टारगेट कोण होतंय अर्थात टारगेटीकरण मतलब टार्गेटॉस श्रीधर तिळवे नाईक
हरी नरके ह्यांच्याबाबत जे झाले ते निषेधार्हच आहे ओबीसी आणि बीसी विभागले जावेत अशी इच्छा असलेले दोन्ही बाजूचे लोक ज्या कारवाया करतात त्यातील ही एक ! हरी नरक्यांशी माझं काहींबाबतीत कधीही पटलं नाही ते प्रचंड आरक्षणकेंद्री आहेत आहेत असं मला वाटतं पण जेव्हा जेव्हा ते आरक्षणाच्या बाहेर जातात तेव्हा मग सामाजिक शोधाचे उत्तम विचारवंत ठरतात गेली कित्येक वर्षे ते ओबीसी समाजाला आंबेडकरांचं महत्व पटवून द्यायचा प्रयत्न करतायत पण त्यांना फार यश मिळालेलं दिसत नाही आपल्यापेक्षा खालच्या जातीचा विचारवंत भारतीयांना चालत नाही त्यामुळं हे होणं अवघड ! भारतीयांना आपल्या जातीचा वा समवर्णीय माणूस विचारवंत म्हणून पटतो किंवा आपल्यापेक्षा उच्चवर्णीय व उच्चजातीय ! त्यामुळे आंबेडकरांना स्वीकारणं आजही अनेकांना अवघड जातं भगवान शंकर किरात आदिवासी असल्याने मी त्यांना स्वीकारू शकत नाही असं म्हणणारा एक दलित महाभाग मला भेटलेला आहे शंकराच्या काळात सगळी मानवजातच आदिवासी होती असं म्हंटल्यावर मग तोंडाला कुलूप !
दुसरी मानसिकता म्हणजे आंबेड्करांच्यावर फक्त आमचा अधिकार आहे दलित साहित्य म्हणजे जे वर्णाने दलित आहेत त्यांनीच लिहिलेले साहित्य इतर वर्णियांनी लिहिलेलं दलित साहित्य आम्ही मानत नाही असं म्हणणारे संकुचित लोक ! ह्याच लोकांनी हरी नरकेंना बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगून सांगून मोठा झालेला विचारवंत म्हणायला सुरवात केली म्हणजे दलित विचारवंत बाबासाहेबांचे विचार सांगून मोठे झाले तर चालतात पण बाकीच्या लोकांनी बाबासाहेबांचे विचार सांगून मोठं व्हायचं नाही वस्तुस्थिती अशी आहे कि बाबासाहेबांचे विचार सांगून ओबीसी विचारवंत मोठा होणे दूर उलट त्याला स्वतःच्याच ओबीसी प्रवर्गाच्या शिव्या खाव्या लागतात
तिसरी गोष्ट म्हणजे नरके महात्मा फुले ह्यांचे विचार समग्र पद्धतीने मांडतात आणि फुले विचार प्रसारातील त्यांचे योगदान हे निश्चितच उच्च दर्जाचे आहे
ज्या संदर्भात हे सगळं प्रकरण घडलं ती दारू सर्वांनीच सोडायला हवी गरीब घरांना दारू ही प्रचंड तापदायक ठरते आहे ही वस्तुस्थिती ह्यावरून वाद होऊ शकत असेल तर त्याचीही मांडणी करायला हवी माझी स्मरणशक्ती धोका देत नसेल तर अभय बंग ह्यांनी दारूचे अर्थशास्त्र मांडून दारू किती हानी पोहचवते हे पटवले आहे त्याचा प्रतिवाद अजूनही नीट कुणी केलेला नाही खुद्द बाबासाहेबांनी दारू पिण्यास मनाई केलेली आहे तुम्हाला जर तुमच्या व्यसनावर नियंत्रण मिळवायचे नसेल तर तुम्ही तुमची बाजू नीट पोहचवली पाहिजे बर्फाळ प्रदेशात दारू आवश्यक होती कारण पूर्वी कपडे विशेषतः उबदार कपडे हे फक्त श्रीमंतांना उपलब्ध होते गरिबांना टोकाच्या थंडीत दारू हीच आधार होती आता तसे राहिलेले नाही आणि युरोअमेरिकेतच व्यसनमुक्तीची चळवळ मूळ धरते आहे कारण दारूने किक न चढणारी पिढी गर्द हशिश अफिम गांजा सारख्या नशील्या पदार्थाने ग्रासून गेली आहे अमेरिकेचा किमान १० ते २५ टक्के पैसा ह्या नशील्या पदार्थावर वाया जातो आहे खरेतर काही आकडे सांगतात कि जवळजवळ निम्मे पैसे ! पंजाब पूर्ण ह्या विळख्यात सापडला आहे आठ तास मेहनत करून कमावलेला पैसा दोन तासाच्या पैश्यात फुंकून टाकणारी मंडळी आपल्या आसपासच आहेत अशावेळी दारू सोडा म्हणून कोणी सांगत असेल तर ते योग्यच आहे
ह्यानिमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे दलितांना आपण सतत टारगेट केले जात आहोत असं का वाटतं ? हे वाटणं खरं आहे कि हा कॉम्प्लेक्स आहे ? जर हे वाटणं हे खरं असेल तर सर्वांनीच ह्यावर विचार करायला हवा सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे हल्ली ब्राम्हणांनाही ब्राम्हण टार्गेट केले जात आहेत असं वाटतं भारतीय समाजातील दोन टोकांना एकच फिलिंग यावं हा काय प्रकार आहे ?
हीच टार्गेट होत असल्याची भावना स्त्रियांच्यातही प्रचंड पसरतांना दिसते आहे हा काही नवा सायकॉसिसचा किंवा सामूहिक सायकॉसिसचा प्रकार किंवा सेमिऑटिक सायकॉसिसचा प्रकार जन्म घेतो आहे का ज्याला टारगेटीकरण टार्गेटॉस म्हणता येईल ? कि सक्सेस ही महादेवता असलेल्या ह्या काळात सक्सेस मिळाले नाही कि आपण ब्लेमगेम सुरु करतो आहे ? स्वतःच्या अपयशाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घ्यायला आपण कचरतो आहे का ? कि कार्पोरेटशाहीची ही अपरिहार्य परिणीती आहे आणि हे सर्व ह्या नव्या जागतिकीकरणातील ग्लोबल कार्पोरेटीझममुळे घडते आहे ?
नशा मग ती दारूची असो कि ड्रगची आजच्या काळात धर्माची रिप्लेसमेंट आहे मार्क्सवादी भाषेत सांगायचे तर एकेकाळी धर्म अफूसारखा होता आता अफू आणि तिची भावंडं नवा धर्म बनत चाललेत कारण शांतीची गरज माणसाला सदासर्वकाळ वाटत राहिली आहे आणि फेक शांती प्रोव्हाइड करणं ह्यात नशा वाकबगार ! स्पर्धा आत्मशांती हिसकावून घेते आणि कार्पोरेटशाहीचा कणाच स्पर्धा आहे त्यामुळे दिलेली टार्गेट कम्प्लिट करणं म्हणजे यश असं नवं समीकरण आपण जन्माला घातलंय आणि मग यश मिळालं म्हणून पार्टी आणि नाही मिळालं तर गममें पार्टी अपयशाचं खापर फोडायला भारतीय जातिवर्णव्यवस्था ही एक उत्तम व्यवस्था आहे ह्या व्यवस्थेत सगळे एकमेकाला ब्लेम करू शकतात त्याने निचरा होतो पण समस्या जागची हलत नाही
नशा कल्पनेत पहाड हलवते प्रत्यक्षात पहाड हाडे मोडेस्तोवर मेहनत करून तोडावे लागतात
श्रीधर तिळवे नाईक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा