आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १३९ ते १४९ श्रीधर तिळवे नाईक

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती १३९ खटला ज्याने देश जागा झाला  श्रीधर तिळवे नाईक 

टिळकांना वॉरंट निघालय हे कळल्यावरही टिळक पळाले नाहीत उलट ,"ज्या देशातील जनतेत प्रतिकाराचे सामर्थ्य नाही त्या जनतेच्या पुढाऱ्याने पळून जाऊन तरी काय फायदा " असे ते उद्गारले 

१२ ५ १९०८ ह्या दिवशी लिहिलेल्या देशाचे दुर्दैव ह्या लेखाच्या निमित्ताने १२४ अ व १५३ अ ह्या कलमान्वये खटला दाखल केला गेला  टिळकांना जामीन नाकारण्यात आला पुढे "हे उपाय टिकाऊ नाहीत " हा लेखही आक्षेपार्ह ठरवून दुसरे वॉरंट काढले गेले एकातून सुटले तर दुसऱ्यातून वाचू नयेत हाच ह्यामागचा ब्रिटिशांचा उद्देश ! 


ह्या खटल्यात टिळकांचे एक वकील बॅरिस्टर जीनाही होते हे आता आश्चर्याचे वाटेल पण ज्यांना टिळक काय विचार करतात हे माहित असेल ते ह्यावर आश्चर्यचकित होणार नाहीत टिळकांच्या संपूर्ण करिअरमध्ये मुस्लिम कायमच टिळकांच्या बाजूने होते कारण टिळकांनी ज्याप्रमाणे हिंदू धर्मातील इंग्रजांचा हस्तक्षेप नाकारला त्याचप्रमाणे मुस्लिम धर्मातील इंग्रजांचा हस्तक्षेपही नाकारला तर्क एकच होता इंग्रजांनी फक्त ख्रिश्चन धर्मात तो त्यांचा धर्म असल्याने हस्तक्षेप करावा बाकी धर्म त्यांचे नाहीत व ते ह्या देशात परकीय राज्यकर्ते आहेत म्हणून त्यांनी ह्या ख्रिश्चनेतर धर्मात अजिबात हस्तक्षेप करू नये कारण राणीच्या जाहीरनाम्याने तसे आश्वासन दिलेले आहे टिळकांच्या ह्या स्टान्समुळे मुस्लिमांना टिळक त्यांच्या धर्माचे रक्षक वाटत होते 

दुसरे कारण म्हणजे टिळक कायमच कौरव पांडवानी परकीय शत्रूंशी एकत्रच लढले पाहिजे असे मानत म्हणून तर मवाळांनी त्यांचा अनेकदा अपमान करूनही ते समेटासाठी प्रयत्न करत जे धोरण मवाळांसाठी तेच धोरण मुस्लिमांसाठी होते जे काय भांडायचे ते आपण नंतर भांडू आधी हा जो आपल्या घरात घुसलेला घुसखोर आहे त्याला हिसकावून लावू असे टिळक म्हणत आणि मुस्लिम नेत्यांपैकी अनेकांना हे मान्य होते 


२ जुलै १९०८ ला जीनांनी टिळकांना जामीन मिळावा म्हणून युक्तिवाद केला पण न्यायाधीशांनी तो अमान्य केला ३ जुलैला ज्यूरीविषयी चर्चा सुरु झाली व सरकारने स्पेशल ज्युरी बसवण्याच्या दृष्टीने युक्तिवाद केला जो टिळकांचे वकील बाप्टिस्टा ह्यांनी नाकारला पण न्यायालयाने सरकारचा युक्तिवाद स्वीकारला १० ज्युरींपैकी ९ ब्रिटिश किंवा ज्यू होते टिळकांना शिक्षा द्यायचीच असा बहुदा विचार असावा जामिनीचा खटला सुरु झाला तेव्हाच लोकांच्यावर घोडदळ घालण्यात आले होते १२ १३ ला गिरण्या बंद होत्या १३ जुलैला साडेअकरा वाजता बादशहा विरुद्ध लोकमान्य टिळक असा खटला अधिकृतरीत्या सुरु झाला टिळकांच्यावतीने टिळक स्वतःच खटला चालवायला उभे राहिले एक आरोप काढण्यात आला तीन ठेवण्यात आले ह्या तिन्हींबाबत मी निर्दोष आहे असे टिळकांनी सांगितले 

हे सर्व करतांना टिळकांचे वय बावन्न होते आणि जर का काळ्या पाण्याची शिक्षा झाली तर आपण कधीही आपल्या घरात परतणार नाही ह्याची जाणीव टिळकांना होती हा खटला टिळकांच्या अन्यनसाधारण देशप्रेमाचा 
पुरावा होता हे खरेच होते कि त्यांच्या काळात भारतावर प्रेम असलेला त्यांच्यासारखा दुसरा नेता न्हवता नाहीतर ५२ व्या वर्षी देशाचे दुर्दैव सारखे लेख लिहितो कोण ? टिळक खरोखरच सिंह होते त्यांच्याबरोबर असणारे सगळे वाद मान्य करूनही त्यांची सिंहगर्जना मान्यच करावी लागते 

श्रीधर तिळवे नाईक 




आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती १४० खटला ज्याने देश जागा झाला २ श्रीधर तिळवे नाईक 

ह्या खटल्यासाठी टिळक दिवस रात्र मेहनत करत होते रात्री तयारी दिवसा लढाई असे काम चाले एकदा जे घडले ते धनंजय किर यांनी ३१४ पानावर तर करंदीकर ह्यांनी टिळक भारतमध्ये १९३ ते १९४ पानावर पुढीलप्रमाणे नोंदवले आहे 
Sergeant : It is now getting rather late. Sir! Don’t you
think you should have a little rest now ?

Tilak ( assuringly ): Why? Are you feeling sleepy? You may please sleep if you like. I won’t abscond!

The police officer went to bed. Tilak was pacing the room,
selecting books, inserting pieces of paper in various pages till
four o’clock in the morning. He then awoke the sergeant and said: “ I have finished my reading 1 I will now have a little rest. Have you had enough rest? ” He pulled himself together and thanked Tilak sincerely. At five Tilak was fast asleep and was snoring! 
सकाळी पाचपर्यंत तयारी करून थोडी झोप घेऊन टिळक कोर्टात हजर होत 

२२ जुलै अडीच वाजेपर्यंत टिळक बोलले त्यात ज्युरींच्या कर्तव्यापासून अनेक गोष्टी होत्या नोकरशाहीबद्दल ते जे बोलले ते  आजही लागू आहे 


“ I can trace a great struggle between the people on the one hand, and a mighty bureaucracy on the other; and I ask you to help us, not me personally, but the whole of India. I am
now on the wrong side of life and for me, it can only be a matter
of a few years, but future generations will look to your verdict and see whether you have judged wrong or right. The verdict
may likely be a memorable one in the history of the freedom
Of the Indian Press. ... If at least one of you would come for¬
ward and say that I was right, it will be a matter of satisfaction
to me; for I know, that if the jury is not unanimous in
England, another trial takes place. It is not so here, but it
would be a moral support upon which I would rely with great
satisfaction. I appeal to you, not for myself, but in the  interest

of the cause that is sacred and I doubt not, gentlemen, that He,
before whom all of us will have to stand one day and render
an account of our actions, will inspire you with the courage of
your convictions and help you in arriving at a right decision on
the issue involved in this case.”
 धनंजय किर Trial and Transportation 309 

टिळक खापर्ड्यांना म्हणाले ,"दादासाहेब आजचा रंग काही वेगळाच दिसतोय बहुतेक काळ्या पाण्याची तयारी दिसते हा आज आपला शेवटचा चहा समजा " हे मी एव्हढ्यासाठी सांगतोय कि स्वातंत्र चळवळीच्या आपल्या नेत्यांनी काय मानसिक तयारी करून स्वातंत्र्य मिळवून दिले हे नवीन पिढीला कळावं 

ज्यूरीतल्या नऊपैकी सात जणांनी टिळकांना दोषी मानले टिळकांना सहा वर्षाची शिक्षा झाली खटल्याच्या शेवटी टिळक म्हणाले 


 “ All I wish to say
is that in spite of the verdict of the jury, I maintain that I am
innocent. There are higher powers that rule the destinies of
men and nations; and it may be the will of Providence that the
cause which I represent may prosper more by my sufferings than
by my remaining free.” 5 
पान क्र १९७ टिळक भारत 



श्रीधर तिळवे नाईक 


आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती १४१ मंडाले आणि गीतारहस्य १ श्रीधर तिळवे नाईक

टिळकांना ब्रिटिशांनी रंगूनच्या मंडाले तुरुंगात ठेवलं आणि टिळकांच्यातला विद्वान पुन्हा जागा झाला सुरवातीला त्यांनी काही काळ जर्मन व फ्रेंच भाषा शिकण्यात व्यतीत केला वेबरचा ग्रंथ मूळ जर्मनीत वाचल्यावर त्यांना झालेला आनंद त्यांनी एखाद्या लहान मुलाच्या उत्साहाने नोंदवलेला आहे
ह्याशिवायचा टिळकांचा आणखी एक उद्योग म्हणजे टिळकांना डायबेटीस असल्याने त्यांनी त्यावर शोधलेला उपाय सगळा आहार सातूचा थोडे दूध दही फळे व दिड तास व्यायाम गांधींची नॅचरोपॅथी अनेकांना माहित असते टिळकांची माहीत नसते म्हणून हा उल्लेख 

ह्या उद्योगांच्यानंतर मात्र त्यांच्यातील धर्मपुरुष जागा झाला आणि ह्यावेळी विषय होता भगवद्गीता ! टिळकांचा गीतेशी आलेला पहिला संपर्क वयाच्या सोळाव्या वर्षी आला होता 

मागील तुरुंगखेपेवेळी टिळकांनी वेदाचा ऍस्ट्रॉनॉमिकल अभ्यास करून आर्यांच्या मूळस्थानाविषयी सिद्धांत मांडला होता ज्याचे खंडन मी केले होते वेदानंतर उपनिषद आणि उपनिषदांचे सार गीतोपनिषद ज्याला आता लोक गीता म्हणतात ह्यांचा क्रमांक येणे अटळ होते ह्या मागचे कारण उघड होते टिळकांना स्वतःच्या जीवनाची शाश्वती राहिली न्हवती आणि आपल्यांनंतर कोणत्या तत्त्वज्ञानाने स्वराज्याचा लढा चालवावा हे आपल्या अनुयायांना सांगणे आवश्यक होते मुळातच टिळकांचा पिंड मुमुक्षाचा असल्याने टिळक रोज दिड तास ध्यान करतच होते मात्र ज्ञानी योग्याने फक्त ज्ञान पाहू नये तर कर्मही करावे अशी त्यांची धारणा होती साहजिकच ह्या दिशेने तुरुंगात विचार सुरु झाला 

टिळकांच्या मते शंकराचार्यांचा संन्यासपर अर्थ असो कि ज्ञानेश्वरांचा भक्तिपर  अर्थ असो हा त्या त्या काळाला गरजेचा वाटला म्हणून लावलेला अर्थ आहे (हे मत हल्ली कुरुंदकरांचे म्हणून खपवले जाते पण ते मूळचे टिळकांचे आहे ) टिळकांनी आपल्या प्रत्येक अनुयायाने हा ग्रंथ वाचला पाहिजे असे म्हंटले आहे 

मराठी आर्य संस्कृतीच्या केंद्रस्थानी असलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी ! साहजिकच तिच्याविषयी वादविवादही तेवढेच ! आजही पद्माकर देशपांडेंच्या सारखे विद्वान त्यावर निरूपणे देत असतात 
गडकऱ्यांनी  म्हंटले आहे 
देवी ज्ञानेश्वरी करि जिथे भक्तीचा खेळ 
तिथेच गीतारहस्य वसवी बुद्धीचा मेळ 
आर्यांच्या संस्कृतीत जोवर तुम्ही गीतेवर भाष्य करत नाही तोवर तुम्ही आचार्य होऊच शकत नाही शंकराचार्यांच्यापासून सुरु झालेली ही हिंदू परंपरा आजही कायम आहे अगदी जैन असलेले आचार्य रजनीशही गीतेवर भाष्य करतात कारण ब्रिटिशांच्या कृपेने गीता भारताच्या धार्मिक केंद्रस्थानी असलेला ग्रंथ आहे ईं- साहित्यावर हा ग्रंथ उपलब्ध आहे जिज्ञासूंनी जरूर वाचावा 

अलीकडच्या भक्तिवेदांत चळवळीच्या केंद्रस्थानीही हा ग्रंथ आहेच टिळकांच्या आधी त्यावर अनेकांनी भाष्य लिहिले आहे त्यात काशिनाथ तेलंग ह्यांचे विवेचन लक्ष्यवेधी आहे श्रीमदभगवदगीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र हे ह्या ग्रंथाचे मूळ नाव गीतारहस्य हे प्रचलित नाव १९१० ते १९११ हिवाळ्यात ह्याचा पहिला खर्डा तयार झाला तुरुंगात चाकूची अनुमती नसल्याने जेवढी पेन्सिल तासून मिळे तिच्या आधारे लेखन करावे लागे तुरुंगात लिखाण करण्याची ही परंपरा पुढे अनेकांनी चालवलेली दिसते त्यातील सावरकर अधिक कठीण कारण त्यांना ना कागद दिला गेला ना पेन्सिल नेहरूंचे काही ग्रंथ तुरुंगातचेच बायप्रॉडक्ट ज्ञानी लोकांनी राजकारण चालवल्याचा हा पुरावा अलीकडच्या काळात तुरुंगात जाऊन कितीजणांनी गुणवत्तापूर्ण लिखाण केले ? खर्डेघाशी जास्त ! असो 

गीतेवरच्या भाष्यात सर्वात प्राचीन भाष्य शंकराचार्यांचे ह्यावरूनसुद्धा गीता कधी लिहिली गेली असेल ह्याचा अंदाज येतो मुळात महाभारतातला श्रीकृष्ण आणि विष्णूचा अवतार बनलेला देवरूप प्राप्त केलेला श्रीकृष्ण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ब्राम्हणांनी श्रीकृष्णाचा वापर सुरु केला तो ७ व्या शतकात जैन बौद्ध ह्या धर्मांना हरवण्यासाठी ह्या दोन्ही धर्माचे संस्थापक क्षत्रिय होते आणि आर्य क्षत्रिय मारले गेलेले होते अशावेळी करायचं काय तर परंपरेने चालत आलेले क्षत्रिय आपल्या बाजूने उतरवणे राम व कृष्ण असे क्षत्रिय होते  त्यांच्या कथा प्रचलित होत्या आणि त्यामुळे लोकप्रियतेसाठी खूप खटाटोप करण्याची आवश्यकता न्हवती वैष्णव धर्म हा रामकृष्णांचा धर्म म्हणून सुरु झाला आणि पुढे मग वैष्णव बनला 

शंकराचार्यांनी गीतेवर भाष्य करून गीतेला प्रतिष्ठा मिळवून दिली तोपर्यंत गीता ही महाभारताचा केवळ एक भाग होती 

श्रीधर तिळवे नाईक 



आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती १४२ गीतारहस्य व मी गीतावादी का नाही ?

टिळकांच्या गीतारहस्याची पार्श्वभूमी पाहिल्यावर आपण पुढे सरकू शकतो पण त्या आधी मी गीतावादी का नाही हे सांगणे मला गरजेचे वाटते शैवांच्या नकुलीश दर्शनाचा व कुलाचा आचार्य म्हणून हे सांगणे गरजेचे आहे गीतेवर ज्या दर्शनपरंपरेत लिहिले गेले आहे त्यात शैव दर्शनांपैकी ब्रम्हदर्शन (शन्कराचार्य ) काश्मिरी शैवागम दर्शन (अभिनवगुप्त ) आणि नाथदर्शन (ज्ञानेश्वर ) ह्या तिघांनी गीतेवर भाष्य लिहिले आहे माझ्या मते ही ह्या तिघांची चूक होती जी शैवांना महागात पडली तरीही मी गीतारहस्याचा विचार करणार आहे कारण त्याशिवाय टिळकांच्यावरचे विवेचन पूर्ण होणे शक्य नाही 

आपल्याकडे गीतेविषयी जेवढे गैरसमज आहेत तेवढे कशाबद्दलही नाहीत ब्राम्हणी प्रचारयंत्रणेचा सर्वात मोठा प्रचार म्हणजे गीता ! शैव सांख्य जैन बौद्ध ह्या आगम धर्माच्या सारतत्वाची चोरी करायची पण ब्राम्हणांचे वर्चस्व कायम राखायचे अशी ही कॉन्स्पिरसी ब्राम्हणेतर ह्या कारस्थानाला कधीही बळी पडले न्हवते पण महात्मा गांधींनी प्रथम गीतेवर भाष्य केले आणि सगळे ब्राम्हणेतर गीतेच्या मागे गेले मुळात शंकराचार्य ह्या शैव ब्राम्हणाने शैव वासुदेव  ह्यांचा मिलाफ व्हावा म्हणून हे भाष्य केले मग काश्मिरी शैवागमच्या शैव ब्राम्हण असलेल्या अभिनव गुप्ताने दुसरे भाष्य करून हा ग्रंथ शैव असल्याचा गैरसमज निर्माण केला आणि मग नाथ संप्रदायाच्या ज्ञानेश्वर  ह्या शैव ब्राम्हण बनलेल्या पण मूळ वैदिक असलेल्या ब्राम्हणाने ज्ञानेश्वरी लिहून हा ग्रंथ शैव असल्याचे भ्रम मजबूत केले पुढे मग शैव ब्राम्हणांचे  जे धर्मांतर सुरु झाले ते थांबलेच नाही 

महात्मा गांधी ह्यांनी भाष्य करेपर्यंत कुणाही ब्राम्हणेतराने गीतेवर भाष्य केलेले नाही मराठीतही ज्ञानेश्वर एकनाथ व रामदास ह्यांनीच गीतेचा सखोल विचार केला आहे नामदेव व तुकारामाने सखोल विचार केलेला नाही ते गीतेला व्हाया ज्ञानेश्वरी भेटलेले आहेत मुळात कृष्णाला शिवाचा अल्टर्नेटीव्ह म्हणून स्वीकारणे हाच मूर्खपणा पण हा प्रथम अभिनवगुप्ताने केला मग ज्ञानेश्वरांनी ! ह्यातून भारतीय जनतेच्या नैतिकतेचा कायमचा ऱ्हास सुरु झाला आणि हे ऱ्हासपर्व अजूनही संपलेलं नाही समोरच्याला गुरु भाऊ आणि कुटुंबीय ह्यांची हत्या करायला उद्युक्त करणारे तत्वज्ञान घराघरात फक्त भांडण लावते आणि नातेवाईकांना आपापसात लढवते ह्या लढाईचा फायदा कसा घ्यायचा हे कळणारा मनुष्य राजकीय नेता बनतो शैवांच्यात त्यामुळेच घरात महाभारत ठेवायला बंदी आहे अगदी शैव ब्राम्हणही (महाराष्ट्रात देशस्थ कऱ्हाडे वऱ्हाडी वैग्रे ) आपल्या घरात महाभारत ठेवत नाहीत हा एकप्रकारे शैवांनी टाकलेला बहिष्कार आहे पण तो ह्या देशातल्या शहाण्यासुरत्यांना आणि आता आपण कुठली गोष्ट का करतो ह्याचा विसर पडलेल्या शैवांनाही कळत नाही

आठव्या शतकात व नंतर भारतीयांना आपापसात लढण्याचा व बाहेरच्याला मदत करण्याचा व बाहेरच्याला बोलावण्याचा जो महारोग जडला त्याला कारण महाभारत व रामायण ! वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था निर्माण करण्याची फॅक्ट्री म्हणजे रामायण व महाभारत हे ग्रंथ हे ग्रंथ केंद्रीय स्थानी आल्यापासून भारत सतत परकीयांचा गुलाम बनतो आहे कारण त्यांचा संदेश तसाच आहे रामाला आमंत्रण देणारा बिभीषण , आपापसात लढणारे व साक्षात एका महाराणीला द्रौपंदिला दास बनवणारे  कौरव पांडव , आणि वर्ण मीच निर्माण केले म्हणून सांगणारा परमेश्वर ज्याला त्या काळात दक्षिण भारतातही ही वर्ण व्यवस्था निर्माण करता आलेली न्हवती मग भारताबाहेरचे जग तर फार दूरची गोष्ट ह्यातून काय निर्माण होणार होते ?

केवळ आर्य ब्राम्हणांनी आर्य ब्राम्हणक्षत्रियांची आर्य आर्यशाही व ब्राम्हणशाही निर्माण करण्यासाठी निर्माण केलेले आर्यवादी ब्राम्हणवादी तत्वज्ञान सांगणारे ग्रंथ हेच ह्या महाकाव्याचे स्वरूप ! ब्राम्हणांना भूदेव व राजाला विष्णूचा अवतार बनवणारे ! देव बनण्याचा शौक कुणाला नसतो ? क्षत्रियांना शासकांना तर सर्वात जास्त मग ह्या ग्रंथांचा राजकीय प्रचार होईल नाहीतर काय होईल ? शिवाय सांगणारा व ऐकणारा क्षत्रिय मग क्षत्रिय बहकतील नाहीतर काय ?

इसवीसन १ पासूनच १ लाख श्लोकाचेच असलेले हे महाभारत!  आता सुखटणकरांनी त्याचे EDITING करवुन २५००० श्लोकाचे केले व भांडारकर प्रत तयार केली म्हणून ह्या देशाचे झालेले नुकसान थोडेच भरून येणारय ? शिवाय ह्याही प्रतीत गीता आहेच जशीच्या तशी ! ती काढून टाकण्याचे धाडस सुखटणकरांना झालेले नाहीच 

बहुजन समाजाचा आणि गीतेचा कधीही संपर्क आलेला न्हवता ह्याबाबत जे  प्रोजेक्शन ब्राम्हणांनी केले आहे ते पोलिटिकल आहे अपवाद कलावंत नावाचे लोक पोट भरण्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेले हे लोक त्याकाळात राजाश्रयावर अवलंबून असल्याने व महाराष्ट्रात यादव राजे असल्याने ह्यांनी श्रीकृष्ण यादव ह्यांना आपल्या कलेत भरपूर प्रमोट केले  राजे वैष्णव असल्याने त्यांच्या समाधानासाठी रामायण व महाभारत ह्यातला भाग सादर केला जाई हे सुरु कसे झाले ?

सातव्या शतकानंतर सर्वत्र शैव जैन बौद्ध शासक कोसळले ह्या तिन्ही धर्मात तंत्र आणि सेक्स बोकाळला ऐयाशी सुरु झाली तिला नियंत्रित करण्यासाठी म्हणून शंकराचार्यांनी तंत्रविरोधी स्टान्स घेतला पंचरात्र व वासुदेव संप्रदायातील तंत्राच्या वाढलेल्या प्रभावाला थांबवल्याशिवाय हा अनाचार थांबणार नाही म्हणून त्यांनी केवळ दोन अध्यायाची असलेली मूळ गीता वाढवली आणि ती अठरा अध्यायाची केली आपण काय करतो आहोत आणि त्याचे भविष्यावर काय परिणाम होणार आहेत ह्याची त्यांना कल्पना असती तर त्यांनी हे कदाचित केले नसते शैवांची कबर एका शैव ब्राम्हणाने खोदावी ह्याहून शोकात्म ते काय ? सर्वत्र वैष्णव राजे असल्यामुळे शंकराचार्य दबावात आले पण माझे म्हणणे असे कि दबावात येतो तो शैव ब्राम्हण कसला ? शैव ब्राम्हणाचे काम सत्य शोधणे आणि सत्य बोलणे आहे ब्राम्हणांनी हे काम सोडून सत्याऐवजी सत्ता शोधणे सत्ता तयार करणे आणि सत्ता राबवणे ही कामे सुरु केली कि जो अनर्थ होतो तो अनर्थ म्हणजे शन्कराचार्य होय 

लोकमान्यांच्या गीतारहस्याची प्रेरणा योगायोगाने शंकराचार्य व ज्ञानेश्वर ह्या शैव ब्राम्हण असलेल्या लोकांची गीताभाष्ये असावीत ह्याला काय म्हणावे ?

ज्यांना कुणाला हा देश पुन्हा चांगला करायचा आहे पुन्हा नव्याने निर्माण करायचा आहे त्यांनी रामायण गीता व महाभारत बाजूला काढून ठेवावेत नाहीतर ह्या देशात ब्राम्हणशाही व पेशवाई पुन्हा परतणे अटळ आहे आणि हो शैवांनी जरा आपले शैव आगम ग्रंथही वाचावेत विशेषतः वज्रसूची शैव किती कट्टरपणे जात वर्ण विरोधी होते ते कळेल तुकाराम वज्रसूचीचा अनुवाद करायला सांगायला उगाच सांगत नाहीत वज्रसूचीच्या अनुवादानंतर तुकाराम गायब झालेले आहेत ते आजतागायत परतलेले नाहीत 

श्रीधर तिळवे नाईक 


आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती १४३ गीतारहस्य व मी गीतावादी का नाही २ ?


सुब्रमण्यम भारतींची एक अर्जुनाचा संदेह नावाची कथा आहे तिच्यात अर्जुन कर्णाला विचारतो कि युद्ध श्रेष्ठ कि शांतता तेव्हा कर्ण म्हणतो शांतता कारण युद्धात मला तुला मारावे लागेल अर्जुन हाच प्रश्न अनेकांना विचारत जातो त्याचे गुरु द्रोणाचार्य म्हणतात युद्ध कारण युद्धात विजय प्राप्त होऊन संपत्ती व कीर्ती मिळते भीष्म म्हणतात शांतता कारण त्यात जनतेचं भलं आहे मग अर्जुन स्वतःशीच म्हणतो शांतता राहिली तर कर्णाचेच नाव मोठे राहणार 

कर्णाला गीतेची गरजच न्हवती कारण तो चांगला राजा होता आणि शांततेचं महत्व त्याला ठाऊक होतं अर्जुनाजवळ राज्य न्हवतं आणि युद्ध हा राज्य मिळवण्याचा एकमेव उपाय उरला होता आणि कीर्ती मिळवण्यासाठी युद्धाखेरीज काय होतं ?जुगारात गमावलेली संपत्ती जिंकलेल्या खेळाडूने हरलेल्या खेळाडूला परत करायची असते कि नाही हा महाभारतातला एक नैतिक प्रश्न ज्याचे उत्तर कोणाकडेच न्हवते ! आणि जो स्वतः दास झाला आहे त्याला आपली पत्नी पणाला लावण्याचा मालकी हक्क आहे का हा द्रौपदीचा दुसरा नैतिक प्रश्न ! त्याचेही उत्तर कुणाकडे न्हवते शेवटी ही सभा गदारोळात संपली (द्रौपदीवस्त्रहरण ही नंतरची फॅन्टसी )

महाभारत युद्धाचे खरे कारण हा केऑस आहे हा एक्स्टर्नल केऑस आहे 

इंटर्नल केऑस हा अर्जुनाच्या मनात आहे युद्ध हवे 

पण युद्धभूमीवर समोर आपलेच पितामह ,गुरु आणि भाऊ समोर ठाकलेले असतील तर काय करायचे ? रामजन्मभूमीची पूजा स्वतः करायची कि ज्याचा हा मान आहे त्या लालकृष्ण अडवाणींना ही संधी द्यायची ? तुम्ही श्रीकृष्णवादी असाल तर म्हणाल पितामह गेले उडत ! मोदी श्रीकृष्णवादी आहेत म्हणून तर सगळे संजय धृतराष्ट्राकडे पाठवून दिलेत टीव्ही पहा संजयशी चर्चा करा पण युद्धात भाग घेऊ नका 

केऑस आहे आणि केऑसवर उपाय एकच स्वतःचा स्वार्थ नेमका काय ते शोधणे आणि तो साधणे मात्र हे करतांना साळसूदपणे आपण काहीतरी मोठे तत्वज्ञान सांगतोय असा आव आणणे 

अर्जुना राज्य हवे कीर्ती हवी तर लढले पाहिजे आप्तांना मारले पाहिजे युद्धे सत्ता निर्माण करतात ती हवीत नाहीतर गरिबी आहे तोच अज्ञातवास आहे तोच वनवास आहे 

कारण समोर काही फार सज्जन माणूस नाही भले त्याने भीष्म कर्ण अश्वत्थामा अशी सज्जन माणसे जमवली असतील पण सुयोधन मूळचा राजकारणी आहे एका राजकारणी माणसाला संपवायचे असेल तर दहा सज्जनांची हत्या केली म्हणून बिघडत नाही ? कोणत्या सज्जनाने चुका केलेल्या नसतात ?
ह्यांनीही केलेत तेव्हा कठोर हो मार !

मी म्हणूनच गीतेचा फॅन नाही 

सुयोधन आणि भीम ह्यांच्यात द्वंद्व आयोजित करून ह्या  द्वंदाने हा प्रश्न सहज सुटला असता युद्ध टळले असते पण मुळात युद्ध टाळायचेच नाही कर्ण हा तुमचा थोरला बंधू आहे हे सत्य पांडवांना व सर्वांना सांगून हे युद्ध टाळता आले असते पण युद्ध मूळात टाळायचेच नाहीये 

युद्धपिपासूं माणसे युद्धे टाळत नसतात हिंसा प्रिय असलेली माणसे युद्धे टाळत नसतात 

मी गीताविरोधी आहे 

श्रीधर तिळवे नाईक 



आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती १४४ कर्म म्हणजे काय ? आणि गीताच का ?


गीता रहस्याची सुरवात प्रस्तावनेने होते आणि ह्या प्रस्तावनेचा केंद्रस्थानी कर्म ही संकल्पना आहे 

मानवी आयुष्यात ज्ञान जेव्हढे महत्वाचे आहे तेवढेच  महत्व क्रियांचे  आहे प्रश्न असा आहे कि ह्या क्रियांचे स्वरूप काय ?
माझ्या मते क्रिया अनेक स्टेजमधून जातात 
त्या गुप्तावस्थेत स्पंदन 
त्या सुप्तावस्थेत स्फुरण 
त्या प्रकट अवस्थेत हालचाल 
त्या जागृत अवस्थेत कृती वा कर्म 
त्या उन्नत अवस्थेत कर्तव्य 
त्या मुक्त अवस्थेत कार्य 

असतात 

क्रिया कधीच एकट्याने होत नाहीत त्या नेहमीच समूहाने ऍक्टिव्ह असतात म्हणजे साधे बोलणे घेतले तरी त्यामागे स्मरण , व्याकरण , जीभ वैगरेंच्या हालचाली अश्या अनेक क्रिया असतात टिळकांचा भर कर्मावर आहे जे स्वाभाविक आहे कारण त्यांच्या समकालीन मानसशास्त्रीय मीमांसा त्यांच्यापर्यंत पोहचल्या न्हवत्या टिळक म्हणतात कि आपण कर्मे टाळूच शकत नाही माझे म्हणणे आपण क्रिया टाळूच शकत नाही हे खरे पण आपण ज्ञान तरी कुठे टाळू शकतो ? त्यामुळे प्रश्न टाळण्या न टाळण्याचा नाही टिळक पुढे म्हणतात त्याचे सार  "ज्या युक्तीने कर्मे केली म्हणजे पाप न लागता मोक्ष मिळतो त्या युक्तीचे ज्ञानमूलक व भक्तिप्रधान कर्मयोगाचे प्रतिपादन गीता करते कर्माकर्माच्या धर्माधर्माच्या ह्या विवेचनास आधुनिक पंडित नीतिशास्त्र म्हणतात ऍरिस्टोटल स्टोईकस कांत ग्रीन ह्या सगळ्यांचेच सिद्धांत गीतेत आहे एकट्या गीतेचे अध्ययन केले तरी ते पुरेसे आहे"

सगळं काही आमच्या प्राचीन ग्रंथात आहे ही हिंदुत्ववादी खोड चिपळूणकर टिळकांच्यापासून सुरु होते कांट सुद्धा टिळक आपल्या गीतेच्या चौकटीत बसवून वाचतात  टिळकांच्या मते गीता ह्या विचारवंतांच्या पुढे जाऊन मोक्ष भक्ती नीतिधर्म ह्यांची चर्चा करते ह्यातील मोक्ष बरोबर आहे नीतिधर्म भक्तीची चर्चा कान्टनेही केली आहे किंबहुना प्रबोधन काळात बुद्धीची मर्यादा दाखवणारा पहिला विचारवंत कांट होता अनेकांच्या मते त्यामुळेच प्रबोधनाकडून आधुनिकतेकडे जे शिफ्टिंग झाले त्याला कारण कांटचे तत्वज्ञान होय टिळकांच्या मते सांख्य न्याय वैग्रे  वैदिक दर्शने क्षेत्र ज्ञान वैग्रे निर्माण झाल्यावर ह्या सगळ्यांच्या आधारे गीता निर्माण झाल्याने हिंदू धर्माचे सारे तत्वज्ञान गीतेत उमटले आहे हिंदू धर्माचे तत्व सांगणारा गीतेसारखा दुसरा ग्रंथ संस्कृत वाङ्मयात दुसरा नाही . 

म्हणूनच टिळक गीता चर्चेला घेतात हिंदुत्वाचा प्राण हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्माचा प्राण गीता आहे एका अर्थाने त्यामुळेच हिंदुत्वाचा प्राण गीता आहे आणि गीता रहस्य ह्या प्राणांची चर्चा करतो 
श्रीधर तिळवे नाईक 


आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती १४५ गीतारहस्य ५ विषयप्रवेश 


प्रस्तावनेनंतर टिळक आरंभाकडे वळतात ह्या प्रकरणाला विषयप्रवेश असे नाव टिळकांनी दिले आहे टिळक संहितेचे परीक्षण अंतरंगपरीक्षण व बाह्यरंगपरीक्षण अशा  दोन्ही पद्धतीने करतात विषयप्रवेशात  भारतात असलेल्या विविध गीतांचा ते आढावा घेतात

विषयाची सुरवात ते युद्ध सम्पल्यानंतरच्या प्रसंगाने करतात युद्ध संपल्यानंतर निवांत बसलेले असताना अर्जुन म्हणतो गीता माझ्या लक्ष्यात नाही तू पुन्हा सांग तेव्हा भगवंत ती सांगू शकत नाहीत टिळक इथे ह्या प्रसंगात पहिल्याच प्रकरणात श्रीकृष्णाला साक्षात भगवंत मानतात हे इथे स्पष्ट होते आणि जणू काही इतरांना हे मान्य आहे ह्या थाटात ते पुढे सरकतात गीता खुद्द भगवंतांना पुन्हा सांगता येऊ नये ह्यावरून तिची थोरवी कळावी असे टिळक म्हणतात आता जी गीता साक्षात भगवंतांच्या लक्ष्यात राहिली नाही ती व्यासांच्या  कशी लक्ष्यात राहिली हे आपण विचारायचं नाही

टिळक रामायण व महाभारत ही दोन्ही महाकाव्ये इतिहास मानतात आणि गीता साक्षात भगवंतांनी सांगितली ह्यावर त्यांचा विश्वास आहे हिंदुत्ववादी हेच मानतात 

सर्व उपनिषदे गायी असून त्यांच्यातून दूध काढणारा गवळी श्रीकृष्ण आणि त्या गायींना पान्हा आणणारा सखा अर्जुन आहे ही परंपरेने आणलेली मांडणी आहे टिळक ती स्वीकारतात 

ह्या प्रतीकात्मक मांडणीनंतरच अचानक श्रीकृष्ण गवळी झाला गोपाळ झाला आणि पुढे तशी भर पडली आजही गवळी समाज श्रीकृष्णाला आपला देव मानतो आता हे स्वीकारले कि श्रीकृष्ण ओबीसी होतो किंवा गवळी क्षत्रिय होतात आर्य संस्कृतीच्या मते श्रीकृष्ण क्षत्रिय आहे गवळी समाज स्वतःला पूर्वाश्रमीचा क्षत्रिय समजतो ह्या प्रतीकात्मक मांडणीमुळे गीता उपनिषदांच्यानंतर लिहिली गेली आहे हे नक्की होते नर व नारायण हे दोन ऋषी अर्जुन व कृष्ण हे त्यांचे अवतार अशी एक कथा टिळक सांगतात म्हणजेच कृष्ण हा नारायण संप्रदायाचा होता ह्याचा हा  पुरावा होय 

टिळक पुढे गीता स्त्रीलिंगी का असा प्रश्न उपस्थित करतात व संस्कृतमध्ये उपनिषद हा शब्द स्त्रीलिंगी असल्याचे सांगत पुढे गीतोपनिषद स्त्रीलिंगी आहे व त्याही पुढे गीता स्त्रीलिंगी आहे असे सांगतात ज्याच्याशी मी सहमत आहे 

मग ते विविध गीतांची चर्चा करतात त्यात गणेशगीतेचीही चर्चा होते शैवांच्यात ज्या काही चर्चा असतात त्यातील एक चर्चा म्हणजे गणेश पुराण आधीचे कि महाभारत आधीचे ? कारण गणेश पुराणात (क्रीडाखंड अध्याय १३८ ते १४८ )जी गणेश गीता आहे ती भगवदगीतेसारखी आहे माझे स्वतःचे मत मुळात गणेश पुराण हेच आर्यांनी रचलेले आहे पण गीता ही शैव वाटण्याचे गणेश गीता हे एक मोठे कारण आहे गीता अनेक होत्या हे तर उघडच आहे आणि ह्या गीतांच्यापैकी अष्टावक्राची गीता ही गीताचं न्हवे तिला गीता म्हंटल गेलं अष्टावक्राची ही संहिता  शैवांच्यात ब्रम्हदर्शनाची विस्तार मानतात तर आर्य ती आर्य गीता मानतात व ती आता गीता म्हणून सेटल झाली आहे यमगीता शिवगीता सूर्यगीता  व  ईश्वरगीता ह्या  शैव धर्म गीतेला स्वीकारतो हे दाखवण्यासाठी दिशाभूल करण्यासाठी लिहिल्या आहेत  इतर  गीता शिळ्या वाटून भगवद्गीता ज्यादा ताजी वाटते ह्याचे कारण टिळक देत नाहीत माझ्या मते महाभारताचे जे बॅकग्राउंड आहे ते जबरदस्त काव्यात्मक आहे त्याचा फायदा भागवद्गीतेला मिळतो एका अर्थाने शंकराचार्यांनी परफेक्ट जागी परफेक्ट सिच्युएशनला गीता नावाचे पेस्टींग केले आहे  शिवाय कपिल गीता रामगीता हंसगीता भिक्षूगीता अशा गीता आहेतच 

जे आपलं नाही त्यावर शैवांनी क्लेम करू नये असं माझं मत आहे गीतवाङ्मय ही आर्यांची निर्मिती आहे आणि वैष्णव झालेल्या शैव ब्राम्हणांनी शिवगीता यमगीता ,गणेशगीता, सूर्यगीता  व  ईश्वरगीता लिहिल्या आहेत त्यामुळे शैवांचे नुकसानच झाले आहे गीतेने शैवांची उसनवारी केली आहे ती व्हाया सांख्य पतंजली योग न्याय ह्यां सारख्या स्रोतांमार्फत मोक्ष प्रथम शिवांनी शोधला हे आर्य परंपरेला मान्य आहे त्याने उपाय दिले हेही त्यांना मान्य असते पण कुठलीही संस्कृती परकी संस्कृती जशी आहे तशी स्वीकारत नाही ती त्या संस्कृतीला आपल्या संस्कृतीत विरघळवुन पिते आर्यांचेही तेच झाले आहे त्यांनी शैव संस्कृती आत्मसात केली आणि पुढे तिला आपल्या पद्धतीने विकसित केले गीता ही आर्य संस्कृतीने शैव संस्कृती किती खोलवर आत्मसात केली त्याचा पुरावा आहे मात्र ह्या आत्मसातीकरणानंतर आर्यांनी आपली वर्णव्यवस्था व वर्चस्ववादी वृत्ती झुगारली नाही कारण आर्यांना विशेषतः ब्राम्हण व क्षत्रियांना आपले वर्चस्व गमवायचे न्हवते गीतेत ह्याचे प्रतिबिंब आहे 

श्रीधर तिळवे नाईक 

सुनील तांबे ह्यांची कॉमेंट आणि माझे उत्तर 

आपण पारंतत्र्यात आहोत हे इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांना कळलं होतं. स्वतंत्र व्हायचं तर आपल्या राष्ट्र-राज्याचा आधार कोणता? हा पेंच होता.
डोळ्यासमोर युरोपचं मौडेल होतं. धर्म, भाषा, वंश यावर आधारलेल्या राष्ट्र-राज्याचं.
अडचण अशी होती की भारतात सर्व धर्म होते, त्याशिवाय जाती आणि वंश, शेकडो भाषा. प्रांतिक अस्मिताही होत्याच. पंजाब, बंगाल, महाराष्ट्र, इत्यादी.
त्यामुळे जे या भूभागात राहातात ते भारतीय अशी भूमिका काँग्रेसने १८८५ साली घेतली.
राष्ट्र निर्मिती, राष्ट्र उभारणी, स्वातंत्र्याचा लढा आणि लोकशाही प्रक्रिया सामान्यपणे एकाचवेळी सुरु झाल्या.
त्यामध्ये अनेक ताणेबाणे होते, अडथळे होते. परंतु लोकशाही, सर्वधर्म समभाव आणि वसाहतवाद विरोध ही मूल्यं १८५७ ते १९४७ या काळात समस्त भारतीयांनी स्वीकारली होती. वसाहतीचं स्वराज्य ही मागणी १९३० पर्यंत होती, त्यानंतर संपूर्ण स्वातंत्र्य ही मागणी पुढे आली.
गांधीजींची हत्या केल्याने हिंदुत्ववादी राजकीय व सामाजिक जीवनातून दूर फेकले गेले. मात्र धार्मिक राष्ट्रवाद - हिंदू, मुस्लिम व शीख यांचा, होताच. त्याशिवाय तमिळ हा वांशिक राष्ट्रवादही होता. गांधींपासून कलबुर्गींपर्यंतच्या हत्या हिंदुराष्ट्रवाद्यांनी केल्या. फुटीर राष्ट्रवादाने इंदिरा गांधी तर वांशिक राष्ट्रवादाने राजीव गांधी यांचा बळी घेतला.
संपूर्ण भारतीय उपखंडाला शैव आणि आर्य या बायनरीत पाहाणं हा द्रुष्टीदोष आहे.
माझे उत्तर श्रीधर तिळवे नाईक 
माझा दृष्टिदोष आहे कि तुमच्या दृष्टीची मर्यादा हे येणारा काळ ठरवेल तुम्ही जो काळ सांगता तो भारतीय इतिहासाचा एक तुकडा आहे आणि ह्या तुकड्यात शैवांच्या बाजूने फक्त फुले आहेत हे मी आधीच मान्य केले आहे फुले अनार्य असा शब्द वापरतात मी शैव वापरतो त्याची कारणे फेसबुकवरच मी दिली आहेत राष्ट्र उभारणीची गरज फुल्यांना का वाटत न्हवती आणि ब्राम्हणांना ती का वाटत होती त्याचीही कारणे मी चर्चेला घेतली आहेत भारतीय राष्ट्रवादातील सेक्युलर हिंदुवाद विरुद्ध हिंदुत्ववाद ही बायनरी तुम्ही मान्य करता कि नाही ? ह्या बायनरीतून बाबासाहेब आंबेडकरांनी तिसरा पर्याय काढला तो बौद्ध राष्ट्रवादाचा अवघा भारत बौद्धमय करेन अशी त्यांची प्रतिज्ञा होती ती प्रत्यक्षात पूर्ण झाली असती तर मला आनंदच झाला असता मी स्वतः १९८६ पासून बौद्ध मेनस्ट्रीममधून कविता  लिहीत होतो जेव्हा अवघा भारत बौद्ध होणे अशक्य आहे हे माझ्या कन्फर्मली लक्ष्यात आले तेव्हा एकच प्रश्न होता ह्यावर उपाय काय ? कम्युनिझम हा मला कधीही सशक्त पर्याय वाटला नाही कारण हा देशच मुळात धर्मांचा देश आहे इस्रायल व्हॅटिकन अरेबिया आणि इंडिया हे असे चार देश आहेत ज्यांनी धर्म/मोक्ष  जन्माला घातलेत ह्या चारही ठिकाणी कम्म्युनिझम अशक्य आहे त्यामुळे शेवटी मी पुन्हा जिथून आलो होतो तिथेच पोहचलो शैव धारा ! ह्या देशाला बौद्धमय करता येणे शक्य नसेल तर शैवमय तरी नक्कीच करता येईल असे मला पुन्हा वाटायला लागले मुख्य म्हणजे ह्या देशातील बहुजनसमाजाला वर्णजातममुक्त कसे करता येईल हा प्रश्न आहे श्रमाला प्रतिष्ठा कशी प्राप्त करून देता येईल हा प्रश्न आहे दारिद्याचे कसे नाहीसे करता येईल हा प्रश्न आहे आणि हे  प्रश्न आगमवादाने (शैव जैन बौद्ध ) सोडवता येतील असे मला वाटते तुम्ही भूतकाळातील राष्ट्रवाद पाहता आहात जे  वैष्णव आहेत  मी भविष्यकाळातील राष्ट्रवाद पाहतो आहे जो आगमिक शैव आहे 
श्रीधर तिळवे नाईक 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट