बाईपण श्रीधर तिळवे नाईक


लिंगता आणि लैंगिकता ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत लिंगता म्हणजे ज्या जनुकांच्यामुळे स्त्री वा पुरुष लिंग प्राप्त होते त्याचा प्रोग्राम व प्रोग्रामिंग लैंगिकता म्हणजे हा प्रोग्रॅम कंटिन्यू करण्यासाठी त्याकरता आपल्यासारखी जनेटिक प्रतिकृती तयार करण्यासाठी केलेल्या कृती अनुकृती प्रतिकृती ज्या ज्ञानिक , आर्थिक ,सामाजिक , शारीरिक , वैयक्तिक आणि राजकीय अशा अनेक प्रतलांवर वावरत असतात

स्त्रीलिंगता व पुरुषलिंगता ह्यांचे नेमके स्वरूप काय ह्याविषयी अजूनही विज्ञानाला फायनल निष्कर्ष काढता आलेले नाही ह्याबाबतीतली फिल्डता काय ठेवायची ह्यावरही वाद आहेत म्हणजे सर्व मॅमल्सचे सिद्धांत मनुष्याला लागू करता येतील का वैग्रे ह्यावर वाद आहे होमो सेपियन्सचा विचार स्वतंत्रपणे करावा असाच कल आहे

भारतात शैवांनी शिव आणि शक्ती हे युग्म ह्या विश्वाच्या मुळाशी असल्याचे प्रतिपादन केले तरी खुद्द शैवांना आपले दार्शनिक काय म्हणतात ह्याची कल्पना नाही अनेकांना महालिंगांची पूजा करण्याचा आदेश शंकराने दिलाय शिवलिंग वा शक्तिलिंगाची पूजा करण्याचा न्हवे हे माहित नाही शिवलिंग आणि शाक्तलिंग ही दोन भिन्न लिंगे आहेत तर ज्याला आज आपण शिवलिंग म्हणतो ते मुळात महालिंग आहे आणि त्यात वृषण आणि योनी दोन्ही एकत्र असतात शिवलिंगात फक्त वृषण असते खांबासारखे तर शाक्त वा शक्तीलिंगात योनी महत्वाची असते शाक्त लिंगे पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे फारशी बनली नाहीत पण पूर्वी ती अस्तित्वात होती योनीच्या आकाराचे पाषाण हीच मुळात पाषाणलिंगांची व पाषाणपूजेमागची संकल्पना होती पण तिची टर उडवली गेली ह्याउलट वृक्षलींग हे पार सहित असणे आवश्यक आहे पार म्हणजे पार्वतीची जागा आणि पारावर बसून महत्वाचे निर्णय घेणे हे आवश्यक होते कारण शिवशक्तीच्या समक्ष हे निर्णय घेतले जात वड म्हणजे शिव व पार म्हणजे शक्ती होय गावातल्या म्हाताऱ्यांना पूर्वी हे माहीत असायचे पण इंग्रज ज्या ज्या गावात पोहचले तिथे तिथे मूळ शैव संकल्पेनेशी असलेली कनेक्टिव्हिटी तुटली पूर्वी पारावर लोक खोटं बोलत नसत कारण पार्वती शिक्षा करेल अशी भीती होती ही भीती गेली आणि पारावर लोक सर्रास खोटं बोलायला लागले आर्यांची पुरुषप्रधानता आज जवळजवळ सर्वच गावांनी अपनवली आणि बाईबाबत ऱ्हास चालू झाला बसवेश्वर , शिवाजी , पहिला बाजीराव , फुले ह्या सर्वांनीच हा ऱ्हास थांबवण्याचा प्रयत्न केला आणि हे सर्वच शैव होते हा योगायोग न्हवता

बाईपणाची मूळ संकल्पना ही आदिशक्ती आहे ह्या आदिशक्तीपासून सृजनशक्ती , शरीरशक्ती ,भवशक्ती , विचारशक्ती , मातृशक्ती , क्रियाशक्ती , कालशक्ती , अवकाशशक्ती अशा अष्टशक्ती तयार होतात ह्या आठ व मूळ आदी ह्या मिळून नवशक्ती तयार होतात आणि त्यांची पूजा म्हणजे नवरात्र होय सामान्य व्यक्तींना त्या कळाव्यात म्हणून ह्यातल्या प्रत्येक शक्तीचे मूर्त रूप दाखवण्यासाठी नऊ शक्ती मुर्त्या आपण सजवतो म्हणजे भवशक्तीपासून भवानी किंवा कालशक्तीपासून महाकाली वा सृजन वा कामशक्तीपासून कामाक्षी अशा ह्या मुर्त्या व रूपे आहे आदिशक्तीची पूजा म्हणून पार्वतीची पूजा केली जाते

बाईपण म्हणजे ह्या नवशक्ती व त्यांचे अविष्कार

प्रश्न असा आहे कि हे सर्व प्रबोधनात्मक ,आधुनिक , उत्तराधुनिक व जालिक (म्हणजे चौथ्या नवतेत) युगात कसे मांडावे

प्रबोधनात्मकतेचे उदाहरण म्हणून आपण रॅशनॅलिझमसाठी सावित्रीबाई फुले व प्रबोधनातील रोमँटिसिझमचा भाग म्हणून आपण इंदिरा संत अमृता प्रीतम गौरी देशपांडे एमिली डिकन्सन पु शी रेगे ह्यांच्या साहित्याचे उदाहरण सहज घेऊ शकतो

आधुनिकसाठी सिल्विया पाथ , सिमॉन द बुआ , प्रभा गणोरकर , रजनी परुळेकर , अनुराधा पाटील , कविता महाजन , मेघना पेठे , प्रज्ञा पवार , योजना यादव

उत्तर आधुनिकसाठी कोलटकरांचा भिजकी वही , ज्ञानदा ,  विस्लावा  सिम्बोर्स्क , ज्युडिथ बटलर , टोनी मॉरिसन अशी उदाहरणे आपण घेऊ शकतो

जालिक युग आता सुरु झालंय ह्यातील नावे हळूहळू पुढे येतील अनेक मराठी कवियत्री ह्या अनेक मराठी कविंच्याप्रमाणे रोमँटिसिझममधेच डुबक्या घेतांना दिसतात अगदी बाईपणाची चर्चा हीही रोमँटिक पद्धतीने चाललेली असते बाईपण फक्त बाईत असत नाही असा माझा विश्वास असल्यानेच मी स्त्रीवाहिनी लिहू शकलो त्यामुळे मी बाईपणाचा शोध घेत असतो तेव्हा तोही शोध माझाच असतो बायका त्यांच्या आतील पुरुषपणाचा  शोध घेतात का ? म्हणजे पु शी किंवा अरुण कोलटकर जसा शोध घेतात तसा बायका का पुरुषपणाचा शोध घेत नाहीत ? तू बाई बनून आलास तर तुला बाईपण कळेल हा जसा एक योजना यादव ह्यांचा काव्यात्मक तर्क आहे आणि जो योग्य आहे तसा तू पुरुष बनून आलीस तर तुला पुरुषपण कळेल हाही योग्यच तर्क आहे कि ! आणि जर उद्या एखादा म्हणाला कि बाईपण मला शक्य नाही तेव्हा तू बाईपण घेऊन ये मी पुरुषपण घेऊन येतो किंवा उद्या जर एखादी बाई म्हणाली कि पुरुषपण मला शक्य नाही तेव्हा मी माझं बाईपणच घेऊन येते तर तेही आदरणीयच आहे जालीय युगात पुरुषालाही समजून घेण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे आपल्याकडे रेणुकाच्या काही पोस्टमध्ये त्याचे प्रतिबिंब होते पुरुषप्रधान व्यवस्थेत पुरुषांचीही घुसमट होत होतीच कि ! म्हणजे हुंडा ही वाईट प्रथा घेतली तर व्यावहारिक पातळीवर हुंडा देणारा कोण होता तर पोरीचा बाप !हुंडा जमा करतांना ह्या बापाला होणारा ताप हिशेबात घ्यायचा कि नाही ? माझ्या बापानं माझी बहीण उज्वलाच्या  हुंड्यासाठी धंद्यातील भांडवल तर उधळलंच पण आम्हा भावांसाठी ठेवलेल्या सगळ्या एफड्या पण मोडल्या  परिणामी घरातले सगळे पुरुष पण कंगाल तर पुरुषप्रधान व्यवस्थेत फक्त बायकाच नाही पुरुष पण मेले

आधुनिक युगापर्यंतचा स्त्रीमुक्तीविचार हा फार एकरेषीयपद्धतीने चालायचा उत्तराधुनिक युगात हे सर्व बदलले आहे आता ह्याची दखल घ्यायची कि नाही हे ज्याने त्याने ठरवायचे आहे

श्रीधर तिळवे नाईक








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट