आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १०४ ते १११
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १०४
वेदोक्त पुन्हा १ श्रीधर तिळवे नाईक १
शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त काही पोस्ट फिरल्याने हे लिहितो आहे. क्लॉड लेवी स्ट्राउसच्या मते द्विध्रुवात्मकता ही प्रत्येक संस्कृतीच्या संरचनेत अटळ असते त्यामुळेच असुर आर्यांची संस्कृती द्विध्रुवात्मकता मानते म्हणजे असुर विरुद्ध देव नशेत
देवासूर आर्य संस्कृती स्पष्टपणे सुरवातीला सूर विरुद्ध असुर व नंतर आर्य आणि आर्येतर अशी द्विध्रुवात्मकता मानते पुढे परशुरामाने क्षत्रिय मारल्याने व कलियुगात वैश्य न राहिल्याने देवासुरांनी आर्य म्हणजे ब्राम्हण अशी व्याख्या बदलून घेतली आणि ब्राम्हण विरुद्ध शूद्र अशी द्विध्रुवात्मकता उभी केली
ही द्विध्रुवात्मकता ह्या काळात टिळकांच्यापुढे उभी टाकली ती सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज ह्यांच्या संदर्भातील वेदोक्त प्रकरणामुळे ! ह्या प्रकरणाची कृतिजन्य बाजूची चर्चा आपण आधीच पाहिली आहे मात्र तात्विक बाजू पाहिली न्हवती ती आता आपण पाहणार आहोत अनेकदा ह्या बाजूची चर्चाही होत नाही टिळकांचे हिंदुत्व म्हणजे नवब्राम्हणवाद त्याचा ढळढळीत पुरावा म्हणजे ही तात्विक मांडणी होय
ह्या संदर्भात टिळकांची बाजू तीन निबंधात आली आहे
१ श्री गायकवाड सरकार यांचा वेदांत केसरी १ ऑक्टो १९०१ पान क्र ३१२ ते ३१६
२ मराठे आणि वेदोक्त कर्म १ केसरी २२ ऑक्टो १९०१ पान क्र ३१६ ते ३१९
३ मराठे आणि वेदोक्त कर्म २ केसरी २९ ऑक्टो १९०१ पान क्र ३१९ ते ३२३
(लोकमान्य टिळकांचे लेख खंड ४)
टिळकांचे ह्या प्रकरणात "सध्याच्या जगात ब्राम्हण आणि शूद्र हे दोनच वर्ण आहेत" हे सांगणारे धर्मग्रंथ अधिक योग्य आहेत हे मानतात व ते प्रमाण मानतात हे धक्कादायक आहे पण ते मानतात ही वस्तुस्थिती आहे
आता प्रश्न येतो कि भोसले क्षत्रिय आहेत कि नाहीत ? टिळकांच्या मते शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत पण त्यांच्या वंशजांनी असा काही पराक्रम केलेला नाही कि ज्यामुळं त्यांना क्षत्रिय म्हणावं ! आता हाच न्याय मग ह्याच तर्काने ब्राम्हणांना लावला तर किती ब्राम्हणांना ब्रम्हप्राप्ती झाली म्हणून त्यांना ब्राम्हण म्हणावे ? किंवा कितीजणांना चार वेद पाठ आहेत ? म्हणजे ब्राम्हणांना त्यांची ब्रम्हकर्मे आली नाहीत तर चालतं आणि क्षत्रियांना मात्र चालत नाही हा खासा न्याय आहे ? मुळात हा वर्णव्यवस्थेचा हा खटाटोपच भंपक आहे ते सोडा पण टिळकांचा तर्क लावला तर काय दिसते हा मुद्दा आहे ह्या संदर्भातला दुसरा मुद्दा म्हणजे ज्या क्षत्रियांच्याबाबत हा वेदोक्त कि पुराणोक्त वाद उदभवला ते दोन्ही क्षत्रिय सयाजीराव आणि शाहू महाराज दोघेही कर्तृत्ववान क्षत्रिय होते त्यांना हा अधिकार द्यायला काय हरकत होती ?
पुढे टिळक म्हणतात कि त्यावेळी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला तेव्हा वेदोक्त मंत्र म्हंटल्याचा कसलाही पुरावा नाही माझं म्हणणं असं कि पुरोणोक्त मंत्रच म्हंटले गेले ह्याचा तरी कुठे पुरावा आहे ? मुळात राज्याभिषेकाचे मंत्रच मराठी ब्राम्हणांना माहित न्हवते म्हणून काशीहून गागाभट्टांना आणावे लागले म्हणजे राज्याभिषेकाचे मंत्र माहीत नसले तरी मराठी ब्राम्हण हे ब्राम्हणच !
पुढे टिळक म्हणतात कि मंत्र पुराणोक्त म्हंटल्याने काय फरक पडतो ब्राम्हणांच्या घरच्या स्त्रियांचे जे विधी असतात त्यावेळी पुराणोक्तच मंत्र म्हंटले जातात त्यामुळे ब्राम्हणी स्त्री शूद्र होते काय टिळकांना कुणीतरी हे सांगायला हवं कि हो ब्राम्हणी स्त्रिया शुद्रच मानल्या जात म्हणूनच त्यांच्यासंदर्भातले विधी पुराणोक्त म्हंटले जात आणि क्षत्रिय आणि वैश्यांच्यावेळी पुराणोक्त मंत्र म्हंटले जातात तेव्हा ते ब्राम्हणवादी धर्मानुसार शुद्रच होतात
पुढे टिळक म्हणतात कि राज्याभिषेकाचे मंत्र वेदोक्त होते पण महाराजांच्या राज्याभिषेकावेळी इतर जे विधी झाले त्यावेळी पुराणोक्तच मंत्र म्हंटले गेले होते टिळक असे जेव्हा म्हणतात त्याचा एक अर्थ असाही होतो कि ही मांत्रिक गंडवागडवी शिवाजी महाराजांच्यावेळीही झाली आणि शाहू महाराजांना जशी राजारामशास्त्री भागवत ह्या ब्राम्हणाने ती नजरेस आणून दिली तशी शिवाजी महाराजांच्या लक्ष्यात ही कुणी आणून दिली नाही त्यामुळे त्या काळात वेदोक्त प्रकरण उदभवले नाही कारण सर्वच तत्कालीन ब्राम्हणांना हे मान्यच होते आणि कुणीही हा सस्पेन्स फोडला नाही
पुढे टिळक म्हणतात कि शिवाजी महाराजांच्यावेळी पुराणोक्त मंत्र म्हंटले गेले होते तेव्हा आताच्या क्षत्रियांच्यावेळी ते म्हंटले गेले तर ते शास्त्राला धरून आहे माझे म्हणणे असे कि असे म्हणणे म्हणजे त्यावेळी गुन्हा घडला म्हणून आताही तो घडला तर तुम्ही तो स्वीकारला पाहिजे . हा तर खासा न्याय आहे का बाबांनो आता जर का अक्कल आली असेल तर ती थांबवून धरावी का ?
मुळात ब्राम्हणधर्माची मान्यता शोधावीच कशाला हा प्रश्न मला पडतो कारण ती शोधायला गेलात कि ब्राम्हणी धर्मशास्त्रानुसार कलियुगात ब्राम्हण आणि शूद्र असे दोनच वर्ण उरणार आणि ब्राम्हण तुम्ही जर ब्राम्हणवादी ब्राम्हण नसाल तर तुम्हाला शुद्रच म्हणणार त्यांचाही नाईलाज आहे कारण त्यांचे धर्मशास्त्र असं म्हणतं जे लोक शैव ब्राम्हणांना ब्राम्हण म्हणून मान्यता देत नाहीत आणि त्यांना शूद्रात टाकतात ते इतर वर्णांना काय कवटाळणार ? ह्यावर उपाय एकच आहे ब्राम्हणांनीच ब्राम्हण्यत्व फेकून देणे सुदैवाने ते करणाऱ्यांची संख्या वाढत चाललीये
खरेतर हे मी लिहिलं नसतं पण शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त काही पोस्ट फिरल्याने हे पुन्हा थोडे तपशीलवार लिहावे लागले मी मागेच म्हंटले आहे कि वेदोक्त प्रकरणात टिळक पूर्ण चुकलेत मात्र ह्या एका प्रकरणावरून टिळकांना मोडीत काढणे मला मंजूर नाही प्रत्येक महापुरुषाच्या आयुष्यात दोन मेजर आणि तीन मायनर हिमालयन ब्लन्डर्स होतात वेदोक्त प्रकरण हे टिळकांच्या आयुष्यातले मेजर हिमालयन ब्लँडर आहे
श्रीधर तिळवे नाईक
शैवांच्या मते जगातील कुठलीही गोष्ट आरंभी युग्मीय म्हणजे शिव शक्ती किंवा पंचायतनीय असते म्हणजे साधे वाक्य घेतले तरी कर्ता कर्म क्रियापद विशेष्य आणि अव्यये ह्या पंचायतनापासून बनलेले असते पुढे अधिक भर पडू शकते नाही असे नाही
सर तुम्ही एक फॅक्ट सांगितली मी त्याचे कारण सांगितले हे कारण योग्य कि अयोग्य हा मुद्दाच नाहीये कारण तुझ्या घरातला मुलगा मेला म्हणून माझ्या घरातला मुलगा मेला तर मी सहन करायला पाहिजे ह्या तर्काला इमोशनल द्वेषात काहीच अर्थ नसतो औरंगजेबाचा द्वेष हा इमोशनल द्वेष आहे मला नाही वाटत हा द्वेष संपेल जोवर एक मेमरीत जिवंत आहे ज्यादिवशी दोन्ही मेमरीतुन गायब होतील तेव्हा मग हा द्वेष चॅप्टर संपेल
ह्या भूतरंजनाची सवय लावून तिला सत्तेसाठी वापरण्याची हातोटी चिपळूणकर टिळकांच्यापासून सुरु होते म्हणून तर त्यांच्यावर माझे सतत अटॅक चालू आहेत मूळ वृक्षावरच हल्ला चढवला कि फांद्या पडतात
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १०५
ओरिएंटॅलिझम व वेदोक्त प्रकरण श्रीधर तिळवे नाईक
प्रथम आमचे जिवलग मित्र बाळकृष्ण शिर्के ह्यांच्या प्रश्नाचे उत्तर
वेदोक्त प्रकरण हे महाराष्ट्राच्या इतिहासात फार महत्वाचे आहे कारण महात्मा फुलेंची जी ब्राम्हण विरुद्ध ब्राम्हणेतर अशी मांडणी आहे त्याचा हे प्रकरण म्हणजे पुरावा झाले आणि पुढे कित्येक वर्षे ब्राम्हणेतर काँग्रेसपासून फटकून राहिले १८९४ -५ च्या गणेशोत्सवात तांबोळ्यापासून चांभारापर्यंत सर्वच सामील झाले होते आणि टिळकांनी त्यासंदर्भातल्या भाषणात त्यांचं कौतुक केलं होतं ह्या गणेश उत्सवात चांभारांच्याबाबत अस्पृश्यता पाळली गेली न्हवती कारण टिळक अस्पृश्यतेला शास्त्रानुसार मान्यता नसल्याने मान्यता देत न्हवते आज हा विरोधाभास विचित्र वाटतो चांभार सुरवातीपासूनच काँग्रेसला पाठिंबा देत होते आणि त्याला कारण टिळक होते हे आपण लक्ष्यात घेतले पाहिजे पुढे गांधीजींनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींना बसवून अस्पृश्यतेला हिंदू धर्मशास्त्र पाठिंबा देते का ह्याची चिकित्सा करायला सांगून असा शास्त्राचा पाठिंबा नाही असं तर्कतीर्थांनी सांगितल्यावर अस्पृश्यता हिंदू धर्माचा भाग नाही असा स्टान्स घेतला होता टिळक स्वतःच हिंदू धर्मशास्त्र जाणत होते त्यामुळे १८९३ पासूनच त्यांनी अस्पृश्यता शास्त्रात बसत नाही असे सांगायला सुरवात केली होती आणि त्यामुळे चांभारांना गणेशउत्सवात खुला प्रवेश होता ह्याउलट वेदोक्त वादात शास्त्र ब्राम्हणेतरांच्याविरुद्ध असल्याने टिळक ब्राम्हणेतरांनी पुराणोक्त मंत्र म्हणावेत असा स्टान्स घेत होते वेदोक्त मंत्र म्हंटले काय किंवा पुराणोक्त मंत्र काय प्रत्यक्षात काय फरक पडतो असा त्यांचा प्रश्न होता आणि माझेही म्हणणे हेच कि जर फरक पडत नसेल तर वेदोक्त मंत्र म्हणायला हरकत काय आहे ?
एकदा का टिळकांचा स्टान्स स्वीकारला कि त्यातून अनेक विचित्र प्रश्न निर्माण होतात ह्या स्टान्सनुसार ब्राम्हणांखेरीज
१ मूळ आर्य क्षत्रिय आर्य वैश्य नाहीसे होतात मग फक्त एकच वर्ण उरतो तो म्हणजे शूद्र म्हणजेच ज्या लोकांनी वैदिक धर्म वा हिंदू धर्म स्वीकारला आहे ते जर ब्राम्हण नसतील तर ते शूद्र असतील आणि होतात ह्याचा एक गमतीशीर परिणाम असा होतो कि जे मूळचे ब्राम्हण आहेत आणि जे क्षात्र वा वैश्य कर्म करतायत ते स्वतःचे कर्म वैश्य असले तरी स्वतःला ब्राम्हणच म्हणवून घेतात उदा माहेश्वरी किंवा शेणवी ब्राम्हण व्यापारी झाले तरी स्वतःचा वर्ण ब्राम्हणच सांगतात आणि कर्माचा संबंध तुटतो आणि वर्णव्यवस्था जन्माधिष्टितच राहते कर्माधिष्ठित राहण्याचे तिचे चान्सेस कमी होतात माहेश्वरी किंवा शेणवी ह्या दोघांनाही आपण वैश्य म्हणून स्वतःला डिक्लेअर केले तर आपले वैदिक संस्काराचे हक्क जातील असे भय आहे आणि त्यात तथ्य आहे कारण ज्यांनी असं डिक्लेअर केलंय त्यांचे वैदिक संस्काराचे हक्क गेलेले आहेत गोव्यात ज्यांनी वैदिक धर्म स्वीकारलाय ते सर्व शेणवी ब्राम्हण स्वतःला आता सारस्वत म्हणवून घेतायत तर जे आपल्या मूळ शैव धर्माला चिटकून आहेत ते स्वतःला शैव ब्राम्हण किंवा शेणवी ब्राम्हण किंवा शैव शेणवी ब्राम्हण म्हणवून घेतायत ह्यातल्या ज्यांनी ब्राम्हणत्व काढून टाकून वैश्य कर्म स्वीकारले त्यांचे वैदिक हक्क काढून घेऊन त्यांना वैश्य हा वर्ण देण्यात आलाय
२ ह्यापुढचा प्रश्न शूद्रांचा आहे हे सर्व शूद्र अनार्य म्हणजे स्थानिक आहेत आणि त्यांच्यासाठीच चौथा वर्ण निर्माण करण्यात आलाय हा वर्ण शैव आहे आणि तरीही त्याने हिंदू धर्म स्वीकारल्याने तो शूद्र आहे आणि त्यांचा स्वीकार करण्याची ब्राम्हणांची तयारीच नाही ह्यातूनच मग एक तडजोड निर्माण झाली त्या तडजोडीचे नाव वैष्णव धर्म आणि पुढे हिंदू धर्म आणि आता हिंदुत्व
म्हणजे काय तर
१ मोक्षाचा अधिकार शुद्रांनाही द्यायचा अध्यात्मिक समता स्वीकारायची आणि वासुदेव पंथ स्वीकारायचा २ त्याचे वैष्णवीकरण घडवायचे स्वतःकडे वेदोक्त मंत्र व वेद ठेवून घ्यायचे पुराणे खुली करायची ३ वैष्णव आगम स्थापन करायचा तो खुला करायचा ४ आणि ह्यातील कर्तृत्ववान लोकांना क्षत्रिय व वैश्य कर्म करायची अनुमती द्यायची मात्र पौराहित्य कामाचा अधिकार आपल्याकडेच ठेवायचा
शिवाजी महाराजांना जो राज्याभिषेक झालाय तो ह्या हिंदुत्ववादी धोरणांतर्गत झाला आहे सर्व वैष्णव संतांना ह्या धोरणांतर्गत मान्यता मिळाली आहे
शिवाजी महाराजांच्याप्रमाणे समजा सयाजीराव गायकवाडांनी वा शाहू महाराजांनी राज्याभिषेक केला असता तर टिळकांनी त्याला मान्यता दिली असती का तर हो दिली असती पण विधी मंत्र पुराणोक्तच म्हंटले असते मोदी ओबीसी असले तरी राजे होऊ शकतात तेही ह्याच हिंदुत्ववादी धोरणामुळे !
थोडक्यात काय हिंदुत्व पौराहित्य सोडले तर इतर सर्व अधिकार कुणालाही द्यायला तयार आहे अलीकडे पौराहित्य खुले होते आहे कारण खुद्द ब्राम्हणांनाच पौराहित्यात इंटरेस्ट उरलेला नाही मात्र शंकराचार्यांची पोस्ट अजूनही ब्राह्मणांसाठी राखीव आहे
थोडक्यात काय शास्त्रानुसार जी कर्मे ब्राम्हणांची न्हवतीच ती कुणालाही द्यायची हिंदुत्ववाद्यांची तयारी आहे कारण त्यांच्या मते ना आर्य क्षत्रिय उरलेत ना आर्य वैश्य
ह्यातून एक प्रश्न उरतोच जे कर्तृत्ववान नाहीत त्यांचं काय तर त्यांनी शुद्रच राहावे टिळकांच्या मते शिवाजी महाराज कर्तृत्ववान होते म्हणून त्यांनी स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेतले तर ते योग्यच आहे पण इंग्रजांची गुलामगिरी करणारे कसले क्षत्रिय ?
थोडक्यात काय कर्तृत्वाचा मुद्दा ब्राम्हणांना लागू नाही पण ब्राम्हणेतरांना लागू आहे
ह्या सगळ्याचा अर्थ काय तर वेदोक्त प्रकरण घडले त्याचे मुख्य कारण हिंदू धर्मशास्त्र होते हे धर्मशास्त्र बदलण्याची वेदोक्त ही संधी होती टिळकांनी ही संधी साधली नाही उलट ते कालबाह्य झालेल्या हिंदू धर्मशास्त्राचा कवटाळून बसले आणि त्यामुळेच त्यांच्याप्रमाणे कट्टर असलेल्या ब्राम्हणांच्यामुळे वेदोक्त प्रकरण घडले
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १०७
वेदोक्त प्रकरण का घडले ? भाग दुसरा
मागील भागात आपण वेदोक्त प्रकरणाची कारणमीमांसा केली आता आणखी काही कारणे पाहू
वेदोक्तमधली टिळकांची जी भूमिका आहे तिचा परिणाम काय होतो ?
तर ब्राम्हणांच्या हातात अमर्याद सत्ता येते आणि शुद्रांशी कसेही वागायला ते मोकळे होतात नवव्या शतकानंतर हेच झाले समुद्रपर्यटन बंदी करता आली आणि वैश्य सम्पवता आले तर परशुरामाने आर्य क्षत्रिय सम्पवल्याने क्षत्रिय न उरल्याने आपणच आपदधर्मानुसार राजे का बनू नये हा विचार ब्राम्हणांच्या मनात घोळायला लागला त्यानुसार सिंध मध्ये वैदिक राजवट आली केरळात आली आणि मुस्लिमांना मोकळे रान मिळाले कारण रणांगणात क्षत्रिय न्हवतेच सर्व गावांची सत्ता ब्राम्हणांच्या हातात आली आणि गावगाडा ब्राम्हण चालवू लागले
पुढेही जेव्हा मराठा साम्राज्य झाले तेव्हा ते कसं ताब्यात घेता येईल हाच विचार होता आणि बाजीरावच्या मस्तानी प्रकरणाने ही संधी दिली
संपूर्ण मुस्लिम काळात आर्य क्षत्रिय नसल्याने मुस्लिमांचा क्षत्रिय म्हणून स्वीकार करून ब्राम्हण लोकांनी आपले वर्चस्व कायम राखले मुस्लिम राजांनीही ब्राम्हणांना न दुखावण्याचे धोरण स्वीकारले जिथे जिथे बौद्ध जैन आणि शैव मंदिरे होती ती लुटली गेली त्यांच्यातल्या मुर्त्या फोडल्या गेल्या व ती ब्राम्हणांना दिली गेली व त्यांचे वैष्णवीकरण केले गेले राजपूत वैष्णव बनवले गेले मराठे वैष्णव बनवले गेले शैवांची धार्मिक राजधानी असलेली काशी वैष्णव बनवण्याचे जोरदार प्रयत्न केले गेले ह्या काशीनाथाच्या काशीविश्वेश्वरच्या मंदिराचा मुख्य अग्रपूजेचा मानकरी वैदिक बनवला गेला आणि पुढे त्याचा वंशज गागाभट जो वैदिक होता आणि शैवही होता राज्याभिषेकासाठी बोलावला गेला
ब्राम्हणांच्या झुंडी भारतभर सनातन धर्माची हाकाटी पेटवत प्रत्येक राज्याच्या राजधानीत फिरू लागल्या काही ब्राम्हणांनी ह्याही पुढे जाऊन वैदिक धर्माचा त्याग करून इस्लाम स्वीकारला
सतत ब्राम्हण महत्व वाढवत न्हेणे वैदिक मंत्रात असाधारण ताकद आहे असा प्रचार करून ती ताकद आपल्याकडे आहे असे भासवणे आणि झुंड म्हणून संघटित राहणे ही ब्राम्हणी पॉलिसी बनली
सर्व प्रवासी भारतात ब्राम्हणधर्म व बौद्धधर्म असल्याचे सांगतात कारण ह्या देशात एकेकाळी ब्राम्हण ब्राह्मणधर्मात होते व क्षत्रिय बौद्ध व वैश्य जैन धर्मात थोडक्यात आर्य तीन धर्मात वाटले गेले आणि अनार्य शैव होतेच म्हणजे चातुर्वर्ण चार धर्मात विभागले गेले अर्थात काही अपवाद वगळून
ब्राम्हण ब्राम्हणधर्म
क्षत्रिय बौद्ध वा वैष्णव
वैश्य जैन पुन्हा हिंदू बनलेल्या वैश्यांनी आपल्या मूळ धर्मातील म्हणजे जैन धर्मातील लक्ष्मी ही देवता मात्र सोडली नाही उलट तिला मुख्य देवता म्हणून स्वीकारली आणि तिला विष्णूची पत्नी बनवली
शूद्र शैव
हे एकदा लक्ष्यात आल्यावर परदेशी प्रवाश्यांच्या प्रवासवर्णनात ब्राम्हणांच्या धर्माला ब्राम्हणधर्म असे वर्णवाचक नाव का रूढ होत गेले ते सहज लक्ष्यात येईल काही शृंगासारखे ब्राम्हण क्षत्रिय झाले तरी ते स्वतःला ब्राम्हणच म्हणत राहिले थोडक्यात काय जसे पारशी नष्ट होत अल्पसंख्यांक उरले तसे ब्राम्हणही पण ब्राम्हण जसे आभासात्मक ताकद निर्माण करण्यात यशस्वी झाले तसे पारशी झाले नाहीत
पुढे शंकराचार्यांचा वापर करून सगळे शैव ब्राम्हण वैदिक बनवण्यात यश आले आणि फासा पालटला शैव शासकांना व व्यापाऱ्यांना शूद्र बनवण्यात यश आले आणि हिंदू धर्म तयार करण्यात आला मात्र वेदोक्त आपल्याकडे ठेऊन ह्यांना पुराणोक्त अशी विभागणी करण्यात आली हा एक वंशवादी निर्णय होता आणि तो राबवण्यात आला आणि त्यातूनच हे वेदोक्त प्रकरण घडले
ह्या प्रकरणाने टिळकांची ब्राम्हणवादी मानसिकता पूर्णपणे उघडी पडली आणि ब्राम्हण ब्राम्हणेतर दुफळी पडली ती पडलीच
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १०८वेदोक्त प्रकरण ५ हिंदू धर्मात वर्ण किती ?
वेदोक्त प्रकरणाने निर्माण होणाऱ्या एका महत्वाच्या प्रश्नाकडे सर्वच विचारवंतांनी दुर्लक्ष्य केलंय हा प्रश्न म्हणजे देवसुर आर्य धर्मात नेमके वर्ण तरी किती आहेत ?
प्रथम वैदिक धर्म निर्माण झाला तेव्हा ह्या धर्मात फक्त तीनच वर्ण होते ब्राम्हण, क्षत्रिय आणि विश आणि हे तिन्ही वर्ण समान तर होतेच पण ते कर्माप्रमाणे होते त्यामुळे वेदात तीनही वर्णांच्या लोकांनी रचलेली सूक्ते आहेत
मग ब्राम्हणांना स्वार्थ चावला आणि ह्याचवेळी त्यांचा संपर्क अनार्यांशी आला आणि ह्यातून फार विचित्र प्रश्न निर्माण झाले जगात ह्या काळात शैव सोडले तर सर्वच धर्मात दासप्रथेला मान्यता होती आर्यांच्यात इसवीसनपूर्व १००० च्या आसपास पराक्रमाचा संचार झाला आणि ज्या ज्या टोळ्या जिंकल्या गेल्या त्यांना सामावून कसं घ्यायचं हा प्रश्न निर्माण झाला ब्राम्हणांनी हा प्रश्न अत्यंत वाईट तऱ्हेने सोडवला ह्यामागे आपल्या धर्माची शुद्धता व पवित्रता व सोवळेओवळे नष्ट होईल अशी भीती होती आणि आपल्या धर्माचे अधिकार आपल्याकडेच रहावेत शुद्र दासांच्याकडे ते जाऊ नयेत अशी लालसाही ! आर्य क्षत्रियांनाही आपली राज्ये वंशाधिकाराने चालवायची होती दोघांचेही हितसंबंध सारखे असल्याने दोघांनी मिळून स्वतःचे दोन वर्ण हे सर्वोच्च आणि जन्माधिष्टित केले साहजिकच तिसरा विश म्हणून व चौथा शूद्र हेही जन्मजात झाले विश हे आर्य असले तरी त्यांचे शुद्रांशी विवाह होऊ लागले आणि त्याला ब्राम्हण क्षत्रियांची हरकत न्हवती इतकेच कशाला ब्राम्हण क्षत्रिय विवाह कॉमन होते ब्राम्हण क्षत्रियांची संतती हीही पितृसत्ताक पद्धतीने ठरत होती त्यामुळे आर्य ब्राम्हण क्षत्रिय पुरुष व विश शूद्र स्त्री ह्यांचा विवाह झाल्यास ती संतती ब्राम्हण व क्षत्रियच मानली जाई (पराशर मत्स्यगंधा किंवा बुद्धाचे मातापिता ह्यांच्यातील विवाह ) पुढे मनूने हेही हक्क नाकारले व अशा संबंधातल्या संततीला चांडाळात ढकलले मनूने एका अर्थाने ब्राह्मणधर्माची स्थापना केली मनू हा ब्राम्हण होता कि क्षत्रिय हा वाद अजून संपलेला नाही मात्र ह्या दोघांचेही हितसंबंध त्याने सांभाळले ह्याविरुद्ध पहिले बंड केले ते कपिलने सांख्य दर्शन सांगून ! ह्या दर्शनातूनच पुढे आत्ताचा जैन धर्म व बुद्धाचा बुद्ध धर्म जन्मले हे तिघेही राजपुत्र होते आणि त्यांना ब्राह्मणधर्म अमान्य होता सुरवातीच्या काळात हे विजयी होत गेले
गुप्त व वर्धन साम्राज्य कोसळल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली ती पुन्हा भरून काढण्यासाठी व्यासांनी वैष्णव धर्म स्थापन केला हा आधीच्याच वासुदेव पंथाचा नवा अवतार होता त्याचे नाव वैष्णव धर्म ! व्यास ब्राम्हण होते आणि बहुदा यादवांचे राजगुरू ! महाभारतातले व्यास वेगळे होते ह्या ब्राम्हण व्यासाने चातुर्वर्ण्याची पुन्हा स्थापना केली आणि वर्ण जन्माधिष्टित केले
म्हणजे
१ वैदिक त्रैवर्णिय कर्माधिष्टीत २ ब्राह्मणधर्म चारवर्णीय जन्माधिष्ठित ३ वैष्णव चारवर्णीय जन्माधिष्ठित
अशी ही वर्णव्यवस्था आहे ह्यातील वैदिक धर्माचे पुनर्जीवन स्वामी दयानंद सरस्वती ह्यांनी करून जन्माधिष्ठित चातुर्वर्ण्यविरुद्ध बंड केले आणि कर्माधिष्ठित चातुर्वर्ण्याची स्थापना केली हा नववैदिकवाद होता आणि हे बंड पंजाबमध्ये जसे पसरले तसे महाराष्ट्रात पसरले नाही शाहू महाराज आर्य समाजी होते आणि ते आर्य समाज पसरवू शकले असते पण ह्याचवेळी नेमके वेदोक्त प्रकरण घडले आणि महाराज सत्यशोधक समाजाकडे ओढले गेले त्यांनी आयुष्यभर ह्या दोन समाजात समतोल साधण्याचा प्रयत्न केला आर्य समाजाचा जातीपातीवर विश्वास न्हवता तो फक्त वर्ण मानी आणि तेही कर्माधिष्ठित ! त्यामुळे महाराजांचाही जातीवर विश्वास न्हवता कर्माधिष्ठित वर्ण मानत असल्याने होळकर घराणे हे त्यांच्या दृष्टीने क्षत्रिय होते त्यामुळे त्यांनी आपली एक मुलगी ह्या घराण्यात दिली. सत्यशोधक समाजाचे टोक त्यांनी नाकारले म्हणूनच काही वर्षांनी त्यांचे टिळकांच्याबरोबरचे संबंध पुन्हा सुधारले
जे लोक स्वतःला वैदिक धर्मीय म्हणवतात त्यांनी कृपया हे लक्ष्यात घ्यावे कि वैदिक धर्म त्रैवर्णिय कर्माधिष्टीत आहे तो कर्मानुसार वर्ण मानतो जन्मानुसार न्हवे वैदिक धर्मानुसार मोदी क्षत्रिय आहेत आणि त्यामुळेच अनेक वैदिक ब्राम्हण हे मोदींच्या समर्थनासाठी उतरत असतात आणि पुरोगामी लोकांना त्यांचे आश्चर्य वाटत असते हिंदुत्ववाद्यांच्यात वैदिक ब्राम्हणांची संख्या वाढत चाललेली आहे एके काळी हिंदुत्ववादावर ब्राम्हण धर्माचा जबरदस्त पगडा होता तो आता ओसरत चाललेला आहे हे बदललेले वास्तव अनेकांना कळत नाही माझा अंदाज चुकला नाही तर येत्या पन्नास वर्षात शंकराचार्यपदी एखादा ब्राम्हणेतर आणला जाईल
वैष्णव धर्माच्या स्वीकार केल्यानंतर भारताचे अधःपतन सुरु झाले अनेक ठिकाणी भारताबाहेरचे लोक शासक बनले ह्याची सुरवात शक आणि राजपूत लोकांनी केली हे लोक शैव बनले व विजयी होत राहिले .
ह्यानंतर शंकराचार्य आले आणि त्यांनी हिंदू वेदांत धर्म स्थापन केला पण वैष्णवांनी त्यांनाही आत्मसात केले आणि त्यांचे वैष्णवीकरण करून हिंदू धर्म निर्माण करून पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला पुढे मुस्लिमांचे आक्रमण सुरु झाले आणि त्यांनी वैष्णवांना सर्वत्र पराभूत केले आणि वैष्णव हा फक्त व्रतवैकल्यांचा व मोक्ष मिळवण्याचा धर्म बनला ह्याच काळात राजपुतांनी वैष्णव धर्म स्वीकारला आणि स्वतःच्या पराभवाची गाथा रचायला सुरवात केली आणि इथेच यादवांच्या काळात महाराष्ट्रात हेमाद्री नावाच्या ब्राम्हणाने द्विवर्णाचा सिद्धांत मांडला आणि हिंदू धर्मात वर्ण किती ह्या प्रश्नाचे ऑफिशियल उत्तर दिले : दोन वर्ण ब्राम्हण व शूद्र आपण हे लक्ष्यात घेणे आवश्यक आहे कि हा सिद्धांत केरळी ब्राम्हणांनी मांडला व मराठी लोकांनी पसरवला आहे गोव्यात तो सारस्वत ब्राम्हणांनी पसरवला १३०० पासून १९०० पर्यंत हिंदू धर्मात दोनच वर्ण होते आणि शाहू महाराजांनी त्याला वेदोक्त प्रकरणात शह दिला ह्या द्विवर्णीय हिंदू धर्मामुळेच शिवाजी महाराजांना क्षत्रिय म्हणून मान्यता मिळाली नाही आणि तुकारामही सुरवातीच्या काळात स्वतःची याति माझी शूद्र असे म्हणत राहिले ह्या दोघांनीही पुढे ही व्यवस्था नाकारली पण मराठी समाजात पेशवाईच्या काळात पुन्हा ह्या सिद्धांताचे आगमन झाले
पुढे जेव्हा १८६० नंतर ब्रिटिशांनी हिंदू धर्माचा कोर्टात शपथ घेण्याचा ग्रंथ म्हणून गीता स्वीकारली तेव्हा हिंदू पुन्हा वैष्णव हिंदू झाले आणि गीतेतल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे पुनरागमन झाले इंग्रज व्यापारीही होते आणि शासकही त्यामुळे झक मारत वैश्य आणि क्षत्रिय वर्णांना वर्णाचा दर्जा देणे क्रमप्राप्त होते शिवाय औद्योगिक क्रांतीनंतर जगभरच व्यापारी वैश्य वर्ण केंद्रस्थानी आला होता आणि पुरोहित ब्राम्हण तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते विवेकानंदांच्या भाषेत सांगायचे तर आत्ताचे युग हे वैश्यांचे आहे साहजिकच द्विवर्णाकडे झुकलेला हिंदू धर्म आता पुन्हा चातुर्वर्णीय झाला होता आणि जणू काय तो पूर्वीसुद्धा चातुर्वर्णीय होता अशा थाटात इतिहास आणि समाजशास्त्रही लिहिले गेले जे स्पष्टपणे चुकीचे होते
वेदोक्त प्रकरणाच्या निमित्ताने ब्राम्हणांनी टिळकांच्या नेतृत्वाखाली ह्या बदलाला कट्टर विरोध केला पण शाहू महाराजांनी ह्या संपूर्ण प्रकरणात योग्य ते डावपेच आखत टिळकांना आणि ह्या कट्टर द्विवर्णीय ब्राम्हणांना पूर्णपणे पराभूत केले
टिळकांची भूमिका शेवटी जे स्वराज्याच्या लढ्यात शांततेने व स्वार्थत्यागाने लढतील ते ब्राम्हण अशी जी बदलली त्यामागे त्यांच्या अंतःकरणातला हा सहृदय ब्राम्हण होता हे लक्ष्यात घेतले पाहिजे एकनाथांनीही आयुष्याच्या शेवटी जो वारकरी तो ब्राम्हण अशी व्याख्या केली होती टिळकांचेही शेवटी एकनाथ झाले आणि पुढे गांधीजी तुकाराम झाले
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १०९वेद महाभारताकडून स्वराज्यलढा व भारताकडे
टिळकांच्या ह्या काळात ज्या काही गोष्टी झाल्या त्यात ताईबाई प्रकरण हे फार महत्वाचे प्रकरण होय (१९०१ ते १९०४ )केळकरांनी ह्या प्रकरणाविषयी जे लिहिलं आहे त्यापेक्षा फार वेगळं काही सांगण्यासारखे माझ्याकडे नाही ह्या प्रकरणात टिळकांच्यातला वचननिष्ठ ,सहृदय अंतःकरणाचा उदात्त माणूस दिसतो व्यक्ती म्हणून जबरदस्त असणारे टिळक धार्मिक आणि सामाजिक सुधारणेबाबत इतके कसे मागासलेले हा प्रश्न कायमच सतावत राहतो ताईबाई खटल्यात केवळ दिलेल्या वचनाखातीर टिळकांनी आयुष्याची चार वर्षे घालवली ह्या खटल्यात टिळकांना पदरचे साठ हजार रुपये खर्च आला जेव्हा महाराजांनी हा खर्च परत करायची इच्छा प्रकट केली तेव्हा टिळकांनी तुम्ही माझे तिसरे पुत्र आहात आणि पिता पुत्राकडून पैसे घेत नाही असे सांगितले . महाराजांनी मग पितृऋणाचा मुद्दा मांडला आणि खूपच आग्रह धरला तेव्हा टिळकांनी पूना कॉलेजसाठी जमीन मागितली ती महाराजांनी आनंदाने दिली मार्केटला तिची किंमत ३०००० होती महाराजांनी उरलेले ३०००० देतो म्हणून सांगितले तर ते घ्यायला टिळकांनी सपशेल नकार दिला आजच्या काळात ह्या पैश्याची किंमत ३० लाख सहज होईल टिळकांनी ही रक्कम पुत्र मानलाय म्हणून सोडली ह्याउलट सावरकरांनी कधी व्यवहार सोडलेला दिसत नाही टिळक सहृदय होते सावरकर कठोर ! तरीही टिळकांनी कधी कविता लिहिल्या नाहीत सावरकरांनी लिहिल्या . रोमँटिक कवींची अमानुषता हा तसा संशोधनाचा विश्वास आहे असो
टिळकांचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या कार्यकर्त्याच्या मागे भक्कम उभे रहात यवतमाळच्या एका साप्ताहिकाच्या कार्यक्रमात जेव्हा त्यांचा एक कार्यकर्ता ऑफिसमधले दारिद्र्य लपवू लागला तेव्हा टिळक त्याला म्हणाले," माणसाला आपल्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे दारिद्र्याची न्हवे " टिळक आपल्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या प्रत्येक विचारवंताला चरणस्पर्श करत आपल्या सासऱ्यांनाही ते आवर्जून भेटत ह्या काळात त्यांनी आपल्या दोन मुलींची लग्ने करून दिली
टिळकांच्या लोकप्रियतेमागे त्यांच्या ह्या स्वभावाचा फार मोठा वाटा आहे हा माणूस आपला आहे ही भावना प्रत्येकात ते निर्माण करत कारण व्यक्तींची त्यांना जेन्युईन कदर होती माणसांचे चांगलेपण आणि वाइटपण ते सहज स्वीकारीत त्यामुळेच एखादा अतिवाईट असेल तर नेमकी कुठे कळ दाबून त्याला नीट करता येईल हे त्यांना कळे व अनेकदा ते यशस्वी होत यदाकदाचित न सुधारणाऱ्यातली केस असेल तर मग ते समोर ठाकला तर दोन हात करण्याची त्यांची तयारी असे सशस्त्र क्रांतिकारकांचा टिळकांचा प्रचंड विश्वास होता त्याचेही कारण टिळकांचा हा स्वभाव होता एखादी गोष्ट सिक्रेट ठेवण्यात ते वाक्बगार होते आणि त्यामुळेच त्यांच्यात आणि ह्या क्रांतिकारकांच्यात नेमकी काय बोलणी झाली हे आजही गुलदस्त्यात आहे
टिळकांना स्पेन्सर पसंत होता पण नित्शेचा सुपरमॅन कधीच मान्य न्हवता त्यांनी त्याचा उल्लेख पूर्णावस्थेत पोहचलेले जनावर असा केला आहे १ टिळकांच्या मृत्यूनंतर उदयाला आलेल्या हिटलरला हे वर्णन चपखल लागू पडते तत्कालीन भारतात अनेक लोक हे जनावरासारखे जगत त्यांना त्यांनी कधीच हेटाळणीने पाहीले नाही टिळक म्हणत ,"हे लोक पशु आहेत म्हणून त्यांचा तिरस्कार करण्यात पुरुषार्थ नाही त्यांचा गळा व आमचा गळा एका मोटेने बांधला आहे अखेरीस आपणास कोणी तारतील वा मारतील तर हेच लोक तारतील वा मारतील " त्यावेळी टिळकांना ही कल्पनाही आली नसेल कि जो हिंदुत्ववाद आपण मांडतोय त्याच्यातच अशा जनावरांची समस्या निर्माण होणार आहे
टिळकांना हे कळत नाही कि भारतीय धर्मवर्णजातिव्यवस्था हीच ह्या माणसांना जनावर बनवण्याचे मुख्य कारण आहे त्यांची एक गैरसमजूत अशी कि वर्णव्यवस्थेतील सर्वच ब्राम्हण क्षत्रिय हे खूप दयाळू व उदार अंतःकरणाचे असतील ह्याउलट फुले ब्राम्हणांना वेगळ्या नजरेने पहात ब्राम्हणेतर पक्षातील काही जहाल व कट्टर लोक साप आणि ब्राम्हण ह्यांच्यात सापाला सोडावे म्हणत वस्तुस्थिती अशी होती दोन्ही प्रकारची माणसे ब्राम्हणांच्यात होती खुद्द टिळकच सहृदय होते त्यामुळेच तर संमती कायद्याला नकार देणारे टिळक स्वतःच्या मुलींची लग्ने मात्र संमती वय पार झाल्यावरच करत होते तर ह्या कायद्याचे कट्टर समर्थक असलेले xxx स्वतःच लहान मुलीशी लग्न करत होते लोकांना ह्या गोष्टी दिसत होत्या
टिळक एका अर्थाने ब्राम्हणांना मिशनरी बना म्हणून सांगत होते आणि त्याचा प्रभाव प्रबोधनकार ठाकरे ह्यांच्यावर खूप पडला आणि त्यांनी हिंदू मिशनरी संघ स्थापन केला टिळकांच्यावर साल्वेनिस्ट मिशनऱ्यांच्या जबरदस्त प्रभाव पडला होता हिंदूंच्यातील रामदासी लोक असे होते असा त्यांचा समज होता म्हणून ते रामदासी वा साल्वेनिस्ट व्हा म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमागे सुरवातीला हीच भूमिका होती गोडसे व गुरुजींनी संघ बदलला

१ संदर्भ आचार्य जावडेकर आधुनिक भारतात पान २२५
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ११०टिळक बुद्ध आगरकर आणि आंबेडकर पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत
भारतात जे काही गैरसमज आहेत त्यातील एक म्हणजे गौतम बुद्धाचे पुन्हा आगमन भारतात आंबेड्करांच्यामुळे झाले आहे वस्तुस्थिती अशी आहे भारतीय प्रबोधनात गौतम बुद्धाबाबत आंबेडकर सर्वात शेवटी आहेत
प्रबोधनात गौतम बुद्ध ओरिएंटॅलिस्ट लोकांनी इन्ट्रुडूस केला महाराष्ट्रात फुले ह्यांनी गौतम बुद्धाला प्रतिष्ठा दिली पण त्यानंतर गौतम बुद्धाचे सर्वात कट्टर समर्थन हे आगरकर ह्यांनी केले आहे त्यानंतर धर्मानंद कोसम्बी ह्यांनी १९१० साली सयाजीराव गायकवाड ह्यांनी बडोदे येथे फेब मध्ये आयोजित केलेल्या परिषदेत बौद्ध धर्मावर चार व्याख्याने दिली ज्याचे पुढे पुस्तकही निघाले आणि ह्या व्याख्यानांचा प्रभाव पडून मग आंबेडकर बुद्धाकडे आलेत.
सर्वात प्रथम अर्वाचीन बौद्ध प्रचार व धर्मांतर साऊथमध्ये झाले आहे आणि ते श्रीलंकन बौद्ध मिशनऱ्यांच्यामुळे झाले आहे साउथचे प्रबोधन हे काही बाबतीत एक पाऊल पुढे होते असो
टिळक गौतम बुद्धाबाबत कट्टर ब्राम्हणवादी होते ओरियनमध्ये पहिल्याच पानावर त्यांनी कुमारील भट्ट आणि शंकराचार्य ह्यांनी बौद्ध धर्म पळवून लावला असे म्हंटले आहे टिळक बुद्धाला मानत नाहीत म्हणून हिंदुत्ववादीही मानत नाहीत हे आपण लक्ष्यात घ्यायला हवे मी मागेच म्हंटलंय टिळकांची स्ट्रेंग्थ तीच हिंदुत्ववाद्यांची स्ट्रेंग्थ आणि टिळकांची मर्यादा तीच हिंदुत्ववाद्यांचीही मर्यादा !
ह्याउलट आगरकर होते टिळक आगरकरांच्या वादावर सांगायला माझ्याजवळ फार काही नवे नाही त्यामुळे मी त्या वादावर मी फार लिहिलेले नाही साहित्यात इंटरेस्ट असणाऱ्यांनी विश्राम बेडेकर ह्यांचे टिळक आणि आगरकर हे नाटक जरूर वाचावे मात्र गौतम बुद्धाबाबत मात्र बौद्धांनी जो न्याय आगरकरांना द्यायला हवा तो दिलेला नाही सर्वात पहिला आणि अंतिम शब्द आंबेडकरांचा ह्या वृत्तीतून हे झाले आहे . हा न्याय मिळावा म्हणून ही चर्चा करतो आहे आगरकरांची गौतम बुद्धाविषयीची मते ही आगरकर निबंधसंग्रहाच्या तिसऱ्या खंडात आली आहेत
आगरकरांचा बुद्धिवाद हा भारतीय प्रबोधनाचा एक वैभवशाली अध्याय आहे आश्चर्य म्हणजे आगरकरांनी प्रज्ञापुरुष म्हणून शंकराचार्यांची निवड न करता बुद्धाची निवड केली आहे तर टिळकांनी शंकराचार्य निवडले आहेत भविष्यात हिंदुत्ववाद्यांनी हाच वाद टिळकांना रामदास व गांधींना बुद्ध मानून लढवला आणि सावरकरांचे संन्यस्त खडग टिळक आगरकरांच्या ह्या वादातून आले आहे आगरकर प्रबोधनाचे फलित म्हणजे विचारस्वातंत्र्य आणि व्यवसायस्वातंत्र्य असे मानतात ह्यातील व्यवसायस्वातंत्र्यामुळे आज ना उद्या वर्णजातिव्यवस्था नष्ट होणार ह्याविषयी त्यांच्या मनात शंका नाही मात्र पुरोहितांचा व्यवसाय मात्र जशाच्या तसा राहील ह्याची त्यांना कल्पना आली नाही आणि वर्णजाती पोलिटिकल बनतील असेही त्यांना वाटले नाही ते १० टक्के मालक व ९० टक्के सेवक ह्यांच्यातले नाते शोषक शोषित असे होऊन त्यांच्यात भविष्यकाळात संघर्ष निर्माण होणे अटळ आहे असे मानतात अशा ह्या जीवनात मग व्यक्तिगत जीवनाचे काय ? आगरकरांचा अहं ब्रम्हास्मि वर विश्वास आहे
आगरकरांच्या मते गौतम बुद्धाचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्याने ईश्वर नाकारून ईश्वराधीनता नाकारली आणि माणसाचे जीवन त्याच्याच कर्माधीन केले मात्र ही कर्मकल्पना आल्यावर आपला धर्म केवळ ह्या कल्पनेच्या आधारे स्वीकारला जाणार नाही म्हणून त्याने पूर्वीपासून चालत आलेली पूर्वजन्म आणि पुनर्जन्म ह्या दोन्ही संकल्पना स्वीकारल्या सत्कर्माला बक्षीस व दुष्कर्माला दंड होणे हे गरजेचे असल्यानेही त्याने हा पूर्वजन्म व पुनर्जन्म स्वीकारला असे ते मानतात त्यांच्या मते सांप्रतच्या काळात हे समाधानकारक नाही कारण सांप्रतच्या काळात सत्कर्माला बक्षीस व दुष्कर्माला दंड मिळतोच असे नाही त्यामुळे हा पूर्वजन्म व पुनर्जन्माचा सिद्धांत व त्याच्याशी जोडला गेलेला कर्मफळाचा सिद्धांत चुकीचे आहेत दुसरे कारण ह्या सिद्धांताना कसलाही वैज्ञानिक पुरावा सापडला नाही ह्याचाच अर्थ बुद्ध ह्या संदर्भात चुकलेला आहे तिसरे कारण ह्या सिध्दांतांच्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सुखदुःख व प्रश्न हे पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलानुसार होतात हे स्वीकारले कि त्याचे परिमार्जन कसे करायचे तेच कळत नाही आणि चौथे कारण पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांतामुळे राजकीय सामाजिक आर्थिक सुधारणा अशक्य बनतात पाचवे कारण ह्यामुळे पाप पुण्याची बक्षिसे व दंड देणाऱ्या मनुष्यकृत संस्था निर्माण करण्याचा उत्साहच ह्यामुळे नाहीसा होतो म्हणूनच मनुष्याला कार्यतत्पर व सुधारणाप्रवण करण्यासाठी पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत हे दोन्ही सिद्धांत नाकारले पाहिजेत
ह्यातून प्रश्न निर्माण होतो बुद्धासारखा पुरुष पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांतांबाबत चुकू शकतो का ? तर हो बुद्धासारखा पुरुषही चुकू शकतो असे ते म्हणतात
आगरकरांच्या दृष्टीने निर्वाण म्हणजे स्थितप्रज्ञता प्राप्ती ! आगरकर ह्या अर्थाने निर्वाण स्वीकारतात मात्र पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत नाकारतात आंबेडकरांच्यावर ह्याचा थेट परिणाम झालेला दिसतो आंबेडकरही आगरकरांच्याप्रमाणे निर्वाण स्वीकारतात पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत नाकारतात हा सिद्धांत नाकारण्याची कारणे स्वीकारतात मात्र ते स्थितप्रज्ञता ही हिंदू संकल्पना असल्याने नाकारून परमप्रज्ञता ही बौद्ध संकल्पना स्वीकारतात व आगरकर जसे थेटपणे बुद्ध चुकला म्हणतात तसे आंबेडकर म्हणत नाही ते बुद्धाने पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत सांगितलेच नाही म्हणतात आणि पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत ह्यांच्याकडे ते ब्राम्हणधर्माची बौद्ध धर्मातली घुसखोरी मानतात ह्यामागची कारणे स्पष्ट आहेत एकतर आगरकर कुणाचेच अनुयायी नाहीत तर आंबेडकरांना आपल्या अनुयायांसाठी धर्म द्यावयाचा आहे अशा वेळी मूळ संस्थापकच चुकला असे म्हणणे म्हणजे मूळ धर्मच चुकीचा आहे असे मानणे होते आंबेडकरांना हे परवडणारे न्हवते दुसरी गोष्ट आंबेडकरांना प्रामाणिकपणे वाटत होते कि अशी घुसखोरी झालेली आहे
वस्तुस्थिती काय आहे ? वस्तुस्थिती अशी आहे कि आंबेडकरांच्या म्हणण्याला कसलाही पुरावा नाही आणि त्यामुळेच आगरकरांचे म्हणणे आधिक तर्कशुद्ध वाटते टिळक पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत स्वीकारतात आगरकर नाकारतात पण ते इथेच थांबत नाहीत ते प्रश्न निर्माण करतात कि बुद्धासारखा पुरुष पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत ह्यांच्याबाबत कसा काय चुकू शकतो ?
आगरकरांच्या मते चैत्यानुभवाला प्राप्त होऊन वासनांचा अंत झाला तरी अमरत्वाची आस शिल्लक राहते व त्यातून हे घडते आगरकरांचे हे कारण तद्दन चुकीचे वाटते कारण बुद्धता सर्व तृष्णांचा त्यात अमरत्वाची तृष्णाही येते अंत झाल्यावरच प्राप्त होते असो
मूळ मुद्दा असा कि बाबासाहेब आंबेडकर ह्यांना आगरकरांची कारणमीमांसा पटली नाही म्हणून त्यांनी आपले तर्क दिले मात्र बुद्धाच्या संदर्भात पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत नाकारण्याचे बळ त्यांना आगरकरांनी पुरवले असे दिसते
आज नवयानाचे पारंपरिक यानांपेक्षा जे वेगळेपण आहे ते पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत नाकारण्यात आहे आणि त्याचा पाया आगरकरांनी टाकला होता
टिळकांनी मात्र स्वराज्याचा लढा पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत ह्यांना स्वीकारतच पुढे न्हेला
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ११०
हिंदवी स्वराज्य , स्वराज्य आणि स्वराज श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळकांनी परंपरेतून ज्या काही गोष्टी शोधल्या त्यातली एक स्वराज्य ! शिवाजी महाराजांनी हा शब्द १७ एप्रिल १६४५ रोजी दादाजी प्रभूदेशपांडे ह्यांना लिहिलेल्या पत्रात रायरेश्वराच्या म्हणजे महादेवाच्या साक्षीने आम्ही हिंदवी स्वराज्य स्थापन करत आहोत असे म्हणत प्रथम ऑफिशियली वापरला हिंदुत्ववादी हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रीची इच्छा हे वारंवार कोट करतात पण महाराजांचा श्री हा भगवान शिवशंकर आहे हे सांगायला सोयीस्कररीत्या विसरतात कारण तो तसा सांगितला कि स्वातंत्र्य समता बंधुता स्वीकारावी लागते आणि हिंदुत्ववाद्यांना ह्याची ऍलर्जी आहे ह्याचा आणखी एक अर्थ हिंदूत्ववादी लोक हिंदू असा काढत असतात पण महाराजांना हा अर्थ अभिप्रेत न्हवता त्यांनी वापरलेला शब्द हिंदवी आहे आणि ह्या शब्दात जे जे हिंद देशात राहतात आणि ज्यांनी आपली मातृभूमी पितृभूमी हिंद मानली आहे ते ते सर्व येतात त्यामुळेच महाराजांनी सम्राट अकबराला आदरयोग्य मानले आहे औरंगजेब मात्र सतत मूळ इस्लामिक मानत जातो अधिकाधिक अहिंदवी होत जातो सम्राट अकबर अधिकाधिक हिंदवी बनत जातो त्यामुळेच मी नेहमी म्हणतो कि मुस्लिमांच्यात दोन प्रकार आहेत
१ हिंदवी अकबरवादी मुसलमान
२ विस्तारवादी अहंकारी इस्लामत्ववादी औरंगजेबवादी मुसलमान महाराज ह्यांचा उल्लेख तुर्क असा करतात आणि त्यांना त्याचा अभिप्रेत असलेला अर्थ परके असा आहे
अकबराची सुरवात हिंदवी म्हणून होते कारण तो राजपुतांच्यात वाढत जातो आणि शेवटी दिन ए इलाही पर्यंत पोहचतो महाराजांच्या स्वराज्यात हिंदवीला जागा आहे किंबहुना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात मुस्लिमांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे माझ्या मते अकबराची वा मलिक अंबरची राजवटही हिंदवी स्वराज्यच आहे कारण ते एका हिंदवी मुस्लिमाने स्थापन केले आहे बाबर मुघलांची पहिली पिढी असल्याने कायमच स्वतःला ह्या देशात आपण परकीय आहोत असे फील करत होता तसे दुसऱ्या पिढीचा अकबर वा पहिल्या पिढीचा मलिक अम्बर फील करत नाही पहिल्या पिढीचा असूनही मलिक अम्बर परकेपणा फील करत नाही कारण तो गुलामीतून आला होता
आपल्या काही पुरोगाम्यांना हिंदुत्ववाद दिसतो पण इस्लामत्ववाद दिसत नाही त्यामुळे ते औरंगजेबाला कधीकधी समर्थन देऊन इस्लामत्ववादाला खतपाणी पुरवत राहतात
१ सर्व जग इस्लामीक मुसलमान करणे
२ शरियाचा कायदा सर्वत्र लागू करून त्याची अंमलबजावणी करणे
ह्या दोन गोष्टींच्यासाठी धडपडणारा वेळप्रसंगी त्यासाठी छुपी वा खुली सक्ती वा छुपा वा खुला दहशतवाद वा छुपे वा खुले युद्ध पुकारणारा व करणारा तो इस्लामत्ववादी
ही माझी साधी सरळ इस्लामत्ववादाची व्याख्या आहे
हिंदवी स्वराज्य हे हिंदुत्ववादही स्वीकारत नाही आणि इस्लामत्ववादही ! ते काळानुसार बदलत जाणारी लवचिक कायदाव्यवस्था स्वीकारते त्यामुळेच शिवाजी महाराजांनी दिलेली चौकट स्वीकारूनही संभाजी महाराज गुलामगिरी बंद करणारा नवीन कायदा करतात शैव कुठलाच कायदा अंतिम मानत नाहीत कारण ते जाणतात कि कायदे तात्कालिक व तत्वाकाशीक असतात आणि ते काळ आणि अवकाशानुसार व नवनवीन आकलनानुसार बदलतात मी ह्याच अर्थाने शैव धर्माला नाकारतात असे म्हणतो कारण धर्म म्हणजे अनेकदा अपरिवर्तनीय कायदे असा अर्थ आर्य आणि मुस्लिम करतात असे अपरिवर्तनीय कायदे शैवांना मान्य नाहीत
आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्यालाही ते मान्य न्हवते.उत्तरपेशवाईने असे अपरिवर्तनीय स्मृतिजन्य कायदे आणले व सत्यानाश केला
स्वराज ही महर्षी दयानंद सरस्वतींची संकल्पना सत्यार्थ प्रकाश मध्ये आली असली तरी तिची विस्ताराने मांडणी गांधीजींनी केली आहे स्वतःचे राज्य असा तिचा अर्थ आहे त्यावर गांधीजींच्यावर चर्चा करताना मी चर्चा करेनच
लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा शब्द नेमका कोणत्या अर्थाने वापरला ? माझ्या मते त्यांच्या डोक्यात चार गोष्टी होत्या
१ ब्रिटिश परके आहेत त्यांची राजवट परकीयांची आहे म्हणून त्यांची राजवट नाकारून इथल्या जनतेचे राज्य आणणे
२ त्याची पहिली पायरी म्हणून होम रुल ह्या आयरिश चळवळीच्या व जपानमधील काउंट इटागाकी काउंट ओकुमा ह्यांच्या Jiyū Minken Undō च्या धर्तीवर स्वराज्य चळवळ उभारणे
३ ह्या पहिल्या पायरीची पहिली पायरी म्हणून ब्रिटिश नागरिकांचा दर्जा हिंदुस्तानातील लोकांना मिळवून देणे व त्यासाठी इंडियातील कायदे बदलण्यास ब्रिटिशांना भाग पाडणे त्यासाठी अर्जविनंत्याचे राजकारण कामाचे नाही म्हणून जहाल उपाययोजना अवलंबणे
४ जापनीज लोकांनी ज्याप्रमाणे विज्ञान व तंत्रज्ञानाला स्वीकारले तसे स्वीकारून त्यांचा राष्ट्रीय शिक्षणात समावेश करणे ह्याबरोबरच प्राचीन विद्यांचा चांगला अंशही भारतीय विद्यार्थ्यांना देणे (ना टिळकांनी ना सावरकरांनी विज्ञान व तंत्रज्ञान नाकारलंय हे आपण लक्ष्यात घ्यायला हवं )
ते स्वराज्य चळवळ हा शब्द होम रुल म्हणूनच अनेकदा वापरत होते आधी घर सावकारानं बळकावलंय ते सावकाराकडून सोडवून घेऊ मग त्या आपल्या ताब्यात आलेल्या घरात काय करायचं ते ठरवू असे ते म्हणत
मात्र त्याजागी कोणत्या प्रकारचे राज्य आणायचे ह्याविषयीची स्पष्टता ते पुरवत न्हवते आणि म्हणूनच ते १९१५ पर्यंत पाठीमागून पेशवाई आणण्याच्या शक्यता ध्वनित करत राहिले १९१५ नंतर मात्र ते हळूहळू बदलत चाललेले दिसतात
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १११
बहुराष्ट्रवादाकडून एकराष्ट्रवादाकडे व्हाया द्विराष्ट्रवाद श्रीधर तिळवे नाईक
आपल्याकडे एक समजूत अशी आहे कि १८५७ पासून भारत हे एक राष्ट्र म्हणून विचार करत होते प्रत्यक्षात १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्ध म्हणजे वेगवेगळ्या राज्यांनी स्वतःचे राज्य प्राप्त करण्यासाठी एकाच वेळी केलेले वेगवेगळे उठाव म्हणजे हे युद्ध होते सावरकर म्हणतात त्याप्रमाणे हे कधीही राष्ट्रीय न्हवते एका सलग शत्रूच्या विरोधात क्षत्रियांच्या असंतोषाचा तुकड्यातुकड्यात झालेला हा उठाव होता तो शत्रू कॉमन असल्याने हे युद्ध राष्ट्रीय असल्याचा भास होतो मात्र ह्याचा एक परिणाम असा झाला कि जोवर आपण ब्रिटिशांच्याविरुद्ध एकदिलाने उभे ठाकत नाही तोवर जिंकू शकत नाही असा एक विचार पुढे आला ह्यातून दोन प्रश्न उभे ठाकणे अटळ होते
१ हे असे एकत्र येणे फक्त ब्रिटिशांच्याविरुद्ध कि ब्रिटिश गेल्यानंतरही आपण एक राहणार आहोत ?
२ कि फक्त ब्रिटिशांच्याविरुद्ध एकत्र लढावे नंतर मग
अ भाषेच्या आधारे अनेक राष्ट्रे तयार करावीत
आ हिंदू आणि मुस्लिम वा उत्तर आणि दक्षिण ह्या दोन भिन्न संस्कृती असल्याने दोन राष्ट्रे तयार करावीत
इ सर्व मतभेद विसरून एकच राष्ट्र उभे करावे
राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर भारताचा एक राष्ट्र म्हणून हळूहळू विचार सुरु झाला तरी टिळकांच्या डोक्यात १९०५ पर्यंत पंजाब गुजरात महाराष्ट्र बंगाल ही वेगवेगळी राष्ट्रे म्हणून उदयाला येऊ शकतात असा विचार होता हे स्पष्ट दिसते उदाहरणार्थ ते म्हणतात, "Mr. Chairman and gentlemen, I am unable to impress you with my feeling and sentiment. I express my gratefulness on my own behalf and that of my friends for the splendid reception accorded to us. This receptio~ is given not to me personally but as a representative of the Marathi nation... This honor is due to the Marathi nation for the services and sympathy towards the Bengali race in their present crisis. "
BAL GANGADHAR TILAK PAGE HIS SPEECHES AND WRITING PAGE २१
म्हणजे मराठी नेशन हे वेगळे असा विचार आहे हा विचार नंतरही संपलेला नाही कारण पाकिस्तानात बहुराष्ट्रवाद बोकाळलेला असून त्याच्या आधारेच बांगला देश तयार झाला आहे आणि आत्ता पाकिस्तानात सिंध बलुचिस्तान अशी स्वतंत्र राष्ट्रे मागितली जात आहेत हे लक्ष्यात घेण्यासारखे आहे कि अल्लाह एक म्हणणारे फुटताहेत तर अनेक देव मानणारे अजूनही एकराष्ट्र टिकवून आहेत
भारतातील द्विराष्ट्रवाद हा अकारण गुंतागुंतीचा मुद्दा झाला आहे कारण राजकारण ! काँग्रेसने नेहरूंच्यापासून हिंदुत्ववाद्यांना फाळणीसाठी जबाबदार मानले आहे अलीकडे शशी थरूर ह्यांनीही द्विराष्ट्रवादासाठी सावरकरांना जबाबदार मानले आहे हे विपर्यस्त आहे आणि काँग्रेसची लोकप्रियता घटवण्यात ह्या मूर्ख उद्योगाचा मोठा वाटा आहे कारण खुद्द पाकिस्ताननेच ह्याबाबत खुलासा केला आहे
पाकिस्तानने मुहम्मद बिन कासिमला पहिला पाकिस्तानी म्हंटल आहे पाकिस्तानने अलीकडे सम्राट अकबराला नाकारून त्याच्या दिन ए इलाहींविरुद्ध लढणाऱ्या अहमद सरहिंदीला व वलीउल्लाहला द्विराष्ट्रवादाचे दुसरे प्रवर्तक मानायला सुरवात केली आहे ज्याला आज आपण द्विराष्ट्रवाद म्हणतो त्याचे खरे प्रवर्तक होते सर सय्यद अहमद खान ज्यांनी जानेवारी १८८३ मध्ये मुस्लिम राष्ट्रवादाची मांडणी केली त्यांच्या मते इंडियात हिंदू व मुस्लिम अशी दोन राष्ट्रे नांदत असून एका देहाचे दोन हात असावेत तशी ही दोन राष्ट्रे आहेत त्यांच्यापूर्वी अमीर खुसरोने मांडलेली मार्गी विरुद्ध देशी ह्या संदर्भातील पर्शियन विरुद्ध हिंदवी ही मांडणी त्यांनी नाकारून उर्दू विरुद्ध इतर अशी स्वीकारायला सुरवात केली होती त्यामुळे दोन गोष्टी निश्चित झाल्या
१ मुस्लिमांचे स्वतंत्र राष्ट्र
२ मुस्लिमांची स्वतंत्र भाषा
ह्यातील दुसरे सुरवातीला संशयास्पद होते पुढे उर्दू हे उत्तर मिळाले त्यातून अनेक अनर्थ निर्माण झाले
१८८७ मध्ये खान ह्यांनी
Now suppose that all the English were to leave India—then who would-be rulers of India? Is it possible that under these circumstances two nations, Mohammedan and Hindu, could sit on the same throne and remain equal in power? Most certainly not. One of them must conquer the other and thrust it down. To hope that both could remain equal is to desire the impossible and inconceivable
असे उद्गार काढले आणि दोन राष्ट्रे अटळ आहेत हेच सांगितले काँग्रेसच्या एकराष्ट्रवादाला हा उघड उघड विरोध होता पुढे त्यांच्याच अध्यक्षतेखाली भरलेल्या मुस्लिम लीग परिषदेत जस्टीस अब्दुल रहीम ह्यांनी उघडपणे ह्या दोन संस्कृती असून जगभरच्या मुस्लिम वस्त्यांत जितके मुस्लिमांना कम्फर्टेबल वाटते तितके ते हिंदूंच्या ठिकाणी वाटत नाही कारण हिंदूंची संस्कृती पूर्ण वेगळी आहे असे ठामपणे सांगितले
म्हणजेच हे पाप औरंगजेबवादी सनातन कर्मठ इस्लामत्ववाद्यांचे आहे ते पाकिस्तानात गेल्याने आता कुणावर तरी राग काढला पाहिजे म्हणून मग सावरकरांच्या नावाने बोंब सुरु केली ह्याला जबाबदार कोण तर हिंदुत्ववादीच कारण त्यांनी थेट इस्लामत्ववाद्यांना जबाबदार धरण्याऐवजी गांधी आणि काँग्रेसला जबाबदार धरायला सुरवात केली आणि नंतर गांधींची हत्या केली त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने बोंब ठोकायला सुरवात केली शत्रू कोण हे स्पष्टपणे पाहावे लागते दोघेही इस्लामत्ववाद्यांना घाबरून होते आणि मग एखादा धिप्पाड माणूस दोन पेद्रु माणसांचे जेवण खाऊन गेला कि ते जसे एकमेकाला दोष देत राहतात तसा हा प्रकार आहे
एकराष्ट्रवादाची सुरवात ही काँग्रेसची म्हणजे राष्ट्रीय सभेची देणगी आहे आणि त्याबद्दल आपण काँग्रेसचे आभारी असलो पाहिजे काँग्रेसचा एकराष्ट्रवाद हा हळूहळू तयार होत गेला आहे
आपण मागेच पाहिले कि टिळकांच्या डोक्यात १९०५ पर्यंत पंजाब गुजरात महाराष्ट्र बंगाल ही वेगवेगळी राष्ट्रे म्हणून उदयाला येऊ शकतात असा बहुराष्ट्रवादी विचार होता
प्रश्न असा आहे कि मग संपूर्ण राष्ट्र म्हणून आपणाला स्वतंत्र व्हावे लागेल हा विचार टिळकांच्या डोक्यात कधी फिक्स झाला ? ह्याचे उत्तर आहे बंगालची फाळणी झाली तेव्हा ! टिळक १९०६ साली म्हणतात, " During Vdic times India was a self-contained country. It was united as· a· 'great nation. That limits have disappeared bringing on us great degradation and it. becomes the duty of the leaders to revive that union. A Hindu of this 'place is as much a Hindu as the one from Madras or Bombay. You might put on a different one. dress; speak a· different language, but you should remember that the inner sentiments which 'move you all are the same. The study of the Gita, Ramayana and Mahabharata produces the. same ideas, throughout the country. Are not these common · allegiances to the Vedas, the Gita and the Ramayana-our common heritage? If we lay stress on it forgetting all the minor differences that exist between · different sects, then by the grace of Providence we shall never long be able to consolidate all the different sects into 'a mighty. Hindu nation. This ought.to be the ambition of every Hindu. If you thus work to unite, you will find within a few years one feeling and one thought actuating and dominating all people throughout the country.' This is the work we have to do. The present condition of our religion is not at all desirable ones. We· think ourselves separate and the feeling of that unity which was the root of our advancement in the past is gone. It is certainly unfair: the circumstance that we should have so many sections and sub-sections. It is the duty of an association like the Bharata Dharma Mahamandala to work to restore the lost and forgotten union. In the absence. of unity' India cannot claim its · place among the nations of the world. For some two hundred years India was in the same ~ondition as· it iS to-' day. Buddhism flourished and attacks were made on the Hindu religion by Buddhist~ and Jains. After 6oo years of chaos, rose one great leader, Shankaracharya and he brought together with all the common philosophical elements of our religion and proved and preached them in such a way that Buddhism was swept away from the land. \V e have the grand and eternal promise· Shri Krishna has given in the Gita that when.: ever there is a ·decay of Dharma, He comes. down ~o restore it. When there is a decay owing to disunion, when good men are prosecuted, then Shri Krishna comes down to' save us. There is no religion on the· face of the earth except the Hindu religion wherein we find such hopeful promise that God comes to us as many times as necessary. After Mahomed no prophet is promised, and Jesus Christ comes once forever. No religion holds such a promise full of hope. It is because of this that the Hindu religion is not dead. We are never. without hope. Let heretics say what they may.' A time will come when our religious thoughts and our rights will be vindicated. Each man is doing his best, and as the· association is doing its best, every Hindu is welcome to assist it .and carry it to its goal. If we do not find men coming forward let us hope they will do so in the. next generations We. are never without hope ; no other religion has such a definite and sacred promise as we have of Shri Krishna. It is based on truth and truth, never dies. I say it and I am prepared . to prove this statement. I believe that truth is not touched or saved to one only. The great characteristic of truth is that it is universal and catholic. It is not confined to. any particular race. Hindu religion tolerates all religions.' Our religion says that all religions are based on truth, "you follow yours, I mine.'' Whatever the differences in religion, whatever the differences in languages or whatever other provincial differences and social customs may be, they are not the essentials. They are something like the dress in use. Your turban or dhoti may be different from mine and we may put them on in different ways, it matters not in which ways we use them. The inner man is the same."
BAL GANGADHAR TILAK PAGE HIS SPEECHES AND WRITING VOL ४ page १२ to २१
टिळक इथेही हिंदू नेशन हाच शब्दप्रयोग वापरतायत हे लक्ष्यात घेण्यासारखे आहे टिळकांचा ह्या भाषणातील जो इंनर मॅन आहे तो हिंदू भारतीय आहे त्यांच्या मते मुस्लिम व ख्रिश्चन हे ह्या देशात हिंदूंच्यासारखेच आहेत टिळकांच्यामधल्या एकराष्ट्रवादी बदलाची ही सुरवात आहे
श्रीधर तिळवे नाईक
Mr. Chairman and gentlemen, I am unable to impress you with my feeling and sentiment. I express my gratefulness on my own behalf and that of my friends for the splendid reception accorded to us. This receptio~ is given not to me personally but as a representative of the Marathi nation. This honor is due to the Marathi nation for the services and sympathy towards the Bengali race in their present crisis.
However, it is also a fact that during the Swadeshi Movement in 1905, Tilak recognized the diversity of India and called Bengali, Punjabi, and Gujarati separate nationalities. This was a time when the idea of Hindu nationality and Hindutva was known in Bengal.3
1906. In this lecture, much like the modern ‘Hindus First’ Hindutva protagonists, he virtually argued that converts to Islam and Christianity were just like Hindus. As he put it, notwithstanding the differences in social custom and language, the ‘inner man’ (some may ask—what about women?) was the same. Tilak said: Whatever the differences in religion, whatever the differences in languages or whatever other provincial differences and social customs may be, they are not the essentials. They are something like the dress in use. Your turban or dhoti may be different from mine and we may put them on in different ways, it matters not in which ways we use them. The inner man is the same.2
आगरकरांच्या मते
“The partition grievance,, for the whole of India is at your back. The love of the nation is one's first duty. Next comes religion will be the edifice for the regeneration of India. Do not give up the partition grievance, for the whole of India is at your back. The love of the nation is one's first duty. Next comes religion and next to its government.” Tilak advocacy of religious nationalism was explicit from his statement which he said “I regard India as my motherland and my Goddes, the people of India my kith and kin and loyal and steadfast work for their political and social emancipation my highest religion and duty.”
Nationalism according to Tilak, “is not a visible and concrete entity but is a kind of sentiment an idea and in generating this idea, the historical memories of the great figures of a country play a significant part.” 12
‘the congress agitation based on the so-called the constitutional method is sheer-waste of time.

प्रश्न है आहे कि, पूर्ण सत्य काय ?
व प्रमाण सत्य कोणती
च्या प्रश्नाचे उत्तर
पूर्ण सत्य हे आहे कि ब्राम्हण आणि क्षत्रिय हे आणि इतर सर्व वर्ण काल्पनिक आहेत वेदोक्त आणि पुराणोक्त दोन्ही मंत्र काल्पनिक त्यामुळे हा जो वाद त्याकाळी होता त्याचे आधार काल्पनिक होते पण वाद व भांडण खरे होते बाकी प्रश्न प्रमाणाचा तर टिळक ब्राम्हणांच्या समर्थनार्थ मुद्दे मांडतायत आणि मी ते त्यांचेच तर्कशास्त्र वापरून खोडतोय इथे दोघेही वैदिक धर्मात अधिकार काय त्याविषयी भांडतायत टिळकांना भीती अशी आहे कि एकदा का हा अधिकार शाहू महाराजांना दिला तर मग तो क्षत्रियाचा दावा करणाऱ्या प्रत्येकाला द्यावा लागेल
आणि त्याला त्यांची तयारी नाहीये ह्याचाच अर्थ टिळक ब्राम्हण व शूद्र असे दोनच वर्ण मानतायत जे समजून घेणे अवघड जाते पुराणोक्त मंत्र हे फक्त शुद्रांसाठी असतात हे इथे लक्ष्यात घेणे आवश्यक आहे आज अवस्था अशी आहे कि क्षत्रिय व वैश्य शाहू महाराजांची लढाई विसरून गेले आहेत आणि दोघांच्याही लग्नात ब्राम्हण पुराणोक्त मंत्रच म्हणत आहेत म्हणजेच ब्राम्हणांच्या दृष्टीने हे दोघे शुद्रच मग ते स्वतःला काहीही समजोत
टिळकांचा वेदोक्त प्रकरणातला जो स्टान्स आहे त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात ज्याची टिळकांना जाणीव नाही
सर्वात पहिला प्रश्न असा निर्माण होतो कि खरोखरच ब्राम्हणांचा आर्य क्षत्रिय व आर्य वैश्य नाहीसे झालेत ह्यावर विश्वास आहे का ? ह्या प्रश्नांची चर्चा मी स्वतः काशीतल्या अनेक वैदिक ब्राम्हणांशी केली आहे आणि त्यांचं उत्तर हो असे आहे त्यामुळे टिळकांनी हा जो स्टान्स घेतलाय तो शास्त्रानुसार घेतलाय हे आपण लक्षात घ्यायला हवं
शेवटी ह्या काळात टिळकांचा शास्त्रांचा जेवढा अभ्यास होता तेवढा क्वचितच कुणाचा असेल टिळक जे म्हणतायत त्यात शास्त्र काय सांगते ते मी सांगतो आहे असा स्टान्स आहे पुढे टिळक ह्याउपर कुणाला नव्या जमान्यात काही व्यक्तिस्वातंत्र्याच्या आधारे इंग्रजी कायद्यात बसेल असं काही करायचं असेल तर ते करायला मुखत्यार आहेत असे टिळक सांगतात जर एखादा ब्राम्हण तुमच्यासाठी वेदोक्त मंत्र म्हणत नसेल तर तुम्ही त्याला पौराहित्य देऊ नका किंवा पौराहित्य दिले असेल तर ते काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे असे ते सांगतात मात्र त्या ब्राम्हणाला जो जमीन जुमला दिलाय तो काढून घेऊ नका असे ते म्हणतात हे शाहू महाराजांना उद्देशून आहे हे तर उघडच आहे ह्यावर माझे म्हणणे असे कि जर जमीन जुमला पौराहित्य काम करण्यासाठीच दिला असेल आणि तुम्ही ते करायला तयार नसाल तर राजाला जमीनजुमला काढून घेण्याचा अधिकार आहे शेवटी पैसे व जायदाद कामासाठी मिळते ती जायदाद काही त्या ब्राम्हणाने स्वतः कमावलेली न्हवती ती महाराजांनी दिली होती त्यामुळे इथेही टिळकांचा युक्तिवाद चुकलेला आहे
टिळकांचा सर्वात स्ट्रेंज युक्तिवाद हा ओरिएण्टल विद्वान वेद शिकले त्या संदर्भात आहे टिळकांचे म्हणणे असे कि युरोपियन लोकांना ब्राम्हणांनी वेद शिकवलेत पण आम्ही त्यांच्यावर वेदोक्त संस्कार केलेले नाहीत त्यामुळे वेदोक्त संस्काराचा मुद्दा युरोपियन लोकांच्याबाबत लागू होत नाही म्हणजे ओरियंटल्स वेद शिकले ते मान्य पण केवळ वेद शिकल्याने आणि त्यांचे पाठांतर केल्याने कोणी ब्राम्हण होऊ शकत नाही म्हणजेच विद्येला काडीचेही महत्व नाही महत्व आहे ते वेदोक्त संस्कार व्हायला हे संस्कार झाले तर तो ब्राम्हण आणि वेदोक्त संस्कार करायचे कि नाही हे ठरवणार कोण तर ब्राम्हणच ! थोडक्यात सगळीकडून आमचीच लाल ! एखादी जात किती कट्टर होऊ शकते त्याचा हा अजिबोगरीब नमुना आहे आता ह्यानंतर ब्राम्हण ब्राम्हणेतर चळवळ पेटेल नाहीतर काय ?

ह्यापुढचा माझा प्रश्न असा कि जे वेद युरोपियन लोकांना शिकवले तर चालतात ते शूद्रांना शिकवण्यात प्रॉब्लेम काय आहे तिथे मग भेदाभेद कुठून येतो ? म्हणजे परका चालतो पण शूद्र चालत नाही आणि हा गृहस्थ स्वराज्याच्या गप्पा मारतोय स्वराज्य म्हणजे काय मग ब्राम्हणांची ब्राम्हणशाही आणि दादागिरी ? हे कोण खपवून घेईल ? आता ह्या पार्श्वभूमीवर ब्राम्हण ब्राम्हणेतर वाद पेटेल नाहीतर काय होईल कारण ब्राम्हणवादाच्या मते धर्मशास्त्रानुसार सारे क्षत्रिय वैश्य शुद्रच ! आता समजा सगळे वेदच कचऱ्यात टाकले तर !
आणि तुम्ही तुमची वैदिक पाठशाळा उबवत बसा असे सांगितले तर !
ब्राम्हणांना अनेकदा आपण समोरच्या माणसाला स्वतःच्या इकवल समजत नाही त्यामुळे समोरच्याला आपण अपमानित करत आहोत हेच कळत नाही ह्याची मग रियॅक्शन येणारच तुम्ही श्रेष्ठ मानले म्हणजे तुम्ही श्रेष्ठ होत नाही समोरच्यानेही मानले पाहिजे ना ? ब्राम्हणांची भट भटुरडे अशी जी कुत्सित अवहेलना सुरु झाली त्याला कारण ब्राम्हणांचा हा अहंगंड आहे
आमचाच वर्ण श्रेष्ठ म्हणणारे ब्राम्हण आणि आमचाच धर्म व प्रेषित सर्वश्रेष्ठ म्हणणारे मुस्लिम ह्या दोघांच्या मानसिकतेत काह्ही फरक नाही आणि हे दोघे एकमेकांशी भांडतायत
श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १०६ वेदोक्त प्रकरण का घडले ? ब्राह्मणधर्म म्हणजे केवळ ब्राम्हणांची झुंड उरला आहे का श्रीधर तिळवे नाईक
वेदोक्त प्रकरण हे महाराष्ट्राच्या इतिहासात फार महत्वाचे आहे कारण महात्मा फुलेंची जी ब्राम्हण विरुद्ध ब्राम्हणेतर अशी मांडणी आहे त्याचा हे प्रकरण म्हणजे पुरावा झाले आणि पुढे कित्येक वर्षे ब्राम्हणेतर काँग्रेसपासून फटकून राहिले १८९४ -५ च्या गणेशोत्सवात तांबोळ्यापासून चांभारापर्यंत सर्वच सामील झाले होते आणि टिळकांनी त्यासंदर्भातल्या भाषणात त्यांचं कौतुक केलं होतं ह्या गणेश उत्सवात चांभारांच्याबाबत अस्पृश्यता पाळली गेली न्हवती कारण टिळक अस्पृश्यतेला शास्त्रानुसार मान्यता नसल्याने मान्यता देत न्हवते आज हा विरोधाभास विचित्र वाटतो चांभार सुरवातीपासूनच काँग्रेसला पाठिंबा देत होते आणि त्याला कारण टिळक होते हे आपण लक्ष्यात घेतले पाहिजे पुढे गांधीजींनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींना बसवून अस्पृश्यतेला हिंदू धर्मशास्त्र पाठिंबा देते का ह्याची चिकित्सा करायला सांगून असा शास्त्राचा पाठिंबा नाही असं तर्कतीर्थांनी सांगितल्यावर अस्पृश्यता हिंदू धर्माचा भाग नाही असा स्टान्स घेतला होता टिळक स्वतःच हिंदू धर्मशास्त्र जाणत होते त्यामुळे १८९३ पासूनच त्यांनी अस्पृश्यता शास्त्रात बसत नाही असे सांगायला सुरवात केली होती आणि त्यामुळे चांभारांना गणेशउत्सवात खुला प्रवेश होता ह्याउलट वेदोक्त वादात शास्त्र ब्राम्हणेतरांच्याविरुद्ध असल्याने टिळक ब्राम्हणेतरांनी पुराणोक्त मंत्र म्हणावेत असा स्टान्स घेत होते वेदोक्त मंत्र म्हंटले काय किंवा पुराणोक्त मंत्र काय प्रत्यक्षात काय फरक पडतो असा त्यांचा प्रश्न होता आणि माझेही म्हणणे हेच कि जर फरक पडत नसेल तर वेदोक्त मंत्र म्हणायला हरकत काय आहे ?
एकदा का टिळकांचा स्टान्स स्वीकारला कि त्यातून अनेक विचित्र प्रश्न निर्माण होतात ह्या स्टान्सनुसार ब्राम्हणांखेरीज
१ मूळ आर्य क्षत्रिय आर्य वैश्य नाहीसे होतात मग फक्त एकच वर्ण उरतो तो म्हणजे शूद्र म्हणजेच ज्या लोकांनी वैदिक धर्म वा हिंदू धर्म स्वीकारला आहे ते जर ब्राम्हण नसतील तर ते शूद्र असतील आणि होतात ह्याचा एक गमतीशीर परिणाम असा होतो कि जे मूळचे ब्राम्हण आहेत आणि जे क्षात्र वा वैश्य कर्म करतायत ते स्वतःचे कर्म वैश्य असले तरी स्वतःला ब्राम्हणच म्हणवून घेतात उदा माहेश्वरी किंवा शेणवी ब्राम्हण व्यापारी झाले तरी स्वतःचा वर्ण ब्राम्हणच सांगतात आणि कर्माचा संबंध तुटतो आणि वर्णव्यवस्था जन्माधिष्टितच राहते कर्माधिष्ठित राहण्याचे तिचे चान्सेस कमी होतात माहेश्वरी किंवा शेणवी ह्या दोघांनाही आपण वैश्य म्हणून स्वतःला डिक्लेअर केले तर आपले वैदिक संस्काराचे हक्क जातील असे भय आहे आणि त्यात तथ्य आहे कारण ज्यांनी असं डिक्लेअर केलंय त्यांचे वैदिक संस्काराचे हक्क गेलेले आहेत गोव्यात ज्यांनी वैदिक धर्म स्वीकारलाय ते सर्व शेणवी ब्राम्हण स्वतःला आता सारस्वत म्हणवून घेतायत तर जे आपल्या मूळ शैव धर्माला चिटकून आहेत ते स्वतःला शैव ब्राम्हण किंवा शेणवी ब्राम्हण किंवा शैव शेणवी ब्राम्हण म्हणवून घेतायत ह्यातल्या ज्यांनी ब्राम्हणत्व काढून टाकून वैश्य कर्म स्वीकारले त्यांचे वैदिक हक्क काढून घेऊन त्यांना वैश्य हा वर्ण देण्यात आलाय
२ ह्यापुढचा प्रश्न शूद्रांचा आहे हे सर्व शूद्र अनार्य म्हणजे स्थानिक आहेत आणि त्यांच्यासाठीच चौथा वर्ण निर्माण करण्यात आलाय हा वर्ण शैव आहे आणि तरीही त्याने हिंदू धर्म स्वीकारल्याने तो शूद्र आहे आणि त्यांचा स्वीकार करण्याची ब्राम्हणांची तयारीच नाही ह्यातूनच मग एक तडजोड निर्माण झाली त्या तडजोडीचे नाव वैष्णव धर्म आणि पुढे हिंदू धर्म आणि आता हिंदुत्व
म्हणजे काय तर
१ मोक्षाचा अधिकार शुद्रांनाही द्यायचा अध्यात्मिक समता स्वीकारायची आणि वासुदेव पंथ स्वीकारायचा २ त्याचे वैष्णवीकरण घडवायचे स्वतःकडे वेदोक्त मंत्र व वेद ठेवून घ्यायचे पुराणे खुली करायची ३ वैष्णव आगम स्थापन करायचा तो खुला करायचा ४ आणि ह्यातील कर्तृत्ववान लोकांना क्षत्रिय व वैश्य कर्म करायची अनुमती द्यायची मात्र पौराहित्य कामाचा अधिकार आपल्याकडेच ठेवायचा
शिवाजी महाराजांना जो राज्याभिषेक झालाय तो ह्या हिंदुत्ववादी धोरणांतर्गत झाला आहे सर्व वैष्णव संतांना ह्या धोरणांतर्गत मान्यता मिळाली आहे
शिवाजी महाराजांच्याप्रमाणे समजा सयाजीराव गायकवाडांनी वा शाहू महाराजांनी राज्याभिषेक केला असता तर टिळकांनी त्याला मान्यता दिली असती का तर हो दिली असती पण विधी मंत्र पुराणोक्तच म्हंटले असते मोदी ओबीसी असले तरी राजे होऊ शकतात तेही ह्याच हिंदुत्ववादी धोरणामुळे !
थोडक्यात काय हिंदुत्व पौराहित्य सोडले तर इतर सर्व अधिकार कुणालाही द्यायला तयार आहे अलीकडे पौराहित्य खुले होते आहे कारण खुद्द ब्राम्हणांनाच पौराहित्यात इंटरेस्ट उरलेला नाही मात्र शंकराचार्यांची पोस्ट अजूनही ब्राह्मणांसाठी राखीव आहे
थोडक्यात काय शास्त्रानुसार जी कर्मे ब्राम्हणांची न्हवतीच ती कुणालाही द्यायची हिंदुत्ववाद्यांची तयारी आहे कारण त्यांच्या मते ना आर्य क्षत्रिय उरलेत ना आर्य वैश्य
ह्यातून एक प्रश्न उरतोच जे कर्तृत्ववान नाहीत त्यांचं काय तर त्यांनी शुद्रच राहावे टिळकांच्या मते शिवाजी महाराज कर्तृत्ववान होते म्हणून त्यांनी स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेतले तर ते योग्यच आहे पण इंग्रजांची गुलामगिरी करणारे कसले क्षत्रिय ?
थोडक्यात काय कर्तृत्वाचा मुद्दा ब्राम्हणांना लागू नाही पण ब्राम्हणेतरांना लागू आहे
ह्या सगळ्याचा अर्थ काय तर वेदोक्त प्रकरण घडले त्याचे मुख्य कारण हिंदू धर्मशास्त्र होते हे धर्मशास्त्र बदलण्याची वेदोक्त ही संधी होती टिळकांनी ही संधी साधली नाही उलट ते कालबाह्य झालेल्या हिंदू धर्मशास्त्राचा कवटाळून बसले आणि त्यामुळेच त्यांच्याप्रमाणे कट्टर असलेल्या ब्राम्हणांच्यामुळे वेदोक्त प्रकरण घडले
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १०७
वेदोक्त प्रकरण का घडले ? भाग दुसरा
मागील भागात आपण वेदोक्त प्रकरणाची कारणमीमांसा केली आता आणखी काही कारणे पाहू
वेदोक्तमधली टिळकांची जी भूमिका आहे तिचा परिणाम काय होतो ?
तर ब्राम्हणांच्या हातात अमर्याद सत्ता येते आणि शुद्रांशी कसेही वागायला ते मोकळे होतात नवव्या शतकानंतर हेच झाले समुद्रपर्यटन बंदी करता आली आणि वैश्य सम्पवता आले तर परशुरामाने आर्य क्षत्रिय सम्पवल्याने क्षत्रिय न उरल्याने आपणच आपदधर्मानुसार राजे का बनू नये हा विचार ब्राम्हणांच्या मनात घोळायला लागला त्यानुसार सिंध मध्ये वैदिक राजवट आली केरळात आली आणि मुस्लिमांना मोकळे रान मिळाले कारण रणांगणात क्षत्रिय न्हवतेच सर्व गावांची सत्ता ब्राम्हणांच्या हातात आली आणि गावगाडा ब्राम्हण चालवू लागले
पुढेही जेव्हा मराठा साम्राज्य झाले तेव्हा ते कसं ताब्यात घेता येईल हाच विचार होता आणि बाजीरावच्या मस्तानी प्रकरणाने ही संधी दिली
संपूर्ण मुस्लिम काळात आर्य क्षत्रिय नसल्याने मुस्लिमांचा क्षत्रिय म्हणून स्वीकार करून ब्राम्हण लोकांनी आपले वर्चस्व कायम राखले मुस्लिम राजांनीही ब्राम्हणांना न दुखावण्याचे धोरण स्वीकारले जिथे जिथे बौद्ध जैन आणि शैव मंदिरे होती ती लुटली गेली त्यांच्यातल्या मुर्त्या फोडल्या गेल्या व ती ब्राम्हणांना दिली गेली व त्यांचे वैष्णवीकरण केले गेले राजपूत वैष्णव बनवले गेले मराठे वैष्णव बनवले गेले शैवांची धार्मिक राजधानी असलेली काशी वैष्णव बनवण्याचे जोरदार प्रयत्न केले गेले ह्या काशीनाथाच्या काशीविश्वेश्वरच्या मंदिराचा मुख्य अग्रपूजेचा मानकरी वैदिक बनवला गेला आणि पुढे त्याचा वंशज गागाभट जो वैदिक होता आणि शैवही होता राज्याभिषेकासाठी बोलावला गेला
ब्राम्हणांच्या झुंडी भारतभर सनातन धर्माची हाकाटी पेटवत प्रत्येक राज्याच्या राजधानीत फिरू लागल्या काही ब्राम्हणांनी ह्याही पुढे जाऊन वैदिक धर्माचा त्याग करून इस्लाम स्वीकारला
सतत ब्राम्हण महत्व वाढवत न्हेणे वैदिक मंत्रात असाधारण ताकद आहे असा प्रचार करून ती ताकद आपल्याकडे आहे असे भासवणे आणि झुंड म्हणून संघटित राहणे ही ब्राम्हणी पॉलिसी बनली
सर्व प्रवासी भारतात ब्राम्हणधर्म व बौद्धधर्म असल्याचे सांगतात कारण ह्या देशात एकेकाळी ब्राम्हण ब्राह्मणधर्मात होते व क्षत्रिय बौद्ध व वैश्य जैन धर्मात थोडक्यात आर्य तीन धर्मात वाटले गेले आणि अनार्य शैव होतेच म्हणजे चातुर्वर्ण चार धर्मात विभागले गेले अर्थात काही अपवाद वगळून
ब्राम्हण ब्राम्हणधर्म
क्षत्रिय बौद्ध वा वैष्णव
वैश्य जैन पुन्हा हिंदू बनलेल्या वैश्यांनी आपल्या मूळ धर्मातील म्हणजे जैन धर्मातील लक्ष्मी ही देवता मात्र सोडली नाही उलट तिला मुख्य देवता म्हणून स्वीकारली आणि तिला विष्णूची पत्नी बनवली
शूद्र शैव
हे एकदा लक्ष्यात आल्यावर परदेशी प्रवाश्यांच्या प्रवासवर्णनात ब्राम्हणांच्या धर्माला ब्राम्हणधर्म असे वर्णवाचक नाव का रूढ होत गेले ते सहज लक्ष्यात येईल काही शृंगासारखे ब्राम्हण क्षत्रिय झाले तरी ते स्वतःला ब्राम्हणच म्हणत राहिले थोडक्यात काय जसे पारशी नष्ट होत अल्पसंख्यांक उरले तसे ब्राम्हणही पण ब्राम्हण जसे आभासात्मक ताकद निर्माण करण्यात यशस्वी झाले तसे पारशी झाले नाहीत
पुढे शंकराचार्यांचा वापर करून सगळे शैव ब्राम्हण वैदिक बनवण्यात यश आले आणि फासा पालटला शैव शासकांना व व्यापाऱ्यांना शूद्र बनवण्यात यश आले आणि हिंदू धर्म तयार करण्यात आला मात्र वेदोक्त आपल्याकडे ठेऊन ह्यांना पुराणोक्त अशी विभागणी करण्यात आली हा एक वंशवादी निर्णय होता आणि तो राबवण्यात आला आणि त्यातूनच हे वेदोक्त प्रकरण घडले
ह्या प्रकरणाने टिळकांची ब्राम्हणवादी मानसिकता पूर्णपणे उघडी पडली आणि ब्राम्हण ब्राम्हणेतर दुफळी पडली ती पडलीच
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १०८वेदोक्त प्रकरण ५ हिंदू धर्मात वर्ण किती ?
वेदोक्त प्रकरणाने निर्माण होणाऱ्या एका महत्वाच्या प्रश्नाकडे सर्वच विचारवंतांनी दुर्लक्ष्य केलंय हा प्रश्न म्हणजे देवसुर आर्य धर्मात नेमके वर्ण तरी किती आहेत ?
प्रथम वैदिक धर्म निर्माण झाला तेव्हा ह्या धर्मात फक्त तीनच वर्ण होते ब्राम्हण, क्षत्रिय आणि विश आणि हे तिन्ही वर्ण समान तर होतेच पण ते कर्माप्रमाणे होते त्यामुळे वेदात तीनही वर्णांच्या लोकांनी रचलेली सूक्ते आहेत
मग ब्राम्हणांना स्वार्थ चावला आणि ह्याचवेळी त्यांचा संपर्क अनार्यांशी आला आणि ह्यातून फार विचित्र प्रश्न निर्माण झाले जगात ह्या काळात शैव सोडले तर सर्वच धर्मात दासप्रथेला मान्यता होती आर्यांच्यात इसवीसनपूर्व १००० च्या आसपास पराक्रमाचा संचार झाला आणि ज्या ज्या टोळ्या जिंकल्या गेल्या त्यांना सामावून कसं घ्यायचं हा प्रश्न निर्माण झाला ब्राम्हणांनी हा प्रश्न अत्यंत वाईट तऱ्हेने सोडवला ह्यामागे आपल्या धर्माची शुद्धता व पवित्रता व सोवळेओवळे नष्ट होईल अशी भीती होती आणि आपल्या धर्माचे अधिकार आपल्याकडेच रहावेत शुद्र दासांच्याकडे ते जाऊ नयेत अशी लालसाही ! आर्य क्षत्रियांनाही आपली राज्ये वंशाधिकाराने चालवायची होती दोघांचेही हितसंबंध सारखे असल्याने दोघांनी मिळून स्वतःचे दोन वर्ण हे सर्वोच्च आणि जन्माधिष्टित केले साहजिकच तिसरा विश म्हणून व चौथा शूद्र हेही जन्मजात झाले विश हे आर्य असले तरी त्यांचे शुद्रांशी विवाह होऊ लागले आणि त्याला ब्राम्हण क्षत्रियांची हरकत न्हवती इतकेच कशाला ब्राम्हण क्षत्रिय विवाह कॉमन होते ब्राम्हण क्षत्रियांची संतती हीही पितृसत्ताक पद्धतीने ठरत होती त्यामुळे आर्य ब्राम्हण क्षत्रिय पुरुष व विश शूद्र स्त्री ह्यांचा विवाह झाल्यास ती संतती ब्राम्हण व क्षत्रियच मानली जाई (पराशर मत्स्यगंधा किंवा बुद्धाचे मातापिता ह्यांच्यातील विवाह ) पुढे मनूने हेही हक्क नाकारले व अशा संबंधातल्या संततीला चांडाळात ढकलले मनूने एका अर्थाने ब्राह्मणधर्माची स्थापना केली मनू हा ब्राम्हण होता कि क्षत्रिय हा वाद अजून संपलेला नाही मात्र ह्या दोघांचेही हितसंबंध त्याने सांभाळले ह्याविरुद्ध पहिले बंड केले ते कपिलने सांख्य दर्शन सांगून ! ह्या दर्शनातूनच पुढे आत्ताचा जैन धर्म व बुद्धाचा बुद्ध धर्म जन्मले हे तिघेही राजपुत्र होते आणि त्यांना ब्राह्मणधर्म अमान्य होता सुरवातीच्या काळात हे विजयी होत गेले
गुप्त व वर्धन साम्राज्य कोसळल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली ती पुन्हा भरून काढण्यासाठी व्यासांनी वैष्णव धर्म स्थापन केला हा आधीच्याच वासुदेव पंथाचा नवा अवतार होता त्याचे नाव वैष्णव धर्म ! व्यास ब्राम्हण होते आणि बहुदा यादवांचे राजगुरू ! महाभारतातले व्यास वेगळे होते ह्या ब्राम्हण व्यासाने चातुर्वर्ण्याची पुन्हा स्थापना केली आणि वर्ण जन्माधिष्टित केले
म्हणजे
१ वैदिक त्रैवर्णिय कर्माधिष्टीत २ ब्राह्मणधर्म चारवर्णीय जन्माधिष्ठित ३ वैष्णव चारवर्णीय जन्माधिष्ठित
अशी ही वर्णव्यवस्था आहे ह्यातील वैदिक धर्माचे पुनर्जीवन स्वामी दयानंद सरस्वती ह्यांनी करून जन्माधिष्ठित चातुर्वर्ण्यविरुद्ध बंड केले आणि कर्माधिष्ठित चातुर्वर्ण्याची स्थापना केली हा नववैदिकवाद होता आणि हे बंड पंजाबमध्ये जसे पसरले तसे महाराष्ट्रात पसरले नाही शाहू महाराज आर्य समाजी होते आणि ते आर्य समाज पसरवू शकले असते पण ह्याचवेळी नेमके वेदोक्त प्रकरण घडले आणि महाराज सत्यशोधक समाजाकडे ओढले गेले त्यांनी आयुष्यभर ह्या दोन समाजात समतोल साधण्याचा प्रयत्न केला आर्य समाजाचा जातीपातीवर विश्वास न्हवता तो फक्त वर्ण मानी आणि तेही कर्माधिष्ठित ! त्यामुळे महाराजांचाही जातीवर विश्वास न्हवता कर्माधिष्ठित वर्ण मानत असल्याने होळकर घराणे हे त्यांच्या दृष्टीने क्षत्रिय होते त्यामुळे त्यांनी आपली एक मुलगी ह्या घराण्यात दिली. सत्यशोधक समाजाचे टोक त्यांनी नाकारले म्हणूनच काही वर्षांनी त्यांचे टिळकांच्याबरोबरचे संबंध पुन्हा सुधारले
जे लोक स्वतःला वैदिक धर्मीय म्हणवतात त्यांनी कृपया हे लक्ष्यात घ्यावे कि वैदिक धर्म त्रैवर्णिय कर्माधिष्टीत आहे तो कर्मानुसार वर्ण मानतो जन्मानुसार न्हवे वैदिक धर्मानुसार मोदी क्षत्रिय आहेत आणि त्यामुळेच अनेक वैदिक ब्राम्हण हे मोदींच्या समर्थनासाठी उतरत असतात आणि पुरोगामी लोकांना त्यांचे आश्चर्य वाटत असते हिंदुत्ववाद्यांच्यात वैदिक ब्राम्हणांची संख्या वाढत चाललेली आहे एके काळी हिंदुत्ववादावर ब्राम्हण धर्माचा जबरदस्त पगडा होता तो आता ओसरत चाललेला आहे हे बदललेले वास्तव अनेकांना कळत नाही माझा अंदाज चुकला नाही तर येत्या पन्नास वर्षात शंकराचार्यपदी एखादा ब्राम्हणेतर आणला जाईल
वैष्णव धर्माच्या स्वीकार केल्यानंतर भारताचे अधःपतन सुरु झाले अनेक ठिकाणी भारताबाहेरचे लोक शासक बनले ह्याची सुरवात शक आणि राजपूत लोकांनी केली हे लोक शैव बनले व विजयी होत राहिले .
ह्यानंतर शंकराचार्य आले आणि त्यांनी हिंदू वेदांत धर्म स्थापन केला पण वैष्णवांनी त्यांनाही आत्मसात केले आणि त्यांचे वैष्णवीकरण करून हिंदू धर्म निर्माण करून पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला पुढे मुस्लिमांचे आक्रमण सुरु झाले आणि त्यांनी वैष्णवांना सर्वत्र पराभूत केले आणि वैष्णव हा फक्त व्रतवैकल्यांचा व मोक्ष मिळवण्याचा धर्म बनला ह्याच काळात राजपुतांनी वैष्णव धर्म स्वीकारला आणि स्वतःच्या पराभवाची गाथा रचायला सुरवात केली आणि इथेच यादवांच्या काळात महाराष्ट्रात हेमाद्री नावाच्या ब्राम्हणाने द्विवर्णाचा सिद्धांत मांडला आणि हिंदू धर्मात वर्ण किती ह्या प्रश्नाचे ऑफिशियल उत्तर दिले : दोन वर्ण ब्राम्हण व शूद्र आपण हे लक्ष्यात घेणे आवश्यक आहे कि हा सिद्धांत केरळी ब्राम्हणांनी मांडला व मराठी लोकांनी पसरवला आहे गोव्यात तो सारस्वत ब्राम्हणांनी पसरवला १३०० पासून १९०० पर्यंत हिंदू धर्मात दोनच वर्ण होते आणि शाहू महाराजांनी त्याला वेदोक्त प्रकरणात शह दिला ह्या द्विवर्णीय हिंदू धर्मामुळेच शिवाजी महाराजांना क्षत्रिय म्हणून मान्यता मिळाली नाही आणि तुकारामही सुरवातीच्या काळात स्वतःची याति माझी शूद्र असे म्हणत राहिले ह्या दोघांनीही पुढे ही व्यवस्था नाकारली पण मराठी समाजात पेशवाईच्या काळात पुन्हा ह्या सिद्धांताचे आगमन झाले
पुढे जेव्हा १८६० नंतर ब्रिटिशांनी हिंदू धर्माचा कोर्टात शपथ घेण्याचा ग्रंथ म्हणून गीता स्वीकारली तेव्हा हिंदू पुन्हा वैष्णव हिंदू झाले आणि गीतेतल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे पुनरागमन झाले इंग्रज व्यापारीही होते आणि शासकही त्यामुळे झक मारत वैश्य आणि क्षत्रिय वर्णांना वर्णाचा दर्जा देणे क्रमप्राप्त होते शिवाय औद्योगिक क्रांतीनंतर जगभरच व्यापारी वैश्य वर्ण केंद्रस्थानी आला होता आणि पुरोहित ब्राम्हण तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते विवेकानंदांच्या भाषेत सांगायचे तर आत्ताचे युग हे वैश्यांचे आहे साहजिकच द्विवर्णाकडे झुकलेला हिंदू धर्म आता पुन्हा चातुर्वर्णीय झाला होता आणि जणू काय तो पूर्वीसुद्धा चातुर्वर्णीय होता अशा थाटात इतिहास आणि समाजशास्त्रही लिहिले गेले जे स्पष्टपणे चुकीचे होते
वेदोक्त प्रकरणाच्या निमित्ताने ब्राम्हणांनी टिळकांच्या नेतृत्वाखाली ह्या बदलाला कट्टर विरोध केला पण शाहू महाराजांनी ह्या संपूर्ण प्रकरणात योग्य ते डावपेच आखत टिळकांना आणि ह्या कट्टर द्विवर्णीय ब्राम्हणांना पूर्णपणे पराभूत केले
टिळकांची भूमिका शेवटी जे स्वराज्याच्या लढ्यात शांततेने व स्वार्थत्यागाने लढतील ते ब्राम्हण अशी जी बदलली त्यामागे त्यांच्या अंतःकरणातला हा सहृदय ब्राम्हण होता हे लक्ष्यात घेतले पाहिजे एकनाथांनीही आयुष्याच्या शेवटी जो वारकरी तो ब्राम्हण अशी व्याख्या केली होती टिळकांचेही शेवटी एकनाथ झाले आणि पुढे गांधीजी तुकाराम झाले
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १०९वेद महाभारताकडून स्वराज्यलढा व भारताकडे
टिळकांच्या ह्या काळात ज्या काही गोष्टी झाल्या त्यात ताईबाई प्रकरण हे फार महत्वाचे प्रकरण होय (१९०१ ते १९०४ )केळकरांनी ह्या प्रकरणाविषयी जे लिहिलं आहे त्यापेक्षा फार वेगळं काही सांगण्यासारखे माझ्याकडे नाही ह्या प्रकरणात टिळकांच्यातला वचननिष्ठ ,सहृदय अंतःकरणाचा उदात्त माणूस दिसतो व्यक्ती म्हणून जबरदस्त असणारे टिळक धार्मिक आणि सामाजिक सुधारणेबाबत इतके कसे मागासलेले हा प्रश्न कायमच सतावत राहतो ताईबाई खटल्यात केवळ दिलेल्या वचनाखातीर टिळकांनी आयुष्याची चार वर्षे घालवली ह्या खटल्यात टिळकांना पदरचे साठ हजार रुपये खर्च आला जेव्हा महाराजांनी हा खर्च परत करायची इच्छा प्रकट केली तेव्हा टिळकांनी तुम्ही माझे तिसरे पुत्र आहात आणि पिता पुत्राकडून पैसे घेत नाही असे सांगितले . महाराजांनी मग पितृऋणाचा मुद्दा मांडला आणि खूपच आग्रह धरला तेव्हा टिळकांनी पूना कॉलेजसाठी जमीन मागितली ती महाराजांनी आनंदाने दिली मार्केटला तिची किंमत ३०००० होती महाराजांनी उरलेले ३०००० देतो म्हणून सांगितले तर ते घ्यायला टिळकांनी सपशेल नकार दिला आजच्या काळात ह्या पैश्याची किंमत ३० लाख सहज होईल टिळकांनी ही रक्कम पुत्र मानलाय म्हणून सोडली ह्याउलट सावरकरांनी कधी व्यवहार सोडलेला दिसत नाही टिळक सहृदय होते सावरकर कठोर ! तरीही टिळकांनी कधी कविता लिहिल्या नाहीत सावरकरांनी लिहिल्या . रोमँटिक कवींची अमानुषता हा तसा संशोधनाचा विश्वास आहे असो
टिळकांचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या कार्यकर्त्याच्या मागे भक्कम उभे रहात यवतमाळच्या एका साप्ताहिकाच्या कार्यक्रमात जेव्हा त्यांचा एक कार्यकर्ता ऑफिसमधले दारिद्र्य लपवू लागला तेव्हा टिळक त्याला म्हणाले," माणसाला आपल्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे दारिद्र्याची न्हवे " टिळक आपल्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या प्रत्येक विचारवंताला चरणस्पर्श करत आपल्या सासऱ्यांनाही ते आवर्जून भेटत ह्या काळात त्यांनी आपल्या दोन मुलींची लग्ने करून दिली
टिळकांच्या लोकप्रियतेमागे त्यांच्या ह्या स्वभावाचा फार मोठा वाटा आहे हा माणूस आपला आहे ही भावना प्रत्येकात ते निर्माण करत कारण व्यक्तींची त्यांना जेन्युईन कदर होती माणसांचे चांगलेपण आणि वाइटपण ते सहज स्वीकारीत त्यामुळेच एखादा अतिवाईट असेल तर नेमकी कुठे कळ दाबून त्याला नीट करता येईल हे त्यांना कळे व अनेकदा ते यशस्वी होत यदाकदाचित न सुधारणाऱ्यातली केस असेल तर मग ते समोर ठाकला तर दोन हात करण्याची त्यांची तयारी असे सशस्त्र क्रांतिकारकांचा टिळकांचा प्रचंड विश्वास होता त्याचेही कारण टिळकांचा हा स्वभाव होता एखादी गोष्ट सिक्रेट ठेवण्यात ते वाक्बगार होते आणि त्यामुळेच त्यांच्यात आणि ह्या क्रांतिकारकांच्यात नेमकी काय बोलणी झाली हे आजही गुलदस्त्यात आहे
टिळकांना स्पेन्सर पसंत होता पण नित्शेचा सुपरमॅन कधीच मान्य न्हवता त्यांनी त्याचा उल्लेख पूर्णावस्थेत पोहचलेले जनावर असा केला आहे १ टिळकांच्या मृत्यूनंतर उदयाला आलेल्या हिटलरला हे वर्णन चपखल लागू पडते तत्कालीन भारतात अनेक लोक हे जनावरासारखे जगत त्यांना त्यांनी कधीच हेटाळणीने पाहीले नाही टिळक म्हणत ,"हे लोक पशु आहेत म्हणून त्यांचा तिरस्कार करण्यात पुरुषार्थ नाही त्यांचा गळा व आमचा गळा एका मोटेने बांधला आहे अखेरीस आपणास कोणी तारतील वा मारतील तर हेच लोक तारतील वा मारतील " त्यावेळी टिळकांना ही कल्पनाही आली नसेल कि जो हिंदुत्ववाद आपण मांडतोय त्याच्यातच अशा जनावरांची समस्या निर्माण होणार आहे
टिळकांना हे कळत नाही कि भारतीय धर्मवर्णजातिव्यवस्था हीच ह्या माणसांना जनावर बनवण्याचे मुख्य कारण आहे त्यांची एक गैरसमजूत अशी कि वर्णव्यवस्थेतील सर्वच ब्राम्हण क्षत्रिय हे खूप दयाळू व उदार अंतःकरणाचे असतील ह्याउलट फुले ब्राम्हणांना वेगळ्या नजरेने पहात ब्राम्हणेतर पक्षातील काही जहाल व कट्टर लोक साप आणि ब्राम्हण ह्यांच्यात सापाला सोडावे म्हणत वस्तुस्थिती अशी होती दोन्ही प्रकारची माणसे ब्राम्हणांच्यात होती खुद्द टिळकच सहृदय होते त्यामुळेच तर संमती कायद्याला नकार देणारे टिळक स्वतःच्या मुलींची लग्ने मात्र संमती वय पार झाल्यावरच करत होते तर ह्या कायद्याचे कट्टर समर्थक असलेले xxx स्वतःच लहान मुलीशी लग्न करत होते लोकांना ह्या गोष्टी दिसत होत्या
टिळक एका अर्थाने ब्राम्हणांना मिशनरी बना म्हणून सांगत होते आणि त्याचा प्रभाव प्रबोधनकार ठाकरे ह्यांच्यावर खूप पडला आणि त्यांनी हिंदू मिशनरी संघ स्थापन केला टिळकांच्यावर साल्वेनिस्ट मिशनऱ्यांच्या जबरदस्त प्रभाव पडला होता हिंदूंच्यातील रामदासी लोक असे होते असा त्यांचा समज होता म्हणून ते रामदासी वा साल्वेनिस्ट व्हा म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमागे सुरवातीला हीच भूमिका होती गोडसे व गुरुजींनी संघ बदलला
टिळकांची भूमिका शेवटी जे स्वराज्याच्या लढ्यात शांततेने व स्वार्थत्यागाने लढतील ते ब्राम्हण अशी जी बदलली त्यामागे त्यांच्या अंतःकरणातला हा सहृदय ब्राम्हण होता हे लक्ष्यात घेतले पाहिजे एकनाथांनीही आयुष्याच्या शेवटी जो वारकरी तो ब्राम्हण अशी व्याख्या केली होती टिळकांचेही शेवटी एकनाथ झाले आणि पुढे गांधीजी तुकाराम झाले
श्रीधर तिळवे नाईक
१ संदर्भ आचार्य जावडेकर आधुनिक भारतात पान २२५
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ११०टिळक बुद्ध आगरकर आणि आंबेडकर पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत
भारतात जे काही गैरसमज आहेत त्यातील एक म्हणजे गौतम बुद्धाचे पुन्हा आगमन भारतात आंबेड्करांच्यामुळे झाले आहे वस्तुस्थिती अशी आहे भारतीय प्रबोधनात गौतम बुद्धाबाबत आंबेडकर सर्वात शेवटी आहेत
प्रबोधनात गौतम बुद्ध ओरिएंटॅलिस्ट लोकांनी इन्ट्रुडूस केला महाराष्ट्रात फुले ह्यांनी गौतम बुद्धाला प्रतिष्ठा दिली पण त्यानंतर गौतम बुद्धाचे सर्वात कट्टर समर्थन हे आगरकर ह्यांनी केले आहे त्यानंतर धर्मानंद कोसम्बी ह्यांनी १९१० साली सयाजीराव गायकवाड ह्यांनी बडोदे येथे फेब मध्ये आयोजित केलेल्या परिषदेत बौद्ध धर्मावर चार व्याख्याने दिली ज्याचे पुढे पुस्तकही निघाले आणि ह्या व्याख्यानांचा प्रभाव पडून मग आंबेडकर बुद्धाकडे आलेत.
सर्वात प्रथम अर्वाचीन बौद्ध प्रचार व धर्मांतर साऊथमध्ये झाले आहे आणि ते श्रीलंकन बौद्ध मिशनऱ्यांच्यामुळे झाले आहे साउथचे प्रबोधन हे काही बाबतीत एक पाऊल पुढे होते असो
टिळक गौतम बुद्धाबाबत कट्टर ब्राम्हणवादी होते ओरियनमध्ये पहिल्याच पानावर त्यांनी कुमारील भट्ट आणि शंकराचार्य ह्यांनी बौद्ध धर्म पळवून लावला असे म्हंटले आहे टिळक बुद्धाला मानत नाहीत म्हणून हिंदुत्ववादीही मानत नाहीत हे आपण लक्ष्यात घ्यायला हवे मी मागेच म्हंटलंय टिळकांची स्ट्रेंग्थ तीच हिंदुत्ववाद्यांची स्ट्रेंग्थ आणि टिळकांची मर्यादा तीच हिंदुत्ववाद्यांचीही मर्यादा !
ह्याउलट आगरकर होते टिळक आगरकरांच्या वादावर सांगायला माझ्याजवळ फार काही नवे नाही त्यामुळे मी त्या वादावर मी फार लिहिलेले नाही साहित्यात इंटरेस्ट असणाऱ्यांनी विश्राम बेडेकर ह्यांचे टिळक आणि आगरकर हे नाटक जरूर वाचावे मात्र गौतम बुद्धाबाबत मात्र बौद्धांनी जो न्याय आगरकरांना द्यायला हवा तो दिलेला नाही सर्वात पहिला आणि अंतिम शब्द आंबेडकरांचा ह्या वृत्तीतून हे झाले आहे . हा न्याय मिळावा म्हणून ही चर्चा करतो आहे आगरकरांची गौतम बुद्धाविषयीची मते ही आगरकर निबंधसंग्रहाच्या तिसऱ्या खंडात आली आहेत
आगरकरांचा बुद्धिवाद हा भारतीय प्रबोधनाचा एक वैभवशाली अध्याय आहे आश्चर्य म्हणजे आगरकरांनी प्रज्ञापुरुष म्हणून शंकराचार्यांची निवड न करता बुद्धाची निवड केली आहे तर टिळकांनी शंकराचार्य निवडले आहेत भविष्यात हिंदुत्ववाद्यांनी हाच वाद टिळकांना रामदास व गांधींना बुद्ध मानून लढवला आणि सावरकरांचे संन्यस्त खडग टिळक आगरकरांच्या ह्या वादातून आले आहे आगरकर प्रबोधनाचे फलित म्हणजे विचारस्वातंत्र्य आणि व्यवसायस्वातंत्र्य असे मानतात ह्यातील व्यवसायस्वातंत्र्यामुळे आज ना उद्या वर्णजातिव्यवस्था नष्ट होणार ह्याविषयी त्यांच्या मनात शंका नाही मात्र पुरोहितांचा व्यवसाय मात्र जशाच्या तसा राहील ह्याची त्यांना कल्पना आली नाही आणि वर्णजाती पोलिटिकल बनतील असेही त्यांना वाटले नाही ते १० टक्के मालक व ९० टक्के सेवक ह्यांच्यातले नाते शोषक शोषित असे होऊन त्यांच्यात भविष्यकाळात संघर्ष निर्माण होणे अटळ आहे असे मानतात अशा ह्या जीवनात मग व्यक्तिगत जीवनाचे काय ? आगरकरांचा अहं ब्रम्हास्मि वर विश्वास आहे
आगरकरांच्या मते गौतम बुद्धाचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्याने ईश्वर नाकारून ईश्वराधीनता नाकारली आणि माणसाचे जीवन त्याच्याच कर्माधीन केले मात्र ही कर्मकल्पना आल्यावर आपला धर्म केवळ ह्या कल्पनेच्या आधारे स्वीकारला जाणार नाही म्हणून त्याने पूर्वीपासून चालत आलेली पूर्वजन्म आणि पुनर्जन्म ह्या दोन्ही संकल्पना स्वीकारल्या सत्कर्माला बक्षीस व दुष्कर्माला दंड होणे हे गरजेचे असल्यानेही त्याने हा पूर्वजन्म व पुनर्जन्म स्वीकारला असे ते मानतात त्यांच्या मते सांप्रतच्या काळात हे समाधानकारक नाही कारण सांप्रतच्या काळात सत्कर्माला बक्षीस व दुष्कर्माला दंड मिळतोच असे नाही त्यामुळे हा पूर्वजन्म व पुनर्जन्माचा सिद्धांत व त्याच्याशी जोडला गेलेला कर्मफळाचा सिद्धांत चुकीचे आहेत दुसरे कारण ह्या सिद्धांताना कसलाही वैज्ञानिक पुरावा सापडला नाही ह्याचाच अर्थ बुद्ध ह्या संदर्भात चुकलेला आहे तिसरे कारण ह्या सिध्दांतांच्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सुखदुःख व प्रश्न हे पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलानुसार होतात हे स्वीकारले कि त्याचे परिमार्जन कसे करायचे तेच कळत नाही आणि चौथे कारण पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांतामुळे राजकीय सामाजिक आर्थिक सुधारणा अशक्य बनतात पाचवे कारण ह्यामुळे पाप पुण्याची बक्षिसे व दंड देणाऱ्या मनुष्यकृत संस्था निर्माण करण्याचा उत्साहच ह्यामुळे नाहीसा होतो म्हणूनच मनुष्याला कार्यतत्पर व सुधारणाप्रवण करण्यासाठी पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत हे दोन्ही सिद्धांत नाकारले पाहिजेत
ह्यातून प्रश्न निर्माण होतो बुद्धासारखा पुरुष पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांतांबाबत चुकू शकतो का ? तर हो बुद्धासारखा पुरुषही चुकू शकतो असे ते म्हणतात
आगरकरांच्या दृष्टीने निर्वाण म्हणजे स्थितप्रज्ञता प्राप्ती ! आगरकर ह्या अर्थाने निर्वाण स्वीकारतात मात्र पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत नाकारतात आंबेडकरांच्यावर ह्याचा थेट परिणाम झालेला दिसतो आंबेडकरही आगरकरांच्याप्रमाणे निर्वाण स्वीकारतात पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत नाकारतात हा सिद्धांत नाकारण्याची कारणे स्वीकारतात मात्र ते स्थितप्रज्ञता ही हिंदू संकल्पना असल्याने नाकारून परमप्रज्ञता ही बौद्ध संकल्पना स्वीकारतात व आगरकर जसे थेटपणे बुद्ध चुकला म्हणतात तसे आंबेडकर म्हणत नाही ते बुद्धाने पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत सांगितलेच नाही म्हणतात आणि पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत ह्यांच्याकडे ते ब्राम्हणधर्माची बौद्ध धर्मातली घुसखोरी मानतात ह्यामागची कारणे स्पष्ट आहेत एकतर आगरकर कुणाचेच अनुयायी नाहीत तर आंबेडकरांना आपल्या अनुयायांसाठी धर्म द्यावयाचा आहे अशा वेळी मूळ संस्थापकच चुकला असे म्हणणे म्हणजे मूळ धर्मच चुकीचा आहे असे मानणे होते आंबेडकरांना हे परवडणारे न्हवते दुसरी गोष्ट आंबेडकरांना प्रामाणिकपणे वाटत होते कि अशी घुसखोरी झालेली आहे
वस्तुस्थिती काय आहे ? वस्तुस्थिती अशी आहे कि आंबेडकरांच्या म्हणण्याला कसलाही पुरावा नाही आणि त्यामुळेच आगरकरांचे म्हणणे आधिक तर्कशुद्ध वाटते टिळक पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत स्वीकारतात आगरकर नाकारतात पण ते इथेच थांबत नाहीत ते प्रश्न निर्माण करतात कि बुद्धासारखा पुरुष पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत ह्यांच्याबाबत कसा काय चुकू शकतो ?
आगरकरांच्या मते चैत्यानुभवाला प्राप्त होऊन वासनांचा अंत झाला तरी अमरत्वाची आस शिल्लक राहते व त्यातून हे घडते आगरकरांचे हे कारण तद्दन चुकीचे वाटते कारण बुद्धता सर्व तृष्णांचा त्यात अमरत्वाची तृष्णाही येते अंत झाल्यावरच प्राप्त होते असो
मूळ मुद्दा असा कि बाबासाहेब आंबेडकर ह्यांना आगरकरांची कारणमीमांसा पटली नाही म्हणून त्यांनी आपले तर्क दिले मात्र बुद्धाच्या संदर्भात पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत नाकारण्याचे बळ त्यांना आगरकरांनी पुरवले असे दिसते
आज नवयानाचे पारंपरिक यानांपेक्षा जे वेगळेपण आहे ते पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत नाकारण्यात आहे आणि त्याचा पाया आगरकरांनी टाकला होता
टिळकांनी मात्र स्वराज्याचा लढा पूर्वजन्म व पुनर्जन्म आणि कर्मफलसिद्धांत ह्यांना स्वीकारतच पुढे न्हेला
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ११०
हिंदवी स्वराज्य , स्वराज्य आणि स्वराज श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळकांनी परंपरेतून ज्या काही गोष्टी शोधल्या त्यातली एक स्वराज्य ! शिवाजी महाराजांनी हा शब्द १७ एप्रिल १६४५ रोजी दादाजी प्रभूदेशपांडे ह्यांना लिहिलेल्या पत्रात रायरेश्वराच्या म्हणजे महादेवाच्या साक्षीने आम्ही हिंदवी स्वराज्य स्थापन करत आहोत असे म्हणत प्रथम ऑफिशियली वापरला हिंदुत्ववादी हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रीची इच्छा हे वारंवार कोट करतात पण महाराजांचा श्री हा भगवान शिवशंकर आहे हे सांगायला सोयीस्कररीत्या विसरतात कारण तो तसा सांगितला कि स्वातंत्र्य समता बंधुता स्वीकारावी लागते आणि हिंदुत्ववाद्यांना ह्याची ऍलर्जी आहे ह्याचा आणखी एक अर्थ हिंदूत्ववादी लोक हिंदू असा काढत असतात पण महाराजांना हा अर्थ अभिप्रेत न्हवता त्यांनी वापरलेला शब्द हिंदवी आहे आणि ह्या शब्दात जे जे हिंद देशात राहतात आणि ज्यांनी आपली मातृभूमी पितृभूमी हिंद मानली आहे ते ते सर्व येतात त्यामुळेच महाराजांनी सम्राट अकबराला आदरयोग्य मानले आहे औरंगजेब मात्र सतत मूळ इस्लामिक मानत जातो अधिकाधिक अहिंदवी होत जातो सम्राट अकबर अधिकाधिक हिंदवी बनत जातो त्यामुळेच मी नेहमी म्हणतो कि मुस्लिमांच्यात दोन प्रकार आहेत
१ हिंदवी अकबरवादी मुसलमान
२ विस्तारवादी अहंकारी इस्लामत्ववादी औरंगजेबवादी मुसलमान महाराज ह्यांचा उल्लेख तुर्क असा करतात आणि त्यांना त्याचा अभिप्रेत असलेला अर्थ परके असा आहे
अकबराची सुरवात हिंदवी म्हणून होते कारण तो राजपुतांच्यात वाढत जातो आणि शेवटी दिन ए इलाही पर्यंत पोहचतो महाराजांच्या स्वराज्यात हिंदवीला जागा आहे किंबहुना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात मुस्लिमांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे माझ्या मते अकबराची वा मलिक अंबरची राजवटही हिंदवी स्वराज्यच आहे कारण ते एका हिंदवी मुस्लिमाने स्थापन केले आहे बाबर मुघलांची पहिली पिढी असल्याने कायमच स्वतःला ह्या देशात आपण परकीय आहोत असे फील करत होता तसे दुसऱ्या पिढीचा अकबर वा पहिल्या पिढीचा मलिक अम्बर फील करत नाही पहिल्या पिढीचा असूनही मलिक अम्बर परकेपणा फील करत नाही कारण तो गुलामीतून आला होता
आपल्या काही पुरोगाम्यांना हिंदुत्ववाद दिसतो पण इस्लामत्ववाद दिसत नाही त्यामुळे ते औरंगजेबाला कधीकधी समर्थन देऊन इस्लामत्ववादाला खतपाणी पुरवत राहतात
१ सर्व जग इस्लामीक मुसलमान करणे
२ शरियाचा कायदा सर्वत्र लागू करून त्याची अंमलबजावणी करणे
ह्या दोन गोष्टींच्यासाठी धडपडणारा वेळप्रसंगी त्यासाठी छुपी वा खुली सक्ती वा छुपा वा खुला दहशतवाद वा छुपे वा खुले युद्ध पुकारणारा व करणारा तो इस्लामत्ववादी
ही माझी साधी सरळ इस्लामत्ववादाची व्याख्या आहे
हिंदवी स्वराज्य हे हिंदुत्ववादही स्वीकारत नाही आणि इस्लामत्ववादही ! ते काळानुसार बदलत जाणारी लवचिक कायदाव्यवस्था स्वीकारते त्यामुळेच शिवाजी महाराजांनी दिलेली चौकट स्वीकारूनही संभाजी महाराज गुलामगिरी बंद करणारा नवीन कायदा करतात शैव कुठलाच कायदा अंतिम मानत नाहीत कारण ते जाणतात कि कायदे तात्कालिक व तत्वाकाशीक असतात आणि ते काळ आणि अवकाशानुसार व नवनवीन आकलनानुसार बदलतात मी ह्याच अर्थाने शैव धर्माला नाकारतात असे म्हणतो कारण धर्म म्हणजे अनेकदा अपरिवर्तनीय कायदे असा अर्थ आर्य आणि मुस्लिम करतात असे अपरिवर्तनीय कायदे शैवांना मान्य नाहीत
आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्यालाही ते मान्य न्हवते.उत्तरपेशवाईने असे अपरिवर्तनीय स्मृतिजन्य कायदे आणले व सत्यानाश केला
स्वराज ही महर्षी दयानंद सरस्वतींची संकल्पना सत्यार्थ प्रकाश मध्ये आली असली तरी तिची विस्ताराने मांडणी गांधीजींनी केली आहे स्वतःचे राज्य असा तिचा अर्थ आहे त्यावर गांधीजींच्यावर चर्चा करताना मी चर्चा करेनच
लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा शब्द नेमका कोणत्या अर्थाने वापरला ? माझ्या मते त्यांच्या डोक्यात चार गोष्टी होत्या
१ ब्रिटिश परके आहेत त्यांची राजवट परकीयांची आहे म्हणून त्यांची राजवट नाकारून इथल्या जनतेचे राज्य आणणे
२ त्याची पहिली पायरी म्हणून होम रुल ह्या आयरिश चळवळीच्या व जपानमधील काउंट इटागाकी काउंट ओकुमा ह्यांच्या Jiyū Minken Undō च्या धर्तीवर स्वराज्य चळवळ उभारणे
३ ह्या पहिल्या पायरीची पहिली पायरी म्हणून ब्रिटिश नागरिकांचा दर्जा हिंदुस्तानातील लोकांना मिळवून देणे व त्यासाठी इंडियातील कायदे बदलण्यास ब्रिटिशांना भाग पाडणे त्यासाठी अर्जविनंत्याचे राजकारण कामाचे नाही म्हणून जहाल उपाययोजना अवलंबणे
४ जापनीज लोकांनी ज्याप्रमाणे विज्ञान व तंत्रज्ञानाला स्वीकारले तसे स्वीकारून त्यांचा राष्ट्रीय शिक्षणात समावेश करणे ह्याबरोबरच प्राचीन विद्यांचा चांगला अंशही भारतीय विद्यार्थ्यांना देणे (ना टिळकांनी ना सावरकरांनी विज्ञान व तंत्रज्ञान नाकारलंय हे आपण लक्ष्यात घ्यायला हवं )
ते स्वराज्य चळवळ हा शब्द होम रुल म्हणूनच अनेकदा वापरत होते आधी घर सावकारानं बळकावलंय ते सावकाराकडून सोडवून घेऊ मग त्या आपल्या ताब्यात आलेल्या घरात काय करायचं ते ठरवू असे ते म्हणत
मात्र त्याजागी कोणत्या प्रकारचे राज्य आणायचे ह्याविषयीची स्पष्टता ते पुरवत न्हवते आणि म्हणूनच ते १९१५ पर्यंत पाठीमागून पेशवाई आणण्याच्या शक्यता ध्वनित करत राहिले १९१५ नंतर मात्र ते हळूहळू बदलत चाललेले दिसतात
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १११
बहुराष्ट्रवादाकडून एकराष्ट्रवादाकडे व्हाया द्विराष्ट्रवाद श्रीधर तिळवे नाईक
आपल्याकडे एक समजूत अशी आहे कि १८५७ पासून भारत हे एक राष्ट्र म्हणून विचार करत होते प्रत्यक्षात १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्ध म्हणजे वेगवेगळ्या राज्यांनी स्वतःचे राज्य प्राप्त करण्यासाठी एकाच वेळी केलेले वेगवेगळे उठाव म्हणजे हे युद्ध होते सावरकर म्हणतात त्याप्रमाणे हे कधीही राष्ट्रीय न्हवते एका सलग शत्रूच्या विरोधात क्षत्रियांच्या असंतोषाचा तुकड्यातुकड्यात झालेला हा उठाव होता तो शत्रू कॉमन असल्याने हे युद्ध राष्ट्रीय असल्याचा भास होतो मात्र ह्याचा एक परिणाम असा झाला कि जोवर आपण ब्रिटिशांच्याविरुद्ध एकदिलाने उभे ठाकत नाही तोवर जिंकू शकत नाही असा एक विचार पुढे आला ह्यातून दोन प्रश्न उभे ठाकणे अटळ होते
१ हे असे एकत्र येणे फक्त ब्रिटिशांच्याविरुद्ध कि ब्रिटिश गेल्यानंतरही आपण एक राहणार आहोत ?
२ कि फक्त ब्रिटिशांच्याविरुद्ध एकत्र लढावे नंतर मग
अ भाषेच्या आधारे अनेक राष्ट्रे तयार करावीत
आ हिंदू आणि मुस्लिम वा उत्तर आणि दक्षिण ह्या दोन भिन्न संस्कृती असल्याने दोन राष्ट्रे तयार करावीत
इ सर्व मतभेद विसरून एकच राष्ट्र उभे करावे
राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर भारताचा एक राष्ट्र म्हणून हळूहळू विचार सुरु झाला तरी टिळकांच्या डोक्यात १९०५ पर्यंत पंजाब गुजरात महाराष्ट्र बंगाल ही वेगवेगळी राष्ट्रे म्हणून उदयाला येऊ शकतात असा विचार होता हे स्पष्ट दिसते उदाहरणार्थ ते म्हणतात, "Mr. Chairman and gentlemen, I am unable to impress you with my feeling and sentiment. I express my gratefulness on my own behalf and that of my friends for the splendid reception accorded to us. This receptio~ is given not to me personally but as a representative of the Marathi nation... This honor is due to the Marathi nation for the services and sympathy towards the Bengali race in their present crisis. "
BAL GANGADHAR TILAK PAGE HIS SPEECHES AND WRITING PAGE २१
म्हणजे मराठी नेशन हे वेगळे असा विचार आहे हा विचार नंतरही संपलेला नाही कारण पाकिस्तानात बहुराष्ट्रवाद बोकाळलेला असून त्याच्या आधारेच बांगला देश तयार झाला आहे आणि आत्ता पाकिस्तानात सिंध बलुचिस्तान अशी स्वतंत्र राष्ट्रे मागितली जात आहेत हे लक्ष्यात घेण्यासारखे आहे कि अल्लाह एक म्हणणारे फुटताहेत तर अनेक देव मानणारे अजूनही एकराष्ट्र टिकवून आहेत
भारतातील द्विराष्ट्रवाद हा अकारण गुंतागुंतीचा मुद्दा झाला आहे कारण राजकारण ! काँग्रेसने नेहरूंच्यापासून हिंदुत्ववाद्यांना फाळणीसाठी जबाबदार मानले आहे अलीकडे शशी थरूर ह्यांनीही द्विराष्ट्रवादासाठी सावरकरांना जबाबदार मानले आहे हे विपर्यस्त आहे आणि काँग्रेसची लोकप्रियता घटवण्यात ह्या मूर्ख उद्योगाचा मोठा वाटा आहे कारण खुद्द पाकिस्ताननेच ह्याबाबत खुलासा केला आहे
पाकिस्तानने मुहम्मद बिन कासिमला पहिला पाकिस्तानी म्हंटल आहे पाकिस्तानने अलीकडे सम्राट अकबराला नाकारून त्याच्या दिन ए इलाहींविरुद्ध लढणाऱ्या अहमद सरहिंदीला व वलीउल्लाहला द्विराष्ट्रवादाचे दुसरे प्रवर्तक मानायला सुरवात केली आहे ज्याला आज आपण द्विराष्ट्रवाद म्हणतो त्याचे खरे प्रवर्तक होते सर सय्यद अहमद खान ज्यांनी जानेवारी १८८३ मध्ये मुस्लिम राष्ट्रवादाची मांडणी केली त्यांच्या मते इंडियात हिंदू व मुस्लिम अशी दोन राष्ट्रे नांदत असून एका देहाचे दोन हात असावेत तशी ही दोन राष्ट्रे आहेत त्यांच्यापूर्वी अमीर खुसरोने मांडलेली मार्गी विरुद्ध देशी ह्या संदर्भातील पर्शियन विरुद्ध हिंदवी ही मांडणी त्यांनी नाकारून उर्दू विरुद्ध इतर अशी स्वीकारायला सुरवात केली होती त्यामुळे दोन गोष्टी निश्चित झाल्या
१ मुस्लिमांचे स्वतंत्र राष्ट्र
२ मुस्लिमांची स्वतंत्र भाषा
ह्यातील दुसरे सुरवातीला संशयास्पद होते पुढे उर्दू हे उत्तर मिळाले त्यातून अनेक अनर्थ निर्माण झाले
१८८७ मध्ये खान ह्यांनी
Now suppose that all the English were to leave India—then who would-be rulers of India? Is it possible that under these circumstances two nations, Mohammedan and Hindu, could sit on the same throne and remain equal in power? Most certainly not. One of them must conquer the other and thrust it down. To hope that both could remain equal is to desire the impossible and inconceivable
असे उद्गार काढले आणि दोन राष्ट्रे अटळ आहेत हेच सांगितले काँग्रेसच्या एकराष्ट्रवादाला हा उघड उघड विरोध होता पुढे त्यांच्याच अध्यक्षतेखाली भरलेल्या मुस्लिम लीग परिषदेत जस्टीस अब्दुल रहीम ह्यांनी उघडपणे ह्या दोन संस्कृती असून जगभरच्या मुस्लिम वस्त्यांत जितके मुस्लिमांना कम्फर्टेबल वाटते तितके ते हिंदूंच्या ठिकाणी वाटत नाही कारण हिंदूंची संस्कृती पूर्ण वेगळी आहे असे ठामपणे सांगितले
म्हणजेच हे पाप औरंगजेबवादी सनातन कर्मठ इस्लामत्ववाद्यांचे आहे ते पाकिस्तानात गेल्याने आता कुणावर तरी राग काढला पाहिजे म्हणून मग सावरकरांच्या नावाने बोंब सुरु केली ह्याला जबाबदार कोण तर हिंदुत्ववादीच कारण त्यांनी थेट इस्लामत्ववाद्यांना जबाबदार धरण्याऐवजी गांधी आणि काँग्रेसला जबाबदार धरायला सुरवात केली आणि नंतर गांधींची हत्या केली त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने बोंब ठोकायला सुरवात केली शत्रू कोण हे स्पष्टपणे पाहावे लागते दोघेही इस्लामत्ववाद्यांना घाबरून होते आणि मग एखादा धिप्पाड माणूस दोन पेद्रु माणसांचे जेवण खाऊन गेला कि ते जसे एकमेकाला दोष देत राहतात तसा हा प्रकार आहे
एकराष्ट्रवादाची सुरवात ही काँग्रेसची म्हणजे राष्ट्रीय सभेची देणगी आहे आणि त्याबद्दल आपण काँग्रेसचे आभारी असलो पाहिजे काँग्रेसचा एकराष्ट्रवाद हा हळूहळू तयार होत गेला आहे
आपण मागेच पाहिले कि टिळकांच्या डोक्यात १९०५ पर्यंत पंजाब गुजरात महाराष्ट्र बंगाल ही वेगवेगळी राष्ट्रे म्हणून उदयाला येऊ शकतात असा बहुराष्ट्रवादी विचार होता
प्रश्न असा आहे कि मग संपूर्ण राष्ट्र म्हणून आपणाला स्वतंत्र व्हावे लागेल हा विचार टिळकांच्या डोक्यात कधी फिक्स झाला ? ह्याचे उत्तर आहे बंगालची फाळणी झाली तेव्हा ! टिळक १९०६ साली म्हणतात, " During Vdic times India was a self-contained country. It was united as· a· 'great nation. That limits have disappeared bringing on us great degradation and it. becomes the duty of the leaders to revive that union. A Hindu of this 'place is as much a Hindu as the one from Madras or Bombay. You might put on a different one. dress; speak a· different language, but you should remember that the inner sentiments which 'move you all are the same. The study of the Gita, Ramayana and Mahabharata produces the. same ideas, throughout the country. Are not these common · allegiances to the Vedas, the Gita and the Ramayana-our common heritage? If we lay stress on it forgetting all the minor differences that exist between · different sects, then by the grace of Providence we shall never long be able to consolidate all the different sects into 'a mighty. Hindu nation. This ought.to be the ambition of every Hindu. If you thus work to unite, you will find within a few years one feeling and one thought actuating and dominating all people throughout the country.' This is the work we have to do. The present condition of our religion is not at all desirable ones. We· think ourselves separate and the feeling of that unity which was the root of our advancement in the past is gone. It is certainly unfair: the circumstance that we should have so many sections and sub-sections. It is the duty of an association like the Bharata Dharma Mahamandala to work to restore the lost and forgotten union. In the absence. of unity' India cannot claim its · place among the nations of the world. For some two hundred years India was in the same ~ondition as· it iS to-' day. Buddhism flourished and attacks were made on the Hindu religion by Buddhist~ and Jains. After 6oo years of chaos, rose one great leader, Shankaracharya and he brought together with all the common philosophical elements of our religion and proved and preached them in such a way that Buddhism was swept away from the land. \V e have the grand and eternal promise· Shri Krishna has given in the Gita that when.: ever there is a ·decay of Dharma, He comes. down ~o restore it. When there is a decay owing to disunion, when good men are prosecuted, then Shri Krishna comes down to' save us. There is no religion on the· face of the earth except the Hindu religion wherein we find such hopeful promise that God comes to us as many times as necessary. After Mahomed no prophet is promised, and Jesus Christ comes once forever. No religion holds such a promise full of hope. It is because of this that the Hindu religion is not dead. We are never. without hope. Let heretics say what they may.' A time will come when our religious thoughts and our rights will be vindicated. Each man is doing his best, and as the· association is doing its best, every Hindu is welcome to assist it .and carry it to its goal. If we do not find men coming forward let us hope they will do so in the. next generations We. are never without hope ; no other religion has such a definite and sacred promise as we have of Shri Krishna. It is based on truth and truth, never dies. I say it and I am prepared . to prove this statement. I believe that truth is not touched or saved to one only. The great characteristic of truth is that it is universal and catholic. It is not confined to. any particular race. Hindu religion tolerates all religions.' Our religion says that all religions are based on truth, "you follow yours, I mine.'' Whatever the differences in religion, whatever the differences in languages or whatever other provincial differences and social customs may be, they are not the essentials. They are something like the dress in use. Your turban or dhoti may be different from mine and we may put them on in different ways, it matters not in which ways we use them. The inner man is the same."
BAL GANGADHAR TILAK PAGE HIS SPEECHES AND WRITING VOL ४ page १२ to २१
टिळक इथेही हिंदू नेशन हाच शब्दप्रयोग वापरतायत हे लक्ष्यात घेण्यासारखे आहे टिळकांचा ह्या भाषणातील जो इंनर मॅन आहे तो हिंदू भारतीय आहे त्यांच्या मते मुस्लिम व ख्रिश्चन हे ह्या देशात हिंदूंच्यासारखेच आहेत टिळकांच्यामधल्या एकराष्ट्रवादी बदलाची ही सुरवात आहे
श्रीधर तिळवे नाईक
Mr. Chairman and gentlemen, I am unable to impress you with my feeling and sentiment. I express my gratefulness on my own behalf and that of my friends for the splendid reception accorded to us. This receptio~ is given not to me personally but as a representative of the Marathi nation. This honor is due to the Marathi nation for the services and sympathy towards the Bengali race in their present crisis.
However, it is also a fact that during the Swadeshi Movement in 1905, Tilak recognized the diversity of India and called Bengali, Punjabi, and Gujarati separate nationalities. This was a time when the idea of Hindu nationality and Hindutva was known in Bengal.3
1906. In this lecture, much like the modern ‘Hindus First’ Hindutva protagonists, he virtually argued that converts to Islam and Christianity were just like Hindus. As he put it, notwithstanding the differences in social custom and language, the ‘inner man’ (some may ask—what about women?) was the same. Tilak said: Whatever the differences in religion, whatever the differences in languages or whatever other provincial differences and social customs may be, they are not the essentials. They are something like the dress in use. Your turban or dhoti may be different from mine and we may put them on in different ways, it matters not in which ways we use them. The inner man is the same.2
आगरकरांच्या मते
“The partition grievance,, for the whole of India is at your back. The love of the nation is one's first duty. Next comes religion will be the edifice for the regeneration of India. Do not give up the partition grievance, for the whole of India is at your back. The love of the nation is one's first duty. Next comes religion and next to its government.” Tilak advocacy of religious nationalism was explicit from his statement which he said “I regard India as my motherland and my Goddes, the people of India my kith and kin and loyal and steadfast work for their political and social emancipation my highest religion and duty.”
Nationalism according to Tilak, “is not a visible and concrete entity but is a kind of sentiment an idea and in generating this idea, the historical memories of the great figures of a country play a significant part.” 12
‘the congress agitation based on the so-called the constitutional method is sheer-waste of time.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा