आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ६१ ते ६७ श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ६१
श्रीधर तिळवे नाईक
टिळक आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान १४
आर्यांच्या बाबतीतील जे काही वाद गाजले आहेत त्यापैकी एक सरस्वतीचा आहे ऋग्वेदात असलेली सरस्वती नंतर गायब झाली पण ऋग्वेदातील सिंधू म्हणजे आताची सिंधू होय अशी मांडणी आहे अलीकडे घागरा नदी म्हणजे सरस्वती असे सिद्ध करण्याचा खटाटोप सर्वच आऊट ऑफ इंडियावाले करतात
माझे ह्या संदर्भातील म्हणणे स्पष्ट आहे माझ्या मते सिंधू सरस्वती व नंतर गंगा ह्या मुळात नद्याच न्हवेत ज्याप्रमाणे इंद्र वरुण ह्या देवता आहेत त्याप्रमाणे सिंधू सरस्वती व नंतर गंगा ह्या देवता आहेत नद्यांच्या माता आहेत त्यामुळेच कुठल्याही नदीला ह्यांचे नाव दिले जाऊ शकते भारतात पंचगंगा वैनगंगा वैग्रे अनेक गंगा आहेत भारतात किमान चार सरस्वती आहेत शिवाय सरस्वती ही ब्रम्हदेवाची पत्नी आहे गंगा ही रुद्राची त्यामुळेच सरस्वती शोधणे हा खटाटोपच व्यर्थपणाचा आहे सप्तसिंधू वा हप्तसिंधू ह्यांचा शब्दशः अर्थ घ्यायचा ठरवलं तर काय होतो ? ह्याचा सरळ अर्थ सात सिंधू असा होतो सात सिंधू म्हणजे सात नद्या असाच अर्थ होतो म्हणजेच सिंधू म्हणजे नदी हे समीकरण ह्या शब्दावरूनही स्पष्ट दिसते सप्तसिंधूचा प्रदेश म्हणजे सात सिंधूचा म्हणजेच सात नद्यांचा प्रदेश असाच अर्थ होतो सरस्वतीचा ऋग्वेदातील पहिला मंडलातील पहिल्याच सूक्तात जो उल्लेख आहे तो नद्यांचा माता म्हणूनच आहे म्हणजे सरस्वती ही नदी नसून नद्यांची माता आहे हे स्पष्ट व्हावे जिला आज गंगा म्हणतात तिचे मूळ नाव अलकनंदा व नंतर भागीरथी असे होते तिला गंगा हे नाव नंतर मिळालेले आहे वेदातील गंगा ही अलकनंदा नसून सामान्य नामातील गंगा म्हणजेच कुठलीही नदी ह्या अर्थाने आहे थोडक्यात सरस्वती सिंधू गंगा हे शब्द नदी ह्या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत पण त्या पवित्र आहेत
टिळक सिंधू ही नद्यांची उपमा आहे हे मान्य करतात आणि सात रश्मी म्हणजे सप्तसिंधू असे समीकरण मांडतात
पंजाब हा पाच नद्यांचा प्रदेश आहे सात नद्यांचा न्हवे असं टिळक सांगतात आणि सप्तसिंधू हे त्यामुळेच त्याला अप्लाय होत नाही असे ते म्हणतात ऋग्वेदात सप्तसिंधूनंतर उषा दिसायला चालू होते ह्याचा अर्थ सप्तसिंधू ह्याचा अर्थ सात किरणांच्या सात रश्मीच्या सात नद्या असा होतो टिळकांच्या मते नद्यांचे सरोवराचे जल हा एक लोक मग दुसरा लोक म्हणजे मेघांचा ज्यात जल असते आणि ह्याच्या वर दिव्य जलाचा लोक आहे आकाशातून दिव्य जले वाहतात अशी आर्यांची समजूत होती ह्या दिव्यजलातून वरुण मेघरूपी पाणी आणतो व मेघात अडकलेले जल इंद्र सोडवतो व मग पाऊस पडतो टिळकांचा इंद्र हा प्रामुख्याने सूर्य देव आहे पर्जन्य देव नाही त्यामुळेच त्याचे जे वृत्राशी जे युद्ध आहे तेही सूर्य म्हणून आहे टिळकांच्या मते इंद्राला नंतरच्या काळात पर्जन्य देवाची कामे चिपकली पण मूळचा तो सूर्य आहे
टिळकांच्या ह्या मांडणीने सूर असुर संघर्षात असुर हे सूर्याचे पूजक असल्याने सुरापासून वेगळे झाले ह्या मांडणीलाच छेद जातो कारण टिळकांच्या मांडणीनुसार इंद्रपूजा हीही सूर्यपूजाच आहे जर दोघेही सूर्यपूजक होते तर वेगळे का झाले ह्याचे उत्तर टिळकांनी दिलेले नसले तरी आपण शोधू शकतो
माझ्या मते सूर आणि असुर ह्यांच्यात संघर्ष झाला त्याचे कारण झरतृष्टाने मांडलेला एकदेववाद झरतृष्टपूर्वी सुरासुर एकच होते पण बहुदेववाद विरुद्ध एकदेववादावरून ते वेगळे झाले सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे मागे उल्लेख केलेल्या अथर्ववेदाच्या कर्त्यात अंगिरसांच्या बरोबर ज्या अथर्वानचा उल्लेख केला त्याच अथर्वनच्या कुळातून झरतृष्ठ आल्याने गोंधळ अधिकच वाढतो अथर्ववेद जर अथर्वणांचा असता तर त्यांनी अंगीरांचा इतका द्वेष केलाच नसता ह्याचा अर्थ अथर्ववेद हा अंगीरसांचाच असावा व अवेस्ता अथर्वानांच्या कुळातील झरथ्रूष्टाचा असावा हे लक्ष्यात घेतले कि मग अवेस्ता ऋग्वेद व अथर्ववेद लिहणाऱ्या अंगीरसाचा इतका द्वेष का करतो हे स्पष्ट आहे स्वतःचाच मार्ग श्रेष्ठ वाटणाऱ्या एकदेववादी अवेस्तनांना अनेक देवांची यज्ञभक्ती करणारे सूर मागासलेले वाटले तर आश्चर्य ते कोणते ?ज्या अवेस्तनांनी सुरांना त्यांच्या जागेतून हाकलून काढले त्याच अवेस्तनांना पुढे मुस्लिमांनी त्यांच्या स्वतःच्या देशातून हुसकावून लावावे आणि त्यांना पुन्हा सूर जिथे राहतात तिथे आश्रयाला यायला लागावे ह्याला काळाचा सूड म्हणावा नाहीतर काय ?
झरथ्रूष्टाने
१ अहूर माझदा ह्या एकमेव देवाची स्थापना केली
२ सैतान वा वाईट व आशा म्हणजे ऑर्डर हे दोन फोर्स मानले
३ कयामत ह्या संकल्पनेला जन्म दिला
४ कयामती दिवशी सर्व मृतात्मे उठतात हे सांगितले
५ निवाड्याच्या दिवशी आत्म्याचे देहाशी मिलन व पापपुण्यांचे फळ
ही तत्वे सांगितली जी कोणत्याच अर्थाने वैदिक धर्माशी जुळणारी न्हवती आणि ज्यांच्यातून नंतरचे ज्युडायिक धर्म जन्मले झरथ्रूष्टाच्या मागे अनेक असुर गेले पुढे तर त्यांनी देवांना सुरांना त्यांच्या राहत्या प्रदेशातून हाकलून दिले काही असुरांनी उदाहरणार्थ कपिल सरळ शैव धर्माची कास धरली व असुरांच्या भाषेत शिवशक्ती दर्शन मांड्ले जे पुढे सांख्य दर्शन म्हणून प्रसिद्ध झाले साहजिकच मूळ धर्मापासून भटकले म्हणून सुरांच्या मनात असुरांच्या बद्दल द्वेष निर्माण झाला कारण त्यांनी मूळ बहुदेववादी यज्ञधर्म टाकला असे सूर देवांना वाटले त्यामुळेच वेदात वृत्राला असुर म्हंटले जाते अवेस्ता देवांची वेद निर्माण करणाऱ्या अंगिरसांची निंदा करतो तर ऋग्वेद असुरांची !
हे दोघेही आर्य असूनही एकमेकात जीव खाऊन एकमेकात भांडत होते हे लक्ष्यात घेण्यासारखे !
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ६२
श्रीधर तिळवे नाईक
टिळक आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान १५
एकदा असुर सूर वादाचे कारण इंद्र पूजन कि सूर्य पूजन हा मतभेद न्हवता कारण ऋग्वेदातील इंद्र हा सूर्यही आहे हे स्पष्ट झाले कि मग काही इतरही गोष्टी स्पष्ट होतात आर्यांचे सप्तलोक हे विचित्र आहेत अदिती पृथ्वी आणि निऋती ह्या आर्यांच्या तीन माता आहेत वरचे तीन लोक अदितीचे मग पृथ्वीचे तीन आणि खाली निऋतीचा एक ! वरील अदितीच्या तीन लोकांपैकी सर्वात वरचा दिव्य लोक त्यातून सरस्वती तिचे कधीही न संपणारे पाणी घेऊन वहाते अशी आर्यांची श्रद्धा असल्याचे टिळक प्रतिपादन करतात सरस्वती ही पृथ्वीवरील नदीचं नाही हे टिळक स्पष्ट सांगतात गंगा हीही अशीच स्वर्गातून पृथ्वीवर अवतरल्याची कहाणी रचावी लागलेली आहे कारण मुळात ह्या प्रत्यक्ष नद्यांचं न्हवेत स्वतःच्याच धर्मग्रंथाशी प्रतारणा करत घागरा नदीला सरस्वती म्हणणे हा दिव्य लोकातील सरस्वतीचा अपमानच आहे टिळकांच्या मते हा दिव्य पाण्याचा प्रवाह वृत्र अडवतो म्हणून इंद्र त्याला मारून तो मोकळा करतो आणि हा मोकळा झालेला प्रवाह दुसऱ्या लोकात मेघ बनतो व तिसऱ्या लोकात कोसळतो व कोसळलेला प्रवाह पृथ्वी ह्या चौथ्या लोकांवर पडतो ग्रीक जर्मन लेंटिश अशा सर्व लोकांच्या पुराणात अशा दिव्य जलाच्या नदीचा व साठ्याचा उल्लेख आहे आणि ग्रीकांचा सूर्य तर चक्क ह्या दिव्य प्रवाहात नावेत बसून पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो आणि उगवतो
टिळकांच्या मते वृत्र इंद्र कथा ही उत्तर ध्रुवावरच्या दोन महिन्याच्या दीर्घरात्री त वृत्र काळोखात सूर्याला अडवून ठेवी व इंद्र मग त्याला मारून प्रकाश मोकळा करी त्याची कथा आहे त्यांच्या मते ऋषी कल्पना अशी आहे कि वृत्र पर्वतांना जोडून काळोखात दोन महिन्याच्या दीर्घरात्री प्रकाशमेघ अडवून ठेवी इंद्र ती फोडून प्रकाशाचे मेघ मोकळे करी
ऋग्वेदातील सप्त सिंधव : हा उल्लेख १ , २, ३, ३२, १२ ऋचांतून येतो व त्यांचा अर्थ प्रकाशाबरोबर वाहू लागणाऱ्या नद्या असा अस्मानी आहे असे टिळक म्हणतात आर्यांच्या सात आकड्याच्या वेडाला टिळक सप्तांकमूलक म्हणतात सात आदित्य सात स्वर्ग सात पाताळ सात समुद्र सात सिंधू सात लोक सात घरे , सूर्याचे सात घोडे , सात रश्मी !
सात दिशांना असणारे सात आदित्य सात नद्यांना घेऊन फिरतात ह्या सात नद्या म्हणजे सप्तसिंधू असे स्पष्टीकरण टिळक देतात सूर्य हा नद्या आणि प्रकाश अश्या दोन्ही गोष्टी घेऊन फिरतो अशी प्राचीन आर्यांची समजूत असल्याचे टिळक सांगतात ह्यात तथ्य असावे असे मला वाटते कारण प्राचीन लोकांना पाणी आणि प्रकाश ह्या दोन्ही गोष्टी आभाळातून येताना दिसत होत्या आणि आभाळात फक्त सूर्य दिसत असे त्यावरून जर का त्यांना प्रकाश आणि पाणी ह्या दोन्ही गोष्टी घेऊन सूर्य फिरतोय असे वाटले तर त्यांच्या त्यावेळच्या डोक्यानुसार ते योग्यच म्हंटले पाहिजे
पुढे जेव्हा आर्य मूळ रहिवासातून अफगाणिस्तानात व भारतात आले तेव्हा त्यांनी आपल्या पुराणातील नावे प्रत्यक्ष भूगोलातील नद्यांना व प्रदेशांना दिली असावीत असे टिळक सुचवतात पुढे ह्या नावांना खरे मानून इतिहासाचा शोध घेतल्याने घोळ झाला असे टिळक म्हणतात
प्रश्न असा आहे कि अनेक ब्राम्हणेतर वृत्राने बांधलेल्या धरणाचा उल्लेख करतात व इंद्राने ही धरणे फोडल्याचा उल्लेख करून वृत्र व इंद्र ह्यांचे युद्ध हे आर्यांच्या आक्रमणाचा पुरावा मानतात त्याचे काय ? माझ्या मते ग्रीक पुराणात वृत्र हा आर्थ्रास ह्या नावाने येतो तर अवेस्तात वेरेथ्रघ्न ह्या नावाने येतो आता अनार्य काय ग्रीस देशात पण पोचले होते असे मानायचे काय ? थोडक्यात काय आपण ही कथा ढगाचे अडवले गेलेले पाणी व नंतर मुक्त झालेले पाणी व त्यातून पडलेला पाऊस अशीच घ्यावी हे बरं ! सतत आपण पराभूत झालो पराभूत झालो म्हणून सतत स्वतःचे पराभव शोधायची व पराभविक मानसिकता प्रकट करायची गरज नाही असो
टिळकांनी आपला सिद्धांत मांडताना आर्यांच्या अनेक पारंपरिक समजुती खोडून काढल्या आहेत त्यामुळेच अनेकदा आर्यही त्यांच्या सिद्धांतावर चर्चा करत नाहीत दंतकथा ह्या दंतकथा म्हणूनच घ्याव्यात असे माझे स्पष्ट मत आहे त्यांना इतिहास समजले कि घोळ चालू होतो टिळक हा घोळ टाळतात म्हणूनच त्यांचा सिद्धांत मान्य नसूनही मी त्याची एव्हढी तपशीलवार चर्चा करतो आहे
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ६३
श्रीधर तिळवे नाईक
टिळक आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान १६
मागील लेखात सिंधू गंगा व सरस्वती ह्या वरील दिव्य लोकातील नद्या असल्याचे आपण पाहिले आणि वृत्र आणि इंद्र ह्यांचा संघर्ष म्हणजे दिव्य लोकांतील नद्यांचे पाणी पृथ्वीलोकावर आणण्याचा खटाटोप होय हेही आपण पाहिले टिळक हा खटाटोप उत्तर ध्रुवावर होता असे मानतात ह्यात एक छोटीशी भर मी घालतो प्राचीन काळी अरबी समुद्राचे एक नाव सिंध वा सिंधू समुद्र /सागर असे होते आणि त्यातील सिंध हे नाव नदीचे नसून ते जलाशी निगडित होते आकाशातील पवित्र दिव्य जलाचा सागर तो सिंध वा सिंधू सागर हे अनेकांनी लक्ष्यात न घेतल्याने ह्याचा अर्थ सिंधू नदी असा केला आहे केशव हा सिंधू सागरावर पहुडलेला असा उल्लेख भर्तृहरीने नितीशतकात केला आहेच हा केशव गुजरात व महाराष्ट्रीयन लोकांचा देव होता जो पुढे विष्णुत विलीन केला गेला
आर्यांच्या सप्तमुलकतेतून टिळक नंतर दशमूलकतेकडे येतात उदा ऋग्वेदात गर्भवतीला उद्देशून म्हणावयाचे पुढील मंत्र आहेत
“7. Just as the wind shakes a pool of lotuses on all sides, so may your embryo (garbha) move (in your womb), and come out after being developed for ten months (dasha-mâsyah).” “
8. Just as the wind, just as the forest, just as the sea moves, so O ten-monthed (embryo)! come out with the outer cover (jarâyu).”
“9. May the child (kumâra), lying in the mother’s (womb) for ten months, cone out alive and unhurt, alive for the living mother.”
टिळक दशमूलकता इथेही दर्शवतात त्यांच्या मते हे मूल काय आहे टिळक म्हणतात , "The wife of the eunuch Vadhrimati is already said to have got a child Hiranyahasta through the favor of the Ashvins. We cannot, therefore, suppose that she prayed for the safe delivery of a child, nor can Saptavadhri be said to have prayed for the safe delivery of his wife, who never bore a child to him. The verses, or rather their connection with the story of Saptavadhri told in the first six verses of the hymn, have, therefore, remained unexplained up-to the present day, the only explanations hitherto offered being, as observed above, either utterly unsatisfactory or rather no explanations at all."
टिळकांच्या मते दहा महिने सूर्य पृथ्वीच्या गर्भात फिरतो व दोन महिने तो अडकतो त्याची सुटका व्हावी म्हणून
केलेली ही प्रार्थना आहे
मला ह्यात आवडलेली गोष्ट म्हणजे ह्यातला पोस्टमॉडर्नपणा पोस्टमॉडर्निझम सांगतो कि आई मुलाला जन्म देत नाही तर मूल आईला जन्म देते म्हणजे काय मूल जन्मेपर्यंत बाई ही बाईचं असते तिने मूलाला जन्म दिल्यानंतर ती आई बनते तोवर ती आई नसते १ ९५ ४ मध्ये म्हंटले जाते,
“Who amongst you has understood this secret? The calf has by itself given birth to its mother. The germ of many, the great seer moving by his own strength comes forward from the lap of the active one (apasâm).”
टिळक पुढे सूर्याच्या चाकाचा धांडोळा घेतात आणि एका ऋचेचा अर्थ वेगळा लावतात ते म्हणतात
But the passage important for our purpose is VI, 31, 3. It reads as follows: —
Tvam Kutsena abhi Shushnam Indra
Ashushaim yudhya Kuyavam gavishtau
Dasha prapitve adha Sûryasya
mushâyas chakram avive rapâmsi
ह्यातील दशप्राप्तिव चा अर्थ त्यांच्या मते दहा महिन्यांनी असा होतो टिळक ह्या ऋचेचा अर्थ ," हे इंद्र , प्रकाशगायी पुन्हा प्राप्त करण्यासाठी अशुष व कुयव ह्यांच्याशी युद्ध कर दहा महिन्याच्या समाप्तीनंतर सूर्याचे चक्र चोरून तू संकटे नाहीशी केलीस " असा करतात एकीकडे ते इंद्र हाच सूर्य म्हणतात तर दुसरीकडे इंद्राला सूर्याचे चक्र चोरणारा म्हणतात ह्याचा अर्थ इंद्र व सूर्य ह्या दोन भिन्न देवता असून सूर्य आणि पाऊस ह्या दोन्हींना नियंत्रित करणारा इंद्र हा तिसरा व मुख्य देव आहे आर्यांची सप्तमुलकता आता दशमूलक झाल्याचे लक्षण ह्या श्लोकात स्पष्ट दिसते
९ ६३ ९ मध्येही सूर्याला दहा घोडे असल्याचा उल्लेख आहेच
ही दशमूलकता आर्यांच्या मुलस्थानाची आठवण आहे का ?
माझे स्वतःचे म्हणणे उलटे आहे महिन्यांचा शोध लागल्यानंतर माणसाच्या असे लक्ष्यात आले कि बायकांना मूल दहाव्या महिन्यात होते हाताची बोटेही दहा होती त्यावरून माणसाला असे वाटू लागले कि दहा आकड्यात काहीतरी दैवी विधान आहे आणि त्याची संस्कृती दशमूलक बनली त्यातच दहा आकडा कसा लिहायचा हा प्रश्न अंतिम पातळीवर शून्याचा शोध लागल्यावर सुटला आणि एक व शून्य जोडून दहा आकडा लिहणे सुरु झाले ज्या नागाच्या फणावर १० आकडा दिसला तो पवित्र मानला जाऊ लागला ह्याचवेळी हवामानबदलामुळे आषाढ व ज्येष्ठ उत्तरार्ध ह्या दोन महिन्याचा अपवाद वगळता सूर्य अधूनमधून का होईना पावसाळयातील महिन्यातही ढळढळीत दिसू लागला आणि सूर्याचे दहा महिने गृहीत धरले जाऊ लागले ह्यातच आंतरराष्ट्रीय व्यापार करणाऱ्यांना असे लक्ष्यात आले कि ज्या महिन्यात आपल्या देशात सूर्य दिसत नाही त्या महिन्यात इतर देशात किंवा समुद्रावर सूर्य दिसतो त्यातून १२ महिन्याचे कॅलेंडर सेट झाले जरी सुरवातीला महिनेही दहा होते मुलाचा जन्म दहा महिन्यात होणे ह्याही घटनेचा दहा महिन्याचे कॅलेंडर होण्यात बराच मोठा वाटा आहे पण आंतरराष्ट्रीय व्यापारानंतर त्याच्याशी कॅलेंडर जोडणे बंद झाले हीच गोष्ट बायकांच्या पिरियड येण्याबाबत सर्वसाधारण चंद्रमास आणि पाळीमहिना समान असल्याने महिना जोडला गेला होता तोही नंतर जोडणे बंद झाले आणि मानवीसंस्कृती अष्टमानीकडून दशमानीकडे सरकली
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ६४
श्रीधर तिळवे नाईक
टिळक आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान १७
मॅक्सम्युलरने मिथकांना नैसर्गिक घटनांचे चित्रण म्हणून पाहिले मी मिथकांना नैसर्गिक घटनांचे कल्पनाप्रधान चित्रण असे म्हणेन कारण मिथकांच्यात वस्तुनिष्ठ वर्णन फार कमी वेळा आढळते सर्वसाधारणपणे ही मिथके देवांशी निगडित असतात आणि ही दैवते आकाशदैवते पृथ्वीदैवते अंतरिक्षदैवते आणि पाताळदैवते अशी चार प्रकारची असतात ह्या दैवतांच्यात सर्वाधिक महत्वाचे दैवत सूर्य असल्याने टिळकांनी त्याची सांगोपांग चर्चा करून त्याच्या वर्णनाच्या आधारे आर्यांचे मूलस्थान उत्तर ध्रुव असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो ह्या सिद्धांतात मनुष्यप्रधान मिथके फारच कमी आढळतात आणि टिळकांना त्याची जाणीवही नसावी हे दुःखद आहे असो
आर्यांच्या देवांचे भारतीय संस्कृतीवर कधी प्रभुत्व निर्माण झालेच नाही असा दावा केला जातो पण विष्णू राम आणि कृष्ण ह्या तिन्ही वैदिक देवतांचा प्रभाव भारतीयांच्यावर पडलेला आहे हे मान्य करावे लागते . रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये विष्णू राम आणि कृष्ण ह्या आर्य देवतांच्यावरच आधारित आहेत हे आपण लक्ष्यात घेतले पाहिजे ह्या तिन्ही देवता मूळच्या
अनेकदा शैव लोकांच्या देवता आणि आर्यांच्या देवता ह्यात कमालीचं साम्य आढळतं कारण जे पूज्य आहे ते एकच आहे उदा सूर्य हा पूज्य एकच आहे आणि शैव त्याला नारायण म्हणायचे तर हेच नाव प्रभावी होत गेले पुढे सूर्यनारायण व सत्यनारायण ही जन्मले असुर हे सुरांच्या तुलनेत खूपच लवचिक असल्याने त्यांनी शैव नावे सहज स्वीकारलेली दिसतात वासुदेव हेही मूळचे सूर्याला दिलेले शैव नाव आहे पण त्यालाही आर्यांनी स्वीकारलेले दिसते ऋग्वेद काळातच ह्या दोन संस्कृतीत दळणवळण झालेले होते राम म्हणजेही शैवांचा सूर्य व कृष्ण म्हणजेही शैवांचा सूर्य राम म्हणजे दिवसा दिसणारा सूर्य तर कृष्ण म्हणजे अस्ताला जाऊन अंधारात लुप्त झालेला सूर्य अरब सोडले तर जगातल्या बऱ्याच संस्कृती ह्या सूर्यकेंद्री होत्या आणि सूर्याची वेगवेगळी रूपे पूजत होत्या आर्य आणि शैव ह्या दोन्ही संस्कृती ह्याला अपवाद नाहीत फक्त शैवांच्यात जितकी सूर्यप्रधानता आढळते तितकीच चंद्रप्रधानताही आढळते हे तिचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल
सूर्य मावळला कि सूर्याचे तेज नाहीसे होते ही वैदिक ऋषींची श्रद्धा ! अंधारात तमात लपलेल्या असुरांना मारून इंद्र सूर्याला पुन्हा तेजस्वी करतो अशी त्यांची श्रद्धा ! इंद्र हाच सूर्य म्हणणारे टिळक पुढे इंद्राला सूर्याला नियंत्रित करणारा देव म्हणून प्रस्तुत करतात कारण वेदांच्यातच असा बदल झालेला आहे
सूर्याला नियंत्रित करणारं आणखी एक रूप म्हणजे विष्णू !अश्विन उषा अदिती वैग्रे सर्वच आकाशदेवता तर यम ही पाताळदेवता आणि ह्या पृथ्वीदेवता आर्यांच्यात तीन पावलांची कथा अनेक देवतांच्या स्वरूपात आढळते
आणि त्यातील वामन व बळी कथेची चर्चा आपल्याकडे सर्वाधिक होते टिळक ह्या कथेची चर्चा करतात
१ २२ १७ १८ १ १५४ २ ऋचांमध्ये विष्णूंच्या तीन पावलांची ही कथा आहे टिळक यास्क व इतरांची मते उल्लेखताना म्हणतात ,"Yâska (Nir. XII, 19) quotes the opinion of two older writers regarding the character of these three steps. One of these, viz. Shâkapûni holds that the three steps must be placed on the earth, in the atmosphere and in the sky; while Aurnavâbha thinks that the three steps must be located, one on the hill where the sun rises (samârohana), another on the meridian sky (Vishnu-pada), and the third on the hill 304 of setting (gaya-shiras). Prof. Max Müller thinks that this three-fold stepping of Vishnu is emblematic of the rising, the culminating and the setting of the sun; and Muir quotes a passage from the Râmâyana (IV, 40, 64), which mentions udaya parvata, or the mountain of sun-rise, and says that on the top of it is the peak Saumanasa, the place where Vishnu’s first step was planted. We are then told that his second step was placed on the summit of Meru; and that “when the sun had circled round Jambudvîpa by the north, he is mostly visible on that lofty peak.”
टिळकांच्या मते विष्णूची ही तीन पदे म्हणजे सूर्याचे वार्षिक भ्रमण आहे प्रत्येक पद म्हणजे चार महिन्याचा काळ आहे दोन पदे म्हणजे आठ महिने सूर्य आकाशात तळपतो व नंतरचे चार महिने तो समुद्रात डुबतो म्हणजेच शेषशायी होतो वृत्राचा पराभव करण्यासाठी विष्णू इंद्राला मदत करतो व विष्णूच्या सहाय्याने इंद्र सूर्य उषा अश्विन ह्यांना पुन्हा प्राप्त करतो अप्रत्यक्षरीत्या ह्याचा अर्थ बळी शंबर वृत्र अहि हे सूर्याला अंधारात अडवून ठेवणारे आहेत व इंद्र व विष्णू सूर्याला मुक्त करणारे आहेत असा होतो पुराणे विष्णू हा चार महिने सुप्त असतो असे म्हणतात त्याचाही अर्थ हाच होतो असे टिळक सुचवतात
सावित्याचेही (सावित्री )तीन ठिकाणे आहेत त्यातील दोन आकाशात तर एक यमलोकात आहे अग्निचीही एक समुद्रात एक आकाशात व एक जलात अशी तीन ठिकाणे आहेत
टिळकांच्या मते आकाशलोक व पृथ्वीलोकातील आठ महिने व पाताळलोकातली चार महिने ही विभागणी उत्तर ध्रुवाची स्मृती आहे
ह्याचा प्रतिवाद असा कि मुळात हा सारा खेळ भोवतालचा भूगोल समजण्याचा आहे माणसाला आकाशात सूर्य चंद्र तारे दिसायला लागले आणि त्याला आकाशलोक मान्य करावा लागला स्वतःच्या आसपासचा भूगोल तर त्याला स्पष्टच दिसत होता त्याला त्याने पृथ्वीलोक म्हणून स्वीकारायला सुरवात केली त्याचबरोबर त्याला साप मुंग्या वैग्रे जमिनीच्या आत जाऊन राहतांना दिसू लागले म्हणून त्याने आपल्या जमिनीखाली एक लोक आहे हे मान्य करायला सुरवात केली आणि त्याला नरकलोक पाताळलोक अशी मान्यता द्यायला सुरवात केली ह्यात प्रश्न फक्त सूर्याचा होता तो उगवताना आकाशातून प्रकाश देतांना आणि पुन्हा मावळताना कधी आकाशात कधी क्षितिज रेखेच्या जमिनीत तर कधी समुद्राच्या पाण्यात गुडूप होतांना त्याला दिसत होता त्यामुळे तिन्ही लोकात सूर्य फिरतो असे त्याला वाटायला लागले आणि त्यातूनच तिन्ही लोकांना जिंकणारा सूर्य म्हणून त्याच्याभवती त्याच्या तिन्ही लोकातील भ्रमणाला एकेक पाऊल वा एकेक ठिकाण देणाऱ्या कथा तयार होऊ लागल्या कालांतराने माणसाच्या मनात स्वर्ग हा आकाशलोक राहतो जगतो तो पृथ्वीलोक व मेल्यानंतर तो जिथे प्रथम जातो तो पाताळलोक असे तीन लोक विकसित झाल्यावर सर्वच देव तिन्ही लोकांतून फिरायला लागले थोडक्यात काय तीन पावलांच्या कथासाठीही उत्तर ध्रुवावर जाण्याची गरज नाही
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ६५
श्रीधर तिळवे नाईक
टिळक आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान १८
टिळकांचे दशमूलक चिंतन मात्र तितकेसे तर्कशुद्ध झालेले नाही कारण ज्या दोन युद्धांचा ते उल्लेख करतात त्याला त्यांनी लावलेले तर्कशास्त्र तितकेसे प्रभावी नाही ह्यातील पहिले दाशराज्ञ युद्ध पुढीलप्रमाणे ऋग्वेदाच्या सातव्या मंडलाच्या १८ व पुढे ३३ मध्ये आढळते इथे सूक्त १८ वे देत आहे त्यावरून कथा स्पष्ट व्हावी
(ऋग्वेद भाषांतर राल्फ टी एच ग्रिफिथ पान क्रमांक ३९६ -७इंटरनेट आवृत्ती मायक्रोसॉफ्ट )
टिळक म्हणतात," It has been noticed above that ten gold-like kings (VIII, 3, 38), and ten non-sacrificing kings (VII, 83, 7), are mentioned in the يigVeda. But there is an important incident connected with the ten nonsacrificing kings which deserves more than a passing notice in this place. Sudâs, the son of Divodâsa Atithigva, is described as engaged in a fight with the ten non-worshipping (ayajyavah) kings, and is said to have received help from Indra and Varuna (VII, 33, 3-5; 83, 6-8). It is known as the Dasharâjña fight, and Vasishtha, as the priest of Sudâs, is said to have secured the assistance of Indra for him. On this slender basis some scholars have erected a stately edifice of the fight of the Aryan races with the ten non-Aryan or non-worshipping kings. But it seems to me that the Dasharâjña fight can be more simply and naturally explained by taking it to be a different version of Indra’s fight with the seven Dânus or demons (X, 120, 6). In X, 49, 8, Indra is called the seven-slayer (sapta-han) with reference either to the seven Dânus or demons (X, 120, 6) or to the seven cities of Vṛitra (I, 174, 2), in the seven-bottomed ocean (VIII, 40, 5). Now if Indra is sapta-han on the seven-fold, division, he may be easily conceived as dasha-han, or the ten-slayer, on the ten-fold method of division. The word dasha-han does not occur in the يig-Veda, but the fight with the ten kings (ayajyavah dasha râjânah) practically amounts to the same thing. It has been stated above that amongst Indra’s enemies we have persons like Dasha-mâya and Dashoni, who are obviously connected in some way with the number ten. The ten gold-like kings mentioned above again seem to represent the ten monthly sun-gods, and the fact that they are said to 322 be given to the sacrificers further strengthens this view."
ते स्वतःच मान्य करतात कि इंद्राचा उल्लेख दशहन असा ऋग्वेदात आलेला नाही मग हे दहा राजे दहा महिन्याचे कारक कसे मानावेत ऋग्वेदातील प्रत्येक गोष्ट सिम्बॉलिक मानल्याने काय घोळ होतो त्याचा हा नमुना ! दुसरी गोष्ट इथेही इंद्राने दिवोदासला मदत केल्याचा उल्लेख आहे आणि वसिष्ठ पुरोहित असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे ह्याचा अर्थ ह्या टोळ्याच असाव्यात दाशराज्ञ युद्धही सूर्य व अंधाराचे उत्तर ध्रुवावरील युद्ध असल्याचे ते सिद्ध करू पाहतात पण हे पटत नाही
दहा अंगिरस दहा हिरण्यगर्भ राजे ह्यांचा उल्लेख करत पुढे रामायण हेही मूळ वैदिक गृहीतकातून जन्मल्याचे टिळक सिद्ध करू पाहतात म्हणजे रावण वृत्रासारखा व राम सूर्य वैग्रे पण ते सिद्ध होताना दिसत नाही ते जेव्हा बृहस्पतींचा, "But in the Atharva Veda IV, 6, I the first Brâhmana Bṛihaspati is said to be dashâsya, or ten-mouthed, and dasha-shirsha or ten-headed." असा उल्लेख करतात तेव्हा तो योग्य आहे पण बृहस्पती दशानन होते त्याचा रावणाच्या दशानन होण्याशी नेमका काय संबंध असा प्रश्न पडतो माझे स्वतःचे मत असे कि रावणाला दहा तोंडे नन्तर जोडलेली आहेत मूळ कथेत ती नसावीत टिळकांचं दशमूलक तर्कशास्त्र अनार्यांच्या बहुजनांच्या बाजूने उलटं लावून पाहिलं तर रावणाचे दशमुख म्हणजे दहा महिने दहा आदित्य आणि राम म्हणजे अंधार रावणाची दश मुखे म्हणजे दहा आदित्यांना मारून तो दीर्घ रात्रीच्या दोन महिन्यापुरता विजयी होतो त्यामुळे सूर्य तेजहीन होतो तेव्हा हनुमान जो सूर्याला थोडेसे तेज देणारा वृषकपी आहे असे टिळक म्हणतात तो प्रकाश देत राहतो असा मीही लावू शकतो पण मी हे करणार नाही कारण रामायण ही उत्तर ध्रुवावर रचलेली कथाच न्हवे रामायण व इलियड ह्या दोन महाकाव्यात साम्य आहे कारण मूळ कथा मूळ आर्यांची आहे जी ग्रीक व इंडियन अश्या दोन्ही आर्यांनी नंतर आपल्या संस्कृतीनुसार सजवली असं टिळक म्हणतात टिळक रामाचे वडील दशरथ म्हणजे पुन्हा दशमूलक असल्याचे म्हणतात इंद्र अहिल्याची मूळ कथाही सूर्य उषेची कथा असल्याचे टिळक मॅक्समूलरचा हवाला देऊन सांगतात ब्रम्हजया कथाही अशीच !
दशावतार ही संकल्पना ऋग्वेदात कुठे आहे पुढे टिळक दहा अवतारांची चर्चा करतात भगवान विष्णूंचे मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध व कल्की असे दहा अवतार होते तसेच अवेस्तातील इंद्राचे म्हणजेच वेरेथ्रनचे वायू वृषभ अश्व उष्ट्र वराह युवा काक मेष बक आणि नर असे दहा अवतार होते हे सर्व अवतार म्हणजे सूर्याच्या दहा महिन्याचे अवतार आहेत असं टिळक अप्रत्यक्ष सुचवतात
थोडक्यात टिळक आपल्याला ऋग्वेदातील अनेक ऋचा व कथा घेऊन
१ आर्य हे मूळचे उत्तर ध्रुवावर आर्टीकजवळ राहात होते
२ तिथून पुढे ते यूरोप व इराणभारत असे विभागले
३ मात्र त्यांच्या मूळ स्थानाची भौगोलिकता ते विसरले नाहीत
४ ही भौगोलिकता नंतरच्या काळात रचलेल्या ऋग्वेद व अवेस्ता ह्या दोन्ही संहितात प्रकट होत राहिली
५ आणि ह्या संहितेत प्रकट झालेल्या चिन्हीय पुराव्याच्या आधारे आपण हे स्वीकारू शकतो कि आर्टिक हेच आर्यांचे मूळ स्थान होते
६ हे स्वीकारले कि ऋग्वेदातल्या अनेक ऋचांचे व कथांचे नेमके अर्थ आपणाला लागतात
अशी सहा गृहीतके सिद्ध करतात त्यांनी दिलेल्या पुराव्यांची थोडीफार छाननी मी जागोजागी केलेली आहेच टिळकांचा ऋग्वेदाचा व्यासंग ह्या पुस्तकात जागोजागी दिसतो हा ग्रंथ वाचतांना आपण एक राजकीय नेत्याचे लेखन वाचतोय ह्याची जाणीवही रहात नाही इतके हे पुस्तक अकादमीक पातळीवर सशक्त वाटते टिळकांची अजोड प्रतिभा आणि प्रखर तर्कबुद्धी आपणाला अचंबित करते टिळकांच्या ह्या ग्रंथाचे एक कवी म्हणून माझ्यावर काय परिणाम झाला ते पुढील भागात !
श्रीधर तिळवे नाईक
प्रत्येक शोषक राज्यकर्त्याला शोषितांनी आपल्या शोषणाविरुद्ध बंड करू नये म्हणून प्रचंड प्रयत्न करायला लागतात आणि त्यासाठी शोषितांना मी तुमच्याच कुळीचा आहे हे पटवण्यासाठी काही वैचारिक क्लुप्त्या रचाव्या लागतात . इंग्रज ह्याला अपवाद न्हवते युरोपियन लोकांच्या सुदैवाने ह्याच वेळी इंडोयुरोपियन भाषेचा सिद्धांत जन्माला आला आणि ह्या भाषा बोलणारे एकाच कुळीचे असावेत असा विचारही उदयाला आला ह्या कुळीला सर्वांनी आर्य असे म्हंटले मात्र ही एकच वंशीय होती कि अनेक वंशीय होती हे गुलदस्त्यातच राहिले भारतात मात्र ती एक वंशीय असल्याचा अट्टाहास ब्राम्हणांनी व ब्राम्हण इतिहासकारांनी धरला आणि त्यातूनच आर्य वंशाची कल्पना जन्माला आली हे आर्य म्हणजे फार प्रागतिक दिसायला देखणे घोड्यावर बसणारे द्रविड बायका ज्यांच्यासाठी जीव टाकतात असे होते असे वर्णन प्रसूत करण्यात आले परिणामी १९५० नंतरचे सगळे बॉलिवूड हिरो पंजाबी झाले जे ह्या तथाकथित हीरॊत्वाचे आर्य प्रतिनिधी होते ह्या आर्य हिरोंच्यावर भाळणारी द्रविड नाग हिरॉईन म्हणून मराठी बंगाली व दाक्षिणात्य अशा हिरॉईन्स जाणीवपूर्वक आणल्या गेल्या स्वतःच आर्यत्व दृढ करण्याची आणि जनमानसात प्रचलित करण्याची ही कारस्थानगिरी होती महाराष्ट्रापर्यंतच्या भंपक बहुजनांनी ही ग्रँड थेरी उचलून धरली दाक्षिणात्य बहुजनाने मात्र उलटापालटी केली आजही एकता कपूरच्या सीरियलमध्ये हा आर्य हिरो हंक सारखा सादर केला जातो आणि राक्षस मात्र काळाच असतो हिरॉईन अनेकदा साक्षी तन्वरसारखी नाग द्रविड असते
आमच्या पिढीने हे आर्यत्व प्रथम नाकारले आणि राजनीकांतपासून मिथुन चक्रवर्तीपर्यंत अनेक सावळे हिरो स्वीकारले मात्र दोन प्रश्नांनी पाठलाग सोडला नाही आर्य म्हणजे काय ? आणि आर्यत्वाचे हे सेटिंग स्वीकारण्याइतके बहुजन इतके मूर्ख खरोखरच होते का ?
ह्यामुळे बहुजनांना कळेनासे झाले कि खरोखरीच झालेली ही उपरती आहे कि एका नव्या कारस्थानाची सुरवात आहे ? जेव्हा जेव्हा ह्या देशात ब्राम्हण्य पलटी मारते तेव्हा तेव्हा ह्या देशात सत्तापरिवर्तन घडून सत्ता ब्राम्हण्याच्या ताब्यात जाते हा इतिहास आहे एकीकडे ब्राम्हण्याने ग्रासलेले ब्राम्हण व दुसरीकडे परिवर्तनवादी ब्राम्हण ह्यांच्यातली धुमश्चक्री ह्या काळात वाढत गेली १८८० पासून परिवर्तनवादी चळवळ जिवंत ठेवणारे ब्राम्हण अचानक ब्राम्हन्य जोपासणाऱ्या कट्टर ब्राम्हणांच्यापुढें फिके पडायला लागले आणि इथूनच कम्युनिस्ट चळवळीचा अस्त व्हायला सुरवात झाली आर्यन वांशिकतेने पुन्हा एकदा जोर पकडायला इथूनच सुरवात झाली एकीकडे आयडियॉलॉजीच्या नावाने फाटाफूट कवटाळणारे पुरोगामी ब्राम्हण आणि दुसरीकडे आर्यत्वाच्या नावाने संघटित होत चाललेले ब्राम्हण्य पाळणारे नवं ब्राम्हण ह्यांच्यात नेहरूकाळात नेहमी विजयी होणारे पुरोगामी ब्राम्हण हळूहळू पराभूत झाले आणि कट्टर सनातन धर्माला पुन्हा एकदा सुगीचे दिवस प्राप्त झाले अशावेळी पुरोगामी ब्राम्हणेतरांनी ह्या पुरोगामी ब्राम्हणांच्यामागे उभे रहायला हवे होते पण फुले आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या अनेकांनी उलट ब्राम्हण पराभूत होतायत ते छान घडतंय असं म्हणून मौन पाळायला सुरवात केली परिणामी परिवर्तनवादाची पीछेहाट सुरु आणि सनातन आर्य धर्माची आगेकूच सुरु !
आऊट ऑफ इंडिया थेरी आर्यन इन्वेजन थेरीला काउंटर म्हणून जन्मली आणि ब्राम्हणांचा हा अबाउट टर्न होता हे तर स्पष्टच आहे कि आर्यन इन्वेजन थेरीमुळे ब्राम्हण एकटे पडले प्रश्न असा आहे कि ह्या एकटे पडण्यावर मात करण्यासाठी आऊट ऑफ इंडिया थेरी जन्माला आली कि जागतिकीकरणाची चाहूल लागलेल्या ब्राम्हण समाजाला आउट ऑफ इंडिया जाऊन जग काबीज करण्याची जी नवीन स्वप्ने पडायला लागली त्याला ऐतिहासिक व पारंपरिक पार्श्वभूमी देण्यासाठी आऊट ऑफ इंडिया थेरीचे हे बॅकग्राउंड म्युझिक तयार करण्यात आले ? हा पश्चाताप होता कि नवीन पराक्रमाची सिद्धता ? आता ब्राम्हणांना नवे जग जिंकण्यासाठी हे आवश्यक वाटायला लागले म्हणून हे नवीन रचित जन्माला आले कि काय ?
आणि आता जागतिकीकरणात स्थलांतरासाठी आणि इंग्लंड अमेरिकेत सेटल होण्यासाठी रचण्यात आलेली ही आऊट ऑफ आफ्रिका थेरी ! ही थेरी काय सांगते तर आर्य पर्यायाने ब्राम्हण मूळचे भारतीयच पण त्यांनी भारताबाहेर जाऊन अनेक साम्राज्ये रचली एकदा ही थेरी स्वीकारली कि भारताबाहेर सेटल होऊन आपली नवी साम्राज्ये रचायला ब्राम्हण मोकळे
एका बाजूला हे असे थेरी रचणे तर दुसऱ्या बाजूला एक हाकाटी नेहमी चालू असते कि ब्राम्हण एकटे पडलेत आणि ब्राम्हणेतर ब्राम्हणांना टार्गेट करतायत पण ब्राम्हण प्रश्न विचारायला किंवा आत्मपरीक्षण करायला तयार नाहीत कि ही परिस्थिती उदभवली कशी ?
टार्गेट करायला सुरवात केली कोणी ? तुम्हीच ठरवून एकेक वर्ण टार्गेट केला परशुराम सिद्धांत मांडून क्षत्रियांशीपंगा घेतला व क्षत्रियांना ज्यात शिवाजी शाहू येतात शूद्र म्हणून हा पंगा वाढवला पुढे समुद्रपर्यटनबंदी करून वैश्यांना शेती करायला भाग पडले आणि हलकटपणाने नंतर कलियुगात वैश्य उरले नाहीत अशी हाकाटी पिटली त्यामुळे ब्राम्हणांचे वैश्यांशीही संबंध तुटले पुढे वैश्यांनाही ब्राम्हणांनि शूद्र म्हणायला सुरवात करून वैश्यांशी पंगा वाढवला शूद्र आणि अतिशूद्र ह्यांना ब्राम्हण कधी किंमत देतच न्हवते आणि शेवटचा बॉण्ड जो आदिवासी जमातीशी उरला होता तो आर्य सिद्धांतच्या प्रभावाखाली येऊन तुम्ही ब्रिटिशांच्याप्रमाणे जमीनदार होऊन आदिवासींच्या जमिनी आणि जंगलं ताब्यात घेऊन तोडला ब्रिटिशांनी जमातींच्यावर अनेक अत्याचार केल्याने आणि ब्राम्हणांनी त्यांना त्यात साथ दिल्याने ब्राम्हण आर्यांचे जमातीशी असलेले नाते तुटले आणि ह्या देशाशी असलेल्या संबंधाची शेवटची कडी निखळली
आज हिंदुत्व काय करत आहे ? ब्रिटिशांचे वैश्य शूद्र आदिवासी ह्यांच्याबाबत जे धोरण होते तेच धोरण आज हिंदुत्व राबवत आहे ब्रिटिशांचे वैश्य शूद्रांच्याबाबतीत कररूपाने व आदिवासींच्याबाबतीत गुलाम बनवून वा हाकलून देऊन जितके लुटता येईल तितके लुटा असेच धोरण होते व आज तेच चालू आहे मला शंका आहे ब्रिटिशांच्या काळात असलेली ब्राम्हण क्षत्रिय व अस्पृश्य एकीकडे व वैश्य शूद्र आणि आदिवासी दुसरीकडे अशी जी अदृश्य फाळणी होती तशीच एखादी फाळणी पुन्हा हिंदुत्व परत आणणार काय ?मुख्य म्हणजे हिंदुत्ववाद्यांना जमातीविषयी वाटणारा आदर पूर्णच संपला आहे का ?
स्वकियांशीच पंगा घेऊन त्यांना हींन लेखून ब्राम्हण नेमके काय साधत होते आणि हिंदुत्व नेमके काय साधत आहे ? हा अहंकार कि मूर्खपणा ? ब्राम्हणांनी अजूनही ह्या गोष्टीची नीट मीमांसा केलेली नाही तुम्ही क्रिया केली तर त्याला प्रतिक्रिया येणारच उलट ब्राम्हणेतर लोक खूप सहनशील आणि सोशिक म्हणायला हवेत कि शतकानुशतकं शूद्र म्हणून हिनवूनही त्यांनी तुमचा आदर करायचा सोडला नाही आणि आजही तुमची अवस्था अशी आहे कि आर्य म्हणवून घेणे तुम्हाला भूषणास्पद वाटते जोपर्यंत तुम्ही इतरांना समान समजणार नाही तोवर हे एकटे पडत जाणे अटळ आहे हा एकटेपणा तुम्ही निर्माण केला आहे तुम्हीच एव्हरेस्टवर जाऊन बसलाय आणि आता एकटे आहात म्हणून ढिंढोरा पिटताय आधी ह्या आर्यत्वाच्या एव्हरेस्टवरून उतरा कारण ह्या देशात तुमच्याशिवाय समता अशक्य आहे आधुनिक मूल्ये ह्या देशाला देण्यासाठी तुमच्याइतके पात्र कोणी नाही आधुनिक मूल्ये द्या व पाळा ह्यात केवळ तुमचेच भले नाही सगळ्यांचेच भले आहे
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ६९ श्रीधर तिळवे नाईक

1. ALL is with thee, O Indra, all the treasures which erst our fathers won who sang thy praises. With thee are milch-kine good to milk, and horses: best winner thou of riches for the pious. 2. For like a King among his wives thou dwellest: with glories, as a Sage, surround and help us. Make us, thy servants, strong for wealth, and honour our songs wirth kine and steeds and decoration. 3. Here these our holy hymns with joy and gladness in pious emulation have approached thee. Hitherward come thy path that leads to riches: may we find shelter in thy favour, Indra. 4. Vasistha hath poured forth his prayers, desiring to milk thee like a cow in goodly pasture. All these my people call thee Lord of cattle: may Indra. come unto the prayer we offer. 5. What though the floods spread widely, Indra made them shallow and easy for Sudas to traverse. He, worthy of our praises, caused the Simyu, foe of our hymn, to curse the rivers' fury. 6. Eager for spoil was Turvasa Purodas, fain to win wealth, like fishes urged by hunger. The Bhrgus and the Druhyus quickly listened: friend rescued friend mid the two distant peoples. 7. Together came the Pakthas, the Bhalanas, the Alinas, the Sivas, the Visanins. Yet to the Trtsus came the Arya's Comrade, through love of spoil and heroes' war, to lead them. 8. Fools, in their folly fain to waste her waters, they parted inexhaustible Parusni. Lord of the Earth, he with his might repressed them: still lay the herd and the affrighted herdsman. 9. As to their goal they sped to their destruetion: they sought Parusni; e'en the swift returned not. Indra abandoned, to Sudas the manly, the swiftly flying foes, unmanly babblers. 10. They went like kine unherded from the pasture, each clinging to a friend as chance directed. They who drive spotted steeds, sent down by Prsni, gave ear, the Warriors and the harnessed horses. 11. The King who scattered one-and-twenty people of both Vaikarna tribes through lust of glory- As the skilled priest clips grass within the chamber, so hath the Hero Indra, wrought their downfall. 12. Thou, thunder-armed, o'erwhelmedst in the waters famed ancient Kavasa and then the Druhyu. Others here claiming friendship to their friendship, devoted unto thee, in thee were joyful. 13. Indra at once with conquering might demolished all their strong places and their seven castles. The goods of Anu's son he gave to Trtsu. May we in sacrifice conquer scorned Puru. 14. The Anavas and Druhyus, seeking booty, have slept, the sixty hundred, yea, six thousand, And six-and-sixty heroes. For the pious were all these mighty exploits done by Indra. 15. These Trtsus under Indra's careful guidance came speeding like loosed waters rushing downward. The foemen, measuring exceeding closely, abandoned to Sudas all their provisions. 16. The hero's side who drank the dressed oblation, Indra's denier, far o'er earth he scattered. Indra brought down the fierce destroyer's fury. He gave them various roads, the path's Controller. 17. E'en with the weak he wrought this matchless exploit: e'en with a goat he did to death a lion. He pared the pillar's angles with a needle. Thus to Sudas Indra gave all provisions. 18. To thee have all thine enemies submitted: e'en the fierce Bheda hast thou made thy subject. Cast down thy sharpened thunderbolt, O Indra, on him who harms the men who sing thy praises. 19. Yamuna and the Trtsus aided Indra. There he stripped Bheda bare of all his treasures. The Ajas and the Sigrus and the Yaksus brought in to him as tribute heads of horses. 20. Not to be scorned, but like Dawns past and recent, O Indra, are thy favours and thy riches. Devaka, Manyamana's son, thou slewest, and smotest Sambara from the lofty mountain. 21. They who, from home, have gladdened thee, thy servants Parasara, Vasistha, Satayatu, Will not forget thy friendship, liberal Giver. So shall the days dawn prosperous for the princes. 22. Priest-like, with praise, I move around the altar, earning Paijavana's reward, O Agni, Two hundred cows from Devavan's descendant, two chariots from Sudas with mares to draw them. 23. Gift of Paijavana, four horses bear me in foremost place, trained steeds with pearl to deck them. Sudas's brown steeds, firmly-stepping, carry me and my son for progeny and glory. 24. Him whose fame spreads between wide earth and heaven, who, as dispenser, gives each chief his portion, Seven flowing Rivers glorify like Indra. He slew Yudhyamadhi in close encounter. 25. Attend on him O ye heroic Maruts as on Sudas's father Divodasa. Further Paijavana's desire with favour. Guard faithfully his lasting firm dominion.
टिळक म्हणतात," It has been noticed above that ten gold-like kings (VIII, 3, 38), and ten non-sacrificing kings (VII, 83, 7), are mentioned in the يigVeda. But there is an important incident connected with the ten nonsacrificing kings which deserves more than a passing notice in this place. Sudâs, the son of Divodâsa Atithigva, is described as engaged in a fight with the ten non-worshipping (ayajyavah) kings, and is said to have received help from Indra and Varuna (VII, 33, 3-5; 83, 6-8). It is known as the Dasharâjña fight, and Vasishtha, as the priest of Sudâs, is said to have secured the assistance of Indra for him. On this slender basis some scholars have erected a stately edifice of the fight of the Aryan races with the ten non-Aryan or non-worshipping kings. But it seems to me that the Dasharâjña fight can be more simply and naturally explained by taking it to be a different version of Indra’s fight with the seven Dânus or demons (X, 120, 6). In X, 49, 8, Indra is called the seven-slayer (sapta-han) with reference either to the seven Dânus or demons (X, 120, 6) or to the seven cities of Vṛitra (I, 174, 2), in the seven-bottomed ocean (VIII, 40, 5). Now if Indra is sapta-han on the seven-fold, division, he may be easily conceived as dasha-han, or the ten-slayer, on the ten-fold method of division. The word dasha-han does not occur in the يig-Veda, but the fight with the ten kings (ayajyavah dasha râjânah) practically amounts to the same thing. It has been stated above that amongst Indra’s enemies we have persons like Dasha-mâya and Dashoni, who are obviously connected in some way with the number ten. The ten gold-like kings mentioned above again seem to represent the ten monthly sun-gods, and the fact that they are said to 322 be given to the sacrificers further strengthens this view."
ते स्वतःच मान्य करतात कि इंद्राचा उल्लेख दशहन असा ऋग्वेदात आलेला नाही मग हे दहा राजे दहा महिन्याचे कारक कसे मानावेत ऋग्वेदातील प्रत्येक गोष्ट सिम्बॉलिक मानल्याने काय घोळ होतो त्याचा हा नमुना ! दुसरी गोष्ट इथेही इंद्राने दिवोदासला मदत केल्याचा उल्लेख आहे आणि वसिष्ठ पुरोहित असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे ह्याचा अर्थ ह्या टोळ्याच असाव्यात दाशराज्ञ युद्धही सूर्य व अंधाराचे उत्तर ध्रुवावरील युद्ध असल्याचे ते सिद्ध करू पाहतात पण हे पटत नाही
दहा अंगिरस दहा हिरण्यगर्भ राजे ह्यांचा उल्लेख करत पुढे रामायण हेही मूळ वैदिक गृहीतकातून जन्मल्याचे टिळक सिद्ध करू पाहतात म्हणजे रावण वृत्रासारखा व राम सूर्य वैग्रे पण ते सिद्ध होताना दिसत नाही ते जेव्हा बृहस्पतींचा, "But in the Atharva Veda IV, 6, I the first Brâhmana Bṛihaspati is said to be dashâsya, or ten-mouthed, and dasha-shirsha or ten-headed." असा उल्लेख करतात तेव्हा तो योग्य आहे पण बृहस्पती दशानन होते त्याचा रावणाच्या दशानन होण्याशी नेमका काय संबंध असा प्रश्न पडतो माझे स्वतःचे मत असे कि रावणाला दहा तोंडे नन्तर जोडलेली आहेत मूळ कथेत ती नसावीत टिळकांचं दशमूलक तर्कशास्त्र अनार्यांच्या बहुजनांच्या बाजूने उलटं लावून पाहिलं तर रावणाचे दशमुख म्हणजे दहा महिने दहा आदित्य आणि राम म्हणजे अंधार रावणाची दश मुखे म्हणजे दहा आदित्यांना मारून तो दीर्घ रात्रीच्या दोन महिन्यापुरता विजयी होतो त्यामुळे सूर्य तेजहीन होतो तेव्हा हनुमान जो सूर्याला थोडेसे तेज देणारा वृषकपी आहे असे टिळक म्हणतात तो प्रकाश देत राहतो असा मीही लावू शकतो पण मी हे करणार नाही कारण रामायण ही उत्तर ध्रुवावर रचलेली कथाच न्हवे रामायण व इलियड ह्या दोन महाकाव्यात साम्य आहे कारण मूळ कथा मूळ आर्यांची आहे जी ग्रीक व इंडियन अश्या दोन्ही आर्यांनी नंतर आपल्या संस्कृतीनुसार सजवली असं टिळक म्हणतात टिळक रामाचे वडील दशरथ म्हणजे पुन्हा दशमूलक असल्याचे म्हणतात इंद्र अहिल्याची मूळ कथाही सूर्य उषेची कथा असल्याचे टिळक मॅक्समूलरचा हवाला देऊन सांगतात ब्रम्हजया कथाही अशीच !
दशावतार ही संकल्पना ऋग्वेदात कुठे आहे पुढे टिळक दहा अवतारांची चर्चा करतात भगवान विष्णूंचे मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध व कल्की असे दहा अवतार होते तसेच अवेस्तातील इंद्राचे म्हणजेच वेरेथ्रनचे वायू वृषभ अश्व उष्ट्र वराह युवा काक मेष बक आणि नर असे दहा अवतार होते हे सर्व अवतार म्हणजे सूर्याच्या दहा महिन्याचे अवतार आहेत असं टिळक अप्रत्यक्ष सुचवतात
थोडक्यात टिळक आपल्याला ऋग्वेदातील अनेक ऋचा व कथा घेऊन
१ आर्य हे मूळचे उत्तर ध्रुवावर आर्टीकजवळ राहात होते
२ तिथून पुढे ते यूरोप व इराणभारत असे विभागले
३ मात्र त्यांच्या मूळ स्थानाची भौगोलिकता ते विसरले नाहीत
४ ही भौगोलिकता नंतरच्या काळात रचलेल्या ऋग्वेद व अवेस्ता ह्या दोन्ही संहितात प्रकट होत राहिली
५ आणि ह्या संहितेत प्रकट झालेल्या चिन्हीय पुराव्याच्या आधारे आपण हे स्वीकारू शकतो कि आर्टिक हेच आर्यांचे मूळ स्थान होते
६ हे स्वीकारले कि ऋग्वेदातल्या अनेक ऋचांचे व कथांचे नेमके अर्थ आपणाला लागतात
अशी सहा गृहीतके सिद्ध करतात त्यांनी दिलेल्या पुराव्यांची थोडीफार छाननी मी जागोजागी केलेली आहेच टिळकांचा ऋग्वेदाचा व्यासंग ह्या पुस्तकात जागोजागी दिसतो हा ग्रंथ वाचतांना आपण एक राजकीय नेत्याचे लेखन वाचतोय ह्याची जाणीवही रहात नाही इतके हे पुस्तक अकादमीक पातळीवर सशक्त वाटते टिळकांची अजोड प्रतिभा आणि प्रखर तर्कबुद्धी आपणाला अचंबित करते टिळकांच्या ह्या ग्रंथाचे एक कवी म्हणून माझ्यावर काय परिणाम झाला ते पुढील भागात !
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ६६
श्रीधर तिळवे नाईक
टिळक आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान १९
ऋग्वेदातील कवितांच्याकडे नजर टाकली तर अंधाराचे वाटणारे भय डोळ्यात भरते ह्या अंधाराला सूर्य नाहीसा करतो म्हणून सूर्याविषयीचे इतके ऑब्सेशन ! अनेकदा तर ह्या प्रार्थना काळोखापुढे तमसपुढे गायलेली प्रकाशाची तेजाची आरती वाटतात छायेसारखे तात्कालिक आणि आधारशून्य शरीरशुन्य वाटणारे आपले अस्तित्व ऋषींना कायमच सतवतांना दिसते आपलं शरीर हे कुठल्यातरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशा शरीराची छाया आहे हे ऋषींना सतत जाणवताना दिसते ऋग्वेदात हे शरीर काळोखाचे आहे कि प्रकाशाचे हा आयुष्य ग्रासून टाकणारा प्रश्न होता आणि त्याचे अंतिम उत्तर उपनिषदात माणूस प्रकाशाचा पुत्र आहे असं प्राप्त केलं गेलेलं आहे सूर्याच्या प्रकाशाकडून आत्मप्रकाशापर्यंतचा हा प्रवास वर्णव्यवस्थेतील व जातिव्यवस्थेतील
काळोख मात्र नीट पाहू शकला नाही
टिळकांना उत्तर ध्रुवावरचा दीर्घ दिवस म्हणजे भारताचा भूतकाळ व ब्रिटिशांचे राज्य म्हणजे दीर्घ रात्र असे वाटत होते का ? प्रकाश गिळणारे वृत्र , अहि वैग्रे त्यांना आसपास दिसत होते का ? आपणही उत्तर ध्रुवावरच्या सूर्याप्रमाणे ब्रिटिशांच्या जेलमध्ये कैद झालो आहोत असे त्यांना वाटल्याने त्यांनी हा ग्रंथ लिहिला नसेल ना ?
अंधारात जे दिसते ते खात्रीलायक असत नाही कारण ते प्रमाणमान्य नसते त्यामुळेच ऋग्वेदात अंधाराविषयी आस्था नाही अंधार खरा असतो कि खोटा ह्या प्रश्नाचे उत्तर ऋग्वेदाकडे नाहीये पुढे अंधाराला खोटा म्हणण्याची रूढी बळावली कारण प्रकाशाच्या अभावामुळे अंधार निर्माण होतो हे पटू लागले आजही अंधाराचे कोडे पुरते उलगडलेले नाहीये प्रकाश म्हणजे जळणारा अंधार असं आपण म्हंटलं तर ते सहजासहजी नाकारता येईल असे वाटत नाही तत्वज्ञानात अंधाराला द्रव्याचा आधार नाही असे म्हंटले जाते एका अर्थाने अंधार ही माणसाला गवसलेली पहिली अभावात्मक वस्तुस्थिती आहे जे नाहीये त्याचा स्पर्श आहे अंधार अविद्या आहे पण विद्या प्रकाश आहे का कि प्रकाशाची फक्त शक्यता आहे जी अंधार आणि प्रकाश ह्यांच्यापलीकडे असलेल्या मोक्षाकडे घेऊन जाते ?
अंधाराचा पुनर्जन्म होतो का ? कि अंधारामुळेच पुनर्जन्म होतो ? नाहीतरी अविद्या हेच पुनर्जन्माचे
मुख्य कारण पण जर अविद्या अंधार असेल तर आणि अंधाराला अस्तित्व नसेल तर मग अस्तित्वात नसलेल्या ह्या गोष्टींनी पुनर्जन्म कसा होतो ?
सावली प्रकाशामुळे पडते आणि ती काळी असते ह्याउलट कवडसे तेजपुंज ! कवडसे सावली असतात कि नसतात
? आयुष्य म्हणजे फक्त सावल्यांचा आणि कवडश्यांचा खेळ का ?
सर्वात मोठी सावली सूर्याची चंद्राची आणि पृथ्वीची आणि ह्यांच्या ह्या खेळातून ग्रहणाचा खेळखंडोबा चालू होतो ग्रहणांनी ऋषी बिथरलेले होते सूर्य गिळला जातो हा त्यावेळचा सर्वात मोठा स्पेशल इफेक्ट ! सूर्यांवरचा विश्वास हा ग्रहणामुळे उडाला . ग्रहणांनी ऋषींना सांगितले कि सूर्याला गिळणाराही कोणी आहे आणि सूर्याला ह्या गिळण्यातून सोडवणाराही ! एकेश्वरवादाची सुरवात ग्रहणांच्यामुळे झाली तोवर सूर्यच प्रमुख होता
टिळक आर्यांचं मूलस्थान शोधतायत कि स्वतःचं ? कुठेतरी ब्रिटिशांना आम्हीही तुमच्याप्रमाणे प्रकाशाचे पुत्र आहोत हे बजावण्याची ही धाटणी आहे का ? स्वतःला आर्य म्हणवणारे लोक पुनःपुन्हा अलिएनएशनमध्ये का ट्रॅप होतात ? त्यांच्या आत हे फिलिंग का कायमस्वरूपी दाटून येते ? ब्रिटिशांच्या
काळात ब्रिटिशांशी तादात्म्य दाखवण्याची मानसिक गरज आर्यांना का भासते आणि आत्ता इंडियात आम्हीही भारताचे मूलनिवासी आहोत हे सांगण्याची व मूळनिवासींशी
तादात्म पावण्याची ही मानसिक गरज का भासते ? सततचे नवीन स्टान्स आर्यांना कुठे घेऊन जाणार आहेत ?तुम्ही आर्य नाही आहात असं समोरच्याला दणकवून सांगता सांगता "मग तुम्हीही मूलनिवासी नाही आहात "
असं प्रत्युत्तर आल्यावर हबकून जाण्यात काय अर्थ ? शेवटी तुम्ही जे पेराल तेच उगवणार हा कर्मफलसिद्धांत
आर्यांनाही लागू होणारच
टिळकांच्यामुळे तुम्ही ऋग्वेद पुन्हा मूळापासून वाचता . टिळकांच्या लेखनाची सर्वात मोठी फलश्रुती हीच !
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ६७
टिळक आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान : सिंहावलोकन २०
गेल्या काही भागात आपण टिळकांनी भूरचनाशास्त्राच्या आधारे व ज्योतिषशास्त्राच्या आधारे केलेली मांडणी पाहिली आता अलीकडच्या संशोधनाच्या प्रकाशात टिळकांचा सिद्धांत पाहू आजही आर्य बाहेरून आलेत हा सिद्धांत स्वीकारणाऱ्या संशोधकांची संख्या प्रचंड आहे आणि आऊट ऑफ इंडियाला फक्त इंडियन
पुण्ययोनीवाल्यांचाच आधार आहे असे चित्र आहे आपल्याला सद्या फक्त टिळकांशीच देणेघेणे असल्याने आपण फक्त टिळकांच्या चौकटीत आतापर्यंत चर्चा केली आणि पुढेही करत
आहोत बाकी चर्चा मी मागच्या काही प्रकरणात केली आहेच
सर्वात मूलभूत प्रश्न असा आहे कि टिळक व त्यांच्या समकालीन लेखकांना सर्वच आर्यांचे मूलस्थान शोधावेसे का वाटले ? ह्यामागे ब्रदरहूड सिद्धांत आहे मी मागेच म्हंटल्याप्रमाणे टिळक हेही स्वतःला आर्यन समजत व युरोपियन लोकांना ब्रदर ! कुंटेपासून टिळकांच्यापर्यंत सर्वच ही ब्रदरहूड थेरी मान्य करत ही थेरी आली कुठून ?
भारतातल्या ओरियंटलिझमची सुरवात विल्यम जोन्समुळे झाली आणि त्याच्या आकर्षणाचे कारण होते त्याचा सिद्धांत त्याच्या मते नोहाचा मुलगा हम होता व त्याचा पुत्र हिंद होता आणि ह्या हिंदपासून सगळे हिंदू तयार झाले तर नोहाच्या दुसऱ्या मुलाचे वंशज म्हणजे यूरोपियन्स ! म्हणजेच युरोपियन व इंडियन आर्यन भाऊभाऊ झाले त्यातूनच ब्रदरहूड सिद्धांत जन्मला ह्यातला धोखा अनेकांना कळला नाही हमने आपल्या बापाला नग्न पाहिल्याने नोहाने हमचा मुलगा कनानला व भावंडांना स्लॅव्हरीचा शाप दिला होता म्हणजे हिंदूंची स्लॅव्हरी ही शापामुळे आली होती ही ब्रदरहूड थेरी मान्य करणे म्हणजे युरोपियन आर्य मालक व इंडियन आर्य गुलाम हे दैवदत्त व शापदत्त असल्याचे मान्य करणे ह्यातलं राजकारण ब्राम्हणांना कळू नये ही अकलेची दिवाळखोरी कि
व्हाईट स्किनची गुलामगिरी स्वीकारल्याने आलेले बौद्धिक मांद्य !
बौद्धिकमांद्य
स्वीकारून हा ब्रदरहूड सिद्धांत स्वीकारून टिळकांनी समग्र आर्यांच्या मूळ वस्तिस्थानाचा शोध घ्यायला सुरवात केली आणि त्यातूनच आरटिक होम इन वेदाज हा ग्रंथ १८९८ साली लिहला गेला ह्या ग्रंथाला लिहिलेली प्रस्तावना ही मी वाचलेल्या सर्वोत्कृष्ट प्रस्तवानांपैकी एक आहे जसे जसे तुमचे ज्ञान वाढत जाते तसे तसे तुम्हाला फक्त तुमचे अज्ञानच दिसू लागते टिळक आर्किओलॉजीपासून जिऑलॉजी पर्यंतच्या अनेक नवीन विज्ञानाविषयी असलेल्या आपल्या मर्यादा आधीच कबूल करतात त्यांचे पॉलिटिक्स , लॉ , ऍस्ट्रॉनॉमि व मॅथेमॅटिक्स वरचे प्रभुत्व वादातित आहे एका राजकारणी माणसाचे हे प्रभुत्व केवळ अचंबित करणारे आहे हल्ली आपली घटना व राज्यशास्त्रही न वाचणारे राजकारणी पाहिले कि आपण अधिकच चकीत होतो १८२० ते १९४७ ह्या काळात जन्मलेले किमान ७० टक्के टॉपक्लास राजकारणी हायक्लास ज्ञानी होते हे आत्ताच्या राजकारणी लोकांच्याकडे पाहून अविश्वसनीय वाटावे ज्ञानापासून राजकारण तुटले कि काय होते त्याचा हा तमाशा आहे आयडियॉलॉजीच्या आधारे केलेलं निवडणूककेंद्री राजकीय संघटन म्हणजे पक्ष तर केवळ व्यवस्थापनाच्या आधारे केलेलं निवडणूककेंद्री राजकीय संघटन म्हणजे पार्टी आपले सारे पक्ष आता पार्टी बनलेत काँग्रेस ही स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्थापन झालेली पार्टी होती आणि टिळक तिच्या व्यवस्थापनाचा भाग होते त्यामुळेच त्यांना घडलेल्या तुरुंगवासाची प्रस्तावनेत झालेली चर्चा अटळच टिळकांच्या सुटकेसाठी काँग्रेसने पुरेसे प्रयत्न केले नाही पण मवाळ विनंती अर्ज केले असो
टिळकांचे मॅक्स्मुलरविषयीचे लिखाण त्यांची सभ्यता दर्शवते टिळक नेहमीच त्यांच्यावर केलेल्या उपकाराची जाण ठेवत. मॅक्समुलरने त्यांच्या सुटकेसाठी केलेल्या प्रयत्नांचा ते त्यामुळेच ह्या ग्रंथात आस्थेने उल्लेख करतात
ओरियनमध्ये ऋग्वेदाचा कालखंड इसवीसनपूर्व ५००० पर्यंत न्हेल्यानंतर टिळक ज्ञानाविषयक घडामोडीकडे लक्ष्य ठेऊन होते ह्यावेळी जिऑलॉजीने साधारण दहा हजार वर्षांपूर्वी झालेल्या आईस एजचा व त्यामुळे आलेल्या हिमपाताचा शोध लावला ह्या शोधात आर्टीकला १०००० वर्षांपूर्वी मानवी वस्ती असावी अशी शक्यता सूचित केली आणि टिळकांनी ही वस्ती आर्यांची असेल तर ह्या अंगाने पुन्हा एकदा मॅक्समूलरने पाठवलेला ऋग्वेद वाचायला सुरवात केली आणि हे वाचन करतांना त्यांना जे ऍस्ट्रॉनॉमिकल पुरावे सापडत गेले त्याच्या आधारे त्यांनी एक सिद्धांत निश्चित केला तो म्हणजे आर्यांची प्राचीन वस्ती आर्टिक वर उत्तर ध्रुवापाशी होती आणि तिथून हिमयुगामुळे आर्य वस्ती सोडून मध्य रशियात आले तिथून काही यूरोपात गेले काही दक्षिण आशियात आले
ऋग्वेद हा एक थोड्या परिपक्व झालेल्या संस्कृतीचा प्रोडक्ट असून त्याच्या आधी यज्ञयाग सुरु झाले असले पाहिजेत आणि इसवीसनपूर्व ५०००च्या आसपास ह्या यज्ञयागांना शिस्त प्राप्त व्हावी म्हणून ऋग्वेदाची निर्मिती झाली असली पाहिजे असा टिळकांचा कयास आहे
प्रत्यक्षात ऋग्वेद हा फक्त ब्राम्हणांनी रचलेला ग्रंथच न्हवे त्यात दाक्षिणात्य क्षत्रिय व ऋषिंचाही वाटा दिसतो (उदा विश्वामित्र )दुसरी गोष्ट ऋग्वेदाची सर्वात प्राचीन लिखित प्रत ही केवळ १३०० वर्षे जुनी आहे आणि ती उत्तरेकडे सापडली नसून तामिळनाडूमध्ये सापडली आहे सर्वात महत्वाची गोष्ट ऋग्वेदात आर्य हा शब्दच नाही जर आर्य वंशाने ह्याचे निर्माण केले तर आर्य ह्या शब्दाचा वापर का नाही तब्बल १०६०० ऋचा आणि एकाही ऋचेत आर्य हा शब्द वंश ह्या अर्थाने नाही आणि तरीही दावा कि ऋग्वेद आर्य वंशीयांनी लिहिलेत ?
मी मागेच म्हंटले आहे कि दक्षिणेत अथर्ववेद निर्माण झाला होता आणि तो अंगिरस म्हणवणाऱ्या भगतांचा कोष होता आणि ज्यात काळ्यापांढऱ्या जादूचे उल्लेख आहेत त्यावरून ऋग्वेद व सामवेद रचण्यात आले भगवान शिवांनी जादूमंत्रांची हकालपट्टी केली तेव्हा ब्राम्हणांनी तो लपवला व पुढे पुनर्जीवित केला पण त्याआधी त्यावरून ऋग्वेद तयार करण्यात आला आणि मग अथर्ववेद आणला गेला अथर्ववेद उपायमंत्रांनी भरलेला आहे ऋग्वेद प्रार्थनामंत्रांनी भरलेला आहे पण प्रार्थनांचे स्वरूप मात्र तेच आहे मंत्रातील सोमरस हा दूध व इतर घटकांनी बनलेला आहे ऋग्वेदाच्या १:२३ व्या सूक्तात पहिल्याच ऋचेत तिखट झालेल्या सोमरसाला दूध घालून आम्ही सौम्य केले आहे असं म्हंटलं आहे सोमरस हे नेवैद्यपेय होते अश्व आणि गायबैल हे ऋग्वेदातील पशु आहेत १६ व्या सूक्तात ते इंद्राला गोधन व अश्व देण्याची प्रार्थना करतात
कुजमीनच्या मते घोड्याबाबत तो प्रथम खाद्य होता आणि खाद्य म्हणूनच तो माणसाळवला गेला पुढे त्याच्यावर ओझे लादले गेले चाकाचा शोध लागल्यावर त्याची घोडागाडी झाली पुढे रथ झाले आणि मग तो घोड्यावर बसून तो घौडदौड करायला शिकला हा ग्राफ आहे मनुष्य रथात बसला तोच मुळी इसवीसनपूर्व २१०० च्या आसपास इसवीसनपूर्व १५०० ला तो रथात होता सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे घोड्यावर प्रथम आर्य बसलेच न्हवते ग्रीकांना घोड्यावर बसणे माहीतच न्हवते घोड्यावर प्रथम आशियाई स्किथीयन्स बसले आणि ग्रीकांनी जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा त्यांना वाटले ही घोड्याच्या धडाची व माणसाच्या मुंडक्याची एक नवीन जमात आहे तिला त्यांनी सेंटॉर असे नाव दिले स्किथीयन्स घोडयावर बसायला इसवीसनपूर्व ९०० ला शिकले आता जिथे स्किथीयन्सच इसवीसनपूर्व ९०० ला घोड्यावर बसायला शिकले तिथे ग्रीक रोमन कधी बसणार आणि इंडियन आर्य तरी कधी बसणार ? मग दहा हजार वर्षांपूर्वी यज्ञयाग तेही घोड्याचे कसे शक्य आहेत ? आणि समजा घोडे खाद्य होते तर ऋग्वेदात वारंवार त्यांच्या रथांचा उल्लेख कसा ?
ऋग्वेदाबाबत येणारा आणखी एक अनुषंगिक प्रश्न बाणांचा आहे सहाव्या मंडलातील ७५ वे सूक्त (पायु भारद्वाज रचित )म्हणते जिथे शेंडी नसलेल्या बालकांच्या प्रमाणे बाण पडतात तिथे अदिती व ब्रम्हणस्पती आम्हाला सुख देवो प्रश्न असा आहे कि जिथे शत्रू बाण टाकतात तो काळ धनुष्य बाणाचा असणार म्हणजे धनुष्यबाणाच्या शोधानंतर ऋग्वेद लिहिला गेलाय रथ आणि धनुष्यबाणाचा काळ इसवीसनपूर्व १५०० च्या आधी काहीकेल्या जात नाही म्हणजेच टिळकांचा इसवीसनपूर्व ५००० हा दिलेला काळ भाकड कथा ठरतो
टिळकांनी व इतरांनी बिलकुलच सोडलेला एक मुद्दा म्हणजे मासे !आर्टिक वर ज्या काही वस्त्या आहेत त्यांच्या ठायी माश्यांचे फार महत्व आहे ऋग्वेदात मासे जवळजवळ नाहीतच( अपवाद ७:१८ :६ आहे पण हा उल्लेख माश्याचा कि मत्स्य राज्याच्या राजाचा हे स्पष्ट नाही ) मनुची आणि मत्सावताराची कल्पना शतपथ ब्राम्हणात (१:८:१)येते आणि मासा प्रजापतीचा अवतार आहे विष्णूचा नाही तर मनू राजा आहे शतपथ ब्राम्हणात जो दुसरा उल्लेख आहे त्यात मत्स्य सामद हा पाण्यात राहणारा असल्याने काल्पनिक राजा वाटतो ( गंमतीची गोष्ट अशी कि बुद्धाची वंशावळ सांगणाऱ्या श्रीलंकन धर्मग्रंथात हा समद वा संमत हा बुद्धाचा व शाक्यांचा मूळपुरुष म्हणून दिलेला आहे तो पाण्यात राहतो म्हणजे कोळी असावा त्यावरूनच शाक्य वंश कोळी पण शासक समुदायातील राजवंश असावा असे वाटते बुद्धाची आई कोळीय वंशाची होती हे तर सर्वमान्यच आहे ) असो
एकंदरच ऋग्वेदकालीन अतिप्राचीन आर्यांना माश्यांच्याविषयी फारशी माहिती नसावी मात्र ब्राम्हणकाळापासून त्यांचा मत्स्य संस्कृतीशी घनदाट परिचय झालेला असावा असे वाटते त्यामुळे ते मत्स्य संस्कृतीशी घनदाट परिचित आर्टीकवरून आलेत असे वाटत नाही
श्रीधर तिळवे नाईक
अवेस्तात उल्लेख केलेल्या सोळा प्रदेशांची चर्चा टिळक करतात पण त्याचबरोबर स्थलांतराचा उल्लेख अवेस्तात नाही हेही सिद्ध करतात
आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ६८
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक
: फिक्शन व वस्तुस्थिती ६८ ते श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ६८ श्रीधर तिळवे नाईक
टिळक आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान : भरतवाक्य २१ आर्य म्हणजे काय , आर्य सिद्धांत शाप कि वरदान व आर्य सिद्धांतामुळे ब्राम्हण एकटे पडलेत काय ?
प्रत्येक शोषक राज्यकर्त्याला शोषितांनी आपल्या शोषणाविरुद्ध बंड करू नये म्हणून प्रचंड प्रयत्न करायला लागतात आणि त्यासाठी शोषितांना मी तुमच्याच कुळीचा आहे हे पटवण्यासाठी काही वैचारिक क्लुप्त्या रचाव्या लागतात . इंग्रज ह्याला अपवाद न्हवते युरोपियन लोकांच्या सुदैवाने ह्याच वेळी इंडोयुरोपियन भाषेचा सिद्धांत जन्माला आला आणि ह्या भाषा बोलणारे एकाच कुळीचे असावेत असा विचारही उदयाला आला ह्या कुळीला सर्वांनी आर्य असे म्हंटले मात्र ही एकच वंशीय होती कि अनेक वंशीय होती हे गुलदस्त्यातच राहिले भारतात मात्र ती एक वंशीय असल्याचा अट्टाहास ब्राम्हणांनी व ब्राम्हण इतिहासकारांनी धरला आणि त्यातूनच आर्य वंशाची कल्पना जन्माला आली हे आर्य म्हणजे फार प्रागतिक दिसायला देखणे घोड्यावर बसणारे द्रविड बायका ज्यांच्यासाठी जीव टाकतात असे होते असे वर्णन प्रसूत करण्यात आले परिणामी १९५० नंतरचे सगळे बॉलिवूड हिरो पंजाबी झाले जे ह्या तथाकथित हीरॊत्वाचे आर्य प्रतिनिधी होते ह्या आर्य हिरोंच्यावर भाळणारी द्रविड नाग हिरॉईन म्हणून मराठी बंगाली व दाक्षिणात्य अशा हिरॉईन्स जाणीवपूर्वक आणल्या गेल्या स्वतःच आर्यत्व दृढ करण्याची आणि जनमानसात प्रचलित करण्याची ही कारस्थानगिरी होती महाराष्ट्रापर्यंतच्या भंपक बहुजनांनी ही ग्रँड थेरी उचलून धरली दाक्षिणात्य बहुजनाने मात्र उलटापालटी केली आजही एकता कपूरच्या सीरियलमध्ये हा आर्य हिरो हंक सारखा सादर केला जातो आणि राक्षस मात्र काळाच असतो हिरॉईन अनेकदा साक्षी तन्वरसारखी नाग द्रविड असते
आमच्या पिढीने हे आर्यत्व प्रथम नाकारले आणि राजनीकांतपासून मिथुन चक्रवर्तीपर्यंत अनेक सावळे हिरो स्वीकारले मात्र दोन प्रश्नांनी पाठलाग सोडला नाही आर्य म्हणजे काय ? आणि आर्यत्वाचे हे सेटिंग स्वीकारण्याइतके बहुजन इतके मूर्ख खरोखरच होते का ?
आर्य हा शब्द मागील लेखात म्हंटल्याप्रमाणे एकदाही वंश म्हणून येत नाही तो सभ्य म्हणून येतो आर्य धर्माने संस्कारित म्हणून येतो मग हा आर्य धर्म एक आहे का ? तर नाही खुद्द अवेस्तनही स्वतःला आर्यच म्हणवून घेतात खुद्द बुद्ध स्वतःला आर्य म्हणवून घेतो आर्य हे संबोधन वापरतो ह्याचा अर्थ स्पष्ट आहे आर्य हा एक धर्म नसून तो अनेक धर्मांचा समूह आहे हे आर्य धर्म कुठले ?
सर्वसाधारणपणे आर्यांच्यात १ सूर आणि २ असुर असे दोन प्रकार आढळतात ह्यातील अनेक सूर असुरांनी शैव धर्म स्वीकारलेले आहेत पण बहुसंख्य अजूनही आर्य धर्मातच वावरत असतात हे आर्य धर्म प्रामुख्याने दोन प्रकारचे आहेत
१ सूर धर्म
२ असुर धर्म
सूर धर्मांच्यात
१ वैदिक २ ब्राम्हणी ३ वैष्णव आणि ४ हिंदू असे चार धर्म येतात
असुर धर्मांच्यात
१ झोरोस्ट्रियन (पारशी ) २ जैन ३ बौद्ध असे तीन धर्म येतात
हे सर्व सात धर्म आर्य धर्म आहेत आणि ह्या धर्माचे पालन करणारे स्वतःला आर्य म्हणवतात ह्यातील झोरोस्ट्रियन धर्मातूनच ज्यांना आज ज्युडायिक धर्म म्हणतात ते निघाले आहेत त्यामुळे ज्युडायिक धर्मांनाही जर कुणी आर्य धर्म मानले तर हे धर्म दहा होतील तूर्तास आपण सात धर्मच पकडू कारण ज्यू धर्मियांची श्रद्धा अशी आहे कि मोझेस हा झरथ्रूष्टच्या आधीचा आहे ह्याबाबत अजूनही स्पष्ट चित्र आलेले नाही म्हणून म्हणालो कि तूर्तास सात धर्म हे आर्य धर्म आहेत हे पकडून चालू !
आर्य म्हणजे मग नेमके काय ? तर आर्य धर्मांना अनुसरतात ते सर्व आर्य होत वैदिक ब्राम्हणी व झोरोष्ट्रियन धर्मात मोक्ष ही संकल्पना नाही पुढे शैवांशी संपर्क आल्यावर आर्यानी मोक्ष स्वीकारला आणि त्यांची चार पुरुषार्थाची संकल्पना पुढे सिद्ध झाली जैन , बौद्ध , वैष्णव , हिंदू हे चार आर्य धर्म मोक्ष स्वीकारतात
ह्याउलट शैव धर्मांच्यात
१ शिवपूर्व २ आदीशैव २ आगमशैव ३ नवशैव (प्रामुख्याने लिंगायत) ४ शीख असे धर्म येतात
सर्व आर्य व शैव धर्म भारतीय धर्म आहेत ह्याशिवाय भारतीय धर्मात अहमदिया वैग्रे धर्म येतात
भारतीय संस्कृतीतील खरा वैचारिक संघर्ष हा आर्य विरुद्ध शैव असा आहे आणि तो नकुलीश बस्वेश्वरांच्यापासून
महात्मा फुलेंच्यापर्यंत अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडला आहे अनार्य हा शब्द मी जास्त वापरत नाही कारण तो आर्यत्वालाच केंद्रस्थानी ठेवतो ह्या दोन्हीत समतोल साधण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी होतो म्हणजे आर्य धर्मात बौद्ध , जैन , हिंदू हे तीन धर्म तर शैव धर्मात सांख्ययोग हे आगमशैव व शीख दोन्ही बाजूत समतोल ठेवण्याचा प्रयत्न करतात ह्या धर्मांना संस्थापक नाहीत असा फार मोठा अपप्रचार ब्राम्हणी धर्माचे लोक करत असतात प्रत्यक्षात भगवान शिवानी आदीशैव अंगिरसांनी वैदिक झरतृष्ट ह्यांनी झोरोस्ट्रयीन गौतम बुद्धाने बौद्ध महावीरांनी जैन व्यासांनी वैष्णव शंकराचार्यांनी हिंदू नकुलीशानी आगमशैव बसवेश्वरांनी नवशैव, गुरु नानक ह्यांनी शीख असे धर्म स्थापन केलेत फक्त ब्राम्हणी धर्मच असा आहे ज्याची स्थापना झालेली नाही कारण तो पुरोहितांच्या कर्मकांडातून जन्मलेला आहे मात्र त्यांच्या पूर्वमीमांसेचा संस्थापक जेमिनी होता हे सर्वमान्य आहे ह्या दोन्ही धर्मात दोन्हीकडचे लोक आहेत आदीशैव धर्मात मुळात पार्वती हीच आर्य आहे गौतम बुद्धाचा शाक्य गण हा असुर असला तरी मूळचा शाक्त आहे पुढे कपिलच्या प्रभावामुळे हा गण सांख्य झाला आणि पुढे शाक्त आणि सांख्य ह्यांच्या संयुक्त उच्चारातून व प्रभावातून त्याला शाक्य असे बदलले गेले आहे त्याची आई तर उघड उघड शैव आहे घुर्येंचे संशोधन प्रमाण मानून शोध घेतला तर साडेपाचशे ब्राम्हण जातींच्यापैकी तब्ब्ल साडेचारशे ब्राम्हण जाती ह्या एतद्देशीय मूळच्या शैव आहेत हीच गोष्ट स्वतःला आर्य म्हणवणाऱ्या क्षत्रिय वैश्यांची आहे ह्यातल्या ९० टक्के लोकांची कुलदैवते शैव आहेत
एकदा आर्य म्हणजे नेमकं काय हे पाहिलं कि आर्य सिद्धांताकडे वळायला हरकत नाही आर्य नावाचा कोणताही वंश ह्या पृथ्वीखंडावर न्हवता तरीही काहीजणांना आर्य म्हणून काही लोकांना माज का हा एक प्रश्नच आहे व होता आणि त्याचा मागोवा घेण्याचे प्रयत्न १९५५ पासून पुन्हा नव्याने सुरु झाले नव्या लोकांनी विशेषतः पुण्ययोनीवाल्यांनी ह्या वादाचे मूळ शोधायला सुरवात केली आणि मग ह्या लोकांनी कलोनियलिझम विरुद्ध देशीवाद पोस्टकलोनियलिझम असा बेगडी वाद निर्माण करून आर्यन इन्वेजन थेरी नाकारायला सुरवात केली आणि सगळे खापर ब्रिटिशांच्या डोक्यावर फोडायला सुरवात केली , जणू काही आर्यनवादी पूर्वज ब्रिटिशांच्या बोळ्याने दूध पीत होते
ह्यामुळे बहुजनांना कळेनासे झाले कि खरोखरीच झालेली ही उपरती आहे कि एका नव्या कारस्थानाची सुरवात आहे ? जेव्हा जेव्हा ह्या देशात ब्राम्हण्य पलटी मारते तेव्हा तेव्हा ह्या देशात सत्तापरिवर्तन घडून सत्ता ब्राम्हण्याच्या ताब्यात जाते हा इतिहास आहे एकीकडे ब्राम्हण्याने ग्रासलेले ब्राम्हण व दुसरीकडे परिवर्तनवादी ब्राम्हण ह्यांच्यातली धुमश्चक्री ह्या काळात वाढत गेली १८८० पासून परिवर्तनवादी चळवळ जिवंत ठेवणारे ब्राम्हण अचानक ब्राम्हन्य जोपासणाऱ्या कट्टर ब्राम्हणांच्यापुढें फिके पडायला लागले आणि इथूनच कम्युनिस्ट चळवळीचा अस्त व्हायला सुरवात झाली आर्यन वांशिकतेने पुन्हा एकदा जोर पकडायला इथूनच सुरवात झाली एकीकडे आयडियॉलॉजीच्या नावाने फाटाफूट कवटाळणारे पुरोगामी ब्राम्हण आणि दुसरीकडे आर्यत्वाच्या नावाने संघटित होत चाललेले ब्राम्हण्य पाळणारे नवं ब्राम्हण ह्यांच्यात नेहरूकाळात नेहमी विजयी होणारे पुरोगामी ब्राम्हण हळूहळू पराभूत झाले आणि कट्टर सनातन धर्माला पुन्हा एकदा सुगीचे दिवस प्राप्त झाले अशावेळी पुरोगामी ब्राम्हणेतरांनी ह्या पुरोगामी ब्राम्हणांच्यामागे उभे रहायला हवे होते पण फुले आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या अनेकांनी उलट ब्राम्हण पराभूत होतायत ते छान घडतंय असं म्हणून मौन पाळायला सुरवात केली परिणामी परिवर्तनवादाची पीछेहाट सुरु आणि सनातन आर्य धर्माची आगेकूच सुरु !
आऊट ऑफ इंडिया थेरी आर्यन इन्वेजन थेरीला काउंटर म्हणून जन्मली आणि ब्राम्हणांचा हा अबाउट टर्न होता हे तर स्पष्टच आहे कि आर्यन इन्वेजन थेरीमुळे ब्राम्हण एकटे पडले प्रश्न असा आहे कि ह्या एकटे पडण्यावर मात करण्यासाठी आऊट ऑफ इंडिया थेरी जन्माला आली कि जागतिकीकरणाची चाहूल लागलेल्या ब्राम्हण समाजाला आउट ऑफ इंडिया जाऊन जग काबीज करण्याची जी नवीन स्वप्ने पडायला लागली त्याला ऐतिहासिक व पारंपरिक पार्श्वभूमी देण्यासाठी आऊट ऑफ इंडिया थेरीचे हे बॅकग्राउंड म्युझिक तयार करण्यात आले ? हा पश्चाताप होता कि नवीन पराक्रमाची सिद्धता ? आता ब्राम्हणांना नवे जग जिंकण्यासाठी हे आवश्यक वाटायला लागले म्हणून हे नवीन रचित जन्माला आले कि काय ?
ह्याही पुढे जाऊन प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे ब्राम्हणांना प्रत्येक नवीन तडजोडीसाठी एका नवीन थेरीची गरज का वाटते ? वर्णव्यवस्थेलाही सैद्धांतिक आधार देऊ पाहणारे कर्मठ ब्राम्हण , मुस्लिम राजांशी तडजोड व्हावी म्हणून हिंदू धर्माचं मिथक रचणारे वाढवत न्हेणारे ब्राम्हण , ब्रिटिशांशी मैत्री करण्यासाठी स्वतःला त्यांचे आर्यबंधु म्हणवून घेणारे ब्राम्हण ! प्रत्येक वेळी ब्राम्हणांना नवीन थेरी रचावीशी वाटली आहे ह्याचे कारण काय ?
आणि आता जागतिकीकरणात स्थलांतरासाठी आणि इंग्लंड अमेरिकेत सेटल होण्यासाठी रचण्यात आलेली ही आऊट ऑफ आफ्रिका थेरी ! ही थेरी काय सांगते तर आर्य पर्यायाने ब्राम्हण मूळचे भारतीयच पण त्यांनी भारताबाहेर जाऊन अनेक साम्राज्ये रचली एकदा ही थेरी स्वीकारली कि भारताबाहेर सेटल होऊन आपली नवी साम्राज्ये रचायला ब्राम्हण मोकळे
एका बाजूला हे असे थेरी रचणे तर दुसऱ्या बाजूला एक हाकाटी नेहमी चालू असते कि ब्राम्हण एकटे पडलेत आणि ब्राम्हणेतर ब्राम्हणांना टार्गेट करतायत पण ब्राम्हण प्रश्न विचारायला किंवा आत्मपरीक्षण करायला तयार नाहीत कि ही परिस्थिती उदभवली कशी ?
टार्गेट करायला सुरवात केली कोणी ? तुम्हीच ठरवून एकेक वर्ण टार्गेट केला परशुराम सिद्धांत मांडून क्षत्रियांशीपंगा घेतला व क्षत्रियांना ज्यात शिवाजी शाहू येतात शूद्र म्हणून हा पंगा वाढवला पुढे समुद्रपर्यटनबंदी करून वैश्यांना शेती करायला भाग पडले आणि हलकटपणाने नंतर कलियुगात वैश्य उरले नाहीत अशी हाकाटी पिटली त्यामुळे ब्राम्हणांचे वैश्यांशीही संबंध तुटले पुढे वैश्यांनाही ब्राम्हणांनि शूद्र म्हणायला सुरवात करून वैश्यांशी पंगा वाढवला शूद्र आणि अतिशूद्र ह्यांना ब्राम्हण कधी किंमत देतच न्हवते आणि शेवटचा बॉण्ड जो आदिवासी जमातीशी उरला होता तो आर्य सिद्धांतच्या प्रभावाखाली येऊन तुम्ही ब्रिटिशांच्याप्रमाणे जमीनदार होऊन आदिवासींच्या जमिनी आणि जंगलं ताब्यात घेऊन तोडला ब्रिटिशांनी जमातींच्यावर अनेक अत्याचार केल्याने आणि ब्राम्हणांनी त्यांना त्यात साथ दिल्याने ब्राम्हण आर्यांचे जमातीशी असलेले नाते तुटले आणि ह्या देशाशी असलेल्या संबंधाची शेवटची कडी निखळली
हे सर्व घडत असतांना किती ब्राम्हणांनी ह्याचा प्रतिकार केला ? क्रिया कृती करायची फायदे लाटायचे आणि मग प्रतिक्रिया अंगावर आली कि आम्हाला टार्गेट केलं जातंय म्हणून हाहाकार करायचा ह्याला काय अर्थ आहे ? कधीतरी आत्मपरीक्षण करणार आहात कि नाही ?
आज हिंदुत्व काय करत आहे ? ब्रिटिशांचे वैश्य शूद्र आदिवासी ह्यांच्याबाबत जे धोरण होते तेच धोरण आज हिंदुत्व राबवत आहे ब्रिटिशांचे वैश्य शूद्रांच्याबाबतीत कररूपाने व आदिवासींच्याबाबतीत गुलाम बनवून वा हाकलून देऊन जितके लुटता येईल तितके लुटा असेच धोरण होते व आज तेच चालू आहे मला शंका आहे ब्रिटिशांच्या काळात असलेली ब्राम्हण क्षत्रिय व अस्पृश्य एकीकडे व वैश्य शूद्र आणि आदिवासी दुसरीकडे अशी जी अदृश्य फाळणी होती तशीच एखादी फाळणी पुन्हा हिंदुत्व परत आणणार काय ?मुख्य म्हणजे हिंदुत्ववाद्यांना जमातीविषयी वाटणारा आदर पूर्णच संपला आहे का ?
स्वकियांशीच पंगा घेऊन त्यांना हींन लेखून ब्राम्हण नेमके काय साधत होते आणि हिंदुत्व नेमके काय साधत आहे ? हा अहंकार कि मूर्खपणा ? ब्राम्हणांनी अजूनही ह्या गोष्टीची नीट मीमांसा केलेली नाही तुम्ही क्रिया केली तर त्याला प्रतिक्रिया येणारच उलट ब्राम्हणेतर लोक खूप सहनशील आणि सोशिक म्हणायला हवेत कि शतकानुशतकं शूद्र म्हणून हिनवूनही त्यांनी तुमचा आदर करायचा सोडला नाही आणि आजही तुमची अवस्था अशी आहे कि आर्य म्हणवून घेणे तुम्हाला भूषणास्पद वाटते जोपर्यंत तुम्ही इतरांना समान समजणार नाही तोवर हे एकटे पडत जाणे अटळ आहे हा एकटेपणा तुम्ही निर्माण केला आहे तुम्हीच एव्हरेस्टवर जाऊन बसलाय आणि आता एकटे आहात म्हणून ढिंढोरा पिटताय आधी ह्या आर्यत्वाच्या एव्हरेस्टवरून उतरा कारण ह्या देशात तुमच्याशिवाय समता अशक्य आहे आधुनिक मूल्ये ह्या देशाला देण्यासाठी तुमच्याइतके पात्र कोणी नाही आधुनिक मूल्ये द्या व पाळा ह्यात केवळ तुमचेच भले नाही सगळ्यांचेच भले आहे
आज हिंदुत्व ज्या आकांताने आर्यांच्याबाबत आऊट ऑफ इंडिया थेरी चा पुरस्कार करतंय त्यात संशोधन कमी आणि राजकीय अजेंडाच जास्त आहे म्हणजेच कुंटेंचा आर्यन इन्वेजन थेरी हा जसा तत्कालीन राजकीय अजेंडा होता तसाच हाही ! पहिला अजेंडा बाहेरून आत म्हणून श्रेष्ठ अश्या डिरेक्शनचा तर आत्ताचा आतून बाहेर म्हणून श्रेष्ठ अशा डिरेक्शनचा दोन्हीत एक फण्डा कायम तो म्हणजे आर्य श्रेष्ठत्व ! ह्या आर्यश्रेष्ठत्वालाच दिलेले नवं नाव हिंदुत्व ! जर हिंदू हा फण्डा असेल तर आर्य बाहेरून आले कि आतून ह्याने काय फरक पडणार आहे ? येऊ देत कि कुठूनही किंवा असू देत कि कुठलेही ! मूळ मुद्दा वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्थेचा त्याग करणार आहेत का हा आहे . कुंटे त्यांचा त्याग करत नाहीत गुरुजी त्यांचा त्याग करत नाहीत म्हणून मतभेद आहेत उद्या जर का कोणी गांधीवादी १९३९ पूर्वीचा गांधीविचार प्रमाण मानून वर्णजातिव्यवस्थेचे समर्थन करायला लागला तर त्याच्याशीही आम्ही आमचे मतभेद व्यक्त करणारच सुदैवाने गांधीवादी असे करत नाही पण संघाच्याबाबतीत असे होत नाहीये म्हणून टीका आहे हिंदुत्व म्हणजे वर्णजातिव्यवस्था पुन्हा आणणे असा विचार करणाऱ्यांना जोपर्यंत तुम्ही हाकलून देत नाही तोपर्यंत तुमच्याबद्दल संशय राहणारच
चुका सर्वांच्या हातातून होत असतात युरोपियन लोकांच्याकडूनही झाल्या पण त्यांचा कल चुका दुरुस्त करण्याकडे होता व आहे म्हणून ते पुन्हा पुन्हा उत्क्रांत होतायत निगमिक आर्य धर्मातील ( वैदिक ब्राम्हणी वैष्णव हिंदू )लोकांनीही झालेल्या चुका दुरुस्त केल्या तर ते सर्वांनाच हवे आहे जे झाले ते गंगेला व हिंदी महासागराला मिळाले पुन्हा नवी सुरवात कायमच शक्य असते
टिळकांच्याकडून ज्या काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्यातील एक म्हणजे चुका दुरुस्त करणे काही चुका दुर्देवाने त्यांना दिसल्याच नाहीत पण ज्या दिसल्या त्या त्यांनी दुरुस्त केल्या ह्यावर अधिक सविस्तर लिहीनच
टिळकांची आर्यन थेरी चूक होती का ? त्यातला आर्यश्रेष्ठत्वाचा गंड चुकीचा आहे मात्र त्यातील जो शास्त्रीय भाग आहे तो मात्र आजही पूर्ण चुकलाय असे वाटत नाही एक काळ असा होता कि (१९३० ते २००५) टिळक पूर्णच चुकलेत असं वाटायचं पण आर्यांच्या मूळस्थानापैकी एक म्हणून आर्टीकचा विचार करणे नव्याने गरजेचे झाले आहे आर्यांचे मुळस्थान म्हणून स्टेपचा क्लेम हा आता एक बऱ्यापैकी स्ट्रॉंग क्लेम आहे पण आपण त्याही मागे जाऊन स्टेपमध्ये आर्य कुठून आले असा प्रश्न विचारला तर कदाचित आर्टीक हे उत्तर मिळू शकते आणि उद्या जर असे काही पुरावे मिळाले तर टिळक द्रष्टे ठरतील
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ६९ श्रीधर तिळवे नाईक
टिळक आणि गोखले
टिळकांनी तुरुंगात असतांना रचलेल्या आर्टिक होम इन वेदाज चा सविस्तर आढावा आपण घेतला स्वतःच्या आर्यत्वाचा शोध ह्या निमित्ताने घेतल्यावर टिळकांची नवी मोहीम होती प्रत्यक्ष आर्यांचे संघटन ! सुदैवाने ह्या ग्रंथलेखनानंतर टिळकांची तुरुंगातून सुटका झाली आणि एक विपरीत घडले ज्या द्रविडांच्याबाबत टिळक उदासीन होते त्यांच्याच प्रदेशात तुरुंगानंतरची टिळकांची मोहीम सुरु झाली केसरीची जबाबदारी ते टाळत होते कारण सरकार केसरीवर टिळक संपादक म्हणून कधी येतात ह्याची वाटच पहात होतं दुसऱ्या तुरुंगवासानंतर टिळक राष्ट्रनायक झाले होते कारण देशासाठी दोनदा अहिंसक मार्गाने तुरुंगात जाणारे ते काँग्रेसचे पहिलेच लीडर होते त्यांच्यामुळे इतर पुढाऱ्यांना आता धैर्य प्राप्त झाले होते जनतेच्या मनातही टिळकांच्या बद्दल प्रेम निर्माण झाल्याने टिळक जिथे जिथे जात तिथे जनता त्यांना पाहायला गर्दी करत होती त्यांची रेल्वे ज्या ज्या स्टेशनवर थांबे त्यात्या स्टेशनवर लोक त्यांना पाहायला व हारतुरे घालायला गर्दी करत काँग्रेसला टिळकांच्या ह्या लोकप्रियतेचं काय करायचं तेच कळत न्हवतं एकीकडे काँग्रेसला टिळकांचा हिंदुत्ववादी कल स्वीकारणे अवजड वाटत होता तर दुसरीकडे त्यांची लोकप्रियता काँग्रेस जिथे आत्तापर्यंत पोहचली न्हवती तिथपर्यंत काँग्रेसला घेऊन जात होती काँग्रेसला ग्रासरूट लेव्हल देणारा नेता हिंदुत्ववादी असावा हा इतिहासातला सर्वात मोठा विरोधाभास होता टिळक जर अधिक जगते तर आणि गांधी न उगवते तर काँग्रेसचेच रूपांतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झाले असते असे खात्रीपूर्वक आता सांगता येते इतकी ह्या काळातील टिळकांची लोकप्रियता होती टिळकांच्या प्रभावाखाली ह्या काळातील पहिल्या फळीत अरविंद घोष , लाला लजपत राय , बिपीनचंद्र पाल आणि पुढे दुसऱ्या फळीत स्वातंत्र्यवीर सावरकर व प्रबोधनकार ठाकरे असे अनेक नेते हिंदुत्ववादी नेते झाले ज्यांचा प्रभाव नंतरच्या काळावर पडला शिवाय ऍनी बेझन्ट ह्या हिंदुत्ववादी नेत्या म्हणून पुढे टिळकांना जॉईन झाल्या टिळक काय करतायत ह्याचा नेमका अंदाज फक्त महात्मा फुले ह्यांना आला होता दुर्देवाने त्यांचे व सावित्रीबाईंचे व पुढे यशवंतराव फुले ह्यांचेही निधन झाल्याने व आगरकर व पुढे रानडेही गेल्याने टिळकांना विरोधकच उरले नाहीत ह्या काळात फक्त एक गोपाळ कृष्ण गोखलेच होते जे टिळकांना विरोध करत होते
मराठ्याला मारायला मराठाच हवा ही गुजराती पॉलिसी राजकारणात सुरु केली ती फिरोजशहा मेहता ह्यांनी ! टिळकांना हरवायचे असेल तर गोखलेच हवेत ही धारणा त्यातून जन्मली टिळक तुरुंगात असतांना नामदार असलेल्या गोखल्यांनी काँग्रेस आपल्या प्रभावाखाली आणायला सुरवात केली ते टिळकांच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान होते आणि त्यांनी प्रथम आगरकर व आगरकरांच्या निधनांनंतर रानडे वैग्रे उदारमतवादी लोकांचे शिष्यत्व पत्करले होते जावडेकर म्हणतात तसे (पान २५५) त्यांची प्रज्ञा अलौकीक न्हवती पण श्रद्धा अलौकीक होती राष्ट्रासाठी स्वार्थत्यागी जीवन व लोकसेवाव्रत ह्यांची नितांत आवश्यकता आहे हे ओळखून त्यांनी भारत सेवक समाज स्थापन केला प्रागतिक राजकारण म्हणजे रावबहादूर रावसाहेब लोकांचा पांजरपोळ न्हवे किंवा धनिकांचा हितरक्षक संघही न्हवे वा क्रांतीचा रक्तपातही न्हवे ही त्यांची श्रद्धा होती क्रमविकासी चिकाटीने व नित्यसेवेच्या स्वार्थत्यागी मार्गाचे अनुसरण करणाऱ्या देशभक्त लोकांचा संप्रदाय म्हणजे भारत सेवक समाज होय गोखल्यांच्या ह्या विचाराचा प्रभाव गांधींच्यावर पडला खरा पण गंमत म्हणजे जेव्हा गांधीजींना भारत सेवक समाजात प्रवेश हवा होता तेव्हा पुण्याच्या ब्राम्हणांनी गोखल्यांना गांधीजींना प्रवेश नाकारायला भाग पाडले आणि काँग्रेसला गांधीजींना काँग्रेसमध्ये प्रवेश द्यायला भाग पाडले ते लोकमान्य टिळकांनी ! हेच गांधीजी पुढे टिळकांनी जन्म दिलेल्या हिंदुत्ववादाला ठोस पर्याय देणार होते आणि त्यांचे गुरु म्हणून नाव निनादणार होते गोखल्यांचे !
काँग्रेसचे इंग्लंडमधील राजकारण हे मुंबईतील पारशी व बंगाली बाबू चालवत होते ह्याला पहिला छेद दिला गेला चंदावरकर ह्या प्रार्थना समाजाच्या लीडरची निवड झाली तेव्हा ! ह्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीतच अधिक वेळ घालवणे पसंद केल्याने त्यांचा राजकारणाशी संबंधच राहिला नाही टिळक हे जहाल असल्याने त्यांना पाठवणे सोयीचे न्हवतेच साहजिकच गोखल्यानी पुन्हा एकदा मराठी माणसाचा नम्बर लावला . त्यांची पुण्याच्या डेक्कन सभेमार्फत निवड झाली त्यांनी भारतीय जनतेतर्फे वेल्बी कमिशनपुढे उत्तम प्रेझेन्टेशन दिले ज्याला टिळकांनीही दाद दिली हा गोखलेंचा राजकारणातील चंचुप्रवेश होता
काँग्रेस ह्या काळात लोकाभिमुख न्हवती सरकाराभिमुख होती आणि हिंदुत्ववादी टिळकांनी तिला लोकाभिमुख बनवण्याचे केलेले प्रयत्न तिला आतून अमान्य होते त्यामुळे टिळकांना तोंडदेखला पाठिंबा द्यायचा पण प्रत्यक्ष जहाल राजकारणापासून दूर रहायचे असे तिचे धोरण होते जे तत्कालीन तरुण तुर्कांना मान्य नसल्याने ते टिळकांच्या मागे जात होते अशावेळी सरकाराभिमुख राजकारणासाठी नव्या मराठी दमदार नेत्याची गरज काँग्रेसला वाटत होती जी गोखल्यांनी पुरवली गोखले अशा राजकारणासाठी सर्वस्वी लायक होते जहाल लोकाभिमुख यशवंतराव चव्हाण शरद पवारांच्यापेक्षा मवाळ सरकारभिमुख दिल्लीअभिमुख शंकरराव चव्हाण सुशीलकुमार शिंदे व प्रतिभा पाटील हे दरबारी राजकारणी बरे तसे हे होते लोकाभिमुख केंद्रवर्ती सत्ता व संघटना फक्त ब्रिटिशांनी चालवायची व इतर काँग्रेससारख्या संघटनांनी फक्त दरबारी राजकारण करायचे ही ह्या काळातील काँग्रेसची पॉलिसी होती जी व्हाया महात्मा गांधी पुढे स्वातंत्र्यानंतर लोकाभिमुख केंद्रवर्ती नेतृत्व फक्त नेहरू , इंदिरा गांधी ,राजीव गांधी , सोनिया गांधी , नरसिंहराव , राहुल गांधी , नरेंद्र मोदी , अमित शहा ह्यांचे व इतरांनी फक्त ह्या केंद्रीय नेतृत्वाला मुजरा करत दरबारी राजकारण करायचे अशी डेवलप होत गेली. जो हिला आव्हान देईल त्याचा सुभाषचंद्र बोस , शरद पवार , यशवंतराव चव्हाण , ममता बॅनर्जी , देवेंद्र फडणवीस करू अशी धमकी व व्यवस्था ! ह्या पॉलिसीला तहहयात पुरून उरलेला एकमेव नेता म्हणजे आमच्या गोव्याचा मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर ! इंदिराजींनी वेळ पाळली नाही तर पुढची फ्लाईट पकडून गोव्यात येणारा (पुढे इंदिराजीनी स्वतःच त्यांना सॉरीचा फोन करून त्यांना भेटायला बोलवलं )आणि पैसे अडवले तर आम्हांला तुमच्या पैश्याची गरज नाही असे ठणकावून तहहयात मुख्यमंत्री राहिलेला !
रानडे मेथा दादाभाई नौरजी ह्या केंद्रीय नेतृत्वाला गोखले आव्हान देणारे न्हवते तर त्यांना फॉलो करणारे होते तेही ब्रिटिश राजवटीला ह्या काळात परमेश्वरी प्रसादच समजत होते साहजिकच टिळकांच्या तुरुंगात जाण्याने उदारमतवादाची गोखल्यांच्या मदतीने सरशीच झाली पण हे समाधान फार काळ टिकले नाही कारण १८९९ साली वेल्बी कमिशननंतर एक औरंगजेबाचा भाऊ शोभेल असा व्हॉईसरॉय अवतरला ज्याचे नाव लॉर्ड कर्झन होते त्याला औरंगजेब म्हंटल्याबद्दल टिळकांच्यावर नाराज होणाऱ्या गोखलेंना स्वतःच १९०५ च्या काँग्रेसच्या अधिवेशनात कर्झनला औरंगझेब म्हणावं लागलं आणि हा टिळकांचा विजय होता
श्रीधर तिळवे नाईक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा