हिंदुत्व म्हणजे काय श्रीधर तिळवे नाईक

महाभारताबाबत एक प्रश्न टिळक शिताफीनं टाळतात तो म्हणजे ओरिजनल संस्कृतमधील रामायण महाभारत व पुराणे ब्राम्हणेतरांना वाचायची अनुमती आहे कि नाही ? हा प्रश्न निर्माण होतो कारण नवव्या शतकात ब्राम्हणांनी देवसुर परंपरेतील संस्कृत ग्रंथ वाचावयास केलेली बंदी ! ह्या बंदीमुळेच पुढे ज्ञानेश्वरांना गीता मराठीत आणावी लागली आणि गीतेचे मराठीकरण करायला ब्राम्हणांनी मनाईच केली एकनाथांनी पुढे रामायणाचे मराठीकरण केले म्हणजे निगम संस्कृत वाङ्मय फक्त ब्राम्हणांनीच वाचले पाहिजे अशी ब्राम्हणांनी  धर्माज्ञांचं काढली ह्याउलट ह्या काळात शैव, जैन व बौद्ध धर्मग्रंथ मात्र सर्वांनाच वाचायला खुले होते म्हणजेच ज्याला आज आपण हिंदू धर्म म्हणतो तो मार्गी न्हवे तर देशी भाषांनी देशी संतांनी देशी भाषेत जन्माला घातलेला धर्म आहे असे म्हणता येईल आणि हा आयता तयार झालेला हिंदू धर्म हायजॅक करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे हिंदुत्व

हे काही प्रथम घडतंय का तर नाही शैवांच्या मोक्ष संकल्पनेची उचलेगिरी करायची पण शैवांचा उल्लेख टाळायचा हा उद्योग थेट कपिल बुद्ध पासून सुरु होतो पुढे तंत्र आणि पूजा ह्यांची उचलेगिरी करायची पण ह्या गोष्टी आपणच सुरु केल्या अशा थाटात सादरीकरण करायचे असा वैदिकांचा सनातन धंदा आहे अलीकडे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची चोरी करण्याची खटपट अशीच दयनीय पद्धतीने चालू आहे बरं ह्याबाबतीत पुरोगामी ब्राम्हणांचेच खून करायला मागेपुढे पाहीले नाही तिथे ब्राम्हणेतरांची काय खैर ? कट्टर वैष्णव असलेल्या तुलसीदासालासुद्धा ह्या लोकांनी मंदिरातून हाकलून काढले आणि त्याला मंदिरासमोरच्या मशिदीत जाऊन रहावे लागले तिथे ज्ञानेश्वर चक्रधरांची काय खैर ?

साहजिकच प्रत्येक देशी निर्मितीचे देवसुरनायझेशन आर्यनायझेशन , ब्राम्हनायझेशन व संस्कृतायझेशन करून ती आर्यांचीच म्हणण्यात आर्य निपुण आहेत

तुम्ही म्हणाल संस्कृतायझेशनचा आर्यनायझेशनचा ब्राम्हनायझेशनचा टिळकांशी काय संबंध तर तो थेटच दिसतो टिळकांच्या मराठी लेखनात सर्वत्र संस्कृत क्वॉटेशनची  पखरण आहे पण टिळक ह्या काळातल्या कट्टर ब्राम्हणाप्रमाणे कुठंही त्या संस्कृतचा मराठी अनुवाद वा भाषांतर देत नाहीत किंवा विवरण करत नाहीत ह्याचे दोन अर्थ होतात

पहिला टिळक फक्त ब्राम्हणांसाठी लिखाण करतायत आणि ब्राम्हणांना संस्कृत समजतं असं गृहीत धरतात
किंवा दुसरा संस्कृत ही भाषा अजूनही ब्राम्हण वर्णासाठीच असलेली देवभाषा असल्याने तीच्यात काय लिहिलंय ते ब्राम्हणेतरांना समजण्याची गरज नाही असे ते गृहीत धरतात
कदाचित ह्या दोन्ही गोष्टी त्यांना अभिप्रेत आहेत

प्रश्न असा येतो कि मग स्वतःचे लेखन ते मराठीत का लिहितात ? टिळकांनी गीतारहस्य मराठीत लिहिले आहे हे बघण्याजोगे आहे ह्याचा अर्थ ते सामान्य माणसांशी कनेक्ट राहू इच्छितात वेदांवरचे लिखाण इंग्लिशमध्ये करणारे टिळक गीतारहस्य मात्र मराठीत लिहितात ह्याचा अर्थ टिळक हळूहळू बदलत चाललेत असा होतो ह्या प्रक्रियेला मी डीदेवसूरनायझेशन डीआर्यनायझेशन डीसंस्कृतायझेशन व डीब्राम्हणायझेशन म्हणतो टिळकांच्याबाबत ह्या चारी  प्रक्रियांची सुरवात झाली होती असे दिसते दुर्देवाने त्यांचे खूप लवकर निधन झाले टिळक जगते तर खूप क्रांतिकारक झाले असते असे म्हणावयास निश्चितच वाव आहे

श्रीधर तिळवे नाईक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट