इब्राहिम अल्काझी ताकदही आणि अडथळाही
भारतातल्या कुठल्याही राज्यात आठ संस्कृत्या नांदत असतात महामार्गी मार्गी महादेशी देशी महापोटी पोटी महाजमाती जमाती ह्यातील जी महामार्गी असते ती आंतरराष्ट्रीय असते तिचा एक पाय भारतीय मार्गीत असतो तर दुसरा आंतरराष्टीय महामार्गीत सलमान रश्दी हे ह्या महामार्गीचे महाराष्ट्राचे सर्वोत्तम प्रतिनिधी दुसरी मार्गी जिचा एक पाय राष्ट्रीय म्हणजे भारतीय असतो तर दुसरा पाय प्रादेशिक असतो शांता गोखले ह्यांचे लिखाण ह्यात येते अरुण कोलटकर दिलीप चित्रे हे ह्याचे उत्तम उदाहरण हे लोक एका आंतरराष्ट्रीय व एका प्रादेशिक भाषेत लिखाण करत असतात महादेशी म्हणजे ज्यांचा एक पाय देशी असतो तर दुसरा पाय भारतीय असतो मात्र हे लोक जाणीवपूर्वक आपले लिखाण प्रादेशिक भाषेत करत असतात देशी म्हणजे ज्यांचे दोन्ही पाय प्रादेशिक असतात आणि जे जाणीवपूर्वक आपले लिखाण प्रादेशिक भाषेत व बोली भाषेचा वापर करत करत असतात महापोटी म्हणजे जे देशी वा मार्गीच्या मुख्य प्रवाहात सामील नसतात पण त्यांचा भाग असतात उदा मुंबईचे धारावी कल्चर किंवा अंडर वर्ल्डचे कल्चर किंवा बायकांची संस्कृती अलीकडे काही बायकांची संस्कृती ही महापोटी राहिलेली नसली तरी अजूनही ह्या बायका अपवादच आहेत पोटी संस्कृती म्हणजे देशी वा मार्गीच्या मुख्य प्रवाहात असतात पण त्यांना सामील करून घेतलेले नसते दलितांची संस्कृती पूर्वी अशी होती महाजमाती म्हणजे प्रभावी तुल्यबळ अशा एका जमातीची संस्कृती जी इतर जमातींच्यावर वर्चस्व गाजवते जमाती म्हणजे आदिवासी जमातीची संस्कृती उदा वारली
महाराष्ट्र राज्यात नाटकाच्या ह्या आठ परंपरा आहेत त्यातील महामार्गी संस्कृतीतून आलेले नाट्यकर्मी म्हणजे इब्राहिम अल्काझी ! १८ ऑक्टोबर १९२५ चा त्यांचा जन्म पुणे शहरातला त्यांचे वडील बदाउ सौदी अरेबियन व्यापारी तर आई कुवेतची कुवेती त्यामुळे त्यांच्यावर जितका संस्कार घरातील आंतरराष्ट्रीय अरबीं संस्कृतीचा होता त्यापेक्षा अधिक संस्कार पुण्यात जन्म झाल्याने भारतीय व त्यातील मराठी रंगभूमीचा होता ह्यांच्या कॉम्बिनेशनमधून त्यांची महाराष्ट्रीय भारतीय अशी मार्गी आयडेंटिटी तयार झाली बॉबी पद्मसी ह्यांच्या इंग्लिश थिएटरपासून त्यांनी सुरवात केल्याने ती घट्ट झाली आणि १९४७ नंतर रॉयल अकादमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट लंडनला शिकल्याने ती आंतरराष्ट्रीय होण्याची संधी निर्माण झाली पण भारतप्रेमाने ते परतले त्यांची स्वतःची अख्खी फॅमिली पाकिस्तानला मायग्रेट झाल्यावरही त्यांनी भारत निवडावा हे खरोखरच आश्चर्य मानायला हवे पुढेही इंग्लंड न निवडता भारत निवडणे आश्चर्यकारक होते भारतात बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपशी ते निगडित झाले ज्यात एम एफ हुसेन सुझ्झा रजा तय्यब मेहता ह्यासारखे पेंटर होते जे पुढे आधुनिक चित्रकलेचे पायोनियर म्हणून ओळखले जाणार होते
पण ह्या पणमध्ये एक ट्विस्ट होता नेमक्या ह्याचवेळी आधुनिक भारतीय ओळख सर्वांगाने निर्माण करण्याच्या मागे लागलेल्या पंडित नेहरूंना एक भारतीय पण आधुनिक असे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा निर्माण करण्याचा ध्यास लागला आणि त्याच्या संचालकपदी प्रशिक्षित अशा माणसाची गरज भासू लागली पंडितजींच्या स्टाफने अल्काझींचे नाव सुचवले अल्काझींच्यापुढे दोनच चॉईस होते इंग्लंडमध्ये पुन्हा जाऊन आंतरराष्ट्रीय होत जागतिक बनणे किंवा ऑफर स्वीकारून भारतीय बनणे अल्काझींनी भारतीयत्व घेतले अल्काझी हे रॉयल अकादमीचे प्रशिक्षण घेतलेले एकमेव असल्याने त्यांना प्रतिस्पर्धीच न्हवता आणि त्यांची नेमणूक झाली
अल्काझींनी ते जे शिकले होते त्यावरून एक अत्यंत अद्ययावत असा अभ्यासक्रम तयार केला जो १९५५ च्या युरोपला समांतर होता भारतीय प्रशिक्षण युरोपियन प्रशिक्षणाला समांतर करायची जी संधी होती ती अल्काझींनी परफेक्ट साधली मुख्य म्हणजे पाठीमागे अद्ययावत विचाराचा पंतप्रधान होता त्यामुळे काड्या करणाऱ्या पारंपरिक लोकांना संधी न्हवती
मराठी रंगभूमीवर त्या काळात दिगदर्शनाची तीन स्कूल्स होती
१ संवाद व हालचाली दोन्हींना बांधून ठेवणारे
२ संवाद बांधणारे पण हालचाली मुक्त सोडणारे
३ संवाद मुक्त सोडणारे पण हालचाली बांधून ठेवणारे
अल्काझी तिसऱ्या स्कूलचे होते हिंदी पट्टा हा थिएटरबाबत ह्या काळात मागासलेला होता तो अल्काझींनी अंधा युग आषाढ का एक दिन सारखी नाटके करून एकदम मराठीच्या बरोबरीत आणण्याचा प्रयत्न केला दुर्देवाने मराठीला जसे विजय तेंडुलकर , चिं त्र्यं खानोलकर , महेश एलकुंचवार , वृंदावन दंडवते , दिलीप जगताप ,सतीश आळेकर , श्याम मनोहर ह्यासारखे अनेक नाटककार लाभले तसे हिंदीला न लाभल्याने हा प्रयत्न पुरेसा यशस्वी झाला नाही फक्त व्यापक मीडिया लाभल्याने भारतीय पातळीवरचा गाजावाजा झाला अपवाद मोहन राकेश पुढे सत्यदेव दुबे , विजया मेह्तापासून नसिरुद्दीन शहा ओम पुरी रोहिणी हट्टंगडीपर्यंत त्यांनी अनेकांना एनएसडी मध्ये प्रशिक्षित केल्याने संवाद मुक्त सोडणारे पण हालचाली बांधून ठेवणारे स्कूल मराठीत वाढीस लागले आणि जणू काय प्रायोगिक रंगभूमीचे हेच एक स्कूल असते असा गैरसमज पसरला मराठी रंगभूमी व एनएसडी ह्यांच्यात एक अदृश्य स्पर्धा सुरु झाली त्यात काही दोन्ही संघात होते
अल्काझींनी हिंदी रंगमंच पुढे न्हेला ह्याबद्दल शंका नाही पण त्यांचे क्लासिकलचे वेड इतरांनाही लागले नवीन नाटकांच्याऐवजी जुनीच नाटके जास्त प्रमाणात झाली पुढे पुढे तर तेंडुलकर कर्नाड मोहन राकेश हे क्लासिकल मानले जाऊ लागले आणि नवीन पिढ्याही ह्यांचेच नाटक करू लागल्या
हे सर्व कमी म्हणून कि काय अल्काझींनी दिलेला अभ्यासक्रम बायबल असल्यासारखा शिकवला जाऊ लागला
अल्काझींची मेथड हीच नाटक बसवण्याची मेथड बनायला लागली जे अल्काझी प्रायोगिक रंगभूमीची ताकद होते तेच तिची मर्यादा बनले वास्तविक हा अल्काझींचा दोष न्हवता नंतरच्या पिढीने हा अभ्यासक्रम बदलायला हवा होता मी जेव्हा मुंबई विद्यापीठाची थिएटर अकॅडमी जॉईन केली तेव्हा सिलॅबस बघून डोक्याला हात लावला तोच अल्काझींना प्रमाण मानणारा जुनाट सिलॅबस होता
मग मी एका बाजूला शिकवतांना ह्या जुन्यातच जागा निर्माण करायला सुरवात केली तर दुसऱ्या बाजूला सिलॅबस अद्ययावत करण्याची मागणी सुरु केली वास्तववाद शिकवताना देशीवाद शिकवणे कमर्शियल रंगभूमी शिकवताना पोस्टमॉडर्न थिएटर शिकवणे असला उद्योग सुरु केला मुलींना स्पष्टपणे फेमिनिझम नाही असे सांगितले त्यांनी मग मागणी केली तिचा फायदा घेऊन फेमिनिझम पोस्टफेमिनिझम शिकवले
खरेतर अल्काझींचा सिलॅबस त्यांच्या काळात एक क्रांतिकारक सिलॅबस होता आणि यूरोपमध्ये त्याकाळात असलेल्या अब्सर्ड थियटरपर्यंत त्यांनी अनेक गोष्टी त्यात समाविष्ट केला होता मी त्याकाळात असतो तर अल्काझींचे पाय धरले असते त्यांमुळे दोष अल्काझींचा नाहीच नवीन गोष्टी केंद्रस्थानी आणणारा सिलॅबस आणण्याची जबाबदारी आपली आहे आणि तीच त्यांना खरी आदरांजली होईल
श्रीधर तिळवे नाईक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा