वेद शैवांचे आणि वेद आर्यांचे श्रीधर तिळवे नाईक
सुरवातीला कित्येक शतके आर्य आपल्या संस्कृतीला वैदिक वा ब्राम्हण संस्कृती म्हणत होते पण जशी जशी आर्यांना स्वतःची संस्कृती स्वायत्त ठेवण्याचा चस्का लागला तसे नवे नामकरण आवश्यक वाटायला लागले त्यातून मग आर्य धर्म आर्य संस्कृती हे शब्द प्रचलित झाले ह्याचं कारण वेद व ब्राम्हण हे दोन्ही शब्द मूळचे अनार्य द्रविड तामिळ शब्द होते आणि आर्यांनी ते उसने घेतले होते पण आर्य संस्कृतीत पुढे पुढे वेदांची महती इतकी वाढत गेली कि वेद हा शब्दच जणू आर्यांचा असल्याच्या थाटात वापरला जाऊ लागला हीच गोष्ट ब्राम्हण शब्दांची वास्तविक जगभर म्हणजे रशिया युरोप भारत अफगाणिस्तान आर्य ह्या काळात पुरोहितांसाठी एकच शब्द वापरत होते तो म्हणजे सामन वा शामन साम म्हणजे प्रार्थना जो प्रार्थना रचतो गातो तो शामन वा सामन भारतातील आर्यही हाच शब्द वापरत होते पुढे भारतात ह्या शब्दाला श्रमण असे सुंदर रुपडे प्राप्त झाले व श्रमण हा शब्द असुर आर्य विशेषतः जैन व बौद्ध सर्रास वापरू लागले ह्याउलट शैव संस्कृतीत भगत , गुरव , जंगम व ब्राम्हण हे शब्द प्रचलित होते
शैवांचा जो भगत आहे तोच आर्यांचा शामन आहे दोघांचे काम प्रार्थना व मंत्र तंत्र आहे शैवांच्यात मंत्र रचणाऱ्या लेखन करणाऱ्या लोकांना उद्देशून ब्राम्हण हा शब्द वापरला जात असे ह्या अर्थाने आजचे सर्व लेखक हे ब्राम्हण आहेत मात्र हे कर्म जन्माप्रमाणे न्हवते कोणीही हे कर्म करू शकत असे त्याउलट गुरवांचे काम हे लेखन सादर करणे पूजा अर्चना करणे संस्कार करणे हे होते त्यामुळे गावात गुरवांना प्रत्येक उत्सवात शैव ब्राम्हणाने लिहिलेले नाटक दिग्दर्शक म्हणून बसवून सादर करावे लागे कालिदास वैग्रे सर्व नाट्यलेखक हे त्यामुळेच शैवब्राम्हण आहेत आणि त्यांनी प्राकृतात लिहिलेली नाटके पुढे संस्कृतमध्ये भाषांतरित केली गेली
इसवीसनपूर्व १५०० नंतर आर्य लोकांनी स्वतःच्या देवांचे मंत्र स्वतःच रचायला सुरवात केली आणि त्यातूनच पुढे संहिता तयार झाल्या आणि पुढे व्यासांनी ह्यांचे एडिटिंग करून दोन वेदांची निर्मिती केली ऋग्वेद आणि यजुर्वेद जे असुर आर्य होते त्यांनी दोन वेदांची निर्मिती केली १ अवेस्ता २ अथर्ववेद पुढे ब्राम्हणांनी ऋग्वेदातून सामवेद निर्माण केला आणि अथर्ववेद असुरांचा असूनही स्वीकारला गेला कारण सूर असुरांचा झगडा भारतात सम्पला
पुढे व्यासांनी आर्य महाभारत लिहिले आणि वाल्मिकीने आर्य रामायण ह्या रामायणात रावणाचा उल्लेख करताना तो वेदपंडित होता असा उल्लेख यायला लागला आणि चार वेद हे शिवानेच दिले असे सांगितले जाऊ लागले आणि ह्यातून अलीकडे खूपच गोंधळ माजलेला दिसतो
प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे ? वस्तुस्थिती अशी आहे कि शिवाने चार वेद दिले हे खरं आहे पण हे वेद आर्यांचे वेद न्हवेत शिवांनी
१ आयुर्वेद
२ ज्योतिषवेद
३ नाट्यवेद
आणि
४ शस्त्रवेद
हे चार वेद दिलेत आणि रावण ह्या चारी वेदात निपुण होता रावणाने सगळे ग्रह आपल्या मांडीखाली ठेवले होते ह्याचा अर्थ त्याला ज्योतिष येत होते त्याला दहातोंडे होती ह्याचा अर्थ तो उत्कृष्ट मेकप करून दहा चेहऱ्यांनी बोलू शकत असे कारण नाट्यवेदाचा तो मास्टर होता आणि त्यामुळेच सीतेला संन्याश्याचे रूप घेऊन तो चकवू शकला तो उत्कृष्ट वैद्य होता आणि शस्त्रात तो वाकबगारच होता
शैव ब्राम्हण व शैव गुरु(गुरव ) ह्या दोघांनाही हे चार वेद शिकणे सक्तीचे होते रावण हा शैव ब्राम्हण होता वैष्णवांनी त्याला नंतर भ्रष्ट रूप दिले
तेव्हा शैव वेद हा शब्द वापरतात तेव्हा त्याचा अर्थ १ आयुर्वेद २ ज्योतिषवेद ३ नाट्यवेद आणि ४ शस्त्रवेद असा होतो हे आर्य आणि शैव ह्या दोघांनीही लक्ष्यात घ्यावे शैवांच्यातील भगतांची स्थिती जशीजशी ढासळत गेली तसे त्यांनी आपले मंत्रतंत्र काम आर्यांच्यात न्हेले आर्यांचे शामन वा सामन व शैवांचे भगत ह्यांनी आर्यांचे वेद रचले आहेत काही शैव ब्राम्हणांनीही शैवांचे चार वेद शिकून मास्टर करणे कठीण वाटल्याने वैदिक संस्कृती स्वीकारून आर्यन वेदांच्या निर्मितीत महत्वाचा रोल निभावला आहे
शैवांच्या चार वेदांचा आद्य प्रणेता मास्टर म्हणून आपण शंकरांचा सन्मान करतो त्यांच्या दोन मुलांनी प्रत्येकी दोन वेद मास्टर केले आयुर्वेद व ज्योतिषवेद हे गणपतीने तर नाट्यवेद व शस्त्रवेद कुमारने त्यामुळेच आजही धर्मांन्तरित होऊनही वैद्य व ज्योतिषी आरंभ शिवपुजनाने व गणपतीपूजनाने करतात ओम शिवाचा तर गणपतये गणपतीचा असतो आर्यांनी शस्त्रवेद क्षत्रियांना तर नाट्यवेद शूद्रांना देऊन टाकला आहे एक काळ असा होता कि शैव आपल्या मुलाच्या मागे कुमार हे नाव शंकराच्या मुलाचा सन्मान करण्यासाठी वापरत त्यामुळे कुमार श्रीधर असे लिहीत आज ही फक्त प्रथा उरलीये आपण कुमार का लिहितो हेच शैवांना माहित नाही कालांतराने मुलींच्याही आधी कुमारी लिहिले जाऊ लागले ह्यामागे कारण मुलगा कुमारसारखा निर्भय व योद्धा व्हावा अशी इच्छा असे कालिदासाने (ह्याच्या नावातच काली आहे तरी तो आर्य असल्याचा समज आहे )आपल्या शंकर पार्वती ह्या प्रणय नाटकाचे नाव कुमारसम्भवम ठेवले आहे कारण शंकर पार्वतीत जे घडले ते सर्व शस्त्रनिपुण कुमारचा जन्म व्हावा म्हणून घडले असे कालिदास मानतो
आणखी एक गोष्ट इथे सांगणे गरजेचे आहे ज्योतिष हा शब्द शैव ऍस्ट्रॉनॉमी ह्या अर्थाने वापरतात पण त्यात भूगोलाचाही समावेश होतो थोडक्यात ज्योतिष म्हणजे पंचमहाभूतांचे ज्यात अंतरिक्षही येते आणि भूमीही ज्ञान होय ऍस्ट्रोलॉजीसाठी शैवांच्यात फलज्योतिष असा स्वतंत्र शब्द आहे आणि फलजोतिष ही शैवांच्या मते कला आहे शास्त्र न्हवे आणि मी नेहमीच म्हणतो कि सरकारने फलज्योतिषाला कलेचा दर्जा द्यावा व त्याकडे प्राचीन शैव जसे करमणूक करणारी कला म्हणून पहात होते तसे करमणूक करणारी कला म्हणून पहावे त्यामुळे सद्या जो दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप येतो तो येणार नाही चॅनेल्स , साईट्स व वर्तमानपत्रांनीही फलज्योतिष छापताना वा सांगतांना आम्ही फलज्योतिष ही कला मानतो असे सांगावे म्हणजे त्यांच्यावरही दुटप्पी असण्याचा आरोप येणार नाही आणि त्याचा आस्वाद घेणारे त्याकडे जादूच्या प्रयोगाकडे पहावे तसे पाहतील आणि त्याचे जे दुष्परिणाम होतात ते होणार नाहीत किमान कमी होतील अलीकडे आलेल्या भविष्यविज्ञानाला (फ्यूचरॉलॉजी )मात्र शास्त्राचा दर्जा द्यावा
गमतीचा भाग असा कि एकेकाळी शैव वैद्यांना वैदू म्हणवून हिणवणारे लोकच आता आयुर्वेद आयुर्वेद म्हणून गळा काढतायत अनेकांना हेही माहित नाही कि काही वैदिक राज्यात वैद्याचा दर्जा हा शूद्राचा होता कारण वैद्य शैव होते असो
माझं स्वतःचं स्पष्ट मत असं आहे कि सर्व ब्राम्हणांनी आता ह्या आर्यन वेदांचा धर्मग्रंथ म्हणून त्याग करून शैव वेदांचा स्वीकार करावा किमान जे मूळचे शैव आहेत त्यांनी पुनः शैव वेद स्वीकारावेत हे उत्तम तुम्ही मूळ शैव होता कि नाही हे ओळखण्याची साधी खूण तुमचे कुलदैवत आहे ते जर शिव पार्वती कार्तिकेय स्कंद गणपती वा सूर्य ह्या शैव पंचायतनांपैकी एक असेल तर तुम्ही मूळचे शैव आहात
आणि धर्म ह्या गोष्टींचाच त्याग केलात तर मस्तच !
श्रीधर तिळवे नाईक
दर्शने शैवांची आणि दर्शने आर्यांची श्रीधर तिळवे नाईक
दर्शने शैवांची
१ नाथ दर्शन योगदर्शन आदिनाथ जैन ह्यातूनच
२ तंत्र दर्शन पार्वती कापालिक दर्शन
३ ईश्वर दर्शन ईश्वर माणूस बनतो माणसाला ईश्वर बनवणे गावात शिवाचे वर्णन अनेकदा कुंडलेश्वर अघोरेश्वर वैग्रे केले जाते ते यामुळेच आर्य अनेक देवांना मानतात भक्ती नारद नयनार संत भक्ती चळवळ अलख दर्शन नानक दर्शन साईबाबा दर्शन
४ पाशुपत ज्ञान प्रथम गणपतीला नकुलीश दर्शन पाशुपत काश्मीर दर्शन सिद्धांत
५ शाक्त दर्शन
६ स्कंद दर्शन
७अघोर दर्शन
८ अलख दर्शन
९ औलूक्य दर्शन
१० नयनार दर्शन
११ लिंगायत दर्शन
उपदर्शने
सांख्य , जैन , बौद्ध , वेदांत , योग , न्याय
दर्शने आर्यांची
१ चार्वाक
२ सांख्य
३ योग
४ न्याय
५ वैशेषिक
६ मीमांसा
७ वेदांत
८ वैष्णव
९ हिंदू

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा