आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १३५ राष्ट्रीय शिक्षण :टिळकांचा हिंदुत्ववादी ढाचा
१९०८ साली बार्शीला लोकमान्य टिळकांनी जे व्याख्यान दिले ते national education ह्या टायटलखाली बाळ गंगाधर टिळक स्पीचेस अँड रायटिंगच्या पान ६९ ते ७९ ह्या पानावर उपलब्ध आहे टिळक राष्ट्रीय शिक्षणाची व्याख्या पुढीलप्रमाणे करतात ,"I shall. speak here this evening on national education. We are not accustomed. to this term, hence it.needs a little explanation. To be able to read and write. alone is no education. These are simply the means of its attainment: That which gives us a. knowledge of the experiences of our ancestors; is called education".पूर्वजांच्या अनुभावांच्या ज्ञानाला टिळक शिक्षण म्हणतात ही व्याख्या हिंदुत्ववादी शिक्षणाची आधारशीला बनली आहे पुढे टिळक म्हणतात How can a person be proud of his religion if he is ignorant of it? The lack of religious education is one of the causes that have brought missionary influence all over our country. The Government cannot give us religious education; and it is well that they are not doing it; because they are not. our co-religionists.
Of the many things that we will do here is religious education where will first, therefore, must engage our attention. Secular education only is not enough to build up a character. Religious education. is necessary because the study of high principles keep us away from. evil pursuits. Religion reveals to us the form of the Almighty. Says our religion that the man by virtue of his action can become even god. When we can become gods even, by virtue of our action, why may we not become active 'by means of our action like the Europeans? some say that religion begets QUARREL? But I ask, "Where is it written in religion to pick up quarrels?'' If there be any religion in. the world which 'advocates toleration of other· religious beliefs and instructs one to stick to one's own religion, it is the' religion Of the Hindus alone. Hinduism to the Hindus Islamism to the Musalmans will 'be taught in these schools. And it will also be taught there to forgive and forget the differences of other religions. टिळक त्यामुळेच धार्मिक शिक्षण आवश्यक मानतात राष्ट्रीय शाळेत मुस्लिमांना मुस्लिम धर्मच शिक्षण द्यावे असे टिळकांचे मत आहे
आजचे शिक्षण किती क्लरिकल आहे ते सांगताना ते म्हणतात, "The tradesmen who are present here this evening send their sons very reluctantly to school and some of them do not send at all;·because they do 'not get there' education 'which 'they need. Besides their 5ons educated in the. present· day system turn. out fashionable. They wish to become clerks"
व्यापाऱ्यांच्या मुलांनाही गादी सांभाळण्यापेक्षा क्लार्क होणे भूषणास्पद वाटावे ह्याहून शोकांतिका ती वेगळी कोणती ? टिळकांच्या भाषेत सांगायचे तर They feel ashamed to sit on the gaddi where their forefathers earned the 'whole of their estate.
पुढे टिळक म्हणतात, "it is not the fault on our part that even after getting so much education ·we ·remain unable to satisfy our bare necessities; but the fault goes direct to the education that we receive. Naturally therefore the question as to how to reform the present system of education stood before us. If the Educational Department had been under our' control we could have effected in it any necessary changes immediately. At first, we asked the government to transfer it to our control the selection of the text-books for schools; for example. we feel now the necessity' of such education which will prepare us to Be A good citizen"
टिळक इंग्लिशविषयी जे म्हणतात ते तर आजही चर्चेचा विषय आहे टिळक म्हणतात, "The second thing that we will do, will be to lighten the load of the study: of the foreign languages. In spite of a long stay in India, no European can speak for a couple of hours fluent Marathi, while our graduates are required as a rule to obtain proficiency in the English language. ·One who speaks and writes good English is said, in these days, to have been educated. But the mere knowledge of the language is no· true education. Such a compulsion for the study of foreign languages does not exist anywhere except in India.
म्हणजे इंग्लिशचा नाकचढेपणा तेव्हाही होताच म्हणायचा आणि इतरांच्या भाषा न शिकण्याचा माजही !
औद्योगिक शिक्षण हा तिसरा राष्ट्रीय शिक्षणाचा मुद्दा टिळक पुढीलप्रमाणे मांडतात टिळक म्हणतात," Industrial education! In no school, this education is given. It will be given in these schools It is an important thing. During the whole of this century, we have not known how· a· match is. prepared. In Sholapur, matches are manufactured from straw; and. straw is found' abundantly in our country. If therefore this industry is taken into. our hands the importation of matches will ·largely· the decrease in 'India. It is the same with the sugar industry. we can procure here as good sugarcane as is found in Mauritius. It is seen by scientific experiments that the 'sugarcane found in the suburbs of Poona can· produce as much sugar as' is' found in the' sugarcane of Mauritius. Six crores of rupees' are drained out even per year from this country only for sugar. Why should this be? Well, can we not get here sugarcane or the machinery necessary for its manufacture?. The reason is that we do not get here the education in this industry. It is ·not so in Germany. The Department of industry investigates there as to which industry is decaying, and if perchance there be any, in a decaying· state, substantial support at once comes forth from the Gover.nment for reviving it. We are intending to start.large mechanical and scientific laboratory for, this purpose.
तर जर्मनीप्रमाणे आपणही औद्योगिक शिक्षण द्यायला हवे असा टिळकांचा आग्रह आहे उसाचा विचार थेट टिळकांच्या काळापासून सुरु होता असं दिसतं
टिळकांचा पुढचा मुद्दा हा राजकीय शिक्षणाचा आहे टिळक म्हणतात, "Education in politics will be the fourth factor. We are not taught this subject in Government schools. The student must understand that the Queen's proclamation is the foundation of our rights. The Government is trying to shut out youngmen from these things; \Vhat has been proved by our revered Grand Old man-Dadabhoy Naoroji, after a ceaseless exertion for over fifty years,' should be understood by our students in their youth. Every year some thirty or forty crores of rupees are drained out of India without any return. We have, therefore, fallen to a wretched state of poverty. These things, if understood in the prime of life," can make' such: a lasting impression over the hearts of our 'youngmen, as it woul1 be impossible in arrived age. Therefore this education should 'be" given in school."
शेवटी टिळक म्हणतात, "We do not get this sort of education for want of self-Government. We should not, therefore, await the coming of these rights, but we must get up and begin the work".
टिळक असे कंप्लिट नॅशनल एजुकेशन स्थानिक देशी भाषेतून देऊ इच्छितात एका बाजूला धार्मिक शिक्षणाबाबत अत्याग्रही असलेले टिळक दुसऱ्या बाजूला इंडस्ट्रिअल एज्युकेशनचाही आग्रह धरतात हिंदुत्ववादी हाच आग्रह धरतात कारण ते हा आग्रह टिळकांच्यापासून शिकलेले आहेत पूर्वजांची पूजा हा हिंदुत्ववादी शिक्षणाचा पाया आहे आणि त्याची सुरवात टिळकांनीच केली आहे म्हणूनच मी टिळकांना आद्यहिन्दूहृदयसम्राट म्हणतो
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १३६ बंगालच्या फाळणीनंतर काँग्रेसचीही फाळणी १
१ स्वदेशी
२ स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण
३ बहिष्कार
४ राष्ट्रीय शिक्षण
ह्यांचा सविस्तर विचार आपण केला कारण ह्या चार मुद्द्यावरूनच जहाल मवाळ वाद पेटला आणि ह्याचे थेट पडसाद १९०७ च्या सुरतेच्या अधिवेशनात उमटले नागपूरला टिळक सहज अध्यक्षपदाची निवडणूक जिंकतील म्हणून मवाळांनी अधिवेशनाची जागा बदलून ती सुरत केली सुरत हा बॉम्बे प्रोव्हिन्समध्ये येत होते व टिळकांचे ते होम प्रोव्हिन्स असल्याने नियमानुसार टिळकांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येणार न्हवती
सुरतेलाही राष्ट्रीय जहाल पक्षाची नाकेबंदी करायची हा प्लॅन सुरवातीपासून तयार झाला होता बंगाली व मराठी जहालांच्यात फूट पडावी म्हणून जाणीवपूर्वक बंगाली रासबिहारी घोष ह्यांचे नाव आणण्यात आले जेणेकरून जहालांनी टिळकांचे नाव आणले कि बंगाली अध्यक्षाला मराठी लोकांचा विरोध असा प्रचार करता येईल व जहालांच्यात फूट पाडता येईल
मग स्वागताध्यक्ष असलेल्या ज्या माळवींच्याकडे सेशनचा बंदोबस्त होता त्यांनी मेथांच्या हुकुमानुसार काम सुरु केले एखादा कार्यकर्ता जहाल पक्षाचा आहे अशी शंका जरी आली तरी सुरतेत त्याच्या राहण्याची व्यवस्था नीट होणार नाही असे प्रयत्न सुरु झाले दक्षिणात्यांची तर फारच गैरसोय झालीआणि पुढे काँग्रेसशी दक्षिणात्यांचे नाते जे तुटले त्याची पायाभरणी इथे झाली विशेषतः मद्रासी काँग्रेसमनना निवासस्थाने मिळालीच नाहीत मवाळ एकाच बाबतीत चुकले मेथा गुजराती असल्याने गुजराती जनता आपल्यामागे राहील ह्याची खात्री त्यांना होती हे टिपिकल प्रादेशिक राजकारण होते पण सुरत त्या मनस्थितीत न्हवते कारण एकेकाळी जगाच्या प्रमुख व्यापारी शहरांपैकी एक असणारे हे व्यापारी शहर इंग्रजांच्या काळात गतवैभव गमावून बसले होते शिवाय दादाभाई नौरोजी टिळकांच्याच भाषेत बोलायला लागले होते ही बदललेली परिस्थिती मवाळांच्या लक्ष्यात येत न्हवती
परिणामी नथिंग इज अनफेअर इन लव्ह अँड वॉर ह्या तत्वाने सर्व वागू लागले काँग्रेसची राजकीय संस्कृती कशी असणार ह्याची ही चुणूक होती टिळकांनी वापरलेला मवाळ हा शब्द गुजराती लोकांना दिलेली शिवी आहे असा अपप्रचार सुरु झाला लाला लजपत रॉय ह्यांचे स्वागत करायचे नाही असा घाट घातला गेला जो टिळकांनी स्वागताची समांतर व्यवस्था करून उधळून लावला ह्या स्वागतात गोखले ह्यांना सामील होण्याची विनंती केली गेली पण गोखलेंनी ती टाळली खुद्द टिळकांना ऑफिशियल वेलकम भेटले नाही तरी खुद्द जनतेनेच टिळकांचे स्वागत केल्याने मवाळांना देश अजूनही जहालांच्या मार्गावर आहे हे कळून चुकले आणि टिळकांना नामोहरण करण्याचे प्लॅनिंग सुरु झाले अरबिंदो घोष ह्यांनाही टिळकांनी उत्तम स्वागत मिळेल ह्याची काळजी घेतली
सुरतेतील पहिल्याच भाषणात टिळकांनी जहालांची व त्यांच्या राष्ट्रीय पक्षाची काय भूमिका आहे ते मांडले काँग्रेस फुटू द्यायची नाही असाच त्यांचा प्रण होता अरबिंदो घोष ह्यांच्या अध्यक्षतेखाली जहालांनी आपल्या प्रतिनिधींची सभा भरवली श्यामसुंदर चक्रवर्तींनी जहालांनी वेगळी काँग्रेस काढावी अशी सूचना दिली ज्याला अरबिंदोचा पाठिंबा होता बहुमत त्या दिशेने कलू लागले पण टिळकांनी सभेच्या शेवटी काही झाले तरी मी कॉम्प्रोमोईजवाला आहे असे सांगून जे काही काम करावयाचे आहे ते काँग्रेसमध्येच राहून करायचे असे सांगितले टिळकांचा निर्णय सर्वांनी मान्य केला व मवाळांशी वाटाघाटी करण्यासाठी टिळक मुंजे वैग्रे नेत्यांची समिती नेमली व मुख्य अधिवेशनात सामील होण्याची तयारी सुरु केली
इकडे मवाळांनी शिवाजीने दोन वेळा सुरत लुटली आणि आता टिळक आले आहेत अशा आशयाची पत्रके वाटली एकंदरच मवाळांचे ज्याला बिलो द बेल्ट म्हणतात तसे राजकारण सुरु होते खापर्डे ह्यांनी गुजरातीत भाषण करून हाही मुद्दा खोडून काढला तर अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मराठी लोक कुठेही ह्या काळात घोंगडे व काठ्या घेऊन हिंडायचे ह्यातील काठ्यांचा विपर्यास करून पुंडगिरीसाठी मराठी लोकांनी सुरतेतल्या काठ्या महाग केल्या असा ब्रभा सुरु केला टिळकांनी अधिवेशनाआधी मवाळांच्या प्रतिनिधींना भेटण्याची खूप खटपट केली पण मवाळ टिळकांना चुकवत राहिले रात्री जर मवाळांशी समेट झाला नाही तर अध्यक्षांच्या सूचनेला दुरुस्ती सुचवायची असे ठरले शेवटचा उपाय म्हणून टिळक समेटासाठी शेवटी माळविंच्या घरी गेले तर माळवी देवपूजेतून मुद्दामहून उठेनात शेवटी टिळक कंटाळून अधिवेशनाच्या जागी आले
मंडपात जाणीवपूर्वक नागपूर वऱ्हाड एका बाजूला तर पुणेकर दुसऱ्या बाजूला बसवले जेणेकरून हे एक होणार नाहीत हळूहळू गर्दी जमू लागली सिंधचा मंडप रिकामा होता तिथे महाराष्ट्रीय बसू लागले तर त्यांना मनाई करण्यात आली अध्यक्षपदाच्या खुर्चीच्या आसपासच्या सर्व जागा फिरोजशहा मेथांच्या प्रभावळीला देण्यात आल्या आणि जहालांना मात्र जागा जवळजवळ नाकारण्यात आल्या सर्वात वाईट गोष्ट म्हणजे टिळकांनाच उच्चासन नाकारण्यात आले त्यामुळे आपला पक्ष मांडायला टिळकांना आसनच न्हवते नियोजित अध्यक्ष घोष मेथा व गोखलेसह स्टेजवर आले माळविंनी कंटाळवाणे भाषण केले ते तरीही चुळबुळ करत लोकांनी ऐकले सुरेंद्रनाथ बाबू उभे राहिले तर बंगालच्याच लोकांनी मिदनापूरचा ट्रेटर अशा त्यांच्याविरुद्ध घोषणा द्यायला सुरवात केली ह्या घोषणांनी ते सर्द झाले लोक ऐकेनात म्हणून माळविंनी उद्यापर्यंत सभा तहकूब केल्याचे जाहीर केले रात्री टिळकांनी सुरेंद्र नाथांच्याविरुद्ध घोषणा देणाऱ्यांना जोवर कुणी आपल्या अंगावर हात टाकत नाही तोवर घोषणा द्यायच्या नाहित असे सांगितले त्यांनी ते मान्य केले
दुसऱ्या दिवशी मेथा कंपूने जे लोक मंडपाच्या नागपूर भागात बसवले त्यातील चक्क काही भाडोत्री गुंड होते ज्यावरून वाद सुरु झाला अशा गदारोळात टिळकांनी खुर्ची आपल्या ताब्यात घेतली आणि मी आता माझे म्हणणे मांडल्याशिवाय हलणार नाही असे म्हणून बोलायला सुरवात केली तर मवाळांच्या एका प्रतिनिधीने टिळकांच्या दिशेने एक छत्री फेकली टिळक तरीही ठाम राहिले तर मंडपातल्या लोकांनी गडबड सुरु केली एका गुजराती माणसाने एक खुर्ची थेट टिळकांच्यावर फेकली ती पंजाबचे प्रतिनिधी मधुसूदन भगत ह्यांनी हवेतल्या हवेत झेलली मग फक्त गदारोळ उरला
सुरेंद्रनाथ म्हणाले काँग्रेस इज डेड लॉन्ग लिव्ह काँग्रेस
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १३७ मवाळ विरुद्ध जहाल कि सेक्युलर विरुद्ध हिंदुत्व
सुरतेच्या फाळणीनंतर जहाल मवाळांना मवाळ जहालांना काँग्रेस फुटल्याबद्दल दोष द्यायला लागले वास्तविक अध्यक्षाच्या अधिकारातून हा वाद झाल्याने टिळकांनी ह्या मूलभूत प्रश्नाची चिरफाड केली आचार्य जवडेकरांनी आधुनिक भारत ह्या ग्रंथात स्वतः मवाळ असूनही सारा दोष मवाळांना दिला आहे कारण ह्या अधिवेशनात खरोखरच टिळक फूट पडू नये म्हणून धडपडत होते माळवीसारख्या नेत्याने देवपूजेचा बहाणा करून टिळकांना घरात बसवून ठेवणे हा नीचपणाच होता टिळकांना साधी खुर्चीही न देणे हा आगाऊपणाचं होता साहजिकच जहालांची माणुसकी अधिकाधिक अधोरेखित होत गेली एका अर्थाने संपूर्ण अधिवेशनात जहाल मवाळांच्या गुणासारखे नम्रतेने वागत होते तर मवाळ जहाल पणाने काटेरी वर्तन करत होते महाराष्ट्रासकट सगळ्या दक्षिणेला जी वागणूक मिळाली ती उत्तरेच्या संस्कृतीच्या आतापर्यंतच्या बायसला पुष्टी देणारी होती आणि गुजरात ज्याला लाट म्हणून दक्षिणेकडे मान होता हा द्वारकेच्या काल्पनिक मिथमध्ये फसून स्वतःला उत्तरेच्या संस्कृतीत बसवंत आहे हेही स्पष्ट झाले स्वतंत्र द्रविडस्थानाचा विचार ह्या अधिवेशनांनंतर घोळायला सुरवात झाली आणि महाराष्ट्र टिळकांच्या ब्राम्हणी नेतृत्वाखाली द्रविड राष्ट्रात येणार नाही म्हणून कर्नाटक आंध्र तामिळ मल्याळम ह्यांचे एक राष्ट्र अशी मांडणी चर्चेला आली
ज्या हिरिरीने सुरतेत मवाळ लढत होते ते बघता एक प्रश्न नेहमीच निर्माण होतो कि हे केवळ सत्ताकारण होते कि ह्यामागे एक विशाल वैचारिक कारण होते ? फिरोजशहा मेथा हे सत्ताकारण करत होते पण सुरवातीला मरेपर्यंत लढणारे रानडे किंवा सुरतेत मवाळांच्या बाजूने ठाम उभे राहणारे गोपाळ गोखले किंवा सुरेंद्रबाबू बॅनर्जी हे काही सत्ताकारणी न्हवते ह्यांना मनापासून वाटत होते कि जहालांच्या राजकारणाची दिशा चुकीची आहे जहालांचे राजकारण हे काही फक्त जहाल न्हवते ते धार्मिकही होते टिळक हिंदू राष्ट्र हा शब्दप्रयोग वापरत होते आणि हिंदू धर्मातल्या प्रत्येक सुधारणेला कट्टर विरोध करत होते
माझे स्वतःचे मत असे आहे कि ह्या काळात टिळक जे काही मांडत होते तो हिंदुत्ववाद आहे ह्याचीच मुळात टिळकांना जाणीव न्हवती त्यांच्यासाठी हाच खरा राष्ट्रवाद होता आणि इतर राष्ट्रवादाचे पर्याय त्यांना चुकीचे वाटत होते सेक्युलॅरिझमला त्यांचा विरोध होता पण उदारमतवादाला त्यांचा पाठिंबा होता एका अर्थाने टिळक हिंदूत्ववादी उदारमतवाद सादर करत होते त्यामुळेच त्यांच्या लेखात अनेकदा तरीही ज्यांना सुधारणा स्वीकारायच्या असतील तर त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य असल्याने त्या स्वीकारण्याचा हक्क आहेच अशा आशयाचे वाक्य येते म्हणजे मी माझे हिंदुत्व मांडणार पण ते अमान्य करण्याचा तुम्हाला अधिकार आहे असे टिळक म्हणत होते आणि त्यांच्या वागण्यातून हा हिंदुत्ववादी उदारमतवाद अनेकदा झळकतो ज्याचे प्रत्यंतर आपणाला पुढे अटलबिहारी वाजपेयींच्या वागण्यात दिसते
एकीकडे जहालांची अशी स्थिती असतांना मवाळांनाही आपण विरोध करतोय म्हणजे हिंदुत्ववादाला विरोध करतोय हे कळत न्हवते एका अर्थाने दोन्ही बाजूंनी ही लढाई एका प्रॉपर इझमनेसपाशी पोहचली न्हवती कारण दोघेही एका इझमची सुरवात करत होत्या आणि टिळकांच्या मृत्यूनंतर हे अधिकाधिक दोन्ही बाजूंना स्पष्ट होत गेले
मवाळांनी टिळकांच्या संपूर्ण हयातीत टिळकांना कधीही अध्यक्षपद मिळू दिलं नाही नंतरही सावरकर सुटून आले तेव्हा सावरकरांची आवश्यक ती मुलाहिजा काँग्रेसने ठेवली नाही उलट ते येऊच नयेत अशी मवाळांची इच्छा होती अपवाद फक्त गांधी गांधी मात्र एकमेव असे नेते होते जे काँग्रेसकडे सर्व आयडियालोजींना खुली असणारी एक स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारी राजकीय संघटना म्हणून पाहात होते ह्याउलट गोखले पटेल नेहरू वैग्रे काँग्रेसला एक राजकीय पार्टी म्हणून पहात होते म्हणूनच गांधींनी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना मंत्रिमंडळात घे अशी सूचना केली तेव्हा नेहरूंनी ते कुठे काँग्रेसचे सभासद आहेत अशी विचारणा केली तेव्हा गांधींनी तुला काँग्रेसचे मंत्रिमंडळ बनवायचे आहे कि भारताचे मंत्रिमंडळ बनवायचे अशी पृच्छा केली आणि आंबेडकर मंत्रिमंडळात आले गांधीनी स्वातंत्र्य मिळवण्याचे काम संपल्याने आता काँग्रेस बरखास्त करावी अशी सूचनाही त्यासाठीच केली होती पण नेहरू पटेल आझाद ह्यापैकी कुणीही ती ऐकली नाही कारण सर्वांनाच काँग्रेस बरखास्त केली तर आपली मते घटतील
ह्याचा अंदाज होता आजही आपल्या नावातून काँग्रेस हा शब्द काढायला फुटलेली काँग्रेस तयार नसते वा फुटलेला नेताही तयार नसतो म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस शेवटी काँग्रेस राहते
टिळकांनाही काँग्रेस फोडायची न्हवती कारण तेही राजकारणी होते पण दुर्देवाने इतरांनाही काँग्रेस हवी होती राजकारणात काँग्रेसच्या नावाने मते मिळत होती आज आपण असे म्हणू शकतो कि सुरतेची काँग्रेस हा काँग्रेस आपल्या ताब्यात घेण्याचा हिंदुत्वाचा पहिला प्रयत्न होता आणि सेक्युलर मवाळांनी तो उधळला ह्याचा अर्थ सेक्युलर खूप सज्जन होते का तर नाही ह्या अधिवेशनात बिलो द बेल्ट सेक्युलरच खेळले ह्या अधिवेशनातले गोखलेंचे मौन हे टिपिकल सेक्युलर सोयीस्कर मौन होते जे पुढे शहाबानो प्रकरणातही पाळले गेले
असे असतांनाही काँग्रेसने टिळकांना का झेलले ? तर लोकप्रियतेमुळे ! टिळक हे एकमेव नेते असे होते ज्यांना जनाधार होता नाही म्हंटले तरी मवाळ दरबारी राजकारण करणारी बाबू मंडळी होती त्यांना काँग्रेसचा मासबेस वाढवण्यासाठी टिळक हवे होते मग प्रश्न असा कि सुरत मध्ये असे काय घडले कि मवाळ एव्हढे जहाल वागले मवाळांची अशी समजूत झाली होती कि बंगालच्या फाळणीमुळे आपलाही मासबेस तयार झाला आहे विशेषतः आपल्याकडे मासबेस असलेले सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहेत त्यामुळे आता टिळकांची गरज नाही ह्याशिवाय टिळक काँग्रेस सोडून जाणार नाहीत ह्याचाही अंदाज त्यांना आला होता
मवाळांचा हा भ्रम टिळक तुरुंगात गेल्यावर आपोआप फिटला खुद्द सुरेंद्रनाथ बॅनर्जींना मिळणारा प्रतिसाद घटला गोखलेंच्या सभांना उपस्थिती कमी झाली मासबेसबाबत आपला अंदाज चुकलाय ह्याची जाणीव झाली आणि जहालांच्यापेक्षा मवाळंच टिळकांची जास्त वाट बघायला लागले
माझं स्वतःच स्पष्ट मत असं आहे कि टिळकांनी स्वतःची जहाल काँग्रेस उभी करायला हवी होती पण टिळकांनी ही लढाई टाळली इंग्रजांच्या विरोधात कौरव पांडव एकच हवेत अशी त्यांची भूमिका होती परकीयांशी लढताना फाटाफूट नको असा त्यांचा आदर्शवाद होता टिळक एका अर्थाने येणारी लढाई पोस्टपोन करत होते कुठेतरी त्यांना हा आत्मविश्वास होता कि काँग्रेस आपण आपल्या मताप्रमाणे वळवू लोकांचा वाढत जाणारा पाठिंबा त्यांच्या बाजूने होता मग गडबड कुठे झाली ?
ह्या गडबडीने नाव महात्मा गांधी होते मुळात गांधी नावाचा फीनॉमीना कुणी इमॅजीनच केला न्हवता ना सेक्युलरवाद्यांनी ना हिंदुत्ववाद्यांनी ! गांधींचा हिंदू धर्म हा स्वभावतः सेक्युलरला पूरक होता अपवाद त्यांचा आतला आवाज त्यामुळे त्यांनी गांधी झेलले ह्याबद्ल्यात गांधींच्या अफाट लोकप्रियतेचा फायदा काँग्रेसला मिळाला मासबेस असलेल्या नेत्याची गरज गांधींनी भागवली हिंदुत्ववादी नेत्याची गरजच उरली नाही
इकडे टिळकांच्या मृत्यूनंतर प्रचंड मासबेस असलेला दुसरा हिंदुत्ववादी नेताच निर्माण झाला नाही त्यामुळे हिंदुत्ववादी साफ गोंधळले आशा फक्त सावरकरांच्यापासून होती पण सावरकर ह्या आशेला पुरेसे पडले नाहीत आता परिस्थिती उलटी झाली एकेकाळी जे हिंन्दुत्ववाद्यांच्याकडे होते ते सेक्युलर वाद्यांच्याकडे न्हवते आता ते सेक्युलरवाद्यांच्याकडे होते हिंदुत्ववाद्यांच्याकडे न्हवते परिणामी हिंदुत्ववाद्यांना शेवटपर्यंत गांधींचे काय करायचे ते कळले नाही हा तोच पेच होता जो कधीकाळी सेक्युलरवाद्यांच्यापुढे होता ज्यांना टिळकांना कसे हाताळायचे तेच कळत न्हवते त्यांनी उतावीळपणे काँग्रेसचं फोडली नेमका
हाच पेच हिंदुत्ववाद्यांच्यापुढे उभे ठाकला पण आता पक्ष फोडण्याचा पर्याय हिंदुत्ववाद्यांच्यापुढे न्हवता
एखादा हॅन्डल करता न येणारा स्मार्टफोन हाताळता आला नाही कि उतावीळ यूजर तो स्मार्टफोनच फोडतो त्याप्रमाणे ही अवस्था होती हिंदुत्ववाद्यांनी गांधींची हत्या केली ह्या हत्येचा राजकीय फायदा काँग्रेसला झाला व काँग्रेस विजयी होत राहिली ह्याऐवजी जर गांधींना जिवंत ठेऊन त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा व वापरण्याचा प्रयत्न करता येणे शक्य होते पण सावरकर हे थिटे व अहंकारी नेतृत्व होते संघटन कौशल्य कशाशी खातात हेच त्यांना माहित न्हवते त्यांच्या जागी टिळक असते तर टिळकांनी निश्चित हे केले असते टिळकांच्यानंतर हिंदुत्ववाद्यांना मिळालेले दुसरे समर्थ नेतृत्व हे अटलबिहारी वाजपेयींचे आहे दुर्देवाने टिळकांच्यानंतर जसे सावरकर आले तसे वाजपेयीनंतर मोदी आलेत ज्यांना सावरकरांच्याइतकाच अहंकार आहे आणि ज्यांना सावरकरांच्याप्रमाणेच कुणाचे ऐकायचे नसते त्यांचे सुदैव आणि काँग्रेसचे दुर्देव इतकेच कि काँग्रेसकडे आता महात्मा गांधी नाहीत आणि फिरोजशहा मेहता सर्वजणच आणि सर्वत्र आहेत
प्रश्न इतकाच फिरोजशहा मेहतांच्याप्रमाणे हे ढुढाचार्य काँग्रेसमध्ये फूट पाडणार आहेत का ?
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १३७ मंडालेकडे वाटचाल १
सुरतेच्या फाटाफुटीनंतर टिळकांनी सांगितले कि आता सरकारची दडपशाही चालू होईल टिळकांचे भविष्य खरे ठरले काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा सर्वाधिक फायदा मिळाला तो ब्रिटिशांना सुरत अधिवेशनाआधीच लाला लजपत राय ह्यांना अटक करून ब्रिटिशांनी ते काय करू शकतात ह्याची चुणूक दाखवली होती सुरतेच्या अधिवेश्नाआधी त्यांची सुटका झाली होती फाटाफुटीनंतर अचानक काँग्रेस दिशाहीन झाली प्रथम मद्रास प्रांतातील चिदम्बरम पिल्ले ह्यांना अटक झाली सरकारला घाबरण्याऐवजी त्यांनी निर्धाराने त्याचा सामना केला
पुण्यात टिळकांनी दारूच्या गुत्यांविरुद्ध निर्धारण चळवळ सुरु केली व त्यासंदर्भात सरकार दारू आणि लोक व दारू आणि सरकारची अडचण असे दोन निबंध लिहिले ही एका अर्थाने दारूबंदी चळवळ होती जी पुढे गांधींनी व्यापक केली हीही चळवळ टिळकांनी शिस्तबद्ध पद्धतीने चालवली ह्या चळवळीने नवऱ्याच्या दारूपानाने त्रस्त झालेल्या बायकांच्यात टिळक अधिकच लोकप्रिय झाले पुढे गडकरींना ह्यातूनच एकच प्याला सुचले टिळक ह्या चळवळीत व्यस्त असतांना इकडे ब्रिटिश सरकार मात्र टिळकांना कशी अटक करता येईल त्याची वाट पहात होते
सुरतेच्या फुटीनंतर जहाल आणि मावळ दोघेही मंदावले आणि तयार झालेल्या पोकळीला भरण्यासाठी म्हणून तिसऱ्या पक्षाचा संचार वाढला ज्याचा उल्लेख आपण अतिजहाल म्हणून केला होता ह्या पंथातल्या तरुणांना टिळक आदरणीय वाटत होते त्यामुळे लाला हरदयाळ सारखे लोक टिळकांना भेटून जात ह्या काळात सर्व अतिजहाल लोक बॉम्ब बनवण्याच्या मागे लागले होते आणि टिळकांना हे तंत्र माहीत असावं असं वाटून टिळकांना हे लोक भेटत काहींना टिळकांचा आशीर्वाद हवा असे बिपीनचंद्र पाल पासून अरबिंदो घोषपर्यंत सर्वच बंगाल्यांना टिळक हेच राष्ट्रीय नेते वाटत होते अनंत कान्हेरे हा टिळकांच्या कैदेत त्यांना भेटत असे त्यामुळे क्रांतिकारकांचा समज असाच होता कि टिळक आतून क्रांतीकारकांना सामील आहेत ज्यावेळेला इतर नेते ह्यांची नावेसुद्धा घेत न्हवते त्यावेळी टिळक भेटत होते शिवाय टिळक दोन वेळा तुरुंगात जाऊन आल्यामुळे त्यांच्याभवती एक ग्लॅमर तयार झाले होते सरकारलाही टिळक क्रांतीकारकांना मदत करतात असा संशय होता
१९०७ च्या डिसेम्बर महिन्यात श्यामजी कृष्णाजी ह्यांनी भारतीय चळवळ रशियातील क्रांतिकारकांच्या मार्गाने चालवणे भाग आहे असे प्रतिपादन केले ह्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर श्यामजींना जाऊन मिळाले सावरकरांनी पुण्यातील परदेशी कपडे जळणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व केले होते हे सर्वश्रुत होते सावरकर ह्या काळात स्वतःला टिळकांचे अनुयायी म्हणवून घेत बंगालमध्ये युगांतर व इतर पत्राद्वारे नेटवर्क तयार होत होते बिरेंद्रकुमार घोष सशस्त्र लढ्याची तयारी करत होते
सुरवातीला सरकारचे ह्याकडे दुर्लक्ष्य झाले कारण मिंटी साहेबांना राज्यकारभारापेक्षा घोडे अधिक प्रिय होते पण नंतर सरकारने अधिक लक्ष्य दिले व टिळकांच्यावर पाळत सुरु झाली
ह्याचवेळी दिनांक ३० एप्रिल १९०८ ला खुदिराम बोस ह्या केवळ अठरा वर्षांच्या क्रांतिकारकाने त्याच्या सहकारी प्रफुल्ल चाकीच्या सहाय्याने मॅजिस्ट्रेट डग्लस किंग्जफोर्ड वर बॉम्ब फेकला पण त्यात मॅजिस्ट्रेटऐवजी मिसेस केनेडी व त्यांची मुलगी ह्या दोन इनोसेंट ब्रिटिश स्त्रियांचा मृत्यू झाला महात्मा गांधींनी ह्याचा निषेध केला व अशा इनोसन्ट हत्या करून भारताला स्वराज्य मिळणार नाही असे सांगितले तर टिळकांनी ह्या घटनेवर १२ मे १९०८ रोजी केसरीत देशाचे दुर्देव नावाचा लेख लिहिला आणि ब्रिटिशांनी आता तरी शहाणे होऊन भारताला स्वराज्य द्यावे अशी मागणी केली ह्यानंतर ताबडतोब काळकर्ते शिवरामपंत परांजपे ह्यांनी १५ मे ला ह्या विषयाची चर्चा केली ११ जूनला सरकारने टिळकांचे अनुयायी असलेल्या शिवरामपंत परांजपे ह्यांना अटक केली टिळकांनी त्यांना जामीन मिळवून देण्याचे प्रयत्न सुरु केले पण जामीन मिळेना आपल्यालाही अटक होण्याची शक्यता असल्याने सर्वात प्रथम टिळकांनी परांजपेंनी त्यांना पाठवलेली पत्रे नष्ट केली इतर सारी डॉक्युमेंट्स जी कोर्टात पुरावा मानली जाऊ शकतात तीही नाहीशी करण्यात आली काळकर्ते परांजपेंना मदत करण्यासाठी टिळकांनी मुंबईला जायचे निश्चित केले टिळकांच्या एका गुप्तचर स्नेह्याने कळवले कि तुम्हाला अटक होणार आहे तरीही टिळक मुंबईला गेले त्यांनी परांजपेंना जामीन मिळवून दिला व त्यांची सुटकाही करून घेतली
दिनांक २४ जून रोजी ते परांजपेंच्या केसबाबत सरदारगृहाच्या बाहेर चर्चा करत होते तेव्हा टिळकांचा हितचिंतक तिथे आला आणि त्याने सांगितले ,"टिळकांच्या अरेस्ट वॉरंटवर अर्ध्या तासापूर्वी मॅजिस्ट्रेटननी सही केली आहे "
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १३८ मंडालेकडे वाटचाल २
टिळकांच्या अटकेचे वॉरंट निघाल्याचे कळल्यावर नेमके पुढे जे झाले त्या ह्या सगळ्या घटनेचा वस्तुनिष्ठ रिपोर्ट टिळकांच्यावर पाळत ठेवणाऱ्या गंधे नावाच्या अधिकाऱ्याने पुढीलप्रमाणे नोंदवलाय
TILAKS CONVICTION AND SENTENCE (Paragraph 607a.) On June 24th B. G. Tilak was arrested in Bombay on a charge . under section 124A and 153A of the Indian Penal Code in respect of an article headed "The Country's misfortune" which appeared in the issue of the Kesari of the 12th of May 1908. He was placed before the Chief Presidency Magistrate, Bombay, on the 25th June and remanded to Jail till the 29th idem. On the 27th June he was again placed before the Chief Presidency Magistrate for a similar offence in respect of an article headed "These remedies are not lasting", which appeared in the issue of the Kesari of the 9th June 1908. Tilak was convicted and sentenced by the Sessions Court to six years' transportation and to pay a fine of Rs. 1,000 on the 22nd July 1908. The same day he was taken to the Ahmedabad Central Prison, Sabarmati.
F. M. GANDEY, Personal Assistant to the Deputy Inspector-General of Police, for Railways and Criminal Investigation.
टिळकांनी जी शिक्षा ठोठावली गेली त्यामागची कारणे व त्यामागचा सरकारचा विचार निकालपत्रात पुढीलप्रमाणे प्रकट झाला आहे न्यायाधीश म्हणतायत
प्रत्यक्षात ह्या दोन घटना दरम्यान व मागे जो ड्रामा होता तो अधिक गुंतागुंतीचा होता टिळकांचे चरित्रकार टिळकांचे चरित्र मंडलपूर्व व मंडलोत्तर असे विभागतात तर सदानंद मोरे ह्यांनी हे चरित्र इंग्लंडपुर्व व इंग्लंडोत्तर असे विभागले आहे तुरुंगगमन नेहमीच तुम्हाला आतून बदलवते अंतःकरणात्मक बदल व जाणीव बदलते तर परदेशगमन बाहेरून तुमची सामाजिक जाणीव बदलते टिळकांच्या पहिल्या तुरुंगवासाने राजकीय सुधारणांबाबत टिळक ठाम झाले दुसऱ्या तुरुंगवासाने ते जहाल झाले प्रश्न आता तिसऱ्या तुरुंगवासाचा होता
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १३८ गीता का फोफावली : गीतारहस्यापूर्वीचे गीतारहस्य
टिळकांच्या ह्या खटल्याने टिळकांच्यावरील मागील खटल्याची पुन्हा चर्चा सुरु झाली ह्या खटल्याचे गुप्तहेर रिपोर्ट व निकालपत्रातला महत्वाचा भाग मुद्दामच मागच्या भागात दिला कारण हा खटला प्रामुख्याने कशा संदर्भात आहे हे स्पष्ट व्हावे अलीकडे अनेक बुद्धिवादी लोकांना मोदी सरकारने तुरुंगात टाकले त्याचा आधार हा व पूर्वी खटला आहे अशी चर्चा पुरोगामी लोकांनी केली आहे त्यामुळे ह्या खटल्याचे महत्व वाढले आहे
मागील खटल्यात टिळकांनी शिवाजीने केलेल्या अफझखानाच्या हत्येचे समर्थन करण्यासाठी टिळकांनी गीतेचा वापर केला होता टिळकांनी केलेला युक्तिवाद पुढीलप्रमाणे होता
Did Shivaji commits a sin in killing Afzulkhan, or how? The answer to this question can be found in the Mahabharata itself. Srimad Krisna’s advice in the Gita is to kill even our teachers and our kinsmen. No blame attaches to any person if he is doing deeds without being actuated by a desire to reap the fruit of his deeds… Do not circumscribe your vision like a frog in the well; get out of the Penal Code, enter into the extremely high atmosphere of Srimad Bhagavadgita, and then consider the actions of great men.’
टिळकांचा हा युक्तिवाद ब्रिटिश सरकारने स्वीकारला नाही प्रश्न असा आहे कि टिळकांना आपल्या कृत्यासाठी महाभारत व गीता ह्यांचा वापर का करावासा वाटला
एकतर कायद्याने स्वीकारलेल्या धर्मग्रंथांची धर्मग्रंथ म्हणून
कायदा खूप इज्जत करतो हे टिळकांना वकील म्हणून चांगलेच माहित होते ब्रिटनमध्ये कोर्टात अनेकदा बायबलचे दाखले दिले जात आणि ह्या दाखल्यांना न्यायासन खूप इज्जत देई अशाच प्रकारची इज्जत सरकारने गीतेला धर्मग्रंथ म्हणून व शपथग्रन्थ म्हणून मान्यता दिल्याने गीतेला मिळेल असा टिळकांचा कयास असावा
खुदिराम ने केलेल्या हत्येचे समर्थन अशा तऱ्हेने गीतेच्या सहाय्याने करता येणे शक्य आहे का? हा टिळकांच्यापुढे जीवनमरणाचा प्रश्न होता कारण ह्या हत्येच्या आधारेच टिळकांच्यावर देशद्रोहाचा खटला भरणार हे स्पष्ट झाले होते
एक गोष्ट आपण लक्ष्यात घ्यायला हवी ब्रिटिशांनी समस्त हिंदूंच्यासाठी गीता हा कोर्टातला शपथ घेण्याचा ग्रंथ बनवल्यापासून हिंदू लोकांची गीतेत रुची वाढली होती आणि ब्रिटिशांच्यामुळे गीता हाच हिंदूंचा धर्मग्रंथ हा समज बळावत चालला होता एका अर्थाने सनातन कर्मठ द्विवर्णात्मक (ब्राम्हण आणि शूद्र )व्यवस्था मानणारा हिंदू धर्म साईडलाईन झाला आणि पुन्हा एकदा चार वर्ण मानणाऱ्या वैष्णव धर्माचे हिंदू धर्म म्हणून कमबॅक झाले आणि नव्या हिंदू धर्मातून शैव व शाक्त दर्शने दर्शने म्हणून वजा करण्यात आली फक्त भक्तीचा उपास्य देव व देवता म्हणून शैव पंचायतन उरले ह्याचा एक परिणाम असा झाला कि तुम्ही वैष्णव नसलात तरी तुम्हाला वैष्णव ग्रंथाला स्वतःचा धर्मग्रांथ म्हणून मान्यता देण्याची सक्ती झाली हे मध्ययुगात शंकराचार्यांच्यानंतर जे घडले त्याची रिपीटिशन होती त्याकाळात शंकराचार्य वापरले गेले आता शिवाजी महाराज व गणपती हे दोन शैव स्वतःच्या हिंदू अजेंड्यासाठी वापरले जाऊ लागले आणि ह्याला अधिकृत स्वरूप टिळकांनीच दिले शिवाजी महाराज ब्राम्हणप्रतिपालक असल्याची द्वाही चिपळूणकरांनी फिरवली व तीला टिळकांनी भारतव्यापी बनवली बर शिवाजीच्या उत्सवाची सुरवात टिळकांनी केलीच न्हवती ती केली होती महात्मा फुलेंनी पण भारतभर गाजावाजा झाला टिळकांच्या नावाचा हीच गोष्ट गणपती उत्सवाची गणपती उत्सव सार्वजनिक रित्या फार प्राचीन काळापासून सुरु होता शिवाजी महाराजांनी तो अधिक भव्य बनवला शिवाजी महाराजांच्या काळात ह्या गणेश उत्सवाला हिंदवी स्वराज्य फ़ंड पुरवत होते ब्रिटिश राज्याने उत्सवाचे फन्डिंग थांबवले व सार्वजनिक गणेश उत्सव थांबला पुढे पहिला सार्वजनिक गणेश उत्सव स्वतःच्या पैशांनी सुरु केला तो शैवांनी १८८६ च्या बॉम्बे गॅझेटमध्ये Angelo de Gubernatis नोंदवतो I followed with the greatest curiosity crowds who carried in procession an infinite number of idols of the god Ganesh. Each little quarter of the town, each family with its adherents, each little street corner I may almost say, organises a procession of its own, and the poorest may be seen carrying on a simple plank their little idol or of papier mâché... A crowd, more or less numerous, accompanies the idol, clapping hands and raises cries of joy, while a little orchestra generally precedes the idol.
शैवांचा उस्फुर्तपणे चाललेला हा गणेश उत्सव ही पश्चिम भारताची हजारो वर्षाची विरासत होती उत्तर शिव दक्षिण कार्तिकेय पूर्व पार्वती मध्य नंदी व पश्चिम गणेश अशी ही शैव विरासत ! पाण्यात विसर्जन ही नंतरची प्रथा पण मिरवणूक भारतभर कॉमन पूर्वेचा दुर्गा पूजा उत्सव आणि पश्चिमेचा गणेश उत्सव गाजला तरी दक्षिणेत कार्तिकेय व उत्तरेत महाशिवरात्रीला शिव अशी ही प्रथा आहे म्हणजे ब्रिटिशांच्या आधीपासूनच ही प्रथा आहे पालखी आणि मिरवणूक हे टिपिकल शैव अविष्कार आहेत टिळकांनी महाशिवरात्रीचा शिव उत्सव शिवाजी उत्सवाच्या द्वारे रिप्लेस केला कारण भगवान शिवांना ब्राम्हणप्रतिपालक म्हणणे कठीण होतं शिवाजी महाराजांच्याबाबत हे शक्य होते म्हणजे शैवांचा वापर करायचा त्यांची पोट्टी जमवायची व स्वातंत्र्यलढ्यासाठी वापरायची असा हा प्लॅन मात्र शैव ब्राम्हणांना जंगमांना गुरवांना शुद्रच म्हणायचे म्हणजे त्यांना फॉलो करणारे आपोआपच शूद्र हे राजकारण ओळखणाऱ्या महात्मा फुलेंना कुठेही वाव मिळणार नाही ह्याची काळजी घ्यायची
१८९३ साली भाऊसाहेब जावळे जे रंगारी समाजातील होते ह्यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाचे अर्वाचीन स्वरूपात पुनर्जीवन केले ही बातमी टिळकांनी केसरीत छापली व असे उत्सव भारतभर सुरु करा असे सांगितले
ह्यातून एक परिणाम झाला तो म्हणजे उत्सव शैवांचा प्रचार वैष्णवांचा सुरु झाला ह्या उत्सवांनी गीता अधिक सेटल झाली कारण गीतेमागची वैष्णव आयडेंटिटी काढून घेऊन तिला हिंदू आयडेंटिटी बनवण्यात आले पुढेपुढे
अगदी कम्युनिस्टसुद्धा गीता आणि श्रीकृष्णाबद्दल गहिवरून लिहायला लागले श्रीकृष्णाचे महाभारतात्मक चरित्र सोयीचे होते कारण श्रीकृष्णाने दोन राज्ये निर्माण केली व एक युद्ध करून प्राप्त केले
१ इंद्रप्रस्थ
२ द्वारका
निर्माण आणि तिसरे हस्तिनापूर इंद्रप्रस्थ नगरीसह प्राप्त केले त्याची स्वतःची द्वारका बुडाली
ह्या राज्य निर्माण करणाऱ्या व प्राप्त करणाऱ्या काल्पनिक श्रीकृष्णाचे वास्तव आकर्षण ह्या काळात सर्वांना वाटणे हे स्वाभाविक होते कारण पांडवांच्याप्रमाणे भारतीयांनी आपले राज्य गमावले होते व भारतीय जनता रामाप्रमाणे वनवासात गेली होती त्यामुळे वनवास व अज्ञातवास सम्पवून गेलेले राज्य प्राप्त करणारा श्रीकृष्ण हा आदर्श बनणे स्वाभाविक होते बरं हे सर्व करणारा श्रीकृष्ण स्वतः मात्र ह्या राज्यांचा स्वामी बनला न्हवता उपभोगशून्य स्वामी अशी त्याची प्रतिमा होती एका अर्थाने तो आर्य चाणक्यपुर्वीचा चाणक्य होता राजकारण कसे करायचे ह्याचे श्रीकृष्ण व चाणक्य हे दोन आदर्श ब्राम्हणांनी निर्माण केले टिळक व गांधी हे दोघेही ह्या वाटेने गेले टिळकांना स्वातंत्र्य बघायला मिळाले नाही पण गांधींना मिळाले ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने युधिष्ठराला व विष्णुगुप्ताने चंद्रगुप्ताला राज्यावर बसवले त्याप्रमाणे गांधींनी नेहरूंना राज्यावर बसवले
साहजिकच गीता हा राजकीय पुढाऱ्यांना त्यांच्या राजकीय कृत्यांसाठी सर्वात उत्कृष्ट ग्रंथ वाटायला लागला ह्या ग्रंथामुळे स्वतःच्या भावांना ठार मारता येणे शक्य होते युद्ध सम्पले कि दारू पित बसणाऱ्या योद्ध्यांचे दाखले देत दारू पिता येणे शक्य होते अनेक लग्ने करण्याची वा रखेल्या ठेवण्याचीही मुभा आहे असेही अनेकांना वाटायला लागले राधेकृष्ण संबंधामुळे विवाहित स्त्रियांशी संबंध ठेवले तर चालू शकते असे वाटणारा वर्ग पुढे येऊ लागला विवाहपूर्व रोमँटिक प्रेमासाठी श्रीकृष्ण राधा व विवाहोत्तर प्रेमासाठी रामसीता हे आदर्श प्रमोट करण्यात आले वैष्णव संतांनी हे सगळे सिम्बॉलिक आहे असे सांगून पळवाट काढली होती पण ब्रिटिश राज्यात वास्तवकेंद्री विचारांची वाढ झाल्याने लोक हे सर्व वास्तव म्हणून स्वीकारत होते ख्रिश्चन अधिकाऱ्यांना हे सगळे प्रोजेक्शन हवे होते कारण त्यामुळे हा पहा तुमचा देव दह्याची चोरी करणारा आणि चोरीला मान्यता देणारा राधेसारख्या विवाहित स्त्रीशी संबंध ठेवणारा युद्धात गुरु बहीण भाऊ ह्यांची हत्या करणारा वेळप्रसंगी खोटे बोलणारा , खांडववनात आदिवासींना जिवंत जाळणारा आणि हा पहा आमचा जिझस चोरी न करणारा जीवावर बेतले तरी हिंसा न करणारा कसलेही शारीरिक संबंध न ठेवणारा ब्रम्हचर्य पाळणारा अपरिग्रहाचे पालन करणारा , सर्वांचा आदर करणारा युद्धाऐवजी शांतीचा संदेश देणारा लोकांच्या पापासाठी स्वतः क्रुसिफाय होणारा वैग्रे ह्याला काउंटर म्हणून भारताकडे फक्त गौतम बुद्ध होता ज्याचे साहजिकच कमबॅक झाले
तुरुंगात जाऊन गीतारहस्य लिहिण्यापूर्वी गीतेभवती ऑलरेडी चर्चा सुरु झाल्या होत्या चर्चेच्या वावटळी उठायला लागल्या होत्या खांडववनात आदिवासी कसे जाळले ह्याच उदाहरण देऊन मुंडांना ख्रिश्चन बनवण्यात आलं होतं आणि बिरसा मुंडाचे बंड फसले होते
टिळक अशा पार्श्वभूमीवर आयुष्यातील चौथा महत्वाचा खटला लढवत होते
श्रीधर तिळवे नाईक
डिसेम्बर १९०८ ला नऊ बंगाली पुढाऱ्यांना अटक झाली
In the Ganpati festival of 1894, a song urged Hindus to stop worshipping Muslim tabuts (floats) of Muharram and to return to Ganpati and the holy cow: Bhupendra Yadav 50
Oh! Why have you abandoned today the Hindu religion? Have you forgotten Ganpati, Shiva, and Marti? What have you gained by worshipping tabuts? What boon has Allah conferred upon you That you have become Mussalmans today? Do not be friendly to a religion which is the alien condemnation Do not give up your religion and befallen. Do not at all venerate the tabuts, The cow is our mother, do not forget her.44
Yet another song mentioned that the Hindus had been beaten up in the recent disturbances and that they should, therefore, come together to demand justice.
Let us dance, O let us dance Ganpati has seated himself on his vehicle and started in procession You work hard to erect poles and make garlands, banners, and flags On this auspicious occasion do not sit quiet or become dispirited Let us tie shelas (scarves) around the waist and, having gaily dressed ourselves, carry the shield and dagger jauntily Disturbances have taken place in several places, and Hindus have been beaten Let all of us with one accord exert ourselves to demand justice.45 Such songs were provocative. They wanted the Hindus to maintain a distance from the Muslims. Hindus were advised to carry shields and daggers to avenge being beaten-up in the disturbances. But the content of such communal songs seem to have been transformed to assume political overtones over the next fifteen years. From communal chants, they turned into nationalist exhortations. This is how S.M. Edwardes, the Police Commissioner of Bombay, noted the changed political message in 1910: The movement which began as an opposition show to local Musalman
व सेक्युलर कलोनियल विरुद्ध हिंद
बंगालमुळे बदल मुस्लिम व गीता रहस्
प्
समता विरुद्ध समत्व (FAIRNESS )हाच पेच हिंदुत्ववाद्यांच्यापुढे उभे ठाकला पण आता पक्ष फोडण्याचा पर्याय हिंदुत्ववाद्यांच्या

It seems to me that it must be a diseased mind,
a most perverted mind, that can think that the articles that you have written
are legitimate articles to write in political agitation. They are seething with
sedition : they preach violence : they speak of murders with approval: and the
cowardly and attrocious act of committing murders by bomb not only seem to meet
with your approval but you hail the advent of bomb in India as if something had
come to India for its good. As I said it would only be a diseased and a
perverted mind that could consider that bombs are the legitimate instruments in
political agitation and it would be a diseased mind that could ever have
thought that the articles that you have written could be legitimately written,
66. Your hatred of the ruling class has not disappeared
during these ten years and these articles deliberately and defiantly written
week after week,-not written as you say on the spur of the moment but a
fortnight after the cruel and cowardly outrages committed on English
women-persistently and defiantly refer to a bomb as if it was one of the
instruments of political warfare. I say such journalism is a curse to the
country. X feel much sorrow in sentencing you. I have done nothing but
considered and considered most anxiously in the eventuality of a verdict of
guilty being returned against you what sentence to pass on you.
67. I have decided to pass a sentence which I
consider will be stigmatized as an instance of what is called misplaced
leniency. I do not think I could pass consistently with my duty and
consistently with the offence of which you have been found guilty a lighter
sentence than that I am going to give you. But I think for a man of your
position and circumstances that sentence will be sufficient to vindicate the
law and meet the ends of justice, You are liable under the first two charges to
be transported for life. I have considered whether I should give you a sentence
of imprisonment or a sentence of transportation. Having regard to your age and
other circumstances I think it is most desirable in the interests of peace and
order and in the interests of the country which you profess to love that you
should be out of it for some little time. Under Section 124A I am entitled to
pass sentence of transportation for any of the first two charges and on each of
the first two charges I sentence you to three years' transportation. You will
thus have six years' transportation. On the third charge, which is not
punishable by transportation but is only punishable by imprisonment or fine, I
do not think I will add to your troubles by sentencing you to an additional
period of imprisonment. On the third charge, I sentence you to a fine of Rs.
1000.
69. On the Advocate General's application the
fourth charge was withdrawn under Section 333 of
the Criminal Procedure Code, and his Lordship directed that such withdrawal be
tantamount to an acquittal.
प्रत्यक्षात ह्या दोन घटना दरम्यान व मागे जो ड्रामा होता तो अधिक गुंतागुंतीचा होता टिळकांचे चरित्रकार टिळकांचे चरित्र मंडलपूर्व व मंडलोत्तर असे विभागतात तर सदानंद मोरे ह्यांनी हे चरित्र इंग्लंडपुर्व व इंग्लंडोत्तर असे विभागले आहे तुरुंगगमन नेहमीच तुम्हाला आतून बदलवते अंतःकरणात्मक बदल व जाणीव बदलते तर परदेशगमन बाहेरून तुमची सामाजिक जाणीव बदलते टिळकांच्या पहिल्या तुरुंगवासाने राजकीय सुधारणांबाबत टिळक ठाम झाले दुसऱ्या तुरुंगवासाने ते जहाल झाले प्रश्न आता तिसऱ्या तुरुंगवासाचा होता
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १३८ गीता का फोफावली : गीतारहस्यापूर्वीचे गीतारहस्य
टिळकांच्या ह्या खटल्याने टिळकांच्यावरील मागील खटल्याची पुन्हा चर्चा सुरु झाली ह्या खटल्याचे गुप्तहेर रिपोर्ट व निकालपत्रातला महत्वाचा भाग मुद्दामच मागच्या भागात दिला कारण हा खटला प्रामुख्याने कशा संदर्भात आहे हे स्पष्ट व्हावे अलीकडे अनेक बुद्धिवादी लोकांना मोदी सरकारने तुरुंगात टाकले त्याचा आधार हा व पूर्वी खटला आहे अशी चर्चा पुरोगामी लोकांनी केली आहे त्यामुळे ह्या खटल्याचे महत्व वाढले आहे
मागील खटल्यात टिळकांनी शिवाजीने केलेल्या अफझखानाच्या हत्येचे समर्थन करण्यासाठी टिळकांनी गीतेचा वापर केला होता टिळकांनी केलेला युक्तिवाद पुढीलप्रमाणे होता
Did Shivaji commits a sin in killing Afzulkhan, or how? The answer to this question can be found in the Mahabharata itself. Srimad Krisna’s advice in the Gita is to kill even our teachers and our kinsmen. No blame attaches to any person if he is doing deeds without being actuated by a desire to reap the fruit of his deeds… Do not circumscribe your vision like a frog in the well; get out of the Penal Code, enter into the extremely high atmosphere of Srimad Bhagavadgita, and then consider the actions of great men.’
टिळकांचा हा युक्तिवाद ब्रिटिश सरकारने स्वीकारला नाही प्रश्न असा आहे कि टिळकांना आपल्या कृत्यासाठी महाभारत व गीता ह्यांचा वापर का करावासा वाटला
एकतर कायद्याने स्वीकारलेल्या धर्मग्रंथांची धर्मग्रंथ म्हणून
कायदा खूप इज्जत करतो हे टिळकांना वकील म्हणून चांगलेच माहित होते ब्रिटनमध्ये कोर्टात अनेकदा बायबलचे दाखले दिले जात आणि ह्या दाखल्यांना न्यायासन खूप इज्जत देई अशाच प्रकारची इज्जत सरकारने गीतेला धर्मग्रंथ म्हणून व शपथग्रन्थ म्हणून मान्यता दिल्याने गीतेला मिळेल असा टिळकांचा कयास असावा
खुदिराम ने केलेल्या हत्येचे समर्थन अशा तऱ्हेने गीतेच्या सहाय्याने करता येणे शक्य आहे का? हा टिळकांच्यापुढे जीवनमरणाचा प्रश्न होता कारण ह्या हत्येच्या आधारेच टिळकांच्यावर देशद्रोहाचा खटला भरणार हे स्पष्ट झाले होते
एक गोष्ट आपण लक्ष्यात घ्यायला हवी ब्रिटिशांनी समस्त हिंदूंच्यासाठी गीता हा कोर्टातला शपथ घेण्याचा ग्रंथ बनवल्यापासून हिंदू लोकांची गीतेत रुची वाढली होती आणि ब्रिटिशांच्यामुळे गीता हाच हिंदूंचा धर्मग्रंथ हा समज बळावत चालला होता एका अर्थाने सनातन कर्मठ द्विवर्णात्मक (ब्राम्हण आणि शूद्र )व्यवस्था मानणारा हिंदू धर्म साईडलाईन झाला आणि पुन्हा एकदा चार वर्ण मानणाऱ्या वैष्णव धर्माचे हिंदू धर्म म्हणून कमबॅक झाले आणि नव्या हिंदू धर्मातून शैव व शाक्त दर्शने दर्शने म्हणून वजा करण्यात आली फक्त भक्तीचा उपास्य देव व देवता म्हणून शैव पंचायतन उरले ह्याचा एक परिणाम असा झाला कि तुम्ही वैष्णव नसलात तरी तुम्हाला वैष्णव ग्रंथाला स्वतःचा धर्मग्रांथ म्हणून मान्यता देण्याची सक्ती झाली हे मध्ययुगात शंकराचार्यांच्यानंतर जे घडले त्याची रिपीटिशन होती त्याकाळात शंकराचार्य वापरले गेले आता शिवाजी महाराज व गणपती हे दोन शैव स्वतःच्या हिंदू अजेंड्यासाठी वापरले जाऊ लागले आणि ह्याला अधिकृत स्वरूप टिळकांनीच दिले शिवाजी महाराज ब्राम्हणप्रतिपालक असल्याची द्वाही चिपळूणकरांनी फिरवली व तीला टिळकांनी भारतव्यापी बनवली बर शिवाजीच्या उत्सवाची सुरवात टिळकांनी केलीच न्हवती ती केली होती महात्मा फुलेंनी पण भारतभर गाजावाजा झाला टिळकांच्या नावाचा हीच गोष्ट गणपती उत्सवाची गणपती उत्सव सार्वजनिक रित्या फार प्राचीन काळापासून सुरु होता शिवाजी महाराजांनी तो अधिक भव्य बनवला शिवाजी महाराजांच्या काळात ह्या गणेश उत्सवाला हिंदवी स्वराज्य फ़ंड पुरवत होते ब्रिटिश राज्याने उत्सवाचे फन्डिंग थांबवले व सार्वजनिक गणेश उत्सव थांबला पुढे पहिला सार्वजनिक गणेश उत्सव स्वतःच्या पैशांनी सुरु केला तो शैवांनी १८८६ च्या बॉम्बे गॅझेटमध्ये Angelo de Gubernatis नोंदवतो I followed with the greatest curiosity crowds who carried in procession an infinite number of idols of the god Ganesh. Each little quarter of the town, each family with its adherents, each little street corner I may almost say, organises a procession of its own, and the poorest may be seen carrying on a simple plank their little idol or of papier mâché... A crowd, more or less numerous, accompanies the idol, clapping hands and raises cries of joy, while a little orchestra generally precedes the idol.
शैवांचा उस्फुर्तपणे चाललेला हा गणेश उत्सव ही पश्चिम भारताची हजारो वर्षाची विरासत होती उत्तर शिव दक्षिण कार्तिकेय पूर्व पार्वती मध्य नंदी व पश्चिम गणेश अशी ही शैव विरासत ! पाण्यात विसर्जन ही नंतरची प्रथा पण मिरवणूक भारतभर कॉमन पूर्वेचा दुर्गा पूजा उत्सव आणि पश्चिमेचा गणेश उत्सव गाजला तरी दक्षिणेत कार्तिकेय व उत्तरेत महाशिवरात्रीला शिव अशी ही प्रथा आहे म्हणजे ब्रिटिशांच्या आधीपासूनच ही प्रथा आहे पालखी आणि मिरवणूक हे टिपिकल शैव अविष्कार आहेत टिळकांनी महाशिवरात्रीचा शिव उत्सव शिवाजी उत्सवाच्या द्वारे रिप्लेस केला कारण भगवान शिवांना ब्राम्हणप्रतिपालक म्हणणे कठीण होतं शिवाजी महाराजांच्याबाबत हे शक्य होते म्हणजे शैवांचा वापर करायचा त्यांची पोट्टी जमवायची व स्वातंत्र्यलढ्यासाठी वापरायची असा हा प्लॅन मात्र शैव ब्राम्हणांना जंगमांना गुरवांना शुद्रच म्हणायचे म्हणजे त्यांना फॉलो करणारे आपोआपच शूद्र हे राजकारण ओळखणाऱ्या महात्मा फुलेंना कुठेही वाव मिळणार नाही ह्याची काळजी घ्यायची
१८९३ साली भाऊसाहेब जावळे जे रंगारी समाजातील होते ह्यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाचे अर्वाचीन स्वरूपात पुनर्जीवन केले ही बातमी टिळकांनी केसरीत छापली व असे उत्सव भारतभर सुरु करा असे सांगितले
ह्यातून एक परिणाम झाला तो म्हणजे उत्सव शैवांचा प्रचार वैष्णवांचा सुरु झाला ह्या उत्सवांनी गीता अधिक सेटल झाली कारण गीतेमागची वैष्णव आयडेंटिटी काढून घेऊन तिला हिंदू आयडेंटिटी बनवण्यात आले पुढेपुढे
अगदी कम्युनिस्टसुद्धा गीता आणि श्रीकृष्णाबद्दल गहिवरून लिहायला लागले श्रीकृष्णाचे महाभारतात्मक चरित्र सोयीचे होते कारण श्रीकृष्णाने दोन राज्ये निर्माण केली व एक युद्ध करून प्राप्त केले
१ इंद्रप्रस्थ
२ द्वारका
निर्माण आणि तिसरे हस्तिनापूर इंद्रप्रस्थ नगरीसह प्राप्त केले त्याची स्वतःची द्वारका बुडाली
ह्या राज्य निर्माण करणाऱ्या व प्राप्त करणाऱ्या काल्पनिक श्रीकृष्णाचे वास्तव आकर्षण ह्या काळात सर्वांना वाटणे हे स्वाभाविक होते कारण पांडवांच्याप्रमाणे भारतीयांनी आपले राज्य गमावले होते व भारतीय जनता रामाप्रमाणे वनवासात गेली होती त्यामुळे वनवास व अज्ञातवास सम्पवून गेलेले राज्य प्राप्त करणारा श्रीकृष्ण हा आदर्श बनणे स्वाभाविक होते बरं हे सर्व करणारा श्रीकृष्ण स्वतः मात्र ह्या राज्यांचा स्वामी बनला न्हवता उपभोगशून्य स्वामी अशी त्याची प्रतिमा होती एका अर्थाने तो आर्य चाणक्यपुर्वीचा चाणक्य होता राजकारण कसे करायचे ह्याचे श्रीकृष्ण व चाणक्य हे दोन आदर्श ब्राम्हणांनी निर्माण केले टिळक व गांधी हे दोघेही ह्या वाटेने गेले टिळकांना स्वातंत्र्य बघायला मिळाले नाही पण गांधींना मिळाले ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने युधिष्ठराला व विष्णुगुप्ताने चंद्रगुप्ताला राज्यावर बसवले त्याप्रमाणे गांधींनी नेहरूंना राज्यावर बसवले
साहजिकच गीता हा राजकीय पुढाऱ्यांना त्यांच्या राजकीय कृत्यांसाठी सर्वात उत्कृष्ट ग्रंथ वाटायला लागला ह्या ग्रंथामुळे स्वतःच्या भावांना ठार मारता येणे शक्य होते युद्ध सम्पले कि दारू पित बसणाऱ्या योद्ध्यांचे दाखले देत दारू पिता येणे शक्य होते अनेक लग्ने करण्याची वा रखेल्या ठेवण्याचीही मुभा आहे असेही अनेकांना वाटायला लागले राधेकृष्ण संबंधामुळे विवाहित स्त्रियांशी संबंध ठेवले तर चालू शकते असे वाटणारा वर्ग पुढे येऊ लागला विवाहपूर्व रोमँटिक प्रेमासाठी श्रीकृष्ण राधा व विवाहोत्तर प्रेमासाठी रामसीता हे आदर्श प्रमोट करण्यात आले वैष्णव संतांनी हे सगळे सिम्बॉलिक आहे असे सांगून पळवाट काढली होती पण ब्रिटिश राज्यात वास्तवकेंद्री विचारांची वाढ झाल्याने लोक हे सर्व वास्तव म्हणून स्वीकारत होते ख्रिश्चन अधिकाऱ्यांना हे सगळे प्रोजेक्शन हवे होते कारण त्यामुळे हा पहा तुमचा देव दह्याची चोरी करणारा आणि चोरीला मान्यता देणारा राधेसारख्या विवाहित स्त्रीशी संबंध ठेवणारा युद्धात गुरु बहीण भाऊ ह्यांची हत्या करणारा वेळप्रसंगी खोटे बोलणारा , खांडववनात आदिवासींना जिवंत जाळणारा आणि हा पहा आमचा जिझस चोरी न करणारा जीवावर बेतले तरी हिंसा न करणारा कसलेही शारीरिक संबंध न ठेवणारा ब्रम्हचर्य पाळणारा अपरिग्रहाचे पालन करणारा , सर्वांचा आदर करणारा युद्धाऐवजी शांतीचा संदेश देणारा लोकांच्या पापासाठी स्वतः क्रुसिफाय होणारा वैग्रे ह्याला काउंटर म्हणून भारताकडे फक्त गौतम बुद्ध होता ज्याचे साहजिकच कमबॅक झाले
तुरुंगात जाऊन गीतारहस्य लिहिण्यापूर्वी गीतेभवती ऑलरेडी चर्चा सुरु झाल्या होत्या चर्चेच्या वावटळी उठायला लागल्या होत्या खांडववनात आदिवासी कसे जाळले ह्याच उदाहरण देऊन मुंडांना ख्रिश्चन बनवण्यात आलं होतं आणि बिरसा मुंडाचे बंड फसले होते
टिळक अशा पार्श्वभूमीवर आयुष्यातील चौथा महत्वाचा खटला लढवत होते
श्रीधर तिळवे नाईक
डिसेम्बर १९०८ ला नऊ बंगाली पुढाऱ्यांना अटक झाली
In the Ganpati festival of 1894, a song urged Hindus to stop worshipping Muslim tabuts (floats) of Muharram and to return to Ganpati and the holy cow: Bhupendra Yadav 50
Oh! Why have you abandoned today the Hindu religion? Have you forgotten Ganpati, Shiva, and Marti? What have you gained by worshipping tabuts? What boon has Allah conferred upon you That you have become Mussalmans today? Do not be friendly to a religion which is the alien condemnation Do not give up your religion and befallen. Do not at all venerate the tabuts, The cow is our mother, do not forget her.44
Yet another song mentioned that the Hindus had been beaten up in the recent disturbances and that they should, therefore, come together to demand justice.
Let us dance, O let us dance Ganpati has seated himself on his vehicle and started in procession You work hard to erect poles and make garlands, banners, and flags On this auspicious occasion do not sit quiet or become dispirited Let us tie shelas (scarves) around the waist and, having gaily dressed ourselves, carry the shield and dagger jauntily Disturbances have taken place in several places, and Hindus have been beaten Let all of us with one accord exert ourselves to demand justice.45 Such songs were provocative. They wanted the Hindus to maintain a distance from the Muslims. Hindus were advised to carry shields and daggers to avenge being beaten-up in the disturbances. But the content of such communal songs seem to have been transformed to assume political overtones over the next fifteen years. From communal chants, they turned into nationalist exhortations. This is how S.M. Edwardes, the Police Commissioner of Bombay, noted the changed political message in 1910: The movement which began as an opposition show to local Musalman
व सेक्युलर कलोनियल विरुद्ध हिंद
बंगालमुळे बदल मुस्लिम व गीता रहस्
प्
समता विरुद्ध समत्व (FAIRNESS )हाच पेच हिंदुत्ववाद्यांच्यापुढे उभे ठाकला पण आता पक्ष फोडण्याचा पर्याय हिंदुत्ववाद्यांच्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा