आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ५१ ते ६० श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ५१ ते
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ५१
टिळक भांडारकर आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान ४
आमच्या इतिहासाच्या पुस्तकात आर्य कास्पियन समुद्राजवळूनच भारतात आले अशी मांडणी यायची कुणी आर्यांना भारताच्या बाहेरून यायला सांगितले ह्याचा इतिहासच सांगितला जायचा नाही जर विसाव्या शतकात १९७८ साली ही अवस्था असेल तर १८९८ साली टिळकांची अवस्था वेगळी काय असणार ?
टिळकांच्या आधीच भांडारकरांनी वंशवादी सिद्धांताची बीजे आपल्या इतिहासलेखनात पेरून ठेवली होती आ
कुंटेंच्या लिखाणात ती उगवली आर सेसच्या गुरुजींच्या लिखाणाचं मूळ कुंटेंच्याThe Vicissitudes of Aryan Civilization in India ह्या ग्रंथात आहे कुंटे तर एके ठिकाणी स्पष्ट म्हणतात ," The Aryas are essentially superior to the non-Aryas. The social history of India is the history of the relative bearing of the two races on one another. . . . The division of the Aryas into Brahmajas, Ksatriyas, and Vaishyas has become obsolete. It is distinctly asserted that there are now only two castes – the Brahmajas and the Shudras."
कुंटेच्या ह्या मांडणीला चिपळूणकरांचा विरोध होता कारण ते ह्या लिखाणाला ब्रिटिशांची चाटूगिरी म्हणून बघत होते ह्या काळात इंडियन आर्य व वेस्टर्न आर्य ह्या दोन संज्ञा इतक्या प्रचलित झाल्या होत्या कि
Old Indian Institute Building, Oxford, च्या उदघाटनप्रसंगी (दिवस दोन मे १८८३ ) जो शिलान्यास झाला त्यावर लिहिले होते
saleyam pracyafastrajaÅ jñanottejanatatparaih / paropakaribhih sadbhih sthapitaryopayogini //1//
albartedvarditikhyato yuvarajo mahamanah / rajarajefvariputras tatpratisthaÅ vyadhat svayam //2//
akkaramakkacandre’bde vaifakhasyasite dale / dafamyaÅ budhavasare ca vastuvidhir abhud iha //3//
ifanukampaya nityam aryavidya mahiyatam / aryavartakglabhumyof ca mitho maitri vivardhatam //4//
This Building, dedicated to Eastern sciences, was founded for the use of Aryas (Indians and Englishmen) by excellent and benevolent men desirous of encouraging knowledge. The High-minded Heir-Apparent, named Albert Edward, Son of the Empress of India, himself performed the act of inauguration. The ceremony of laying the Memorial Stone took place on Wednesday, the tenth lunar day of the dark half of the month of Vaifakha, in the SaÅvat year 1939 ( Wednesday, May 2, 1883). By the favor of God may the learning and literature of India be ever held in honour; and may the mutual friendship of India and England constantly increase!
म्हणजे ही इमारत जी पौर्वात्य शास्त्रांच्या अभ्यासासाठी डेडिकेट केली आहे इंडियन व इंग्लिशमेन ह्या दोन प्रकारच्या आर्यांसाठी स्थापन केली आहे आता इतक्या स्पष्टपणे आर्यत्वाची ग्वाही फिरत असल्यावर जे आर्य नाहीत त्यांना खालच्या नजरेनं पाहिलं जाणं अटळ !
हे इथं सांगण्याचं कारण अलीकडे लार्स फॉसी सारख्या काही युरोपियन विचारवंतांनी देशी आर्यवाद हा हिंदुत्वाचा एक महत्वाचा पाया आहे असं म्हंटल आहे ह्यांना टिळकांचा हिंदुत्ववाद माहित नसल्याने हे सुचलं आहे टिळकांचा हिंदुत्ववाद आर्य बाहेरून आलेत हे सत्य स्वीकारतो त्यामुळेच इंग्रजांच्याबाबतीत जी कट्टर शत्रुत्वाची भूमिका निर्माण होण्याची शक्यता असते ती टिळकांच्यात निर्माण होत नाही ऍलन ह्यूम किंवा ऍनी बेझंट ह्यांच्याबद्दल टिळकांना जे प्रेम वाटते त्याचे कारणच हे लोक आपले आर्यबंधूभगिनी आहेत ह्या त्यांच्या धारणेत आहे अनेकदा ह्या काळापासून जे भारतीय लोक यूरोप अमेरिकेत सेटल झाले त्यांना परात्मता कमी वाटण्याचे कारण हे व्हाईट आर्य आपले आर्यबंधूभगिनी आहेत ही असलेली धारणा खुद्द वेस्टर्न आर्यांनाही भारतीय आपले आर्यबंधूभगिनी वाटत असल्याने त्यांनीही त्यांच्या स्थलांतराचे स्वागतच केल्याचे दिसते पण ह्यातूनच एक रोगपण जन्माला आला तो म्हणजे कृष्णवर्णीयांच्याविषयी असलेला द्वेष रामकृष्णशिव विसाव्या शतकात जास्तीत जास्त निळे केले गेले कारण ह्या लोकांचा देवांचा काळा रंग झेलणे ह्या स्थलांतरित मूळ भारतीय वंशाच्या युरोपियन लोकांना शक्य न्हवते ह्यातूनच दाक्षिणात्त्य लोकांना मागासलेले समजण्याची खोड जडली आणि त्यांच्या उच्चारांची टर उडवली गेली काळ्या रंगासाठी फेअर अँड लवली त्यातून वाढत गेले आर्यवाद हा वंशवर्णवाद जन्माला घालतो आणि आदीनिवासी लोकांच्याबाबत निर्घृण नीच आणि क्रूर बनवतो अगदी काळ्या ब्राम्हण लोकांनाही (विशेषतः स्त्रियांना )टॉन्टिंग करतो (पुण्यासारख्या शहरात तर देशस्थ ब्राम्हणांना खालचे समजणारे महाभाग आढळतात )हिंदुत्ववाद्यांनी गांधींच्या रूपाची केलेली चेष्टा ही त्यांच्या ह्या आर्यन मानसिकतेतून आलेली आहे काहीजणांनी तर आर्यांच्या गोऱ्या गोऱ्या रुपड्यावर अनार्य बायका कशा फिदा होत ह्याची वर्णने केली आहेत सुपर्णखा कशी लक्ष्मणाच्या मागे लागली आणि लक्ष्मणाने कसे तिचे नाक कापले ही गोष्ट ह्याचेच एक प्रारूप ! लिहिणाऱ्याला सु म्हणतांना लाज वाटते आणि तो शु लिहितो त्यावरूनही हे स्पष्ट व्हावे वस्तुस्थिती अशी आहे कि नंतरच्या काळातही इतर संस्कृतीविषयीचा अनादर स्पष्टच दिसतो अगदी आजसुद्धा तामिळ लोकांना हिंदी स्वीकारायला लाज का वाटते असा प्रश्न विचारला जातो आणि हेच उलट हिंदी लोकांनी तामिळ शिकावी म्हंटल कि कपाळ्याला आठ्या तुम्ही आमची भाषा शिका तुमची भाषा आम्ही शिकणार नाही हा अटीट्युड ! डरपोक स्वतःला आर्यन समजणाऱ्या मराठी लोकांनी तो अटीट्युड झेलावा शैव असलेल्या बंगाली साऊथवाल्यांनी तो का झेलावा ?आर्यवाद हा इतरांची संस्कृती गिळण्याचे कारस्थान असते आणि ह्याची सुरवात भांडारकर कुंटे चिपळूणकर टिळकांनी केली एरव्ही नेमस्त आणि जहाल म्हणून भांडणारे आर्यवादाबाबत मात्र कसे एक होतात हे पाहण्यासारखे ! (आगरकरांच्या सारखा मोहराही ह्याबाबत खर्ची पडला आहे )हे सांगण्याचे कारण ह्या एतद्देशीय आर्यवादाची सुरवात कुंटेन्नी केली आहे तर मार्गी हिंदुत्ववादाची सुरवात चिपळूणकर टिळकांनी केली आहे मात्र कुंटेंचा सामाजिक सुधारणांना विरोध करण्याचा अजेंडा मात्र टिळकही मिरवताना दिसतात
आत्ताचा देशी हिंदुत्ववाद जो आर्य भारतातलेच होते व भारतातून सर्वत्र पसरले असे मानतो अलीकडे उगवला आहे पण तो सुरवात नाही हिंदुत्ववादाची सुरवात टिळकांच्या मार्गी हिंदुत्ववादापासून झाली आहे
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ५२
टिळक कुंटे आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान ५
अवकाश ही एक फार गुंतागुंतीची गोष्ट व्हायला सुरवात झाली ती सृष्टीयतेमुळे! युरोपियन साम्राज्यांनी जागतिक भूगोल निर्माण केला आणि राष्ट्रीय भूगोलही ! प्रत्येक राष्ट्र अनेक प्रांतांनी बनलेले असते त्यांच्यामुळे प्रांतीय भूगोल तयार झाला आणि प्रांतांच्यात जिल्हे आले जिल्ह्यात तालुके तालुक्यांच्यात बाजारपेठेची पंचक्रोशी गोळा करणारी महागावे आणि ह्या महागावात गावे गावात खेडी आणि पाडी हा राजकीय अवकाशाचा भूगोल होता भारतात ब्रिटिशांच्यापूर्वी प्रांतीय राज्ये होती आणि अपवादात्मक अनेक प्रांतांची साम्राज्ये ! ही साम्राज्ये राष्ट्रे होती का ? तर नाही ! कारण राष्ट्रांना लिखित राज्यघटना असते आणि तिच्या छापील प्रति सर्वांना उपलब्ध असतात राज्यात राजा करे सो कायदा हीच स्थिती असते राष्ट्रात लोकशाहीच असते आणि ज्या राष्ट्रात लोकशाही नसते त्या लोकशाहीचे रूपांतर साम्राज्यात होते आत्ताचा चीन हा राष्ट्र नाही तर कम्युनिस्ट राज्य व साम्राज्य आहे राष्ट्रे स्वतःच्या देशात राष्ट्रवादी आणि इतर देशांबाबत साम्राज्यवादी असू शकतात जसे ब्रिटन होते आज आपण राजकीय भूगोलाचा उल्लेख जागतिक , राष्ट्रीय , प्रांतीय व जिल्हिय असा करतो आर्यांचे आक्रमण जागतिक मानायचे कि एका जिल्ह्याने दुसऱ्या जिल्ह्यावर केलेल्या आक्रमणासारखे मानायचे कि ते राजकीय मानायचेच नाही ?
टिळक ज्या आर्यांच्याबद्दल बोलतायत ते कुंटेंच्या मते कसे होते ?
कुंटेंच्या मते ,"The ancient Aryas were at first, that is, long before they invaded India, savages who hunted wild beasts and lived upon their flesh, the whole animal being cooked. Some of them formed a gang, and intoxicated with the Soma-juice, went a-shooting, yelling as frantically as possible, brandishing their rude javelin-like poles, and overcame their wild adversary in the recesses of a jungle more by dint of a furious onslaught, than by a sustained effort. They had not constructed even rude huts to live in. "(The Vicissitudes of Aryan Civilization in India.: 7)
जंगली , पशूंची शिकार करणारे , सोमरस पिणारे , झोपडीही बांधता न आलेले असे हे आर्य आहेत
साहजिकच हे आर्य चिपळूणकरांना मान्य होणे शक्य न्हवते पण आंबेडकरवाद्यांना व फुलेवाद्यांना हे मान्य होते कारण त्यांच्या मते अनार्य आर्यांच्यापेक्षा अधिक सुसंस्कृत होते
ह्याचा अर्थ स्पष्ट आहे प्राचीन मागासलेल्या आर्यांचा सुरवातीचा भूगोल हा राजकीय होऊच शकत न्हवता कारण ते रानटी भटके होते . अरियाणात स्थिर झाल्यावरच त्यांचा राजकीय भूगोल निश्चित झाला त्यामुळेच त्यांच्या टोळ्यांच्यात शासनव्यवस्था होती पण स्थिर भूमी नसल्याने राज्य न्हवते
मग त्यांच्या अवकाशाचे स्वरूप तरी काय होते ?
मानवाचा सांस्कृतिक अवकाश पूर्वीपासूनच मार्गी देशी पोटी आणि जमातीय होता आणि चौथ्या नवतेत त्यात महामार्गी महादेशी महापोटी आणि महाजमाती अशी भर पडलीये
आर्यांचा सांस्कृतिक अवकाश हा जमातीय होता आणि कुंटेंच्या मते अनार्य म्हणजे दस्यु हेही जमाती रूपात पण मागासलेले असल्याने त्यांच्यावर मात करून एका अर्थाने स्वतःला महाजमाती बनवून आर्यांनी आर्यावर्त बळकावला ज्याप्रमाणे युरोपियन आर्यांनी मागासलेल्या अमेरिकन लोकांना पराभूत केले तसेच ह्या भारतीय पुढारलेल्या आर्यांनी मागासलेल्या आर्यांना पराभूत केले कुंटेंना माझा प्रश्न असा कि एव्हढे पुढारलेले होते तर भारतासारख्या मागासलेल्या दस्युन्च्या देशात आलेच कशाला तेही बायकापोरे घेऊन ?
टिळकांच्यावर भंडारकरांच्याइतका कुंटेंचा प्रभाव पडला नाही कारण तर्काचा अभाव ! मात्र त्यांच्या अरियन ह्या मुलस्थानाबाबत टिळकांनी विचार केला असावा
एक विचित्र गोष्ट दिसते ती अशी कि मनुसारखा कट्टर कर्मठ कायदेकानूंनवालाही जमातींना आपली स्मृती लागू नाही असे सांगतो आणि वनातून आलेल्या राजाचे आर्य राजाचे स्वागत करावे असे सांगतो ही भानगड काय आहे
मनूकडे जमातीबद्दलची ही सहानुभूती कुठून आली कदाचित कधीकाळी आपणही जमाती होतो त्यातून ती तयार झाली असावी रामायणातही सुपर्णखेबद्दल कठोर असणारा राम शबरीबद्दल मात्र प्रेमळ होतो वाल्मिकी स्वतः जंगलातून आल्याने हे घडलेले नाही ना ?
ह्याचा एक फायदा असा दिसतो कि आर्यांनी काही अपवाद वगळता शक्यतो जमातींना त्रास दिलेला नाही जन्गलात राहतायत राहू देत अशीच धारणा दिसतीये अपवाद जेव्हा जमीन लागली तेव्हा ! तेव्हा मात्र खांडववन क्रूर होऊन जाळले गेले आहे अर्थात आदिवासी गप्प बसलेत असं दिसत नाही त्यांनी श्रीकृष्णाला बाण मारून संपवलं आहे म्हणजेच जमिनी व जंगल ताब्यात घेऊ न देणाऱ्या आदिवासी राज्यांशी शत्रुत्व पण शबरीसारख्या फक्त शासनव्यवस्था असलेल्या आदिवासींच्याबद्दल सहानभूती असे आर्यांचे धोरण दिसते
एक गोष्ट स्पष्टच दिसते जर आर्य बाहेरून आलेच असतील तर ते टोळ्याटोळ्यांनी आले असावेत म्हणजे हे जे आक्रमण झाले आहे ते जमातींचे छोट्या छोट्या सिटीस्टेटवर नगरराज्यावर पूरांवर झालेले आक्रमण आहे कुंटे समजतात तसे अनार्य मागासलेले न्हवते उलट अधिक सुसंस्कृत होते इंद्राला त्यामुळेच पुरंदर पुरांचा नाश करणारा म्हंटले आहे एका अर्थाने रानटी टोळ्यांनी सुसंस्कृत नगरराज्यावर पुरावर केलेले हे आक्रमण आहे आणि युरोपियन सिटीस्टेटवर आक्रमण करणाऱ्या रानटी टोळ्याप्रमाणे ते झाले असावे
कुंटे आर्यांचा इतिहास १ आर्यांचे आक्रमण
२ अनार्यांचे गुलामीकरण
३ बुद्ध धर्माद्वारा अनार्यांचे पुनर्जीवन
४ त्याला छेद देऊन ब्राम्हण धर्माचे पुरुज्जीवन
५ मग सर्वच अनार्यांचे झालेले आर्यीकरण व ब्राम्हणीकरण -ब्राम्हणायझेशन (हो हाच शब्द कुंटेंनी वापरला आहे समाजशास्त्रात ह्या संकल्पनेचे श्रेय विनाकारण एम एन श्रीनिवासांना कधीकधी दिले जाते जे चूक आहे )
अशा तऱ्हेने इतिहास मांडतात ज्याचा पुढे बाबासाहेब आंबेड्करांच्यावर प्रभाव पडलेला आहे फक्त बाबासाहेब विरुद्ध पार्टीत आहेत कुंटेंचा बुद्ध हा अनार्यांचा नेता आहे ब्राम्हण धर्माने बौद्धांचा पाडाव करून सर्वच अनार्यांचे आर्यीकरण व ब्राम्हणीकरण घडवले असे कुंटे सांगतात
एक गोष्ट मला दिसते ती अशी कि आर्यांना जो हा मोठा विजय मिळाला तो त्यांना ऋग्वेदांतल्या मंत्रांच्यामुळे व आपल्या वैदिक तत्वांच्यामुळे मिळाला असा तत्कालीन आर्यांचा ठाम समज होता साहजिकच वेदांच्यावर त्यांची श्रद्धा बसली व पुढे मुसलमानांचेही हेच झाले साहजिकच वैदिकांच्या दृष्टीने वेद हे ग्रंथ विजय मिळवून देणारे धर्मग्रंथ बनले मुसलमानांच्याबाबतही कुरणासंदर्भात हेच घडले वैदिकांची ब्राम्हणांची आणि मुसलमानांची ही जी कट्टर मानसिकता बनली आहे तिला कारण प्रत्यक्ष रणांगणात मिळालेला विजय आहे आणि त्यांच्या मते हे विजय त्यांना त्यांच्या धर्मग्रंथावरील श्रद्धांमुळे मिळालेले आहेत
ह्याला धक्का दिला तो ब्रिटिशांनी ! वैदिक , ब्राम्हण व मुसलमानांच्या ह्या मंत्रांचे व धर्मग्रंथांचे ब्रिटिशांच्यापुढे काहीच चालले नाही पारंपरिक मंत्र तोवरच बलवान वाटतात जोवर ते विजयी होतात विजय बंद मंत्र अडगळीत साहजिकच ब्रिटिश जे जे करतात ते ते आदर्श झाले आणि मग ब्रिटिशांना नेमका का विजय मिळाला ह्याची चिकित्सा सुरु झाली पण ह्याचे काही दुष्परिणामही झाले उदाहरणार्थ ब्रिटिशांच्या काळात आर्यांना वाटणारा जमातीविषयीचा आदर पूर्ण संपला कारण ब्रिटिशांना असा आदर न्हवता उलट ब्रिटिशांनी बहुसंख्य आदिवासी जमाती राज्ये ताब्यात घेतली आणि आदिवासी जमिनी व जंगल बळकावली इतकेच न्हवे तर ह्या पापात प्रामुख्याने ब्राम्हण व मुसलमानांना सामील करून घेतले व त्याचा ह्या दोघांनाही प्रचंड आर्थिक फायदा झाला ह्यात आदिवासी कंगाल झाले आणि ब्रिटिश ब्राम्हण व मुस्लिम जमीनदार फळफळलें ब्रिटिशांनी क्षत्रियांना पाटीलकी दिली अपवादात्मक क्षत्रियांना जमीनदारी दिली आणि जे जमीनदार होते त्यांची जमीनदारी शाबूत ठेवली आणि जे संस्थानिक होते त्यांना तर सांभाळलेच सांभाळले एका अर्थाने ब्रिटिशांनी गीता धर्म पाळला कारण त्यांनी हिंदू व मुस्लिम धर्मातील ब्राम्हण व क्षत्रिय ह्या पुण्ययोनींची पुण्ययोनी म्हणून व्यवस्थित बडदास्त ठेवली वाट लावली ती वैश्य व शूद्र ह्या पापयोनीजची आणि आदिवासी ह्या अयोनीजची !
ब्रिटिशांचा हा आदर्श ब्राम्हणप्रधान काँग्रेसनेही गिरवला आदिवासी जमाती राज्ये सामावून घेतली पण जमातींच्याकडे साफ दुर्लक्ष्य केले पुढे जेव्हा आदिवासींची धर्मांतरे सुरु झाली तेव्हा मग विश्व हिंदू परिषदेला जाग आली तोपर्यंत पूर्व भारत हिंदूंच्या हातातून निसटून ख्रिश्चन झाला होता
म्हणजेच आर्यांनी केलेल्या आक्रमणात स्वतःच्या जमाती भूतकाळाला जे मूल्य प्राप्त झाले होते ते ब्रिटिशांच्या कलोनियल राजवटीत उरले नाही
ह्याउलट ब्रिटिशांना सुरवातीला जरी अस्पृश्य अयोनीजचीही फिकीर न्हवती तरी पुढे आंबेडकरांच्या उदयानंतर त्यांच्या लक्ष्यात आले कि अस्पृश्य अयोनीजना आपल्या बाजूला ठेवण्यातच फायदा आहे यदाकदाचित शुद्रांनी विशेषतः शेतकऱ्यांनी बंडे केली तर त्यांच्यावर कंट्रोल करायला पूर्वाश्रमीचे अस्पृश्य अयोनिज उपयोगी आहेत
ब्रिटिशांना अयोनीजची फिकीर वाटायला लागली म्हणून काँग्रेसलाही ही फिकीर वाटायला लागली त्यामुळेच टिळकांच्या हिंदुत्वाला अस्पृश्यांची १८९२ नंतर काळजी वाटायला लागली १६ मे १८९३ च्या केसरीच्या अंकात टिळकांनी पूर्वीइतकी कडक जाती बंधने आता चालावयाची नाहीत असे सांगून ह्याची सुरवात केली
ह्या सगळ्याचा एकंदर अर्थ काय ? तर ब्रिटिश आक्रमणाने आर्यांच्या आक्रमणाचाही शोध लावला ब्रिटिश येईपर्यंत आर्यांना आपण बाहेरून आलोय हे माहित न्हवते पण पुढे भाषारचनाशास्त्रामुळे जेव्हा इंडोयुरोपियन भाषा संकुलाचा शोध लागला तेव्हा ब्राम्हणांनाही आपण इंडोयुरोपियन आहोत असे वाटू लागले आणि ते ब्रिटिशांच्या नादी लागून स्वतःला इंडियन आर्य समजायला लागले साहजिकच हे आक्रमण सोयीस्कर असल्याने ह्या आक्रमणाचा ते धांडोळा घेऊ लागले आता एकदा आक्रमण मान्य केले कि आर्य बाहेरून आले हेही स्वीकारावेच लागते आणि मग त्यातूनच बाहेरून आले म्हणजे कुठून आले हा प्रश्न निर्माण होतो
हाच प्रश्न टिळकांना पडला
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ५३
टिळक पावगी आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान ६
रामकृष्ण भांडारकर आणि महादेव कुंटे ह्या दोन आर्य आक्रमणाचा सिद्धांत स्वीकारणाऱ्यांच्या मांडण्या आपण पाहिल्या इतर विचारवंत आर्यांच्या प्रश्नाकडे कसे पाहत होते ?
आर्य सिद्धांत १९ व्या शतकात न्यायमुर्ती रानडेंनीही उचलून धरलेला दिसतो किंबहुना सुधारणा ह्या पूर्वीच्या आर्य समाजात होत्याच पण काही कारणाने पतन झाले आम्ही ज्या सुधारणा मागतो आहोत त्या आर्य समाजात पूर्वी होत्याच म्हणूनच त्या करणे आवश्यक आहे असे रानडे सातत्याने म्हणतायत
फुल्यांनी हा आर्य आक्रमणाचा सिद्धांत कसा उचलून धरला ह्याची चर्चा मागे केलीच आहे
मात्र ह्यातून काही विनोदी प्रसंगही घडलेले आहेत म्हणजे रानडे मद्रास मध्ये गेल्यावर त्यांची चांगलीच गोची झाली होती कारण समोर द्रविड होते त्यांना म्हणणार कसं कि आर्य संस्कृती श्रेष्ठ आहे आणि तुम्ही मागासलेले आहात . रानडेंनी द्रविड संस्कृतीही श्रेष्ठ आहे म्हणून मार्ग काढला अशीच गोची विवेकानंदांची झाली होती त्यांनी तामिळ संस्कृती माझी आई आहे असं म्हणून मार्ग काढला होता मात्र आर्यांचे आक्रमण त्यांनी नाकारले होते
द्रविड संस्कृतीने आर्यांची जेवढी पंचाईत करून ठेवलीये तेवढी फुल्यांनीही केलेली नसावी असो
ह्या पार्श्वभूमीवर चिपळूणकर ह्या टिळकांच्या मार्गदर्शकाकडे वळल्यावर काय दिसते ?
टिळकांचे मार्गदर्शक चिपळूणकर वेगळे आहेत आर्य कुठून आलेत त्यापेक्षा आत्ता आर्यांची स्थिती काय असा त्यांचा प्रश्न आहे त्यांना हा सिद्धांत मान्य होता आर्य आणि हिंदू हे दोन्ही शब्द चिपळूणकर समानार्थी वापरतात हे लक्षणीय आहे पण त्यांची मांडणी अशी होती कि भारतीय आर्य हे ब्रिटिशांच्यापेक्षा सरस आहेत दुसरी गोष्ट जर दोघेही आर्य आहेत तर ब्रिटिश आर्य भारतीय आर्यांच्या हातात ह्या देशाचा कारभार सोडून ब्रिटनमध्ये का जात नाहीत ?
थोडक्यात काय तर १९व्या शतकात भांडारकरांनी भाषारचनाशास्त्राचा वापर करून आर्यांचा हाताळलेला प्रश्न हीच मराठी लोकांच्यातली सर्वात शास्त्रीय मांडणी होती तर बहुजनांची बाजू घेऊन फुल्यांनी अर्थनिर्णयनात्मक पद्धतीने केलेली हाताळणी ही सर्वात मोठी उलथापालथ करणारी मांडणी होती ह्या दोन मांडण्याखेरीज इतर मांडण्या तितक्या महत्वाच्या न्हवत्या मात्र चिपळूणकरांचा ,"दोघेही आर्य आहेत तर ब्रिटिश आर्य भारतीय आर्यांच्या हातात ह्या देशाचा कारभार सोडून ब्रिटनमध्ये का जात नाहीत ?" हा प्रश्नही महत्त्वाचाच होता
ह्या सर्व मांडण्याच्यापेक्षा एक पूर्ण तिसरी महत्वाची मांडणी फार पूर्वीच आली ती एका फ्रेंच पंडितांकडून !पुन्हा एका हिंदुत्ववाद्याकडूनच ती नव्याने टिळकांच्या काळात मांडली गेली मात्र ती आर्य आक्रमणाचा सिद्धांत नाकारणारी होती ह्या मांडणीने ही मांडणी हा सिद्धांत मांडणाऱ्याचे नाव होते नारायण भवानराव पावगी पावगीनीं १८९० - ९२ मध्ये जो त्यांच्या इतिहासलेखनाचा व्यापक प्रोजेक्ट हातात घेतला त्यात त्यांनी दुसऱ्या खंडात मॅक्स्मुलरऐवजी फ्रेंच पंडित क्रूझरचा हवाला दिला (पान क्र १ ते १८) क्रूझरच्या मते पृथ्वीवरील मानवाचे मूळ हे हिंदुस्थान असून तिथूनच जगभर माणूस किंवा माणसाची उन्नती उगम पावली व पसरली पावगीच्या मते आर्यांचे मूळ स्थान उत्तर हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान होय इथूनच आर्य जगभर पसरले एल्फिन्स्टनच्या इतिहासातील उल्लेख ते त्यासाठी आधाराला घेतात द्रविडांना ते तुराणींच्यामध्ये टाकतात व हे लोक फक्त अडथळे आणण्याचे काम करतात असे म्हणतात तर शमिंच्यात ते अरबांचाही समावेश करतात
काबुल म्हणजे पूर्वीची कुंभा नदी तिच्या काठी वेदलिखाण सुरु झाले व पुढे आर्य गंगायमुना व नंतर दक्षिणापथ असे पसरत गेले अशी त्यांची मांडणी आहे वायव्येतून ते पुढे जगभर पसरले असेही ते म्हणतात
टिळकांची जडणघडण ह्या लोकांच्या लिखाणावर झालेली होती मात्र टिळक जे काही मांडायला निघाले होते ते ह्या लेखकांच्यासारखे केवळ उसने न्हवते तर त्यात काही मुद्दे असे होते जे जगात कुणालाच सुचले न्हवते मुख्य म्हणजे एम एम देशपांडेंनी म्हंटल्याप्रमाणे इतर लोक राजकीय न्हवते तरी त्यांची मांडणी राजकीय होती तर टिळक मात्र हिंदुस्तानचे पहिले राष्ट्रीय पुढारी असूनही ते अधिकाधिक शास्त्रीय राहून आपली मांडणी करण्याचा प्रयत्न करत होते
मी मागे म्हंटल्याप्रमाणे टिळक हे गुंतागुंतीचे होतात ते असे !
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ५४
आमची पिढी टिळकांच्या आर्य अभ्यासाकडे पुन्हा का वळली ?टिळक आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान ७
प्राचीन संहितांचा अभ्यास करतांना माझी स्वतःची एक पद्धत आहे मी ह्या काळात पंचमहाभूते महत्वाची असल्याने पंचपुरावे पाहतो पंचपुरावे म्हणजे
१ आकाशपुरावे
२ भूमिपुरावे
३ जलपुरावे
४ वायुपुरावे
५ अग्निपुरावे
त्यानंतर मग
१ चिन्हपूरावे
२ अनुमानात्मक पुरावे
ह्यांचा विचार करावा ह्या मताचा मी आहे
आर्यांच्या आक्रमणाबत चिन्हपुराव्याचाच विचार प्रथम झाला कारण आर्यसिद्धांत हाच मुळात भाषासिद्धान्ताच्या आधारे जन्मला भाषांच्या साम्यामुळे वंश एक असावा असा विचार जन्मला पुढे मग इंड्सचा शोध लागल्यानंतर अचानक भारतीय संस्कृतीचा काळ इसवीसनपूर्व १३०० कडून थेट ३००० ते ५००० इसवीसनपूर्व झाला आणि स्वतःला आर्य समजणाऱ्यांची पंचाईत झाली त्यातच व्हीलरने म्हंटले ,"
The Aryan invasion of the Land of Seven Rivers, the Punjab and its environs, constantly assumes the form of an onslaught upon the walled cities of the aborigines. For these cities the term used in the ¸igveda is pur, meaning a “rampart,” “fort” or “stronghold.” ...Indra, the Aryan War god, is puraydara, “fort-destroyer.” He shatters “ninety forts” for his Aryan protégé Divodasa. [...] Where are – or were – these citadels? It has in the past been supposed that they were mythical, or were “merely places of refuge against attack, ramparts of hardened earth with palisades and a ditch.” The recent excavation of Harappa may be thought to have changed the picture. Here we have a highly evolved civilization of essentially non-Aryan type, now known to have employed massive fortifications, and known also to have dominated the river-system of north-western India at a time not distant from the likely period of the earlier Aryan invasions of that region. What destroyed this firmly settled civilization? Climatic, economic, political deterioration may have weakened it, but its ultimate extinction is more likely to have been completed by deliberate and large-scale destruction. It may be no mere chance that at a late period of Mohenjo-daro men, women and children appear to have been massacred there. On circumstantial evidence, Indra stands accused. (Wheeler 1947: 82)"
ह्याचा एक परिणाम असा झाला कि आर्यांचे आक्रमण झाले अशी ओरड सुरु झाली कारण हा मुद्दा भूमिपुराव्याच्या आधारे मांडला गेला आहे असा दावा केला गेला पूर ही वस्तुस्थिती होते व इंद्राने पूर नष्ट केले असं मानलं जाऊ लागलं अचानक इंद्र बहुजनवादांचा व्हिलन झाला
एकदा आक्रमण निश्चित झाले कि मग बाहेरून आर्य कुठून आले ह्याचा धांडोळा सुरु होतोच इंद्र हा फक्त आर्यांचा पावसाचा देव आहे ही गोष्टच विसरली गेली त्यामुळे जलपुरावे शोधण्याऐवजी इंद्राला राजा मानून त्याने ह्या आक्रमणाचे नेतृत्व केले असा सिद्धांत पुढे आला
पुढे अधिक उत्खनने झाली तेव्हा आक्रमणाचे पुरावे इतरत्र मिळेनात मग १९६४ साली जॉर्ज एफ डेल्सने द मिथिकल मॅसाकर ऑफ मोहेंजोदडो नावाचा निबंधच लिहिला ह्यातून मग स्वतःला आर्य समजणाऱ्यांना बळ मिळालं त्यांचा आर्य असण्याचा गिल्ट गेला आम्ही आक्रमण केलेलं नाही आम्ही शांततेने नांदलो असा हा दिलासा होता
हा दिलासा फार काळ टिकला नाही कारण आर्यांच्या गोऱ्या रंगामुळे ते बाहेरून आलेत ह्याची खात्री असलेल्या लोकांच्या बाजूने तीन गोष्टी होत्या
१ आर्यांचे घोडे ते सिंधू संस्कृतीत मिळत न्हवते भारतातही सापडत न्हवते
२ सरस्वती नदी ती भारतात अस्तित्वात न्हवती
३ ऋग्वेदाची भाषा आणि अवेस्ता ह्यांच्यातील साम्य
अवेस्ता अफगाणिस्तानात व इराणात निर्माण झाल्याचे पूर्वीपासूनचे पुरावे असल्याने पुन्हा लक्ष्य तिकडे वळले अवेस्तात हेल्मन्ड नदीचा उल्लेख हरखवती असा असल्याने आणि सचा ह करण्याच्या प्रवृत्ती असल्याने (जसा कि सिंधू चा हिंदू ) अफगाणी लोकांनी सरस्वतीचा हरखवती केला असे मानायला जागा होती आर एस शर्मानी ह्या अंगाने १९९९ साली एक मांडणी केली आहे पुढे स्टेपमध्ये अचानक उत्खनन होऊन तिथे रथ व घोडे प्रथम हाताळल्याचे पुरावे पुढे येऊ लागले आणि स्टेप ते अफगाणिस्तान अशी घौडदौड इतिहासकारांना दिसू लागली
पण भारतात आर्य वेगळ्या मूडमध्ये ! आक्रमण केल्याशिवाय थांबतील तर ते आर्य कसले बाहेरून आक्रमण केले नाही हे सिद्ध झाले पण बाहेरच्यांच्यावर आक्रमण करणे शक्य होते म्हणजे आर्य इथलेच होते त्यांनी बाहेर जाऊन साम्राज्ये स्थापन केली म्हणजे आऊट ऑफ इंडिया थेरी !
आता हे आक्रमण करायला आपण अडवान्स असणे आवश्यक आणि आपण तर अडवान्स न्हवतो उलट रानटी मागासलेले होतो मग विकसित होण्यासाठी करायचे काय तर जे विकसीत होते त्यावरच कब्जा करा विकसित काय होतं तर इंडस संस्कृती चला मग ती आपलीच म्हणा झालं तेव्हापासून इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ही वैदिक होती हे सुरु करण्याचा खटाटोप सुरु ! पण हे सिद्ध कसे करायचे ?कारण दोन गोष्टी भयंकर गुंतागुंतीच्या होत्या
१ आर्यांचे घोडे व रथ
२ सरस्वती नदी
ह्या दोन गोष्टी जोवर भारतात येत नाही तोवर काम चालू रास्ता बंद !
ह्यातील सरस्वती भारतात आणणे फारच गरजेचे होते कारण ऋग्वेदाची ती मुख्य नदी होती रथ व घोडे सापडणे फार गरजेचे होते सगळे उत्खनन ह्या दिशेने सुरु
आम्ही श्रेष्ठ आर्य श्रेष्ठ आम्ही आर्यच श्रेष्ठ !
आम्ही बेस्ट आर्य बेश्ट आम्ही आर्यच बेस्ट !
किती काळ बाकीच्यांना झ्याटूक समजणार बाबांनो ? अहंकार इतका ? पिढ्यानपिढ्या फक्त अहंकारच संक्रमित करता कि काय ?
मित्रहो घागरा को सरस्वती शाबीत करनेका मिशन जारी हैं देखना एक दिन हम ये साबित करकेही रहेंगे
उत्खननमें एक दिन जरूर घोडा और रथ मिलेंगे मैं यकीं दिलाता हूँ की वे ७००० साल पुराने होंगे
तर आहे हे असं आहे
आज हिंदुत्व ज्या आकांताने आर्यांच्याबाबत आऊट ऑफ इंडिया थेरी चा पुरस्कार करतंय त्यात संशोधन कमी आणि राजकीय अजेंडाच जास्त आहे म्हणजेच कुंटेंचा आर्यन इन्वेजन थेरी हा जसा तत्कालीन ब्रिटिशांची चाटूगिरी करण्याचा राजकीय अजेंडा होता तसाच हाही ! पहिला अजेंडा बाहेरून आत म्हणून श्रेष्ठ अश्या डिरेक्शनचा तर आत्ताचा आतून बाहेर म्हणून श्रेष्ठ अशा डिरेक्शनचा दोन्हीत एक फण्डा कायम तो म्हणजे आर्य श्रेष्ठत्व ! ह्या आर्यश्रेष्ठत्वालाच दिलेले नवं नाव हिंदुत्व ! जर हिंदू हा फण्डा असेल तर आर्य बाहेरून आले कि आतून ह्याने काय फरक पडणार आहे ? येऊ देत कि कुठूनही किंवा असू देत कि कुठलेही ! मूळ मुद्दा वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्थेचा त्याग करणार आहेत का हा आहे कुंटे त्यांचा त्याग करत नाहीत गुरुजी त्यांचा त्याग करत नाहीत म्हणून मतभेद आहेत उद्या जर का कोणी गांधीवादी १९३९ पूर्वीचा गांधीविचार प्रमाण मानून वर्णजातिव्यवस्थेचे समर्थन करायला लागला तर त्याच्याशीही आम्ही आमचे मतभेद व्यक्त करणारच सुदैवाने गांधीवादी असे करत नाही पण संघाच्याबाबतीत असे होत नाहीये म्हणून टीका आहे हिंदुत्व म्हणजे वर्णजातिव्यवस्था पुन्हा आणणे असा विचार करणाऱ्यांना जोपर्यंत तुम्ही हिंदुत्वातून हाकलून देत नाही तोपर्यंत तुमच्याबद्दल संशय राहणारच
चुका सर्वांच्या हातातून होत असतात युरोपियन लोकांच्याकडूनही झाल्या पण त्यांचा कल चुका दुरुस्त करण्याकडे होता व आहे म्हणून ते पुन्हा पुन्हा उत्क्रांत होतायत निगमिक धर्मातील ( वैदिक ब्राम्हणी वैष्णव हिंदू )
लोकांनीही झालेल्या चुका दुरुस्त केल्या तर ते सर्वांनाच हवे आहे जे झाले ते गंगेला व हिंदी महासागराला मिळाले पुन्हा नवी सुरवात कायमच शक्य असते
टिळकांच्याकडून ज्या काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्यातील एक म्हणजे चुका दुरुस्त करणे काही चुका दुर्देवाने त्यांना दिसल्याच नाहीत पण ज्या दिसल्या त्या त्यांनी दुरुस्त केल्या ह्यावर अधिक सविस्तर लिहीनच
टिळकांची आर्यन थेरी चूक होती का ? त्यातला आर्यश्रेष्ठत्वाचा गंड चुकीचा आहे मात्र त्यातील जो शास्त्रीय भाग आहे तो मात्र आजही पूर्ण चुकलाय असे वाटत नाही एक काळ असा होता कि (१९३० ते २००५) टिळक पूर्णच चुकलेत असं वाटायचं पण आर्यांच्या मूळस्थानापैकी एक म्हणून आर्टीकचा विचार करणे नव्याने गरजेचे झाले आहे आर्यांचे मुळस्थान म्हणून स्टेपचा क्लेम हा आता एक बऱ्यापैकी स्ट्रॉंग क्लेम आहे पण आपण त्याही मागे जाऊन स्टेपमध्ये आर्य कुठून आले असा प्रश्न विचारला तर कदाचित आर्टीक हे उत्तर मिळू शकते आणि उद्या जर असे काही पुरावे मिळाले तर टिळक द्रष्टे ठरतील
आमची पिढी टिळकांच्या आर्य उगम मूलस्थान सिद्धांताकडे पुन्हा वळली ती ह्या स्टेप मध्ये झालेल्या उत्खननामुळे तिथे सापडलेल्या पुराव्यामुळे ! टिळक भावनेऐवजी पुराव्याच्या आधारे बोलतात आणि हिंदुत्ववाद्यांनी हे लक्ष्यात घेणे आवश्यक आहे
ज्यावेळेला सर्व भूमिपुराव्यांच्याकडे लक्ष्य देत होते तेव्हा टिळकांनी अचानक सगळ्यांचे लक्ष्य आकाशपुराव्याच्याकडे वळवले आर्यन थेरीतील त्यांचे हे योगदान फार महत्वाचे आहे
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ५५
टिळक आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान ८
विलियम वॉरेन ह्याने जेव्हा Paradise Found—the Cradle of the Human Race at the North Pole (1885) हा ग्रंथ लिहिला तेव्हा आपल्या ह्या ग्रंथाच्या सहाय्याने कोणी भारतीय राजकारणी विचारवंत स्वतःच्या जमातीचे आदिमूळस्थान थेट उत्तर ध्रुवावर न्हेईल असे त्याला वाटलेही नसेल बायबलमधील ऍडम आणि ईव्ह कथेमुळे ख्रिश्चन व ज्यू शास्त्रज्ञांना कायमच ईडन गार्डन शोधण्याचा ध्यास लागलेला असतो वॉरेनने आपली ईडन गार्डन उत्तर ध्रुवावर न्हेऊन उत्तर ध्रुव हा समस्त मानवजातीचा मूलस्थान होता असे ह्या ग्रंथात सिद्ध करायचा प्रयत्न केला हे करतांना त्याने होमर व्हर्जील आणि हेसिओड ह्यांच्या लिखाणाचा भरपूर वापर केला
टिळकांनी ह्या ग्रंथापासून प्रेरणा घेतली व ऋग्वेद व अवेस्ता ह्यांचा सोर्स मटेरिअल म्हणून वापर केला इतिहासपूर्व कालखंडाचे विश्लेषण करायचे तर आपणाला ह्या दंतकथात्मक साहित्याचा वापर करण्याखेरीज पर्याय नाही असे वॉरेन म्हणतो टिळक त्याचीच री ओढतात
ऋग्वेदात बारा महिन्याचे वर्ष सांगितल्याने ऋग्वेद आर्टिक खंडावर कसा लिहिला जाईल ह्या प्रश्नाचे खंडन शक्य आहे कारण टिळक मुळात वेद आर्टिक वर लिहिले गेलेत असं म्हणत नाहीत त्यांच्या मते डिसेंबर मधला DEC हा दहा ह्याच अर्थाने वापरला गेलाय व डिसेम्बर हा दहावा व शेवटचा महिना होता म्हणजेच ग्रीक आणि भारतीय आर्य सुरवातीला दहा महिन्याचे वर्ष मानत होते पण हे आर्य जेव्हा यूरोपात व अफगाणिस्तानात आले तेव्हा त्यांनी नव्या हवामानानुसार बारा महिन्याचे कॅलेंडर स्वीकारले आणि ऋग्वेद जेव्हा ते आर्यावर्तात आले तेव्हाच लिहिले गेले पण त्यांचे मुळस्थान आर्टीक असल्याने तिथल्या कित्येक स्मृती ऋग्वेदात प्रकट झालेल्या आहेत म्हणजेच ऋग्वेदात आर्यावर्तातला वर्तमानकाळ व आर्टीकवरचा भूतकाळ असे दोन्ही काळ नोंदवले गेले आहेत
हे सिद्ध करण्यासाठी वॉरेन जसा धार्मिक संहिता वापरतो त्याप्रमाणे त्यांनी धार्मिक (ऋग्वेद व अवेस्ता ह्या आर्यन) संहिताचा पुरावा म्हणून वापर केला आहे त्यासाठी गाथाशास्त्र (मायथॉलॉजी ) व्युत्पत्तीशास्त्र (फाइला लॉजी )पुराणवस्तूशास्त्र (आर्किऑलॉजी )मस्तकविज्ञानशास्त्र(क्रेनियोलॉजी ) मानुष्यकशास्त्र (अँथ्रोपॉलॉजी ) व भूस्तरशास्त्र (ह्या संज्ञा नारायण पावगी ह्यांच्या आहेत ) ह्यांचाही वापर केला आहे
भूस्तरशास्त्रातील हिमयुग (ग्लेशियल) . हिमयुग संपल्यानंतरचा हिमयुगोत्तर (पोस्टग्लेशियल )काळ आणि दोन हिमयुगांच्या दरम्यानचा हिमयुगान्तर काळ (इंटर ग्लेशियल ) ह्या तीन संकल्पनांचा टिळकांनी वापर केला आहे
सध्या आपण हिमयुगोत्तर काळात वावरत आहोत
बायबलने जरी मनुष्य इसवीसनपूर्व तीन हजार वर्षांपूर्वी मनुष्य निर्माण झाला असे मानले तरी भूस्तरविज्ञानाने हे म्हणणे खोडून काढले मात्र तरीही मानवाचा काळ साधारण चतुर्थ युगात सुरु झाला असेच मानले जात होते १८७५ नंतर मात्र तिसऱ्या युगाच्या अंतात माणूस अस्तित्वात असल्याचे भक्कम पुरावे उत्खननातून मिळायला लागले ह्याचवेळी साधारण इसवीसनपूर्व १००००-८००० ला हिमयुग झाल्याचे पुरावे पुढे यायला सुरवात झाली टिळकांनी ह्या सर्व पुराव्याची छाननी करून हे हिमयुग व त्यापूर्वी आर्टिक खंडावर मानवी वस्ती होती हे वॉरेनचे म्हणणे स्वीकारलेच पण ही वस्ती आदाम व ईव्ह ह्यांच्याऐवजी आर्यांची होती असे प्रतिपादन केले
टिळकांच्या मते ध्रुव प्रदेश म्हणजे बर्फाळ ध्रुव बिंदू न्हवे तिथे वस्ती अशक्यच आहे पण क्रांतिवृत व विषुववृत्त एकाच पातळीत नसल्याने त्यांच्या पातळ्यात २३ अंश १७ कलांचा कोन आहे पृथ्वी कलत असल्याने त्या ध्रुवबिंदूपासून २१ ते २७ अंशावर वस्ती शक्य आहे ध्रुवप्रदेश व ध्रुवंविशिष्ट प्रदेश अशी टिळक विभागणी करतात व ध्रुवंविशिष्ट प्रदेश मानवी वस्तीला पूर्वी योग्य होता असे मानतात त्यांच्या मते ह्या ध्रुवंविशिष्ट अंशावरच आर्यांची मूळ वस्ती होती दोन महिन्याची दीर्घ उषा ही ध्रुवबिंदूवर असते तर तिथून दक्षिणेकडे तिचा कालावधी कमी होतो ह्या प्रदेशात जवळजवळ १० महिने सूर्यप्रकाश व २ महिने रात्र होती टिळकांच्या मते आजही नार्डकीनला ६७ दिनांची रात्र असते उत्तर ध्रुवावर हिवाळ्यात अखंड दीर्घ रात्र असते ध्रुव स्थिर असल्याने गेली लाख वर्षे तो हललेला नाही त्यामुळेच तिथली भौगोलिकताही हललेली नाही म्हणूनच टिळकांचा सिद्धांत शक्य आहे
रॉबर्ट बॉल व डॉ क्रोल ह्यांचा हवाला देत टिळक असे सिद्ध करतात कि ह्या मूलस्थानी जवळ जवळ १० महिन्याचा वसंत ऋतू होता व दोन महिन्याची रात्र पुढे ह्यात बिघाड झाला व बर्फाळपणा वाढत जाऊन इथे राहणे अशक्य बनले व आर्यांनी स्थलांतर केले
ह्याचे काही पुरावे आर्यांच्या श्रद्धात आढळतात असे टिळकांचे म्हणणे आहे उदाहरणार्थ देवांचा दिवस व रात्र सहा महिन्यांचा असतो असते ही श्रद्धा फक्त उत्तर ध्रुवावर शक्य आहे कारण तिथे सहा महिन्याचा दिवस व रात्र असते ज्योतिषशास्त्रातील उत्तर ध्रुवाला पुराणात मेरू पर्वत मानले गेले आहे सूर्यसिद्धान्तात मेरूवर देव मेष राशीपासूनच्या अर्ध्या प्रदिक्षणेत एकदाच उगवतो असे म्हंटले आहे हेही अर्ध्या वर्षाच्या दिवसाचे द्योतक आहे पुराणांतही देवांचे घर मेरू पर्वतावर आहे म्हणजे उत्तर ध्रुवावर आहे असे म्हंटले आहे मनुस्मृतीच्या पहिल्या अध्यायातील ६७ व्या श्लोकात दिवस म्हणजे उत्तरायण रात्र म्हणजे दक्षिणायन असे म्हंटले आहे महाभारतात अर्जुन मेरू पर्वतावर रहायला गेला असता तिथे प्रतिदिन सूर्य चंद्र तारे त्याच्याभवती फिरतात टिळकांच्या मते त्याकाळी विज्ञान एव्हढे प्रगत झाले न्हवते त्यामुळे हे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातूनच आलेले असले पाहिजे आणि हा अनुभव त्यांना त्यांच्या पूर्वजांकडूनच प्राप्त झाले असले पाहिजे
टिळकांचे लिखाण अतिशय गुंतागुंतीचे व ज्यांना विज्ञानात रस नाही त्यांना कंटाळवाणे वाटणे सहज शक्य आहे पण यूरोपियनांची मक्तेदारी मानल्या गेलेल्या विषयात एक मराठी माणूस घुसतो हेच मुळात कौतूकास्पद आहे
असो
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ५६
टिळक आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान ९
सहा महिन्याचा दिवस व सहा महिन्याची रात्र ह्यांचा संबंध जोडून दाखवल्यावर टिळक उषेकडे येतात ऋग्वेदात उषेवर वीस सूक्ते आहेत त्यांची छाननी करतात अवेस्तातील उषेचीही छाननी करतात
टिळकांचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत
१ )ज्याप्रमाणे धृवबिंदूवरील ६ महिन्याचा दिवस वा ध्रुवविशिष्ट प्रदेशातील १० महिन्याचा दिवस व धृवबिंदूवरील ६ महिन्याची रात्र वा ध्रुवविशिष्ट प्रदेशातील २ महिन्याची रात्र ह्यांचे वर्णन ऋग्वेदात मिळते त्याचप्रमाणे कित्येक दिवसांच्या उषेचे वर्णन आर्य ग्रंथातून मिळते
२ )ऋग्वेदात वर्णिलेली उषा इतकी दीर्घ होती कि त्यात अनेक दिवस जात व अनेक उषा एकामागून एक येत त्यांचे पर्यवसान शेवटी सूर्योदयात होई (ऋचा क्रमांक ७ , ३ , २ ,९ , २८ ,७६ ) ह्याचा प्रतिवाद असा कि वेगवेगळ्या रंगात पहाटेची वेगवेगळी रूपे येत त्यामुळे त्या वेगवेगळ्या भासत एकच स्त्री पण ती जशी कविंना अनेक रूपात दिसते तसे हे आहे मुळात ऋग्वेद लिहिणारे कवी असल्याने त्यांनी उषेची अनेक रूपे तपशीलवार नोंदवली आहेत तो कविंचा पिंडच असतो ऋग्वेदातले कवी हे भक्त कवी आहेत आणि त्यांचे देव सूर्य , अग्नी , उषा , इंद्र , वरुण आहेत ह्या कविता असल्याने त्यात कविंचा कल्पनाविलासही आलेला आहे ब्राम्हण ह्या शब्दाचा अर्थच मुळी कविता रचणारा मंत्र रचणारा असा आहे कवी ह्या शब्दाचा मूळ अर्थ नाटक महाकाव्य कथा असे काव्य रचणारा असा आहे प्राचीन काळी लिहिणाऱ्यांच्यात ब्राम्हण व कवी असे दोन प्रकार होते आणि ज्याला आज आपण कवी म्हणतो त्यांना शैव "ब्राम्हण" म्हणत तर ज्याला आज आपण गद्य लेखक म्हणतो त्याला प्राचीन शैव "कवी " म्हणजे काव्य रचणारा म्हणत मंत्र म्हणजे कविता तर काव्य म्हणजे कथा कादंबरी महाकाव्य नाटक हे वाङ्मयप्रकार हे सर्वच पूर्वी पद्यात लिहिले जात असल्याने वृत्तछंदात असत
३ )उषेविषयीचे जे बहुवचनात्मक म्हणजे अनेक उषाचे उल्लेख आहेत ते केवळ ३६० दिवसाच्या ३६० उषा ह्या अर्थाने नाहीत तर केवळ ३० दिवसांच्या ३० उषा असा आहे (ऋचा क्रमांक १ ८ , २३ , ६ ,२ ,९ , ५९ ,६ ) ह्याचा प्रतिवाद आपण असा करू शकतो कि प्रत्येक महिन्यातील प्रत्येक दिवसाची उषा स्वतंत्र उषा मानल्याने हा बहुवचनीय उल्लेख आला आहे दुसरी गोष्ट जर समजा आर्य उत्तर ध्रुवावरच होते तर त्यांना थोडेच माहिती असणार कि दक्षिणेकडे गेल्यावर दर दिवशी अर्ध्या तासाची नवी उषा होते ते एकाच दीर्घ उषेचा उल्लेख करतील ना ? जसा सहा व दहा महिन्याच्या एकाच दिवसाचा उल्लेख आहे
४ )पुष्कळ उषा एकाच ठिकाणी सहमतीने रहात व एकमेकांशी भांडत नसत (ऋचा क्रमांक ४, ५१ , ७ , ९ , ७६ , ह्याचा प्रतिवाद असा कि हे स्वाभाविकच आहे कारण अंतिमतः त्या एकाच फिनॉमिनाच्या भाग आहेत तर त्या भांडतील कशाला ?
५ ) उषाचे तीस भाग पृथक पृथक नसून ते एकाला एक सलग आहेत ((ऋचा क्रमांक १, १५२ , ४ ) ह्याचा प्रतिवाद असा कि हेही स्वाभाविकच आहे कारण अंतिमतः त्या एकाच फिनॉमिनाच्या भाग आहेत तर त्या अलग अलग येतील कशाला ?
६ हे एकाच उषेचे तीस भाग किंवा तीस उषा चक्राकार फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येत ह्याचा प्रतिवाद असा कि हेही स्वाभाविकच आहे कारण सूर्य पुन्हा फिरून त्याच पूर्वेला उगवताना दिसे आणि उषाही टिळकांचा एक घोळ मुळातूनच झालाय तो असा कि त्यांना प्राचीन लोकांची एक समजूत कळालेली नाही प्राचीन लोकांना (ह्यात आर्यही येतात ) सूर्य मावळतो म्हणजे मरतो किंवा पाताळात जाऊन मरतो व सकाळी पुन्हा जिवंत होऊन उगवतो असे वाटे व त्यांची अशी श्रद्धा होती त्यामुळे महिन्यातील प्रत्येक दिवशी सूर्य मरतो म्हणून तीस दिवशी वेगवेगळे सूर्य असे ते मानत आणि कधी कधी वर्षाचे ३६० वा ३६५ सूर्य मानत पुढे कालांतराने एकाच सूर्याची संकल्पना उदयाला आली ज्यांनी समुद्र पाहिला होता त्यांना असे वाटे कि वरुण म्हणजे समुद्ररूपी पाणी असलेला सूर्याला गिळतो व पुन्हा जिवंत करून पूर्वेकडे पाठवतो असे लोक वरुणाला मुख्य देव मानत समुद्ररूपी पाणी असलेला वरूणच पाऊस पाठवतो अशी त्यांची समजूत असे कारण वरूणाकडे असलेले पाणी त्यांना स्पष्ट दिसे ज्यांनी समुद्र पाहिला न्हवता त्यांना मात्र सूर्यच वरून पाणी पाठवतो असे वाटे व हे लोक सूर्याची पूजा करत कारण उष्णता , प्रकाश व पाणी सूर्यच पाठवतो असे त्यांना वाटे काहींना आकाश निळे दिसे व ते सूर्याला पकडून ठेवणारे वाटे हे आकाशच ढगांच्या मार्फत पाणी पाठवते असे त्यांना वाटे व वीज ह्या आकाशाच्या हातातील वज्र वाटे ते ह्या आकाशाची विष्णू वा नारायण वा इंद्र म्हणून पूजा करत काहींना हा सूर्य अग्नीचा बायप्रॉडक्ट वाटे व सूर्य हा फक्त अग्नीचे माध्यम आहे असे वाटे त्यांना अग्नी सूर्य नसतांना जंगलात पेटलेला दिसे ह्याचा अर्थ सूर्य नसला तरी अग्नी व अग्नीचा प्रकाश दिसे साहजिकच अग्नी म्हणजे दिवसा पेटलेला अग्निगोळा असे त्यांना वाटे तर चंद्र हा ह्याच अग्नीचा शांत प्रकाशगोळा वाटे हे सर्व लोक त्यामुळेच अग्नीला मुख्य मानून त्याची पूजा करत आर्यांच्यात असे सूर्यपूजक अग्निपूजक इंद्रपूजक वरुणपूजक लोक व संप्रदाय होते व ते एकमेकांशी श्रेष्ठ कोण ह्यावरून भांडतही असत व आपल्या मुख्य देवाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी कथाही रचत
असो
टिळकांची कार्यपद्धती कशी आहे तर टिळक ऋचा घेतात उदा
१:११३:१० मध्ये
" उषा उदय पाऊन झाला किती काल
उगवणार त्या किती आणखी काल
आमच्यासाठी प्रकाश करणारी ही उषा
आणि आमच्यासाठी येणाऱ्या उषा
सर्वच असतील दैदिप्यमान उषा "
ह्याचा अर्थ टिळक दोन उषाच्या मधील कलाप म्हणजे दीर्घरात्र असा लावतात जो कितपत योग्य असा प्रश्न पडतो
किंवा मग आणखी एकदा ८:४१ :३ मध्ये तीन उषांचा उल्लेख आहे उद्ष्यत उद्यत व उदित आता एव्हढा दीर्घकाळ उषेला फक्त उत्तर ध्रुवावरच शक्य आहे कारण उदित उषा येईपर्यंत ऋग्वेद संपूर्ण म्हण अशी आज्ञा आहे
टिळक ह्याचा अर्थ दीर्घ कालावधी घेतात पण शक्यता अशीही असू शकते कि त्यावेळी ऋग्वेद दोन तीन सूक्तात समाप्त होत असेल कारण टिळकांच्या तर्कानेच जायचे तर आत्ताचा ऋग्वेद इसवीसनपूर्व ५००० वर्षी लिहिला गेलाय ह्यातला तर्कदोष उघड आहे एकीकडे उत्तर ध्रुवावर ऋग्वेद न्हवता म्हणायचे व दुसरीकडे उत्तर ध्रुवावर ऋग्वेद म्हणायला लागायचा म्हणजे उषा दीर्घच असली पाहिजे असं म्हणायचं
ऋग्वेदातील अनेक ऋचांचा अर्थ त्या ऋचा उत्तर धृवाशी निगडित असल्याने हे लक्ष्यात न आल्याने क्लिष्ट झाल्या पण हे एकदा लक्ष्यात आले कि त्यांचा सरळ अर्थ लागतो असे टिळक म्हणतात
असाच काहीसा युक्तिवाद सात आदित्य व बारा आदित्य ह्यांच्या संदर्भात केला आहे बारा आदित्य व बारा महिन्यांचा संबंध आत्ताचा तर सात आदित्य उत्तर ध्रुवावर सात महिन्याचा दिवस असल्याने उत्तर ध्रुवावरचे हे सात आदित्य ते सात महिन्यांशी जोडतात
ऋग्वेदातील वेगवेगळ्या ऋचा ज्यांचा अर्थ आर्यावर्तात लागत नाही पण उत्तर ध्रुवावर लागतो असे टिळकांना वाटे म्हणूनच टिळक आर्य उत्तर ध्रुवावर रहात होते असं म्हणतात

६ हे एकाच उषेचे तीस भाग किंवा तीस उषा चक्राकार फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येत ह्याचा प्रतिवाद असा कि हेही स्वाभाविकच आहे कारण सूर्य पुन्हा फिरून त्याच पूर्वेला उगवताना दिसे आणि उषाही टिळकांचा एक घोळ मुळातूनच झालाय तो असा कि त्यांना प्राचीन लोकांची एक समजूत कळालेली नाही प्राचीन लोकांना (ह्यात आर्यही येतात ) सूर्य मावळतो म्हणजे मरतो किंवा पाताळात जाऊन मरतो व सकाळी पुन्हा जिवंत होऊन उगवतो असे वाटे व त्यांची अशी श्रद्धा होती त्यामुळे महिन्यातील प्रत्येक दिवशी सूर्य मरतो म्हणून तीस दिवशी वेगवेगळे सूर्य असे ते मानत आणि कधी कधी वर्षाचे ३६० वा ३६५ सूर्य मानत पुढे कालांतराने एकाच सूर्याची संकल्पना उदयाला आली ज्यांनी समुद्र पाहिला होता त्यांना असे वाटे कि वरुण म्हणजे समुद्ररूपी पाणी असलेला सूर्याला गिळतो व पुन्हा जिवंत करून पूर्वेकडे पाठवतो असे लोक वरुणाला मुख्य देव मानत समुद्ररूपी पाणी असलेला वरूणच पाऊस पाठवतो अशी त्यांची समजूत असे कारण वरूणाकडे असलेले पाणी त्यांना स्पष्ट दिसे ज्यांनी समुद्र पाहिला न्हवता त्यांना मात्र सूर्यच वरून पाणी पाठवतो असे वाटे व हे लोक सूर्याची पूजा करत कारण उष्णता , प्रकाश व पाणी सूर्यच पाठवतो असे त्यांना वाटे काहींना आकाश निळे दिसे व ते सूर्याला पकडून ठेवणारे वाटे हे आकाशच ढगांच्या मार्फत पाणी पाठवते असे त्यांना वाटे व वीज ह्या आकाशाच्या हातातील वज्र वाटे ते ह्या आकाशाची विष्णू वा नारायण वा इंद्र म्हणून पूजा करत काहींना हा सूर्य अग्नीचा बायप्रॉडक्ट वाटे व सूर्य हा फक्त अग्नीचे माध्यम आहे असे वाटे त्यांना अग्नी सूर्य नसतांना जंगलात पेटलेला दिसे ह्याचा अर्थ सूर्य नसला तरी अग्नी व अग्नीचा प्रकाश दिसे साहजिकच सूर्य म्हणजे दिवसा पेटलेला अग्निगोळा असे त्यांना वाटे तर चंद्र हा ह्याच अग्नीचा शांत प्रकाशगोळा वाटे हे सर्व लोक त्यामुळेच अग्नीला मुख्य मानून त्याची पूजा करत आर्यांच्यात असे सूर्यपूजक अग्निपूजक इंद्रपूजक वरुणपूजक लोक व संप्रदाय होते व ते एकमेकांशी श्रेष्ठ कोण ह्यावरून भांडतही असत व आपल्या मुख्य देवाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी कथाही रचत

आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ५७
टिळक आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान १०
टिळक आदित्य दिवस उषा ह्यांची मीमांसा करत शेवटी मास व ऋतू ह्यांच्याकडे येतात संहिताकालापेक्षा हा ध्रुवकाल वेगळा असणार हे तर उघडच आहे प्रश्न आहे त्याचे पुरावे संहितेत मिळतात काय ? ऋत्विजांचे मुख्य कार्य अग्नी जागृत ठेऊन वार्षिक यागपर्याय योग्य ऋतूत योग्य वेळी करणे आर्य हिमालयाच्या काठी रहात असल्याने व त्याकाळच्या पंजाब हिमाचल प्रदेशात बर्फ प्रचंड पडत असल्याने शेकोटी ही त्यांची गरज होती त्यातूनच भक्तीची यज्ञपद्धत जन्मली भक्तिपरी भक्ती व शेकोटीपरी शेकोटी अशा दोन्ही गोष्टी त्यात साधून जात
प्रश्न इतकाच कि प्राचीन आर्यांची कालमापन पद्धत ऋग्वेदिक आर्यांनी जपून ठेवली आहे का ?
संहिता व ब्राम्हणे दोन्हीतही प्राचीन काळी याग बारा महिने चालत असं म्हंटलं आहे ह्याचा अर्थ टिळक म्हणतात तसे ७ महिन्याचा दिवस असेल तर याग सात महिनेच चालायला हवा कारण यज्ञयाग तीन वा दोन महिन्याच्या असलेल्या रात्री चालणे शक्य न्हवते त्यामुळे हे उल्लेख टिळकांच्या सिद्धांताच्या विरोधी जातात
ऋचा ९, ११४ व ३ मध्ये सात आदित्यचा उल्लेख आहे टिळकांच्या मते ते सात आदित्य व सात ऋत्विज हे सात महिन्याचे द्योतक आहेत ऋचा २,२७ , १ मध्ये सहा आदित्यांची नावे दिलेली आहेत मित्र , अर्यमा , भग , वरुण , दक्ष आणि अंश अशी ही नावे आहेत ( एकेकाळी कऱ्हाडे ब्राम्हण सुर्याच्या अर्यमा ह्या रूपाची पूजा करायचे पण सद्या ब्राम्हणांनाच स्वतःची सांस्कृतिक विरासत कळत नसल्याने त्यांनी ह्या अर्यमाची व अंबेची मिळून आर्याम्बा केलेली आहे वास्तविक अर्यमा हा वैदिक देव व अंबा ही शैव देवता ह्यांचे सांस्कृतिक संतुलन कऱ्हाडयानी चांगले मेनटेन केले होते पण आर्य बनण्याच्या घाईला कसे थांबवावे ) ऋचा ५ ,४५, ९ मध्ये आदित्यला सात घोडे असतात असा उल्लेख आहे सात रश्मी सूर्याचे आहेत असाही उल्लेख आहेच अदितीला आठवा अदिती झाला असे म्हंटले जाते व त्या आठव्याला मार्तण्ड म्हणतात ह्या मार्तण्डाला गिळायलाच हनुमान बाहेर पडला होता धनगरांच्यात मल्हारी मार्तंड प्रसिद्ध आहे हा आठवा असून इतका प्रसिद्ध कसा ? टिळक बहुजनांच्याकडे जाऊ बघत नाहीत जे स्वाभाविक आहे कारण अदितीने आठवा आदित्य टाकून दिला व नंतर आणला तो मारण्यासाठीच शतपथ ब्राम्हणात धातृ व अर्यमा मित्र व अरुण अंश व भग इंद्र व विवस्वत अशा आदित्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत म्हणजेच इंद्र व विवस्वत ही भर आहे तर दक्ष वगळून त्याजागी धातृ आला आहे टिळकांचा प्रतिवाद करायचा तर कारण उघड आहे दक्षाने आपली मुलगी पार्वती शिवाला देऊन आर्यांचा कायदा मोडला आहे मार्तंडाने शिवाला पाठिंबा दिल्याने तोही गायब झाला आहे
प्रश्न असा कि पहिले आदित्य संख्येने सहा का ? त्याचे उत्तर सहा ऋतूंचे कारक सहा आदित्य सहा सूर्य वेगवेगळे मानल्याने असे घडले आहे असे सुचवता येईल पण श्रुतींनी आठ सूर्य मानले आहे त्यांचे काय ? ह्याला उत्तर आठव्या सूर्याला मारून त्याच्यापासून मानव प्राणी वैग्रे अदितीने निर्माण केले हे आहे थोडक्यात आपले जग मार्तण्डाने निर्माण केलेले आहे जो आठवा आहे पण तरीही सातव्याचा प्रश्न उरतोच कारण ऋतू सहा आहेत सात नाहीत उपनिषदात बारा आदित्य येतात त्याचे कारण उघड आहे प्रत्येक महिन्याचा एक असे बारा महिन्याचे बारा सूर्य असे हे समीकरण आहे मग सात आदित्यांचे कोडे सोडवायचे कसे टिळक म्हणतात कि आपण आर्यांचे मूलस्थान उत्तर ध्रुव मानले कि हा प्रश्न सुटतो तिथे सात महिन्याचा दिवस असल्याने प्रत्येक महिन्याला एक व सात महिन्याला सात आदित्य म्हणून हे स्मृती म्हणून जपले गेलेले सात आदित्य आहेत तैत्तरीय अरण्यकांत निरनिराळ्या आदित्यामुळे निरनिराळे महिने होतात असे म्हंटले आहेच आठवा मार्तंड हा सात महिन्यानंतर आल्याने तो अदितीने मारला असा उल्लेख येतो म्हणूनच मार्तंड काळोखात जातो मार्तंडाचा आठव्या आदित्यचा प्रश्न तो उत्तर ध्रुवावर काळोखात जातो हे लक्ष्यात घेतले कि सहज सुटतो असे टिळक म्हणतात
आता शैवांची नकुलीशकुळांची उत्पत्ती काय आहे ? ती मासाशी निगडित नाही शैवांच्यात पंधरवडा (पक्ष ) हा एकक असला तरी आठवडा हा आठ दिवसांचा आहे दोन आठवडयांनी पंधरवडा येतो पण कसा ? तर सात दिवसाचे सात आदित्य आणि आठवा मार्तण्डचा म्हणजे शिवाचा सोमवार हा अनेकदा सुट्टीचा दिवस कारण शिवाचा मार्तण्डचा ह्या आठव्या दिवसावर हक्क पुन्हा सात दिवस सात सूर्याचे आठवडा हा नावानुसार आठ दिवसाचा मग सात दिवसाचा काळ मिळवून पंधरवडा व एकतीस दिवसांचा मास असेल तर पुन्हा एक दिवस मार्तंडाचा थोडक्यात मार्तंड हा समतोल आहे बहुजन पूर्वी सोमवारीच आपले दुकान बंद ठेवायचा व शिव मंदिरात जायचा रवीवार हा डबल कामाचा दिवस आपण त्याची आता इंग्रजांच्या नादाला लागून सुट्टी केली
आजच्या काळात आपला सूर्य हा आपल्या सूर्यमालेतील एकच असल्याचे आपणाला माहित आहे पण अतिप्राचीन काळी असे न्हवते हे आपण लक्ष्यात घ्यायला हवे ऋग्वेदात आणि शैवांच्या श्रद्धात ह्या अतिप्राचीन समजुतीची बीजे आजही टिकलेली आहेत फक्त शैवांचा धर्म ह्या अक्षावर विश्वास नसल्याने त्यांनी ऋग्वेदासारखे अंधश्रद्धांनी भरलेले ग्रंथ लिहिले नाहीत त्यांनी अर्थशास्त्र कामशास्त्र आणि मोक्षदर्शने रचली मात्र एक गोष्ट बघण्यासारखी आहे ती म्हणजे ऋग्वेदकाळातही वैदिक व शैव एकमेकांना ट्क्करत होते वाद घालत होते आणि एकमेकांच्या समजुती समजूनही घेत होते पुढे ब्राम्हणकाळात व स्मृतीकाळात हे नाहीसे झाले आणि त्याचा भारतीय संस्कृतीला तोटाच झाला मार्तण्ड हा सूर्य शैव आहे पण तो वैदिक सूर्यांच्या यादीत येतो समस्त मानवजातीची व प्राणिसृष्टीची निर्मिती करतो आणि नाहीसा होतो हे बघण्यासारखे आहे ह्याउलट दक्ष हा वैदिक सूर्य असूनही तो भगवान शिवांचा सासरा बनतो आणि शैवांच्या सूर्यात दाखल होतो
थोडक्यात काय शैवांचे आठ दिवसाचे आठ आदित्य हे सरळ गणित आहे आर्यांनी बारा महिन्याचे बारा आदित्य करूनही हे गणित सरळ ठेवले ह्या आठव्या आदित्यासाठी थेट उत्तर ध्रुवावर जाण्याची काही गरज नाही पंधरवडा नीट पाहीला वा ३१ दिवसाचा महिना पाहिला तरी ते नीट कळते
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ५८
टिळक आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान ११
मॅक्समूलरने स्पष्टपणे , "Aryan, in scientific language, is utterly inapplicable to race. It means language and nothing but language." असे सांगितले तरी टिळक आर्य ही रेस असल्याचे मानत आदित्य उषा मास ह्यांच्या उल्लेखांचा वापर करत आपला सिद्धांत कसा उभा करतायत हे आपण पहात होतो बट कृष्ण घोष ह्यांनी cultural heritage of india च्या पहिल्या खंडात पान १२९ वर मॅक्समूलरचा युक्तिवाद फेटाळला आहे ते एक युक्तिवाद सादर करतात व नंतर त्याच्या मर्यादाही सांगतात हा युक्तिवाद म्हणजे जर भाषेची कसोटी लावून पहायचे ठरवले तर आफ्रिकन अमेरिकनांना त्यांची भाषा अमेरिकन इंग्लिश असली तरी त्यांना स्वतंत्र रेस न मानता भाषिक समूह मानावे लागेल आणि वस्तुस्थिती तशी नाहीये हे आपण सर्वच जाणतो अलीकडे आर्यांचे जनेटिक कोड प्राचीन काळी वेगळे होते असे जवळजवळ मान्य आहे मात्र ह्या शतकात भारतात सनातन ब्राम्हण स्वतःला आर्य मानत असले तरी प्रत्यक्षात कुणातही म्हणजे ब्राम्हणांच्यातही आर्यन नावाचे काहीही स्वतंत्र शिल्लक नाही हे सिद्ध झाले आहे आर्य आर्य म्हणून जे सद्या नाचतायत त्यांना हे स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे कि आर्य नावाचा वंश भारतात आता अस्तित्वात नाही टिळक संशोधन करत होते तेव्हा मात्र आर्य स्वतंत्र वंश म्हणून सर्वांनाच मान्य होता हे आपण लक्ष्यात घेतले पाहिजे आणि त्यांच्या खटाटोपाला फक्त ऐत्याहासिक म्हणून पाहिले पाहिजे आत्ताच्या वर्तमानाशी त्याचा संबंध जोडू नये
आर्य संस्कृतीत कुठलीही गोष्ट ही एकतर
१ पुरातन म्हणजे जुनी पण आता कालबाह्य असते किंवा
२ सनातन म्हणजे जुनी पण कालबाह्य न झालेली आत्ताही अप्लिकेबल असणारी असते किंवा
३ नूतन म्हणजे पूर्ण नवी आत्तापर्यंत अस्तित्वात न आलेली पण नुकतीच अस्तित्वात आलेली किंवा
४ नित्यनूतन म्हणजे जुनी असूनही कालबाह्य न झालेली आणि आत्ताही नूतन असलेली
अशी असते आर्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पुरातन गोष्टींची आठवण ठेवतात नेमाडेंच्या भाषेत सांगायचे तर त्यांना अडगळ आवडते मात्र अनेकदा ही अडगळ अडगळ आहे ह्याचे त्यांना भान असते ज्या गोष्टी त्यांना सनातन वाटतात त्यांचा ते जोरदार प्रसार प्रचार करतात आर्यांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते नूतन गोष्टी शिकायला सदैव तयार असतात ह्या नवीन गोष्टी ते फक्त शिकून थांबत नाहीत तर त्यांना आपल्या संस्कृतीचा ते भाग बनवतात त्यासाठी खरे आणि काल्पनिक असे अनेक खटाटोप करतात कधीकधी धडधडीत खोटं बोलतात त्या खोट्याचा धडधडीत प्रचार करतात आमचं ते आमचं आणि तुमचं तेही आमचंच ह्या त्यांच्या प्रचारशैलीला ते कधीकधी जीवनशैली बनवतात कमीत कमी किंमत मोजून जास्तीत जास्त पदरात पाडून घेणे ही त्यांची वृत्ती असते कष्ट आणि चिकाटी हे त्यांचे फारच मोठे सद्गुण त्यांना भिक्षा मागायला लाज वाटत नाही आणि काम मागायलाही ! फेवर मागण्याची त्यांची एक स्वतःची गोडबोली रीत असते धाडस आणि धडाडी हेही त्यांचे वाखाखण्याजोगे गुण
टिळकांच्यात हे आर्यत्व चांगलेच भिनलेले होते आणि त्यांची जीवनशैली ही आर्यन होती साहजिकच युरोपियन नूतनत्व सामावून घेणे आणि स्वतःच पुरातनत्व व सनातनत्व पुन्हा उभं करणं ह्या अजेंडाने ते काम करतात आर्टिक होमची तलाश ही स्वतःच्या सनातन व पुरातन आर्यत्वाची तलाश आहे टिळकांना काही दहा महिन्याचे कॅलेंडर मान्य न्हवते टिळक पंचांग हे १२ महिन्यांचे कॅलेंडर मानते पण आपल्या ऋग्वेदात १० महिन्याच्या कॅलेंडरची जी समृद्ध अडगळ आहे तिचा आपण मागोवा घेतला पाहिजे असे त्यांना प्रामाणिकपणे वाटते
आदित्य उषा मास ह्यांच्या विचारानंतर टिळक वर्षाचा विचार कसा करतात ?
रोमन आर्यांचे प्राचीन वर्ष हे दहा महिन्याचे होते ऑक्टॉ म्हणजे आठ (ऑक्टोपस वैग्रे आठवा )नॉव्ह म्हणजे नऊ डेक म्हणजे दहा ह्या नावावरूनही ते स्पष्ट व्हावे प्लुटार्कने रोमन लोकांच्या इतिहासात न्यूमा नावाच्या राजाने पहिले दोन महिने मिळवून रोमन वर्ष बारा महिन्याचे केले आहे असे म्हंटले आहे
प्रत्यक्षात असेच दहा महिने भारतीय आर्यही पाळत असे टिळक म्हणतात
गवा अयन हे आर्यांच्या अयनामध्ये मुख्य त्याचा उल्लेख ऐतरेय ब्राम्हणांमध्ये येतो तो ," शफ आणि शिंगे मिळवण्यासाठी गायीनीं सत्र आरंभले व दहा महिन्यात त्यांना ते मिळाल्यावर त्या उठल्या पण ज्या आणखी बसल्या त्यांच्या अश्रद्धेमुळे त्यांची शफे व शिंगे नाहीशी झाली " असा ! दहा महिन्यातच फलश्रुती कशीकाय ह्याचे उत्तर केवळ वहिवाट असे दिले जाते प्रत्यक्षात ही दहा महिन्याच्या वर्षाची स्मृती आहे असे टिळक म्हणतात
ह्या गाई म्हणजे आदित्य होत व दहा आदित्य म्हणजे दहा महिने होय . गाय ही उपमा आर्य पाण्याला सूर्याला उषेला वापरत असे मॅक्स्मुलरने म्हंटले आहे
दहा महिने सत्र चालवणाऱ्या दशग्वाची कथाही हेच सांगते कि पूर्वी दहा महिन्यांचे अयन होते
अवेस्तातही एर्यन वैजोमध्ये १० महिन्याच्या उन्हाळ्याचा उल्लेख आहे हे टिळक दाखवतात
टिळकांच्या मते रोमन आर्य व भारतीय आर्य दोघांच्या समान पूर्वजांच्यामुळे दहा महिन्याचे वर्ष मानत
माझा प्रतिवाद असा आहे कि समजा दहा महिन्याचा दिवस दहा महिन्याचे दहा आदित्य असा हा सगळा थाट आपण स्वीकारला तरी दोन महिन्याची रात्र तर होत होतीच ना ? खुद्द टिळकच अतिरात्र प्रयोगाचा उल्लेख करून रात्री चालणाऱ्या यज्ञयागाचा धांडोळा घेतात म्हणजेच टिळकांच्याच तर्काने जायचे ठरवले तरी दहा महिन्याचा उन्हाळा व दोन महिन्याची रात्र होतात आणि त्यामुळे वर्ष बारा महिन्यांचेच होते मग ध्रुवावर जाण्याचे कारणच उरत नाही
माझ्या मते दहा महिन्याचे वर्ष असण्याचे सर्वात मोठे कारण त्यावेळच्या लोकांच्या हाताला असलेली दहा बोटे होती शक्यतो बोटांवर मोजण्याइतके महिने ठेऊन गणित करण्याची वृत्ती होती तर अनेकदा दहाच्या वर बोटे नसल्याने दहाच्यावर आकडे माहित नसल्याने दहा महिन्याचे वर्ष बनवले गेले. भारतात शून्याचा शोध आधीच लागल्याने बारा महिन्याचे वर्ष स्वाभाविकपणे बनत गेले प्राचीन काळी पृथ्वी सूर्याभवती फिरते हेच माहित न्हवते आणि तिला फिरायला बारा महिने लागतात हेही त्यामुळे आपण दहा महिन्याचे वर्ष पकडून काही चूक करतोय हेही माणसाच्या ध्यानीमनी न्हवते पण ऋतूंचा आणि त्यांच्या रिपीट होण्याचा जसा शोध लागला तसा कोणता ऋतू किती महिन्यांनी परत येतो ह्याचा शोध सुरु झाला आणि प्रत्येक ऋतू बारा महिन्यांनी परत येतो हे लक्ष्यात आले आणि मग ऋतुंच्यानुसार बारा महिन्यांचे कॅलेंडर सेट झाले हे सर्व शेतीच्या शोधानंतर अधिक नीट झाले
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ५९
टिळक आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान १२
टिळकांनी वर्षाच्या अयनांच्या चर्चेत गवा अयनांची चर्चा का केली आहे अंगिरस अयनांची का नाही असा प्रश्न काही जणांना पडतो ह्याचे पहिले कारण म्हणजे आशयाच्या अंगाने फारसा फरक पडत नाही हे आहे दुसरे कारण तपशीलवार द्यावे लागेल
ऋग्वेद हे विविध पुरोहितांच्या कुळांच्या (संगीताच्या भाषेत सांगायचे तर घराण्यात ) रचनांचे संकलन आहे हे आता स्पष्ट झाले आहे कुळात त्या कुळांचे केवळ पुत्र पुत्री आप्त येत नाहीत तर त्या कुळाने स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश होतो ऋग्वेदकाळात पौराहित्य हे जन्मानुसार न्हवते तर कर्मानुसार होते हे आपण लक्ष्यात घेतले पाहिजे उदा अंगिरस हे कुल घेतले तर ह्या कुळाची प्रथम द्वितीय पंचम अष्टम नवम दशम अशा मंडलात सूक्ते दिसतात आणि ती ह्या कुळातील वेगवेगळ्या लोकांनी लिहिली आहेत
परंपरेनुसार हे संकलन महर्षी व्यासांनी केले आणि त्यांची चार वेदात विभागणी केली मी मागे म्हंटल्याप्रमाणे अथर्ववेद प्रथम लिहिला गेला आणि त्यानंतर ऋग्वेद मात्र अथर्ववेदाची मूळ भाषा अगदीच अनाकलनीय झाल्याने तो व्यासांनी संकलन करतांना नव्या भाषेत लिहिला एका अर्थाने हे वेदांचे पहिले अर्वाचिनीकरण होते तो सर्वात शेवटी संकलित होण्याचे कारणही त्याच्या अनाकलनीय भाषेत आहे आपल्याला उपलब्ध असलेला अथर्ववेद हा संपूर्णपणे फक्त दोन कुळांचा असल्यानेच त्याचे एक नाव अर्थवन अंगिरस असे आहे वैदिक लोक अथर्वन हे एक कुळ असल्याचे मानत असले तरी प्रत्यक्षात ते तसे असेलच असे नाही शक्यता अशीही आहे कि आत्ताचा संपूर्ण अथर्ववेद हा फक्त अंगिरस कुळाचा असेल दक्षिणेत अंगिरासांना अंगिरा म्हंटले जाई अंगिरा हा भारतातील काळ्या जादूचा प्रवर्तक मानला जातो आणि त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी अर्थवन नावाचे काल्पनिक कुल वैदिकांनी नंतर घुसडले असे माझे स्पष्ट मत आहे प्रश्न असा आहे कि अंगिरा उर्फ अंगिरस ह्यांना एव्हढा हुसकावून लावण्याचा प्रयत्न का चालला आहे कारण उघड आहे ऋग्वेदातील दोन ते सात ही मूळ मंडळेही अंगीरसाच्या कुळाने लिहिलेत व उरलेली ही नंतर रचली गेली असे दाक्षिणात्य परंपरा सांगते हे जर खरे मानले तर संपूर्ण वेदच म्हणजे ऋग्वेद व अथर्ववेद हे अंगिरा व त्याच्या कुळाने रचले हे सिद्ध होते आणि वेद उत्तरेकडे रचले गेले ह्या गृहीतकाला छेद जातो जर अथर्ववेद रचण्याऱ्यांनीच ऋग्वेद रचला असे सिद्ध झाले तर दोन्हीही वेदांचे स्वरूप तारण मारण मंत्रांचे आहे हे सिद्ध होते आणि हे वेदांना पवित्र मानणाऱ्यांना परवडणारे नाही साहजिकच स्वतःला आर्यन समजणारे लोक अंगीरसांना टाळत असतात
अंगीरसाचा अवेस्तात येणारा उल्लेखही मारणमंत्राच्या संदर्भातच येतो तिथेही ते अग्नीशी व अँगरशीच संबंधित आहेत आणि सैतानसदृश्य आहेत व त्यांचा उल्लेख एन्ग्रो मेन्यू असा होतो
स्पेंटो मैन्यू (चांगले मन ) व एन्ग्रो मेन्यू (वाईट मन ) ह्यातील एन्ग्रो मेन्यू चे ते प्रतीक आहेत वेंडीदाद १९ मध्ये तर एन्ग्रो मेन्यू झोरास्टरला चक्क त्याने चांगला मार्ग सोडावा म्हणून विश्वाचे राज्य ऑफर करतो आणि झरतृष्ट ती धुडकावतो तेव्हा त्याच्यावर चालून जातो (पुढे बौद्ध धम्मात हीच कथा मार व बुद्ध ह्यांची म्हणून येते ) अवेस्तन असुरांचे वैदिक सूरदेवाशी असलेले वाकडे लक्ष्यात घेता त्यांना मुख्य खलनायक बनवण्याचा अर्थ स्पष्टच आहे त्यांनी देवांचे वेद रचलेत हे झोरस्टरला माहित आहे देवांना बिघडवण्यात ह्या एन्ग्रो मेन्यूचा मुख्य रोल आहे असा नंतरच्या अवेस्तनचा विश्वास आहे
अंगिरस ही वैदिकांची एक फार मोठी अडचण होऊन बसली आहे कारण भारतीय वेदातून एक वेळ त्याला उखडता येईल पण अवेस्तातील उल्लेखांचे काय करायचे ? सर्वात उत्तम उपाय चर्चा टाळणे हा आहे टिळकांनी तोच अवलंबला आहे
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग ६०
टिळक आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान १३
अंगिरस अयनाचा मुद्दा समजून घेतल्यावर आपण पुन्हा अयनविचाराकडे वळू शकतो टिळक काही कथांचा नव्याने विचार करतात उदा टिळकांच्या मते आश्विनांनी च्यवन नावाच्या भक्ताला तरुण केले त्याचा स्पष्टार्थही सूर्य जो दोन महिने नाहीसा झाला त्याचे पुन्हा रिसरेक्शन झाले असाच आहे (च्यवन ऋषी ही नंतरची दंतकथा आहे आणि च्यवनप्राशवाल्यांनी तीच जास्त वापरल्याने मूळ कथेचा सर्वांनाच विसर पडला आहे )
इंद्र आणि वृत्र ह्यांची संघर्षकथा ही आर्य अनार्य ह्यांच्या संघर्षातील एक कळबिंदू होऊन बसली आहे . टिळकांच्या मते अतिरात्रीचे याग चालत व ते वृत्राशी लढणाऱ्या इंद्राला मदत करण्यासाठी होत वृत्र ज्याच्यावर इंद्र वज्र प्रहार करतो इंद्र वृत्राला मारून पाणी गाई व दिविष्टी ह्यांना वाट करून देतो टिळकांच्या मते इंद्र वृत्र ह्यांचे युद्ध झाल्यावर रात्र नाहीशी होऊन उषा सुरु होई टिळकांच्या मते ह्या दोन महिन्याच्या दीर्घरात्री इंद्र व वृत्र ह्यांचे युद्ध चाले व त्यात शेवटी इंद्र विजयी होऊन पुन्हा उगवे म्हणून उत्तर ध्रुवावर जिथे दहा दिवसाची रात्र असे तिथे दशरात्र याग चाले तर जिथे शंभर दिवसाची रात्र असे तिथे शतरात्र याग चाले ह्या शंभर रात्रीमुळेच इंद्राला शतक्रतु नाव पडले आहे
अवेस्तातही तिष्ट्र्य अपौश्य ह्यांच्यातले युद्धही इंद्र वृत्रासारखे आहे असे टिळक म्हणतात
इंद्राचा दुसरा शत्रू शंबर त्याची शंभर पुरे नष्ट केली ह्याचा अर्थ त्याच्या शंभर दिवसाच्या रात्रीला इंद्राने नष्ट केले आणि तो उगवला असा होतो असे टिळक म्हणतात अहिशी युद्ध करताना ९९ नद्या स्त्रावीणी उलटून जातात तेव्हा त्याचा अर्थ ९९ दिवसाची ही रात्र सम्पून पुन्हा दिवस सुरु झाला असा होतो असे टिळक म्हणतात
ह्याचा प्रतिवाद असा कि अहोरात्र याग हा एक दिवसाचा होता भारतात पावसाळा चार महिने चालतो त्यातील ज्येष्ठांचे शेवटचे १० दिवस पकडले व आषाढ श्रावण भाद्रपद ह्यांचे ९० दिवस आपण पकडले तर १०० दिवस सूर्यप्रकाशाच्या कमी प्रभावाचे दिवस असणे अटळच आहे आणि उरलेले जे साडेसात महिने आहेत त्यांचे सात आदित्य व आठव्या महिन्याचा मार्तंड ज्याचा उल्लेख अर्धविकसित असा केला आहे तो असे पकडले तर १०० आणि २६५ दिवसाचा खेळ साफ कळावा त्याकाळी पावसाळ्यात पाऊस पडत असल्याने सूर्य म्हणजेच इंद्र न दिसणे स्वाभाविक आहे व वीज म्हणजेच वज्र चमकताना दिसत असल्याने इंद्र ह्या वीजवज्राच्या साहाय्याने वृत्राशी लढतोय असे वाटणे स्वाभाविक आहे
ब्राम्हणेतर विचारवंत असा प्रश्न विचारू शकतात कि वृत्र हा असुर होता व इंद्र देवांचा राजा व ह्या युद्धात असुर इंद्राकडून पराभूत झाले त्याची ही कथा नाही काय ? पहिली गोष्ट अनेक ब्राम्हणेतर विचारवंतांचे ऋग्वेदात इंद्राचीही शंभर पुरे होती व त्यांना देवपुरे म्हणत असा उल्लेख आहे ह्याकडे दुर्लक्ष्य झाले आहे दुसरी गोष्ट दंतकथा ह्या दंतकथा म्हणून न घेता इतिहास म्हणून घेतल्याने जेवढा फायदा ब्राम्हणांना झाला आहे त्यापेक्षा अधिक नुकसान ब्राम्हणेतरांचे झाले आहे ह्या मुळात आर्यांच्या श्रद्धांकथा(faithstories ) आहेत आणि त्यांना श्रद्धांकथा म्हणूनच पाहावे सर्व फेथ स्टोरीज ह्या अंतिमतः फेक स्टोरीज असतात कल्पनाविलास असतात हे प्रत्येकाने लक्ष्यात घ्यावे अन्यथा ब्राम्हणेतर म्हणजे ब्राम्हणांच्याकडून सतत फसवला जाणारा मूर्ख लोकांचा समूह होता असा मेसेज जातो आणि ह्यात आपण आपल्या पूर्वजांना बिनडोक ठरवतो हे अनेक ब्राम्हणेतरांना दिसत नाही असे दिसते
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती भाग
टिळक आणि आर्यांचे मूळ वसतिस्थान १९
गेल्या काही भागात आपण टिळकांनी भूरचनाशास्त्राच्या आधारे व ज्योतिषशास्त्राच्या आधारे केलेली मांडणी पाहिली आता अलीकडच्या संशोधनाच्या प्रकाशात टिळकांचा सिद्धांत पाहू आजही आर्य बाहेरून आलेत हा सिद्धांत स्वीकारणाऱ्या संशोधकांची संख्या प्रचंड आहे आणि आऊट ऑफ इंडियाला फक्त इंडियनपुण्ययोनीवाल्यांचाच आधार आहे असे चित्र आहे आपल्याला सद्या फक्त टिळकांशीच देणेघेणे असल्याने त्याच अंगाने चर्चा करायची आहे बाकी चर्चा मी मागच्या काही प्रकरणात केली आहेच
सर्वात मूलभूत प्रश्न असा आहे कि टिळक व त्यांच्या समकालीन लेखकांना सर्वच आर्यांचे मूलस्थान शोधावेसे का वाटले ? ह्यामागे ब्रदरहूड सिद्धांत आहे मी मागेच म्हंटल्याप्रमाणे टिळक हेही स्वतःला आर्यन समजत व युरोपियन लोकांना ब्रदर ! कुंटेपासून टिळकांच्यापर्यंत सर्वच ही ब्रदरहूड थेरी मान्य करत ही थेरी आली कुठून ?
भारतातल्या ओरियंटलिझमची सुरवात विल्यम जोन्समुळे झाली आणि त्याच्या आकर्षणाचे कारण होते त्याचा सिद्धांत त्याच्या मते नोहाचा मुलगा हम होता व त्याचा पुत्र हिंद होता आणि ह्या हिंदपासून सगळे हिंदू तयार झाले तर नोहाच्या दुसऱ्या मुलाचे वंशज म्हणजे यूरोपियन्स ! म्हणजेच युरोपियन व इंडियन आर्यन भाऊभाऊ झाले त्यातूनच ब्रदरहूड सिद्धांत जन्मला ह्यातला धोखा अनेकांना कळला नाही हमने आपल्या बापाला नग्न पाहिल्याने नोहाने हमचा मुलगा कनानला व भावंडांना स्लॅव्हरीचा शाप दिला होता म्हणजे हिंदूंची स्लॅव्हरी ही शापामुळे आली होती ही ब्रदरहूड थेरी मान्य करणे म्हणजे युरोपियन आर्य मालक व इंडियन आर्य गुलाम हे दैवदत्त व शापदत्त असल्याचे मान्य करणे
तरीही टिळकांनी हा ब्रदरहूड सिद्धांत स्वीकारून समग्र आर्यांच्या मूळ वस्तिस्थानाचा शोध घ्यायला सुरवात केली आणि त्यातूनच आरटिक होम इन वेदाज हा ग्रंथ १८९८ साली लिहला गेला ह्या ग्रंथाला लिहिलेली प्रस्तावना ही मी वाचलेल्या सर्वोत्कृष्ट प्रस्तवानांपैकी एक आहे जसे जसे तुमचे ज्ञान वाढत जाते तसे तसे तुम्हाला फक्त तुमचे अज्ञानच दिसू लागते टिळक आर्किओलॉजीपासून जिऑलॉजी पर्यंतच्या अनेक नवीन विज्ञानाविषयी असलेल्या आपल्या मर्यादा आधीच कबूल करतात त्यांचे पॉलिटिक्स , लॉ , ऍस्ट्रॉनॉमि व मॅथेमॅटिक्स वरचे प्रभुत्व वादातित आहे एका राजकारणी माणसाचे हे प्रभुत्व केवळ अचंबित करणारे आहे हल्ली आपली घटना व राज्यशास्त्रही न वाचणारे राजकारणी पाहिले कि आपण अधिकच चकीत होतो १८२० ते १९४७ ह्या काळात जन्मलेले किमान ७० टक्के टॉपक्लास राजकारणी हायक्लास ज्ञानी होते हे आत्ताच्या राजकारणी लोकांच्याकडे पाहून अविश्वसनीय वाटावे ज्ञानापासून राजकारण तुटले कि काय होते त्याचा हा तमाशा आहे आयडियॉलॉजीच्या आधारे केलेलं निवडणूककेंद्री राजकीय संघटन म्हणजे पक्ष तर केवळ व्यवस्थापनाच्या आधारे केलेलं निवडणूककेंद्री राजकीय संघटन म्हणजे पार्टी आपले सारे पक्ष आता पार्टी बनलेत काँग्रेस ही स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्थापन झालेली पार्टी होती आणि टिळक तिच्या व्यवस्थापनाचा भाग होते त्यामुळेच त्यांना घडलेल्या तुरुंगवासाची प्रस्तावनेत झालेली चर्चा अटळच टिळकांच्या सुटकेसाठी काँग्रेसने पुरेसे प्रयत्न केले नाही पण मवाळ विनंती अर्ज केले असो
टिळकांचे मॅक्स्मुलरविषयीचे लिखाण त्यांची सभ्यता दर्शवते टिळक नेहमीच त्यांच्यावर केलेल्या उपकाराची जाण ठेवत. मॅक्समुलरने त्यांच्या सुटकेसाठी केलेल्या प्रयत्नांचा ते त्यामुळेच ह्या ग्रंथात आस्थेने उल्लेख करतात
ओरियनमध्ये ऋग्वेदाचा कालखंड इसवीसनपूर्व ५००० पर्यंत न्हेल्यानंतर टिळक ज्ञानाविषयक घडामोडीकडे लक्ष्य ठेऊन होते ह्यावेळी जिऑलॉजीने साधारण दहा हजार वर्षांपूर्वी झालेल्या आईस एजचा व त्यामुळे आलेल्या हिमपाताचा शोध लावला ह्या शोधात आर्टीकला १०००० वर्षांपूर्वी मानवी वस्ती असावी अशी शक्यता सूचित केली आणि टिळकांनी ही वस्ती आर्यांची असेल तर ह्या अंगाने पुन्हा एकदा मॅक्समूलरने पाठवलेला ऋग्वेद वाचायला सुरवात केली आणि हे वाचन करतांना त्यांना जे ऍस्ट्रॉनॉमिकल पुरावे सापडत गेले त्याच्या आधारे त्यांनी एक सिद्धांत निश्चित केला तो म्हणजे आर्यांची प्राचीन वस्ती आर्टिक वर उत्तर ध्रुवापाशी होती आणि तिथून हिमयुगामुळे आर्य वस्ती सोडून मध्य रशियात आले तिथून काही यूरोपात गेले काही दक्षिण आशियात आले
ऋग्वेद हा एक थोड्या परिपक्व झालेल्या संस्कृतीचा प्रोडक्ट असून त्याच्या आधी यज्ञयाग सुरु झाले असले पाहिजेत आणि इसवीसनपूर्व ५०००च्या आसपास ह्या यज्ञयागांना शिस्त प्राप्त व्हावी म्हणून ऋग्वेदाची निर्मिती झाली असली पाहिजे असा टिळकांचा कयास आहे
प्रत्यक्षात ऋग्वेद हा फक्त ब्राम्हणांनी रचलेला ग्रंथच न्हवे त्यात दाक्षिणात्य क्षत्रिय व ऋषिंचाही वाटा दिसतो दुसरी गोष्ट ऋग्वेदाची सर्वात प्राचीन लिखित प्रत ही केवळ १३०० वर्षे जुनी आहे आणि ती उत्तरेकडे सापडली नसून तामिळनाडूमध्ये सापडली आहे सर्वात महत्वाची गोष्ट ऋग्वेदात आर्य हा शब्दच नाही जर आर्य वंशाने ह्याचे निर्माण केले तर आर्य ह्या शब्दाचा वापर का नाही तब्बल १०६०० ऋचा आणि एकाही ऋचेत आर्य हा शब्द नाही ? आणि तरीही दावा कि ऋग्वेद आर्यांनी लिहिलेत ?
मी मागेच म्हंटले आहे कि दक्षिणेत अथर्ववेद निर्माण झाला होता आणि तो भगतांचा कोष होता आणि ज्यात काळ्यापांढऱ्या जादूचे उल्लेख आहेत त्यावरून ऋग्वेद व सामवेद रचण्यात आले भगवान शिवांनी जादूमंत्रांची हकालपट्टी केली तेव्हा ब्राम्हणांनी तो लपवला व पुढे पुनर्जीवित केला पण त्याआधी त्यावरून ऋग्वेद तयार करण्यात आला आणि मग अथर्ववेद आणला गेला अथर्ववेद उपायमंत्रांनी भरलेला आहे ऋग्वेद प्रार्थनामंत्रांनी भरलेला आहे पण प्रार्थनांचे स्वरूप मात्र तेच आहे मंत्रातील सोमरस हा दूध व इतर घटकांनी बनलेला आहे ऋग्वेदाच्या १:२३ व्या सूक्तात पहिल्याच ऋचेत तिखट झालेल्या सोमरसाला दूध घालून आम्ही सौम्य केले आहे असं म्हंटलं आहे सोमरस हे नेवैद्यपेय होते अश्व आणि गायबैल हे ऋग्वेदातील पशु आहेत १६ व्या सूक्तात ते इंद्राला गोधन व अश्व देण्याची प्रार्थना करतात
कुजमीनच्या मते घोड्याबाबत तो प्रथम खाद्य होता आणि खाद्य म्हणूनच तो माणसाळवला गेला पुढे त्याच्यावर ओझे लादले गेले चाकाचा शोध लागल्यावर त्याची घोडागाडी झाली पुढे रथ झाले आणि मग तो घोड्यावर बसून तो घौडदौड करायला शिकला हा ग्राफ आहे मनुष्य रथात बसला तोच मुळी इसवीसनपूर्व २१०० च्या आसपास इसवीसनपूर्व १५०० ला तो रथात होता सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे घोड्यावर प्रथम आर्य बसलेच न्हवते ग्रीकांना घोड्यावर बसणे माहीतच न्हवते घोड्यावर प्रथम आशियाई स्किथीयन्स बसले आणि ग्रीकांनी जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा त्यांना वाटले ही घोड्याच्या धडाची व माणसाच्या मुंडक्याची एक नवीन जमात आहे तिला त्यांनी सेंटॉर असे नाव दिले स्किथीयन्स घोडयावर बसायला इसवीसनपूर्व ९०० ला शिकले आता जिथे स्किथीयन्सच इसवीसनपूर्व ९०० ला घोड्यावर बसायला शिकले तिथे ग्रीक रोमन कधी बसणार आणि इंडियन आर्य तरी कधी बसणार ? मग दहा हजार वर्षांपूर्वी यज्ञयाग तेही घोड्याचे कसे शक्य आहेत ? आणि समजा घोडे खाद्य होते तर ऋग्वेदात वारंवार त्यांच्या रथांचा उल्लेख कसा ?
ऋग्वेदाबाबत येणारा आणखी एक अनुषंगिक प्रश्न बाणांचा आहे सहाव्या मंडलातील ७५ वे सूक्त (पायु भारद्वाज रचित )म्हणते जिथे शेंडी नसलेल्या बालकांच्या प्रमाणे बाण पडतात तिथे अदिती व ब्रम्हणस्पती आम्हाला सुख देवो प्रश्न असा आहे कि जिथे शत्रू बाण टाकतात तो काळ धनुष्य बाणाचा असणार म्हणजे धनुष्यबाणाच्या शोधानंतर ऋग्वेद लिहिला गेलाय रथ आणि धनुष्यबाणाचा काळ इसवीसनपूर्व १५०० च्या आधी काहीकेल्या जात नाही म्हणजेच टिळकांचा इसवीसनपूर्व ५००० हा दिलेला काळ भाकड कथा ठरतो
टिळकांनी व इतरांनी बिलकुलच सोडलेला एक मुद्दा म्हणजे मासे !आर्टिक वर ज्या काही वस्त्या आहेत त्यांच्या ठायी माश्यांचे फार महत्व आहे ऋग्वेदात मासे जवळजवळ नाहीतच( अपवाद ७:१८ :६ आहे पण हा उल्लेख माश्याचा कि मत्स्य राज्याच्या राजाचा हे स्पष्ट नाही ) मनुची आणि मत्सावताराची कल्पना शतपथ ब्राम्हणात (१:८:१)येते आणि मासा प्रजापतीचा अवतार आहे विष्णूचा नाही तर मनू राजा आहे शतपथ ब्राम्हणात जो दुसरा उल्लेख आहे त्यात मत्स्य सामद हा पाण्यात राहणारा असल्याने काल्पनिक राजा वाटतो ( गंमतीची गोष्ट अशी कि बुद्धाची वंशावळ सांगणाऱ्या श्रीलंकन धर्मग्रंथात हा समद वा संमत हा बुद्धाचा व शाक्यांचा मूळपुरुष म्हणून दिलेला आहे तो पाण्यात राहतो म्हणजे कोळी असावा त्यावरूनच शाक्य वंश कोळी पण शासक समुदायातील राजवंश असावा असे वाटते बुद्धाची आई कोळीय वंशाची होती हे तर सर्वमान्यच आहे ) असो
एकंदरच ऋग्वेदकालीन अतिप्राचीन आर्यांना माश्यांच्याविषयी फारशी माहिती नसावी मात्र ब्राम्हणकाळापासून त्यांचा मत्स्य संस्कृतीशी घनदाट परिचय झालेला असावा असे वाटते त्यामुळे ते मत्स्य संस्कृतीशी घनदाट परिचित आर्टीकवरून आलेत असे वाटत नाही
श्रीधर तिळवे नाईक
टिळकांचे
आर्य सिद्धांतामुळे ब्राम्हण क्षत्रिय एकाकी पडले आहेत का ?
आर्य ही ब्राम्हण क्षत्रिय ह्या पुण्ययोनिचे नवे नाव आहे का ?
हा सगळा वाद शेवटी ह्या दोन गोष्टी भवती फिरायला लागला
इतर पुराव्याचा विचार करावा ऋग्वेदाच्या बाबतीत पंच पुरावे काय सांगतात
होती हिंदुत्वाला आजही ही काळजी वाटते आहेच वैश्य शूद्र आणि आदिवासी ह्यांच्याबाबत मात्र ब्रिटिशांचे जितके लुटता येईल तितके वैश्य शूद्रांच्याबाबतीत कररूपाने व आदिवासींच्याबाबतीत गुलाम बनवून वा हाकलून देऊन लुटा असेच धोरण होते व आज तेच चालू आहे मला शंका आहे ब्रिटिशांच्या काळात असलेली ब्राम्हण क्षत्रिय व अस्पृश्य एकीकडे व वैश्य शूद्र आणि आदिवासी दुसरीकडे अशी जी अदृश्य फाळणी होती तशीच एखादी फाळणी पुन्हा हिंदुत्व परत आणणार काय ?
मुख्य म्हणजे हिंदुत्ववाद्यांना जमातीविषयी वाटणारा आदर पूर्णच संपला आहे का ?
आर्य आक्रमण सिद्धांताने आर्यही ब्रिटिश झाले आणि ब्रिटिशांनी जमातींच्यावर अनेक अत्याचार केल्याने आणि ब्राम्हणांनी त्यांना त्यात साथ दिल्याने ब्राम्हण आर्यांचे जमातीशी असलेले नाते तुटले आणि ह्या देशाशी असलेल्या संबंधाची शेवटची कडी निखळली परशुराम सिद्धांत मांडून ब्राम्हणांनी क्षत्रियांशी पंगा घेतला व क्षत्रियांना शूद्र म्हणून वाढवला पुढे समुद्रपर्यटनबंदी करून वैश्यांना शेती करायला भाग पडले आणि हलकटपणाने नंतर कलियुगात वैश्य उरले नाहीत अशी हाकाटी पिटली त्यामुळे ब्राम्हणांचे वैश्यांशीही संबंध तुटले पुढे वैश्यांनाही ब्राम्हणांनि शूद्र म्हणायला सुरवात करून वैश्यांशी पंगा वाढवला शूद्र आणि अतिशूद्र ह्यांना ब्राम्हण कधी किंमत देतच न्हवते आणि जो शेवटचा बॉण्ड आदिवासी जमातीशी उरला होता त्याच्या जमिनी आणि जंगलं घेऊन तोडला स्वकियांशीच पंगा घेऊन त्यांना हींन लेखून ब्राम्हण नेमके काय साधत होते ? हा कसला अहंकार होता कि मूर्खपणा ? ब्राम्हणांनी अजूनही ह्या गोष्टीची नीट मीमांसा केलेली नाही
अलीकडे ब्राम्हणांची एक हाकाटी नेहमी चालू असते कि ब्राम्हणेतर ब्राम्हणांना टार्गेट करतायत पण ब्राम्हण प्रश्न विचारायला किंवा आत्मपरीक्षण करायला तयार नाहीत कि ही परिस्थिती उदभवली कशी ? टार्गेट करायला सुरवात केली कोणी ? तुम्हीच ठरवून एकेक वर्ण टार्गेट केला तर त्याला प्रतिक्रिया येणारच उलट ब्राम्हणेतर लोक खूप सहनशील आणि सोशिक म्हणायला हवेत कि शतकानुशतकं शूद्र म्हणून हिनवूनही त्यांनी तुमचा आदर करायचा सोडला नाही आणि आजही तुमची अवस्था अशी आहे कि आर्य म्हणवून घेणे तुम्हाला भूषणास्पद वाटते जोपर्यंत तुम्ही इतरांना समान समजणार नाही तोवर हे एकटे पडत जाणे अटळ आहे हा एकटेपणा तुम्ही निर्माण केला आहे तुम्हीच एव्हरेस्टवर जाऊन बसलाय आणि आता एकटे आहात म्हणून ढिंढोरा पिटताय आधी ह्या आर्यत्वाच्या एव्हरेस्टवरून उतरा कारण ह्या देशात तुमच्याशिवाय समता अशक्य आहे आधुनिक मूल्ये ह्या देशाला देण्यासाठी तुमच्याइतके पात्र कोणी नाही द्या
हरि ह्या शब्दाचा मूळ अर्थ घोडाआहे विशेषतः इंद्राचा घोडा सूक्त १६ :२ ऋग्वेद

हरि ह्या शब्दाचा मूळ अर्थ घोडाआहे विशेषतः इंद्राचा घोडा सूक्त १६ :२
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा