आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती ४२ ते ५० लेखक : श्रीधर तिळवे -नाईक
रँडचा खून , मीडियायुद्ध आणि पहिला बळी : लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ४२ श्रीधर तिळवे नाईक
दिल्लीकरांची चाटणाऱ्या मराठी माणसांना अधिकाधिक प्रोत्साहन देणे व न चाटणाऱ्या व राष्ट्रीय नेता बनू पाहणाऱ्या मराठी माणसाची राजकीय शिकार करणे हा इंग्रजी वर्तमानपत्रांचा उद्योग टिळकांच्यापासून सुरु होतो शरद पवार हे अलीकडचे बळी सद्या कोणी राष्ट्रीय पातळीवर मुख्य नेता नसल्याने नितीन गडकरींच्याबाबत आपले कर्तव्य पार पाडून हा मीडियाउद्योग थांबला आहे
लोकमान्य टिळकांच्या मराठाची लोकप्रियता वाढत गेली तशी एक अस्वस्थतेची कळ टाइम्स व इतर वर्तमानपत्रात पसरत गेली आंग्लशिक्षित वाचक हा ह्या दैनिकांचा टीआरपी होता आणि टिळकांच्या मराठा वर्तमानपत्राने त्याला आव्हान देण्यास सुरवात केली टिळकांना थेट शांत बसवणे शक्य न्हवते एकीकडे टिळकांचा हिंदुत्ववाद हा ह्या हिंदुविरोधी वर्तमानपत्रांना पसंद न्हवता तर दुसरीकडे मराठा व केसरीची लोकप्रियताही त्यांना सहन होत न्हवती ह्या वर्तमानपत्रांनी टिळकांचं काय चाललंय हे इंग्रज सरकारला कळावं म्हणून टोपण नांवांनी टिळकांच्या लिखाणातले व भाषणातले मजकूर जाणीवपूर्वक आपल्या वर्तमानपत्रात भाषांतरित करून छापायला सुरवात केली टिळकांना पायबंद घालण्याची सुप्त इच्छा ह्यामागे होती ह्यासाठी आवश्यक अशा घटनाही घडत गेल्या
व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला साठ वर्षे पूर्ण होणार होती व त्यानिमित्ताने हिरकमहोत्सव साजरे करणे गरजेचे होते २२ जूनला गणेशखिंडीत जेव्हा हा महोत्सव सुरु झाला तेव्हा सर्व प्रतिष्ठित ह्या सभारंभाला हजर होते
सभारंभ संपल्यानंतर रँडसाहेब एका गाडीत बसले व त्यांच्या मागल्या गाडीत एका सीटवर ले आयर्स्ट व त्यांची पत्नी बसली ५५० फुटांचा प्रवास झाला नि अचानक झाडीतून पाठीमागून एक माणूस आला व त्याने रँडसाहेबांच्या पाठीमागून गोळी झाडली ती डाव्या खांद्यातून आरपार गेली तर दुसरी फैरी आयर्स्टच्या थेट डोक्यात झाडण्यात आली
गणेशखिंडीची ताबडतोब नाकाबंदी करण्यात आली टिळकांना ह्या घटनेची कुणकुणही न्हवती रँडच्या आमदानीत अत्याचार झाल्याने हा खून त्या अत्याचाराचा बदला म्हणूनच झाला असावा अशी शंका सर्वांना येणे साहजिकच होते नेमक्या ह्याच दिवसाच्या आसपास केसरीमधले लिखाण आक्रमक होत चालले होते ह्याचा पुरेपूर फायदा घेऊन इंग्रजी वर्तमानपत्रांनी विशेषतः टाइम्सने ह्या खुनामागे पुण्यातल्या एका ब्राम्हणाचा हात आहे अशी कुजबुज मोहीम सुरु केली इशारा साफ होता
दोन साहेबांचा खून होऊनही पुणेकर एकही श्रद्धांजलीपर वा तत्सम भाषण घेत नाही हे सरकारला खटकायला लागले पुन्याच्याविरुद्ध बोंब सुरु झाली हा जो काही तमाशा सुरु होता त्याला उद्देशून टिळकांनी " सरकारचे डोके ठिकाणावर आहे का " ह्या नावाचा एक अग्रलेखच लिहिला ह्याचवेळी इंग्लंडमध्ये नामदार गोखलेंनी पुण्यातील रँडच्या अत्याचारी राजवटीमुळेच हे खून झाले असावेत असे बयान दिले २७ जुलै ला टिळक मुंबईत पोहचले सरकारची सिद्धता झाली व टिळक रात्री १० -११ ला दाजीसाहेब खरे ह्यांच्या घरी असतांना युरोपियन अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली
काँग्रेसच्या इतिहासातील काँग्रेस पुढाऱ्याला झालेली ही पहिली अटक होती आणि ती होण्यात इंग्रजी वर्तमानपत्राचा भरीव वाटा होता इंग्रजी वर्तमानपत्रांनी भाषांतरे केली नसती व कुजबुज मोहीम चालवली नसती तर टिळक मुळात फ्रेमच झाले नसते ही मीडिया युद्धाची सुरवात होती आणि आता लोकशाहीचे शहाणपण सांगणारी अनेक वर्तमानपत्रे त्यावेळी ब्रिटिशांच्या बाजूने होती
श्रीधर तिळवे नाईक
रँडचा खून , मीडियायुद्ध आणि पहिला बळी : लोकमान्य टिळक २
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ४३ श्रीधर तिळवे नाईक
वॉल्टर चार्ल्स रँडच्या खुनाचा तपास सुरु झाला आणि त्यात चाफेकरांचे नाव पुढे आले ८ ऑक्टोबर १८९७ ला चाफेकरांनी, "आमच्या धार्मिक पवित्र जागा रॅंडने भ्रष्ट केल्या व देवादिकांचा कसलाही आदर न ठेवल्याने आम्ही त्याला मारले " असा कबुलीजवाब दिला धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने ही हत्या झाली होती आधुनिक उपायांचा अतिरेकीवाद आणि धार्मिक भावनांचा अतिरेकीवाद ह्यातून संस्कृती संघर्ष होऊन ह्या हत्या घडल्या होत्या आणि टिळकांना ह्याचे निमित्त करून फ्रेम करण्यात आले आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला राजद्रोहाचा खोटा आरोप लावून शिक्षा करण्यात आलेला आद्य नेता हा आद्यहिंदुहृदयसम्राट असावा हा योग आज स्तिमित करतो आणि सरकारांचे फन्क्शनिंग खरोखरच किती बदललं हा प्रश्न त्यानिमित्ताने निर्माण होतो
मात्र टिळकांना झालेल्या शिक्षेमुळे सरकारला अपेक्षित असलेला परिणाम न होता उलट लोकमान्य टिळक रातोरात राष्ट्रीय हिरो झाले डोंगरीच्या शिक्षेने महाराष्ट्राचे हिरो बनलेले टिळक आता थेट राष्ट्राच्या अंतकरणात उतरले ह्या शिक्षेने टिळकांच्याबद्दल प्रेम व सहानुभूती आणि ब्रिटिशांच्याबद्दल प्रक्षोभ तयार झाला
दुसऱ्या बाजूला चाफेकरांच्या कबुलीजवाबानंतर प्लेगविरोधी मोहीम सौम्य करण्यात आली आणि ब्रिटिशांनी प्लेगची बाधा फक्त आपल्या लोकांना होणार नाही ह्याची काळजी घ्यायला सुरवात केली आणि हिंदुस्थानला त्याच्या प्रिय धार्मिक भावनेवर सोडले परिणामी प्लेग पसरत गेला आणि १९०२ पर्यंत त्याने साधारण २० लाख लोक मारले
वास्तविक टिळक हे धार्मिक प्रवृत्तीचे असले तरी विज्ञानाकडे पाठ करून न्हवते अगदी फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते होते तेव्हाही विज्ञानाचे प्राध्यापक माधवराव गोळेनीं प्रात्यक्षिकासाठी तयार केलेल्या विमानात तांत्रिक दोष राहिल्याने त्यांचे विमान उडेना तेव्हा टिळकांनी हे दोष दुरुस्त करून ते विमान उडवून दाखवले होते त्यामुळेच प्लेग निवारणाच्या कामातही टिळक सरकारी अधिकारांच्या बरोबर राहून काम करत होते उलट सरकारी अधिकारी चोख काम करत नाहीत अशी त्यांची तक्रार होती आणि जोरजबरदस्तीला त्यांचा विरोध होता पण नेत्याला समजून घेतील ते अनुयायी कसले टिळकांना धार्मिक क्षेत्रात सरकारचा हस्तक्षेप पसंद न्हवता आणि त्यांना प्लेग हा धार्मिक क्षेत्रात येत नाही ह्याची जाणीव होती म्हणून तर त्यांनी थेट सुश्रुतापासूनच प्लेगचा धांडोळा घेतला होता व वाग्भटापर्यंत ते पोहचले होते व्हिन्सेंट स्मिथचे मत (history of india page ७६८ ) प्रमाण मानले तर टिळकांच्याही आधी भारतात प्लेगचा विचार चक्क जहांगीर बादशाहने केला होता कारण जहांगीरच्या काळातही प्लेग आला होता आणि जहांगीरला तो उंदरापासून फैलावतो हे माहित होते तो म्हणतो
THE BRITISH PERIOD attracting much notice. An epidemic spread over a considerable region in Cutch and Sind in 1812, where it lasted for ten years. In 1836 the disease extended over a large area in Rajputana. But no very widely diffused outbreak in India seems to be recorded after 1616, in the reign of Jahangir, when the pestilence wrought havoc in almost every locality of northern and western India, lasting for eight years. Jahangir, an acute observer, described the symptoms accurately, and noted how the disease affected rats and mice. The Deccan was smitten in 1703 and 1704.
ह्या घटनेमागे असणाऱ्या चाफेकरांना मुळात धर्मरक्षण म्हणजे स्वराज्यप्राप्ती असे काहीतरी वाटणे हे त्यांच्या घरातील कीर्तनी परंपरेला साजेसे होते त्यामुळेच त्यांच्या संस्थेतील एकाने विकटोरीया राणीच्या पुतळ्याला डांबर फासले होते
टिळक प्लेगचा वैज्ञानिक विचार करत असतांना चाफेकर मात्र आपल्या धार्मिक भावना दुखावून घेत होते हे अजिबोगरीब म्हंटल पाहिजे ह्या घटनेमागे असणाऱ्या चाफेकरांना मुळात धर्मरक्षण म्हणजे स्वराज्यप्राप्ती असे काहीतरी वाटणे हे त्यांच्या घरातील कीर्तनी परंपरेला साजेसे होते त्यामुळेच त्यांच्या संस्थेतील एकाने विकटोरीया राणीच्या पुतळ्याला डांबर फासले होते हिंदुत्ववादाच्या इतिहासातला हा विरोधाभास पुढेही कायमच राहिला म्हणजे सावरकर विज्ञाननिष्ठ तर अनुयायी धर्मनिष्ठ वैग्रे
त्यामुळे टिळकांना अटक करण्याचा सरकारी अधिकाऱ्यांचा उद्देशच न्हवता पण इंग्रजी वर्तमानपत्रांची कुजबुज मोहीम प्रभावशाली ठरली आणि टिळकांच्या अटकेचे वॉरंट निघाले
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ४४ श्रीधर तिळवे नाईक
कवितेवरून उभा राहिलेला राजद्रोहाचा खटला आणि काँग्रेस टिळकांना अटक झाल्यानंतर देशभर त्याचे पडसाद उमटले एका हिंदुत्ववादी पुढाऱ्याला झालेली ही अटक कशी हाताळावी हे काही दिवस काँग्रेसला कळेना विशेषतः उदारमतवादी सेक्युलर नेते चांगलेच गोंधळात पडले काँग्रेसमध्ये ह्या काळात उदारमतवाद्यात दोन प्रवाह होते
पहिला प्रवाह हा राजाराम मोहन रॉय ह्यांनी सुरु केला होता त्यांनीच भारतात प्रथम हिंदुइझम म्हणजे हिंदुवाद हा शब्दप्रयोग वापरला होता ह्या अंगाने डरमॉट किल्लीन्गली ह्या इतिहासकाराने १८१६ व १८१७ ह्या काळात लिहिलेल्या त्यांच्या दोन पत्रांचा उल्लेख केला आहे व त्यांची चर्चाही केली आहे रॉय ह्यांनी सुरु केलेला हा हिंदुवाद हा भारतीय उदारमतवादाचा जनक होता आणि त्यामुळेच त्यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणणारे लोक आहेत मी मागेच सिद्ध केल्याप्रमाणे भारतीय प्रबोधनाचे जनक बसवेश्वर आहेत मात्र वेदान्तिक हिंदू प्रबोधनाचा आरंभ राजाराम मोहन रॉय ह्यांनी केला असे म्हणता येईल हा राजाराम रॉयवाद आपल्या हिंदू धर्मात सुधारणा व्हाव्यात ह्याचा पुरस्कर्ता होता काँग्रेसमध्ये रानडे हे ह्या हिंदू सुधारणावादी प्रबोधनाचे पाईक होते त्यांना गोखलेंच्यात आपला शिष्य दिसला आणि टिळकांच्या अटकेचा फायदा घेऊन त्यांनी गोखलेंना पुढे आणायला सुरवात केली इतर राजारामरॉयवाद्यांनी त्यांना साथ दिली
दुसरा प्रवाह हा ह्यूमवादी उदारमतवाद्यांचा होता ह्यांचा युरोपियन लोकांच्यावर जास्त विश्वास होता हे लोक सूटबूटवादी होते ह्यांना टिळकांचे नेतृत्व काँग्रेसला फायदेशीर आहे ह्याची जाणीव होती शिवाय त्यांच्या धार्मिक श्रद्धांना टिळकांचा हिंदुत्ववाद एका अर्थाने संरक्षणच देत होता म्हणजे टिळकांना जसा हिंदू धर्मात सरकारचा हस्तक्षेप नको होता तसा ह्यांना आपल्या पारशी , ख्रिश्चन वा मुस्लिम धर्मात सरकारचा हस्तक्षेप नको होता
मात्र हे लोक टिळकांच्या हिंदुत्ववादाच्या विरोधात होते त्यांना मराठ्यांचं राज्य नको होते
मात्र काँग्रेसच्या मजबुतीसाठी टिळक हवे होते
साहजिकच टिळकांना अटक झाल्यानंतर काँग्रेसमध्ये क्षणभर शांतता पसरली टिळकांच्या अटकेचा वापर काँग्रेसच्या हितासाठी कसा करायचा ह्याचाही विचार सुरु झाला सरकारने फक्त टिळकांना अटक केली नाही तर केसरीशी संबंध आहे म्हणून हरी गोखले व केशवराव बाळ ह्यांच्यावरही वॉरंट काढण्यात आले २८ जुलैला श्रीमंत बाळासाहेब व तात्यासाहेब नातू ह्यांनाही अटक करून जेलमध्ये पाठवण्यात आले टिळकांचा रँडच्या खुनात हात आहे कि नाही ह्याची चाचपणी सुरु झाली टिळकांची जामिनावर मुक्ती झाली टिळकांची अजूनही सारी कर्जे फिटली न्हवती ते ओळखून पुढील खटला चालवण्यासाठी डिफेन्स फ़ंड सुरु करण्यात आला सुरेंद्रनाथ बॅनर्जी व बाबू घोष ह्या दोन बंगाल्यांनी ह्यात फारच पुढाकार घेतला
इकडे मराठ्यांना असलेला फुटीरतेचा शाप पुन्हा वळवळला बनावट कागदपत्रे तयार केली म्हणून शिक्षा झालेल्या द्रविड ह्या गृहस्थाने आपल्याच मित्रांची म्हणजे दामोदर व बाळकृष्ण चाफेकरांची नावे इंग्रजांना कळवली
केसरीतील भवानी तरवार ह्या कवितेचा आधार घेऊन हा राजद्रोहाचा खटला भरण्यात आला होता तोही हीचा अनुवाद इंग्लिश वर्तमानपत्रात भाषांतरित झाल्यावर ज्याची चर्चा मी मागे केली आहे
गंमतीचा भाग म्हणजे ज्युरींपैकी कुणालाच मराठी भाषा येत न्हवती कारण ज्युरींच्यापैकी कोणीच मराठी न्हवते त्यामुळे खुद्द टिळकांना कवितेचा शब्दार्थ सांगण्याची वेळ कोर्टात आली ८ सप्टें ला सुरु झालेला हा खटला १४ सप्टें ला संपला
ह्या दरम्यान गोपालकृष्ण गोखले ह्यांनी रँडच्या खूनासंदर्भात जे इंग्लंडमध्ये बयान दिले त्याबद्दल माफी मागितली (मला आशा आहे कि त्यांना कोणी माफीवीर म्हणणार नाही ) त्यामुळे खुद्द टिळकांचे मित्र असलेले व डिफेन्स फन्डला मदत करणारे बाबू घोष ह्यांनी टिळकांना त्यांनीही गोखलेंच्याप्रमाणे माफी मागावी अशी सूचना केली त्यावर टिळकांनी उत्तर दिले " माझा समाजातील दर्जा केवळ शिलावरच अवलंबून असल्यामुळे अशा खटल्यांनी भेदरून जाणे कमीपणाचे आहे आणि मी भेदरून गेलो तर पुढे महाराष्ट्रात राहणे व अंदमानात राहणे सारखेच "
टिळकांचे हे उत्तर बांगला प्रांतात त्यांची लोकप्रियता अधिकच वाढवणारे ठरले ह्या खटल्यात ज्युरीपैकी सहा जणांनी टिळकांना दोषी तर तिघा जणांनी निर्दोष ठरवले केशवराव बाळ ह्यांची निर्दोष मुक्तता झाली टिळकांना १८ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली
शेवटी भारताच्या निःशस्त्र स्वतंत्र्यलढ्यासाठी पहिला भारतीय नेता तुरुंगात गेला टिळकांच्या भाषेत सांगायचे तर ही सुरवात होती
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळकांवरचा राजद्रोहावरचा खटला : फिक्शन व वस्तुस्थिती लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ४५ श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळकांच्यावरचा हा खटला आता अनेक गोष्टींच्यामुळे इंटरेस्टिंग वाटतो
१ ह्या खटल्याबाबत पसरलेला एक समज म्हणजे टिळकांच्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ह्या अग्रलेखावर हा खटला होता प्रत्यक्षात तो भवानी तरवार कविता संदर्भात होता
२ टिळकांनी ह्या खटल्यात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे बाणेदार उद्गार काढले असाही एक समज आहे प्रत्यक्षात हे उदगार त्यांच्या ह्या सहकाऱ्यांचे आहे जे पुढे टिळकांनी वारंवार काढले
३ टिळक ह्या खटल्यात कवितेचा खोटा अर्थ सांगून कदाचित सहज सुटू शकले असते पण त्यांचा प्रामाणिकपणा इतका टोकाचा होता कि त्यांनी जो अर्थ आहे तोच सांगितला
४ टिळक माफी मागून सुटू शकले असते पण त्यांनी माफी मागितली नाही
५ ह्या खटल्यात त्यांना अंदमानावर पाठवले जाण्याची शक्यता होती पण टिळक तरीही डगमगले नाहीत
६ मी मागे म्हंटल्याप्रमाणे इंग्लिश वर्तमानपत्रांनी ही कविता भाषांतरित केल्यानेच ती इंग्रजांना कळली आणि भाषांतराचे काम जाणीवपूर्वक केले गेले होते
७ इंग्लिश मीडियाची टिळकांना शिक्षा व्हावी अशीच अपेक्षा होती आणि ती पूर्ण झाली इंग्लिश माध्यमांचा ब्रिटिश राज्यातील रोल नेमका काय होता ह्याची सखोल चौकशी होणे अटळ आहे ही माध्यमं उदारमतवादाच्या बाजूने उभी होती हे खरंय पण ती ब्रिटिशांच्या बाजूने उभी होती का हा एक प्रश्न आहे आणि तो ह्या खटल्याच्या निमित्ताने समोर येतो
८ ह्या खटल्यात ६ ब्रिटिश आणि ३ भारतीय ज्युरी होते भारतीयांनी टिळकांना निर्दोष तर ब्रिटिशांनी दोषी मानले कारण सर्वच ज्युरी पूर्वग्रहदूषित असावेत त्यामुळेच ज्याला आज फिक्सिंग म्हंटले जाते तसे काही इथे घडले असावे म्हणजे टिळकांना तुरुंगात पाठवायचे हे बहुदा आधीच ठरले असावे हे जर खरे असेल तर ब्रिटिशांना टिळक धोखादायक वाटत असावेत हे स्पष्ट दिसते
९ ह्या निमित्ताने न्यायालयात निर्माण झालेला भाषेचा प्रश्न महत्वाचा होता समजा टिळकांना इंग्लिश येतच नसती तर -- नाहीतरी ह्या खटल्यात भाषांतराच्या कामासाठी भांडारकरांना बोलवण्याचे घाटत होतेच पण टिळकांच्या प्रामाणिकपणाविषयी खुद्द न्यायालयाला इतकी खात्री होती कि टिळक चुकीचे भाषांतर देणार नाहीत ह्या खात्रीने भांडारकरांना बोलवणे रद्द केले गेले
१० राजद्रोहाचा खटला भारताला नवीन न्हवता मुघल व मराठा राज्यात तर राजद्रोहाचे खटले प्रचंड प्रमाणात होते टिळकांच्या आधीही बंडखोरांना फाशीपर्यंत शिक्षा झाल्या होत्या पण टिळक हे सुसंस्कृत कायदेशीर चौकटीत लढणारे नेते होते तरीही सरकारला ते सहन झाले नाहीत भारतातील सरकारे किती असहिष्णू आहेत हे ह्या खटल्यामुळे सिद्ध झाले
११ एकंदरच हा खटला कन्स्ट्रुक्टेड होता रचित होता असा आता निष्कर्ष काढता येतो भारतातील आपल्या हितसंबंधांना कुणीही धोका पोचवण्याचा प्रयत्न केला तर त्याची गत आम्ही टिळकांच्यासारखी करू असा हिडन मेसेज ब्रिटिश सरकारने दिला आणि अनेक सभ्य राजकारणी लोकांना तो पोहचलाही
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ४६
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळकांवरचा राजद्रोहावरचा खटला : फिक्शन व वस्तुस्थिती भाग २ प्रश्न असा आहे कि लोकमान्य टिळकांना आपण फ्रेम होतोय ह्याची जाणीव होती कि न्हवती तर उत्तर " होती " असं आहे
" इंग्रजी वर्तमानपत्रकार रागाच्या सपाट्यात काय वाटेल ते बरळू लागले आहेत "
(लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख भाग १ पृष्ठ ६७१)
किंवा
" ज्याने खून केला आहे त्यास खुशाल फाशी द्या .... आपल्यावरचा दोष टळावा एव्हढ्याकरिता नेटिव्ह वर्तमानकारास राजद्रोही ठरवण्याची ही खटपट चालू आहे बाकी काही नाही "(लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख भाग १ पृष्ठ ६७७) असे खुद्द टिळकांनी म्हंटले आहे
निकालानंतर केसरी मराठा बंद पडेल ही अपेक्षा धुळीस मिळाली २० तारखेला मराठा २१ तारखेला केसरी पुन्हा सुरु झाले आणि टाइम्सला ही बातमी तारेने कळवण्यात आली
ह्या खटल्याच्या निकालाचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटले होतेच पण ते जनतेतही उमटायला सुरवात झाली काँग्रेसच्या अमरावतीला होणाऱ्या अधिवेशनात विनाचौकशी डांबलेल्या नातूंच्या संदर्भात ठराव आणण्याचे ठरले पण टिळकांच्या अभिनंदनाचा ठराव आणणे मात्र बारगळले कारण नेमस्तांच्याकडे तेव्हढे धाडसच न्हवते
इकडे टिळकांनी नामदारपदाचा व म्युनिसिपल कौन्सिलचा राजीनामा दिला तर सरकारने त्यांना मुंबई विद्यापीठातील पदांचा त्याग करावयास भाग पाडले दोऱ्या वळण्यासाठी काथ्या साफ करावा लागतो टिळकांना तुरुंगात हे काम करावे लागले टिळकांना जेवणात कांदा चालत न्हवता आणि तुरुंगात कांद्याशिवाय कालवण बनत नसे त्यामुळे टिळकांचे हाल सुरु झाले तूप दूध तर दुरूनही दिसत न्हवते परिणामी वजन घटायला सुरवात झाली नातूंना घरचे जेवण खाण्याची परमिशन होती त्यांना टिळकांची स्थिती कळली तेव्हा त्यांनी आपल्या जेवणाचा काही भाग टिळकांना पाठवावयास सुरवात केली
टिळकांना सोडवण्याचे प्रयत्न सुरु झाले आणि फसले
इकडे काँग्रेसच्या १८९७ डिसेम्बरच्या अमरावती अधिवेशनात स्वागताध्यक्षपदी दादासाहेब खापर्डे होते जे लोकमान्यांचे मित्र होते त्यांनी दुष्काळ , प्लेग ह्यांची चर्चा करत सरकारच्या दडपशाहीचा मुद्दा ऐरणीवर आणला आणि टिळकांच्या कैदेचा मुद्दा हाच संमेलनाचा विषय बनला टिळकांना सर्व स्तरांवर मिळणारा फायदा इतका भरघोस होता कि टिळकांचे नाव कुठल्या वक्त्याने घेतले कि लोक टिळक महाराज कि जय च्या घोषणा देत साहजिकच काँग्रेसच्या वक्त्यांना कळून चुकलं कि आपणाला आवडो न आवडो पण काँग्रेससाठी टिळक अपरिहार्य आहेत
ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष शंकरन नायर ह्यांनीही टिळकांच्या खटल्यासंदर्भात संपूर्ण न्यायव्यवस्थेतील हिंदी लोकांच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उभे केले हिंदी ज्युरींची संख्या कमी असल्यानेच टिळकांना शिक्षा झाली असा त्यांनी तर्क दिला व सरकारने हिंदी लोकांचा ज्यूरीतला सहभाग वाढवावा आणि ह्यापुढे हिंदी माणसाचा राजद्रोहाचा खटला हिंदी ज्युरींच्यापुढे चालला पाहिजे अशी मागणी केली
आमच्या भूतकाळात आमच्या समस्यांची मुळे असली तरी कुणी ब्राम्हण त्यांना भूतकाळात शिक्षा न्हवती म्हणून आत्ताही त्यांना शिक्षा होऊ नये अशी मागणी करेल तर त्यालाही आमचा इंग्रजांच्याइतका विरोध असेल असेही त्यांनी सांगितले हे एक अत्यंत संतुलित भाषण होते ज्याचा शेवट हिंदी व इंग्रजी ह्यांच्यातली विषमता आम्हाला मान्य नाही असे ठणकावून सांगण्यात झाली
सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी ते नेमस्त पक्षाचे असूनही टिळकांची अटक ही सरकारची चूक होती असे सांगून ह्या अटकेमुळे सर्व राष्ट्राच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत असे सांगितले
ह्या अधिवेशनाचे रिपोर्ट इंग्रजांच्याकडे गेले आणि टिळकांची वाढती लोकप्रियता बघता आणि चाफेकरांनी दिलेला कबुलीजवाब बघता टिळकांच्यावर आपण थोडा अन्यायच केला असे सरकारलाही वाटू लागले व शिक्षा रद्द करणे अशक्य आहे तर निदान त्यांना आपण चांगले जेवण तरी द्यावे असे सरकारला वाटू लागले टिळकांचे वकील सेंटलूर ह्यांनी त्याकाळात कैद्यांच्या हक्कासंदर्भात इंग्लडमध्ये काम करणाऱ्या हावर्ड असोशिएशन ह्या संस्थेमार्फत तिला सारी माहिती कळवून काही काम होते का ते पाहायला सुरवात केली
ह्या सर्वच प्रयत्नांचा परिणाम होऊन टिळकांना डोंगरीच्या तुरुंगातून येरवड्याच्या तुरुंगात हलवण्यात आले व आधी दिलेले कठीण काम काढून घेऊन गालिचा व लॉकर रंगवण्याचे काम देण्यात आले टिळकांची वैज्ञानिक दृष्टी इथेही जागी झाली त्यांनी रंगकामाचा शास्त्रीय अभ्यास सुरु केला त्यासंदर्भातील पुस्तकं मागवली इथेच त्यांची भेट दामोदरपंत चाफेकर ह्यांच्याशी झाली चाफेकरांना दयेचा अर्ज द्यायचा होता पण त्यासाठी टिळकांची स्वाक्षरी हवी म्हणून हटून बसले होते वास्तविक टिळकांची स्वाक्षरी घेणे धोखादायक व निगेटिव्ह इम्पॅक्ट घडवणारे होते टिळकांनी समजावूनही केवळ श्रद्धेच्या आधारे जगणाऱ्या चाफेकरांना त्यातले तर्कशास्त्र कळेना परिणामी टिळकांनी सही दिली पण त्याचा परिणाम थोडा उलटा झाला चाफेकर व टिळक ह्यांचे संबंध होते अशी अफवा पसरली अर्ज फेटाळला जाऊन चाफेकरांना फाशीची शिक्षा झाली धर्मश्रद्धा कधीकधी काय करते त्याचा हा नमुना ! टिळकांनी धर्मश्रद्धेच बीज पेरलं त्यावेळी त्यांना कल्पनाही नसेल कि यातून असे काही उगवेल चाफेकरांचे और्ध्वदैहिक कसे व्हावे ते टिळकांनी पहावे अशी खुद्द चाफेकरांची इच्छा असल्याने टिळकांनी त्याची संपूर्ण काळजी घेतली व तुरुंगातून योग्य ती व्यवस्था केली चाफेकर टिळकांच्या कायदेशीर निःशस्त्र लढ्याच्या चौकटीत बसत नसले तरी त्यांच्यासाठी जे जे करता येईल ते ते टिळकांनी केले व त्यांना दिलेली सर्व वचने ब्रिटिशांची पर्वा न करता पार पाडली सशस्त्र क्रांतिकारकांचा सिद्धांत स्वीकारायचा नाही पण कायदेशीर चौकटीत राहून त्यांचा सन्मान करायचा शक्य असेल ती मदत करायची हा काँग्रेसी सिद्धांत टिळकांनी जन्माला घातला व पुढे गांधी व नेहरू ह्यांनीही तो पाळला काँग्रेसवाद आणि हिंदुत्ववाद अशा दोन्ही आयडियॉलॉजीच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा उचलणारे टिळक हे बहुदा एकमेव नेते व विचारवंत असावेत
श्रीधर तिळवे नाईक
टिळकांचे आर्यत्व , ओरायन आणि आपले महिने भाग १
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ४७
श्रीधर तिळवे नाईक
टिळकांचा कल कर्मयोगाकडे असल्याने त्यांच्यासारखा माणूस तुरुंगात स्वस्थ बसणे शक्यच न्हवते त्यांनी आपला अभ्यास पुन्हा सुरु केला टिळक एकांतात असले कि त्यांच्यातला सनातनी ब्राम्हण जागा होई कि काय न कळे !
हिंदुत्वाचे जे काही आधार आहेत त्यातील एक आधार सनातनत्व आहे हे सनातनत्व आर्यांच्या सनातनत्ववर ठरते ज्याचे तीन आयाम आहेत
१ कालिक आयाम वा कालिक सनातनत्व : ह्यात भारतीय आर्यांचे धर्मग्रंथ सर्वाधिक प्राचीन आहेत असे दाखवून त्यांचा कालखंड अधिकाधिक मागे रेटण्याचा प्रयत्न सुरु असतो हे करण्याचे आणखी कारण ब्रिटिशांना व यूरोपियनांना आम्ही तुमचेही थोरले भाऊ किंवा बाप आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न असतो
२ अवकाशीक आयाम वा अवकाशीक सनातनत्व : ह्यात आम्हीच ह्या आर्यभूमीचे सर्वात प्राचीन वंश असून जी काही भारतीय संस्कृती आहे ती आम्हीच निर्माण केली आहे व जे जे भारतात उदात्त उन्नत आहे ती आमची देणगी आहे असे दाखवण्याचा प्रयत्न असतो आमच्या आधीचे जे कोणी होते ते मागासलेले होते असेही सुचवायचे असते
आर्य कुठल्या अवकाशातून म्हणजे भूगोलातून म्हणजे कुठून आले हे मात्र त्या त्या वेळची सोय पाहून ठरवले जाते म्हणजे राज्यकर्ते परकीय असले कि आर्य भारताच्याबाहेरून येतात आणि आम्हीही तुमच्यासारखेच बाहेरून आलोय असे साम्य दाखवून सख्य साधले जाते ग्रीक इराणियन मुस्लिम व नंतर ब्रिटिश ह्यांच्याबाबत हा खेळ खेळला गेला आहे ह्याउलट स्वकीय राजवटी प्रस्थापित करायच्या असल्या कि आर्य ताबडतोब ह्याच देशातले होतात आणि आउट ऑफ इंडिया थेरी मांडली जाते व आर्यच कसे भारतातून बाहेर पसरत गेले ते सांगितले जाते
३ ह्यानंतर मग आर्यावर्त कसा चालवायचा हे सांगणारी स्वतःची काल्पनिक पौराणिक शास्त्रीक व धार्मिक पुस्तके कशी लादायची ते ठरवले जाते
लोकमान्य टिळक ह्याला अपवाद न्हवते
टिळकांनी ओरायन नावाचा ग्रंथ कालिक सनातनत्व सिद्ध करण्यासाठी लिहिला होता.
ओरायन काय होता ?
टिळक स्वतःला आर्य मानत आणि वेदांना आर्यांचा आद्यग्रंथ मानत विशेषतः ऋग्वेद ! साहजिकच वेदांचा कालखंड नेमका काय हा त्यांच्यापुढचा प्रश्न होता ह्या काळात बुद्धाचा कालखंड इसवीसनपूर्व ५०० मानला जाई आणि महावीर व त्याने वैदिक संस्कृतीविरुद्ध बंड केल्याने साहजिकच वेद त्याच्याआधीचे मानले जात वेद त्याच्या आधीचे असल्याने वेदांचा कालखंड त्या आधीचा मानला जाई
मॅक्स्मुल्लरने वैदिक वाङ्मयाचे छंद:काल मंत्रकाल ब्राम्हणकाल व सूत्रकाल असे चार भाग करून प्रत्येक भागाला २०० वर्षे देऊन बुद्धाच्या आधीची ८०० वर्षे म्हणजे इसवीसनपूर्व १२०० ते १३०० असा वेदाचा काळ निश्चित केला होता हे करतांना त्याने आधार घेतला होता तो भाषेचा पण असाच भाषेचा आधार घेऊन डॉक्टर हौ ह्यांनी प्रत्येक कालखंडाला ५०० वर्षे देऊन वेदकाळाचा आरंभ इसवीसनपूर्व २५०० पर्यंत मागे न्हेला होता त्याआधीही जोन्सपासून भाषिक आधाराच्या साहाय्यानेच ऋग्वेदाचा कालखंड ठरवला जात होता भाषाशास्त्राच्या अभ्यासातून वेगवेगळे विद्वान वेगवेगळे कालखंड सांगत असल्याने टिळकांच्या काळात ऋग्वेद कधी लिहिला गेला ह्याविषयी एकच गोंधळ उडाला होता
दुसरी पद्धत ज्योतिषीय होती आर्यांचा सर्वात जुना ज्योतिष ग्रंथ हा वेदांग ज्योतिष होता ह्याचे प्राचीनत्व संशयास्पद असले तरी आणि यूरोपियनांनी ह्या संदर्भात अनेक शंका व्यक्त केल्या असल्या तरी प्राचीन काळी आर्यांना खूप ज्योतिष अवगत होते अशी टिळकांच्या काळी आणि खरेतर अलीकडेही समजूत होती ह्या अंगाने प्रथम मांडणी करणारा श बां दीक्षित ह्यांचा भारतीय ज्योतिषशास्त्र हा द्विखंडी ग्रंथ हस्तलिखित रूपात टिळकांच्या हातात आला तो वाचताना ज्योतिषीय पद्धतीने वेदकाळ ठरवता येणे शक्य आहे हे टिळकांच्या लक्ष्यात आले त्यांनी ह्या ग्रंथाच्या प्रकाशनाला मदत केलीच पण स्वतःही ह्या अंगाने विचार सुरु केला
गीतेत श्रीकृष्णांनी मांसामध्ये मी मार्गशीर्ष महिना असे म्हंटले आहे श्रीकृष्णाने मार्गशीर्ष का म्हंटले हा प्रश्न टिळकांच्या डोक्यात उगवला व त्यातून वैदिक कालखंडाच्या आरंभाबद्दल काही करता येईल का ह्या दिशेने त्यांनी प्रयत्न सुरु केले
मी मागे म्हंटल्याप्रमाणे शैवांच्यात चैत्र महिना हा आरंभ आहे आणि तो निश्चित करणारा संपात लवचिक आहे हलू शकतो माझ्या मते शैवांच्यात महिनांत हा अमावास्येने होता कारण प्रथमा द्वितीया अश्या तिथ्या काउंट करायला अमावास्यान्त सोपा आहे म्हणजे अमावस्येनंतर प्रथमा द्वितीया अशी गणना होत महिन्याच्या मध्यभागी पौर्णिमा होई पुढे शिवांना निर्वाण प्राप्ती अमावास्येला झाल्याने (ज्याला आता सर्व शैव महाशिवरात्र म्हणून साजरे करतात )शैवांच्यात महिनांत हा अमावास्यान्त म्हणजे अमावास्येने रूढच झाला. महिन्याचा शेवट पोर्णिमेनं करायचा कि अमावास्येनं करायचा हा आजही वाद आहे अमावास्येला अशुभ समजणारे वैदिक आणि अमावास्येला शुभ मानून तिला शिवरात्र म्हणणारे शैव ह्यांच्यातील झगडा आजही संपलेला नाही
श बां दीक्षितांच्या मते वैदिकांच्यात महिनांत हा शैवांच्याप्रमाणे अमावास्यांत न्हवता तर पूर्णिमान्त होता म्हणजे महिन्याचा शेवट पोर्णिमेने होत होता व आरंभ चतुर्दशी त्रयोदशी होत मध्ये अमावस्या येई महिन्याचा शेवट अर्थात पोर्णिमेने होई
प्रश्न असा होता कि अशा गणतीमुळे वर्षारंभ पुढे जाऊन कधी काळी मार्गशीर्ष महिन्यात वर्षारंभ झाला होता का ? श्रीकृष्ण गीतेत स्वतःला महिन्यात मी मार्गशीर्ष असे का म्हणतो ? असे म्हणण्याचे काहीतरी कारण असावे असे टिळकांना वाटू लागले
ह्याच मार्गशीर्षाच्या बाबत एक गोष्ट मला जाणवते ती म्हणजे आपण जर बारकाईने पाहीले तर मार्गशीर्ष महिना आरंभीचा मानण्याकडे युरोपियन लोकांचाही विशेष कल आहे त्यांची वर्षारंभ तारीख १ जानेवारी आहे जी अनेकदा मार्गशीर्षात येते ख्रिस्ताचा मृत्यू व पुनरुत्थान हे साधारण मार्गशीर्ष महिन्यात होते माझे स्वतःचे मत असे कि प्राचीन ज्यू लोक हे त्यांचे कॅलेंडर मार्गशीर्षापासूनच सुरु करत व पुढे ह्या महिन्यातच ख्रिस्ताचा मृत्यू व पुनरुत्थान झाल्याने त्याच्या आरंभतिथीत वा आरंभतारखेत फरक पडला असावा असो अलीकडे ते पौष कडे सरकू शकते त्यामुळं टिळकांना ह्या महिन्याविषयी प्रेम निर्माण होण्याचे कदाचित हे दुसरे कारण असू शकते युरोपियन आर्य इराणियन आर्य आणि भारतीय आर्य ह्यांचे मूळ एकच आहे असे त्याकाळी अनेकजण मानत टिळक त्याला अपवाद न्हवतेच
टिळकांनी ह्या मार्गशीर्षाच्या शोधापासून आरंभ करत ऋग्वेदाच्या लिखाणाचा काळ हा इसवीसनपूर्व ५००० ते ६००० असल्याचे सिद्ध केले आणि त्यानंतर सर्वच हिंदुत्ववादी ऋग्वेदाची तारीख ही अनेक विद्वानांनी इसवीसनपूर्व १५०० ते ९०० ह्या दरम्यानची सांगितली तरी अट्टाहासाने इसवीसनपूर्व ५००० ते ६००० सांगत राहिले काही शहाणे तर इसवीसनपूर्व १०००० ते १००००० ह्या दरम्यानची काहीही तारीख सांगू लागले आणि भारतीय इतिहास-संशोधनात ह्यातून अनेक अनर्थ उद्भवले अकबराने बिरबलाला तीन हट्ट सांगायला सांगितले तेव्हा त्याने राजहट्ट , स्त्रीहट्ट व बालहट्ट असे तीन हट्ट सांगितले होते त्याला चौथा हट्ट माहित न्हवता ह्या चौथ्या हट्टाला मी आर्यहट्ट म्हणतो जो काही झाले तरी संस्कृतिश्रेष्ठत्वाचा आपला हेका सोडत नाही
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ४७ श्रीधर तिळवे नाईक
टिळकांचा कल कर्मयोगाकडे असल्याने त्यांच्यासारखा माणूस तुरुंगात स्वस्थ बसणे शक्यच न्हवते त्यांनी आपला अभ्यास पुन्हा सुरु केला टिळक एकांतात असले कि त्यांच्यातला ब्राम्हण जागा होई कि काय न कळे !
टिळकांनी ओरायन नावाचा ग्रंथ लिहिला होता त्या पार्श्वभूमीवर हा अभ्यास होता .
ओरायन काय होता ?
टिळक स्वतःला आर्य मानत आणि वेदांना आर्यांचा आद्यग्रंथ विशेषतः ऋग्वेद साहजिकच वेदांचा कालखंड नेमका काय हा त्यांच्यापुढचा प्रश्न होता ह्या काळात बुद्धाचा कालखंड इसवीसनपूर्व ५०० मानला जाई आणि वेद त्याच्या आधीचे असल्याने वेदांचा कालखंड त्या आधीचा मानला जाई
पुढे
पृथ्वीचा नक्षत्रातून फिरणारा मार्ग म्हणजे क्रांतिवृत्त व विषुववृत्त ही दोन्ही एका पातळीत नाहीत त्यामध्ये साधारण साडेबावीस ते तेवीस अंशाचा कोन आहे
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ४७ श्रीधर तिळवे नाईक
ओरियन किंवा ओरायन म्हणजेच मृगशीर्ष किंवा मार्गशीर्ष तारा व आर्यांचे मूळ
गीतेत श्रीकृष्णांनी मांसामध्ये मी मार्गशीर्ष महिना असे म्हंटले आहे श्रीकृष्णाने मार्गशीर्ष का म्हंटले हा प्रश्न टिळकांच्या डोक्यात उगवला व त्यातून वैदिक कालखंडाच्या आरंभाबद्दल काही करता येईल का ह्या दिशेने त्यांनी प्रयत्न सुरु केले १८९० ते १८९२ हा टिळकांचा कालखंड वैचारिक पातळीवर ह्याही संशोधनात ऍक्टिव्ह होता जो तुरुंगात पुन्हा ऍक्टिव्ह झाला
शैवांच्यात चैत्र महिना हा आरंभ आहे आणि तो लवचिक आहे हलू शकतो वैदिकांच्यात आरंभ संपात स्थिर आहे साहजिकच ते अयनांश पकडून गणित करतात
सर्वसाधारणपणे त्याकाळी ऋग्वेदाचा कालखंड इसवीसनपूर्व १५०० ते २०० पर्यंत सांगितला जात होता
मार्गशीर्ष महिना आरंभीचा मानण्याकडे युरोपियन लोकांचा विशेष कल आहे ख्रिस्ताचा मृत्यू व पुनरुत्थान हे साधारण मार्गशीर्ष महिन्यात होते अलीकडे ते पौष कडे सरकू शकते त्यामुळं टिळकांना ह्या महिण्याविषयी प्रेम निर्माण होण्याचे हे दुसरे कारण असू शकते युरोपियन आर्य इराणियन आर्य आणि भारतीय आर्य ह्यांचे मूळ एकच आहे असे ते मानत
महिन्याचा शेवट पोर्णिमेनं करायचा कि अमावास्येनं करायचा हा वाद आहे दीक्षितांच्या मते पूर्णिमान्त महिना हीच वैदिकांची परंपरा होती माझ्या मते शैवांच्यात महिनांत हा अमावास्येने होता कारण प्रथमा द्वितीया अश्या तिथ्या काउंट करायला अमावास्यान्त सोपा आहे पुढे शिवांना निर्वाण प्राप्ती अमावास्येला झाल्याने (ज्याला आता सर्व शैव महाशिवरात्र म्हणून साजरे करतात )शैवांच्यात महिनांत हा अमावास्यान्त म्हणजे अमावास्येने रूढच झाला.
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ४८ श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक व आर्यांचे मूळ
५० गेले काही आठवडे आपण राखीगडीवरून आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांताबाबत होणारे वाद पहात आहोत टिळकांनांही तुरुंगात असतांना हा प्रश्न सतवायला लागला होता मी हिंदुत्वाचे सनातनत्व हे एक महत्वाचे तत्व आहे असे प्रतिपादन करताना टिळक कालिक सनातनत्व सिद्ध करण्यासाठी वेदांचा प्रस्थापित काळ कसा इसवीसनपूर्व ५००० ते ६००० असा मागे न्हेतात ते दाखवलं होतं अलीकडे सत्यप्रसाद मिश्र ह्यांनी काही नव्या पुराव्यानुसार हाच कालखंड असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे टिळकांचे कमबॅक झाले आहे
आता टिळक अवकाशीक भौगोलिक सनातनत्व शोधत कसे मागे जातात ते दाखवणार आहे
टिळक तुरुंगात असतांना मॅक्समूलरने त्यांना त्याने तयार केलेल्या ऋग्वेद संहितेची दुसरी आवृत्ती पाठवून दिली ती वाचतांना टिळकांच्या डोक्यात जे काही चिंतन झाले त्यातून त्यांनी द आरटिक होम इन वेदाज हा ग्रंथराज १८९८ साली सिद्ध केला
मी मागे एक्सप्लॉइटर्स गिल्ट व एक्स्प्लॉईटेड फिल्ट नावाचा सिद्धांत मांडला होता त्यातील एक्सप्लॉइटर्स गिल्ट व एक्स्प्लॉईटेड फिल्ट ह्यातील दोन्हींचा अजिबोगरीब समन्वय ब्राम्हणी आर्यन इन्वेजन थेरीत घडतो ह्या थेरीत ब्राम्हण व क्षत्रिय ह्या पुण्ययोनीत जन्मलेल्या माणसांच्या डोक्यात एकाचवेळी आपण शैवांच्यापेक्षा कसे वेगळे व उच्च आहोत हे दाखवून देण्याचा किडा असतो तर त्याचबरोबर शैवांच्यावर त्यांच्यातील वैश्य शूद्र अतिशूद्र व आदिवासी ह्या श्रीकृष्णाच्या दृष्टीने पापयोनीज व अयोनिज असलेल्या लोकांच्यावर अधिराज्य गाजवण्याची सुप्त आकांक्षा असते त्याउलट ब्राम्हणेतर विचारवंतांच्या आर्यन इन्वेजन थेरीत आर्य कसे बाहेरून आलेत आणि आम्ही कसे मूलनिवासी आहोत हे सिद्ध करण्याचा किडा असतो
एक्स्प्लॉइटेड फिल्ट मध्ये वैश्य शूद्र अतिशूद्र व आदिवासी ह्या पापयोनीज व अयोनिज
आपण मूळ कसे ब्राम्हण वा क्षत्रीय वंशाचे आहोत हे सिद्ध करून स्वतःला ब्राम्हण वा क्षत्रिय असण्याचा फील घेत राहतात हा फील -कॉम्प्लेक्स एक प्रकारचा मानसिक उच्चत्वाचा अबोध फील देतो रस देतो रसस्राव देतो आणि हा रसस्राव वैश्य शूद्र अतिशूद्र व आदिवासी ह्या पापयोनीज व अयोनिज लोकांना पुण्ययोनींनी निर्माण केलेल्या न्यूनगंडाचा निचरा करत राहतो इथे पुण्ययोनींचा अहंगंड जितका खोटा तितकाच पापयोनी व अयोनी लोकांचा न्यूनगंडही खोटा पण दोन्ही बाजूने हा खोटेपणा ऍक्टिव्ह राहिल्याने हे खोटे खऱ्याहून आधिक खरे होत जाते आणि आनंदरसस्त्राव वा सुखरसस्राव होत राहतो
नॉन इंडियन आर्यन इन्वेजन थेरीत मात्र स्वतःला आर्यन समजणारे नॉनइन्डियन आर्यन (NIA )व स्वतःला नॉनआर्यन समजणारे नॉनइन्डियन (NINA )असे दोन्हीही लोक आपापली मते व संशोधने मांडत राहतात आजही अनेक जर्मन व इराणी इराकी लोक स्वतःला आर्य समजतात व त्यांना त्यामुळेच इंडियात कमालीचा रस असतो तर स्वतःला आर्य समजणारे इंडियन जर्मन व इराणीइराकी ह्यांना आपले भाऊ समजतात
वेद व अवेस्ता ही एक विलक्षण गोष्ट आहे कारण कदाचित जगातले हे एकमेव वाङ्मय आहे ज्यात टोळ्यांचा यातू धर्म पूर्णपणे सुरक्षित ठेवला गेला आहे त्यातील मंत्र शाबूत ठेवले गेले आहेत अलीकडे अनेक आदिवासी टोळ्यांचे यातू धर्म व मंत्र उपलब्ध झाल्याने वेदांचे आकर्षण ओसरले असले तरी जी व्याप्ती आणि संख्या वैदिक यातू मंत्रांना प्राप्त आहे ती इतर टोळ्यांच्या मंत्रांना नाही सूर आणि असुर ह्या दोन्ही टोळ्यांनी आपली ही सांस्कृतिक विरासत जपून ठेवल्यानेच धार्मिक सामाजिक संशोधनाच्या अनेक शाखा खुल्या झाल्या मॅक्समूलरच्या भाषेत सांगायचे तर वेदात छंदःशास्त्रीय मंत्रशास्त्रीय धर्म टिकवला गेलाय ह्यानंतरची पौराणिक व कायदे कानूनीक अवस्था अनेक धर्मात आढळते सगळे ज्युडायिक धर्म हे पौराणिक कथा सान्गतात आणि कायदेकानूनही खुद्द सुरांचा पौराणिक धर्म ब्राम्हण व सूत्रीय-स्मृतीय पद्धतीने येतो वैष्णव धर्म हा तर सरळ सरळ पौराणिक धर्म म्हणून अवतरला आणि हिंदू हा धर्म अथपासून इतिपर्यंत पौराणिक धर्म आहे ह्या पौराणिकतेचा इतका प्रभाव पडला कि शैव जैन व बौद्ध धर्मी लोकांनीही पुराणे रचायला सुरवात केली
टिळकांना एकीकडे गीताधर्म प्रस्थापित करायचा होता जो वैष्णव होता तर दुसरीकडे वैदिकतेचे सनातनत्व प्रस्थापित करून हिंदू धर्माला सर्वात प्राचीनत्व प्राप्त करून द्यायचे होते ओरायनमध्ये त्यांनी ऋग्वेद हा ग्रंथ प्राचीन असल्याचे सिद्ध केले आता आर्यवंशाची प्राचीनता सिद्ध करणे भाग होते त्यासाठी आर्यांचे मूळ वसतिस्थान कोणते हे शोधणे भाग होते
टिळकांच्या पूर्वी व टिळकांच्या काळात प्राचीन शैव इंडस हरप्पा संस्कृतीचा शोध लागला न्हवता त्यामुळे ब्रिटिशांशी बंधुभावाचे नाते जोडू पाहणारे सर्वच ज्यात महात्मा फुलेही येतात आर्य बाहेरून आलेत अशी मांडणी करत होते
ह्या काळातील ओरिएंटॅलीस्टची ब्राम्हणांनी अशी ठाम समजूत करून दिली होती कि हिंदू धर्म शाश्वत आहे आणि वेदही शाश्वत आहेत आणि प्रत्येक हिंदू ह्यावर विश्वास ठेवतो दुसरीकडे हेच ब्राम्हण हिंदूंच्यातील शूद्र अतिशूद्र आणि आदिवासी ह्यांना तुम्ही वैदिक नसल्याने तुम्हाला वेद शिकण्याचा अधिकार नाही असं सांगत होते म्हणजेच ह्या ब्राम्हणांच्या डोक्यात वैदिक हा धर्म वेगळा आहे ह्याची जाणीव होती मात्र पौराणिक धर्माच्या कर्मकांडांचा अधिकार मात्र ह्या ब्राम्हणांना सोडायचा न्हवता त्यातूनच हिंदू धर्माची निर्मिती झाली म्हणजे तुम्ही वैदिक नाही आहात पण तुमचे पुरोहित मात्र आम्हीच आहोत मात्र तुमचे धर्मग्रंथ वेद वाचण्याचा हक्क तुम्हाला नाही त्यातील मंत्रांच्यावर तुमचा हक्क नाही अशी ही ब्राम्हणी धार्मिक रचना होती इतकी भंपक रचना जगाच्या पाठीवर कुठंच नसेल अशी रचना सांगायला ह्या लोकांना लाज कशी वाटली नाही हा प्रश्न आजही पडतो युरोपियन लोकांनी ही रचना अभ्यास न करताच जणू खरोखरच अस्तित्वात आहे असं गृहीत धरून स्वीकारली प्रत्यक्षात बहुजन शैव समाजाला ह्या आर्यसूर वेदांशी काही देणंघेणंच न्हवतं त्यामुळे त्यांच्या कालखंडाची चर्चा महात्मा फुले ह्यांनी फारशी केलीच नाही फुले आर्यांना इराणियन मानत होते आणि आर्यांची अवतार संकल्पना ते आर्यांच्या आक्रमणाचा इतिहास म्हणून पाहात होते त्यांनी असे करण्याचे कारण उघड होते ते संपूर्ण इतिहास बळी वंशाच्या संदर्भात पहात होते हे करतांना त्यांना एका गोष्टीचा विसर पडला होता ती गोष्ट म्हणजे अंतिमतः ह्या आर्यांनी विशेषतः सुरांनी रचलेल्या पुराणकथा होत्या ह्या अंगाने एक कविताही माझ्याकडून आली होती ती पुढीलप्रमाणे
बळीसाठी एक कविता
इडापिडा टळो
आणि बळीचं राज्य येवो
मी कधीच म्हणत नाही
कारण मला
तुझ्याविषयी मुळीच आदर
नाही
तू वामनाची ब्राम्हण म्हणून ऑथॅरिटी मानलीस
तिथंच तू
माझ्या दृष्टीनं सम्पलास
राजाने स्वतःकडे पहावयाचे नसते
तर जनतेकडे पहावयाचे असते
वामनाला वर
देताना
तू जनतेकडे पाहिलं होतंस काय
आणि जर
भोळसटपणानं हे केलं असशील
तर तू
कसला राजा ?
आणि जमीन काय तुझ्या बापाच्या मालकीची होती काय
जी तू
मूर्खासारखी वामनाला देऊन
पाताळात गेलास ?
तू आमच्या बहुजनांच्या चिरंतन मूर्खपणाचं प्रतीक आहेस
जो वामनासारख्यानां बहुजनांच्या जमिनी देतो
आणि चिरंजीव होतो
तुझे राज्य पुन्हा परत आले
तरी काय
गॅरंटी कि
तू पुन्हा आपलं राज्य
मुर्खासारखे वामनाला देणार नाहीस
मला तुझे राज्य पुन्हा नको
तू पाताळातच रहा
पृथ्वीवर उगवू नकोस
आमच्या जमिनी आम्हीच परत मिळवू
(समाप्त )
अनेकांना असं वाटेल कि आर्यांच्या आक्रमणाच्या चर्चेत बळीचे काय काम आहे ? तर काम हे आहे कि प्रबोधनाच्या प्रोजेक्टमध्ये बहुजनांच्या कडून आर्य आक्रमणाचे जे पहिले रूप सादर केले गेले त्याचे बळी आणि वामन हे प्रतीक आहेत आणि आपण नक्की काय करतोय ह्याची कसलीही चिकित्सा न करता बहुजनवाद हे प्रतीक स्वीकारतो बळी हा आपला खरोखर आदर्श होऊ शकतो का हा माझा प्रश्न आहे पहिली गोष्ट ह्यात वामन सूर आहे तर बळी असुर असुरांशी ह्या देशातल्या बहुजनांशी अनेकदा चांगले संबंध होते हे खरे असले तरी असुर म्हणजे इथले बहुजन न्हवेत इथले बहुजन शैव आहेत ही कथा सूर असुर संघर्ष दर्शवते त्याचबरोबर ब्राम्हण व क्षत्रिय हा संघर्षही दर्शवते इथे वामनाची मेथोडॉलॉजी ही ब्राम्हणी आहे तो राज्य मिळवतो ते चक्क दान म्हणून युद्ध करून न्हवे
दुसरी गोष्ट कोणीतरी डेढफुट्या येतो आणि चक्क बहुजनांच्या राजाला उल्लू बनवून जातो हे मला मान्य नाही असली प्रतीकं चुकीचे आदर्श निर्माण करतात सूर आर्यांनी ह्या कथेत आम्ही डेढफुट्या असलो तरी असुरांना गाडू शकतो असा काल्पनिक माज केलाय आणि आश्चर्यकारकरित्या तो ब्राम्हणांनी आणि ब्राह्मणेतरांनी समान आस्थेने स्वीकारला आणि साठोत्तरी बहुजनवाद्यांनी तर ह्या कथेच्या आधारे चक्क डान्सचं केला परिणाम सगळे ओबीसी नेते बळी आणि सत्तेवर वामन !
दुसरी गोष्ट कोणीतरी डेढफुट्या येतो आणि चक्क बहुजनांच्या राजाला उल्लू बनवून जातो हे मला मान्य नाही असली प्रतीकं चुकीचे आदर्श निर्माण करतात सूर आर्यांनी ह्या कथेत आम्ही डेढफुट्या असलो तरी असुरांना गाडू शकतो असा काल्पनिक माज केलाय आणि आश्चर्यकारकरित्या तो ब्राम्हणांनी आणि ब्राह्मणेतरांनी समान आस्थेने स्वीकारला आणि साठोत्तरी बहुजनवाद्यांनी तर ह्या कथेच्या आधारे चक्क डान्सचं केला परिणाम सगळे ओबीसी नेते बळी आणि सत्तेवर वामन !
एकीकडे फुले बळिवंशात अडकत असतांना टिळक आर्यवंशात अडकतात फुले बळीला आद्य पुरुष मानतात तर टिळक मनूला आद्यपुरुष मानतात साहजिकच मनूच्या संदर्भात वैश्विक पुराची जी घटना घडली तिला ते अनन्यसाधारण महत्व देतात आणि हिमयुगांनंतर आर्यांनी आपले मूळ रहिवासस्थान सोडून आर्यावर्तात आगमन केले अशी मांडणी ते करतात
टिळकांना आपण वामन वा मनूचे वंशज आहोत ह्याचा अभिमानच आहे पण त्यामुळेच एक गम्मत घडते ती म्हणजे टिळक आपल्या ग्रंथाची चिकित्सा करण्याचा अधिकार हा फक्त ब्राम्हणांना आहे असा सनातनवादी षटकार ठोकतात परिणामी ह्या ग्रंथाची ब्राम्हणेतरांनी फारशी चिकित्साच केली नाही आणि विदेशी विचारवंतांनीही सुरवातीला दुर्लक्ष्यच केले
ह्या ग्रंथामुळे महाराष्ट्रात आर्य मूलनिवासी सिद्धांत आणि आर्य आक्रमण सिद्धांत ह्या दोन सिद्धांतात युद्ध सुरु झाले जे अजूनही संपलेले नाही
एरव्ही एकमेकांशी अजिबात न पटणाऱ्या फुले आणि टिळक ह्यांचे एका गोष्टीवर एकमत होते ती गोष्ट म्हणजे आर्य बाहेरून आर्यावर्तात वा भारतात आले
श्रीधर तिळवे नाईक
ह्या ग्रंथामुळे महाराष्ट्रात आर्य मूलनिवासी सिद्धांत आणि आर्य आक्रमण सिद्धांत ह्या दोन सिद्धांतात युद्ध सुरु झाले जे अजूनही संपलेले नाही
एरव्ही एकमेकांशी अजिबात न पटणाऱ्या फुले आणि टिळक ह्यांचे एका गोष्टीवर एकमत होते ती गोष्ट म्हणजे आर्य बाहेरून आर्यावर्तात वा भारतात आले
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ४९ श्रीधर तिळवे नाईक
आर्यांचे मुळस्थान आणि टिळक २
(सर्वात प्रथम लोकमान्य टिळक आणि अरविंद घोष ह्यांच्यामुळे राजकारणात आलेल्या , बुद्ध व मार्क्स ह्यांना बाबासाहेब आंबेड्करांच्याप्रमाणे एकत्रच पाहणाऱ्या भारतीय समाजवादाचे पितामह असलेल्या आचार्य नरेंद्र देवांना नमन करतो नव्या नरेंद्राच्या जमान्यात ह्या जुन्या नरेंद्रची आठवण भारतीय ठेवोत न ठेवोत मला ती ठेवणे आवश्यक वाटते कारण त्यांचे बौद्धाचार्य वसुबंधूच्या अभिधर्मावरचे काम ! हिंदी भाषेबाबत कट्टर देशीवादी आग्रह धरला नसता तर हा माणूस कुठच्या कुठं गेला असता असो )
इतिहासकार हे चार प्रकारचे असतात
मार्गी इतिहासकार जे राष्ट्रवादी राष्ट्रीय मार्गीचे समर्थक असतात किंवा आंतरराष्ट्रीय मार्गीवादी जे आंतरराष्ट्रीय मार्गीचे समर्थक असतात ह्यातील आंतरराष्ट्रीय मार्गीवादी असलेल्या युरोपियन लोकांनीच आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत मांडला तोवर बिचाऱ्या भारतीय आर्यांना त्यांनी आक्रमण केलं होतं हे माहित न्हवतं आपण शैव लोकांच्यापेक्षा वेगळे आहोत एव्हढीच त्यांची धारणा होती
देशी इतिहासकार जे देशी संस्कृतीचे प्रादेशिक संस्कृतीचे समर्थक असतात आणि
ज्यांचा मार्गी वर्चस्वाला विरोध असतो अनेकदा राष्ट्रीय मार्गी आणि देशी एकच वाटतात कारण दोघेही परंपरेविषयी बोलत असतात प्रत्यक्षात राष्ट्रीय मार्गी ही प्रस्थापित परंपरेचा उद्घोष करीत असते उदा भारतात वैदिक वैष्णव ब्राम्हणी हिंदू परंपरा ह्या आपली परंपरा मिरवत न्हेतात आणि त्या परंपरेन्तर्गत असलेल्या वर्ण जातिव्यवस्थेचे समर्थनही करतात मग मी जातिव्यवस्थेचा आडवा अक्ष मानतो वैग्रे समर्थने दिली जातात कुठलीही आडवी गोष्ट उभी करणारा मनुष्य जन्मतोच हे भविष्य न दाखवता !
तिसरे जमाती इतिहासकार हे आदिवासी जमातीत आदिवासी जमातीचे समर्थक इतिहासकार असतात आणि काही तर इतके कट्टर असतात कि फक्त आपल्या आदिवासी जमातीचे बघतात इतर आदिवासी जमातींविषयी त्यांना फार अगत्य नसते अनेक जण आमचीच आदिवासी जमात नेतृत्व करायला लायक मानतात राजस्थानमधल्या एका आदिवासी जमातीने आदिवासी कोट्यातल्या इंडियन सिव्हिल सर्व्हिसमधल्या तब्बल ५० टक्के राखीव जागा बळकावल्या आहेत
चौथे पोटी इतिहासकार जे मार्गी वा पोटी वा जमाती ह्यांच्या पोटात सुप्तावस्थेत वावरत असतात आणि जे सर्वसाधारणतः शोषित असतात
फुले देशीवादी इतिहासकार असल्याने ब्राम्हणांच्या मार्गी इतिहासाला विरोध करत असल्याचे भासत असले तरी प्रत्यक्षात ब्रिटिश आंतरराष्ट्रीय मार्गीचे समर्थक इतिहासकार म्हणूनही ते इतिहासलेखन करतांना दिसतात टिळक हे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मार्गिवाद सोडतांना दिसत नाहीत भारत हे आर्यांनी जपलेले एक राष्ट्र आहे अशा दृष्टीने ते मांडणी करत जातात
२० व्या शतकात रचित ह्या गोष्टीला महत्व आले इतिहास हा कुणीही लिहिला तरी मुळात तो रचलेलाच राहतो त्यामुळे कुठल्याही संहितेचा एक संरचना म्हणून अभ्यास करण्याची संरचनावादी पद्धत जन्माला आली ह्यात भाषेला व चिन्हांना नैसर्गिक रित्या महत्व प्राप्त झाले संहितेतील संरचनात्मक घटकाच्या आधारे संरचना समजून घेता येते अशी ही मांडणी आहे
ह्या मांडणीला विरोध केला तो देरिदाने संहिता स्वतंत्र नसते तर तीही कुठल्यातरी आधीच्या संहितातून जन्माला आलेली असते आणि तिला समजून घेताना तिच्या आधीच्या व तिच्या नंतरच्या व तिच्या आसपासच्या समकालीन संहितांचा अभ्यास करूनच त्या संहितेचे अर्थनिर्णयन करता येते असे देरिदा माने इतकेच न्हवे तर संहितेची संरचना विरचित करून तिच्यातील परस्परपूरक वा परस्परविरोधी संबंधाच्या आधारेही तिचे सतत चलित व विचलित अर्थनिर्णयन करता येते असे त्याला वाटे मात्र संहितेच्या स्थिर अर्थावर त्याचा विश्वास नसतो अर्थ सतत बदलत असतो ह्यावर त्याचा विश्वास असतो
ह्यापुढची पायरी उत्तराधुनिक इतिहासकारांनी गाठली संहिता संरचीत असो वा विरचित ती मुळातच प्रथम बनवलेली रचलेली अशीच असते त्यामुळेच तिला मूळ नसते असतो तो फक्त फ्लक्स अशी मांडणी त्यांनी केली ह्याचा कळस म्हणून मानवाचे जे जे आहे ते ते सर्व कल्पित व मानवरचीत आहे खुद्द माणूस हाही ह्या रचिताचा भाग असतो अशी मांडणी पोस्टमॉडर्न इतिहासमीमांसेने केली
दशावतारातून फुलेंनी बळीवंश रचला तसा टिळकांनी ऋग्वेदातून आर्यवंश रचला फुल्यांना व आंबेडकरांना क्षत्रियत्वाची ओढ तर टिळकांना ब्राम्हणत्वाची दोघांनाही ब्राम्हण व क्षत्रिय ह्या पुण्ययोनीतच सेटल व्हायचे व राहायचे असल्याने भारतात फक्त व्यापारी वैश्य व आदिवासी तेवढे सामान्य माणसासारखे जगत होते असा निष्कर्ष हाती येतो बाकी सर्व पूर्वी क्षत्रिय किंवा ब्राम्हण होते म्हणे !
१६ टक्के वैश्य व १६ टक्के आदिवासी म्हणजे ३२ टक्के लोक जनता क्लास होते बाकी सर्व राज्य करणारे ! आणि तरीही प्रत्येकाला राखीव जागा हव्यातच म्हणजे काही मिळत असेल तर आम्ही मागासलेले नाहीतर आम्ही पूर्वाश्रमीचे ब्राम्हण किंवा क्षत्रिय ! ह्यावरून भारतातील तब्ब्ल ६८ टक्के लोक हे पूर्वी ब्राम्हण
किंवा क्षत्रिय होते असा निष्कर्ष निघतो आता जनतेने म्हणजे १६ टक्के वैश्य व १६ टक्के आदिवासी जनतेने ह्यांना प्रश्न विचारावा कि आम्ही मग एव्हढे गरीब कसे झालो ? ब्रिटिशांनी अशी काय जादू केली कि ६८ टक्के ब्राम्हण व क्षत्रिय आमच्या भल्याची चिंता करत असतांना आम्ही असे गरीब झालो ?
आपला प्रबोधनकाळ हा कधीकधी फार विनोदी निष्कर्षांला पोहचतो
असो
माझा स्वतःचा सिद्धांतच असा कि भारत हा स्वभावतः पोस्टमॉडर्न आहे आणि इथे इतिहास नेहमीच रचला जातो आणि त्यामुळेच त्यात पोस्टमॉडर्न कल्पितांची रेलचेल असते अगदी स्वतःला रॅशनल म्हणवणारे फुले आंबेडकरही ह्यातून सुटत नाहीत आता जर हे असं पोस्टमॉडर्न रचित आसपास असेल तर टिळकांच्या सिद्धांताचे रचित समजून कसं घ्यायचं ?
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ५० श्रीधर तिळवे नाईक
आर्यांचे मुळस्थान आणि टिळक ३
टिळकांचा आर्यविचार समजून घेताना सर्वात प्रथम विचार डोक्यात येतो तो म्हणजे स्वतःला पंचद्रविड ब्राम्हण म्हणवून घेणारे मराठी ब्राह्मण अचानक स्वतःला वैदिक का समजायला लागले ? गोरे गोमटे पण स्वतःला शैव समजणारे शेणवी अचानक स्वतःला सारस्वत ब्राम्हण का म्हणवून घ्यायला लागले ? अचानक ह्या सगळ्यांना स्वतःच्या शैव आयडेंटिटीची लाज का वाटायला लागली ? वास्तविक शिवाजी महाराज शैव होते त्यांचे राजमंदिर शैव होते त्याचा ताबा गुरवांच्याकडे होता जे गुरव असले तरी मराठा होते त्यांची प्रणाम व युद्धघोषणा हर हर महादेव होती खुद्द पेशव्यांचे कुलदैवत गणपती होते आणि ते शैव असल्याने शूद्र मानल्या गेलेल्या तत्कालीन ओबीसी भट( भाटियार वा भटार ) घराण्यातून आले होते तरीही हे का घडले ?
लोकमान्य टिळकांनी नर्मदेच्या अलीकडील द्रविड आणि नर्मदेच्या पलीकडील आर्य असा दोन संस्कृतीचा सिद्धांत स्वीकारला तरीही स्वतःचा काळासावळा रंग न पाहता त्यांना गोऱ्यागोमट्या आरंगाचा मोह का पडावा ? दिसतं असं कि ब्रिटिशांच्या मांडीला मांडी लावून बसणे ही ब्राम्हणांची त्यावेळी मानसिक आवश्यकता होती आणि ब्राम्हण व्यवहारात इंग्रजांच्या तुलनेत कुठेच न्हवते जेव्हा तुम्ही वर्तमानात समान नसता तेव्हा चारच गोष्टी उरतात
अ भविष्यात आम्ही समान होऊ असा आशावाद बाळगून त्यासाठी प्रयत्न करणे त्यासाठी टिळकांनी स्वराज्याची चळवळ केली
ब वर्तमानात आपल्याकडची एक गोष्ट समोरच्या बलवान माणसाकडे नाही असे सांगणे ह्यातूनच अध्यात्माबाबत व धर्माबाबत आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे दाखवणे सुरु झाले तेरे कमीजसे मेरी कमीज सफेद हैं हे दाखवण्याचा हा सांस्कृतिक प्रकार ! प्रत्यक्ष आयुष्यात मोक्षाची साधना जाऊ द्या पण सत्य अहिंसा अपरिग्रह अचोर्य आणि ब्रम्हचर्य ह्या बेसिक गोष्टींचा पूर्ण अभाव असला तरी चालतं. स्वतःला उच्च समजणारा आणि समता न मानणारा माणूस मोक्षाला पोहचूच शकत नाही टिळक एकीकडे स्वतःला उच्च समजत होते आणि दुसरीकडे थोडीफार साधना करत होते पण त्यामुळे मोक्ष मिळणे शक्यच न्हवता पुढं मंडालेत तुरुंगात त्यांची साधना थोडी वाढली आणि ताबडतोब टिळकांचा प्रवास समतेच्या दिशेने सुरु झाला मात्र त्यांचा हा ग्रंथ त्या आधीचा असल्याने टिळकांचे ब्राम्हणाविषयीचे प्रेम स्पष्टच दिसते
३ भूतकाळात आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ होतो असा टेम्भा मिरवणे व तसे इतिहास लिहिणे
आणि चौथी
४ किमानपक्षी समोरचा बलदंड आणि आपण एकाच मूळाचे व कुळाचे आहोत असे भासवणे तसे पुरावे सादर करणे
मोरेश्वर कुंटे ह्यांनी the vicissitudes of aryan नावाचा एक ग्रंथ ह्याच काळात लिहिला आहे त्यात ते इंग्रजांचा उल्लेख व्हाईट आर्य असा करतात म्हणजेच इंडियन आर्य हे काळे आर्य असेच ते सुचवतात जे ते किती वसाहतवादाला बळी पडले होते त्याचे द्योतक आहे
टिळकांच्या ह्या पुस्तकलेखनात पहिला दुसरा व चौथा प्रयत्न तर स्पष्टच दिसतो गंमतीचा भाग असा कि आम्ही व तुम्ही एका समान वस्तिस्थानातून आलोय अशी सुरवात करणारा टिळकांचा हिंदुत्ववाद आता ऑक्टोम्बर १९९६ मध्ये झालेल्या “Revisiting Indus-Saraswati Age and Ancient India,” ह्या कॉन्फरन्समध्ये ३०० इंडॉलॉजिस्टच्या साहाय्याने आर्य कसे मूळचे इंडीयन होते व ते कसे बाहेर पसरले ते सांगतो कम्प्लिट घुमणे ह्यालाच म्हणतात हिंदुत्वाचा हा कम्प्लिट घुमजाव भारतीय इतिहास किती पोस्टमॉडर्न आणि पोचा आहे तेच दर्शवतो
मॅक्स्मुलरने जेव्हा आर्य बाहेरून आले हा सिद्धांत व्यवस्थित मांडला तेव्हा त्याच्या डोक्यात काही कलोनियालिझम वैग्रे काही न्हवतं तो भाषिक साम्यांनी चक्रावला होता एव्हढंच त्यामुळेच त्यानं तो सिद्धांत पुढे मागंही घेतला मात्र कोकणातल्या काही दीडशहाण्या ब्राम्हणांनी आधीच पाचर मारली होती
हे पाचर मारणारे लोक कोण होते ? ग्रीकांच्याप्रमाणे व अरबांच्याप्रमाणे आपण गोरे आहोत त्यामुळे आपण देशी नाही आहोत असे ह्यांना वाटले असावे त्यामुळेच मग आपल्या कोकणात असण्याचे समर्थन करणे भागच होते त्यातूनच आर्यन गोऱ्यागोमट्या परशुरामाने कोकणाची अपरान्त पहिली वस्ती वसवली अशी भाकडकथा निर्माण केली गेली (आता कोळ्यांना कुणी आणलं आग्र्यांना कुणी आणलं ते विचारायचं नाही ) पुढे त्याने सगळे क्षत्रिय नष्ट केले असा सिद्धांत आला आणि कलियुगात वैश्य उरले नाही हा सिद्धांत हेमाद्रीने मांडला त्यामुळे १२व्या शतकानंतर ब्राम्हण व शूद्र असे दोनच वर्ण उरलेत असे ह्या ब्राम्हणांनी दणकून सांगायला सुरवात केली अर्थात बहुजन समाजाला ह्या मूर्खपणाशी काही देणंघेणंच न्हवतं त्यांच्या थाळीत ब्राम्हणांचे स्थान लोणच्यासारखं होतं चवीला खारट हजारो लाखो वर्ष मुरलेला बिरलेला ! मात्र थाळीत मजा आणणारा !(आपण बहुजन समाजाच्या केंद्रस्थानी आहोत ही उडनछु अफवा ब्राम्हणांनी कधी उडवली ? बहुदा मुस्लिम व ख्रिश्चन राज्यकर्त्यांना आम्हीच इथल्या समस्त महाजन व बहुजन समाजाच्या केंद्रस्थानी आहोत अश्या थापा मारतांना त्या थापा खुद्द ब्राम्हणांना खऱ्या वाटायला लागल्या बहुदा तेव्हा )
ब्राम्हण सुधारावेत म्हणून पेशवाईच्या पाडावानंतर इंग्रजांनी सुरु केलेल्या संस्कृत पाठशाळेत गणित व विज्ञाने शिकवली जात पण बंगाली ब्राम्हण जसे सुधारले तसे मराठी काही सुधारले नाहीत ( नोबल बेन्गालांना मिळतात हा योगायोग नाही ) उलट मराठी ब्राम्हण आपल्या ब्राम्हणधर्माची विषमतामूलक पिंक टाकत राहिले परिणामी १८६० साली ब्रिटिशांनी संस्कृत कॉलेज बंद केले आणि सर्वांना खुले असणारे नवे डेक्कन कॉलेज सुरु केले आणि ह्या डेक्कन कॉलेजमध्ये ज्यांना नेमस्त म्हंटले जाते अशा इतिहासकारांचा ओनामा झाला ह्यातील सर्वश्रेष्ठ होते रामकृष्ण भांडारकर !
आर्यन उगमाविषयीचे पहिले विवेचन करणारा पहिला संशोधक मराठी माणूस म्हणून आर जी भांडारकरांचा उल्लेख आजही आदराने करावा लागतो त्यांच्या मते आर्य आर्य मिक्स आणि आर्य शुद्ध अशा दोन फॉर्ममध्ये कॅस्पियन समुद्रापासून आले तत्पूर्वी इंडियन युरोपियन भाषासंघाचे लोक वेदांच्यापूर्वीही एकत्र होते
प्रथम ते भाषाशास्त्रातील ट ला ट री ला री करणाऱ्या व उत्पत्तीने कश्शाशी काहीही जोडणाऱ्या प्रवृत्तीची चेष्टा करतात मग जर्मनी व संस्कृतची तुलना करत म्हणतात ,"The German d corresponds to th in the Gothic, with which also low German or Anglo-saxon, i. e., the modern English agrees, and to t in Sanskrit. Thus German drei is English three, and Sanskrit fa ; Germ, dass, Eng. thai, Skr. JT^; Germ, du, Eng. thou, Skr. ?=r in ?^j;'; Germ, durch, Eng. through, Skr. frr^t.; Germ, durst, Eng. thirst, Skr. r^, i. e., <(§ Sec. Similarly, Germ. t is Eng. d. and Skr. %r; as in the instances, Germ, mit, old H. G. : miite,/Eng. mid, A. S. midde, Skr. rrwr; Germ, tag. Eng. day, Skr. some such word as os.
मग एक निष्कर्ष देतात ."You will thus see that there is a law which determines the forms that Sanskrit words should assume in German, and that law. ought to give to daitya some such from as teudh; so that we should not allow ourselves to be deceived by the mere similarity of daitya and deut>"
ह्यातून त्यांचा एक निष्कर्ष निघतो तो पुढीलप्रमाणे
Besides, from all the observation that the great founders of comparative philology have made, they have come to the conclusion that the affinity between the Sanskrit and the European languages dates from prehistoric times, i.e., is due to the fact that the ancestors of us all spoke one and the same language before they separated and formed distinct nationalities. This was long before the time when the Vedas were composed. (.(Complete works Bhandarkar 1933: Vol. I, : 377–8) म्हणजे अंतिमतः भंडारकरही फिलालॉजीच्या साहाय्यानेच निष्कर्ष काढतात हा निष्कर्ष मॅक्स्मुलरशी मिळताजुळता आहे
aryans in the land of asur ह्या निबंधात भांडारकर मित्तानी इन्स्क्रिप्शनची चर्चा करतांना असुर सूर एकत्र होते नंतर ते वेगळे झाले व पुढे असुर व सूर असा संघर्षही झाला असे दाखवतात ते म्हणतात
Is it not unlikely that just as in India the progress of the Aryans was contested by the Dasyus, so was it contested by the Asuras of Assyria and they were thus compared with the Dasyus in some of the passages quoted above. . . . In later times especially when Aryans settled in the regions of the five rivers,... the reminiscences of the human Asuras and the fights of the Aryans with them and their civilisation led to the whole subject having transformed itself into a myth of the determined enmity between the Devas and the Asuras.(Complete works Bhandarkar 1933: Vol. I, : ९४ ते १०१)
टिळक सर्व आर्य पूर्वी एकत्र होते हे भांडारकरांचे सूत्र स्वीकारतात आणि प्रश्न उपस्थित करतात सर्व आर्य एकत्र कुठल्या स्थानी होते आणि मग उत्तर देतात " आर्टिक "
पाली संस्कृत शुद्ध उच्चारता न येणाऱ्या अलिएन( हो हाच शब्द भांडारकर वापरतात ) लोकांच्यापासून तयार झाली हा त्यांचा सिद्धांत ! अद्रविड भारतीय भाषा ह्या संस्कृतपासून तयार झाल्या असे ते म्हणत टिळकांनीही ह्याला दुजोराच दिला
टिळक डेक्कनमध्ये भांडारकरांचे विद्यार्थी होते आणि आपल्या गुरूंचा त्यांच्यावर संशोधक म्हणून प्रभाव होता (समाजकारण व राजकारणात दोघे दोन ध्रुवावर होते ) भांडारकर युरोपियन विद्वान लोकांना ऋषीच मानत ते म्हणतात
“Let us . . .sitting at the feet of the English, French, and German rsis, (ऋषी ) I imbibe the knowledge that they have to give, and at least keep pace with them, if not go beyond them” (Bhandarkar 1933: Vol. I, 393)
भांडारकरांनी युरोपियन लोकांशी किमान बरोबरी करण्याचा हा आत्मविश्वास आपल्या विद्यार्थ्यांनाही दिला ज्यांच्यात टिळकही होते पुढे टिळकांचा आत्मविश्वास इतका वाढला कि ते ह्या युरोपियन ऋषींना चॅलेंज द्यायला लागले
श्रीधर तिळवे नाईक
शैवांच्यात चैत्र महिना हा आरंभ आहे आणि तो लवचिक आहे हलू शकतो वैदिकांच्यात आरंभ संपात स्थिर आहे साहजिकच ते अयनांश पकडून गणित करतात
पृथ्वीचा नक्षत्रातून फिरणारा मार्ग म्हणजे क्रांतिवृत्त व विषुववृत्त ही दोन्ही एका पातळीत नाहीत त्यामध्ये साधारण साडेबावीस ते तेवीस अंशाचा कोन आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा