टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती श्रीधर तिळवे नाईक टिळक आणि रामायण
कुठल्याही धर्माची सुरवात यातुमंत्रांनी होते ऋग्वेद आणि इतर वेद ही सुरवात आहे त्यांनंतर मंत्रकाल संपून कथाकाळ सुरु होतो पुराणे रचली जातात मग धर्मविषयक कथा व कायदे एकत्र गुंफून कथाधर्म रचले जातात वेदांत (उपनिषदे म्हणजे वेगवेगळ्या कथा व धर्मवचने ) , बायबल जुने व नवे , कुराण हे सर्व कथाधर्म आहेत ह्यातून पुढे महाकाव्यधर्म व नाटकधर्म जन्मतात
हिंदुधर्म हा महाकाव्यधर्म व नाटकधर्म आहे सुमेरियन व ग्रीक धर्म हे महाकाव्य धर्म होते ह्यातील ग्रीकांनी पुढे नाटकधर्मही जन्माला घातला रोमन लोकांनी आर्यांनी जसा शैव धर्म नष्ट करायचा प्रयत्न केला तसा ग्रीक धर्म नष्ट करायचा प्रयत्न केला पण ऐनवेळी ख्रिश्चन धर्माने एंट्री घेऊन तिथे ख्रिश्चन धर्म स्थापन केला तसाच काहीसा प्रकार ऐनवेळी हिंदुस्तानात इस्लामने एंट्री घेऊन केला आर्य धर्माची गांधार , बलुचिस्तान , पंजाब , सिंध , हस्तिनापूर , पूर्व बंगाल ही मुख्य केंद्रेच मुस्लिम झाली आणि मुस्लिम राजवट स्थिर झाली ज्या मुस्लिमांचा आर्य द्वेष करतात त्यांना ह्या पाकिस्तानातील बहुतांशी मुस्लिम मूळचे आर्य आहेत हे सांगणे आवश्यक आहे राजपूत व भोसले शैव असल्याने त्यांनी मात्र तगडी झुंज दिली आणि त्यानेच हिंदुस्थान इस्लाममय होणे वाचले
अलीकडे ह्या रूपांनी कादंबरीधर्माकडून नाटकधर्माकडून चित्रपटधर्म व सिरियलधर्माकडे वाटचाल करायला सुरवात केली आहे मूळ महाकाव्यधर्माचा गाभा न बदलता अधिक सोर्सेसची भर घालून हे नवीन धर्म तयार केले जातायत जे मूळ धर्मातूनच उगम पावलेले असतात मूळ महाकाव्ये अलीकडे फार कुणी वाचत पण नाही पण सिरीयलचा प्रत्येक एपिसोड भक्तिभावाने पाहणारे करोडो आहेत
वैष्णव ह्या पौराणिक कथाधर्मापासून हिंदू ह्या महाकाव्यिक धर्माकडे झालेल्या वाटचालीत महाकाव्याचा व त्या महाकाव्यात असलेल्या गीता ह्या भागाचा फार मोठा वाटा आहे रामायण हे हिंदूंच्या दोन महाकव्यांपैकी एक !
साहजिकच ऋग्वेदाकडून टिळक कधीनाकधी महाकाव्यांच्याकडे वळणे अटळ होते ते प्रथम गीताधर्माच्या रूपाने महाभारताकडे वळले तर रामायणाकडे वैद्यांच्या ग्रंथरूपाने
मराठीत आणि इतरत्रही एक गैरसमजूत अशी कि रिडल ऑफ राम महाराष्ट्रात प्रथम आंबेडकरांना पडलं वस्तुस्थिती अशी नाहीये महाराष्ट्रात राम व रामायणाचे कोडे सोडवण्याचा प्रयत्न प्रथम चिंतामण विनायक वैद्य ह्यांनी १९०६ साली केला त्यांच्या ग्रंथाचे नावच मुळी द रिडल ऑफ द रामायण असे होते जे पुढे टायटल म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी थोडे बदलून स्वतःच्या ग्रंथासाठी वापरले वैद्यांच्या इंग्रजी ग्रंथाचे मराठी व्हर्जन १९११ साली आले
टिळकांना रामायणाविषयी जे म्हणायचे होते ते अचानक ह्या ग्रंथाच्या रूपाने सामोरे आल्याने टिळकांनी त्याचे
परीक्षण रामायण हा "इतिहास कि गप्पा" ह्या लेखात करून रामायणाविषयीची आपली मते मांडली आहेत टिळकांची मते ही आद्यहिन्दूसम्राटाची मते असल्याने हिंदुत्ववाद्यांवर ह्या मतांचा सखोल परिणाम झाला आहे
ही मते पुढीलप्रमाणे
१ सर्वात पहिली गोष्ट म्हणजे टिळक रामायणाला काल्पनिक महाकाव्य मानत नाहीत त्यांच्या दृष्टीने हा आर्यांच्या इतिहासाचा एक ऑथेंटिक भाग आहे रामायण इतिहास आहे
२ जगात सर्वत्र रानटी लोकांचा उच्छेद केला तसा उच्छेद रावण व इतर रानटी असल्याने केला गेला त्याची ही सत्य कहाणी आहे
३ मेक्सिकोमधील रानटी ऍस्टेक संस्कृती जी नरमेध करत होती मानवी मांस खात होती तशीच संस्कृती राक्षसांची होती रावण राक्षस होता बिभीषण राक्षस होता राक्षस लोक रानटी होते व ते माणसे मारून खात
४ ज्याप्रमाणे स्पेनच्या कोर्टेस या योध्याने मेक्सिकोतील ऍस्टेक ह्या राक्षस सदृश्य लोकांचा व त्यांचा सम्राट मॉंटेझुमाचा पराभव करून त्यांच्या नरमांसभक्षणासारख्या प्रथांचा नायनाट केला त्याप्रमाणेच रामाने नरमांसभक्षक राक्षसांचा नायनाट केला म्हणजे राम हा कोर्टेस रावण हा सम्राट मॉंटेझुमा व ईस्टलीलचितल म्हणजे बिभीषण असे समजायला हरकत नाही
५ आर्य इराणकडून अफगाणिस्तानातून सरकत उत्तर भारत असे सरकत आले व नंतर ते दक्षिणेकडे घुसले रामायण हे आर्य उत्तर भारतातून दक्षिण भारतात कसे शिरले त्याचा इतिहास आहे
राम दक्षिणेत शिरलेला पहिला वन्दनीय आर्य पुरुष असल्याने त्याची जन्मभूमी अयोध्या असल्याने तिथे त्याच्या जन्मस्थानी मंदिर बनणे हे त्यामुळेच योग्य ठरते ही हिंदुत्ववादी मांडणी त्यामुळेच टिळकांच्या हिंदुत्ववादी मांडणीशी सुसंगतच ठरते
श्रीधर तिळवे नाईक
परीक्षण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा