आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती श्रीधर तिळवे नाईक ९८ ते १०३

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ९८
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप रामदास विरुद्ध बुद्ध आणि महाभारत २६ श्रीधर तिळवे नाईक
टिळक वेद ,रामायण आणि महाभारत ह्यांच्याविषयी लिहितांना कायमच आर्य सतत विजयी असल्याच्या थाटात लिहीत असतात पण वस्तुस्तिथी अशी आहे कि आर्य सतत पराभूत झालेले दिसतात इसवीसनपूर्व १५०० पासून आर्यांना उत्तर भारत पूर्ण मोकळे मैदान म्हणून मिळाला होता आर्यांनी काय केले ?त्यांनी शूद्र नावाचा चौथा वर्ण बनवून त्याला दास शूद्र करून टाकले आणि स्वतःला तीन वर्णात बंदिस्त करून घेतले अशी व्यवस्था परकियांच्यापुढे टिकूच शकत नाही कारण लढण्यासाठी सैनिक लागतात आणि नेमके तेच मिसिंग आहेत आर्य प्रथम इराणी लोकांच्याकडून पराभूत झाले नंतर ग्रीक म्हणजे यवनांच्याकडून पराभूत झाले आणि शेवटी चायनीज लोकांनी उत्तरेत कुशाण साम्राज्य उभे केले वाद फक्त डिमीट्रीस १ ने प्रथम आक्रमण केले कि डिमीट्रीस २ ने एव्हढाच आहे पुढे शक लोकांनी उत्तर पश्चिम भारत जिंकला मौर्य राजवट ही शैव राजवट होती आणि आदिवासीही ह्यांनी सगळ्यांना हरवले अगदी अलेक्झांडरलाही शैवांनी पळवून लावलं जेव्हा जेव्हा ह्या मौर्य राजांनी असुर धर्म स्वीकारले तेव्हा तेव्हा त्यांना राज्याचा त्याग करावा लागला आहे मग आर्य भारतीय इतिहासात विजयी आहेत कुठे ? तर रामायण महाभारत आणि पुराण ह्या काल्पनिक ग्रंथात ! हे ग्रंथ प्रस्थापित झाले ७ व्या शतकात आणि मग आर्यांच्या राजवटी दिसायला लागतात विशेषतः यादव हे सूर आर्य धर्माचे कट्टर पुरस्कर्ते होते
आणि आर्य शासक बनल्यावर भारताचा अधःपात व्हायला सुरवात झाली (यादव हे मूळचे असुर होते असा अनेकांचा दावा आहे पण यादव तो स्वीकारतांना दिसत नाहीत ) आणि शेवटी ह्याही राजवटी टिकल्या नाहीतच मुस्लिमांनी पुन्हा हरवलंच हे लक्ष्यात घेण्याजोगं आहे कि इसवीसन ६०० ते १३०० जे राजपूत शैव होते ते वैष्णव झाले आणि मग मुस्लिमांचे चाकर झाले वैष्णववादाने आणि वैष्णव संतांनी भारताचा राजकीय अधःपातच घडवला आहे आणि परकीय राजवटींना स्टॅबिलिटी दिली आहे स्वतःच्या ब्राम्हण क्षत्रिय हितसंबंधाखेरीज काहीच न कळणाऱ्या लोकांना राष्ट्र वैग्रे भानगडी कळत नाहीत त्या त्यांना कळवणारा पहिला नेता म्हणून लोकमान्य टिळकांचे नाव घ्यावे लागते फक्त स्वतःच्या इस्टेटीशी इमानदार असलेल्या ह्या दोन आर्य जमाती ह्यांनी शिवाजी महाराजांना जिथे सोडले नाही तिथे इतरांचा काय पाड ? शिवाजींशी इमान राखणारे बहुतांशी ब्राम्हण क्षत्रिय हे देशस्थ कऱ्हाडे वऱ्हाडी कायस्थ असे मूळचे शैव आहेत पेशवाईत ह्यातील देशस्थ कऱ्हाडे वैग्रे एतद्देशीय ब्राम्हण शंकराचार्य , माधवराव पेशवे व नाना फडणवीसच्या नादाला लागून सूर आर्य झाले आणि बिघडले त्यांचाही राजपूत झाला
टिळकांच्यापुढे अशा लोकांना संघटित करण्याचे चॅलेंज होते जे मनाने वैष्णव होते कारण तोवर ओबीसी बीसी आणि आदिवासी व शैव ब्राम्हण क्षत्रिय वैश्य साईडलाईन झाले होते अनेकजण ब्राम्हणब्राम्हणेतर वादात ब्राम्हणेतर म्हणून फटकून होते टिळक अशा पार्श्वभूमीवर स्वतःचा राष्ट्रवाद शोधत होते टिळक हे खालून पायऱ्या पायऱ्यांनी चढत आलेले नेते होते कॉर्पोरेटर ते राष्ट्रीय नेता असा त्यांचा प्रवास होता आणि त्यांना पुण्यातून निवडणूक लढवावी लागत होती आणि त्यांचा तत्कालीन मतदार हा ब्राम्हण होता त्यांना ह्या ब्राम्हण मतदारालाही सांभाळायचे होते कारण त्याच्याशिवाय निवडणूक जिंकणे अवघड होते आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याचा लढाही लढवायचा होता हा एक तिढा होता आणि त्याची उकल करायचा ते प्रयत्न करत होते टिळकांच्या काळात सुधारक ब्राम्हणांची लोकसंख्या धड २ टक्केही न्हवती गांधी आले तेव्हा ती १० टक्क्यांच्यापर्यंत पोहचली गांधींना महाराष्ट्रातून मिळालेले सुधारक ब्राम्हण हे टिळकांनी दिलेले आहेत गांधींच्यासाठी टागोरांनी हेच काम बंगालमध्ये केले आहे आणि ह्या सगळ्यांचा आदर्श महाभारत आणि त्यापेक्षाही अधिक त्यातील गीता आहे वैष्णव संतांचा तिघांच्यावरही प्रचंड प्रभाव आहे ह्यातही टिळकांचे घोळ आहेतच म्हणजे टिळक हे ज्ञानेश्वर एकनाथ रामदास आणि तुकाराम ह्या ब्राम्हण क्षत्रिय संतांना वारंवार कोट करतात पण नामदेव , गोरा कुंभार अभावानेच दिसतात
त्यामुळेच टिळकांच्या मृत्यूनंतर टिळकांना दुसरे संत रामदास म्हणून टिळकांच्या अनुयायांनी वारंवार गौरवलेलं आहे ह्याउलट गांधींना मात्र गौतम बुद्ध म्हणून हिणवलेलं आहे रामदास विरुद्ध गौतम बुद्ध ही प्रतिकात्मता आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून पुढे अधिकच ठळक केली किंबहुना १८६० ते १९९० ह्या कालखंडात महाराष्ट्राचे व भारताचेही सार्वजनिक जीवन रामदास विरुद्ध बुद्ध ह्या ह्या प्रतीकात्मक संघर्षात बुडालेले आहे त्यात टिळक सावरकर संघ आणि भाजप हे रामदास पंथी आहेत तर गांधी नेहरू आंबेडकर हे बुद्धपंथी आहेत रामदासांनी अतिशय पद्धतशीरपणे हनुमानाला शिवअवतार घोषित करून हनुमानाच्या नावे संघटन केले नव्या रामदासांनी मोदींच्या रूपाने नवा हनुमान शैवांच्यातून निर्माण केला आहे दुर्देव इतकेच आहे कि हे समजून न घेता बुद्धपंथी आपापसात खूप भांडत बसलेत मुळात हा सूरआर्य विरुद्ध असुर आर्य ह्यांच्यातील प्राचीन संघर्ष आहे जो नवे रूप घेऊन आपल्या आसपासच वावरतो आहे
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ९९
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप आणि महाभारत २७ (कृष्ण पांडव जन्माच्या तीन कथा )
श्रीधर तिळवे नाईक
आपण टिळकांच्या तत्त्वज्ञानाच्या तिसऱ्या टप्प्याची चर्चा करत आहोत जिथे रामायण आणि महाभारत महत्वाचे ग्रंथ आहेत पहिल्या टप्प्यात पेशवाई महत्वाची होती दुसऱ्या टप्प्यात वैदिकता महत्वाची ठरली तर तिसऱ्या टप्प्यात महाकाव्यात्मकता महत्वाची ठरून पुढे टिळक गीतारहस्याच्या चौथ्या टप्प्यात पोहचतात ह्या सर्वच टप्प्यांचा कणा हिंदुत्ववादी आर्यन राष्ट्रवाद आहे जो पुण्ययोनीकेंद्रित आहे
वैद्य महाभारताला वैष्णव धर्मग्रंथ म्हणून थांबत नाही तर ते महाभारताला वैष्णवांची स्मृती म्हणजे कायदाव्यवस्था मानतात ह्याचा एक अर्थ असाही होतो कि वैदिक धर्माचे धर्मग्रंथ वेद ब्राम्हण धर्माचे मुख्य ग्रंथ ब्राम्हण आरण्यके आणि स्मृती तर वैष्णव धर्माचे वैष्णव उपनिषदे , रामायण ,महाभारत व पुराणे हिंदुत्व हे ह्या वैष्णव धर्माचे पुढील रूप आहे ज्यात पुढे वैष्णव संतपंतपंडित काव्याची भर पडली आणि बहुतांशी हिंदू हे ह्या वैष्णव संतपंतपंडित साहित्यालाच कवटाळून आहेत मराठीत चक्रधर , ज्ञानेश्वर , नामदेव ,तुकाराम , एकनाथ , रामदास , श्रीधर वैग्रे ह्यांच्या साहित्याच्या आधारेच हिंदू धर्म उभा आहे आपण जर बारकाईने संतपंतपंडित साहित्य वाचले तर ते वैष्णव उपनिषदे , रामायण ,महाभारत व पुराणे ह्याचाच विस्तार असल्याचे सहज लक्ष्यात येते एकही शैव ग्रंथ मराठी एलिट लोकांच्या केंद्रस्थानी नाही हे सहज लक्ष्यात यावे
आपण साधी कर्णपांडवद्रौपदी व कृष्ण बलराम जन्माची कथा बघितली तरी मूळ वैदिक कथा मग वैष्णव कथा आणि मग हिंदू कथा असा क्रम दिसतो मूळ वैदिक कथेत पांडव हे सूर्य इंद्र अग्नी वायू अश्विन ह्या वैदिक देवतांच्यापासून कर्ण -पांडवांचा जन्म झाला असे दिसते पण मग नंतर वैष्णव कथा येते ती वैद्य पुढीलप्रमाणे देतात
It is the third version most probably adjusted by Sauti Therein
the oppressed earth goes to Brahma who directs all
gods to go down to the earth and be born as mortals
They then all go to Narayana, and Indra implores him
to be boofon the earth by Amsha, and they make a
compact and the gods are born by Amsha or portion
only m the families of Kings and Brahmdnas In the
list given hereafter Balrama is said to be bom of Shesha
and Draupadi is said to be born of Shachi, the wife of
Indra The sixteen thousand wives of Krishna are
here said to be born of the Apsaras by the order of Indra
In Chapter 5 of the Swargarohana Parva the actors are
said to have returned after death to the respective deities
from whom they spiang These women arc said after
death to have been united with the Apsaias, a thing
which we can scarcely reconcile with the statement
about some of them referred to above
वैद्य ह्याचे श्रेय सौतीला देतात माझ्या मते हा व्हर्जन वैशंपायनचा असावा कारण हिंदू धर्म नंतरचा व्हर्जन आहे आणि लेखकांचा क्रमही व्यास वैदिक ,वैशंपायन वैष्णव व सौती हिंदू असा आहे , पुढे शिवाला इन्व्हॉल्व करणारी कथा पुढीलप्रमाणे येते
The gods once performed a sacrifice at
which the god of death officiated as the Sharnitia (killer)
Mortals consequently did not die
and multiplied immensely
Indra and others being afraid went to
Prajapati and said
" We are afraid of men for, there
is now no difference between mortals and immortals
"
Prajapati replied "When the god of death will finish
his work he will destroy men "
Indra went to see
the sacrifice and on the way saw a golden lotus coming down
the Ganges Wishing to know whence it came,
he went to the source and saw a beautiful woman
weeping an$standing in the stream to take water Her
a tear fell in the stream and became a golden lotus immediately
Indra asked her why she wept^ancTshe requested
him to follow her He saw Shiva with his wife playing
at dice and being disregarded exclaimed "
I^am
the Lord
of the Universe
" Shiva looked at him and only
laughed Indra raised his hand but it as made motionless
Shiva then said
," You are proud Look into
that cave There are four previous Indras confined
there Go >ou all to the earth and be born of mortals
This damsel who is the prosperity of heaven \ull be
your wife
"
Indra trembled and consented, They
then went to Narayana, the Lord of the Universe, and
told him what had happened He too snatched two
hairs, one white and the other black, from his body and
they \\ere laid in the womb of Devaki and Rhohini, the
two queens of Vasudeva Thus were born Bahama,
the white, from the white hair and Krishna from the
black one The fi\e Indras became the five Pandavas
and the Laxmi of heaven is Draupadi The commentator
explains that the word hair meant semen and that
Krishna was born directly of Han or Nara}ana He
trues in this way to explain the apparent discrepancy
from the modern belief, Mz, that Krishna was a full and
not a partial Avatara But other discrepancies still
remain Bahama is not now believed to be an Avatara of
Vishnu, though in the above he is shown to be as full an
Avatara as Krishna himself Moreover there is not that
Subordination of Prajapati and of Shiva to Vishnu in
the above account which is to be found m the usual version
The Pandavas too are all looked upon as Indras
and Draupadi is merely the prosperity of heaven
महाभारत देवसुर आर्यांच्या हितसंबंधानुसार विकसित होत गेलेले महाकाव्य आहे आणि त्याचा पुरावा कृष्णपाण्डव जन्मकथांच्यात आढळतो वैदिक इंद्राचे महत्व पूर्ण घटले आहे हे स्पष्टच आहे अगदी शिवसुद्धा तुझ्यासारखे चार इंद्र आत गुहेत पडले आहेत असे म्हणतो
मेगॅस्थेनिसचा हेरॅक्लिस हा श्रीकृष्ण असल्याचा ते सांगतात कारण हेरॅक्लिसने मथुरा शहर स्थापन केले असे मेगॅस्थिनीसने म्हंटले आहे असा युक्तिवाद ते करतात वास्तविक मथुरेला कृष्णाचा जन्म झाला असे खुद्द महाभारतच सांगते त्यामुळे मथुरेचा संस्थापक हाच हेरॅक्लिस असला पाहिजे आणि तो श्रीकृष्ण नक्कीच न्हवता कारण परंपरेनुसार कृष्ण मथुरेची स्थापना झाल्यानंतर जन्मला असे वैद्यांच्याच पद्धतीने तर्काने म्हणता येते खुद्द रामायण मथुरेचे नाव मधुपूर होते आणि नंतर मथुरा झाले असे सांगते म्हणजे रामायण काळातच मथुरा होती
महाभारतात श्रीकृष्णाची एन्ट्री ही खूप उशिरा होते कुंतीचा पुतण्या म्हणून तो आपल्या आतेभावांना भेटायला येतो आणि मग त्यांच्या आयुष्याचे अनेक महत्वाचे निर्णय तो घ्यायला लागतो खांडववन जाळताना तो फक्त झाडे जाळत नाही तर जंगलातले पशु आणि नाग लोकही जाळतो ह्यात फक्त तक्षक वाचतो हजारो माणसांना जिवंतपणी जाळणारा मनुष्य काय आहे हे सांगायची गरज नाही महाभारतातला मूळ कृष्ण अत्यंत निर्दयी, हिंसक क्रूर आणि कसलीही नैतिकता नसलेला आहे त्यामुळेच क्रूर देवसुर आर्यांना तो आवडतो किंबहुना तो त्यांचा आदर्श आहे
पांडवांच्या राजसूययज्ञात तोच मुख्य अग्र आहे असे युधिष्टिर सांगतो आणि भीष्म त्याचा उल्लेख विष्णूचा अवतार असा करतात शिशुपाल ह्या सगळ्या प्रकाराला विरोध करतो आणि ज्येष्ठत्वाची कसोटी मांडतो जी कोणी स्वीकारत नाही आणि तरुण श्रीकृष्ण मुख्य बनतो आणि मग शिशुपालाचा वध श्रीकृष्ण करतो वैशंपायन नंतर सुदर्शन चक्र वैग्रे चमत्कार जोडतो आणि संपूर्ण महाभारतच वैष्णव महाकाव्य बनते
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १००
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप आणि महाभारत २८
श्रीधर तिळवे नाईक
महाभारताबाबत एक प्रश्न टिळक शिताफीनं टाळतात तो म्हणजे ओरिजनल संस्कृतमधील रामायण महाभारत व पुराणे ब्राम्हणेतरांना वाचायची अनुमती आहे कि नाही ? हा प्रश्न निर्माण होतो कारण नवव्या शतकात ब्राम्हणांनी देवसुर परंपरेतील संस्कृत ग्रंथ वाचावयास केलेली बंदी ! ह्या बंदीमुळेच पुढे ज्ञानेश्वरांना गीता मराठीत आणावी लागली आणि गीतेचे मराठीकरण करायला ब्राम्हणांनी मनाईच केली एकनाथांनी पुढे रामायणाचे मराठीकरण केले म्हणजे निगम संस्कृत वाङ्मय फक्त ब्राम्हणांनीच वाचले पाहिजे अशी ब्राम्हणांनी धर्माज्ञांचं काढली ह्याउलट ह्या काळात शैव, जैन व बौद्ध धर्मग्रंथ मात्र सर्वांनाच वाचायला खुले होते म्हणजेच ज्याला आज आपण हिंदू धर्म म्हणतो तो मार्गी न्हवे तर देशी भाषांनी देशी संतांनी देशी भाषेत जन्माला घातलेला धर्म आहे असे म्हणता येईल आणि हा आयता तयार झालेला हिंदू धर्म हायजॅक करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे हिंदुत्व
हे काही प्रथम घडतंय का तर नाही शैवांच्या मोक्ष संकल्पनेची उचलेगिरी करायची पण शैवांचा उल्लेख टाळायचा हा उद्योग थेट कपिल बुद्ध पासून सुरु होतो पुढे तंत्र आणि पूजा ह्यांची उचलेगिरी करायची पण ह्या गोष्टी आपणच सुरु केल्या अशा थाटात सादरीकरण करायचे असा वैदिकांचा सनातन धंदा आहे अलीकडे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची चोरी करण्याची खटपट अशीच दयनीय पद्धतीने चालू आहे बरं ह्याबाबतीत पुरोगामी ब्राम्हणांचेच खून करायला मागेपुढे पाहीले नाही तिथे ब्राम्हणेतरांची काय खैर ? कट्टर वैष्णव असलेल्या तुलसीदासालासुद्धा ह्या लोकांनी मंदिरातून हाकलून काढले आणि त्याला मंदिरासमोरच्या मशिदीत जाऊन रहावे लागले तिथे ज्ञानेश्वर चक्रधरांची काय खैर ?
साहजिकच प्रत्येक देशी निर्मितीचे देवसुरनायझेशन आर्यनायझेशन , ब्राम्हनायझेशन व संस्कृतायझेशन करून ती आर्यांचीच म्हणण्यात आर्य निपुण आहेत
तुम्ही म्हणाल संस्कृतायझेशनचा आर्यनायझेशनचा ब्राम्हनायझेशनचा टिळकांशी काय संबंध तर तो थेटच दिसतो टिळकांच्या मराठी लेखनात सर्वत्र संस्कृत क्वॉटेशनची पखरण आहे पण टिळक ह्या काळातल्या कट्टर ब्राम्हणाप्रमाणे कुठंही त्या संस्कृतचा मराठी अनुवाद वा भाषांतर देत नाहीत किंवा विवरण करत नाहीत ह्याचे दोन अर्थ होतात
पहिला टिळक फक्त ब्राम्हणांसाठी लिखाण करतायत आणि ब्राम्हणांना संस्कृत समजतं असं गृहीत धरतात
किंवा दुसरा संस्कृत ही भाषा अजूनही ब्राम्हण वर्णासाठीच असलेली देवभाषा असल्याने तीच्यात काय लिहिलंय ते ब्राम्हणेतरांना समजण्याची गरज नाही असे ते गृहीत धरतात
कदाचित ह्या दोन्ही गोष्टी त्यांना अभिप्रेत आहेत
प्रश्न असा येतो कि मग स्वतःचे लेखन ते मराठीत का लिहितात ? टिळकांनी गीतारहस्य मराठीत लिहिले आहे हे बघण्याजोगे आहे ह्याचा अर्थ ते सामान्य माणसांशी कनेक्ट राहू इच्छितात वेदांवरचे लिखाण इंग्लिशमध्ये करणारे टिळक गीतारहस्य मात्र मराठीत लिहितात ह्याचा अर्थ टिळक हळूहळू बदलत चाललेत असा होतो ह्या प्रक्रियेला मी डीदेवसूरनायझेशन डीआर्यनायझेशन डीसंस्कृतायझेशन व डीब्राम्हणायझेशन म्हणतो टिळकांच्याबाबत ह्या चारी प्रक्रियांची सुरवात झाली होती असे दिसते दुर्देवाने त्यांचे खूप लवकर निधन झाले टिळक जगते तर खूप क्रांतिकारक झाले असते असे म्हणावयास निश्चितच वाव आहे
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १०१
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप , देशीवाद आणि महाभारत २९
श्रीधर तिळवे नाईक
वैद्यांच्या मते महाभारताचा उद्देश पांडवांची कथा सांगणे हा नसून भारतयुद्ध हा त्याचा विषय आहे टिळकांना हे मान्य होणे अटळ कारण खुद्द टिळक भारतीय जनतेला जी पांडव होती तिला वनवासात पाठवणारे कौरव म्हणून इंग्रजांना पहात होते आणि आज ना उद्या ह्या कौरवांशी लढावे लागेल हे जाणत होते
वैद्यांना वाटणारे महाभारताच्या थोरवीचे अप्रूप समजण्यायोग्य आहे सौती स्वतःच महाभारताला वटवृक्ष म्हणतो जिथे इतर कवी विश्रांती घेण्यासाठी येतात अपवादात्मकवेळा वैद्यांची शब्दरचना काही वेळा विचित्र आहेत म्हणजे ते कुंतीला व द्रौपदीला राजपूत म्हणतात आता ते ऑड वाटते
आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे वळू तो मुद्दा म्हणजे देशीवाद व महाभारत ह्यांचा संबंध
देशीवादाची जी काही तत्वे आहेत ती आपण पाहिली तर देवसुर आर्य पक्के देशीवादी आहेत असा भास होतो प्रत्यक्षात मार्गी आणि देशी ह्यांचा समतोल महाभारतात आहे हे आपणाला सहज कळेल एकीकडे आर्यांच्या वर्चस्ववादी मार्गी तऱ्हांच अमानुष समर्थन महाभारत करते तर दुसरीकडे इथल्या शैव संस्कृतीला आत्मसातही करते
१ देशीवादाच्या मते लेखकाने परंपरेत ठामपणे उभे रहायला हवे व्यास , वैशंपायन आणि सौती हे आपली देवसुर आर्यन परंपरा अजिबात सोडत नाहीत ते ह्या आर्यन परंपरेत ठामपणे उभे राहतात प्रश्न असा आहे कि ही परंपरा शोषकांची असेल तर ! देशीवाद ह्याबाबत गप्प बसतो तो गृहीतच धरतो कि परंपरा शोषितांची असते पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती उलटी असते माझ्या मते परंपरा ही प्रामुख्याने शोषकांच्याच मालकीची असते आणि शोषित नेहमी परंपरेच्या भक्ष्यस्थानी असते खांडववन जाळताना म्हणूनच आदिवासींच्याबाबत कृष्ण मुर्दाड असतो पुढे घटोत्कच ह्या अवैदिकालाही असेच बळी चढवले जाते महाभारत म्हणजे अथपासून इतिपर्यंत ब्राम्हण आणि क्षत्रिय ह्या पुण्ययोनींनी केलेले पापयोनीचें व अयोनिचे म्हणजे वैश्य शूद्र अतिशूद्र व आदिवासी ह्यांचे शोषण !
२बाहेरील गोष्टींचे देशीकरण करणे हे देशीयतेच्या सातत्यात आवश्यक असते हे देशीकरण देवसुर आर्य सतत करतात उदा वैद्य पुढे ज्या उपमन्यु उपाख्यानची चर्चा करतात ते उपाख्यान पाहू ज्यात कृष्ण शिवाची आराधना करतो आहे आणि जांबुवंतीसाठी पुत्र मागतो आहे ही सौतीची भर आहे हे स्पष्ट आहे इथेच हिंदूंच्या ब्रम्हा विष्णू आणि रुद्र ह्या त्रिदेवांचा उल्लेख येतो तिसरा देव मूलतः रुद्र आहे हे ध्यानात घेण्याजोगे आहे ह्या रुद्रालाच पुढे शंकराचा जामानिमा घालण्यात येऊन शंकराचे देशीकरण घडवून आणून त्याला आर्य दैवत बनवण्यात आले शैवांचा शंकर वेगळा आणि हिंदू त्रिदेवांतील रुद्र वेगळा आणि वैदिकांना हे नीट माहित आहे वैदिक प्रत्येक शंकराच्या देवळात पुढे महारुद्र का लावतात ते इथे स्पष्ट व्हावे हीच गोष्ट मोक्षाची ही संकल्पना शैव असली तरी ती पुढे पूर्ण स्वीकारण्यात आली देवसुर वेदांच्यात मोक्ष शोधावा लागतो कारण तो तिथे नाही पुढे शैवांशी संपर्क आल्यावर मोक्षाचे ज्ञान सुरु झाले म्हणजे कठोपनिषदात ज्या यमाला आर्य घाबरतात त्याच यमाकडून मोक्षज्ञानाची प्राप्ती झाल्याचे दिसते श्वेताश्वेतर उपनिषद तर उघडपणे शैव आहे संस्कृत उत्कर्षाला पोहचल्यावर हे ज्ञान संस्कृतमध्ये प्रवेश करते झाले आणि मोक्षाच्या देवसुरायानेझेशनची व संस्कृतायझेशनची सुरवात झाली अवेस्तन असुर आर्यांचा संपर्क तुटला तर त्यांना मोक्षाची कल्पना आत्मसात करावीशी वाटली नाही असे दिसते
आर्यांनी शैवांच्या सगळ्या बौद्धिक गोष्टींचे आर्यीकरण घडवले आणि आज अशी अवस्था आहे कि खुद्द शैवांना त्या आर्यांच्याकडून शिकाव्या लागतील कि काय अशी शंका यावी .
३ वैद्य महाभारतातील शिवाच्या उल्लेखाची अनेक उदाहरणे देतात पण ही उदाहरणे देताना ते कळत नकळत वैष्णव आणि हिंदू अशी फारकत करतात आणि त्यांना ते कळत नाही त्यांचा अंतिम निष्कर्ष मात्र महाभारत हे वैष्णव आहे हाच आहे आणि मी त्याच्याशी सहमत आहे
४ आर्य शैवांची प्रत्येक चांगली गोष्ट आत्मसात करत असतांना शैवांना आर्यांच्यात एकही चांगली गोष्ट का दिसली नाही किमान आर्यांचा आक्रमकपणा शिकायला काय हरकत होती
असो महाभारत व रामायण (विशेषतः महाभारत अधिक ) हे भारतीय स्वातंत्र्ययुद्धाच्या सतत केंद्रस्थानी राहिलेले ग्रंथ आहेत म्हणून त्याची इतक्या विस्ताराने चर्चा केली काव्याच्या पातळीवर मात्र हे जगातले सर्वश्रेष्ठ एपिक आहे ह्याविषयी माझ्याही मनात शंका नाही
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १०२
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप , युरोपियन आर्य विरुद्ध भारतीय आर्य ह्यांच्यातील महाभारत ३०
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या चळवळीत सातत्यानं रामायण व महाभारताचा झालेला प्रतीकात्मक वापर ! रानडे ,गोखले , टिळक , अरविंद घोष , गांधी हे आपापसात कितीही भांडत असले तरी प्रत्येकजण गीतेचा उल्लेख धर्मग्रंथ म्हणून करत होता
भारतात रामायण महाभारताची लोकप्रियता ही मुस्लिम काळात प्रचंड वाढली विशेषतः मुस्लिम काळात रामायण हे सर्वाधिक भाषांतरित व रूपांतरित झालेले महाकाव्य आहे आणि बहुतांशी ठिकाणी महाभारताचे सुभद्राहरण , गीता , नल दमयंती अशी उपाख्याने वा आख्यान तुकडे भाषांतरित झालेले दिसते कारण संपूर्ण महाभारत अनुवादित करणे वेळखाऊ होते भारतात एक अजिबोगरीब अंधश्रद्धा मी माझ्या भारत भटकंतीत पाहिली होती ती म्हणजे घरात महाभारत ठेवले कि घरात भावाभावांच्यात भांडणे होतात साहजिकच संपूर्ण महाभारत आजही अनेक भारतीय घरात ठेवत नाहीत मुस्लिम कालखंडात मुस्लिम राजे हे शत्रूवत वाटत असल्याने त्यांना रावण म्हणून पाहणे शक्य होते अकबराचा अपवाद वगळता हिंदूंशी कनेक्ट झालेला राजाच न्हवता परिणामी उत्तरेत तुलसीरामायणाने जबरदस्त लोकप्रियता प्राप्त केली
इंग्रजांच्या काळात गोष्ट वेगळी होती सुयोधन हा राजा म्हणून उत्तम होता ब्रिटिशांच्याबाबत हीच भावना होती ह्यातच आर्य आक्रमणाच्या सिद्धांताने उचल खाल्ली आणि भारतीय आर्यांना युरोपियन बिछडे हुए भाई वाटू लागले त्यामुळे हे युद्ध दोन शत्रूंच्यातले नसून दोन भावांच्यातले झाले आणि स्वातंत्र्य चळवळ महाभारत झाली ह्या चळवळीचा पहिला श्रीकृष्ण टिळक तर दुसरा गांधी होते आणि दोघे रणांगणात उभे राहून भारतीय जनतेला स्वातंत्र्याची गीता सांगत होते ह्यात कधीकधी विनोदी विरोधाभासही होता म्हणजे गांधी एकीकडे रामराम करत आणि आवडता ग्रंथ म्हणून गीता घेऊन फिरत
अपवादात्मकवेळा भारत देश म्हणजे सीता अशी कल्पना केली गेली पण त्यापेक्षा भारत म्हणजे भारतमाता हीच कल्पना जास्त प्रचलित झाली
पुढे पुढे गांधीजींची वैष्णवांच्यापासून फारकत सुरु झाली तशी गांधींची भाषाही बदलायला लागली ते माझा राम माझ्या अंतःकरणातला राम आणि रामायणातील राम वेगळे आहेत असं सांगू लागले सामान्य माणसांच्यापुढे प्रतीक म्हणून ठेवलेल्या गोष्टी भारतीयांच्या आता इतक्या डोक्यात गेलेत कि ही दोन महाकाव्ये हीच हिंदूंचे धर्मग्रंथ बनली आहेत रामायण आणि महाभारत ह्यां दोन सिरियलची लोकप्रियता ही स्वातंत्र्य चळवळीच्या देणगीची कंटिन्यूटी आहे
स्वातंत्र्यानंतर काळ बदलला आता महाभारत कामाचे न्हवते उलट काँग्रेसला रावण म्हणून प्रोजेक्ट करणे गरजेचे होते प्रश्न होता कसे ? सुरवातीला काँग्रेसच्या काळात जनसंघाने काँग्रेसची राजवट म्हणजे जणू मुस्लिम लोकांचीच राजवट आहे असा प्रचार सुरु केला त्यासाठी नेहरू घराणे मुस्लिम होते असे सांगायला सुरवात केली पण त्याने काही साध्य होईना मग स्वातंत्र्य चळवळीतील महाकाव्यांच्या प्रतीकात्मक वापराचे भाजपने प्रत्यक्ष वापरात रूपांतर करायला सुरवात करून राम जन्मभूमी आंदोलन पेटवले ह्या आंदोलनाने काँग्रेस ही हिंदुहितविरोधी संघटना असल्याचे सिद्ध झाल्याचा प्रचार सुरु झाला आणि राम विरुद्ध काँग्रेस असे कुरुक्षेत्र उभे करण्यात आले ह्याचा जो परिणाम अपेक्षित होता तो झाला आणि भाजपने स्वतःसाठी राजकीय अवकाश उपलब्ध करून घेतला एका अर्थाने आद्यहिंदुहृद्यसम्राट टिळकांच्या महाकाव्यात्मक हिंदुत्वाची ही अंतिम परिणीती होती ज्याची कल्पना खुद्द टिळकांनीही केली नसेल
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १०३
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप : महाभारताकडून खऱ्या भारताकडे ३१
श्रीधर तिळवे नाईक टिळक एकीकडे महाभारतावर विचार करत होते आणि दुसरीकडे भारत दौरा करत होते ह्या दौऱ्यातच त्यांना त्यांच्या द्विध्रुवात्मकता सापडायला लागल्या मी मागेच म्हंटल्याप्रमाणे टिळकांना इंग्रज रावण न्हवे तर दुर्योधन वाटत होता एका लेखात त्यांनी म्हंटले आहे कि इंग्रजांच्या राज्यामुळे
१ शांतता
२ कायद्याची सर्वत्र व्यवस्था
३ अपराधांचा बंदोबस्त
४ सार्वजनिक आरोग्य
५ व्यापारसमृद्धी
६ शेतकी सुधारणा
७ खनिज व उद्भिज संपत्तीची अभिवृद्धी
८ विद्यादानाच्या अनुपम सोयी
९ स्वराज्य कारभाऱ्यांनी प्राप्ती
१० लेखनस्वातंत्र्य
११ यंत्रादी सुखसामुग्रीचा परिचय
१२ स्वातंत्र्याची अभिरुची
ह्या गोष्टी प्राप्त झाल्या असे खुद्द टिळक म्हणतायत (लोकमान्य टिळकांचे लेख खंड १ पान ७१ ) तरीही टिळकांना इंग्रज राज्य नको आहे आणि फुलेंना ते हवे आहे कारण फुल्यांना वरील १२ गोष्टी हव्या आहेत टिळक कायद्यापुढे सर्व भारतीय समान हा फायदा विचारात घेत नाहीत पण फुल्यांना तो फार महत्वाचा वाटत होता
टिळकांना इंग्रज शत्रू वाटत नसले तरी दख्खन दौऱ्यात त्यांना त्यांची पहिली द्विध्रुवात्मकता पहिली बायनरी सापडली आणि साहजिकच त्यांनी ती लिप्यांचा विचार करताना केलेल्या भाषणात मांडली
अशा प्रकारची द्विध्रुवात्मकता ही कुठल्याही संघर्षासाठी आवश्यक असते म्हणजे मध्ययुगात यवन विरुद्ध हिंदवी अशा रूपाने ती मांडण्याचा प्रयत्न केला गेला होता प्रत्यक्षात दोन्ही बाजूनां यवन व हिंदवी होते कारण ही मुळात हिंदवी शासक समुदाय विरुद्ध यवन शासक समुदाय ह्या दोन शासक समुदायातील लढाई होती ह्यातील हिंदवी शासक समुदाय हा स्वतःच्या धर्माशी अजिबात प्रामाणिक न्हवता कारण बहुतांशी हिंदवी समुदायाला बांधेल अशी कायदा पद्धत हिंदवी समुदायाकडे न्हवती त्याउलट यवन शासक समुदायाकडे सर्वांना लागू करायला एक शरीयत कायदा पद्धत होती हिन्दवी वाल्यांच्याकडे अनेक देव होते यवनांकडे एक देव होता त्यामुळे धार्मिक बाबतीत यवन समाज तुलनेने एकसंध होता हिंदवीच्याकडे वर्ण व जातीचं जाती होत्या यवन मुस्लिम ही एकच कौम मानत होता शत्रूशी लढण्याबाबत हिंदवी काही नैतिकता बाळगून होता जी कालबाह्य आणि रोमँटिक होती तर यवन नैतिकता शत्रूबाबत रियॅलिस्टिक आणि नृशंस होती फालतूचे अध्यात्मिक फुगे उडवण्यात तिला रस न्हवता हिंदवी विषमतेने माखलेली स्त्रियांची थोडीही इज्जत न करणारी तयांना सती पाठवणारी विधवांना विवाह नाकारणारी संस्कृती होती तर यवन स्त्रियांनाही प्रॉपर्टीचे अधिकार देणारी शिकण्यास व व्यापार करण्यास अनुमती देणारी विधवांना विवाहाची अनुमती देणारी होती तत्कालीन दोन शासक संस्कृतीत यवन शासक समुदायाची संस्कृती सरळ सरळ उजवी होती ह्या दोन संस्कृतीत जी प्रगत होती ती जिंकली पुढे जेव्हा बसवेश्वर शिवाजी व नानक शिखांनी तोडीसतोड संस्कृती जन्माला घातली तेव्हा यवन पराभूत होऊ लागले आणि मराठा व शीख सत्ता विजयी होऊ लागल्या
टिळकांच्या पुढे प्रश्न ह्या दोन संस्कृतीत चालत आलेल्या द्विध्रुवात्मकतेचा जसा होता तसाच नवीन काळात द्विध्रुवात्मकता कशी द्यावी असाही होता कारण त्यांच्या आधी महात्मा फुलेंनी अत्यंत उघडपणे दोन द्विध्रुवात्मकता जन्माला घातल्या होत्या
१ आर्य विरुद्ध अनार्य
२ ब्राम्हण विरुद्ध ब्राम्हणेतर
म्हणजेच टिळकांच्यापुढे
१ यवन विरुद्ध हिंदवी
२ आर्य विरुद्ध अनार्य
३ ब्राम्हण विरुद्ध ब्राम्हणेतर
अशा तीन द्विध्रुवात्मकता प्रबळपणे समोर आल्या होत्या आणि टिळकांना त्यांचा सामना प्रमुख राष्ट्रीय पुढारी म्हणून करणे भाग होते
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १०४
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप : महाभारताकडून खऱ्या भारताकडे ३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा