मनुस्मृतीतील सर्वात मोठा विरोधाभास आणि मी काहीही करायला मोकळा श्रीधर तिळवे नाईक

मनुची स्वतःची धर्माची व्याख्या
वेदः स्मृतिः सदाचारः स्वस्य  प्रियमात्मनः  एतच्चतुर्विधं प्राहुः साक्षाद् धर्मस्य लक्षणम् ॥ अध्याय २ श्लोक १२ 
अशी आहे
अर्थ :
    "वेद , स्मृती,  सज्जनांचे सदाचार  व स्वतःच्या आत्म्याला प्रिय ह्या  चतुर्विध लक्षणांनी युक्त तो धर्म   " (अध्याय २ श्लोक १२ ) अशी आहे मनुस्मृतीचे विरोधक सदाचाराऐवजी आचार हा शब्द भाषांतरात वापरतात तर आत्म्याला प्रिय ऐवजी संतोष समाधान असे शब्द वापरतात ते योग्य न्हवे प्रश्न असा येतो कि माझ्या आत्म्याला प्रिय व मला जे सज्जन वाटतात ते ह्या दोन्ही गोष्टी सापेक्ष आहेत  ह्याचाच अर्थ धर्मातील वेद स्मृती ही दोन लक्षणे  निरपेक्ष तर सज्जनांचे सदाचार  व स्वतःच्या आत्म्याला प्रिय हे दोन लक्षणे  सापेक्ष आहेत आणि मनूला ती  मान्य आहेत ह्या सापेक्ष लक्षणांच्या  आधारे मी मला हवे ते वर्तन करू शकतो आणि ते धर्माप्रमाणे आहे मनुस्मृतीचे समर्थक ही गोष्ट स्वीकारतात काय तर नाही ते वेद व स्मृती ही  निरपेक्ष लक्षणेच  स्वीकारतात पण ह्या दोन निरपेक्ष लक्षणातील  एक लक्षण  स्मृतीच म्हणजे मनुस्मृतीच मला सांगते कि सज्जनांचे सदाचार  व स्वतःच्या आत्म्याला प्रिय ही  धर्मलक्षणे   आहेत आणि तुम्ही ती  नाकारता म्हणजे तुम्ही स्मृती नाकारता म्हणजे प्रत्यक्ष धर्माची  तीन लक्षणे  नाकारता म्हणजे धर्माचे  एकच लक्षण  शाबूत राहते  ते  म्हणजे वेद आणि वेद यज्ञ वगळता इतर जगातील वर्तनाचा एकही नियम मला पक्का नियम म्हणून  सांगत नाहीत म्हणजेच धर्म मला प्रत्यक्षात एकही नियम सांगत नाही हा मनूच्या व्याख्येतील विरोधाभास आतापर्यंत कुणाच्या का लक्ष्यात येऊ नये हा मला नेहमीच प्रश्न पडतो
मूळ धर्मलक्षणे  मला अनुमती देत असतील  तर मग धर्मशास्त्र पाळण्याची कसलीही जबाबदारी माझ्यावर उरत नाही

श्रीधर तिळवे नाईक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट