कुरुन्दकर आणि धर्मनिरपेक्षता श्रीधर तिळवे नाईक

कुरुन्दकर आणि धर्मनिरपेक्षता  श्रीधर तिळवे नाईक

कुरुन्दकर आणि धर्मनिरपेक्षता  १ श्रीधर तिळवे नाईक

कुरुंदकरांचे मनुस्मृतीविषयीचे विचार तपासल्यानंतर  आपण तपासासाठी कुरुंदकरांच्या धर्मनिरपेक्षतेकडे सहज वळू शकतो कुरुंदकरांच्या जागर वाटा तुझ्या माझ्या भजन आकलन शिवरात्र निवडक पत्रे व अन्वय ह्या पुस्तकांत धर्मनिरपेक्षतेची मीमांसा येते कुरुंदकर गांधी नेहरूंची बाजू सतत मांडताना दिसतात कारण धर्मनिरपेक्षतेविषयीची मते ह्या काँग्रेसच्या नेत्याभवती त्यांच्या काळात फिरत होती कुरुंदकरांच्या माध्यमातून मला काय वाटते तेही मी सांगणार आहे

शेषराव मोरेंसारखे लेखक विचारवंतही आपल्या धर्मनिरपेक्षतेविषयीच्या विचाराची प्रेरणा म्हणून कुरुंदकरांचे नाव घेत असल्याने हे विचार अधिकच वादळी बनलेले असतात खरेतर धर्मनिरपेक्षतेचा पहिला पराभव भारत स्वतंत्र झाला तेव्हाच फाळणीच्या रूपाने झाला

भारतीय संविधान हा दुसरा पराभव कारण त्यात समान नागरी कायदा न्हवता

तिसरा पराभव हा शाहबानो प्रकरणात झाला

आणि चौथा बाबरी मस्जिद पाडली गेली तेव्हा झाला

मग आता धर्मनिरपेक्षतेचा विचार करायचा म्हणजे करायचं तरी काय ?

अल्पसंख्याक असणे हा जसा गुन्हा नाही तसा तो बहुसंख्यकांच्यावर उपकार पण नाही पण हे कळणारे फार थोडे लोक भारतात झाले कुरुंदकर हे त्यापैकी एक

खरी धर्मनिरपेक्षता आणि छद्म धर्मनिरपेक्षता असे सद्या धर्मनिरपेक्षतेचे दोन प्रकार आहेत आणि प्रत्येक राजकीय पक्ष माझी धर्मनिरपेक्षता खरी व तुझी छद्म असे सांगत असतो


साम्राज्यात वसाहतींच्यावर रिमोट कंट्रोल ठेऊन राज्य करणे शक्य असते कारण जनतेशी काहीही देणेघेणे नसते पण राष्ट्र चालवतांना प्रत्येक राज्याचे मत प्रत्येक नागरिकाचे मत महत्वाचे ठरते म्हणूनच ब्रिटिश साम्राज्यातले व्हॉईसरॉय मुघल सुभेदाराप्रमाणे हिंदुस्तानात बंड करत नाहीत  पण ग्रेट ब्रिटनमधले आयर्लंड वेगळे राष्ट्र होते
साहजिकच जितके नागरिक तितक्या धर्मनिरपेक्षता असतात आणि त्यांचा म सा वि काढून राष्ट्रीय धर्मनिरपेक्षतेची व्याख्या करावी लागते

भारतात न्यायमूर्ती रानडे दादाभाई नौरजी ह्यांनीच धर्मनिरपेक्षतेचा पाया घातला जों गोखलेंनी घट्ट केला आणि काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेचा पाया  ह्यांच्याच आधारे सुरु झाला

धर्मनिरपेक्षता ही राजकीय संकल्पना आहे असा एक गैरसमज आहे माझ्या मते तिच्यात धर्म असल्याने ती एक धार्मिक संकल्पनाही आहे आणि हे न कळल्यानेच आजचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आम्ही आमचा धर्म राज्यकारभार चालवताना व लोकव्यवहार करतांना स्वतःच्या अंतकरणात व कृतीत  येऊ देणार नाही असा नागरिकांनी केलेला वैयक्तिक  व  सामुदायिक निश्चय म्हणजे धर्मनिरपेक्षता होय

वैयक्तिक निश्चय न शिकवल्याने आज प्रश्न निर्माण झाला आहे कुठलीही गोष्ट केवळ राष्ट्रासाठी आवश्यक आहे असे सांगितलंत तर ते पटत नाही त्याऐवजी त्यात त्या व्यक्तींचंही कल्याण आहे असं सांगितलं व तिला पटलं कि ती व्यक्ती आपोआप ते मूल्य स्वीकारते जीवनव्यवहार व राष्ट्रव्यवहार ह्यांच्यातली आदर्शवादी फारकत दोन्ही बिघाडते

कुरुंदकरांच्या मते समताधिष्ठित नवभारत निर्माणाचे सूत्र धर्मनिरपेक्षता आहे बुद्धिवादाच्या आधारे सुधारणा केल्या कि जमातवादाला पायबंद बसतो  (पान १८० निवडक पत्रे )व्यक्ती व्यक्ती संबंध आणि व्यक्ती विश्व संबंध ह्यांच्यात संघर्ष निर्माण झाला तो विश्व म्हणजे ईश्वर मानणाऱ्या लोकांच्यामुळे कारण हा संबंध धर्माच्या कक्षेत येतो असे त्यांना वाटत होते म्हणजेच राज्याने फक्त व्यक्ती व्यक्ती संबंध स्वतःकडे ठेवावेत असा धर्माचा आग्रह होता आणि प्रबोधनात तो मान्य झाला कुरुंदकरही ह्या आग्रहाचे बळी आहेत

आता विश्वाचे कोडे विज्ञानाने बऱ्यापैकी उलगडलेले असल्याने विश्व  व्यक्ती संबंधात ईश्वराची गरज काय असा प्रश्न निर्माण होतो आणि धर्मनिरपेक्षतेची आपणाला गरज आहे काय हा प्रश्न निर्माण होतो

कुरुंदकर जमातवादी राष्ट्रद्रोही आहेत असे म्हणतात तेव्हा त्यांना फक्त हिंदू जमातवादी अभिप्रेत नसतात तर मुस्लिम जमातवादीही अभिप्रेत असतात

कुरुंदकरांच्या मते हिंदू हा  सहस्त्रावधी अल्पसंख्याकाचा समूह आहे  माझं म्हणणं इतकंच कि जर सर्वच अल्पसंख्याक असतिल तर कुणालाच अल्पसंख्याकांचा दर्जा देऊ नका नाहीतर मग मान्य करा कि मेजॉरिटी आहे हे दोन्ही बाजूंनी मेजॉरिटीला झोडपणे बंद करा

समजा हिंदू ही  अनेक भोकांची मच्छरदाणी आहे तर माझ्या मते सर्वच समाज असे असतात पण धर्म त्यांना बांधून ठेवतो त्यामुळे संस्कृतीही काहीशी एक चेहऱ्याची होते जी त्या राष्ट्राला एक चेहरा देते भारतीय  समाजात आर्य व शैव असे दोन चेहरे असल्याने आणि ह्या चेहऱ्यांच्यावर अनेक पेंटिंग्जची कामे केल्याने तो अनेक कांदा बटाटे सफरचंद मोसंबी आंबा टोमॅटो एकत्र असलेल्या भाजी मंडईसारखा किंवा मॉलसारखा पोस्टमॉडर्न दिसतो व असतो मोक्षाची उपस्थिती त्याला एकसंध धार्मिक चेहरा फॉर्म करू देत नाही अगदी मुस्लिमांना सुद्धा इथे सुफी मोक्षाची ओढ लागते आणि साईबाबा कबिरसारखे उपलब्धही होतात भारतात विविधतेत एकता नाही तर विविधतेत एकात्मता आहे आणि आत्मता मोक्ष आहे लोकायत ह्या मॉलमध्ये मी मोक्ष खरेदी करणार वा विकणार नाही म्हणून हटून बसणाऱ्या लहान मुलासारखे आहेत आणि  ते ह्या मॉलचे सौंदर्य वाढवतात ते  मला म्हणूनच हवेहवेशे वाटतात हट्टी मुलांशिवाय घराला मजा कशी प्राप्त होणार ?

भारतीय धर्मनिरपेक्षता हा मुस्लिमांचा बुरखा तटआणि संरक्षण आहे त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचा पाडाव केल्याशिवाय मुस्लिमांचा पाडाव अशक्य असं मानणारा सूर आर्य विचार सध्या सत्तेवर आहे पण मुस्लिमांचा पाडाव करून तुम्ही मुस्लिमांचं करणार काय ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या लोकांच्याकडे नाही आम्ही त्यांना घरवापसी करायला भाग पाडू असा विचार चालू आहे पण घरवापसी करणाऱ्याच्या वर्णजातीचे काय ह्या प्रश्नाचे उत्तर ह्यांच्याकडे नाही

हमीद दलवाईंनी एक नेमका प्रश्न उपस्थित केला होता समजा भारतातील मुस्लिम पाकिस्तानातच गेले असते तर भारत धर्मनिरपेक्ष राहिला नसता काय? तर हो सर्व मुस्लिम पाकिस्तानात गेले असते तर भारत धर्मनिरपेक्ष झाला असता ह्याचा अर्थ भारताला धर्मनिरपेक्ष बनवण्यातला मुख्य अडथळा मुस्लिम समाजच आहे कुरुंदकर म्हणतात कि मुस्लिमांना धर्मनिरपेक्ष बनवण्यासाठी प्रथम हिंदूंनी धर्मनिरपेक्ष बनले पाहिजे हा मूर्ख युक्तिवाद आहे कारण धर्मनिरपेक्षपणाची गरज मुस्लिम समाजाला आहे त्यामुळे प्रथम मुस्लिमांनीच धर्मनिरपेक्ष झालं पाहिजे कुरुंदकर म्हणतील मुस्लिमांचा अभ्यास कच्चा आहे हिन्दु हुशार आहेत  माझे म्हणणे हिंदू हुशार आहेत हा हिंदूंचा दोष नाही एखादा विध्यार्थी ढ असणे हा हुशार विद्यार्थ्यांचा दोष नसतो दुसरी गोष्ट जो ढ आहे त्याला पास व्हायचे असेल तर डबल अभ्यास करावा लागतो मुस्लिम धर्मनिरपेक्ष झाले नाहीत म्हणून हिंदू धर्मनिरपेक्ष राहिले नाहीत

हिंदुत्ववाद ह्या देशाच्या मेन फ्रेममध्ये कधीच न्हवता मुस्लिमांच्या कट्टरतेमुळे तो मेन फ्रेममध्ये आला आणि पुरोगामी असे नादान आहेत कि मुस्लिमांना समजावण्याऐवजी हिंदूंना शिव्या घालत बसलेत  ह्याने साध्य तर काहीच होणार नाही पण जे पुरोगामी हिंदू आहेत ते प्रतिगामी बनत जातील किंबहुना बनायला लागले आहेत
श्रीधरा तिळवे नाईक

कुरुंदकर आणि धर्मनिरपेक्षता २ श्रीधर तिळवे नाईक

भारतात धर्मनिरपेक्ष शासनाची पहिली घोषणा काँग्रेसने १९३१ च्या  कराचीच्या अधिवेशनात केली"धार्मिकबाबतीत स्वतंत्र भारताचे शासन तटस्थ राहील’ असे जाहीर करण्यात आले ही काँग्रेसची घोषणा होती आणि बहुतांश हिंदू लोक काँग्रेसमध्ये असल्याने हिंदू लोकांना धर्मनिरपेक्ष शासन हवे आहे असे गृहीत धरले गेले मुस्लिमांना धर्मनिरपेक्ष शासन हवे होते का तर नाही मात्र जिनांना धर्मनिरपेक्ष शासनच हवे होते दुर्देवाने त्यांचे निधन झाले आणि पाकची इस्लामिक राजवटीच्या  दिशेने वाटचाल सुरु झाली 

हिंदूंच्याबद्दल नेहरूंचे मत स्पष्ट होते 

"HINDUISM as a faith is vague, amorphous, many-sided, all things to all men. It is hardly possible to define it, or indeed to say definitely whether it is a religion or not, in the usual sense of the word. In its present form, and even in the past, it embraces many beliefs and practices, from the highest to the lowest, often opposed to or contradicting each other."(द डिस्कव्हरी ऑफ इंडिया पेज ३७) 

जिथे हिंदू धर्म नेमका काय आहे हेच माहित न्हवते तिथे  काँग्रेस धर्मनिरपेक्षता शिकवणार होती हा ओव्हर कॉन्फिडन्स होता मुख्य म्हणजे खुद्द पंतप्रधानांना हिंदू म्हणजे काय ते माहित न्हवते प्रश्न असा कि ह्यामुळेच तर एव्हढी वर्षे धर्मनिरपेक्षता टिकली नाही ना ?आपला धर्म काय आहे तेच माहित नसतांना धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे कसं माहीत होऊ शकतं ?कि काँग्रेसने सिरियसली विचारच केला नाही आणि प्रवाहाप्रमाणे वहात राहिली ?

पुढचा प्रश्न ब्रिटिश राज्य धर्मनिरपेक्ष होते कि नाही ?जर होते तर त्याचा अर्थ काँग्रेस फक्त ब्रिटिशांचा कलोनियल वारसा पुढे न्हेत होती ब्रिटिशांच्यापेक्षा काँग्रेसची धर्मनिरपेक्षता वेगळी कुठे होती ? हे प्रश्न आजहि विचारले जात नाहीत 

ह्या देशातल्या शैवांचा एक प्रॉब्लेम म्हणजे १३०० नंतर गुलामी अंगात भिनल्याने शैव त्यांना राज्यकर्ते जे आयडेंटिटी देतात ते ती घेतातअपवाद शिवाजींनी शिखांनी दिलेली राजवट  त्यामुळे त्यांनी ही आयडेंटिटी घेतली पण प्रश्न विचारले नाहीत प्रश्न विचारले गेले ते आर्यांच्याकडून आर्यांना !त्यामुळे हा धर्मनिरपेक्षतेचा डिबेट आर्यांच्या अंतर्गत असलेला डिबेट झाला एकही शैव वा ओबीसी विचारवंत ह्यात सामील न्हवता आणि हा शैव अचानक जेव्हा बीजेपीच्या दिशेने गेला तेव्हा मग काँग्रेसला जाग आली पण अक्कल आली  नाही १९६० नंतर हळूहळू शैव विचाराच्या क्षेत्रात दिसायला लागले आणि १९९० ला शैव विचारवंतांची एक फौज निर्माण व्हायला लागली हे विचारवंत बहुतांशी कुरुन्दकरांसारखे होते व आहेत 

धर्मनिरपेक्षतावाद  हा शब्द सेक्युलॅरिझमसाठी योग्य आहे का हा प्रश्न काँग्रेसमध्ये खूप आधीपासून निर्माण झाला खुद्द कुरुंदकर जागर (पान १४७ ) मध्ये हा प्रश्न चर्चेला घेतात ही संकल्पना भारतीय नाही हे तर उघड आहे सर सय्यद अहमद खान ह्यांनी काँग्रेसचा जन्म झाल्या झाल्या "या देशातून इंग्रजांना घालवून येथील सत्ता  आपल्या  ताब्यात घेणे हाच काँग्रेस-स्थापनेचा हेतू आहे आणि  काँग्रेस ही हिंदू  संघटना आहे. हिंदू  व मुसलमान या केवळ दोन जमाती नसून दोन भिन्न राष्ट्रे आहेत व त्यांत हिंदू  संख्येने मुसलमानांच्या चौपट असल्ह्याने प्रजा सत्ताक  लोकशाहीच्या पद्धतीप्रमाणे हिंदू  नेहमीच सत्ताधारी  राहतील व मुसलमान नेहमीच हिंदूंच्या  आधीन राहतील. तेव्हा मुसलमानांनी काँग्रेसशी कोणताच संबंध ठेऊ नये.’[मे. पुं. रेगे ले ख – नवभारत – जडसेंबर १९८५ – पृ. क्र. १६१]
असे म्हणून धर्मनिरपेक्षतेची कबर खोदली होती 

धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्माशी संबंध नसणे धर्मनिरपेक्ष राजवट म्हणजे धर्माशी कसलाही संबंध न ठेवणारी राजवट  इहवाद म्हणजे धर्मच नाकारणे पारलौकिक नाकारणे आणि फक्त हा लोक स्वीकारणे धर्मनिरपेक्षता संविधानाचा भंग न करता धर्म घरात पाळायला अनुमती देते इहवाद अशी अनुमती देत नाही धर्मनिरपेक्ष व्यक्ती सार्वजनिक जागी पूजा नाकारते पण घरात पूजा करू शकते 

कुरुंदकरांनी त्यांचे शिष्य जगदीश कदम ह्यांना  एका मुलाखतीत म्हंटले होते
जगदीश कदम - सरआपला धर्म वगैरे गोष्टींवर विश्वास आहे का?
कुरुंदकर-  माझा धर्मावर विश्वास नाहीआजही नाहीमी स्वतहोताहोईतो धर्मकृत्य टाळतोपण चार लोकांच्या आग्रहाखातर एखादे वेळी सहभागी होतोफक्त हे सांगून सहभागी होतो कीयापैकी कशावरही माझा विश्वास नाहीकारण जे अस्तित्वात नाहीत्याच्याशी मला शत्रुत्व करता येत नाहीम्हणून धर्म हा माझ्यासाठी चेष्टेचाकरमणुकीचाअभ्यासाचा विषय आहेपरंतु तो श्रद्धेचा विषय नाहीभोवतालच्या नातेवाइकांच्या मात्र हा श्रद्धेचा विषय आहे.
माझा धर्मावर विश्वास नाहीही गोष्ट जे माझ्या धर्माचे नाहीत त्यांना आवडतेपण त्यांच्याही धर्मावर माझा कवडीचा विश्वास नाहीहे माझे म्हणणे त्यांना आवडत नाहीमाझा धर्मावर विश्वास नाही म्हणजेजगातल्या कोणत्याच धर्मावर विश्वास नाहीभोवतालच्या लोकांना जगातील कोणत्या तरी एका धर्माचा अभिमान असतोउरलेल्या धर्मांना ते शिव्या देतातत्यामुळे कोणत्याही धर्मावर श्रद्धा असणाऱ्या माणसाशी माझी मनोवृत्ती जुळत नाही.
 धर्माचे पुनरागमन झालेल्या पोस्टमॉडर्निझमने भारावल्या गेलेल्या आजच्या युगात घरी पूजा करणारा मनुष्य सार्वजनिक जीवनात पूजा नाकारू शकेल का ? घरातला गणपती राजकीय कारणांसाठी सार्वजनिक केल्यानंतर आणि एक निवडणूक राममंदिराभवती लढून स्वतःचा उभा पक्ष उभा राहिल्यानंतर त्या पक्षाने धर्मनिरपेक्षता पाळावी अशी अपेक्षा करणे हेच तर्कदोषयुक्त न्हवे काय ? सेक्युलर शतकांचा हा अंत आहे का ? कि सेक्युलॅरिझमची पोस्टमॉडर्निटी ही अपरिहार्य परिणीती आहे ?

गणेशोत्सव  ते राममंदिर हे एक आर्य वर्तुळ आहे आणि  पेशवाचें कुलदैवत गणपती असल्याने त्याची सुरवात गणपतीपासून झालीये हा गणपती आर्य गणपती आहे आणि शैव बेहोष होऊन त्याच्यापुढे नाचत आहेत काहीजणांच्या मते हा पोस्टसेक्युलर टर्न आहे प्रश्न असा आहे कि ह्यात लोककल्याण आहे का ?

सेक्युलरिझम हा शब्द देणाऱ्या जॉर्ज होलिऐकने धर्मनिरपेक्षता हा ख्रिश्चनिटीविरुद्धचे विधान न्हवे ते त्यापासून स्वतंत्र आहे त्याचा प्रकाश स्वतंत्र प्रकाश आहे असे म्हंटले होते आज हे प्रकाश एकमेकात मिसळत आहेत का ?
मानवी विचार हा ऐतिहासिकच असतो का? आपण सगळे परंपरेतच उभे असतो का ?आज आपण सगळेच एकमेकांच्या परंपरेचा आदर करायला शिकलो आहोत शैव आर्यांच्या परंपरांचा आदर करतात पण आर्य शैवांच्या परंपरांचा आदर करतात का ? मला शंका आहे आर्य नेहमीच कट्टर देशीवादी असतात त्यामुळे ते शैवांची प्रत्येक गोष्ट तिचे आर्यीकरण करून स्वीकारतात शिव दुर्गा गणपती आणि कार्तिकेय ह्यातील प्रत्येकाची आर्यांना भीती वाटते त्यामुळे विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता रौद्र भयंकर ते कल्याणकारी चंडी महिषासुर मर्दिनी दुर्गा ते शांतादुर्गा असा प्रवास घडत असतो आर्य शैवांना शैव देवतांना का घाबरतात ?कि वेदात अग्नीला इंद्राला घाबरायचे त्याचे हे एक्स्टेन्शन आहे ? जर भय हेच धर्माचे मूळ असेल तर धर्मनिरपेक्षता येणार कशी ? कारण भय तर मोक्ष मिळेपर्यंत अपरिहार्य आहे 

श्रीधर तिळवे नाईक

कुरुंदकर आणि धर्मनिरपेक्षता ३ श्रीधर तिळवे नाईक

मोदींचे कट्टर समर्थक असलेल्या डेविड फ्रावली David Frawley (Vamadeva Shastri) ह्यांनी म्हंटल आहे कि
After seventy years, there is a powerful new political, intellectual, and cultural churning occurring in India. The Nehruvian socialist era is coming to an end in favor of a new India that has a transformative vision of the future but also honors its ancient dharma and spiritual heritage. We see a number of individuals and groups active on many fronts of a national revival that reconnects to India’s older Independence Movement on an intellectual and spiritual level. Yet this new movement remains in its initial phases in removing ideological and cultural distortions about the country and its ancient civilization. These distortions remain deep-seated and institutionally entrenched, particularly in India’s media and academia that have served as neo-colonial advocates
Indeed, it seems that anything Hindu is communal and anything anti-Hindu is secular.".

वर वर्णन केलेली जे हिंदुविरोधी आहे ते सेक्युलर अशी स्थिती नेहरूवादी  पुरोगाम्यांनी लादली आणि आज स्थिती अशी आहे कि एक अँटीसेक्युलर माहोल तयार झाला आहे संपूर्ण भारत परंपरेत परततोय आणि देशीवाद आणि देशवाद सेलिब्रेट करतोय राष्ट्रवादाकडून देशवादाकडे चाललेली ही वाटचाल अटळच होती देशीवादी लोकांना हे आनंददायक वाटतं कि हेचि फळ काय मम तपाला असे वाटते हे त्यांनाच ठाऊक !देशीवादाचा अंतिम परिणाम आर्यवादात होतो हे आता ओरडून सांगूनही कंटाळा आलाय

मोदींनी अर्थव्यवस्था रसातळाला न्हेल्यानंतरही उन्माद व्यक्त करणारे हिंदू आणि देश गाडला तरी खोमेनीला संत म्हणणारे मुस्लिम ह्यांच्यात काहीही फरक उरलेला नाही ह्याची सर्वात मोठी किंमत वैश्य ओबीसींना चुकवावी लागणार आहे कारण धर्म पुढे करून बेसावध ठेवत ओबीसी व वैश्यांच्या लघुउद्योगांच्यावर घाला घालण्याचा अजेंडा उफाळलेला आहे हा अजेंडा अंतिमतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही खड्ड्यात घालणार आहे हे संघाला कळत नाहीये मोदींच्या अर्थकारणात भटकायचं कि मोदींच्या लोकप्रियतेत अटकायचं कि मोदींना आर्थिक धोरण बदलायला लावून सटकायचं हे संघाला आज ना उद्या ठरवावं लागेल

धर्मनिरपेक्षतेचा एक अर्थ धर्म हा अक्ष उपेक्षित ठेऊन अर्थ व काम ह्या अक्षांच्याकडे नीट लक्ष्य देणे असाही होतो मोदी स्वतःला खरे धर्मनिरपेक्षवादी म्हणवतात पण त्यांनी हे काम नीट केलंय असं वाटत नाही

दुसरीकडे सेक्युलॅरिझमविषयी अनेक प्रश्न आता घोंगावायला लागले आहेत

सेक्युलॅरिझम हा ख्रिश्चन फेथ मधून बाहेर पडण्याचा उपाय होता कि  विज्ञान असेच एकांड्या पद्धतीने प्रगती करत राहिलं तर ख्रिश्चन फेथ कोसळून पडेल म्हणून तिला वाचवण्याची शेवटची धडपड होती ?साम्राज्य उभी करायची अट सेक्युलॅरीझम होती कि  धार्मिक साम्राज्यवादातला तो अडथळा होता ?

कलोनाइझ्ड प्रजेवर नियंत्रण लादायचं असेल तर तंत्रज्ञान सेक्युलर असतं हे पटवणं आवश्यकच असतं नाहीतर रेल्वे येऊ कोण देईल ? हत्तीचे दात विकायचे असतील तर त्याला गणेशापासून तोडून किंग एलिफन्टा बनवावे लागते विज्ञान शोषणालाही सेक्युलर करतं आणि त्याला पाप पुण्याच्या हिशेबातून मुक्त करतं ह्यामुळेच सेक्युलॅरिझम हा साम्राज्यवादाचा आणि भांडवलशाहीचा आवश्यक हिस्सा बनतो सेक्युलरॅझिम हा एकाच वेळी धर्माचे प्रायवेटायझेशन करतो आणि धार्मिक अंग कमी करत त्या त्या उत्सवांना व्यावसायिक स्वरूपही देतो त्यामुळेच गणेश मंडळे लाखाची आणि करोडोची भाषा बोलायला लागतात राजकीय खंडणीवसुलीला धार्मिक आधार मिळतो पण मॅटर धार्मिक राहिल्याने हिशेबाची जबाबदारी तर्कशुद्ध रहात नाही पोस्टसेक्युलर युगात गणेश मंडळे सत्ता गॅदर करण्याची आणि धार्मिक सत्ता डिझाईन करण्याची माध्यमे बनतात कारण नेत्यांची कार्यशक्ती आत्मविश्वास गमावून बसलेली असते ह्यातूनच आपण उत्सव साजरे केले नाहीत तर जनता आपल्याला  मत देणार नाही असे धार्मिक भय नेतृत्वात निर्माण होते जगात सर्वत्र दुःख भरलेले आहे आणि दुःखाची रिप्लेसमेंट उत्सव आणि करमणूक आहे हा आजचा पोस्टमॉडर्न समज आहे उत्सवात सगळे समान होतात आणि विषमता दिसणे बंद होते

अशा ह्या पार्श्वभूमीवर कुरुंदकरांचा आधुनिक सेक्युलॅरिझम बघायचा कसा ? धर्माचा प्रभाव अजूनही टिकलाय
म्हणून त्याला स्वीकारायचे कि तो कमी कसा होईल ते पहायचे ? ज्याचे प्रबोधन झालंय तो तीस वर्षांनी मरणार असतो आणि त्याची ती तीस वर्षे जो जन्मलाय त्याला आधुनिक आणि अपडेट होण्यात खर्ची पडणार असतात माणसाचा मर्त्यपणा अनेकदा त्याच्या आयुष्यातील महत्वाचा भाग नवीन पिढीला आधुनिक अद्ययावत बनवण्यात खर्ची पाडायला भाग पाडतो पिढ्यानपिढ्या अद्ययावतपणा सरकत राहतो आणि मग अचानक एक पिढी ह्या अद्ययावतपणाला रूढी म्हणून फटकारते आणि जुने ते पुन्हा सोने बनते आणि मग ह्या जुन्याचे पुणे बनते

अँटिज्युडायिक सेक्युलरॅझिमला भारतीय धर्म कळू शकतात का हा आणखी एक असाच प्रश्न ! एकेश्वरवादाला झोडपणाऱ्या धर्मनिरपेक्षतेला निरीश्वरवादी धर्माची कल्पना समजू शकते ? आजची पिढी धर्माला कमिटमेंट देते ?
धार्मिक पाडापाडीनंतर जर कोणी बियर पीत आपण कशी पाडापाडी केली हे रंगवून सांगत असेल तर पाडापाडी बघायची कि त्याच्या हातातली बियर बघायची ?

सेक्युलॅरिझमने धर्माला प्रोव्होक केले का ? कि धर्माला जिवंत ठेवले हीच सेक्युलर चूक होती ? असं तर नाही ना कि जागतिकीकरणाच्या ह्या युगात धर्म हीच एकमेव जगातिक आयडियॉलॉजीकल  पॉसिबिलीटी  होती म्हणून जिवंत झाली ?

अचूक प्रश्न विचारले गेले पाहिजेत सेक्युलरॅझिमचा खरा उद्देश सतत आणि अचूक प्रश्न विचारणे हा आहे


श्रीधर तिळवे नाईक

धर्मनिरपेक्षता ,  धर्ममुक्ती , नास्तिकता आणि कम्म्युनिझम ४ श्रीधर तिळवे नाईक

विज्ञानाने धर्माचा अडथळा आपल्या मार्गात येऊ नये म्हणून सादर केलेले पहिले प्रेझेंटेशन म्हणजे सेक्युलॅरिझम धर्मनिरपेक्षता होय

जेव्हा तत्कालीन भांडवलशाहीनें विज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली अर्थव्यव्स्था नियंत्रित करायला सुरवात केली तेव्हा धर्माचा वापर भांडवलशाहीच्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी होऊ लागला आणि समाजवादी लोकांच्या लक्ष्यात आले कि धर्म हा प्रत्यक्षात शोषणाचे आणि शोषकांचे हत्यार आहे ह्याला काउंटर म्हणून साम्यवादी लोकांनी धर्ममुक्त राजवटीचे स्वप्न पाहायला सुरवात केली आणि त्यातूनच जन्मली धर्ममुक्तता म्हणजे धर्मापासूनच मुक्तता

ह्यातुन धर्माला निर्माण झालेला धोखा लक्ष्यात घेऊन कांटच्या सिद्धांताच्या आधारे जॉर्ज होलीओक  ह्याने जो सिद्धांत मांडला त्याला सेक्युलॅरिझम असे म्हणतात सेक्युलॅरिझमची सुरवात इथून झाली हा सिद्धांत एकीकडे विज्ञानाच्या विकासासाठी आवश्यक असलेली धर्मनिरपेक्षता जपत होता तर दुसरीकडे श्रमिकांच्या लढ्यातून जन्माला येऊ घातलेली धर्ममुक्ती नाकारत होता

ह्याचवेळी डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत आला आणि त्याच्या आधारे निधर्मीवाद निरीश्वरवाद ह्यांची मांडणी करणारा मानवजातीला धर्ममुक्त करणारा नवनास्तिकवाद जन्माला आला जो आता
रिचर्ड डॉकिन्सपर्यंत चालत आला आहे हा नवनास्तिकवाद धर्ममुक्तीचे स्वप्न पाहतो आहे

भारताचा विकास धर्मनिरपेक्षतेकडून धर्म मुक्तीकडे होणे आवश्यक होते पण हे शक्य झाले नाही उलट इंडियात निर्माण झालेल्या कार्पोरेट सेक्टरने धर्म हीही इंडस्ट्री बनवली आणि आता भारतातही रिलिजियस इंडस्ट्रीने हातपाय पसरले आहेत

म्हणजेच सध्या धर्म
१ धर्मनिरपेक्षता
२ धर्ममुक्ततावाद
३ धर्मनिरपेक्षतावाद
४ नवनास्तिकवाद
५ धार्मिक कार्पोरेटवाद
ह्यांच्यात फसला आहे आणि ह्यातूनच हे अमान्य असलेला धार्मिक मूलतत्त्ववाद जन्मला आहे आणि तोही मवाळ वाटल्याने धार्मिक दहशतवाद म्हणजे धर्म आता
१ धर्मनिरपेक्षता
२ धर्ममुक्ततावाद
३ धर्मनिरपेक्षतावाद
४ नवनास्तिकवाद
५ धार्मिक कार्पोरेटवाद
६ धार्मिक मूलतत्त्ववाद
७ धार्मिक दहशतवाद
अशा सात आयामात वावरतो आहे

धर्मनिरपेक्षता ही फ्रान्सिस बेकन ह्याने प्रथम मांडली त्याने प्रथम धर्म विज्ञान आणि कला ह्या तीन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या केल्या आणि ह्या तिन्ही गोष्टींचे सत्य वेगळे वेगळे असते असे सांगितलें त्यातूनच कलात्मक सत्य आणि वैज्ञानिक सत्य हे धार्मिक सत्यापासून वेगळे झाले माझ्या मते त्या काळात  हे योग्यच पाऊल होते ते टाकले नसते तर विज्ञान जन्मण्याआधीच त्याचा गळा घोटला गेला असता

ह्या पुढचे काम नंतरच्या पिढ्यांचे होते Theophrastus redivivus ह्या लॅटिन पुस्तकाने (हे एका अनामिकाने लिहिले होते )सर्व नास्तिक मतांचे संकलन करून ते लोकांच्यापुढे आणले ही चांगली सुरवात होती नैतिक नियंत्रणाचे काय करणार हा प्रश्न ह्या निमित्ताने नास्तिकवाद्यांना विचारला  गेला  स्पिनोझाने ईश्वर नैसर्गिक नियमात हस्तक्षेप करत नाही अशी भूमिका घेतली तर त्याला हाकलण्यात आले ह्यांनंतर अनेक नास्तिकांचे गळे घोटले गेले ह्यातला सर्वात धक्कादायक मर्डर हा ख्रिस्तोफर मार्लो ह्या नास्तिक नाटककाराचा होता ज्याने ब्रिटिश रंगभूमीचा पाया घातला होता आणि ज्याच्या खांद्यावर शेक्सपियर बसला होता ह्यातील केझिमीझ लिसझीन्स्कीचे एक वाक्य सर्वश्रुत आहे ते म्हणजे "माणसाने ईश्वर निर्माण केला आहे आणि ईश्वर ही एक संकल्पना आहे व त्या संकल्पनेचे निर्माण माणसाने केले आहे म्हणूनच माणसेच ईश्वराचे स्थापत्यकार व इंजिनीयर आहेत अणि ईश्वर खरे अस्तित्व नाही गॉड फॅब्रिकेट करून जे कनिंग असतात ते साध्याभोळ्या माणसांना फसवत असतात स्वतःच्या अत्याचारासाठी वापरत असतात आणि जर का एखाद्या शहाण्या माणसाने त्यांचे मुखवटे फाडले तर ते त्याचा सर्वनाश करतात" ह्याला १६८९ ला फाशी देण्यात आले

ख्रिश्चन लोकांच्या ईडन गार्डनला ह्या काळात आव्हान दिले ते रूसोने त्याने माणूस पापी आहे हे ख्रिश्चन सत्य नाकारले व माणूस मूळचा चांगला  असतो पण संस्कृती त्याला बिघडवते अशी भूमिका मांडली हे जग अव्यवस्थित असून त्याला ईश्वर नावाचे   पोलिसी  भय आवश्यक आहे हे वोल्टेयरचे मत ईश्वर नसेल तर ईश्वर शोधावा लागेल हे त्याचे दुसरे गाजलेले मत पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे नास्तिकवादाची मांडणी करणारे पहिले पूर्ण पुस्तक हे चक्क एका फ्रेंच  कॅथॉलिक धर्मगुरूने लिहिले होते त्याचे नाव जॉन मिसलीर ईश्वर देव आणि चमत्कार ह्या तिन्ही गोष्टी त्याने नाकारल्या हळूहळू नास्तिक मताला जागा मिळायला लागली डेव्हिड हुमने ईश्वर असलाच तर तो नपुंसक असला पाहिजे असे मत मांडले फ्रेंच राज्यक्रांतीतल्या लोकांनी फ्रान्सचे डीख्रिश्च्नायझेशनचा आरंभ केला १८११ साली पर्सी शेली ह्या रोमँटिक कवीने नास्तिकवादाची आवश्यकता ह्या नावाने आपले पॅम्फ्लेट प्रेझेन्टेशन सबमिट केल्याबद्दल त्याला ऑक्सफर्ड विद्यापीठातून हद्दपारी ठोठावण्यात आली चार्ल्स ब्रँडलाफ हा ईश्वराच्या नावाने धार्मिक शपथ घ्यायला नकार देणारा पहिला सांसद लोकप्रतिनिधी तो चौथ्यांदा निवडून आल्यावर त्याला पाहिजे तशी शपथ घेण्याची अनुमती मिळाली आणि पुढे संसदेचा शपथ कायदा बदलला

कार्ल मार्क्सचे  "Religious suffering is, at one and the same time, the expression of real suffering and a protest against real suffering. Religion is the sigh of the oppressed creature, the heart of a heartless world, and the soul of soulless conditions. It is the opium of the people." 

 हे मत गाजले आहे मात्र धर्म ही अफूची गोळी आहे हेच अर्ध वाक्य उधृक्त केले जाते बदलता न येणारी सामाजिक परिस्थिती असह्य झाली कि लोक धर्माकडे वळतात माणसाने धर्म निर्माण केलाय धर्माने माणूस न्हवे हे त्याच्या विचाराचे सार

मार्क्स आणि कान्ट ही दोन प्रबोधनाच्या प्रोजेक्टची महान शिखरे आहेत

ईश्वरावर शेवटचा खिळा मारला तो फ्रेडरिक नित्शेने त्याने गॉड इज डेड अशी गाजलेली घोषणा दिली

कुरुंदकर ह्या नास्तिक विचारांच्या खांद्यावर उभे आहेत ह्या नास्तिकवादावर उतारा शोधला तो कान्टने त्याने ज्ञानाच्या मर्यादेचा सिद्धांत मांडला आणि ईश्वराची अनंतता मानवी ज्ञानाच्या कक्षेबाहेर आहे ह्या प्रमेयाला आधार दिला मे पु रेगे ह्यांनी ह्या सिद्धांताची चर्चा वेळोवेळी केलेली आहे

कांटच्या ह्या सिद्धांतानेच नरहर कुरुंदकर आणि मे पु रेगे ह्या मराठीतल्या दोन महान विचारवंतांची सारखीच गोची केली ह्यातील कुरुंदकर नास्तिकतेकडे आणि मार्क्सकडे वळले पण ज्ञानाची साशंकता त्यांना डळमळीत करीत राहिली तर मे पु रेगे अंतिमतः कांटवादी सेक्युलर हिंदू बनले

श्रीधर तिळवे नाईक

धर्मनिरपेक्षता ,  धर्ममुक्ती , नास्तिकता आणि कम्म्युनिझम ५ श्रीधर तिळवे नाईक

१८९० ते १९४० पर्यंत लोक असे काही लिहीत होते कि जणू धर्म अस्तित्वात नाही हिटलरने ह्याला छेद दिला एका अर्थाने हिटलर हा राजकीय उत्तराधुनिकतेचा आरंभ आहे आणि कारणही कारण तोपर्यंत स्वतःला रॅशनल आणि आधुनिक  समजणाऱ्या आधुनिक नागरिक असलेल्या माणसाला हिटलरने जनावरासारखे फिरवून ज्यू धर्मियांची कत्तल घडवली नाव वंशाचे होते पण काम धार्मिक होते पुढे महात्मा गांधी ह्यांच्या हिंदोस्तानच्या धार्मिक फाळणीत असाच इररॅशनलपणा दाखवला गेला आणि धर्मनिरपेक्षता ही केवळ बुजगावणं आहे हे सिद्ध केले पुढे खोमेनीने इस्लामिक राजवट आणून जगाची इस्लामिक जग विरुद्ध धर्मनिरपेक्ष जग अशी फाळणी घडवली आणि पाकिस्तान बांगलादेशने इस्लामिक जगात सामील होत इस्लामिक राजवट आणून ती फाळणी भारताच्या दारात आणून सोडली शाहबानो नाडली गेली शिखांचे दिल्लीत हत्याकांड झाले काश्मिरी पंडित पळवले गेले आणि बाबरी मस्जिद पडली आणि त्याबरोबरच भारतात हिंदुत्ववाद विरुद्ध धर्मनिरपेक्षतावाद अशी फूट पडली साहजिकच ह्या पार्श्वभूमीवर धर्म आणि धर्मनिरपेक्षतेची पुन्हा चर्चा सुरु झाली लोक हे विसरूनच गेले कि लेनिनने धर्ममुक्त राजवट उभी करण्याच्या दिशेने कधीकाळी पाऊले टाकली होती जणू काय आधी धर्मनिरपेक्षता शाबूत ठेऊया मग धर्ममुक्तता आणूया असा मानसिक स्वीकार झाला आणि नास्तिकतेच्या दिशेने चाललेला युरोपियन समाज थेट धार्मिक विरुद्ध धर्मनिरपेक्ष असा प्रबोधनी डिबेटमध्ये अडकला हे मागे जाणे होते

तरीही देरिदाने डेमोक्रसी इज प्रॉमिस असं म्हंटलं होतं ते पूर्ण भंग पावले नाही नागरिक होण्याचं व बनवण्याचं एक अजस्त्र यंत्र लोकशाही ह्या नावाने भारतात अस्तित्वात आले ह्यातून काय काय निर्माण होणार होतं
१ मानवी हक्क
२ निवडीचं स्वातंत्र्य
३ प्रेस व कलावंतांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य
४ कायदा व न्याय
५लोकशही पाळणारे नागरिक
६ सर्वांना शिक्षण समता आणि बंधुता
ह्यातून एक गोष्ट मात्र निर्माण होणार न्हवती धर्मनिरपेक्षता
भारतात २६ जानेवारी १९५० ला जे संविधान स्वीकारले गेले त्यात धर्मनिरपेक्षता न्हवती कारण धर्मनिरपेक्षता स्वीकारावी का नाकारावी ह्याचा निश्चित निर्णय झाला न्हवता फाळणीच्या जखमा ताज्या होत्या आणि हिंदू धर्मनिरपेक्षता स्वीकारतील कि नाही ह्याविषयी शंका होती काही वर्षांनी हा विश्वास वाटला इंदिरा गांधींना  इंदिरा गांधींच्या काळात भारतीय संविधानात सेक्युलॅरिझम हा शब्द घातला गेला आणि हे करताना जनतेला विश्वासात घेण्याची गरज इंदिरा गांधींना वाटली न्हवती जनतेला विश्वासात घेऊन  हे काम होते तर बरे झाले असते

भांडवलशाही ही कायमच धर्ममुक्ततेच्या विरोधात होती कारण धर्म भांडवलशाहीचे हितसंबंध प्रमोट करत होता
कार्पोरेटशाहीही  कायमच धर्ममुक्ततेच्या विरोधात होती कारण धर्म कार्पोरेटशाहीचे  हितसंबंध प्रमोट करत होता
ह्या दोघांनाही धर्मनिरपेक्षता सोयीची होती म्हणूनच ती प्रमोट केली गेली आणि प्रबोधनाच्या  धर्म व राज्य ह्यांच्यातील  तणावाचे अंतिम सोल्युशन म्हणून सेक्युलॅरिझम प्रस्थापित झाला

पण एक प्रश्न निर्माण होतो धर्म व राज्य ह्यांच्यात केवळ  फारकत करून सेक्युलर राज्य  निर्माण होते असं म्हणता येईल का ? जॉर्ज होलिओकने म्हंटले होते

Secularism is a code of duty pertaining to this life, founded on considerations purely human, and intended mainly for those who find theology indefinite or inadequate, unreliable or unbelievable. Its essential principles are three: (1) The improvement of this life by material means. (2) That science is the available Providence of man. (3) That it is good to do good. Whether there be other good or not, the good of the present life is good, and it is good to seek that good


आजही ह्यात फरक पडलाय असं वाटत नाही


मी होलिओक शी सहमत आहे माझ्या मते सेक्युलर असण्याचा निगेटिव्ह अर्थ धर्म व राज्य ह्यांच्यातील फारकत आहे तर पॉझिटिव्ह अर्थ विज्ञानाधिष्ठित कायदे हा आहे त्यामुळेच सेक्युलर राज्य लग्न विवाहपूर्व सेक्स ऍबॉर्शन ह्यासारख्या अनेक बाबतीत विज्ञानाला प्रमाण मानते आणि सार्वजनिक जीवनात विज्ञानाला प्रमोट करते ह्या अर्थाने भारतातील पहिले सेक्युलर राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न म्हणजे  नेहरूंचे राज्य  होते

धर्मनिरपेक्षता वैयक्तिक जीवनातील धर्म मान्य करते पण सार्वजनिक जीवनात धर्माची उपस्थिती नाकारते विठ्ठलाची शासकीय पूजा , सरकारी ऑफिसमधली सत्यनारायणाची पूजा , सरकारी ऑफिसमधला ख्रिसमस वा ईद वा गणपतीपूजा  वा बुद्ध पूजा ह्या गोष्टी  धर्मनिरपेक्षतेत बसत नाहीत

धर्मनिरपेक्षता ही फक्त राज्यापुरती निर्माण होऊन चालणार नाही तर समाजातल्या प्रत्येक संघटनेत ती निर्माण व्हायला हवी
अगदी धार्मिक संघटनेतही तरच तो समाज सेक्युलर झालाय असे म्हणता येईल ह्याचा अर्थ समाजातल्या चर्चेस मंदिरात मस्जिदीत अग्निमंदिरात सर्वांना प्रवेश हवा अस्पृश्यांना व बायकांना प्रवेश नाकारण्याचे उद्योग धर्मनिरपेक्षतेत बसत नाहीत

आपण खरोखर सेक्युलर झालो आहोत का कि मागील वाटेने आपणाला धर्म बोलावतो आहे ?



श्रीधर तिळवे नाईक

धर्मनिरपेक्षता ,  धर्ममुक्ती , नास्तिकता आणि कम्म्युनिझम ६  श्रीधर तिळवे नाईक

जिझस ख्राईस्टने देवाचं देवाला द्या आणि राजाचं राजाला असं सांगितलं होतं धर्मनिरपेक्षता हेच आधुनिक भाषेत राज्याचं राज्याला आणि धर्माचं धर्माला द्या असं सांगते कायदे करण्याचे अधिकार व नीती ठरवण्याचे अधिकार ह्या व्यवस्थेत राज्याला प्राप्त होतात पूर्वी हा अधिकार चर्चला होता धर्मनिरपेक्षतेमुळे  हे अधिकार  राज्याकडे आले आणि हे उत्तम झाले नंतर लोकशाही आणून राज्याचा प्रमुख जो राजा असे त्याचेही अधिकार काढून ते लोकप्रतिनिधींच्याकडे सोपवले गेले आणि हेही उत्तम झाले

भारतात उत्तरपेशवाईमुळे स्मृतींचे म्हणजे धर्मशास्त्राचे कायदे होते तर मुस्लिम राजवटीत शरियत कायदा होता तो जाऊन ब्रिटिशांनी पहिले सेक्युलर कायदे केले

ब्रिटीश राजवटीत झालेल्या भारतीय स्वातंत्र्य वा  प्रबोधन चळवळीत आठ  प्रकारच्या व्यक्ती होत्या ह्या व्यक्ती केवळ व्यक्ती राहिलेल्या नाहीत तर ह्या ब्रँड-धारणा बनल्या आहेत ह्या ब्रॅंडधारणा पुढीलप्रमाणे

१  लोकमान्य टिळक वैयक्तिक जीवनात धार्मिक सार्वजनिक जीवनात धार्मिक
२ गोपाळ गणेश आगरकर पंडित नेहरू  वैयक्तिक जीवनात नास्तिक सार्वजनिक जीवनात धर्मनिरपेक्ष
३ मानवेंद्रनाथ रॉय वैयक्तिक जीवनात नास्तिक सार्वजनिक जीवनात नास्तिक
४ वि दा सावरकर व मोहम्मद अली जीना वैयक्तिक जीवनात नास्तिक सार्वजनिक जीवनात धार्मिक
५ न्यायमूर्ती रानडे  वैयक्तिक जीवनात धार्मिक सार्वजनिक जीवनात धर्मनिरपेक्ष
६ महात्मा फुले  वैयक्तिक जीवनात धर्मनिरपेक्ष  सार्वजनिक जीवनात धर्मनिरपेक्ष
७ बाबासाहेब आंबेडकर वैयक्तिक जीवनात धम्मिक  सार्वजनिक जीवनात धम्मिक
८ प्रबोधनकार  ठाकरे वैयक्तिक जीवनात धर्मनिरपेक्ष  सार्वजनिक जीवनात धार्मिक
९ महात्मा गांधी विनोबा भावे वैयक्तिक जीवनात सर्वधर्मसमभाव   सार्वजनिक जीवनात सर्वधर्मसमभाव
१० मौलाना आझाद वैयक्तिक जीवनात धार्मिक  सार्वजनिक जीवनात सर्वधर्मसमभाव

ह्यांच्या वैचारिक घुसळणीतून भारतीय धर्मनिरपेक्षता आली म्हणजे  काय तर  वैयक्तिक जीवनात तुम्ही टिळक  गांधी असा किंवा सावरकर जिना रॉय किंवा फुले आंबेडकर सार्वजनीक जीवनात तुम्ही धर्मनिरपेक्षच  असायला हवं ह्यातून जे राज्य जन्मले ते कसे ?


मे पु रेगे ह्यांनी भारतीय राज्यसंस्था सेक्युलर आहे म्हणजे काय आहे ते पुढीलप्रमाणे सांगितले आहे
१ भारतीय राज्यसंस्था धर्माच्या कुठल्याही तत्त्वानुसार व सिद्धांतानुसार चालत नाही व आधारित नाही
२ सर्वांनाच धर्मनिरपेक्ष असे समान नागरिकत्व ती देते
३ सामाजिक न्याय ,सुव्यवस्था , नागरिकांचे हित वैग्रे ऐहिक उद्दिष्टे ती स्वीकारते
४ धर्माशी संबंधित सर्व उद्दिष्टे ती वर्ज्य मानते

ह्या राज्यसंस्थेला कुठलाही धर्म नाही विज्ञाननिष्ठ इहलौकिक विकास घडवणे हे तिचे उद्दिष्ट आहे ती लोकांच्या उपासनास्वातंत्र्यात हस्तक्षेप करत नाही

ह्या  धर्मनिरपेक्षतेनंतर  तिसरा टप्पा होता धर्ममुक्तता ! प्रतिसृष्टीत आधुनिकतेत हे घडायला हवं होतं तर्कदृष्ट्या हेच योग्य होते मानवेंद्रनाथ रॉय ह्यांनी तर धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्मविरोधी विचार करणे व धर्मविरोधी असणे अशी व्याख्या केली आहे  पण हे घडले नाही उलट उत्तराधुनिकतेने विज्ञानाच्या ओथेन्टिसिटीवीषयी प्रश्न निर्माण करुन विज्ञानाचा सत् शोधण्याचा सगळा प्रोजेक्टच संशयास्पद केला मी कायमच पोस्टमॉडर्निझमविरोधी भूमिका घेण्याची  जी कारणे आहेत त्यातील  एक उत्तराधुनिकतेचा  हा विज्ञानसंशय  आहे वास्तविक क्वांटम विज्ञान सापेक्षता विज्ञान ह्यांनी विज्ञान अधिक पुढं न्हेलं आहे ह्यांनी विज्ञान अधिक सहिष्णू केले आहे त्यामुळे धर्ममुक्तता यायला हवी होती आणि तीही  धर्मनिरपेक्षतेचा पुढील टप्पा म्हणून पण सगळ्या आयडीयलीजींचं गाडं धर्मनिरपेक्षतेत अडकून पडलं

मग व्हायचं तेच झालं तुम्ही पुढे गेला नाहीत कि मागं येता आणि राजकीय लोकांना तुम्ही पुढे जाता कि मागे जाता ह्याविषयी काही सोयरंसुतक न उरल्याने ही मागे जाण्याची प्रक्रिया पूर्ण झाली

आणि आज पुन्हा एकदा धर्मनिरपेक्षतेचा मागोवा घेण्याची वेळ आली आहे


श्रीधर तिळवे नाईक





धर्मनिरपेक्षता ,  धर्ममुक्ती , नास्तिकता आणि कम्म्युनिझम ७  श्रीधर तिळवे नाईक

एक गोष्ट प्रथम माझ्या अँटिहिन्दुत्ववादी आणि अँटिमार्क्सवादी मित्रांसाठी
माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्या मनात कधीही हिंदुत्ववाद्यांच्याबद्दल आणि कम्युनिस्टांच्याबद्दल कधीही कडवटपणा आला नाही ह्याचे कारण कोल्हापुरात ह्यांच्याकडून मिळालेले प्रेम माझ्या दुकानाला लागूनच भवानी मंडपानंतरचा तिसरा किंवा दुसरा स्टॉप लागायचा आणि जुन्या काळात हा स्टॉप तिळवे भांडार स्टॉप म्हणूनच फेमस होता कमानीच्या जवळच दुकान असल्याने अंबाबाईला जाणारे भक्त माझ्या दुकानात जे सामान घरातून आणायला विसरत ते खरेदी करायला थांबत ह्यात अनेक हिंदुत्ववादी असत आणि काही कॉम्रेडही (ह्यात गोविंद पानसरेही होते ) माझी शाळा प्रायव्हेट हायस्कूल ही अनेक हिंदुत्ववादी शिक्षकांनी भरलेली त्यामुळे हिंदी संस्कृत कम्पलसरी होतं आणि त्याचा पुढे फायदाच झाला करकरे मॅडम संस्कृत उत्तम शिकवायच्या माझ्या बहिणीला म्हणजे उज्वला तिळवेला संस्कृतची अतिशय आवड आणि करकरे मॅडमची ती एक आवडती मुलगी होती ती दोन इयत्ता पुढे असल्याने पुढच्या इयत्तेतल्या संभाव्य भानगडी आधीच कळत माझी शाळेतली सर्वोत्कृष्ट मित्र माझी बहीणच होती लोकापुरे सरांच्या क्लासला बसला नाहीस तरी चालेल ही तिचीच  सजेशन माझे बरेचसे शिक्षक हे वडिलांना दुकानात भेटत त्यामुळे आपली प्रत्येक भानगड वडिलांना कळणार म्हणून मला भानगडी फार सावध रीतीने कराव्या लागत दुकानात दुपारी भरपूर चर्चा झडायच्या मी बिघडलोय ही बातमीही शिक्षकांनीच दिली पण मी सुधारणार ह्याची गॅरेंटी मेहंदळे सर , गुळवणी सर , रक्तवान सर व वालावलकर सर ह्यांनी दिल्याने वडील थोडे निश्चिन्त होते मी दुकानात निखळ दुकानदार म्हणून सर्व शिक्षकांना ट्रीट करे रक्तवान सर इतिहास जबरदस्त शिकवीत आणि त्यांचा इतिहास म्हणजे राष्ट्रप्रेमाने ओथंबलेला वालावलकर सर अफलातून जीवशास्त्र शिकवीत ह्यातील वालावलकर सरांचं अकाउंटच आमच्या दुकानात असे आणि अपवादात्मक वेळेला मला त्यांच्या घरून उधारी गोळा करावी लागे कारण सरांना स्वतः बोलवण्याची हिंमत माझ्या बापातही न्हवती दुकानात एकदम चण्ट असलेला आपला विद्यार्थी  शाळेत असा एव्हरेज का असा प्रश्नच काहीवेळा शिक्षकांना पडे

पुढे मी जेव्हा सुधारलो तेव्हा करवीर नगर वाचन मंदिरात प्रवेश केला आणि गुळवणी सरांनी मला अख्ख वाचनालयच देऊन टाकलं ह्या काळात हिंदुत्ववादी लोकांनी आणि मार्क्सवादी लोकांनी आपली वाचनालये मला सताड उघडी केली मला वाचायला पुस्तक हवंय आणि ते मिळालं नाही असं क्वचितच झालं असेल मला भेटलेले सगळे हिंदुत्ववादी आणि मार्क्सवादी लोक प्रेमळ होते आणि त्यांनी माझ्यावर प्रेमच केलं त्यामुळे माझ्या मनात द्वेष येणार कुठून ? आर एसेंस मधल्या लोकांचा माझा अनुभव खूप चांगला होता त्यामुळे नंतर अनेकांनी आपले कडवट अनुभव मला सांगितले तेव्हा मी हेही शक्य आहे असे म्हणालो माझे वडील कट्टर गांधीवादी त्यामुळे सर्वांना प्रेमाने जिंकावे हा त्यांचा कायमच मला सल्ला असे द्वेष कुणाचाच करायचा नाही हे तर मी त्यांच्या आचरणातूनच शिकलो अहिंसेवर त्यांचा दृढ विश्वास त्यामुळे द्वेष माझ्या रक्तातच नाही मात्र आक्रमकता निश्चित आहे

माझा स्वभाव अत्यंत शीघ्रकोपी माझ्या आईसारखा ! राग आला कि हातात जे असेल ते तिचे शस्त्र ! तिचा धाक असा कि एरियातले  रामभाऊ फाळके ,केमन , दादा सरनोबत असे डॉन टाईप लोकही तिला घाबरायचे मात्र तितकीच प्रेमळ असल्याने बायका तिला येऊन दुःख सांगायच्या आणि ही निवारण करायची म्हणजे एकदा सरनोबतांनी दारू पिऊन जरा जास्तच मारलं तर माझ्या आईने त्याला सरळ कानाखाली काढून पुन्हा माझ्या लेकीवर हात टाकशील तर खबरदार म्हणून ठणकावलं होतं तिचा हा प्रेमळ पण शीघ्रकोपी स्वभाव माझ्यात आला आणि माझ्या घरच्या लोकांनी तो जसा सांभाळला तसा ह्या लोकांनीही ! आणि अर्थातच पुढे माझ्या सगळ्या गर्लफ्रेंड्सनी आणि परममित्रांनी ! पुढे मेडिटेशनने तो नियंत्रणात आणला  पण जनेटिकल असल्याने नाहीसा नाही झाला माझ्या आईवडिलांची लव्हस्टोरी मी फार जवळून टिकतांना पाहिली आहे समोरच्याला त्याच्या सगळ्या पॅकेजडील सकट स्वीकारणे हे मी माझ्या आईवडिलांच्यामुळे शिकलो
साहजिकच हिंदुत्ववादी व मार्क्सवादी लोकांशी माझे कितीही मतभेद असले तरी माझ्या मनातले त्यांच्याविषयीचे प्रेम कधीही कमी झाले नाही आज मी जो काही आहे त्यात त्यांचाही वाटा अतिशय महत्वाचा आहे इतरांच्या वाईट अनुभवाला मी कमी लेखत नाही पण माझे अनुभव चांगले असतील तर उगाच पब्लिसिटी मिळावी म्हणून मी का फालतूपणा करावा ?इझम आज आहेत उद्या जातील पण माणुसकी चिरंतन आहे आणि मला तिचा वावर हिँदुत्ववादी आणि मार्क्सवाद ह्यांच्यातही भरपूर दिसलेला आहे ही माणुसकी  टिकवणे हाच सर्वोत्कृष्ट इझम !आणि हे कळणे हेच सर्वोत्कृष्ट विजडम ! बाकी सगळं डमडम ! माणुसकी नसलेला माणूस मोक्षाला पोहचूच शकत नाही असो आता पुन्हा धर्मनिरपेक्षततेकडे वळूया कुरुंदकरांनी म्हंटलं होतं

माझा देवावर विश्वास नाही. माझा धर्मावर विश्वास नाही. पण देव आणि धर्म यावर विश्वास असणारे लाखो लोक माझ्या भोवती आहेत त्यांच्या पासून तुटून पडण्यावारही माझा विश्वास नाही. त्यांना माझ्या बरोबर खेचून नेण्यासाठी आवश्यक असणारी व्यवहारातील तडजोड करण्यास मी तयार आहे. विचारात मात्र करणार नाही. याच कारण अस आहे की विचार हे तुम्हाला कोणीकडे जायचं आहे याची दिशा दाखवणारे असतात आणि व्यवहार तिथपर्यंत तुम्हाला टप्या टप्याने खेचून नेण्यासाठी असतो.”

विचार आणि व्यवहार ह्यांच्या ह्या तडजोडीचा धर्मनिरपेक्षता निर्माण करण्यात व आणण्यात बराच मोठा वाटा आहे

ही धर्मनिरपेक्षता आली कशी तर
कुरुंदकरांच्या मते
१ मुस्लिमांच्याकडून झालेले काही पराभव त्यामुळे धार्मिक श्रद्धांना बसलेला धक्का
२ विज्ञान काही नवी सत्ये प्रस्थापित करते जी नाकारता येत नाही त्याभोवती काही  नवीन हितसंबंध तयार होतात व ह्या हितसंबंधांना  धर्म मान्यता देत नसल्याने इहलोक व परलोक संघर्ष सुरु होतो
३ धर्मच धर्माच्या विरोधी लढायला लागतो
(जागर १६१ ६२)

भारताबाबत हेच घडले अशी कुरुंदकरांची धारणा आहे

प्रश्न असा आहे कि मुस्लिमांचे आक्रमण भारतावरही झाले त्यावेळी भारत का शहाणा झाला नाही कि त्यावेळी भारताच्या धार्मिक श्रद्धांना धक्का बसला नाही ? वस्तुस्थिती अशी आहे कि पराभवामुळे न्हवे तर ख्रिश्चनांनी क्रुसेड्समध्ये मुस्लिमांच्यावर विजय मिळवल्याने तिथे धर्मनिरपेक्षता आली ख्रिश्चनांचा पराभव झाला असता तर अख्खा युरोप मुस्लिम झाला असता पुढे हे विजयी झालेले ख्रिश्चन भारतातही विजयी झाल्यावर त्यांनी धर्मनिरपेक्षता इन्ट्रुडयुस केली

कुरुंदकरांनी दिलेले दुसरे कारण योग्य आहे

तिसरे कारण अपूरे आहे कारणं शंकराचार्यांनी प्रस्थापित केलेल्या हिंदू धर्माविरुद्ध बसवेश्वरांनी मार्टीन ल्यूथरपेक्षा ताकदीचे  बंड केले होते विनोबा भावे ह्यांनी भारतीय प्रबोधनाची सुरवात राजाराम मोहन रॉय ह्यांनी केली असे आपण म्हणत असलो तरी ८०० वर्षांपूर्वी असे काम कर्नाटकात बसवेश्वर ह्यांनी केले होते असे म्हंटले आहे तरीही धर्मनिरपेक्षता आली नाही कारण बिज्जल राजाचे सहकार्य लाभले नाही उलट ब्राम्हणांच्या प्रभावाखाली येऊन राज्यसत्तेने बसवेश्वरांना त्रासच दिला शरण व बिज्जल ह्यांच्यातील संघर्ष हा एक दुर्देवी संघर्ष होता

ह्याउलट युरोपमध्ये तिथल्या ९० टक्के राज्यकर्त्यांनी विज्ञानाला व प्रोटेस्टंट नावाच्या नवीन धर्माला भरपूर पाठिंबा दिला असा पाठिंबा तत्कालीन राजांचा बसवेश्वरांना मिळता तर भारतातही प्रबोधन वेगवान झाले असते पुढे जेव्हा शिवाजी महाराजांनी ताकद उभी केली तेव्हा बंड झाले पण तरीही सर्वधर्मसमभाव आला पण धर्मनिरपेक्षता आली नाही कारण विज्ञानाची मांडणी करणारा कोणी फ्रान्सिस बेकन निर्माण झाला नाही वैज्ञानिक मेथडॉलॉजी , तीने पसरवलेले ज्ञान व तिची धर्माशी कशी सांगड घालायची हा पडलेला प्रश्न हेच धर्मनिरपेक्षतेचे खरे कारण आहे नानक आणि रणजितसिंग ह्यांच्या संबंधातूनही पंजाबमध्ये सर्वधर्मसमभाव आला पण धर्मनिरपेक्षता आली नाही कारण विज्ञान निर्माण झाले नाही विज्ञानाला मान्यता देण्याची गरज आणि धर्मालाही आधार देण्याची राजकीय आवश्यकता ह्यातूनच धर्मनिरपेक्षता जन्मली भारतातही हेच घडले आहे गांधी हवेत आणि जगदीशचंद्र बोस - न्यूटनही त्यातून भारतीय धर्मनिरपेक्षता जन्मली आहे शिवाजी महाराज व रणजितसिंग ह्यांच्या राजवटीत जगदीशचंद्र बोस सारखे वैज्ञानिक व वैज्ञानिक मेथडलॉजी वाले कुणी न्हवते म्हणूनच त्यांच्या राजवटी धर्मनिरपेक्ष झाल्या नाही थोडक्यात सर्वधर्मसमभाव अधिक विज्ञान व विज्ञाननिष्ठ कायदे व वैज्ञानिक मेथडचा स्वीकार म्हणजे धर्मनिरपेक्षता होय विवेकानंदांच्या भाषेत भारतीय धर्म व युरोपियन विज्ञान ह्यांच्या समन्वय आवश्यक होता धर्मनिरपेक्षतेत तो साधला गेला

आणखी  एक प्रश्न असा कि भारतीय राष्ट्राच्या सीमा आणि त्याचबरोबर भारतीय धर्मनिरपेक्षतेच्या सीमा ठरल्या कशा ?तर ह्याचं उत्तर काँग्रेस आहे काँग्रेसनं श्रीलंका आणि तिबेटला कधीही काँग्रेसमध्ये बोलावले नाही कारण हे वेगळे देश आहेत हे ठरले हे कुणी ठरवलं तर ब्रिटिशांनी ! काँग्रेसचा भौगोलिक सेन्स हा कलोनाइज्ड होता म्हणूनच नेपाळ अफगाणिस्तान श्रीलंका तिबेट हे भारताचे भाग आहेत हे काँग्रेसने कधीही स्वीकारले नाही कुणी म्हणेल कि ब्रिटीशांच्याच्यापूर्वी ही स्वतंत्र राज्ये होती त्यामुळे पण ह्याच तर्काने पाहिले तर दाक्षिणात्य राज्ये तर पहिल्यापासूनच स्वतंत्रपणे वाटचाल करत होती मग भारतात दक्षिण कशाला हवी होती असं तर न्हवतं ना कि काँग्रेसमधल्या नोकरदार पुढाऱ्यांना आपल्या पोरांच्या बदल्या तिबेट श्रीलंकेला नको होत्या ? कि नेपाळ शैव (राजघराणे वैष्णव )तिबेट श्रीलंका बौद्ध अफगाणिस्तान इस्लाम असल्याने ह्यांची देशाला गरज नाही असे वाटले ?

राष्ट्र आणि राज्य ह्यांच्यातील फरक स्पष्ट आहे राष्ट्राला लिखित छापील संविधान असते राज्याला लिखितछापील  संविधान नसते

राज्ये धर्मनिरपेक्ष नसतात  तर राष्ट्रे धर्मनिरपेक्ष असतात त्यामुळेच धर्मराज्ये सोपी आहेत पण धर्मराष्ट्रे पूर्ण अवघड
भारतीय राज्यघटना ही प्रथम लिहिली गेली आहे मग तिच्या छापील आवृत्या उपलब्ध झाल्या आहेत

भारतात छापील राज्यघटना ही ब्रिटिशांनी आणली आणि हे लक्ष्यात घेण्याजोगे आहे कि ही सेक्युलर कायदेव्यवस्था आल्यावर ब्राम्हणांनी एकाही संताला मोक्ष मिळालेल्या माणसाला हिंसक त्रास दिलेला नाही कारण खून पचवण्याचे चान्सेस सेक्युलर कायद्यात कमी असतात धर्मसूत्रात जी छूट ब्राम्हणांना होती ती ब्रिटिश राज्याच्या कायद्यात न्हवती सेक्युलॅरिझमचा हा पहिला फायदा असा झाला

श्रीधर तिळवे नाईक

नास्तिकवाद , निरीश्वरवाद , निनिर्मिकवाद  , निधर्मीवाद , धर्मनिरपेक्षवाद आणि लोकायतवाद ८ श्रीधर तिळवे नाईक

इंग्रजी सेक्युलर कायद्यांच्यामुळे एक अतिशय महत्वाचा बदल भारतीय प्रबोधनात घडला तो म्हणजे लोकायत दर्शनाचे झालेले कमबॅक ! ह्या दर्शनाची चर्चा देबीप्रसाद चटोपाध्याय ह्यांनी लोकायत अ स्टडी ऑफ इंडियन मटेरियलिझम ह्या ग्रंथात अत्यंत सविस्तरपणे केली आहे मात्र दृष्टिकोन आर्यन असल्याने शंकरापेक्षा पुरंदरपेक्षा बृहस्पती व चार्वाक ह्यांचा गवगवा अधिक आहे  मराठीत स रा  गाडगीळ  आ ह सांळूखे ह्यांनी हे काम केले लोकायत फक्त प्रत्यक्ष प्रमाण मानतात हे त्यांचे वैशिष्ट्य त्यांना इत्तर सर्व दर्शनांच्यापेक्षा वेगळं काढतं साहजिकच ते स्वर्ग नरक कर्मकांड यज्ञ वैग्रे सर्वांनाच नकार देतात




न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिकः ।
नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिकाः ॥१॥
स्वर्ग नाही, मोक्ष नाही, पारलौकिक असा आत्माही नाही, वर्ण, आश्रम आदींची कर्मकांडे फळ देणारी नाहीच नाहीत



हे चार्वाकांचे सूत्र सर्व काही सांगते आणि ते जगप्रसिद्ध आहे 

शैव संस्कृतीत लोकायत दर्शनाचा आरंभ शंकरापासून होतो व पुरंदरेने पुढे त्याचा विस्तार केला असे मानले जाते म्हणजे शंकराने ईश्वर म्हणजे विश्वाचा प्राण अशी व्याख्या करून बाकी सर्व देव आणि धर्म ह्यांना नकार दिला तर पुढे पुरंदरने मोक्षालाही नकार देऊन ते पूर्णपणे जडवादी बनवले व पुरंदर ही एक परंपराच बनवली आर्य शैव टक्करले तेव्हा साहजिकच ऋग्वेदात इंद्राने ह्या पुरंदरावर हल्ले केल्याचा उल्लेख अटळ होता कारण पुरंदर धर्म आणि देव दोन्ही नाकारत होता 

आजच्या अर्थाने शैव संस्कृतीत ह्या विचाराचा प्रवर्तक शंकर नसून पुरंदर आहे कारण शंकराने मोक्ष प्राप्ती हे जीवनाचे सर्वोत्तम श्रेयस मानले होते शैवांच्यातली ही बंडखोरी टिकली नाही त्यातच शैवांची परंपरा मौखिक त्यामुळे पुरंदरच्या नावाखेरीज काहीही उपलब्ध नाही मध्वाचार्य ह्या शैव आचार्याने (ह्याला हायजॅक करण्याचा प्रयत्न सध्या आर्य करतायत )जी उद्धरणे सर्वदर्शनसंग्रहात दिली आहेत तेव्हढीच आज प्रमाण आहेत 

आर्य संस्कृतीत लोकायत दर्शनाची सुरवात बृहस्पस्ती व चार्वाक ह्यांनी केली ह्यातील बृहस्पती सूर होता देवांचा एक गुरु होता तो देवांना ऐहिक बाबतीत सल्ला देई पुढे आर्य वाङ्मयात त्याची प्रतिमा बदलली कारण देवसुर आर्यांना त्याचे विचार पेलेनासे झाले तो एका अर्थाने मवाळवादी होता तर चार्वाक असुर आणि जहालवादी होता हे दोघेही लोकायतवादी असले तरी ह्या दोघांच्या मांडण्या वेगळ्या होत्या पण तपशील उपलब्ध नसल्याने त्या कळणे अवघड आहे एक गोष्ट साफ आहे बृहस्पतीपेक्षा चार्वाकाचा यज्ञ संस्थेला कडवा विरोध होता आणि बहुदा त्यामुळेच त्याची हत्या झाली 


इंडियन मटेरियलिझमचा हा नमुना दोन्ही  संस्कृतीत निर्माण झाला तरी दोन्ही  संस्कृतीनी  त्याला फार मान्यता दिली नाही मात्र कौटील्याच्या अर्थशास्त्रात अण्विक्षिकीच्या अभ्यासात लोकायत दर्शनाचा समावेश आहे 

धर्मनिरपेक्षतेनंतर ज्या धर्ममुक्तीची आपण अपेक्षा करतो त्यासाठी लोकायत हे दर्शन परफेक्ट होते किंबहुना धर्ममुक्ततेची जगातली पहिली मांडणी ही लोकायतांनी केली दुर्देवाने लोकायतांच्याकडे माणसाला पडणाऱ्या अंतिम प्रश्नांची उत्तरे न्हवती त्यामुळे लोकायतवाद फारसा पसरला नाही पुढे विज्ञानाचा उदय झाला आणि जडवादाला ज्या कोंडीला फेस करावे लागे ती कोंडी फुटली जडवादाकडेही काही निश्चित अशी उत्तरे उपलब्ध झाली साहजिकच लोकायतवाद वाढत जाणे अटळ आहे 

लोकायत तत्वज्ञानाची एक पंचाईत म्हणजे समाज कसा निर्माण करावा ह्याविषयी ते पुरेसे स्पष्ट न्हवते ही स्पष्टता आली ती समाजवादामुळे आणि कार्ल मार्क्सच्या शास्त्रीय समाजवादामुळे 
माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे कि कम्म्युनिस्ट आपली चळवळ लोकायतवादी चळवळ म्हणून चालवते तर यशस्वी होते एखादी गोष्ट ऋषी किंवा देवांचे गुरु सांगत होते म्हंटल्यावर भारतीय लोक अधिक कान देऊन ऐकतात दुर्देवाने कम्युनिस्टांना हे कळलं नाही देवांचे गुरु बृहस्पती ह्यांचा उपदेश म्हणून व्याख्याने लावली व दिली असती तर गांधीजींच्या भक्तीला एन्काउंटर निर्माण झाला असता असो 

धर्ममुक्तीचा पहिला प्रयोग लोकायत असल्याने त्याची चर्चा अटळ आहे 

लोकायत ह्या दर्शनाविषयी भारतात अनेकदा बोललं जात पण अनेकदा घोळही घातले जातात त्यामुळे लोकायतांच्याविषयी थोडक्यात चर्चा आवश्यक आहे

भारतात लोकायतवादी लोक नास्तिक असतात असा समज आहे पण हे चुकीचे आहे कारण भारतात नास्तिक ह्या शब्दाचा अर्थ वेद मानणारे असा होतो आणि वेद मानणारे सर्वच नास्तिक होतात लोकायत फक्त नास्तिक नाहीत ते आणखी  काही आहेत

भारतात लोकायतवादी निरीश्वरवादी असतात असा समज आहे मुळात ईश्वर ह्या शब्दाचा अर्थच भारतात वेगवेगळा आहे शैव धारेनुसार ईश्वर म्हणजे विश्वाचा प्राण असा प्राण असतो हे मानणे म्हणजे निरीश्वरवाद होय तर भक्ती धारेनुसा सतत अविरत अखंड अमर सर्वत्र असलेले सगुण अस्तित्व म्हणजे ईश्वर आणि ह्याला दिलेला नकार म्हणजे निरीश्वरवाद ! लोकायतवादी नास्तिक तर आहेतच पण ते निरीश्वरवादीही आहेत

भारतात लोकायतवादी निनिर्मिकवादी आहेत असा समज आहे मुळात निर्मिक म्हणजे निर्माण करणारा ज्याने हे ब्रम्हांड निर्माण केले असा ! हिंदू धर्मातील शैव पंथानुसार  (शैव धर्म व शैव पंथ ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत )ह्या जगाचे निर्माण शिवाने केले आहे तर हिंदू धर्मातील शाक्त पंथानुसार शक्तीने ब्रह्मांड निर्माण केले आहे ज्यू ख्रिश्चनांच्या मते गॉड इस्लामनुसार अल्ला हिंदू धर्मातील वैष्णव पंथानुसार विष्णू कृष्ण पंथानुसार कृष्ण ईश्वर पंथानुसार ईश्वर ह्यांनी हे जग निर्माण केले आहे ईश्वरवाद निर्मिकवाद ह्यांच्यातील फरक असा कि ईश्वर अमर आहे अजन्मा आहे आणि त्याने ब्रह्मांड निर्माण केले नसून तेही अमर अजन्मा आहे ह्याउलट निर्मिकवादानुसार निर्मिकाने हे विश्व निर्माण केले आहे निर्मिक क्रियेटर आहे पाश्चात्य तत्वज्ञानात अथेईस्ट म्हणजे कधी कधी निर्मिक मानणारे असाही होतो लोकायतवादी निनिर्मिकवादीही आहेत

भारतात लोकायतवादी निधर्मीवादी आहेत असाही समज आहे निधर्मी म्हणजे धर्म , ईश्वर , निर्मिक , धार्मिक तत्वज्ञान वा दर्शन ह्याला ठाम नकार देणे आपण जेव्हा निधर्मी शासन हवे असे म्हणतो तेव्हा कुठलाही धर्म  , ईश्वर , निर्मिक , धार्मिक तत्वज्ञान वा दर्शन ह्याला ठाम नकार देणारे शासन हवे असे म्हणतो फक्त कम्युनिस्ट राजवटीतच असे शासन काहीकाळ अवतरले होते पण नंतर त्यांनाही काही काळाने तडजोड करावी लागली लोकायतवादी निधर्मीवादी आहेत ते निधर्मी शासन मागतात

भारतात लोकायतवादी धर्मनिरपेक्षवादी  आहेत असा गैरसमज आहे धर्मनिरपेक्षवादी सार्वजनिक जीवनात धर्म , ईश्वर , निर्मिक , धार्मिक तत्वज्ञान वा दर्शन ह्याला ठाम नकार देतात पण घरात सार्वजनिक धर्मस्थळी वैयक्तिक आयुष्यात हे सर्व पाळायला अनुमती देतात  आपण जेव्हा निधर्मी शासन हवे असे म्हणतो तेव्हा कुठलाही धर्म  , ईश्वर , निर्मिक , धार्मिक तत्वज्ञान वा दर्शन ह्याला ठाम नकार देणारे शासन हवे असे म्हणतो पण जेव्हा आपण धर्मनिरपेक्ष शासन हवे असे मानतो तेव्हा सार्वजनिक जीवनात शासकीय स्थानात कुठलाही धर्म  , ईश्वर , निर्मिक , धार्मिक तत्वज्ञान वा दर्शन ह्याला ठाम नकार देणारे शासन हवे असे मानतो शासनाच्या जागेत गणपतीउत्सव साजरा करणारे आणि बुद्ध जयंती साजरे करणारे दोघेही धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन करत असतात
काही लोकायतवादी नंतर धर्मनिरपेक्षवादी झाले असले तरी ती तडजोड आहे तत्वज्ञान नाही

पण लोकायतवादी फक्त नास्तिक , निरीश्वरवादी , निधर्मीवादी नाहीत तर ते ह्यापेक्षाही अधिक काही आहेत हे अधिक काही पाश्चात्य धर्मात अस्तित्वातच नसल्याने त्याचा प्रश्न येत नाही ते आहे मोक्ष म्हणजेच  कैवल्यप्राप्ती वा निर्वाण ! फक्त भारतीय धर्मातच मोक्ष अस्तित्वात असल्याने लोकायतवादी मोक्षालाही ठाम नकार देतात आणि इथेच भगवान शिव भगवान बुद्ध आणि भगवान महावीर ह्यांच्यापेक्षा वेगळे होतात शैव , बौद्ध जैन ह्यांचा मोक्ष निर्वाण कैवल्यप्राप्ती ह्यावर ठाम विश्वास आहे हे तिघेही नास्तिक आहेत निधर्मी आहेत पण मोक्षी आहेत लोकायत मोक्षी नाहीत ते निमोक्षीवादी आहेत त्यामुळेच ते केवळ धर्माला नकार देऊन थांबत नाहीत ते मोक्षालाही(कैवल्यप्राप्ती वा निर्वाण ) ठाम नकार देतात

तेव्हा भारतात तुम्हाला तत्वज्ञान मांडायचे असेल तर नुसते अथेईस्ट वा नास्तिक वा निरीश्वरवादी वा निधर्मीवादी म्हणवून घेऊन चालणार नाही तर स्वतःला लोकायतवादी म्हणवून घेणे आवश्यक आहे अनेक पुरोगामी लोक हे करत नाहीत म्हणून मी हे लिहिले मी १२वीत सुरवातीला  लोकायतवादी होतो आणि मी एक ग्रंथही लिहिला होता माझ्या वडिलांचा एका लहान मुलावर झालेला हा संस्कार होता आणि त्यातूनच हा ग्रंथ जन्मला होता आणि ज्यांना लोकायतवादी म्हणाव्यात अशा कविताही मी लिहिल्या ज्या डेकॅथलॉन रियल ह्या संग्रहात आहेत माझे वडील सुरवातीला  लोकायतवादी  होते त्याचा हा सुपरिणाम होता मात्र सार्वजनिक जीवनात नैतिक मूल्ये कशी प्रस्थापित करायची हा पेच सुटत नसल्याने ते गांधीवादी झाले होते  मला सर्वात प्रथम ते जेव्हा अंबाबाईच्या देवळात घेऊन गेले तेव्हा त्यांनी मला मंदिराच्या गाभाऱ्यात नमस्कार करायला न्हेले न्हवते तर अंबाबाईचे आर्किटेक्चर कसे आहे ते दाखवायला न्हेले होते माझ्या वडिलांच्यापुढचा नैतीकतेचा प्रश्न आजही तसाच आहे  आजही लोकायतवाद्यांपुढचा  हा पेच सुटलाय असं मला वाटत नाही जेपीसारखे अनेकजण का गांधीवादी बनले ह्या प्रश्नाचे उत्तरही ह्या पेचात आहे


लोकायतवादी अर्थ आणि काम हे दोनच पुरुषार्थ मानतात ह्यातील शैवांच्या मते अर्थमध्ये समाजकारण , राजकारण आणि अर्थकारण येते तर काममध्ये सेक्स फॅमिली नातेवाईक नातेवाईकांचा गोतावळा आणि कला येते लोकायतवाद्यांना हा अर्थ अपेक्षित होता का ? सांगणे कठीण आहे आपणाला फक्त त्यांचा अर्थ काम ह्या पुरूषार्थावर विश्वास होता एव्हढंच माहित आहे

आजच्या काळात आपण लोकायतवादी शासन निर्माण करू शकतो का माझ्या मते कम्युनिस्टांनी असे प्रयत्न केले पण रशियात ते यशस्वी झाले नाहीत कारण रशियात ख्रिश्चन व मुस्लिम धर्म होता (काही कॉन्स्पिरसी थेरीवाल्यांच्या मते मार्क्स हा ज्यू होता आणि रॉथशिल्ड फॅमिलीचा जावई होता आणि ह्या जावयाचे कामच मुळी ख्रिश्चन व भारतीय धर्मांच्या अंकित असलेली विविध राष्ट्रातील सरंजामशाही उध्वस्त करून त्या जागी ज्यू सिंडिकेटला आवश्यक असलेली इंडस्ट्रीयल राजवट आणण्यासाठी वैचारिक पार्श्वभूमी तयार करणे हे होते साम्यवाद ही ह्या ज्यू सिंडिकेटची विशेषतः अमेरिकन ब्रिटिश अर्थव्यवस्था ताब्यात असलेल्या रॉथ शिल्डची एक भांडवली खेळी होती जी यशस्वी झाली (पुतिनने तिला छेद दिला )ज्याने क्रांती केली तो लेनिन ज्यू होता आणि क्रांती करण्यासाठी लागणारा फायनान्स ज्यू सिंडिकेटने पुरवला अधिक माहितीसाठी दीपक करंजीकर ह्यांचे घातसूत्र हे पुस्तक वाचा  )

रशियातील ह्या ख्रिश्चन व मुस्लिम ह्या दोन धर्मांनी धर्ममुक्ततेला छेद दिला कारण नास्तिकता रुजवण्यात रशियन सरकारला अपयश आले आणि जेव्हा अफगाणिस्तानात रशियाने सैन्य घातले तेव्हा ही लढाई धर्ममुक्त राजवट विरुद्ध धर्मयुक्त राजवट अशी बनली ज्यात अमेरिकेने धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली धर्मयुक्त राजवटीच्या दिशेने उडी मारली ही अमेरिकन भांडवलशाहीची एक आत्मघातकी खेळी होती जिने भांडवलशाहीसाठी धर्मनिरक्षता महत्वाची नसते हे सिद्ध केले ह्या लढाईतील रशियाचा पराभव हा धर्ममुक्ततेचा पराभव होता आणि लादेनचा विजय हा धर्मयुक्त शासनाचा विजय होता अमेरिकेने मुर्खासारखी ह्यावेळींहि धर्मनिरपेक्षतेची होळी केली आणि ही होळी जगभर इस्लामिक देशात वाटली धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी राजवटींच्यापेक्षा धर्मवादी राजवटी तेलावर व नशील्या ड्रग्जवर नियंत्रण मिळवण्यासाठी सोप्या असतात हा ह्यामागचा भांडवली घाणेरडा विचार 
ह्या युद्धात एकीकडे रशियाची तेल तैलता नष्ट केली गेली तर दुसरीकडे अफगाणिस्तानातील ड्रग सप्लायवर नियंत्रण मिळवले गेले 

ह्याउलट चायनात बौद्ध धर्म असल्याने व तो नास्तिकच असल्याने तिथे मात्र धर्ममुक्त राजवट सहज रुजली म्हणूनच तिथे कम्म्युनिझमही टिकला 

भारतात बांगला व केरळमध्ये साम्यवादी राजवटी आल्या ह्यातील केरळ हे ब्राम्हणधर्माची राजवट चरमसीमेवर असलेले राज्य होते इतके कि इथले नालायक ब्राम्हण क्षत्रिय नायर स्त्रीशी संबंधन करून राज्याचा वारस निश्चित करायला लागले जिथे क्षत्रियांच्या बायकांची ही अवस्था तिथे बाकींच्यांबद्दल काय बोलावे ? ब्राम्हण आणि शूद्र ही द्विवर्णीय हिंदू वर्णव्यवस्था आणि अस्पृश्यता केरळातच जन्म पावली आणि भारतभर पसरली ब्राम्हणधर्माचा ब्राम्हणी सरंजामशाहीचा गजबजाट इतका कि ख्रिश्चन धर्माचा पर्याय इथे जास्त प्रसरण पावला युरोपियन लोकांनी जिंकलेला पहिला प्रदेश बंगाल न्हवता तर केरळ होता दुसरा बंगाल ह्या दोन्ही राज्यात हिंदू ब्राम्हणी धर्माने ब्राम्हण व शूद्र अशी द्विवर्णीय व्यवस्था लादल्याने धर्माबद्दल जास्त असंतोष होता त्यामुळे तुलनेने लवकर धर्मनिरपेक्षता आली आणि धर्ममुक्तताही अपवाद बांगला देश तिसरा प्रदेश अर्थात महाराष्ट्र होता इथेही उत्तर पेशवाईत मनुस्मृती लागू होती इथेच डांगेंनी कम्युनिस्ट पार्टी वाढवली पण इथे ट्रेंड युनिअनिझ्म ज्यादा भरभराटला कारण महाराष्ट्र हा काँग्रेसच्या राजकारणाचे केंद्र होता आणि काँग्रेसने कम्युनिस्ट गिळले 
परिणामी महाराष्ट्र कधीही धर्ममुक्ततेकडे सरकलाच नाही तो धर्मनिरपेक्ष गणपती उत्सव साजरा करत बसला तो बसलाच आजही त्यातून तो उठलेला नाही मराठी गणपती उत्सव आणि भारतीय धर्मनिरपेक्षता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत .  

श्रीधर तिळवे नाईक  


धर्मनिरपेक्षता ,  धर्ममुक्ती , नास्तिकता आणि कम्म्युनिझम   श्रीधर तिळवे

आधुनिक युगात औद्योगिकता सेट झाल्यावर जे चमत्कार पूर्वी देव करायचे ते तंत्रज्ञानाने प्रत्यक्ष करून दाखवायला सुरवात केली औद्योगिकता  झेपणाऱ्या लोकांनी ईश्वर सोडला नाही खरा पण बर्ट्रांड रसेलने ह्या लोकांचे सगळे युक्तिवाद व्हाय आय एम नॉट  ख्रिश्चन ह्या नावाचा एक ग्रंथ लिहून खोडून काढले गॉड इज डेड म्हणणाऱ्या फ्रेडरिक नित्शेने सुरु केलेल्या प्रतिसृष्टीय  नास्तिकवादाचे हे पुढचे पाऊल होते भारतीय संस्कृतीतील तिसऱ्या उपसंस्कृतीला म्हणजेच ज्युडायिक धर्मांना हा धक्का होता मात्र आपल्या आर्य  शैव बांधवांच्याप्रमाणे त्यांनीही हा धक्का पचवला मात्र स्टॅलीन  माओच्या आधुनिक राजवटीत झालेले अत्याचार पुढे आले आणि धर्ममुक्त राजवटी  किती नृशंस होऊ शकतात ते जगाला कळाले ह्यातून साम्यवादी धर्ममुक्त चळवळींना चांगलाच सेट बॅक बसला आणि संपूर्ण युरोप बॅकस्टेजवर गेला ह्यातूनच १९५० पासून धर्माची उत्तराधुनिक मांडणी सुरु झाली ह्याचा एक फायदा भारताला झाला आतापर्यंतचे ओरिएंटॅलिस्ट वैदिक ब्राम्हण वैष्णव धर्मात अडकून होते साठोत्तरी ओरिएंटॅलिस्ट लोकांनी भारतातल्या स्थानिक धर्मांचा पंथाचा अभ्यास सुरु केला ह्यातूनच वारकरी आणि खंडोबा ज्योतिबा ह्यांच्या अभ्यासाची प्रथा सुरु झाली तिने मराठी साहित्याला देशी पाठबळ पुरवले 

ह्याला प्रतिक्रिया म्हणून मार्गी संस्कृतीत १९६० नंतर साहजिकच आजच्या काळातील मार्गी धर्माची मांडणी कशी करावी ह्या दिशेने मंथन  सुरु झाले अणि भारतात ओशो रजनीश हयांनी जगातल्या सर्व धार्मिक मार्गी परंपरा नव्याने मांडल्या प्राचीन मार्गी संहितामधून  आधुनिक संहिता निर्माण करण्याचा हा प्रयत्न मस्त होता नवीन पिढीला ह्या निमित्ताने आपल्या मार्गी परंपरेची नव्याने ओळख झाली साठोत्तरीच्या ऍडव्हान्स मार्गी धार्मिकतेचे प्रतीक म्हणजे ओशो रजनीश होय 

राजनीशांच्यामुळे अनेकांना जे कृष्णमूर्तींच्या आधुनिक  ज्ञानप्रधान मोक्षतेचे जे आकर्षणे होते ते  संपले वं ओशोंचा अराजकी  उत्तराधुनिक धर्म सेटल झाला भारतीय पुन्हा एकदा मोक्षाकडून मार्गी धर्माकडे सरकले हे परंपरेचे कमबॅक होते ह्याचा साहित्यावर परिणाम होणे अटळ होते साहित्यिकही कुलवृत्तांत  हिंदू लिहू लागले आपण परंपरेत लिहितो ही अभिमानाने सांगण्याची गोष्ट बनली आणि चौथ्या नवतेच्या क्रांतिकारकांचा ९० टक्के वेळ परंपरेशी झगडण्यात जाऊ लागला

अस्तित्ववादाचे दोन जनक होते एक होता किर्केगार्द जो ईश्वर तर्कशुद्ध नसल्याने मी त्याच्यावर विश्वास ठेवतो असं म्हणत होता तर दुसरा नित्शे गॉड इज डेड म्हणत होता भारतीयांनी किर्केगार्द निवडला त्यामुळे इल्लोजिकल विचार करणाऱ्या ब्राम्हणांच्या झुंडशाहीने पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि पुरोगामी ब्राम्हण आदर गमावू लागले घरात होणाऱ्या कर्मकांडांना गोतावळ्यात  प्रसिद्धी मिळायला लागली १२ व्या शतकातला बंगाली वैश्यांचा सत्यनारायण आपली पूजा भारतभरातल्या सर्व आणि अर्थात मराठी ऑफिसेसमध्येही मिरवू लागला भक्तिवेदांत मुंबईकर बनला


हे लक्ष्यात घेण्याजोगं आहे कि ओशो रजनीशांच्या मृत्यूनंतरच भाजप पक्कड बसवू शकला कारण रजनीशांच्यामुळे परंपरा उत्तरआधुनिकतेकडे सरकत होती पण कर्मठ बनत न्हवती तिला पायबंद घातला तो अमेरिकेतल्या कर्मठ ख्रिश्चनांनी रजनीशपूरम हे एका पोस्टमॉडर्न सिटीचं स्वप्न होतं जे व्हॅटिकन सिटीनं उध्वस्त केलं कारण रजनीशांनी जिझसला मोक्ष मिळाला न्हवता किंबहुना त्याला तो माहीतच न्हवता असं स्पष्ट विधान केलं त्यांनी आतापर्यंत जिझसवर दिलेल्या व्याख्यानांच्या हे विरुद्ध होतं वास्तविक ज्युडायिक धर्माला मोक्ष ही संकल्पनाच माहित नाही तरीही आपल्याकडच्या प्रबोधनाच्या प्रोजेक्टने उगाच नसलेल्या गोष्टी सांगून सर्वधर्मसमभावाचा खोटा इतिहास रचला हा इतिहास भारतीय स्वातंत्र्य चळवळीला पूरक होता आणि काँग्रेसी अजेंड्याला साजेसा होता तो भारतभर पसरला

प्रत्यक्षात भारतात धर्म स्पष्टपणे  आर्य , शैव आणि ज्युडायिक अशा प्रकारात वाटले गेले होते ह्याशिवाय जमाती श्रद्धा होत्याच सर्वधर्मसमभावाला धर्म सम लागतात युरोपमध्ये शैव वा  आर्य नसल्याने तिथे असे सम होते  भारतातही प्राचीन काळात असे सम होते कारण विषम आले न्हवते विषम आले जेव्हा मुस्लिमांनी आक्रमण करून हिंदुस्थान जिंकला ह्या मुस्लिम   ज्युडायिक राजवटीत ज्युडाइक धर्मांनी धर्मांतर घडवून आपली लोकसंख्या आर्य शैवांच्या इकवल केली त्यामुळे सर्वधर्मसमभाव हलायला लागला त्याला पर्याय म्हणून धार्मिक सहिष्णुतेचा उद्घोष सुरु झाला अकबर शिवाजी हे धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक बनले


दुर्देवाने औरंगजेबाच्या कारकिर्दीत धर्मसहिष्णुता पूर्ण हलली आणि पुढे उत्तरपेशवाईत ती रसातळाला गेली

आज अवस्था अशी आहे कि  सर्वधर्म सम हा पोकळपणा आहे आर्य सूर धर्म वर्ण जात मानतात अलीकडे विदेशी सर्व्हेत एन आर आय लोकांच्यातही वर्णजातिव्यवस्था अजूनही पाळली जात असल्याचे निष्कर्ष पुढे आले आहेत हे खरे असतील तर मग शिकून आपल्या धार्मिक धारणा बदलत नाहीत हा निष्कर्ष घट्ट होईल शैव असुर आर्य ज्युडायिक वर्णजातिव्यवस्था मानत नाहीत पण अलीकडे त्यांनाही ही बाधा झालेली दिसते लिंगायत धर्मात वर्णजातिव्यवस्थेचे कमबॅक झाले आहे पण सुदैवाने अजूनही पुरोगामीपणा सम्पलेला नाही ब्राम्हण वैष्णव हिंदू शैव बौद्ध ह्यांना समान मानणं म्हणजे गोळवलकर आणि आंबेडकर ह्यांना समान मानणं आहे आर्य आणि शैव मोक्ष मानतात ज्युडायिक मानत नाहीत मग हे धर्म समान होणार कसे ?

वस्तुस्थिती अशी आहे कि जगात सर्वधर्मविषमभावच जास्त आहे आणि सामान्य माणसाला तो कळतो पण अंगभूत सहिष्णुतेकडे सर्वांचा कल असल्याने लोक एकत्र नांदत असतात मुद्दा सर्वधर्मसहिष्णुतेचा असतो  सर्वधर्मसमभावाचा न्हवे अकबर रणजित शिवाजी हे सर्वधर्मसहिष्णुवादी होते पण बाकीचे न्हवते आणि बाकीचे ९९ टक्के आहेत ह्यातील अकबराची जी दुर्दशा मौलवींनी केली ती इस्लामविषयी जास्त बोलते शेवटी अकबर नास्तिक झाला म्हणून त्याला मरण्यासाठी कैदेत टाकले आणि तो नास्तिक म्हणूनच कैदखान्यात मेला ह्याउलट धर्मसहिष्णुवादी राजवट शिवाजीनंतर संभाजीने आणि पहिल्या बाजीरावापर्यत टिकली होती बाजीराव मस्तानी विवाहाने सर्व समीकरणे फिरवली वास्तविक मस्तानी आणि तिचा मुलगा ह्यांचे धर्मांतर घडवून हा प्रश्न सहज सोडवता आला असता पण हिंदू ब्राम्हणधर्मात धर्मांतराची प्रथा नसल्याने हे घडू शकले नाही कुणाला आपल्या धर्मात घ्यायचे नाही आणि कुणी गेला तर त्याला आत घ्यायचे नाही ही हिंदू ब्राम्हणांची  मानसिकता आहे शैवांनी नेहमीच ह्याला कडकडून विरोध केला आहे म्हणूनच शिवाजी महाराजांच्या राजवटीत नेताजी पालकरचे पुन्हा शैविकरण होऊ शकते जे धाडस शिवाजी महाराजांनी दाखवले तेच धाडस पहिल्या बाजीरावाने दाखवायला हवे होते त्याने इतिहास बदलला असता पण पहिल्या बाजीरावाने धाडस दाखवले नाही आणि इतिहास उलटा फिरला मनुस्मृती आणि धर्मशास्त्र राज्यकारभारात घुसले

अनेक लोक अध्यात्मिकतेची ग्वाही देता असतात पण अध्यात्मिकता ही धर्मापेक्षा उंच गोष्ट आहे तिथे सर्वच एका ईश्वराची लेकरे होतात पण धर्मात प्रत्येकाचा ईश्वर वेगळा म्हणून तर त्यांना देव आणि देवता  म्हणतात गॉड आणि गॉडेसेस कुणाचा एक कुणाचा अनेक ईश्वर सर्व देवदेवतांचा अंत आहे आणि मोक्ष ईश्वराचा अंत आहे त्या पातळीवरून राज्यशासन चालवायला सर्वानांच मोक्षकुं आणि मुमुक्षु बनवावं लागतं आणि ही दुर्मिळ परिस्थिती असते दारू पिणारे लोकसुद्धा सोमेलिअर परीक्षा पास झाल्यावरच तज्ज्ञ मानतात पण धर्माची गोष्ट आली कि सर्वच तज्ञ हिंदू लोक तर कुठल्याही गोष्टीच अधःपतन घडवण्यात वाकबगार अगदी बाळासाहेब आंबेडकर सुद्धा श्रद्धेय होतात आणि विठ्ठलाला जातात

ईश्वराला सुद्धा ह्यांनी देवळात बंदिस्त केला जो  मूळ अर्थाने विश्वाचा प्राण होता हिंदूंना धार्मिक बनायचं नसत म्हणून ते अध्यात्मिक सिद्ध बुद्ध लोकांची पूजा करत बसतात शंकर महावीर बुद्ध ह्यांची एकदा पूजा सुरु केली त्यांना देव बनवलं कि मग त्यांनी सांगितलेले यमनियम किंवा पंचव्रते किंवा पंचशील पाळायची गरजच भासत नाही आपण अशाच लोकांच्यात वावरत असतो आणि  अशा लोकांच्यासाठी धर्ममुक्तता अशक्यच बनत जाते आणि म्हणून धर्मनिरपेक्षता फळफळते 

साधना करू इच्छिणाऱ्या लोकांच्या समूहाचीही धर्मनिरपेक्षता गरज बनते मी माझी प्रॉपर्टी सांभाळतो तू तुझी प्रॉपर्टी सांभाळ असाच हा करार असतो आणि प्रॉपर्टी रिलिजियस असते


श्रीधर तिळवे नाईक





धर्मनिरपेक्षता ,  धर्ममुक्ती , नास्तिकता आणि कम्म्युनिझम १०  श्रीधर तिळवे नाईक

धर्मनिरपेक्षतेत राज्यशासन धर्मनिरपेक्ष आणि नागरिक धर्मसापेक्ष अशी विषमता अपरिहार्यपणे निर्माण होते कारण धर्माबाबत काही कृती करण्याचा हक्क धार्मिक पातळीवर शासन गमावून बसते ह्या विरोधाभासाचे मूळ युरोपच्या इतिहासात आहे शासनाची पारलौकिकतेपासून काल्पनिक सुटका होते पण शासकीय अधिकारी स्वर्गनरकावर विश्वास ठेवतात ह्यामागे कळत नकळत माणूस मशीन समजण्याची प्रबोधनाची युक्ती असते

फ्रान्सिस बेकनने धार्मिक ज्ञान व वैज्ञानिक ज्ञान ह्या दोन भिन्न कॅटेगरीज केल्या कारण त्याकाळात विज्ञान कुठवर मजल मारेल ह्याचा अंदाज कुणालाच आलेला न्हवता बेकन एक स्वतःच व्हिलन टाईप मनुष्य होता ज्याने आपल्या गरिबीत आपला मेंटॉर असलेल्या उमरावाचा काटा काढला होता तर आयुष्यभर भ्रष्टाचार करून वयाच्या साठाव्या वर्षी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून जेव्हा अटक झाली तेव्हा  सर्वच भ्रष्टाचार करतात मी  केला तर काय बिघडले असे उद्गार काढले होते त्याच्या ह्या चारित्र्यहीनतेमुळेच आधुनिक तत्वज्ञानाचा जनक हा मान त्याला देण्याऐवजी देकार्त ला दिला जात असे कारण तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार होईल अशी ब्रिटिशांना साधार भीती होती आजही मराठी विश्वकोशात आधुनिक तत्वज्ञानाचा जनक म्हणून देकार्तचाच उल्लेख होतो कारण कलोनियल मानसिकता

आता अशा माणसाला देव म्हातारपणी आठवणे साहजिकच मानले पाहिजे त्याने ह्या दोन वेगळ्या कॅटेगरीज करून शासनाला धार्मिक झंझटीपासून वाचवले पुढे जेव्हा लॉक आला तेव्हा तो बेकनच्या इंद्रियप्रामाण्यवादाचा अनुयायी म्हणूनच आला व त्याने देकार्तचे गणिती बुद्धिप्रामाण्यवादी ज्ञान ,बेकनचे  इंद्रियप्रामाण्यवादी  ज्ञान आणि ईश्वराविषयीचे ज्ञान अशा ज्ञानाच्या तीन कॅटेगरीज केल्या व शासनाने ईश्वरविषयक ज्ञानात ढवळाढवळ करू नये अशी भूमिका घेतली त्याच्या ह्या भूमिकेत फ्रान्सिस बेकनी धर्मनिरपेक्षतेचे जे बीज होती त्याचे रोपटे झाले

व्हीकोने इतिहासाची विभागणी धार्मिक युग हिरॉईक युग आणि मानवी युग अशी विभागणी करून धार्मिक युग होऊन गेले अशी मांडणी केली आणि एका अर्थाने धार्मिक युगाला इतिहासजमा  केले

ह्यातूनच पुढे होलिओकची गाजलेली पाच तत्वे विकसित होतात

1. Science as the true guide of man.
2. Morality as secular, not religious in origin.
 3. The reason the only authority.
4. Freedom of thought and speech
5. Owing to the “uncertainty of survival” we should direct our efforts to this life only.

 भारतीय धर्मनिरपेक्षतेलाही ह्याच पाच गोष्टी अपेक्षित आहेत

हा सगळा आटापिटा धर्माने विज्ञानात हस्तक्षेप करून मोडता घालू नये म्हणून होता

के एम पणिक्कर जेव्हा म्हणतात कि   आपले राज्य आपल्या प्राचीन परंपरावर आधारित नाही तेव्हा ते खरंच असतं डी इ स्मिथ ह्यांचे इंडिया ऍज अ सेक्युलर स्टेट हे पुस्तक ह्या प्रश्नांची चांगली चर्चा करतं The Secular State is a State which guarantees individual and corporate freedom of religion, deals with the individual as a citizen irrespective of religion is not constitutionally connected to a particular religion nor does it seek either to promote or interfere with religion.

ही त्यांनी दिलेली व्याख्या आहे आणि आजही ही व्याख्या व्याख्या आहे कि भारतीय धर्मनिरपेक्षतेचं वर्णन आहे असा प्रश्न पडतो

थोडक्यात काय धर्मनिरपेक्षता ही एक युरोपियन गोष्ट भारताने विज्ञानाबरोबर आलेले पॅकेजडील म्हणून स्वीकारलेले आहे मात्र आजही भारतीय अंतःकरणाशी त्याचे नातेगोते संशयास्पद आहे

श्रीधर तिळवे नाईक 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट