आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती श्रीधर तिळवे नाईक ते आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती
बायनरी द्विध्रुवात्मकता प्रबोधन आणि टिळक
द्विध्रुवात्मकता सोस्यूर , लेवी स्ट्राऊस , राजाराम मोहन रॉय ,फुले आणि टिळक
no doubt sign isn't representation and thing and representation are two things but who creates reality an answer is a self so every reality is selfity and objective conclusion from all selfities is the reality it is a representation of representation I e ultra representation
then from ultra representations hyper representations appear and from hyper representation super and from super mega and from megas meta
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप द्रविड (शिव) आर्य आणि महाभारत श्रीधर तिळवे नाईक
१
मागील लेखात देवसुर आर्य आणि असुर आर्य ह्यांचा हा संघर्ष आजही रामदास विरुद्ध बुद्ध ह्या स्वरूपात अस्तित्वात आहे असे मी म्हणालो ह्या संघर्षात शैवांनी काय करायचं हा प्रश्न नैसर्गिकरित्या उपस्थित होतो खुद्द शंकराच्या कारकिर्दीतच कुमार स्कंद देवासुरांचा सेनापती बनून लढला होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली सुरांनी असुरांना हरवले होते अशा भाकडकथा पुराणात रचलेल्या मिळतात आणि त्यातून शैवांनी देवसूरांना मदत केली पाहिजे असे गृहीतक मांडले जाते साठोत्तरीतील अनेक हिंदू विचारवंत शैव व वैष्णव हे दोन संप्रदाय असून ह्या संप्रदायांनी हिंदुधर्म बनलेला असून वैदिक हे हिंदू धर्मात घुसलेले उपरे आहेत अशी मांडणी करतात ही साठोत्तरी मांडणी काही शैवांनी स्वीकारलेली आहे हे शैव स्वतःला हिंदू धर्माचा भाग मानतात ह्या गृहीतकाचा पाया ज्ञानेश्वर आहेत ते वैष्णव ज्ञानेश्वरी लिहितात आणि शैव अमृतानुभवही एका अर्थाने ह्या हिंदू धर्माचे महाराष्ट्रातील प्रवर्तक ज्ञानेश्वर आहेत जे शैव आणि वैष्णव दोन्ही संप्रदायात लिहितात हीच परंपरा पुढे चालवत दिलीप चित्रे वारकरी व शाक्त अशा दोन्ही परंपरांत कविता लिहितात अरुण कोलटकर जेजुरी शैव तर चिरीमिरी वैष्णव परंपरेत लिहितात साहजिकच ह्यातून आमच्या पिढीपुढे इतिहासाच्या वेगळ्या समस्या ठाकल्या कारण हे नवहिंदूपण थेट राजाराम मोहन रॉय (त्यांचे वडील वैष्णव तर आई शाक्त होती ) ह्यांच्यापासून सुरु होत होते आणि अपवादात्मकवेळा त्यांनी आपल्या मांडणीसाठी तंत्राचाही संदर्भ दिलेला दिसतो मला वैष्णव व वारकरी वर्णजातिव्यवस्थेचे समर्थक सम्प्रदाय म्हणून काम करतांना दिसत होते आणि ज्ञानेश्वरांचे मूळ थेट शंकराचार्यांच्यात सापडत होते आणि शंकराचार्यांना स्वीकारण्याचा अर्थ वर्णजातिव्यवस्था स्वीकारणे असा होणे भाग होते आता मग हे जे जातिवर्णव्यवस्थेचे हिंदू म्हणून येणारे अटळ पॅकेज आहे ते टाळायचे कसे ? साठोत्तरी शैव हिंदू जातीव्यवस्था ही हिंदूंची निर्मिती म्हणून स्वीकारतात पण वर्णव्यवस्थेला ती वैदिक असल्याने नकार देतात
माझ्या सुदैवाने घरातल्या नकुलीश व नाथ दर्शनाने मला स्पष्टच दाखवून दिले होते कि शैव धर्म पूर्ण वेगळा धर्म आहे आणि त्याचा हिंदू धर्माशी काडीचाही संबंध नाही आता हे एकदा स्पष्ट झाल्यावर इतिहास वेगळाच दिसू लागला दुर्देवाने दिलीप चित्रेंच्यापासून संजय सोनवणी ह्यांच्यापर्यंत सगळ्यांनीच साठोत्तरी मांडणी स्वीकारल्याने मी ह्याही अंगाने एकटा पडत गेलो म्हणजे चौथी नवता मांडल्याने नवतेच्या अंगाने आणि शैव धर्म स्वतंत्र मानल्याने परंपरेच्या अंगाने ! म्हणजे परंपरा आणि नवता अशा दोन्ही अंगाने एकटा पडणारा मी एक अजिबोगरीब नमुना आहे
ह्यातून मग तिसरा प्रश्न पडतो तो म्हणजे आपण ही सगळी लढाई अशी एकट्याने लढणे गरजेचे आहे का ? कुठल्याच चौकटीत न बसता असे आयुष्य का काढावे ? ह्याला माझे उत्तर सरळ आहे पारदर्शक आत्मदर्शकता ! ती वगळली तर आयुष्याला काय अर्थ उरतो ?
२
जवळ जवळ ९० टक्के शैवांना हिंदू धर्मात खेचण्यात हिंदुत्ववाद्यांना मिळालेले यश हे एक अजिबोगरीब यश आहे आणि ह्याला कारण आहे महाकाव्यकेंद्री पौराणिक हिंदुत्ववाद ज्याची स्थापना ब्रिटिशांनी आणि टिळकांनी केली
गीतेला शैवांचा धर्मग्रंथ बनवून शैवांचे शैवागम वाचणे ब्रिटिशांनी बंद केले आणि आज अवस्था अशी आहे कि शैव ब्राम्हण आणि गुरवसुद्धा आगम वाचत नाहीत त्यांच्या घरातही गीतासार लटकलेले असते शैव पुरोहितांना स्वतःच्या धर्माचे धर्मग्रंथ माहित नसतात आणि त्यांना त्याची लाज वाटत नाही ते लग्नाला वैदिक ब्राम्हण बोलवतात आणि वैदिक विवाह लावतात आणि तरीही ह्या पुरोहितांना शैव मंदिरांच्यातून मिळालेले निवासस्थान जमीनजुमला आणि उत्पन्न सोडायचे नसते
३
रामायण महाभारतात असणारे शिवाचे उल्लेख अनेकांना सुखावतात राम आणि कृष्ण शिवाची पूजा करतात म्हणून सुखावणे ठीक आहे पण मग प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे जे स्वतः शिवाची पूजा करतात आपण त्यांची पूजा का करतो ? जर आपला देव पंतप्रधान आहे तर राम आणि कृष्ण ह्या मुख्यमंत्री असलेल्या देवाची आपण पूजा का करतो ? जर आपला देव वर्णजातीव्यवस्था सांगतच नसेल तर आपण ही व्यवस्था का पाळतो ? आपण शिवलिंग आणि शक्तिलिंग दोन्हीची पूजा करतो आणि आपले हे शंकर पार्वती युग्म जर जेंडर इक्वालिटी स्त्रीपुरुष समानता पाळत असेल तर आपण लिंगभेद का करतो ? आपल्या देवाने जर आपल्या पुरोहितांना कष्ट करून खा असे सांगितले असेल तर आपले शैव ब्राम्हण वा गुरव जंगम असलेले पुजारी जे परवापरवापर्यंत शेती व्यापार करत होते अचानक आर्य ब्राम्हणांच्यासारखे ऐदी का होत चाललेत ? अस्पृश्यता पाळणे आपल्या धर्मात बसत नाही तरी आपण ती का पाळतोय ? सर्व जीवांच्या ठायी शिव तर अस्पृश्यांच्या ठायी शिव नाही ? मुक्त व्हा मित्रांनो मैत्रिणींनो हे विषमतेचे फालतू जोखड नका बाळगू फेकून द्या
४
प्रश्न असा आहे कि टिळक शैवांचा उल्लेख का टाळतात ? कारण उघड आहे शैव त्यांचे मतदार नाहीत आणि स्वराज्याच्या लढतीत ते आपल्या बाजूने उतरण्याची त्यांना शक्यता वाटत नाही कुठे ना कुठे महाराष्ट्रातील शैव फुल्यांच्या बाजूने आहेत ह्याची टिळकांना जाणीव आहे
५
मग टिळक द्वंद्वात्मकता मांडत नाहीत असे आहे का ? नाही टिळकानीं अ स्टॅंडर्ड कॅरॅक्टर ऑफ इंडियन लँग्वेजेस (पहा BAL GANGADHAR TILAK HIS WRITING AND SPEECHES VOL FOUR PAGE १ TO ११ ) ह्या निबंधात स्पष्टपणे आर्य आणि द्रविड ह्या दोन भिन्न संस्कृती असल्याचे मान्य केले आहे ह्याचा अर्थ फुले आर्य विरुद्ध अनार्य अशी जी मांडणी करतात ती काही अंशाने टिळक आर्य विरुद्ध द्रविड अशी स्वीकारतात पुढे बाबासाहेब आंबेडकर हिंदू विरुद्ध बौद्ध अशी द्वंदात्मकता मांडतात
ह्यातून असा प्रश्न निर्माण होतो कि मग मी जुन्या लोकांची परिभाषा न वापरता आर्य विरुद्ध शैव अशी डायलेक्टिकल मांडणी का करतो आहे ? ह्याचे उत्तर पुढील लेखात
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप द्रविड (शिव) आर्य आणि महाभारत २८ श्रीधर तिळवे नाईक
मी जुनी द्विदलता स्वीकारत नाही कारण उपलब्ध झालेल्या इतिहासाला ती लावता येत नाही
आर्य अनार्य ह्या द्विदलतेत प्रॉब्लेम असा आहे कि फुले समजतात तसे असुर अनार्य नाहीत उदाहरणार्थ बळी हा शैव होता पण असुर आर्य होता अनेक असुर आर्यांनी शैव धर्म स्वीकारलेला होता उदा यादव ते श्रीकृष्णापर्यंत शैव होते आणि श्रीकृष्णाच्या काळी वैष्णव झाले ते वर्ण जातीव्यवस्था मानत न्हवते पण वैष्णव झाल्यावर त्यांनी स्वतःला क्षत्रिय समजायला सुरवात केली अनेक ब्राम्हण क्षत्रिय वैश्य हे मूळचे शैव आहेत त्यांना जर समताधिष्ठित शैव धर्मात परत यायचे असेल तर त्यांच्या घरवापसीचे मार्ग खुले ठेवले पाहिजेत असं मला वाटतं ह्यातल्या अनेकांनी आजही आपल्या शैव दैवतांचा त्याग केलेला नाही अनेक पुरोगामी ब्राम्हणांना हिंदू म्हणवून घ्यायचे नाहीये त्यांना शैव म्हणवून घेण्याचा पर्याय उपलब्ध असला पाहिजे
लोकमान्य टिळकांचे आर्य विरुद्ध द्रविड हे द्वंदही स्वीकारता येत नाही अनेक तामिळ द्रविड ब्राम्हण हे वैदिक धर्म स्वीकारून वर्णजातिव्यवस्थेचे कट्टर समर्थक बनले आहेत केवळ द्रविड आहेत म्हणून त्यांना स्वीकारावे असे मला वाटत नाही शिवाय शैवांच्यात जितका वाटा द्रविडांचा आहे तितकाच नागांचा आहे गौतम बुद्धाची आई नागवंशीय आहे तिबेट तर पूर्ण शैव होता आणि तंत्रप्रधान होता बुद्ध धर्म स्वीकारल्यानंतरही ही तंत्रप्रधानता गेलेली दिसत नाही वज्रयान मूळचे शैव आहे आणि बुद्धाच्या उपदेशापासून कोसो दूर आहे तिबेट शैव होता तोवर चीन जिंकण्याची भाषा करत होता बौद्ध झाल्यावर आकुंचन पावत शेवटी चायनाकडून गिळला गेला
बाबासाहेबांचे द्विदल तिसरे आहे त्यांनी ते हिंदू धर्म विरुद्ध बौद्ध धर्म म्हणून उभे केलेले आहे कारण त्यांच्या काळापर्यंत आर्य वैदिक , ब्राम्हण , वैष्णव असे सर्व टप्पे पूर्ण करून हिंदू धर्म निर्माण करून बसले होते आणि सर्वपल्ली राधाकृष्णन ह्या गृहस्थाने HINDU VIEW OF LIFE हे पुस्तक लिहून हिंदू जीवनपद्धती मांडली होती त्याला एन्काउंटर म्हणून बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी ANNIHILATION OF CAST हे पुस्तक लिहिले आणि त्यातूनच हिंदू धर्म विरुद्ध बौद्ध धर्म ह्या द्विदलतेची सुरवात झाली मी स्वतः १९८७ पासून २००७ पर्यंत भारत बौद्धमय करेन ह्या बाबांसाहेबांच्या स्वप्नांशी सहमत होतो माझ्या ह्या कालखंडातल्या बऱ्याच कविता बौद्धमय आहेत हे स्वप्न पूर्ण होणे शक्य नाही ह्याची खात्री पटल्यावर मी पुन्हा माझ्या मूळ शैव आरंभाकडे आलो मात्र हा ऑप्शन खुला राहिला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळेच बौद्ध धर्मांतरावर मी टीका करत नाही अस्पृश्यतेचा त्याग पण करायचा नाही आणि तुम्ही धर्मांतर करूं नका असं दलितांना सांगायचं हा सवर्णांचा दुटप्पीपणा आहे असं मला वाटतं
ब्राम्हण ब्राम्हणेतर ही द्विध्रुवात्मकताही मी स्वीकारत नाही कारण ब्राम्हण ही कल्पना मूळची शैव आहे आणि तिचा अर्थ लेखन करणारा असा होता त्याकाळात ऐहिक प्रतिलोक निर्माण करण्याचा मार्ग लेखन हाच होता ब्रम्ह हे तत्व ऐहिक इहलोकाची निर्मिती करणारे तत्व होय आणि असेच निर्माण करण्याचे काम लेखक शब्दांद्वारे करतो म्हणून लेखक ब्राम्हण त्याला पौराहित्याची झूल नंतर चढवली गेली पुढे वैदिक संस्कृतीनेही हा मूळचा तामिळ शब्द स्वीकारला व त्याचा अर्थ सुरवातीला मंत्र रचणारा असाच होता वैदिक परंपरेतील सर्व सूत पुढे ब्राम्हण होत गेले पुढे ह्या लेखकांना माज चढला आणि हे स्वतःला शहाणे समजू लागले बहुतांशी ब्राम्हण हे अवैदिक आहेत ही गोष्ट समाजशास्त्राला (घुर्ये )मान्य आहेच तेव्हा ब्राम्हण ब्राम्हणेतर वाद स्वीकारता येत नाही त्याऐवजी ब्राम्हणांनी ह्या भाड्याने घेतलेल्या आर्यत्वाचा त्याग करून शैवत्व स्वीकारावे अशी मागणी लावून धरावी हे उत्तम दुसरी गोष्ट वर्णव्यवस्था ही फक्त आर्य ब्राम्हणांची निर्मिती नाही ती आर्य क्षत्रियांचीही निर्मिती आहे आणि क्षत्रियांनीच वेळप्रसंगी हिंसा करून ती टिकवली आहे आर्यांच्या धर्मव्यवस्था आणि राज्यव्यवस्था ह्या एकमेकाला पूरक म्हणून काम करतात जेव्हा ब्राम्हणांना माज चढतो तेव्हा क्षत्रिय काही काळ ब्राम्हणक्षत्रियेतर लोकांना जवळ करतात आणि एकदा त्यांचे साध्य साध्य झाले कि पुन्हा आर्यन होतात ह्याउलट क्षत्रियांना माज चढला कि ब्राम्हण ब्राम्हणक्षत्रियेतर लोकांना जवळ करतात वेळप्रसंगी त्यांना क्षत्रियांचा दर्जा देतात
साठोत्तरीचे हिंदू विरुद्ध वैदिक हे द्वंद्वही मी स्वीकारत नाही कारण दोघेही जातिवर्णव्यवस्थेचे समर्थक आहेत तुम्ही वैष्णवांना घेऊन समता प्रस्थापित करूच शकत नाही चक्रधरांच्यापासून हे प्रयत्न सुरु आहेत बसवेश्वरांचा नानकांचा निदान नवा धर्म झाला चक्रधरांचे तेही झाले नाही लोक वर्णजातिव्यवस्था मानणाऱ्या वारकऱ्यांच्या मागे गेले त्यामुळे माझ्यासाठी वैदिक आणि हिंदू ह्या आर्य धारेच्या आरंभिक आणि अंतिक धारा आहेत जर हिंदूंनी वर्णजातिव्यवस्थेचा त्याग केला व श्रमप्रतिष्ठा व समता स्वीकारली तर मी गर्वसे कहो मैं हिंदू हूँ म्हणायला तयार आहे
व्हाय आय एम नॉट अ हिंदू ह्या शशी थरूर ह्यांच्या हिंदू धर्माचं समर्थन करणाऱ्या ग्रंथात थरूर पुस्तकाच्या आधी जी क्वॉटेशन देतात ती पुढीलप्रमाणे
What thing I am I do not know.
I wander secluded, burdened by my mind.
When the first-born of Truth has come to me
I receive a share in that self-same Word. — Rig Veda, I.164.37
May we not anger you, O God,
in our worship
By praise that is unworthy or by scanty tribute. — Rig Veda, II.33.4
May He delight in these my words. — Rig Veda, I.25.18
योगायोगाने ही सगळी ऋग्वेदातली आहेत हिंदू धर्म कुठून सुरु होतो ह्या प्रश्नाचे हे उत्तर आहे केवळ शब्दच्छल करून तुम्ही माप सांगाल हो कि वैदिक व हिंदू ही द्विध्रुवात्मकता आहे पण सामान्य हिंदू आणि नेतेही हे मानताना दिसत नाही कारण हिंदू धर्म हा ब्राम्हणधर्माने जन्माला घातलेली लेटेस्ट एडिशन व ऍडिशन आहे हे लोक हिंदू हा शब्द वापरतात कारण त्यांना हिंदू व्होटिंग गमवायचं नसतं पॉलिटिकली हे करेक्ट असेलही पण पुराव्याच्या पातळीवर हे टिकणार नाही ह्याउलट शैवांच्या शैव ग्रंथात हिंदू हा शब्द जवळजवळ आढळतच नाही अनेक शैवाचार्यांना हिंदू नावाचा धर्मच माहीत न्हवता असं दिसतं नकुलीश लकुलीश पतंजलीनाथ अभिनवगुप्त सिद्धान्तमतवादी , बसवेश्वर गोरखनाथ ह्यापैकी कुणीही हिंदू शब्द वापरलेला नाही शैवांचा सर्वात मोठा शत्रू वैष्णव हेही शैव धर्म असाच उल्लेख करतात आणि स्वतःचा उल्लेख वैष्णव धर्मी असाच करतात
मग आता करायचे काय ? तर शैव दर्शने जी राधाकृष्णन ह्यांच्यामुळे कधी अभ्यासक्रमात समाविष्ट होऊ शकली नाही त्यांचा अभ्यासक्रमात समावेश करा म्हणून आग्रह धरायचा शैव हा स्वतंत्र धर्म म्हणून मान्य करण्याची मागणी रेटून धरायची सगळी शैव मंदिरे शैवांच्या ताब्यात द्या असा आग्रह धरायचा सर्व शैव मंदिरात लंगर व्यवस्था सुरु करायची शैव पुरोहितांनी सेवा म्हणून पौराहित्य करायच्या शैव परंपरेचे पुनर्जीवन करायचे आणि पुरोहितांनी स्वतःच्या उपजीविकेसाठी पूर्वीसारखी शेती पशुपालन उद्योग कारागिरी वा व्यापार सुरु करण्याची प्रथा जिवंत करायची किंवा संन्यासी व्हायचे सर्व शैव मंदिरे शाळा म्हणून व तपश्चर्येची ठिकाणे म्हणून पुन्हा ऑन करायची अभ्यासक्रमात द्वादशशिले यम नियम ह्यांच्याबरोबर अद्ययावत विज्ञान तंत्रज्ञान चिन्ह विज्ञान व चिन्हतंत्रज्ञानाचा समावेश असावा व अभ्यासक्रमात सतत नवीन ज्ञानाचा समावेश करत राहावा पुराणातल्या व महाकाव्यातल्या भाकडकथा इतिहास म्हणून शिकवू नयेत सर्व शैव मंदिरे लग्नाचा व तत्सम कार्यक्रमाचा हॉल म्हणून पूर्वी युज करत ह्या परंपरेचे पुनर्जीवन करून गरिबांना मंदिरे कार्यक्रमासाठी १०० रुपये किंवा तत्सम घेऊन भाड्यांनी द्यावीत हवे तर ५००० रुपये डिपॉझिट म्हणून ठेऊन घ्यावे व कार्यक्रमानंतर परत करावे सर्व मंदिरे पूर्वीसारखी सर्वांना खुली ठेवावीत इतकेच न्हवे तर ही मंदिरे शैवांच्या प्राचीन परंपरेनुसार इतर धर्मियांना उदाहरणार्थ मुस्लिमांना नमाज पढण्यासाठी व ख्रिश्चनांना प्रेयरसाठी खुली ठेवावीत ज्यांना शैव धर्मात यायचे असेल त्यांना तीन वेळा ओम नमो शिवाय हा मंत्र म्हणायला लावून प्रवेश द्यावा धर्मस्वीकारानंतर इष्टलिंग एक तास गळ्यात बांधावे मग त्यांनतर त्या व्यक्तीची मर्जी चालू द्यावी शाखाहाराची सक्ती करू नये प्राचीन परंपरेनुसार आठवड्यातून दोन वेळा मांसाहार करण्याची अनुमती द्यावी व सोमवारी शाकाहाराची सक्ती करावी सर्व शैव मंदिराशेजारी हॉस्पिटल्स व शिक्षणसंस्था खोलून तिथे फुकट किंवा कमीतकमी पैश्यात उपचार करावा राजकीय पोस्ट वा आमदार खासदार मंत्री असलेल्या कुणालाही मंदिराशी निगडित कुठल्याच ट्रस्टवर प्रवेश देऊ नये मंदिराच्या आवारात आठवडी बाजार भरवण्याच्या प्राचीन परंपरेचे पुनर्जीवन करावे आणि ह्यात गरीब शेतकरी व आदिवासी ह्यांच्या मालाला विकण्याची परवानगी द्यावी व त्यांच्याकडून जागेचे पैसे घेऊ नयेत मंदिराच्या आवारात कुणालाच पर्मनंट जागा देऊ नये

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा