हिंदुत्ववादाचे दहा टप्पे श्रीधर तिळवे नाईक 

हिंदुत्ववादाचे दहा  टप्पे आहेत 


१ ग्रंथकेंद्रीयता प्रथम एक ग्रंथ केंद्रीय म्हणून प्रस्थापित करणे प्रथम वेद केंद्रीय ग्रंथ म्हणून वैदिक धर्माने आणले व १८६० नंतर महाभारतातील गीता ह्यां ग्रंथास  हिंदूंचा केंद्रीय ग्रंथ म्हणून स्थिर केले गेले आणि त्याचा एक भाग म्हणून टिळकांचे व वैद्यांचे विवेचन येते 

२ दुसऱ्या टप्प्यात  कायदे म्हणून स्मृती व  एक मांसल व्यक्तीसमूह  केंद्रीय असायला हवा  म्हणून ब्राम्हण  हा केंद्रीय व्यक्तिसमूह म्हणून ब्राम्हणधर्माने स्थिर केला ज्याला कपिल महावीर बुद्ध ह्या तिघांनी हलवले व हादरवलेही 

३ पुढे मग कपिल महावीर बुद्ध ह्या त्रयीला हलवण्यासाठी तीन देवता केंद्रीय हव्यात म्हणून प्रथम राम कृष्ण विष्णू अशी वैष्णव त्रयी प्रस्थापित केली गेली आणि नंतर ब्रह्मा विष्णू महेश ही त्रयी हिंदू त्रयी आणली गेली 

४ ह्या तिघांच्या संघव्यवस्थेला छेद म्हणून शक्तिपीठे रिप्लेस करून  शंकराचार्यांचे मठ प्रस्थापित केले गेले आणि धार्मिक प्रमुख म्हणून शंकराचार्य केंद्रीय केले गेले व पुढे ह्या मठातून शैव धर्म व त्याचे आगम ग्रंथ हटवून तिथे वैदिक ग्रंथ आणले गेले पुढे समुद्रपर्यटनबंदी करून वैश्यांना कंगाल केले गेले तर परशुरामाने सर्व क्षत्रिय मारले असा कांगावा करून कलियुगी क्षत्रिय वैश्य उरलेत कुठे असा प्रश्न विचारत ब्राम्हण व ब्राम्हणेतर अशी द्विवर्णीय हिंदू व्यवस्था प्रस्थापित केली गेली व पुढे मुस्लिमांना क्षत्रिय म्हणून स्वीकारून त्यांच्या राज्यातील सेवाक्षेत्रें स्वीकारली 

५ पुढे ब्रिटिश आल्यावर तिथेही सेवाक्षेत्रे  बळकावली मग सत्तेची व्याप्ती वाढवत राजकीय पाय रोवले व पुढे केंद्रीय राजकीय  हक्क मागावयास सर्वसमावेशक संघटना  हवी म्हणून प्रथम काँग्रेस ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला  आणि टिळकांच्या मृत्यूनंतर ते अशक्य आहे हे लक्ष्यात आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन करण्यात आला 

६ मग राजकीय पक्ष  हवेत  म्हणून प्रथम हिंदू महासभा मग जनसंघ मग  भाजप आणला गेला 

७ मग भारतात केंद्रीय राजकीय नेतृत्व प्रमोट केल्याशिवाय सत्ता मिळत नाही हे लक्ष्यात आल्यावर म्हणून प्रथम वाजपेयी मग अडवाणी मग मोदी पंतप्रधानांचे उमेदवार म्हणून प्रमोट केले आणि सत्तेवर आणले गेले

ह्यापुढचा आठवा टप्पा स्वतःचा अर्थव्यवहार निर्माण करणे हा आहे  आणि मुकेश अंबानी हे पहिले पाऊल म्हणून प्रमोट केले आहे नवव्या टप्प्यात  सर्व अर्थव्यवहार स्वतःच्या हातात एकवटवणे हे असेल अंबानी अदानी वैगरे सर्वांना हटवले जाईल  आणि शेवटी दहाव्या टप्प्यात  हिंदू स्टेट कॅपिटॅलिझम आणण्याचा चायनाप्रमाणे प्रयत्न केला जाईल

SHRIDHAR TILVE NAIK


दुसऱ्या नवतेनं सत्यकथेच्या रूपात टोकाचा मार्गिवाद गाठला म्हणजे सत्यकथेतल्या लेखक समीक्षकांना अनेकदा यूरोपमध्ये काय चाललंय हे माहीत असायचं पण आपल्या आणि आपल्या आसपासच्या राज्यात काय चाललंय ते माहीत नसायचं हा साहित्यिक नेहरूवाद होता ज्याच्याबद्दल माओ म्हणाला होता कि नेहरूंना कुणीतरी सांगा भारत आशियाचा भाग आहे युरोपचा नाही आजही हा सत्यकथावाद ओसरलाय असं नाही युरो अमेरिकेत गेलो म्हणून फोटो टाकणारे आणि त्या फोटोला लाईक देणारे प्रचंड आहेत माझी यूरोअमेरिकेला जायला हरकत नाही पण आपण ज्या देशात राहतोय त्याच्यावर फोकस ठेऊन ! युरोअमेरिकन आर्टिस्ट आपल्या देशावरचा फोकस कधी हटवत नाहीत एव्हढी तरी अक्कल आपण त्यांच्याकडून शिकावी कि ! ह्याला उतारा म्हणून नेमाडेंनी देशीवाद मांडला ज्याचा इतका स्वदेशावर फोकस वाढला कि ह्यांना जगात काय चाललंय त्याच्याशी देणंघेणं उरलं नाही हे दुसरे टोक होते सर्वात वाईट म्हणजे नेमाडेंच्या देशीवादाला देशी संस्कृतीतल्या एलिट शासक कास्टचं आवरण चढत गेलं आणि पोटी संस्कृतीतून आलेल्या दलित व स्त्रीवादी साहित्याची जमीन एलिट असेल तरच त्याला मान्यता देण्याचा खेळ सुरु झाला जमातीतून आलेले भुजंग मेश्रामासारखे लेखक प्रमोट केले गेले ते देशी संस्कृतीचा भाग म्हणून मात्र ते देशी संस्कृतीचा कसा काय भाग आहेत हे काही कुणी समजावून सांगितलं नाही जी के ऐनापुरे म्हणतात तसं साहित्य अकादमी पारितोषिक कधी दलित लेखकांना देण्यात आलंच नाही आता हे खरं असेल तर (मी पारितोषिकांचे हिशेब ठेवत नाही कारण मला त्यांच्याशी देणंघेणंच नाही म्हणूनच हे खरं असेल तर असं म्हणतोय ) ब्राम्हणांची सत्ता जाऊन क्षत्रियांची आली एव्हढंच कुलकर्णी जाऊन पाटील आले एव्हढंच असं म्हणावं लागतं वैष्णव पाटील पूर्वीपासूनच ओबीसींना औकातीत रहा म्हणायचे म्हणजे तुम्ही औकातीत रहात असाल तर आम्ही तुम्हाला पारितोषिकं देऊ आणि ढसाळांसारखा एखादा हे राजकारण समजून नकार देत असेल तर आणि त्याचा ग्रेटनेस नाकारता येत नसेल तर त्याला आम्ही स्पेशल पारितोषिक देऊ


हे सगळं राजकारण सुरवातीपासूनच लक्ष्यात आल्याने चौथ्या नवतेनं ही दोन्ही टोकं नाकारली आणि मार्गी देशी पोटी जमाती ह्यांच्या सम्यक भानाची मागणी केली पण माझ्या काही समकालीनांना ती भावली नाही ह्यातील काहींनी आंतरराष्ट्रीय मान्यतेची सत्यकथा पुन्हा गिरवली आणि त्यांना ती पावलीही आणि चवलीही ! आता एकदा चव चवल्यावर कोण कशाला पुन्हा मागे वळून पाहतो ? शेवटी आंतरराष्ट्रीय मान्यता कुणाला नकोय ?

ह्यातला फोलपणा कळालेली एक नवदेशी लोकांची समकालीन पिढी आता उदयाला येते कि काय अशी आता शंका येते आहे माझं म्हणणं मांडणी करा नितीन वाघ ह्यांनी एक मांडणी आणली आणि थेट बाबासाहेब आंबेडकरांना देशीवादी बनवलं फुले तर ऑलरेडी देशीवादी आहेतच मग फुले आंबेडकर ह्या दोघांना देशीवादी विचारवंत म्हणून सिद्ध करत नवदेशीवाद सिद्ध करता येईल का ? मुख्य म्हणजे हे साहित्यातून नवं म्हणून कसं मांडणार कारण नेमाडे सर्व गिळायला बसलेले आहेतच नेमाडेंच्यातून निसटून काही खर्रर्रखुर्रर्र नवं आहे का कि नुसती बडबड आहे ?

श्रीधर तिळवे नाईक












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट