राममंदिर आणि मी श्रीधर तिळवे नाईक 

राममंदिर आंदोलन सुरु झालं तेव्हापासून माझा त्याबाबतचा प्रवास बदलत गेला आज पाहतो तेव्हा चार टप्पे स्पष्ट दिसतात 
कट्टर विरोधाचा टप्पा 
जहाल विरोधाचा टप्पा 
मवाळ विरोधाचा टप्पा 
आणि काही महिन्यापूर्वीचा पाठिंबा 

माझ्या घऱात बहुजनवादी राजकारणाची परंपरा कित्येक शतकांची आहे त्यामुळं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला पाठिंबा ही एक स्वाभाविक नैसर्गिक प्रक्रिया आहे वडील कट्टर गांधीवादी त्यामुळे काँग्रेसला फुटल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा आणि दाजीबा देसाई वा गोविंद पानसरेंचे (पानसरे आमच्या गल्लीतच रहात होते अविनाश पानसरे माझा लहानपणचा मित्र होताकाही काम असले कि शेकाप वा कम्म्युनिस्टांना पाठिंबा हे आमच्या घरात कायमच चालत आलेले

पण १९८० साली माझ्या घरात प्रथम माझा भाऊ भारत बदलला मग दुसरा भाऊ भूषण नंतर माझा भाचा जतीन तिघेही शिवसेना सैनिक बनले बाळासाहेब ठाकरे हे जणू ह्यांच्यासाठी देवच ह्यांच्यात मी एकटाच शैव उरलो आर्य संस्कृतीचा अभिमान हा भांडणाचा विषय झाला ह्या पार्श्वभूमीवर शाहबानो प्रकरण घडले आणि माझे वडीलही कधी न्हवे ते काँग्रेसवर दुसऱ्यांदा संतापले आणिबाणीनंतरची काँग्रेसची ही दुसरी मोठी चूक होती ह्यावेळी रामजन्मभूमीचा प्रश्न पुन्हा आणला गेला माझे भाजपवाल्यांना सांगणे होते कि तुम्ही शहाबानो प्रकरणावरून आंदोलन करा पण ह्या प्रकरणावरून भाजपला  पाठिंबा मिळेना आणि नेमके ह्याचवेळी रामानंद सागरचे रामायण आले मी ह्या काळात राममंदिराच्या कट्टर विरोधात होतो कारण इतिहासाचा अभ्यासक म्हणून मला अयोध्येत सापडलेली इन्स्क्रिप्शन्स माहित होती आणि ही इन्स्क्रिप्शन्स गर्जून सांगत होती कि अयोध्येचा पूज्य देव हा शिव आहे नंतर सापडलेल्या इन्स्क्रिप्शन्समध्येही शिवच जास्त होता जर रामायण खरोखरच घडले असते तर अयोध्येत सुरवातीपासूनच रामाची पूजा केली गेली असती पण ज्या अर्थी असे घडता तिथला मुख्य देव शिवच होता त्याअर्थी रामायण हे काल्पनिक असावे होते असा माझा युक्तिवाद होता ह्या काळात त्यामुळेच मी राम मंदिराला कट्टर विरोध करत होतो 

पुढे अडवाणींची रथयात्रा झाली त्या काळावर मी एक कविताही लिहिली होती ती पुढीलप्रमाणे ऑक्टोबर १९९०

अनेकांचे हेतू चांगले होते 
तुझेही 

वडिलांचे चलअचल हेतू चांगलेच होते 
पण तरीही माझा चंचल सत्यानाश 

क्लीनिकल समुद्राचे क्लिनसिकल कट इमोशन्सचे 
पॉईंट ब्लॅक इच्छांचे चोंदलेले नाक 
रॅपरमध्ये गुंडाळलेले स्वतःचे प्रेत खाण्याची सक्ती 
जस्ट अनदर संडे म्हणत कोल्हापुरी शिव्यांचे ऑम्लेट 

वाच पण कुणाच्या आसपास वावरत वाचन नको 
पुस्तकातले किरदार त्या माणसात दिसायला लागते 
गा पण पक्ष्यांना स्पर्धा देण्यासाठी नको 
भेट द्यायला येणाऱ्यांचे आवाज म्यूट नको करू 
राष्ट्रांच्या पवित्र स्थानी अन्गझायटी पेरणारे राजकारण नको 

आता अडवाणींना अडवायला कुठला घोडा आणू ?

तपश्चर्येचा हक्क नाकारणारे देव 
आणि इथे तुझ्या नास्तिक गालावरचे चार्वाकी दव 

देवांच्या पार्किंगची भांडणे देव सोडवू शकत नाहीत 
कारण ती मुळात देवांनी निर्माण केलेलीच नसतात 
माणसांना पार्किंग लागते 
माणसांच्या देवांना पार्किंग लागते 

तुला हवाय मुंबईला जाण्यापूर्वीचा एक कोल्हापुरी संभोग 
आणि ही रथयात्रा अशी आडवी येतीये मेंदूच्या हमरस्त्यावर 
समोर गर्दीतही स्पष्ट दिसणारी 
वडिलांना गाढवावर बसून दिलेली वचने 

पर्मनन्टमध्ये तत्कालची परेड 

शांततेचा फुगा दोन्ही बाजूनी फुटला 
आणि व्हायोलन्स दोघांनी पाटा फिरवत कुंटला 

विश्रामस्थानांचा अंत 
शांतताही दंगली घडल्यावर जाणवायला लागतात 
तोपर्यंत एक तणाव तरी असतो 
किंवा बनाव तरी

हजारॊपैकी किती लोक आपणासाठी मॅटर करतात 

आपली झेप आपल्या देहापर्यंत 
अनलिमिटेड झेपेची हौस आपण देवात पुरी करतो 

कृष्णाने काशी लुटली होती 
ह्याची मी आता आठवण करू द्यावी का ?

ह्या देशात दंतकथा वारत नाहीत 
पुन्हा पुन्हा जन्म घेतात 

किंवा त्यांना कुणीतरी जाणीवपूर्वक जिवंत ठेवतं 
कलेच्या बाटलीत कोंबून 

वेद वेदी वदंता वाद विवाद विवाद्य 
सगळं एकत्रच आहे 

अयोध्या घड्याळ पाहतीये 
तिला कळत नाहीये 
हे सम्पणार आहे 
कि पुन्हा सुरु होणार आहे 

कवी रामावर भावुक कविता लिहीतायत 

मानवतेची रँक धर्मापेक्षा अधिक होऊ शकत नाही 

पातळ शेवट भूमीचा जाडजूड कसा करावा ?
रेकॉर्ड केलेल्या सकाळीत मोर शूट झालेले नाहीत 

अख्खा देश रामायण झालाय माय डियर 

बरं झालं श्रीलंकेने आपलं नाव श्रीलंका ठेवलं 
भारतात लंका असती 
तर रावणदहनाला जाळली असती 
खांडववनासारखी 

बरंच काही डिकोड होतंय 
कदाचित अख्खा अनकॉन्शस डिकोड होतोय रथयात्रेत 

ह्या देशाला नेमकं काय हवंय डिकोड होतंय 

त्या युनिव्हर्सिट्या खरोखर हव्या आहेत का 

ज्ञानापेक्षा करमणूक महत्वाच्या वाटणाऱ्या युगात मी जन्म घेतलाय का ?

डिजिट करन्सी टाईप करतायत 

वैश्विक फ़ंडींग 

कन्स्ट्रक्शन किट्स हातात दिसत नाहीयेत कुणाच्या 

पोलिटिकल कारणांनी का असेना 
हा देश एका देवात प्रथमच सेटल होतोय 

प्रत्येकाचा पर्सनल राम विलीन होतोय 

विद्वानांनो ह्यापुढे रामाच्या जनभूमीवर वाद घालायचा नाही 
आम्ही सांगतो तीच जन्मभूमी 
काल्पनिक तर बिलकुल म्हणायचं नाही 
एका काल्पनिक देवासाठी एव्हढे खरेखुर्रे लोक जमा होतील ?

नेमक्या ह्याच दिवशी मी तुझ्या घरी 
आणि समोर टीव्हीची रहदारी 

ओनिडा ओनिडा ओनिडा 
तिढा तिढा तिढा 

मालक कोण आणि मत्सर कोणाचा 
प्रश्नच नाही राम माझा एका बाणाचा 

धुके जळालेले आहे 
पुरोगामीत्व पळालेले आहे 

त्याला नको शोधू 
शव जळालेले आहे 

जे शत्रूवत होते 
आपल्याकडे वळालेले आहे 

ही गर्दी पहा 
तिला झालेली सर्दी पहा 

भगवी त्वचा सर्वांची 
एकोप्याची वर्दी पहा 

कोण सुटले आहे 
सामील दर्दी पहा 

तुम्हाला दिसत नाहीये 
राम तुमच्या काळजात वसत नाहीये 

तुझी एल्बो पॅड्स 
डोळ्याचा अंतरावर 
वेच 

स्मितांची बाईक रेस 
ओठांवर 
खेच 

त्वचेविषयी काय 
आपल्याच देहाची गाय
नाही पेच 

श्वासाइतकी तू नैसर्गिक माझ्या 
उमलतेस मेमरीच्या गुलाबात ताज्या 

वडिलांना विसर 

ते रथयात्रेत गेलेत जरी गाठली साठी 
त्याचा एव्हढा त्रागा कशासाठी ?

हा तुझा माझा किंवा वडिलांचा प्रश्न नाही 
दंतकथा निवडायची का वास्तव
हा प्रश्न आहे 

वास्तव नीट हाताळलं असतं 
तर दंतकथा अशी ताडमाड कशाला झाली असती ?

कायम अल्पसंख्यांक अल्पसंख्याक 
बहुसंख्याक अस्तित्वातच नाहीत 
किचनमध्ये काम करणाऱ्या बाईसारखे टेकन फॉर ग्रांटेड 
कधीतरी किचनमधली बाई 
हॉलमध्ये येऊन हक्क मागणारच 
आणि विषय भलताच काढणारच 

माझ्या तळव्याचा बूट अवेलेबल नाही 
म्हणून मी माझा पाय कापून छोटा करावा काय ?

मी तेच बोलणार 
जे मला योग्य वाटत 

केवळ तुझ्या कम्युनिस्ट कानांना योग्य वाटावं ते बोलण्यासाठी 
मी आलेलो नाही 
आणि हो हिंदुत्ववादी आहेस असा भंपक आरोप नको 

व्हर्जिन मुमेंट आहे प्रेमाची 
पकडूया का 

तुझी त्वचा म्हणजे अखंडित गरम सफेद बर्फ 
पेटवूया  का 

रथयात्रा सगळ्या दिशांनी पांगत असेल तर 
आपण एकमेकांच्या देहाचं वास्तव 
बनूया का 

मंदिर होईल होईल 
आपण देव तर होऊ शकतो 

माझं जग तुझं जग 
जुगुया का ?
जगूया का ?
श्रीधर तिळवे - नाईक 
(चॅनललव , सेक्स  एण्ड एलसेट्रा ह्या काव्यफाईलीतून)
ह्या आंदोलनाला मिळालेला पाठिंबा बघून मी जहाल झालो बाबरी मस्जिद पडली माझ्या कादंबरीत ते प्रकरण आलेही होते मग मी ते उडवले कारण अभिजित देशपांडेंकडे प्रत्यक्षदर्शी अनुभव होते ते मला जास्त महत्वाचे वाटले 

२०११ ला मी मवाळ झालो कारण खुद्द ओबीसींनीच राममंदिरला दिलेला पाठिंबा ज्यांच्या जीवावर शैवांचे राजकारण उभे होते तेच फिरल्यामुळे आपल्या जहाल भूमिकेला काहीही अर्थ उरलेला नाही असे माझ्या लक्ष्यात आले 

आणि काही महिन्यापूर्वी मी पाठिंबा दिला कारण माझ्या सर्वच मुस्लिम मित्रांनी मला सांगितले कि राम मंदिर व्हावे अशी त्यांचीही इच्छा आहे एका मशिदीच्या बदली शांतता असे त्यांचे कारण होते जे मला पटले 

माझ्या ह्या चारी अवस्थांवर कविता येत राहिल्या म्हणजे ऑक्टोबर १९८९(चॅनेल लव्ह सेक्स अँड एल्सट्रा  ) , वास्तू , रावण (ह्या दोन्ही स्त्रीवाहिनीत ) दंगा (कव्ही ) वैग्रे 


आता राममंदिराचा शिलान्यास झाला आहे आमच्या पिढीचे तारुण्य ह्या प्रश्नात वाहून गेले कमावले काय तर एक मंदिर त्याने समाजात नेमका काय फरक पडतो हे आगामी काळात हळूहळू कळेल 

श्रीधर तिळवे नाईक 

राममंदिर २ श्रीधर तिळवे नाईक PRASHANT  NILKUND ह्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे 


आमच्या लहानपणी मला आठवते त्याप्रमाणे रामाची पूजा, कृष्णाची पूजा घरात नसे. मूर्तीही नसे आणि फोटोही. राम, कृष्ण वगैरे "वैष्णवांचे" असे सांगण्यात येत असे. त्यांच्या गोष्टी एकतर आधी आजीकडून आणि नंतर चांदोबा वगैरे मासिके, रामायण सिरीयल, आणि शेवटी रामानंद सागर कृपेने समजल्या.

रामाचे नाव प्रॉमिनंटली येऊ लागले ते "राम मंदिर आंदोलन" सुरु झाले, बाबरी पडली त्यानंतर. पण तरीही घरात रामाची पूजा झाल्याचे आठवत नाही. दरवाजांवर "वि हीं प" वाल्यांनी स्टिकर लावेपर्येंत रामाचा फोटो नव्हताच.

फक्त पणजोबांच्या जमान्यातील शाळीग्राम एक होता. नाहीतर सर्व काही देवी, शिव, नवनाथ, साईबाबा प्रा. लि. होते.
आमच्या गल्लीतही, जवळपास सुद्धा राम मंदिर नाही. माहित असलेले एक पार्ल्याला होते. मुंबईत जसे उत्तर भारतीय येत गेले तसे दशहरा इत्यादी आणि राम वगैरे मंडळींची पूजा आसपास सुरु झाली. दहीकाला होत असे पण त्यात पूजेपेक्षा गंमतीचा भाग अधिक होता.
मग प्रश्न असा पडतो कि राम या "देवते"ला दक्षिण भारतात, शैव, शाक्त समुदायांत, सर्वसामान्य जनतेत कितपत स्थान आहे? आणि राम मंदिर आंदोलनाचा मुख्य मुद्दा "रामाचे मंदिर उभारणे" हा होता कि "गर्व से कहो" मधून मुस्लिम विरोधी अस्मिता निर्माण हा होता?

प्रशांतजी

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे राम आणि श्रीकृष्ण हे शैव देव न्हवेत आणि त्यामुळेच त्यांना शैवांच्या पंचायतनात जागाच नाही शिव पार्वती गणपती स्कंद आणि सूर्य हे शैवांचे पंचायतन आणि ह्यांचीच पूजा शैवांच्यात केली जाते आर्य संस्कृती यज्ञ प्रधान तर शैव पूजाप्रधान शैवांच्यात द्रविड नाग राक्षस असुर यक्ष दैत्य दानव भूत पिशाच्च असे अनेक गण येतात असुर आर्य असले तरी त्यांनी कधीही आर्य संस्कृती स्वीकारली नाही त्यांची मूळ संस्कृती त्यांच्या गणागणिक वेगवेगळी होती जी पुढे शैव म्हणून एक झाली असुरांचे सूर्य व द्रविड नागांचा सूर्य ह्यांची कालांतराने सरमिसळ होऊन एक सूर्यपूजा उदयाला आली शैवांच्यात एक सूर्याची कल्पना असली तरी असुरांच्यात अनेक सूर्यांना स्थान होते एक सूर्य ही कल्पना आर्यांच्यात नंतरची कल्पना आहे पूर्वी वेगवेगळ्या अवस्थेतील सूर्य वेगवेगळे मानले जात

शैव असुरांनीच पुढे आर्यांच्यात सांख्य , अवेस्तन(पारशी ) , जैन व बौद्ध असे चार मुख्य धर्म जन्माला घातले आणि देव सुर आर्यांनी ह्या धर्मांना कायमच अवैदिक म्हणून मान्यता देणे नाकारले अस्सल देव सूर दर्शन एकच जैमिनी दर्शन बाकी सगळी ढापाढापी आहे टिळकांच्यावर चर्चा करताना मी देवसुर सूर्याची चर्चा केलेली आहे

ह्या असुर शैवांच्यात पाच सूर्य होते

१ ब्रम्ह
२ राम
३ नारायण
४ श्याम
५ असुर

आणि असुर हा सर्वांचा स्वामी होता त्यामुळेच असुर ह्या शब्दाचा अर्थच मुळी स्वामी असा होतो ऋग्वेदात त्यामुळे हा शब्द इंद्राला उद्देशूनही वापरला आहे सर्व वैदिक देव सुरवातीला असुरच होते पण नंतर सूर होत गेले

ह्यातील ब्रम्ह शब्दावरूनच ब्रम्हमुहूर्त हा शब्द तयार होतो हा पहिला सूर्य आहे त्यामुळेच तो निर्मितीचा प्रकाशाचा कारक आहे रामप्रहर हा शब्द आपणाला परिचित आहे कारण हा रामाचा कालखंड असतो राम हे सूर्याचे नाव आहे आणि ज्या आफ्रिकेतून असुर व राक्षस आले तिथेही त्याचा अर्थ सूर्य असाच होता अत्यंत्य कडक सूर्य म्हणजे नारायण हा दुपारचा सूर्य आहे तर श्याम म्हणजे संध्याकाळचा सूर्य त्यामुळेच श्याम हा शब्दाचा अर्थच मुळी संध्याकाळ असा रूढ झाला आहे संध्याकाळ झाली कि रात्री हे सगळे सूर्य स्वामी असुराच्या ताब्यात असतात आणि तोच पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांना पाठवतो अशी ही कल्पना आहे जगभरात असुर असीर अस अशा अनेक नावांनी प्रचलित होता व ज्याला आपण असिरियन साम्राज्य म्हणतो तेही असुरांनी स्थापन केले होते

वैदिक काळात सूरही असुरांची थोडी इज्जत करत पण नंतर त्यांनी त्यांची चेष्टा करायला सुरवात केली वैदिक सूर्याऐवजी पावसाळा पाठवणाऱ्या इंद्राला महत्व देत आणि इंद्र हीच त्यांची मुख्य देवता होती त्यांनी असुरांच्यापेक्षा अवेस्तापेक्षा स्वतःचा वेगळा धर्म स्थापन केला ज्याला आपण वैदिक धर्म म्हणतो पुढे वैदिक विजयी झाले तसे ब्राम्हणांचे वर्चस्व वाढले व त्यांनी दुसरा धर्म जन्माला घातला तो म्हणजे ब्राम्हण ग्रंथांना व स्मृतीला केंद्रस्थानी ठेवणारा ब्राम्हणधर्म पाचव्या शतकापर्यंत ब्राम्हणधर्मच देव सूर आर्यांचा मुख्य धर्म होता त्यामुळे सर्वत्र ह्याचा उल्लेख ब्राम्हणधर्म असाच आहे ह्या ब्राम्हणधर्माविरुद्ध पहिला असुरांचा दैत्यांचा उठाव हा हिरण्यकशिपू व हिरण्याक्ष ह्या शैव बंधू राजांच्या नेतृत्वाखाली बळिवंशाने केला ह्यातील हिरण्यकशिपूची कथा पदमपुराणांत आली असून खुद्द शिवनेच पार्वतीला सांगितली आहे कारण हिरण्यकशिपू हा परम शिवभक्त होता ह्या दोघांची ब्राम्हणांनी हत्या घडवली पुढे ह्यांच्याच नातवाने म्हणजे कपिलने सांख्य दर्शन मांडले ह्या दर्शनाचा आत्मा शैव होता आणि भाषा असुर आर्यांची होती बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म ह्यात म्हंटल्याप्रमाणे ह्या कपिलच्या विचारांचा सखोल परिणाम गौतम बुद्धावर झाला आहे पुढे बौद्ध झालेल्या ब्राम्हणांनी शैव प्रभाव नाकारण्यासाठी बुद्धाच्या शाक्त गणाचे नाव बदलून शाक्य असे केले पण बुद्धाच्या आईचे नाव मात्र पार्वतीचेच म्हणजे मायादेवी राहिले कपिलवास्तूचे नाव कपीलवास्तूच राहिले ह्या कपिलचा नातू किंवा पणतू होता बळी ज्याला ब्राम्हणांनी गाडले तरीही शैवांचा व सांख्यांचा प्रभाव ओसरेना उलट त्यात आता जैन व बौद्धांची भर पडली तेव्हा ह्यांना शह देण्यासाठी म्हणून ब्राम्हणांनी तिसरा धर्म जन्माला घातला वैष्णव त्याला प्रतिसाद मिळेना म्हणून ब्राम्हणांनी राम पासून रचले रामायण श्यामपासून रचले महाभारत जे यश वैदिकांना वेद रचून मिळाले नाही ब्राम्हणग्रंथ रचून मिळाले नाही ते यश त्यांना रामायण व महाभारत ह्या महाकाव्यांच्या रचनेनंन्तर मिळाले कारण ही महाकाव्ये अतिशय यशस्वी व प्रभावी होती ह्या महाकाव्यात त्यांनी राम कृष्णांना शिवभक्त दाखवून शैवांना सामावून घेतले शांतिपर्वात सगळा बुद्ध उपदेश सामावून घेतला व गीतेद्वारा अख्खे सांख्य तत्वज्ञान शोषून घेतले
आणि ह्यांच्यातूनच पुढे हिंदू धर्म निर्माण केला हिंदू धर्माचे मुख्य देव राम कृष्णच आहेत विष्णू फार दुय्यम आहे
आणि महेशही !

कृष्णाने सांगितलेली गीता हा हिंदूंचा मुख्य धर्मग्रंथ आहे म्हणजे महाभारतच हिंदूंचा मुख्य धर्मग्रंथ आहे कारण गीता महाभारतात आहे आणि ती शंकराचार्यांनी लिहिली आहे म्हणूनच शंकराचार्य हे हिंदूंचे पोप आहेत शंकराचार्य जातीव्यवस्थेला नकार देतो म्हणून सनातन धर्म जातिव्यवस्थेला नकार देतो लोकमान्य टिळक जातिव्यवस्थेला नकार देतात मात्र वर्णव्यवस्था ह्या सर्वांना मान्य आहे पुण्ययोनी पापयोनी अयोनी ही योनिव्यवस्था ह्यांना मान्य आहे मागच्या जन्मात पुण्य केल्याने ब्राम्हण व क्षत्रिय वर्ण प्राप्त होतो व मागील जन्मात पाप केल्याने वैश्य शूद्र व अतिशूद्र व आदिवासींचा जन्म मिळतो हे ह्यांना मान्य आहे त्यामुळेच ब्राम्हण व क्षत्रिय हे पुण्यवान लोक आहेत तुमच्या मागील जन्माच्या कर्मामुळेच तुम्हाला ह्या जन्माचा वर्ण मिळाला आहे असे श्रीकृष्ण म्हणतो ह्या अर्थाने कर्माप्रमाणे वर्ण मिळतो आणि मी वर्ण देतो असे श्रीकृष्ण म्हणतो

ह्या सगळ्या विवेचनावरून मला वाटते सर्व स्पष्ट व्हावे तुम्ही म्हणता
आमच्या लहानपणी मला आठवते त्याप्रमाणे रामाची पूजा, कृष्णाची पूजा घरात नसे. मूर्तीही नसे आणि फोटोही. राम, कृष्ण वगैरे "वैष्णवांचे" असे सांगण्यात येत असे. त्यांच्या गोष्टी एकतर आधी आजीकडून आणि नंतर चांदोबा वगैरे मासिके, रामायण सिरीयल, आणि शेवटी रामानंद सागर कृपेने समजल्या.


जर तुम्ही शैव असला तर रामकृष्णाची मूर्ती मिळणार कुठून ? असुरांचे राम और श्याम ब्राम्हणांनी रामायण व महाभारताद्वारे गिळले आणि नवीन राम और श्याम तयार केले ज्यांचा बहुजनांशी किंवा शैव ब्राम्हण क्षत्रियांशी काही संबंधच नाही त्यामुळे जे घडले ते स्वाभाविक आहे अनेकांना रामनवमी माहित असते पण रामनवमीचा मूळ अर्थ माहित नसतो राम ह्या शब्दाचा मूळ अर्थ आहे पूर्वज कोकणात त्यामुळेच आपल्या मूळपुरुषाला रामपुरुष म्हंटले जाते ह्या पुरुषाची पूजा रामनवमीला केली जाते कारण चैत्रात गुडीपाडव्याला नवीन वर्षाचे स्वागत होते मग आठ दिवसांचा आठवडा गुडीपाडवाच साजरा केला जातो एकदा पृथ्वीची व सूर्याची पूजा संपली त्यांचे नववर्षाचे पहिले मिलन साजरे झाले नववर्षाचे स्वागत पूर्ण संपन्न झाले कि मान येतो तो आपल्या सर्व पूर्वजांच्या पूजेचा पूर्वज म्हणजे पूर्वेकडून येणारा प्राचीन आत्मज ह्यात बायकांनी प्राचीन बायका व पुरुषांनी प्राचीन पुरुषांना आठवणे अभिप्रेत आहे आपण आता जे आहोत ते आपल्या पूर्वजांच्यामुळे आहोत ही जाणीव सर्वच संस्कृतीत असते शैव संस्कृतीत ही जाणीव व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राम नवमी राम फक्त पुल्लिंगी नाही स्त्रीलिंगीही आहे प्राचीन काळी ह्या दिवशी बायका आपल्या आईने व आजीने दिलेले दागिने व सासू व आजेसासू व तिच्या आधीच्या बायकांचे दागिने पूजत व घालत व रात्री ते उतरवून पुन्हा आपल्या घराण्याच्या पेटीत ठेवत त्यामुळे आपल्या आधी होऊन गेलेल्या स्त्रियांशी एकप्रकारची कनेक्टिव्हीटी निर्माण होई ही प्रथा आता लोप पावलेली दिसते ह्याला शिवीपूजन म्हंटले जाई शिव पुल्लिंगी शिवी स्त्रीलिंगी आता शिवी हा शब्द काय अर्थाने वापरला जातो हे मी सांगायला नकोच कट्टर व हट्टाहासाने शेणवी (मूळ शब्द शंभवी ) ब्राम्हण राहिलेल्या घराण्यांत ही प्रथा १९७० पर्यंन्त होती मराठवाडा विदर्भ नागपुरात ही प्रथा ब्राम्हणांच्यात टिकली पण दिवस बदलला

तुम्ही म्हणता

रामाचे नाव प्रॉमिनंटली येऊ लागले ते "राम मंदिर आंदोलन" सुरु झाले, बाबरी पडली त्यानंतर. पण तरीही घरात रामाची पूजा झाल्याचे आठवत नाही. दरवाजांवर "वि हीं प" वाल्यांनी स्टिकर लावेपर्येंत रामाचा फोटो नव्हताच.
फक्त पणजोबांच्या जमान्यातील शाळीग्राम एक होता. नाहीतर सर्व काही देवी, शिव, नवनाथ, साईबाबा प्रा. लि. होते.

हे स्वाभाविकच नाही काय ? खरेतर घरोघरी हीच स्थिती आहे पण स्वतःचा देवारा बघण्याऐवजी रामायण महाभारत बघितल्यावर काय होणार ? आपण कशाची पूजा करतो किंवा आपले पूर्वज कशाची पूजा करत होते ह्याचंही बहुजन समाजाला भान उरलं नाही भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही वैष्णवांनी पूर्णपणे आपल्या नावाने केली आहे हे सहजासहजी लक्ष्यात येत नाही गांधीजींच्या प्रार्थनेत शिव पार्वतीची एकही प्रार्थना न्हवती हे कोणीही सांगत नाही अल्ला आणि गॉड नीट दिसणाऱ्या गांधींना स्वतःच्या अनुयायांचे शिव पार्वती का दिसत न्हवते कि बहुजन शैव फक्त मरायला आणि ब्रिटिशांचा मार खायाला ठेवले होते ?

पुरोगाम्यांनी शैव स्वीकारले असते तर जी रिकामी जागा होती ती नीट भरली गेली असती पण दुर्देवाने हे झाले नाही आणि मग ही रिकामी असलेली जागा मोदीनां पुढे करून भाजपने बळकावली आणि शैवांनी हर हर महादेव म्हणत आपली सारी ताकद मोदींच्यामागे उभी केली

पुरोगामी भाजपप्रणीत शैवांच्याकडून पराभूत झालेत हे कळण्याइतकीही अक्कल पुरोगामी लोकांना उरलेली नाही जोपर्यंत भाजपकडे गेलेला हा शैव पुन्हा परतत नाही तोवर पुरोगाम्यांना विजय मिळणे शक्य नाही खरेतर हे सर्व काय होणार म्हणून नंतर काय होते आहे म्हणून आणि काय झाले म्हणून मांडत होतोआणि आता काय करता येईल म्हणून मांडतो आहे राहुल गांधींनी गुजरात विधानसभा निवडणुकीत मीही शैव काश्मिरी ब्राम्हण आहे म्हणून सांगितल्या सांगितल्या टेबल फिरले होते पण मणिशंकर अय्यरसारख्या कट्टर वैदिक सेक्यूलर असलेल्या लोकांच्या नादाला लागून पुन्हा राहुल गांधी बदलले आणि बदललेली टेबलं पुन्हा भाजपकडे फिरली

तुम्ही म्हणता

आमच्या गल्लीतही, जवळपास सुद्धा राम मंदिर नाही. माहित असलेले एक पार्ल्याला होते. मुंबईत जसे उत्तर भारतीय येत गेले तसे दशहरा इत्यादी आणि राम वगैरे मंडळींची पूजा आसपास सुरु झाली. दहीकाला होत असे पण त्यात पूजेपेक्षा गंमतीचा भाग अधिक होता.

हे खरे आहे

तुम्ही म्हणता


मग प्रश्न असा पडतो कि राम या "देवते"ला दक्षिण भारतात, शैव, शाक्त समुदायांत, सर्वसामान्य जनतेत कितपत स्थान आहे? आणि राम मंदिर आंदोलनाचा मुख्य मुद्दा "रामाचे मंदिर उभारणे" हा होता कि "गर्व से कहो" मधून मुस्लिम विरोधी अस्मिता निर्माण हा होता?

टिळकांनी शिव जयंती उत्सव व गणेश उत्सव सुरु करून हिंदुत्ववादी आंदोलनांची त्यामागच्या स्ट्रॅटेजीची पायाभरणी केली १९८५ पर्यंत हिंदुत्व आरएसएस प्रणित हिंदुत्व अजमावत होते पण यश मिळेना तेव्हा पुन्हा ह्या लोकांनी टिळकांच्या हिंदुत्वाच्या मार्गाने जाण्याचे निश्चित केले व टिळकांच्या शिव जयंती व गणेश उत्सवासारखे राम जन्मभूमी आंदोलन सुरु केले शाहबानो प्रकरणाने हवा हलवली होती ह्या आंदोलनाने वादळ निर्माण केले
शाहबानो व बाबरी मस्जिद ही मुस्लिम अस्मितेची प्रतीके बनली व त्याविरुद्ध हिंदुत्व ही हिंदू अस्मिता तयार करण्यासाठी राम जन्मभूमी वापरण्यात आली आणि ही खेळी यशस्वी झाली गुलाम जेव्हा आपल्या मालकांच्या बाजूने आपल्याच बंधूंच्याविरुद्ध लढतात तेव्हा ती गुलामाची हाईट असते हे काही आजचे नाही रामायणातही शैव असलेला हनुमान रामाला मदत करतो ह्याही आंदोलनात विटा घेऊन अनेक शैव गेलेच होते ही नव्या युगाची वानरसेना होती

मध्ययुगीन वैष्णव संतांच्या चळवळीने व भारतीय स्वातंत्र्य चळवळीने व साठोत्तरी देशीवादी चळवळींनी बहुजन शैवांची मानसिकता हिंदू बनवली होती (महाराष्ट्रात वारकरी )तिला हिंदुत्ववादी बनवले ते राम जन्मभूमी चळवळीने टिळकांचे हिंदू राष्ट्र मिशन एका अर्थाने पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले हे अत्यंत महत्वपूर्ण पाऊल आहे जी अयोध्या फक्त शैव देवतांना पूजत होती तिथे राम मंदिर उभे राहणे हा वैष्णवांचा शैवांवरचा सर्वात मोठा विजय आहे गर्वसे कहो हम हिंदू है ही वैष्णव संतांच्या भक्ती चळवळीने सुरु केलेल्या आरंभाचा मध्य आहे आणि रामराज्य हा शेवट आहे तुम्ही विचाराल श्रीकृष्णराज्य का नाही ह्याचे उत्तर श्रीकृष्ण कधीही राजा झाला न्हवता म्हणून ! श्रीकृष्णाने जे राज्य निर्माण केले ते द्वारका पण त्याचा अधिपती श्रीकृष्ण न्हवता तर बलराम होता आणि शेवटी यादव दारू पिऊन आपापसात लडून मेले व द्वारका बुडाली त्यामुळे द्वारका आदर्श होऊ शकत नाही म्हणून श्रीकृष्णराज्य नाही तर अयोध्येतून रामराज्य ! आणि रामराज्य हवे म्हणून रामजन्मभूमीआंदोलन व राम मंदिर !

हिंदुत्ववाद्यांना मठ्ठ समजणारे लोक मठ्ठ आहेत हिंदुत्ववादी आपणाला प्रथम काय करायचे हे ठरवतात व मग अत्यंत एकसंधपणे त्यांची टीम काम करते एकगठ्ठा ब्राम्हणांचा एकगठ्ठा टोळीवादी अटॅक ही विचारपूर्वक केली जाणारी झुंडशाही असते मुस्लिमही हेच करतात फरक एकच मुस्लिम अधिक धर्मांध आहेत अन्यथा दोन्ही धर्माध लोकांचे समूह आहेत त्यांच्यापुढे ना जैन टिकले ना बौद्ध त्यांच्यापुढे फक्त शैव टिकले आणि ख्रिश्चन !

खरेतर मुस्लिमांनी बाबरी मशिदीमागे मुस्लिम अस्मिता उभी करून तिला मुस्लिम अस्मितेचे प्रतीक बनवून फार मोठी घोडचूक केली मुस्लिमांच्या दृष्टीने ही मशीद होऊच शकत नाही आणि ह्या जागी ते मशीद बनवणार पण नाहीत पण प्रश्न अस्मितेचा झाला आणि आता ती पराभूत झाली

हा प्रश्न शाहबानो प्रकरणामुळेच पेटला जर काँग्रेसने हे अल्पसंख्यांकी लाडाचे पाऊल उचलले नसते तर भाजपला एव्हढा सपोर्टच मिळाला नसता

असो जे झाले ते झाले खुद्द मुस्लिम बहुमतानेही राम मंदिर व्हावे असा कौल दिल्याने मीही नंतर त्याला पाठिंबा दिला मात्र लोकशाहीचा आदर म्हणून हा पाठिंबा दिला आहे माझ्यासाठी आजही अयोध्येचा देव शिवच आहे आणि राम आर्य असूनही शिवभक्त ज्याने कुठेही विष्णूच्या मूर्तीची स्थापना न करता शिवलिंग मात्र स्थापन केले
आणि ज्याचा वापर सनातन आर्य धर्माचा पाईक म्हणून झाला .

श्रीधर तिळवे नाईक

राममंदिर आणि मी ३ श्रीधर तिळवे नाईक

रामजन्मभूमी आंदोलन , सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ह्यांच्यानंतर राम मंदिराबाबत जो तिसरा ट्विस्ट आला तो राम मंदिर बांधण्यासाठी समभूमीकरणाची जी सुरवातीची कामे झाली त्यावेळी तिथे सापडलेले शिवलिंग ! शोधायला गेले राम सापडला शिव अशी ही स्थिती होती ही बातमी पुढीलप्रमाणे आली होती

New Delhi: In a major archaeological finding, carvings on sandstone, Shiv Ling and pillars were excavated during the land levelling work at Ram Janmabhoomi in Ayodhya.
Making the announcement, Champat Rai, General Secretary of the Sri Ram Janmabhoomi Tirth Kshetra Trust, said, "discovered pillars in the debris of the structure and carvings on sandstone. Found a Shivling there and a similar one at Kuber Teela."
The debris is being removed and land being leveled at Ram Janmabhoomi from the past 10 days after due permission from district authorities.
The Vishva Hindu Parishad (VHP) has also said that ever since the first phase of construction of the Ram temple in Ayodhya started on May 11 many objects have been discovered during excavation.
VHP spokesperson Vinod Bansal said that it includes many objects of archaeological importance like flowers made of stone, Kalash, Aamalak, Dorjamb, etc.
Apart from this, during the excavation, a 5 feet Shiva Linga, 7 pillars of black touchstone, 6 pillars of red sandstone and broken idols of gods and goddesses were also been discovered.
“Work is continuing at a slow pace due to strict regulations. We will be providing updates regularly,” Bansal said in a tweet.
(२१ मे २०२० टाइम्स न्यूज )

साहजिकच काहींना असे वाटले कि शैव आता शैव मंदिर बांधण्याची मागणी करणार पण प्रत्यक्षात कोणीही अशी मागणी केली नाही अनेकांनी दखलही घेतली नाही ह्यामागे तीन कारणे होती

१ मोठ्या मुश्किलीने सुटलेल्या ह्या प्रश्नात उगाच नाक खुपसून आपण शैवांनी तिढा वाढवू नये

२ सापडलेल्या लिंगाविषयी अनेक अफवा होत्या म्हणजे हे लिंग दुसऱ्याच एका मंदिराचे आहे आणि ते इथे आणून ठेवले आहे द लॉजिकल इंडियन डॉटकॉम ह्या वृत्त संस्थेने जे व्हयरल झाले आहे ते हे न्हवे अशी मांडणी केल्याने हा प्रकार वादग्रस्त आहे हे लक्ष्यात आले

संदर्भ :(https://thelogicalindian.com/fact-check/viral-photo-shivlinga-ram-temple-ayodhya-excavations-21373)


अशा वादात पडणे हा शैवांचा पिंड न्हवे माझा स्वतःचा आग्रह आहे कि किमान शैवांनी सार्वजनिक जीवनात विज्ञाननिष्ठेचाच पाठपुरावा करावा काही अतर्क्य गोष्टी घडल्या तर त्यांना वैयक्तिक अविष्कार द्यावा त्या सार्वजनिक करू नयेत उदा तुकारामाचे परत केले गेलेले अभंग वैग्रे घटना



ह्याला एक बाजू अशीही आहे कि हे सर्व मोदी शैव असल्याने मोदींच्या समाधानासाठी केले जाऊ शकते तेव्हा उगाच कशाला आवाज काढा ? असा विचार शैवांनी केला पण बौद्ध गप्प बसले नाहीत त्यांनी हे बौद्ध स्थळ आहे असे सांगावयास सुरवात केली

३ शिवाचे आजही भय आहे त्यामुळे इथे राममंदिराबरोबर छोटे शिव मंदिर आपोआपच उभारले जाईल कारण शिवलिंग जिथे सापडते तिथे मंदिर उभे करावे ही फक्त शैवांची न्हवे तर हिंदूंचीही श्रद्धा आहे ह्या श्रद्धेनुसार जर हे लिंग खरोखर इथले असेल तर शिवाचा कोप होऊ नये म्हणून घाबरून का होईना ह्याची प्राणप्रतिष्ठा होईल



आता समजा हे शिवलिंग ऑथेंटिक आहे तर !
तर त्या आश्चर्याचे कारण नाही कारण हे सर्व आतापर्यंतच्या इतिहासाला पूरकच आहे

ज्या इन्स्क्रिप्शनला सर्वोच्च न्यायालयाने ऑथेन्टिक मानलंय व ज्याला विष्णू हरी इन्स्क्रिप्शन म्हंटलंय ते सर्वात अर्वाचीन १७ व्या शतकातले आहे त्याचीही सुरवात ओम नमो शिवाय पासून होते आणि ह्याच्या आधारे इरफान हबीब ह्यांनी इथे जे मंदिर बांधण्याचा प्लॅन होता ते शिव मंदिर आहे असे म्हंटले आहे पण इन्स्क्रिप्शन त्याला सपोर्ट करत नाही पुढच्या अनेक व्हर्सेसमध्ये असलेले उल्लेख हे वैष्णव आहेत हा तत्कालीन सर्वच क्षत्रियांचा डायलमा आहे घरात शिव बाहेर वैष्णव त्यामुळे कुलदैवत प्रसन्न राहावे म्हणून ओम नमो शिवाय व बाहेर ब्राम्हणांना खुश करण्याकरता वैष्णव गमतीचा भाग असा कि ह्या इन्स्क्रिप्शनमध्ये वामनापर्यंतच्या अवतारांचा स्पष्ट उल्लेख आहे पण राम कृष्णाचा उल्लेख स्पष्ट नाही रावणाला ज्याने मारला तो असा रामाचा उल्लेख आहे ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे कुल आणि वंश ह्या इथे दोन वेगळ्या संकल्पना म्हणून येतात शिवाच्या तांडवाचा उल्लेख आहे ज्याचे हे इन्स्क्रिप्शन आहे तो वैष्णव असावा आणि त्याचा प्लॅन इथे विष्णू हरी मंदिर बांधण्याचाच असावा मात्र शिव हा कुलदेव असल्याने शिवलिंगापासून सुरवात केली असावी शैव धर्मातून वैष्णव धर्मात धर्मांतरित झालेल्या टिपिकल शैव क्षत्रियाची ही द्वीधता आहे ह्या इन्स्क्रिप्शनमध्ये कुठेही हे रामाचे जन्मस्थळ आहे असा उल्लेख नाही मात्र हे प्रस्तावित मंदिर विष्णू हरीचे आहे विष्णुसहस्त्रनामात विष्णूहरी नाम नाही म्हणून अशा देवतेचे मंदिर कसे शक्य आहे असा प्रश्न राम शर्मांनी विचारला आहे विष्णुसहस्त्रनाम हे इसवीसनपूर्व ३०० च्या आसपास लिहिले गेले आहे त्यानंतर वैष्णवांच्यात अनेक देवांची भर पडली आहे त्यामुळे मला हे ऑब्जेक्शन पटलेले नाही विष्णूच्या अवताराचे स्पष्ट उल्लेख आहेत त्यामुळेच शैवांनी इथे हक्क सांगू नये असे माझे मत आहे मंदिर विष्णू हरीचे बांधायचे कि रामाचे हा वैष्णवांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यात आपण कशाला पडा ?

पण ह्याचा अर्थ असा नाही कि अयोध्या रामाची आहे
नाही अयोध्या रामाची नाही !
अयोध्येत सापडलेल्या ह्या विष्णू हरी इन्स्क्रिप्शन्सच्या आधीच्या सर्व अयोध्या इन्स्क्रिप्शन्समध्ये विशेषतः इसवीसन १००० पूर्वीच्या फक्त शिवच आहे ज्यावरून स्पष्ट होते कि भारतावर रामायणाचा प्रभाव १००० नंतरच पडला आहे जर खुद्द अयोध्येलाच इसवीसन १००० पर्यंत राम माहित न्हवता तर अख्ख्या भारताला राम कसा माहीत असणार ? बाकी कल्पनाविलास करायचा हक्क सर्वांना आहेच

श्रीधर तिळवे नाईक










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट