आर्यांची प्रस्थान त्रयी व शैवांची स्थानत्रयी



१ आयुषी ह्यात आयु स्थिर राखणाऱ्या , आरोग्यज्ञानाचा व खोल जडीबुटींचा अभ्यास होतो बटवा ह्या शब्दाचा अर्थच मुळी बुटी साठवलेला असा आहे . आत्ताचा आयुर्वेद ह्यातच येतो आणि त्याचबरोबर व्यायाम व नाट्यगंधर्व ह्यांचाही समावेश होतो प्राचीन काळात नाटकाच्या तालमींना व्यायामच म्हणत कारण व्यायाम आणि नाट्यगंधर्व ह्या दोन गोष्टी वेगळ्या मानल्या जात नसत आणि नाटक सादर करणे हा आयुषीचा भाग मानला जाई व्यायाम करणाऱ्या जागांना व्यायामशाळा हा  होता
२ ज्योतिषी ज्याला आज आपण ऍस्ट्रॉनॉमी म्हणतो त्याचा ह्यात समावेश होतो राहत्या स्थानावरून जात्या स्थानाकडे जाण्यासाठी त्याकाळी ह्याचे ज्ञान आवश्यक होते अनेक शैव पशुपालक असल्याने ह्याचे महत्व अनन्यसाधारण होते ध्रुव तारा स्थिर मानून हे मॅपिंग होत असे
३इतिषी ह्यात रेकॉर्ड मेन्टेन केला जाई विशेषतः वंशावळी स्थानावळी आणि भूनोंदी म्हणजे गावात वा शहरात कुणाच्या नावे कुठल्या जमिनी आहेत ह्याच्या नोंदी असत

ह्या त्रयी सांभाळण्याचे आणि त्यांची वृद्धी करण्याचे काम गुरव आणि महाहर म्हणजेच महार करत गावात शांतता आणि सुरक्षितता राखण्याचे काम ह्यांचे असे वैदिकांनी ह्या दोघांना प्रथम शूद्र व नंतर ही युती फोडण्यासाठी महाहरांना अतिशूद्र केले आणि स्थानत्रयी आत्मसात करून त्यांचे सारे हक्क हिसकावून घेतले आणि नंतर स्वतःची प्रस्थानत्रयी निर्माण करून ती सर्वांच्यावर लादली


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट