स्वातंत्र्य आणि मोक्ष श्रीधर तिळवे नाईक
भारतीयांना स्वातंत्र्य किती महत्वाचं वाटतं वा स्वातंत्र्याबद्दल काय वाटत हा एक कळीचा प्रश्न आहे
माणूस तयार होतो तो गर्भाशयात आणि गर्भाशयात तो परावलंबी असतो माणसाचा जन्म ह्या परावलंबनाचा आईवर अवलंबून राहण्याचा अस्त असतो पण आईची गरज समाप्त होत नाही ती जन्मानंतरही भासते गर्भाशयत अन्नाचा पुरवठा आई करते श्वास आईवर असतो गर्भाशय वस्त्राचेही काम करते आणि घराचेही जन्मानंतर माणूस आईवडील वा केअरटेकर ह्यांच्यात असतो एकप्रकारे ही कैद असते पण ती अटळ असते घर हे ह्या कैदेत महत्वाचे असते पुढे तो मोठा व्हायला लागतो पण त्याचे पारतंत्र्य संपत नाही पण स्वातंत्र्य दिसायला लागते
इंग्रजांनी आपले इंग्लंडवरचे परावलंबित्व वाढवले आपल्याच देशात आपल्याला कैद केले दास केले वेळप्रसंगी जगभर दास म्हणून भारतीयांची विक्री केली अख्ख्या देशाचा तुरुंग केला आणि आपले कृती करण्याचे स्वातंत्र्य नाकारले
परावलंबनावर एकच उपाय असतो स्वावलंबन
कैद गुलामी दासतेवर एकच उपाय असतो दास्यापासून सुटका
आणि पारतंत्र्यावर उपाय असतो स्वातंत्र्य
स्वातंत्र्यात सुटका आणि सुटकेत स्वावलंबन उपस्थित असते
स्वावलंबन सुटका स्वातंत्र्य वैग्रे सर्वच गोष्टी १ वैयक्तिक असतात तशा २ सामुदायिक ३ शासिक ही असतात
ब्रिटिशांचा भारताशी आलेला संबंध हा शासिक व सामुदायिक आहे
परावलंबनातील सर्वात वाईट परावलंबन असते शारीरिक परावलंबन जे कुणालाच नको असते मग क्रमांक असतो बौद्धिक परावलंबनाचा मग भावनिक परावलंबनाचा मग कार्मिक मग भौगोलिक मग कालिक म्हणजे सर्व गोष्टी आपल्या भूगोलात मिळत नाही उदा तेल तर आपणाला ते आयात करावे लागते अवलंबन हे अपरिहार्य असते तुम्ही टाळू शकत नाही पण ह्या अवलंबून असण्याच्या अटी कोण ठरवणार इंग्रजांनी हे अधिकार आपल्याकडे ठेवले म्हणजे तेल कुणाकडून घ्यायचे किती भावाने घ्यायचा ह्याचा अधिकार आपल्याकडे न्हवता
आजच्या आपल्या जगण्यात आपण तब्बल ९९. ९९९९९ टक्के गोष्टींच्याबाबत इतरांवर अवलंबून असतो आपले अन्न आपले वस्त्र आपले घर ह्यातील काहीही आपण बनवत नाही समाज आपण जन्मल्यापासूनच आपल्यासोबत ऑन होतो संन्याश्याना जंगलात जाणे सक्तीचे होते ते त्यासाठी ! समाजावर स्वतःला कमीत कमी अवलंबून ठेवण्याची व राहण्याची ही धडफड होती
परावलंबनाची सुरवात गर्भाशयापासून होते तर आपल्या दासतेचि सुरवात घरापासून होते घराचे नियम पाळावे लागतात तुरुंगात हे नियम शासन व जेलर ठरवतो घरात हे नियम कुटुंबप्रमुख वा कुलप्रमुख ठरवतो प्रमुख स्त्री वा पुरुष दोघेही असू शकतात अलीकडे ह्या घरात लोकशाही शिरलेली आहे आणि निर्णय बहुमताने होतात किंवा त्या त्या व्यक्तीला काय करायचं ते कर असे सांगितले जाते आहे पण अजूनही अशी घरे कमी आहेत
घराबाहेर आपले कार्यक्षेत्र सुरु होते पारतंत्र्य सुरु होते तिथे आपण आपल्या क्लायंट्सचे किंवा बॉसचे ऐकत असतो फार क्वचित आपणाला स्वातंत्र्य मिळते इंग्रजांनी आपली कार्यक्षेत्रे ताब्यात घेतली म्हणून स्वातंत्र्य चळवळ सुरु करावी लागली स्वतःच्या आवडीचे क्षेत्र कार्यक्षेत्र म्हणून निवडणे ही जीविका व स्वतःच्या आवश्यकतेनुसार कार्यक्षेत्र निवडणे म्हणजे उपजीविका आपले स्वातंत्र्य व पारतंत्र्य हे आपल्या जीविकेशी आणि उपजिविकेशी निगडित असते
आपल्या घरापासून सुटका व्हावी म्हणून घर सोडणारे महाभाग जसे असतात तसे जगण्यासाठी आपली जीविका सोडणारे महाभागही असतात आपल्या कार्यक्षेत्राचे नियम आपला मालक किंवा आपले शासन ठरवते
प्रश्न असा असतो कि आपल्या स्वावलंबनात - परावलंबनात ,घरात आणि सुटकेत आणि कार्यक्षेत्रात -स्वातंत्र्यात
शासनाला किती हस्तक्षेप करू द्यावा ?
आजकाल हा हस्तक्षेप ९० टक्के झालाय आणि आपण सर्व स्वातंत्र्याची चर्चा करत आहोत वस्तुस्थिती अशी आहे कि आपल्या सर्व पुरोगामी आणि आधुनिक विचारवंतांनी आपल्याला फसवले आहे त्यांनी आपल्याला त्यांच्या मेगानरेटेव्हिजनी अत्यंत सर्वंकष अशा सत्तेच्या हवाली केले आहे भांडवली वा समाजवाद्यांनी कमी साम्यवाद्यांनी संपूर्ण! उत्तराधुनिक विचारवंतांनी ही सगळी फसवणूक डिकन्स्ट्रक्ट करून आपल्यापुढे सादर केली आणि लोकल राजकारणाचा पर्याय आपल्यापुढे सादर केला तर त्यातूनही आपल्या हाती आंधळी मेग्या-धार्मिकता हाती लागली आहे
ज्यांना स्वातंत्र्य हवे आहे त्यांनी जावे कुठे ?
श्रीधर तिळवे नाईक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा