टिळक विरुद्ध गांधी श्रीधर तिळवे नाईक

दोन महापुरुष जेव्हढे एकमेकाला ओळखतात तेव्हढे त्यांचे अनुयायी ओळखत नाहीत त्यातूनच टिळक विरुद्ध गांधी रानडे विरुद्ध टिळक गोखले विरुद्ध टिळक टिळक विरुद्ध आगरकर गांधी विरुद्ध आंबेडकर असे संघर्ष नेत्यांच्यापेक्षा अनुयायांच्यातच तीव्र झालेले दिसतात

गांधींनी गोखले रानडे आणि टिळक ह्यांच्यात जे जे चांगले होते ते स्वीकारले आणि त्याचा स्वतःच्या समकालीन भवतालात विकास केला

१ गांधींनी टिळकांच्या उत्सवाचे रूपांतर प्रत्यक्ष चळवळीत केले टिळकांनी काँग्रेसमध्ये लोक जमवले गांधींनी ते ऍक्टिव्हेट केले

२ गांधींनी टिळकांचा धर्म हा भारतीयांची प्रायोरिटी आहे हा सिद्धांत स्वीकारला पण टिळकांनी ह्याचे रूपांतर जसे हिंदुत्वात केले तसे त्यांनी केले नाही त्यांनी हिंदूंचा हिंदूपणा जपत हिंदू सेक्युलॅरिझम जन्माला घातला

३ जावडेकर म्हणतात त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीची टिळकांनी सांगितलेली महत्ता स्वीकारून त्यांनी त्यावर आणखी एक मजला चढवला

४ टिळकांचा हिंदूपणा पांडित्याकडे कलणारा होता शेवटी ते वैदिक होत गांधींचा हिंदूपणा हा प्रत्यक्ष कृतीकडे कलणारा होता शेवटी ते जैन वैष्णव होत

५ टिळकांची चळवळ त्यांच्या काळामुळे महाजनांची राहिली गांधींनी बहुजनवाद सिद्ध करून दाखवला त्यामुळेच फुल्यांचे कित्येक अनुयायीही गांधींना जाऊन मिळाले

६ लोकमान्य इंग्रजांची राजवट सैतानाची मानत गांधींचा भर इंग्रजांच्या अंतःकरणातला सैतान काढून टाकण्यावर होता

७ टिळकांनी आहेत त्या कायद्याच्या अमंलबजावणीकडे लक्ष्य दिले गांधींनी सविनय कायदेभंग करून अन्यायकारक कायदे मोडावयास सुरवात केली

८ टिळक अधिक जगते तर सशस्त्र क्रांतीकडे सरकत गेले असते गांधींनी निःशस्त्र क्रांतीचा पर्याय उभा करून दाखवला

९ टिळकांनी लोकहितवादी व दादाभाईंची चळवळ बहिष्कार स्वदेशी स्वराज्य ह्यांच्यापर्यंत आणली गांधींनी स्वदेशीचा विकास केला बहिष्काराचे शस्त्र धारदार केले व सत्याग्रह नावाचे एक नवे राजकीय शस्त्र विकसित केले

गांधीजी टिळकांच्या खांद्यावरच उभे होते दुर्देवाने महाराष्ट्रातील टिळकभक्तांना हे कळले नाही

श्रीधर तिळवे नाईक


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट