण केलेले नेटवर्क आहे म्हणून टिळकांच्यावर लेखन ! प्रतिसादाची अपेक्षा नाहीच आहे कारण वाचक ब्राम्हणी संवेदनशीलतेचा बळी आहे आणि ब्राम्हणी संवेदनशीलता तुम्ही जन्माने ब्राम्हणेतर झालात म्हणून तुमची पाठ सोडेलच अशी खात्री नाही शैव होण्याची पहिली अटच मुळी डीकास्ट व डीवर्ण  होणे आहे संस्कृतायझेशन ब्राम्हनायझेशन व क्षत्रियनायझेशन वाढलेल्या युगात हे अवघड आहे

मी टिळकांच्या चांगल्या बाजूही मांडणार आहे त्यामुळे अनेकांना धक्का बसेल पण माझ्या मते शैव विचारवंतांनी तरी कुणाबद्दल बायस बाळगू नये ज्याचं जे चांगलं त्याला क्रेडिट द्यावं आणि वाईटाला झोडपावं ह्याबाबतीत शिवाजी महाराज हेच आपले आदर्श असले पाहिजेत अफझलखानाचा कोथळा काढावा इब्राहिम लोधी , मुरारबाजी व बाजीराव देशपांडेंना तोफखाना द्यावा , किल्ले द्यावेत , सन्मान द्यावा अजिबात जात वर्ण धर्म डोक्यात येऊ देऊ नयेत लायकीप्रमाणे नायकी हे सूत्र सांभाळावे


श्रीधर तिळवे नाईक




















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट