अमूर्तता आणि शैव श्रीधर तिळवे नाईक
अमुर्ततेचा विचार हा फार जुना विचार आहे आपण जे पाहतोय जे आपणाला मूर्त होते आहे त्यापलीकडे अमूर्त असे काही आहे आणि ते मूर्तपेक्षा अधिक प्रभावी आहे ही माणसाची भावना त्याने जेव्हापासून निसर्ग पहायला सुरवात केली तेव्हापासूनच आहे ह्या अमुर्तला समूर्त करण्याचा पहिला प्रयत्न म्हणून मी धर्माकडे पाहतो हे सर्वशक्तिमान अमूर्त आणि त्याच्याबद्दल वाटणारे भय व आश्चर्य ह्यातूनच माणसाने देवाची आणि श्रद्धेची निर्मिती केली आणि पुढे धर्माची
भगवान शंकरांनी दुसरी अमूर्तता शोधली जिचे नाव मोक्ष ह्या अमूर्ततेत पाऊल टाकणे हे तिचा पुरावा नसतांना कर्मकठीण आमच्यासारख्या काही भाग्यवान लोक अपवाद असावेत पण ९९ टक्के लोक पुरावा नसतांना पाऊल टाकतात आणि मोक्ष आपल्या देहात मूर्त होण्याची प्रतीक्षा करतात त्यासाठी साधना करतात
शैवांनी ह्या अमूर्ततेला मूर्त करण्याच्या तीन साधना शोधल्या
१ मंत्रसाधना ओम हा मंत्र व पुढे ओम नमो शिवाय
२ यंत्रसाधना यंत्र हे वाचिक नसते तर लिखित किंवा चित्रित असते ओम हा आकार किंवा श्रीयंत्र
३ तंत्रसाधना ही प्रामुख्याने षोडोपचार किंवा अष्टोपचार किंवा पंचोपचार किंवा सप्तोपचार अशी विविध असते आणि साधकाप्रमाणे बदलते दुर्देवाने अनेकांना ह्या साधनेचे मर्मच माहित नसते केवळ करायची म्हणून पूजा करायची हाच अनेकांचा अजेंडा असतो उपचार म्हणजे साधना म्हणून केलेली कृती मळामुळे मनुष्य म्लान मळीन झाला आहे त्याला अम्लान अमळीन करण्यासाठी केले गेलेले चार म्हणजे उपचार उपाय म्हणजे उपचारांचा संघात चार हा पशुपालकांचा शब्द पशु वा गुरं चारायला न्हेणे चरायला न्हेणे चरणे चारणे चूर्ण चूरण वैग्रे हे भावंड शब्द पुढे त्यातूनच विचार आचार प्रचार हे शब्द निर्माण झालेले दिसतात नंतर पाली संस्कृत शब्द उदा चर्या व उत्पत्याही तयार झालेले दिसतात चार आणि उपचार ह्यातील फरक स्पष्ट आहे चार नैसर्गिक आहेत उपचार मानवी आहेत विचार आचार मानवी आहेत विचार , आचार आणि संचार हे उपचारांचे भाग आहेत मोक्ष मिळाल्यानंतर तुम्ही त्यांचा प्रचारही करू शकता विचार्य जे फक्त विचार करतात , प्रचार्य जे केवळ विचार करून थांबत नाही तर त्यांचा प्रचार करतात संचार्य जे आचार्य व प्रचार्य ह्यांच्याप्रमाणे केवळ विचार व प्रचार करून थांबत नाही तर त्यांचा प्रचार करण्यासाठी संचार करतात आणि आचार्य जे विचार प्रचार संचार करून थांबत नाहीत तर ते प्रत्यक्षात अंमलात आणतात उपचार्य मात्र प्रत्यक्ष आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा स्वतंत्र सर्व उपचार करतात ज्यात षोडोपचारापासून सर्व काही येते
मंत्रसाधना आणि गायकीचा फार जवळचा संबंध आहे ओम हा मूळ ध्वनी मग श्रुती मग स्वरताल मग न्यास ( राग) मग बंदिश वा स्वरतालन्यास अशा तऱ्हेने ही मंत्रसाधना विकसित करता येते ओम व श्रुती अमूर्त तर स्वर राग वा न्यास बंदिश वा स्वरतालन्यास मूर्त असतात श्रुती तालव्यही असू शकतात फक्त स्वराव्य असतात असे नाही देवआर्यांनी ह्या बाबत फार मोठे गोंधळ घालून ठेवलेत म्हणून हे सांगतोय न्यास हा फक्त स्वरांचाच नसतो तो तालांचाही असू शकतो न्यासाला पुढे अनुराग हा शब्द का प्राप्त झाला आणि पुढे अनु गायब झाला आणि राग कसा उरला माहित नाही

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा