आंबेडकरवाद तिसरा पर्याय म्हणून का उभा रहात नाही
१ दोन पर्याय कम्म्युनिस्ट /हिंदुत्ववादी तिसरा आंबेडकरवादी मानणारे आहेत पण मी मानत नाही
कारणे १ एकनायकवाद हवाय आणि आंबेडकर हा अस्पृश्यांचा एकमेव नायक अशी मांडणी ज्यात बिलकुल तथ्य नाहीये दलितांचा लढा हा बहुनायकवादी आहे आंबेड्करांच्याआधी शिंदे , गांधी , फुले , शाहू 
२ आंबेडकरवाद हा कुणाला आवडो न आवडो एकजातीय झाले आहेत म्हणजे किमान आंबेडकरवादी बहुजातीय असायला हवेत बोंबा मारणारे लोक ह्यांनी एकदा ऑफशियली सांगावं कि त्यांनी किती लग्नें 
चांभार ढोर आणि आदिवासी स्त्रीया व पुरुषांशी केली ब्राम्हणांनी आपल्या स्त्रिया लग्न करून द्याव्यात हे योग्यच आहे पण तुम्ही तुमच्या स्त्रिया चांभार ढोर व आदिवासी ह्यांच्यात द्यायला हव्यात त्या दिल्या का वरच्या जातीची सून वा जावई कुणीही करून आणेल खरे शौर्य खालच्या जातीला स्वतःच्या समान समजण्यात आहे ते तुम्ही समजता का ? ह्याबाबत नुसत्या तोंडदेखल्या गप्पा नकोत किती ऍक्शन झालेत ते दाखवा 

३आदिवासी लोकांच्यात जाऊन आंबेडकरवाद्यांनी किती काम केलं ? 

४ आंबेडकरवादी फक्त बोलघेवडे आहेत का आणि असलेच तर तसे का झालेत वस्तुस्थिती अशी आहे कि सर्वाधिक ब्राम्हनायझेशन झालेले हेच लोक आहेत आणि त्याचे मूळ आंबेडकरांच्या नेतृत्वात आणि जीवनशैलीत आहे ही जीवनशैली एका ज्ञानयोगीची आहे 

५ आंबेडकरवाद हा अंतिमतः काँग्रेसचाच भाग आहे जो काँग्रेसवादाशी भांडतो 

का भांडतो 
१ स्वातंत्र्य नको होते कारण पेशवाईची भीती होती कारण स्वातंत्र्य मिळाल्यावर काय होणार हे निश्चित होते 
२ आंबेडकर प्रथम दलितांचे नेते होते आणि त्यांची सगळी स्ट्रॅटेजी ही दलितांच्या भल्यासाठी फिरते ते कधीच राष्ट्रवादी न्हवते ते नंतर राष्ट्रवादी झाले जेव्हा राष्ट्र काँग्रेसचे येणार ह्याची खात्री त्यांना पटली 
३ आंबेडकरांनी  कर्नाटक तामिळनाडूमधील दलित  चळवळ जी  शैववादाने उभी केली होती तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही कारण ही चळवळ आंबेडकरांच्या जन्माच्याही आधी जन्मली होती आणि ती आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारायला तयार न्हवती परिणामी आंबेडकरांनी तिची उपेक्षा केली किंबहुना जी जी चळवळ आपले नेतृत्व मानत नाही ती अस्तित्वात नसल्यासारखं दाखवायचं ही आंबेडकरांची स्ट्रटेजि होती तीच इथेही होती 
४ पाकिस्तानातल्या हिंदूंचा प्रश्न हा हिंदू दलितांचाही प्रश्न होता आंबेडकरांनी ह्या संदर्भात काहीही केलं नाही 
५ गांधी ह्या समांतर नेतृत्वाचा त्यांनी कायम दुस्वास केला त्यांचे गांधीजींचे असलेले मतभेद हे फक्त वैचारिक न्हवते तर नेतृत्वात्मकही होते दलितांचे नेतृत्व कुणी करायचे ह्यावरून हा संघर्ष होता आजही हा संघर्ष संपलेला नाही एकीकडे शाहू , शिंदे आणि गांधी जगजीवनराम अशी कॉंग्रेसंवादी  फळी आहे तर दुसरीकडे आंबेडकरवादी ह्यात प्रश्न फुलेवादी फळीचा आहे जी ब्राम्हणेतरवाद मांडते ती कुणाला जाऊन मिळते ह्यावर सर्व अवलंबून आहे तिला स्वतःकडे ओढण्यात मायावतींना यश मिळालं होतं पण त्यांनीही फक्त चिन्हकीय काम केली 
६ आंबेडकरांनी  बौद्ध धर्म स्वीकारला आणि आंबेडकरवाद स्वीकारणे म्हणजे हिंदू होणं नाकारणं असे समीकरण स्वीकारलं हे समीकरण अनेक दलितांना मंजूर नाही 

७ आंबेडकरांनी फक्त बौद्धधर्म स्वीकारला नाही तर स्वतःचे नवयान मांडले जे आत्तापर्यंतच्या हीनयान , महायान आणि वज्रयानापेक्षा भिन्न आहे आंबेडकरांना निर्वाण प्राप्त झालेलं नसताना त्यांनी स्वतःचे यान मांडणे हे अनेक पूर्वीच्या बुद्धिस्ट लोकांना खटकतय आधीच्या यानांचे प्रवर्तक हे निर्वाण प्राप्त झालेले होते आंबेडकरांचे तसे झालेले नाही मग आंबेडकरांचं झालं काय वस्तुस्थिती अशी आहे कि अंतिमतः आंबेडकर जुन्या धार्मिकतेतून बाहेर पडू पाहणाऱ्या प्रबोधनाचे शिखर होते पण त्यामुळेच निर्वाण मोक्ष मुक्ती कैवल्यप्राप्ती न मिळालेल्या विचारवंतांनी स्थापन केलेल्या नवधर्म परंपरेला शरण गेले ह्या परंपरेतील प्रत्येकाने निर्वाण वा मोक्ष वा कैवल्यप्राप्ती प्राप्त न करताच आपले नवीन धर्म स्थापन केले 
१ राजाराम मोहन रॉय ब्राम्हो समाज 
२ केशवचंद्र सेन रानडे प्रार्थना समाज 
३ स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज 
हे वैदिक धर्माचे नवधर्म स्थापन करणारे 
४ स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन 
हे हिंदूंचा शैवांचा नवधर्म स्थापन करणारे 

५ ज्योतिबा फुले सत्यशोधक समाज 
हे ब्राम्हणेतर हिंदू धर्माचे नवधर्म समाज स्थापन करणारे 

अशी ही परंपरा होती 

आंबेडकरांनी ही प्रबोधनाची परंपरा पुढे न्हेली आणि नवयान समाजाची स्थापना केली आणि आज इतर नवसमाजाची चळवळ थंडावलीये तशी नवयानाचीही थंडावली 

८ मग राजकीय जातीयवाद आला आंबेडकर हे आपल्या जातीचे म्हणून ते जास्त योग्य गांधी शिंदेंना आपलं दुःख काय कळणार ?

९ नवयानांना सर्वांच्यावर सत्ता गाजवायची आहे त्यासाठी मग खेळ्या 
ह्यातून नेमकं काय साध्य होणार आहे हे मला आजतागायत कळालेलं नाही
श्रीधर तिळवे नाईक

नेता म्हणतो मी तुमच्या सगळ्या भुका तृष्णा आणि निकडी ह्यांची पूर्तता करेन संन्यासी म्हणतो सर्वच आसक्त्यापासून मुक्त व्हा त्यातच आयुष्याची पूर्तता आहे आता ह्या दोन दृष्टिकोनांचे जमणार कसं ?

===============================================================

खडसे एक अन्वयार्थ श्रीधर तिळवे नाईक 

भारतीय राजकीय व्यवस्थेत ज्यावेळी यूरोप अमेरिकेत जपान मध्ये पार्टी पॉलिटिक्स डेव्हलप होत होते तेव्हा ब्रिटिश ही एकच पार्टी राज्य करत होती पुढे टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीचा एक मजबूत विरोधी पक्ष निर्माण केला इंग्रज विरुद्ध स्वातंत्र्यसेनानी ह्या द्विध्रुवात्मक व्यवस्थेतून आपण आजही बाहेर पडलेलो नाही त्यामुळे सत्तेवर आलेल्या काँग्रेसला इंग्रजांचं फिलिंग आलं तर विरोधी पक्ष पुन्हा एकदा फ्रीडम मुव्हमेंट मोडमध्ये जाऊन ऑपरेट झाले समाजवादी तर विरोधी पक्षाचं ग्राईप वॉटर पितच लहानांचे मोठे झाले . लोहिया , जयप्रकाश नारायण , अण्णा हजारे ह्या सर्वांनी विरोधी पक्ष म्हणून सभागृहात स्वातंत्र्य चळवळी चालवल्या हा फ्रीडम मोड इतका भिनला होता कि जनता पक्षाला आंशिक इंग्रजी बनणंही शक्य झालं नाही ह्या काळात दोन्ही पक्ष विरोधी पक्षच होते ह्याला अपवाद फक्त जनसंघ होता स्वातंत्र्यचळवळपूर्व कालखण्डातला जुळारीपणा आणि जुगाडगिरी ह्याचा अनुभव ह्या पक्षाला हिंदू महासभा म्हणून काम करतांना होता आज भाजप जे काय करतंय त्याची मुळे थेट हिंदू महासभेच्या राजकारणात सापडतील हिंदू महासभा कधीच पार्टी विथ डिफरन्स न्हवती म्हणून तर वेळप्रसंगी सत्तेसाठी मुस्लिम लीगशी युती केली जात होती तेव्हा हे जे काही चार आठ वर्षात चाललंय ते काहीतरी आत्ताचे ग्रहण आहे असे म्हणणारे लोक अज्ञानी आहेत  

ब्राम्हणधर्माचा सगळा खेळ सत्तेसाठी होता व असतो व उत्तरपेशवाईपासून ब्राह्मणधर्म तडजोडी करत आलेला आहे पराक्रमी होळकरांना ते ओबीसी असल्याने राज्य करता येणार नाही असं कधीही पेशव्यानीं म्हंटलेल नाही मोदी , शहा , खडसे , मुंडे ह्यांच्यासारखे नेते हे नव्या युगाचे होळकर आहेत आणि आत्ताचा संघ नाना फडणवीसपेक्षा अधिक शहाणा आहे भाजपचा ब्राह्मणधर्म व काँग्रेसचा इंग्रजधर्म असे दोनच धर्म आजही एकमेकाला टक्कर देतायत आंबेडकर स्वातंत्र्यापूर्वी मूळ इंग्रजांच्या बाजूने होते पुढे डुप्लिकेट इंग्रजधर्माच्या बाजूने गेले आणि हा इंग्रजधर्म डुप्लिकेट आहे हे लक्ष्यात आल्यावर पुन्हा वेगळे झाले आणि बौद्धधर्म निर्माण करण्याच्या मागे लागले नाहीतरी सम्राट अशोकांनंतर उत्तर भारतात  बौद्धधर्म विरुद्ध ब्राम्हणधर्म असा सामना होता असा इतर अनेकांच्याप्रमाणे त्यांचाही समज होता प्रत्यक्षात ना बौद्धधर्म वाढला ना कम्युनिस्ट सोशॅलिस्टांचा लोकायतधर्म वाढला आणि वाढतायत त्यामुळे आता वाढला तर फक्त शैव धर्मच वाढू शकतो पूर्वीही ब्राम्हणधर्म व  मुस्लिम धर्म ह्यांना टक्कर शैवांनीच दिली होती आता एका बाजूला ब्राम्हणधर्म आहे दुसऱ्या बाजूला मुस्लिमांच्याऐवजी इंग्रजधर्मीय काँग्रेस आहे सिच्युएशन शिवाजी महाराजांच्या काळासारखीच आहे पण राजकारणात शिवाजी महाराजांचा पत्ता नाही त्यामुळे शैवधर्मही हवालदिल आहे मायावतीसारख्यांचा मर्यादित वकूब आता स्पष्ट झाला आहे आता नव्या युगाचे  शिवाजी महाराज उगवेपर्यंत ब्राम्हणधर्म व इंग्रजधर्म ह्यांच्या आट्यापाट्या बघायच्या पाचव्या शतकात बौद्ध धर्म व ब्राह्मणधर्म ह्यांची एक अंडरस्टँडिंग तयार झाली होती तशीच काहीशी आताही आठवले वैगरेंच्यामुळे झालीये 

त्यामुळे पक्षांतरे ही फार किरकोळ गोष्ट आहे खरा मुद्दा तुमचा धर्म काय आहे हाच आहे काँग्रेसमधले जीना मुस्लिम लीगमध्ये गेलेले विख्यात आहे कारण जिनांना मुस्लिम ही जात कौम वाटत होती आणि ह्या जातीचं राज्य आलं पाहिजे असं त्यांना व बहुतांशी मुस्लिमांना वाटत होतं खडसेंच्याकडे आयडियालॉजी कधीच पक्की न्हवती जातमते हेच क्वालिफिकेशन त्यांनाही फक्त आपल्या जातमतांच्या जीवावर सत्ता हवी आहे आणि माझा अंदाज चुकला नाही तर पक्षांतर केलं तर एखादं दुसरं कॅबिनेट ते पदरात पाडून घेतीलच फक्त अजित पवारांना ते आपल्या मुख्यमंत्रीपदाचे प्रतिस्पर्धी वाटता कामा नयेत माझं स्वतःचं मत खडसेंनी भाजपमध्ये राहावे असंच आहे कारण फडणवीस चुकांमागून चुका करतायत अशावेळी घडा भरतोच तो भरला कि खडसेंना संधी आहे आता पेशन्स नसेल तर आयुष्यभर कॅबिनेट अटळ आहे कारण शिवसेनेत त्यांना मुख्यामंत्रीपदाचा चान्स नाही राष्ट्रवादीतही नाही फक्त काँग्रेस हीच एक अशी पार्टी आहे जिथे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चान्स आहे अगदी सुरवातीला संशय घेतला गेला तरी ! तेव्हा जातमतांच्या  जीवावर ते आता काय पदरात पाडून घेतात ते पहायचं 

हिंदुत्वाचं बीज आणि झाड हे मराठी ब्राम्हणांचं आहे विशेषतः चित्पावनांचं त्यामुळेच तर वैश्याच्या हातात सत्ता गेल्यावर चुळबुळ सुरु झाली आणि शेवटी गांधींची हत्याही करण्यात आली काँग्रेस हे सुरवातीपासूनच इंग्रजी प्रोडक्ट आहे टिळकांनी ते हिंदुत्ववादी करण्याचा प्रयत्न केला आणि काहीकाळ त्यांना यशही मिळालं गांधींच्यामुळे हे समीकरण उधळले गेले काँग्रेसचा इंग्रजधर्म जेव्हा हिंदुद्वेषात टर्न झाला आणि शाहबानो प्रकरणामुळे देशात स्युडोसेक्युलर मुस्लिम राज्य सुरु झाल्याचा जो फील मुस्लिमेतर लोकांना आला त्याने  हिंदुत्ववाद्यांना पुन्हा चान्स भेटला आणि आज त्यांची निरंतर सत्ता आहे 

स्वातंत्रपूर्व हिंदू महासभेच्या मेंटल सेटपमध्ये भाजप आता पुन्हा गेला आहे त्यामुळे ज्यांनी बलिदान दिले त्यांचे आवाज नेतृत्वाला सध्या ऐकू येत नाहीयेत खडसे हे ह्या बहिरेपणाचे बळी आहेत ह्यात सर्वाधिक नुकसान जनतेचे आहे स्वतःच्या जातीप्रेमाची जनतेने मोजलेली व मोजत असलेली ती किंमत आहे आणि एरव्हीही जातीसाठी माती खाण्याची जनतेतील बहुसंख्याकांची तयारी आहे तर खा माती जिचे नाव भारतीय राजकारण आहे 
 
श्रीधर तिळवे नाईक 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट