नरहर कुरुंदकर : डेमोक्रेटिक पोस्ट सोशॅलिझम चा एक मुख्य अर्ध्वयू श्रीधर तिळवे नाईक

नरहर कुरुंदकर : डेमोक्रेटिक पोस्ट सोशॅलिझम चा एक मुख्य अर्ध्वयू श्रीधर तिळवे नाईक

नरहर कुरुंदकर : डेमोक्रेटिक पोस्ट सोशॅलिझम चा एक मुख्य अर्ध्वयू १ मेथड सत्य शोधणे  श्रीधर तिळवे नाईक

सध्या नरहर कुरुन्दकरांच्यावर खूपच चर्चा होते आहे आणि ही आनंदाची गोष्ट आहे मात्र कुरुंदकरांच्या विचाराऐवजी कुरुंदकरांनी विचार कसा करावयाचा ते शिकवले त्यावर ही चर्चा केंद्रित आहे कुरुंदकरांना सॉक्रेटिस महत्वाचा वाटत असल्याने कुरुंदकरांना सॉक्रेटिस ठरवण्याचा हा खटाटोप आहे बरे कुरुंदकर कसा विचार करायला शिकवतात त्यांची विचाराची मेथडॉलॉजी काय ह्यावर कुणी चर्चा करतांना दिसत नाही म्हणजे तिथेही बगलच दिलेली दिसते वास्तविक कुरुंदकरांनी स्वतःच सॉक्रेटिसचा मृत्यू ह्या नावाचा एक लेख लिहिला आहे आणि त्यात
१ तर्कशुद्ध विचार
२ तर्कशुद्ध विचार करण्याचा हक्क व
३ त्या विचारासाठी मरण पत्करण्याची तयारी
ह्यांची चर्चा केली आहे ही सॉक्रेटिसची वैशिष्ट्ये युरोपियन प्रबोधनाने आत्मसात केली म्हणूनच तिथे विज्ञान विकसित होऊ शकले शैवांनी ह्या गोष्टीला सॉक्रेटिसच्या आधीच आत्मसात केले होते मात्र आर्य संस्कृतीला हा विचार मान्य नाही मुळात १ तर्कशुद्ध विचार २ तर्कशुद्ध विचार करण्याचा हक्क ह्या दोन गोष्टी  ज्यांना आर्य युरोपियन आर्य समजतात त्या ग्रीकांनाही  मान्य न्हवत्या  म्हणून तर त्या विचारासाठी मरण पत्करण्याची तयारी सॉक्रेटिसला करावी लागली सॉक्रेटिसच्या मृत्यूनंतर ग्रीक थोडे शहाणे झाले पण भारतीय आर्य काही शहाणे झाले नाहीत हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू बळीपासून ते गौरी लन्केश पानसरेंच्यापर्यंत अनेकांच्या हत्या आजही होत आहेत कुरुंदकरांच्या मते सॉक्रेटिस हा मते सांगणारा विचारवंत न्हवता तर विचार कसे करावयाचा हे शिकवणारा आचार्य होता

कुरुंदकरांनी आणखी एका आदर्शाचा उल्लेख पुढीलप्रमाणे केलाय तो आहे शेजवलकर ! ते म्हणतात ,
स्वतःला जन्मभर गाडून घेणाऱ्या या निःस्पृह, निःस्वार्थ, स्पष्टवक्त्या, प्रज्ञावंत मीमांसकाला मी मराठा इतिहासाचा एक श्रेष्ठ आचार्य मानतो... भाबड्या स्तुतिपाठकांनी त्यांची बावळट पूजा बांधण्यापेक्षा निदान फटकळ मतभेद दाखवून त्यांचे ग्रंथ नवीन पिढी बारकाईने वाचीत आहे, हे नजरेस आणणे मला इष्ट वाटते. शेजवलकरांचा विवेचक प्रखर बुद्धिमान आत्मा या खणाखणीने अधिक तृप्त होईल, अशी माझी श्रद्धा आहे. शेजवलकर मराठा इतिहासातील अस्सल नाणे होते. आंधळेपणाने कोणालाही शरण जाऊ नका, हा ताठर उपदेश ज्या वंदनीयांकडून आम्ही शिकलो, त्यांपैकी तेही एक होते.”

- नरहर कुरुंदकर (इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांच्यावरील मृत्युलेखातून. नरहर कुरुंदकर, मागोवा, देशमुख आणि कंपनी. पृ. २०१-२०२)
कुरुंदकर योग्य जागी ताठर होते आणि ते स्वतः अस्सल नाणे होते इतिहासाविषयी ते भाबडे आशावादी न्हवते त्यांनी स्वतःच म्हंटल होतं कि

माझे इतिहासावर प्रेम असले तरी इतिहास भविष्याला मार्गदर्शन करतोअसे म्हटलेले नाहीइतिहास खाचखळगे दाखवून सावध करतो इतकेच म्हटलेले आहे... कोणत्याही जमातीतील परंपरागत नेतृत्व उद्ध्वस्त केल्याशिवाय भारतात लोकशाहीचा आरंभच करता येणे कठीण आहे त्याला फार मोठ्या वैचारिक लढ्याची तयारी ठेवावी लागेल... इतिहासाचा नायक जुना समाज असतोत्या संदर्भातच इतिहास घडत असतोपरंपरांची चिकित्सा करूनच मागासलेले अंधश्रद्ध मन आधुनिक बनवता येतेचिकित्सा टाळून माणसाला आधुनिक बनवता येत नाही.”

प्रश्न आताच्या काळात इतकाच कि गांधी घराण्याचे नेतृत्व परंपरागत मानून त्याला उध्वस्त करावे का त्याशिवाय मोदींना टक्कर देणारी लोकशाही व नवे लोकशाहीवादी नेतृत्व निर्माणच होणार नाही असे म्हणावे का ?
मागासलेले मन आधुनिक बनवणे हा कुरुंदकरांचा  प्रकल्प आहे आणि त्यासाठी ही चिकित्सा आहे घराणेशाही स्वीकारणारी काँग्रेस आधुनिक कि मागासलेली ? गांधी घराणेच पुन्हा काँग्रेसला सत्ता मिळवून देईल ही प्रखर वास्तवता कि अंधश्रद्धा ?

आणखी काही लोक कुरुंदकरांना तिसरी रिकामी जागा देऊ इच्छितात म्हणजे सेक्युलर हिंदुवाद आणि हिंदुत्ववाद ह्यांनी दोन जागा व्यापल्या  आहेत  आणि आता ह्या दोघांना पर्याय देईल अशी जागा रिकामी आहे म्हणजे इतके दिवस कम्म्युनिस्ट किंवा फुले आंबेडकरवादी झक मारत होते असं तुम्हाला सुचवायचं आहे का कि ह्यांना काँग्रेसच्या छावणीत टाकून तुम्ही मोकळे होताय ? प्रत्यक्ष कुरुंदकर तिसऱ्या जागेत बसतायत का कि ते काँग्रेसच्या जागेत आहेत ?


दुसऱ्या महायुद्धानंतर जगभर ज्या उत्तरवादी विचारसरणी जन्माला आल्या त्यात भारतीयांच्या संदर्भात १ उत्तरवसाहतवाद २ देशीवाद ह्या दोन चळवळी खूप गाजल्या मात्र इतर धारा विशेषतः काँग्रेस ,आंबेडकरवादी ,समाजवादी व मार्क्सवादी ह्या सतत मागे पहात राहिल्याने त्या आधुनिकवादीच व  थांबलेल्याच राहिल्या  पण ह्याला दोन  विचारवंत अपवाद होते १ शरद पाटील २  नरहर कुरुंदकर ह्या दोघांचे  सतत प्रवाही असणे हे कधीही मराठी संस्कृतीला आणि मीडियाला झेपले नाही आधी ह्या दोघांना स्वतःच्या मीडियात जागा न देऊन ह्यांचा वैचारिक मर्डर करायचा आणि आता त्यांना ते आउटडेटेड झाल्यावर व मेल्यानंतर जागा द्यायची असा हा दुटप्पीपणा आहे असो देर आये दुरुस्त आये

ह्यातील शरद पाटील ज्याला उत्तरमार्क्सवाद म्हणता येईल अशी मांडणी करत होते मार्क्सवाद आणि फुले आंबेडकर (माफुआ) राष्ट्रीय व प्रादेशिक संस्कृती ह्यांचा मिलाफ घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला जो अतिशय महत्वाचा होता कुरुंदकरांनी समाजवाद ही अर्थव्यवस्थाकेंद्री रचना नसून नवीन संस्कृती तयार करण्याची एक पद्धत आहे अशी भूमिका घेऊन भारतात सांस्कृतिक समाजवादाची मुहूर्तमेढ रोवली जी त्यांच्या समकालीन लोकांना कळली नाही कुरुंदकर संस्कृतीचा विचार करत होते म्हणूनच एव्हढे चौफेर लिहीत होते कारण संस्कृतीच्या प्रत्येक आयामांची चिकित्सा आपण केली पाहिजे असे त्यांना वाटत होते ते काँग्रेसी हिंदूवादी होते आणि काँग्रेस हीच हिंदूंची सर्वात मोठी संघटना आहे ह्यावर त्यांचा विश्वास होता  पण ते पारंपरिक काँग्रेसी हिंदूवादी न्हवते त्यांचा प्रयत्न ह्या पारंपरिक काँग्रेसी  हिंदुवादाला पुढे न्हेण्याचा होता वस्तुस्थिती अशी आहे कि कुरुंदकर लोकशाही समाजवादी परंपरेतच लिखाण करतायत मात्र ह्या परंपरेला जो लांगूलचालनाचा रोग लागलाय त्यापासून ते कोसो दूर आहे कुरुंदकरांना राजकीय अभिलाषा नाहीत त्यामुळे काँग्रेसमध्ये उगम पावलेला वाढलेला हा विचार ते स्वीकारून थांबत नाही तर सत्याच्या प्रकाशात इहवादी विचार विकसित करत  आणि वैष्णव व्यावहारिकता सांभाळत ते पुढे जातायत मराठीत ह्याचा उगम आपणाला आगरकरांच्यात सापडतो मात्र कुरुंदकर आगरकरांच्यापाशी थांबत नाहीत ते सांस्कृतिक समाजवादाची निर्मिती करतात जो आता रिलेवंट वाटू शकतो

आगरकरांच्या काळात आगरकरांच्या वाट्याला जी उपेक्षा आली तीच कुरुंदकरांच्या वाट्याला आली इष्ट ते बोलणार इष्ट ते करणार ह्या आगरकरांच्या बाण्याला जपणारे फार कमी विचारवंत झाले कुरुंदकर त्यांपैकी एक स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय समान नागरी कायदा ह्या प्रबोधनात्मक मूल्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे म्हणूनच कुरुंदकर पोस्टमॉडर्निस्ट होत नाहीत त्यांचा सत्यशोधनावर विश्वास आहे तो ढळलेला नाही

ते म्हणतात त्याप्रमाणे  इतिहासाला सत्य ही एकच देवता असते आणि म्हणून व्यक्तींच्या मोठेपणाची फारशी मातब्बरी इतिहासाला नसतेआजच्या राजकीय गरजा अगर आजची ‘उपयुक्त’ श्रद्धास्थाने यांची बूज राखणे इतिहासाला जमणे शक्य नाहीभूतकाळातली व्यक्ती जाणीवपूर्वक काय घडविण्याचा प्रयत्न करीत होत्या इतकेच पाहून इतिहासाला चालणार नाही तर या व्यक्तींच्या हातून जे अजाणता घडले  त्याचे परिणाम काय झाले हेही इतिहासाला पाहावे लागेलपुराव्याने जे सिद्ध होईल ते स्वीकारीत सर्व गुंतागुंत मान्य करीतऐतिहासिक दृष्टिकोन स्वीकारून कुठवर वाटचाल करता येते हे पाहण्याचा प्रयत्न करणे इतकाच या आकलनाचा हेतू आहेत्यामुळे नवी अभिमानस्थाने समोर आली तर ती नाकारलेली नाहीत आणि काही श्रद्धास्थाने ढासळली तरी फारशी चिंता केलेली नाही.”

मात्र सत्य निरंतर प्रवाही आहे ह्यावरही त्यांचा विश्वास आहे आपण मांडलेले सत्य ही खोडलं जाऊ शकतं हे त्यांना ठाऊक आहे एका पत्रात ते लिहितात, ‘माझ्या विवेचनाचे महत्त्व वाचकांना पटेलजर पटले तर माझ्यावर कठोर टीका होईल...माझी इच्छा पण कठोर टीका होऊन सर्वांनी मला मुर्खात काढावे ही आहेकारण त्यासाठी माझ्यापेक्षा खोलात उतरावे लागून मराठी समीक्षा अधिक खोल करावी लागेल तेच मला हवे आहे.’’ 

प्रबोधनाच्या ठोस आणि ठोकळ समाजवादातून त्यांनी स्वतःची मुक्तता करून घेतली म्हणूनच ते पुढचे पाहू शकले आणि ह्याला कारण आपणाला मुर्खात काढले जावे अशी त्यांची इच्छा अशी इच्छा असली कि तुम्हालाही इतरांना मुर्खात काढण्याचा परवाना मिळतो


सहाजिकच त्यांचा हिंदुत्ववादाला विरोध होता गांधिजिंच्याप्रमाणे त्यांच्यावर वैष्णवांचा सखोल परिणाम होता पण गांधिजिंच्याप्रमाणे ते आस्तिक न्हवते आणि मुस्लिमांच्याबाबत भोळसट न्हवते ह्या काळात काँग्रेसने आणि समाजवाद्यांनी काय करायला पाहिजे ते ते नेमक्या भाषेत सांगत होते समाजवादी लोक वा काँग्रेस त्यांचं ऐकती तर काँग्रेसवर आज जी स्थिती आली ती आली नसती पण कुरुंदकर म्हणतात त्याप्रमाणे
गेली कैक वर्षे आपण राजकारणाचा चिकित्सकपणे अभ्यास करणे सोडूनच  दिलेले आहेजाहीर सभेतील व्याख्यानेपुस्तके  लेख यांच्या आधारेच आपण राजकारणाचा विचार करीत आहोराजकारणाचा विचार राजकीय प्रवाहाच्या संदर्भात करायचा असतो  राजकीय नेत्यांच्या वर्तनाची त्यांच्या व्याख्यानांत सुप्तपणे दडलेल्या ध्वन्यर्थाशी संगती लावून राजकारणाचा विचार करायचा असतोही शिस्तच आपण सोडून दिलेली आहे.” (‘जागरच्या प्रस्तावनेतून).

कुरुंदकरांनी ही शिस्त पाळली का कि नेहरू युगाच्या जादुवादात तेही अडकले ?

मी ना कुरुंदकरांना समकालीन ना त्यांच्या नंतरच्या पिढीच्या समकालीन त्यामुळे कुरुंदकरांना मी गुरुजी म्हणून पाहू शकत नाही मी कुरुन्दकरांच्याकडे सर्वात प्रथम ओढला गेलो होतो तो त्यांच्या एका पुस्तकाच्या टायटलमुळे पुस्तकाचे टायटल होते शिवरात्र आणि कुरुंदकरांनी त्याचे दिलेले स्पष्टीकरण होते, शिवरात्र ही रात्रच असतेपण ती झोपण्याची रात्र नाहीशिवाच्या आराधनेत ही रात्र जागून काढावयाची असतेअसले जागरण करताना जीवनातील शिव या मूल्यावर पुरेशी श्रद्धा असणे आवश्यक असते... देशाच्या उज्ज्वल भवितव्यावर माझी श्रद्धा आहे आणि अशा श्रद्धा कोणत्याही तर्कशास्त्रावर आधारलेल्या नसतातयाची मला जाणीव आहे.”

हा अर्थ चुकीचा आहे कारण शिव हे मूल्य ग्रीक आहे त्याचा भारतीय शिवाशी केवळ एक अंग म्हणून संबंध आहे सत्यम शिवम सुंदरम ही त्रयी भारतीय न्हवे हे आता आम्ही कुरुंदकरांना सांगावे काय ? मात्र त्यातली त्यांची तळमळ अस्सल आहे असे वाटल्याने मी हे पुस्तक वाचून पूर्ण केले 

कुरुंदकरांचा मी ऐकलेला पहिला क्रांतिकारक विचार म्हणजे त्यांनी ब्राह्मणांच्याकडे असलेले ज्ञान खरे ज्ञान न्हवतेच जे ज्ञान ब्राम्हणांकडे होते ते थोर न्हवेच अशी केलेली मांडणी ! मी टीकाहरणमध्ये म्हंटले होते कि ब्राम्हणांच्याकडे असलेल्या ज्ञानाचे स्वरूप महत्वाचे नाही तर त्या ज्ञानाला ब्राम्हणांनी सामाजिक व्यवस्थेत काय उंचीवर ठेवले होते हे महत्वाचं ब्राम्हणांनी अतिशय पद्धतशीरपणे  त्यांचे निरुपयोगी ज्ञान सर्वोच्च स्थानी ठेवले होते माझ्या मते क्लास केवळ धनव्यवस्थेला लागू होत नाही तो सत्ताव्यवस्थेला , कर्मव्यवस्थेला आणि ज्ञानव्यवस्थेलाही लागू होतो सत्तेची कर्माची आणि ज्ञानाचीही  हेजिमनी असते आणि भारतीय वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था ही सत्तेची , कर्माची आणि ज्ञानाचीही हेजिमनी निर्माण करते धार्मिक काल्पनिक ज्ञान सर्वोच्च त्या खालोखाल राज्यकारभार ,युद्ध व संरक्षणाचे ज्ञान आन्वीक्षिकीचे ज्ञान मग त्याखालोखाल वैश्यांची वार्ता म्हणजे पशुपालन शेती व्यापार ह्यांचे ज्ञान व मग शूद्रांचे वस्तूंचे उत्पादन करण्याचे ज्ञान आणि शेवटी अस्पृश्यांचे सफाई करण्याचे ज्ञान हे सर्वात तळाला ही आर्यांची कर्माची , सत्तेची , धनाची , ज्ञानाची हेजिमनी होती व आहे आणि हेही वर्णव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे आणि दुर्देवाने ते कोणीच लक्ष्यात घेत नाही कारण मनु ह्या भाषेत बोलत नाही पुस्तकी किडे असणाऱ्या विचारवंताना हे कळावे कसे ? जगात सर्वत्रच १८०० पर्यंत ही नॉलेज हेजिमनी होती आणि आजही ह्या हेजिमनीचे संस्कार टिकलेले आहेत कुरुंदकरांचे म्हणणे म्हणूनच चुकीचे ठरते कारण मुद्दा ज्ञानाच्या स्वरूपाचा नाही तर मुद्दा ज्ञानाच्या उच्चनीच्चतेचा आहे ब्राम्हणांचे खरे यश स्वतःचे निरूपयोगी ज्ञान टॉप क्लासवर ठेवण्यात आहे प्रथम क्लास ज्ञानाचा ठरतो मग धनसंपत्तीचा असा माझा सिद्धांत आहे

मी हे सुरवातीलाच म्हणतोय कारण ब्राम्हण असण्याची अपराधभावना कुरुन्दकरांच्यात घनदाट आहे आणि मला वाटते तिला उचलून फेकून देण्याचा विवेकी प्रयत्न ते सतत करत असतात मला संशय आहे ही भावना तत्कालीन सगळ्या ब्राम्हण समाजवाद्यांच्यात होती पण फक्त कुरुंदकरच असे होते जे ह्या अपराधभावनेला सायकॉलॉजिकली डिकन्सट्रकट करण्याचा व ऍड्रेस करण्याचा ते प्रयत्न करत होते किमान आपल्यात ती आहे हे ऍडमिट करत होते त्यातूनच वरील सिद्धांत जन्मला होता

पण प्रश्न फक्त ज्ञानाच्या प्राचीन हेजिमनीचा नाही अर्वाचीन आणि आधुनिक काळात ही ज्ञानाची कर्माची सत्तेची हेजिमनी सम्पलीये का ?तर नाही १९९० पर्यंत भारतीय ज्ञानव्यवस्थेवर ब्राम्हणांचं एक नॉलेज क्लास म्हणून वर्चस्व होत आणि भारतीय आयडियालॉजीच्यावरही अपवाद फक्त गांधी पण गांधींच्यानंतरही गांधीवाद सांभाळतंय कोण ? मुळात गांधींना आपला वारस नेहरू निवडावा लागला कि त्यांनी स्वतः निवडला ?पटेलांना बहुमत असूनही लोकशाहीची हत्या करून हा निर्णय का घेतला पटेलांनी हा निर्णय स्वीकारला हा पटेलांचा शिष्य म्हणून असलेला मोठेपणा आहे गांधींचा गुरु म्हणून असलेला मोठेपणा नाही मला पटेल कि नेहरू हा वादच निर्माण करायचा नाही प्रश्न लोकशाही व्यवस्थेचा आहे देशाचा पंतप्रधानच बहुमताने निवडला जाणार नसेल तर पुढे काय होणार हे स्पष्ट आहे

आंदोलन करणे आणि शासन चालवणे ह्यात फरक आहे आंदोलन काय नको ते सांगतं कुरुंदकरांच्या भाषेत सांगायचे तर आंदोलन विचार आहे तर शासन व्यवहार आहे गांधी स्वतः व्यवहार सांभाळण्यात माहीर होते त्यामुळे त्यांनी हा जो पंतप्रधानकीचा व्यवहार केला तो असा का केला हे त्यांनी देशाला सांगायला हवं होतं . एक प्रश्न असाही निर्माण होतो तो म्हणजे गांधी हा सत्ता प्राप्त करण्यासाठी काँग्रेसमधल्या ब्राम्हण पुढाऱ्यांनी केलेला व्यवहार होता काय ? कारण जनता गांधींच्यामागे होती जर गांधींच्यामागे जनता नसती तर हा व्यवहार सांभाळला गेला असता काय ?

गांधींच्या मृत्यूनंतर हा व्यवहार हळूहळू प्रभाव गमावून बसला आणि २०१४ नंतर तर पूर्णच ! आता तो जिवंत करायचा प्रयत्न आहे पण जे लोक तो जिवंत करायला चाललेत त्यांच्यावरच लोकांचा विश्वास नाही कारण सत्तेची हेजिमनी न हलवता लोकांना गांधी हवा आहे

ह्याचा अर्थ काय ? तर कुरुंदकरांची चिकित्साही आपण डोळे उघडे ठेऊन केली पाहिजे


श्रीधर तिळवे नाईक


नरहर कुरुंदकर : डेमोक्रेटिक पोस्ट सोशॅलिझम चा एक मुख्य अर्ध्वयू  मनुस्मृती :सत्य शोधणे  श्रीधर तिळवे नाईक

मनुस्मृती हा भारतातील कदाचित सर्वात वादग्रस्त पुस्तक आहे आणि  कुरुंदकरांचे तिच्यावरील लेखन हे एक सर्वश्रेष्ठ लेखनापैकी एक आहे विशेषतः भाजपमुळे मनुस्मृती पुन्हा चर्चेत आली आहे 

भारतीय इतिहासात मनुस्मृती फार महत्वाची आहे ती प्राचीन कारणांमुळे न्हवे तर अर्वाचीन कारणांमुळे ! ब्रिटीशांच्यापूर्वी वैदिक राजवटी सोडल्या म्हणजे उत्तरपेशवाई सोडली तर  ज्या शैव वा ब्राम्हणेतर राजवटी होत्या तिथे कुठेही मनुस्मृतीची राजवट अस्तित्वात न्हवती वैदिक राजवटीतही मनुपेक्षा याज्ञवल्क्य स्मृतीलाच जास्त महत्व होते

दुर्देवाने ब्रिटिश काळात १७९४ साली मनुस्मृतीचा अनुवाद झाला तिला प्रमाण मानून ब्रिटिशांनी हिंदू कायदा तयार केला आणि अख्खा भारत  मनुस्मृतीनुसार चालत होता असा गैरसमज पसरला ह्याला कारण उत्तरपेशवाई होती जी मनुस्मृतीनुसार चालत होती आणि ब्रिटिशांची अंतिम लढाई ह्या उत्तरपेशवाईशी झाल्याने इंग्रजांना असे वाटले कि उत्तरपेशवाई ज्या कायद्याच्या आधारे चालत होती त्याच कायद्याच्या आधारे भारत चालत असणार
जे हजारो वर्षे ब्राम्हणांना जमलं नाही ते ब्रिटिशांनी एका तडाख्यात केले खरेतर ह्या एका कारणासाठी फुले ह्यांनी ब्रिटिश राज्य नाकारले असते तरी चालले असते पण झाले नेमके उलटे ! फुल्यांनीही असाच समज करून घेतला कि महाराष्ट्र मनुस्मृतीनुसार चालत होता म्हणजे भारत मनुस्मृतीनुसार चालत होता आणि हा गैरसमज फुल्यांच्याकडून आंबेड्करांच्याकडे पास झाला वास्तविक ह्या लोकांनी होळकरांना आणि त्यांच्या राजवटींना डोळे उघडून पाहिले असते तरी त्यांना मनुस्मृती ही राज्यकारभार चालवत होती हे प्रमाण मानण्यातला  मूर्खपणा कळला असता असो ब्रिटिशांच्यामुळे आणि फुले आंबेड्करांच्यावर पडलेल्या ब्रिटिश प्रभावामुळे बहुजनांच्या बोडक्यावर उगाचच अंगापेक्षा बोन्गा जास्त झालेली ही मनुस्मृती पडलेली आहे

शिवाजी महाराजांनी मनुस्मृती वाचली तरी होती काय ? वाचणं जाऊ द्या शिवाजी महाराजांना मनुस्मृती माहित तरी असावी का हा मला प्रश्न पडतो . असो . ब्राम्हणांना शंख छान वाजवता येतात एव्हढेच त्यातून कळते

मागील लेखात आपण कुरुंदकरांच्या मेथडॉलॉजीची आणि त्यांच्या सॉक्रेटिस , शेजवलकर आगरकर ह्यांच्याशी असलेल्या संबंधाची चर्चा केली मनुस्मृती : एक विचार ह्याही ग्रंथात कुरुंदकर हीच मेथडॉलॉजी वापरतात 

मी मागेच म्हंटल होतं कि  महाराष्ट्र हा चार उपसंस्कृतीतून वाहता राहतो

अपरान्त कोकण
कर्णाट दक्षिण पश्चिम महाराष्ट्र(ह्यात बेळगाव खानापूर निपाणीही येते )
मराठवाडा
विदर्भ(ह्यात दक्षिण  मध्यप्रदेश येतो )

कुरुंदकर हे मराठवाड्यातून आले होते आणि  नांदेड ही त्यांची कर्मभूमी होती आणि ते अवघ्या नांदेडचे आचार्य होते हे सर्वश्रुत आहेमराठवाडा हा वैष्णवांचा अड्डा आहे अपरान्त कर्णाट (दक्षिण पश्चिम महाराष्ट्र )हे शैवप्रधान  आहेत (अपवाद पुणे शहर आसपासचे  परिसर जे वारकरी चळवळीमुळे वैष्णव बनले  शैवांचा पंढरीनाथ पद्धतशीरपणे विठ्ठल करून मूळचे शैव मंदिर वैष्णव बनवत हे धर्मांतर घडवण्यात आले आहेआणि ज्याने वैष्णवांच्या परिणामस्वरूप उत्तरपेशवाई आणली  )ह्या मराठवाडा उत्तर आंध्र मुळे कुरुन्दकरांच्यावर  घनदाट वैष्णव संस्कार आहेत आणि अप्रत्यक्षरीत्या ते सतत नवंवैष्णवांचे समर्थन करत राहतात नववैष्णववादाने मनुस्मृती ठामपणे नाकारली पाहिजे अशी कुरुंदकरांची  भूमिका आहे जी ह्या सदंभात आतापर्यंतच्या गांधीजींच्या लेच्यापेच्या हिंदुवादाला एक तर्कशुद्ध ठामपणा देते



ब्राम्हणांच्या विशेषतः ब्राम्हणधर्म मानणाऱ्या ब्राम्हणांच्या दृष्टीने मनुस्मृती ही त्यांची श्रद्धा आहे खुद्द कुरुंदकरांनी श्रद्धांच्याबाबत असं म्हंटलं आहे कि 

यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याला २५ वर्षे होत आलेली आहेतएका मर्यादित अर्थाने आपले स्वातंत्र्य आता स्थिर झाले असून राष्ट्र क्रमाक्रमाने प्रौढ होऊ लागले आहे आणि त्याबरोबरच आपली लोकशाहीही प्रौढ होऊ लागली आहेराष्ट्राच्या लोकशाहीच्या बाल्यावस्थेत निर्भयपणे ज्या चर्चाचिकित्सा करणे आपल्याला जमले नसते त्या चर्चा आपण आता सुरू केल्या पाहिजेतभोवताली ज्या घटना घडत असतात त्या घटनांचा सर्वागीण आणि संपूर्ण अर्थ जनतेला आकलन झालेला असतोच असे नाहीशिवाय स्मरणशक्तीही अतिशय दुबळी असतेअशा अवस्थेत वेळोवेळी आपल्या सर्व श्रद्धा पुन:पुन्हा घासूनपुसूनतावूनसुलाखून घेण्याची गरज असतेयाबाबत परंपरेने चालत आलेल्या भूमिका बदललेल्या परिस्थितीत कित्येकदा बाद होतातकित्येकदा त्यांची मर्यादा आपल्याला दिसू लागतेकधी कधी तर अगदी मुळामध्ये जाऊन पाहिले म्हणजे आपल्या श्रद्धा आणि त्यांचे आधार तपासून घेण्याची गरज निर्माण होते.
आपण समजतो तितके श्रद्धांची तपासणी करण्याचे कार्य सोपे नाहीस्वत:ला अतिशय तर्कशुद्ध आणि बुद्धिनिष्ठ म्हणविणाऱ्या मंडळींच्याही स्वत:च्या मनातील विविध श्रद्धा आणि पूर्वग्रह अशा मूलभूत तपासणींच्या आड येतात

तेव्हा कुरुन्दकरांनाच प्रमाण मानून त्यांच्याही विचाराची चिकित्सा आपण करायला काहीही हरकत नाही 

ग्रीकरोमन परंपरेचे क्लासिसिझमचे युरोपियन लोकांना फायदा झाला आपल्याकडे मनुस्मृतीचे पुनरागमन पेशवाईत झाल्याने मनुस्मृतीचे ब्रिटिश राजवटीतील कमबॅक झाल्याने अस्तित्वात नसलेल्या इतिहासावरच जास्त चर्चा झाली आणि काल्पनिक इतिहास घट्ट झाला असो 

मनुस्मृतीबाबत जे काही जीवघेणे प्रश्न आहेत त्यातील एक म्हणजे विनोबा भावे सारख्या समजूतदार माणसाला मनू शासनम हा ग्रंथ वा संकलन का रचावेसे वाटले ? हे करून आपण अख्ख्या गांधीवादाला पुन्हा मागे न्हेतो हे विनोबांना कळले नसेल ?

आणि दुसरा प्रश्न हिंदुराष्ट्रवादाची आधारशीला मनुस्मृती असणार आहे का ? हिंदुत्ववादी अनेकदा हिंदू हिंदू म्हणून टिकले त्याचे श्रेय हिंदूंच्या वर्णजातिव्यवस्थेला देतात साहजिकच कुरुंदकरांनी प्रथम त्यावरच हल्ला चढवलेला आहे कुरुंदकर म्हणतात ,

जगाच्या इतिहासात हिंदूंच्या इतकी चिवट अशी जमात आढळणार नाहीकाही प्रमाणात ज्यूंशी त्याची तुलना करून पाहता येईल... हा चिवटपणा हिंदू समाजाला एक वरदान ठरलेले आहेबाहेरून जितका आघात होतोतितका हिंदूंचा कर्मठपणा वाढत जातो... हिंदूंची टिकून राहण्याची शक्ती एवढी प्रचंड आहे कीकत्तलीविध्वंस  अत्याचार आणि शतकानुशतकांच्या पराभवानंतरसुद्धा हा समाज टिकून राहिलेला आढळतो... सगळे सुधारकसगळे विचारवंत पचवूनआत्मसात करून पुन्हा जसेच्या तसे शिल्लक राहण्याची हिंदू समाजाची शक्ती फार अफाट आहे... एवढा चिवट असलेला हिंदू समाज कमालीचा असहिष्णू आणि तितकाच कमालीचा निर्दय  क्रूर असूनही उदारमतवादी  सहिष्णू म्हणून ओळखला जातो!” (जागर पृ१७१-१७६

भारतीय इतिहासातील नरहर कुरुंदकरांचे मनुस्मृतीवरचे पुस्तक हे ह्या सर्व गोष्टींच्यामुळे महत्वाचे ठरते एकदा ही पार्श्वभूमी कळली कि कुरुंदकर काय म्हणतात ते कळणे सोपे जाते 

पुराव्याचे  चार प्रकार असतात

समकालीन पुरावा 
उत्तरकालीन पुरावा 
भविष्य निर्देषक पूर्वकालीन विधानांचा पुरावा 
मरणोत्तर पुरावा 

मनुस्मृतीवर लिहिताना अशा प्रकारचा पुरावा नसल्याने सगळा खेळ चिन्हात्मक झाल्याचे दिसते कुरुंदकरांचे पुस्तकही ह्याला अपवाद नाही 

मनुस्मृती ही काय आहे कुरुंदकर म्हणतात

“समाज जीवनातील गुंतागुंत, हितसंबंध समजून घेण्यासाठी धर्मश्रध्द आणि धर्म `वापरणारे' यांच्यातील फरक समजून घेणे अनिवार्य आहे. गीता हा धर्मश्रद्धांचा ग्रंथ आहे, तर मनुस्मृती हा धर्म `वापरणाऱ्यांचा' ग्रंथ आहे”

कुरुंदकरांच्या संपूर्ण मांडणीत हे प्रमेय वावरतांना दिसते ब्राम्हण धर्म वापरतायत आणि धर्माच्या आधारे आपले हितसंबंध राखण्यासाठी त्यांनी स्मृती निर्माण केली असा हा व्यूह आहे त्यामुळे  कुरुंदकर प्रथमच सखोलपणे इहवादी मार्क्सवादी भूमिकेतून मनुस्मृतीची चिकित्सा करतात

कुरुंदकरांच्या मते मनुस्मृती इसवीसन २०० च्या आसपास लिहिला गेला कुरुंदकरांचे हे मत सर्वमान्य आहे कुरुंदकरांच्या मते मनू हा उच्चवर्णीयांचे हितसंबंध जपणारा गुलामगिरीचा समर्थक पुरस्कर्ता ब्राम्हणांचा पक्षपाती समर्थक असा परंपरावाद्यांचा नेता होता आणि त्याचा ग्रंथही तसाच आहे त्यामुळेच कुरुंदकर मनुस्मृती जाळण्याचे समर्थन करतात कारण त्यांच्या मते मनुची परंपरा हयात असते आणि त्यामुळेच आता ती ह्या हयात असणाऱ्या लोकांच्यापुढेच जाळली पाहिजे एका अर्थाने हा वर्तमानात हयात असलेल्या परंपरेचा मनुस्मृती जाळणे हा निषेध असतो एका अर्थाने इथंपर्यंत ते आंबेडकरांशी सहमत आहेत पण पुढे ते बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला शूद्र पूर्वी कोण होता ह्या ग्रंथातील  शूद्र हे क्षत्रिय होते हा सिद्धांत नाकारतात मनुस्मृतीच्या आधारे ते शूद्रांचे नऊ गट सांगतात त्यांच्या मते फुले ह्यांनी मांडलेली ब्राम्हण ब्राम्हणेतर अशी ही अहंता नाही तर ब्राम्हण क्षत्रिय वैश्य हे आर्य शूद्र हे अनार्य अशी ही अहंता आहे माझ्या मते ही अहंता ब्राम्हण क्षत्रिय वैश्य हे आर्य हे वैदिक धर्मीय सत्य आहे पण अनार्यांशी घुसळण सुरु झाल्यावर सर्व आर्य वैश्य हे क्षत्रिय म्हणून सामावून घेण्यात आलेत त्यांना क्षेत्रपती बनवून अनार्य वाणी पणी लोकांना वैश्यांचा दर्जा देण्यात आला त्यांचा समावेश पाप योनीत करण्यात आला आणि गीता त्याचा पुरावा आहे कुरुंदकर फक्त वर्णाच्या अंगाने विचार करत असल्याने आणि योनीच्या अंगाने विचार आजवर कोणी केल्याने हे सामाजिक सत्य बदलावं दिसलेला नाही त्यामुळेच भारतीय जमीनदारी सरंजामशाहीचा उत्क्रांती कशी झाली हे अनेकांना नीट कळत नाही दुसरी गोष्ट अनार्यांशी विवाह करणाऱ्या वैश्यांनाही नंतर वैश्यांच्यात शूद्रांच्यातच ठेवले गेले आहे अनेकदा तर ब्राम्हण क्षत्रियांनाही हीच ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच वैश्य शूद्र अतिशूद्रांच्यातही आर्यन बॉडीज आढळतात

ह्यासंदर्भातले निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांचे उदाहरण प्रसिद्ध आहे आर्य ब्राम्हण हे त्यांचा धर्म मोडणाऱ्या त्या धर्माला आव्हान देणाऱ्या ब्राम्हणांनाही वाळीत टाकून शूद्र वा अतिशूद्र बनवत जर ह्या निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांनीं लग्न केले असते तर त्यांच्या संततीला आर्यांनी शूद्र किंवा अतिशूद्र बनवले असते हे आपण लक्ष्यात घेतले पाहिजे त्यांनी शैव धर्म स्वीकारून ह्यातून स्वतःची सुटका करून घेतली नाथसंप्रदाय स्वीकारला त्यांनतर ही भावंडे वाळीत पडलेली नाहीत कारण ती आता परक्या धर्मात गेलेत हे लक्ष्यात घ्यायला हवे म्हणूनच मग ही भावंडे मोक्षाची साधनाही करू शकलेत आणि ग्रंथही लिहू शकलेत  असो 

शूद्रवर्ण हा अनार्यांना आत्मसात करण्यासाठी निर्माण करण्यात आला असा कुरुंदकरांचा निष्कर्ष आहे शूद्र हे  तीन आर्य वर्णाचे गुलाम होते असे ते म्हणतात अनेक पुरोगामी म्हणवणारे हिंदू मनुस्मृती गीता ह्यांच्यातील वर्णव्यवस्था ही कर्माधिष्ठित होती असा सिद्धांत मांडतात आर्य समाज ह्या सिद्धांताचा पुरस्कर्ता आहे कुरुंदकर सिद्ध करतात कि आर्यांची वर्णव्यवस्था ही कधीही कर्माधीष्ठीत न्हवती ती जन्माधिष्ठीतच होती आणि कर्मफळाचा खरा अर्थ हा कर्माप्रमाणे पुढील जन्म असा आहे म्हणजेच हा जो जन्म आहे तो तुम्हाला मागील जन्माच्या कर्माच्या आधारेच मिळाला आहे म्हणजेच ह्या जन्मी तुमचा वर्ण जन्माधिष्ठितच आहे आणि तो मागील जन्मी  तुम्ही केलेल्या कर्मामुळे तुम्हाला मिळालेला आहे मी कुरुन्दकरांशी ह्याबाबत पूर्ण सहमत आहे

सारे धर्मशास्त्र हे ब्राम्हणांच्या जायदादींचे हितसंबंधांचे रक्षण करणारे होते त्यांचा ब्राम्हणांच्या ज्ञानाशी वा चारित्र्य उपासनेशी काहीही संबंध नाही क्षत्रियांच्या शस्त्रबळाच्या आधारे ब्राम्हणांनी विषमतायुक्त शोषणयुक्त अशी समाजाची घडी बसवली असे कुरुंदकर म्हणतात माझ्या मते हे केवळ ब्राम्हणांच्या जायदादींचे हितसंबंधांचे रक्षण  करणारे  नाही तर हे क्षत्रियांच्या  जायदादींचे हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठीही घडवलेले आहे आणि वर्णजातिव्यवस्थेची साजिश ह्या दोन वर्णांनी मिळून रचलेली आहे म्हणून तर धर्मशास्त्र ब्राम्हणांचे सांगणारे श्रीराम श्रीकृष्ण साक्षात परमेश्वर ब्राम्हण भूदेव क्षत्रिय विष्णू वा तत्सम देवाचे अवतार अशी मांडणी पुढे येते

आपली संस्कृती अध्यात्मिक आहे हा भ्रम बाळगण्याचे काहीही कारण नाही कारण गुलामगिरी विषमता शोषण ह्यांचे निर्लज्ज समर्थन हिंदूंच्या धर्मग्रंथात आढळते असे कुरुंदकर म्हणतात त्यामुळेच मनुस्मृतीबद्दलचा पूज्यभाव ब्राम्हणांच्या मनात आढळतो असे ते म्हणतात माझ्या मते भारतीय संस्कृती कधी ब्राम्हणी असते तर कधी अध्यात्मिक ! ती केवळ ब्राम्हणीच होती असे मानणे हा सुद्धा ब्राम्हणी अहंकारच ! महाराष्ट्रापुरते बोलायचे तर सातवाहन , वाकाटक , भोसले ह्यांच्या राजवटी कधीही ब्राम्हणी न्हवत्या ह्याउलट यादवांच्या राजवटी पूर्ण ब्राम्हणी वैष्णव त्यामुळेच तर यादवांच्या राजवटीतही महानुभवी पंथाला वैष्णव असूनही आपला पंथ लपवायची वेळ आली

कुरुंदकरांच्या मते ब्राम्हणांनी शस्त्रबळासाठी क्षत्रिय संपत्तीसाठी वैश्यांना जवळ केले आर्थिक साधने ज्याच्याजवळ कमी त्या वैश्याला शूद्र समजले जाई असे कुरुंदकर म्हणतात माझ्या मते आर्थिक निकष त्याकाळी प्रधान न्हवते अन्यथा दरिद्री ब्राम्हणांची वर्णने काही कमी नाहीत वर्ण जन्माधिष्ठित होते असे खुद्द कुरुंदकर म्हणतात त्याच्या हे विरोधी जाते ह्या काळात आचारी पाणके हे व्यवसाय ब्राम्हण करीत हे कुरुंदकर नोंदवतात पण ते का हे सांगत नाहीत माझ्या मते काहीवेळा अतिशुद्ध अतिपवित्र पाणी काही धर्मविधींना लागे अशा पाण्याला शूद्रांचा स्पर्श चालत नसे म्हणून मग हे काम ब्राम्हण करीत हीच गोष्ट प्रसादाबाबत तो ब्राम्हणेतरांच्या हातातला चालत नसे म्हणून तो बनवण्यासाठी स्पेशल ब्राम्हण लागे हा ब्राम्हण कम्पल्सरी शैव असे कारण पूजा ही मुळात आर्यांची संस्कृती न्हवती देवाच्या प्रसाद बनवणाऱ्या पवित्र शुद्ध भटारखान्यात काम करणाऱ्या ह्या ब्राम्हणांना भटारखान्यातले म्हणून भट म्हंटले जाई आणि अनेकदा काही ठिकाणि ह्यांचा दर्जा शूद्र होता पेशवाई ही अशा भटांनी उभी केली

ब्राम्हण क्षत्रिय युती कुरुंदकरांना दिसते ही युती निर्माण होण्याचे कारण  कुरुंदकर आर्थिक संबंधात शोधतात माझ्या मते ते पुरेसे नाही.  प्रश्न असा आहे कि आर्थिक संबंध फक्त लौकिक असतात काय? तर नाही ते पारलौकिकही असतात

तुमचा जर परलोकावर विश्वास असेल तर परलोकातही तुम्ही तुमचा क्लास जसाच्या तसा ठेवायला वा उन्नत करायला धडपडता तुमच्या क्लासची हेजिमनी टिकवायला धडपडतात आणि ह्याची गॅरेंटी जी काल्पनिक असते ब्राम्हण घेतात त्यामुळे ब्राम्हणांनी दाखवलेल्या स्वर्गनरकावर क्षत्रियांचा असलेला विश्वास मरणोत्तर जीवनावरचा धार्मिक विश्वास हीच तर ब्राम्हणांची  ताकद असते  होती त्यामुळे ही ब्राम्हण क्षत्रिय युती नैसर्गिक भय आशेच्या आधारे आणि काल्पनिक पारलौकिक तत्वांच्या आधारे झालेली युती होती संपत्ती निर्माण करणारे वैश्य ह्या दोन्ही वर्णांना हवे होते ते फायनान्सर म्हणून पण वैश्यांनाही स्वर्ग हवेच होते कि ! आणि कदाचित शुद्रांनाही ! धर्म हे  नरकाचे भय स्वर्गाची आशा ह्यांच्या आधारे तर उभे राहतात जोवर परलोक आहे तोवर ब्राह्मणसत्ता धर्मसत्ता अटळ मग तो धर्म कोणताही असो अगदी बौद्ध धर्मातही स्वर्ग नरक आहेतच पिरॅमिड्स तर फेमस आहेतच इथे तर स्वर्गात सोबतीला आपले दास दासी सामान न्हेण्याचाही अट्टाहास आहे म्हणजेच मरणोत्तर पारलौकिक जीवनाची पारलौकिक क्लासची पारलौकिक हेजिमनीची क्षत्रियांना असलेली आसक्ती हवी असलेली गॅरेंटी हीही ह्या युतीला कारणीभूत आहे असे दिसते

मूळ प्रश्न असा आहे कि कुरुंदकर म्हणतात तसे अनार्य जीत आर्य जेते असे खरोखर काही भारतात झाले आहे काय ? आर्य विचारवंत असे झाले हे कोणत्या पुराव्याच्या आधारे म्हणतात ? कुरुंदकर हे प्रश्न विचारत नाहीत ते गृहीतच धरतात कि आर्यांनी अनार्यांच्यावर विजय मिळवला ह्यातूनच मग ह्या विजयानंतर जे झाले त्याचे समर्थन तरी करायचे किंवा निषेधन तरी असे दोनच पर्याय उरतात सर्वसाधारण आर्य आर्यांचा शूद्र निर्माण करण्याचा जो उद्योग आहे त्याचे  समर्थनच करतात हे  समर्थन कसे होते ?

 ते म्हणतात कि आर्य आक्रमक जीत होते म्हणून त्यांनी अनार्यांना आपल्या राज्याची सिटिझनशिप नाकारली सर्व जेते त्याकाळात असेच करत होते तर आर्यांनी तसेच केले त्यात चुकीचं काय?

ह्यावर माझा प्रश्न असा कि ह्याच न्यायाने मुसलमान तुमच्याशी जेते म्हणून त्यांच्या धर्माप्रमाणे वागले तर मग एव्हढा त्रागा कशाला करता ? दुसरी गोष्ट अनार्यांच्या राजवटीही ह्या देशात आल्या म्हणून त्यांनी आर्यांना  शूद्र म्हणून वागवलं असतं तर तुम्हाला चाललं असतं का ? ब्रिटिशांनी आपल्याला गुलाम बनवलं म्हणून त्यांच्याविरुद्ध बोंबा मारायच्या पण अनार्यांनी आर्यांच्याविरोधात बोंबा मारल्या कि जेते म्हणून केले हे समर्थन कसे चालेल आणि ह्याहीपुढचा प्रश्न जगात सर्व जेते जीतांना पेशवाईतल्या आर्यांच्याइतके वाईट पिढ्यानपिढ्या अस्पृश्य म्हणून वागवत होते का ? ब्राम्हणांचा पेशवाईतील वैदिक राज्यांच्यातील नालायकपणा हा जास्त क्रूर होता ही वस्तुस्थिती नाकारण्यात काय अर्थ आहे ?

दुसरी सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे जेते मुस्लिम जेते ख्रिश्चन ह्यांनी धर्मांतर घडवून जीत लोकांना मुस्लिम ख्रिश्चन बनवले आर्य लोकांनी काय केलं तर शूद्रांना वेदाधिकार नाकारला यज्ञाधिकार नाकारला संपत्तीअधिकार नाकारला जगाच्या पाठीवर कुठेही असं घडलेलं नाही वास्तविक आर्य जेते होते तर त्यांनी सर्वांना आर्य धर्मीय बनवायला हवे होते पण आर्यांच्याच म्हणण्यानुसार त्यांनी अनार्यांना शूद्र बनवलं आणि अनार्य चुपचाप शूद्र बनले ?

कुरुंदकर असे समर्थन करत नाहीत  तर कडक निषेधन करतात आणि त्यातूनच हा ग्रंथ निर्माण होतो 

पण पुढे कुरुंदकर म्हणतात

ब्राह्मणवर्ग वर्णव्यवस्थेचा अभिमानी  समर्थक राहिला हे खरेच आहेया व्यवस्थेचा त्यांनी लाभ घेतलातिचे समर्थन केलेती व्यवस्था राबविलीती बळकट करण्याचा प्रयत्न केलाटिकवण्याचा प्रयत्न केला हे सारे खरेचपण हे सारे मान्य केले तरी वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था ब्राह्मणांनी निर्माण केली असा मात्र याचा अर्थ होत नाहीसमाजव्यवस्था निर्माण करण्याचेटिकवण्याचे सामर्थ्य ब्राह्मणांच्याजवळ कधीच नव्हतेती व्यवस्था व्यवहारात ब्राह्मणांना पुष्कळ सवलती देणारी असली तरी वाटते तितकी हिताची नव्हती.” (नरहर कुरुंदकरमनुस्मृतीपृ१६५-१७०)

इथे कुरुन्दकरांच्यातला निद्रिस्त वैष्णव झोपलेला हिंदूवादी गांधी अचानक जागा झालेला दिसतो 

ह्याचा अर्थ ब्राम्हणांनी ही व्यवस्था टिकवली तिचे संवर्धन केले पण ती निर्माण मात्र केली नाही प्रश्न असा निर्माण होतो कि ही व्यवस्था ब्राम्हणांनी निर्माण केली नाही तर कुणी केली


श्रीधर तिळवे नाईक 

========================================================================

नरहर कुरुंदकर : डेमोक्रेटिक पोस्ट सोशॅलिझम चा एक मुख्य अर्ध्वयू श्रीधर तिळवे नाईक

मागील लेखात आपण कुरुंदकरांच्या मनुस्मृती एक विचार ह्या ग्रंथाचा विचार केला आता त्या ग्रंथाला जोडून येणाऱ्या इतर ग्रंथातील मतांचाही मनुस्मृती संदर्भात विचार करू 

कुरुंदकरांच्या मते ब्राम्हणांनी ही व्यवस्था टिकवली तिचे संवर्धन केले पण ती निर्माण मात्र केली नाही ब्राम्हणांच्याजवळ समाजोपयोगी ज्ञान न्हवतेच जेव्हा लाखो क्षत्रियांचे वैश्यांचे थवे बौद्ध जैन धर्मात गेले तेव्हा ब्राम्हण काहीच करू शकले नाहीत समाजाची शक्ती ज्यांच्या हातात वा हाताजवळ शस्त्र  असते त्यांच्याजवळ असते 

मला हे मान्य नाही कारण जात धर्म वर्ण हा विचार आहे आणि हा विचार जेव्हा जैन बौद्धांनी पराजित केला तेव्हा धर्मांतर झाले तेव्हा हा विजय शस्त्राचा नाही. हे खरं आहे कि  शस्त्र धर्मप्रसार करण्यात सिंहाचा वाटा उचलतं पण त्यासाठीही ज्याच्या  हातात शस्त्र आह त्याचा विचार बदलावा लागतो आर्यांच्यातले सगळे आर्य वैश्य हे जैन झाले सगळे क्षत्रिय तर आधीच नष्ट झाले होते तरीही उरलेल्या मूठभर ब्राम्हणांनी प्रतिक्रांती घडवलीच कि ! अनेक बौद्ध  क्षत्रिय परतलेच कि   !तेव्हा प्रश्न प्रथम डोकं बदलण्याचा आहे हात नंतर आपोआपच बदलतो 

अर्थात प्रश्न तरीही उरतोच वर्णजातिव्यवस्था कुणी निर्माण केली ह्याचे पारंपारिक उत्तर ऋग्वेदाचे दहावे मंडल पुरुषसुक्त आहे पण अलीकडे ते प्रक्षिप्त असल्याचे सिद्ध झाल्याने हा प्रश्न सुटत नाहीये 

कुरुंदकर म्हणतात धर्माने वर्ज्य केलेल्या गोष्टी समाजात सर्रास घडतायत ह्याचा अर्थ धर्म समाजाला सुधारण्यात कमी पडलेत असे कुरुंदकर म्हणतात हाच तर्क लावायचा म्हंटल तर जगातल्या सगळ्या कायदे  व्यवस्था
फेल गेलेत असं म्हंटल पाहिजे  कारण त्यांनाही ज्या वगॊष्टी प्रतिबंधित करायला सांगितलेत त्या जमलेल्या नाहीत कुरुंदकरांचं एक धक्कादायक मत म्हणजे अध्यात्मिक गोष्टीशी ईश्वर असण्याशी नसण्याशी मोक्ष असण्याशी नसण्याशी काही संबंध नाही असे ते म्हणतात त्यांच्या दृष्टीने अध्यात्मिकता एक मानसिक प्रवृत्ती आहे पण मग तिचं करायचं काय ? तर घरातल्या घरात मनातल्या मनात जे करायचं ते करा 

एकीकडे ते हिन्दू धर्माला हिंसक म्हणतात दुसरीकडे ज्ञानेश्वरांचे उदाहरण देऊन अहिंसक माझ्या मते कुठलाही धर्म नैतिक पातळीवर काय आहे ते तपासायचे असेल तर त्याने दिलेली कायदेव्यवस्था तपासावी शैवांनी कायदेव्यवस्था दिलेली नाही कारण शैव हा धर्मच नाही पण शैव दंडनीती मानतात आणि प्रत्येक काळानुसार तिच्यात बदल घडवले पाहिजेत अशी त्यांची दृष्टी आहे वैदिकांनी दंडनीतीतील नीती सोडली आणि दण्ड पकडून स्वतःची धर्मशास्त्रे तयार केली शैवांनी धार्मिक कायदेव्यवस्था जी सनातन कर्मठ वैग्रे असते दिली नाही पण ज्यू ख्रिस्चन इस्लाम वैदिक ब्राम्हण वैष्णव हिंदू ह्या सर्व धर्मांनी कायदेव्यवस्था दिलेली आहे ह्यातील वैदिक ब्राम्हण वैष्णव हिंदू ह्यांना एकच कायदेव्यवस्था आहे ती म्हणजे स्मृती  धर्मशास्त्रे ज्यू ख्रिस्चन धर्मांची एकच कायदेव्यवस्था आहे जी ज्युईश आहे इस्लामचे शरियत फेमस आहे शैव सांख्य जैन बौद्ध ह्यांनी कायदेव्यवस्था दिलेली नाही कारण ह्यांचा भर मोक्षावर आहे हे धर्म सामाजिक पातळीवर भारतात पराभूत होण्याचं हे एक मोठं कारण असावं चायनाने कन्फ्यूशियस कायदे व जपानने शिन्तो व इतर ह्यांच्या सहाय्याने आपली व्यवस्था चालवली जी पूर्व आशियाने कमीजास्त फरकाने राबवली 
दक्षिण आशिया तिबेट वैग्रे देश ह्यांच्यात  आर्यांची धर्मशास्त्रे घुसली आणि त्याबरोबर वर्णजातिव्यवस्थाही 

मनुस्मृती ही ह्या कायद्याची एक भाग आहे म्हणूनच तिच्यावर एव्हड्या चर्चा होतात धर्माच्या अनेक व्याख्या करता येतात कुरुंदकर त्यांचा धांडोळा घेतात पण शेवटी समाज राजकीय पातळीवर कायद्याप्रमाणे चालत असतो म्हणून मनुस्मृतीकडे वळतात वैदिक राज्यात सर्वच धर्मशास्त्राचा साधकबाधक विचार करून निकाल दिला जाई 

कुरुंदकर हिंदू धर्माने विषमता निर्माण केलेली नाही तर विषमतेने हिंदू धर्म निर्माण केला म्हणतात ज्याच्याशी मी अंशतः सहमत आहे पण  प्रश्न असा कि विषमता कुणी निर्माण केली तर त्याचे स्पष्ट उत्तर आर्य ब्राम्हण आर्य क्षत्रिय आहे ह्यांच्या युतीने निर्माण झालेल्या ब्राम्हणधर्माने  सांख्य जैन बौद्ध ह्यांनी त्याला आव्हान दिल्यावर  ते 
 आव्हान मोडीत काढणाऱ्या वैष्णव धर्माने  ! मग हिंदू धर्म ब्राम्हण शूद्र असा द्विवर्णीय का बनला कारण  मुस्लिम राज्वटी  आल्यावर क्षत्रियांची गरज संपली असे ब्राम्हणांना वाटल्याने ! ह्याचाच अर्थ मुख्य डोकं ब्राम्हणांचं आहे गंमतीचा भाग असा कि मुस्लिम राजवटीत खरे हिंदू क्षत्रिय नाहीसे झाल्यावर काल्पनिक राम कृष्ण ह्या हिंदू क्षत्रियांची पूजा बोकाळलेली आहे ह्याच काळात शैव शेतकऱ्यांना बळी राजा आठवलेला आहे त्यापूर्वी आठवल्याचे पुरावे नाहीत 

कोणताच धर्म शुद्ध विज्ञान नसतो श्रद्धा आणि भावना ह्यांच्याशिवाय तो उभा राहू शकत नाही असे कुरुंदकर म्हणतात गुलामानेच गुलामी जतन करण्यासाठी प्रवृत्त व्हावे अशी धर्म ही नशा आहे ह्या कुरुंदकरांच्या मताशी मी सहमत आहे शैवांच्याबाबत ही गोष्ट तीव्रतेने जाणवते 
संतांनी नैतिक आचरणाचे आदर्श निर्माण केले हे त्यांना मान्य आहे वैज्ञानिकांबरोबर धर्मनिरपेक्ष मूल्यांची समाजात प्रतिष्ठापना त्यांना महत्वाची वाटते त्यांचा प्रतिष्ठापनेसाठी धर्मची मदत होऊ शकते असे त्यांना वाटते 
माझ्या मते ह्यात प्रॉब्लेम असा आहे कि धर्म केवळ त्याची नीतिमूल्ये घेउन येत नाही अनेक धर्म त्यांचे कायदे व त्यांची कायदेव्यवस्था घेऊन येतात 
संतांच्या काळात मुस्लिम बादशहा किंवा आर्य हिंदू राजे कोणते कायदे लागू करत होते तर स्मृतिजन्य व शरियत कायदे होते आणि संतांनाही ते लागू होते कुरुंदकरांना ह्याचा विसर पडलेला दिसतो औरंगजेब शरीयतनुसार त्याचे राज्य चालवत होता आणि अनेकदा हिंदूंना त्यांचे कायदे लागू करत न्हवता ह्याचा अर्थ हिंदूंची धर्मशास्त्रे व कायदे फार सज्जन होती अशातला भाग नाही सामाजिक आर्थिक बाबत ती शरियतपेक्षा भयानक होती म्हणून तर एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झाले इस्लामचा कायदा धार्मिक समता व आंशिक सामाजिक समता तरी देत होता स्त्रीला किमान काही अधीकार होते शिकण्याचे व व्यवसाय करण्याचे हिंदूंचे कायदे असे अधिकार देतच न्हवते तर अशा माहोलमध्ये संतांची अध्यत्मिकता व नैतिकता काय करत होती कुठल्या संताने धर्मशास्त्र नाकारलं आणि किती नाकारलं ? हिंदूंचा खोटा अहंकार आहे झालं जेव्हा शैव राजवटी आल्या तेव्हा कायदे बदलले कारण शैवांना स्मृती लागू न्हवत्या ब्राम्हण म्हणून मुलाहिजा राखली जाणार नाही हे शिवाजी महाराजचं वाक्य त्यातून येतं कुरुंदकरांना हे दिसत नाही 


धारण करतो तो धर्म ही महाभारतातील व्याख्या आर्य मानत असतील तर कुटुंब नियोजन सारख्या गोष्टी समाजाला धारण करणार्याच असतात त्याला मग तुमही मान्यता द्या पण तुम्ही मान्यता देत नाही कारण ह्या व्याख्या तुम्ही मानत नाही कुरुंदकरांच्या मते धर्म ही एक सामाजिक घटना आहे आणि तिने गुलामगिरी निर्माण करून शोषणच केले आहे 

प्राचीन मध्ययुगीन काळात सर्वच धर्माचे अधिष्ठान विषमता होते असे कुरुंदकर म्हणतात ह्यातील प्राचीनबद्दल सर्व धर्माबद्दल मला शंका आहे आणि मध्ययुगीन बद्दल लिंगायत शैव शीख शैवांबद्दल कारण हे समतेचे कट्टर पुरस्कर्ते होते ब्राम्हण , वैष्णव , हिंदू , जैन ,मुस्लिम ख्रिश्चन ह्या धर्मात मात्र विषमता बोकाळली होती हे सत्य आहे सर्वात वाईट म्हणजे बौद्ध राजवटी जिथे होत्या तिथंही विषमता होतीच कुरुंदकरांच्या मते खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनाही हे मान्य आहे त्यांचे म्हणणे विषमता सर्वच धर्मात होती पण ह्या विषमतेला जे पावित्र्य हिंदू धर्मात लाभले ते इतर धर्मात लाभले नाही . बाबासाहेबांची सगळी चीड त्यासाठी होती (आकलन पृष्ठ ७३)

ह्यात शैवांचा प्रश्न येत नाही कारण मध्ययुगात शैव गुलाम बनवले गेल्याने स्वतःच ह्या काळात हवालदिल  बनलेले होते आणि म्हणूनच शैवांच्याकडूनच ह्या काळात बसवेश्वर , गुरु नानक , शिवाजी महाराज , होळकर रणजितसिंग अशी बंडे झाली त्यांनी समांतर व्यवस्था निर्माण केली ह्याशिवाय रुमी ,कबीर अकबर अशी तीन बंडे मुस्लिम समाजाकडून झाली ह्यातील अकबराच्या बंडाची पार्श्वभूमी हुमायूनने सुन्नी पंथ त्यागून शिया पंथ स्वीकारून केली होती हे अनेकांना माहीत नाही ह्या शियांशी शैवांचे ते जन्मल्यापापासून नाते आहे कारण भारतातील पंजाब सिंधमधील शैव ब्राम्हण हे हुसेनच्या  बाजूने युद्धात उतरले होते आणि आजही त्यांना हुसेनी ब्राम्हण म्हंटले जाते अभिनेता सुनील दत्त हा ह्या हुसेनी ब्राम्हणांच्यातील एक आहे आणि म्हणूनच जेव्हा त्याने नर्गिसशी लग्न करायचे ठरवले तेव्हा हुसेनी ब्राम्हणांपैकी एकानेही विरोध केलेला नाही उलट विरोध मुस्लिमांनी केला आणि हाजी मस्तान नामक  एका डॉनलाही पाठवले जेव्हा दत्त मला मारलं तरी चालेल पण मी हे लग्न करणारच  म्हणाले तेव्हा मग हे लग्न झाले

उशिरा येण्याचे काही फायदे असतात आधीचा विस्कळीतपणा टाळता येतो आणि ह्याचा फायदा जैन बौद्ध ह्या उशिरा आलेल्या धर्मांना मिळाला असे त्यांना वाटते वैदिक विकळीतपणा टाळता आलेला आहे असे त्यांना वाटते पण उशिरा आल्यावर अधिक नालायकपणाही सुचू शकतो मनुस्मृती ह्याचे उदाहरण आहे 

माणसाचा मूल्यविवेक उन्नत करते ती श्रद्धा मूल्यविवेक अवनत करते ती अंधश्रद्धा असे कुरुंदकर म्हणतात मला हे मान्य नाही कारण मूल्यविवेक फार सापेक्ष असतो उदा मुस्लिमांचा हा विश्वासच आहे कि गैर मुस्लिमांचे धर्मांतर करवून आपण त्याच्यासाठी जन्नतीचा रस्ता मोकळा करतोय 

माझं स्वतःच स्पष्ट मत आहे कि जगातले सर्व  धर्म नाहीसे झालेले बरे ह्यात शैव धर्मही येतो पण सध्या हे शक्य नसल्याने त्यातला त्यात बरा चॉईस म्हणून मी शैव दर्शन निवडतो 

श्रीधर तिळवे नाईक
मनुस्मृती आणि स्त्रिया :नरहर कुरुंदकर : डेमोक्रेटिक पोस्ट सोशॅलिझम चा एक मुख्य अर्ध्वयू ४ श्रीधर तिळवे नाईक

मनुची स्वतःची धर्माची व्याख्या
वेदः स्मृतिः सदाचारः स्वस्य  प्रियमात्मनः  एतच्चतुर्विधं प्राहुः साक्षाद् धर्मस्य लक्षणम् ॥ अध्याय २ श्लोक १२ 
अशी आहे 
अर्थ :
    "वेद , स्मृतीसज्जनांचे सदाचार   स्वतःच्या आत्म्याला प्रिय ह्या  चतुर्विध लक्षणांनी युक्त तो धर्म   " (अध्याय श्लोक १२अशी आहे मनुस्मृतीचे विरोधक सदाचाराऐवजी आचार हा शब्द भाषांतरात वापरतात तर आत्म्याला प्रिय ऐवजी संतोष समाधान असे शब्द वापरतात ते योग्य न्हवे प्रश्न असा येतो कि माझ्या आत्म्याला प्रिय मला जे सज्जन वाटतात ते ह्या दोन्ही गोष्टी सापेक्ष आहेत  ह्याचाच अर्थ धर्मातील वेद स्मृती ही दोन लक्षणे  निरपेक्ष तर सज्जनांचे सदाचार   स्वतःच्या आत्म्याला प्रिय हे दोन लक्षणे  सापेक्ष आहेत आणि मनूला ती  मान्य आहेत ह्या सापेक्ष लक्षणांच्या  आधारे मी मला हवे ते वर्तन करू शकतो आणि ते धर्माप्रमाणे आहे मनुस्मृतीचे समर्थक ही गोष्ट स्वीकारतात काय तर नाही ते वेद स्मृती ही  निरपेक्ष लक्षणेच  स्वीकारतात पण ह्या दोन निरपेक्ष लक्षणातील  एक लक्षण  स्मृतीच म्हणजे मनुस्मृतीच मला सांगते कि सज्जनांचे सदाचार   स्वतःच्या आत्म्याला प्रिय ही  धर्मलक्षणे   आहेत आणि तुम्ही ती  नाकारता म्हणजे तुम्ही स्मृती नाकारता म्हणजे प्रत्यक्ष धर्माची  तीन लक्षणे  नाकारता म्हणजे धर्माचे  एकच लक्षण  शाबूत राहते  ते  म्हणजे वेद आणि वेद यज्ञ वगळता इतर जगातील वर्तनाचा एकही नियम मला पक्का नियम म्हणून  सांगत नाहीत म्हणजेच धर्म मला प्रत्यक्षात एकही नियम सांगत नाही हा मनूच्या व्याख्येतील विरोधाभास आतापर्यंत कुणाच्या का लक्ष्यात येऊ नये हा मला नेहमीच प्रश्न पडतो 
मूळ धर्मलक्षणे  मला अनुमती देत असतील  तर मग धर्मशास्त्र पाळण्याची कसलीही जबाबदारी माझ्यावर उरत नाही 

मनुस्मृतीत असे अनेक विरोधाभास दिसतात हे विरोधाभास मनूच्या स्त्रियांविषयीच्या मतातही आहेत 

कुठल्याही संस्कृतीत मार्गी संस्कृती असते तशी देशी पोटी संस्कृतीही असते कुरुंदकरांच्या मते आदिवासी कधीच आर्य हिंदू संस्कृतीचे भाग न्हवते त्यामुळेच जमातीचा प्रश्न उद्भवत नाही आर्यांच्यात मुख्य पोटी संस्कृती ही स्त्रियांची होती 

 साहजीकच कुरुंदकर ह्यानंतर मनुस्मृतीनुसार शुद्रच असलेल्या स्त्रीचा विचार करतात कुरुंदकर मनुची स्त्रियांविषयीची मते ही आधार देऊन स्पष्ट करतात आणि मनू स्त्रियांच्या गुलामीचे समर्थन करतो असे म्हणतात भारतीय वाङ्मयात स्त्रीनिंदेला उधाण आलं आहे आणि त्याला आधार मनुस्मृती आहे

पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।
रक्षन्ति स्थविरे पुत्राः स्त्री स्वातंत्र्यं अर्हति॥ (.
अर्थविवाहापूर्वी स्त्रियांचे रक्षण पित्यानेविवाहानंतर स्त्रियांचे रक्षण पतीने करावे आणि शेवटी पुत्राने स्त्रियांचे रक्षण करावे,  स्त्री स्वातंत्र्ययोग्य नाही.(म्हणून तिला स्वातंत्र्य देऊ नये )

ह्यासारखी विधाने कुरुंदकर पुरावा म्हणून सादर करतात ह्याहीबाबत मी कुरुन्दकरांशी सहमत आहे

ज्या कन्येचे वाग्दान झाल्यावर पती मरतो तिच्याशी तिच्या पतीच्या सख्ख्या भावाने विवाह करावा.  पहिल्या ऋतूप्राप्तीपासून आठ वर्षांपर्यंत जिला अपत्य होत नाही, तिच्या पतीने आठव्या वर्षी दुसरा विवाह करावा, जिची अपत्ये होऊन मरत असतील तिच्या पतीने दहाव्या वर्षी, जिला कन्याच होत असतील तिच्या पतीने अकराव्या वर्षी दुसरा विवाह करावा, जी अप्रिय भाषण करणारी असेल आणि निपुत्रिक असेल तिच्या पतीने तात्काळ दुसरा विवाह करावा, पुरुषाने दुसरा विवाह केला असता जी स्त्री रागावून निघून जाते तिला पतीने तात्काळ माहेरच्या लोकांपाशी पोहोचवावे

ह्यासारखी अनेक विधाने श्लोकरूपात मनुस्मृतीत आहेत 

ऋग्वेदात स्त्रीला मेना (मूळ शब्द प्राकृत मैनाम्हणजे माननीय म्हंटले असले तरी हा मान मनूने ठेवलाय असे वाटत नाही 

वैदिक काळात स्त्री स्वतंत्र असावी ह्याचे कित्येक पुरावे आहेत आर्यांच्यात स्त्रीपुरुष संबंधात कसलाच विधिनिषेध न्हवता आपल्याच मुलीशी लग्न करणारे बाप होते उदा  वसिष्ठ - शतरूपा (हरिवंशा )
अगस्त्य -लोपामुद्रा (महाभारत वनपर्व ९६ -९८) अनेक राज्यात आर्य स्त्रिया सेक्सबाबत फ्री होत्या उदा महिष्मती -स्वछंद स्त्रिया (महाभारत सभापर्व ३१)आरट्ट बाहिक -आपपरभाव करणाऱ्या स्त्रिया (महाभारत कर्ण पर्व ४० ४४ ) असे प्राचीन उल्लेख प्रसिद्ध आहेत पितृसत्ताक राजवटी असूनही हे घडत होते किंवा कदाचित पितृसत्ताक राजवटी होत्या म्हणूनच हे घडत होते कारण मातृसत्ताकात स्त्रियांना स्वतःची नीट व्यवस्था लावून घेणे गरजेचे बनते शैव मातृसत्ताक असल्यानेच शैवांच्यात विवाह संस्था होती आणि खुद्द शंकरालाच पार्वतीशी विवाह करावा लागला होता असा विवाह ब्रम्हाने सरस्वतीशी किंवा विष्णूने लक्ष्मीशी केल्याचा  दिसत नाही महाभारतात आदिपर्वात (८३ २१४ ) प्राचीन काळी स्त्रीने भोग मागितल्यास तो द्यावा असा नियमच होता असे म्हंटले आहे कदाचित ह्या स्वैराचाराला कंटाळून मनूने असे कडक कायदे केले असे समर्थन करता येईल पण मग हे कायदे विवाहसंस्थेबाबत लागू करायला हवेत म्हणजे व्यभिचार करू नये वैग्रे त्यात वर्णव्यवस्था आणण्याचे कारण काय? वस्तुस्थिती अशी आहे कि आर्य  अनार्य संकर व्हायला सुरवात झाली होती आणि तो टाळण्याचा ब्राम्हणवादाचा सर्वोत्कृष्ट प्रयत्न म्हणजे स्मृतिवाङ्मय होय मनू त्यामुळेच बाल कुमारविवाहाचे समर्थन करतो मनू म्हणतो 

उत्कृष्टायाभिरूपाय वराय सदृशाय
अप्राप्तामपि तां तस्मै कन्यां दद्याद् यथाविधि ८८

अर्थ :मुलीचा विवाह योग्य त्या रूपात विधीने करावा मग तिला मासिक पाळी आलेली असो वा नसो 

 
कुमारीविवाहात  बालविवाहात दोन पद्धतीची सिक्युरिटी होती मुलगी कुणाबरोबर पळून जाणार नाही कारण लग्न आधीच झालंय मुलगीचे लग्न लहानपणी केले कि तिचा विवाह स्वतःच्या वर्णजातीतीतच करता येतो त्यामुळेच कुमारीविवाह  बालविवाह हा वर्णजातिव्यवस्था टिकवण्याची पद्धतशीर यंत्रणा बनते 

थोडक्यात काय मनुस्मृती एका अर्थाने शूद्र म्हणूनच ट्रीटमेंट देते आणि कुरुंदकर हे सर्व पद्धतशीर आपल्यापुढे आणतात

आणि आता जाता जाता सर्वात शेवटी एका प्रश्नाचे उत्तर 

मी टिळक कुरुन्दकरांच्याबद्दल का लिहितोय ?

आपण सगळे होमो युनियन्स आहोत होमो सेपियन्स म्हणत नाही कारण ती एकमेव न्हवती त्यामुळे ज्यांना आपण विरोधक शत्रू म्हणतो ते काही आपल्या फॅमिलीबाहेरचे  नसतात  ते आपले बहीण भाऊ आई वडील असतात मी विरोधकांच्यावरही त्यामुळे आस्थेने प्रेमाने लिहितो लोकमान्य टिळक असोत कि नरहर कुरुंदकर असोत मी विरोधकांच्यावर माझे मत लादत नाही ते खरोखर काय म्हणतात त्याचा विचार करतो 

त्यांच्या विरोधी प्रकाशात आपण आपणाला जास्त चांगले कळतो 
श्रीधर तिळवे नाईक 

=============================================================================================================== 

पण जेव्हा कपिल महावीर गौतम ह्या क्षत्रियांनी धर्म जीवन आपल्या ताब्यात घेतले तेव्हा ब्राम्हणांची गरज संपली ह्यातून ब्राम्हण क्षत्रिय युती तुटली व वैश्य क्षत्रिय युती जन्माला आली


मग हे धर्म बळकावण्याची कॉन्स्पिरसी सुरु झाली ह्या तिन्हींतील सांख्य हा धर्म ब्राम्हणांना सर्वात सोयीचा होता त्यामुळेच पुरुष प्रकृती ह्यांचा स्वीकार करून वैष्णव व ब्रम्ह माया स्वीकारून हिंदू धर्म निर्माण करण्यात आला






श्रीधर तिळवे नाईक


१२३४५६ श्रीधर तिळवे नाईक

कुरुंदकर नास्तिक होते पण विचार आणि व्यवहार ह्यांच्यातील अंतर त्यांना अगरकरांच्याप्रमाणे माहीत होतं


===================================================

नरहर कुरुंदकर : डेमोक्रेटिक पोस्ट सोशॅलिझम चा एक मुख्य अर्ध्वयू ५ श्रीधर तिळवे नाईक

प्रश्न असा आहे एव्हढी अन्याकारक धर्मशास्त्रे इतकी प्रसार कशी पावली ह्यासाठी आपणाला ब्राम्हणांची एक स्टाईल पहावी लागेल

ब्राम्हणांचा एका प्रामाणिकपणा सांगायला हवा ब्राम्हणांनी कधीही वैदिकेतर राजवटींच्यावर आपले धर्मशास्त्र लादण्याच्या प्रयत्न केलेला नाही ह्याबाबत त्यांची स्टाईल ठरलेली आहे ते नेहमीच राज्यकर्त्याला घिश्यात घेतात त्याला पटवतात कि आमचा धर्म कसा श्रेष्ठ व तो कसा राजाला देवाचा  अवतार मानतो राजालाही देवाचा अवतार बनण्याची दांडगी हौस असल्याने तो वैदिक ब्राम्हणधर्म स्वीकारतो आणि राज्याभिषेक करून घेतो आणि आपल्या जनतेवर ब्राम्हणांचे धर्मशास्त्र लादतो राजाचं ब्राम्हणधर्मी झाल्यावर राजापुढे शरण जाणे किंवा मुकाट शूद्र अतिशूद्र होणे एव्हढाच पर्याय उरतो शैव कट्टर धर्मी असल्याने ते शूद्र अतिशूद्र झाले पण त्यांनी धर्म बदलला नाही बाबासाहेबांच्या मते हेच बौद्ध क्षत्रियांनी केलं व ते अस्पृश्य झाले पण आपणाला हीच स्टाईल बौद्धांची
आणि जैनांची दिसेल तेही राजाचे धर्मपरिवर्तन करतात अशोक ह्या शैव राजाचे त्यांनी घडवलेलं धर्मांतर हे त्यांचे सर्वात मोठे धर्मांतर पुढे हिचं स्टायील ख्रिश्चन व मुस्लिमांना स्वीकारली राजा बदला राज्य बदलतं आणि राज्य बदललं कि प्रजाही आपोआपच धर्म बदलते  हा सर्वच आर्य धर्माचा मोटो आहे अगदी युरोपियन आर्यांचाही आणि अरबी तुर्की इराणी इराकींचाही प्रश्न असा आहे कि शैवांनी ही मेथडॉलॉजी का स्वीकारली नाही

त्यांनी कायमच राजाऐवजी जनतेत प्रचार का केला ह्याचे कारण शैवांच्या धर्मात आहे शैवांच्यात सर्वच समान असल्याने राजाला विशेष दर्जा देणे शैवांना कधीही जमलेलं नाही

सुरवातीच्या काळात शैवांना प्रतिस्पर्धी न्हवता त्यामुळे संपूर्ण आशियाभर शैव पसरले अगदी व्हिएतनाममध्येही शैवांचे १०० वर्षे राज्य होते पण नंतर आलेल्या धर्मांनी  शैवांच्या शैव राजवटी शैव राजांना धर्मांतरित करून बदलल्या वैष्णवांनी जगभर त्यांचे धर्मशास्त्र लागू केले स्मृती लागू केल्या

काही शैव राजे मात्र शहाणे होते त्यांनी वैदिक राज्याभिषेक करून आर्य प्रजेला खुश केले पण नंतर पुन्हा शैव पद्धतीने राज्याभिषेक करून शैवांच्यात परतावा केला  शिवाजी महाराज हर्षवर्धन असे राजे असे शहाणे होते

ह्याशिवाय अंगावर प्रकरण शेकलं कि कसं निभावयाचं ह्याचं एक तर्कशास्त्र ब्राम्हणांच्याकडं असतं ते लगेच धर्माच्या व ब्राम्हणांच्या वेगळ्या व्याख्या सादर करतात उदाहरणार्थ

महाभारतात शांतिपर्वात (१८१ :१०) सगळं जग ब्राम्हण होतं किंवा एकनाथांचं जो वारकरी तो ब्राम्हण किंवा टिळकांची जो स्वराज्यप्राप्तीसाठी लढतो तो ब्राम्हण अशा व्याख्या आहेत पण ब्राम्हणांनी काही ह्या व्याख्या स्वीकारलेत व त्या अंगाने रोटीबेटी व्यवहार सुरु केलेत असं दिसत नाही ब्राम्हण सुधारल्यासारखे दिसतात पण कालांतराने ते मूळच्या कर्मठ झोनमध्ये परततात शिवाजी ते पहिला बाजीराव ब्राम्हण सुधारलेले नंतर पुन्हा मनुस्मृतिवादी  १९२० ते १९८० ब्राम्हण सुधारलेले आणि १९९० नंतर पुन्हा हिंदू धर्माच्या नावाने भाजप ह्याला कंटाळून आ ह साळूनखे ह्यांनी त्यांच्या शिव धर्मात ब्राम्हणांना  प्रवेशच नाकारला

ह्याशिवाय आम्ही कर्माप्रमाणे ब्राम्हण मानतो वैग्रे तर्क येतात मी त्यांचा आदर करतो माझं म्हणणं इतकंच कर्माप्रमाणे ब्राम्हण मानता ना मग द्याकी शंकराचार्यांची पोस्ट एखाद्या ब्राम्हणेतराला पण तिथे त्यांना जन्माधिष्ठीतच ब्राम्हणीच  करायचं असतं वास्तविक पहिला आद्य शंकराचार्य हा मूळचा शैव ब्राम्हण होता तरीही आजतागायत शंकराचार्यांची पोस्ट एकाही शैवाचार्याला किंवा शिवाचार्याला किंवा आगमाचार्याला  देण्यात आलेली नाही नुसतं म्हणायचं कि शंकर आमचा शिव आमचा आगम आमचे व्यवहारात काही नाही शैव पण एव्हढे मूर्ख त्यांना हे पॉलिटिक्स कळत नाही

शैवांच्यात काहींच्या मते ह्यात माझा बाप येतो आद्य शंकराचार्यांनी काही शिव स्तोत्रे लिहिली आणि विवेक चुडा मणी हा एकच ग्रंथ लिहिला बाकी सगळे वांग्मय जे शंकराचार्यांनी लिहिले म्हणून सांगितले जाते ते त्यांनी लिहिलेलेच नाही असे सांगितले जाते हे वाङ्मय त्यांच्यानंतर आलेल्या शंकराचार्यांनी आद्य शंकराचार्यांच्या नावाने लिहिले असे काही शैवांच्याकडून म्हंटले जाते

अलीकडेच विकिपीडियात   शंकराचार्यांनी विवेकचूडामणी हा ग्रंथ लिहिलाच नाही असे सांगितले जाते आहे म्हणजेच जो मूळ  ग्रंथ आद्यशंकराचार्यांनी लिहिला असा शैवांचा दावा आहे तो लिहिलाच नाही असे सांगितले जात आहे आणि जे ग्रंथ लिहिलेच नाहीत असे शैवांना वाटते ते शंकराचार्यांनी लिहिलेत असं सांगितलं जातंय हा बदल मोदी दुसऱ्यांदा निवडून आल्यावर घडला आहे ह्या गोष्टी दिसायला छोट्या दिसतात पण त्या कधीकधी येणारे मोठे बदल सूचित करणाऱ्या असतात असो

प्रश्न असा कि आमचाच धर्म आमचाच धर्म हा इतका अट्टाहास का ? ज्यू , ब्राम्हण ,  पारशी आणि वैष्णव धर्म हे एव्हढे कट्टर का मुस्लिम अरब  एव्हढे कट्टर का ?


कारण हे धर्म मूलतः टोळ्यांचे आहेत ह्यातून एक विचित्र गोष्ट घडलेली दिसते ह्या धर्मांनी आपल्या टोळ्यांचे कायदे इतर जगावर लादण्याचा प्रयत्न केलेला दिसतो एका अर्थाने ह्यांनी जगाची विभागणीच

१ कायदे असलेले धर्म
२ कायदे नसलेले धर्म

अशी केली आहे
ज्यू , ब्राम्हण ,  पारशी आणि वैष्णव आणि आर्य वा ज्यू धर्मशास्त्र स्वीकारणारे हिंदू व ख्रिश्चन हे कायदे असलेले धर्म आहेत
तर शैव , सांख्य , जैन , बौद्ध आणि आर्य वा ज्यू धर्मशास्त्र नाकारणारे हिंदू व ख्रिश्चन हे कायदे नसलेले धर्म आहेत

हे नको तितके आपल्या धर्मशास्त्राबाबत आग्रही आहेत ह्याचा एक दुष्परिणाम असा झालाय कि एक प्रकारचा फ़ंडामेंटलिझम ह्या धर्मात वावरतो आहे त्यामुळे पुढे व्यापारवाद , भांडवलवाद विज्ञान तंत्रज्ञान विकसित झाले ते ह्यांनी साधन म्हणून आत्मसात केले लाईफस्टाईल म्हणून न्हवे

त्यामुळे ह्यांची मानसिकता टोळ्यांची राहिलेली आहे ह्यांनी कधीही सिव्हिलायझेशनची प्रोसेस आत्मसात केलेली नाही म्हणूनच जगात सर्वाधिक विस्तार व ट्रोलिंग ह्यांनी केलेले आहे शैव जैन बौद्ध
ख्रिश्चन हे धर्म सिव्हिलाइझ्ड धर्म आहेत ह्यांनी रानटीपणा मॅनेज करण्याच्या काही पद्धती शोधल्या प्रार्थना समाजापासून व्हाया गांधी वैष्णव हिंदू सिव्हिलाइझ होण्याच्या मार्गावर आहेत आणि हिंदुत्व ह्या प्रकारात अडथळा आहे कि सहाय्य्य आहे हेच स्पष्ट होत नाहीये जर हिंदुत्व सहाय्य्य झाले  तर वैष्णव हिंदू धर्म ब्राम्हणी धर्मशास्त्रे फेकून देईल आणि आहे त्याहून अधिक मॉडर्न संविधान आणले जाईल किंवा मग हे घडले नाही तर धर्मशास्त्राधिष्टीत संविधान येईल अनेकांना असे वाटते कि असे होणार नाही पण शिवाजी महाराजांची शैव राजवट बदलून वैष्णवांनी मनुस्मृती उत्तर पेशवाईत आणलेली  आहे आपल्या शेजारी पाकिस्तान व बांगला देश ह्यांनी इस्लामिक राजवट आणलेली आहे त्यामुळे उगाच आशावादी राहू नये आणि निराशावादीही राहू नये मुळात ब्राम्हणांच्या पुढच्या पिढ्यांना धर्मशास्त्राधिष्ठित राजवटी परवडणार नाहीत पण अलीकडे काळ असा आलाय कि सुशिक्षित लोकही अतिरेकी बनलेले आपण पाहिलेले आहे म्हणून डोळे  उघड ठेऊन वावरलेले बरे

माझा स्वतःचा अंदाज असा आहे कि अख्खे हिंदूत्व हेच मुळात शैव बनेल आणि हें जर घडले नाही तर पून्हा एकदा शिवाजी महाराजांच्या प्रमाणे आपणाला हर हर महादेव म्हणत लढाईसाठी उतरावे  लागेल
श्रीधर तिळवे नाईक

==================================================================

आरंभ
चौथी नवता  आणि धर्म व मोक्ष श्रीधर तिळवे नाईक

काही लोकांचा माझ्याबाबत गोंधळ उडालेला आहे म्हणून हे लिहितोय

मोक्षाने व प्रबोधनाने धर्म मुळापासून उखडण्याचा प्रयत्न केला खरा पण प्रत्यक्षात धर्म उखडला गेला नाही त्यामुळे आधुनिक विचाराची सुरवातच मुळी गॉड इज इल्लोजिकल म्हणूनच मी त्याचा स्वीकार करतो ह्या किर्केगार्दच्या वाक्याने झाली आधुनिकतेने  धर्म स्वीकारला आणि शेवटी उत्तराधुनिकतेने धर्म अक्षरशः केंद्रस्थानी आणला आणि आज जगभर धार्मिक राजवटी यायला सुरवात झाली ह्याचा प्रतिकार फक्त चौथ्या नवतेचे लोक करत होते आणि त्यांनी केला पाहिजे
चौथ्या नवतेची सात  तत्वे आहेत
१ धर्म मूळापासून उखडणे
२ हे शक्य नसेल तर पारलौकिकता पूर्णपणे नाकारून अस्तीत्वात असलेले धर्म अधिकाधिक विज्ञाननिष्ठ तंत्रज्ञानप्रवण चिन्हज्ञानप्रवण चिन्हतंत्रज्ञानप्रवण बनवणे
३ धर्म आणि धम्म ह्यांच्यातील फरक सतत सांगणे
४ मूळ दर्शने सतत मूळ रूपात मांडणे उदा शिवाचा ,बुद्धाचा वा महावीराचा मूळ उपदेश लोकांना सांगणे मी शैवाचार्य म्हणून शिवाचा मूळ उपदेश मांडत असतो एखादा ब्राम्हणधर्मी असेल तर त्याने ब्राम्हणधर्माचा मूळ उपदेश काय ते मांडावे जर एखादा नास्तिक आहे तर त्याने नास्तिकवाद मांडावा जर एखादा गोंधळलेला असेल तर त्याने आपला गोंधळ मांडावा प्रामाणिक मांडणी ही सद्या खूप गरजेची बनली आहे
५  मोक्षावर वा निर्वाणावर विश्वास नसेल तर समाज  किमान स्वावलंबन ,स्वातंत्र्य ,अबद्धता म्हणजे दास्यापासून सुटका , मुक्तता , मुक्ती निःपाश ह्यांच्या दिशेने न्हेणे
६ ह्यानंतर मोक्ष येतो जर मोक्षावर विश्वास असेल तर स्वावलंबन ,स्वातंत्र्य ,अबद्धता म्हणजे दास्यापासून सुटका , मुक्तता  मुक्ती , निःपाश ह्यांच्यासह मोक्षाच्या दिशेने न्हेणे
७ मोक्षावर व धर्मावर विश्वास नसलेल्या विचारांचा आदर  करणे नास्तिक विचार हा समाजाला अधिक पुढे घेऊन जातो त्यामुळे कुराणापेक्षा वेदांपेक्षा रिचर्ड डॉकिन्स महत्वाचा आहे

मोक्ष त्यांनाच मिळतो जे धर्म आणि देव मूळापासून उखडतात पण काही लोक मोक्षाच्या मागे जात नाही मात्र त्यांना  मोक्षाचाच शोध असतो  कारणं प्रत्येकाला शेवंटी  आपल्या दुःखाचे मूळ असोशीत म्हणजे भूक तृष्णा निकड ह्यांच्यात आहे हे कळते मोक्षाचा मूळ कणा संयम आहे आणि समाज संयमाच्या आधारेच उभा राहतो
त्यामुळे संयम शिकवणे ही गरज आहे
श्रीधर तिळवे नाईक

========================================================

कुरुन्दकर आणि धर्मनिरपेक्षता  १ श्रीधर तिळवे नाईक

कुरुंदकरांचे मनुस्मृतीविषयीचे विचार तपासल्यानंतर  आपण तपासासाठी कुरुंदकरांच्या धर्मनिरपेक्षतेकडे सहज वळू शकतो कुरुंदकरांच्या जागर वाटा तुझ्या माझ्या भजन आकलन शिवरात्र निवडक पत्रे व अन्वय ह्या पुस्तकांत धर्मनिरपेक्षतेची मीमांसा येते कुरुंदकर गांधी नेहरूंची बाजू सतत मांडताना दिसतात कारण धर्मनिरपेक्षतेविषयीची मते ह्या काँग्रेसच्या नेत्याभवती त्यांच्या काळात फिरत होती कुरुंदकरांच्या माध्यमातून मला काय वाटते तेही मी सांगणार आहे

शेषराव मोरेंसारखे लेखक विचारवंतही आपल्या धर्मनिरपेक्षतेविषयीच्या विचाराची प्रेरणा म्हणून कुरुंदकरांचे नाव घेत असल्याने हे विचार अधिकच वादळी बनलेले असतात खरेतर धर्मनिरपेक्षतेचा पहिला पराभव भारत स्वतंत्र झाला तेव्हाच फाळणीच्या रूपाने झाला

भारतीय संविधान हा दुसरा पराभव कारण त्यात समान नागरी कायदा न्हवता

तिसरा पराभव हा शाहबानो प्रकरणात झाला

आणि चौथा बाबरी मस्जिद पाडली गेली तेव्हा झाला

मग आता धर्मनिरपेक्षतेचा विचार करायचा म्हणजे करायचं तरी काय ?

अल्पसंख्याक असणे हा जसा गुन्हा नाही तसा तो बहुसंख्यकांच्यावर उपकार पण नाही पण हे कळणारे फार थोडे लोक भारतात झाले कुरुंदकर हे त्यापैकी एक

खरी धर्मनिरपेक्षता आणि छद्म धर्मनिरपेक्षता असे सद्या धर्मनिरपेक्षतेचे दोन प्रकार आहेत आणि प्रत्येक राजकीय पक्ष माझी धर्मनिरपेक्षता खरी व तुझी छद्म असे सांगत असतो


साम्राज्यात वसाहतींच्यावर रिमोट कंट्रोल ठेऊन राज्य करणे शक्य असते कारण जनतेशी काहीही देणेघेणे नसते पण राष्ट्र चालवतांना प्रत्येक राज्याचे मत प्रत्येक नागरिकाचे मत महत्वाचे ठरते म्हणूनच ब्रिटिश साम्राज्यातले व्हॉईसरॉय मुघल सुभेदाराप्रमाणे हिंदुस्तानात बंड करत नाहीत  पण ग्रेट ब्रिटनमधले आयर्लंड वेगळे राष्ट्र होते
साहजिकच जितके नागरिक तितक्या धर्मनिरपेक्षता असतात आणि त्यांचा म सा वि काढून राष्ट्रीय धर्मनिरपेक्षतेची व्याख्या करावी लागते

भारतात न्यायमूर्ती रानडे दादाभाई नौरजी ह्यांनीच धर्मनिरपेक्षतेचा पाया घातला जों गोखलेंनी घट्ट केला आणि काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेचा पाया  ह्यांच्याच आधारे सुरु झाला

धर्मनिरपेक्षता ही राजकीय संकल्पना आहे असा एक गैरसमज आहे माझ्या मते तिच्यात धर्म असल्याने ती एक धार्मिक संकल्पनाही आहे आणि हे न कळल्यानेच आजचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आम्ही आमचा धर्म राज्यकारभार चालवताना व लोकव्यवहार करतांना स्वतःच्या अंतकरणात व कृतीत  येऊ देणार नाही असा नागरिकांनी केलेला वैयक्तिक  व  सामुदायिक निश्चय म्हणजे धर्मनिरपेक्षता होय

वैयक्तिक निश्चय न शिकवल्याने आज प्रश्न निर्माण झाला आहे कुठलीही गोष्ट केवळ राष्ट्रासाठी आवश्यक आहे असे सांगितलंत तर ते पटत नाही त्याऐवजी त्यात त्या व्यक्तींचंही कल्याण आहे असं सांगितलं व तिला पटलं कि ती व्यक्ती आपोआप ते मूल्य स्वीकारते जीवनव्यवहार व राष्ट्रव्यवहार ह्यांच्यातली आदर्शवादी फारकत दोन्ही बिघाडते

कुरुंदकरांच्या मते समताधिष्ठित नवभारत निर्माणाचे सूत्र धर्मनिरपेक्षता आहे बुद्धिवादाच्या आधारे सुधारणा केल्या कि जमातवादाला पायबंद बसतो  (पान १८० निवडक पत्रे )व्यक्ती व्यक्ती संबंध आणि व्यक्ती विश्व संबंध ह्यांच्यात संघर्ष निर्माण झाला तो विश्व म्हणजे ईश्वर मानणाऱ्या लोकांच्यामुळे कारण हा संबंध धर्माच्या कक्षेत येतो असे त्यांना वाटत होते म्हणजेच राज्याने फक्त व्यक्ती व्यक्ती संबंध स्वतःकडे ठेवावेत असा धर्माचा आग्रह होता आणि प्रबोधनात तो मान्य झाला कुरुंदकरही ह्या आग्रहाचे बळी आहेत

आता विश्वाचे कोडे विज्ञानाने बऱ्यापैकी उलगडलेले असल्याने विश्व  व्यक्ती संबंधात ईश्वराची गरज काय असा प्रश्न निर्माण होतो आणि धर्मनिरपेक्षतेची आपणाला गरज आहे काय हा प्रश्न निर्माण होतो

कुरुंदकर जमातवादी राष्ट्रद्रोही आहेत असे म्हणतात तेव्हा त्यांना फक्त हिंदू जमातवादी अभिप्रेत नसतात तर मुस्लिम जमातवादीही अभिप्रेत असतात

कुरुंदकरांच्या मते हिंदू हा  सहस्त्रावधी अल्पसंख्याकाचा समूह आहे  माझं म्हणणं इतकंच कि जर सर्वच अल्पसंख्याक असतिल तर कुणालाच अल्पसंख्याकांचा दर्जा देऊ नका नाहीतर मग मान्य करा कि मेजॉरिटी आहे हे दोन्ही बाजूंनी मेजॉरिटीला झोडपणे बंद करा

समजा हिंदू ही  अनेक भोकांची मच्छरदाणी आहे तर माझ्या मते सर्वच समाज असे असतात पण धर्म त्यांना बांधून ठेवतो त्यामुळे संस्कृतीही काहीशी एक चेहऱ्याची होते जी त्या राष्ट्राला एक चेहरा देते भारतीय  समाजात आर्य व शैव असे दोन चेहरे असल्याने आणि ह्या चेहऱ्यांच्यावर अनेक पेंटिंग्जची कामे केल्याने तो अनेक कांदा बटाटे सफरचंद मोसंबी आंबा टोमॅटो एकत्र असलेल्या भाजी मंडईसारखा किंवा मॉलसारखा पोस्टमॉडर्न दिसतो व असतो मोक्षाची उपस्थिती त्याला एकसंध धार्मिक चेहरा फॉर्म करू देत नाही अगदी मुस्लिमांना सुद्धा इथे सुफी मोक्षाची ओढ लागते आणि साईबाबा कबिरसारखे उपलब्धही होतात भारतात विविधतेत एकता नाही तर विविधतेत एकात्मता आहे आणि आत्मता मोक्ष आहे लोकायत ह्या मॉलमध्ये मी मोक्ष खरेदी करणार वा विकणार नाही म्हणून हटून बसणाऱ्या लहान मुलासारखे आहेत आणि  ते ह्या मॉलचे सौंदर्य वाढवतात ते  मला म्हणूनच हवेहवेशे वाटतात हट्टी मुलांशिवाय घराला मजा कशी प्राप्त होणार ?

भारतीय धर्मनिरपेक्षता हा मुस्लिमांचा बुरखा तटआणि संरक्षण आहे त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचा पाडाव केल्याशिवाय मुस्लिमांचा पाडाव अशक्य असं मानणारा सूर आर्य विचार सध्या सत्तेवर आहे पण मुस्लिमांचा पाडाव करून तुम्ही मुस्लिमांचं करणार काय ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या लोकांच्याकडे नाही आम्ही त्यांना घरवापसी करायला भाग पाडू असा विचार चालू आहे पण घरवापसी करणाऱ्याच्या वर्णजातीचे काय ह्या प्रश्नाचे उत्तर ह्यांच्याकडे नाही

हमीद दलवाईंनी एक नेमका प्रश्न उपस्थित केला होता समजा भारतातील मुस्लिम पाकिस्तानातच गेले असते तर भारत धर्मनिरपेक्ष राहिला नसता काय? तर हो सर्व मुस्लिम पाकिस्तानात गेले असते तर भारत धर्मनिरपेक्ष झाला असता ह्याचा अर्थ भारताला धर्मनिरपेक्ष बनवण्यातला मुख्य अडथळा मुस्लिम समाजच आहे कुरुंदकर म्हणतात कि मुस्लिमांना धर्मनिरपेक्ष बनवण्यासाठी प्रथम हिंदूंनी धर्मनिरपेक्ष बनले पाहिजे हा मूर्ख युक्तिवाद आहे कारण धर्मनिरपेक्षपणाची गरज मुस्लिम समाजाला आहे त्यामुळे प्रथम मुस्लिमांनीच धर्मनिरपेक्ष झालं पाहिजे कुरुंदकर म्हणतील मुस्लिमांचा अभ्यास कच्चा आहे हिन्दु हुशार आहेत  माझे म्हणणे हिंदू हुशार आहेत हा हिंदूंचा दोष नाही एखादा विध्यार्थी ढ असणे हा हुशार विद्यार्थ्यांचा दोष नसतो दुसरी गोष्ट जो ढ आहे त्याला पास व्हायचे असेल तर डबल अभ्यास करावा लागतो मुस्लिम धर्मनिरपेक्ष झाले नाहीत म्हणून हिंदू धर्मनिरपेक्ष राहिले नाहीत

हिंदुत्ववाद ह्या देशाच्या मेन फ्रेममध्ये कधीच न्हवता मुस्लिमांच्या कट्टरतेमुळे तो मेन फ्रेममध्ये आला आणि पुरोगामी असे नादान आहेत कि मुस्लिमांना समजावण्याऐवजी हिंदूंना शिव्या घालत बसलेत  ह्याने साध्य तर काहीच होणार नाही पण जे पुरोगामी हिंदू आहेत ते प्रतिगामी बनत जातील किंबहुना बनायला लागले आहेत
श्रीधरा तिळवे नाईक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट