आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ११२ ते १२७

बंगालची फाळणी १ श्रीधर तिळवे नाईक
दुसरे भारतीय प्रबोधन बंगालवर सर्वप्रथम ब्रिटिशांनी राज्य केले म्हणून सुरु झाले असले तरी राजाराम मोहन रॉय ह्यांच्यानंतर तेथे फार मोठ्या राजकीय हालचाली झाल्या नाहीत कारण बंगालमध्ये ब्रिटिश राज्य हे ईश्वरी कृपाप्रसाद होता ज्याने हिंदू बंगालींची मुस्लिम सुभेदार व अधिकाऱ्यांच्यापासून सुटका केली होती प्रार्थना समाजाद्वारा ही बंगाली रॉयिस्ट कृपाप्रसाद थेरी लोकहितवादी रानडे व इतर नेमस्तांनी आणण्याचा व पटवण्याचा प्रयत्न केला असला तरी ती महाराष्ट्रात स्थिरावणे शक्य न्हवते कारण महाराष्ट्रावर मुस्लिमांचं राज्य न्हवत बंगाली लोकांच्या उलट महाराष्ट्रात मराठ्यांना आपले साम्राज्य गमवावे लागले होते साहजिकच जिचे राज्य होते त्या चित्पावन ब्राम्हण कम्युनिटीला बंगाली ब्राम्हणांना ब्रिटिश राजवटीत दिसणारा कृपाप्रसाद दिसत न्हवता
मराठा साम्राज्यात ह्या काळात व्यापार धंद्यात पारशी लोकांचा बऱ्यापैकी सहभाग होता आणि इंग्रजांच्यामुळे सुरवातीच्या काळात त्यांना तोटा झेलावा लागला होता पारश्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा होता कि इंग्रजांनी व्यापार मोडून टाकल्यावर हिंदू व मुस्लिम व्यापारी ज्याप्रमाणे शेतीत परतले तसे ते परंतु शकत न्हवते कारण ते स्थलांतरित होते ह्याला काही पारशी अपवाद होते पण एकंदरच बऱ्याच जणांची अवस्था व्यापाराबाबत जिना यहाँ मरना यहां अशी होती शेवटी इंग्रज व्यापाराचे उपव्यापारी किंवा दलाल बनून स्वतःला टिकवण्याचा त्यांनी प्रयत्न चालवला ज्यावर ते आतून नाराज होते त्यामुळे मराठी लोकहितवादी आणि पारशी दादाभाई नौरोजी ह्या दोघांनाही अनुक्रमे अमेरिका व फ्रांस ह्यांच्याप्रमाणे भारतात इंग्रजांविरुद्ध क्रांती होईल अशी स्वप्ने पडत होती आगरकर टिळकांच्यावर ह्या दोघांचा परिणाम होता ह्यातील आगरकर हे सामाजिक राजकीय धार्मिक अशा सर्वच पातळ्यांवर कट्टर जहालवादी होते टिळकांचा जहालपणा फक्त राजकीय क्षेत्रापुरता मर्यादित होता एका अर्थाने टिळक राजकारणी होते त्याचे भारतीयांना फायदेही झाले आणि तोटेही ! फुल्यांचा सामाजिक जहालवाद
, रानडेंचा संपूर्ण नेमस्तवाद , आगरकरांचा संपूर्ण जहालवाद आणि चिपळूणकर टिळकांचा राजकीय जहालवाद ह्यांच्यात कोण बाजी मारणार हा प्रश्न होता आणि ह्या प्रश्नाचे उत्तर दादाभाई नौरोजी कुठल्या बाजूने कलणार त्यावर अवलंबून होते दुर्देवाने आगरकर निधन पावले आणि संपूर्ण जहालवाद मागे पडला सावित्रीबाई फुले ह्यांच्या मृत्यूनंतर सामाजिक जहालवादही फिका पडायला लागला आणि लढाई उरली ती रानडेंचा संपूर्ण नेमस्तवाद व चिपळूणकरांचा राजकीय जहालवाद ह्यांच्यात ह्या दोघांनाही गोखले आणि टिळक असे समर्थ वारस मिळाल्याने ती रंगलीही
टिळकांनीच काँग्रेसमध्ये लोकशाही आणली नाहीतर तत्पूर्वी काँग्रेसमध्ये कसेही निर्णय होत टिळकच ह्या काळात ज्याला आपण आज मास म्हणतो त्याची भाषा बोलत होते अन्यथा तोपर्यंत काँग्रेस ही एक अभिजनांची संघटना होती ज्यांना ब्रिटिश सरकारमध्ये अधिकाधिक जागा कश्या मिळवता येतील ह्यात रस होता
ह्या जहाल मवाळ वादातून स्वदेशी , स्वराज्य , बहिष्कार , अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्यात प्रेसचे स्वातंत्र्य येते आणि राष्ट्रीय शिक्षण हे पाच फ़ंडे उदयाला येत गेले आणि भारतीय स्वातंत्र्याचा लढा कायदेशीर चौकटीत चालवावा लागणार हे तत्त्वही ! ह्यातील काही फ़ंडे लोकहितवादींनी दिले होते तर काही पुण्याच्या सार्वजनिक काकांनी ! टिळकांनी ह्या सगळ्या फंड्यांना धोरणात बदलले काँग्रेसमार्फतच हा लढा चालवला पाहिजे हा टिळकांचा आग्रह होता ह्या काळात नेमस्त पुढेपुढे जात होते खरे पण मागे कोणी येतंय कि नाही ते पाहायला विसरत होते तर जहाल मागे जनता येतीये कि नाही ते पहात पुढे जात होते आणि जनता मागे यावी म्हणून जनतेच्या श्रद्धा जपत होते ह्या वादाविषयी मागे चर्चा केली आहेच
हा वाद सुरु असतांनाच १८९९ साली लॉर्ड कर्झनची हिंदुस्थानचा व्हॉईसरॉय म्हणून नेमणूक झाली आणि भारतीय राजकारणाची दिशा कर्झन काय करणार त्यावर ठरणार हे पक्के झाले १९०१ साली रानडेंचा मृत्यू झाला आणि नेमस्तांना सर्वमान्य असा एकच नेता उरला तो म्हणजे दादाभाई नौरोजी ज्यांच्याविषयी टिळकांना आदर होता साहजिकच नेमस्तांना तरुण नेत्याची गरज होती ती गोखले ह्यांनी पूर्ण केली
कर्झनची राजवट ही तीन गोष्टींनी भरून गेली प्लेग ,दुष्काळ व फाळणी ! जनतेची उपासमार आणि तिजोरी काठोकाठ भरलेले सरकार अशी ह्यावेळी अवस्था होती आणि लोकांना ती दिसायला लागली तुम्ही मरा पण टॅक्स द्या हे सरकारचे धोरण होते तीन कोटी लोक मेले तरी सरकार टस कि मस होत न्हवते गेंड्याची कातडी कमावलेले असे सरकार तोपर्यंत जनतेने पाहिले न्हवते वारंवार पडणारे दुष्काळ हे नित्याचे झाले आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी ह्या दुष्काळांचा अभ्यास करून काँग्रेसच्या अध्यक्षीय भाषणात एक सिद्धांत मांडला ज्याचा पुढे वैज्ञानिक पद्धतीने विस्तार करून अमर्त्य सेन ह्यांना नोबल मिळाले सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या मते हे दुष्काळ इतरत्रही होते पण लोकांच्याकडे दारिद्र्य नसल्याने इतर प्रांतातून धान्य आयात करून लोक जिवंत रहात पण भारतात मात्र दुष्काळ मानवनिर्मित आणि सरकारनिर्मित आहेत ब्रिटिश साम्राज्याने लोकांना इतके कंगाल बनवले आहे कि लोकांची खरेदीक्षमता शून्यावर आलेली आहे त्यामुळे दुष्काळ पडला कि लोक खरेदीक्षमता नसल्याने अन्न खरेदी करू शकत न्हवते व नाहीत आणि त्यामुळेच १९ व्या शतकात पहिल्या पंचवीस वर्षात पाच दुष्काळात दहा लक्ष मग दुसऱ्या पंचवीस वर्षात फक्त दोनच दुष्काळामुळे पाच लक्ष मग तिसऱ्या पंचवीस वर्षात पन्नास लाख आणि शेवटच्या पंचवीस वर्षात तब्बल अठरा वर्षे दुष्काळाची गेल्याने दोन कोटी साठ लक्ष लोक मृत्यू पावले आहेत जसेजसे अधिकाधिक लोक निर्धन झाले तसे तसे दुष्काळ अधिक भीषण झाले जसे जसे सरकारी टॅक्सेशन व शोषण वाढले तसेतसे लोकांचे मृत्यू वाढले
खरेतर बॅनर्जी मवाळ असल्याने फार सौम्य भाषेत बोलत होते पण त्या सौम्यपणातही संताप होता शाहू महाराज सयाजीराव गायकवाडांच्यासारखे मोजके संस्थानिक वगळता ह्या काळातही भारतीय शासकवर्ग हे रोग व दुष्काळामुळे झालेले मृत्यू थंडपणाने आपली ऐयाशी सांभाळत पहात होता जणू हे सगळे संस्थानिक नॅनो कर्झन होते नेहमीप्रमाणे जनतेविषयी पूर्ण बेफिकीर !
प्रश्न असा आहे कि ह्या सगळ्या शासकांना ब्राम्हण ब्राम्हणेतर वाद घालणारे लोक जनतेच्या कामासाठी का प्रवृत्त करत न्हवते ? वास्तविक ही एक क्षत्रियांना ते कसे ब्राम्हणेतरांसाठी उत्तम आहेत हे सिद्ध करण्याची उत्तम संधी होती पण उपभोगात रमलेल्यांना काय पडलंय हो ? ब्राम्हणेतरांचे तत्वज्ञान जर ह्या संस्थानिकांच्या मार्फत प्रत्यक्ष राबवले गेले असल्याचे दिसले असते तर ब्राम्हणेतर चळवळीला फायदा झाला असता पण ब्राम्हणांना शिव्या घालणे एव्हढाच अजेंडा उरल्यावर कसलं दुष्काळी काम आणि कसला दिलासा ?
अर्थात शाहू महाराजांसारखे अपवाद होते पण त्यामुळे नियम सिद्ध होत होता
ह्या पार्श्वभूमीवर कर्झन ह्याने १८५८ साली झालेला राजा प्रजा करार हा ऑफिशियल करार नाही असे स्पष्टपणे सांगितले आणि ब्रिटिश साम्राज्यशाही हा ब्रिटिश भांडवलशाहीचा काळा भाग आहे हे जणू सिद्ध केले कच्चा माल फुकटात न्हेणे आणि पक्का माल प्रचंड किमतीने विकणे आणि हे करण्यासाठी राजवट टिकवणे हे ब्रिटिशांचे धोरण कर्झनने अधिकच क्रूर केले आजच्या भाषेत सांगायचे तर भारतीय जनता ह्या काळात ओबीसी शूद्र आणि बीसी अतिशूद्र बनली होती आणि इंग्रज सबकुछ म्हणजे क्षत्रिय आणि वैश्य बनले होते फक्त ब्राम्हणच असे होते ज्यांचा जॉब टिकला होता एकेकाळी आर्य पुरोहितांनी शैव पुरोहितांना शूद्र ओबीसी बनवले होते आता मिशनऱ्यांच्यापुढे आर्य पुरोहित ओबीसी पुरोहित बनले टिळकांनी आम्हीही आर्य आहोत आणि तुम्हीही आमच्याप्रमाणेच आर्य आहात असे सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकायला कर्झन म्हणजे काही एल्फिन्स्टन वा मॅक्समूलर न्हवता बंगालच्या इतिहासात प्रथमच एक असा व्हॉईसरॉय आला ज्याने बंगाली ब्राम्हणांचे हितसंबंध पूर्णपणे फाट्यावर मारले इंग्रज नोकरदार आनुवंशिक आणि संस्कार ह्यांच्यामुळे हिंदी नोकरांच्यापेक्षा जात्याच सरस असतो त्यामुळे सर्वोच्च व उच्च अधिकार ब्रिटिशांच्याच ताब्यात रहायला हवेत असे तो उघडपणे म्हणायला लागला त्याच्यामते हिंदी नेते राजद्रोही होते व त्यांच्यापेक्षा जनता राजनिष्ठ आहे व तिचे हित ह्या राजद्रोही नेत्यांपेक्षा ब्रिटिशांना अधिक कळते
कर्झनने आपल्या ह्या विचारानुसार सर्वत्रच सरकारी अधिकारी वाढवले आणि सर्वच यंत्रणांचे ब्रिटीशीकरण वाढवले स्वतःचा एकतंत्री राज्यकारभार सुरु केला
हे पाहून टिळक स्वस्थ बसणे शक्यच न्हवते त्यांनी २९ ऑगस्ट १९०५ च्या केसरीतील अग्रलेखात कर्झन ह्यांची संभावना औरंगजेब म्हणून केली दास्य आणि साम्राज्य वाढवणे इतकाच ह्या राजवटीचा हेतू आहे अशी टीका त्यांनी सुरु केली (लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख खंड तिसरा )
पूर्वीचे इंग्रज हळूहळू आम्ही राज्यकारभार हिंदी लोकांच्या ताब्यात देऊ असे म्हणत कर्झन हे म्हणत नसे त्यामुळे नेमस्तांच्या राजकारणाचा आधारच ढासळला कधीतरी हा कारभार स्वतः ब्रिटिशच आपल्याला देतील ही नेमस्तांची अर्ग्युमेण्ट कोसळली आणि इंग्रजांच्या राजवटीला देवाचा कृपाप्रसाद समजणारे बंगाली ब्राम्हण हा कृपाप्रसाद आपल्या हाती येणार नाही हे लक्ष्यात येताच खवळले क्रांतीची भाषा बोलू लागले संघटित होऊ लागले
एरव्ही मवाळ असणाऱ्या गोखलेंनीही प्रथमच टिळकांची री ओढत कर्झनची संभावना औरंगजेब अशीच केली त्यांनी कर्झनच्या तिजोरीत किती पैसे आले आणि युरोपियन अधिकाऱ्यांना अधिक पगार देत किती पैसे उधळले ह्याचा हिशेबच सादर केला
हिंदू आपल्याविरोधात संघटित होतायत हे लक्ष्यात आल्यावर कर्झनने मुस्लिमांना जवळ करायला सुरवात केली
आणि ह्यातूनच निर्माण झाली बंगालची फाळणी !
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ११३
बंगालची फाळणी २ श्रीधर तिळवे नाईक
भारतात आलेल्या ब्रिटिशांचे राजकीय कंडिशनिंग अत्यंत गुंतागुंतीचे होते एकीकडे त्यांनी लोकशाही राजवट आणि पंतप्रधान व मंत्रिमंडळ स्वीकारले होते तर दुसरीकडे राजेशाही जोपासणारे नामधारी प्रमुख राजेपद !
ते भारतात आले तेव्हा नेमकी हीच स्थिती होती मराठांच्यात पेशव्याची राजवट व मंत्रिमंडळ होते तर राजेशाही जोपासणारे नामधारी भोसले घराण्याचे छत्रपतीपद ! ह्याचा संस्कार मराठ्यांच्यावर खोलवर होता त्यामुळे दिल्ली जिंकली तेव्हा दिल्लीतही त्यांनी हीच पद्धत लागू केली म्हणजे दिल्लीत मराठ्यांची राजवट व मंडळ लागू केले होते तर दुसरीकडे राजेशाही जोपासणारे नामधारी मोघल सम्राटपद बादशहाला दिले होते ब्रिटिशांना ही पद्धत आपल्यासारखीच वाटणे साहजिक होतं त्यांनी मराठ्यांनी दिलेली ही घडी स्वीकारली आणि भारतातील सर्वच संस्थानिक राज्यात ब्रिटिश राजवट आणि अधिकारी लागू केले होते तर दुसरीकडे राजेशाही जोपासणारे नामधारी संस्थानिक राजे कायम ठेवले होते . जिथे संस्थानिक ठेवले न्हवते तिथे व राष्ट्रीय पातळीवर हीच पद्धत अधिक विकसित करून व्हॉइसरॉयची राजवट आणि अधिकारी लागू होते तर दुसरीकडे लोकशाही जोपासणारे नामधारी प्रमुखपद इंग्लंडकडच्या पार्लमेंटकडे अशी पद्धत लागू केली गेली होती म्हणजेच नामधारी आणि प्रशासनधारी अशी ही मराठ्यांची द्विदल पद्धत ब्रिटिश राजवटीतही कायम होती
ब्रिटिशांना राज्यकारभार चालवणारा अनुभवी देशी वर्ग हवा होता व त्या दृष्टीने ब्राम्हण योग्य होते कारण मुघल व मराठा राजवटींना अशी सेवा ब्राम्हणांनी पुरवली होती व वैष्णव धर्मात पुण्ययोनी ह्या कॅटेगरीत त्याला मान्यता होती साहजिकच ब्रिटिशांनी ब्राम्हणांनी जशी मोघलांची व छत्रपतींची सेवा केली तशी ते आपली सेवा करतील असे वातावरण बनवायला सुरवात केली अधिकारीवर्गात ब्राम्हण घेतले आणि त्यामुळे महाराष्ट्र वगळता ही पद्धत सर्वत्र १०० टक्के तर महाराष्ट्रात ७० टक्के यशस्वी झाली म्हणजेच पुण्य योनीतील ब्राम्हण त्यांनी आपल्या बाजूने वळवले पुण्ययोनीतील क्षत्रिय संस्थानिक त्यांच्या बाजूने होतेच मुस्लिम राजवटींनीही हेच केले होते व ब्राम्हण क्षत्रियांच्या पुण्ययोनिच्या साहाय्याने देशावर राज्य केले होते एका अर्थाने जी पुण्ययोनी मुघलांच्या व मुस्लिम राजवटीच्या बाजूने होती ती आता ब्रिटिशांच्या बाजूने उभी रहात होती बंगालमध्ये ह्या पुण्ययोनीला एक नवे नाव मिळाले भद्रलोक ज्यात बंगाली कायस्थांचाही समावेश होऊ लागला होता भद्र कोण ह्याबद्दल वादविवादही सुरु होते
१८५७ च्या बंडात नेतृत्व कुणीच केलं नाही तरी सैनिकांनी घोषणा दिल्या त्या मुघल सम्राटाच्या नावाने आणि मुस्लिम सैनिकांनी तर हा जिहाद असे जाहीर केले ,यूरोपियनांनी अशा जिहादींची विल्हेवाट क्रुसेडमध्ये लावून क्रुसेड्स जिंकली होती आणि त्यांना इंडियात त्यांना त्यांची पुनरावृत्ती नको होती . साहजिकच ब्रिटिशांच्या डोक्यात शैवांच्या बद्दल असलेल्या अढीबरोबर आता मुस्लिम धर्मियांच्याबद्दल अढी बसली.
१८५८ साली राणीची राजवट आली तरी मुघलांचा हा पुण्ययोनीवादी लोकांना वापरण्याचा फॉर्म्युला कंटिन्यू राहिला ह्या फॉर्म्युलाची खात्री १८९८ पर्यंत कायम होती ह्या पार्श्वभूमीवर डिसेम्बर १८९८ साली कर्झन व्हॉईसरॉय म्हणून दाखल झाला कर्झनसाठी (रोनाल्डशे द लाईफ ऑफ लॉर्ड कर्झन पान ३ वर म्हंटल्याप्रमाणे) India had been the romance of his youth, the consuming passion of his prime, the unforgettable memory of his declining years होती
ह्यावेळी बंगालमध्ये जहालवादाचे नेतृत्व बीपीनचंद्र पाल करत होते त्यांनी आम्हा जहालवाद्यांचीही लॉयल्टी ब्रिटिशांशीच आहे अशी खात्री दिली पण राष्ट्रीय सभेत दादाभाई नौरोजी ह्यांनी जे अध्यक्षीय भाषण केले त्यानंतर जहालांचा प्रभाव वाढतच गेला तसा ब्रिटिशांना स्वतःचा खात्रीचा वाटणारा भद्रवर्ग खात्रीचा वाटेना
टिळकांनी केसरीतील जानेवारी १९०५ मधल्या लेखात कॅनडा व ऑस्ट्रेलियाप्रमाणे इंडियाला प्रांतिक स्वराज्य पाहिजे अशी मागणी केली
देशातील प्रस्थापित कायदे पाळण्याची खात्री टिळक आणि पाल दोघेही देत होते मात्र दोघेही नेमस्त्यांची ब्रिटिश राजवट हा ईश्वराचा कृपाप्रसाद सिद्धांत स्वीकारायला आता तयार न्हवते बिपीनचंद्र पालांची ह्या काळातील मांडणी न्यू स्पिरीट ऑफ इंडिया ह्या त्यांच्या ग्रंथात आलीये त्यांच्यामते राजनिष्ठा व साम्राज्यनिष्ठा ह्या दोन भिन्न निष्ठा असून नेमस्त दोन्ही निष्ठा पाळतात तर जहाल फक्त राजनिष्ठा पाळतात साम्राज्यनिष्ठेला जहालांचा नकार आहे
कर्झन पक्का साम्राज्यवादी होता त्याच्या हे लक्ष्यात आले कि आपणाला आपल्या बाजूचा आणखी एक खात्रीचा समूह हवा जो ह्या जहाल ब्राम्हणांना काउंटर मारेल सर सय्यद अहमद खान ह्यांनी हे ओळखून ब्रिटिशांशी मुस्लिम १०० टक्के लॉयल राहतील अशी पुनःपुनः खात्री द्यायला सुरवात केली बंगालमध्ये कर्झनच्या मनाचा कल ओळखून ह्या एलिट मुस्लिमांनी ब्रिटिश व्हॉइसरॉयशी बोलणे सुरु केले
एका अर्थाने फक्त राजनिष्ठा न्हवे तर साम्राज्यनिष्ठाही मागणारा कर्झन साम्राज्यनिष्ठा नाकारणारे जहालवादी आणि राजनिष्ठेबरोबरच साम्राज्यनिष्ठा देऊ इच्छिणारे भद्र मुस्लिम हे टकरायला व मिक्स व्हायला सुरवात झाली
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ११४
बंगालची फाळणी ३ श्रीधर तिळवे नाईक
विभाजन डिव्हिजन हे स्वखुशीने होत असते तर फाळणी पार्टीशन करण्यात येते फाळणीच्या मागे सक्ती असते
कुठलीही राजकीय फाळणी दोन कारणांनी होते
१ अवाढव्य लोकसंख्या आणि तिच्यावर प्रशासन करणे अशक्य होत जाणे
२ लोकांत राजकीय सांस्कृतिक धार्मिक सामाजिक आर्थिक फूट पडल्याने वा पाडण्यासाठी
बंगालच्या फाळणीत ह्या दोन्ही कारणांनी आपला रोल बजावला
ह्या काळात बंगालप्रांताची लोकसंख्या तब्बल ८ करोड होती आणि एक प्रांत मानून त्याचे प्रशासन सांभाळणे कठीण होऊन बसले होते आणि विभाजनाची चर्चा सुरु झाली होती
शैवांच्यात शास्त्रीक अंगाने लोकांचे पाच प्रकार होतात
१ शास्त्रक ज्याच्यासाठी अलीकडे शास्त्रज्ञ हा शब्द जास्त प्रचलित आहे जो शास्त्र वा शास्त्रीय नियम शोधतो वा निर्माण करतो किंवा असलेल्या शास्त्रात सृजनशील भर टाकतो
२ शास्त्री ज्याला शास्त्र कळते
३ पंडित जो शास्त्र वाचतो पण ज्याला शास्त्र कळत नाही जो शास्त्राचे फक्त कर्मकांड करतो
४ आचार्य ज्याला शास्त्र कळते व जो शास्त्र शिकवतो
५ श्रावण जो ह्या चौंघांच्याकडून शास्त्र ऐकतो आणि कधीकधी त्यांनी दिलेल्या आज्ञा पाळतो (जाताजाता श्रावण महिना हा शैवांच्यात शास्त्र ऐकण्याचा शास्त्राचे श्रवण करण्याचा महिना आहे गुरु पोर्णिमेला गुरु निवडल्यानंतर तो शेतीवाडीची मुख्य कामे संपल्यावर येतो )
बंगालच्या फाळणीत हे चारही प्रकारचे लोक ऍक्टिव्ह झाले नेमस्तांचा प्रॉब्लेम हाच होता कि त्यांचे नेतृत्व पंडित बनत चाललेल्या फिरोजशहा मेथ्यांच्याकडे होते जे राष्ट्रीय सभेचे फक्त पंडिती कर्मकांड पार पाडत होते आणि वारंवार यांत्रिकपणाने साम्राज्यनिष्ठा आणि राजनिष्ठा प्रदर्शित करत होते तर जहालांचे नेतृत्व लोकमान्य टिळक करत होते आणि ह्या दोघांचा समतोल दादाभाई नौरोजींच्यामुळे टिकून होता आणि दोन्ही पक्ष त्यांचे म्हणणे ऐकत होते
कर्झनचा प्रॉब्लेम हाच होता कि तो ह्या प्रोब्लेमकडे फक्त शासक म्हणून पहात होता ज्याला शास्त्राशी काही देणेघेणे न्हवते त्याच्यासाठी हा प्रश्न डिपार्टमेंटॅलिझ्ममध्ये गोते खाल्लेला आणि त्याच्यापर्यंत योग्य दिशेने न पोह्चवलेला प्रश्न होता कर्झन म्हणाला ,“ People sometimes ask what departmentalism is,” he continued. “To any such I give this case as an illustration. Departmentalism is not a moral delinquency. It is an intellectual HIATUS-the complete absence of thought of apprehension of anything outside the purely departmental aspects of the matter under discussion. For fourteen months it never occurred to a single human being in the Departments to mention the matter or to suggest that it should be mentioned. Round and round like the diurnal revolution of the earth went the file, stately, solemn, sure and slow ; and now in due season it has completed its orbit and I am invited to register the concluding stage.”'
EARL OF RONALDSHAY पुढे लिहितात ,
“Lord Curaon was by no means
prepared to register the concluding stage, and he sent the file back whence it
had come, with an intimation that the approaching incorporation of Berar into
British India provided an occasion for a more general consideration of existing
boundaries. His own view was that the existing boundaries of Bengal, Assam, the
Central Provinces and Madras were “antiquated, illogical and productive of inefficiency ” ; and he set to
work to plan necessary alterations. “I should like to fix the Provincial
boundaries for the next generation,” he told Sir A. Godlcy.
(Tbe note is written in Is txtmo Mr. Lovst Fraser’s " India under
Curzon and After.” )
REF : Page 321 EARL OF RONALDSHAY THE LIFE OF LORD CURZON
माणसात सुपेरीअर आणि इंफेरीअर कॉम्प्लेक्स जसे असतात तसे सुपर व लोअर कॉम्प्लेक्स म्हणजे सुपर व लोअर बनण्याचे कॉम्प्लेक्सही असतात डार्विनच्या थेरीने उत्क्रांतीच्या तत्वात जो सुपेरीअर असतो तो टिकतो असे सांगितले खरे पण त्याचा सामाजिक अर्थ जो टिकतो तो सुपेरीअर असतो असा झाला आणि त्यातून आपण विजयी झाल्याने गोऱ्या लोकांना आपण अचानक सुपेरीअर वंश असल्याचे कळले आणि ह्या सुपेरीअर कॉम्प्लेक्सच्या बळी असलेला पहिला व्हॉईसरॉय कर्झन होता डार्विनपूर्वी अनेक व्हॉईसरॉय किमान काही बाबतीत आपण भारताकडून शिकू शकतो अशा वैचारिक पोझिशनमध्ये होते त्यामुळे साहजिकच निगोशिएशनची शक्यता जिवंत असे डार्विननंतर ही पोझिशन व शक्यता हळूहळू लोप पावत गेली आणि कर्झनमध्ये ती पूर्णपणे लोप पावली
इकडे राष्ट्रीय सभेत सुपेरीअरमध्ये सुपर कोण हा सनातन प्रश्न उपस्थित झाला कारण आता काँग्रेसवर भद्र व उच्च लोकांचे पूर्ण नियंत्रण प्रस्थापित झाले होते आणि प्रत्येक नेत्यात सुपर बनण्याचा कॉम्प्लेक्स (ह्याला किडा हा शब्द अधिक योग्य आहे ) जागा व्हायला सुरवात झाली होती जो सुपर त्याचा कंट्रोल ह्या न्यायाने राष्ट्रीय सभेवर नियंत्रण कुणाचे ह्या अंगाने स्पर्धा सुरु झाली इंग्रजांच्या दृष्टीने ही स्पर्धा दासांच्यात सुपर दास कोण ह्याबाबत होती विशेषतः मेथा , टिळक व गोखले ह्यांच्यात ! टिळकच ह्या सुपर कॉम्प्लेक्सने सर्वात कमी ग्रासलेले होते तर मेथा सर्वात अधिक !
ह्या सगळ्याचा एक परिणाम म्हणून वैश्य शूद्र अतिशूद्र आदिवासी ह्यांना विश्वासात न घेताच एक इल्लोजिकल निर्णय घेण्यात आला वास्तविक शास्त्रीय विचार केला तर ४ कोटी बंगाली भाषी लोकांचा एक स्वतंत्र प्रांत निर्माण करणे व उरलेल्या आसाम , बिहार ,ओरिसा वैग्रे भागांचा एक प्रांत निर्माण करणे हे तर्काला धरून होते आणि हे विभाजन सर्वांना मान्यही होते पण प्रत्येकाचे वेगवेगळे कॉम्प्लेक्स आडवे आले आणि फाळणी झाली
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ११५
बंगालची फाळणी ४ श्रीधर तिळवे नाईक
कुठलाही समाज व पक्ष पराभूत आणि दास होतो तेव्हा त्याच्यात १ शत्रूनिरीक्षण व शत्रूपरीक्षण २ आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण सुरु होते सुरवातीच्या काळात आपण शत्रूसारखे झालो कि पुन्हा शत्रूवर विजय मिळवू अशी भावना उद्भवते शत्रूचे अनुकरण व कॉपीपेस्टींग सुरु होते शत्रूची भाषा आत्मसात केली जाते बंगालमध्ये ह्याची सुरवात राजाराममोहन रॉय ह्यांनी केली व केशवचंद्र सेन ह्यांनी पसरवली बंगालमध्ये आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षणाची सुरवातही रॉय ह्यांनी केली एकाबाजूला ब्रिटिश का जिंकले हा प्रश्न तर दुसऱ्या बाजूला आपण का हरलो हा प्रश्न ! ह्या आत्मविश्वास हरवलेल्या समाजाला अचानक आत्मविश्वास मिळवून दिला तो स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेत स्वामीजींनी अचानक हिंदू धर्माची जी तत्वे सांगितली त्याने वेदांतांचे ग्लोबल कमबॅक झाले ह्यातला विरोधाभास असा होता कि शंकराचार्यांनी विवेकानंद हे ब्राम्हण नसल्याने त्यांना हिंदू धर्माच्या वतीने बोलता येणार नाही असे सांगून बोलायला नकार दिला तत्कालीन बंगालमध्ये १५०० पर्यंत कायस्थ हे वैश्य व्यापारांच्याकडे हिशेब ठेवण्याचे काम करत त्यामुळे वैश्य व नंतर क्षत्रिय मानले जात असल्याने हे घडले होते महाराष्ट्रात कायस्थ १०००पासून क्षत्रिय होते आणि उत्तर पेशवाईने त्यांचे अधिकार काढून घेतले होते थोडक्यात कोणत्याही अर्थाने कायस्थ ब्राम्हण न्हवते त्यामुळे हिंदू धर्मावर बोलण्याचा विवेकानंदांना अधिकारच नाही असा स्टान्स शंकराचार्यांनी घेतला व इतर वैदिक ब्राम्हणांनी त्याला सपोर्ट दिला
ह्या अडचणीच्या वेळी विवेकानंदांना मदत केली ती जैन असलेल्या विरचंद गांधी व इतर बौद्ध देशातून आलेल्या प्रतिनिधींनी ह्यांनी विवेकानंदांना पत्र देऊन बोलायची संधी दिली कारण त्यांच्या दृष्टीने त्यांचे संस्थापक महावीर व गौतम बुद्ध हे विवेकानंदांच्याप्रमाणे क्षत्रिय होते विवेकानंदानी बंधू आणि भगिनींनो अशी सुरवात करून हिंदू धर्म हा वेदांतकेंद्रित आहे अशी मांडणी केली व हिंदू धर्माला एकसंध धर्म म्हणून सादर केले शतकाच्या सुरवातीला राजाराम मोहन रॉय ह्यांनी सर्वात प्रथम हिंदुइझम हा शब्द वापरून हिंदुवादाची सुरवात केली तर १९ व्या शतकाच्या शेवटी स्वामी विवेकानंदांनी ह्या हिंदुवादाला जागतिक करून एक राष्ट्रीय एकसंधता दिली आणि २० व्या शतकात ह्याच हिंदुवादाला गांधींनी एक व्यापक राजकीय स्ट्रक्चर दिले
शिकागोतील ह्या घटनेचा एक परिणाम असा झाला कि स्वामींनी आपल्या भाषणात ब्राम्हण्यावर कठोर हल्ले सुरु केले ह्यातून तत्कालीन भद्र समाजात खळबळ उडाली त्यांनी विवेकानंदांच्या कुळाविषयी शंका प्रकट करायला सुरवात केली एक वेळ अशी आली कि विवेकानंदांना स्वतःच्या दत्त घराण्याचा इतिहास पहा असे सांगण्याची वेळ आली आणि आपण बोस/बसू , गुहा , घोष , मित्र आणि दत्त ह्या पाच कुलीन कायस्थांपैकी एक आहोत असे सांगावे लागले एका आध्यत्मिक मुमुक्षुला जात सांगायला भाग पाडले जावे ह्याहून शोकात्मिक ते काय ?
बंगाल प्रांताचे वैशिष्ट्य असे होते कि बंगाल शाक्त शैव होता भगवान शंकरांनी दक्षिण कुमार स्कंद कार्तिकेयाला पश्चिम गणपतीला तर पूर्व पार्वतीला दिली होती आणि आपला प्रदेश पार्वतीचा हे पूर्वी लोक फार पूर्वीपासून मानत होते साहजिकच इथे शैवांचा विशेषतः त्यातील शाक्तांचा प्रभाव प्रचंड होता आणि एकेकाळी हा प्रदेश बिहारपासून बांगला देशपर्यंत स्वतःला द्रविड म्हणवून घेत होता १२०० नंतर इथे वैष्णव घुसले आणि त्यांनी ह्या शैव प्रदेशाला वैष्णव बनवायला सुरवात केली शंकरदेवापासून चैतन्यापर्यंत अनेकांनी ह्यासाठी चळवळ उभारली आणि तरीही बंगालमधील शैवशाक्त ब्राम्हण क्षत्रिय हे महाराष्ट्राप्रमाणे ओबीसी झाले न्हवते कारण बंगालमध्ये पेशवाई न्हवती साहजिकच रामकृष्ण परमहंस हे कालीमातेच्या देवळात पुजारी होते व कट्टर कालीभक्त होते शैव ब्राम्हण असूनही त्यांचा सन्मान होता विवेकानंद त्यांचे क्षत्रिय शिष्य होते आणि गुरूप्रमाणे कालीचे भक्तही ! ज्यावेळी महाराष्ट्रात चित्पावन वेदोक्त पुराणोक्त खेळत क्षत्रियांना शूद्र दर्जा द्यायला लागले होते त्यावेळी बंगालमध्ये रामकृष्ण परमहंस नावाचा ब्राम्हण नरेंद्रनाथ दत्त नावाच्या क्षत्रियाला स्वतःचा वारसदार नेमत होता हा विरोधाभास लक्ष्यात घेण्यासारखा आहे आणि आता विसाव्या शतकाच्या शेवटी ही पाळी आली कि रामकृष्ण मिशनने आम्ही हिंदू नाही आहोत असे जाहीर केले आहे ( १९८० साली रामकृष्ण मिशनने हे ऍफिडेव्हिट दिले आहे ज्यात आम्ही रामकृष्णांनी दिलेल्या धर्माचे आम्ही पाईक आहोत आम्ही हिंदू नाही आहोत असे म्हंटले आहे २ जुलै १९९५ ला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात हा दावा फेटाळून लावला आहे )
विवेकानंदांनी जन्मदत्त वर्णव्यवस्था ठामपणे नाकारली जातीव्यवस्था नाकारली आणि आत्ताचे राज्य वैश्यांचे आहे असे उघडपणे सांगायला सुरवात केली व पुढे शूद्रांचे राज्य येणार असे सांगितले त्यांच्या ह्या भविष्यवाणीचा कम्युनिस्टांना प्रचंड फायदा झाला नंतर १९९५ नंतर बंगाली कम्युनिस्टांना हिंदुत्ववाद उलट दिशेने चावला आणि त्यांनी चक्क विवेकानंदांना हिंदुत्ववादी म्हणायला सुरवात केली ही वैचारिक आत्महत्या होती आणि मार्क्सवादी राजवट कोसळवण्यात तिचा वाटा होता
विवेकानंद समाजवादाकडे झुकलेले होते आणि त्यांनी विज्ञान दोन्ही हातांनी कवटाळले होते भारताचा ह्या जगात अध्यात्मिक रोल आहे अशी त्यांची ठाम समजूत होतीआर जी प्रधान ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे "He had an intense faith in the spiritual mission of India and in her power to fulfil that mission. At the same time, he believed that the full realization of that mission was impossible without political freedom, without congenial political milieu ; and he therefore actively encouraged the new political aspirations with which the heart of young India was beating. Though a Sanyasi, who had given up all worldly interests, he was yet a patriot, and his heart bled at the idea of the sufferings of his country. His English disciple, Sister Nivedita, speaks thus of his love of India : " Throughout those years ", she says ", in which I saw him almost daily, the thought: of India was to him like the air he breathed/' Swami Vivekananda was also a man of action. He thought that India had lost her old balance between the material and spiritual sides of true civilization, that, . latterly, she had suffered from the disease of excessive thought, with the result that the strong vigorous life of action had been neglected, and thought itself had * become effete and unreal. He therefore impressed 1 upon the people the duty of leading a life, not of mere dreamy contemplation, but of vigorous, social* action. He was to Modern India what Wangyangming, was to the Chinese under the Ming dynasty in the sixteenth century, or the School of Oyomei to the Japanese on the eve of the Restoration. The funda- mental principle of Wangyangming and the School of Oyomei was that knowledge was useless, unless realized in action. It was this great and vital principle that Swami Vivekananda impressed upon his countrymen. The rich knowledge, enshrined in the noble teachings of Hinduism, had not, he said, had its full effects, because it had not been expressed in action ; nay, what action there was, was not in harmony with that knowledge. And he practied what he preached. No religious teacher worked more for the uplift of the masses, for elevating the status of the pariah, the poor, the down-trodden or for relieving poverty, disease, and distress. Such a thinker, patriot, reformer and Sanasi was bound to exercise great influence upon contemporary Indian thought and life."
R G PRADHAN PAGE ५९ TO 60 INDIA'S STRUGGLE FOR SWARAJ १९३० edition '
विवेकानंदांनी धर्मक्षेत्रात युद्धासारखा जोश आणला क्षात्रतेज निर्माण केले. त्यांच्या आवेशयुक्त भाषणांनी अवघा बंगाल भद्रतेकडून क्षत्रतेकडे वळायला लागला खुद्द त्यांच्याच घरातून भूपेंद्रनाथ दत्त हे त्यांचे बंधू क्रांतिकारी झाले आणि अरबिंदो घोष व बरिंदर घोष आणि भूपेंद्रनाथ दत्त ह्या क्रांतिकारक त्रयींपैकी एक झाले ह्या तिघांनी
टिळकांची विवेकानंदांशी भेट झाली आणि विवेकानंद टिळकांच्या पुण्याच्या घरी १५ दिवस मुक्कामाला होते हे मागे सांगितले आहेच हे लक्ष्यात घेण्यासारखे आहे कि सयाजीराव गायकवाड महाराजांनी जेव्हा वेदान्तावर व्याख्याने दिली तेव्हा त्यांना आधी अधिकार कमवा म्हणून सांगणारे टिळक विवेकानंद क्षत्रिय असूनही त्यांना मात्र वेदान्तावरची उच्च ऑथॅरिटी मानत होते
आणि आता असे म्हणता येते कि टिळक १९१२ नंतर विवेकानंदवादी बनत गेले दुदैवाने त्यांच्या शिष्यांना त्यांच्यातला हा बदल कधीच कळला नाही त्यामुळेच टिळकांच्या पूर्वार्धातून सावरकर ठाकरेंचा हिंदुत्ववाद निघाला आणि उत्तरार्धातून गांधियन हिंदुवाद उत्तरार्धातील टिळक ही विवेकानंद व गांधी ह्यांना जोडणारी कडी आहे
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ११६
बंगालची फाळणी व पहिली ग्लोबल चळवळ ५ श्रीधर तिळवे नाईक
स्वामी विवेकानंदांनी निर्माण केलेला जोश बंगालमध्ये पसरत चालला आणि त्याचे थेट पडसाद १९०४ च्या राष्ट्रीय अधिवेशनात लालसाहेब घोष ह्यांच्या भाषणात पडले ते म्हणाले , "ज्या लोकांवर आपला विश्वास नसतो त्यांचीच शस्त्रे आपण काढून घेतो " काँग्रेसच्या व्यासपीठावर त्यांनी प्रथमच शस्त्रनिर्बंध कायदा रद्द झालेला नाही ह्याकडे लक्ष वेधले पण ह्याचा परिणाम उलटा झाला असावा मी असावा म्हणतोय कारण थेट पुरावा नाहीये काँग्रेस आता शस्त्रांची भाषा करतीये असं सरकारला वाटायला लागलं ११ फेब १९०५ ला कर्झनने उत्तर म्हणून ज्या सत्याची वार्ता केली जातीये ते पाश्च्यात्य देशात आधीच शोधलं गेलंय आणि हिंदुस्थानी एपिकमध्ये म्हणजे रामायण महाभारत मध्ये सत्याविषयी खूप बडबड होते खरी पण प्रत्यक्षात सत्याचा अनेकदा बळी दिला जातो आणि ह्या बळी देण्याचे कोडकौतुकच केले जाते असे प्रतिपादन केले मिशनरी श्रीकृष्णाला लबाड देव म्हणायचे त्याचे हे सौम्य सादरीकरण होते साहजिकच टिळक व बंगाली नेत्यांनी कर्झनविरुद्ध झोड उठवायला सुरवात केली
ह्यानंतर बंगालच्या फाळणीच्या निर्णयाने वेग घेतला कर्झनने स्वतःची १९०३ ची फाळणी योजना जी फूट पाडत न्हवती व अंमलाच्या दिशेने जिची गती स्लो होती नाकारली व काँग्रेसने वॉर्निंग देऊनही २० जुलै १९०५ ला बंगालचे पार्टीशन जाहीर केले व त्यानुसार १६ ऑक्टोबरला मुस्लिमबहुल प्रदेश हिंदुबहुल प्रदेशापासून वेगळे करण्यात आले ह्यामुळे पश्चिम बंगालमधले हिंदू बिझनेसमन व इतर भद्र अचानक मायनॉरिटी झाले आणि त्यांच्या वर्चस्वाला मेजॉरिटी मुस्लिमांची असल्याने शह बसण्याची शक्यता निर्माण झाली मुस्लिम भद्रांना हिंदूं भद्रांचे हे वर्चस्व पूर्वीपासूनच सहन होत न्हवते त्यामुळे फाळणीला ताबडतोब नवाब सल्लीमुल्लाने पाठिंबा दिला ढाका ही ह्या नव्या प्रांताची राजधानी झाली दुसरा प्रांत हा गैरबंगाल लोकांनी प्रामुख्याने बिहार व ओरिसा ह्यांनी बनल्याने इथेही बंगाली मायनॉरिटीत जात होते म्हणजेच कर्झन फक्त धार्मिक फाळणी करत न्हवता तर बंगाली लोकांना दोन्ही प्रांतात अल्पसंख्य बनवून बंगाली चळवळ तोडत होता जिच्यात बंगाली मुस्लिमही बंगाली म्हणून सामील होत होता एका अर्थाने ही बंगाली ओबीसींचीही फाळणी होती ज्यात मुस्लिम ओबीसीही होते आणि ज्यांनी नंतर फाळणीविरोधात प्रचंड मोर्चा काढला
१९०५ साली लाला लजपत रॉय , बिपीनचंद्र पाल आणि लोकमान्य टिळक संघटित झाले आणि त्यांनी नुसत्या अर्जविनंत्यांनी काही होणार नाही आणि प्रत्यक्ष कृतीशिवाय आता पर्याय नाही असे ठणकावले जहालवाद आता थेट व स्पष्ट झाला हे जहालांचे राजकारण आम्ही यशस्वी होऊ देणार नाही अशी भूमिका फिरोजशहा मेथा ह्यांनी व मवाळांनी घेतली हे मतभेद वाढत गेले आणि १९०७ साली सुरतेला काँग्रेस फुटली
वंगभंगाविरोधातील चळवळ ७ ऑगस्ट १९०५ रोजी म्हणजे फाळणी जाहीर झाल्याझाल्याच सुरु झाली
तिने वेगवेगळ्या सभा भरवून परदेशी मालावर बहिष्कार घाला अशी सूचना केली टिळकांच्याकडे वार्ता पोहचताच त्यांनी १५ ऑगस्ट रोजी आणीबाणीची वेळ हा लेख केसरीत लिहून कुठलेच साम्राज्य चंद्र सूर्य असेपर्यंत टिकत नसते आणि प्रत्येक साम्राज्य आपले धोरण लवचिक करत जाते पण बुद्धिमान असूनही कर्झनचा मद असा कि ते धोरण सैल करण्याऐवजी घट्ट करत आहेत अशी टीका केली ह्या सभांना वॉरेन हेस्टिंग्जला बंगालमध्ये मदत करणाऱ्या भद्र लोकांच्या वंशजांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याबद्दल त्यांनी आनन्द व्यक्त केला भारतीयांना तृण लेखणाऱ्या ब्रिटिशांनी तृणापासून बनलेला दोर हत्तीलाही आवळतो हे लक्ष्यात घ्यावे मात्र तृणांनीही एकत्र असायला हवे अशी त्यांनी अपेक्षा केली नाहीतर एका सैनिकाला घाबरून हे पळणार असतील आणि मग ब्रिटिश राजपुत्राला डायमंड बूट घालणार असतील तर काय फायदा असेही टिळकांनी विचारले
सतत तोड काढणाऱ्या नेमस्तांना त्यांनी फटकारले ब्रिटिश लोकशाही दुट्टपी आहे स्वतःच्या देशात एका मतांचीही कदर करणारी ब्रिटिश लोकशाही हिंदुस्थानातल्या लाखो लोकांनी व्यक्त केलेल्या मताची थोडीही कदर करत नाही ही वस्तुस्थिती त्यांनी नोंदवली
ह्या घटनेचा थेट परिणाम दादाभाई नौरोजी ह्यांच्यावर झाला त्यांनी इंग्लंडमध्ये केलेल्या भाषणात प्रथमच एक थेट मुद्दा ह्या निमित्ताने मिळाला आहे असे सांगितले वंगभंग चळवळीला मिळालेला प्रतिसाद पाहता ही हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीची सुरवात आहे आणि हा दिवस पहायला मी जगलो ह्याचा मला आनंद होतो आहे असे सांगितले खुद्द कर्झनच्या धोरणावर नाराज असणाऱ्या ब्रिटिशांची मते त्यांनी सांगितली व ही राजवट अननर्थकारी आहे आणि ती तशीच राहिली तर लवकरच ब्रिटिशांचे साम्राज्य बुडेल असे सांगितले
ह्या प्रश्नावर काँग्रेसच्या लोकांनी ज्यात नेमस्तच जास्त होते जेव्हा कर्झनची भेट मागितली तेव्हा त्याने भेट घ्यायलाच नकार दिला आणि इंग्लंडला शिष्टमंडळ पाठवण्याखेरीज पर्याय राहिला नाही नेमस्तांचे गोखले व जहालांचे लाला लजपत रॉय असे मंडळ ठरले व इंग्लंडला रवाना झाले इकडे बंगालमध्ये फुलरने प्रचंड दडपशाही चालवली आणि काही नेमस्त तिला घाबरले पण खुद्द इंग्लंडमध्ये नेमस्त असलेले गोखले ह्यावेळी कठोर झाले आणि त्यांनी बायकोटॉची भाषा कायम राखली प्रथमच नेमस्त गोखले जहाल लाला लजपत राय आणि समतोलवादी दादाभाई नौरोजी एकाच स्वदेशीच्या भाषेत बोलू लागले
बंगालच्या घराघरातून वंदे मातरम च्या घोषणा सुरु झाल्या ह्याला प्रत्युत्तर म्हणून फुल्लरने गंगेतुन आगबोटीने गुरखे सैनिक मागवून त्यांना रस्त्यावर उतरवले त्याला ही क्रांती वाटत होती इकडे दादाभाई नौरजींनी आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भाग घेऊन ब्रिटिश साम्राज्य कसे शोषण करत आहे ते सांगितले त्याला सर्वच समाजवाद्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला विशेषतः हिडमन हा समाजवादी ज्याने पुढे श्यामलाल कृष्णवर्मांजींच्या इंडिया हाऊसचे उदघाटन केले सर वेंडरबर्न ह्यांनीही जेव्हा इटली ऑस्ट्रियाच्या ताब्यात होता तेव्हा त्यांनी बहिष्काराचा मार्ग अवलंबून कसे ऑस्ट्रियन अधिकाऱ्यांना जेरीस आणले होते ते सांगितले
एकंदरीतच वंगभंग चळवळ ही भारतात झालेली भारतीय जनतेची पहिली चळवळ होती जिचा स्प्रेड ग्लोबल होता व जिने जगाचे लक्ष्य खेचले
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ११७
बंगालची फाळणी व पहिली ग्लोबल चळवळ ६ श्रीधर तिळवे नाईक
वंगभंगाचा परिणाम म्हणूनच कि काय काँग्रेसची बाजू मांडून शिष्टमंडळ भारतात परतल्यावर नामदार गोखले ह्यांनी १२ जून १९०५ ला भारत सेवक समाजची स्थापना केली आश्चर्याची गोष्ट म्हणजे वंगभंग चळवळीत इंग्लंडमध्ये जहाल झालेले गोखले पुन्हा मवाळ झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा आम्ही ब्रिटिश राज्याचे पण स्वतंत्र भाग आहोत अशी जुनी भूमिका रिपीट केली कारण उघड होते इंग्लंडमधल्या प्रेसच्या स्वातंत्र्यामुळे इंग्लंडमध्ये त्यांना ब्रिटिश सरकार अटक करण्याची शक्यता न्हवती पण इंडियात अशी सिक्युरिटी न्हवती ईश्वराच्या कृपाप्रसादाचा भंग करणे त्यांना मानवणारे न्हवते आता साम्राज्यवाद हा कृपाप्रसाद असेल तर जगातला प्रत्येक पापी व त्याचे पाप कृपाप्रसादच म्हंटले पाहिजे एकंदरच मवाळांचा हा कृपाप्रसाद सिद्धांत मवाळांना फेविकॉलसारखा चिकटलेला होता आणि जनतेला जहालांची बाजू पटायला लागली खुद्द ज्या बंगाल पुढ्याऱ्यांनी हा सिद्धांत प्रसवला त्यांनीच आता हिंदुस्थान स्वतंत्र व्हावा असा परमेश्वराचा आदेश आहे असे सांगायला सुरवात केली एकंदरच ईश्वर पोलिटिकल बनून आपले आदेश राजकारणाप्रमाणे बदलत होता
ह्याउलट जहालांच्या डोक्यात मात्र नागरी असहकाराच्या तत्वज्ञानाचा विचार डोक्यात घोळायला लागला
हा विचार सर्वात प्रथम अमेरिकन विचारवंत हेनरी डेव्हिड थोरो ह्याने सिविल डिसओबडियन्स ह्या संकल्पनेच्या अंगाने मांडला जंगलात राहायला गेलेल्या थोरोवर २४ जुलै १८४६ रोजी जेव्हा सॅम स्टेपल्स नावाच्या अधिकाऱ्याने टॅक्ससाठी सक्ती केली तेव्हा गुलामीच्या निषेधार्थ थोरोने टॅक्स पे करायला नकार दिला त्याला अटक झाली त्याच्या आत्याने टॅक्स भरल्याने त्याची सुटका झाली जगातली ही पहिली नागरी असहकाराची सुरवात होती पुढे थोरोने ह्यावर व्याख्याने द्यायला सुरवात केली जी सिव्हिल डीस ओबिडियन्स ह्या नावाने प्रसिद्ध झाली सिविल सरकारला सभ्य प्रतिकार असे त्याचे स्वरूप होते
हे छोटेसे वादळ ताबडतोब मोठे झाले ते हंगेरीत ! १८५० ला ऑस्ट्रियन सरकारने जेव्हा हंगेरीचे स्वातंत्र्ययुद्ध दडपले तेव्हा फेरेंन्क डीएकने ऋणात्मक प्रतिकाराला आरंभ केला
१ कर भरायला नकार
२ सरकारी नोकऱ्यांना नकार
३ शांततामय निदर्शने
ही ह्या ऋणात्मक प्रतिकाराची वैशिष्ट्ये होती
ह्या प्रतिकाराने समित्या नेमल्या गेल्या बरखास्त झाल्या चळवळ थंडावली पुन्हा जिवंत केली गेली आणि शेवटी १८७१ साली स्वतंत्र ऑस्ट्रिया हंगेरीची निर्मिती झाली सिव्हिल डीस ओबिडियन्सला मिळालेले हे पहिले यश होते
ह्याचा प्रभाव ब्रिटनमध्ये पडला तो आयर्लंडवर ! प्रथम लॉर्ड सॅलिसबरीने १८८७ साली हंगेरीचे उदाहरण आयर्लन्डला का लागू करू नये असा प्रश्न विचारला पण आवाज घुमला तो आर्थर ग्रिफिथ ह्या आयर्लंडच्या चळवळीच्या सिनफिन पार्टीच्या संस्थापक नेत्याने १९०४ साली The Resurrection of Hungary: A Parallel for Ireland ह्या नावाने ह्या चळवळीवरचे पुस्तक प्रकाशित केले तेव्हा !
त्याने १८०१ साली किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि किंगडम ऑफ आयर्लन्ड एकत्र करून जे आत्ताचे ग्रेट ब्रिटन तयार झाले ते आता पुन्हा विभाजित करून एकाच राजाखाली दोन स्वतंत्र सरकारे चालवावीत अशी ह्या पुस्तकात मागणी केली बहुदा फाळणी केली कि काय फील येतो हे तपासण्यासाठी कि काय ब्रिटनने वंगभंग केले
पण ह्याचा परिणाम असा झाला कि जे आयर्लंडला देणार असाल ते भारतीयांना का नाही असा प्रश्न निर्माण झाला जर खुद्द ब्रिटनमध्ये एकाच राजाच्या नावाने दोन सरकारे नांदू शकणार असतील तर मग भारतीयांना स्वतंत्र सरकार का नको असा विचार टिळकांच्या डोक्यात चालू झाला
नेमक्या ह्याचवेळी अमेरिकेत गेलेल्या चायनीज लोकांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधात १० मे १९०५ ह्या दिवशी चायनाने अमरिकन मालावर बहिष्कार घातला आणि त्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरवात झाली खुद्द टिळकांनी ह्याबाबत लिहिले “It appears that our people have failed to fully understand the significance of the boycott movement started by people of Bengal. When a tough fight is going on between the people and its alien rulers, such a strong action becomes absolutely very necessary. There is an instance even in the history of England which is worth mentioning - how the people came forward to condemn their own king when their demands were not met-we neither have power, nor the will to raise arms against them. But why should not we attempt to stop the flow of crores of rupees to outside foreign country? Don’t we see, how the eyes of the American government opened by the boycott of their goods by the Chinese people. History is the witness that with the unity, courage and determination even a slave nation can rein in insolvent rulers, without using any weapon. Therefore, we are confident that the people in other parts of country also will not lag behind in supporting Bengal in the current crisis.”
बहिष्काराचे तत्व हे असे आंतरराष्ट्रीय तत्व होते आणि वंगभंगामुळे भारतीय उपखंडात त्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरवात झाली
चायनीज मालावर बहिष्कार घालायला निघालेल्या लोकांना कुणीतरी हे सांगणे आवश्यक आहे कि हे बहिष्काराचे तत्त्वही अमेरिका युरोपची देणगी आहे ह्याचा अर्थ ते स्वीकारू नये असा नाही पण स्वीकारताना ते कुठून कसे आले ह्याचे भान ठेवले कि फालतूचे देशी माज चढत नाहीत
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ११८ बंगालची फाळणी व संभाषणाचा प्रश्न ७ श्रीधर तिळवे नाईक
सत्ताधारी व जनता ह्यांच्यात जेव्हा संभाषणाचा प्रचंड अंतराय निर्माण होतो तेव्हा चळवळीचा उदय होतो विशेषतः सिव्हिल लोकशाही सरकारांच्याबाबत हे खूपच खरे असते विरोधी पक्षाचे काम हा अंतराय हा गॅप भरून काढणे हे असते साम्राज्यशाहीत विरोधी पक्षाचा अभाव असतो अशावेळी वर्तमानपत्रांची व मीडियाची जबाबदारी वाढते ह्या देशाचे दुर्देव असे इंग्रजी वर्तमानपत्रांनी कधीही ही जबाबदारी पार पाडली नाही त्यामुळे कर्झन व जनता ह्यांच्यातील गॅप वाढतच गेला ही गोष्ट तीव्रतेने जाणवली ती मोर्लेच्या संदर्भात स्वतःच्या देशात आयर्लंडच्या होम रुल चळवळीला पाठिंबा देणारे मोर्ले एकोणिसाव्या शतकातले इंग्लंडमधले एक थोर लिबरल विचारवंत होते साहजिकच त्यांच्या ज्या मिटींगा गोखलेंशी झाल्या त्या तेव्हा गोखलेंना प्रचंड आश्वासक वाटल्या व ते पुन्हा ब्रिटिशांचे भक्त झाले ब्रिटिश एकंदरच मवाळांना गुंडाळण्यात आता एक्सपर्ट झाले होते अपवाद फक्त टिळक होते ज्यांना प्रयत्न करूनही ब्रिटिश गुंडाळू शकत न्हवते
मोर्लेबाबतही टिळकांचे पाय मात्र जमिनीवरच होते जोपर्यंत मोर्ले प्रत्यक्षात हिंदुस्थानला काय देतायत हे स्पष्ट होत नाही त्यावरून त्यांच्या पुस्तकावरून आपण हवामहल बांधू नयेत असे ते सांगू लागले
टिळकांच्यापुढे ह्या काळातला एक प्रश्न होता असे काय केले तर मोर्लेना हिंदुस्तानवासी लोकांना काय नरकातून जावे लागते हे कळेल ? निःशस्त्र प्रतिकार व बहिष्कार ह्या दोन्ही शस्त्रांच्या आधारे आपण आपले दुःख पोहचवू शकतो असे टिळकांना वाटायला लागले
टिळकांच्या निःशस्त्र प्रतिकाराचे दोन अर्थ होतात
१ कायदेशीर रित्या प्रतिकार करू पण कायदा मोडणार नाही
२ कायदा मोडून निःशस्त्र प्रतिकार करू आणि ह्या गुन्ह्यासाठी जी कायद्याने शिक्षा असेल ती आम्ही भोगू
हा निःशस्त्र प्रतिकाराचा सिद्धांत स्वीकारून फुल्लरसाहेबांच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी बारिसाल येथे प्रांतिक परिषद घेण्याचे बंगाली पुढाऱ्यांनी ठरवले ह्या चळवळीत विद्यार्थ्यांनी भाग घेऊ नये असा वटहुकूम सरकारने काढला आणि वंदे मातरम म्हणायला बंदी घातली ही बंदी बेकायदेशीर आहे असे वाटून लोकांनी अध्यक्षीय मिरवणुकीत वंदे मातरमच्या घोषणा दिल्या सरकारने बाबू सुरेंद्रनाथ ह्यांना अटक केली तर घोषणा देणाऱ्या लोकांची डोकी फोडली घोषणा न देण्याचा कायदा असूनही हा कायदा निःशस्त्र राहून जनतेने मोडला व त्यासाठी जनता शिक्षा भोगायला तयार झाली
पण जशेजशें सरकारी जुलूम वाढत गेले तसतसा काही लोकांचा निःशस्त्र प्रतिकारावरचा विश्वास उडायला लागला व असे लोक सशस्त्र प्रतिकार करायला हवा असा विचार करू लागले
आतापर्यंत लोकांचा ब्रिटिश राजवटीच्या सभ्यतेवर विश्वास होता तो वंगभंग (बंगालीत बंगभंग ) चळवळीत खतम झाला अगदी ब्रिटिशधार्जिण्या मवाळांनाही आता वसाहतन्तर्गत स्वराज्य हवे असे वाटायला लागले लोकमान्यांनी १९०५ साली राष्ट्रसभांतर्गत निःशस्त्र क्रांतिकारक राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली आणि ह्यानिमित्ताने लाल बाल पाल व अरबिंदो घोष एकत्र आले १९०६ साली लोकमान्यांना काँग्रेसचे अध्यक्षपद मिळावे म्हणून तरुण पिढी कामाला लागली टिळकांची दादाभाई नौरोजींच्यावरील श्रद्धेची कल्पना असलेल्या मवाळांनी दादाभाईंचं नाव आलं तर टिळक विरोध करणार नाहीत हे ओळखून लोकमान्यांना पायबंद घालण्यासाठी दादाभाईंचे नाव अध्यक्षपदासाठी नाव सुचवले केवळ टिळकविरोधाने ग्रासलेल्या ह्या मवाळ पक्षाने तोवर किचन पॉलिटिक्समध्ये महारत प्राप्त केली होती ह्यावेळीही मासबेस असलेला नेता जाणीवपूर्वक डावलून दादाभाईंची नेमणूक झाली पण किचन पॉलिटिक्सला जे अपेक्षित होते ते घडले नाही दादाभाई नौरोजींनी प्रत्यक्ष भाषणात जहालांचा पक्ष उचलून घेतला शेवटी अर्जविनंत्यांचे राजकारण करून तेही आता कंटाळले होते आणि देश जहालांच्या दिशेने कलतोय हे त्यांच्या लक्ष्यात आले होते त्यांनी स्वराज्याचा मंत्र देऊन
१ स्वदेशी
२ राष्ट्रीय शिक्षण
३ बहिष्कार
४ स्वराज्य
असा जहालांचा चतुःसूत्री कार्यक्रमच पास करवून घेतला आणि मवाळांची चांगलीच कोंडी झाली मवाळांना एकच आशा होती लॉर्ड मिंटो जर का त्यांनी मवाळांच्या मागण्या मान्य केल्या तर मवाळांचा जो कृपाप्रसाद सिद्धांत होता त्याला बळ मिळणार होते
श्रीधर तिळवे नाईक
BAL GANGADHAR TILAK SPEECHES AND WRITING PAGE २२ तो ३२
एका अर्थाने टिळक जनतेच्या भाषेत बोलत होते एका बाजूने शिक्षणाचा खेळखंडोबा करायचा आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही अजून पुरेसे शिक्षित झाले नाही आहेत असे कारण देऊन सवलती नाकारायचा हा दुट्टपीपणा त्यांनी दाखवला
१८ सप्टेंबर १९०६ च्या भाषणात आमचं एकमात्र ध्येय स्वातंत्र्य आहे असं त्यांनी जाहीर केलं विदेशी नियंत्रणाचा पूर्ण अभाव म्हणजे स्वातंत्र्य अशी त्यांनी स्वातंत्र्याची व्याख्या केली
ते म्हणाले It is hopeless to expect anything from the rulers. The rulers have developed a system which they are not prepared to alter in spite of the protests 'of the people. Protests are of no a vail. Mere protest, not backed by ·self-reliance; .will ·not help the people
नुसत्या बहिष्काराने काही होणार नाही तर आपण स्वावलंबीही झाले पाहिजे ह्याची टिळकांना जाणीव होती स्वदेशी उद्योगधंदे उभे राहिल्याशिवाय बहिष्कारयोगाला काही अर्थ राहणार नाही ह्याची त्यांना लख्ख जाणीव होती टिळक त्यादिशेने पावलं टाकू लागले
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १२० बंगालची फाळणी मवाळांची लिमिटेड माणुसकी आणि देशभक्ती ९ श्रीधर तिळवे नाईक
अरबिंदो घोष ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे फाळणीच्या तीन वर्षात बंगाल पूर्ण पालटला आणि ब्रिटिशांचा सर्वाधिक गुलाम म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश ब्रिटिशांना कडवा विरोध करणारा प्रांत बनला PAGE ६२ तो ६४ AURBINDO घोष स्पीचेस त्यांनी उपनिषदाचा दृष्टांत दिला जणू आपण इंग्रजांनी निर्माण केलेल्या मायेत गुरफटलो आणि आता आपणाला स्वराज्याचा साक्षात्कार होतो आहे असे त्या भाषणात म्हणाले
एकंदरच बंगालने निर्माण केलेल्या प्रतिकाराच्या शक्तीने राष्ट्रसभेचे डोळे उघडले आणि जहाल व मवाळ असे दोन्ही पक्ष ही शक्ती आपल्याकडे वळवायची धडपड करू लागले खरेतर हे सत्तेचे राजकारण होते ज्याची सुरवात झाली होती मवाळांना कमीतकमी रिस्क घ्यायची होती तर जहालांना रिस्कची पर्वा न्हवती तिसरा पक्ष हा हिंसेचा होता आणि त्याची मृत्यूची तयारी होती हा पक्ष सशस्त्र प्रतिकारवादी पक्ष होता जो टिळकांना मूर्खपणा वाटत होता त्यांच्या दौऱ्यात जेव्हा त्यांना असे सशस्त्र प्रतिकारवादी लोक भेटले तेव्हा त्यांनी हा मूर्खपणा करू नका असाच सल्ला दिला त्याला उद्देशूनच टिळक म्हणाले कि जहालवाद कालिक आहे जो आज जहाल आहे तो उद्या अनेकांना मवाळवाद वाटू शकतो कारण निःशस्त्र प्रतिकाराचे दिवस संपून सशस्त्र प्रतिकाराचे दिवस आलेत असे मानणाऱ्या तरुणांचा गोतावळा वाढत चालला होता ज्यात टिळकवादाचे समर्थक असलेले सावरकरही होते
टिळकांच्या दृष्टीने बहिष्कार हेच मोठे शस्त्र होते (बंगालमध्ये ह्याची सूचना कृष्णकुमार मित्रो ह्यांनी १३ जुलै १९०५ ला संजीवनी मधून केली होती व ७ ऑगस्टला सुरेंद्रनाथ बॅनर्जीनी खूप आढेवेढे घेत स्वीकारली होती संदर्भ हिस्टरी ऑफ मॉडर्न इंडिया सुमित सरकार पान क्र १११ व ११२ ) ते अवलंबले तर आपण आपल्या मागण्या मान्य करवून घेऊ शकतो टिळक असे का म्हणत होते ? माझ्या मते शेवटी ब्रिटिश भारतात स्थिरावले होते त्याचे मुख्य कारण आर्थिक होते भारतातून कच्चा माल जात होता कारण पक्का माल तयार करण्यासाठी तो लागत होता हा पक्का माल विकला कुणाला जात होता तर भारतीयांनाच जर भारतीयांनी पक्का मालच घेतला नाही तर कच्च्या मालाची निर्यात होणेही थांबणे अटळ होते
त्यामुळेच पुढेही पक्क्या मालावर बहिष्कार हे धोरण अधूनमधून वापरले गेले बहिष्काराची दुसरी बाजू स्वदेशी मालाचे उत्पादन करणे हीच असू शकत होती त्यासाठी स्वदेशी मालाचा खप होणेही गरजेचे होते म्हणूनच बहिष्कारानंतर स्वदेशीचा पुरस्कार अटळ होता आता पुढचा प्रश्न स्वदेशी उत्पादन होणार कसे तर त्यासाठी माल तयार करण्याचे शिक्षण आवश्यक होते ह्यातूनच स्वदेशी शिक्षण देणाऱ्या शिक्षणसंस्था आवश्यक झाल्या आणि राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ आवश्यक बनली आता हे सर्व इंग्रज सहजासहजी कसे होऊ देतील ते आडवी टांग टाकणारच म्हणजे मग स्वराज्य अपरिहार्य होते ह्यातूनच बहिष्कार . स्वदेशी , राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य ही चतुःसूत्री जन्मली
दुर्देवाने मवाळ ह्या चतुःसुत्रीला प्रामाणिकपणे पाठिंबा देत न्हवते ह्याचे कारण मवाळातील काही जणांचे हितसंबंध व राजकारण हे आयात निर्यात व्यापारात गुंतलेले होते
त्यामुळेच आता ह्या काळाकडे बघताना एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो दादाभाई नौरोजी बॅरिस्टर गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी ह्यांच्यासारखे काही सन्माननीय अपवाद वगळता मवाळांची देशभक्ती खरोखर अस्सल होती का कि अमे-यूरोपमध्ये सेटल व्हायला मिळत नाही म्हणून भारतीय देशभक्त असणाऱ्या आत्ताच्या तथाकथित देशभक्तांचे हे लोक पूर्वज होते ज्यांना ब्रिटिश राज्यात ब्रिटिश सत्तेत फक्त स्वतःचा वाटा व स्वतःची जागा हवी होती जी त्यांना एकेकाळी मुस्लिम राजवटींनी दिली होती ? हे लोक स्वराज्यवादी होते कि राज्यवादी होते ज्यांना कुणाचेही राज्य असो आम्हाला तुमच्या राज्यात वरची स्थाने द्या म्हणजे झालं असं वाटत होतं ? हे लोक भारतात बोकाळलेल्या किचन पॉलिटिक्सचे आद्य भांडवलदार होते का ज्यांना फक्त सत्तेचा व्यापार करायचा होता ?
हा प्रश्न निर्माण होतो कारण मवाळांनी टिळकांना ज्या तऱ्हेने दाबण्याचा प्रयत्न केला ती तऱ्हा देशभक्तीची न्हवती एवढं नक्की
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १२१ बंगालची फाळणी १० श्रीधर तिळवे नाईक
अरबिंदो घोष यांनी एक मार्मिक प्रश्न मवाळवाद्यांना विचारला होता तो म्हणजे एकाचवेळी माया आणि ईश्वर ह्या दोघांच्यावर प्रेम कसं करता येईल ? एकतर इंग्रजांची माया स्वीकारावी लागेल किंवा स्वराज्याचा जहालांचा ईश्वर ! पुढे ते म्हणाले तुम्ही स्वतंत्र व्हा हा परमेश्वराचा आदेश आहे अर्थात हा परमेश्वराचा आदेश फिरोजशहा मेथा ह्यांना मान्य न्हवता आणि त्यांच्या नादाला लागलेल्या गोखले व सुरेंद्रनाथ बॅनर्जी ह्यांनीही तो अमान्य केला बहिष्काराचा अर्थ ह्या लोकांनी परदेशी मालपुरता व तोही बंगालपुरता मर्यादित आहे असा केला टिळकांच्या मते स्वराज्य आणि राष्ट्रीय सभा ह्यांची लग्नगाठ दादाभाई नौरोजींनी घालून दिली आहे आणि राष्ट्रीय सभेने त्या अंगाने चालायला हवे जहालांसाठी बहिष्कार स्वराज्याच्या व्यापक लढ्याचा आरंभ होता तर नेमस्तांसाठी अंत व शेवटचा पर्याय ! गोखलेंना हा मार्ग अव्यवहारी वाटत होता आणि पुढेही हा कार्यक्रम गांधींनी पुढे न्हेला तेव्हा महाराष्ट्रातील गोखलेवादी लोक टिळकवाद्यांच्या खांद्याला खांदा लावून ह्याला विरोध करत राहिले
गोखलेंचा मूळ मुद्दा असा होता कि आपणाला स्वदेशी धंदे खरोखरच विकसित करायचे असतील तर ब्रिटिश राज्याची मदत अपरिहार्य आहे त्यामुळे ब्रिटिश राज्यातच स्वदेशी धंदे आपण उभे करावेत आपण राष्ट्रीय स्वदेशी शाळा काढायला गेलो तर अजून कितीतरी वर्षे लागतील तोपर्यंत शाळांच्या बहिष्कार टाकणे शक्य आहे का किंवा राजकीय बहिष्कार टाकला व राजीनामे दिले तर त्या जागा भरायला अनेक लोक पुढे येतील तर मग बहिष्काराने काय साधेल हीच गोष्ट सरकारी नोकऱ्यांच्याबाबत त्या रिकाम्या झाल्या तर भरायला डबल लोक येतील गोखले व्यवहार्यतेच्या पातळीवर बहिष्कार ह्या सूत्राला नकार देत होते हे आपण लक्ष्यात घेतले पाहिजे गोखल्यांचे ऐकून ह्या दृष्टीने पुढे व्हॉइसरॉयने स्वदेशी मालाच्या उत्पादनाचे प्रदर्शन जेव्हा भरले तेव्हा त्याचे उदघाटनही केले टिळकांनी हे परस्परविरोधी आहे अशी टीका केली पण त्यांनी गोखल्यांचे आक्षेप खोडू न काढलेले माझ्या तरी वाचनात आलेले नाहीत गोखले फक्त आक्षेप घेऊन थांबले न्हवते त्यांनी करबंदी हा बहिष्काराला पर्याय दिला होता ज्यावर फारशी चर्चा झाली नाही गोखले एका बाबतीत मात्र ठाम होते ती म्हणजे हिंन्दुस्तानचा लढा हा अहिंसक निःशस्त्र प्रतिकारानेच चालला पाहिजे टिळकांच्यात हिंसेला असलेला सपोर्ट सुप्तावस्थेत तरी का होईना दिसतो गोखल्यांच्यात हिंसेला कसलाच आधार सापडत नाही ह्याशिवाय परकीय आक्रमकांना बोलवणे व त्याची मदत घेणे हेही त्यांना साफ नामंजूर होते गांधींच्यावर ह्या तत्वांचा सखोल परिणाम झाला
अरबिंदो घोषांचे वैशिष्ट्य म्हणजे ते बंगालच्या फाळणीमुळे निर्माण झालेल्या राष्ट्रवादाचे श्रेय टिळकांच्याप्रमाणे ना राष्ट्रीय सभेला देत होते ना नेमस्तांच्या प्रमाणे कर्झनच्या राजवटीला ! त्यांच्या मते हा राष्ट्रवाद सामान्य जनतेच्या बंदीखान्यात जन्मला आहे आणि त्याचे श्रेय काँग्रेसच्या जहाल पुढाऱ्यांना कमी मवाळ पुढाऱ्यांना शून्य आणि सामान्य जनतेला जास्त आहे श्रीकृष्णाप्रमाणे कारागृहात हा राष्ट्रवाद जन्मला आहे फकिराच्या वेषात तरुण लोकांच्या अंतःकरणात मानमरताबाचा त्याग करून रस्त्यावर उतरलेल्या सुशिक्षितांच्या जीवनात ह्या राष्ट्रवादाची वाढ झाली आहे अरबिंदोची ही मांडणी म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या ह्यापुढे शूद्रांचे राज्य येणार आहे ह्या सिद्धांताला दिलेला बळकट आधार होता विवेकानंद आणि अरबिंदो ह्या दोघांनीही जो चळवळीला जनचळवळ बनवण्याचा सैद्धांतिक प्रयत्न केला त्याने पुढे मानवेंद्रनाथ रॉय व सुभाषचंद्र बोस ह्यांच्या डाव्या राजकारणाला मासबेस पुरवला ज्यातून पुढे बंगालमध्ये मार्क्सवादी राजवट पुढे आली
अरबिंदोची ही मांडणी म्हणजे प्रस्थापित पुढाऱ्यांना दिलेला ठाम नकार होता साहजिकच नवा जहाल पक्ष राष्ट्रसभा गिळायला बसलाय असे भय जुन्या मवाळ लोकांना वाटले तर आश्चर्य काय ? साम्य फक्त एकच होते ज्याप्रमाणे जहालांना दादाभाई नौरोजी शिरसांवद्य होते तसे ह्या नव्या क्रांतीकारकांना टिळक शिरसांवद्य होते टिळकांच्या त्यागाला मिळालेली ही एका अर्थाने पावती होती
एक मात्र नक्की होते ते म्हणजे गोखले बॅनर्जी टिळक व लाला लजपत रॉय ह्या चौघांनाही काँग्रेस फुटावी असे वाटत न्हवते आणि त्यासाठी ते तत्वाला थोडीशी मुरड घालायला तयार होते टिळक कट्टर जहाल असणाऱ्या बिपीनचंद्र पाल व अरबिंदो घोष ह्यांना आवर घालण्यास यशस्वी होत होते तसे गोखले मेथांना आवर घालण्यास यशस्वी होत न्हवते ह्याचे कारण टिळक देशासाठी दोन वेळा तुरुंगात जाऊन आल्यामुळे त्यांच्या शब्दाला एक ऑथेन्टिसिटी प्राप्त झाली होती गोखल्यांना कधीही तुरुंगवास घडला न्हवता त्यामुळे ती ऑथेन्टिसिटी न्हवती
ह्याचा अर्थ जहालांच्या निःशस्त्र प्रतिकाराने सर्वच समाधानी होते असे न्हवते बंगालमधील एक उलट अंतर्प्रश्न तिथे गेलेल्या पंजाबी आणि महाराष्ट्रीय मारवाडी पारशी महाजनांचा होता ज्यांनी बंगालमधल्या जमिनी खरेदी करायला सुरवात केली होती आणि ज्याचा बंगालच्या फाळणीशी असलेला नेमका संबंध स्पष्ट होत न्हवता मात्र एक नक्की ह्या जमिनीवर राबणाऱ्या काही लोकांच्या डोक्यात हिंसा घोळायला लागली होती
ह्याउलट भद्र लोकात उलट्या दिशेने निशस्त्र प्रतिकार नाकारला तो खुद्द अरबिंदो घोष ह्यांचे बंधू बिरेंद्रकुमार घोष ह्यांनी ज्यांनी लोकांची डोकी फुटतांना प्रत्यक्ष पाहिले होते आणि स्वामी विवेकानंद ह्यांचे बंधू भूपेंद्रनाथ दत्त ह्यांनी ! १९०२ साली स्थापन झालेली अनुशीलन समिती ही कलकत्यात ऍक्टिव्ह झाली बंगालच्या फाळणीचे जवळजवळ सगळेच नेते कायस्थ क्षत्रिय होते हा योगायोग न्हवता मुळात कलकत्ता हे शहरच कालीचे शहर होते आणि तिथे हिंसा सन्माननीय होती जर ती दुष्टांची असेल ह्याचवेळी महाराष्ट्रात सावरकर आपल्या अभिनव भारत समाज ह्या संस्थेतील तरुणांना सशस्त्र क्रांतीची दीक्षा द्यायला लागले
राष्ट्रसभेचे पुढचे अधिवेशन कुठे भरवायचे असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा मवाळांनी आपल्या सोयीचे शहर शोधायला सुरवात केली सुरवातीला नागपूरचे नाव होते पण टिळकांना नागपूरकरांचा प्रचंड पाठिंबा मिळणार हे लक्षात येताच अधिवेशन सुरतेला शिफ्ट करण्यात आले एका नव्या रणसंग्रामाची ही तयारी होती
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १२२ बंगालची फाळणी व मुस्लिम लीगची स्थापना ११ श्रीधर तिळवे नाईक
बंगाली फाळणीला सर्वात अनपेक्षित आलेलं फळ कुठलं असेल तर ते म्हणजे मुस्लिम लीगची झालेली स्थापना ! फाळणीला उच्चभ्रू मुस्लिमांचा असलेला पाठिंबा हिंदू आंदोलकांनी मनावर घ्यायलाही नकार दिला आणि हे कळेस्तोवर मुस्लिम लीगची स्थापना झाली होती
कुठलाही भाडेकरू कधीही आपल्याला मिळालेले घर जसेच्या तसे परत करू इच्छितो ब्रिटिशांनी तीन लोकांच्याकडून देश घेतला होता
१ शैव ह्यात मराठा व शीख साम्राज्याचा मुलुख होता
२ मुघल व मुस्लिम ह्यात टिपू हैदर व मुघल आणि मुस्लिम संस्थानिक होते
३ काही छोटे छोटे वैष्णव संस्थानिक होते
त्यामुळे जातांनाही भारताचे किमान तीन तुकडे करावे लागणार असं ब्रिटिशांनी गृहीत धरलं होतं
राष्ट्रीय सभेमुळे काही काळ असा भास झाला कि द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मागे पडलाय आणि मुस्लिम कम्युनिटी काँग्रेसच्या मागे आहे खरेतर मुस्लिम कम्युनिटी काँग्रेसच्या मागे काही काळ होतीही १८९८ साली सर सय्यद अहमद खान ह्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर काहीकाळ द्विराष्ट्र सिद्धांताची कुणाला फारशी आठवण झाली नाही १९०१ ला काही मुस्लिमाना मुस्लिमांची स्वतंत्र राजकीय पार्टी हवी असे वाटले पण चर्चेपलीकडे गोष्टी गेल्या नाहीत
इकडे जहालांनी स्वराज्याची मागणी जोर लावून केली तशी मुस्लिमांना गोंजारण्यासाठी कर्झनने ह्या सिद्धांताला हवा दिली कर्झन ह्याने केलेल्या बंगालच्या फाळणीमुळे हिंदू मुस्लिम ह्यांच्यात फट पडली मुस्लिम एलिट वर्गाचा ह्या फाळणीला पाठिंबा होता पण प्रत्यक्षात जेव्हा काँग्रेसने ह्या फाळणीला विरोध केला तेव्हा ह्या वर्गापुढे दोन पर्याय उभे ठाकले
१ बंगालची फाळणी राष्ट्रीय सभेप्रमाणे नाकारणे
२ बंगालच्या फाळणीला पाठिंबा देणे
नवाब सलीम उल्ला खान ह्याने उघडपणे फाळणीला पाठिंबा दिला म्हणजेच ह्यातील दुसरा पर्याय स्वीकारण्यात आला तेव्हा साहजिकच ब्रिटिशांना आपल्याला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे असं वाटायला लागलं साहजिकच सर सय्यद अहमद खान ह्यांनी स्थापन केलेल्या अलिगढ युनिव्हर्सिटीला सहानुभूती दाखवत ब्रिटिशांनी द्विराष्ट्र सिद्धांताला पाठिंबा द्यायला सुरवात केली यदाकदाचित ब्रिटिशांनी भारत सोडला तर इंग्रज जाताना मुस्लिमांना स्वतंत्र राष्ट्र देतील असे आश्वासन देण्यात आले
ह्याचा परिणाम अटळ होता मुस्लिमांचे रक्त न सांडता राष्ट्रीय सभेने केलेल्या आंदोलनाला यश मिळाले तर स्वतंत्र राष्ट्र मिळणार होते किंवा यश नाही मिळाले तर ब्रिटिशांचा फेवर ! पांचो उंगलीया घीमे अशी ही मुस्लिमांची स्थिती होती
ह्यासाठी करायचं काय तर
१ राष्ट्रीय सभेला विरोध करत रहायचा जेणेकरून ब्रिटिश आपल्याला पॉझिटिव्हली पहात राहतील
२ ब्रिटिशांना पाठिंबा देत जेव्हढं पदरात पाडून घेता येईल तेवढं पदरात पाडून घ्यायचं
हे करायला मुस्लिमांची एक स्वतंत्र संघटना आवश्यक होती त्या दृष्टीने लखनौ व सिमल्याला मिटींगा झाल्या व त्यानुसार संघटना स्थापन करण्याचे ठरले नवाब सलीम उल्ला खानने ऑल इंडिया मुस्लिम फेडरेशन हे नाव सुचवले सरतेशेवटी एलिट मुस्लिमांनी ढाक्याला ही संघटना स्थापन केली तिचे नाव ऑल इंडिया मुस्लिम लीग !
२६ ते ३० डिसेम्बर १९०६ ला ढाक्याला झालेल्या ह्या अधिवेशनाला ३००० मुस्लिम प्रतिनिधींनी हजेरी लावली सर सुलतान महम्मद शाह आगाखान तिसरे हे मुस्लिम लीगचे पहिले प्रेसिडेन्ट होते १९०७ ला मौलाना महम्मद अली ह्यांनी ग्रीन बुक ह्या नावाने संघटनेची घटना तयार केली
काही काळातच सर सुलतान महम्मद शाह आगाखान तिसरे ह्यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत पुन्हा जिवंत केला
ह्या संघटनेमुळे हिंदुस्तानच्या राजकारणात तिसरा प्लेयर अस्तित्वात आला जो पुढे दोघांनाही मस्त झुलवणार होता आतापर्यंत गलिगढ असणारे अलिगढ पॉलिटिक्स भविष्यात बलिगढ पॉलिटीक्स म्हणून उदयाला येणार होते
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १२३ बंगालच्या फाळणीने काय साधले? श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १२४ टिळकांची स्वराज्याची संकल्पना व तिच्या मर्यादा श्रीधर तिळवे नाईक
ज्या स्वराज्यावरून जहाल मवाळांच्यात ही घमासान लढाई सुरु होती त्या स्वराज्याविषयी टिळक सुरवातीपासूनच क्लिअर होते दैनिक केसरी व मराठात ते वेगवेगळ्या पद्धतीने स्वराज्याविषयीच्या त्यांच्या कल्पना सादर करत होते धनंजय कीर ह्यांनी त्यांच्या टिळक चरित्रात हा प्रवास उत्तम रीतीने सादर केला आहे
वेदान्तातील स्वराज्यमपासून ते शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांचा आधार घेत ते आपली संकल्पना मांडत होते
The opportunity for spiritual Swaraj for all the people It is life centered in self and dependent upon self. There is Swaraj in this world as well as in the world hereafter. The Rishis who laid down the law of duty betook themselves to forests, because the people were already enjoying Swarajya or people’s dominion which was administered and defended in the first instance by the Kshatriya Kings. Swaraj in the life to come can not be the reward of a people who have not enjoyed it in this world. अशी त्यांची अध्यात्मिक बैठक होती स्वराज्य ही नैतिक आवश्यकता होती जो भूलोकी स्वराज्य प्राप्त करू शकत नाही त्याला परलोकातही स्वराज्य प्राप्त होणे अशक्य असे त्यांचे मत आहे
ह्याचा अर्थ टिळकांचे स्वराज्य हे धर्मराज्य आहे ते इहलोकात आहे तसे परलोकातही आहे आणि पुढे हीच संकल्पना विकसित करून सावरकरांनी हिंदुत्व मांडले आहे टिळकांच्या राष्ट्रवादाला त्यामुळेच धार्मिक राष्ट्रवाद असे म्हंटले जाते
त्यांना अपेक्षित होते ते स्वराज्य मिळत नाही म्हणून No piece meal reform will do. The system of present administration is ruinous to the country. असा आक्रोश त्यांनी केला होता It must '' mend or end.'' मेंड ऑर एन्ड ह्या निष्कर्षापाशी ते पोहचले होते
"swaraj is the right of the people to conduct the administration of the country according to what they consider to be their good" अशी त्यांनी व्याख्या दिली होती जिला जहालांची संमती होती आणखी एके ठिकाणी a government which rules according to the wishes of the people of their reperesentatives असे त्यांनी म्हंटले होते
सुरवातीला ब्रिटिशांना हाकलून देणे एव्हढेच त्यांना अपेक्षित होते पण पुढे ब्रिटिश गेल्यानंतर काय हा प्रश्न लोक त्यांना विचारू लागले त्यामुळे ही संकल्पना धार्मिक , अध्यात्मिक व नैतिक व नंतर स्पष्टपणे राजकीय बनत गेली The main point is that all the system should be in our hands. I am demanding the key of my house. But I do not want to evict a stranger from the house. Total Sawaraj is our aim. We want full control on our administrative machinery. Now we are just and clerks and tools in the hands of foreign masters असे ते म्हणायला लागले
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणणारे टिळक पुढे १९१६ च्या लखनोच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये स्वराज्य हा प्रत्येक भारतीयाचा जन्मसिद्ध हक्क आहे असे म्हणाले We want equality. We cannot remain slaves under foreign rule. We will not carry for an instant longer, the yoke of slavery that we have carded all these years. Swaraj is our birth- right. We must have it at any cost. When the Japanese, who are Asians like us, are free, why should we be slaves? Why should our Mothers hands be handcuffed.”
असे असूनही टिळकांना मग विरोध का होत होता ?
लॉर्ड कर्झनचा व इंग्रजांचा विरोध आपण समजू शकतो कारण त्यांना राज्य करायचे होते आणि त्यांना बदललेली परिस्थिती दिसतही होती कर्झनने एके ठिकाणी म्हंटले आहे Curzon had been quick to reply. “To you in England it seems so clear that there is no difference between the end of Lord Dufferin’s regime and the end of mine. To me in India it is transparent tbat there is all the difference in the world. What is the great difference at this end ? It is that public opinion has been growing all the while, is articulate, is daily becoming more powerful, cannot be ignored. What is the origin of mistakes sometimes made at other end ? It is that men are Standing Still their eyes shut and do not see the movement here.
page ३२७
ह्याचा अर्थ कर्झनला भारतीय मानसिकतेत झालेले बदल स्पष्ट दिसत होते
प्रश्न असा आहे कि जे बदल कर्झनला दिसत होते ते मावळवाद्यांना का दिसत न्हवते ?
बहिष्कार हा एक मतभेदाचा मुद्दा होता ज्याची चर्चा आपण केली आहेच बाकी राजाला दैवी मानण्याची वृत्ती मवाळांच्याप्रमाणे टिळकांच्यातही होती शेवटी टिळक वैष्णव होते आणि वैष्णवांच्या दृष्टीने राजा विष्णूचा अवतार होता टिळकांच्याच भाषेत सांगायचे तर “There is no relation between the king or king’s views and Swaraj. The King is divine for us. He is above good or bad. He is permanent. The institution of the king which the gist of the government. He is divine for us and this idea will remain intact. But we can change the government. The relation of my Swaraj idea is with the government. What I mean say is that such amendments should made so that we can improve the living of Indian people. The Swaraj means in whose hands our destination should be. I have said that I don’t want to change the rule of the king. The bureaucracy should be in our hands not in the British’s hands. In short, we can said that all the control of our work should be in our hands.”
राजाला दैवी मानणे राजा दैवी असून तो चांगले आणि वाईट ह्यांच्यापलीकडे असून तो चिरस्थायी आहे असे मानणे हे लक्षात घेतले कि आज हिंदुत्ववादी मोदींना देव का मानतो का त्यांचे भक्त त्यांच्याविरुद्धची टीका सहन करत नाहीत हे लक्षात येते
टिळकांच्यासारखा बुद्धिमान माणसाने राजा दैवी असून तो चांगले आणि वाईट ह्यांच्यापलीकडे असून तो चिरस्थायी आहे असे मानावे ह्याला परंपरेचा विजय मानावा कि नव्या युगाचा पराभव मानावा ? जर टिळकच राजाकडे डोकं गहाण टाकणार असतील तर मग इतरांच्याविषयी तक्रार का करावी ? हे असे घडण्याची दोन कारणे आहेत १ टिळकांचे अनकॉन्शस माईंड ब्राम्हण व क्षत्रिय ह्या पुण्ययोनी आहेत हे मानतं साहजिकच ब्राम्हण भूदेव व क्षत्रिय दैवी व देवाचा अवतार हे समीकरण त्यांना मान्य आहे २ टिळकांचा सर्व क्षत्रिय परशुरामाने नष्ट केलेत ह्यावर विश्वास असल्याने नव्याने क्षत्रिय बनलेल्या सर्वांनाच ते दैवी व देवाचा अवतार मानायला तयार आहेत
टिळकांची ही मानसिकता आजच्या समस्त हिंदुत्ववाद्यांची मानसिकता असल्याने आज हिंदुत्ववादी मोदींना देव का मानतात व का त्यांचे भक्त त्यांच्याविरुद्धची टीका सहन करत नाहीत हे सहज लक्षात येते एकदा राजा चांगले आणि वाईट ह्यांच्यापलीकडे असतो हे स्वीकारल्यानंतर त्याने कितीही वाईट केले तरी त्याला ते माफच आहे असे ठरते मग पक्षांतर्गत विरोध कोण कशाला करतोय आणि केला तरी त्याच्याबाबतचा निर्णय राजाच म्हणजे मोदीच करणार हो अट फक्त एकच आहे राजाने वेदांवर श्रद्धा ठेवली पाहिजे टिळक हे असे हिंदुत्ववाद्यांच्या नसानसात भिनलेत मी टिळकांना आद्यहिंदुहृदयसम्राट त्यामुळेच म्हणतो
मी मागे चर्चा केलेल्या द्विदल राज्यपद्धतीच्या संस्कारातून टिळकही मुक्त न्हवते पेशवाईत ज्याप्रमाणे छत्रपती होते त्याप्रमाणे ब्रिटिश राजे व राजघराण्याने छत्रपतींच्यासारखे रहावे आणि पेशवाईची वस्त्रे त्यांनी भारतीयांच्या हाती सोपवावीत असेच ते म्हणत होते वैष्णव विशेषतः भक्तीवाले वैष्णव असे मानत कि मुक्ती मिळाल्यानंतर मुक्त पुरुषाला स्वराज्य प्राप्त होते मात्र त्याच्यावर अंतिम सत्ता ब्रम्हाची व परमेश्वराची राहते टिळकांचा परमेश्वर ब्रिटिश होता आणि स्वराज्य ही मुक्ती होती खरेतर ज्या शंकराचार्यांना टिळक मानतात त्यांच्या अद्वैत सिद्धांतात हे बसत नाही कारण अद्वैतात मुक्ती आणि ब्रम्ह भिन्न नाही मीच ब्रम्ह आहे असे अद्वैत सांगते तरीही टिळकांनी हे द्वैत स्वीकारावे आणि स्वराज्य आणि ब्रिटिश ह्यांना भिन्न मानावे हे आश्चर्यकारक म्हंटले पाहिजे टिळक संपूर्ण परराष्ट्र धोरण ब्रिटिशांनी हाताळावे आणि अंतर्गत धोरण आम्ही हाताळू असे म्हणत होते
गांधींनी ही मर्यादा ओलांडायला सुरवात केली आणि काँग्रेसने जसे संपूर्ण स्वातंत्र्य मागायला सुरवात केली तसे टिळकवादी हिंदू जे प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेणे कमी केले
टिळक असे द्वैती का होत होते ? कारण भारत परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे हाताळू शकेल ह्याचा विश्वास त्यांना वाटत न्हवता विशेषतः पहिल्या महायुद्धांनंतर भारतावरही आक्रमण होऊ शकतं ह्याची लख्ख जाणीव त्यांना झाली होती भारतीय क्षत्रियांच्यावर त्यांचा विश्वास न्हवता आणि भारतीय पुढाऱ्यांच्यात युद्ध हाताळण्याची क्षमता आहे असे त्यांना वाटत न्हवते त्यामुळेच महायुद्धानंतर स्वराज्याऐवजी होम रुल हा शब्द आधिक वापरतांना दिसतात
टिळकांच्या ह्या विचाराचा सखोल परिणाम महात्मा गांधींच्यावर झालेला दिसतो किंबहुना गांधी म्हणजे टिळक आणि गोखले ह्यांचा सुवर्णमध्य होते
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १२५ स्वराज्य आणि टिळकांच्या मते हिंदू कोण ? श्रीधर तिळवे नाईक
टिळकांच्या पुढे निर्माण झालेला प्रश्न म्हणजे हिंदू कोण ? ते हिंदुत्वाची संकल्पना मांडत असल्याने हे अटळ होते त्यांनी ह्या प्रश्नाचे दिलेले उत्तर हिंदुत्ववाद्यांनी स्वीकारलेले असल्याने ते महत्वाचे आहे
टिळकांची धर्मविषयक मते ह्या ग्रंथात त्यांचा उहापोह आहे
टिळकांनी हिंदू प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु म्हणजेच ज्याची बुद्धी वेदांना प्रमाण मानते तो हिंदू असे पहिले लक्षण सांगितले आहे वेद तीन माना कि चार पौरूषेय माना वा अपौरुषेय नित्य माना वा अनित्य जोवर तुम्ही वेद प्रमाण मानताय तोवर तुम्ही हिंदू आहात
टिळकांच्या मते साधनानामनेकता हे हिंदू धर्माचे दुसरे लक्षण आहे जो भक्ती कर्म ज्ञान वा राजयोग असे सर्व मार्ग मानतो व सर्वच साधनांनी मनुष्याला मोक्ष मिळतो असे मानतो तो हिंदू इतर धर्म एकाच वाटेने जातात हिंदू अनेक वाटांनी जातात सर्व साधनांचा मार्गांचा समान आदर करतो तो हिंदू
उपास्यानामनियमः हे टिळकांच्या मते हिंदूंचे तिसरे लक्षण आहे इस्लाम फक्त एकट्या महंमदाला बौद्ध फक्त गौतम बुद्धाला जसे उपास्य मानतात तसे हिंदू कुणा एकाला उपास्य मानत नाही शिव विष्णू गणपती अशी कोणतीही देवता उपास्य असू शकते असे हिंदू मानतात
पहिल्या तीन लक्षणानुसार वेद मानणारा कुठलाही मनुष्य महंमदाची शिकवण स्वीकारून अल्लाला उपास्य देवता मानेल मग त्याला हिंदू मानायचे काय असा प्रश्न निर्माण होतो म्हणून टिळक जो हिंदूंचे परंपरेने चालत आलेल्या विधींपैकी काही विधी परंपरेने चालत आलेल्या संस्कारांपैकी काही संस्कार परंपरेने चालत आलेल्या आचारापैकी काही आचार पाळतो तो हिंदू असे चौथे लक्षण टिळक हिंदूंचे सांगतात सर्वच विधी आचार संस्कार पाळता येणे अशक्य असल्याने टिळक काही हा शब्दप्रयोग करतात जर आर्य समाज वा ब्राम्हो समाज काही विधी आचार संस्कार पाळत असतील तर ते हिंदूच असं ते म्हणतात इतकेच न्हवे तर जैन बौद्ध हे धर्मही हिंदूंचे काही विधी आचार संस्कार पाळत असल्याने त्यांनाही हिंदू म्हणायला काहीच हरकत नाही असे टिळक मानतात
टिळकांची हीच मांडणी सावरकर पुढे घेऊन जातात आणि ह्या सगळ्या हिंदू लोकांना हिंदुत्वाच्या झेंड्याखाली एकत्र आणू पाहतात
टिळक चातुर्वर्ण्य व्यवस्था परमेश्वरानेच निर्माण केली आहे असा गीतेचा हवाला देऊन म्हणतात मात्र गुणकर्मानुसार ही व्यवस्था आहे असे ते म्हणतात ह्याही पुढे जाऊन एक अजिबोगरीब गोष्ट म्हणजे टिळक व्यवसाय धंदे गुणकर्मानुसार मानतात पण रोटीबेटीचे व्यवहार अंतर्वर्णीय करण्याची त्यांची तयारी नाही आंतरजातीय विवाह करा असे ते सांगतात पण अंतर्वर्णीय विवाहाला टिळकांचा विरोध आहे जातीव्यवस्था ही आर्य अनार्य ह्यांच्यातील वर्णभेदामुळे निर्माण झाली हे टिळकांचे मत आहे
टिळक ज्युडायिक धर्मांना हिंदू म्हणून मान्यता देत नाहीत सावरकर त्यांचाच कित्ता गिरवतात धर्मपरिवर्तनाला टिळकांचा आक्षेप नाही पण हे धर्मपरिवर्तन नेमके कशासाठी केले जाते आहे ते तपासून मगच परधर्मियांना आपल्या धर्मात आपण दाखल करून घ्यावे असे ते सुचवतात इतर धर्मीय जर आपल्या धर्माचा आदर करीत असतील तर आपणही त्यांचा व त्यांच्या धर्माचा आदर करावा पण ते दांडगाई करणार असतील तर त्यांच्या दांडगाईला दांडगाईनेच उत्तर द्यावे असे टिळक म्हणतात मुसलमान खाटक्याची गाय कोणी दांडगाईने चोरून आणत असेल तर त्या हिंदूला शिक्षाच द्यायला हवी असे टिळक म्हणत पण आमच्या धर्मपालनात वा उत्सवात इतर धर्मीय अडथळा आणत असतील तर त्यालाही शिक्षा झाली पाहिजे असे ते म्हणत
प्रश्न असा आहे टिळक आपल्या ह्या हिंदुत्वात स्वराज्यात इतर धर्मियांना कसे सामावून घेणार तर ह्याबाबत तुझा धर्म तू पाळ आणि माझा धर्म मला पाळू दे असे त्यांचे धोरण आहे त्यामुळेच मुस्लिमांना ते तुम्हाला शिवाजीची जयंती साजरी करायची नसेल तर नका करू अकबराची जयंती साजरी करा असे म्हणतात आता ह्याला सेक्युलॅरिझम म्हणायचे कि नाही हे ज्याने त्याने ठरवायचे आहे कारण टिळकांच्या काळात तुझा धर्म तू पाळ आणि माझा धर्म मला पाळू दे ह्या साध्या तत्वानुसार प्रश्न सुटू शकत होते आजच्या काळात हे शक्य नाही
श्रीधर तिळवे नाईक
व व
पान क्रमांक १८३ ते
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १२६ टिळकांची स्त्रीशिक्षण , राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना व तिच्या मर्यादा श्रीधर तिळवे नाईक
टिळकांच्या बहिष्कार व स्वराज्य ह्या दोन संकल्पनाची चर्चा केल्यानंतर आता आपण त्यांची राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना पाहणार आहोत टिळक हे स्वतः उत्तम शिक्षक व शिक्षणसंस्था चालक होते आणि एका शिक्षकाचे चिरंजीव होते साहजिकच त्यांना शिक्षणाविषयी प्रचंड आस्था होती
लोकमान्य टिळकांचे लेख खंड ४ मध्ये त्यांचे अनेक शिक्षणविषणविषयक लेख आहेत ते वाचले कि टिळकांचे शिक्षणविषयक विचार सहज समजून येतात
२८ सप्टेंबर १८८७ साली टिळकांची फिमेल हायस्कुलातील शिक्षणक्रम (उक्त पान ६९ ते ८२ ) ह्या नावाने एक मालिका सुरु झाली अभ्यासक्रम हा कायमच टिळकांच्या प्रेमाचा विषय असल्याने इथेही टिळक अभ्यासक्रमाची चर्चा करतात लोकमताच्याविरुद्ध जायचे नाही हे टिळकांचे कायमच मुख्य धोरण होते टिळकांच्या काळात स्त्रियांना शिक्षणच नको असे म्हणणारे सनातनी होते टिळक त्यांचा पक्ष घेत नाही स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे ह्याविषयी त्यांच्या मनात शंका नाही मनुष्याचे अर्धांग अशिक्षित राहून चालणार नाही असे ते म्हणतात इतकेच कशाला तत्कालीन शिक्षणसंस्थेत फिमेल स्कुलमध्ये जो गोषा वा पडदा ठेवणे सक्तीचे होते त्याला त्यांनी ठाम नकार दिला होता मात्र स्त्रियांना कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे ह्याविषयी ते सनातन होते दोघांना समान अभ्यासक्रमाचे शिक्षण त्यांना अमान्य होते टिळकांचा पहिला मुद्दा आता विचित्र वाटतो त्यांच्या मते जिथे मोठेपणी विवाह होतो तिथल्या गोष्टी वेगळ्या भारतात लहानपणी लग्न होत असल्याने शिक्षणाची मुख्य जबाबदारी पित्यावर न पडता सासऱ्यावर व नवऱ्यावर पडत असल्याने स्त्रियांचे शिक्षण हे सासरला त्यांना कोणती कर्तव्ये पार पाडायची आहेत त्यावर ठरणे अटळ आहे खुद्द इंग्लंडमध्येही जी शैक्षणिक समता आहे ती अलीकडच्या पाच पंचवीस वर्षात तिकडे आली आहे ती आपल्याकडे थेट अंमलात आणण्यात काय हशील असा प्रश्न टिळक विचारतात सद्यातरी जिला गृहकर्म व धर्मकर्म ह्यांचा कंटाळा आलेला नाही अशा स्त्रिया जास्ती असल्याने त्यांना त्याच तऱ्हेचे शिक्षण द्यावे असे टिळक म्हणतात
टिळकांच्या विचारातील पायाच मुळात चुकीचा असल्याने ते असा विचार करतायत ते समाजाप्रमाणे परंपरेप्रमाणे शिक्षण द्यायला हवे असे मानतात प्रत्यक्षात शिक्षणाचा मुख्य आधार सत्य आणि सत्याचे आजवर चालत आलेले ज्ञान हेच असले पाहिजे भले मग ते सामाजिक शिष्टाचाराच्या विरुद्ध का जाणारे असे ना ! शिक्षणाचे तोंड भूतकाळाकडे ठेवण्यात काय हशील ? शिक्षणाचे केवळ तोंडच न्हवे तर हात पाय धड देखील भविष्याच्या दिशेने असायला हवे
टिळकांच्या मते लग्न झालेल्या मुली शाळा सोडतात व त्या परत शाळेत येत नाहीत त्याची कारणे आपण शोधायला हवीत टिळक प्राथमिक व हायस्कूल शिक्षण हे वेगळे पाहिजे असं सांगतात आपल्याकडे लग्न लहान असतांना होत असल्याने ह्या विवाहित मुलींना ह्या हायस्कूलमध्ये काही उपयुक्त शिक्षण मिळायला हवे असे ते म्हणतात त्यांच्या मते सध्यातरी विवाहित स्त्रीला मिळणारे शिक्षण हीच कसोटी असले पाहिजे सध्या स्त्रियांचे सासर हेच वर्कशॉप आहे असे एक इंटरेस्टिंग निरीक्षण ते मांडतात मात्र पुरुषांना धंदेशिक्षण आवश्यक मानणारे टिळक स्त्रियांना धंदेशिक्षण नाकारतात त्यांच्या मते चार पाच श्रीमंत स्त्रिया वगळता इतरांना त्यांचा फायदा नाही डॉक्टर आनंदीबाई हे ते अपवादात्मक उदाहरण मानतात
कुठे ना कुठे तरी सासरचे लोक सुनेच्या शिक्षणाची विशेषतः धंदेवाईक शिक्षणाची जबाबदारी घेणार नाहीत अशी टिळकांना भीती वाटत असावी असे वाटते आणि टिळकांच्या काळात ती अगदीच अनाठायी होती असे नाही पण मग ह्या भीतीवर उपाय काय तर मुलींचे लग्न त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर वा २१ वर्षानंतर तिच्या संमतीने करणे हा होय टिळक त्याकडे वळ्तच नाहीत आणि ही दुर्देवी गोष्ट होय
घटलेल्या संख्यापटासाठी ते समाजसुधारकांच्या सुधारणांना जबाबदार मानतात ते त्यांच्या सुधारणांना काल्पनिक सुधारणा म्हणतात आपले सुधारक इंग्लंडमधले ताजे लोणी चटकन चाटण्याचा प्रकार करत आहेत असं ते म्हणतात त्यांना म्हणायचंय असं कि आधी दूध तरी तयार करा मग लोण्याकडे वळता येईल प्रत्यक्षात हा युक्त्तीवाद उत्क्रांतिवादी आहे आणि शिक्षणासाठी तो लागू करण्याची गरजच नाही कारण ह्या युक्तिवादात त्यांनी जितकी वर्षे घेतली तितकीच आम्हीही घ्यायला हवीत असे गृहीतक आहे प्रत्यक्षात शिक्षणाचा वेग वाढवणे आपल्याच हातात असते
टिळक पूर्ण प्रतिगामी आहेत का ? तर नाही त्यांच्या मते प्रथम स्त्रियांना पूरक वाटेल रुचेल असे शिक्षण सुरवातीला द्या मग समाज जसजसा बदलत जाईल त्याप्रमाणे शिक्षण द्या एकदम ऍडव्हान्स शिक्षण द्यायला जाल तर शाळा बंद पडतील असा इशारा ते देतात
(जाता जाता सध्या फेसबुकवर आपण मोदी फॅन्ससाठी भक्त वा मोदीभक्त असा शब्दप्रयोग वापरतो तसा शब्दप्रयोग टिळक सुधारकांसाठी वापरतात ते सुधारकांना सुधारकभक्त म्हणतात ह्याला काळाने उगवलेला सूड म्हणावे का ?)
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १२७ राष्ट्रीय शिक्षण , आयुर्वेद आणि टिळक श्रीधर तिळवे नाईक
आयुर्वेद ही शैवांची देणगी असली तरी पुढे तिच्यात सर्वांनीच भर घातली साहजिकच इंग्रज जेव्हा ह्या देशात ऍलोपॅथी आणि होमिओपॅथी घेऊन आले तेव्हा आयुर्वेदाचे काय करायचे ह्यावर चर्चा सुरु झाली सुदैवाने काविळीसारख्या रोगात पाश्च्यात्य वैद्यकशास्त्र उपयोगी न पडल्याने आणि आयुर्वेदाने गुण आल्याने खुद्द इंग्रजांच्यात आयुर्वेदाविषयी प्रेम असणारे लोक होते टिळकांचे ह्याविषयावरचे मत त्यांनी आर्य वैद्यकाचे पुनरुज्जीवन (संदर्भ लोकमान्य टिळकांचे निबंध खंड ४ २०१ ते २०६ )ह्या निबंधात मांडले आहे सद्या आयुर्वेदावर जी चर्चा सुरु आहे तिचे मूळ तत्कालीन वादात आहे
म्लेंछ असोत कि यवन ज्ञान सर्वांचेच ग्रहण केले पाहिजे असे शास्त्रवचन आहे असा दाखला देत टिळक पाश्च्यात्य वैद्यकशास्त्राला मान्यता देतात आणि राष्ट्रीय शिक्षणात रसायनशास्त्र , वनस्पतीशास्त्र , इंद्रियविज्ञानशास्त्र ह्यासारख्या पाश्चात्य शास्त्रांचाही समावेश केला पाहिजे असा आग्रह धरतात
ह्या नवीन पाश्चात्य शास्त्राकडे अधिक ज्ञान आहे हेही ते खुल्या दिलाने मान्य करतात
मात्र त्यामुळे आयुर्वेद टाकाऊ होतो असे त्यांना वाटत नाही त्यांच्या मते आयुर्वेदातले उपाय हे अनेक वर्षांच्या अनुभवातून आणि अनेक लोकांच्यावर उपचार करून आल्याने ते अनुभवजन्य आहेत शेवटी पाश्चात्य वैद्यकशास्त्रालाही अमुक औषध अमुक रोगावर चालते हे अनुभवातूनच कळते आयुर्वेदिक औषधे हीही अशी अनुभवातूनच आलेली आहेत
मात्र टिळक आता जो आयुर्वेद तो आपण अधिकाधिक शास्त्रीय बनवला पाहिजे असा आग्रह धरतात
औषधे विलायतेहून शास्त्र विलायतेहून ही परिस्थिती बरी नाही इंग्रजांनी आमची पुराणी शास्त्रे धोक्यात आणली आहेत असे ते म्हणतात त्यापुढे जाऊन टिळक राष्ट्रीय वैदयशास्त्र हवे अशी मागणी करतात मेडिकल ग्रॅज्युएटनी प्राच्य व पौर्वात्य ह्यांना एकत्र करून नवे हिंदूवैद्यक करण्याच्या निमित्ताने कॉलेज काढले पाहिजे असे त्यांना वाटते इंग्रजी सरकार फक्त ऍलोपॅथीला उत्तेजन देत असल्याचा आरोप करून आयुर्वेदासाठी एतद्देशीयांनीच आता मेहनत करायला हवी असे ते म्हणतात
आमचे सर्व वैद्य द्रव्यसंचय करण्यात गुंतले असल्याने आमचे स्वतःचे वैद्यकशास्त्र विकसित झाले नाही असे ते म्हणतात म्हणजे टिळकांच्या काळातही डॉक्टर पैसेच कमावण्यात गुंतले होते म्हणायचे त्यामुळेच ग्रांट मेडिकल कॉलेजच्या धर्तीवर देशी वैद्यक कॉलेज व्हावे अशी ते अपेक्षा व्यक्त करतात व सरकारी यंत्रणेने देशी दवाखानेही उभे करावेत असा सल्ला देतात
जो न्याय वैद्यकशास्त्राला तोच न्याय ज्योतिषाला ते लावतात
थोडक्यात काय टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणात आयुर्वेद व ज्योतिष ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे भाजपने ह्याच दिशेने काही उपक्रम चालवले ह्याचे त्यामुळेच आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १२८ राष्ट्रीय शिक्षण , ब्राम्हण आणि त्याची विद्या
इंग्रजांच्या आगमनानंतर ब्राम्हणांच्या विद्येवर प्रथम लोकहितवादींनी चर्चा सुरु केली प्रबोधनाचा मुख्य प्रोजेक्ट हा विज्ञानाच्या निर्मितीचा होता आणि शैवांनी शांतपणे आपल्याकडे विज्ञान नाही हे सत्य स्वीकारले ह्याचं कारण शैव हे प्रामुख्याने वैश्य शूद्र अतिशूद्र असल्याने त्यांचा थेट जगण्याशी संबंध येत होता आणि आपल्या जगण्यात विज्ञान नाही हे त्यांना स्पष्ट दिसत होतं ह्याउलट ब्राम्हण व क्षत्रिय ह्यांनी मात्र पुण्ययोनी असल्याने आर्य संस्कृतीचा पोकळ अभिमान बाळगत विज्ञान आपल्याकडे आहे अश्या वल्गना सुरु केल्या ह्या लोकांना विज्ञान ही गोष्ट शास्त्रापेक्षा कुठे वेगळी असते तेच कळत न्हवते दुर्देवाने शैवांनी नवीन विज्ञान शिकण्याऐवजी निराशेत उडी मारली स्वतःचे धंदे मोडीत निघताना बघीतल्यावर वास्तविक त्याची कारणमीमांसा करायला हवी होती पण महात्मा फुले हे शैवांचे पहिले आणि शेवटचे नेते निघाले नारायण गुरूंनी गांधींच्या प्रभावाने शैव संस्कृतीचा त्याग करून वैष्णव धर्म स्वीकारला मुळात महात्मा फुलेंनीच शैव धर्माचा त्याग करून स्वतःचा सत्यशोधक समाज नावाचा नवीन धर्म निर्माण केला जो शैवांनी स्वीकारला नाही कारण हा धर्म शैव कमी आणि ख्रिश्चन जास्त होता हीच गोष्ट नेहरू घराण्याची हेही घराणे मूळचे कौल आडनावाचे शैव ब्राम्हण असलेले ! हेही घराणे गांधीजींच्या नादाला लागून अर्धवट वैष्णव व समाजवादाच्या नादाला लागून अर्धवट लोकायत बनले आणि ह्याने आपल्या शैव धर्माचा पूर्ण त्याग केला
शैवांच्या तिन्ही मुख्य नेत्यांनी शैव धर्माकडे पाठ फिरवल्याने शैवांच्याबाबत मुकी बिचारी कुणीही हाका अशी स्थिती झाली आणि शैव वैष्णवांनी निर्माण केलेल्या नव्या हिंदुधर्मात स्वतःहूनच विसर्जित होऊ लागले शंकराचार्यांनी त्यांच्या उत्तर आयुष्यात आणि राजपुतांनी मुस्लिम काळात शैव धर्म त्यागला आणि वैष्णव धर्म स्वीकारला तेव्हापासून सुरु झालेले हे शैवांचे धर्मांतर आता कळसाला पोहचले आहे आणि शैवांनी राम कृष्ण लक्ष्मी ह्यांना शिवाबरोबर स्वीकारले ह्याचा जो दुष्परिणाम व्हायचा तो झाला वर्णजातिव्यवस्थेचे कमबॅक झाले आहे बहुसंख्य शैव स्वतःला हिंदू म्हणवून घेत आहेत ह्यातील काही हिंदूवादी आहेत तर बहुतांशी हिंदुत्ववादी मात्र जेव्हा वैयक्तिक व कौटुंबिक धर्मपालनाची वेळ येते तेव्हा हे लोक पुन्हा शैव होतात पण त्यांच्या शैव असण्याचा अर्थ केवळ कर्मकांड उरला आहे आपल्या संस्कृतीत मुळात धर्मालाच जागा नाही ह्याची त्यांना कल्पना नाही
महाराष्ट्रात अनेक संतांनी वैष्णव धर्म स्वीकारला आणि ते वारकरी झाले हिंदू धर्म हा वैष्णव धर्माचे अधिक पुढचे रूप होते आणि ते राजाराम मोहन रॉय , रानडे , गोखले , गांधी ह्यांनी अधिक विकसित केले आणि त्यातूनच नवा सेक्युलर हिंदू धर्म निर्माण झाला वैष्णव भक्ती चळवळीची ही अंतिम परिणीती झाली ह्याउलट टिळक , हेडगेवार , सावरकर , गुरुजी ह्या ब्राम्हणांनी व त्यांच्या नवं ब्राम्हणवादाने स्वतःचा जो नवा ब्राम्हण्यवादी हिंदू धर्म तयार केला त्यातून हिंदुत्ववाद निर्माण झाला जो सेक्युलॅरिझम नाकारतो आजचा हिंदू धर्म हा ह्या हिंदूवाद आणि हिंदुत्ववाद ह्या दोन चळवळींनी बनला आहे
ह्या दोन्ही चळवळींना शैव आतापर्यंत फक्त कार्यकर्ते म्हणून हवे होते मोदींच्या आगमनाने हे बदलले आणि भाजप प्रथमच पूर्ण बहुमताने विजयी झाला कारण शैवांचा मोदींना मिळालेला एकमुखी पाठिंबा ! हिंदुत्ववादाचे हे पुढचे पाऊल आहे आणि ह्या पावलाला कसं हाताळायचं हे पुरोगामी लोकांना कळत नाहीये अनेक पुरोगामी बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखे वागतायत कारण त्यांनी आतापर्यंत कधी शैवांना विचारात घेतलेच नाही अगदी कम्म्युनिस्टसुद्धा शैवविरोधी नीचपणात सामील असतात आणि शैवांचा विचार करायचा असला कि ऍण्टीशैव बनतात ह्याचा स्पष्ट पुरावा आपणाला त्यांच्या तत्वज्ञानाविषयीच्या ग्रंथात मिळतात आर्य धर्मियांच्या एलिट षड दर्शनाविषयी लिहिणारे हे लोक प्रत्यक्ष प्रोलिटरीयत लोकांतून उदयाला आलेली आणि लोकांशी जोडली गेलेली शैव दर्शने मात्र विचारातसुद्धा घेत नाही सगळे कम्युनिस्ट अंतिमतः आर्य कम्युनिस्ट असतात
ह्यातील हिंदुत्ववादाची पहिली मांडणी करतांना टिळकांना ज्या काही प्रश्नांनी सतावले होते त्यातील एक प्रश्न म्हणजे ब्राम्हणाची विद्या !

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ११९ बंगालची फाळणी ८ श्रीधर तिळवे नाईक
मवाळांचा लॉर्ड मिंटो बंगालची फाळणी रद्द करेल व अधिक सवलती देईल हा भ्रम तुटला आणि टिळकांनी लेख लिहिला भ्रमाचा भोपळा फुटला टिळकांचा अंदाज खरा ठरल्याने राष्ट्रसभेत त्यांचे फॅनफॉलोइंग वाढले
७ जून १९०६ ला टिळकांनी कलकत्त्यात दिलेल्या एका भाषणात त्यांनी मोर्लेविषयी म्हंटलं Do not rely much upon the sympathy o[ the' rulers. Mr. Morley has given a strange illusion of his sympathy in the partition· question .. Mr. Morley has said that he has full sympathy with the people but he cannot or will not undo partition. An apt illustration of this sympathy will be found in the laws of the land. Punishment of whipping is provided in the Penal Code and there is another law which provides. that the sufferer will be sent to hospital for treatment. If you 'want that sort of sympathy Mr. Morley is ready to give it to you. If you forget your grievances by; hearing words of sympathy, then the cause is gone. You must make a permanent cause of grievance. Store up the grievances till they are removed. Partition grievance will be the edifice for the regeneration of India. Do not give up this partition grievance for the whole Of India is at your back. It is a corner stone and I envy the people of Bengal for laying this corner stone .
ह्या भाषणात त्यांनी जहालवादी भूमिका मांडताना म्हंटले होते Fifty years ago Mr.·Dadabhai Naoroji, the greatest sta!esman of
India, thought that Government would grant
them rights· and privileges when they were
properly educated,. but that hope is gone.
Now it might be· said that they were not
fitted to take part in the administration of the
country owing to their defective education.
But, I ask, whose fault it is. The Govern·
ment has been imparting education to the
people and he~ce the fault is not theirs but
of the Government. The . Government is
imparting an education to make the people
fit for some subordinate appointments. Pr<r
fessions have been made that one day the
people would be given a share in the
administration of the country. This is far
from the truth. What did Lord Curzon do?
He saw that this education was becoming
dangerous and he made the Government
control more strict. He passed the Universities Act and thus brought all schools under Government. control. Education, in future
would pin the people to service only and
they now want to reform it.

बंगालच्या फाळणीला आता पूर्वीसारखं पाहता येत नाहीये बांगला देश स्वतंत्र झाल्यापासून बंगालच्या फाळणीकडे बघण्याच्या दृष्टिकोनात फरक पडत चाललाय विशेषतः बांगला देशाचे इतिहासकार कर्झनला व्हिलन मानायचं कि बांगला देशाचा शिल्पकारापैकी एक म्हणून ओळखायचं ह्या प्रश्नात गटांगळ्या खाऊ लागले तर आश्चर्य नाही खुद्द कर्झनला
to contend that it does not exist, that it has not advanced in the laSt fifteen years, or that it may be treated with general indifference is, in my view, to ignore the great change which is passing over this country, and which I believe history will recognise myself as having done much (whether wisely or unwisely) to accelerate ; viz the lifting of India from the level of a Dependency to the position which is bound one day to be hers, if it is not so already, namely, that of the greatest partner in the Empire.”
असे वाटत होते
ह्या फाळणीने झाले काय कर्झनने आपल्या बायकोला आधीच परत पाठवले होते तिला उत्तर देताना कर्झन म्हणतो
“ Life has gone silently grindingly on since you left,” he wrote on January the 12th. “ I felt very miserable driving back to Calcutta after we had left you. . . Now you ate slipping away down the Bay of Bengal further and further every minute.” Time did little to assauge the pangs of solitude. “ And now my feeble gossip comes to a close,” he wrote on February the iith, ” for you are at the end where are life and interest and I where are only bitter- ness and fiitigue.”
page ३२०curzan and his life

हा बिटरनेस आणि फटिग फक्त कर्झनला ग्रासून न्हवता त्याने नंतर भारतालाही ग्रासले
एक गोष्ट मात्र ह्या बंगालच्या फाळणीने साधली ती म्हणजे ह्या फाळणीविरुद्ध झालेल्या आंदोलनाने
१ निःशस्त्र प्रतिकार हेच शस्त्र
२ बहिष्कार हा त्या प्रतिकाराचा अविष्कार
३ बहिष्कार यशस्वी व्हायचा असेल तर त्यासाठी स्वदेशी
४ स्वदेशीसाठी राष्ट्रीय शिक्षण
५ आणि ह्या सगळ्यासाठी स्वराज्य
ही पंचसुत्रे पूर्णपणे भारतीय जनमानसात स्थिर केली ही पंचसुत्रे टिळकांच्या आयुष्याचीही पंचसुत्रे बनली
श्रीधर तिळवे नाईक
The united voice of the whole nation,” declared an Indian writer at a later date, rose and fell like one crying in the wilderness. None heeded it. The Viceroy persevered in his scheme of administrative division; and the English Parliament pronounced its benediction upon it. The political method of the Congress (i.e. constitutional agitation) had been tried and failed — and the people fell upon bitterness.”*
Page 327 curzan and his life
एक गोष्ट मात्र ह्या बंगालच्या फाळणीने साधली ती म्हणजे ह्या फाळणीविरुद्ध झालेल्या आंदोलनाने
१ निःशस्त्र प्रतिकार हेच शस्त्र
२ बहिष्कार हा त्या प्रतिकाराचा अविष्कार
३ बहिष्कार यशस्वी व्हायचा असेल तर त्यासाठी स्वदेशी
४ स्वदेशीसाठी राष्ट्रीय शिक्षण
५ आणि ह्या सगळ्यासाठी स्वराज्य
ही पंचसुत्रे पूर्णपणे भारतीय जनमानसात स्थिर केली ही पंचसुत्रे टिळकांच्या आयुष्याचीही पंचसुत्रे बनली
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १२४ टिळकांची स्वराज्याची संकल्पना व तिच्या मर्यादा श्रीधर तिळवे नाईक
ज्या स्वराज्यावरून जहाल मवाळांच्यात ही घमासान लढाई सुरु होती त्या स्वराज्याविषयी टिळक सुरवातीपासूनच क्लिअर होते दैनिक केसरी व मराठात ते वेगवेगळ्या पद्धतीने स्वराज्याविषयीच्या त्यांच्या कल्पना सादर करत होते धनंजय कीर ह्यांनी त्यांच्या टिळक चरित्रात हा प्रवास उत्तम रीतीने सादर केला आहे
वेदान्तातील स्वराज्यमपासून ते शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांचा आधार घेत ते आपली संकल्पना मांडत होते
The opportunity for spiritual Swaraj for all the people It is life centered in self and dependent upon self. There is Swaraj in this world as well as in the world hereafter. The Rishis who laid down the law of duty betook themselves to forests, because the people were already enjoying Swarajya or people’s dominion which was administered and defended in the first instance by the Kshatriya Kings. Swaraj in the life to come can not be the reward of a people who have not enjoyed it in this world. अशी त्यांची अध्यात्मिक बैठक होती स्वराज्य ही नैतिक आवश्यकता होती जो भूलोकी स्वराज्य प्राप्त करू शकत नाही त्याला परलोकातही स्वराज्य प्राप्त होणे अशक्य असे त्यांचे मत आहे
ह्याचा अर्थ टिळकांचे स्वराज्य हे धर्मराज्य आहे ते इहलोकात आहे तसे परलोकातही आहे आणि पुढे हीच संकल्पना विकसित करून सावरकरांनी हिंदुत्व मांडले आहे टिळकांच्या राष्ट्रवादाला त्यामुळेच धार्मिक राष्ट्रवाद असे म्हंटले जाते
त्यांना अपेक्षित होते ते स्वराज्य मिळत नाही म्हणून No piece meal reform will do. The system of present administration is ruinous to the country. असा आक्रोश त्यांनी केला होता It must '' mend or end.'' मेंड ऑर एन्ड ह्या निष्कर्षापाशी ते पोहचले होते
"swaraj is the right of the people to conduct the administration of the country according to what they consider to be their good" अशी त्यांनी व्याख्या दिली होती जिला जहालांची संमती होती आणखी एके ठिकाणी a government which rules according to the wishes of the people of their reperesentatives असे त्यांनी म्हंटले होते
सुरवातीला ब्रिटिशांना हाकलून देणे एव्हढेच त्यांना अपेक्षित होते पण पुढे ब्रिटिश गेल्यानंतर काय हा प्रश्न लोक त्यांना विचारू लागले त्यामुळे ही संकल्पना धार्मिक , अध्यात्मिक व नैतिक व नंतर स्पष्टपणे राजकीय बनत गेली The main point is that all the system should be in our hands. I am demanding the key of my house. But I do not want to evict a stranger from the house. Total Sawaraj is our aim. We want full control on our administrative machinery. Now we are just and clerks and tools in the hands of foreign masters असे ते म्हणायला लागले
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणणारे टिळक पुढे १९१६ च्या लखनोच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये स्वराज्य हा प्रत्येक भारतीयाचा जन्मसिद्ध हक्क आहे असे म्हणाले We want equality. We cannot remain slaves under foreign rule. We will not carry for an instant longer, the yoke of slavery that we have carded all these years. Swaraj is our birth- right. We must have it at any cost. When the Japanese, who are Asians like us, are free, why should we be slaves? Why should our Mothers hands be handcuffed.”
असे असूनही टिळकांना मग विरोध का होत होता ?
लॉर्ड कर्झनचा व इंग्रजांचा विरोध आपण समजू शकतो कारण त्यांना राज्य करायचे होते आणि त्यांना बदललेली परिस्थिती दिसतही होती कर्झनने एके ठिकाणी म्हंटले आहे Curzon had been quick to reply. “To you in England it seems so clear that there is no difference between the end of Lord Dufferin’s regime and the end of mine. To me in India it is transparent tbat there is all the difference in the world. What is the great difference at this end ? It is that public opinion has been growing all the while, is articulate, is daily becoming more powerful, cannot be ignored. What is the origin of mistakes sometimes made at other end ? It is that men are Standing Still their eyes shut and do not see the movement here.
page ३२७
ह्याचा अर्थ कर्झनला भारतीय मानसिकतेत झालेले बदल स्पष्ट दिसत होते
प्रश्न असा आहे कि जे बदल कर्झनला दिसत होते ते मावळवाद्यांना का दिसत न्हवते ?
बहिष्कार हा एक मतभेदाचा मुद्दा होता ज्याची चर्चा आपण केली आहेच बाकी राजाला दैवी मानण्याची वृत्ती मवाळांच्याप्रमाणे टिळकांच्यातही होती शेवटी टिळक वैष्णव होते आणि वैष्णवांच्या दृष्टीने राजा विष्णूचा अवतार होता टिळकांच्याच भाषेत सांगायचे तर “There is no relation between the king or king’s views and Swaraj. The King is divine for us. He is above good or bad. He is permanent. The institution of the king which the gist of the government. He is divine for us and this idea will remain intact. But we can change the government. The relation of my Swaraj idea is with the government. What I mean say is that such amendments should made so that we can improve the living of Indian people. The Swaraj means in whose hands our destination should be. I have said that I don’t want to change the rule of the king. The bureaucracy should be in our hands not in the British’s hands. In short, we can said that all the control of our work should be in our hands.”
राजाला दैवी मानणे राजा दैवी असून तो चांगले आणि वाईट ह्यांच्यापलीकडे असून तो चिरस्थायी आहे असे मानणे हे लक्षात घेतले कि आज हिंदुत्ववादी मोदींना देव का मानतो का त्यांचे भक्त त्यांच्याविरुद्धची टीका सहन करत नाहीत हे लक्षात येते
टिळकांच्यासारखा बुद्धिमान माणसाने राजा दैवी असून तो चांगले आणि वाईट ह्यांच्यापलीकडे असून तो चिरस्थायी आहे असे मानावे ह्याला परंपरेचा विजय मानावा कि नव्या युगाचा पराभव मानावा ? जर टिळकच राजाकडे डोकं गहाण टाकणार असतील तर मग इतरांच्याविषयी तक्रार का करावी ? हे असे घडण्याची दोन कारणे आहेत १ टिळकांचे अनकॉन्शस माईंड ब्राम्हण व क्षत्रिय ह्या पुण्ययोनी आहेत हे मानतं साहजिकच ब्राम्हण भूदेव व क्षत्रिय दैवी व देवाचा अवतार हे समीकरण त्यांना मान्य आहे २ टिळकांचा सर्व क्षत्रिय परशुरामाने नष्ट केलेत ह्यावर विश्वास असल्याने नव्याने क्षत्रिय बनलेल्या सर्वांनाच ते दैवी व देवाचा अवतार मानायला तयार आहेत
टिळकांची ही मानसिकता आजच्या समस्त हिंदुत्ववाद्यांची मानसिकता असल्याने आज हिंदुत्ववादी मोदींना देव का मानतात व का त्यांचे भक्त त्यांच्याविरुद्धची टीका सहन करत नाहीत हे सहज लक्षात येते एकदा राजा चांगले आणि वाईट ह्यांच्यापलीकडे असतो हे स्वीकारल्यानंतर त्याने कितीही वाईट केले तरी त्याला ते माफच आहे असे ठरते मग पक्षांतर्गत विरोध कोण कशाला करतोय आणि केला तरी त्याच्याबाबतचा निर्णय राजाच म्हणजे मोदीच करणार हो अट फक्त एकच आहे राजाने वेदांवर श्रद्धा ठेवली पाहिजे टिळक हे असे हिंदुत्ववाद्यांच्या नसानसात भिनलेत मी टिळकांना आद्यहिंदुहृदयसम्राट त्यामुळेच म्हणतो
मी मागे चर्चा केलेल्या द्विदल राज्यपद्धतीच्या संस्कारातून टिळकही मुक्त न्हवते पेशवाईत ज्याप्रमाणे छत्रपती होते त्याप्रमाणे ब्रिटिश राजे व राजघराण्याने छत्रपतींच्यासारखे रहावे आणि पेशवाईची वस्त्रे त्यांनी भारतीयांच्या हाती सोपवावीत असेच ते म्हणत होते वैष्णव विशेषतः भक्तीवाले वैष्णव असे मानत कि मुक्ती मिळाल्यानंतर मुक्त पुरुषाला स्वराज्य प्राप्त होते मात्र त्याच्यावर अंतिम सत्ता ब्रम्हाची व परमेश्वराची राहते टिळकांचा परमेश्वर ब्रिटिश होता आणि स्वराज्य ही मुक्ती होती खरेतर ज्या शंकराचार्यांना टिळक मानतात त्यांच्या अद्वैत सिद्धांतात हे बसत नाही कारण अद्वैतात मुक्ती आणि ब्रम्ह भिन्न नाही मीच ब्रम्ह आहे असे अद्वैत सांगते तरीही टिळकांनी हे द्वैत स्वीकारावे आणि स्वराज्य आणि ब्रिटिश ह्यांना भिन्न मानावे हे आश्चर्यकारक म्हंटले पाहिजे टिळक संपूर्ण परराष्ट्र धोरण ब्रिटिशांनी हाताळावे आणि अंतर्गत धोरण आम्ही हाताळू असे म्हणत होते
गांधींनी ही मर्यादा ओलांडायला सुरवात केली आणि काँग्रेसने जसे संपूर्ण स्वातंत्र्य मागायला सुरवात केली तसे टिळकवादी हिंदू जे प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेणे कमी केले
टिळक असे द्वैती का होत होते ? कारण भारत परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे हाताळू शकेल ह्याचा विश्वास त्यांना वाटत न्हवता विशेषतः पहिल्या महायुद्धांनंतर भारतावरही आक्रमण होऊ शकतं ह्याची लख्ख जाणीव त्यांना झाली होती भारतीय क्षत्रियांच्यावर त्यांचा विश्वास न्हवता आणि भारतीय पुढाऱ्यांच्यात युद्ध हाताळण्याची क्षमता आहे असे त्यांना वाटत न्हवते त्यामुळेच महायुद्धानंतर स्वराज्याऐवजी होम रुल हा शब्द आधिक वापरतांना दिसतात
टिळकांच्या ह्या विचाराचा सखोल परिणाम महात्मा गांधींच्यावर झालेला दिसतो किंबहुना गांधी म्हणजे टिळक आणि गोखले ह्यांचा सुवर्णमध्य होते
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १२५ स्वराज्य आणि टिळकांच्या मते हिंदू कोण ? श्रीधर तिळवे नाईक
टिळकांच्या पुढे निर्माण झालेला प्रश्न म्हणजे हिंदू कोण ? ते हिंदुत्वाची संकल्पना मांडत असल्याने हे अटळ होते त्यांनी ह्या प्रश्नाचे दिलेले उत्तर हिंदुत्ववाद्यांनी स्वीकारलेले असल्याने ते महत्वाचे आहे
टिळकांची धर्मविषयक मते ह्या ग्रंथात त्यांचा उहापोह आहे
टिळकांनी हिंदू प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु म्हणजेच ज्याची बुद्धी वेदांना प्रमाण मानते तो हिंदू असे पहिले लक्षण सांगितले आहे वेद तीन माना कि चार पौरूषेय माना वा अपौरुषेय नित्य माना वा अनित्य जोवर तुम्ही वेद प्रमाण मानताय तोवर तुम्ही हिंदू आहात
टिळकांच्या मते साधनानामनेकता हे हिंदू धर्माचे दुसरे लक्षण आहे जो भक्ती कर्म ज्ञान वा राजयोग असे सर्व मार्ग मानतो व सर्वच साधनांनी मनुष्याला मोक्ष मिळतो असे मानतो तो हिंदू इतर धर्म एकाच वाटेने जातात हिंदू अनेक वाटांनी जातात सर्व साधनांचा मार्गांचा समान आदर करतो तो हिंदू
उपास्यानामनियमः हे टिळकांच्या मते हिंदूंचे तिसरे लक्षण आहे इस्लाम फक्त एकट्या महंमदाला बौद्ध फक्त गौतम बुद्धाला जसे उपास्य मानतात तसे हिंदू कुणा एकाला उपास्य मानत नाही शिव विष्णू गणपती अशी कोणतीही देवता उपास्य असू शकते असे हिंदू मानतात
पहिल्या तीन लक्षणानुसार वेद मानणारा कुठलाही मनुष्य महंमदाची शिकवण स्वीकारून अल्लाला उपास्य देवता मानेल मग त्याला हिंदू मानायचे काय असा प्रश्न निर्माण होतो म्हणून टिळक जो हिंदूंचे परंपरेने चालत आलेल्या विधींपैकी काही विधी परंपरेने चालत आलेल्या संस्कारांपैकी काही संस्कार परंपरेने चालत आलेल्या आचारापैकी काही आचार पाळतो तो हिंदू असे चौथे लक्षण टिळक हिंदूंचे सांगतात सर्वच विधी आचार संस्कार पाळता येणे अशक्य असल्याने टिळक काही हा शब्दप्रयोग करतात जर आर्य समाज वा ब्राम्हो समाज काही विधी आचार संस्कार पाळत असतील तर ते हिंदूच असं ते म्हणतात इतकेच न्हवे तर जैन बौद्ध हे धर्मही हिंदूंचे काही विधी आचार संस्कार पाळत असल्याने त्यांनाही हिंदू म्हणायला काहीच हरकत नाही असे टिळक मानतात
टिळकांची हीच मांडणी सावरकर पुढे घेऊन जातात आणि ह्या सगळ्या हिंदू लोकांना हिंदुत्वाच्या झेंड्याखाली एकत्र आणू पाहतात
टिळक चातुर्वर्ण्य व्यवस्था परमेश्वरानेच निर्माण केली आहे असा गीतेचा हवाला देऊन म्हणतात मात्र गुणकर्मानुसार ही व्यवस्था आहे असे ते म्हणतात ह्याही पुढे जाऊन एक अजिबोगरीब गोष्ट म्हणजे टिळक व्यवसाय धंदे गुणकर्मानुसार मानतात पण रोटीबेटीचे व्यवहार अंतर्वर्णीय करण्याची त्यांची तयारी नाही आंतरजातीय विवाह करा असे ते सांगतात पण अंतर्वर्णीय विवाहाला टिळकांचा विरोध आहे जातीव्यवस्था ही आर्य अनार्य ह्यांच्यातील वर्णभेदामुळे निर्माण झाली हे टिळकांचे मत आहे
टिळक ज्युडायिक धर्मांना हिंदू म्हणून मान्यता देत नाहीत सावरकर त्यांचाच कित्ता गिरवतात धर्मपरिवर्तनाला टिळकांचा आक्षेप नाही पण हे धर्मपरिवर्तन नेमके कशासाठी केले जाते आहे ते तपासून मगच परधर्मियांना आपल्या धर्मात आपण दाखल करून घ्यावे असे ते सुचवतात इतर धर्मीय जर आपल्या धर्माचा आदर करीत असतील तर आपणही त्यांचा व त्यांच्या धर्माचा आदर करावा पण ते दांडगाई करणार असतील तर त्यांच्या दांडगाईला दांडगाईनेच उत्तर द्यावे असे टिळक म्हणतात मुसलमान खाटक्याची गाय कोणी दांडगाईने चोरून आणत असेल तर त्या हिंदूला शिक्षाच द्यायला हवी असे टिळक म्हणत पण आमच्या धर्मपालनात वा उत्सवात इतर धर्मीय अडथळा आणत असतील तर त्यालाही शिक्षा झाली पाहिजे असे ते म्हणत
प्रश्न असा आहे टिळक आपल्या ह्या हिंदुत्वात स्वराज्यात इतर धर्मियांना कसे सामावून घेणार तर ह्याबाबत तुझा धर्म तू पाळ आणि माझा धर्म मला पाळू दे असे त्यांचे धोरण आहे त्यामुळेच मुस्लिमांना ते तुम्हाला शिवाजीची जयंती साजरी करायची नसेल तर नका करू अकबराची जयंती साजरी करा असे म्हणतात आता ह्याला सेक्युलॅरिझम म्हणायचे कि नाही हे ज्याने त्याने ठरवायचे आहे कारण टिळकांच्या काळात तुझा धर्म तू पाळ आणि माझा धर्म मला पाळू दे ह्या साध्या तत्वानुसार प्रश्न सुटू शकत होते आजच्या काळात हे शक्य नाही
श्रीधर तिळवे नाईक
व व
पान क्रमांक १८३ ते
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १२६ टिळकांची स्त्रीशिक्षण , राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना व तिच्या मर्यादा श्रीधर तिळवे नाईक
टिळकांच्या बहिष्कार व स्वराज्य ह्या दोन संकल्पनाची चर्चा केल्यानंतर आता आपण त्यांची राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना पाहणार आहोत टिळक हे स्वतः उत्तम शिक्षक व शिक्षणसंस्था चालक होते आणि एका शिक्षकाचे चिरंजीव होते साहजिकच त्यांना शिक्षणाविषयी प्रचंड आस्था होती
लोकमान्य टिळकांचे लेख खंड ४ मध्ये त्यांचे अनेक शिक्षणविषणविषयक लेख आहेत ते वाचले कि टिळकांचे शिक्षणविषयक विचार सहज समजून येतात
२८ सप्टेंबर १८८७ साली टिळकांची फिमेल हायस्कुलातील शिक्षणक्रम (उक्त पान ६९ ते ८२ ) ह्या नावाने एक मालिका सुरु झाली अभ्यासक्रम हा कायमच टिळकांच्या प्रेमाचा विषय असल्याने इथेही टिळक अभ्यासक्रमाची चर्चा करतात लोकमताच्याविरुद्ध जायचे नाही हे टिळकांचे कायमच मुख्य धोरण होते टिळकांच्या काळात स्त्रियांना शिक्षणच नको असे म्हणणारे सनातनी होते टिळक त्यांचा पक्ष घेत नाही स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे ह्याविषयी त्यांच्या मनात शंका नाही मनुष्याचे अर्धांग अशिक्षित राहून चालणार नाही असे ते म्हणतात इतकेच कशाला तत्कालीन शिक्षणसंस्थेत फिमेल स्कुलमध्ये जो गोषा वा पडदा ठेवणे सक्तीचे होते त्याला त्यांनी ठाम नकार दिला होता मात्र स्त्रियांना कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे ह्याविषयी ते सनातन होते दोघांना समान अभ्यासक्रमाचे शिक्षण त्यांना अमान्य होते टिळकांचा पहिला मुद्दा आता विचित्र वाटतो त्यांच्या मते जिथे मोठेपणी विवाह होतो तिथल्या गोष्टी वेगळ्या भारतात लहानपणी लग्न होत असल्याने शिक्षणाची मुख्य जबाबदारी पित्यावर न पडता सासऱ्यावर व नवऱ्यावर पडत असल्याने स्त्रियांचे शिक्षण हे सासरला त्यांना कोणती कर्तव्ये पार पाडायची आहेत त्यावर ठरणे अटळ आहे खुद्द इंग्लंडमध्येही जी शैक्षणिक समता आहे ती अलीकडच्या पाच पंचवीस वर्षात तिकडे आली आहे ती आपल्याकडे थेट अंमलात आणण्यात काय हशील असा प्रश्न टिळक विचारतात सद्यातरी जिला गृहकर्म व धर्मकर्म ह्यांचा कंटाळा आलेला नाही अशा स्त्रिया जास्ती असल्याने त्यांना त्याच तऱ्हेचे शिक्षण द्यावे असे टिळक म्हणतात
टिळकांच्या विचारातील पायाच मुळात चुकीचा असल्याने ते असा विचार करतायत ते समाजाप्रमाणे परंपरेप्रमाणे शिक्षण द्यायला हवे असे मानतात प्रत्यक्षात शिक्षणाचा मुख्य आधार सत्य आणि सत्याचे आजवर चालत आलेले ज्ञान हेच असले पाहिजे भले मग ते सामाजिक शिष्टाचाराच्या विरुद्ध का जाणारे असे ना ! शिक्षणाचे तोंड भूतकाळाकडे ठेवण्यात काय हशील ? शिक्षणाचे केवळ तोंडच न्हवे तर हात पाय धड देखील भविष्याच्या दिशेने असायला हवे
टिळकांच्या मते लग्न झालेल्या मुली शाळा सोडतात व त्या परत शाळेत येत नाहीत त्याची कारणे आपण शोधायला हवीत टिळक प्राथमिक व हायस्कूल शिक्षण हे वेगळे पाहिजे असं सांगतात आपल्याकडे लग्न लहान असतांना होत असल्याने ह्या विवाहित मुलींना ह्या हायस्कूलमध्ये काही उपयुक्त शिक्षण मिळायला हवे असे ते म्हणतात त्यांच्या मते सध्यातरी विवाहित स्त्रीला मिळणारे शिक्षण हीच कसोटी असले पाहिजे सध्या स्त्रियांचे सासर हेच वर्कशॉप आहे असे एक इंटरेस्टिंग निरीक्षण ते मांडतात मात्र पुरुषांना धंदेशिक्षण आवश्यक मानणारे टिळक स्त्रियांना धंदेशिक्षण नाकारतात त्यांच्या मते चार पाच श्रीमंत स्त्रिया वगळता इतरांना त्यांचा फायदा नाही डॉक्टर आनंदीबाई हे ते अपवादात्मक उदाहरण मानतात
कुठे ना कुठे तरी सासरचे लोक सुनेच्या शिक्षणाची विशेषतः धंदेवाईक शिक्षणाची जबाबदारी घेणार नाहीत अशी टिळकांना भीती वाटत असावी असे वाटते आणि टिळकांच्या काळात ती अगदीच अनाठायी होती असे नाही पण मग ह्या भीतीवर उपाय काय तर मुलींचे लग्न त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर वा २१ वर्षानंतर तिच्या संमतीने करणे हा होय टिळक त्याकडे वळ्तच नाहीत आणि ही दुर्देवी गोष्ट होय
घटलेल्या संख्यापटासाठी ते समाजसुधारकांच्या सुधारणांना जबाबदार मानतात ते त्यांच्या सुधारणांना काल्पनिक सुधारणा म्हणतात आपले सुधारक इंग्लंडमधले ताजे लोणी चटकन चाटण्याचा प्रकार करत आहेत असं ते म्हणतात त्यांना म्हणायचंय असं कि आधी दूध तरी तयार करा मग लोण्याकडे वळता येईल प्रत्यक्षात हा युक्त्तीवाद उत्क्रांतिवादी आहे आणि शिक्षणासाठी तो लागू करण्याची गरजच नाही कारण ह्या युक्तिवादात त्यांनी जितकी वर्षे घेतली तितकीच आम्हीही घ्यायला हवीत असे गृहीतक आहे प्रत्यक्षात शिक्षणाचा वेग वाढवणे आपल्याच हातात असते
टिळक पूर्ण प्रतिगामी आहेत का ? तर नाही त्यांच्या मते प्रथम स्त्रियांना पूरक वाटेल रुचेल असे शिक्षण सुरवातीला द्या मग समाज जसजसा बदलत जाईल त्याप्रमाणे शिक्षण द्या एकदम ऍडव्हान्स शिक्षण द्यायला जाल तर शाळा बंद पडतील असा इशारा ते देतात
(जाता जाता सध्या फेसबुकवर आपण मोदी फॅन्ससाठी भक्त वा मोदीभक्त असा शब्दप्रयोग वापरतो तसा शब्दप्रयोग टिळक सुधारकांसाठी वापरतात ते सुधारकांना सुधारकभक्त म्हणतात ह्याला काळाने उगवलेला सूड म्हणावे का ?)
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १२७ राष्ट्रीय शिक्षण , आयुर्वेद आणि टिळक श्रीधर तिळवे नाईक
आयुर्वेद ही शैवांची देणगी असली तरी पुढे तिच्यात सर्वांनीच भर घातली साहजिकच इंग्रज जेव्हा ह्या देशात ऍलोपॅथी आणि होमिओपॅथी घेऊन आले तेव्हा आयुर्वेदाचे काय करायचे ह्यावर चर्चा सुरु झाली सुदैवाने काविळीसारख्या रोगात पाश्च्यात्य वैद्यकशास्त्र उपयोगी न पडल्याने आणि आयुर्वेदाने गुण आल्याने खुद्द इंग्रजांच्यात आयुर्वेदाविषयी प्रेम असणारे लोक होते टिळकांचे ह्याविषयावरचे मत त्यांनी आर्य वैद्यकाचे पुनरुज्जीवन (संदर्भ लोकमान्य टिळकांचे निबंध खंड ४ २०१ ते २०६ )ह्या निबंधात मांडले आहे सद्या आयुर्वेदावर जी चर्चा सुरु आहे तिचे मूळ तत्कालीन वादात आहे
म्लेंछ असोत कि यवन ज्ञान सर्वांचेच ग्रहण केले पाहिजे असे शास्त्रवचन आहे असा दाखला देत टिळक पाश्च्यात्य वैद्यकशास्त्राला मान्यता देतात आणि राष्ट्रीय शिक्षणात रसायनशास्त्र , वनस्पतीशास्त्र , इंद्रियविज्ञानशास्त्र ह्यासारख्या पाश्चात्य शास्त्रांचाही समावेश केला पाहिजे असा आग्रह धरतात
ह्या नवीन पाश्चात्य शास्त्राकडे अधिक ज्ञान आहे हेही ते खुल्या दिलाने मान्य करतात
मात्र त्यामुळे आयुर्वेद टाकाऊ होतो असे त्यांना वाटत नाही त्यांच्या मते आयुर्वेदातले उपाय हे अनेक वर्षांच्या अनुभवातून आणि अनेक लोकांच्यावर उपचार करून आल्याने ते अनुभवजन्य आहेत शेवटी पाश्चात्य वैद्यकशास्त्रालाही अमुक औषध अमुक रोगावर चालते हे अनुभवातूनच कळते आयुर्वेदिक औषधे हीही अशी अनुभवातूनच आलेली आहेत
मात्र टिळक आता जो आयुर्वेद तो आपण अधिकाधिक शास्त्रीय बनवला पाहिजे असा आग्रह धरतात
औषधे विलायतेहून शास्त्र विलायतेहून ही परिस्थिती बरी नाही इंग्रजांनी आमची पुराणी शास्त्रे धोक्यात आणली आहेत असे ते म्हणतात त्यापुढे जाऊन टिळक राष्ट्रीय वैदयशास्त्र हवे अशी मागणी करतात मेडिकल ग्रॅज्युएटनी प्राच्य व पौर्वात्य ह्यांना एकत्र करून नवे हिंदूवैद्यक करण्याच्या निमित्ताने कॉलेज काढले पाहिजे असे त्यांना वाटते इंग्रजी सरकार फक्त ऍलोपॅथीला उत्तेजन देत असल्याचा आरोप करून आयुर्वेदासाठी एतद्देशीयांनीच आता मेहनत करायला हवी असे ते म्हणतात
आमचे सर्व वैद्य द्रव्यसंचय करण्यात गुंतले असल्याने आमचे स्वतःचे वैद्यकशास्त्र विकसित झाले नाही असे ते म्हणतात म्हणजे टिळकांच्या काळातही डॉक्टर पैसेच कमावण्यात गुंतले होते म्हणायचे त्यामुळेच ग्रांट मेडिकल कॉलेजच्या धर्तीवर देशी वैद्यक कॉलेज व्हावे अशी ते अपेक्षा व्यक्त करतात व सरकारी यंत्रणेने देशी दवाखानेही उभे करावेत असा सल्ला देतात
जो न्याय वैद्यकशास्त्राला तोच न्याय ज्योतिषाला ते लावतात
थोडक्यात काय टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणात आयुर्वेद व ज्योतिष ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे भाजपने ह्याच दिशेने काही उपक्रम चालवले ह्याचे त्यामुळेच आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १२८ राष्ट्रीय शिक्षण , ब्राम्हण आणि त्याची विद्या
इंग्रजांच्या आगमनानंतर ब्राम्हणांच्या विद्येवर प्रथम लोकहितवादींनी चर्चा सुरु केली प्रबोधनाचा मुख्य प्रोजेक्ट हा विज्ञानाच्या निर्मितीचा होता आणि शैवांनी शांतपणे आपल्याकडे विज्ञान नाही हे सत्य स्वीकारले ह्याचं कारण शैव हे प्रामुख्याने वैश्य शूद्र अतिशूद्र असल्याने त्यांचा थेट जगण्याशी संबंध येत होता आणि आपल्या जगण्यात विज्ञान नाही हे त्यांना स्पष्ट दिसत होतं ह्याउलट ब्राम्हण व क्षत्रिय ह्यांनी मात्र पुण्ययोनी असल्याने आर्य संस्कृतीचा पोकळ अभिमान बाळगत विज्ञान आपल्याकडे आहे अश्या वल्गना सुरु केल्या ह्या लोकांना विज्ञान ही गोष्ट शास्त्रापेक्षा कुठे वेगळी असते तेच कळत न्हवते दुर्देवाने शैवांनी नवीन विज्ञान शिकण्याऐवजी निराशेत उडी मारली स्वतःचे धंदे मोडीत निघताना बघीतल्यावर वास्तविक त्याची कारणमीमांसा करायला हवी होती पण महात्मा फुले हे शैवांचे पहिले आणि शेवटचे नेते निघाले नारायण गुरूंनी गांधींच्या प्रभावाने शैव संस्कृतीचा त्याग करून वैष्णव धर्म स्वीकारला मुळात महात्मा फुलेंनीच शैव धर्माचा त्याग करून स्वतःचा सत्यशोधक समाज नावाचा नवीन धर्म निर्माण केला जो शैवांनी स्वीकारला नाही कारण हा धर्म शैव कमी आणि ख्रिश्चन जास्त होता हीच गोष्ट नेहरू घराण्याची हेही घराणे मूळचे कौल आडनावाचे शैव ब्राम्हण असलेले ! हेही घराणे गांधीजींच्या नादाला लागून अर्धवट वैष्णव व समाजवादाच्या नादाला लागून अर्धवट लोकायत बनले आणि ह्याने आपल्या शैव धर्माचा पूर्ण त्याग केला
शैवांच्या तिन्ही मुख्य नेत्यांनी शैव धर्माकडे पाठ फिरवल्याने शैवांच्याबाबत मुकी बिचारी कुणीही हाका अशी स्थिती झाली आणि शैव वैष्णवांनी निर्माण केलेल्या नव्या हिंदुधर्मात स्वतःहूनच विसर्जित होऊ लागले शंकराचार्यांनी त्यांच्या उत्तर आयुष्यात आणि राजपुतांनी मुस्लिम काळात शैव धर्म त्यागला आणि वैष्णव धर्म स्वीकारला तेव्हापासून सुरु झालेले हे शैवांचे धर्मांतर आता कळसाला पोहचले आहे आणि शैवांनी राम कृष्ण लक्ष्मी ह्यांना शिवाबरोबर स्वीकारले ह्याचा जो दुष्परिणाम व्हायचा तो झाला वर्णजातिव्यवस्थेचे कमबॅक झाले आहे बहुसंख्य शैव स्वतःला हिंदू म्हणवून घेत आहेत ह्यातील काही हिंदूवादी आहेत तर बहुतांशी हिंदुत्ववादी मात्र जेव्हा वैयक्तिक व कौटुंबिक धर्मपालनाची वेळ येते तेव्हा हे लोक पुन्हा शैव होतात पण त्यांच्या शैव असण्याचा अर्थ केवळ कर्मकांड उरला आहे आपल्या संस्कृतीत मुळात धर्मालाच जागा नाही ह्याची त्यांना कल्पना नाही
महाराष्ट्रात अनेक संतांनी वैष्णव धर्म स्वीकारला आणि ते वारकरी झाले हिंदू धर्म हा वैष्णव धर्माचे अधिक पुढचे रूप होते आणि ते राजाराम मोहन रॉय , रानडे , गोखले , गांधी ह्यांनी अधिक विकसित केले आणि त्यातूनच नवा सेक्युलर हिंदू धर्म निर्माण झाला वैष्णव भक्ती चळवळीची ही अंतिम परिणीती झाली ह्याउलट टिळक , हेडगेवार , सावरकर , गुरुजी ह्या ब्राम्हणांनी व त्यांच्या नवं ब्राम्हणवादाने स्वतःचा जो नवा ब्राम्हण्यवादी हिंदू धर्म तयार केला त्यातून हिंदुत्ववाद निर्माण झाला जो सेक्युलॅरिझम नाकारतो आजचा हिंदू धर्म हा ह्या हिंदूवाद आणि हिंदुत्ववाद ह्या दोन चळवळींनी बनला आहे
ह्या दोन्ही चळवळींना शैव आतापर्यंत फक्त कार्यकर्ते म्हणून हवे होते मोदींच्या आगमनाने हे बदलले आणि भाजप प्रथमच पूर्ण बहुमताने विजयी झाला कारण शैवांचा मोदींना मिळालेला एकमुखी पाठिंबा ! हिंदुत्ववादाचे हे पुढचे पाऊल आहे आणि ह्या पावलाला कसं हाताळायचं हे पुरोगामी लोकांना कळत नाहीये अनेक पुरोगामी बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखे वागतायत कारण त्यांनी आतापर्यंत कधी शैवांना विचारात घेतलेच नाही अगदी कम्म्युनिस्टसुद्धा शैवविरोधी नीचपणात सामील असतात आणि शैवांचा विचार करायचा असला कि ऍण्टीशैव बनतात ह्याचा स्पष्ट पुरावा आपणाला त्यांच्या तत्वज्ञानाविषयीच्या ग्रंथात मिळतात आर्य धर्मियांच्या एलिट षड दर्शनाविषयी लिहिणारे हे लोक प्रत्यक्ष प्रोलिटरीयत लोकांतून उदयाला आलेली आणि लोकांशी जोडली गेलेली शैव दर्शने मात्र विचारातसुद्धा घेत नाही सगळे कम्युनिस्ट अंतिमतः आर्य कम्युनिस्ट असतात
ह्यातील हिंदुत्ववादाची पहिली मांडणी करतांना टिळकांना ज्या काही प्रश्नांनी सतावले होते त्यातील एक प्रश्न म्हणजे ब्राम्हणाची विद्या !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा