आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ८३ ते ९५ श्रीधर तिळवे नाईक

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ८३
ते ९३ श्रीधर तिळवे नाईक ५
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ८३
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप ११ श्रीधर तिळवे नाईक 
पुढे जातांना आता पुन्हा एकदा थोडी उजळणी करूया 
१ आपण पाहिले कि भारतीय संस्कृती ही 
अ आर्य संस्कृती 
ब शैव संस्कृती 
अशा दोन संस्कृतीपासून बनली आहे आणि ह्या दोन संस्कृतीतील संघर्ष हा भारतीय संस्कृतीतील मुख्य संघर्ष आहे ह्यातील आर्य संस्कृतीत देवसूर आणि असुर अशा दोन उपसंस्कृती आहेत तर शैव संस्कृतीत १ नाग २ द्रविड अशा दोन उपसंस्कृती आहेत 

२ आर्य संस्कृतीतील देवसुर संस्कृतीने 
१ वैदिक 
२ ब्राम्हणी 
३ वैष्णव 
४ हिंदू 
असे चार धर्म जन्माला घातले तर
असुर संस्कृतीने 
१ पारशी उर्फ झरथूष्टी 
२ सांख्य 
३ जैन 
व 
४ बौद्ध 
असे चार धर्म जन्माला घातले आहेत भारतीय राष्ट्रवादावर आर्य संस्कृतीचा जबरदस्त प्रभाव पडलेला 
असून हा राष्ट्रवाद हा आर्य राष्ट्रवाद आहे 

शैव संस्कृतीने 
१ आदीशैव 
२ विश्वशैव ह्यात पाशुपतपासून  काश्मिरी शैवागमपर्यंत सर्व दर्शने व तंत्र , कालमुखपासून अघोर व नाथ संप्रदायापर्यंतचे सर्व पंथ येतात 
३ नवशैव लिंगायत 
आणि 
४ नवशैव शीख 

असे चार धर्म जन्माला घातले आणि ह्या सर्वांना शैव धर्म म्हंटले जाते आपण पाहिले कि ब्रिटिश राज्याने ब्राम्हणांच्या 
सांगण्यावरून शैव संस्कृतीचे स्वतंत्र अस्तित्वच अमान्य केले कारण ब्रिटिशांना शैव असलेल्या शिवाजींच्या होळकरांच्या उमा नाईकांच्या फौजेशी आणि शैव असलेल्या नानकांच्या शिखांशी कडवट सामना करावा लागला ब्रिटिशांचा अंतिम सामना हा शैवांशी झाल्याने त्यांनी शेवटपर्यंत शैवांना माफ केले नाही ह्या अंतिम लढाईत शैव पराभूत झाले ब्रिटिशांनी १८६० पासून शैवांना पूर्ण दडपले नि;शस्त्रीकरणाचा कायदा करून त्यांची शस्त्रे काढून घेतली वैष्णवांची गीता त्यांच्यावर धर्मग्रंथ म्हणून लादली औद्योगिकीकरण करून त्या औद्योगिकीकरणात त्यांना सामावून घेण्याऐवजी त्यांना पूर्ण डावलून त्यांच्या व्यवसायांची पूर्ण वाट लावून टाकली आणि त्यांना चोर लुटारू म्हणत त्यांची इतिहासात जेव्हढी बदनामी करता येणे शक्य होते तेवढी केली आजही भारतीय मानसिकता ह्या बदनामीतून बाहेर आलेली नाही शस्त्रसंघर्ष व स्वतःच्या लोकांची हानी टाळण्यासाठी ब्रिटिशांनी अहिंसेचा जास्तीत जास्त प्रचार होईल ह्याची काळजी घेतली म्हणजे अशोकाचे साम्राज्य तो जेव्हा शैव होता तेव्हा निर्माण झाले हे न सांगता तो बौद्ध असतांना त्याने कसे अहिंसेचे प्रतिपादन केले त्यावर भर द्यायचा चंडी आणि काली ह्या दोन पार्वतीच्या रूपांचा भक्त असलेल्या अशोकाचे चंडाशोक वा कालाशोक म्हणजे भीषण व बौद्ध अशोक म्हणजे महान असा प्रचार करायचा आणि हे सांगायचंच नाही कि अशोकाचे साम्राज्य त्याच्या बौद्ध धोरणामुळे अवघ्या २० वर्षात राज्याचा खनिजा रिकामा करून काही वर्षातच  कोसळलं मला बुद्धावर टीका करायची नाहीये पण राज्य नको तितके अहिंसक होण्यावर टीका करायची आहे खुद्द बुद्धाचा गणही बुद्धानंतर काही  वर्षातच कोसळला कारण अहिंसा फक्त सज्जन लोकांच्यात आणि सज्जन होण्याची धडपड करणाऱ्या लोकांच्यात टिकते ब्रिटिशांनी शैवांच्याबाबत अवलंबलेले धोरण काँग्रेसने पुढे कंटिन्यू केले अहिंसा आणि हिंसा ह्यांच्या दरम्यान सुहिंसा नावाचा एक मध्य असतो आणि शैव सुहिंसेचे समर्थक आहेत 
त्यामुळेच खुद्द भगवान शिव युद्धविद्येत निपुण होते आणि दुर्जनांना शासन करतांना त्यांनी ती निपुणता वापरलीही आहे रेप करून हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावीच लागते मी अशा फाशीला सुहिंसा म्हणतो मात्र आधी सुधारणेची मानसोपचाराची संधी द्यावी असे माझे मत आहे हिंसा ही विकृत कर्मठ आणि बदलण्यास अशक्य असणाऱ्या आणि सतत हिंसा करत सुटलेल्या व्यक्तीबाबत वापरावीच लागते अशोक हा हिंसाग्रस्त होता आणि त्याने त्यातून सुटका करून घेण्यासाठी आणि त्याच्या दरबारी राजकारणासाठी बौद्ध धर्म स्वीकारला हे योग्य एक व्यक्ती म्हणून त्याला धर्मप्रसार करण्याचा हक्क असणे हेही योग्य पण मग त्याचा स्वीकार करत नाही म्हणून त्याने जे काही केले आहे ते किंवा मांसाहारावर त्याने घातलेली बंदी हे योग्य न्हवते दुष्काळात गरिबांना मांसाहाराचाच त्याकाळी आधार असे अशावेळी मांसाहारावरची बंदी परवडणारी नसते ब्रिटिशांनी ही विघातक बाजू दाखवलीच नाही कारण बुद्ध त्यांना स्वतःच्या साम्राज्यरक्षणासाठी हवा होता गांधी हे ह्यातून जन्मले आहेत 

आपण हे पाहिले कि टिळक कसे ह्या इतिहासाच्या कह्यात येतात आणि कसे निसटतात आपण टिळकांची आर्य कुठून आले ह्याची थेरी पाहिली आणि ह्या सिद्धांताचा अपुरेपणाही आपण हेही पाहिले कि अंतिमतः टिळकांचा राष्ट्रवाद हा देव-सूर आर्यांचा राष्ट्रवाद आहे त्यात जिथे असुर आर्यांनाच स्थान नाही तिथे अनार्य शैवांना काय स्थान मिळणार ?

आपण हेही पाहिलं कि १८६० नंतर शैवांच्यात फुले नारायण गुरु पेरियार अशा काही मोजक्या नेत्यांचा अपवाद वगळता नेताच झाला नाही आणि त्याचे फार मोठे दुष्परिणाम झाले राष्ट्रवादात शैवांना समान महत्व मिळाले नाही आणि ह्याचा अपरिमित फायदा टिळकांच्या आणि पुढे गांधींच्या नेतृत्वाला मिळाला 

आपण हेही पाहिलं कि भारतीय आर्यकेंद्री इतिहासाची मीमांसा करतांना आतापर्यंत चालत आलेल्या वर्ण आणि जाती ह्या कसोटी पुरेश्या नाहीत तर ह्यांच्यापेक्षा वैष्णवांची गीतेत सांगितलेली पुण्ययोनी , पापयोनी आणि अयोनी ही योनिप्रधान समाजव्यवस्था प्रत्यक्षात अधिक कार्यरत आहे ह्या देशात पुण्ययोनी असलेले ब्राम्हण व क्षत्रिय प्रत्यक्षात एकमेकांचे हितसंबंध व्यवस्थित सांभाळतात 

आपण हे पाहिले कि विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी प्रथम हिंदुत्व हा शब्द वापरला म्हणून तेच हिंदुत्वाचे आजोबा आहेत आणि टिळक हिंदुत्वाची चर्चा सतत करत असल्याने तेच हिंदुत्वाचे पायोनीअर कसे आहेत तेच कसे आद्यहिंदुहृद्यसम्राट आहेत 

आपण हेही पाहिले कि पेशवाई पहिल्या बाजीरावापर्यंत कशी शैव होती आणि नानासाहेब पेशव्याच्यानंतर ती कशी वैष्णव व माधवराव पेशव्याच्यापर्यंत कशी ब्राम्हणी बनत गेली आणि टिळक हे कसे ह्या पेशवाईचे वारसदार आहेत 

आपण हेही पाहिले कि टिळक कसे समाजसुधारकांच्या विरुद्ध आणि राजकीय सुधारणेच्या पक्षात होते 

आपण हेही पाहिले कि टिळक हे कधीच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विरोधात न्हवते किंबहुना ह्याबाबतीत आधुनिक असल्यानेच त्यांच्या प्रभावाने ब्राम्हणही आधुनिक झाले 

आपण हेही पाहिले कि टिळकांचा कर्मठपणा हा फक्त धर्माबाबत आहे आणि त्याला जोड त्यांच्या राष्ट्रवादाची आहे म्हणजे टिळक ब्रिटिश हे परके असल्याने त्यांनी आमच्या धर्मात हस्तक्षेप करू नये ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्या आम्ही आमच्या धर्मात आमच्या आमच्या करू अशी टिळकांची भूमिका आहे म्हणजे ब्रिटिशांनी धर्मसुधारणा करण्याला त्यांचा विरोध आहे त्या त्या धर्मातल्या सुधारणा ह्या त्या त्या धर्मातल्या लोकांनी कराव्यात बाहेरच्या लोकांनी त्या धर्मात नाक खुपसू नये असा हा विचार आहे 

आपण हेही पाहिलं कि ऑफिशियल काँग्रेसने कधीही टिळकांना काँग्रेसचे नेतृत्व म्हणून स्वीकारले नाही टिळक कायमच काँग्रेसमध्ये असूनही काँग्रेसच्या उंबरठ्यावर ठेवले गेले टिळक ह्या पक्षांतर्गत विरोधाला पुरून उरले 

आपण टिळकांच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू दाखवल्या अनेकदा एक लेख टिळकांचं कौतुक करणारा तर एक लेख त्यांची खरडपट्टी काढणारा असे अनेकदा झाले कारण खुद्द टिळकांच्या व्यक्तिमत्वात , विचारात आणि कृतीत सतत डोलत असलेला पॅराडॉक्स 

आपण टिळक जसे आहेत तसे पाहण्याचा प्रयत्न करतोय जसे प्रोजेक्ट केले जातात तसे नाही 

टिळकांनी निर्माण केलेलं हे हिंदुत्व कधीच बर्फाळ न्हवते तो एक प्रवाह होता जो सावरकर व संघाने पुढे न्हेला वाजपेयींच्यापर्यंत हिंदुत्व टिळकांच्या आर्य पगड्यात होते पण पुढे केवळ आर्य संस्कृतीच्या साहाय्याने हिंदुत्व विजयी होऊ शकत नाही हे लक्ष्यात आल्यावर प्रथम प्रमोद महाजनांनी शैव हिंदुत्वाचे ठाकरे जोडून घेतले आणि पुढे भाजपने अतिशय काळजीपूर्वक मोदी ह्या शैव नेत्याला पुढे आणले आणि शैवांनी त्यांना हर हर महादेव अशी घोषणा देऊन प्रचंड मतांनी विजयी केले हे कारस्थान आहे कि फसवणूक आहे कि आणखी काही आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही मात्र शैवांचा डिंडिम मोदींच्यामुळे पुन्हा चालू झाला ही वस्तुस्थिती 

टिळकांची गंगोत्री ही मोदींच्या निमित्ताने महासागर झाली आहे हे टिळकांचे प्रचंड मोठे यश आहे दुर्देवाने ह्या देशातल्या पुरोगामी लोकांना हे अद्यापही स्वीकारता आलेले नाही 

श्रीधर तिळवे नाईक 



पाचव्या शतकात फासियन हा चिनी बौद्ध भिक्षू भारतात आला. श्रीलंकेतून समुद्रमार्गे चीनला परतला. त्याच्या प्रवासवर्णनाचं शीर्षक आहे- बौद्ध देशांतील प्रवास. चीननंतर भारत, श्रीलंका ही राज्यं वा देश बौद्ध होते असं तो सांगतो. या देशांतील बौद्ध कर्मकांडे, उत्सव याची माहिती त्याच्या प्रवास वर्णनात आहे. अलीकडेच मी ते पुस्तक वाचलं.
त्यानंतर सातव्या शतकात शुआनसांग हा बौद्ध पंडीत भारतात आला. त्यावेळी बौद्ध धर्माला भारतात उतरती कळा लागल्याचं त्याने नोंदवलं आहे. परंतु नालंदा विद्यापीठात बौद्ध आचार्य होते, तिथे तो शिकला , तिथेच त्याने अध्यापनही केलं. हर्षवर्धन या सम्राटाने नालंदा विद्यापीठाच्या खर्चाची जबाबदारी घेतली होती. कान्यकुब्ज म्हणजे सध्याचं कनौज इथे शुआनसांग आणि अन्य धर्मांतील आचार्यांचा जाहीर वादविवाद झाला. या स्पर्धेत महायान पंथाची बाजू लढवणा-या शुआनसांगचा विजय झाला. चीनला परतल्यानंतरही शुआनसांग आणि नालंदा विद्यापीठातील आचार्यांचा पत्रव्यवहार होता.
ते पुस्तकही मी अलीकडेच चाळलं.
सम्राट अशोकाचा काळ इसवीसनपूर्व ३ रे शतक.
७ व्या शतकापर्यंत भारतीय उपखंडात बौद्ध भिक्षू , त्यांचे पंथ होते. त्यांच्या जाहीर चर्चा होत असत, अशी माहिती या पुस्तकांतून मिळते.
सम्राट हर्ष वर्धन नाटककारही होता. त्याच्या नाटकात एक राजा आपल्या प्रजाजनाचे प्राण वाचवणासाठी आपल्या देहाची आहुती द्यायला सिद्ध होतो. या नाटकाचा प्रयोग शुआनसांगच्या उपस्थितीत करण्यात आला.
त्यामुळे सम्राट अशोकाच्या निधनानंतर लवकरच बौद्ध गण वा संघ कोसळला हे विधान पटण्याजोगे नाही. असो.

श्रीधर तिळवे नाईक 

मी कुठेही बौद्ध संघ म्हंटलेलं नाही मी अशोकाच्या राज्याविषयी आणि बुद्धाच्या स्वतःच्या शाक्य गणाविषयी विधाने केली आहेत तुम्ही म्हणता ती प्रवासवर्णने मी वाचली आहेत बौद्ध लोक बौद्धांच्याविषयी लिहितात तेव्हा ते स्वतःच कौतुक करतात जे नैसर्गिक आहे पण जैन बौद्धांच्याबद्दल त्याकाळाबद्दल काय लिहितात ते वाचले कि दुसरी बाजूही कळते अर्थात विरोधी बाजूतही पूर्ण सत्य असत नाही जैनांनी अशोकला अक्षरशः व्हिलन म्हणून प्रस्तुत केले आहे जे सत्य नाहीये असो शैवांचा सगळा इतिहास हळूहळू पुढे येतोय कारण ओबीसी वर्ग आत्ता जागा झालाय असो 

==========================================================

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ८४
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप १२ श्रीधर तिळवे नाईक 
मागील लेखात आपण टिळकांचा राष्ट्रवाद देवसूर आर्यांच्या आर्य राष्ट्रवाद आहे आणि त्यात असुर व शैव ह्यांना जागा नाही असे म्हंटले काहींना असे वाटेल कि तो काळच असा होता कि टिळकांना शैव माहीतच नसावेत माझ्या मते इथे प्रश्न काळाचा नाही तर बायस दृष्टिकोनाचा आहे मी इथे त्यासाठी विवेकानंदांचे उद्गार देतो हे उद्गार त्यांनी त्यांची आयरिश शिष्य भगिनी निवेदिता हिच्यापुढे काढले होते ते म्हणतात , 
“Oh India ! wouldst thou attain,” he exclaimed, “by means of thy disgraceful cowardice, that freedom deserved only by the brave and the heroic ? Oh India ! forget not that the ideal of thy womanhood is Sita, Savitri, Damayanti, forget not that the God thou worshipest is the great ascetic of ascetics, the all-renouncing Shankara, the Lord of Uma ; forget not that thy marriage, thy wealth, thy life are not for sense-pleasure, are not for thy individual personal happiness; forget not that thou art bom as a sacrifice to the Mother s altar; forget not that thy social order is but the reflex of the Infinite Universal Motherhood ; forget not that the lower classes, the ignorant, the poor, the illiterate, the cobbler, the sweeper are thy flesh and blood, thy brothers. Thou brave one, be bold, take courage, be proud that thou art an Indian, and proudly proclaim : T am an Indian, every Indian is my brother. Say : ‘The ignorant Indian, the poor and destitute Indian the Brahman Indian, the Pariah Indian, is my brother

भारताची देवता शंकर आहे असं विवेकानंद इथे स्पष्ट म्हणत आहेत ( संदर्भ श्री अरबिंदो अँड इंडियन फ्रिडम पान ४७ -४८ शिशीरकुमार मित्र )

हे उद्गार मी इथे  ह्यासाठी दिलेत कि जे ब्राम्हण मूळचे शैव ब्राम्हण होते ( विवेकानंदांच्या केसमध्ये कायस्थ ब्राम्हण ) त्यांना भारतीय जीवनातले शंकराचे स्थान व्यवस्थित माहित होते अगदी टिळकांच्या काळातही ! स्वतः टिळक विवेकानंदाचे फॅन होते हे त्यांनी स्वामीजींच्यावर जे लेख लिहिलेत त्यावरून स्पष्ट व्हावे असे असतांनाही टिळकांनी शैव संस्कृतीची उपेक्षा का करावी ?

 भारतीय संस्कृती पुढे घेऊन जायची असेल तर आर्य , ज्युडायिक आणि शैव ह्या तीन्ही  संस्कृतींना आपापले अहंकार त्यागून पुढे जावे लागेल हे तर उघड आहे पण ह्या यात्रेत आर्य ज्युडायिक उच्च आणि शैव पायाखाली हे चालणार नाही किंबहुना हे आता खपवूनच घेतले जाणार नाही हे उघड आहे टिळकांच्या बाबतीत हाच प्रॉब्लेम आहे कि त्यांना अनार्य शैव द्रविड आपल्या आर्यन पायाखाली ठेवायचे आहेत त्यामुळेच शंकराविषयी अनार्यांच्याविषयी आणि शैवांच्या दर्शनाविषयी टिळक उदासीन आहेत आणि टिळक उदासीन म्हणून समस्त हिंदुत्व आणि काँग्रेस उदासीन आहेत समाजवादी लोहिया वगळता उदासीन आहेत कम्युनिस्ट उदासीन आहेत हा मुद्दा समजायचा असेल तर टिळकांचे रामायणाविषयीचे मत पाहावे लागेल प्रथम आपण रामायणाची पार्श्वभूमी पाहू मग टिळक काय म्हणतात ते पाहू

कुठल्याही धर्माची सुरवात यातुमंत्रांनी होते ऋग्वेद आणि इतर वेद ही सुरवात आहे त्यांनंतर मंत्रकाल संपून कथाकाळ सुरु होतो पुराणे रचली जातात मग धर्मविषयक कथा  कायदे एकत्र गुंफून कथाधर्म रचले जातात वेदांत (उपनिषदे म्हणजे वेगवेगळ्या कथा  धर्मवचने ) , बायबल जुने  नवे , कुराण हे सर्व कथाधर्म आहेत ह्यातून पुढे महाकाव्यधर्म  नाटकधर्म जन्मतात वैष्णव   हा  महाकाव्यधर्म  नाटकधर्म आहे  सुमेरियन  ग्रीक धर्म हे  महाकाव्य धर्म होते ह्यातील ग्रीकांनी पुढे नाटकधर्मही जन्माला घातला रोमन लोकांनी आर्यांनी जसा शैव धर्म नष्ट करायचा प्रयत्न केला तसा ग्रीक धर्म नष्ट करायचा प्रयत्न केला पण ऐनवेळी ख्रिश्चन धर्माने एंट्री घेऊन तिथे ख्रिश्चन धर्म स्थापन केला तसाच काहीसा प्रकार ऐनवेळी हिंदुस्तानात इस्लामने एंट्री घेऊन केला आर्य धर्माची गांधार  , बलुचिस्तान  , पंजाब , सिंध , हस्तिनापूर , पूर्व बंगाल ही मुख्य केंद्रेच मुस्लिम झाली आणि मुस्लिम राजवट स्थिर झाली ज्या मुस्लिमांचा आर्य द्वेष करतात त्यांना ह्या पाकिस्तानातील बहुतांशी मुस्लिम मूळचे आर्य आहेत हे सांगणे आवश्यक आहे राजपूत , भोसले व शीख  शैव असल्याने त्यांनी मात्र तगडी झुंज दिली आणि त्यानेच हिंदुस्थान इस्लाममय होणे वाचले

अलीकडे ह्या रूपांनी कादंबरीधर्माकडून नाटकधर्माकडून चित्रपटधर्म  सिरियलधर्माकडे वाटचाल करायला सुरवात केली आहे मूळ महाकाव्यधर्माचा गाभा  बदलता अधिक सोर्सेसची भर घालून हे नवीन धर्म तयार केले जातायत जे मूळ धर्मातूनच उगम पावलेले असतात मूळ महाकाव्ये अलीकडे फार कुणी वाचत पण नाही पण सिरीयलचा प्रत्येक एपिसोड भक्तिभावाने पाहणारे करोडो आहेत

उपनिषदीक ह्या  कथाधर्मापासून वैष्णव  ह्या महाकाव्यिक धर्माकडे झालेल्या वाटचालीत महाकाव्याचा  त्या महाकाव्यात असलेल्या गीता ह्या भागाचा फार मोठा वाटा आहे रामायण हे वैष्णवांच्या  दोन महाकव्यांपैकी एक !
साहजिकच ऋग्वेदाकडून टिळक कधीनाकधी महाकाव्यांच्याकडे वळणे अटळ होते ते प्रथम गीताधर्माच्या रूपाने महाभारताकडे वळले तर रामायणाकडे वैद्यांच्या ग्रंथरूपाने

मराठीत आणि इतरत्रही एक गैरसमजूत अशी कि रिडल ऑफ राम महाराष्ट्रात प्रथम आंबेडकरांना पडलं वस्तुस्थिती अशी नाहीये महाराष्ट्रात राम  रामायणाचे कोडे सोडवण्याचा प्रयत्न प्रथम चिंतामण विनायक वैद्य ह्यांनी १९०६ साली केला त्यांच्या ग्रंथाचे नावच मुळी  रिडल ऑफ  रामायण असे होते जे पुढे टायटल म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी थोडे बदलून स्वतःच्या ग्रंथासाठी वापरले वैद्यांच्या इंग्रजी ग्रंथाचे मराठी व्हर्जन १९११ साली आले 

टिळकांना रामायणाविषयी जे म्हणायचे होते ते अचानक ह्या ग्रंथाच्या रूपाने सामोरे आल्याने टिळकांनी त्याचे
परीक्षण रामायण हा "इतिहास कि गप्पाह्या लेखात  करून रामायणाविषयीची आपली मते मांडली आहेत टिळकांची मते ही आद्यहिन्दूसम्राटाची मते असल्याने हिंदुत्ववाद्यांवर ह्या मतांचा सखोल परिणाम झाला आहे
ही मते पुढीलप्रमाणे

 सर्वात पहिली गोष्ट म्हणजे टिळक रामायणाला काल्पनिक महाकाव्य मानत नाहीत त्यांच्या दृष्टीने हा आर्यांच्या इतिहासाचा एक ऑथेंटिक भाग आहे रामायण इतिहास आहे

 जगात सर्वत्र रानटी लोकांचा उच्छेद केला तसा उच्छेद रावण  इतर रानटी असल्याने केला गेला त्याची ही सत्य कहाणी आहे

 मेक्सिकोमधील रानटी ऍस्टेक संस्कृती जी नरमेध करत होती मानवी मांस खात होती तशीच संस्कृती राक्षसांची होती रावण राक्षस होता बिभीषण राक्षस होता राक्षस लोक रानटी होते  ते माणसे मारून खात

 ज्याप्रमाणे स्पेनच्या कोर्टेस या योध्याने मेक्सिकोतील ऍस्टेक ह्या राक्षस सदृश्य लोकांचा  त्यांचा सम्राट मॉंटेझुमाचा पराभव करून त्यांच्या नरमांसभक्षणासारख्या प्रथांचा नायनाट केला त्याप्रमाणेच रामाने नरमांसभक्षक राक्षसांचा नायनाट केला म्हणजे राम हा कोर्टेस रावण हा सम्राट मॉंटेझुमा  ईस्टलीलचितल म्हणजे बिभीषण असे समजायला हरकत नाही

 आर्य इराणकडून अफगाणिस्तानातून सरकत उत्तर भारत असे सरकत  आले  नंतर ते दक्षिणेकडे घुसले  रामायण हे आर्य उत्तर भारतातून दक्षिण भारतात कसे शिरले त्याचा इतिहास आहे 

राम दक्षिणेत शिरलेला पहिला वन्दनीय आर्य पुरुष असल्याने त्याची जन्मभूमी अयोध्या असल्याने तिथे त्याच्या जन्मस्थानी मंदिर बनणे हे त्यामुळेच योग्य ठरते ही हिंदुत्ववादी मांडणी टिळकांच्यापासूनच सुरु होते आणि त्यामुळेच टिळकांच्या हिंदुत्ववादी मांडणीशी सुसंगतच ठरते


इथे प्रश्न उपस्थित होतो कि मराठी आणि कन्नड लोक ज्यांच्या संयुक्त प्रदेशाला रामायणकाळी किष्किंधा म्हंटले जायचे ते वानर होते आणि त्यांना शेपूट होती हे लिहिणारे कोण ? राक्षस माणसाहारी  होते हे लिहिणारे कोण ?
म्हणजे लिहिणारे आर्य आणि त्याला वास्तव म्हणणारेही आर्यच ?

द्रविड संस्कृती ही माझी माता आहे आणि आर्य संस्कृती पिता आहे असे म्हणणारे स्वामी विवेकानंद एकीकडे आणि द्रविड संस्कृतीला मागासलेले समजणारे टिळक दुसरीकडे हे दोघेही एकाच काळाचे अपत्य आहेत हे लक्षणीय !

श्रीधर तिळवे नाईक



आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ८५
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप १३ श्रीधर तिळवे नाईक 

युरोपियन प्रबोधन आणि भारतीय प्रबोधन ह्यांच्यात दोन फरक आहेत 

१ पहिला फरक भारतीय प्रबोधनाची सुरवात मोक्षाने झाली तर युरोपियन प्रबोधनाची सुरवात धर्माने झाली बसवेश्वर आणि नानक दोघांनीही मोक्षदर्शन आणि समाजशास्त्राच्या दिशेने प्रबोधनाची केलेली मांडणी , प्रस्थापित धर्मांना दिलेले चॅलेंज आणि वर्ण जातव्यवस्थेविरुद्ध बंड करून पुढे श्रमांच्या प्रतिष्ठेची केलेली स्थापना हे आरंभीचे प्रबोधनसूत्रही अजून भारतीय समाजाला पचवता आलेले नाही युरोपात रॉजर बेकन , निकोलस ऑफ कुसा आणि मार्टिन ल्युथर ह्यांनी धार्मिक प्रबोधन वाढवत न्हेले आणि शेवटी प्रोटेस्टंट पंथ प्रस्थापित झाला भारतात धर्माचीच मांदियाळी ज्याची चर्चा आपण केली त्यामुळे ह्या प्रत्येक धर्मात प्रोटेस्ट होऊन नवधर्म निर्माण होणे हे मल्टिपल होते ह्या नवहिंदू , नववैदिक , नववैश्णव आणि नवब्राह्मण धर्माच्या समाजांना प्रत्यक्षात प्रोटेस्टंट धर्माप्रमाणे यश मात्र मिळालेले नाही नवशैवांना कर्नाटक व पंजाबमध्ये मिळालेले यश हेच काहीसे प्रभावी म्हणता येईल जे नवशैवांना साधले ते इतरांना का साधले नाही ह्याचे कारण स्पष्ट आहे लिंगायत आणि शीख ह्या दोन्ही नवशैव धर्माच्या संस्थापकांना मोक्ष मिळाला होता त्यामुळे त्यांच्या धर्मांना एक ऑथेन्टिसिटी होती अशी ऑथेन्टिसिटी राजाराम मोहन रॉय ह्यांच्या नवहिंदू ब्राम्हो समाज दयानंद सरस्वती ह्यांच्या नववैदिक आर्य समाज रानडे गोखले  ह्याचा  प्रार्थना समाज भारत सेवक समाज फुले ह्यांचा सत्यशोधक समाज आणि पुढे बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा नवयांनी नवबौद्ध समाज ह्यांना  लाभली  नाही त्यामुळे हे सर्व प्रोटेस्ट गारद झालेले आहेत भले ह्यांच्या अनुयायांना हे न पटो भारतीयांना मोक्ष किती महत्वाचा वाटतो ते ह्यावरून स्पष्ट व्हावे धर्मासाठी धर्म स्थापन करणारे धर्म  भारतात तरी आऊटडेटेड होत जातात

२ युरोपात देशी राष्ट्रीय राजांना धर्माचे वर्चस्व नकोच होते साहजिकच त्यांनी प्रोटेस्टंट धर्माला पाठिंबा दिला राष्ट्रीय चर्चे उभी केली आपल्याकडे पारतंत्र्यामुळे अशा राष्ट्रीय राजवटींचा लाभ प्रबोधनाला झालाच नाही इंग्रजांना भारतीय प्रबोधनापेक्षा आर्थिक लुटीत जास्त रस होता त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जी राजवट आली ती नास्तिकांची होती आणि नेहरूंना मोक्ष म्हणजे काय हे कधीच कळले नाही मोक्षाबाबत डम्बो पण आधुनिकतेबाबत अतिशय हुशार अश्या माणसाची राजवट सत्तेवर आली मोक्षासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या गांधींनी मोक्षाविषयी कन्फ्युज असलेला नेता पंतप्रधान म्हणून निवडावा हे भारतासाठी चांगले कि वाईट हे आजही सांगणे कठीण आहे पण त्याचा एक दुष्परिणाम असा झाला कि रिलिजियस प्रोटेस्टची आवश्यकता सरळसरळ नजरेआड केली गेली आणि मग सनातनी कट्टर लोकांच्यासाठी मैदान मोकळे झाले

अशाप्रकारच्या राष्ट्रवादाला वाव मिळेल असं नेहरूंनी कधीही गृहीत धरलं नाही वस्तुस्थिती अशी आहे कि भारतीय प्रबोधनाचा प्रोजेक्ट पूर्ण झालेलाच नाही शैवांना शैववादाचा तिसरा टप्पा आणत हा प्रबोधनाचा प्रोजेक्ट आता पूर्ण करावा लागेल आणि चौथ्या नवतेच्या सहाय्याने नवा देशही निर्माण करावा लागेल हे करण्यासाठी सनातन कट्टर म्हणजे काय ते नीट समजून घ्यावे लागेल तेही त्यांचा अनादर न करता आर्यांचं सर्वच वाईट असं नाहीये आर्यांची सर्वात मोठी ताकद त्यांची लवचिकता आणि बदल स्वीकारण्याची क्षमता आणि बदल स्वतःच्या संस्कृतीत सामावून घेण्याची क्षमता ही आहे विज्ञान तंत्रज्ञानाला ते नकार देत नाहीयेत ते आपल्या संस्कृतीला शाबूत ठेऊन ह्या गोष्टी स्वीकारू इच्छितात त्यांचा स्वभाव वर्चस्ववादी आहे त्यांना हा देश सतत स्वतःच्या ताब्यात ठेवायचा असतो त्यांच्याकडे अमाप विजिगिषु वृत्ती आहे आणि टॅलेंट दिसले तर सलाम ठोकण्याची वृत्तीही क्वालिफिकेशन कमवायचे नाही आणि आर्यांच्याकडून मान्यता मिळवू पहायचे हे जमणे अवघड आहे

आर्य म्हणजे फक्त मनू न्हवे आर्यांच्यातूनच बुद्ध महावीर कपिल निर्माण झालेत हेही आपण लक्ष्यात घेतले पाहिजे माझ्यावर शिवाइतकाच प्रभाव बुद्ध महावीर ह्यांचा आहे संघर्ष करावा पण हा संघर्ष दोन भावांच्यातला आहे हे लक्ष्यात ठेवावे आर्य बाहेरून आलेत ह्या सिद्धांतावर माझा काडीचाही विश्वास नाही ते ह्याच देशात हिमालयाच्या पायथ्याशी होते असे माझे आकलन आहे

आर्यांनी टिळकांच्यापासून आर्य म्हणजे काय ह्याचा जसा नव्याने शोध घेतला तसाच शोध शैवांनी घेणे आवश्यक आहे माझे लिखाण ह्या शोधाचा भाग असते

श्रीधर तिळवे नाईक






मात्र स्वतःला सेक्युलर  म्हणवून घेणारी पण प्रत्यक्षात नववैष्णव असणारी काँग्रेस आणि धार्मिक म्हणवून घेणारी हिंदुत्व  ह्या दोन्ही राजकीय धारा मात्र व्यवस्थित भरभराटीला आल्या

ह्यानंतरचा टप्पा विज्ञानकेंद्री प्रबोधनाचा होता जो अकबर किंवा शिवाजीच्या राजवटीत घडता तर कदाचित इंग्रज इथे हरले असते पण भारतात कुणी फ्रान्सिस बेकन जन्मला नाही त्यामुळं हे घडले नाही आणि अमानुष पारतंत्र्य पदरात पडलं


पुढे राजाराम मोहन रॉय ह्यांनी भारताला वैज्ञानिक पाया पुरवण्याची धडपड करून आणि विज्ञानाच्या अभ्यासक्रमाचा अभ्यासक्रमात समावेश करून घेऊन पहिले पाऊल टाकले खरे पण धर्मात अडकून पडलेल्या ब्राम्हण समाजाने त्यांच्या कार्यक्रमावर बोळा फिरवला विज्ञानाचा पाया महाराष्ट्रात न पडता बंगालमध्ये पडावा हे योगायोगी न्हवतं ब्रिटिशांनी पहिला पाय तिथे रोवल्याने हे झाले होते पण शेवटी विज्ञान सत्याधिष्टित मनोवृत्तीवर अवलंबून असते आणि ब्रिटिश हे परकीय राज्यकर्ते असल्याने त्यांना सत्यान्वेषण परवडणारे न्हवते ब्रिटिश सामाजिक संघटनाला आणि सत्याच्या शोधाला प्रचंड घाबरत होते भारतातला पोस्टट्रुथ जमाना ब्रिटिशांच्या काळापासूनच सुरु होतो  शासनव्यवस्थेचा खोटेपणा आणि ब्रिटिश लॉर्ड राजांचा मुघलपणा हा विज्ञानाला वाव देण्यास तयार न्हवता शेवटी यूरोपीय विज्ञान स्वातंत्र्यात वाढले होते आणि ब्रिटिश स्वातंत्र्य देणे शक्यच न्हवते शेवटी इंडिया ही कॉलनी होती त्यांचा देश न्हवता

लोकमान्य टिळकांना जेवढं स्वातंत्र्याचं महत्व कळलं तितकं ते कुठल्याच नेत्याला कळलं न्हवतं स्पेन्सर वाचल्याने स्वातंत्र्य आणि विज्ञान ह्यांचा एकमेकांशी असलेला संबंध त्यांना माहित होता त्यांचा फक्त एकच प्रॉब्लेम होता तो म्हणजे सर्व वैज्ञानिक सत्ये भारतीय दर्शनांनी आधीच शोधलेत आणि आपणाला ती पुन्हा शोधायची आहेत असा त्यांचा अभिनिवेश होता जो सत्याला धरून न्हवता धर्माच्या सहाय्याने वैज्ञानिक अपयशावर पांघरून घालणे हा अडाणीपणा होता जो पुढे हिंदुत्वाचाही पाया बनला अभ्युपगम आणि सिद्धांत ह्यांच्यातील फरक टिळकांना खोलात उमगला नाही वास्तविक आर्यांच्या उगमाविषयीचा एक अभ्युपगम मांडून त्याची सिद्धता करून त्यांनी त्याचा सिद्धांतही बनवला होता तरीही हे घडले

विज्ञान आणि सत्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने सत्याचा शोध आणि विज्ञानाचा शोध ह्यांच्यात फरक नाही उत्तराधुनिकतेने विज्ञानाच्या सत्यशोधनाच्या मर्यादा दाखवल्या असल्या तरी विज्ञान ह्या मर्यादा उल्लंघून जाण्याची शक्यता अजूनही मावळलेली नाही टिळकांच्या काळात ह्या मर्यादा दिसल्याही न्हवत्या त्यामुळे टिळकांचा विज्ञानावरचा विश्वास आपण सहज समजू शकतो प्रश्न असा आहे कि युरोपीय प्रबोधनातून उमललेले स्वातंत्र्य टिळकांना स्पष्टपणे दिसले पण ह्याच प्रबोधनांतून उमललेली समता टिळकांना का पचली नाही कि ब्राम्हणी संस्कारातून टिळक बाहेर न पडल्याने हे घडले ? आर्य श्रेष्ठत्वाचा गंड नेमका आला कुठून ? कुणी म्हणेल कि ह्याचा पुरावा काय तर त्यासाठी आपणाला टिळकांची रामायणाविषयीची मते पहावी लागतील

कुठल्याही धर्माची सुरवात यातुमंत्रांनी होते ऋग्वेद आणि इतर वेद ही सुरवात आहे त्यांनंतर मंत्रकाल संपून कथाकाळ सुरु होतो पुराणे रचली जातात मग धर्मविषयक कथा कायदे एकत्र गुंफून कथाधर्म रचले जातात वेदांत (उपनिषदे म्हणजे वेगवेगळ्या कथा धर्मवचने ) , बायबल जुने नवे , कुराण हे सर्व कथाधर्म आहेत ह्यातून पुढे महाकाव्यधर्म नाटकधर्म जन्मतात
हिंदुधर्म  हा महाकाव्यधर्म नाटकधर्म आहे सुमेरियन  ग्रीक धर्म हे  महाकाव्य धर्म होते ह्यातील ग्रीकांनी पुढे नाटकधर्मही जन्माला घातला रोमन लोकांनी आर्यांनी जसा शैव धर्म नष्ट करायचा प्रयत्न केला तसा ग्रीक धर्म नष्ट करायचा प्रयत्न केला पण ऐनवेळी ख्रिश्चन धर्माने एंट्री घेऊन तिथे ख्रिश्चन धर्म स्थापन केला तसाच काहीसा प्रकार ऐनवेळी हिंदुस्तानात इस्लामने एंट्री घेऊन केला आर्य धर्माची गांधार  , बलुचिस्तान  , पंजाब , सिंध , हस्तिनापूर , पूर्व बंगाल ही मुख्य केंद्रेच मुस्लिम झाली आणि मुस्लिम राजवट स्थिर झाली ज्या मुस्लिमांचा आर्य द्वेष करतात त्यांना ह्या पाकिस्तानातील बहुतांशी मुस्लिम मूळचे आर्य आहेत हे सांगणे आवश्यक आहे राजपूत भोसले  शैव असल्याने त्यांनी मात्र तगडी झुंज दिली आणि त्यानेच हिंदुस्थान इस्लाममय होणे वाचले

अलीकडे ह्या रूपांनी कादंबरीधर्माकडून नाटकधर्माकडून चित्रपटधर्म सिरियलधर्माकडे वाटचाल करायला सुरवात केली आहे मूळ महाकाव्यधर्माचा गाभा बदलता अधिक सोर्सेसची भर घालून हे नवीन धर्म तयार केले जातायत जे मूळ धर्मातूनच उगम पावलेले असतात मूळ महाकाव्ये अलीकडे फार कुणी वाचत पण नाही पण सिरीयलचा प्रत्येक एपिसोड भक्तिभावाने पाहणारे करोडो आहेत

वैष्णव ह्या पौराणिक कथाधर्मापासून हिंदू ह्या महाकाव्यिक धर्माकडे झालेल्या वाटचालीत महाकाव्याचा त्या महाकाव्यात असलेल्या गीता ह्या भागाचा फार मोठा वाटा आहे रामायण हे हिंदूंच्या दोन महाकव्यांपैकी एक !
साहजिकच ऋग्वेदाकडून टिळक कधीनाकधी महाकाव्यांच्याकडे वळणे अटळ होते ते प्रथम गीताधर्माच्या रूपाने महाभारताकडे वळले तर रामायणाकडे वैद्यांच्या ग्रंथरूपाने

मराठीत आणि इतरत्रही एक गैरसमजूत अशी कि रिडल ऑफ राम महाराष्ट्रात प्रथम आंबेडकरांना पडलं वस्तुस्थिती अशी नाहीये महाराष्ट्रात राम रामायणाचे कोडे सोडवण्याचा प्रयत्न प्रथम चिंतामण विनायक वैद्य ह्यांनी १९०६ साली केला त्यांच्या ग्रंथाचे नावच मुळी रिडल ऑफ रामायण असे होते जे पुढे टायटल म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी थोडे बदलून स्वतःच्या ग्रंथासाठी वापरले वैद्यांच्या इंग्रजी ग्रंथाचे मराठी व्हर्जन १९११ साली आले 

टिळकांना रामायणाविषयी जे म्हणायचे होते ते अचानक ह्या ग्रंथाच्या रूपाने सामोरे आल्याने टिळकांनी त्याचे
परीक्षण रामायण हा "इतिहास कि गप्पा" ह्या लेखात  करून रामायणाविषयीची आपली मते मांडली आहेत टिळकांची मते ही आद्यहिन्दूसम्राटाची मते असल्याने हिंदुत्ववाद्यांवर ह्या मतांचा सखोल परिणाम झाला आहे
ही मते पुढीलप्रमाणे

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे टिळक रामायणाला काल्पनिक महाकाव्य मानत नाहीत त्यांच्या दृष्टीने हा आर्यांच्या इतिहासाचा एक ऑथेंटिक भाग आहे रामायण इतिहास आहे

जगात सर्वत्र रानटी लोकांचा उच्छेद केला तसा उच्छेद रावण इतर रानटी असल्याने केला गेला त्याची ही सत्य कहाणी आहे

मेक्सिकोमधील रानटी ऍस्टेक संस्कृती जी नरमेध करत होती मानवी मांस खात होती तशीच संस्कृती राक्षसांची होती रावण राक्षस होता बिभीषण राक्षस होता राक्षस लोक रानटी होते ते माणसे मारून खात

ज्याप्रमाणे स्पेनच्या कोर्टेस या योध्याने मेक्सिकोतील ऍस्टेक ह्या राक्षस सदृश्य लोकांचा त्यांचा सम्राट मॉंटेझुमाचा पराभव करून त्यांच्या नरमांसभक्षणासारख्या प्रथांचा नायनाट केला त्याप्रमाणेच रामाने नरमांसभक्षक राक्षसांचा नायनाट केला म्हणजे राम हा कोर्टेस रावण हा सम्राट मॉंटेझुमा ईस्टलीलचितल म्हणजे बिभीषण असे समजायला हरकत नाही

आर्य इराणकडून अफगाणिस्तानातून सरकत उत्तर भारत असे सरकत  आले नंतर ते दक्षिणेकडे घुसले  रामायण हे आर्य उत्तर भारतातून दक्षिण भारतात कसे शिरले त्याचा इतिहास आहे 

राम दक्षिणेत शिरलेला पहिला वन्दनीय आर्य पुरुष असल्याने त्याची जन्मभूमी अयोध्या असल्याने तिथे त्याच्या जन्मस्थानी मंदिर बनणे हे त्यामुळेच योग्य ठरते ही हिंदुत्ववादी मांडणी त्यामुळेच टिळकांच्या हिंदुत्ववादी मांडणीशी सुसंगतच ठरते



आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ८६
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप १४ श्रीधर तिळवे नाईक 
वेद आणि रामायण ह्या दोन्ही ग्रंथांचा वापर टिळक देवसुर आर्यवादी राष्ट्रवाद उभा करण्यासाठी करतात हे स्पष्ट झाले आहे भारतात ह्याचवेळी राष्ट्रवादाला ठामपणे नकार देऊन देशवादाचा पुरस्कार करणारे टागोरही होते हा देशवाद वैश्विक चैतन्याला आधार मानून व देशाला घर मानून साकारला जात होता टिळकांना जशी लोकहितवादींची व चिपळूणकरांची पार्श्वभूमी होती तशी टागोरांना रॉय , दत्त व ब्राम्हबांधव उपाध्यायांची होती ज्यांनी नवहिंदू वा  हिंदू ख्रिश्चनिटीची संकल्पना मांडली होती टागोरांच्या मते देशवादाचा आधार वेद उपनिषद नसून मध्ययुगीन संत होते एका अर्थाने टागोर हिंदूवाद व त्यांचा देशवाद शंकराचार्यांच्यामुळे जन्माला आलेल्या वैष्णव भक्तीचळवळीच्या आधारे  उभा करत होते नेमाडेंच्या देशीवादाचा पूर्वसुरी म्हणून आपण टागोरांचा देशवाद पाहू शकतो जो ब्राम्हो समाजातून म्हणजे नवहिंदू समाजातून आला होता टागोर राजाराम मोहन रॉय ह्यांचा वेदांत हा हिंदू करत होते त्याचे हिंदूकरण करत होते 

टिळक मराठी संतांचा वारसा मिरवतात पण टागोर जितक्या सहजपणे वेद उपनिषद गीता ह्यांचे अभिजातवादी हायफाय वस्त्र उतरवून ठेवतात तसे टिळक ठेवत नाहीत टिळकांचा नवब्राह्मणवाद हिंदुवादाच्या व वैष्णववादाच्या फार जवळ आहे पण धर्माबाबतच्या कट्टर भूमिकेमुळे टिळक शेवटी नवब्राम्हणवादीच राहतात टागोर विशाल होतात आणि नंतर गांधींच्या बरोबरीने नवहिंदुवाद नववैष्णववाद सेलिब्रेट करतात गांधीही राष्ट्रवादी नाहीयेत तेही देशवादी आहेत राष्ट्रवाद हा अंतिमतः युद्धखोर बनवतो ह्याची लख्ख जाणीव टागोर व गांधींना दिसते गांधी व गोडसे ह्यांच्यातील वाद हा अंतिमतः देशवाद विरुद्ध राष्ट्रवाद ह्यांच्यातील वाद आहे 

प्रश्न असा आहे कि ह्या देशवादाला मधुसूदन दत्त व ब्रम्हबांधव उपाध्याय ह्यांचा ख्रिस्चन व इंग्रजांचा कलोनियल असे दोन प्रभाव जबाबदार आहेत का ? यूरोपात राष्ट्रवादाची अभिजातवादी  व रोमँटिक अशी दोन्ही रूपे दिसतात आणि रोमँटिक राष्ट्रवाद मध्ययुगीन देशी भाषेत लिहिलेल्या वाङ्मयाला महत्व देतो टिळकांचा राष्ट्रवाद हा अभिजातवादी आहे काय ? तर हो टिळकांचा राष्ट्रवाद हा अभिजातवादी राष्ट्रवाद आहे 

श्रीधर तिळवे नाईक 


आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ८७
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप १५ श्रीधर तिळवे नाईक

चि केळकरांनी मराठीला जे काही शब्द दिलेत त्यातील एक शब्द धर्मलंड ! म्हणजे धर्माबाबत आचरट  पाखण्डी ! टिळकांची धर्मविषयक मते ह्या पुस्तकाच्या संपादकीय प्रस्तावनेत (पान क्र त्यांनी हा शब्द वापरला आहे पुढे ह्यातील लंड म्हणजे पाखण्डी, प्रमाण मते मानणारा असा अर्थ शिल्लक राहिला लांडे म्हणजे पाखण्डी , वेद मानणारे ! मुस्लिमांना लांडे म्हंटले जाते तेव्हा त्याचा मूळ अर्थ आचरट पाखण्डी जे वेद प्रमाण मानत नाहीत असा होतो टिळकांच्या काळात खुद्द टिळकांना उद्देशून धर्मलंड हा शब्द वापरला जात होता आणि त्याचा समाचार घेतांना केळकरांनी हा शब्द लिखितमध्ये आणला आज आपण टिळकांना कर्मठ म्हणतो पण खुद्द टिळकांच्या काळात त्यांची पाखण्डी म्हणून निर्भत्सना करणारे अनेक ब्राम्हण होते 


तरीही टिळकांना नवब्राम्हणवाद व्यवस्थित मांडायचा होता आणि त्याला हिंदुत्व म्हणून प्रस्थापित करायचे होते  ब्राम्हण धर्माने तो हिंदू धर्म बनल्यावर त्याच्यावर द्विवर्णीय व्यवस्था लादली ज्यात फक्त ब्राम्हण उच्च आणि उरलेले ब्राम्हणेतर होते ब्राम्हण ब्राम्हणेतर वादाची सुरवात साधारण १००० साली केरळात तर १२०० च्या आसपास महाराष्ट्रात झाली आणि ती ब्राम्हणांनी केली ब्राम्हणवादाने वैष्णव धर्म शोषून घेतला भक्तिमार्गी अध्यात्मिक समता मान्य केली मात्र भक्तियोग हा ब्राम्हणांसाठी आणि शुद्रांसाठीही  आणि ज्ञानयोग राजयोग कर्मयोग हे फक्त ब्राम्हणांसाठी अशी विभागणी केली हिंदू धर्माचा वेदान्तिक टप्पा नाहीसा होऊन आता हा दुसरा नवा ब्राम्हणवादी  टप्पा सुरु झाला त्यामुळेच तुकारामसुद्धा स्वतःचा उल्लेख शूद्र म्हणून करतो टिळकांना हिंदू धर्माचा राजाराम मोहन रॉय ह्यांचा नवहिंदू टप्पा अमान्य होता कारण तो नवहिंदू असला तरी प्रामुख्याने नववेदान्ती होता टिळकांच्यापुढे  हा नवहिंदू कि रानडे ह्यांचा नववैष्णव टप्पा स्वीकारायचा कि आर्य समाजाचा नववैदिक टप्पा स्वीकारायचा असा प्रश्न होता टिळकांनी हे तिन्ही समाज नाकारून हिंदू धर्माच्या दुसऱ्या ब्राह्मणी टप्प्याला कवटाळले साहजिकच शाहू टिळक वादात त्यांनी शाहू महाराजांनी प्रथम वैदिकांचे  क्षत्रिय संस्कार करून घ्यावेत म्हणजे त्यांना वैदिक वेदोक्त मंत्राचा हक्क प्राप्त होईल अशी भूमिका घेतली त्यांचा वेदोक्तला विरोध न्हवता पण प्रथम वैदिक व्हा असा त्यांचा आग्रह होता हे करतांना ते ब्राम्हणवादाचा द्विवर्ण्य सिद्धांत नाकारत होते आणि चातुर्वर्ण्य मान्य करत होते क्षत्रिय आणि वैश्यांचे अस्तित्व मान्य करत होते कर्मठ द्विवर्ण्य हिंदुत्वाला ब्राम्हण्याला हेही पाखण्ड वाटत होते म्हणूनच टिळकांना त्यांनी धर्मलंड म्हणायला सुरवात केली ज्याचा खरपूस समाचार केळकरांनी घेतला ब्राम्हणवादात ही सुधारणा होती पण ब्राम्हणेतरांना हा मागासलेपणा वाटत होता 


टिळकांच्यासारखा नेता ब्राम्हणवादात का अडकावा ? राजकारणासाठी त्यांना ब्राम्हणांची गरज वाटत होती हे अपुरे उत्तर आहे कुठेतरी युरोपच्या प्रबोधनाच्या पहिल्या टप्प्यात कॅथॉलिसिझम आणि विज्ञान हातात हात घालून गेले तसे आता भारतात घडते आहे असे त्यांना वाटत होते का ? कि प्रत्येक राष्ट्राचा राष्ट्रवाद वेगळा असतो भारताचा राष्ट्रवाद हा धार्मिक राष्ट्रवादच असणार अशी त्यांना खात्री 
होती ?


मला असं वाटतं कि टिळकांचा आणि पुढे सावरकरांचाही भारतीय राष्ट्रवादही धार्मिक राष्ट्रवादच  असणार ह्यावर विश्वास होता भारतीय समाज मूलतः धार्मिक आहे हे त्यांचे आकलन होते त्यामुळेच व्हॅटिकन सिटी किंवा अरबस्तान ह्यांच्याप्रमाणे हिंदुस्तान हीही धर्मभूमी आहे असा दोघांचा विश्वास होता 


ह्यातून प्रश्न निर्माण होतो कि ह्याबाबतचा निर्णय घेणार कोण ? तर लोक ! पण लोक आपल्या मताशी ठामच राहतील ह्याची काय खात्री ? लोक आज धार्मिक राष्ट्रवादाला आणि उद्या सेक्युलर राष्ट्रवादाला पाठिंबा देणारे असतील तर ! तर ह्याचा अर्थ उघड आहे भारतात धार्मिक ध्रुव एका बाजूला तर सेक्युलर ध्रुव दुसऱ्या बाजूला अशी बायनरी रचना येणे अटळ जे आता झाले आहे 


थोडक्यात टिळकांच्या आगमनाने नवरोजी रानडे ह्यांच्या सेक्युलर ध्रुवाला चॅलेंज करणारा धार्मिक ध्रुव जन्माला आला आणि  हे दोन्ही ध्रुव काँग्रेसमध्ये प्रथम आपापसात लढले आणि ह्यातला धार्मिक ध्रुव टिळकांच्या मृत्यूनंतर 
काँग्रेसमध्ये अस्वस्थ राहून शेवटी बाहेर पडला त्याने प्रथम हिंदू महासभा नंतर जनसंघ आणि अलीकडे भाजप असा मोर्चा चालवला 


मी टिळकांना म्हणूनच आद्यहिंदुसम्राट म्हणतो जो आयुष्यभर काँग्रेसमध्ये होता 



श्रीधर तिळवे नाईक 


आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ८८
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप आणि व्यक्ती १६ श्रीधर तिळवे नाईक

राष्ट्रवाद आणि टागोरांचा देशवाद ह्यांची आपण तुलना केली कारण टिळकांना समांतर असे काही विचारमंथन भारतात सुरु होते हे कळावे टिळक तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांच्या डोक्यात असणाऱ्या देवसुर आर्य राष्ट्रवादाविषयी त्यांनी जमेल तसा प्रचार सुरु केला ४ जुलै १९०२ ला स्वामी विवेकानंद गेले तेव्हा टिळकांनी मृत्युलेख लिहिला (स्वामी विवेकानंद समाधीस्थ झाले लोकमान्य टिळकांचे लेख खंड ४ पान ३२७ ते ३३१  )त्यात आजच्या युगाचे शंकराचार्य म्हणून त्यांनी विवेकांनंदाचा गौरव केला टिळकांना बहुदा शंकराचार्य तरी कळले न्हवते किंवा विवेकानंद तरी कळले न्हवते जिनसीवाल्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्यावर लिहिलेल्या मृत्युलेखात हिंदू म्हणून जन्मलो जगलो हिंदू म्हणून मरेन व हिंदुत्वाच्या साहाय्यानेच अभ्युदय करेन अशी त्यांची भूमिका असल्याचे स्पष्ट करून टिळकांनी त्या भूमिकेवर स्तुतीसुमने उधळली होती 

ह्या हिंदुत्वात व्यक्तीचे रूप काय होते ? थोर पुरुषांची चरित्रे ह्या निबंधात (निबंधकार टिळक पान ५१) त्यांनी जी मांडणी केलीये त्यानुसार 
१ प्रतिभा जन्मसिद्ध असते 
२ तिला विकसित करायला मेहनत करायला लागते 
३ ह्या मेहनतीला अनुकूल परिस्थिती अनुकूल असावी लागते परिस्थिती अनुकूल नसल्यास प्रतिभा विकसित क्वचितच होते 
४ प्रतिभा आणि अनुकूल परिस्थिती नेते व व्यक्ती घडवते 
५ प्रतिभा आणि अनुकूल परिस्थिती ह्यांच्याबरोबरच काम होण्यासाठी ईश्वराचे सहाय्य लागते पण ईश्वर उद्योगी व्यक्तींनाच सहाय्य करतो 
६ थोर पुरुष ईश्वरी कृपेनेच जन्मतात 

ज्याला आज मेरिटोक्रसी म्हंटले जाते त्याचा पुरस्कार टिळकांनी केलाय जन्मजात प्रतिभेला त्यांनी महत्व दिलंय म्हणजे चितारी जन्मजातच असली पाहिजे जो चितारी नाही त्याच्यासाठी चित्रे म्हणजे करमणूक त्याहून अधिक काही नाही असे ते म्हणतात मात्र चित्रे साठवायला असे लोक हवेत असे ते म्हणतात परिस्थितीचे महत्व त्यांनी नाकारलेले नाही शिवाय प्रतिभेने स्वतःवर मेहनतही घ्यायला हवी असा त्यांचा आग्रह आहे जन्मजात काहीतरी असतेच म्हणून थोर लोक थोर असतात असा त्यांचा दावा आहे ह्या थोर लोकांची चरित्रे वाचून किंवा त्यांच्या जयंत्या करून कोणी बीए शिवाजीसारखा थोर झाला नाही तरी कदाचित ज्याच्या अंगी थोर पुरुषाचे ओज आहे अशी व्यक्ती थोर पुरुषांपासून प्रेरणा घेऊन स्वतःही थोर होऊ शकते म्हणूनच थोर पुरुषांचे स्मरण जयंती पुण्यतिथी वैग्रे साजरे झालेच पाहिजेत असे टिळक म्हणतात हिंदुत्वाला हे मान्य आहे म्हणूनच प्रातःस्मरणीय लोकांना पुजले जाते ज्यांच्याजवळ प्रतिभा नसते त्यांनी निदान उत्तम अनुयायी व्हावे अशी अपेक्षा ह्यातून आपोआप निर्माण होते 


श्रीधर तिळवे नाईक 

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ८९
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप आणि महाभारत १७  श्रीधर तिळवे नाईक
मागच्या लेखात टिळक व्यक्तीकडे काय दृष्टीने पहात होते ते आपण पाहिले मागील अनेक लेखात टिळकांची समष्टी देवसुरआर्य संस्कृती आहे हेही आपण पाहिले ह्या देवसुर संस्कृतीचा उगम ते उत्तर ध्रुवावर  न्हेतात आणि मग भारताला आर्यभूमी म्हणून ते पाहतात हेही आपण पाहिले आणि रामायणावरील लेखात ते शैव आणि असुर ह्यांना मागासलेले समजतात हेही पाहिले त्यांचे हिंदुत्व उत्तर ध्रुवापासून  पासून सुरु होते व्हाया वेद विकसित होते आणि त्यांच्या समकालीन वास्तवात वावरते टिळकांचे हिंदुत्व हे आर्यसातत्य आहे 
आता आपण टिळकांचे महाभारताविषयी काय मत आहे ते पाहणार आहोत ह्या महाभारताच्या अध्ययनातूनच पुढे टिळकांचे गीतारहस्य जन्मते आणि त्या निमित्ताने ते उपनिषद आणि वेदांत ह्यांना भिडतात आपण बारकाईने पाहिले तर टिळक १ वेद २ स्मृती ३ उपनिषद व गीतोनिषद ४  महाकाव्ये आणि ५ वेदांत ह्या हिंदूंच्या पाचही अंगांना भिडतात आणि त्यांना स्वतःच्या राष्ट्रवादात उभे करतात असे दिसेल उत्तर ध्रुवाचा सिद्धांत मांडून ते आर्य भारतीयांना आपण युरोपियन आर्यांच्या तोडीस तोड आहोत आपणास न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही असा आत्मविश्वास देतात आपण आपले कायदे आपल्याच स्मृतीपरंपरेतून निर्माण केले पाहिजेत असा आग्रह धरतात आणि रामायण महाभारतांना ते राष्ट्रीय महाकाव्ये असे संबोधून राम आणि कृष्ण ह्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनवतात आणि शेवटी गीतेचा निवृत्तिपर अर्थ मुख्यार्थ नसून गीता कर्मप्रधान अर्थ सांगत आहे आणि तोच गीतेचा मुख्यार्थ आहे असे सांगून राष्ट्रनिर्माण करण्याच्या कर्माला प्रोत्साहन देतात 
म्हणजेच 
१ आत्मविश्वास गमावलेल्या आर्य समाजाला तुही युरोपियन लोकांच्याप्रमाणे आर्यच आहेस त्यांच्या समान आहेस हा आत्मविश्वास देणे 
२ त्याला परंपरेत उभे करून स्वतःच्या दृष्टीतून नवे जग पाहायला प्रवृत्त करणे 
३ त्यासाठी शिवाजी व गणेश उत्सव साजरे करून संगठन करणे त्याच्यापुढे महापुरुषांचा आदर्श उभा करणे आणि रामायण महाभारतावर आधारित नाटके व मेळे जागोजागी भरवून जागरण करणे 
४ आणि हे करायला खुद्द ईश्वरच कसे सांगत आहे हे पटवून देण्यासाठी गीतेचा कर्मयोग सांगणे, पसरवणे व लढ्याला आवश्यक असणारी निर्भयता त्याच्या ठायी निर्माण करणे 
ही टिळकांची स्ट्रॅटेजी आहे 

टिळक हे उत्कृष्ट नेते होते हे त्यांची स्ट्रॅटेजी पाहिले कि स्पष्ट होते १८५० ते १९२० ह्या काळातील सर्वोत्कृष्ट राजकीय नेता निवडायची वेळ आली तर टिळक हा मान सहज पटकावतील इतके ते इतरांच्यापुढे आहेत सर्वोत्कृष्ट सामाजिक नेत्याचा मान अर्थातच महात्मा फुलेंना जातो आणि सर्वोत्कृष्ट आर्थिक नेता म्हणून दादाभाई नौरोजी ह्यांची तर सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक नेतृत्वाचा मान न्यायमूर्ती रानडे व रबिन्द्रनाथ टागोर ह्यांना विभागून द्यावा लागतो ह्या काळातील सर्वोत्कृष्ट दलित नेता नारायण गुरु आहेत 

टिळक राष्ट्रीय जाणिवेसाठी रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये आवश्यक आहेत असे मानतात ते ह्यांना आर्ष महाकाव्ये मानतात आणि ही महाकाव्ये वैष्णव धर्म मांडतात हे कबूल करतात 

श्रीधर तिळवे नाईक 

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ९०
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप आणि महाभारत १८ श्रीधर तिळवे नाईक 

महाभारत हे जगातले सर्वश्रेष्ठ महाकाव्य आहे जे महाभारतात नाही ते भारतात नाही असे वचनच आहे रवींद्रनाथ टागोरांनी गंगा आणि हिमालय ह्यांच्याप्रमाणे रामायण व महाभारत भारतीय भूगोलाचे अढळ भाग आहेत असं म्हंटलं आहे त्यांच्यामते भारतात विखुरलेले सर्वकाही महाभारताने गोळा केले म्हणूनच ते पोहचले अन्यथा कदाचित हे संचित गायब झाले असते 

 आर्य संस्कृतीने ज्या काही ग्रेट गोष्टी जन्माला घातल्या त्यात टिळकांचा शब्द वापरायचा तर रामायण महाभारत ही आर्ष महाकाव्ये येतात ह्या दोन महाकाव्यामुळेच भारत १० व्या शतकापासून कल्पनेत वावरायला लागला आणि अजूनही त्याचे पुष्पक विमान धरतीवर लॅन्ड झालेले नाही 

महाभारताविषयी चर्चा करतांना शास्त्रींच्यात आपण कोणती प्रत संपूर्ण वाचली  ते सांगावं लागतं मी फक्त गोरखपूर प्रत संपूर्ण वाचली आहे आणि अलीकडे इसाहित्याने इप्रकाशित केलेली अशोक कोठारे अनुवादित  महाभारत वाचत असतो  

महाभारताचा  ज्याच्यावर प्रभाव पडला नाही असा भारतीय साहित्यिक दुर्मिळ मात्र मूळ प्रत खूप कमी वाचतात हा माझा अनुभव आहे आणि टिळकांच्या काळीही हीच स्थिती होती असे टिळकांचे महाभारतावरचे निबंध वाचून वाटते उठसुठ ब्राम्हणांना नावे ठेवणाऱ्या साहित्यिकांना एक गोष्ट नक्कीच ब्राम्हणांच्यापासून शिकण्याजोगी आहे ती म्हणजे त्यांनी रामायण महाभारताचे व महाभारतातील गीतेचे देशी भाषेत सादर केलेले अवतार वैष्णव धर्माने ह्या दोन महाकाव्यांच्या साहाय्याने शैव जैन आणि बौद्ध ह्यांना पराभूत केलं असं माझं स्पष्ट मत आहे ही महाकाव्ये न्हवती तोवर वैष्णवांना भारतीय इतिहासात जागा न्हवती साहित्य काय करू शकतं त्याचा हा नमुना ! चायना जपान ब्रम्हदेश वैग्रे देशामध्ये असे महाकाव्यांचे धर्म म्हणून आक्रमण झाले नाही म्हणूनच तिथे बौद्धधर्म टिकला खुद्द शैव ह्या महाकाव्यांच्या इतके आहारी गेले कि अनेक शैव पुजाऱ्यांनी राम कृष्णांची पूजा सुरु केली आणि शैव धर्माला राम राम ठोकला शैवांच्या आणि बौद्धांच्या धर्मांतरात ह्या दोन महाकाव्यांचा प्रचंड मोठा वाटा आहे अनेक शैव सिद्ध आणि दैवते नंतर रामकृष्णाचे अवतार झाले किंवा प्रारूप झाले खुद्द महाराष्ट्रात विठ्ठल हे शैव दैवत ज्याचे पुजारी ब्राम्हण न्हवते तर कोळी होते आज कृष्णावतार झाले आहे जगाच्या इतिहासात कुठल्याही महाकाव्यांना एव्हढे दैदिप्यमान यश मिळालेले नाही आणि ह्याच दोन महाकाव्यांनी वर्णजातिव्यवस्था घट्ट केली आणि ब्राम्हण क्षत्रिय ह्यांना सर्वोच्च पुण्ययोनीचे स्थान प्राप्त करून दिले जोपर्यंत रामायण महाभारताचा प्रभाव नष्ट होत नाही तोवर भारतातून वर्णजातिव्यवस्था नष्ट होणे शक्य नाही 

महाभारताचा हा प्रभाव ठाऊक असल्याने साहजिकच टिळक महाभारताकडे वळणे नैसर्गिक होते आणि तसे ते वळले टिळकांचे महाभारतावरचे लेख लोकमान्य टिळकांचे लेख खंड चार पान क्र ४३१ ते ४७३ वर उपलब्ध आहेत जिज्ञासू ते मुळातून वाचू शकतात मराठीत गो नि दांडेकरांचे श्री महाभारत दोन खंडात आहे वि स खांडेकरांची ययाती शिवाजी सावंतांच्या मृत्युंजय व युगंधर ह्या दोन्ही कादंबऱ्या व रणजित देसाई ह्यांची राधेय ह्या महाभारतावरच आधारित आहेत इंग्लिशमध्ये राजगोपालाचारी ह्यांचे महाभारतही मस्त जमलंय शिवाय सिरियल्स आहेतच महाभारताचा काय प्रभाव आहे हे कळायला हे पुरेसं आहे 

टिळकांच्या मते रामायण महाभारताचा प्रभाव भारतभर आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय जागृतीसाठी लोकांना संघटित करण्यासाठी आपण ह्या आर्षमहाकाव्यांचा वापर केला पाहिजे असे टिळक सुचवतात लालकृष्ण अडवाणींनी टिळकांचे ऐकून पुन्हा एकदा हिंदू जागृती केलेली आपण पाहिली आहेच खुद्द टिळकांच्या प्रभावानेच खाडिलकरांनी त्याकाळात ह्या आर्ष महाकाव्याद्वारे त्यांचा नाटकात (विशेषतः सैरंध्री व कीचकवध )वापर करून वन्ही चेतवली असे दिसते अँनी बेझन्ट ह्यांनीही संक्षिप्त महाभारत प्रकाशित केले होते आणि चि वि वैद्य ह्यांनी संस्कृतमध्ये संक्षिप्तीकरण केलेलेही उपलब्ध आहे 

संपूर्ण महाभारत वाचायला वेळ नाही हे ओळखून महाभारतकथा  आणि महाभारताची चिकित्सा चिंतामण विनायक  वैद्य ह्यांनी MAHABHARAT  A  CRITICISM ह्या ग्रंथात सादर केली केली आणि ह्या ग्रंथाची चिकित्सा करतांना टिळकांनी महाभारताची चिकित्सा केली 

टिळकांच्या मते धर्म अर्थ काम मोक्ष ह्या चारही पुरुषार्थाचे विवेचन  महाभारत करते हिंदूंच्या निरनिराळ्या प्रांतातील आचारात जे काही साम्य आहे ते ह्या महाकाव्यांमुळे आहे असे टिळक म्हणतात राष्ट्रीय ऐकव्याची साक्ष आणि चार पुरुषार्थाचे प्रस्थापित केलेले साम्राज्य हा  ह्या ग्रंथाचा पडलेला प्रभाव आहे असे टिळकांचे म्हणणे आहे ज्यातील दुसऱ्या भागाशी मी पूर्ण सहमत आहे . इंग्रजी काळात ह्या दोन ग्रंथाच्या अध्ययनाची व श्रवणाची परंपरा कमी झाली पण ही स्थिती फार काळ टिकली नाही ही आनंदाची गोष्ट असं टिळक म्हणतात 

आधुनिक युगाच्या संदर्भात हा ग्रंथ महाभारताची चिकित्सा करतो म्हणून टिळक वैद्य ह्यांचे अभिनंदन करतात नवनवीन पुराव्याच्या आधारे चिकीत्सा होत राहिली पाहिजे असे टिळकांचे मत आहे आणि हे कुणीतरी आत्ताच्या हिंदुत्ववाद्यांना सांगणे आवश्यक आहे 



(आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ९१
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप आणि महाभारत १९ श्रीधर तिळवे नाईक 

मी भविष्यावैज्ञानिक आहे आणि माझा साधा नियम असा जोवर तुझे भविष्यविषयक प्रेडिक्शन अचूक आहे तोवर तुझे इतिहासविषयक आकलन अचूक आहे भविष्याविषयक प्रेडिक्शन चुकले कि मी इतिहाससुद्धा पूर्णपणे नव्याने पहायला लागतो माझे हिंदुत्वाविषयीचे प्रेडिक्शन अद्यापतरी चुकलेले नाही किंबहुना मी असे प्रेडिक्शन  दिल्याने मी  शिव्याच खाल्ल्या आहेत आणि काही अतिशहाण्यांनी माझ्यावर हिंदुत्ववाद्याचा शिक्का मारण्याचाही प्रयत्न केला आहे ह्याच न्यायाने गांधींची चिकित्सा करतात म्हणून मग आंबेडकरांना गांधीवादी म्हणावे लागेल 

माझी प्रेडीक्शन्स कशातून आलेत त्याची मांडणी म्हणजे माझे टिळकांवरचे हे लेखन ! हिंदुत्ववाद्यांना नुसत्या शिव्या घालण्यात मला रस नाही ह्या वादावर अनेक खोटे आरोप पुरोगामी लोकांनी केले आणि त्याचा फायदा हिंदुत्ववादाला झाला असे दिसते ह्याउलट हिंदुत्ववाद्यांनी केलेला खोटेपणा इतक्यांदा उघडा पाडूनही तो यशस्वी होतांना दिसतोय हा एक विचित्र विरोधाभास आहे आणि तो ठळक आहे असो 

महाभारतात काही गोष्टी मला फार विचित्र वाटत आल्या आहेत म्हणजे तुम्ही जर पर्वांची नावे पाहिली तर भीष्म द्रोण कर्ण शल्य ह्यांची नावे पर्वांना आहेत पण एकही पर्व अर्जुन , युधिष्ठर किंवा श्रीकृष्ण ह्यांच्या नावे नाही कौरवांचेच नायक कसे काय पर्वांच्या नावाचे हकदार ? ही नावे मूळची असतील तर अर्जुन कृष्ण वैग्रे सुरवातीला खूप दुय्यम असावेत हा संशय बळावतो आणि असं वाटतं कि काहीतरी असं आहे जे संशयास्पद आहे 

महाभारत हा कदाचित भरत कुलाचा कुलवृत्तांत असावा आणि म्हणूनच त्याचे नाव भारत असावे प्राचीन काळी सर्वच कुळांचा कुलवृत्तांत ठेवण्याची जबाबदारी पुजाऱ्यांची होती माझ्या आजोबांच्याकडे  गावातील सर्व  कुळांच्या वह्या होत्या आजही काशीला वैग्रे अशा नोंदी मिळतात रामायण आणि महाभारत ही दोन्ही महाकाव्ये ही मूळची इश्वाकू आणि भरत ह्या दोन कुलांची कुलवृत्तांतिक नोंदकाव्ये होती असे माझे मत आहे 

टिळकांच्या मते भारत हेच प्रथम नाव असावे मग महाभारत असे झाले असावे महाभारत हे व्यासांनी सुमंतु , जैमिनी , पैल ,शुक्र , वैशंपायन  ह्या पाचजणांना सांगितले असावे ह्यातील जी वैशंपायनची प्रत आहे ती आपण वाचतो आहे असे टिळक म्हणतात व्यासांनी वैशंपायनास , वैशंपायन ने जनमेजयास आणि पुढे मग सौतीस असा प्रवास असावा म्हणजे आत्ताच्या महाभारताचे व्यास , वैशंपायन आणि सौती असे तीन लेखक आहेत असे वाटते असे टिळक म्हणतात माझ्या मते  ह्या तीघांबरोबर शौनकाचाही समावेश ह्यात होतो आणि ब्राम्हणांचे महात्म्य सांगणारे श्लोक घुसवण्याची खोड शौनकला असावी महाभारताची शंभर पर्वे होती हे टिळक मान्य करतात मला हे कल्पनाविलास वाटते किंवा मग आधी शंभर पर्वे असावीत नंतर त्यांचे पुन्हा वर्गीकरण करून  पुन्हा अठरा पर्वात विभागणी केली असावी 

टिळक भारत हे चोवीस हजार श्लोकाचे व महाभारत हे १ लाख श्लोकाचे असे मानतात जे रिजनेबल वाटते प्रत्यक्षात महाभारत वेगवेगळ्या प्रतीत हरिवंश धरून ९५००० ते ९६००० ह्यांच्या दरम्यान आहे एक लाख आकडा भरताड करायची सोय व्हावी म्हणून किंवा टारगेट म्हणून दिलेला आहे मुख्य आख्याने २४००० श्लोकात व उपाख्याने ७१००० ते ७२००० श्लोकात असावीत हा वैद्यांचा निष्कर्ष टिळक मान्य करतात जय हे व्यासाच्या व  भारत हे वैशंपायन ह्याच्या आणि महाभारत हे सौतीच्या ग्रंथाचे नाव असावे हा वैद्यांचा निष्कर्ष टिळक फेटाळतात मला भारत हे व्यासांच्या ग्रंथाचे नाव असावे व हा ग्रंथ व्यास खुद्द ह्या कुलाचे भाग असल्याने तटस्थपणे त्यांनी हा कुलवृत्तांत लिहिला असावा पुढे पांडवांच्या विजयाची ही कथा हे प्रस्थापित झाल्याने वैशंपायन ह्यांनी जय हे नाव दिले असावे व पुढे अनेक उपाख्यानांनी महा झाल्याने ह्याला सौतीने महाभारत हे नाव दिले असावे असे वाटते 
वैद्यांनी इसवीसनपूर्व २०० ते ३०० हा महाभारताचा कालखंड टिळक मान्य करतात मेगॅस्थिनीसच्या ग्रंथात रामायण महाभारताचा उल्लेख नाही ह्याचा अर्थ त्याच्याकाळापर्यंत तरी ही महाकाव्ये लिहिली गेली नसावीत पुढे 
डायॉसन खायसोस्तोमच्या ग्रंथात उल्लेख आहे म्हणजे इसवीसन १०० मध्ये ही महाकाव्ये प्रसिद्ध असावीत असे अनुमान आहे म्हणजेच वैद्यांचा काळ बरोबर असावा असा निष्कर्ष टिळक काढतात उठसुठ महाभारताला इसवीसनपूर्व ३००० ते ५००० इतके मागे न्हेणाऱ्यांनी हे लक्ष्यात घ्यावे हे बरे 

श्रीधर तिळवे नाईक 


आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ९२


टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप आणि महाभारत २० श्रीधर तिळवे नाईक 

आत्ताचे महाभारत हे शैवांमधील दोन उपसंस्कृती द्रविड वा नागांपैकी नागांचे सर्पसत्र करताना सांगितले गेले आहे ही विलक्षण क्रूर स्थिती आहे म्हणजे नाग लोक मारले जात आहेत आणि त्यामागचे कारण हे महाभारत आहे म्हणून हे महाभारत सांगितले जात आहे माणसांना मारले जात असतांना काव्य ऐकवणे हे फक्त आर्यांना साधू शकते नातेवाईकांना मार म्हणून सांगण्यासाठी गीता सांगणे आणि नागांना मारले जात असतांना महाभारत ऐकवणे ह्यांच्यात फरक नाही  वैद्यांना किंवा टिळकांना ही क्रूरता जाणवलेली नाही जणू ही क्रूरता नैसर्गिक आहे 

पुढे टिळक महाकाव्य म्हणजे काय ह्याचा मागोवा घेतात भारतीय साहित्यशास्त्रात ह्या आर्षमहाकाव्यांची चर्चा नाही हे ते मान्य करतात पण ह्यातून निर्माण होणारा प्रश्न ते लक्ष्यात घेत नाहीत पहिली शक्यता अशी आहे कि रामायण व महाभारत खूप उशिरा म्हणजे सातव्या शतकात लिहिली गेली असावीत त्यामुळे संस्कृतमध्ये त्यांची समीक्षाही उशिरा झाली असावी दुसरी शक्यता ही दोन्ही महाकाव्ये इसवीसन १ च्या आसपास प्राकृतात लिहिली गेली असावीत आणि सातव्या शतकात त्यांचे व्यासांनी संस्कृतकरण केले असावे किंवा व्यासांचा मूळ ग्रंथ प्राकृतात असावा व पुढे सूतांनी वा व्यासांनी  त्याचे संस्कृतकरण केले असावे किंवा शक्यता अशीही आहे कि सद्याची ही आर्षकाव्ये साहित्यशास्त्रींना उपलब्धच न्हवती त्यामुळे त्यांच्याविषयी लिखाणच शक्य न्हवते ह्या आर्षमहाकाव्यांची लोकप्रियता ही ७ व्या शतकानंतर वाढीस लागलेली आहे आणि कालिदास वैग्रेंची नाटके ही त्यापूर्वीच लिहिली गेली असावीत भीष्मपर्वातला हुणांचा उल्लेख हेच दर्शवतो भासाचा काळ दुसरे व तिसरे शतक मानला जातो ज्याने ऊरूभंगः व माध्यमव्यायोग ही महाभारत कथेशी निगडित नाटके लिहिलीत त्याचा उल्लेख संस्कृत साहित्यशास्त्रात येतो पण महाभारताचा येत नाही हे केवळ आश्चर्यकारकच आहे भासाच्या ऊरूभंगात त्याने हे नाटक महाभारतावरून घेतल्याचा उल्लेख नाही असं तर नाही ना कि आधी लोककथा मग नाटके आणि मग महाकाव्ये लिहिली गेली ? आपण अनेकदा आपला इतिहास लिहितांना ग्रीक रोमन युरोपियन फॉर्म्युला पकडतो पण तोच अप्लाय होतो का ह्याची चौकशी करत नाही तिकडे होमर आधी झाला आणि नंतर इस्किलस वैग्रे नाटककार झाले म्हणून आपल्याकडेही असे झाले असे गृहीत धरता येणार नाही कारण शैवांच्यात नाट्यपरंपरा खूप प्राचीन आहे भासाची नाटके रामायण महाभारताच्या आधारे रचली गेलेत कि भासाच्या नाटकांच्या आधारे महाभारत रचले गेले आहे ? माझ्या मते आधी कथाकाव्याच्या आणि नंतर नाटकाच्या फॉर्ममध्ये कथा आल्या आणि मग ह्यांच्या आधारे महाकाव्ये रचली गेली खुद्द महाभारतही आधी पुराणे होती असं सांगतचं शिवाय महाभारतात नाटकाचे उल्लेख आहेतच अर्थात ह्यामुळे महाभारताची महती कमी होत नाही ग्रीकांना नाटक हा फॉर्म खूप उशिरा सापडला आणि त्याची कारणे तिथल्या भौगोलिक अवस्थेत आहेत शक्यता अशी आहे कि आपल्याला नाटक हा फॉर्म आधी सापडला कारण आपल्या हवामानामुळे आपण १५ -१५ दिवस सहज नाटक बघू शकतो ग्रीकांना हे अवघड होते त्यापेक्षा घरी बसून महाकाव्य लिहिणे अधिक योग्य वाटले असेल तर त्यात आश्चर्य काय ? टिळक असा विचार करत नाहीत 

महाकाव्य म्हणजे काय ह्याची चर्चा पुढे टिळक करतात त्यांच्या मते १ ऋषीकुळातील ऋषीने लिहिलेली २ उच्चकुलीन म्हणजे ब्राम्हण वा क्षत्रिय नायक असलेली , ३ इतिहासप्रधान कथा असलेली (कल्पनाप्रधान न्हवे) , नायकाइतकीच खलनायकही बलवान ठेवणारी , ४ सूक्ष्मार्थन्यायाने युक्त , संसारातील प्रसंगांची द्योतक , पावनलोकयात्राक्रमाची प्रतिपादक , ५ लोकांच्या अंगी शौर्य , धर्म ,अभिमान , उत्साह ,सत्य ह्यांना  संक्रमित करणारी आणि मुख्य म्हणजे ६ लोकांचे शीलवर्धन करणारी अशी कलाकृती म्हणजे महाकाव्य होय माझ्या मते ही तोवरची सर्वात उत्तम आर्यन व्याख्या आहे.  महाकाव्याच्या संदर्भातही टिळक फक्त ब्राम्हण व क्षत्रिय ह्यांनाच नायक बनवतात आणि ऋषींनीच ती लिहिली पाहिजे असे सांगतात हे लक्ष्यात घेण्याजोगे आहे पुण्ययोनीचें वैष्णव भूत इथेही उतरत नाहीच ही दोन लक्षणे मला अजिबात मान्य नाहीत महाकाव्य कुणीही लिहू शकतो आणि कुणावरही लिहू शकतो  मात्र इतर लक्षणे ही सर्वच संस्कृतींनी पालन करावीत अशी आहेत फक्त इतिहासप्रधानता हेही मला मान्य नाही कल्पनेलाही वाव मिळालाच पाहिजे असे मी मानतो रामायण व महाभारत ही दोन्ही महाकाव्ये कल्पनाप्रधानच आहेत ती इतिहास आहेत हा टिळकांचा गैरसमज आहे आणि त्याच्या मुळाशी त्यांची आर्यशीलता आहे जी जाता जात नाही 

श्रीधर तिळवे नाईक 
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ९३


टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप आणि महाभारत २१ श्रीधर तिळवे नाईक 

चिंतामणी वैद्यांचे महाभारतावरील पुस्तक हे महाभारतावरील आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे असे टिळक म्हणतात आणि ते सत्य आहे पण वैद्यांचे काही कल्पनाविलास म्हणजे श्रीकृष्ण हाच हेरॅक्लिस आताच्या काळात विनोदी वाटतात येनकेनप्रकारे ग्रीकांशी आपल्या पूर्वजांशी नाळ जुळवणे स्वतःला उत्तर ध्रुवावरून आल्याचे मानणे हे सगळेच टिळकांचे कल्पनाविलास आहेत 

टिळक एकाबाबतीत मात्र फार महत्वाचा मुद्दा मांडतात टिळकांच्या मते महाभारत हे ब्राम्हण ग्रंथानंतर झाले म्हणजे इसवीसन पूर्व १५०० ते १२०० च्या आसपास ! ब्राम्हण ग्रंथात आलेल्या अश्वमेध केलेल्या राजांच्या यादीत युधिष्ठराच्या पूर्वजांचे नावही जनमेजय होते हे सिद्ध करून ! 

टिळक ज्याला इतिहास म्हणतात त्याला मी कल्पनाविलास म्हणतो हा कल्पनाविलास ब्राम्हणग्रंथांच्यानंतर सुरु झाला व्यासाने भरत कुळाचा कुलवृत्तांत भारत लिहिल्यानंतर 
हा जय होऊन पुढे महाभारत झाला आणि ह्या ग्रंथाच्या आधारेच पुढे श्रीकृष्ण हे नवे दैवत आणले गेले श्रीकृष्ण व राम ह्यांच्या आधारे पुढे वैष्णव धर्म निर्माण केला गेला ज्याचे समर्थक खुद्द टिळक आहेत गर्ग ज्योतिष्यानेही बुद्धाच्या आधी पांडव झाले असे म्हंटले आहेच कलियुग ते नंद ह्या दरम्यानच्या काळात नेमके काय झाले हे आजही स्पष्ट नाही आणि महाभारताचा पहिला मसुदा नेमका ह्याच काळात लिहिला गेला असावा किमान कुलवृत्तांत तरी !

मेगॅस्थिनीसने डायोनीसॉस हा सर्वांचा मूळपुरुष असल्याचे सांगितले म्हणून त्याच्या आधारे वैद्य चर्चा करतात म्हणून टिळकही चर्चा करतात व वैद्यांचा सिद्धांत नाकारून महाभारताचा काळ ब्राम्हण ग्रंथांनंतरचा असल्याचा सिद्ध करतात  ज्याच्याशी मी सहमत आहे वैदिक धर्म नंतर ब्राम्हण धर्म नंतर वैष्णव धर्म ही संगती इथे लागते 

इसवीसनपूर्व सहाव्या पाचव्या शतकापासून असुर आर्य बुद्धाचा प्रभाव देवसुर आर्यसंस्कृतीवरही  पडायला लागला आणि देवसूरांना आपली नाव बुडतांना दिसायला लागली त्यातच अशोकाचे बलाढ्य साम्राज्य बौद्ध झाले आणि बुद्धाच्या तोडीचा कोणी प्राचीन पुरुष निर्माण केल्याशिवाय ब्राम्हण धर्माची वापसी होऊ शकत नाही हे कळलेल्या देवसुर आर्यसंस्कृतीने अश्या पुरुषांचा शोध घ्यायला सुरवात केली तेव्हा त्यांना दोन शिवभक्त सापडले एक राम एक कृष्ण ह्या दोघांच्या कथा लोकप्रिय होत्या आणि मुख्य म्हणजे ह्या दोघांचेही कुलवृत्तांत उपलब्ध होते त्या कुलवृत्तांताच्या आधारे महाकाव्यनिर्मितीचा प्रकल्प सुरु झाला आणि त्यातूनच रामायण आणि महाभारत जन्मले ह्या दोघांना विष्णूचे अवतार बनवून वैष्णव धर्माची आस्तेकदम स्थापना करण्यात आली 

ज्यांनी ही महाकाव्ये निर्माण केली त्यांना डायनिसॉस म्हणजे कोण तेही माहित न्हवते आणि मेगॅस्थिनीस कोण तेही ! त्यामुळे वैद्य टिळकांचा हा वाद फक्त ऍस्ट्रॉनॉमीच्या पातळीवर इंटरेस्टिंग वाटतो . टिळक नंदांचा कालखंड इसवीसनपूर्व ४२५ मानतात जो मलाही पटतो 

टिळक महाभारत युद्धाचा काळ इसवीसनपूर्व १५०० च्या आधी न्ह्यायला तयार नाहीत हे कोणीतरी हिंदुत्ववाद्यांना जाऊन सांगणे गरजेचे आहे 

श्रीधर तिळवे नाईक 


आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ९४


टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप आणि महाभारत २२ श्रीधर तिळवे नाईक 

माणसांनी कसं असावं हे सांगते ते रामायण आणि माणसं प्रत्यक्षात कशी असतात ते दाखवते ते महाभारत ! टिळक महाभारतातील व्यक्तिरेखांची स्खलनशिलता दाखवलीये म्हणून व्यासांचं कौतुकच करतात भीष्म परशुराम युद्धातील भीष्म ज्येष्ठतेपुढे झुकत नाही ह्याचं त्यांना कौतुकच आहे त्यांच्या जहालवादाचे प्रतिबिंब त्यांच्या महाभारतावरच्या विश्लेषणात पडलेले आहे ही सर्व चर्चा मे १९०५ मध्ये चाललीये ज्यावेळी जहाल मवाळ वाद सुरु आहे एका अर्थाने मवाळवादी रामायणवादी आहेत आणि ब्रिटिश त्यांच्यासाठी रावणासारखे आहेत ज्ञानसंपन्न धनसंपन्न अनेक तोंडांनी बोलणारे तर जहालवादी महाभारतवादी आहेत आणि ब्रिटिश त्यांच्यासाठी दुर्योधन आणि दुःशासन आहेत ज्यांचा अहंकार मदमस्तपणा लोळवायचा असेल तर भारतीय जनतेला श्रीकृष्ण बनायला लागेल टिळक स्वतः श्रीकृष्णासारखे शस्त्र उचलायला तयार नाहीत पण कोणी अर्जुन शस्त्र उचलायला तयार असेल तर त्याला गोष्टी युक्तीच्या सांगेन चार म्हणत  मदत करायला तयार आहेत मवाळांचा आदर्शवाद पुरे झाला त्यांनी आता वास्तव जसे आहे तसे पहावे असं टिळक सतत सांगतायत 

थोर पुरुष आपत्तीतही आपला तोल सोडत नाहीत हे महाभारतात वारंवार दाखवले जाते मग नल असो कि श्रीकृष्ण म्हणूनच आपत्तीकाळात महाभारत अधिक मार्गदर्शक ठरते 

टिळक साहित्याच्या प्रयोजनाविषयी इम्पॅक्टवादी आहेत महाकाव्यातील व्यक्तिरेखांचा जनजीवनावर प्रभावच पडणार नसेल तर ते साहित्य काय कामाचे असा त्यांचा प्रश्न आहे राम , नळ , युधिष्ठर सारखे आदर्श काही करमणूकीकरता ऋषीनीं निर्माण केलेले नाहीत तर त्यांचा प्रभाव पडून शीलवर्धन व्हावे म्हणून ही महाकाव्ये लिहिली गेली आहेत असे वैद्यांचे व टिळकांचे म्हणणे आहे ग्रीक महाकाव्ये कसलाही नैतिक आग्रह लावून धरत नाहीत त्यामुळे शीलवर्धन होत नाही पण रामायण महाभारत मात्र नैतिक आग्रह लावून धरतात आणि शीलवर्धन  
करतात असा फरक वैद्य सांगतात आणि टिळक त्याला अनुमोदन देतात हा नैतिक आग्रह काय स्वरूपाचा आहे ते पुढील लेखात पाहू

श्रीधर तिळवे नाईक 


आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ९५


टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप आणि महाभारत २३ श्रीधर तिळवे नाईक 

मी मागच्या लेखात म्हंटल्याप्रमाणे वैद्यांनी अधोरेखित महाभारतातला नैतिक आग्रह टिळकांना महत्वाचा वाटतो आणि महाभारत वैष्णव ग्रंथ आहे हेही टिळक मान्य करतात मात्र कसा ते टिळक सांगत नाहीत त्यामुळे आता आपणालाच ह्या मुद्द्याची चर्चा करणे भाग आहे वैद्यांच्या  महाभारत  अ क्रिटिसिझम ह्या ग्रंथातील  THE VAISHNAVITE ELEMENT IN THE MAHABHARATA ह्या प्रकरणात ही चर्चा येते 

पहिली युद्धानंतर श्रीकृष्णाच्या बायकांना यादवांचा नाश झाल्यानंतर अर्जुन श्रीकृष्णाच्या बायका घेऊन जात असतांना रानटी लोकांनी केलेल्या हल्ल्याची आहे वैद्य ती पुढीलप्रमाणे सांगतात 

वैद्यांच्या मते नारायणाची स्तुती करणारा पहिला श्लोकच व्यास कृष्णाचे चाहते असल्याचे दर्शवते आणि हा श्लोक व्यासांनीच लिहिलाय महाभारत हे पंचरात्र संप्रदायाचा धर्मग्रंथ होता कि नाही हा वादाचा विषय पण वैद्य महाभारताचे पंचरात्र कनेक्शन मान्य करतात मात्र व्यासांनी श्रीकृष्ण माणूस म्हणूनच रंगवलाय असेही सांगतात ब्राम्हण ग्रंथानंतर विष्णू आणि शिव असे दोन देव उदयाला आले पण शिव मायनॉरिटीत होता असे ते म्हणतात हे सत्य आहे कारण ह्या काळात शिव ह्या अनार्य दैवताने आर्यांच्यात जस्ट एंट्री मारली होती पण वैद्य एक गोष्ट विसरतात ती म्हणजे महाभारतातील श्रीकृष्ण धरून सर्वच शिवभक्त आहेत आता जो स्वतःच भक्त आहे तो प्रतिस्पर्धी कसा असू शकतो ह्याला काउंटर म्हणून पुढे हनुमानाला व बलरामाला शिवाचा अवतार घोषित करून दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न आर्यांनी केला पण त्याने शिवाचे महत्व कमी झालेले दिसत नाही वैद्य दोन फार महत्वाच्या घटना सांगतात पहिली युद्धानंतर श्रीकृष्णाच्या बायकांना यादवांचा नाश झाल्यानंतर अर्जुन श्रीकृष्णाच्या बायका घेऊन जात असतांना रानटी लोकांनी केलेल्या हल्ल्याची आहे वैद्य ती पुढीलप्रमाणे सांगतात ,
"In the Mausala Parva, where, after the Yadavas had been destroyed in a terrible internecine feud, Arjuna" is said to4iave led away the many wives of Krishna, it is" stated that barbarian attacked Arjuna and carried away many from among his fair charge "Some," it is aided, " went away of their own choice " Now had the author has been thoroughly Vaishtiavite he "would not have represented some of Krishna's wives or rather as eloping with the barbarians, although it is but natural to expect, where a man keeps an unwieldy harem, some Of the women to be dissatisfied and in a mood to elope But this fact is detrimental to the, the greatness of Shnkrishna as an incarnation of Vishnu Probabl^ Vyasa here pointed out the only foible in his character great as it was and was not hindered by any particular sentiments from expressing his opinions freely"

 ह्या घटनेत ज्यांना रानटी म्हंटले आहे ते आदिवासी नाग आहेत ज्यांनी पुढे श्रीकृष्णाचा वध केला ह्या  घटनेत एव्हढी अस्त्रे असलेला अर्जुन एका रानटी हल्ल्यात श्रीकृष्णाच्या बायकांचे रक्षण करू शकत नाही हे महाभारतातील अस्त्रे वैग्रे बंडलबाजी आहे हेच अधोरेखित करतं व्यासांनी फार वास्तववादी कुलवृत्तांत लिहिला असण्याची शक्यता इथे दिसते दुसरी घटना सुयोधनावर अधार्मिक पद्धतीने हल्ला केल्यानंतर मृत्यूपूर्वी जे झाले त्याच्याशी संबंधित आहे वैद्य लिहितात,"Similarly in the Gada-Parva where Duryodhana was, as he lay wounded on the cattle-field, upbraided by Shnknshna for his evil deeds, the former exculpated himself in a rigorous speech and exclaimed that he had lived a brilliant life and died a brilliant death, levelled down when fighting honourably by a dishonourable blow dealt by one of those who wished to pose as honourable men The poet adds "The gods showered flowers on the dying man in approbation and all those present felt abashed"

इथेही देव दुर्योधनाच्या बाजूने बोलतायत कदाचित हा वैदिक संप्रदाय आणि नारायण संप्रदाय ह्यांच्यातील वाद असावा ह्या दोन्ही घटनेत श्रीकृष्ण मातीच्या पावलाचाच आहे 

प्रश्न असा कि मग महाभारताला वैष्णव कुणी केले ?

श्रीधर तिळवे नाईक 


आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ९६


टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप आणि महाभारत २४ श्रीधर तिळवे नाईक 

मागील लेखात आपण व्यास कसे कृष्णाकडे  समकालीन म्हणून पहात होते ते आपण दोन घटनांच्या संदर्भात पाहिले प्रश्न असा आहे कि महाभारत वैष्णव कुणी केले ? ह्या प्रश्नाचे महत्व समजायचे असेल तर आपणाला हिंदुत्ववादाचे टप्पे पाहावे लागतील 

१ ग्रंथकेंद्रीयता प्रथम एक ग्रंथ केंद्रीय म्हणून प्रस्थापित करणे प्रथम वेद केंद्रीय ग्रंथ म्हणून वैदिक धर्माने आणले व १८६० नंतर महाभारतातील गीता ह्यां ग्रंथास  हिंदूंचा केंद्रीय ग्रंथ म्हणून स्थिर केले गेले आणि त्याचा एक भाग म्हणून टिळकांचे व वैद्यांचे विवेचन येते 

२ दुसऱ्या टप्प्यात  कायदे म्हणून स्मृती व  एक मांसल व्यक्तीसमूह  केंद्रीय असायला हवा  म्हणून ब्राम्हण  हा केंद्रीय व्यक्तिसमूह म्हणून ब्राम्हणधर्माने स्थिर केला ज्याला कपिल महावीर बुद्ध ह्या तिघांनी हलवले व हादरवलेही 

३ पुढे मग कपिल महावीर बुद्ध ह्या त्रयीला हलवण्यासाठी तीन देवता केंद्रीय हव्यात म्हणून प्रथम राम कृष्ण विष्णू अशी वैष्णव त्रयी प्रस्थापित केली गेली आणि नंतर ब्रह्मा विष्णू महेश ही त्रयी हिंदू त्रयी आणली गेली 

४ ह्या तिघांच्या संघव्यवस्थेला छेद म्हणून शक्तिपीठे रिप्लेस करून  शंकराचार्यांचे मठ प्रस्थापित केले गेले आणि धार्मिक प्रमुख म्हणून शंकराचार्य केंद्रीय केले गेले व पुढे ह्या मठातून शैव धर्म व त्याचे आगम ग्रंथ हटवून तिथे वैदिक ग्रंथ आणले गेले पुढे समुद्रपर्यटनबंदी करून वैश्यांना कंगाल केले गेले तर परशुरामाने सर्व क्षत्रिय मारले असा कांगावा करून कलियुगी क्षत्रिय वैश्य उरलेत कुठे असा प्रश्न विचारत ब्राम्हण व ब्राम्हणेतर अशी द्विवर्णीय हिंदू व्यवस्था प्रस्थापित केली गेली व पुढे मुस्लिमांना क्षत्रिय म्हणून स्वीकारून त्यांच्या राज्यातील सेवाक्षेत्रें स्वीकारली 

५ पुढे ब्रिटिश आल्यावर तिथेही सेवाक्षेत्रे  बळकावली मग सत्तेची व्याप्ती वाढवत राजकीय पाय रोवले व पुढे केंद्रीय राजकीय  हक्क मागावयास सर्वसमावेशक संघटना  हवी म्हणून प्रथम काँग्रेस ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला  आणि टिळकांच्या मृत्यूनंतर ते अशक्य आहे हे लक्ष्यात आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन करण्यात आला 

६ मग राजकीय पक्ष  हवेत  म्हणून प्रथम हिंदू महासभा मग जनसंघ मग  भाजप आणला गेला 

७ मग भारतात केंद्रीय राजकीय नेतृत्व प्रमोट केल्याशिवाय सत्ता मिळत नाही हे लक्ष्यात आल्यावर  प्रथम वाजपेयी मग अडवाणी मग मोदी पंतप्रधानांचे उमेदवार म्हणून प्रमोट केले आणि सत्तेवर आणले गेले

ह्यापुढचा आठवा टप्पा स्वतःचा अर्थव्यवहार निर्माण करणे हा आहे  आणि मुकेश अंबानी हे पहिले पाऊल म्हणून प्रमोट केले आहे नवव्या टप्प्यात  सर्व अर्थव्यवहार स्वतःच्या हातात एकवटवणे हे असेल अंबानी अदानी वैगरे सर्वांना हटवले जाईल  आणि शेवटी दहाव्या टप्प्यात  हिंदू स्टेट कॅपिटॅलिझम आणण्याचा चायनाप्रमाणे प्रयत्न केला जाईल

ब्रिटिश राजवटीत ह्या सगळ्याचा नवा ब्राम्हणवादी ओनामा ब्राम्हणांनी गिरवला वैष्णव ब्राम्हणांनी आम्हीच हिंदूंचे कर्तेधर्ते हे इंग्रजांना पटवून गीता ही केंद्रस्थानी आणली आणि त्यानंतरच रानडे गोखले टिळक गांधी हे सर्वच गीतेच्या भाषेत बोलू लागले कारण गीतेला ब्रिटिश सत्तेची मान्यता होती गीता महाभारतात होती त्यामुळे महाभारत हाच हिंदूंचा धर्मग्रंथ म्हणून प्रस्थापित करण्याची धडपड सुरु झाली श्रीकृष्ण हा त्यामुळे ईश्वरी अवतार वा ईश्वर म्हणून प्रस्थापित होणे गरजेचे होते आणि टिळक वैद्यांनी ही धडपड सुरु केली बंगालमध्ये रोमेश दत्त अरबिंदो घोष ह्यांनीही हीच धडपड केली गीतेला राजकीय प्रेरणा बनवण्यात ब्रिटिश सत्तेचा फार मोठा वाटा होता 
कारण ब्रिटिश राज्यात गीता पॉलिटिकली करेक्ट होती 

ह्या पहिल्या टप्प्यानंतर ब्रिटिश राज्यात सगळ्या कौन्सिल निवडणुकात ब्राम्हणांनी विजय मिळवून स्वतःची सत्ता निर्माण केली पुन्हा एकदा ब्राम्हण केंद्रीय जमात बनली जहाल टिळक अतिजहाल सावरकर आणि मवाळ गोखले असे तिन्ही प्रवाहांचे राष्ट्रीय प्रमुख नेते चित्पावन ब्राम्हण होते आणि हा योगायोग न्हवता म्हणजे ही राजकीय त्रयी होती 

आणि मग नव्या मठाची गरज होती म्हणून काँग्रेस ही तोवर शक्तीपीठ झाल्याने ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला तो फसल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नवा मठ निर्माण केला गेला पुढेही गांधींचा अपवाद वगळता नेहरूंच्यापासून नरसिंहराव मनमोहनसिंगापर्यंत श्यामाप्रसाद मुखर्जीपासून वाजपेयीपर्यंत प्रामुख्याने ब्राम्हण आणि ब्राम्हण नसेल तर क्षत्रिय असाच प्रकार आहे शंकराचार्यांनी केलेल्या कामाला बळकावुन ज्याप्रमाणे शक्तीपीठ ताब्यात आणली गेली त्याप्रमाणेच महात्मा गांधींचे काम बळकावले गेले आता मोदींना वापरून हेच केले जाणार आहे एकेकाळी काँग्रेसने ब्राम्हणेतर गांधी आणले आणि अलीकडे भाजपने ब्राम्हणेतर मोदी आणले आणि दोघेही योगायोगाने प्रदेशाने  गुजराती वर्णाने वैश्य आहेत मोदी प्रवर्गाने ओबीसी आहेत (गांधींच्यावर १९२२ साली जेव्हा देशद्रोहाचा खटला दाखल केला गेला तेव्हा त्यांना जात विचारली गेली गांधी म्हणाले विणकर व शेतकरी कारण ते सूतकताई पशुपालन आणि शेती करत होते गांधी कोर्टाला कर्मानुसार जात सांगत होते आणि हा जातिव्यवस्थेला धक्का होता एक वैश्यवर्णीय माणूस स्वतःला शूद्रवर्णीय म्हणून जाहीर करत होता )

वैद्य आणि टिळकांचा गीता व महाभारत विचार हा गीतेला केंद्रीय धर्मग्रंथ बनवण्याचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला त्यासाठी गीता वैष्णव असणे महाभारत वैष्णव असणे गरजेचे होते आणि हे दोन्ही ग्रंथ मुळातच वैष्णव असल्याने ते अवघड गेले नाही एकदा हे समजले कि मग टिळक आणि वैद्य ह्यांची मांडणी समजणे सहजसोपे जाते 

मग प्रश्न एकच उरतो राम आणि कृष्ण हे दोघेही शंकराचार्य ,गांधी व मोदी ह्यांच्याप्रमाणे ब्राम्हणांच्या हातचे बाहुले होते का ?

ह्या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे पण गांधी १९३५ नंतर ह्या मिठीतुन निसटत गेले आणि १९४० नंतर गांधी फक्त नावापुरते वैष्णव उरले ह्याचे उत्तर म्हणून त्यांची हत्या झाली मोदी असे निसटतील का हे सांगणे अवघड आहे टिळक समर्थक खापर्डे गांधींबरोबरच्या पहिल्या मीटिंगमध्ये म्हणाले होते हा आपला (म्हणजे ब्राम्हणांचा )माणूस नाही पुढे गांधींनी ते सार्थ केले आणि खापर्डे कुटुंबीयच गांधींच्या मागे गेले मोदींच्याबाबत असं काही होण्याची शक्यता सद्या तरी दिसत नाही गांधींच्या मागे जनता होती म्हणजे लोकमान्य टिळक स्वराज्य फ़ंडाला १ करोड हवे होते तर जनतेने ते दिले हिंदुत्ववाद्यांच्या टिळक फ़ंडाला धड १ लाख रुपयेही हिंदुत्ववाद्यांना जमा करता आले न्हवते सगळे वैश्य मग ते हिंदू असोत कि मुसलमान कि पारशी गांधींच्या मागे एक दिलाने आपले पैसे घेऊन उभे राहिले आज मोदींच्या मागे सगळा ओबीसी समाज उभा आहे अगदी मुस्लिम ओबीसीही (मोदी पंतप्रधान झाले तेव्हा आपल्या घांची समाजाचा पंतप्रधान झाला म्हणून मुस्लिम घांची समाजाने मोदींच्या अभिनंदनाचे कटाऊट्स लावले होते ) मोदी ह्याचा वापर व्यापक समाज परिवर्तनासाठी करू शकतात दुर्देवाने त्यांनी तो केलेला नाही गांधींच्याप्रमाणे अंतःकरणाला प्रमाण मानून त्यांनी गांधी स्टाईलमध्ये निर्णय घेतले खरे पण त्यांचे बहुतांशी निर्णय चुकले आहेत आणि गांधी आपल्या चुका कबूल करून त्या सुधारत तसे मोदी करतील असे वाटत नाही मोदींच्या ह्या मर्यादा आहेत शेवटी गांधी सेंट होते मोदी राजकारणी आहेत 

इतिहास हार्ड वेअर रिपीट करतो पण सॉफ्टवेअर चेंज करतो शंकराचार्य , गांधी आणि मोदी ही सॉफ्टवेअर्स आहेत ती दिसायला भिन्न आहेत पण त्यांना वापरणारे हार्डवेअर एकच आहे ब्राम्हण्यवाद जो सोयीप्रमाणे कधी वैष्णव कधी हिंदू कधी वैदिक होतो 

वैद्यांचे महाभारताचे सादरीकरण ह्या ब्राह्मण्यवादाच्या वैष्णवीकरणाचे सादरीकरण आहे ते म्हणतात 
That the Mahabharata was made a vehicle of moral and religious instruction is so apparent that it hardly requires any proof.  In fact the work has almost lost its character as an epic poem and has become, and has always been acknowledged, as a Smriti  and a Dharma Shastra Native writers and authors of treatises, so old as the Brahma Sutra, quote passages from the Bharata with the feeling of reverence due to a Dharma Shastra(पान २६)
म्हणजेच महाभारत हे वैष्णवांचे धर्मशास्त्र वा स्मृती आहे हे वैद्य प्रथम प्रस्थापित करतात 

महाभारतात एक कथा अनेकदा येते कारण एक कथा वैंशपायन सांगतो उदा सर्पसत्र अस्तिक कथा तर त्यात भर टाकणारी सौतीची कथा सौती स्वतःचे तपशील वाढवून पुन्हा सांगतो असे वैद्य म्हणतात  पण वैद्य म्हणतात तेव्हढ्यापुरते हे मर्यादित असते का तर नाही पुन्हा पुन्हा ब्राम्हणाचे महत्वही सांगितले जाते श्रीकृष्णाचा वैष्णवावतार प्रस्थापित करण्यासाठी अनेक मूळ महाभारतात नसलेल्या कथा सांगितल्या जातात म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण हे नंतरची भर असते शिशुपाल वधात सुदर्शन वैग्रे भर असते अर्जुनाला सांगितलेली दोन अध्यायानंतरची गीता ही भर असते 

ही भर विसाव्या शतकातही नंतर भैरप्पा , शिवाजी सावंत , वि स खांडेकर , वसंत कानेटकर , रणजित देसाई टाकतच राहतात आणि भर टाकणारे प्रामुख्याने पुण्य योनीचे म्हणजे ब्राम्हण क्षत्रिय वर्णाचे लेखक असतात 

श्रीधर तिळवे नाईक 


आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ९७


टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप आणि महाभारत २५ श्रीधर तिळवे नाईक 

वैद्यांच्या मते वैशम्पायम हा कट्टर वैष्णव असावा आणि त्यानेच ग्रंथाला वैष्णव स्वरूप द्यायला सुरवात केली माझ्या मते वैशंपायन ह्यांनी जय नाव दिले त्याचे कारण महाभारत युद्धाला धर्मविजय म्हणून पाहणे वैष्णवांनी सुरु केले वैद्यांच्या मते गीता व्यासांच्या भाषेत आहे पण आशय श्रीकृष्णाचा आहे ह्यामागचे तर्क स्पष्ट आहे जोवर खुद्द ईश्वरानं हे सांगितलंय असा विश्वास निर्माण होत नाही तोवर वर्णविचार वा योनिविचार स्वीकारणार कोण ? अल्लाहने स्वतःच कुराण सांगणे किंवा खुद्द भगवानाने गीता सांगणे ह्यामागचे मान्यतेचे राजकारण समानच आहे त्यामुळे टिळकांचा वैद्यांना ह्यासंदर्भात असलेला पाठिंबा स्वाभाविक आहे 

भीष्मपर्वात (अध्याय ६३ ते ६६)खुद्द भीष्माच्या तोंडून कृष्णावतार पटवण्याची युक्ती लेखक योजतो आणि दुर्योधनाला ते न पटल्याने त्याचा वध झाला असे दाखवतो 

वैद्य त्यांच्या विवेचनात सतत शिव हा नंतर आलेला देव आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात ज्यावेळेला हे पुस्तक लिहिलं गेलं त्या काळात इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा शोध लागला न्हवता आज अवस्था अशी आहे कि प्राचीन काळातील नाण्यांवर फार सुरवातीपासून शिव आहे आणि विष्णूचाच पत्ता नाही त्यामुळे ह्यासंदर्भातले सगळे युक्तिवाद बिनकामाचे आहेत 

वैद्यांच्या मते शिवविषयीचा मजकूर हा सौतीने महाभारतात टाकला आहे ब्रह्म विष्णू महेश ही त्रयीही सौतीने टाकली आहे म्हणजेच एका अर्थाने वैशंपायनने महाभारत वैष्णव केले तर सौतीने त्याला हिंदू बनवले माझ्या मते हा हिंदूपणा फार काळ टिकला नाही कारण इसवीसन ११०० नंतरच्या सर्व वैष्णव संतांनी शिव साईडलाईन करायला सुरवात केली आणि हिंदू धर्म म्हणजे वैष्णव धर्माची सुधारित आवृत्ती बनवली एका हा वैष्णव हिंदू धर्म मध्ययुगीन संतांनी साकार केला आहे आणि ब्रिटिशांनी त्यांच्या कह्यात येऊन हे वैष्णव हिंदुधर्माचे रूपच हिंदुधर्म म्हणून स्वीकारून त्याला आणि त्यातील वर्णजातिव्यवस्थेला चालना दिली आहे 

मध्ययुगीन वैष्णवांची मजल नंतर कुठवर पोहचली हे पहायचे असेल तर तुलसीदासाचे रामचरितमानस पहावे त्यात शिव पार्वतीचे लग्नही रामाच्या इच्छेने झाले असे दाखवले आहे 

हे वैष्णव हिंदुधर्म रूप चातुर्वर्णाचे समर्थन करते म्हणून १९०५ पर्यंतचे टिळक जन्मजन्य वर्णजातिव्यवस्थेचे समर्थक आहेत सुरवातीच्या काळात गांधींचा हिंदूवादही अधूनमधून सनातन वर्णव्यवस्थेचे समर्थन करतो 

श्रीधर तिळवे नाईक 





व  




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट