भोके आणि पळवाटा श्रीधर तिळवे नाईक

भारतात आर्यांनी जशा जशा जाती आणि वर्ण घट्ट होत गेले तशा जातीबाहेर एकत्र जगण्याच्या तऱ्हा शैवांनी शोधायला चालू केल्या ह्या तऱ्हा आजही जिवंत आहेत

१ यात्रा करताना जातीचे बंधन लागू पडत नाही ही एक तऱ्हा सर्व जातीजमाती एकत्रच जेवण घेऊन प्रवास करताना अनेकदा रेल्वेच्या डब्यात तुम्हाला भेटतील किंवा राजस्थानातील प्रवासी तांड्यात फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात

२ शैवांनी शोधलेली दुसरी तऱ्हा लग्नाच्या वऱ्हाडाची लग्नाच्या वऱ्हाडात जाती बघितल्या जात नाहीत
अनेकदा जर शैवांचे लग्न असेल तर प्रत्यक्ष लग्नाच्या संगीत वैग्रे रितीरिवाजात जात बघितली जातनाही  नृत्य हे शैवांचे असले व आर्य संस्कृतीने ते शूद्रांना दिले असले तरी आर्य उच्चवर्णीयांना शूद्रांच्याबरोबर लग्नात डान्स करण्याची अनुमती असते व पूर्वी होती विशेषतः बायकांना तर फुल अनुमती कारण आर्यांच्या मते बायका शूद्र आणि शूद्र शूद्रांबरोर नाचू शकतो मनू फक्त लग्नाबाबत काय करायचे ते सांगतो लग्नात काय करायचे विशेषतः नृत्याबाबत ते सांगत नाही

३ स्मशानात जातिवर्णव्यवस्था पाळली नाही तर चालते त्यामुळे अनेक जातीविरहित व्यवहार स्मशानात पार पाडले जायचे ह्यात अनेकदा दारूपान जुगार आणि अपवादात्मकवेळेला सेक्स असे

४ तंत्रात वर्णजातिव्यवस्था पाळली जात नसे आर्यांच्या दृष्टीने परधर्मीय काय करतात ह्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही शैव परधर्मीय असल्याने १००० पर्यंत शैव आर्यांच्यापासून पूर्ण स्वायत्त जगत होते पुढे हिंदू धर्माच्या निर्मितीनंतर वैदिक कायदे शैवांनाही लागू करण्याचे प्रयत्न सुरु झाले मात्र तंत्राबाबत ते लागू केले गेले नाहीत ९०० ते १००० नंतर तंत्र बोकाळण्याचे सर्वात मोठे कारण वर्णजातीपासून मिळणारी मुक्ती होती पेशवाईतही जेव्हा पुण्यात वैदिक व्यवस्था जशीजशी कट्टर होत गेली तशीतशी ज्यांना जातिव्यवस्थेपासून मुक्ती हवी होती त्यांनी तंत्र मार्ग स्वीकारायला सुरवात केली ज्यात खुद्द दुसरा बाजीराव फसला


ह्या चारही पद्धती प्रचलित झाल्या कारण आर्यांच्या धर्मशास्त्रातच ह्या परिस्थितीत काय करायचे ह्याविषयी काही पक्के नियम न्हवते वैदिक मांडणीतील ही भोके हेरून शैवांनी त्या भोकातून आपल्या पळवाटा निर्माण केल्या अनेक शैवांनी जंगलात जाऊन स्वतःच्या आदिवासी जमाती निर्माण केल्या तर काही जणांनी यात्रेच्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन भटके होणे पत्करले भारतातल्या जिप्सीची शोकांतिकाही ह्यातूनच निर्माण झाली आहे जास्तीत जास्त भारतातच भटकणारे हे लोक नाईलाजाने रशिया व यूरोप खंडातही अधिकाधिक हिंडू लागले आणि नंतर तर त्यांना तिकडचे धर्म स्वीकारावे लागले आर्य ब्राम्हण व क्षत्रिय ह्यांना ह्यामुळे काही फरकच पडत नसल्याने धर्मातून लोक फुटत राहिले मुस्लिम ख्रिश्चन बनत राहिले पण आर्य पुण्य योनी ना टस ना मस !

पुढे शैवांनी बसवेश्वर नानक शिवाजी पहिला बाजीराव ह्यांच्या नेतृत्वाखाली वर्णजातिव्यवस्थेला आव्हान दिले जे आजही जिवंत आहे

श्रीधर तिळवे नाईक






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट