आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ६८ ते ८२ श्रीधर तिळवे नाईक

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ६८ ते ८२

श्रीधर तिळवे नाईक 

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ६८ श्रीधर तिळवे नाईक 
टिळक आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान : भरतवाक्य  २१ आर्य म्हणजे काय , आर्य सिद्धांत शाप कि वरदान व आर्य सिद्धांतामुळे ब्राम्हण एकटे पडलेत काय  ?

प्रत्येक शोषक राज्यकर्त्याला शोषितांनी आपल्या शोषणाविरुद्ध बंड करू नये म्हणून प्रचंड प्रयत्न करायला लागतात आणि त्यासाठी शोषितांना मी तुमच्याच कुळीचा आहे हे पटवण्यासाठी काही वैचारिक क्लुप्त्या रचाव्या लागतात . इंग्रज ह्याला अपवाद न्हवते युरोपियन लोकांच्या सुदैवाने ह्याच वेळी इंडोयुरोपियन भाषेचा सिद्धांत जन्माला आला आणि ह्या भाषा बोलणारे एकाच कुळीचे असावेत असा विचारही उदयाला आला ह्या कुळीला सर्वांनी आर्य असे म्हंटले मात्र ही एकच वंशीय होती कि अनेक वंशीय होती हे गुलदस्त्यातच राहिले भारतात मात्र ती एक वंशीय असल्याचा अट्टाहास ब्राम्हणांनी व ब्राम्हण इतिहासकारांनी धरला आणि त्यातूनच आर्य वंशाची कल्पना जन्माला आली हे आर्य म्हणजे फार प्रागतिक दिसायला देखणे घोड्यावर बसणारे द्रविड बायका ज्यांच्यासाठी जीव टाकतात असे होते असे वर्णन प्रसूत करण्यात आले परिणामी १९५० नंतरचे सगळे बॉलिवूड हिरो पंजाबी झाले जे ह्या तथाकथित हीरॊत्वाचे आर्य प्रतिनिधी होते ह्या आर्य हिरोंच्यावर भाळणारी द्रविड नाग हिरॉईन म्हणून मराठी बंगाली व दाक्षिणात्य अशा हिरॉईन्स जाणीवपूर्वक आणल्या गेल्या स्वतःच आर्यत्व दृढ करण्याची आणि जनमानसात प्रचलित करण्याची ही कारस्थानगिरी होती महाराष्ट्रापर्यंतच्या भंपक बहुजनांनी ही ग्रँड थेरी उचलून धरली दाक्षिणात्य बहुजनाने मात्र उलटापालटी केली आजही एकता कपूरच्या सीरियलमध्ये हा आर्य हिरो हंक सारखा सादर केला जातो आणि राक्षस मात्र काळाच असतो हिरॉईन अनेकदा साक्षी तन्वरसारखी नाग द्रविड असते

आमच्या पिढीने हे आर्यत्व प्रथम नाकारले आणि राजनीकांतपासून मिथुन चक्रवर्तीपर्यंत अनेक सावळे हिरो स्वीकारले मात्र दोन प्रश्नांनी  पाठलाग सोडला नाही आर्य म्हणजे काय ? आणि  आर्यत्वाचे हे सेटिंग स्वीकारण्याइतके बहुजन इतके मूर्ख खरोखरच होते का ?

आर्य हा शब्द मागील लेखात म्हंटल्याप्रमाणे एकदाही वंश म्हणून येत नाही तो सभ्य म्हणून येतो आर्य धर्माने संस्कारित म्हणून येतो मग हा आर्य धर्म एक आहे का ? तर नाही खुद्द अवेस्तनही स्वतःला आर्यच म्हणवून घेतात खुद्द बुद्ध स्वतःला आर्य म्हणवून घेतो आर्य हे संबोधन वापरतो ह्याचा अर्थ स्पष्ट आहे आर्य हा एक धर्म नसून तो अनेक धर्मांचा समूह आहे हे आर्य धर्म कुठले ?

सर्वसाधारणपणे आर्यांच्यात १ सूर आणि २ असुर असे दोन प्रकार आढळतात ह्यातील अनेक सूर असुरांनी शैव धर्म स्वीकारलेले आहेत पण बहुसंख्य अजूनही आर्य धर्मातच वावरत असतात हे आर्य धर्म प्रामुख्याने दोन प्रकारचे आहेत 
१ सूर धर्म 
२ असुर धर्म 

सूर धर्मांच्यात 
१ वैदिक २ ब्राम्हणी ३ वैष्णव आणि ४ हिंदू असे चार धर्म  येतात 
असुर धर्मांच्यात 
१ झोरोस्ट्रियन (पारशी ) २ जैन ३ बौद्ध असे तीन धर्म येतात 

हे सर्व सात धर्म आर्य धर्म आहेत आणि ह्या धर्माचे पालन करणारे स्वतःला आर्य म्हणवतात ह्यातील झोरोस्ट्रियन धर्मातूनच ज्यांना आज ज्युडायिक धर्म म्हणतात ते निघाले आहेत त्यामुळे ज्युडायिक धर्मांनाही जर कुणी आर्य धर्म मानले तर हे धर्म दहा होतील तूर्तास आपण सात धर्मच पकडू कारण ज्यू धर्मियांची श्रद्धा अशी आहे कि मोझेस हा झरथ्रूष्टच्या आधीचा आहे ह्याबाबत अजूनही स्पष्ट चित्र आलेले नाही म्हणून म्हणालो कि तूर्तास सात धर्म हे आर्य धर्म आहेत हे पकडून चालू !

आर्य म्हणजे मग नेमके काय ? तर आर्य धर्मांना अनुसरतात ते सर्व आर्य होत वैदिक ब्राम्हणी व झोरोष्ट्रियन धर्मात मोक्ष ही संकल्पना नाही पुढे शैवांशी संपर्क आल्यावर आर्यानी मोक्ष स्वीकारला आणि त्यांची चार पुरुषार्थाची संकल्पना पुढे सिद्ध झाली जैन , बौद्ध , वैष्णव , हिंदू  हे चार आर्य धर्म मोक्ष स्वीकारतात 

ह्याउलट शैव धर्मांच्यात 
१ शिवपूर्व २ आदीशैव २ आगमशैव ३  नवशैव (प्रामुख्याने लिंगायत) ४  शीख  असे धर्म येतात 

सर्व आर्य व शैव धर्म भारतीय धर्म आहेत ह्याशिवाय भारतीय धर्मात अहमदिया वैग्रे धर्म येतात 

भारतीय संस्कृतीतील खरा वैचारिक संघर्ष हा आर्य विरुद्ध शैव असा आहे आणि तो नकुलीश बस्वेश्वरांच्यापासून
महात्मा फुलेंच्यापर्यंत अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडला आहे अनार्य हा शब्द मी जास्त वापरत नाही कारण तो आर्यत्वालाच केंद्रस्थानी ठेवतो ह्या दोन्हीत समतोल साधण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी होतो म्हणजे आर्य धर्मात बौद्ध , जैन , हिंदू हे तीन धर्म तर शैव धर्मात सांख्ययोग हे आगमशैव व शीख दोन्ही बाजूत समतोल ठेवण्याचा प्रयत्न करतात ह्या धर्मांना संस्थापक नाहीत असा फार मोठा अपप्रचार ब्राम्हणी धर्माचे लोक करत असतात प्रत्यक्षात भगवान शिवानी आदीशैव अंगिरसांनी वैदिक झरतृष्ट ह्यांनी झोरोस्ट्रयीन गौतम बुद्धाने बौद्ध महावीरांनी जैन व्यासांनी वैष्णव शंकराचार्यांनी हिंदू नकुलीशानी आगमशैव बसवेश्वरांनी नवशैव,  गुरु नानक ह्यांनी शीख असे धर्म स्थापन केलेत फक्त ब्राम्हणी धर्मच असा आहे ज्याची स्थापना झालेली नाही कारण तो पुरोहितांच्या कर्मकांडातून जन्मलेला आहे मात्र त्यांच्या पूर्वमीमांसेचा संस्थापक जेमिनी होता हे सर्वमान्य आहे ह्या दोन्ही धर्मात दोन्हीकडचे लोक आहेत आदीशैव धर्मात मुळात पार्वती हीच आर्य आहे गौतम बुद्धाचा शाक्य गण हा असुर असला तरी मूळचा शाक्त आहे पुढे कपिलच्या प्रभावामुळे हा गण सांख्य झाला आणि पुढे शाक्त आणि सांख्य ह्यांच्या संयुक्त उच्चारातून व प्रभावातून त्याला शाक्य असे बदलले गेले आहे त्याची आई तर उघड उघड शैव आहे  घुर्येंचे संशोधन प्रमाण मानून शोध घेतला तर साडेपाचशे ब्राम्हण जातींच्यापैकी तब्ब्ल साडेचारशे ब्राम्हण जाती ह्या एतद्देशीय मूळच्या शैव आहेत हीच गोष्ट स्वतःला आर्य म्हणवणाऱ्या क्षत्रिय वैश्यांची आहे ह्यातल्या ९० टक्के लोकांची कुलदैवते शैव आहेत 

एकदा आर्य म्हणजे नेमकं काय हे पाहिलं कि आर्य सिद्धांताकडे वळायला हरकत नाही आर्य नावाचा कोणताही वंश ह्या पृथ्वीखंडावर न्हवता तरीही काहीजणांना आर्य म्हणून काही लोकांना माज का हा एक प्रश्नच आहे व होता आणि त्याचा मागोवा घेण्याचे प्रयत्न १९५५ पासून पुन्हा नव्याने सुरु झाले नव्या लोकांनी विशेषतः पुण्ययोनीवाल्यांनी ह्या वादाचे  मूळ शोधायला सुरवात केली आणि मग ह्या लोकांनी कलोनियलिझम विरुद्ध देशीवाद पोस्टकलोनियलिझम असा बेगडी वाद निर्माण करून आर्यन इन्वेजन थेरी नाकारायला सुरवात केली आणि सगळे खापर ब्रिटिशांच्या डोक्यावर फोडायला सुरवात केली , जणू काही आर्यनवादी पूर्वज ब्रिटिशांच्या बोळ्याने  दूध पीत होते  

ह्यामुळे बहुजनांना कळेनासे झाले कि खरोखरीच झालेली ही उपरती आहे कि एका नव्या कारस्थानाची  सुरवात आहे ? जेव्हा जेव्हा ह्या देशात ब्राम्हण्य पलटी मारते तेव्हा तेव्हा ह्या देशात सत्तापरिवर्तन घडून सत्ता ब्राम्हण्याच्या ताब्यात जाते हा इतिहास आहे  एकीकडे ब्राम्हण्याने ग्रासलेले  ब्राम्हण व दुसरीकडे परिवर्तनवादी ब्राम्हण ह्यांच्यातली धुमश्चक्री ह्या काळात वाढत गेली १८८० पासून परिवर्तनवादी चळवळ जिवंत ठेवणारे ब्राम्हण अचानक ब्राम्हन्य जोपासणाऱ्या कट्टर ब्राम्हणांच्यापुढें फिके पडायला लागले आणि इथूनच कम्युनिस्ट चळवळीचा अस्त व्हायला सुरवात झाली आर्यन वांशिकतेने पुन्हा एकदा जोर पकडायला इथूनच सुरवात झाली एकीकडे आयडियॉलॉजीच्या नावाने फाटाफूट कवटाळणारे पुरोगामी ब्राम्हण आणि दुसरीकडे आर्यत्वाच्या नावाने संघटित होत चाललेले ब्राम्हण्य पाळणारे नवं ब्राम्हण ह्यांच्यात नेहरूकाळात नेहमी विजयी होणारे पुरोगामी ब्राम्हण हळूहळू पराभूत झाले आणि कट्टर सनातन धर्माला पुन्हा एकदा सुगीचे दिवस प्राप्त झाले अशावेळी पुरोगामी ब्राम्हणेतरांनी ह्या पुरोगामी ब्राम्हणांच्यामागे उभे रहायला हवे होते पण फुले आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या अनेकांनी उलट ब्राम्हण पराभूत होतायत ते छान घडतंय असं म्हणून मौन पाळायला सुरवात केली परिणामी परिवर्तनवादाची पीछेहाट सुरु आणि सनातन आर्य धर्माची आगेकूच सुरु !

आऊट ऑफ इंडिया थेरी आर्यन इन्वेजन थेरीला काउंटर म्हणून जन्मली आणि ब्राम्हणांचा हा अबाउट टर्न होता हे तर स्पष्टच आहे कि आर्यन इन्वेजन  थेरीमुळे ब्राम्हण एकटे पडले प्रश्न असा आहे कि  ह्या एकटे पडण्यावर मात करण्यासाठी आऊट ऑफ इंडिया थेरी जन्माला आली कि जागतिकीकरणाची चाहूल लागलेल्या ब्राम्हण समाजाला आउट ऑफ इंडिया जाऊन जग काबीज करण्याची जी नवीन स्वप्ने पडायला लागली त्याला  ऐतिहासिक व पारंपरिक पार्श्वभूमी देण्यासाठी  आऊट ऑफ इंडिया थेरीचे हे बॅकग्राउंड म्युझिक तयार करण्यात आले ? हा पश्चाताप होता कि नवीन पराक्रमाची सिद्धता ? आता ब्राम्हणांना नवे जग जिंकण्यासाठी हे आवश्यक वाटायला लागले म्हणून हे नवीन रचित जन्माला आले कि काय ?

ह्याही पुढे जाऊन  प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे ब्राम्हणांना प्रत्येक नवीन तडजोडीसाठी एका नवीन थेरीची गरज का वाटते ? वर्णव्यवस्थेलाही सैद्धांतिक आधार देऊ पाहणारे कर्मठ ब्राम्हण , मुस्लिम   राजांशी   तडजोड व्हावी म्हणून हिंदू धर्माचं मिथक रचणारे वाढवत न्हेणारे  ब्राम्हण , ब्रिटिशांशी मैत्री करण्यासाठी स्वतःला त्यांचे आर्यबंधु म्हणवून घेणारे ब्राम्हण ! प्रत्येक वेळी ब्राम्हणांना नवीन थेरी रचावीशी वाटली आहे ह्याचे कारण काय ?

आणि आता जागतिकीकरणात  स्थलांतरासाठी आणि इंग्लंड अमेरिकेत सेटल होण्यासाठी रचण्यात आलेली ही आऊट ऑफ आफ्रिका थेरी ! ही थेरी काय सांगते तर आर्य पर्यायाने ब्राम्हण  मूळचे भारतीयच पण त्यांनी भारताबाहेर जाऊन अनेक साम्राज्ये रचली एकदा ही थेरी स्वीकारली कि भारताबाहेर सेटल होऊन आपली नवी साम्राज्ये रचायला ब्राम्हण मोकळे 

 एका बाजूला हे  असे थेरी रचणे तर दुसऱ्या बाजूला एक हाकाटी नेहमी चालू असते कि ब्राम्हण एकटे पडलेत आणि  ब्राम्हणेतर ब्राम्हणांना टार्गेट करतायत पण ब्राम्हण प्रश्न विचारायला किंवा आत्मपरीक्षण करायला तयार नाहीत कि ही परिस्थिती उदभवली कशी ? 

टार्गेट करायला सुरवात केली कोणी ? तुम्हीच ठरवून एकेक वर्ण टार्गेट केला परशुराम सिद्धांत मांडून क्षत्रियांशीपंगा घेतला  क्षत्रियांना ज्यात शिवाजी शाहू येतात  शूद्र म्हणून हा पंगा वाढवला पुढे समुद्रपर्यटनबंदी करून वैश्यांना शेती करायला भाग पडले आणि हलकटपणाने नंतर कलियुगात वैश्य उरले नाहीत अशी हाकाटी पिटली  त्यामुळे ब्राम्हणांचे वैश्यांशीही संबंध तुटले पुढे वैश्यांनाही ब्राम्हणांनि शूद्र म्हणायला सुरवात करून वैश्यांशी पंगा वाढवला शूद्र आणि अतिशूद्र ह्यांना ब्राम्हण कधी किंमत देतच न्हवते आणि  शेवटचा बॉण्ड जो आदिवासी जमातीशी उरला होता तो  आर्य सिद्धांतच्या प्रभावाखाली येऊन तुम्ही ब्रिटिशांच्याप्रमाणे जमीनदार होऊन आदिवासींच्या  जमिनी आणि जंगलं ताब्यात घेऊन तोडला ब्रिटिशांनी जमातींच्यावर अनेक अत्याचार केल्याने आणि ब्राम्हणांनी त्यांना त्यात साथ दिल्याने ब्राम्हण आर्यांचे जमातीशी असलेले नाते तुटले आणि ह्या देशाशी असलेल्या संबंधाची शेवटची कडी निखळली 

हे सर्व घडत असतांना किती ब्राम्हणांनी ह्याचा प्रतिकार केला ? क्रिया कृती करायची फायदे लाटायचे आणि मग प्रतिक्रिया अंगावर आली कि आम्हाला टार्गेट केलं जातंय म्हणून हाहाकार करायचा ह्याला काय अर्थ आहे ? कधीतरी आत्मपरीक्षण करणार आहात कि नाही ?

आज हिंदुत्व काय करत आहे ? ब्रिटिशांचे  वैश्य शूद्र आदिवासी  ह्यांच्याबाबत जे धोरण होते तेच धोरण आज हिंदुत्व राबवत आहे  ब्रिटिशांचे वैश्य शूद्रांच्याबाबतीत कररूपाने  आदिवासींच्याबाबतीत गुलाम बनवून वा हाकलून देऊन जितके लुटता येईल तितके लुटा असेच धोरण होते  आज तेच चालू आहे मला शंका आहे ब्रिटिशांच्या काळात असलेली ब्राम्हण क्षत्रिय  अस्पृश्य एकीकडे  वैश्य शूद्र आणि आदिवासी दुसरीकडे अशी जी अदृश्य फाळणी होती तशीच एखादी फाळणी  पुन्हा हिंदुत्व परत आणणार काय ?मुख्य म्हणजे हिंदुत्ववाद्यांना जमातीविषयी वाटणारा आदर पूर्णच संपला आहे का ?

स्वकियांशीच पंगा घेऊन त्यांना हींन  लेखून ब्राम्हण नेमके काय साधत होते आणि हिंदुत्व नेमके काय साधत आहे ? हा  अहंकार  कि मूर्खपणा ? ब्राम्हणांनी अजूनही ह्या गोष्टीची नीट मीमांसा केलेली नाही तुम्ही क्रिया केली  तर त्याला प्रतिक्रिया येणारच उलट ब्राम्हणेतर लोक खूप सहनशील आणि सोशिक म्हणायला हवेत कि शतकानुशतकं शूद्र म्हणून हिनवूनही त्यांनी तुमचा आदर करायचा सोडला नाही  आणि आजही तुमची अवस्था अशी आहे कि आर्य म्हणवून घेणे तुम्हाला भूषणास्पद वाटते जोपर्यंत तुम्ही इतरांना समान समजणार नाही तोवर हे एकटे पडत जाणे अटळ आहे हा एकटेपणा तुम्ही निर्माण केला आहे तुम्हीच एव्हरेस्टवर जाऊन बसलाय आणि आता एकटे आहात म्हणून ढिंढोरा पिटताय आधी ह्या आर्यत्वाच्या एव्हरेस्टवरून उतरा कारण ह्या देशात तुमच्याशिवाय समता अशक्य आहे आधुनिक मूल्ये ह्या देशाला देण्यासाठी तुमच्याइतके पात्र कोणी नाही आधुनिक मूल्ये द्या व पाळा ह्यात केवळ तुमचेच भले नाही सगळ्यांचेच भले आहे 

आज हिंदुत्व ज्या आकांताने आर्यांच्याबाबत आऊट ऑफ इंडिया थेरी चा पुरस्कार करतंय त्यात संशोधन कमी आणि राजकीय अजेंडाच जास्त आहे म्हणजेच कुंटेंचा आर्यन इन्वेजन थेरी हा जसा तत्कालीन राजकीय अजेंडा होता तसाच हाही ! पहिला अजेंडा बाहेरून आत म्हणून श्रेष्ठ अश्या डिरेक्शनचा तर आत्ताचा आतून बाहेर म्हणून श्रेष्ठ अशा डिरेक्शनचा दोन्हीत एक फण्डा कायम तो म्हणजे आर्य श्रेष्ठत्व ! ह्या आर्यश्रेष्ठत्वालाच दिलेले नवं नाव हिंदुत्व ! जर हिंदू हा फण्डा असेल तर आर्य बाहेरून आले कि आतून ह्याने काय फरक पडणार आहे ? येऊ देत कि कुठूनही किंवा असू देत कि कुठलेही ! मूळ मुद्दा वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्थेचा त्याग करणार आहेत का हा आहे . कुंटे त्यांचा त्याग करत नाहीत गुरुजी त्यांचा त्याग करत नाहीत म्हणून मतभेद आहेत उद्या जर का कोणी गांधीवादी १९३९ पूर्वीचा गांधीविचार  प्रमाण मानून वर्णजातिव्यवस्थेचे समर्थन करायला लागला तर त्याच्याशीही आम्ही आमचे मतभेद व्यक्त करणारच सुदैवाने गांधीवादी असे करत नाही पण संघाच्याबाबतीत असे होत नाहीये म्हणून टीका आहे हिंदुत्व म्हणजे वर्णजातिव्यवस्था पुन्हा आणणे असा विचार करणाऱ्यांना जोपर्यंत तुम्ही हाकलून देत नाही तोपर्यंत तुमच्याबद्दल संशय राहणारच

चुका सर्वांच्या हातातून होत असतात युरोपियन लोकांच्याकडूनही झाल्या पण त्यांचा कल चुका दुरुस्त करण्याकडे होता व आहे म्हणून ते पुन्हा पुन्हा उत्क्रांत होतायत निगमिक आर्य धर्मातील ( वैदिक ब्राम्हणी वैष्णव हिंदू )लोकांनीही झालेल्या चुका दुरुस्त केल्या तर ते सर्वांनाच हवे आहे जे झाले ते गंगेला हिंदी महासागराला मिळाले पुन्हा नवी सुरवात कायमच शक्य असते

टिळकांच्याकडून ज्या  काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्यातील एक म्हणजे चुका दुरुस्त करणे काही चुका दुर्देवाने त्यांना दिसल्याच नाहीत पण ज्या दिसल्या त्या त्यांनी दुरुस्त केल्या ह्यावर अधिक सविस्तर लिहीनच

टिळकांची आर्यन थेरी चूक होती का ? त्यातला आर्यश्रेष्ठत्वाचा गंड चुकीचा आहे मात्र त्यातील जो शास्त्रीय भाग आहे तो मात्र आजही पूर्ण चुकलाय असे वाटत  नाही एक काळ असा होता कि (१९३० ते २००५) टिळक पूर्णच चुकलेत असं वाटायचं पण आर्यांच्या मूळस्थानापैकी एक म्हणून आर्टीकचा  विचार करणे नव्याने गरजेचे झाले आहे आर्यांचे मुळस्थान म्हणून स्टेपचा क्लेम हा आता एक बऱ्यापैकी स्ट्रॉंग क्लेम आहे पण आपण त्याही मागे जाऊन स्टेपमध्ये  आर्य कुठून आले असा प्रश्न विचारला तर कदाचित आर्टीक हे उत्तर मिळू शकते आणि उद्या जर असे काही पुरावे मिळाले तर टिळक द्रष्टे ठरतील

श्रीधर तिळवे नाईक


आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ६९  श्रीधर तिळवे नाईक टिळक आणि गोखले 

टिळकांनी तुरुंगात असतांना रचलेल्या आर्टिक होम इन वेदाज चा सविस्तर आढावा आपण घेतला स्वतःच्या आर्यत्वाचा शोध ह्या निमित्ताने घेतल्यावर टिळकांची नवी मोहीम होती प्रत्यक्ष आर्यांचे संघटन ! सुदैवाने  ह्या ग्रंथलेखनानंतर टिळकांची तुरुंगातून सुटका झाली आणि एक विपरीत घडले ज्या द्रविडांच्याबाबत टिळक उदासीन होते त्यांच्याच प्रदेशात तुरुंगानंतरची टिळकांची मोहीम सुरु झाली केसरीची जबाबदारी ते टाळत होते कारण सरकार केसरीवर टिळक संपादक म्हणून कधी येतात ह्याची वाटच पहात होतं दुसऱ्या तुरुंगवासानंतर टिळक राष्ट्रनायक झाले होते कारण देशासाठी दोनदा अहिंसक मार्गाने तुरुंगात जाणारे ते काँग्रेसचे पहिलेच लीडर होते त्यांच्यामुळे इतर पुढाऱ्यांना आता धैर्य प्राप्त झाले होते जनतेच्या मनातही टिळकांच्या बद्दल प्रेम निर्माण झाल्याने टिळक जिथे जिथे जात तिथे जनता त्यांना पाहायला गर्दी करत होती त्यांची रेल्वे ज्या ज्या स्टेशनवर थांबे त्यात्या स्टेशनवर लोक त्यांना पाहायला व हारतुरे घालायला गर्दी करत काँग्रेसला टिळकांच्या ह्या लोकप्रियतेचं काय करायचं तेच कळत न्हवतं एकीकडे काँग्रेसला टिळकांचा हिंदुत्ववादी कल स्वीकारणे अवजड वाटत होता तर दुसरीकडे त्यांची लोकप्रियता काँग्रेस जिथे आत्तापर्यंत पोहचली न्हवती तिथपर्यंत काँग्रेसला घेऊन जात होती काँग्रेसला ग्रासरूट लेव्हल देणारा नेता हिंदुत्ववादी असावा हा इतिहासातला सर्वात मोठा विरोधाभास होता टिळक जर अधिक जगते तर आणि गांधी न उगवते तर काँग्रेसचेच रूपांतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झाले असते असे खात्रीपूर्वक आता सांगता येते इतकी ह्या काळातील टिळकांची लोकप्रियता होती टिळकांच्या प्रभावाखाली ह्या काळातील पहिल्या फळीत अरविंद घोष , लाला लजपत राय , बिपीनचंद्र पाल आणि पुढे दुसऱ्या फळीत स्वातंत्र्यवीर सावरकर व प्रबोधनकार ठाकरे असे अनेक नेते हिंदुत्ववादी नेते झाले ज्यांचा प्रभाव नंतरच्या काळावर पडला शिवाय ऍनी बेझन्ट ह्या हिंदुत्ववादी नेत्या म्हणून पुढे टिळकांना जॉईन झाल्या टिळक काय करतायत ह्याचा नेमका अंदाज फक्त महात्मा फुले ह्यांना आला होता दुर्देवाने त्यांचे व सावित्रीबाईंचे व पुढे यशवंतराव फुले ह्यांचेही निधन झाल्याने व आगरकर व पुढे रानडेही गेल्याने टिळकांना विरोधकच उरले नाहीत ह्या काळात फक्त एक गोपाळ कृष्ण गोखलेच होते जे टिळकांना विरोध करत होते 

मराठ्याला मारायला मराठाच हवा ही गुजराती पॉलिसी राजकारणात सुरु केली ती फिरोजशहा मेहता ह्यांनी ! टिळकांना हरवायचे असेल तर गोखलेच हवेत ही धारणा त्यातून जन्मली टिळक तुरुंगात असतांना नामदार असलेल्या गोखल्यांनी काँग्रेस आपल्या प्रभावाखाली आणायला सुरवात केली ते टिळकांच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान होते आणि त्यांनी प्रथम आगरकर व आगरकरांच्या निधनांनंतर रानडे वैग्रे उदारमतवादी लोकांचे शिष्यत्व पत्करले होते जावडेकर म्हणतात तसे (पान २५५) त्यांची प्रज्ञा अलौकीक न्हवती पण श्रद्धा अलौकीक होती राष्ट्रासाठी स्वार्थत्यागी जीवन व लोकसेवाव्रत ह्यांची नितांत आवश्यकता आहे हे ओळखून त्यांनी भारत सेवक समाज स्थापन केला प्रागतिक राजकारण म्हणजे रावबहादूर रावसाहेब लोकांचा पांजरपोळ न्हवे किंवा धनिकांचा हितरक्षक संघही न्हवे वा क्रांतीचा रक्तपातही न्हवे ही त्यांची श्रद्धा होती क्रमविकासी चिकाटीने व नित्यसेवेच्या स्वार्थत्यागी मार्गाचे अनुसरण करणाऱ्या देशभक्त लोकांचा संप्रदाय म्हणजे भारत सेवक समाज होय गोखल्यांच्या ह्या विचाराचा प्रभाव गांधींच्यावर पडला खरा पण गंमत म्हणजे जेव्हा गांधीजींना भारत सेवक समाजात प्रवेश हवा होता तेव्हा पुण्याच्या ब्राम्हणांनी गोखल्यांना गांधीजींना प्रवेश नाकारायला भाग पाडले आणि  काँग्रेसला गांधीजींना काँग्रेसमध्ये प्रवेश द्यायला भाग पाडले ते लोकमान्य टिळकांनी ! हेच गांधीजी पुढे टिळकांनी जन्म दिलेल्या हिंदुत्ववादाला ठोस पर्याय देणार होते आणि त्यांचे गुरु म्हणून नाव निनादणार होते गोखल्यांचे !

काँग्रेसचे इंग्लंडमधील राजकारण हे मुंबईतील पारशी व बंगाली बाबू चालवत होते ह्याला पहिला छेद दिला गेला चंदावरकर ह्या प्रार्थना समाजाच्या लीडरची निवड झाली तेव्हा ! ह्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीतच अधिक वेळ घालवणे पसंद केल्याने त्यांचा राजकारणाशी संबंधच राहिला नाही टिळक हे जहाल असल्याने त्यांना पाठवणे सोयीचे न्हवतेच साहजिकच गोखल्यानी पुन्हा एकदा मराठी माणसाचा नम्बर लावला .  त्यांची पुण्याच्या डेक्कन सभेमार्फत निवड झाली त्यांनी भारतीय जनतेतर्फे वेल्बी कमिशनपुढे उत्तम प्रेझेन्टेशन दिले ज्याला टिळकांनीही दाद दिली हा गोखलेंचा राजकारणातील चंचुप्रवेश होता 

काँग्रेस ह्या काळात लोकाभिमुख न्हवती सरकाराभिमुख होती आणि हिंदुत्ववादी टिळकांनी तिला लोकाभिमुख बनवण्याचे केलेले प्रयत्न तिला आतून अमान्य होते त्यामुळे टिळकांना तोंडदेखला पाठिंबा द्यायचा पण प्रत्यक्ष जहाल राजकारणापासून दूर रहायचे असे तिचे धोरण होते जे तत्कालीन तरुण तुर्कांना मान्य नसल्याने ते टिळकांच्या मागे जात होते अशावेळी सरकाराभिमुख राजकारणासाठी नव्या मराठी दमदार नेत्याची गरज काँग्रेसला वाटत होती जी गोखल्यांनी पुरवली गोखले अशा राजकारणासाठी सर्वस्वी लायक होते जहाल लोकाभिमुख यशवंतराव चव्हाण शरद पवारांच्यापेक्षा मवाळ सरकारभिमुख दिल्लीअभिमुख शंकरराव चव्हाण सुशीलकुमार शिंदे व प्रतिभा पाटील हे दरबारी राजकारणी बरे तसे हे होते लोकाभिमुख केंद्रवर्ती सत्ता व संघटना फक्त ब्रिटिशांनी चालवायची व इतर काँग्रेससारख्या  संघटनांनी फक्त दरबारी राजकारण करायचे ही ह्या काळातील काँग्रेसची पॉलिसी होती जी व्हाया महात्मा गांधी पुढे स्वातंत्र्यानंतर लोकाभिमुख केंद्रवर्ती नेतृत्व फक्त नेहरू , इंदिरा गांधी ,राजीव गांधी , सोनिया गांधी , नरसिंहराव , राहुल गांधी , नरेंद्र मोदी , अमित शहा ह्यांचे व इतरांनी फक्त ह्या केंद्रीय नेतृत्वाला मुजरा करत दरबारी राजकारण करायचे अशी डेवलप होत गेली. जो हिला आव्हान देईल त्याचा सुभाषचंद्र बोस ,  शरद पवार , यशवंतराव चव्हाण , ममता बॅनर्जी , देवेंद्र फडणवीस करू अशी धमकी व व्यवस्था ! ह्या पॉलिसीला  तहहयात पुरून उरलेला एकमेव नेता म्हणजे आमच्या गोव्याचा मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर ! इंदिराजींनी वेळ पाळली नाही तर पुढची फ्लाईट पकडून गोव्यात येणारा (पुढे इंदिराजीनी स्वतःच त्यांना सॉरीचा फोन करून  त्यांना भेटायला बोलवलं  )आणि पैसे अडवले तर आम्हांला तुमच्या पैश्याची गरज नाही असे ठणकावून तहहयात मुख्यमंत्री राहिलेला !

रानडे मेथा दादाभाई नौरजी ह्या केंद्रीय नेतृत्वाला गोखले आव्हान देणारे न्हवते तर त्यांना फॉलो करणारे होते तेही ब्रिटिश राजवटीला ह्या काळात परमेश्वरी प्रसादच समजत होते साहजिकच टिळकांच्या तुरुंगात जाण्याने उदारमतवादाची गोखल्यांच्या मदतीने सरशीच झाली पण हे समाधान फार काळ टिकले नाही कारण १८९९ साली वेल्बी कमिशननंतर एक औरंगजेबाचा भाऊ शोभेल असा व्हॉईसरॉय अवतरला ज्याचे नाव लॉर्ड कर्झन होते त्याला औरंगजेब म्हंटल्याबद्दल टिळकांच्यावर नाराज होणाऱ्या गोखलेंना स्वतःच १९०५ च्या काँग्रेसच्या अधिवेशनात कर्झनला औरंगझेब म्हणावं लागलं आणि हा टिळकांचा विजय होता 

श्रीधर तिळवे नाईक 



आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ७०  श्रीधर तिळवे नाईक टिळक आणि गोखले २


कुठल्याही काळात ज्ञानकारण धर्मकारण अर्थकारण समाजकारण आणि राजकारण कसे चालते ह्यावर त्या समाजाची प्रतिष्ठा आणि प्रगती अवलंबून असते दडपशाही हा कुठल्याही शोषक शासनसंस्थेचा आधार असतो आणि अशी शासनसंस्था ही कितीही लोकशाहीची ग्वाही देत असली तरी प्रत्यक्षात ती फक्त शोषणशाही असते इंग्रजांचे राज्य हे असे शोषणशाही होते 
युरोपियन प्रबोधनात 
१ ज्ञानकारण हे फ्रान्सिस देकार्त बेकन गॅलिलिओ न्यूटन ह्यांनी चालवले व वैज्ञानिक ज्ञानपद्धतीचा पाया घातला 
२ धर्मकारण हे प्रामुख्याने मार्टिन ल्युथर ह्याने चालवले व प्रोटेस्टंट धर्माचा पाया घातला 
३ अर्थकारण हे कॅपिटॅलिझम व सोशॅलिझम ह्यांच्या कडे सरकले व ते ऍडम  स्मिथ ,रिकार्डो , कार्ल मार्क्स ह्यांनी चालवले 
४ समाजकारण हे अनेक चळवळी आणि क्रांती ह्यांच्यामधून वाटचाल करू लागले 
५ तर राजकारण हे हॉब्ज लॉक  रुसो हेगेल मार्क्स ह्यांनी केंद्रस्थानी आणले 

ह्या युगात समाजकारणाला फार कमी वाव होता आणि नेमका हाच संस्कार टिळकांच्यावर झाला 

१९ व्या शतकात भारतात सर्वांनाच ल्युथर होण्याचे स्वप्न पडायला लागले व त्यातून राम मोहन रॉय ह्यांनी नववेदान्तवाद स्वामी दयानंद सरस्वती ह्यांनी नववैदिकवाद रानडे गोखले ह्यांनी नववैष्णववाद ,   चिपळूणकर राजवाडे ह्यांनी नवब्राम्हणवाद व हिंदुत्ववाद , सर सय्यद अहमद खान ह्यांनी नवंमुस्लीमवाद व पुढे आंबेडकर ह्यांनी नवबौद्धवाद जन्माला घातले  बसवेश्वरांनी नवशैववाद आधीच जन्माला घातला होता ज्याचे देशी शैववादात महात्मा फुले व सावित्रीबाई फुल्यांनी रूपांतर केले होते 

टिळक हे आद्यहिंदूहृदयसम्राट होते हे  मी आधीच सिद्ध केले आहे टिळक हे  हेगेलचे नाव सतत घेत नसले तरी त्यांना अभिप्रेत असलेले तत्वज्ञान हेगेलपासून आणि स्पेन्सरपासून स्फूर्ती घेणारे होते आणि हिंदुत्ववादाला राजकीय आधार देण्याचे काम त्यांनीच प्रथम सुरु केले होते मात्र टिळक हे आपल्या विरोधकांबाबत सहिष्णू होते त्यामुळेच एका सभेत जेव्हा टिळक आणि गोखले एकाच रंगमंचावर आले तेव्हा दोघेही एकमेकाला तुम्हीच अध्यक्ष व्हा असे म्हणायला लागले आणि संयोजकांची पंचाईत झाली 

जेव्हा जमिनीच्या हस्तांतरणासंबंधी लँड रेव्हेन्यू कायदा आला तेव्हा त्याचा निषेध करण्यासाठी मेथा वैग्रे प्रभूती सभात्याग करून बाहेर पडले तेव्हा टिळकांनी त्यांनाच पाठिंबा दिला टिळकांचा राजकीय विवेक कधीच क्षीण झाला नाही राजकीय आणि वैयक्तिक संबंधात त्यांनी कधीच गफलत केली नाही त्यामुळेच गोखले , रानडे , मेथा ह्यांच्या मृत्यूवर ते विरोधक असूनही त्यांनी अप्रतिम अग्रलेख लिहिले आणि त्यांच्या योगदानाची योग्य अशी चिकित्सा केली हिंदुत्ववाद्यांच्यात ही टिळकवादी परंपरा अटलबिहारी वाजपेयींच्यापर्यंत व्यवस्थित चालली टिळकांचा लोकशाहीवर विश्वास होता आणि स्वातंत्र्यानंतर भारतात लोकशाहीच असायला हवी ह्याविषयी ते निःशंक होते ह्याउलट सावरकर ! ते आपल्या विरोधकांच्या बाबतीत कमालीचे असहिष्णू आणि काहीवेळा ना शेंडा ना बुडखा अशी टीका करणारे होते आणि त्यांना त्यांच्या आसपास थोडादेखील विरोध चालत नसे परिणामी हिंदू महासभा ही काँग्रेसच्या तुलनेत उभीच राहू शकली नाही मोदी व शहा हे ह्या अर्थाने सावरकरवादी आहेत आणि त्यांच्यामुळे भाजपचे रूपांतर हिंदू महासभेत झाले आहे हिंदुत्ववादातील टिळकीय हिंदुत्ववाद आणि सावरकरी हिंदुत्ववाद ह्यांच्यातील हा फरक विचारवंतांच्या लक्ष्यात येत नाही हे दुर्देव !

टिळक तुरुंगात असतांना गोखलेंचे नेतृत्व कसे उभे केले ते आपण मागील लेखात पाहिले पण कर्झनच्या आगमनाने भारतीय राजकारणाची दिशा बदलली कर्झन हा राज्यवादाचा आणि साम्राज्यवादाचा कट्टर पुरस्कार करणारा होता टिळकही राज्यवादाचेच कट्टर समर्थक होते भारतीयांच्या दैन्यावस्थेला ब्रिटिशांचे परराज्य जबाबदार आहे ह्याची त्यांना ठाम खात्री होती ह्यासंदर्भात त्यांचा त्यांच्या समकालीनांशी असलेला एक वाद लक्षणीय आहे शिक्षणक्षेत्रात त्याकाळी एक प्रमेय असे होते कि सांप्रतच्या राजवटीमुळे जो काही दुष्परिणाम झाला आहे तो अभ्यासक्रमामुळे झाला आहे टिळकांनी हे प्रमेय कसे चुकीचे आहे आणि परराज्यामुळेच कसे भारतीय जनतेला दैन्य प्राप्त झाले आहे ते सिद्ध केले

जहाल कर्झनवर शेवटी जहाल टिळक हाच उतारा होता आणि काळाने ते सिद्ध केले

श्रीधर तिळवे नाईक


आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ७१ टिळक आणि ब्राह्मणांच्यातील दुसरी फूट  श्रीधर तिळवे नाईक
तुरुंगातुन बाहेर आल्यावर टिळकांची कर्मठ  सनातनवादी धार्मिक  सामाजिक भूमिका आणि प्रगतिवादी विज्ञान  तंत्रज्ञानाचा पुरस्कार करणारी शैक्षणिक  जहाल राजकीय भूमिका ह्यांच्यातील संघर्ष कायमच राहिला टिळकांची इंग्रजांनी ते परधर्मीय  परकीय राज्यकर्ते असल्याने त्यांनी भारतीयांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करू नये ही भूमिका कायमच राहिली टिळकांची ही भूमिका मुस्लिम नेत्यांना इस्लाममध्ये इंग्रजांचा हस्तक्षेप नको असल्याने फारच सोयीस्कर होती आणि  त्यांनी टिळकांना पाठिंबा द्यायला सुरवात केली 

उत्तरपेशवाईने छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य नाहीसे करून वैदिक राज्य
स्थापन केले जातीनिहाय संख्या नीट कळावी म्हणून खानेसुमारी करण्यात आली आणि सर्व व्यवहार लिखित करण्याची आणि त्यासाठी स्वतंत्र खातं निर्माण करण्याची तजवीज करण्यात आली ह्यामुळेच पेशवाईचे दफतर कागदांनी भरून गेले हे दफ्तर नाना फडणवीस ह्यांनी  छापील मात्र केले नाही कारण एकदा कागद छापील झाला कि ब्राम्हणांची कागदपत्रांवरची सत्ता संपणार होती आणि कागदपत्रावरील सत्ता संपण्याचा अर्थ राजकीय सत्तेला खतरा असा होता नाना  फडणवीस ह्यांची ह्याला तयारी न्हवती छापीलतेचा दुसरा अर्थ वेद स्मृती छापील होणे आणि ते जनसामान्यांना उपलब्ध होणे असा होता साहजिकच त्यालाही ब्राम्हणांचा विरोध होता

उत्तरपेशवाई शेणवी  ब्राम्हणांच्या जमिनी जप्त करून तर प्रभुपाठारे , सोनारांना त्यांनी शूद्राचाच पोशाख घातला पाहिजे नमस्कार म्हणण्याचा अधिकार फक्त ब्राम्हणांना आहे सबब त्यांनी फक्त रामराम म्हणावा असा आदेश काढून  चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ( ठाकरे ह्या समाजाचे आहेत )ह्या शैव समाजांना क्षत्रिय दर्जा नाकारून फक्त शुद्रांसाठी असलेल्या मंदिरातच त्यांनी पूजा करावी असा आदेश काढून तर कऱ्हाडे देशस्थ ब्राम्हणांचे वर्चस्व कमी करून करून चित्पावनांनी घोळ घातलाच होता पुढेपुढे तर ब्राम्हणेतरांनी वैदिक कर्मकांड केल्यास त्यांची प्रॉपर्टी जप्त केली जाऊ लागली इतकेच न्हवे तर जे ब्राम्हणेतर १२ वर्षाच्या आत मुलीचे लग्न करणार नाहीत ते दंडास पात्र ठरवले गेले ह्यावरूनच  पहिली फूट पडलीच होती दुसरी फूट पेशव्याचें राज्य गेल्यावर पडली 

पेशव्याचें राज्य गेल्या गेल्या १८१८ मध्ये अहमदनगरमध्ये काही ब्राम्हणांनी ताबडतोब सोनारांचे धार्मिक कर्मकांड वैदिक पद्धतीने करायला सुरवात केली चित्पावनांनी ह्या ब्राम्हणांना  जातिबहिष्कृत करून सरकारने त्यांनी ब्राम्हणांचा अपमान केला म्हणून त्यांना शिक्षा द्यावी अशी नव्या ब्रिटिश सरकारकडे मागणी केली गोव्यात कॅनरात शेणविंनी स्वतःला सारस्वत ब्राम्हण म्हणवून घ्यायला सुरवात केली बडोद्यात प्रभुंना पुन्हा त्यांचा दर्जा दिला गेला तर तिथेही ज्यांनी हा दर्जा दिला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली 

आता चित्पावनांनी चक्क एकत्र येऊन महाराष्ट्रीय पातळीवर एक संघटना उभी केली सर्व दाक्षिणात्य ब्राम्हणाची एक व्यापक सभा भरवली गेली आणि धार्मिक विधी करण्याचा हक्क फक्त ब्राम्हणांना आहे असे जाहीर केले हे पेशवाईपेक्षा भयानक होते कारण उत्तरपेशवाईत निदान गुरव जंगम भगत  शैव ब्राम्हण ह्यांना शूद्र आदिवासी आणि अतिशूद्र ह्यांचे धार्मिक विधी करण्याचे अधिकार होते तेही ह्या ठरावाने काढून घेतले गेले आणि ह्यामुळे उरलासुरला शैव पुरोहित वर्ग कायमचा देशोधडीला लागला सर्वांचेच धार्मिक विधी ह्यात लग्न श्राद्धही आले करण्याचा अधिकार फक्त ब्राम्हणांना उरला आणि ब्राम्हणांनी ह्या पुराणोक्त विधींच्या नावाखाली ब्राम्हणेतरांना लुटायला सुरवात केली ज्यांच्याविरुद्ध पुढे फुलेंनी आवाज उठवला आजही ब्राह्मणेतरांची लग्नें श्राद्धविधी ब्राम्हणच करतात त्याचे मूळ ह्या ठरावात आहे हे सर्व इथेच थांबणारे न्हवते

ह्याच सभेत ब्राम्हण शूद्र असे दोनच वर्ण आहेत असे जाहीर केले पुढे प्रतापसिंह भोसलेंचा क्षत्रिय दर्जा काढून घेतला गेला  ते क्षत्रिय नसून शूद्र आहेत असे जाहीर केले गेले आज हातातून गेला पण माज गेला नाही अशी ही स्थिती होती 

ह्याची रिऍक्शन चित्पावन ब्राम्हणांच्यातच उमटली काही चित्पावन ब्राम्हणांनी आपल्याच जातीच्या विरोधात जात सुधारणेची चळवळ हातात घेतली ह्याला प्रतिक्रिया म्हणून जो सुधारणाविरोधी ब्राम्हणांचा सुधारणावादी ब्राम्हणांच्याविरोधी ग्रुप स्थापन झाला त्याला टिळक चक्क सामील झाले आणि ब्राम्हणांच्यात दुसरी फूट पडली आणि ब्राम्हण सुधारणावादी सुधारणाविरोधी अश्या दोन कॅम्पमध्ये विभागले गेले. आजही हे कॅम्प तसेच ऍक्टिव्ह आहेत टिळकांचे सुधारणाविरोधी कॅम्पला सामील होणे ही भारतातील एक फार मोठी राजकीय शोकांतिका होती ज्याची फळे आजही आपण भोगत आहोत 

श्रीधर तिळवे नाईक 
-------------------------------------------------------------------------------------------
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ७२
आर्यांच्यात कायमच धर्मसत्ता कुणाची ह्यावरून वाद होता हा वाद इतका पुढे निकराला पोहचला  कि ऋग्वेदातील गाजलेल्या पुरुषसूक्तांतून ब्राम्हणांनी चक्क क्षत्रियांची हकालपट्टी केली पुरुषसुक्त हे परशुरामाने क्षत्रियांना संपूर्ण नाहीसे केले ह्या कथेनंतर रचले ह्याचा ढळढळीत पुरावा आहे कारण ह्या सूक्तात क्षत्रियांचा उल्लेख नाही तर राजन्याचा उल्लेख आहे हे सूक्त 

 ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः 
ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत ॥१२

असे म्हणते आणि क्षत्रियांच्याऐवजी  राजन्य हा शब्द वापरते 
 ह्या वादामुळेच  प्रथम झरथ्रूष्ट ह्या क्षत्रियाने स्वतःचा स्वतंत्र धर्म स्थापन करून असुरवादाची मुहूर्तमेढ रोवली आणि अवेस्ता ह्या ग्रंथाद्वारे वा असुरवेदाद्वारे असुर वेगळे झाले पुढे कपिल ,महावीर आणि गोतम बुद्ध ह्या तीन भारतीय असुर राजपुत्रांना मोक्ष मिळाला व त्यांनीही आपले धर्म स्थापन केले आणि भारतीय आर्यांच्यात दुसरी फूट पडली पारशी , सांख्य , जैन आणि बौद्ध हे चारही धर्म क्षत्रियांनी स्थापन केले ह्या धर्मांच्यापुढे आपला वैदिक व विशेषतः ब्राम्हणांना क्षत्रियांच्यापेक्षा श्रेष्ठ मानणारा ब्राम्हण धर्म टिकणार नाही हे लक्ष्यात येताच काल्पनिक क्षत्रियांना म्हणजे राम व कृष्णांना केंद्रस्थानी आणून ब्राम्हणांचे महत्व मान्य करणारा वैष्णव धर्म ब्राम्हणांनी आणला ह्या वैष्णव धर्माचे कामच मुळी जैन व बौद्ध धर्माला पराभूत करणे हे होते जे जैनांच्याबाबत काही प्रमाणात साध्य झाले व बौद्धांच्या संदर्भात पूर्णच साध्य झाले नंतर  प्रश्न होता शैवांना कसे हरवायचे त्यासाठी शंकराचार्य उपयोगी पडले शैव धर्माला पराभूत करण्यासाठी हिंदू धर्म रचण्यात आला आर्यांनी हिंदू धर्म स्थापन करून आख्खा शैव धर्म गिळंकृत केला पण बसवाचार्यांनी नवशैव धर्म स्थापन करून शैव धर्म वाचवला त्याला गिळंकृत करण्यासाठी ब्राम्हणांनी वीरशैव नावाचा वेदांना प्रमाण मानणारा धर्म स्थापन करून त्याच्यात फूट पाडली आजही शैवांची लढाई संपलेली नाही हीच लढाई अनार्यांचीही आहे 

ही लढाई महात्मा फुलेंनी बहुजनवाद आणून व केंद्रस्थानी पुन्हा खंडोबा व ज्योतिबा ही शैव देवते आणून अधिक जिवंत केली आणि ह्या बहुजनवादाला छेद देण्यासाठी ब्राम्हणांनी हिंदुत्ववाद आणला ज्याचे आद्यहिंदुसम्राट टिळक होते 

तुरुंगातून सुटून आल्यावर जेव्हा टिळकांनी दक्षिणेचा दौरा सुरु केला तेव्हा पेशवाईपासून सुरु झालेली दुसरी फूट पुन्हा उफाळली ज्याची चर्चा आपण मागील लेखात केली 

ह्या काळात ब्रिटिशांच्या मुर्खपणामुळे व युरोपियन ओरिएंटॅलिझमच्या ब्राम्हणग्रस्त विद्वत्ताजड वावदूकपणामुळे आद्य शैव पुरोहितांना ह्या काळात जोराने भरभराटीस आलेल्या हिंदू धर्माने शैवीझम  शाक्तीझम ह्यांना हिंदू धर्माचे महत्वाचे पंथ म्हणून मान्यता द्यायला सुरवात केली आणि त्यातूनच शैव पुजाऱ्यांचे काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला त्याचे सोल्युशन म्हणून शंकराचार्यांनी आम्ही शैव पुजाऱ्यांना ब्राम्हणच मानतो अशी घोषणा केली ह्या घोषणेनं कर्नाटक , गोवा , महाराष्ट्र , गुजरात (तपोनिधी ब्राम्हण ) , मध्य प्रदेशातील शैव पुजार्यांच्यात खळबळ माजली . आद्यशंकराचार्यांनी इतर प्रदेशातील सर्वच शैव पुजाऱ्यांना  वेदांताची दीक्षा दिल्याने आणि कर्नाटक , गोवा , महाराष्ट्र , गुजरात (तपोनिधी ब्राम्हण ) , मध्य प्रदेशातील काही शैव पुजाऱ्यांना दीक्षा दिल्याने जवळ जवळ हिंदूकरण पूर्ण झाले होते  मात्र बसवेश्वरांच्या प्रभावामुळे व पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा शैव राजवट स्थापन केल्याने हा हिंदूकरणाचा घोडा अडवला गेल्याने कर्नाटक , गोवा , महाराष्ट्र , गुजरात (तपोनिधी ब्राम्हण ) , मध्य प्रदेशातील अनेक शैव पुजारी शैव धर्माची स्वायत्तता टिकवून होते  यादवकाळात शैव पुरोहितांना  ते  शूद्र असल्याची घोषणा करण्यात येऊन  पुढे उत्तरपेशवाईत बलुतेदारीत ह्यांचा समावेश करण्यात आला होता  तरी हे शिल्लक लोक शूद्र म्हणून शैव धर्माची लढाई लढत होते त्यांना शंकराचार्यांची ही घोषणा म्हणजे पुन्हा उच्चस्थानी येण्याची संधी वाटली गोव्यातून महाराष्ट्रातून काहींनी शंकराचार्यांची ह्या संदर्भात जेव्हा भेट घेतली तेव्हा शंकराचार्य लिखित फर्मान काढायला तयार होईनात ही ब्राम्हणधर्मी ब्राम्हणांची बनवाबनवी आहे हे लक्ष्यात येताच हे लोक फिरले. अलीकडेच मोदींपुर्व विकिपीडियाच्या गुरव ह्या नोंदीत  अशी घोषणा झाल्याचे सांगण्यात येत होते तर अलीकडच्या विकिपीडियाच्या नोंदीत केवळ उल्लेख करून हा एपिसोड झटकण्यात आला आहे मोदी हर हर महादेव म्हणतात म्हणून त्यांच्या मागे मागे फिरणाऱ्या गुरवांनी आणि ओबीसींनी हा बदल लक्ष्यात घ्यावा असा आहे 

साहजिकच टिळकांनी जेव्हा दक्षिण दौरा काढला तेव्हा त्यांची भेट तत्कालीन शैव गुरु नारायण गुरु (हे अवर्णातून म्हणजे अस्पृश्य समाजातून आले होते )ह्यांच्याशी होईल असे सर्व शैवांनी गृहीत धरले नारायण गुरूंनी १८८८ साली सर्व जातिवर्णांना खुले असे नवे अरूविरुपम शैव मंदिर बांधले होते आणि ब्राम्हणांनी आवाज उठवला तेव्हा हा ब्राम्हण शिव नसून एझहवा शिव आहे असे खडसावून सांगितले ( हे नारायण गुरु पुढे वैष्णव झाले आणि गांधींना मिळाले ) प्रत्यक्षात टिळकांनी सर्वच शैवांची भेट घेणे टाळले इतकेच न्हवे तर शंकराचार्यांनी लिखित फर्मान काढलेले नसल्याने शैव पुरोहितांच्या भेटी घेण्याची गरज नाही असे सांगितले पुढे अश्याच वाटणाच्या अक्षता महर्षी शिंदेंना लावण्यात आल्या 

थोडक्यात काय तुरुंगातून बाहेर आल्यावरही क्षत्रिय वैश्य हवेत पण ब्राम्हणांचे ऐकणारे क्षत्रिय वैश्य हवेत अशीच टिळकांची भूमिका होती त्याबदल्यात ते क्षत्रिय वैश्यांना सर्वोच्च राजकीय पद द्यायला तयार होते आणि बहुसंख्याक क्षत्रिय वैश्यही सर्वोच्च राजकीय वा आर्थिक पद मिळत असल्यास ब्राम्हणांचे ऐकायला हवे अशा विचारसरणीचे असल्याने टिळकांना पाठिंबाही देत होते मोदी शहा ही सावरकरवादी वैश्य जोडगोळी हीही अशी ब्राम्हणांचे ऐकणारी जोडगोळी आहे आणि त्यामुळे ती टिळकीय हिंदुत्ववादात ह्याबाबतीत फिट्ट बसते. 

श्रीधर तिळवे नाईक  


------------------------------------------------------------------------------------------------------------------


आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ७३
टिळक विरुद्ध कर्झन 
कुठल्याही कालखंडात एक लहरी व जुलमी राज्यकर्ता  निर्माण होत असतो आणि तो जनतेचे हित बाजूला सारून आपल्या लहरीवर अख्खे राज्य नाचवत असतो सल्तनत काळात मोहम्मद बिन तुघलक मुघल कालखंडात औरंगजेब मराठ्यांच्यात दुसरा बाजीराव ही उदाहरणे सर्वश्रुत आहेत इंग्रजांनी असा राज्यकर्ता कर्झनच्या रूपाने धाडला 

"राजनीती पहिल्याने स्वार्थ ओळखते मग तर्कशास्त्र तदनुकूल असेल तर त्याकडे वळते  " असे टिळकांनी म्हंटले होते कर्झनने प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  स्वातंत्र्यांस आळा घालायला सुरवात केली आणि टिळकांच्या भाषेत सांगायचे तर आकाशातून फुले पडण्याऐवजी गोवऱ्या पडायला सुरवात झाली (केसरी १९ -९ -१८९९) ब्रिटिश साम्राज्याच्या वाढीपेक्षा रयतेची स्थिती सुधारणे आवश्यक आहे असा इशारा टिळकांनी दिला कर्झन काय करणार हे नेमके टिळकांनाच कळले होते आणि त्याअर्थाने टिळक द्रष्टे ठरले 

महात्मा फुले यू एस ए ला पहात कारण अनार्यांची गुलामगिरी आणि ऍफ्रोअमेरिकन लोकांची गुलामगिरी ते एकसारखी मानत तिथले गोरे व इथले आर्य त्यांना एकसारखे वाटत ह्याउलट टिळकांचे लक्ष्य जपानकडे होते जपान जसा उभा राहिला तसा हिंदुस्थान उभा राहू शकतो असा त्यांना विश्वास होता पण तिथल्या सामुराई वर्गाने जसे स्वतःचे सर्व सामाजिक हक्क सोडले तसे ब्राम्हणांनी स्वतःचे सर्व धार्मिक व सामाजिक हक्क सोडायला हवेत असं मात्र ते म्हणत न्हवते म्हणजे त्यागाची कल्पना त्यांना करवत न्हवती फुल्यांना स्थानिक गोऱ्यांनी केलेल्या स्वातंत्र्ययुद्धाचा विसर पडला होता त्यामुळे स्वातंत्र्ययुद्ध लढण्याची फुल्यांची तयारी न्हवती तर टिळकांना जपानमधील उच्चवर्णीयांच्या त्यागाचा विसर पडला होता आणि त्यांची उच्चवर्णीयांचे हक्क त्यागण्याची तयारी न्हवती.  दोघेही सोयीस्कर तेव्हढाच भाग घेत होते 

हळूहळू कर्झनने आपले धोरण राबवायला सुरवात केली ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट खाली नेटिव्ह वर्तमानपत्रांच्या मुसक्या बांधल्या जाऊ लागल्या विद्यापीठांचे नियंत्रण सरकारी अधिकारी करू लागले सर्वत्र पुंडाई सुरु झाली 

ह्याचवेळी १९०४ च्या आंतरराष्ट्रीय समाजवादी मेळाव्यात दादाभाई नौरजी जाऊन आले इकडे काँग्रेसला कार्योन्मुख करा नाहीतर काँग्रेसचा तमाशा बंद करा असे आवाहन टिळकांनी केले तिथे मवाळांनी नौरजीच्याकडे  टिळकांची तक्रार केली व त्यांनी टिळकांना सबुरीचा उपदेश करणारे पत्र लिहिले त्याला मान देऊन टिळक सौम्य झाले काँग्रेस मोडलेली टिळकांनांही परवडणारी न्हवतीच काँग्रेसला व्यवस्थित घटना असावी अशी मागणी टिळक व लाला लजपत रॉय ह्यांनी केली तर फिरोजशहा मेथा ह्यांनी ती धुडकावली 

भारतात स्वदेशीची मुहूर्तमेढ सार्वजनिक काकांनी रोवली तर कर्झनशाहीमुळे बहिष्कारावर चर्चा सुरु झाली टिळकांनी बहिष्काराला पाठिंबा देणारे अनेक लेख लिहिले "आणीबाणीची वेळ " "राष्ट्रीय बहिष्कार" व "बहिष्कार योग " ह्या तीन लेखात बहिष्काराची सांगोपांग चर्चा केली काँग्रेसचे अधिवेशन राजपुत्राचे स्वागत करावे कि न करावे ह्या मुद्यावर गाजले ह्यावेळी घडलेली एक घटना म्हणजे सांस्कृतिक अर्थनिर्णय कसे विपरीत घडवतात त्याचा नमुना होता सुरेंद्रबाबूंच्यामुळे पुल्लरसाहेबांना राजीनामा द्यावा लागला म्हणून जनतेने सुरेंद्रबाबूंचा शांतिभिषेक केला तर गोऱ्या इंग्रजांना हा राज्याभिषेक वाटला व त्यांनी ह्याच्याकडे बंड म्हणून पाहायला सुरवात केली टाइम्स ऑफ इंडियाने ह्या प्रसंगाला संघटित बंडखोरीचा प्रयत्न म्हणत ही भीती वाढवली तेव्हा टिळकांनी मुंबईच्या टाइम्सचा बेशरमपणा नावाचा लेख लिहून टाईम्सची सांस्कृतिक अकलेची दिवाळखोरी जाहीर केली 

याकाळात राष्ट्रीय शिक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला तेव्हा टिळकांनी न्याय व्याकरण वैग्रे जुनी शास्त्रे शिकावीत पण त्यांच्यापेक्षा महत्वाची अशी युरोपियन विज्ञाने आधी शिकावीत अशी ठाम भूमिका घेतली  टिळकांच्यामुळे सनातन पंडितांनी ह्याला मान्यता दिली 

श्रीधर तिळवे नाईक 
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ७४
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप १
टिळकांच्या राष्ट्रवादाला नेहरूंनी स्पष्टपणे धार्मिक राष्ट्रवाद असे म्हंटले आहे भारताचा हा पहिला राष्ट्रवाद धार्मिक असावा ह्याचे आश्चर्य वाटू नये भारताचे प्रबोधन हेच  मुळी बसवेश्वरांच्या व राजा राम मोहन रॉय ह्यांच्या धार्मिक प्रबोधनापासून सुरु होते त्यानंतरही जो राष्ट्रवाद अवतरला तो गांधींचा अध्यात्मिक राष्ट्रवाद होता भारतातील सेक्युलर राष्ट्रवादाचे श्रेय हे रानडे नौरोजी गोखले व डाव्या लोकांना जाते पुढे नेहरूंनी तो स्वीकारला व आंबेडकरांनीही!

युरोपातही प्रबोधनाची सुरवात रॉजर बेकन ह्या धर्मगुरूंपासून होते त्याच्याविषयी स्वतंत्र लेख मी इथे फेसबुकला टाकला होता मात्र युरोपात जसे वैज्ञानिक निर्माण झाले तसे भारतात न झाल्याने भारतीय सेक्युलरवाद हा कायमच कागदी राहिला भारतीय समाजात तो कधीच भिनला नाही 

इस्लामिक देशात तर तो कागदीही न्हवता त्यामुळे तिथे तो कोसळण्याइतकाही उभा राहू शकला नाही भारतात आज जी काही सेक्युलरवादाची हवा आहे ती गांधीजींच्या अध्यात्मिक राष्ट्रवादामुळे टिकून आहे त्यामुळेच धार्मिक राष्ट्रवाद्यांना मग ते हिंदू असोत  वा मुस्लिम गांधी नेहमी मुख्य शत्रू वाटत आलेत प्रश्न असा आहे कि टिळकांच्या धार्मिक राष्ट्रवादाचे स्वरूप काय ?

भारतीय राज्यव्यवस्थेत स्पष्टपणे जातीयवाद आणणाऱ्या ज्या काही राजवटी झाल्या त्यात उत्तरपेशवाईचा क्रमांक पहिल्या तीनात सहज लागेल ह्या जातीयवादाचे स्वरूप मी मागील काही लेखात स्पष्टपणे मांडले आहे महाराष्ट्रात मुस्लिम वैष्णवांची आणि शैवांची परंपरा पूर्वीपासूनच होती ह्यातील मुस्लिम शैव परंपरेतूनच साईबाबा आले आहेत मराठी मुस्लिम हा प्रामुख्याने खोजा बोहरा गुजराती मेमन व कोकणस्थ सुन्नी ह्यांनी बनलेला आहे हे धर्मांतर प्रामुख्याने यादवांनी  समुद्रपर्यटनबंदी लागू केल्यांनतर नाईलाजाने व्यापार करण्यासाठी वैश्यांनी केले आहे साहजिकच मराठी मुस्लिम समाजात व्यापाराचे प्रमाण ९० टक्के आहे दुकान टाकायचे आणि जगायचे ही वैश्य वृत्ती आजही टिकलेली ! त्यामुळे ना इंग्लिश शिक्षण घेण्याची वृत्ती ना सरकारी नौकरी करण्याची आसक्ती ! १९९० पर्यंत हे लोक वैश्य रीतीरिवाज पाळायचे पण बाबरी मशीद पडली आणि मूळ वैश्य भारतीय रिवाज फेकून वहाबी रिवाज बोकाळायला सुरवात झाली मुंबईत ह्याची सुरवात १९१० लाच झाली होती  ( शिवाजीच्या काळातच काहींनी स्वतःला मराठा म्हणवून घ्यायला सुरवात केली उदाहरणार्थ साहू हे मध्य प्रदेशात छत्तीसगडमध्ये वैश्य पण महाराष्ट्रात ते सावंत होऊन मराठा झाले ) ह्याला पहिला छेद दिला तो बद्रुद्दिन तय्यबजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ! त्यांनी अंजुमन ए इस्लाम ही शैक्षणिक संस्था काढली नेमस्त सुधारकांनी त्यांना पाठिंबाच दिला आणि मराठी मुस्लिमांनाही सरकारी नोकरीत संधी मिळू लागली टिळकांनी ह्याविरोधात तोफ डागायला सुरवात केली हिंदूंच्यापेक्षा जाणीवपूर्वक सरकार मुस्लिमांना अधिक संधी देते आहे असा त्यांचा युक्तिवाद होता शिवाजी महाराज मुघलांना पठाण म्हणत टिळकांनीही सरकारला पुन्हा पठाणांचे रिस्टोरेशन करायचे आहे का असा प्रश्न विचारला आपण ज्यांना पठाण म्हणतोय ते आपलेच मूळचे हिंदुधर्मीय वैश्य आहेत इतकी प्राथमिक माहितीही टिळकांना नसावी ह्याचे आता आश्चर्य वाटते 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे काँग्रेसचा कारभार हिंदीत चालावा अशी मागणी करणारे कोणी हिंदी भाषिक न्हवते तर टिळक होते (१८८७) हिंदूंच्या भावना ब्रिटिश मुद्दाम दुखवतायत हेही दर्शवणारे प्रथम टिळकच होते मराठा विरुद्ध मुघल असा जो ब्रिटिशपूर्व संघर्ष होता तो ब्रिटिशांच्या काळात सातत्याने सुप्त गुप्त आणि प्रकटपणे टिळकांच्या मनात व मराठी लोकांच्या मनातही चालूच होता असे दिसते आणि मोगलकालीन मानसिकतेत अडकलेल्या मुसलमानांच्या मनातही हा संघर्ष सतत चालू होता असे आता दिसते परिणामी देशाची फाळणी करायची कि नाही ह्यावर जे मुस्लिम लीगला मतदान झाले त्याला सर्वाधिक पाठिंबा उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब राजस्थान बिहार येथून झाले आणि ज्या बिचाऱ्या सिंध बलुचिस्तान ह्यांना फाळणी नको होती त्यांच्या प्रदेशात पाकिस्तान स्थापन झाला 

श्रीधर तिळवे नाईक 
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ७४
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप २
कुठल्याही राष्ट्रवादाचा मुख्य आधार वैज्ञानिकता ,स्वातंत्र्य ,समता आणि बंधुता ही चार तत्वे असतात ही तत्वे नसली कि राष्ट्रवाद फोफसा होत जातो . धर्मापासून सुटका नसल्यामुळे राष्ट्रवाद सेक्युलॅरिझम सुचवतो व शासनाने धार्मिक ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊ नये आणि धर्माच्या आधारे कायदे बनवू नये अशी आज्ञा देतो शासनाने विज्ञानाच्या आधारे कायदे बनवावेत व न्यायनिवाडाही वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे व्हावा ही राष्ट्रवादाची आणि राष्ट्राची अपेक्षा असते ह्याबाबतीत राष्ट्रवादाने तडजोड केली कि तो राष्ट्रवाद राष्ट्रवाद रहात नाही तो राज्यवादाकडे परततो आणि राज्यवाद कट्टर धार्मिक बनला तरी त्याला ते चालते किंबहुना प्राचीन काळात अनेक ठिकाणी धर्मराज्येच अस्तित्वात होती त्यातील काही चांगली आणि बरीचशी वाईट होती 

टिळक राष्ट्रवादाचे हे नेमके स्वरूप ओळखतात का कि ते काही वेगळी मांडणी करतात ? आपल्याकडे अनेकदा राष्ट्रवाद एक राजकीय सामुदायिक अस्तित्व म्हणून पाहिला जातो प्रबोधनातल्या बहुविध राष्ट्रवादाच्या मांडण्यांचें दाखले दिले जातात आणि धर्मनिरपेक्षतेचा प्रत्येकजण सोयीस्कर अर्थ लावत जातो कारण मुळात अनेक विचारवंत व राजकारणी स्वतःच धर्मात अडकलेले असतात मताच्या राजकारणासाठी धर्माचे सार्वजनिक उत्सवी प्रदर्शन अनेकांना आवश्यक वाटते साहजिकच धर्म राष्ट्रापेक्षा अधिक बोकाळतो  आणि लोक अनेकदा राष्ट्राला साईडलाईन करून धर्माला डोक्यावर घेऊन नाचायला लागतात त्यातून धर्मराज्यवाद बोकाळतो ज्यू राष्ट्र ख्रिस्चन राष्ट्र हिंदू राष्ट्र मुस्लिम राष्ट्र अशा मागण्या पुढे यायला लागतात अनेकांना आपण कशाला आमंत्रण देतोय ह्याचीच कल्पना नसते 

आज राष्ट्र ही संकल्पना जगण्याच्या केंद्रस्थानी राहिलेली नाही त्याऐवजी कार्पोरेटशाहीची मार्केट ही संकल्पना आज आपल्या जगण्याची केंद्रवर्ती संकल्पना झालेली आहे आणि ज्याला एकेकाळी राष्ट्र म्हंटले जाई ते कार्पोरेट हाऊसेससाठी केवळ एक मार्केट बनून उरलेले आहे त्यातूनच इंडियन मार्केट अमेरिकन मार्केट अशा संकल्पना कार्पोरेटशाहीनं विकसित करून आपल्या मांडणीत त्याप्रमाणे राष्ट्रवादाला बसवायला सुरवात केली आहे ही कार्पोरेट हाउसेस जशी चांगली आहेत तशी वाईटही आहेत अनेकांनी सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव चांगली राखलेली आहे तर काहींनी नृशन्सपणा दाखवून अनेक ठिकाणची लोकशाही राजवट पाडून आपल्या मार्केट गरजा  पूर्ण करणारी हुकूमशाही वा धार्मिक शासने जन्माला घातली आहेत २१ व्या शतकात राष्ट्राचा विचार मार्केटशिवाय आणि कार्पोरेटशाहीचे स्वरूप कळल्याशिवाय होऊच शकत नाही अनेकदा मार्केट प्रबोधनाच्या स्वातंत्र्य समता व बंधुता ह्या मूल्यांच्या छाताडावर बसून नाचत असते अशावेळी त्याला लगाम घालणारी नैतिक ताकद म्हणून शासन व्यवस्थेकडे बघावे लागते आणि जर शासनसंस्था हे कार्य करीत नसेल तर मग ती शासनसंस्था धुळीला मिळते हा इतिहास आहे 

ह्या पार्श्वभूमीवर टिळकांच्याकडे पाहिल्यावर काय दिसते ? एक गोष्ट प्रथमच सांगतो टिळकांच्या कायदेशीर चौकटीत वावरणाऱ्या व कायदे अजिबात न तोडणाऱ्या नैतिकतेबद्दल मला अजिबात शंका नाही टिळक हे चांगले कायदेशीर राजकारणी होते त्यांना भारतीय जनतेचे भलेच करायचे होते मात्र ह्या भलाईविषयीच्या सर्वच संकल्पना योग्य होत्या असे म्हणवत नाही 

मुळात टिळकांना भारत हे एक राष्ट्र म्हणून दिसत होते असे वाटत नाही मात्र हळूहळू त्यांना हिंदुस्थान एक राष्ट्र म्हणून दिसायला लागला सुरवातीला मराठा नेशनच्या गोष्टी करणारे टिळक पुढे इंडियन नेशन पर्यंत पोहचले  

स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे टिळकांचे सर्वाधिक गाजलेले वाक्य आहे ह्यातील स्वातंत्र्य म्हणजे काय जन्मसिद्ध म्हणजे काय आणि हक्क म्हणजे काय हा खरा प्रश्न आहे 

टिळकांच्या बालपणापासूनच टिळकांना स्वातंत्र्य ही संकल्पना सर्वाधिक प्रिय असावी असे दिसते स्वतःच्या स्वातंत्र्यापासून राष्ट्राच्या स्वातंत्र्यापर्यंत टिळकांचा झालेला प्रवास हा केवळ टिळकांचा नाही तर तो समस्त भारतीयांचा प्रवास आहे 

हक्क आणि कर्तव्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि कर्तव्याशिवाय हक्क मिळूच शकत नाहीत ह्याची जाणीव टिळकांना होती 

प्रश्न इतकाच आहे टिळकांच्यासाठी जन्मसिद्ध काय होते ? एखादी गोष्ट जन्मसिद्ध असते म्हणजे काय असते ? उदाहरणार्थ भारतीय नागरिकत्व एखाद्याचा जन्म भारतात झाला असेल तरी ते सिद्ध होते असे आपण म्हणतो त्यासाठी मग केवळ जन्मदाखला पुरतो स्वातंत्र्यासाठीही मग केवळ जन्म पुरेसा आहे मी माणूस म्हणून जन्मलो ह्या एकाच गोष्टीवरून माझे माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य सिद्ध होते ? जर ते असे सिद्ध होत असेल तर मग माझी कर्तव्ये कोणती कारण ज्याप्रमाणे मला स्वातंत्र्य आहे त्याचप्रमाणे इतरांनाही माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य आहेच कि ! पण जर एकाचे स्वातंत्र्य दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालत असेल तर करायचे काय ? म्हणजेच माझे स्वातंत्र्य जन्मसिद्ध असले तरी दुसऱ्याचे स्वातंत्र्य मला मर्यादित करते म्हणजेच माझ्या पारतंत्र्याची सुरवात दुसऱ्याच्या स्वातंत्र्यापासून होते अशावेळी माझ्या स्वातंत्र्याच्या मर्यादा ठरवणार कोण ?

एकदा हा प्रश्न आला कि राष्ट्र आणि कायदा ह्यांचा शिरकाव माझ्या आयुष्यात होतो राष्ट्र म्हणजे विज्ञानाच्या आधारे स्वातंत्र्य समता बंधुता ह्यांच्या आधारे केल्या गेलेल्या संविधानाच्या आधारे कायद्याच्या आधारे चालणारा लोकांचा समूह ज्यांनी आपण संविधानाच्या आधारे आपले आयुष्य चालवू असा करार केलेला असतो 

आणि आता समजा संविधान हेच जर तुमच्यावर लादले गेले असेल तर कायदे तुमच्यावर लादले गेले असतील तर ! ब्रिटिशांचे राज्य हे असे परकीयांचे संविधान भारतीय जनतेवर लादणारे राज्य होते ब्रिटिश राज्य हा भारतीय जनतेने भारतीय जनतेशी केलेला करार न्हवता म्हणूनच टिळकांनी सर्वात प्रथम स्वातंत्र्य मागितले आणि ह्या स्वातंत्र्यात भारतीयांनी स्वतःचे कायदे स्वतः करण्याचे स्वातंत्र्य अपेक्षित होते हे स्वातंत्र्य भारतीय जनतेला न्हवते आणि त्यामुळेच भारतीय जनतेच्या मनात त्याविषयी एक असंतोष खदखदत होता टिळकांनी ह्या असंतोषाला स्वातंत्र्याचा आणि स्वराज्याचा उद्गार दिला म्हणूनच टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक ठरतात आणि ह्याच अर्थाने टिळक हे भारताचे पहिले लोकमान्य राष्ट्रव्यापी पुढारी ठरतात . 

श्रीधर तिळवे नाईक 


आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ७५
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप ३
मागील लेखात आपण स्वातंत्र्याची चर्चा केली हा शब्द मूळचा शैव आहे ह्याचीच अनेकांना कल्पना नाही तंत्र म्हणजे स्वतःच्या सर्व म्हणजे देहिक व अंतःकरणात्मक(मन , बुद्धी आणि अहम ) क्षमता विकसित करून त्यांना सतत वाढवत मोक्षप्राप्ती करणे स्वतंत्र म्हणजे स्वतःचे स्वतःसाठी स्वतःकडून चालवले जाणारे तंत्र ज्यात स्वतःचे अवगत केलेले कलाकुशलताकौशल्यही येते आणि स्वतःचे तंत्र अंमलात आणण्यासाठी समाजाने दिलेली सर्व प्रकारची मोकळीक म्हणजे स्वातंत्र्य होय  ही मोकळीक धार्मिक ज्ञानिक राजकीय आर्थिक सामाजिक अशा सर्व पातळ्यांवर असणे हे अत्यंत आवश्यक असते ह्या मोकळिकीला संविधानाने  मान्यता द्यायलाच हवी तरच ते संविधान राष्ट्रवादी ठरते अन्यथा ते राज्यीय ठरते स्वराज्य आणि स्वराष्ट्र ह्या दोन भिन्न संज्ञा आहेत स्वराज्यात तुम्ही कुठल्यातरी राष्ट्राच्या अंकित असता तर स्वराष्ट्रात तुमचे स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र असते भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ही स्वराज्याकडून स्वराष्ट्राकडे गेलेली दिसते आणि स्वराज्याच्या मागणीचे प्रमुख अर्ध्वयू म्हणून आपणस टिळकांना मान्यता द्यावी लागते 

टिळकांच्या आधीचे नेते हे परराज्यावर ब्रिटिश राज्यावर संतुष्ट होते टिळक ह्या कलोनियल संतोषात रमले नाही ते ह्या संतोषाविषयी असंतोष प्रकट करत राहिले 

स्वातंत्र्यात वागण्याची बोलण्याची कृती करण्याची आणि स्वतंत्र विचार करण्याची पूर्ण मोकळीक असते ब्रिटिश अशी मोकळीक देऊ इच्छित न्हवते सध्या संपूर्ण मोकळिकीसाठी भारतीय लायक नसल्याने आम्ही अशी मोकळीक टप्प्याटप्याने देऊ असे ते म्हणत एका अर्थाने भारतीयांच्यात स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता आलेली नाही असे ते म्हणत वैदिक ब्राम्हणी राजवटी किंवा मुस्लिम राजवटी तरी ह्याहून काय वेगळं म्हणत होत्या ? सर्वच हुकूमशाही , अल्पजनशाही , एकाधिकारशाही हे गृहीतक मांडत असतात प्रश्न बहुजन हे गृहीतक स्वीकारतात का हाच असतो आणि जेव्हा बहुजन दास्य मानसिकतेत असतो तेव्हा त्याला हे गृहीतक बरोबर वाटत असते भारतात मोठ्या प्रमाणात शैव हेच बहुजन असल्याने आणि अनेकदा शिवाजी महाराजांसारखा अपवाद वगळता ते ही मानसिकता स्वीकारत असल्याने ह्या देशात कायमच अल्पजनशाही बिनबोभाट राज्य करत असते अशा थंड गोळा होऊन पडलेल्या समाजाला गरम करून जागृत करणे हे सोपे काम नसतेच 

ब्रिटिशांनी भारतातील मुस्लिम , वैष्णव , वैदिक व ब्राम्हणी अल्पजनशाही पराभूत करून तिलाही इथल्या बहुसंख्याकांप्रमाणे दास्यत्वात लोटल्याने साहजिकच ब्रिटिश अल्पजनशाहीचे प्रतीक बनले व समस्त भारतीय हेच बहुसंख्याक दास बनले ह्या ब्रिटिश अल्पजनशाहीला क्षत्रिय शामिल झाल्याने स्वातंत्र्य मागायचे कुणी हाच प्रश्न निर्माण झाला ब्राम्हण मार्गानेही हळूहळू ब्रिटिशांना तुमचे राज्य आमच्याशिवाय चालणार नाही हे पटवून देऊन स्वतःला ह्या अल्पजनशाहीत अधिकाधिक जागा मिळावी म्हणून जे संघटन हस्तगत केले ते संघटन म्हणजे काँग्रेस टिळकांच्या काळात काँग्रेस ब्राम्हणांचीच व इतर अल्पसंख्याकांची संघटना होती ज्यांना ब्रिटिशांच्या अल्पजनशाहीत अधिकाधिक जागा हवी होती फक्त टिळकच असे होते ज्यांना ब्रिटिशांच्याकडून अधिकाधिक जागा न्हवे तर जागा भरण्याचा अधिकार असलेले स्वराज्य हवे होते 

टिळक ब्रिटिश साम्राज्यातून बाहेर पडू इच्छित न्हवते हे आपण लक्ष्यात घ्यायला हवे त्यामागे अनेक कारणे होती त्यातील एका कारणाची खोलात जाऊन चर्चा आपण पुढील भागात करू 

श्रीधर तिळवे नाईक 
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ७६
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप ४
स्वतंत्र भारतीय अस्तित्वात नाहीत म्हणून भारतीयच अस्तित्वात नाहीत अशी अवस्था भारताच्या इतिहासात अनेकदा आली आहे टिळकांचा काळ हा एक असाच काळ होता जेव्हा स्वतःच्या देशातील लोक स्वतंत्र विचार करणं थांबवतात तेव्हा परदेशातील स्वतंत्र विचार करणारे लोक आकर्षित करू लागतात ब्रिटिशांच्या अभ्यासक्रमातून असे अनेक विचारवंत तत्कालीन भारतीयांना भेटत होते आणि त्यांचा प्रभावही पडायला लागला ह्या विचारवंतात जेफरसन पेन असे अमेरिकन्स जसे होते तसे बेंथॅम दोन्ही मिल्स , स्पेन्सर असे ब्रिटिश विचारवंतही होते किंबहुना उदारमतवादाशी भारतीयांची ओळख परकीय संपर्कातून झाली होती 
टिळकांनी वकिलीचा अभ्यासक्रम पुरा केल्याने त्यांच्यापुढे ब्रिटिश प्रभाव हात जोडून उभा होता आणि त्याला टाळणे शक्य न्हवते टिळकांची अस्मिता एकीकडे हे प्रभाव आत्मसात करत होते तर दुसरीकडे आपल्या संस्कृतीत ह्या विचारांना समांतर असे काही आहे का हेही चाचपत होती ह्यादृष्टीने टिळकांना सर्वात जवळचा विचारवन्त वाटत होता हरबर्ट स्पेन्सर ! बर्ट्रांड रसेलपासून स्पेन्सरला एक मेडीओकर तत्वज्ञानी मानण्याची परंपरा पाश्च्यात्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासात सुरु झाली स्पेन्सरला एकेकाळी समाजशास्त्राच्या फाऊंडेर मेम्बरपैकी एक मानले जात होते तोही दर्जा टॅलकोट पार्सन च्या स्पेन्सर इज डेड ह्या घोषणेने ढासळला असे असले तरी टिळकांच्या काळात स्पेन्सर हा पिता पुत्र मिल ह्यांच्या बरोबरीचा मानला जात होता रानडे व पुढे गोखलेनेहरू  मिल पितापुत्रांना वाट विचारत गेले तर टिळक स्पेन्सर ह्यांना !

टिळक हे वेदांती गीतधर्मी असल्याने कट्टर आस्तिक होते तरीही टिळकांच्याच भाषेत सांगायचे तर जो नास्तिकशिरोमणी  होता असा स्पेन्सर त्यांना पसन्त पडावा हे सकृतदर्शनी आश्चर्यकारक वाटले तरी ज्यांना वेदांताची नेती नेति भूमिका माहित आहे आणि ज्यांना स्पेन्सरच्या अंतिम तत्वांबाबतचा नेति नेति दृष्टिकोन माहित आहे त्यांना हा प्रभाव मुळीच आश्चर्यकारक वाटणार नाही 

स्पेन्सरचे सर्वात महत्वाचे योगदान म्हणजे तो पहिला विचारवन्त होता ज्याने विज्ञानातील सर्व स्पेशल शाखांतील स्पेशल ज्ञानाचे सिंथेसिस करून त्याला पुन्हा ज्ञानाच्या एकात्म स्वरूपात मांडण्याचे  काम तत्वज्ञान करते अशी तत्वज्ञानाची व्याख्या व मांडणी केली आज त्याच्या तत्वज्ञानाला सिंथेटिक  फिलॉसॉफी म्हणून ओळखले जाते 

टिळकांनाही त्यांच्या विज्ञानप्रेमामुळे ही मांडणी आकर्षक वाटली तर त्यात आश्चर्य ते काय ? टिळकांच्या ज्ञेयाज्ञेयमीमांसा ह्या निबंधात त्यांनी स्पेन्सर ह्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे स्वीकारलेला आहे असे दिसते टिळकांची वैज्ञानिकता ही स्पेन्सरमधून उगम पावते हे लक्ष्यात आले कि त्यांच्याविषयीचे आकलन आधिक स्पष्ट होते 

स्पेन्सरचा दृष्टिकोन त्याच्या समकालीन लोकांना पचणे अवघड होते कारण बहुतांशी तत्वज्ञ  तत्वज्ञाला व तत्वज्ञानाला विज्ञानाच्या आधी प्लेस करत होते स्पेन्सरने तत्वज्ञानाला विज्ञानानंतर प्लेस केल्याने त्यांच्याविषयीचा एक तीव्र तिटकारा निर्माण होणे साहजिक होते प्रत्यक्षात तत्वज्ञान व विज्ञान ह्यांच्यात कधी विज्ञान तर कधी तत्वज्ञान भविष्यसूचक ज्ञानात्मक मांडणी करत आलेले होते  उदा  अणूंची चर्चा प्रथम तत्त्वज्ञानीं डिस्कस केली होती मग ती वैज्ञानिकांनी मांडली होती त्यामुळे तत्वज्ञानी स्पेन्सरवर खवळले तर ते समजण्यासारखे होते भारतासारख्या मागासलेल्या देशात जिथे वैज्ञानिकच निर्माण होत न्हवते तिथे तर तत्वज्ञानात्मक सृजनशीलतेला चेव चढणे अटळच भले मग तिचे योगदान शून्य असेल 

आज स्पेन्सर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ह्या त्याने कॉईन केलेल्या टर्मसाठी अधिक फेमस असला तरी एकेकाळी त्याची उत्क्रांतीची कल्पना प्रचंड गाजली होती स्पेन्सरने मांडलेली सामाजिक उत्क्रांतीवादाची संकल्पना टिळकांना मात्र लगेच पटली कारण त्यांनी ती आणि डार्विनचा सिद्धांत एकत्रच वाचला होता ह्याच सिद्धांतानुसार टिळक हे भारतीयांची राजकीय उत्क्रांती पहात होते माझ्या मते 
१ ईश्वरी राज्य 
२ स्वराज्य 
आणि 
३ स्वतंत्र राष्ट्र अशा तीन टप्प्यात भारताची ही प्रबोधनात्मक उत्क्रांती स्पष्ट दिसते आणि टिळकांना आपण दुसऱ्या टप्प्यात आहोत हे स्पष्टपणे दिसत होते साहजिकच टिळकांनी ब्रिटिश राष्ट्राची अंकितता स्वीकारली असली तरी आज ना उद्या स्वतंत्र राष्ट्राचा तिसरा टप्पा येणार ह्याविषयी टिळकांना शंका न्हवती मात्र टिळकांच्या काळात खुद्द त्यांची काँग्रेसच ईश्वरी राज्याच्या टप्प्यात होती आणि ती ब्रिटिश राज्याला  ईश्वरी संकेत मानत होती साहजिकच टिळकांच्या काळात दुसरा टप्पा हाच मुळी क्रांतिकारक टप्पा होता आणि म्हणूनच टिळक गर्जले "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच  "

श्रीधर तिळवे नाईक 



आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ७७
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप ५

माझ्या मते व्यक्ती  ही सहा आयामात जगते 
१ साधक 
२ गृहस्थ 
३ नागरिक 
४ विद्रोही 
५ दास 
आणि 
६ पशु 

 राष्ट्रवाद नागरिकतेला असामान्य महत्व देतो आणि कधीकधी त्याला अक्षरशः दास बनवतो हिटलर मुसोलिनी स्टॅलिन ह्यांनी हे सिद्ध केले आहे नागरिक संविधानाचे इमान एतबारे पालन करतो गृहस्थ म्हणून तो घरात पूर्ण स्वतंत्र असतो असावा शासनसंस्था जेव्हा गृहस्थक्षेत्रात शिरते तेव्हा अत्याचारशाहीची सुरवात होते आणि गृहस्थाच्या साधनेत जेव्हा शासनसंस्था शिरते तेव्हा ती अनाचारशाही होते जेव्हा समाजमान्य नागरिकताजन्य साधनाजन्य व कुटुंबजन्य  गोष्टी अमान्य होतात व साधनेलाही नीट वाव मिळत नाही तेव्हा विद्रोहाची सुरवात होते

डार्विनची उत्क्रांती ही माणसातील पशुची उत्क्रांती होत तो कसा माणूस बनला त्याची मांडणी करते माणसाचे शरीर हे बहुतांशी पशु म्हणून जन्मत असले तरी कुटुंब त्याला गृहस्थ बनवते अभ्यासक्रम त्याला नागरिक बनवतो अतिकामवासना व भय त्याला दास बनवते त्याच्यातला संयम व विवेक त्याला साधक बनवतो आणि ह्या सगळ्याविषयीचा असंतोष त्याला विद्रोही बनवतो 

प्रश्न असा कि डार्विनचे उत्क्रांतीचे तत्व मानवी समाजाला लागू करता येईल का ? स्पेन्सर ह्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देतो टिळकांनी अज्ञेयमीमांसा ह्या निबंधात इवोल्युशनसाठी मराठी प्रतिशब्द म्हणून "उत्क्रमण" हा  शब्द सुचवला आहे पण इथे मी उत्क्रांती हा सध्या प्रचलित असलेला शब्दच वापरत आहे 

टिळकांनी एक भूमिका नेहमीच मांडली आहे ती म्हणजे कुठलाही पाश्च्यात्त विचार हा आधी आपल्याकडच्या विचारवंतांशी जोडून पाहावा त्याची नवता खरोखरच किती प्रमाणात नवी आहे हे ताडावे आणि मगच निर्णय घ्यावा अज्ञेयमीमांसा हा ग्रंथ लिहीणाऱ्या नारायण लक्ष्मण फडके ह्यांना म्हणूनच त्यांनी ह्या निबंधात फटकारले आहे हा ग्रंथ स्पेन्सर ह्यांच्याच विचारांचा परिचय करून देणारा आहे व टिळकांनी म्हणूनच त्याचे परीक्षण केले आहे 

अगम्य असलेल्या अंतिम तत्वाचीच अभिव्यक्ती सध्याची विज्ञाने करत असून सर्व विज्ञानातील ज्ञानांचे संकलन करून त्यातून चार पाच नियम सहज शोधता येतील असा विश्वास स्पेन्सरला होता हे काम अर्थातच तत्वज्ञानाचे होते स्पेन्सरप्रमाणे ज्ञेय व अज्ञेय स्वीकारत टिळक सांगतात कि न्याय व सांख्य ही दर्शने ज्ञेय तर वेदांत हे दर्शन अज्ञेयाची मीमांसा करते त्यांच्या मते सांख्यांची पुरुष व प्रकृती हेच विज्ञानात मॅटर व स्पिरिट होत न्याय दर्शनातील पदार्थ व त्यांची क्रिया व वैशेषिक दर्शनातील विशेष हे तीन एकत्र आणले तर भौतिकविज्ञानाचे भोवतालच्या पदार्थांनी बनलेले जग हे 
१ पदार्थ 
२ त्यांच्या क्रिया 
३ त्यांच्या गती 
४ त्यांचे विशेष 
अशी मांडणी करून दाखवता येईल 
ह्याला जर वैशेषिकांच्या अणू ह्या कल्पनेची जोड दिली तर रसायनविज्ञान तयार होईल 

भारतीय नकुलीश शैव न्याय दर्शनात 
१ प्रमेय ज्याच्यावर आहे ते व तो व ती 
२ प्रमाण 
३ समस्या 
४ सिद्धांत 
५ सिद्धता 
६ प्रयोजन उद्देश हेतू 
७ दृष्टांत इतिहासातील उदाहरण साक्ष म्हणून काढणे किंवा साक्षात्कार होणे किंवा गाभा उकलणे 
८ शंका (संशय , प्रश्न , तपासणी व उलटतपासणी )
९ अवयव तर्कशास्त्रीय निर्णयाच्या पायऱ्या व पाया 
१० तर्क 
११ निग्रहस्थान जय पराजयाचे स्थान  जिथे गुन्हा घडला ते स्थान 
१२ वाद 
१३ संवाद 
१४ विवाद  
१५ प्रतिवाद 
१६ वितंड अनावश्यक व फालतू गोष्टी पुढे करून वाद घालणे ह्याला वितंड म्हणतात 
१७ जल्प  दीर्घकाळ चालणारा तंटा व तंटेकरी  
१८ हेत्वाभास प्रमाद व चुकीच्या हेतूने झालेला भास 
१९ छळ म्हणजे आक्षेप छळ करण्याचा मूळ अर्थ आक्षेप घेऊन घेऊन सतावणे 
२० जातीविशेष (  जात न्हवे जाती जन्मजात वैशिष्ट्ये )
२१ निर्णय ( सिद्ध होणे व निकाल देणे )

अशा एकवीस दुर्वा मानल्या जातात ह्या एकवीस दुर्वा ज्याला पूर्ण कळतात त्यालाच गणपती वा गणाधिपती होता येत असे अक्षपाद ह्याने ह्या दुर्वांचे संकलन व विवेचन  केले होते  व  आर्यांच्यात अक्षपादाची ही मांडणी गौतमने संस्कृतात आर्यजन्य केली त्यामुळे आर्यांच्यात ती अक्षपाद गौतम मांडणी म्हणून प्रसिद्ध आहे ह्या दुर्वांना नंतर प्रत्यक्ष गवताच्या दुर्वाची जोड देणाऱ्या महाभागांना काय म्हणावे ? शैवांनी व  ओबीसींनी अक्कल गहाण टाकल्याचे हे आणखी एक उदाहरण शैवांच्यावरचे निवाडे ह्या दुर्वांच्या आधारे चालू नयेत म्हणून ब्राम्हण्याने बहुजनसमाजाच्या हातात दिलेले हे गवत म्हणजे सांप्रतच्या गवती दुर्वा  ! गणपतीची पूजा करण्यापेक्षा ज्यामुळे गणपती गणपती बनला वा बनतो त्या ह्या एकवीस न्याय देणाऱ्या दुर्वांचा अभ्यास केला तर शैवांचे अधिक कल्याण होईल 

टिळकांना दुर्वांचा विचार माहित नसला तरी त्यावर आधारित गौतमाच्या न्यायशास्त्रातील १६ गोष्टींचे त्यांना ज्ञान होते व त्याच्या प्रकाशात ते ब्रिटिशांची न्याय व्यवस्था व कायदेव्यवस्था नीट तपासत होते ह्या ब्रिटिश न्याय व्यवस्था व कायदेव्यवस्थेत भारतीयांच्यावर होणारा अन्याय त्यांना स्पष्ट दिसत होता मात्र पेशवाईने आंधळे झालेल्या टिळकांना उत्तरपेशवाईत ह्या २१ दुर्वांची लागलेली वाट मात्र दिसत न्हवती व  आपल्या धर्मांच्यातील अन्याय कळत न्हवते ही त्यांची मर्यादा !


टिळकांनी विज्ञानाचा केलेला पुरस्कार व पुढे त्यांचे शिष्य सावरकर ह्यांनी केलेला विज्ञानाचा पुरस्कार हा भारतीय आर्य दर्शनांच्या वाचनातून आलेला आहे तो बघितला तर हिंदुत्ववादातील सद्याच्या विज्ञानविरोधी भोंगळपणाचे आश्चर्य वाटते मग अधिक खोलात गेले कि लक्ष्यात येते कि ह्याचेही बीज टिळक आणि सावरकर ह्यांच्याच विचारात आहे ह्या लोकांनी धर्माला मुख्य स्थान दिल्यानेच हा अनर्थ घडला आहे 

श्रीधर तिळवे नाईक 

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ७८
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप ६
टिळकांच्या वैज्ञानिकतेची चर्चा आपण करत आहोत कारण वैज्ञानिकता हा राष्ट्रवादाचा पहिला आधारस्तंभ आहे आपण हेही पाहात आहोत कि हरबर्ट स्पेन्सरच्या वैज्ञानिकतेतील उत्क्रांतीवादाचा टिळकांच्या राष्ट्रवादावर काय परिणाम झाला होता 

एकदा सामाजिक व राजकीय उत्क्रांती मान्य केली कि राष्ट्रीय उत्क्रांतीही मान्य करावी लागते राजकीय स्वातंत्र्यासाठी लोक अद्याप तयार नाहीत म्हणून टिळक राष्ट्रीय उत्क्रांतीच्या तिसऱ्या टप्प्यात जायला तयार न्हवते त्यामुळेच ईश्वरी राज्य टप्प्यातून हिंदुस्थानाला आपण स्वराज्याच्या टप्प्यात न्ह्यायचे हे त्यांनी निश्चित केले होते आणि मग त्या दिशेने पाऊले टाकली होती सार्वजनिक जीवनात ब्राम्हणांना दुखवायचे नाही हे धोरणही ह्या उत्क्रांतीवादातून आले होते त्यामुळेच संमती वयाबाबत सनातन भूमिका घेणारे टिळक स्वतःच्या मुलींची लग्ने मात्र संमती वयांनंतरच करतात अस्पृश्यतेबाबत सार्वजनिक जीवनात गोलमटोल भूमिका घेणारे टिळक स्वतःच्या घरात मात्र चोखामेळा संप्रदायांच्या लोकांना बोलावून त्यांचा पाहुणचार करतात आणि त्यांच्या अडचणी दूर करायला मदत करतात टिळकांच्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातला हा विरोधाभास पुरोगामी काँग्रेसी व हिंदुत्ववादी नेत्यांच्या जीवनशैलीचा फाउंडेशन स्टोन आहे घरात पुरोगामी समाजात प्रतिगामी ह्या जीवनशैलीचा उदय टिळकांच्यामुळेच भारतीय राजकारणात झाला त्याउलट घरात प्रतिगामी व समाजात पुरोगामी ह्या जीवनशैलीचा आरंभ न्यायमूर्ती रानडे ह्यांच्यामुळे झाला घरात व समाजात दोन्ही ठिकाणी पुरोगामी जीवनशैलीचा प्रारंभ आगरकर ह्यांच्यामुळे झाला किंबहुना राजकीय व सामाजिक दोन्हीबाबत पुरोगामी असणारे आगरकर हे १९व्या शतकातील एकमेव विचारवंत होते 

टिळकांच्या घरातील पुरोगामीपणामुळेच त्यांचा मुलगा आंबेडकरवादी झाला हे आपण लक्ष्यात घ्यायला हवे टिळकांचे घराणे आता पुन्हा हिंदुत्ववादी होऊन हिंदुत्ववादात परतले आहे हे यश कि अपयश हे ठरवणे गुंतागुंतीचे आहे कारण काँग्रेसने सेक्युलरॅझिमच्या नावाखाली हिंदूंचीच मान आवळली ही भावना सर्वदूर व सर्वखोल आहे 

टिळकांची अश्याच प्रकारची भावना होती ब्रिटिश राज्याबाबत ! ब्रिटन स्वतःच्या देशात सेक्युलर असले तरी ते हिंदुस्तानात मात्र हिंदूंची मान आवळत आहे असेच त्यांना वाटत होते 

मात्र हे करतांना हे का घडले ह्याचीही ते मीमांसा करत होते हिंदूंचा धर्म प्रतिगामी असल्याने हे घडले असे ते मानत न्हवते त्यांच्या मते युरोप व अमेरिकेतील लोक धार्मिकबाबतीत हिंदूंच्याइतकेच कट्टर आहेत तरीही त्यांची प्रगती झाली कारण त्यांचे राष्ट्रीय फिलिंग जबरदस्त होते भारतात जर अशी राष्ट्रीयतेची भावना निर्माण झाली तर भारतही पुढे जाईल असे त्यांना वाटत होते 

हिंदुस्थान सामाजिक व शैक्षणिक रचनेबाबत मागासलेला असल्याने पिछाडीला पडला ही रानडे फुलेवादी भूमिका त्यांना मान्य न्हवती पेशवाई राष्ट्रभक्तीच्या अभावामुळे कोसळली हे त्यांचे अनुमान होते जर मराठे एकसंध लढते तर इंग्रज कधीही जिंकू शकले नसते असे त्यांना वाटत होते त्यामुळे हिंदुस्तानच्या मागासलेपणाची राजकीय मीमांसा करणे हा टिळकांच्या राष्ट्रवादाचा एक मुख्य गुण आहे अनेक ठिकाणी पेशवाई त्यांच्या समकालीन युरोपियन राजवटींच्या समांतर प्रगतच होती असे त्यांचे प्रतिपादन होते 

मला व्यक्तिशः हे मान्य नाही राष्ट्रीयतेचा अभाव हे  नक्कीच महत्वाचे कारण आहे पण सर्वात महत्वाचे कारण धार्मिक कट्टरता आहे जिची सुरवात उत्तरार्धातील अकबराच्या (पूर्वार्धातील अकबर कट्टरच होता पण तो बदलला ) प्रागतिक धोरणाची वाट लावून औरंगजेबाने केली आणि मग तिचे अनुकरण पेशवाईने केले आजही नेमके हेच घडले आहे धार्मिक कट्टरतेची सुरवात इस्लामिक स्टेटने  केलीये आणि तिचा प्रतिकार म्हणून ज्यू स्टेट हिंदू स्टेट व ख्रिश्चन स्टेट स्थापन करायची व्यूहरचना सुरु झाली आहे ह्या गोष्टीतला मूर्खपणा उघड आहे आणि पेशवाई त्याचे उदाहरण आहे औरंगजेबाने शे खाल्ले म्हणून पेशवाईने ते खाल्ले परिणामी पेशवाई बोंबलली व त्यात हिंदूंचेच नुकसान झाले व ख्रिश्चनिटीचा फायदा झाला इस्लामने खाल्ले ते आपणही खायचे ही तर्कवृत्ती आपल्यालाही खड्ड्यात घालेल हे बहुसंख्याक हिंदूंनी लक्ष्यात घेणे आवश्यक आहे नित्शेचे एक वचन आहे शत्रूंशी लढता लढता तुम्ही शत्रूसारखेच बनता औरंगजेबाशी लढता लढता उत्तरपेशवाईत मराठेही औरंगजेब झाले इस्लामिक स्टेट्सशी लढता लढता आपण हिंदू स्टेट कडे वळू तर आपण मुसलमानांच्या प्रमाणे दोन शतके मागे जाऊ हे आपण लक्ष्यात घ्यायला हवे 

टिळकांचा राष्ट्रवाद हा ह्या तर्कवृत्तीचे पोषण करतो ब्रिटिश धार्मिक बाबतीत श्रद्धाळू व मागासलेले 
असले तरी सामाजिक समतेच्या शक्यता त्यांच्या धर्मात प्रचंड आहेत हे आपण लक्ष्यात घ्यायला हव्यात हिंदू धर्म हा वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था मानत असल्याने हिंदू राज्य अटळ व अपरिहार्यपणे वर्णव्यवस्था व जातिव्यवस्थेकडे जाणे अनिवार्य आहे ह्यातला धोखा उघड आहे आणि अंतिमतः त्यात हिंदूंचे नुकसान आहे 

श्रीधर तिळवे नाईक 

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ७९
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप ७
हरबर्ट स्पेन्सरचा प्रभाव जसा टिळकांच्यावर पडला तसा तो विवेकानंदांच्यावरही पडला स्पेन्सर केवळ उत्क्रांती मानत नाही तर अधोक्रांती म्हणजे उलट्या दिशेने अधःपाताच्या दिशेने उत्क्रांती होऊ शकते असा त्याचा सिद्धांत होता आणि विवेकानंदांनी अनेकदा त्याचा वापर आपल्या भाषणात केला 
ज्यावेळी स्पेन्सर आपला सामाजिक उत्क्रांतीवाद मांडत होता त्याचवेळी कार्ल मार्क्स हा त्यांचा समकालीन मात्र उत्क्रांती तत्वाचा वापर करत ह्यापुढे वर्गलढ्याचा पुढचा टप्पा म्हणून प्रॉलिटरीयत व भांडवली व्यवस्थेत संघर्ष होऊन जगभरच कामगारांचे राज्य येईल अशी भविष्यवाणी उच्चारत होता उत्क्रांतीवादाचा हा अर्थशास्त्रीय अविष्कार होता 

टिळकांच्या मते आपली अधोक्रांती जेव्हढी व्हायची तेव्हढी झाली आता आपण स्वराज्याच्या दिशेने उत्क्रांत होऊ शकतो स्पेन्सरचा सिद्धांत जगाची विभागणी ज्ञेय व अज्ञेय अशी करतो व जेजे इंद्रियांना गोचर व डोळ्यांना दृश्य ते ते सर्व ज्ञेय व इंद्रियांना जे अगम्य ते अज्ञेय अशी स्पेन्सरची मांडणी आहे विज्ञान हे ह्या ज्ञेयचे ज्ञान आहे असे तो माने मात्र ज्ञेयाच्या खोलात जे काही अज्ञेय आहे त्याचा ध्यास विज्ञानाने घ्यावा व त्याला ज्ञेय करावे हे त्याला मान्य आहे मात्र सृष्टीच्या सगळ्या चल अचल गोष्टींच्या मागे जे एकम तत्व आहे ते अज्ञेय राहण्याचीच शक्यता अधिक असे तो मानत असे एखाद्या गोष्टीचा रंग आपणाला जसा दिसतो तसा कावीळ झालेल्या माणसाला दिसतो का तर नाही म्हणजेच रंग सापेक्ष आहे पण त्या वस्तूचा सर्वांच्या मनावर उमटलेला ठसा मात्र एकसारखाच असतो म्हणूनच व्यवहार शक्य होतो म्हणजे ठसेज्ञान हे निरपेक्ष आहे म्हणजेच ज्ञान जसे सापेक्ष आहे तसे ते निरपेक्षही  आहे कुठलीही वस्तू आपणाला संपूर्ण दिसत नाही तिचा काही ना काही भाग अज्ञेय राहतोच पण त्याबरोबर हेही खरे कि सर्वांना त्यात्या वस्तूचे काही सर्वसामान्य म्हणून एक ज्ञान होतेच विज्ञान असे ज्ञान आपणास देते आपल्याला ज्ञानप्राप्तीच्या ज्या अवस्था गवसतात त्या आपल्या मनाच्याच अवस्था होत ह्याचा अर्थ स्पेन्सर ईश्वर स्वीकारतो का तर नाही ह्या अज्ञेयला ईश्वर म्हणण्याचे काहीच कारण नाही असे तो सांगतो एका अर्थाने तो ईश्वराला अज्ञेयने रिप्लेस करतो ईश्वराच्या जागी अज्ञेयची स्थापना करतो टिळक ईश्वराला नाकारत नाहीत ते ईश्वराला ब्रम्ह मानतात मात्र हे ब्रम्ह अज्ञेयच आहे व ते नेती नेती च म्हणायला लावते असे ते म्हणतात  

धर्मशास्त्र हे छद्मशास्त्र आहे हे माझे मत मी अनेक ठिकाणी मांडले आहे स्पेन्सरची धर्मशास्त्राविषयीची मते वेगळी आहेत  स्पेन्सर ह्या धर्मशास्त्र व विज्ञान ह्यांच्या संघर्षाची सखोल चर्चा त्याच्या अज्ञेयमीमांसेत करतो (ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनी त्याचा first principles हा ग्रंथ वाचावा ) धर्म म्हणजे काय तर स्पेन्सरच्या मते धर्म म्हणजे विज्ञानाने कितीही प्रगती केली अगदी आपल्या हाडांचेही पुढेमागे फोटो काढले तरी जे अंतिम तत्व आहे ते अज्ञेयच राहणार महागुढच राहणार असे मानणारी विचारपद्धती ! विज्ञान म्हणजे काय तर स्पेन्सरच्या मते विज्ञान म्हणजे जगातील ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या समजून घेण्याची खटपट करणारी जगातील सर्व चमत्कार मग ते दृश्य असोत वा अदृश्य आज ना उद्या उलगडतील स्पष्ट करून दाखवता येतील असे मानणारी प्रवृत्ती ! धर्माची  अज्ञेय हे अज्ञेयच राहणार ह्यावर श्रद्धा असते तर विज्ञानाचा प्रत्येक गोष्ट ही ज्ञेय होणारच व जे आज अज्ञेय आहे तेही कधी ना कधी माणसाला ज्ञेय व ज्ञात होणारच ह्यावर विश्वास असतो 

स्पेन्सरच्या मते आपल्या संकल्पना ह्या कमी अधिक प्रमाणात सांकेतिकच असतात आणि त्यांचे खऱ्या व खोट्या असे दोन वर्ग होतात तो पुढे म्हणतो कि धर्माने आजवर विश्वरूपाविषयी वा विश्वाच्या उगमाविषयी ज्या ज्या संकल्पना मांडल्या त्या केवळ शाब्दिक आहेत व त्यांनी विश्वाचा कसलाही बोध आपणाला होत नाही वेगवेगळ्या धर्माच्या ह्या संकल्पनातून फक्त एकच धार्मिक बोध आपणाला होतो तो म्हणजे ह्या विश्वाचे आदिकारण हे महागूढ आहे 

माझ्या मते भारतीय दर्शने विश्वाच्या आदिकारणाला फारसे महत्व देत नाहीत ती हे जे महागूढ अज्ञेय आहे ते प्राप्य आहे असे मानतात व ते एखाद्या व्यक्तीला प्राप्त झाले व तिच्यात ते अवतरले कि तिला मोक्ष वा निर्वाण वा कैवल्यप्राप्ती झाली असे मानतात मोक्ष वा निर्वाण वा कैवल्यप्राप्ती करण्याची ही प्रक्रिया ती मुळीच गूढ मानत नाही रामकृष्ण परमहंसाच्या भाषेत सांगायचे तर ," जितक्या लख्खपणे तुम्ही मला पाहात आहात तितक्याच लख्खपणे मी ईश्वराला पहात आहे " प्रश्न अभिव्यक्तीचा आहे आणि जे नेती नेती आहे तो अभिव्यक्तीचा प्रॉब्लेम आहे कारण ते "अंतिम" चिन्हांत व्यक्त करता येत नाही आणि म्हणूनच मग त्याच्या अभिव्यक्तीसाठी काव्यात्मक भाषेचा वापर सुरु होतो पण त्याचबरोबर ही काव्यात्मक अभिव्यक्ती म्हणजे ते अंतिम न्हवे ते चिन्हांच्या बाहेरच आहे असे ठणकावले जाते त्यामुळेच जो अटीतटीचा संघर्ष युरोअमेरिकेत धर्म व विज्ञान ह्यांच्यात झाला तो भारतीय धर्मांच्याबाबत उद्भवला नाही उलट युरोअमेरिकेच्या ज्युडायिक धर्माची परंपरा चालवणाऱ्या इस्लामने मात्र आशिया खंडात व इतरत्र ह्या संघर्षात धर्मप्रधानतेचे टोक गाठले आहे स्पेन्सर ख्रिश्चन धर्मप्रधानतेवर थेट हल्ला करतो व विज्ञानाची भलावण करतो 

टिळक वेदांत दर्शन स्वीकारतात आणि त्याची सांगड स्पेन्सरप्रणित वैज्ञानिकतेशी घालतात त्यांची ही सांगडभट्टी नीट जमलीये का ह्याची चर्चा पुढे करूच 

श्रीधर तिळवे नाईक 


आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ८०
श्रीधर तिळवे नाईक 
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप ८

टिळकांच्यावर पडलेल्या स्पेन्सरच्या प्रभावाची राष्ट्रवादाच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत आता स्पेन्सरवर पडलेल्या प्रभावाची आपण चर्चा करू 
युरोपियन प्रबोधनाचे तीन टप्पे आहेत 
१ धर्मकेंद्री प्रबोधन व नवजाग्रण ज्यात प्रामुख्याने धार्मिक जागृती आणि इहलोकाकडे निसर्गाकडे लक्ष्य येते ह्याचा पाया भारतात बसवेश्वर यूरोपात रॉजर बेकन ह्यांनी घातला 
२ ज्ञानकेंद्री प्रबोधन ज्यात विज्ञान तर्कज्ञान शास्त्रे ह्यांच्या नव्या ज्ञानाची निर्मिती व विस्तार येतो ह्याचा पाया फ्रान्सिस बेकन देकार्त कोपर्निकस  गॅलिलिओ न्यूटन लॉक रिकार्डो ऍडम स्मिथ सेंट सायमन  हॉब्ज ह्यूम रुसो बेंथॅम ह्यांनी घातला 

३ व्यवस्थाकेंद्री प्रबोधन ज्यात प्रबोधनांनी निर्माण केलेल्या प्रस्थापित ज्ञान ,धर्म, राज्य, समाज व अर्थ व्यबस्थेविषयी प्रबोधन होते आणि त्यांच्याविरुद्ध आक्रोशही होता आणि काहींची कृती म्हणजे क्रांतीही होती  ह्याचा पाया व्हॉल्तेयर  कान्ट हेगेल मार्क्स कॉम्ट मिल  ह्यांनी घातला ह्यांना परिवर्तनही हवे होते आणि त्यातील मार्क्ससारख्याना तर फक्त क्रांतीनेच हे शक्य होईल असे वाटत होते 

शेवटी स्पेन्सर हा काही आकाशातून पडलेला न्हवता तो ह्या प्रबोधनाच्या खांद्यावर उभा होता किंबहुना कान्ट ज्याने प्रबोधनाची विज्ञानकेंद्री ज्ञानव्यवस्था हलवून तिच्या मर्यादा सांगितल्या हेगेल ज्याने राज्यव्यवस्था हीच सर्वोच्च मानून तिचा नवा धर्मच करून टाकला व नेशनला व नॅशनलला पिसाटी दिली कॉम्ट ज्याने समाजविज्ञानाचा पाया घालून सारे ज्ञानच सामाजिक केले आणि मार्क्स ज्याने भांडवली अर्थव्यवस्थेचे भ्रष्ट व शोषणकारी रूप दाखवून क्रांती करण्याचे आव्हान केले ह्या सर्वांच्याप्रमाणे तोही प्रबोधनाचे शेवटचे शिखर होता ज्याला झळाळी न्हवती कारण अनेकांना असं वाटत होत कि कॉम्ट समाजशास्त्रात जे काही करून बसलाय त्याचेच हे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातले अनुकरण आहे  

स्पेन्सरवर  सेंट सायमनचा प्रभाव होता 

युरोपियन प्रबोधनात सेंट सायमनचे महत्व अलीकडच्या काळात पुन्हा प्रस्थापित झाले आहे ह्याचे कारण ऑगस्ट कॉम्ट आणि हरबर्ट स्पेन्सर ह्या दोघांच्या मुळाशी सायमन असल्याचे आता नीट स्पष्ट झाले आहे खरेतर दुर्खाइमने सायमनवर सोशॅलिझम अँड सेंट सायमन हा ग्रंथ लिहिला तेव्हाच हे घडायला हवे होते ह्या सायमनिझमला दोन फाटे फुटले पहिला मार्क्सचा आणि दुसरा कॅव्हिलरचा हेही आता नव्वोदत्तर इतिहासकार स्पष्टपणे मांडत आहेत गंमत म्हणजे मार्क्स आणि कॅव्हिलर ह्या दोघांचेही  महत्वाचे ग्रंथ योगायोगाने १८४८ साली प्रसिद्ध झाले होते समाजवाद हा आपला चर्चेचा विषय नसल्याने इथेच थांबतो असो 

इब्न खालदूनने समाजशास्त्राची स्थापना केली असली तरी ज्याला आज आपण समाजविज्ञान म्हणतो त्याचा आरंभ सेंट सायमनच्या १८१३ साली प्रकाशित झालेल्या  फिजिओलॉजी सोशल ह्या ग्रंथाने केला त्याने नवा इंडस्ट्रियल समाज व वर्ग निर्माण झाल्याचे सांगून त्यात बिझनेसमन , व्यापारी व श्रमिक ह्यांचा अभ्यास केला त्याने हा एक क्लास मानला होता टिळकही हा इंडस्ट्रियल वर्ग एक वर्ग म्हणून पहात होते आणि हा सायमनिझम होता जो व्हाया स्पेन्सर त्यांच्यापर्यंत पोहचला होता टिळक श्रमिकांचाही विचार का करत होते हे ह्यामुळे स्पष्ट व्हावे 

मात्र समाजविज्ञानाला खरा आकार देणारा समाजवैज्ञानिक म्हणून ऑगस्ट कॉम्टचेच नाव घ्यावे लागते त्याने समाजविज्ञानाला विज्ञानाची महाराणी म्हंटले होते आणि सर्व विज्ञानातील ज्ञानाचे संकलन करून त्याला दिशा देणारे विज्ञान म्हणून समाजविज्ञानाची स्थापना केली त्याचा प्लॅन ऑफ सायंटिफिक स्टडीज नेसेसरी फॉर द रिऑर्गनायझेशन ऑफ सोसायटी हा समाजविज्ञानाचा पाया घालणारा ग्रंथ १८२२ साली प्रकशित झाला 

जे स्थान ऑगस्ट कॉम्टने समाजविज्ञानाला दिले तेच स्थान हर्बर्ट स्पेन्सरने तत्वज्ञानाला दिले टिळकही तत्वज्ञानाला ह्याच नजरेने पहात होते साहजिकच एक अमूर्तता आणि मूर्तता ह्यांची सांगड घालणे त्यांच्यासाठी गरजेचे होते फुल्यांची वृत्ती समाजशास्त्रीय होती तर टिळकांची तत्वज्ञानीय ! फुल्यांना अमूर्ततेत काडीचाही रस न्हवता ते इहवादी होते आणि धर्माकडेही ते केवळ इहवादी सोय म्हणून पहात होते कारण धर्माच्या नावाने धार्मिक अमूर्ततेच्या नावाने झालेले शोषण त्यांना माहीत होते मात्र धर्माच्या प्रभावातून ते मुक्त होऊ शकले नाहीत म्हणूनच राजाराम मोहन रॉय ह्यांचा  ब्राम्हो समाज दयानंद सरस्वतीं ह्यांचा  आर्य समाज ह्यांच्याप्रमाणे त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला ब्राम्हो समाज नवहिंदु धर्म  होता तर आर्य समाज हा नववैदिक धर्म होता फुल्यांचा समाज हा शैवांच्या ईश्वरवादाचे ख्रिश्चन रूप होते ते ओबीसींना भावणे शक्यच न्हवते आणि पुढे ते भावलेही नाही शैवांच्यात बसवेश्वरांनी नवशैव आणि गुरु नानकांनी नवईश्वर धर्म आधीच निर्माण केले होते त्याच्या पुढे जाणारे काहीतरी हवे होते आणि ते देण्यात महात्मा फुले कमी पडले कारण फुल्यांचा तो पिंडच न्हवता केवळ आर्यांना काउंटर म्हणून त्यांनी अनार्य सत्यशोधक समाज निर्माण केला ह्याचवेळी रामकृष्ण मिशनच्या रूपाने विवेकानंदांनी नववेदान्त धर्म स्थापन केला ह्याला समांतर म्हणून टिळकांनी नवब्राम्हण शक्यतांची हुडकणी केली आणि त्यातूनच नवब्राम्हणधर्माचे नवे रूप म्हणजे टिळकांचे हिंदुत्व जन्मले ज्याची चर्चा आपण केली आहेच हे हिंदुत्व रानडे गोखले ह्यांनी आणलेल्या हिंदू नववैष्णववादाशी आजही झगडत आहे ज्याला गांधींनी एक परिपूर्ण रूप दिले होते रानडे गोखले विरुद्ध टिळक ह्या संघर्षाचे पुढचे रूप म्हणजे गांधी विरुद्ध सावरकर व संघ होय 


श्रीधर तिळवे नाईक 

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ८१
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप ९
मागे मी म्हणालो कि रानडे गोखले विरुद्ध टिळक ह्या संघर्षाचे पुढचे रूप म्हणजे गांधी विरुद्ध सावरकर व संघ होय आश्चर्य म्हणजे सुरवातीला हे दोघेही स्वतःला बुद्धिवादीच म्हणवून घेत आणि दोघेही समोरचा बुद्धिवादी नाही असे प्रतिपादन करत ह्या सगळ्याचा कळस आपणाला गांधी हत्येत दिसतो नथुराम गोडसेने हत्येची जी मीमांसा दिलीये त्यात त्याने गांधींना इरॅशनल म्हंटले आहे तर अनेक काँग्रेसवाल्यानी नथुरामला इन्सेन म्हंटले आहे 


ह्याचा अर्थ टिळकांचे हिंदुत्व रॅशनल नॅशनॅलिझम रचत होते असं मानायचं काय ?कि काँग्रेसत्व जितकं गोलमटोल तितकंच हिंदुत्वही गोलमटोल आहे ? कि दोन्ही केवळ राजकीय आयडियालॉजी आहेत ज्यांना ब्रिटिश गेल्यावर ह्या देशावर राज्य करायचे होते ? असं तर नाही ना कि काँग्रेसत्व म्हणजे सॉफ्ट पेशवाई आणि हिंदुत्व म्हणजे हार्ड पेशवाई आणि दोन्हीकडे ब्राम्हणांचेच राज्य ?

ह्यापुढचा प्रश्न असा कि ह्या सगळ्यात शैव कोठे आहेत तर ते कुठेच नाहीयेत त्यांनी फक्त मेंढराप्रमाणे नेत्यांच्या मागे जायचे आहे फुल्यांच्यानंतर शैवांना एकही टोलेजंग नेता सापडलेला नाही त्यामुळे विसाव्या शतकात वैचारिक पातळीवर शैव कुठेच नाहीयेत आणि जो हिंदुवाद आणि हिंदुत्व आहे ते वैष्णवकेंद्री गीताकेंद्री आहे शैव फक्त नावापुरते आहेत 

टिळक हे हिंदू धर्माला कित्येकदा आर्यधर्म म्हणतात श्रीभगवद्गीतारहस्य ह्या निबंधात टिळक  कुठल्याही संप्रदायाला प्रस्थानत्रयीशी जोडून घेतल्याशिवाय मान्यता मिळत नाही असे सर्रास म्हणतात (निबंधकार टिळक पान १७) कारण त्यांच्या दृष्टीने शैव किरकोळ आहेत म्हणजे एकीकडे तुम्ही प्रस्थानत्रयी मानत नाही म्हणून आम्ही तुम्हाला मानत नाही असं म्हणायचं आणि दुसरीकडे प्रस्थानत्रयीची तुम्हाला मान्यता नसल्याने तुमचा समावेश करता येणार नाही असंही म्हणायचं आणि प्रस्थानत्रयीची मान्यता आहे कि नाही हे ठरवण्याचा अधिकार ब्राम्हणांनाच ! हे म्हणजे चितभी मेरी पटभी मेरी कॉईनभी मेरा !  ह्याला मी मान्यतेचं राजकारण पॉलिटिक्स ऑफ रिकग्निशन म्हणतो आणि ब्राम्हण हे वारंवार खेळत असतात  दुसरं राजकारण हे स्वीकारतेचं राजकारण म्हणजे पॉलिटिक्स ऑफ ऍक्सेप्टन्स असतं म्हणजे कधी संपूर्ण स्वीकार कधी संपूर्ण नकार कधी अर्धा कधी पाव स्वीकार म्हणजे सुरवातीला गोडसे आमचा मग आमचा पण गांधी हत्या हा त्याचा वैयक्तिक निर्णय मग तो संघाचा सभासदच न्हवता हीच गोष्ट बाबरी मस्जिदीबाबत आम्ही पाडली आम्ही नाही पाडली काही कार्यकर्त्यांनी पाडली वैग्रे 

ह्या मान्यतेच्या आणि स्वीकारतेच्या अर्वाचीन राजकारणाची सुरवात रानडे टिळकांच्यापासून होते म्हणूनच शैव फुले वैष्णव साहित्यसंमेलनाला जायला नकार देतात (निबंधकार टिळक पान १७)
मग ह्याचा अर्थ १८६० ते १९४७ पर्यंतचा भारतीय राष्ट्रवाद हा वैष्णव राष्ट्रवाद आहे का ? तर ९० टक्के हो आणि १० टक्के नाही कारण काँग्रेसमध्ये असलेले वैष्णवेतर अल्पसंख्याक !

बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तो सगळ्यांचा म्हणजे १०० टक्के सगळ्यांचा केला 

श्रीधर तिळवे नाईक 

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ८२
टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप १० श्रीधर तिळवे नाईक 




आता ह्या पार्श्वभूमीवर  टिळकांना स्पेन्सर का हवा होता हे पाहू टिळकांच्या दृष्टीने राजाराम मोहन रॉय ह्यांनी नवजाग्रणाचा टप्पा सुरु केला होता आणि गोखले रानडे तो पुढे न्हेत होते ज्याच्या पद्धतीबद्दल ते विरोधक होते टिळकांना नवजागरणानंतर असलेला प्रबोधनाचा दुसरा वैज्ञानिक प्रबोधनाचा टप्पाही हवा होता आणि यूरोपमध्ये ह्या टप्प्यात ज्याप्रमाणे ख्रिश्चन वैज्ञानिकांनी धार्मिक सत्य आणि वैज्ञानिक सत्य ह्यांची फारकत करून विज्ञान वाढवत न्हेले तसे आर्यांनी करावे अशी त्यांची इच्छा होती म्हणजेच टिळकांचा विज्ञानाला नकार न्हवता हे निश्चित ! देह आणि आत्मा हा टिळकांचा एक गाजलेला निबंध त्यात ते म्हणतात नवीन लोक दुसऱ्याच्या (म्हणजे पाश्च्यात्यांच्या ) ओंजळीने पाणी पिणारे तर जुने शास्त्री सनातन ग्रंथावर हवाला देऊन स्वस्थ बसणारे दोघेही डबक्यात साचलेल्या पाण्याप्रमाणे आहेत दोघांच्याही ठायी जिवंत झरा नाही 

ते पुढे विचारतात युरोपियांप्रमाणे प्रयोग करून उलगडा करता आला नसता काय ? ह्या प्रयोगांना उपकरण सामग्री तरी काय विशेष लागत होती ? नरसोबाच्या वाडीस अंगात होणारे भूतसंचार किंवा अपस्माराचे रोगी सापडतात काय ? शोधक बुद्धी आमच्यात उत्पन्न झालेली नाही कोणताही सिद्धांत शास्त्राच्या कसोटीस लावल्याशिवाय तो हल्लीच्या काळी ग्राह्यास धरणे शक्य नाही अशी शोधकबुद्धी बुद्धीदाता गजानन आपल्या हृदयात उत्पन्न करो अशी माझी प्रार्थना ! (पहा  निबंधकार टिळक  पान १५ व १६) 

आजच्या हिंदुत्ववाद्यांनी टिळक आणि सावरकर ह्या दोघांनाही ह्याबाबत साईडलाईन केलेले आहे असे दिसते टिळकांना विज्ञान हवं आहे आणि धर्मही स्पेन्सरमध्ये त्यांना ह्या दोघांचा हवा असणारा समन्वय आहे म्हणून टिळक स्पेन्सरवादी आहेत आणि म्हणूनच विज्ञानाबाबत ते आग्रही आहेत 

ह्या काळातील शैवांची वा ओबीसींची स्थिती तरी वेगळी होती काय ? वास्तविक ह्या काळात फुलेंनी विज्ञानाचे स्वरूप , संरचना आणि अंमल काय आहे ह्या अंगाने शोध घ्यायला हवा होता पण पेशवाईनें धास्तावलेल्या फुलेंनी आपली सगळी शक्ती सामाजिक संघर्षात खर्ची केली युरोपात वैज्ञानिक ज्ञान आणि राज्यव्यवस्था ह्यांचा जो ताळमेळ बसला तसा तो आपल्याकडे पारतंत्र्यामुळे बसत न्हवता आणि ही गोष्ट फुल्यांच्या लक्षातच आली नाही त्यांनी ब्रिटिश राज्यातच समाधान मानले फुल्यांची ही मर्यादा पुढे सगळ्या शैवांची , ओबीसींची आणि पुढे बहुजनवादाची मर्यादा बनली आहे 

सामाजिकबाबतीत फुल्यांच्यापेक्षा पूर्ण मागास असलेल्या टिळकांनी इथे मात्र बाजी मारली जगदीशचंद्र बसूंच्यापासून पंचागापर्यंत आसपास चाललेल्या त्यांच्या काळातील प्रत्येक वैज्ञानिक फिनॉमिनोत टिळक उत्साहाने सामील झालेले दिसतात ह्याचा परिणाम ब्राम्हणांच्यावर पडलाच आणि विज्ञान व तंत्रज्ञान ही नव्या युगाची गरज आहे हे ब्राम्हणांनी मनापासून स्वीकारले 

हे घडले कारण टिळकांचा स्पेन्सरवाद 

टिळक न वाचताच टिळक म्हणजे फक्त गणेश उत्सव आणि शिवजयंती समजणाऱ्या बहुजन विचारवंतांनी आपले गॉगल थोडे बाजूला काढून ठेवावेत आणि टिळक पुन्हा वाचावेत हे बरे !

श्रीधर तिळवे नाईक 


टिळकांना ह्या दोघांच्याप्रमाणे 







    ------------------------------------
    रफ वर्क  धर्माचा मूळ पाया कसा अज्ञेय गूढ आदितत्व आहे हे दाखवून दिल्यावर स्पेन्सर विज्ञानाच्या व मनाच्या आदित्वाकडे वळतो 












    टिळकांनी हा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला मात्र जे अज्ञेय आहे ते ब्रम्ह आहे ही विवेकानंदी भूमिका स्वीकारली व पुढे गीताधर्म मांडला राष्ट्राच्या जीवनात उत्क्रांती व अधोक्रांती अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात असे ते मानत 

    राष्ट्र हे अज्ञेय कमी व ज्ञेय जास्त अशा इंद्रियगोचर गोष्टींनी व व्यक्तींनी बनलेले असते 



    टिळक हे ब्राम्हणांचे हितसंबंध सांभाळत होते त्यातूनच शाहू व सयाजीराव गायकवाड ह्यांच्याबरोबर त्यांचे वाद झाले 







    आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन  वस्तुस्थिती ८०
    टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप ८
    आता ह्या पार्श्वभूमीवर  टिळकांना स्पेन्सर का हवा होता हे पाहू टिळकांच्या दृष्टीने राजाराम मोहन रॉय ह्यांनी नवजाग्रणाचा टप्पा सुरु केला होता आणि गोखले रानडे तो पुढे न्हेत होते ज्याच्या पद्धतीबद्दल ते विरोधक होते टिळकांना नवजागरणानंतर असलेला प्रबोधनाचा दुसरा वैज्ञानिक प्रबोधनाचा टप्पाही हवा होता आणि यूरोपमध्ये ह्या टप्प्यात ज्याप्रमाणे ख्रिश्चन वैज्ञानिकांनी धार्मिक सत्य आणि वैज्ञानिक सत्य ह्यांची फारकत करून विज्ञान वाढवत न्हेले तसे आर्यांनी करावे अशी त्यांची इच्छा होती म्हणजेच टिळकांचा विज्ञानाला नकार न्हवता हे निश्चित ! देह आणि आत्मा हा टिळकांचा एक गाजलेला निबंध त्यात ते म्हणतात नवीन लोक दुसऱ्याच्या (म्हणजे पाश्च्यात्यांच्या ) ओंजळीने पाणी पिणारे तर जुने शास्त्री सनातन ग्रंथावर हवाला देऊन स्वस्थ बसणारे दोघेही डबक्यात साचलेल्या पाण्याप्रमाणे आहेत दोघांच्याही ठायी जिवंत झरा नाही 

    ते पुढे विचारतात युरोपियांप्रमाणे प्रयोग करून उलगडा करता आला नसता काय ? ह्या प्रयोगांना उपकरण सामग्री तरी काय विशेष लागत होती ? नरसोबाच्या वाडीस अंगात होणारे भूतसंचार किंवा अपस्माराचे रोगी सापडतात काय ? शोधक बुद्धी आमच्यात उत्पन्न झालेली नाही कोणताही सिद्धांत शास्त्राच्या कसोटीस लावल्याशिवाय तो हल्लीच्या काळी ग्राह्यास धरणे शक्य नाही अशी शोधकबुद्धी बुद्धीदाता गजानन आपल्या हृदयात उत्पन्न करो अशी माझी प्रार्थना ! (पहा  निबंधकार टिळक  पान १५ व १६) 

    आजच्या हिंदुत्ववाद्यांनी टिळक आणि सावरकर ह्या दोघांनाही ह्याबाबत साईडलाईन केलेले आहे असे दिसते टिळकांना विज्ञान हवं आहे आणि धर्मही स्पेन्सरमध्ये त्यांना ह्या दोघांचा हवा असणारा समन्वय आहे म्हणून टिळक स्पेन्सरवादी आहेत 

    ह्या काळातील शैवांची वा ओबीसींची स्थिती तरी वेगळी होती काय ? वास्तविक ह्या काळात फुलेंनी विज्ञानाचे स्वरूप , संरचना आणि अंमल काय आहे ह्या अंगाने शोध घ्यायला हवा होता पण पेशवाईनें धास्तावलेल्या फुलेंनी आपली सगळी शक्ती सामाजिक संघर्षात खर्ची केली युरोपात वैज्ञानिक ज्ञान आणि राज्यव्यवस्था ह्यांचा जो ताळमेळ बसला तसा तो आपल्याकडे पारतंत्र्यामुळे बसत न्हवता आणि ही गोष्ट फुल्यांच्या लक्षातच आली नाही त्यांनी ब्रिटिश राज्यातच समाधान मानले फुल्यांची ही मर्यादा पुढे सगळ्या शैवांची , ओबीसींची आणि पुढे बहुजनवादाची मर्यादा बनली आहे 

    सामाजिकबाबतीत फुल्यांच्यापेक्षा पूर्ण मागास असलेल्या टिळकांनी इथे मात्र बाजी मारली जगदीशचंद्र बसूंच्यापासून पंचागापर्यंत आसपास चाललेल्या त्यांच्या काळातील प्रत्येक वैज्ञानिक फिनॉमिनोत टिळक उत्साहाने सामील झालेले दिसतात ह्याचा परिणाम ब्राम्हणांच्यावर पडलाच आणि विज्ञान व तंत्रज्ञान ही नव्या युगाची गरज आहे हे ब्राम्हणांनी मनापासून स्वीकारले 

    टिळक न वाचताच टिळक म्हणजे फक्त गणेश उत्सव आणि शिवजयंती समजणाऱ्या बहुजन विचारवंतांनी आपले गॉगल थोडे बाजूला काढून ठेवावेत हे बरे !










    गांधीत्व व हिंदुत्व हे दोघेही गीताकेंद्री असल्याने ह्या दोघांनाही वैष्णव मानायचे काय हा एक जटील प्रश्न आहे बाबासाहेब ह्या दोन्ही विचारांना हिंदू मानत होते त्याचे कारण दोघांच्याही केंद्रस्थानी गीता आहे ह्याचा अर्थ हे दोन एकाच धर्मातील दोन फाटे आहेत असे मानायचे का 

    टिळक सेक्युलर होते कि नाही ?

    टिळकांना वर्णव्यवस्था मान्य होती ती कर्मजन्य होती कि जन्मजन्य ?

    टिळकांना जातीव्यवस्था मान्य न्हवती म्हणून तर त्यांनी सुरवातीपासूनच ब्राम्हणांना आंतरजातीय विवाह करा अशी आज्ञा दिली होती आणि सर्व हिंदुत्ववादी ब्राम्हणांनीही ही आज्ञा पाळलेली दिसते आणि असे आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणात केले असे दिसते 

    गांधीत्व










    ग 




    टिप्पण्या

    या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट