राष्ट्रपती राजवटीनंतर सुचलेले शहाणपण आणि टिपण्या श्रीधर तिळवे नाईक

कोल्हापुरात एक कन्सेप्ट आहे x मणी इगो हा एखाद्या x मणात दाटला कि x मण फाटला असं कोल्हापुरात म्हंटलं जातं कन्सेप्ट जन्म पावली ती शाहू महाराजांच्या क्षत्रिय असण्याबद्दल शंका घेऊन त्यांच्यासाठी पुराणोक्तच मंत्र म्हंटले पाहिजे असा आग्रह धरणाऱ्या प्राध्यापक विजापुरेंच्या अतिशहाण्या आग्रहामुळे त्यामुळे त्यांना शेवटी कोल्हापूर सोडावे लागले मात्र जातांना ते ही एक जनसंकल्पना देऊन गेले

फडणवीसांची वाटचाल ह्या दिशेने होतीये ह्याची स्पष्ट जाणीव चंद्रकांत पाटलांना(ते जेव्हा कुणीच न्हवते तेव्हा ते आमदार तर होणारच पण मंत्रीही होणार असे भविष्य मी त्यांना सांगितले होते आणि तेव्हा ते त्यांना पटले न्हवते पण मला फ्लॅश आले कि मी मग तर्क ऐकत नाही थेट बोलतो ) झाली होती इलेक्शनमध्ये आपली शिकार केली जाऊ शकते हे लक्ष्यात आलेल्या पाटलांनी थेट पुणे गाठले कारण त्यांच्या आधीच मुख्यमंत्र्याच्या पदासाठी दावेदार असलेल्या विनोद तावडे आणि एकनाथ खडसे  ह्यांची शिकार झाली होती

फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचा हव्यास जडला जो नैसर्गिक होता त्याबद्दल कुणाची तक्रार नाही पण हा हव्यास त्यांना एक प्रकारची असुरक्षितता देऊ लागला आणि एकदा असुरक्षितता आली कि मग असुरक्षिततेचे राजकारण सुरु होते आणि स्वतःच्याच लोकांना शत्रू समजण्याची चूक व्हायला लागते देवेन्द्र फडणवीसांचे हेच झाले स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा सल्ला त्यामुळेच कानाआड केला गेला कारण फडणवीसांना काहीही करून मुख्यमंत्रिपद हवे होते शिवसेनेनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी चालवली असतांनाही देवेंद्रांनी युती केली आणि त्यातूनच आत्ताची शोकांतिका निर्माण झाली भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती तर भाजपने किमान १३५ जागा जिंकल्या असत्या आणि मग शिवसेनेनेही मुख्यमंत्रीपदाची मागणी केली नसती कारण आपल्याशिवायही मंत्रिमंडळ बनू शकते हे कळल्यावर शिवसेनेला हे धाडसच झाले नसते

ह्यानंतर जे झाले ते झाले म्हणून पुढे पाहणे आवश्यक होते शिवसेनेला " पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप "
हे वचन दिले गेले होते ही वस्तुस्थिती ह्यावेळी हे वचन भाजपने निभावयाला हवे होते पण पाच वर्षासाठी
मुख्यमंत्रीपद हवे असणाऱ्यांना समजवायचे कुणी ? ह्या वचनात मुख्यमंत्रीपद येत नाही असे तुमचे म्हणणे पण मग ह्या गोष्टी बोलल्या जात होत्या तेव्हाच तुम्ही स्पष्टपणे " पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप पण ज्याच्या ज्यादा सीट्स निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री " असे तुम्ही स्पष्ट म्हणायला हवे होते पण तुम्ही असे म्हंटले नाही कारण तसे तुम्ही म्हंटले असते तर शिवसेनेने इलेक्शन लढवायच्या जागांत  समान वाटा मागितला असता आणि तुम्हाला शिवसेनेला समान वाटा द्यायचा न्हवता म्हणजे लढायच्या जागा समान द्यायच्या नाहीत आणि जिंकलेल्या जागांवरून मुख्यमंत्री ठरवायचा आता हे तर न्यायाच्या तत्वाला धरून नाहीच आहे दोघांनीही समान जागा लढवल्या असत्या तर वचन मोडूनही भाजपची भूमिका थोडी तरी न्यायसंगत वाटली असती


हे सर्व इथेच थांबले असते तरी ठीक होते पण नाही ह्यानंतर उद्धव ठाकरेंच्यावर खोटे बोलतात म्हणून आरोप केला गेला ही म्हणजे हाईट होती  उद्धव ठाकरे ह्यामुळे भडकले ते भडकलेच उद्धव ठाकरे अमित शहांची वाट बघत होते ह्या खोटेपणाच्या आरोपाआधी ते येते तर ठाकरेंची समजूत काढणे अवघड न्हवते पण खोटेपणाचा आरोप झाला आणि समजूत काढण्याचे मार्गच बंद केले गेले

परिणामी आत्ता राष्ट्रपती राजवट ! सरकार फक्त भाजप आणि शिवसेना युतीच स्थापन करू शकली असती कारण जनादेश दोन्ही काँग्रेसच्या बाजूने नाहीच आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ह्यांची युती होऊन सरकार आले असते तरी आतापर्यंतचा इतिहास बघता नेहमीप्रमाणे काँग्रेसने काहीतरी तात्विक कारण देऊन ते एका वर्षाने पाडलेच असते शरद पवारांना ह्याची कल्पना असल्यानेच ते काँग्रेसही बोलणी करत राहिले सरकार काँग्रेसशिवाय टिकणार नाही हे त्यांना पूर्ण माहित आहे शिवसेनेने सोनियांशी थेट बोलणे आवश्यक आहे शक्यता अशी आहे कि राम मंदिराच्या निमित्ताने उत्तरेकडे जाऊन सोनियांशी बोलणी केली जातील भाजपला हे लक्ष्यात आल्यानेच राष्ट्रपती राजवट आणण्याची घाई केली गेली आहे

ह्यातून मग पुढचे चित्र काय ?

राष्ट्रवादी फुटून निघालेला काँग्रेस पक्ष असल्याने त्याची काँग्रेसशी सुप्त स्पर्धा आहे राष्ट्रवादी प्रादेशिक पक्ष असल्याने शिवसेनेशी त्याची थेट स्पर्धा आहे आणि भविष्यात त्याची खरी स्पर्धा भाजपशी आहे हे त्याला माहित असल्याने भाजप त्याचा प्रतिस्पर्धी आहे

भाजप आणि शिवसेना ह्यांच्यातील स्पर्धा खूप जुनी आहे सावरकर व प्रबोधनकार ठाकरे हे दोघेही टिळकांचे शिष्य मात्र दोघांच्या विचारसरणीत टिळकांचे हिंदुत्व हा कॉमन फॅक्टर आहे ठाकरेंचे नाते सत्यशोधक समाजाशी असल्याने त्यांच्या हिंदुत्वाला सत्यशोधकीय धार आहे जी शिवसेनेतही आहे शिवसेना हा त्यामुळेच प्रथम हिंदुत्ववादी व नंतर महाराष्ट्रवादी पक्ष आहे कारण प्रबोधनकार ठाकरे प्रथम हिंदुत्ववादी व नंतर संयुक्त महाराष्ट्रवादी झाले होते बाळासाहेब ठाकरेंनी सुरवात मराठीवादापासून केली असली तरी ते हिंदुत्ववादाकडे येणे अटळ होते कारण त्यांच्या घराण्याची ती मुख्य विचारधारा आहे हे हिंदुत्व आणि सावरकरांचे व संघाचे हिंदुत्व हे कायमच एकमेकांशी भांडत पण एकत्र नांदत आले आहे पण भाजपला आता शिवसेनेचे हिंदुत्व हे स्वतःच्या हिंदुत्वाचे प्रतिस्पर्धी वाटते गांधी हत्येमुळे संघाला व संघाच्या हिंदुत्वाला महाराष्ट्रात जागा न्हवती ही जागा बाळासाहेबांनी त्यांना मिळवून दिली उपकार लक्ष्यात ठेवणे ब्राम्हण्यवादात बसत नाही जिथे अडवाणींचीच पत्रास ठेवली गेली नाही तिथं बाकीचे कोण ? हे ब्राम्हण्य शिवसेनेच्या हिंदुत्वात नाही म्हणूनच शिवसेना शिवसेना आहे भाजपच्या दृष्टीने त्यांच्या पार्टीवाढीसाठी आवश्यक असलेला शिवसेनेचा रोल सम्पला आहे आता त्यांना महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी व्होटिंग स्वतःकडे खेचायचे आहे आणि त्यासाठी भाजपला शिवसेना गिळायची आहे  काँग्रेसलाही  राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःत विलीन करून घ्यायची आहे भाजप बाळासाहेबांच्या मृत्यूची वाट पहात होते काँग्रेस शरद पवारांच्या ! शरद पवार खमके निघाल्याने सध्या हा अजेंडा ढिला पडला आहे पण आज ना उद्या हे दोन्ही प्रादेशिक पक्ष थोडे जरी बेसावध राहिले तर त्यांची अस्मिता प्रादेशिक असली तरी आयडियालॉजी राष्ट्रीय असल्याने गिळले  जाणे अटळ आहे शिवसेनेकडे निदान मराठीचा मुद्दा आहे राष्ट्रवादीकडे तर तोही नाही केवळ सोनियांना पवार नको आहेत म्हणून व पवारांना सोनियांचे मन माहित असल्याने हा पक्ष आता वेगळा आहे असं वाटतं ह्यावर उपाय एकच आहे पवारांनी काँग्रेस गिळायला सुरवात करावी व शिवसेनेने संपूर्ण हिंदुत्व व्होटिंग स्वतःकडे वळवून महाराष्ट्रातून भाजप नामशेष करावा हे शक्य झाले तरच ह्या दोन पक्षानां भवितव्य आहे अन्यथा महाराष्ट्रात आता चाललीये तशी सत्ताखेच कायम चालू राहणार आणि शेवटी काँग्रेस राष्ट्रवादीला व भाजप सेनेला गिळणार

ह्या पार्श्वभूमीवर मनसेने काय करावे ? सर्वात प्रथम मनसे अधूनमधून जी हिंदुत्ववादी डरकाळी फोडते ती त्यांनी थांबवलेली बरी कारण त्यासाठी आता भाजप शिवसेना आहे  महाराष्ट्रात मराठी लाईन फक्त संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी यशस्वी झाली होती कारण त्यांनी हिंदुत्वाला थारा दिला न्हवता जोवर तुम्ही हिंदुत्व आणि मराठीत्व ह्यांना मेसप करताय तोवर मराठीवादी व्होटर्सना तुम्ही कधीही रिलायबल वाटणे शक्य नाही त्यामुळे राज ठाकरे जोवर शुद्ध मराठी लाईन घेत नाहीत तोवर त्यांना निवडणुकात यश मिळणे शक्य नाही त्यामुळे मंत्रिमंडळ  कुणाचंही  आलं तरी मनसेनं त्यात सामील  होऊ नये

वंचित आघाडीने आता तरी  शहाणं व्हावं आणि दोन्ही काँग्रेसबरोबर जावं फुल्यांनी केलेली चूक करू नये फुले जर काँग्रेसला सामील होते तर बहुजनवादाचे अख्खे चित्र आणि चरित्र बदलले असते आणि बहुजन काँग्रेसमध्ये आणि वादी विचारवंत काँग्रेसच्या विरोधात असे विचित्र चित्र दिसले नसते

असो सर्वांनाच शुभेच्छा !

श्रीधर तिळवे नाईक






श्रीधर तिळवे नाईक





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट