लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग १ ते २२
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग १ ते २२ श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती लेखक : श्रीधर तिळवे -नाईक
प्रस्तावना
लोकमान्य टिळकांच्या मृत्यूची शताब्दी आजपासून सुरु होतीये साहजिकच टिळकांचे स्मरण आणि नव्याने मूल्यमापन होणे अटळ आहे प्रश्न एव्हढाच आहे कि हे मूल्यमापन सत्यगामी असणार कि आधीच फिक्स असणाऱ्या स्टान्सप्रमाणे होणार
पोस्टमॉडर्न इतिहासकारांनी इतिहास हे एक रचित असतं हे सिद्ध केले आणि सगळेच इतिहास ही एक सोय असते असे प्रतिपादन करून इतिहासाचा वस्तुनिष्ठ आधार काढून घेतला त्याची सर्वाधिक प्रचिती सांप्रतकाळी भारतात जेव्हढी येते तेव्हढी कधीच आली नसावी मग हा इतिहास सदोदित फिक्शन रचणाऱ्या ब्राम्हणांचा असो किंवा आंबेडकरांसारख्या सतत अस्पृश्यांच्या हितसंबंधाविषयी जागृत असणाऱ्या ब्राम्हणेतरांचा असो अशावेळी टिळकांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन अशक्य बनले तर आश्चर्य वाटावयास नको ब्राम्हणांच्या सर्वच गोष्टी चांगल्या ते ब्राम्हणांच्या सर्वच गोष्टी वाईट असे एक वर्तुळ भारतात पूर्ण झालेले आहे आणि त्याचे जे काही बरे वाईट परिणाम व्हायचे ते आपण भोगले आहेत अशावेळी टिळकांचे जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ मूल्यमापन शक्य आहे का हा प्रश्न आपण विचारायला हरकत नाही
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती २ श्रीधर तिळवे नाईक
२
टिळकांना भारतात टिळक महाराज म्हणूनच ओळखलं जाई विशेषतः उत्तर भारतात ! टिळकांना मिळणारा आदर हा मराठ्यांना मिळणाऱ्या आदराचा साईडइफेक्ट होता आणि टिळकांना ह्याची जाणीव असल्यानेच त्यांनी आपल्या वर्तमानपत्रांना मराठीत केसरी हे भगवे नाव दिले होते तर इंग्रजीत मराठा ज्यांचा भगवा झेंडा भारतभर फेमस होता ! त्याकाळी मराठा ही जातीय आयडेंटिटी न्हवती तर प्रादेशिक ओळख होती . ब्रिटिश इतिहासकारांनी कितीही दिल्लीकेंद्रित इतिहास लिहिला असला तरी प्रत्यक्षात ब्रिटिशांनी भारत हिसकावून घेतला तो मराठा आणि शीख ह्या नवशैव धार्मिकांनी स्थापन केलेल्या राजवटींकडून ! पहिली हर हर महादेव म्हणत उभी राहिली होती तर दुसरी ओम म्हणत ! मुघल बादशहाला ह्या काळात काडीचीही किंमत न्हवती त्यामुळेच भारतीय जनतेला आशा होती ती लोकमान्य टिळक आणि लाला लजपत राय ह्यांच्याकडून ! एक पुरोगामी रोल प्ले करण्याची अद्भुत संधी टिळकांना नियतीने दिली होती भारताच्या दुर्देवाने टिळकांनी ती व्यवस्थित पेलली नाही .
३
भारतीय बंडाच्या मालिकेची चर्चा आपण मागेच केली आहे ब्रिटिशांची राजवट १८५९ ला शिखांना हरवल्यानंतर प्रस्थापित झाली आणि ब्रिटिशांशी जुळवून घेणाऱ्या मानसिकतेचा उदय झाला ह्या मानसिकतेला आपण ब्रिटीशराज्यवाद असे म्हंटले आहे हा ब्रिटीशराज्यवाद इंग्रजांना राज्यकर्ते म्हणून स्वीकारत होता इतकेच न्हवे तर त्यांची राजवट ही दैवी योजना वा कृपा मानायला लागला होता लोकहितवादी , फुले ते रानडे असे अनेक विचारवंत ह्या ब्रिटीशराज्यवादाचे समर्थक होते ह्या ब्रिटीशराज्यात आम्हालाही जागा असावी अशी त्यांची माफक अपेक्षा होती सुरेंद्रनाथ बॅनर्जींचे ह्या काळातील आंदोलन कशासाठी होते तर भारतीयांना सिव्हिल सर्विसमध्ये सामील केले जावे म्हणून ! ह्या लोकांनीच पुढे अॅलन ह्यूम च्या सांगण्यावरून १८८५ साली काँग्रेसची स्थापना केली ही एक शहरी उच्चभ्रूंची संघटना होती जी ब्रिटीशराज्यवादी होती आणि ब्रिटिश राज्यकारभारात भारतीयांचा सहभाग मागत होती विशेषतः सिव्हिल सर्व्हिसमध्ये ! अरविंद घोष ह्यांनी टिळकांच्या भाषणांना जी प्रस्तावना लिहिली आहे त्यात ते म्हणतात The congress movement was for a long time purely occidental in its mind, character and methods, confined to the English-educated few, founded on the political rights and interests of the people read in the light of English history and European ideals,, but with no roots either in the past of the country or in the inner spirit of the nation. Mr. Tilak was the first political leader to break through the routine of its somewhat academical methods, to bridge the gulf between the present and the past and to restore continuity to the political life of the nation. He developed a language and a spirit and he used methods which Indianised the movement and brought into it the masses.(पेज क्र १६ )टिळकांचं हे एक मूल्यमापन आहेच पण काँग्रेस ह्या काळात ऑक्सीडेन्टल होती हेही इथे अधोरेखित केले आहे मात्र ह्या संघटनेचं एक वैशिष्ट्य होतं ब्रिटिश साम्राज्याने उभे केलेले एकात्म भारतीय राज्य ती आता एक राष्ट्र म्हणून बघत होती . तिने ते तसे बघावे अशी ब्रिटिशांचीही इच्छा होती कारण त्यांनाही भारत शोषणासाठी म्हणून का होईना एकसंध हवा होता ह्यातूनच उत्तरेची साम्राज्ये संपूर्ण भारताची साम्राज्ये म्हणून प्रोजेक्ट करण्याचा धुमधडाका युरोपियन इतिहासकारांनी चालवला ही साम्राज्ये बाहेरच्या लोकांनी उभी केली हे दाखवण्यासाठी आर्य आक्रमणाची थेरी आणली गेली आणि युरोपियन लोकांना नवे आर्य म्हणून प्रोजेक्ट केले गेले प्राचीन भारताला आर्य भारत म्हणण्यापर्यंत मजल गेली तसे इतिहास रचले गेले नव्या युगाचे चंद्रगुप्त मौर्य समुद्रगुप्त म्हणून ब्रिटिश महामंडित करण्यात आले आणि ब्रिटिश चाटण व्यवस्था ही सर्वमान्य रिच्युअल बनली काँग्रेस उदयाला आली ती ह्या चाटण व्यवस्थेची संघटना म्हणून ! आणि टिळकांनी ह्या चाटणाविरुद्ध बंड केले . त्यांनी काँग्रेस हिंदूपणाशी जोडली पण हे हिंदूपण काय होते ?
४
शंकराचार्य आणि त्यांच्या मठांनी कशी हिंदू धर्माची स्थापना केली हे आपण मागे पाहिलेच आहे आणि त्यातून हिंदू म्हणावी अशी एक महारचना कशी विकसित झाली तेही आपण पाहिले आहेच ह्या हिंदुधर्म रचनेची काही वैशिष्ट्ये होती जी मी पुन्हा इथे संक्षिप्त करून देतो आहे जेणेकरून समजणे सोपे जाईल हिंदू धर्म हा निगमांनी स्थापन केलेला चौथा धर्म आहे त्याआधी त्यांनी १ वैदिक २ ब्राम्हणी आणि ३ वैष्णव असे तीन धर्म स्थापन केले होते पण नव्या काळाला ते पुरे पडेनात म्हणून सुरांनी देवांनी ब्राम्हणांनी हिंदू हा धर्म शंकराचार्यांना आधार बनवून विकसित केला आणि त्याला मुस्लिम राज्यकर्त्यांनी मान्यता देऊन स्वतःच्या कायदाव्यवस्थेत स्थान दिले हा धर्म पुढीलप्रमाणे होता
१ मोक्षाला मान्यता ज्ञानमार्गाने मोक्ष शक्य उपनिषदे वेदांत व गीता हे मोक्ष ग्रंथ ज्ञान भक्ती कर्म व राजयोग ह्या चारही मार्गाने मोक्ष शक्य
२ वर्ण जात व्यवस्थेला मान्यता स्मृती ही कायदेव्यवस्था मान्य पुराणे मान्य जन्मकर्म मान्य वेदांचे पावित्र्य मान्य
३ शंकराचार्य हे हिंदू धर्मप्रमुख व त्यांचा वर्ण जात धर्म विषयीचा निवाडा सर्व हिंदूंना मान्य शंकराचार्य हे पद फक्त ब्राम्हणांसाठी राखीव
४ आश्रमव्यवस्था मान्य म्हणजे ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम संन्यासाश्रम वानप्रस्थाश्रम
५ दशायतन मान्य म्हणजे
अ शिव कार्तिकेय व गणपती मान्य
आ शक्ती
इ विष्णू व त्याचे राम कृष्ण नरसिंह परशुराम वैग्रे अवतार मान्य
ई लक्ष्मी मान्य
उ ब्रम्हदेव मान्य
ऊ सरस्वती मान्य
ए यज्ञ व पूजा दोन्ही कर्मकांडे मान्य मात्र यज्ञ करण्याचा अधिकार फक्त ब्राम्हणांना पूजा करण्याचा अधिकार सर्वांना
ऐ कुलदेवता मान्य
ओ इष्टदेवता मान्य म्हणजे उदा विठ्ठल मान्य जातदेवता व जमातदेवता मान्य
औ ग्राम व स्थानदेवता मान्य
हिंदूंची ही एक बहुआयामी व्यवस्था होती जिला सर्वच हिंदू धर्म स्वीकारणाऱ्यांची मान्यता गृहीत धरण्यात आली होती मुस्लिमांना राज्यशकट हाकण्यासाठी गैरमुस्लिमांची एक व्यवस्था लावणे गरजेचे वाटत होते आणि हिंदू हा धर्म त्यांना तशी एक व्यवस्था देत होता
ही व्यवस्था शैवांना मान्य न्हवती व त्यांनी बसवेश्वरांच्या नेतृत्वाखाली तिला विरोध केला हा विरोध बसवेश्वरांची हत्या करून मोडीत काढण्याचा प्रयत्न केला गेला पुढे नानकांनी हेच केले आणि नंतर महात्मा फुलेंनीही हेच केले
राजाराम मोहन रॉय ते आर्य समाज ह्यांनी हिंदूंची एक नवी रचना तयार करण्याचा दृष्टीने पावले टाकली ब्राम्हो समाज प्रार्थना समाज रामकृष्ण मिशन हे त्यातूनच जन्मले अर्थात ह्याच काळात वैदिकांचे आर्य समाज म्हणून पुरुज्जीवन झाले ह्याचवेळी ब्राम्हणी धर्माचे पुनर्जीवन उत्तरपेशवाईने केलेच होते ह्याचवेळी ब्रिटिशांनी हिंदू धर्मग्रंथ म्हणून गीतेला मान्यता दिली आणि वैष्णववाद उसळला संतांचा अभ्यास सुरु झाला रानडेंनी वैष्णव संतांचे पुरुज्जीवन केले ह्या वैष्णववादाचे दोन उपपंथ होते
१ वैष्णव संतवादी हे ब्रिटिशांच्यातील उदारमतवादाशी जुळऊन घेत आपले हितसंबंध पुढे न्हेऊ इच्छित होते ह्यात रानडे गोखले होते हे स्वतःला पांडव व ब्रिटिशांना कौरव समजत होते आणि ह्या कौरवांनी अधर्माने भारत जिंकलाय असे ते मानत. संतांच्या अहिंसेवर त्यांचा विश्वास होता
२ श्रीकृष्णवादी हे अत्यंत धूर्तपणाने श्रीकृष्ण नीती अवलंबून भारताचे नेतृत्व आपल्या हातात ठेऊ इच्छित होते ह्यांचा हिंसेवर विश्वास होता मात्र हे हिंसाही डिप्लोमॅटिकली हॅन्डल करू पहात होते
टिळक महाराज श्रीकृष्णवादी वैष्णव हिंदू होते त्यामुळेच त्यांनी गीतारहस्य लिहिले भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या केंद्रस्थानी गीता हा ग्रंथ आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे
५
फुले ह्यांची मिसिंग लिंक आणि त्याचा टिळकांना झालेला फायदा
मी सावित्रीबाई फुले ह्या कशा शैव होत्या आणि ज्योतिबा हे कसे मर्यादित अंगाने शैवच होते ह्याची चर्चा मागे केली आहेच भारतातील सामाजिक व्यवस्था जितकी खोलवर ज्योतिबा फुलेंना कळली होती तितकी ती कुणालाच कळली न्हवती ही वस्तुस्थिती फुले ह्यांनी देशस्थ ब्राम्हण आणि कोकणस्थ ब्राम्हण ह्यांच्यातील संघर्ष अचूक हेरला होता फुल्यांचे म्हणणे पुढे न्हेत मी म्हणेन कि देशस्थ ब्राम्हण कऱ्हाडे ब्राम्हण हे पूर्वाश्रमीचे शैवच आहेत कारण त्यांचा सावळा काळा वर्ण त्यांच्या शैव कुलदेवता ह्या त्यांचे वास्तव स्पष्टच सांगतात भले मग ते आता कितीही नाकारोत ह्यावरून टिळकांची सद्याची जी प्रतिमा झालीये त्यावरून असे वाटेल कि टिळक कोकणस्थ आणि देशस्थ ह्यांच्यातून विस्तव जाऊ देणार नाहीत प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे ?
टिळकांचा जन्म चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण घराण्यात झाला होता त्यामुळे साहजिकच आर्यवादाचे बाळकडू पीतच ते वाढले होते हे तर सगळ्यांनाच माहीत आहे मात्र टिळक आश्चर्यकारकरित्या (लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख खंड ४ पान क्र १ ,२११ ,५५३ ) कोकणस्थ , देशस्थ आणि कऱ्हाडे ही उपजातींची नावे असून ह्यांनी आपापसात विवाह केला पाहिजे असा आग्रह धरतात म्हणजे वर्णांतर्गत आंतरजातीय विवाह १८८१ सालीच टिळकांना मान्य होता हे आपण लक्ष्यात घेतले पाहीजे टिळक हे किती गुंतागुंतीचे प्रकरण आहे हे ह्यावरून कळावे .
महात्मा फुलेंनी ब्राम्हणशाहीविरुद्ध बंड केले आणि हे करतांना त्यांनी मार्गी आणि देशी ह्यांचा समतोल साधण्यासाठी एक वेगळी मांडणी केली त्यांनी आपली मार्गी मांडणी करतांना मानवतावादाचा पुरस्कार केला आणि समस्त मानवजातीला कवळणारा सत्यशोधक समाज मांडला तर देशी मांडणी करतांना त्यांनी हर हर महादेव चा गजर स्वीकारला आणि मराठी लोकांनी विशेषतः कुणबी धनगर माळी ह्यांचं कुळ एकच असल्याने त्यांनी खंडोबा व ज्योतिबा हे बळी राजवटीचे खंडाधिपती म्हणून स्वीकारावेत अशी मांडणी केली खंडोबाची एक बायको कुणबी कुळातील म्हाळसाई व दुसरी धनगरातील बाणाबाई असल्याने त्यांनी आपले कुळ एक आहे हे समजून घ्यावे असे ज्योतिबा मांडतात माझी तक्रार एकच आहे ती म्हणजे हे करतांना ज्योतिबा तिसरी महत्वाची जी लिंक आहे ती मिस करतात ती म्हणजे राष्ट्रीय लिंक जी त्या काळात ज्योतिबा मांडते तर आज शैवांचे व ओबीसींचे समस्त राजकारण बदलते फुले फक्त उत्तर पेशवाई पाहतात आणि मग मुस्लिम राजवटीत शूद्रांची अवस्था अधिक चांगली होती असे म्हणतात जे पुराव्यावर टिकणारे नाही फुले त्यामुळेच ब्रिटीशराज्यवादी बनतात आणि समस्त ओबीसी समाज राष्ट्रीय पातळीवर संघटित करण्याचा मार्गच खुंटवतात वास्तविक मुघलांनी केले त्याच्या कित्येकपट शोषण ब्रिटिशांनी ओबीसी आणि आदिवासींचे केले फुल्यांना ते स्पष्टपणे दिसत नाही ते उलट ब्रिटिश राज्याकडे भटशाहीपासून मुक्त होण्याची संधी देणारी राजवट म्हणून पाहतात त्यामुळेच इंग्रज आहेत तोवरच आपण शूद्रातिशूद्र शिकून भटांच्यापासून मुक्त व्हावे अशी तातडीची भावना ते व्यक्त करतात
त्यांच्या ह्या धारणेमुळे होते काय कि ज्या मुर्खपणामुळे राजकारणी समाजकारणाकडे दुर्लक्ष्य करतात त्याच आंधळेपणामुळे समाजकारणी राजकीय स्वातंत्र्याकडे व राजकारणाकडे दुर्लक्ष्य करतात ज्याचा अंतिमतः फायदा ब्राम्हण्यवादी व हिंदुत्ववादी शक्तींना होतो ९०० नंतर उदयाला आलेल्या जातपंचायत आणि ग्रामपंचायत ह्या राजकीय व्यवस्थेमुळे केंद्रात कोणीही येवो आपण आपल्या गावात व घरात सुरक्षित आहो ना मग झाले ही भावना बळावते ज्योतीबांना हा एका अर्थाने हिंदू धर्मप्रणित जात व ग्रामपंचायत व्यवस्थेचा विजय आहे हे जितकं स्पष्ट दिसायला हवं तितकं स्पष्टपणे दिसत नाही आणि राष्ट्रीय राजकारणाबाबत संपूर्ण ओबीसी बीसी आणि आदिवासी समाज कमालीचा उदासीन राहतो
ही जी फुल्यांची राष्ट्रीय मिसिंग लिंक आहे तिचाच फायदा टिळकांना स्वतःचे श्रीकृष्णवादी वैष्णव हिंदू राजकारण पुढे रेटण्यासाठी झाला कारण त्यांना स्वराज्याची मागणी खणखणीतपणे करणारा बहुजनवादी समांतर राजकीय डिस्कोर्स निर्माणच झाला नाही आणि पुढे जी टिळकांना गांधीवादी रिप्लेसमेंट आली ती हिंदुत्ववादी नसली तरी वैष्णव संतांना मानणारी श्रीकृष्णवादी रामवादी वैष्णव हिंदूवादी अशीच होती आणि तिच्याही केंद्रस्थानी गीताच होती
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती श्रीधर तिळवे नाईक
६
शैव राष्ट्रवाद जो मराठा आणि शीख साम्राज्याच्या आधारे सहज उभा करता आला असता तो शैवांनी उभा केला नाही किंबहुना शिवाजी महाराज जो हिंदवी राज्याचा तोल उभा करू पहात होते त्याला प्रथम नानासाहेब पेशव्याने नख लावले यामागचे कारण उघड होते शाहू पहिला जोवर होता तोवर मराठा साम्राज्य सतत वाढत होते कारण ह्याकाळात पंचमुखी मराठेशाहीचे पेशवे हे केवळ एक मुख होते आणि अंतिम निर्णय घेण्यात शाहुंचाही वाटा महत्वाचा होता शाहूंना चारही मुली झाल्या आणि अचानक भोसल्यांचा वंशच थांबला त्यातच भर म्हणून ताराबाईने जो दत्तक पुत्र दिला तो तोतया असल्याचे खुद्द ताराबाईनेच जाहीर केले त्यामुळे ह्या नवीन छत्रपतींची इज्जतच उरली नाही आणि सर्व सत्ता पेशव्यांच्या ताब्यात गेली आणि इथूनच कोकणस्थांचे स्वतःचे जातीनिष्ठ राजकारण सुरु झाले शेणवी व प्रभू ह्या शैवांना पुणेरी राजकारणातून बाहेर फेकण्यात आले देशस्थ तीन शहाणे आणि कोकणस्थ अर्धा शहाणा ह्यांच्यात मारामाऱ्या सुरु झाल्या आणि ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर अशी फाळणी करून ब्राम्हण आणि शूद्र असे दोनच वर्ण असल्याची द्वाही फिरू लागली अस्पृश्यता मराठा साम्राज्यात विशेषतः पुण्यात मान्य करण्यात आली शिवाजी संभाजी राजाराम ताराबाई शाहू ह्यांच्या काळात मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे महार मातंग अचानक अस्पृश्य झाले त्यांच्या गळ्यात मडके बांधण्यात आले शिवाजी महाराजांच्या स्वप्नांच्या चिंद्या चिंद्या झाल्या जे भट खानदान पूर्णतः शैव होते गणपती हे ज्यांचे कुलदैवत होते इतकेच न्हवे तर जे बारा बलुतेदारांपैकी एक होते ते स्वतःला वेद पाठ म्हणता येत नसले तरी स्वतःला वैदिक म्हणवून घेऊ लागले आणि चक्क स्मृतींचा पुरस्कार करायला लागले
महाराष्ट्रात ह्यातूनच उत्तर पेशवाईचे समर्थन करणारे आणि तिला नकार देणारे असे दोन गट पडले परशुरामाला प्रमाण मानणारे आणि त्याने सगळे क्षत्रिय कापून पृथ्वी निःक्षत्रिय केली मानणारे चित्पावन कोकणस्थ एकीकडे तर यजुर्वेद आणि याज्ञवल्क ह्यांच्यांशी जोडून घेणारे देशस्थ ( देशस्थांतील काहींनी ऋग्वेदी देशस्थ बनण्याचा प्रयत्न केला तरी त्याला कोकणस्थानी फारसा प्रतिसाद दिला नाही )दुसरीकडे ही विभागणी अंतिमतः महाग पडणारी होती छत्रपतींची सत्ता उलथून टाकायला परशुराम निःक्षत्रिय सिद्धांत उपयोगी होता त्यामुळे तो अधिक त्वेषाने मांडला जाऊ लागला शाहू महाराजांना शूद्र मानून वेदोक्त मंत्र म्हणायला जो नकार दिला गेला त्याची बीजे उत्तर पेशवाईत पडली होती आणि टिळकांनी ह्या वेदोक्त प्रकरणात स्वतःची जात निवडली आणि दाखवलीही . ब्राम्हण ब्राम्हणेतर वाद संपुष्टात आणण्याची ही संधी नियतीनेच टिळकांना दिली होती जर टिळक ह्यावेळी शाहू महाराजांच्या बाजूने उभे राहते तर ब्राम्हण ब्राम्हणेतर वादाला वेगळे वळण लागते पण टिळकांनी हे केले नाही व ही संधी घालवली त्याचा परिणाम खोलवर झाला एकतर त्यामुळे ब्राम्हणेतर वर्ग टिळकांच्यावर नाराज होत गेला आणि त्याने ह्यापुढे टिळकांची पाठराखण करायची नाही असे ठरवले आणि तो गांधीजींच्या ब्राम्हणेतर नेतृत्वाकडे वळला खुद्द पुरोगामी ब्राम्हणांनाही टिळक अडचणीचे वाटायला लागले ह्यात भरीसभर म्हणून टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शवाला खांदा द्यायला महात्मा गांधी पुढे सरकले तेव्हा गांधी वैश्य असल्याने ते खांदा देऊ शकत नाहीत अशी भूमिका टिळकांच्या काही कट्टर अनुयायांनी घेतली ही उंटावरची शेवटची काडी ठरली
कुणी म्हणेल कि ही काळाची मर्यादा होती पण हे धादांत खोटे आहे कारण ह्याच काळात टिळक बालपणात होते त्यावेळी ज्योतिबा फुले व लोकहितवादींनी पेशवाईची लक्तरे वेशीला टांगली होती ( १०० हिंदुस्थान्यांपैकी फक्त ५ टक्के हिंदुस्थानी प्रामाणिक आहेत तर १०० इंग्रजांपैकी ९५ टक्के इंग्रज प्रामाणिक आहेत असे निरीक्षण लोकहितवादींनी नोंदवले आहे म्हणजे हिंदुस्थानी लोकांचा प्रामाणिकपणाचा कोशण्ट त्याकाळीही पाच टक्केच होता हे लक्ष्यात घेण्याजोगे आहे ) इतकेच न्हवे खुद्द टिळकांचे समकालीन नारायण गुरु(जन्म १८५५) ह्यांनी सर्वांसाठी खुले असलेले पहिले शैव मंदिर १८८८ साली बांधले होते ज्याचा त्यावेळी गाजावाजा झाला होता खुद्द शंकराचार्यांना विधवांनी पळवून लावले होते तेही आता कम्पनी कायदा आहे असे निक्षून सांगून आणि पुण्यातील एका खेड्यात जेव्हा ब्राम्हणांनी न्हाव्यांना बहिष्कृत करण्याची धमकी दिली तेव्हा तुम्ही ब्राम्हण्य पाळाल तर आम्ही न्हावीण्य पाळु व तुमचे केस कापायचे बंद करू अशी धमकी देऊन न्हाव्यांनी ब्राम्हणांना वठणीवर आणले होते टिळकांना हे दिसत असूनही त्यांना त्याचा अर्थ का उमगला नसावा ? कि पुण्यामुळे टिळकांची दृष्टी हृस्व झाली होती ?

७
टिळकांची जी काही चरित्रे उपलब्ध आहेत त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते
१ गणित व संस्कृत ह्यांची टिळकांना जन्मजात आवड होती
२ गुंडाला महागुंड बनून त्याचा सामना करायला हवा ह्यावर त्यांचा विश्वास होता
३ प्रचंड निर्धार फोकस आणि मेहनत ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती
४ त्यांना ब्रिटिश कायदेव्यवस्थेचे महत्व नीट कळले होते आणि तिचा वापर कसा करायचा ह्याची प्रॅक्टिकल अक्कल त्यांना प्रचंड होती
५ ब्रिटिशांना कायद्याच्या चौकटीत राहून अंगावर घेण्याची त्यांची कायम तयारी होती ते ह्या अर्थाने सिंह होते त्यांचे समकालीन जिथे त त प प करत तिथे ते दणकून बोलत होते आणि त्यांनी त्यांच्या शिक्षकांशी जो सामना केला त्यावरून हे स्पष्ट होते
६ ते त्यांच्या काळातले सर्वात लोकप्रिय नेते होते आणि ज्याला राष्ट्रीय नेता म्हणावे असे ते भारताचे पहिले आधुनिक नेते होते
७ टिळकांना सायन्स आणि टेक्नॉलॉजीत प्रचंड रस होता जगदीशचंद्र बसूंनी नेमके काय संशोधन केलंय ह्याची त्यांना कल्पना होती त्यामुळेच त्यांच्या स्वागताचे भाषण ते उत्तम करू शकले केसरीची प्रिंटिंग मशीन्स बंद पडायची तेव्हा कधी कधी ते ती स्वतःच दुरुस्त करायचे इतकी तांत्रिक गती त्यांना होती
सांगण्याचा मुद्दा असा कि टिळक पगडी घालत असले तरी त्या पगडीखालचे डोके आधुनिक होते मात्र संस्कृत ग्रंथांच्या वाचनामुळे त्यांना आपली आर्य संस्कृतीही शाबूत ठेवायची होती ही एक द्विधा मनस्थिती होती आणि टिळकांनी ती आयुष्यभर वागवली
प्रश्न असा कि त्यांना हे असे का करावेसे वाटले ? ह्याचे उत्तर तत्कालीन ब्रिटिश लोकांच्यात आहे ते पहात होते कि ब्रिटिश जरी विज्ञान व तंत्रज्ञानात एक्सपर्ट आहेत तरी ते आपला ख्रिश्चन धर्म अजिबात सोडत नाहीत जर ब्रिटिश हे करू शकतात तर आपण का नाही असा प्रश्न त्यांना पडलेला असणार त्याकाळी साम्यवाद प्रसार पावला न्हवता आणि नास्तिक लोकांची संख्या जवळ जवळ शून्य होती त्यामुळे ब्रिटिश राज्यकर्ते हे धर्माबाबत अत्यंत पारंपरिक होते आणि त्यांना पाहणारे टिळकही !
८
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे टिळकांचे वचन प्रसिद्ध आहे त्याचे मूळ काय ?
ब्रिटिश साम्राज्यवादाचे परिणाम सांगणारा पहिला विचारवंत हा भारतीय मराठी होता त्याचे नाव भास्कर पांडुरंग तर्खडकर (जन्म १८१६ मृत्यू १८४७) बॉम्बे गॅझेटच्या जुलै ते ऑक्टोंबर १८४१ च्या इश्युजमध्ये हे लिखाण आहे
हिंदुस्थानला मिळालेला सर्वात मोठा शाप म्हणजे ब्रिटिश राजवट असे ते ब्रिटिश राज्याचे वर्णन करतात
त्याच्या मते
१ ब्रिटिशांनी भारत राजकीय कटकारस्थाने करून जिंकला होता
२ सातारच्या छत्रपतींची प्रतापसिंगाची गादी ही कटकारस्थान करून हिसकावण्यात आली होती
३ अफगाणिस्तानचे युद्ध अनैतिक होते आणि त्याचा खर्च भारतीय जनतेकडून उकळण्यात आला होता
४ चायनाला जाणीवपूर्वक अफूच्या युद्धात खेचले
५ हे करतांना ब्रिटिश वंशवादाचे कट्टर समर्थन करत होते
तर्खडकरांनी ब्रिटिशांच्या तथाकथित पराक्रमाचा फुगा फोडायचा प्रयत्न केला तरी ब्रिटिश फक्त काटकारस्थानांनी जिंकले असे म्हणता येणे अशक्य आहे कारण युरोपियन लोकांची प्राचीन ग्रीकांच्याकडून उचललेली आठपदरी मिलिटरी स्ट्रॅटेजी हे त्यांच्या लष्करी विजयाचे एक मोठे कारण होते ब्रिटिश युद्धधोरणात आधुनिक होते ही वस्तुस्थिती होती कटकारस्थान व अद्ययावत शस्त्र व युद्धधोरण ह्याच्या जीवावर ब्रिटिश जिंकले ब्रिटिशांचे सिव्हिलायझिंग मिशनची भोके दाखवणे हे त्यांच्या लिखाणाचे उद्दिष्ट होते
तर्खडकरांच्या मते
५ ब्रिटिशांनी व्यापारात प्रचंड फसवणूक व लूट केली होती
६ त्यांनी व्यापारी व शेतकरी रयतेकडून अक्षरशः गुंडासारखी वसुली केली
७ त्यांनी स्थानिक उद्योग नेस्तनाबूत केले
८ भारतातील संपत्ती लुटून त्यांनी ती इंग्लंडला पाठवली व भारताला दरिद्री केले
तर्खडकरांचे आर्थिक बाबतीतले प्रत्येक विधान खरे आहे
तर्खडकर शासकीय व्यवस्थेबाबत म्हणतात
९ ब्रिटिशांच्या शासनव्यवस्थेत सर्वोच्य जागा ह्या फक्त ब्रिटिश लोकांसाठी आहेत
१० त्यांच्या न्यायव्यवस्थेत न्याय फक्त ब्रिटिशांना आणि ब्रिटिशांच्या बाजूने मिळतो
११ त्यांची शासनव्यवस्था एतद्देशीय लोकांच्या शिक्षणाकडे पूर्ण दुर्लक्ष्य करते
१२ ब्रिटिश राजवट मिशनरींना उत्तेजन देते आणि शासन धार्मिक बाबत न्यूट्रल आहे असं खोटं सांगते
१३ ब्रिटिश इतिहासकार भारतीयांचा खोटा इतिहास रचतात आणि हा खोटा इतिहास जाणीवपूर्वक नेटीवांना शिकवला जातो
हे निष्कर्ष १८४१ साली काढलेले आहेत आणि पुढे अनेकांनी ज्यात कार्ल मार्क्सही येतो ह्याची पुष्टी केली आहे
कार्ल मार्क्सच्या मते ब्रिटिश वसाहतवादाने सारे हात- उद्योग बंद पडून त्याजागी औद्योगिक माल आला आणि ह्या प्रक्रियेने लाखो विणकर भुकेकंगाल झाले
विष्णुबोवा ब्रम्हचारी ह्यांनी सुखदायक युटोपियन समाजवादी राज्याची संकल्पना मांडली असली तरी भारतातील श्रमिकांची चळवळ नारायण मेघाजी लोखंडे (जन्म १८४८)ह्यांनीच सुरु केली
टिळकांच्या नावाने जी काही सर्वाधिक आश्चर्यकारक क्रेडिट्स आहेत त्यातील एक मार्क्सवादाशी निगडित आहे भारतात मार्क्सची चर्चा करणारे पहिले नेते टिळक होते १७ एप्रिल १८८१ च्या मराठाच्या अंकात निहीलिज्म ची चर्चा करतांना मराठात कम्म्युनिझम हा शब्द अवतरतो भारतात हा पहिला उल्लेख आहे १ मे १८८१ च्या अंकात टिळक म्हणतात
However highly we may boast of progressive civilisation amongst us, there is still much that remains to be undone. We extract below from the columns of the Radical a prized essay on the best means of utilizing trade unions. The essay is very valuable and we are sure perusal of this essay will produce a revolution of opinion of a very useful and desirable description
पण ह्याच टिळकांनी भारतीय उद्योगाच्या मुळावर येणारे कामगार कायदे स्वीकारायला मात्र नकार दिला होता हेच टिळक कर्जबुडव्या शेतकऱ्याला जेलची शिक्षा रद्द झाली तेव्हा सावकारांच्या बाजूने सुरवातीला उतरतांना दिसतात आणि ही शिक्षा कायम करा अशी मागणी करतात टिळक खोत असल्याने हे करतात अशी त्यांच्यावर त्याकाळी टीकाही झाली होती
हेच टिळक नंतर बदललेले दिसतात मंडालेहून आल्यानंतर २९ नोव्ह १९१९ ला त्यांनी श्रीपाद अमृत डांगेंना सल्ला दिला होता कि सर्व प्रकारच्या क्षेत्रात ट्रेड युनियन्स काढा टिळकांना मार्क्स हा समाजसत्ता स्थापित करू पाहणारा पुरुष म्हणून दिसत होता २९ जाने १९१८ ला त्यामुळेच त्यांनी रशियाचा पुढारी लेनिन ह्या नावाने एक लेखही लिहिला होता
टिळक मग नेमके काय इच्छित होते ? त्यांना बहुदा भारतीय शेती व उद्योग आधी उभे राहू द्या आणि एकदा का हे उभे राहिले कि मग त्यांच्यातला शेतकरी कामगारांचा न्याय हिस्साही त्यांना मिळावा वा त्यांना देण्यात यावा असे वाटत होते
९
भारतीय राष्ट्रवाद हा प्रथम ब्रिटीशराज्यवाद होता आणि टिळक राजकीय रंगमंचावर येईतोवर तोच प्रभावी आणि प्रचलित होता लोकहितवादी , महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे ,फिरोजशहा मेहता ,गोपालकृष्ण गोखले ,सुरेंद्रनाथ बॅनर्जी ,दादाभाई नौरजी हे सर्वच ह्या ब्रिटीशराज्यवादाचे समर्थक होते मग असे काय झाले कि फक्त टिळकच ह्यांच्यापासून वेगळे झाले ?
ह्याचं एक उत्तर टिळकांच्या स्वभावात आहे टिळक स्वभावतः सर्वच प्रकारच्या दादागिरीविरुद्ध होते त्यामुळे त्यांनी एतद्देशीय शिक्षकांना जुमानले नाहीच पण ब्रिटिश शिक्षक प्राध्यापकांनाही जुमानले नाही त्यासाठी त्यांना परमप्रिय असलेल्या गणितात एम ए करणे ही महत्वाकांक्षा असूनही शेवटी त्यांनी ती मारली आणि लॉ केले त्यांच्या स्वभावातच धीटपुंडाई होती जी महात्मा फुले सोडले तर इतरांच्यात न्हवती गोखले मेहता ह्यांच्यापेक्षा टिळक लोकप्रिय का ह्या प्रश्नाचे खरे उत्तर हेच होते कि हे लोक बंगल्याशिवाय झोपू शकत न्हवते आणि टिळक कुठल्याही कार्यकर्त्याच्या घरी चटईवरही झोपत साहजिकच सामान्य कार्यकर्त्याला ते आपलेसे वाटत होते टिळकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ पुस्तकी विद्वान न्हवते म्हणजे सुतारांशी बोलतांना ते सहज सुतारकामावर बोलू शकत शेतकऱ्यांशी शेतीवर हा गुण त्यांच्याआधी फक्त महात्मा फुल्यांच्याजवळ होता काँग्रेसचा राष्ट्रीय नेता कसा असावा ह्याचे पहिले उत्तर टिळक होते दुसरे महात्मा गांधी होते आणि तिसरे नेहरू लोकांची मने जिंकून त्यांच्याशी संपर्क कसा ठेवायचा हे टिळकांनी प्रथम काँग्रेस नेत्यांना शिकवले . मात्र त्याचबरोबर लोक नालायक असतात केलेले उपकार विसरून जातात ह्याचीही त्यांना जाणीव होती त्यामुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षितताही त्यांनी व्यवस्थित पाहिली त्यामुळेच महात्मा फुल्यांच्या कुटुंबियांना जशी भीक मागायची पाळी आली तशी टिळकांच्या फॅमिलीवर आली नाही स्वतःच्या फॅमिलीची आर्थिक सुरक्षितता आणि राष्ट्रभक्ती ह्यांचा जो मेळ टिळकांनी घातला तो पुढे अनेक काँग्रेस नेत्यांनी स्वीकारला अगदी सोनिया गांधीही ह्याबाबत टिळकवादी आहेत मंडालेला तुरुंगात जातांना त्यामुळेच टिळकांना कुटुंबाचे टेन्शन न्हवते .
------------------------------
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती १० श्रीधर तिळवे नाईक
टिळकांना स्वराज्य म्हणजे नेमकं काय हवं होतं लॉर्ड माँटेंग्युला त्यांनी सांगितलं होतं कि आम्ही ऍरिस्टोक्रेटीक माणसं आहोत आणि आमची डेमोक्रसी ऍरिस्टोक्रेटीकच असणार त्यांच्यावर त्यामुळे टीका होणे अटळ होतं पण आज भारताची अवस्था बघितली कि टिळक द्रष्टे होते काय असाच प्रश्न पडतो भारतीय लोकशाहीचा कारभार सरंजामशाही पद्धतीनेच चालणार असं त्यांना का वाटलं असावं ? ते प्रॅक्टिकल होते म्हणून कि त्यांची मानसिकता पेशवाईची होती म्हणून ?
टिळकांना देशभक्त म्हणून नाव मिळाले ते कोल्हापूर प्रकरणामुळे महादेव बर्वे हे महाराजांचे दिवाण होते व त्याविषयी अनेक अफवा होत्या म्हणजे दिवाण महाराजांना हंटरने मारतात वैग्रे कोल्हापुरात एक असंतोष होता आणि त्याची माहिती टिळक आगरकरांना काही करवीरकर मंडळींनी दिली शिवाय बर्व्याच्याविरुद्ध काही कागदपत्रेही दिली प्रत्यक्ष कोर्टात ती बनावट निघाली आणि ती छापल्याबद्दल टिळक आगरकरांना चार महिन्याची सजा झाली लवकरच महाराजांचा मृत्यू झाला आणि हे बर्वेन्च्यामूळे घडले असे जनता मानू लागली आणि महाराजांच्या बाजूने लढणारे निधडे पत्रकार म्हणून टिळक आगरकर महाराष्ट्रभर चमकले
टिळकांचे सनातन रूप समोर आले ते रखमाबाई प्रकरणात लहानपणी झालेला विवाह अमान्य करणाऱ्या रखमाबाईने थेट कोर्टविरोधात सत्याग्रह करण्याचे जाहीर केले आगरकर रानडे आदी सुधारक तिच्या मागे उभे राहिले तर त्यात टिळकांनी सुधारकांच्या विरुद्ध जाऊन तिने हिंदू कायद्याप्रमाणे नवऱ्याच्या घरी जाऊन नांदायला हवे अशी भूमिका घेतली
पुढे स्त्रियांच्या संमतिवयाबाबतही टिळक जीर्णमतवादी लोकांच्या बरोबर उभे राहिले
वेदोक्त प्रकरणातही शाहू महाराजांना वेदोक्त कि पुराणोक्त मंत्र अप्लाय होतात ह्यावरून वाद झाला तेव्हा त्यांनी ठामपणे महाराजांची बाजू घेतली नाही शिवाजी महाराजांना क्षत्रिय म्हणून मान्यता दिल्यावर हा वाद संपला होता कोल्हापूरचे ब्राम्हण महाराजांच्या बाजूने होते पण इतर काही ब्रम्हवृन्द विरोधक झाले ह्यातील काही इतके कट्टर कि त्यांची वतने काढून घेतली गेली तरी अडून राहिले महाराजांनी मग क्षात्र जगदगुरु नेमला मात्र अनेकांचा समज आहे तसे टिळक म्हणत न्हवते महाराजांनी प्रायश्चित्त घ्यावे आणि मग वेदोक्त मंत्राचा अधिकार त्यांना प्राप्त व्हावा अशी काहीशी चमत्कारिक भूमिका टिळकांची होती आणि ती मान्य करणे अर्थातच महाराजांना शक्यच न्हवते
टिळक अनेकदा असे प्रायश्चित्त घेत चहोक्त प्रकरणात त्यांनी हे केले होते ब्राम्हणांना नाराज करायचे नाही असे त्यांचे स्पष्ट धोरण होते त्यांच्या अनुयायांत ब्राम्हणांची संख्या जास्त असल्याने हे धोरण असावे
एकंदर टिळकांना कितीही झुकते माप दिले तरी सामाजिक सुधारणेबाबत टिळक हे १९१८ पर्यंत अतिशय मागासलेल्या विचाराचे होते असे नाईलाजाने म्हणावे लागते मंडालेहून ते बाहेर आल्यावर त्यांच्या विचारात फरक पडायला सुरवात झाली होती गीता कर्माप्रमाणे वर्णव्यवस्था मानते अशा विचारापर्यंत ते आले होते पण ह्याबाबत जाहीर भूमिका घ्यायला ते कमी पडले अस्पृश्यता मानणारा देव देवच न्हवे असे उद्गार त्यांनी नंतर काढले पण अस्पृश्यताविरोधी पत्रकावर त्यांनी सही केली नाही म्हणजे विचार आचारात आणण्याची तयारी झाली न्हवती असेच दिसते थोडक्यात टिळकांची सामाजिक आधुनिकता फक्त त्यांच्या डोक्यात राहिली ती त्यांनीच सांगितलेल्या कर्मयोगात कधी उतरली नाही गीतेचे रहस्य कधीच आधुनिक झाले नाही असो राजकीय टिळक मात्र सामाजिक टिळकांच्यापासून पूर्ण भिन्न आणि सर्व राजकीय नेत्यात अधिक आडवान्स होते
श्रीधर तिळवे नाईक
टिळकांनी दिलेला काँग्रेस पॅटर्न लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ११ श्रीधर तिळवे नाईक
मोक्ष ही भारतातील एकमेव गोष्ट अशी आहे जी एव्हरग्रीन आहे ह्या एकमेव हिरवळीभवती भारतीय समाजाचे वाळवंट टिकून आहे
मोक्षाची आस हे स्वातंत्र्यपूर्व भारतीय नेत्यांचे वैशिष्ट्य होय टिळक ह्याला अपवाद न्हवते अगदी झोपेतही ते एकदा म्हणाले होते ," मोक्ष ! नको नको सद्या भारतभूचे स्वातंत्र्य हेच माझे ध्येय आहे " गांधी , महर्षी शिंदे ,आंबेडकरही ह्याला अपवाद न्हवते केवळ राष्ट्रासाठी ही मंडळी राजकारणात आणि समाजकारणात उतरली होती अन्यथा मोक्षाची साधना करत हे मोक्ष मिळवून मुक्त झाले असते
टिळक गीतारहस्य लिहिते झाले हा केवळ योगायोग न्हवे त्यांना कर्मयोगाद्वारे मोक्ष साधता येईल येतो अशी मांडणी करायची होती एका अर्थाने हे आत्मसमर्थन होते व टिळकांना ते शोभून दिसते कारण टिळक स्वतः कर्मयोगी होते
भारतीय इतिहासात अनेकदा ब्राम्हणाने ज्ञानयोग आणि राजयोगामार्फत मोक्ष मिळवावा अशीच अपेक्षा दिसते मराठीत मोक्ष मिळवलेल्या मुख्य चतुष्टकांपैकी ज्ञानेश्वर व एकनाथ हे राजयोगामार्फत तर नामदेव तुकाराम हे भक्तियोगामार्फत मोक्षाला पोहचलेले दिसतात रामदासांची धडपड कर्मयोग्यासारखी दिसते पण त्यांना मोक्ष मिळालेला दिसत नाही किंबहुना त्यांनी महाराष्ट्र धर्माला स्वतःला वाहून घेतलेले दिसते आणि आज ज्यांना आपण तालमी व आखाडे म्हणतो ते महाराष्ट्रात उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे कारण कर्मयोग !
टिळकांनी आपल्या कॉलेजचे पहिले वर्ष शरीर मजबूत करण्यात घालवले ह्याबाबत त्यांचा फोकस एव्हढा प्रखर होता कि ते व्यायामाखेरीज काहीही करत न्हवते परिणामी प्रथम वर्ष चक्क नापास झाले टिळकांना मल्ल विद्येची आणि पोहण्याची आवड होती एकार्थाने ते अतिशय तल्लख पैलवान होते कृतिशीलता आणि कर्मशीलता हा त्यांचा स्वभाव होता नुसते अर्जविनंत्या करत बसणे त्यांच्या स्वभावाला मानवणारे न्हवते
भारतात श्रीकृष्ण हा कर्मयोगाच्या साहाय्याने मोक्ष प्राप्त केलेला सर्वात महान तत्वज्ञानी पुरुष म्हणून नेहमीच दाखवला जातो आणि त्याने गीता सांगितली असेही सांगितले जाते अर्थात कर्मयोगाचे पहिले दोन मोक्षक पुरुष हे राजा जनक व वैश्य तुलाधार आहेत जे उपनिषदात येतात टिळक हे ह्या कॅटेगरीत येऊ पाहतात
प्रश्न असा आहे कि टिळक हे नव्या युगाचे श्रीकृष्ण बनू पहात होते का ?तर ह्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे योद्धा नाही पण लढण्याची ताकद आहे विचारी आहे पण सनातन ब्राम्हणी निगमीं धर्म पुन्हा प्रस्थापित करायचा आहे ब्रिटिश नावाच्या धर्माला कधी विनंत्या करून तर कधी क्रांतीकारकांना सशस्त्र उठावाला उत्तेजन देऊन हुसकावून लावायचे आहे व सनातन आर्य धर्माची पेशवाई पुन्हा भारतभर आणायची आहे सुधारकांशी मैत्री करून त्यांना सांभाळायचे आहे पण प्रत्यक्ष सामाजिक सुधारणात एक इंचही पुढे सरकायचे नाहीये सुधारकांच्या बाजूने संभाषणे करायची आहेत अपवादात्मक गरज असेल तर भाषणेही करायची आहेत पण जोवर समाज ह्या सामाजिक सुधारणेसाठी तयार होत नाही तोवर सामाजिक पाऊल टाकायचे नाहीये शेअरबाजाराच्या उलाढालीत भाग घेऊन पैसेही कमवायचे आहेत हा टिळकांचा पॅटर्न आहे आणि जर बारकाईने पाहिलात तर हाच पॅटर्न काँग्रेसचा आहे
टिळकांनी भारताला काय दिले तर त्यांनी काँग्रेसला एक राजकारणी पॅटर्न दिला जो पुढे भारतीय राजकारणाचाच एक मुख्य पॅटर्न बनला महात्मा गांधींनी हा पॅटर्न वैष्णव करून आधिक लवचिक केला नेहरूंनी ह्या पॅटर्नमधून मोक्ष वजा केला आणि तो आधिक जडवादी केला हा बदल पुढे इतका जडवादी झाला कि काँग्रेस नेत्यांनी फक्त स्वतःचे जडवादी ऐहिक कल्याण करण्याचा महामार्ग शोधला नेहरूंना वाटले होते आपल्यासारखेच सगळे जडवादी गांधीवादी नैतिक होतील ही अपेक्षाच युटोपियन होती आणि तिचे तीनतेरा वाजणे अटळच होते
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती १२ श्रीधर तिळवे नाईक
ज्यांना मोक्षामार्फत भारताशी नाळ जोडता येत नाही असे लोक भारताशी एकतर धर्मामार्फत तरी नाळ जोडतात किंवा इतिहासामार्फत नाळ जोडतात म्हणजे हिंदुत्ववाद्यांपैकी अनेकजण ज्यांना मोक्षाशी काहीही देणेघेणे नाही धर्मामार्फत भारताशी नाळ जोडतात आणि ज्यांचा मोक्ष आणि धर्म ह्यापैकी कशावरच विश्वास नाही असे मार्क्सवादी आणि समाजवादी इतिहासामार्फत भारताशी नाळ जोडतात
मी मागे म्हंटल्याप्रमाणे मार्क्सवादाशी पहिली नाळ जोडण्याचे श्रेय हे टिळकांना जाते पण टिळकांचा धर्म आणि मोक्ष ह्यांच्याशी असलेला गाढ संबंध मार्क्सवादयांना टिळकांच्यापासून दूर ठेवतो
टिळक हिंदुस्तानशी आपली नाळ मोक्ष धर्म आणि इतिहास अश्या तिन्ही मार्गांनी जुळवतात
ते मोक्ष हाच अंतिम पुरुषार्थ मानतात आणि प्राचीन चालत आलेला हिंदू वेदांती धर्म हाच समाजधारणेचा आधार मानता येईल का ते चाचपत राहतात केसरीतल्या एका निबंधात ते आपणाला समाजाची रचना युरोपीय पायावर करायची आहे कि भारतीय पायावर असा प्रश्न विचारतात जुन्या काळातील हिंदूंची वर्णजातनिष्ठ रचना आता लागू करणे अशक्य आहे ह्याची जाणीव असूनही ते पुन्हा पुन्हा कर्मठ हिंदू धर्माकडे वळतात ते ज्याला भारतीय पाया समजतात तो हिंदू पाया आहे इतर मार्गांची त्यांना जाणीवच नाही आर्य एके आर्य आर्य दुणे आर्य असा त्यांचा सतत पाढा चालू आहे जो त्या काळाचाच पाढा होता इंग्रजांच्या आगमनानंतर पेशव्यांची हिंदू निगम आणि यूरोपियनांची यूरोपीय अशा दोन संस्कृतीत संस्कृती संघर्ष निर्माण झाला असे मानून जाणाऱ्या लोकात ते असल्याने ह्या द्विध्रुवात्मकतेत ते घुटमळत राहतात
साहजिकच इतिहासाची मांडणी ह्या द्विध्रुवात्मकतेत होते आणि आपण हिंदू आर्य ध्रुवावर उभे आहोत अशी परिकल्पना रचून सुधारक जणू यूरोपीय ध्रुवावर उभे आहेत अशी मिथ ते स्वतःशीच रचतात आपल्या ह्या आर्य हिंदू ध्रुवाचे उगमस्थान ते उत्तर ध्रुवावर शोधतात त्यासाठी काही पुरावे देतात उत्तर ध्रुव हा प्राचीन काळी मानवी वस्तीसाठी योग्य होता ह्या तत्कालीन समजुतीमुळे त्यांना स्फुरण चढते युरोपियन आणि आर्यन एकाच भूप्रदेशातून निघालेली दोन भावंडे आहेत हे त्यांना मान्य असावे एक भारतात आले व दुसरे यूरोपात पसरले इंड्सचा शोध त्याकाळी लागला न्हवता त्यामुळे आर्यांनी इथल्या मागासलेल्या लोकांना शहाणे करून आर्य धर्मांच्यात सामावून घेतले हे तत्कालीन गृहीत तेही गिरवतात तुंगभद्रा ते नर्मदा एक वेगळी संस्कृती आहे ह्याची त्यांना जाणीव असूनही ते तिच्याविषयी बोलायचे टाळून आर्यांच्यावर बोलत राहतात .
अर्थशास्त्रापासून स्मृतीपर्यंत आपण आर्यन निगम परंपरेचा विचार केला तर ही वैदिक ब्राम्हणी वैष्णव हिंदू परंपरा राज्य कसे नैतिक असावे हे सांगत नाही तर श्रुतिस्मृतीप्रमाणे राज्यकारभार कसा चालवावा हे सांगते राज्य कसे असावे तर स्मृतीप्रमाणे चालवावे कसे तर अर्थशास्त्राप्रमाणे साम दाम दंड भेद ह्यांचा अवलंब करत ! ह्या राजकीय विचारांना प्लेटो ऍरिस्टोटल ते स्पेन्सरपर्यंत सर्वांना पडणारे नैतिक प्रश्नच पडत नाहीत त्यावरून वाद होत नाहीत झापड लावून सामान्य माणसांनी जगावे आणि घोड्यावर बसून क्षत्रियांनी त्यांचे जगणे चालवावे आणि घोडा कसा व कुठल्या दिशेने हाकावा ते घोड्यावर बसता आले नाही तरी ब्राम्हणांनी सांगावे परिणामी सगळी वैदिक राज्ये म्हणजे अन्यायाची चाबूक बनली
टिळकांनी ही परंपरा पेशवाईप्रमाणे धुडकावून ते स्वतःच घोड्यावर बसले आणि त्यांनी त्यांचा हा घोडा भारतभर फिरवला पण तो अंतिमतः कुठे जाणार हे मात्र त्यांना शेवटपर्यंत माहित न्हवते शूद्रांना गुलाम समजून राज्यकारभार हाकण्याची वैदिक कठोरता त्यांच्याकडे न्हवती पण शूद्रांना (ह्यात स्त्री दलितही गृहीत आहेत )ठाम शब्दात समान हक्क द्यावे असे ते गर्जले नाहीत त्यांना मिळणारा पाठिंबा हाही प्रामुख्याने ब्राम्हण क्षत्रिय ह्यांचाच होता मात्र तो अखिल भारतीय असल्याने ते भारताचे राष्ट्रीय नेते बनले
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक आणि स्वराज्य
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती १३ श्रीधर तिळवे नाईक
आपण भारतीय अत्यंत कृतक जगतो समोर असेल तेव्हा स्नेहाची मिठी पाठ फिरली कि द्वेषाची आणि निंदा नालस्तीची पिठी असे आपले जगणे असते आपले अहंकार इतक्या क्षुद्र गोष्टींच्या आधारे उभे असतात कि ते लागलीच दुखावले जाऊ शकतात आणि आपण भांडायला तयार होतो हे भांडण सोडवायला कुणी तिसरा उभा राहिला तर ठीक नाहीतर महिनेंनमहिने धुसफूस चालू आणि कधीकधी जातीय वर्णीय समतोल नसेल तर हत्या !
भारतीयांचा हा कृतकपणा खुद्द काँग्रेसमध्येही मुबलक होता त्यामुळेच अनेक परस्पर लोक एकमेकांशी स्नेहाने वागत एकमेकांची पाठीमागे निंदानालस्ती करत असत टिळक जे करू शकतात ते आम्ही करू शकत नाही ह्याची कबुली खुद्द फिरोजशहा मेहतांनीच दिली होती पण ह्याच नेमस्तांनी टिळकांना त्यांच्या जहाल राष्ट्रवादामुळे काँग्रेसबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता हे आज काहीसं विनोदी वाटतं टिळकांचे वैशिष्ट्य म्हणजे टिळक कधीही कृतक झाले नाहीत त्यांनी अनेकदा सुस्पष्ट भूमिका घेतल्या राजकारण आधी समाजकारण नंतर ही त्यांची स्पष्ट भूमिका होती
युरोपियन प्रबोधनाशी त्यांचा घनदाट परिचय होता . यूरोपमधील राष्ट्रे स्वतंत्र होती म्हणूनच तिथे प्रबोधन घडले हे आपण लक्ष्यात घ्यायला हवे इंग्लंड स्वतंत्र होते मग समाजक्रांती झाली हळूहळू घटनात्मक बदल आणले गेले त्याकाळातील सर्वात मोठा आदर्श अमेरिका संस्थान हेही प्रथम राजकीयदृष्टया स्वतंत्र झाले मग तिथे समाजकारण झाले भारतात सर्वच विपरीत झाले आपण ब्रिटिशांचे गुलाम झालो आणि मग आपल्या प्रबोधनाच्या प्रोजेक्टने गती पकडली एका अर्थाने आपला प्रबोधनाचा प्रोजेक्ट हा गुलामांचा प्रबोधन प्रोजेक्ट होता इंग्रजांच्याविरुद्ध १८५७ नंतर लढण्याची ताकदच भारतीयांनी गमावली आणि आपण पराभूत का झालो ह्याची मीमांसा सुरु झाली आणि त्यातूनच भारतीय समाजसुधारणांचा प्रोजेक्ट सुरु झाला
तत्कालीन पेशवाई ही इतकी वाईट राजवट होती कि अनेकांना ब्रिटिश राजवट उजवी वाटली त्यामुळे स्वातंत्र्याचा प्रोजेक्ट हातात घेऊन आपण करणार तरी काय हा यक्षप्रश्न होता बरं क्षत्रिय सगळे तैनाती फौजा घेऊन बसले होते भारतीय शासक किती निर्लज्ज आळशी ऐदी आणि नुसता जनतेच्या जीवावर चरणारा कसा असतो ह्याचे असंख्य नमुने त्याकाळी संस्थानांच्यात दिसत आत्मविश्वास लयाला गेलेला असा हा समाज होता मुख्य म्हणजे पारंपरिक क्षत्रिय राजा वा बादशहा राजकीय पटलावरून गायब झाला होता अशा स्वशासकशून्य समाजात प्रथम समाज सुधारू आणि मग स्वातंत्र्य वैग्रे बघू असं जर कुणाला वाटलं तर ते चुकीचं न्हवतं टिळकांनी ह्यातून राजकीय मध्यममार्ग काढला ब्रिटिश राज्यात रहायचे आणि स्वराज्य घेऊन राज्य करायचं असा हा मार्ग होता आणि आवाजी मागण्या मग त्या मान्य झाल्या कि आणखी जहाल आवाजात मागण्या ही त्यांची स्ट्रॅटेजी होती ही स्ट्रॅटेजी पुढे गांधी आंबेडकरांनीही थोडी सौम्य करून अवलंबली टिळकांनी म्हंटले होते
It is ·only possible that they will have enlightened despotism in place of pure despotism.
ह्यातील enlightened despotism हे ब्रिटिश राज्याचे वर्णन दाद द्यावे असे !
स्वराज्यात भारतीयांनाही शासक समाजाचा भाग बनणे शक्य होते. काँग्रेस ही शासक समुदायाचा भाग बनण्यासाठीच जन्मली होती त्यामुळेच सिव्हिल सर्व्हिसमध्ये जागा मागणे मग अधिक जागा मागणे हेच काँग्रेसमध्ये जास्त होते एका अर्थाने काँग्रेस ब्रिटिश शासनात भारतीयांसाठी आरक्षणच मागत होती राखीव जागांचे प्रश्न हे ब्रिटिश शासनातच सुरु झाले होते कारण सुरवातीला ब्रिटिश तब्बल ९५ ते ९९ टक्के उच्च पदे ब्रिटिशांसाठी राखीव ठेवत होते आणि ५ ते १ टक्के पदे एतद्देशीयांना देत होते जो अन्याय वैदिक राजवटीत पूर्वी ब्राम्हण क्षत्रिय करत तोच अन्याय आता ब्रिटिश करत पुढे खालच्या जागा एतद्देशीयांना मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्या पण वरच्याबाबत ब्रिटिशांचे आरक्षण लागूच होते पुढे फुले दाखवतात त्याप्रमाणे भारतीय जागांत सर्वच जागा ब्राम्हणांनी बळकावयाला सुरवात केल्यावर आणि ह्या ब्राम्हण अधिकारी व कारकुंड्यानी प्रचंड भ्रष्टाचार करूंन सामान्य जनतेचे प्रचंड शोषण सुरु केल्यावर फुल्यांना पेशवाई येण्याचे भय वाटले तर त्यात चूक काय होती ?पेशवाईचा सर्वात प्रॉब्लेम भ्रष्टाचार हाच तर होता आणि आजही हाच आहे
टिळकांच्या मनात जे राष्ट्र होते ते मराठा राष्ट्र होते १९०६ पर्यंत तरी ही स्थिती होती उदाहरणार्थ १९०६ च्या एका भाषणात ते म्हणतात ,"Mr. Chairman and gentlemen, I am unable to impress you with my feeling and sentiment. I express my gratefulness on my own behalf and that of my friends for the splendid reception accorded to us. This reception is given not to me personally but as a representative of the Marathi nation. . This honour is due to the Marathi nation for the services and sympathy towards the Bengali race in their present crisis." (Speech delivered by Mr. Tilak at Calcutta under the Presidency of Babu . Motilal Ghose on 7th June 1906).
पुढे ते भारत राष्ट्र पर्यंत आले
नेमकी त्याचवेळी ब्रिटिश राजवटीला जशीजशी १०० वर्षे पूर्ण होऊ लागली तशतशी निराशा वाढू लागली त्याचवेळी रशिया जपान आयर्लन्ड मध्ये स्वतंत्र होऊन वा सत्तापालट करून क्रांती झाली टिळक अधिकाधिक आक्रमक झाले टिळक म्हणतात ,"
India is under a foreign rule and Indians welcomed the change at one time. ·Then many races were the masters and they had no sympathy and hence the change was welcomed and that was the cause
why the English succeeded in establishing an empire in India. Men then thought that the change was for their good. The confusion which characterised native rule was in striking contrast with the constitutional laws of the British Government. The people had .much hope in the British Government, but they were much disappointed in their anticipations. They hoped that their arts and industries would be fostered in British rule and· they would gain much from their new rulers.But all those hopes· had. been . falsified. The .people were now compelled to adopt a
new line, namely, to fight against the bureaucracy. Hundred· years · ago it was said, and believed by : the. people; that they were socially inferior to their rulers and as soon as
they were socially·. improved they would obtain liberties:. and privileges• But subsequent events have shown that this was· not based on sound logic. Fifty years ago Mr.· Dadabhai Naoroji, the greatest statesman of India, thought that Government would grant them rights· and privileges when they were properly educated,. but that hope is gone.
Now it might be· said that they were not fitted to take part in the administration of the
THE POLITICAL SITUATION in the country owing to their defective education. But, I ask, whose fault it is. The Government has been imparting education to the people and hence the fault is not theirs but of the Government. The . Government is imparting an education to make the people
fit for some subordinate appointments. Professions have been made that one day the people would be given a share in the administration of the country. This is far from the truth.
पुढे ते म्हणतात
Good wishes between master and servant are impossible. It may be possible between equals: The people must show that they are fit for .privileges. They must take such departments as finance in their own hands and the rulers will then be ·oound to give them to the people.· That is .the. 'key of success. It is 'l'HE POLlTIC.lL SITUATION impossible to expect ·that our petitions will be heard unless backed by firm resolution. Do not expect much from a change in government. Three P's-pray, · please and protest-will not do unless backed by solid force. Look to the examples of. Ireland, Japan and Russia and· follow their methods. You probably Have read the speech delivered· by Arthur Griffin and we · m~t consider the· way as to how to build a nation on Indian; soil. The rulers have now. a definite policy.
(page 24 TO 27 BAL GANGADHAR TILAK speeches and writing publisher ganesh company Madras )
जहाल मवाळ सापेक्षता त्यांना माहित होती ते म्हणतात
Two new words have recently come into existence with regard to our politics, and they
are Moderate• and Extremists., These words have a specific relation to'time, and they,
therefore, will change 'with time. The Extremists of to-day will be :Moderates tomorrow, just as the Moderates of today were Extremists yesterday.
(page 37BAL GANGADHAR TILAK speeches and writing publisher ganesh company Madras )
नेमस्त दादाभाई नौरोजी भारताच्या आर्थिक शोषणाविषयीची जाणीव करून द्यायला तब्बल २५ वर्षे इंग्लंडला राहिले आणि शेवटी ८१ व्या वर्षी निराश होऊन परतले टिळकांना हे सतत बोचत होते जे दादाभाईंना कळायला २५ वर्षे घालवावी लागली ते कळायला गोखले व नेमस्त आणखी किती वर्षे घेणार असा त्यांचा सवाल होता ब्रिटनमधले लिबरल भारतात आले कि कॉन्झर्वेटिव्ह बनतात असा त्यांचा अनुभव आहे असे ते म्हणत
टिळक ज्या काळात वावरत होते त्या काळात स्वराज्याची चर्चा करतांना मतदानाच्या हक्काची चर्चा फारशी होत नसे कारण खुद्द इंग्लंडमध्येच १८६७ पर्यंत मतदानाचा हक्क उच्च व मध्यमवर्गापुरता मर्यादित होता प्रोलिटरीयतना मतदानाचा हक्क न्हवता किंबहुना मार्क्सला लोकशाही ही भांडवलशाही संस्था आहे असे जे वाटत होते त्याला कारण कामगारांना तत्कालीन लोकशाहीत मतदानाचा हक्क न्हवता हेच होते ज्या जपानचा आदर्श तत्कालीन नेत्यांना वाटत असे तिथे १८८९ साली जेव्हा पार्लमेंटची स्थापना झाली तेव्हा मतदानाचा हक्क ज्याचे वय २५च्या पुढे आहे व जो साडेबावीस येन एव्हढा प्रत्यक्ष कर भरतो फक्त त्या पुरुषालाच होता त्यामुळे चार करोड जपानी लोकसंख्येतील फक्त साडेचार लाख लोकांना खरेतर फक्त पुरुषांनाच मतदानाचा हक्क होता हे आपण लक्ष्यात घ्यायला हवे टिळकांना झोडपणाऱ्या लोकांना अनेकदा त्यांचा समकालीन जागतिक काळ माहित नसतो म्हणून हे सांगत आहे .
टिळकांच्या मृत्यूनंतर पाच वर्षातच एतद्देशीय लोकांच्या हातात जी सत्ता आली आणि त्यांनी जो भोंगळ पद्धतीने राज्यकारभार चालवला त्यामुळे रामचंद्र गणेश प्रधान ह्या लोकप्रतिनिधीने भारतसेवकच्या अंकात प्रश्न विचारला ," आम्ही स्वराज्यास पात्र आहोत का ?"
श्रीधर तिळवे नाईक
युरोपियन प्रबोधनाचा टिळकांच्यावर सामाजिक प्रभाव का पडला नाही
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती १४ श्रीधर तिळवे नाईक
युरोपियन प्रबोधनाचा विचार करताना सर्वात प्रथम डोळ्यापुढे येते ती वैज्ञानिक दृष्टी ! वैज्ञानिक दृष्टीबाबत सध्या अनेक गैरसमज पसरले आहेत म्हणून इथे पुन्हा थोडक्यात ओळख करून देतो
पहिली गोष्ट म्हणजे विज्ञानाच्या तत्वज्ञानाची सुरवात बुद्धिप्रामाण्यवादापासून होत नाही मराठी लोकांचा आणि अनेकांचा हा ढकोसला आहे विज्ञानाची सुरवात इंद्रियाप्रमाण्यवादापासून झाली आणि तिची मांडणी फ्रान्सिस बेकनने केली तोच इम्पिरिसिझ्मचा जनक होता ह्याला आपण इंद्रियप्रामाण्यवाद म्हणू ज्ञानाचे मुख्य प्रमाण इंद्रियप्रामाण्य आहे आणि इंद्रियांना जे प्रतीत होते इंद्रियाद्वारे जे प्राप्त होते आणि इंद्रियाद्वारे जे प्रमाणित होते तेच वैज्ञानिक सत्य होय इंद्रियप्रामाण्यवाद हा धार्मिक सत्याला नाकारतो आणि मानवी सत्याला जे त्याला इंद्रियांच्याद्वारे प्राप्त होते त्याला प्रमाण मानतो ह्यामुळे साहजिकच धार्मिक पारलौकिक सत्याला नाकारता येते
बेकनच्या ह्या मांडणीला नकार दिला तो देकार्तने त्याच्या मते इंद्रियांच्यापासून प्रतीती सुरु झाली तरी ज्ञान इंद्रियांच्याद्वारे न्हवे तर बुद्धीद्वारे मिळते म्हणूनच ज्ञानाचे मुख्य प्रमाण बुद्धीप्रमाण आहे ज्ञान बुद्धीद्वारे प्राप्त होते आणि बुध्दीच्याद्वारे प्रमाणित होते ह्याला बुद्धिप्रामाण्यवाद म्हणतात
मराठीत ह्या दोन्हींना एकच समजण्याची घोडचूक अनेकजण करतात
प्रत्यक्षात विशेष ज्ञान विज्ञान हे इंद्रियांच्याद्वारे प्रतीत झालेल्या संवेदनातून आणि बुद्धीद्वारा प्रमाणित झालेल्या अन्वेषण आकलनातून आणि पुढे सर्वांच्या इंद्रिय व बुद्धीद्वारे प्रमाणित झालेल्या तर्कातून प्राप्त होते ह्या इंद्रियबुद्धीप्रामाण्यवादाने संपूर्ण यूरोप हलला आणि सारी व्यवस्था मानवकेंद्री झाली
ह्याचा एक परिणाम असा झाला कि सर्व काही चिकित्सेच्या खाली आले अन्वेषणाला पात्र ठरले मग ते धार्मिक कायदे वा शास्त्र असो वा वा राज्यघटनेची संरचना असो प्रत्येक गोष्टीवर टीका करण्याचा हक्क व स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळायला हवे ही भावना पसरली काहीही पवित्र नाही हे सर्वांना उमजू लागले स्वातंत्र्य समता बंधुता ह्या तीन तत्वाचा जयजयकार सूर झाला
टिळकांना युरोपियन प्रबोधन व त्यातील विज्ञान माहित असूनही त्यांच्यावर सामाजिक अंगाने त्याचा प्रभाव का पडला नाही हा एक कळीचा प्रश्न आहे वैज्ञानिक नाही पण मग निदान राजकीय तरी ! मेकायवलीने जे राजकीय तत्वज्ञान मांडले त्यात त्याने धर्माला बाजूला सारून राज्य केंद्रस्थानी आणले हे करताना त्याने माणूस हा स्वार्थी असतो आणि ख्रिश्चन धर्माची शिकवण ही राजनैतिक व्यवहाराला मारक असते ही कल्पना मांडली त्याने पोपविरुद्ध बंड पुकारले टिळकांनी राज्यव्यवहार केंद्रस्थानी आणला पण मेकायवलीसारखा धर्म व पोप म्हणजे हिंदू धर्म व शंकराचार्य बाजूला का सारले नाही ?
टॉमस हॉब्जने मॅकायवलीचा मनुष्य स्वार्थी असला हा मुद्दा स्वीकारला पण त्याचबरोबर माणसाला सारासार विवेकबुद्धीही असते अशी मांडणी केली मात्र ही विवेकबुद्धी त्याने राज्ययंत्रणेला अर्पावी व त्याबदली स्वतःच्या स्वार्थाला पोषक अशी सुरक्षितता व राजकीय हक्क मिळवावे अशी अपेक्षा केली टिळक विवेकबुद्धी ब्रिटिश राज्याला अर्पण करायला तयार होते पण त्याबदलात भारतीयांना न्याय्य हक्क ब्रिटिश देणार आहेत का असा त्यांचा प्रश्न होता
जॉन लॉकने हा विवेकबुद्धीचा मुद्दा स्वीकारला व तिच्यामुळेच मनुष्य त्याला योग्य अशी शांत स्वतंत्र विवेकपूर्ण प्रातिनिधिक आणि प्रत्येकाच्या आयुष्याला व जीवनशैलीला मान्यता देणारी राज्ययंत्रणा स्वीकारेल अशी मांडणी केली माणसाच्या विवेकावरचा हा विश्वास टिळकांना होता का ? लॉकच्या मते माणूस जगण्यासाठी श्रम करतो आणि ह्या श्रमात आणि श्रमातून निर्माण होणाऱ्या वस्तूत तो स्वतःचे व्यक्तित्व ओततो म्हणूनच त्या वस्तूवर त्याचा मालकी हक्क प्रस्थापित होतो मानवाला ह्या स्वनिर्मित वस्तूची विक्री करण्याचा हक्कही असल्याने खरेदी विक्री न्याय्य होत होती आणि खरीददार आणि विक्रेता ह्यांनी करायचा व्यवहार हा पूर्णतः त्या दोघातील प्रश्न होता लॉकचा हा मालकी हक्काचा सिद्धांत टिळकांना मान्य होता त्यामुळेच त्यांनी गायकवाडवाड्याचा खरेदी व्यवहार निःशंक मनाने केला आपण गायकवाडांना देत असलेली किंमत ही पीनट प्राईस आहे ह्याची कसलीही बोच त्यांना न्हवती गायकवाडांनी आपल्या बाजूने काय किंमत लावायची हा त्यांचा प्रश्न आहे असा हा दावा होता
गायकवाडांनी हा घाट्याचा सौदा का केला कि टिळक काय आहेत हे न समजल्यामुळे हे झाले हे प्रश्न आजही बहुजन समाजापुढे आहेत टिळकांनी हा वाडा स्वस्तात खरेतर जवळ जवळ फुकटात पदरी पाडून घेतला हे मात्र खरं ! व्यवहार करण्याची ही स्टाईल पुढे मराठ्यांच्यात व नंतर बहुजनांच्यात बामणी कावा म्हणून प्रसिद्ध झाली .
टिळकांच्या बाबतीतला आणखी एक प्रश्न म्हणजे इंग्लिश लोकांच्या प्रोटेस्टंटवादाला पाहणारे टिळक स्वतःला ब्राम्हो समाज आर्य समाज सत्यशोधक समाज प्रार्थना समाज ह्यापैकी कोणत्याही प्रोटेस्टमध्ये का बसवू शकले नाहीत ? स्वामी दयानंदाविषयी त्यांना आदर होता तर त्यांचा नववैदिक धर्म त्यांनी का स्वीकारला नाही किंवा आर्य समाजाच्या सुधारणा त्यांनी का पत्करल्या नाहीत ? टिळक किमान आर्य समाजाइतके सुधारणावादी होते तर भारतीय समाजसुधारणांचा इतिहास बदलला असता टिळकांनी "जोपर्यंत समाजाची संपूर्ण मान्यता मिळत नाही तोवर समाज सुधारणेला मान्यता द्यायची नाही " हा जो मंत्र स्वीकारला तो नंतरच्या अनेक काँग्रेस पुढाऱ्यांचा गुरु मंत्र बनला परिणामी शाहबानो प्रकरणात काँग्रेसने शेण खाल्ले आणि भाजपचा रस्ता मोकळा झाला
प्रोटेस्टंट प्रबोधनाने ख्रिश्चन धर्माच्या केंद्रस्थानी असलेले चर्च व पोप हटवले व काळजातल्या पर्सनल ख्रिस्ताची स्थापना केली ज्याचा त्याचा ख्रिस्त अशा रीतीने पर्सनल झाला दुसरी गोष्ट ख्रिस्ताच्या जीवनशैलीच्या अनुकरणातून
१ रुग्णांना मदत करणे त्यासाठी हॉस्पिटल्स उघडणे
२ सर्वांना शिक्षण व शिकवण देणे
३ सर्वांची सेवा करणे व सर्वांच्याविषयी करुणा बाळगणे
४ मानवसेवा हीच ईश्वरसेवा मानणे
ही तत्वे विकसित झाली टिळकांना ह्या तत्वाचे आकर्षण का निर्माण झाले नाही महर्षी शिंदेंनी जेव्हा सर्व जातीजमातीसाठी देऊळ उभा करण्याचा संकल्प त्यांना सांगितला तेव्हा छोटे का मोठे मंदिर उभारा म्हणणारे टिळक आपल्या ब्राम्हण अनुयायांना मिशनरी बना असे का म्हणाले नाहीत ? कि ते ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजकडे धर्मांतराचे छुपे कारस्थान म्हणून बघत होते ?
श्रीधर तिळवे नाईक
लोकहितवादी, टिळक आणि कृष्णाची भूमिका १५

विवेकबुद्धी सर्वांच्याकडे असते म्हणून सर्वांना समान वागणूक म्हणूनच सर्व समान
विवेकबुद्धी कशी वापरायची हे सर्वांना कळत असते म्हणून सर्वांना स्वातंत्र्य
आणि सर्वच मानवात विवेकबुद्धी आहे म्हणून सर्व समान नागरिकत्व पत्करू शकतात म्हणून बंधुत्व
साहजिकच स्वातंत्र्य समता बंधुता ही त्रयी प्रतिष्ठित झाली आणि प्रबोधनाचा पाया झाली आणि सभ्यतेची कसोटीही झाली भारतात नेमका ह्यांचाच अभाव साहजिकच इंडियन ही इंफेरियर जमात असून तिच्यावर राज्य करण्याचा आणि तिला सभ्यता शिकवण्याचा आपणाला हक्क आहे ही ब्रिटिशांची धारणा बनली अर्थात सर्वच ब्रिटिश असे न्हवते काही अधिकारी प्रबोधनाच्या विरोधातही होते प्रबोधनाच्या विरोधात असणाऱ्या अधिकाऱ्यांचा महामेरू होता माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि टिळकांनी ज्याच्यावर स्तुतीसुमने उधळली असा एकमेव अधिकारी ! टिळकांनी नेमका प्रबोधनाच्या विरुद्ध असलेल्या एडमंड बर्कचा हा अनुयायी निवडावा हा काही योगायोग न्हवे कुठेतरी तार जुळत असावी एल्फिन्स्टन चित्पावनांना खूप वरच्या दर्जाचा व सर्वात बलवान जात समजे आणि साहजिकच तिला कमीतकमी दुखवायचे असे त्याचे धोरण असे त्याच्या ह्या आदराची फेड टिळकांनी आदर दाखवून केली पुढेही एकदा प्रबोधनकार ठाकरे त्यांना मदत मागायला आले तेव्हा त्यांनी तुम्ही क्षत्रिय आणि क्षत्रिय कधी मदत मागत नसतात ते स्वतःच मदत उभी करतात असे उद्गार काढले होते प्रश्न असा आहे कि मग टिळकांची मानसिकता ह्यावरून जातीयवादी ठरवता येईल का ?तर नाही टिळक हे एका अर्थाने देशीवादी आडवा अक्ष मानणारे होते आणि उभा अक्ष हळूहळू जाईल अशी त्यांना आशा होती किंबहुना गीतेत सांगितलेला कर्मयोग सर्वांनी कर्तव्य बुद्धीने पार पाडावा अशी त्यांची इच्छा होती कर्तव्य हा एका अर्थाने त्यांच्या तत्वज्ञानाचा चावीशब्द आहे ज्याने कुलपे उघडतात सद्यस्थितीत स्वराज्य मिळवणे हेच त्यांना कर्तव्य वाटत होते श्रुतिस्मृतिधर्मातील प्रत्येकाची सामाजिक स्थिती ज्याने त्याने बदलावी मी त्या फंदात पडणार नाही किंबहुना ते माझे कर्तव्य न्हवे असे त्यांचे म्हणणे असावे
राजकीय बाबतीत त्यांचे गुरु लोकहितवादी होते १४ ऑक्टो १८४९ च्या प्रभाकरमधील पत्रात जो स्वराज्य स्वदेशी आणि बहिष्काराचा मार्ग लोकहितवादींनी सांगितला तोच टिळकांनी राजकीय पातळीवर अंमलात आणला भारताला ब्रिटन घरगडी समजतं ह्या गृहीतकांनी सुरु होणारे हे पत्र आहे (पत्र क्र ६८ उद्योगप्रशंसा ) १३ ऑगस्ट १८४८ च्या पत्रात ते म्हणतात कि गीतेचा खरा उपदेश कर्मयोगाचा आहे त्यामुळेच लोकहितवादी कर्मयोगाच्या दृष्टीने गीता पाहतात माणसाने आपले कर्म करीत रहावे वैराग्य हा मूर्खपणा आहे हाच गीतेचा उपदेश आहे असे ते म्हणतात (पत्र क्र २६ वैराग्य )टिळकही गीतारहस्यात तेच पण विस्तृत प्रमाणात मांडतात
अॅलन ह्यूम व वेडरबर्न कॉटन आदी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय सभा काँग्रेस स्थापन केली कारण हिंदुस्थानात निर्माण होऊ पाहणारी राष्ट्रीय भावना ब्रिटिश राजनिष्ठेत बदलण्याचा सनदशीर मार्ग म्हणून त्यांना आवश्यक होती हा सगळा गाडा नेमस्त होते तोवर नीट चाललाही पण लोकमान्य टिळक आले आणि त्यांनी जहाल मार्ग निवडला आपला रोल सुरवातीच्या काळात शिष्टाई करणाऱ्या कृष्णाचा आहे असे त्यांना वाटत असावे ब्रिटिश दुर्योधनाला समजवावे आणि अर्जुनामार्फत उठाव करावेत असा हा प्लॅन होता
श्रीधर तिळवे नाईक
पहिले हिंदुहृदयसम्राट वा आद्यंहिंदुहृदयसम्राट लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती १६ श्रीधर तिळवे नाईक
४ ऑगस्ट १९२० च्या यंग इंडियात गांधीजींनी लिहिलं होतं ," मासेसवर आमच्या काळात टिळकांची जेवढी पकड होती तेव्हढी कुणाचीच न्हवती आणि स्वराज्याचा आग्रह इतका सातत्याने कुणीही लावून धरला न्हवता " टिळक हे निर्विवादपणे भारताचे पहिले मास लीडर होते त्यांना पाहायला लोक मोठ्या संख्येने येत. महात्मा गांधींचे राजकीय गुरु गोखले असले तरी मास हँडलिंगबाबत ते टिळकांना जवळचे होते पुढे आपला वारसदार म्हणून विनोबा भावेची निवड त्यांनी केली तरी जिला राष्ट्रीय लोकप्रियता म्हणावी अशी त्यांना मिळाली नाही ते क्रेडिट मराठी माणसात टिळकांचेच !
ज्यां मराठी माणसांना राष्ट्रीय नेते बनण्याची आकांक्षा आहे त्यांनी टिळकांचा एक राजकारणी म्हणून अभ्यास करणे आवश्यक आहे शिवाजी महाराज , पहिला बाजीराव , महादजी शिंदे , अहिल्याबाई होळकर आणि लोकमान्य टिळक हे राजकारणातील महाराष्ट्राचे भारतीय आयकॉन आहेत आणि त्यांना हे यश आपोआप मिळालेलं नाही (समाजकारणातील अर्थातच रानडे शाहू फुले आंबेडकर )आपल्याकडे प्रबोधन म्हणजे फक्त सामाजिक प्रबोधन असा एक मूर्ख प्रचार प्रचलित झालाय आणि तो रूढ करण्यात फुले आंबेडकरवादी लोकांचा फार मोठा वाटा आहे म्हणूनच शरद पवारांची जी टवाळी होते त्यातील ९० टक्के टवाळी महाराष्ट्र स्पॉन्सर करतो टिळकांच्यानंतर शरद पवार हा एकमेव नेता होता ज्याला राष्ट्रीय राजकारण काय आहे हे कळलं होतं दिलीप पाडगावकर नावाच्या मराठी पत्रकाराने भोचकपणा केला नसता तर बरेच काही बदलले असते असो सांगण्याचा मुद्दा असा कि टिळकांना सामाजिक पातळीवर अवश्य धुवावे पण त्यांच्या राजकारणाशी त्याची गल्लत करू नये मला तर स्वतःला असा संशय आहे कि टिळकांनी जाणीवपूर्वक आधीच्या रानडे गोखले ह्या सामाजिक नेतृत्वाला काँग्रेसमध्ये हरवण्यासाठी समाजसुधारणाविरोधी भूमिका घेऊन स्वतःला राजकारणाच्या केंद्रीय स्थानी आणले कारण त्यामुळेच टिळक विरुद्ध इतर सारे असे चित्र भारतात उभे राहिले आणि भारतीय लोकच मुळात कर्मठ असल्याने ते टिळकांच्या बाजूने उभे राहिले आणि नेमस्त बाजूला पडत गेले खरे तर पहिले हिंदुहृदयसम्राट हा 'किताब टिळकांना द्यायला हवा
टिळकांच्या ह्या प्रतिमेचा थेट परिणाम तपासायचा असेल तर नेहरूंचा डिस्कव्हरी ऑफ इंडिया वाचावा जवाहरलाल नेहरूंनी टिळकांचा उल्लेख सबंध पुस्तकात फक्त तीनवेळा केलाय एकदा भगवद्गीता आणि दोनदा जहालमवाळ वाद !नेहरूंचा मराठी लोकांविषयीचा पूर्वग्रह गृहीत धरूनही हे खटकते
मराठी लोकांना साईडलाईन करण्याचे हे राजकारण टिळकांचा प्रभाव पूर्ण ओसरल्याचे चिन्ह होते महाराष्ट्रातून राजकारण खेळायचे पण राष्ट्रीय मराठी नेतृत्व उभे राहू द्यायचे नाही ही खेळी काँग्रेसने पुढे सातत्याने खेळली खरी पण गप्प बसेल तो मराठी माणूस कसला ? त्याने हिंदुत्ववादाच्या रूपाने समांतर डिस्कोर्स निर्माण करायला सुरवात केली जो पुढे काँग्रेसलाच चॅलेंज करणार होता गांधींना ही खदखद ऐकू आली होती म्हणूनच त्यांनी आपला अध्यात्मिक वारसदार म्हणून विनोबा भावे व राज्यघटना तयार करण्यासाठी आंबेडकर ह्यांची निवड केली. पण काँग्रेसला महात्मा गांधी काय आहेत हे कळलंय कुठं त्यांना फक्त इंदिरा गांधी आणि त्यांचे वारसदार कळतात असो
टिळकांना ही लोकप्रियता लाभली कशी ? तर ते लोकांच्या आवाजात आणि लोकांना समजेल अशा भाषेत बोलत होते म्हणून !टिळक कायमच महाभारत शिवाजी महाराज आणि पुराणांचे दाखले देत बोलत .
टिळकांनी राजकारण म्हणजे काय ते फार सुदंर रीतीने सांगितले आहे ते म्हणतात , "श्रीकृष्ण शिष्टाईला जातो तेव्हा दोन्ही पक्ष स्वतःच्या सैन्याची उभारणी करतात ते राजकारण ब्रिटिश संख्येने कमी असूनही ते भारतीयांना आम्ही तुमच्यापेक्षा स्ट्रॉंग आहोत हे त्यांना पटवतात व त्यांच्या मनावर बिंबवतात ते राजकारण "
(page ५५ ते ६७BAL GANGADHAR TILAK speeches and writing publisher ganesh company Madras )
अफझलखानाला शिवाजी महाराजांनी मारले तो भले इंडियन पिनल कोड प्रमाणे अपराध असेल पण गीताधर्म सांगतो त्यानुसार ही कल्याणकारीच गोष्ट आहे तेव्हा इंडियन पिनल कोडच्या बाहेर येऊन गीताधर्माच्या वातावरणात शिरा असा ते उपदेश करतात
टिळकांना अर्जविनंत्या करून ब्रिटिश दाद देणार नाहीत ह्याची खात्री होती म्हणूनच त्यांना बहिष्कार बायकॉट हा योग्य वाटत होता ब्रिटिश मूठभर आहेत आणि आपण त्यांना हुसकावून लावू शकतो हे ते जाणून होते आपण संघटित होऊ नये एकमेकाला सहकार्य करू नये म्हणून ब्रिटिश प्रयत्न करतात असा त्यांचा तर्क होता त्यामुळेच ब्रिटिश जर ऐकत नसतील तर आपसातील मतभेद विसरून एकी करून त्याची चोहीबाजूने कोंडी करा त्यांच्या मालावर बायकॉट करा वेळ आली तर टॅक्स देऊ नका असे ते म्हणत
टिळकांचे हिंदू धर्माला सर्वात मोठे योगदान कुठले ?
ब्रिटिशांनी कोर्टात शपथ घेण्यासाठी हिंदू धर्माचा धर्मग्रंथ म्हणून भगवद्गीता अक्षरशः लादली पण त्याचा एक परिणाम असा झाला कि अचानक हिंदू धर्माच्या केंद्रस्थानी गीता आली . फक्त शपथ घेण्यासाठी आलेली ही गीता नेमकी काय आहे त्याचे अत्यंत तपशीलवार विवेचन प्रथम लोकमान्य टिळकांनी केले त्यांनी स्वतःच्या धर्माला गीताधर्म असे म्हंटले आहे आणि ह्या धर्मात वैदिकांचे कर्मकांड उपनिषदांचे ज्ञानकांड भागवद्धर्माचे भक्तिकाण्ड ह्यांचा उत्कृष्ट संगम कसा झाला आहे ते त्यांनी खोलात जाऊन सांगितले आहे जो ज्या स्थितीत आहे तिथून गीताधर्म पाळू शकतो असे त्यांचे म्हणणे मराठीत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून गीता केंद्रस्थानी आणली तशाच स्वरूपाचे काम टिळकांनी केले आहे टिळक फक्त इथेच थांबत नाहीत ते गीतेची तुलना बायबलशी करतात पुढे जाऊन तर येशू हा ज्यू धर्मातील एसिक ह्या कडक संन्यास पंथाचा अनुयायी होता असेही ते प्रतिपादन करतात
गीतेचा इतका सांगोपांग अभ्यास आद्यशंकराचार्यांच्यानंतर टिळकांनीच सादर केला आहे
गीतारहस्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे टिळक हा ग्रंथ लिहिता लिहिता जन्मानुसार वर्ण ह्या विचाराकडून कर्मानुसार वर्ण ह्या विचाराकडे शिफ्ट झालेले आहेत टिळक आणखी जगते तर कदाचित एक नवे टिळक आपणास पाहावयास मिळाले असते असे म्हणावयास नक्कीच जागा आहे
आद्य शंकराचार्यांनी प्रथम गीतेवर विस्तृत टीका लिहून तिला हिंदू धर्मात मुख्य धर्मग्रंथ म्हणून स्थान दिले ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत बृह्दटीका लिहून गीतेचे देशीकरण केले टिळकांनी त्यांच्याच तोडीचे काम श्रीमदभगवद्गीतारहस्य (प्रकाशन १९१५)लिहून केले
आज गीता हिंदू धर्माचा मुख्य ग्रंथ म्हणून पूर्णपणे प्रस्थापित झाला आहे आणि त्याचे श्रेय आद्य शंकराचार्य व ज्ञानेश्वर ह्यांच्यानंतर कुणाला जात असेल तर ते टिळकांना जाते म्हणूनच मी म्हंटले टिळकांना आद्यंहिंदुहृदयसम्राट म्हणावयास हवे
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती १७ श्रीधर तिळवे नाईक
प्रबोधनाने दोन संस्था केंद्रस्थानी आणल्या ज्ञान व राज्य ! ह्याचा एक परिणाम असा झाला कि बहुतेक युरोपियन विचारवंत धर्माचा विचारही ज्ञानाच्या चौकटीत करू लागले इमानुएल कान्टची तर सगळी हयात ख्रिश्चनिटीला ज्ञानाचा आधार कसा पुरवता येईल हे शोधण्यात गेली ख्रिश्चनिटी फक्त भक्तियोग मानत असल्याने ज्ञानयोगाची शक्यता तिच्यात नसल्याने त्याची झालेली गोची ही हास्यास्पद वाटते तो जर नकुलीशदर्शन काश्मिरी शैवागम सांख्य जैन बौद्ध ह्यातील एकही दर्शन नीट वाचतो तर ही गोची झालीच नसती पुढे किर्केगार्दच्या लक्ष्यात आले कि ख्रिश्चनिटीला असा ज्ञानात्मक तार्किक आधार पुरवतात येत नाही आणि मग त्याने एक अब्सर्ड लॉजिक पुरवले ते म्हणजे ईश्वर सिद्ध करता येत नाही म्हणून मी त्याच्यावर श्रद्धा ठेवतो
अलीकडे हिंदुत्ववाद्यांनी कान्ट आणि किर्केगार्द ह्यांचे तर्कशास्त्र अप्लाय करायला सुरवात केलीये त्यांना हे कुणीतरी सांगायला हवे कि हे ते ज्या भारतीय परंपरेची ग्वाही देतात त्यात हे बसत नाही खुद्द त्यांच्या वैचारिक आजोबांनी म्हणजे टिळकांनी हे केलेलं नाही त्यांनी कायमच आपली मांडणी तर्कशास्त्राच्या आधारे केली माझा ह्या हिंदुत्ववाद्यांना प्रश्न आहे तुम्ही ख्रिश्चन वा मुस्लिम आहात का ? श्रद्धेचे तर्कशास्त्र हा ख्रिश्चन लोकांचा विचार आहे तो तुम्ही हिंदू लोकांच्यावर का लादता आहात कि टिळक आणि सावरकर तुम्ही नीट वाचलेलेच नाहीत ?
जो प्रॉब्लेम किर्केगार्द व कांटपुढे होता तो भारतीय वातावरणात कधीच न्हवता त्यामुळेच टिळक ज्ञानाच्या आधारे आपला कर्मयोग सिद्ध करू शकले खुद्द श्रीकृष्ण अर्जुनापुढे अत्यंत तर्कशुद्ध युक्तिवाद करत आपली मांडणी करतो आहे आणि अर्जुन त्याच्या परमेश्वराला अजिबात न घाबरता प्रश्न विचारत आहे जर गीताधर्मात गीताधर्मानुसार जो परमेश्वर आहे त्या खुद्द परमेश्वरालाच प्रश्न विचारता येतात तर हिंदुत्ववादी कशाच्या आधारे प्रश्न विचारण्याची मनाई करत आहेत ?
टिळक ब्रिटिश लोकांना न घाबरता प्रश्न विचारत होते कारण ते गीताधर्म जाणत होते ज्ञानयोग जाणत होते . स्वराज्य मिळवायचे असेल तर प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे आणि जे जे स्वराज्याकरता करता येणे शक्य आहे ते ते करावे अशी त्यांची मांडणी झाली त्यामुळे अगदी सामान्य माणसांनाही आपली उपजीविका चालवत काँग्रेसचा कार्यकर्ता बनता येणे शक्य झाले टिळक शब्दाचे पक्के होते त्यामुळे ब्रिटिश प्रशासनात काम करणारे अनेक भारतीय अधिकारी त्यांना रात्री भेटायला येत हे लोक अनेकदा गुप्तहेरासारख्या टिळकांना बातम्या पुरवत कारण तुमचे नाव मी गुप्त ठेवेन असा टिळकांनी दिलेला शब्द ! संपूर्ण पोलीस चौकशीत कितीही दबाव टाकला तरी टिळकांनी कधीही ह्या अधिकाऱ्यांची नावे कधीही जाहीर केली नाहीत ह्यासाठी फार उच्च मनोबल लागते पोलिसांच्यापुढे टिकणे हे खायचे काम नाही पण टिळक ते सहज करत टिळक नॅशनल हिरो झाले त्याचे हे एक कारण होते ब्रिटिश शासनाने रँडच्या खुनात गुंतवून त्यांना जी शिक्षा दिली त्यामागे एक कारण हेच होते टिळकांच्या रात्रीच्या हालचाली संशयास्पद होत्या आजही टिळकांनी सशस्त्र क्रांतीकारकांना मदत केली कि नाही हे सांगणे कठीण बनलंय टिळकांना मिळालेल्या चिठ्ठ्या टिळक ताबडतोब नष्ट करत भर सभेत त्यांनी चिठ्ठ्या फाडलेल्या आहेत आणि ह्या चिठ्ठ्यांच्यात काय होते हे आजही गुलदस्त्यात आहे टिळकांचा कर्मयोग हा असा आहे शब्दांचा पक्का कृतीत स्पष्ट आणि काहीवेळा गुप्त कारवाया करणारा ! फळाची अपेक्षा तर टिळकांना कधीच न्हवती आपण आपले कर्तव्य पार पाडले कि झाले अशी त्यांची वृत्ती होती .
श्रीधर तिळवे नाईक
टिळक क्षत्रियांचे द्वेष्टे होते का ? लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती १८श्रीधर तिळवे नाईक
ब्राम्हणेतर चळवळीने जे काही टिळकांच्याविरुद्ध प्रचार केले त्यात टिळक हे समस्त क्षत्रियांचे शत्रू आहेत अशी एक टिळकांची प्रतिमा घडत गेली आहे
ही गोष्ट खरी आहे का ?
पहिली गोष्ट टिळक ज्या गीताधर्माचा पुरस्कार करतात तो गीताधर्म एक क्षत्रियांने सांगितला आहे हे आपण लक्ष्यात घेतले पाहिजे टिळक क्षत्रियद्वेष्टे असते तर त्यांनी क्षत्रियाने सांगितलेला धर्म का स्वीकारला असता ?
टिळकांच्या राजकारणाचे शिवाजी महाराज प्राण आहेत ते महाराजांचा प्रचार भारतभर करत होते सगळीकडे देशभर शिवजयंती व्हावी म्हणून ते जीवाचे रान करत होते जर शिवाजी क्षत्रिय असूनही ते त्यांचा प्रचार करत असतील तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे ते क्षत्रियांचे द्वेष्टे न्हवते
ज्यामुळे टिळकांना आगरकरांसोबत १०० दिवसांची जेल झाली त्या कोल्हापूरच्या शिवाजी प्रकरणातही त्यांनी महाराजांच्या बाजूने उडी मारली होती जर ते क्षत्रियद्वेष्टे असते तर त्यांनी अशी उडी मारलीच नसती
मग टिळकांची अशी प्रतिमा का झाली ?
तर त्याला कारण वेदोक्त प्रकरण ! हे एक असे प्रकरण आहे ज्यात विलक्षण गुंतागुंत आहे मुळात इतर संस्थानिक आहेत तसे शाहू महाराजही (व सयाजी महाराजही )आहेत हा एक टिळकांचा गैरसमज होता आणि तो व्हावा अशी परिस्थिती संस्थानिकांची होती हे आपण लक्ष्यात घ्यायला हवे खरेतर हे प्रकरण विझले असते पण राजाराम कॉलेजमधील एका विजापूरकर नावाच्या प्राध्यापकाने अक्षरशः चिथावणीखोरी करून ह्यात नको तेव्हढे तेल टाकले आणि मग कुणाचेच नियंत्रण उरले नाही टिळकांचा ह्या प्रकरणातला आग्रह फार वेगळा होता ते प्रायश्चित घ्या म्हणजे वेदोक्त अधिकार मिळेल असं सांगत होते पण पुण्याकडच्या काही ब्राम्हणांनी त्यांचे हे म्हणणे पोह्चवलेच नाही व बराच घोळ घातला मग कोल्हापूर विरुद्ध पुणे ह्या ताराबाई पासून सुरु असलेल्या संघर्षाला जणू पुनर्जीवन मिळाले
ह्याकाळात टिळक धार्मिक अधिकार ब्राह्मणांच्या हातातच रहायला हवेत ह्याविषयी आग्रही होते वेदोक्त प्रकरणावेळी टिळक जन्माप्रमाणे वर्ण मानत होते ही वस्तुस्थिती ! टिळक जर कोल्हापूरच्या ब्राम्हणांना भेटायला गेले नसते तर पुढचे महाभारत टळले असते एक गोष्ट मात्र नक्की ह्या प्रकरणी जे दोन्ही बाजुंनी राजकारण झाले त्यात शाहू महाराजांनी टिळकांना हरवले . राजपुरोहिताचे वतनावरून नाक दाबणे . ब्रिटिश एजंटांना आपल्या बाजूला वळवणे , घराण्याचा वेदोक्त इतिहास शोधून तो सादर करणे अशा एकामागून एक सरस चाली शाहू महाराज खेळत गेले महाराज जिंकले कारण त्यांची बाजू सत्याची होती टिळक हरले कारण ते असत्याकडून लढत होते .
थोडक्यात काय वेदोक्त प्रकरणात टिळक हे दोषी आहेत हे कबुल केलेच पाहिजे पण त्यावरून ते समस्त क्षत्रियांचे द्वेष्टे होते असे मात्र म्हणता येत नाही
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक ह्यांची ब्राम्हण ह्या शब्दाची व्याख्या
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती १९ श्रीधर तिळवे नाईक
आपण मागील दोन्ही प्रकरणात दादाभाई नौरोजींची चर्चा केली होती इथे थोडा गोषवरा टिळक कळावेत म्हणून पाहू
भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर सर्वाधिक प्रभाव पडलेली जागतिक घटना म्हणून अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध बघता येते ह्याच्या राजकीय बाजूवर चर्चा करतांना अनेकदा आर्थिक बाबीतली महत्वाची बाजू लक्ष्यात घेतली जात नाही ती म्हणजे जे अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध सुरवातीला ब्रिटिशांना लॉस वाटत होते ते नंतर फायद्याचे वाटू लागले स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षानंतर अमेरिकेचा इंग्लंडशी असलेला व्यापार कमी न होता वाढला होता आणि ह्याचे श्रेय लिबरल पक्ष आपण अमेरिकनांना सुशिक्षित बनवलं त्याला देत होते अमेरिकन नेटिव्ह आणि हिंदुस्तानातले नेटिव्ह हे फार वेगळे त्यांना वाटत न्हवते त्यामुळेच लॉर्ड मेकॉले १८३३ साली भारतीय जनतेचे इंग्रजीकरण करण्याचा प्रकल्प हातात घ्यायला हवा जेणेकरून हे प्रजानन सुशिक्षित होतील अशी मांडणी करतांना दिसतो . आपण एक गोष्ट लक्ष्यात घ्यायला हवी ती म्हणजे खुद्द राजाराम मोहन रॉय ह्यांनीही ह्या काळात आम्हाला देशी शिक्षण देऊ नका तर युरोपियन विज्ञाने शिकवा असा आग्रह धरलेला होता तेव्हा मेकॉलेची निंदा करतांना आपण हेही लक्षात ठेवायला हवे कि ही मागणी तत्कालीन खुद्द सुधारकांचीही होती आपले प्रॉडक्ट्स अडाणी जनता विकत घेऊच शकणार नाही हे युरोपियन कंपन्यांना लक्ष्यात यायला लागले होते कॉन्व्हेंट स्कूलचा प्रसार ह्यामुळे झाला धर्मप्रसार व व्यापारप्रसार हा कॉन्व्हेंटमागचा उद्देश होता आणि आत्ताही तो फारसा बदललेला नाही अपवाद त्यावेळीही होते आत्ताही आहेत
ह्यातूनच धर्मप्रसारक ,राज्यकर्ते अधिकारी व व्यापारी इंग्लिश लोकांना आपल्याला सुखी व संपन्न करायला आलेले देवदूत म्हणून बघणारे लोक निर्माण व्हायला लागले आणि ब्रिटिश राज्यनिष्ठही बनू लागले ह्यात एक गोची अशी होती जी कुणी लक्षातच घेतलेली नाही ती म्हणजे हे ब्राम्हण क्षत्रिय व वैश्य असे नवे वैदिक वर्ण होते जे कर्माप्रमाणे ठरत होते जन्माप्रमाणे नाही साहजिकच गीतेचा अर्थ लावतांना समोर कर्माप्रमाणे असले तीन ब्रिटिश वर्ण ऍक्टिव्ह होते त्यामुळे गीतेचा व वर्णांचा कर्माप्रमाणे वर्ण असा अर्थ लावणे सोयीचे गेले
पण एक गोचीही होती आलेल्या ब्रिटिश लोकात जवळजवळ कुणी शेतकरी किंवा ओबीसी न्हवतेच जे होते ते मळेवाले वा जमीनदार ! साहजिकच जमीनदार होण्यात वा मळेवाले होण्यात ब्राम्हणांना प्रतिष्ठा दिसू लागली अधिकारी होण्यात तर पूर्वीपासूनच प्रतिष्ठा होती आणि वतने तर होतीच शिवाय व्यापारी बनण्यात स्ववर्णाचा अपमान समजणाऱ्या ब्राम्हणांच्यात अचानक व्यापारी व उत्पादक होणे प्रतिष्ठेचे ठरू लागले टिळक शेअरमार्केटमध्ये उतरले हा काही योगायोग न्हवता मार्क्सवाद्यांचा ब्राम्हणांच्यावर प्रभाव पडेतोवर व्यापार व शेठ होणे ह्या गोष्टीं ब्राम्हणांना आकर्षक वाटत होत्या मला तर संशय आहे कि मार्क्सवादी ब्राम्हण हा आतूनच पुरोहित असतो ज्याला व्यापारी बनणे म्हणजे पतन वाटत असते आणि ज्याने मार्क्सवाद नावाच्या धर्मात धर्मांतर केलेले असते म्हणूनच भारतात मार्क्सवाद अक्षरशः पोथीनिष्ठ कर्मकांडाप्रमाणे राबवला गेला
ह्याचा एक दुष्परिणाम असा झाला कि शूद्रांची उरलीसुरली प्रतिष्ठा धुळीला मिळाली ब्रिटिश शूद्र नावाचा प्राणी बघायला न मिळाल्याने उच्चवर्णीयांच्या दृष्टीने तो अदृश्य झाला कारखान्यातून भांडी मिळू लागल्यावर कुंभार दिसणार कसा ? गरज फक्त मर्तिकाच्या वेळी तेही कारखान्यातील मडकी फुटत नाहीत म्हणून नाहीतर त्यावेळीही ती वापरली गेली असती
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाना शंकरशेठ , दादाभाई नौरोजी आणि न्यायमूर्ती रानडे हे भारताचे पहिले तीन राजकारणी उदयाला आले . ह्यात नाना ज्येष्ठ होते . दादाभाई पहिले असे राजकारणी होते ज्यांना इंग्लंड काय खेळ खेळतंय हे लक्ष्यात आलं होतं त्यानंतर गोपाळ कृष्ण गोखले , सुरेंद्रनाथ बॅनर्जी ,फिरोजशहा मेहता आदी दुसरी पिढी जन्माला आली
ह्या पार्श्वभूमीवर टिळक आले आपल्या ब्राम्हण जातीचा विचार करत ! मागेच त्यांनी वर्णांतर्गत आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला होता हे आपण पाहिले पण ह्यापेक्षा विचित्र होती त्यांची ब्राम्हण शब्दाची व्याख्या ही व्याख्या पुढीलप्रमाणे
"जातीचे कोणीही असोत स्वराज्याच्या लढ्यात शांततेने व स्वार्थत्यागाने लढणारे सर्व ब्राम्हण "
ही ब्राम्हण ह्या गोष्टीची मी वाचलेली सर्वात विचित्र व सर्वात राजकीय व्याख्या आहे टिळक हे किती स्वराज्यवेडे होते तेही ह्या व्याख्येवरून स्पष्ट व्हावे म्हणूनच मी म्हणालो कि अखेरीला टिळक बदलत होते एका अर्थाने हे आमिष होते तुम्ही जर स्वराज्यासाठी लढाल तर तुमच्या वर्णांचा अंत होऊन नव्या लोकशाही व्यवस्थेत सर्वच ब्राम्हण होतील असे टिळकांना सुचवायचे होते
टिळकांच्या ह्या व्याख्येचे मूळ कशात होते ? कुणात होते ? हे मूळ संत एकनाथांच्या ब्राम्हण ह्या शब्दाच्या व्याख्येत आहे एकनाथांनी जो जो वैष्णव आहे तो तो ब्राम्हण आहे अशी ब्राम्हण ह्या शब्दाची व्याख्या केली होती टिळकांनी भक्ती आणि वैष्णव काढून कर्म आणि स्वराज्यासाठी लढणे आणले जे टिळकांच्या पिंडाला साजेसे होते
टिळक कॉम्प्लिकेटेड होतात ते असे !
श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर तिळवे नाईक
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
घोड्यावर बसायचे ठीक आहे पण घोडा जाणार कुठे चिपळूणकरांचा घोडा व टिळक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती २१श्रीधर तिळवे नाईक
विशेष टीप :तुम्ही मोदींच्याविषयी काय विचार करता त्याच्या आधारे इतिहास रचला जाऊ शकत नाही किंवा तू अडचणीत असतांना हे लिखाण कोण करतंय नक्की तूच ना ? असा संशयही व्यक्त करून फायदा नाही मी मोदींच्या अर्थव्यवस्थेवर ६ व्याख्याने टाकली होती व ठाकरे , मुखर्जी व सावरकर ह्यांच्या हिंदुत्ववादावर ६ कारण ह्या देशात हिंदुत्ववाद सत्तेवर आहे आणि इथे त्यामागील त्याची पाळेमुळे मांडणे हे माझे मिशन आहे पण हे करतांना हिंदुत्ववादी म्हणजे कोणी मूर्ख हे गृहीतक मला मान्य नाही राहिली गोष्ट वेळेची तर अडचणीत असलो तरी आणि तिकडेच लक्ष्य असले तरी मागे सांगितलेलीच गोष्ट सांगतो मी २००५ ते २०१० हा कालखंड इतिहासाला दिला होता व शैव पॅरेडाईम्स अँड यूरोअमेरिकन पॅरेडाईम्स हा ग्रंथ सिद्ध केला होता तोच मी इथे संक्षिप्त करून इंग्रजीतला मजकूर मराठी करून मांडत असतो व मांडत आहे त्यामुळे ग्रंथ वा कागदपत्रे वाचन करण्याची मला गरज नसते जे सर्वात वेळखाऊ काम आहे त्यामुळे मी माझी कामे करून मगच हा लेखनप्रपंच करत असतो हिंदुत्ववादाची वैचारिक मीमांसा टाळून आणि काही मूर्ख भाजप कार्यकर्त्यांच्या वाचाळ कृतीच्या आधारे हिंदुत्ववादाचे मूल्यमापन करायचे ठरवले तर हिंदुत्ववाद कधीही कळणे व हरणे शक्य नाही हिंदुत्ववादातलं सर्वच चुकीचं हेही मला मान्य नाही मी खरं खोटं पाहतो उगाच फिक्शनच्या आहारी जाण्याची माझी तयारी नसते माझा इतिहास हा खुद्द हिंदुत्ववाद्यांच्याही पचनी पडत नाही पण जर चिपळूणकर हिंदुत्व हा शब्द वापरत असतील तर त्याकडे आपण लक्ष्य देणार आहोत कि नाही ? मी टिळकांना आद्यहिंदुहृदयसम्राट म्हणतो म्हणून काही जणांना मिरच्या झोंबल्या आहेत त्यांना असे वाटते कि मी हे करून काँग्रेसला अडचणीत आणत आहे वस्तुस्थिती अशी आहे टिळक आपल्या अडचणीचे आहेत हे काँग्रेसने फार पूर्वीच ओळखले होते त्यामुळेच महाराष्ट्र सदनात सर्वांचे पुतळे होते पण टिळकांचा न्हवता तो देवेंद्र फडणवीसांनी बसवला हा काही योगायोग न्हवे हा इतिहासगत न्याय आहे दुसरी गोष्ट आपण आता एकविसाव्या शतकात आलो आहोत बहुजन समाजातील राजवटीचे काय झाले ते आपण डोळ्यांनी पहात आहोत १९६० पासून भारतात बहुजनांची सत्ता होती ती जवळ जवळ २०१४ पर्यंत आता वेळ आलीये हिशेब तपासण्याची खरोखर काय साधले हे आता आपण बघायला नको काय ? ब्राम्हणांनी काय केलं ह्याची झाडाझडती घेतांना बहुजन समाजानेही काय केले ह्याचीही झाडाझडती घ्यायला नको काय ? हिंदुत्ववाद्यांचे वेद पूजनीय तसे बहुजनांचे फुले आंबेडकरांचे ग्रंथ आपण वेद बनवणार आहोत काय फुल्यांच्या मर्यादा आंबेडकरांच्या मर्यादा आपण तपासणार आहोत कि नाही कि बहुजनसमाजही ह्यांच्या लेखनाचे रूपांतर वेदात करणार आहे ?
------------------------------------------------------------------------------------------------------------------
मागील प्रकरणात आपण विष्णुशास्त्री चिपळूणकर व टिळक व हिंदुत्व ह्यांची लिंक मांडली प्रश्न असा आहे कि टिळकांनी चिपळूणकरांच्याकडून नेमके काय घेतले ? त्यासाठी चिपळूणकरांचा दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक आहे
१८५७ च्या सरंजामवादी स्वातंत्र्ययुद्धामुळे भारतातील राजकीय परिस्थिती बदलली
१८५७ च्या युद्धाला घाबरून काढलेल्या राणीच्या जाहीरनाम्याला मॅग्ना चार्ट समजून रानडेंचे राजकारण सुरु झाले जे चिपळूणकरांना अमान्य होते चिपळूणकरांचा प्रॉब्लेम हा होता कि ते रोग सांगत होते पण उपचार सांगत न्हवते आमच्या देशाची सद्यस्थिती ह्या निबंधात त्यांनी त्याचे समर्थनही केले होते त्यांनी ह्या निबंधात
१ आमच्या राज्यकर्त्यांची स्थिती
२ एत्तद्देशीय राजवाड्यांची स्थिती
३ सामान्य लोकांची स्थिती
अश्या तीन स्थित्यांची मांडणी केली होती इंग्लंडमध्ये ग्लॅडस्टन पंतप्रधानपदी आल्याने काही बदल व्हावेत ह्या आशेने हा निबंध लिहिला आहे ह्या निबंधावर पुढे ब्रिटिश सरकारने बंदी घातली जी १९०८ नंतर काँग्रेस सरकारने उठवली कारण त्याकाळी चिपळूणकर टिळकांचे गुरु होते हे काँग्रेसला माहीत होते
फारुखसियर बादशहाला डॉकटर मिल्टनने कसे बरे केले आणि पदरी मद्रासमधील तीन गावे जमीन कशी पाडून घेतली व कलकत्त्यात ३७ गावे खरेदी करण्याची परवानगी कशी मिळवली जिथे पुढे वखारी झाल्या इथून सुरवात करून चिपळूणकर इतिहास मांडत जातात यूरोपियनांची विद्या त्यांना हवीच आहे पण राज्य नको आहे ग्रीक रोमन विद्येमुळे जसे युरोपचे चैतन्य त्यांना प्राप्त झाले तसेच संस्कृतविद्येमुळे होईल असे त्यांना वाटत होते इंग्रजांच्याकडे ते एक जात म्हणून पाहत होते आर्यांनाही ते एक जात म्हणून पहात होते हे इंटरेस्टिंग आहे कि एकीकडे चिपळूणकर राजवाडे आर्यवादी तर दुसरीकडे फुले अनार्यवादी ! मात्र फुले जसे दंतकथात इतिहास शोधत होते तसे चिपळूणकरांचे न्हवते ते पुराण रामायण महाभारत ह्यांच्यातील कथांना काल्पनिक मानत होते हे लक्ष्यात घेण्यासारखे आहे ह्या काल्पनिक गोष्टी यंत्रविद्येमुळे आता प्रत्यक्ष येत आहेत असे ते मानत होते असे दिसते त्यांच्याच शब्दात सांगायचे तर पूर्वी खरा देव बाजूला पडून खोटे देव माजले होते इंग्रजांच्या आगमनामुळे लोक खऱ्या देवाकडे वळण्याची जास्त शक्यता आहे असे त्यांना वाटे इंग्रज लोक अंतर्ज्ञान पावले तर रेल्वे इंजिन तयार करणाराही किंवा तारायंत्र जुळवणाराही ह्या देशात मिळेल कि नाही ह्याची त्यांना शंका आहे
चिपळूणकर म्हणतातच कि कुठल्याही स्वदेशी राजापेक्षा अधिक स्वातंत्र्य इंग्लिश राजवटीत आहे कारण प्रत्येकजण आपला विचार मांडू शकतो जे पूर्वी अशक्य होते राजे लोकांची ते खिल्लीच उडवतात बुद्धिबळात जेव्हढे सैन्य तेवढेच आणि तसेच ह्यांचे सैन्य असे ते वर्णन करतात हे लोक आत्ताच्या सरकारच्या मुठीत आहेत त्यामुळे ह्यांच्याकडून त्यांच्या अपेक्षाच नाहीत समस्त प्रजा इंग्रजांची बैल बनली आहे आणि इंग्रजांच्या कायद्याप्रमाणे सर्व मुल्क सर्व झाडे इंग्रजांचीच आहेत
इंग्रज काही संत न्हवते किंवा भारतीय जनतेचे भले करण्याचा कोणताही ध्यास त्यांना न्हवता लुटायला आलेल्या दरोडेखारांच्यासारखेच ते होते ह्याची जाणीव ते वारंवार करून देतात इंग्रज भारतीयांच्या व हिंदुस्तानच्या लोककल्याणासाठी आलेत आणि असे लोककल्याण झाले कि ते निघून जाणार ही दंतकथा ते वेगवेगळ्या तर्काने नामशेष करतात फुले इंग्रजी राजवटीकडे देवाचा कृपाप्रसाद म्हणून पहात होते तिला तसे समजत होते तसे चिपळूणकर समजत नाहीत
जर का इंग्रज आले नसते तर मराठ्यांनी संपूर्ण देशच निर्यवन केला असता असा दावा ते करतात आम्ही त्या स्थितीत आलो होतो पण इंग्रजांनी फाटाफुटीचे व भाऊबंदकीचे राजकारण करून मराठ्यांचे मिशन थांबवले असे ते दर्शवू पाहतात डबक्यातल्या बेडकांना जसा देवाने राजा म्हणून ओंडका पाठवून दिला तसे इंग्रज आहेत असे ते म्हणतात
इंग्रजच्याशिवाय आमचे काय पूर्वी चालत न्हवते काय असा प्रश्न ते विचारतात त्यामुळेच आम्ही स्वातंत्र्याला लायकच नाही आहोत व पारतंत्र्यातच आमचे कल्याण आहे हीत आहे ही तत्कालीन दोन्ही मते ते नाकारतात पुढची दिशा ठरवता येत नाही त्यामुळे पुढे काय हे सांगणे कठीण आहे . आधी घोड्यावर तरी बसा असा त्यांचा आग्रह आहे आणि जे बसणार नाहीत त्यांना ते रडतराउ म्हणतात
आज आपण हे सर्व नीट वाचले कि स्पष्ट दिसते कि ते रोग दाखवतात आणि उपचार गुप्त ठेवतात कारण उपचार पेशवाई आणणे हाच आहे नाहीतर मग वर्णाश्रमधर्माची इतकी तरफदारी का ? चिपळूणकर म्हणतात कि कायदे होते पण काय लायकीचे कायदे होते ह्याची ते चर्चा करत नाही एक प्रकारची गंडवागंडवी ह्यात दिसते आणि फुल्यांसारखे लोक ह्याला फसले नाहीत ते बरेच झाले असे वाटते तुम्ही जेव्हा इतिहासातून एखादी विचारप्रणाली उभी करू पाहता तेव्हा इतिहासातील काय तुम्ही स्वीकारता आणि काय नाकारता हे तर तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता आणि जर आर्यावर्त आणि वर्णाश्रम तुम्ही स्वीकारता असे म्हणता तर त्याचा अर्थ स्पष्टच असतो कि तुम्ही वर्णजातिव्यवस्था आणणार मग एव्हढी तुमची विदवत्ता काय चाटायची आहे ? तुम्ही जर समतांच स्वीकारत नसाल तर स्वातंत्र्य काय कामाचे ? तुम्ही बंधुता मानत नसाल तर मग तुमच्या धर्माची लायकी काय ? तुम्ही उत्तरपेशवाईतील अस्पृश्यतेविषयी एक शब्द बोलत नाही ह्याचा अर्थ तुम्हाला ती नष्ट करायचीच नाहीये असाच होत नाही काय ?
टिळकांच्यावर चिपळूणकरांच्यावर पडलेला सर्वात पॉझिटिव्ह परिणाम म्हणजे ज्यावेळी लोक आपली स्वातंत्र्य व्हायची लायकीच नाही म्हणत होते त्यावेळी टिळक ठामपणे आपली स्वराज्याची लायकी आहे असे म्हणत आले हम भी कुछ कम नहीं ही जाणीव पसरवण्यात टिळकांचा जेव्हढा हात आहे त्या हाताला इतिहासप्रधान मीमांसेचा आधार आहे आणि तो चिपळूणकरांच्यापासून सुरु होतो जेव्हा वर्तमानात अंधार असतो तेव्हा इतिहासातच दिवे शोधावे लागतात चिपळूणकरांनी असे दिवे शोधण्याची जी परंपरा सुरु केली ती टिळकांनी कंटिन्यू केली आहे
मात्र कुठे जाणार ह्याबाबत टिळकांचे सगळे राजकारण १९१४ पर्यंत चिपळूणकरी पद्धतीने चाललेले दिसते मात्र एक फरक आहे टिळकांना राजकीय कृती काय करायची हे नीट माहित होते म्हणजे युद्धात लढायचे कसे हे त्यांना माहीत होते पण स्वराज्याचा घोडा कुठे जाणार हे तेही सांगत न्हवते मंडाले मधून बाहेर आल्यावर त्यांच्या बऱ्याच भूमिका बदलायला लागल्या कर्माप्रमाणे वर्ण ही तर ठाम भूमिका होत गेली म्हणून त्यांचे बाकी सगळे ब्राम्हण सहकारी काँग्रेसवासीय विरोध करत असतांना गांधींना त्यांनी प्रवेश दिला पाहिजे अशी भूमिका घेतली आणि गांधींनी घेतलेल्या कार्यक्रमाला मीही हेच केले असते म्हणत पाठिंबाच दिला म्हातारपणी तत्वज्ञ अधिक आधुनिक होत जातात तर विचारवंत कर्मठ ! भारतात हे टिळक , गांधी , आंबेडकर ह्या तिघांच्याबाबतीतही घडलेले दिसते पण आश्चर्याची गोष्ट अशी कि त्यांच्या अनुयायांना व विरोधकांना हे बदल मानवलेले दिसत नाहीत दोघांनाही ह्या नेत्यांच्या कर्मठ चेहऱ्यात इंटरेस्ट आहे कारण त्यातच ह्यांचे राजकीय व सामाजिक फायद्याचे हितसंबंध गुंतलेले आहेत
श्रीधर तिळवे नाईक
टिळक आणि काँग्रेसचे अध्यक्षपद
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती २२ श्रीधर तिळवे नाईक
भारतीय राजकारणात एक उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग टाईपची लीडरशिप असते दुसरी एक लीडरशिप असते ह्या जन्मात नाहीतर पुढील जन्मात मोक्ष मिळवू अशी लांबणीखोर आणि तिसरी जिला आज स्पिरिट म्हंटले जाते जिला मी बधिरता म्हणतो ती जी १८५० नंतर चिकट म्हणून उदयाला आली होती ती ! ह्या जमातीचा ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर विश्वास होता
ब्रिटिशही असे दूर्लक्ष्यखोर कि त्यांनी कायदे करायचे पण अंमलबजावणी करायची नाही असा एक महामंत्र शोधून काढला जो आजही भारतीय शासनव्यवस्थेचा महामंत्र आहे साहजिकच १८३३ ला बनवलेल्या कायद्यानुसार ज्या जागा भारतीयांना प्रशासनात द्यायला हव्या होत्या त्यातील एकही जागा १८५३ पर्यंत भरली गेली नाही तरीही रानडे व दादाभाई नौरोजी ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर विश्वास ठेवून होते दादाभाईंच्या शब्दात ह्या काळात मौन पाळले तर इंग्रज राजवटीबाबत तुम्ही समाधानी आणि आवाज उठवलात तर देशद्रोही अशी भारतीयांची अवस्था होती
जगात फक्त कधीच वर्गसंघर्ष वा वर्णसंघर्ष वा जमातसंघर्ष वा लिंगसंघर्ष वा जातसंघर्ष असत नाही ह्यांच्या बरोबरीने एक राष्ट्रसंघर्ष व राज्यसंघर्षही अस्तित्वात असतो विशेषतः जेव्हा एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला दास बनवते तेव्हा तर हा संघर्ष टोकाला पोहचलेला असतो हा संघर्ष फक्त राजकीय रहात नाही तर तो हळूहळू धार्मिक , आर्थिक सांस्कृतिक होत जातो आणि पराजितांना धार्मिक , आर्थिक , राजकीय ,सामाजिक आणि सांस्कृतिक न्यूनगंड देत जातो भारतीय ह्या काळात अशा न्यूनगंडात सापडलेले दिसतात प्रथम मुस्लिमांनी हे न्यूनगंड दिले जे शीख मराठा आणि लिंगायतांनी झुगारले मग ब्रिटिशांनी दिले आणि त्यांना प्रथम चिपळूणकरांनी झुगारले पण चिपळूकर अपवाद होते एरव्ही सगळीकडे ब्रिटिशांशी सलोखा ठेऊन हक्क मागून घ्यायची वृत्ती होती कारण भारत १८५७ ला वाईट तऱ्हेने हरला होता फक्त चिपळूणकरच होते जे ह्या पराभवातले छोटे छोटे जयाचे तुकडे दाखवून विजयी होऊ शकतो असं दाखवत होते
ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा राष्ट्रीय सभा काँग्रेस स्थापन झाली तेव्हा ती एक मोजक्या मवाळ लोकांची चळवळ होती जिला कायद्याची अंमलबजावणी हवी होती आणि राज्यकारभारात वाढीव सहभाग हवा होता हे लोक इंग्रज आणि हिंदवी ह्यांच्यात सख्य घडेल अशी आशा बाळगून होते कारण मुस्लिमांच्याबाबतीत हे पूर्वी घडले होते ह्या लोकांच्या लक्ष्यात एक गोष्ट येत न्हवती ती म्हणजे मुस्लिमांना दळणवळणाच्या त्या सोयी प्राप्त झाल्या न्हवत्या ज्या इंग्रजांना प्राप्त झाल्या न्हवत्या मुस्लिमांना घोड्यावर बसून पुन्हा माघारी जाणे परवडणारे न्हवते आणि मुळात अनेकांना माघारी फारसे काही न्हवतेच ज्यांना होते ते तैमुरलींग गझनी सारखे निघूनही गेले इंग्रजांना मात्र भारतापेक्षा अधिक संपन्न असा देश उपलब्ध होता आणि दळणवळणाच्या सोयीही ! त्यामुळे ह्या दोन वेगळ्या केसेस होत्या आणि हेच सख्ख्यवाद्यांच्या लक्ष्यात येत न्हवते आगरकरांनी तर अधिकारी -अनाधिकारी कांचन -निष्कांचन स्वतंत्र व परतंत्र ह्यांच्यात मैत्री होऊच शकत नाही असे प्रतिपादन केले होते शेवटी भारतातच दोन राष्ट्रे निर्माण झाली होती ब्रिटिश इंडिया आणि इंडियन भारत आणि ह्या दोन्हीत संघर्ष अटळ होता मुख्य म्हणजे शेतकऱ्यांची दैना आणि भारतीय व्यापाराची वाताहत दोघांना एकत्र आल्याशिवाय थांबणार नाही ह्याची जाणीव व्हायला लागली होती स्वतःतले वर्णसंघर्ष व जातिसंघर्ष बाजूला ठेऊन राष्ट्रसंघर्ष करावा असे काहीजणांना वाटत होते वासुदेव फडक्यांच्या बंडात काही रामोशी सामील झाले होते
शेवटी जेव्हा १८५७ ते १८७५ -८० ह्या राणीच्या अठरा -तेवीस वर्षाच्या कालखंडात काहीच घडलं नाही तेव्हा चिपळूणकर आगरकर आणि टिळक ह्या तिघांच्याही लक्ष्यात आलं कि संघर्ष अटळ आहे आणि त्याची सुरवात स्वराज्यानेच होऊ शकते राजकीय हक्क कोणी भीक म्हणून घालत नाही त्यासाठी चळवळ उभी करावी लागते हे ह्यांना उमगले होते त्यासाठी वेळप्रसंगी तुरुंगात जाण्याची ह्या दोघांची तयारी होती प्रश्न होता कायदेशीर चौकटीत चळवळ कशी उभी करायची त्याचे उत्तर लोकहितवादींनी दिले होते आणि दादाभाई नौरिजींनी कन्फर्म केले होते ते होते बहिष्कार
टिळकांनी ह्यासाठी लोकांना शिक्षण देण्यासाठी शिक्षणसंस्था मग केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे आणि पुढे लॉचे क्लासेस काढले पण राजकीय जागृतीसाठी ह्यापेक्षा काहीतरी अधिक हवे होते आणि त्यावेळीच काँग्रेस स्थापन झाली ह्या तिघांतील चिपळूणकरांचे निधन झाले पण नंतर टिळक आगरकर दोघेही काँग्रेसवर बारकाईने नजर ठेऊन होते
डोंगरीच्या तुरुंगात असतांना हे दोघेही तुरुंगात आता येणे कसे टाळावे आणि अशा कोणत्या अपरिहार्य गोष्टी आहेत कि ज्यामुळे तुरुंग मिळाला तरी चालेल ह्यावर चर्चा करत होते
सरकार ही संस्थाच अशी आहे कि ती तुम्हाला स्वर्ग देऊ शकत नाही पण नरक मात्र निश्चितच निर्माण करू शकते ब्रिटिश सरकार ह्याला अपवाद न्हवते ह्या सरकारविरुद्ध वासुदेव बळवंत फडके ह्यांनी केलेलं बंड फसले होते आणि दुसरीकडे राष्ट्रीय सभा होती ह्या दोन्हीचा समतोल काढणे आवश्यक होतं .
ह्या वर्षात काँग्रेसमध्ये काय चालले होते?
काँग्रेस ही आर्टिफिशियल पीस अँड स्टॅबिलिटी मेकर म्हणून ह्यूमनें जन्माला घातली होती हे आपण पाहिले आहेच आणि ब्रिटिश ऑफिसर्संनी ती जन्माला घातली होती म्हणूनच सरकारने ती बंद पाडली न्हवती हेही खरं होतं . काँग्रेसचे १८८५ ते १८९० ह्या कालखंडातले अध्यक्ष त्यामुळे गैरहिंदू होते तीन ख्रिश्चन दोन पारशी व एक मुस्लिम सातवे अध्यक्ष होते दक्षिण भारतीय रायबहादूर आनंद चारळु ! मुंबईतल्या ह्या राष्ट्रीय संघटनेत मराठी माणसाला अध्यक्षपद मिळाले ते तब्बल २० वर्षानंतर १९०५ साली कारण तो सर्वाधिक ह्या पदासाठी लायक होता त्याचे नाव बॅरिस्टर गोखले त्यांना टाळता येणे शक्यच न्हवते न्यायमूर्ती रानडेंना त्यांच्या हयातीत अध्यक्षपद मिळालेच नाही रघुनाथ मुधोळकर ह्यांना एकदा ते १९१२ साली मिळाले त्यानंतर मराठी माणसाला तब्बल २०१९ पर्यंत ते मिळालेले नाही म्हणजे १०० हुन अधिक वर्षे काँग्रेसने मराठी माणसाला अध्यक्षपद दिलेले नाही आश्चर्य म्हणजे लोकमान्य टिळकांना कधीही काँग्रेसचे अध्यक्षपद एकदाही मिळालेले नाही काँग्रेस नेहमी सांगते कि गांधी हत्येमुळे हे घडले पण त्याआधीही काँग्रेस मराठी माणसांच्याबाबतीत नालायकगिरी करतच होती लोकमान्य टिळकांना काँग्रेसने कधीही आपला नेता म्हणून मनापासून मान्यता दिलेली नाही तरीही टिळकांनी टिळकयुग निर्माण केले आणि काँग्रेसने केवळ स्वतःचा फैलाव व्हावा म्हणून टिळकांना वापरले टिळकांना हा अंतर्गत विरोध माहित असूनही त्यांनी स्वराज्याचा लढा चालूच ठेवला एका अर्थाने टिळक हे बाहेरूनच आउटसायडर म्हणूनच काम करत होते
ह्याची कारणे काय होती ?
श्रीधर तिळवे नाईक
काँग्रेसच्या आऊट सायडर कंट्रोलचे पायोनियर : लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग २३ श्रीधर तिळवे नाईक
मागील भागात लोकमान्यांना काँग्रेसने एकदाही अध्यक्षपद दिले नाही हे आपण पाहिले तरीही लोकमान्यांनी कधीही काँग्रेस सोडली नाही ह्यामागे काय कारण होते ?
काँग्रेस कशीही असली तरी तिच्यामागे प्रशासकीय अधिकारी होते त्यामुळे टिळकांना मते मांडण्यासाठी आवश्यक असलेला फ्लॅटफॉर्म पुरवत होती साहजिकच पुन्हा नवीन संस्था काढून त्यात वेळ खर्च करणे टिळकांच्या गणितात बसले नाही
दुसरी गोष्ट मुळात काँग्रेसची स्थापना हीच आऊटसायडर ब्रिटिश ऑफिसर्स लोकांनी केली होती टिळकांनी ह्यूमचे नेतृत्व रिप्लेस करून स्वतःचे नेतृत्व पुढे आणले गोखले ह्या काळात
काँग्रे स
गीतेतील योनीव्यवस्था आणि टिळक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग २४ श्रीधर तिळवे नाईक
मागील भागात आपण पाहिले कि भगवान श्रीकृष्णांनी योनिविचार कसा मांडला ?
वैदिकांनी आडवी कर्मकेंद्री वर्णव्यवस्था मांडली तर ब्राम्हण धर्माने उभी जन्मवादी वर्णव्यवस्था ह्या दोन्हींना छेद देत श्रीकृष्णांनी दिलेली योनिव्यावस्था वैष्णवांनी स्वीकारली ही योनीव्यवस्था काय होती ?
वैष्णवांनी जी योनीव्यवस्था मांडली ती जन्मवादी आणि कर्मवादी ह्यांचे त्रांगडे होती म्हणजे जन्म झाला तो योनीनुसार पण ह्या जन्मी पुण्यकर्म केले तर पुढच्या जन्मी पुण्ययोनी मिळणार असा हा सिद्धांत होता ह्या योनीव्यवस्थेत कर्माचे फळ मिळणार पण ते पुढील जन्मात मात्र ह्या जन्मात तुमचा वर्ण जन्मानुसार असणार होता त्यामुळेच व्रतवैकल्य यज्ञ उपासतापास पूजा अर्चना दान पान करून पुढील जन्मात पुण्ययोनी प्राप्त करण्याची सोय होती त्यामुळे साहजिकच पुढील जन्मात पुण्ययोनी प्राप्त करण्याच्या व पुण्य संपादन करण्याच्या कामात वैश्य व शूद्र गुंतून पडले आणि ह्यातून मिळणाऱ्या दक्षिणेवर ब्राम्हण गब्बर झाले ह्या योनिव्यावस्थेमुळेच कर्ण ह्या जन्मानुसार सूतपुत्र होता व कुंतीने रहस्य सांगितल्यावर ताबडतोब ह्या जन्मी क्षत्रिय ठरून राज्य करायला लायक झाला
वैष्णव संतांचे तर्कशास्त्रही ह्या योनिव्यावस्थेनुसार चालते मात्र मोक्ष मात्र जर तुम्ही विष्णू राम कृष्ण ह्यांना किंवा ह्यांच्या अवतारांना शरण गेलात कि मिळतो कारण तशी गॅरंटी खुद्द भगवान कृष्णांनी भगवद्गीतेत दिलेली आहे
जिच्या आधारे वारकरी चळवळ उभी होती व आहे म्हणजे ह्या जन्मात वर्ण जन्मानुसार व पुढील जन्मात वर्ण कर्मानुसार मात्र मोक्ष तुमच्या भक्तीनुसार वा साधनेनुसार अशी ही व्यवस्था आहे ती आपल्याकडच्या विचारवंतांना कधीच कळली नाही हे दुर्देव ! म्हणूनच पुन्हा एकदा तिची चर्चा केली असो
ब्रिटिशांच्या आगमनानंतर ब्राम्हणांचा हा पुण्ययोनी व पुण्य कमावून देण्याचा उद्योग घसरणीला लागला कारण क्षत्रिय मांडलिक झाले तर पापयोनीतले वैश्य बुडाले तर शूद्र देशोधडीला लागले तर अयोनिज अंत्यजांना ब्रिटिश सत्तेने अचानक शिक्षण व फौजेची दारे खुली केली
आता योनीव्यवस्थेवर उपजीविका चालणे अशक्य होते ब्राम्हणांनी पर्याय शोधायला सुरवात केली कारण ब्रिटिशांनी ब्राम्हणांची राज्ये व वतने हिसकावून घ्यायला सुरवात केली तर जे दक्षिणेवर अवलंबून होते असे ब्राम्हण कायमस्वरूपी दरिद्रीनारायण झाले साहजिकच ह्या दोन्ही प्रकारच्या ब्राम्हणांनी पर्याय शोधणे सुरु केले ह्यातील एक पर्याय बहुजन शैव पुजाऱ्यांना हाकलून देऊन शैवांची श्रीमंत देवस्थाने बळकावणे हा होता जो मुस्लिम काळात अतिशय प्रभावीपणे अंमलात आणला गेला होता आणि ब्रिटिश पोर्तुगीज काळात ज्याची व्याप्ती वाढवणे सुरु झाले दुसरा पर्याय ब्रिटिश शासनात नोकऱ्या शोधणे हा होता आणि काँग्रेसची पहिली मागणी शासकीय नोकऱ्या एतद्देशीयांना म्हणजे त्याकाळात अधिकतर ब्राम्हणांना खुल्या व्हाव्यात अशी होती शासन विशेषतः न्याय खाते तिसरा पर्याय स्वतःच्या शिक्षणसंस्था , प्रकाशनसंस्था , मीडियासंस्था सुरु करणे हा होता तर चौथा वैदिक धर्म अधिकाधिक सुधारून व व्यापक बनवून सर्वांसाठी खुला करून पौराहित्य व्यापक बनवून उत्पन्न कमावणे हा होता आणि पाचवा वैश्यिकरण स्वीकारून वैश्य होत डीकास्ट होत व्यापार करणे हा होता (ह्या पर्यायाची सुरवात रविंद्रनाथ टागोरांच्या आजोबांनी केली होती )
नेमकी ह्याचवेळी लॉर्ड डफरिनसारखी व्यक्ती भारतात आली होती जिला भारतीयांना राजकीय पातळीवर जाणून घेण्यात रस होता त्यामुळेच ऍलन ह्यूमनें जेव्हा सामाजिक संस्था म्हणून काँग्रेससारखी संघटना काढण्याची योजना डफरीनपुढे चर्चेला घेतली तेव्हा डफरीनने तिला सामाजिक बरोबर राजकीय करण्याच्याही सूचना केली जी ह्यूमनें स्वीकारली व २८ डिसेम्बर १९८५ ला काँग्रेस स्थापन झाली
परिणामी ब्राम्हणी प्रबोधनाची व सुरवातीच्या काँग्रेसची आख्खी चळवळ ह्या पाच पर्यायात व ब्रिटिश चौकटीत घुटमळत होती
टिळकही ह्या योनिव्यावस्थेत व पाच पर्यायात कैद होते पण त्यांनी शासकीय नोकरीचा पर्याय शोधला नाही आणि इथेच त्यांचे व आगरकरांचे वेगळेपण दिसते महात्मा फुलेंनी ब्रिटिश सत्तेकडून गुणवत्तेच्या जीवावर बांधकामाची काँट्रॅक्टस मिळवली व भक्कम बांधकामे करून दाखवली टिळकांनी हाही पर्याय नाकारला आहे
टिळकांना शासकीय नोकरी किंवा कॉन्ट्रॅक्ट न्हवे तर शासनच आपल्या ताब्यात हवे होते त्यामुळेच त्यांनी स्वशासित शाळा व महाविद्यालये सुरु केली व शासकीय अनुदान नाकारले
टिळकांची स्वशासनावरची निष्ठा सुरवातीपासूनच दिसते आणि ह्याबाबत कथनी आणि करणी ह्यात अंतर दिसत नाही त्यातूनच ब्राम्हणांना पुढे सहावा पर्याय खुला झाला तो म्हणजे पेशव्यांच्याप्रमाणे राज्यकर्ता वर्ग होणे देवेन्द्र फडणवीसांनी व नेहरूगांधी फॅमिलीने टिळकांना कायमच मुजरा करायला हवा कारण ते आज जिथे आहेत त्याचे श्रेय टिळकांना जाते
प्रश्न असा आहे कि मग ह्या आद्यहिंदुहृदयसम्राटाला राज्यकर्ता होण्यासाठी काँग्रेसमध्ये एन्ट्री मिळाली कशी ?
श्रीधर तिळवे नाईक
============================================================

दुसरी गोष्ट मुळात काँग्रेसची स्थापना हीच आऊटसायडर ब्रिटिश ऑफिसर्स लोकांनी केली होती टिळकांनी ह्यूमचे नेतृत्व रिप्लेस करून स्वतःचे नेतृत्व पुढे आणले दादाभाई नौरोजी व गोपाळ गोखले ह्या काळात काँग्रेसचे इन्सायडर पुढारी होते पण ताबा ब्रिटिश लोकांच्याकडेच होता
प्रश्न असा आहे कि ही आउटसायडर थेरी आली कुठून ?
तिचा उगम महाभारतात आहे गीतेत आहे नवव्या अध्यायात हा श्लोक पुढीलप्रमाणे आहे
मां हि पार्थ व्यपाश्रित्य
येऽपि स्युः पापयोनयः ।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि
यान्ति परां गतिम् ॥९- ३२॥
त्याचा अर्थ जरी स्त्रिया , वैश्य व शूद्र हे पापयोनी असतात तरी त्यांना मला शरण आल्यावर परम गती प्राप्त होते
किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या
भक्ता राजर्षयस्तथा ।
अनित्यमसुखं लोकमिमं
प्राप्य भजस्व माम् ॥९- ३३॥
आणि मग जे ब्राम्हण व राजर्षी आहेत त्या पुण्यभक्तांना काय सांगावे ?त्यांनाही मला शरण आल्यास परमगती प्राप्त होते
सर्वसाधारण निगम समाजात ह्या काळात जे जन्मजात वर्ण होते त्यांच्या श्रीकृष्णांनी तीन योनी बनवल्या होत्या
१ पुण्य योनी : ह्यात ब्राम्हण व क्षत्रिय वर्ण होते भगवान श्रीकृष्णानीं गीतेत म्हंटल्याप्रमाणे ह्या पुण्य योनी होत्या
२ पाप योनी : ह्यात वैश्य , स्त्री आणि शूद्र होते भगवान श्रीकृष्णांनी म्हंटल्याप्रमाणे ह्या पाप योनी होत्या
३ अयोनी : ह्यात अतिशूद्र आणि आदिवासी होते ज्यांना योनीचा दर्जाचं न्हवता म्हणजे ह्या अयोनी होत्या त्यांचा उल्लेख करण्याची गरज भगवान कृष्णांना वाटली न्हवती
मागील जन्मी पाप केल्याने पाप योनींना पाप योनी प्राप्त झाली होती तर पुण्य केल्याने पुण्य योनीवाल्यांना पुण्य योनी प्राप्त झाली होती ही निगमांची वर्गव्यवस्था होती आणि तिच्याकडे विचारवंतांनी कायमच दुर्लक्ष केले
भारतातील प्रस्थापित व्यवस्था ही पुण्य योनीवाल्यांची व्यवस्था आहे तर पाप योनीवाल्यांना पुण्य संपादन करून पुढील जन्म पुण्य योनीचा संपादन करण्याचा चान्स आहे त्यासाठी अनुष्ठाने व्रतवैकल्ये यज्ञ वैग्रे मार्ग होते व आहेत अतिशूद्र आणि आदिवासी हे गीतेनुसार मनुष्य योनीत मोडत नाहीत
भगवान श्रीकृष्णाने मांडलेल्या ह्या योनी सिद्धांताने सातव्या आठव्या शतकात धुमाकूळ घालायला सुरवात केली आणि वैष्णवानी सर्व व्यवस्था आपल्या ताब्यात घ्यायला सुरवात केली ह्या वैष्णवांनी प्रथम आउटसायडरची थेरी जन्माला घातली
ह्या थेरीनुसार मुख्य नेता युद्धभूमीवर नेतृत्व करतो युक्तीच्या चार गोष्टी सांगतो काय धर्म काय अधर्म ते ठरवतो थोडक्यात भगवान श्रीकृष्ण हा भारतातील निगम समाजाचा (म्हणजे वैदिक , ब्राम्हणी , वैष्णव व हिंदू ) पहिला आउटसायडर नेता आहे जो युद्धभूमीवर आहे आणि मुख्य नेताही आहे पण पक्षात नाहीये सत्तेत नाहीये तो अनऑफिशियल अध्यक्ष आहे पण पंतप्रधान नाहीये
पुढे पेशव्यांच्या काळात हेच रोल बदलले गेले जिथे छत्रपती श्रीकृष्ण आहेत तर बाळाजी व बाजीराव पेशवे अर्जुन आहेत तर उत्तर पेशवाईत छत्रपती बाजूला गेलेत आणि खुद्द पेशवे व त्यांचे शहाणे श्रीकृष्णाच्या रोलमध्ये आहेत तर शिंदे होळकर गायकवाड भोसले आणि खुद्द छत्रपती असे पाच पांडव आहेत
ह्या आउटसायडर थेरीचा नंतर इतका परिणाम झाला कि खुद्द शिवाजी महाराजांच्यासाठी दादोजी कोंडदेव नावाचा एक काल्पनिक श्रीकृष्ण विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी तयार केला तर चंद्रगुप्त व विष्णुगुप्त ह्या काका पुतण्या जोडीला चंद्रगुप्त आणि चाणक्य असे काल्पनिक स्वरूप देण्यात आले
टिळकांच्यावर चिपळूणकरांचा इतका प्रभाव इतका होता कि खुद्द काँग्रेसमध्ये टिळकांनी स्वतःचा रोल श्रीकृष्णांनुसार बेतून आउटसायडर असा केला आणि दादाभाई नौरोजी व अँनी बेझेन्ट ह्यांना अर्जुन बनवून पाठीमागून काँग्रेसचे सारथ्य केले
टिळकांच्या ह्या आउटसायडर स्टान्सचा प्रभाव महात्मा गांधींच्यावर इतका पडला कि खुद्द गांधीही काँग्रेसमध्ये आउटसायडर म्हणून श्रीकृष्णाचा रोल करत राहिले आणि पंडित नेहरू , सरदार पटेल , मौलाना आझाद , सुभाषचंद्र बोस व विनोबा भावे ह्या आपल्या पांडवांना ब्रिटिशांच्या विरुद्ध लढवत राहिले आणि लढतही राहिले .त्यांच्याही दृष्टीने काँग्रेस ही स्वातंत्र्यासाठी स्थापन झालेली एक सर्वसमावेशक संघटना होती पक्ष न्हवता
हे चिपळूणकर टिळक मॉडेल पुढे हिंदुत्ववाद्यांनी गिरवले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ श्रीकृष्ण आणि हिंदू महासभा जनसंघ व भाजप हे पक्ष अर्जुनासारखे काम करत राहिले
ह्या मॉडेलमध्ये पुण्य योनीतील दोघांचेही हितसंबंध शाबूत ठेवले जातात राजा हा विष्णूचा अवतार असल्याने त्याला थेट देवाचा दर्जा मिळतो आणि तो फार भाग्यवान असेल तर त्याला राम व कृष्णाइतकी अफाट लोकप्रियता प्राप्त होते तर ब्राम्हण हा भूदेव असल्याने आणि राजा त्यालाही नमस्कार करत असल्याने त्याचेही देवत्व अबाधित राखले जाते दोघेही एकमेकांचे देवत्व शाबूत ठेवून पद्धतशीरपणे पापयोनीज व अयोनिज लोकांच्यावर राज्य करत राहतात आणि मनू ब्राम्हण होता कि क्षत्रिय होता ह्यावर वाद घालत राहतात
आजही हे मॉडेल ऑन आहे मोदी अर्जुन आहेत तर संघ व भागवत आउटसायडर नेते आहेत

लोकमान्य टिळकांनी आद्यहिन्दूहृदयसम्राट असूनही काँग्रेस का स्वीकारली व स्वतंत्र हिंदुत्ववादी संघटना का काढली नाही
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती २५ श्रीधर तिळवे नाईक
काँग्रेसची विचारसरणी ही दादाभाई नौरोजी न्यायमूर्ती रानडे गोपालकृष्ण गोखले ह्यांनी घडवली होती आणि हे सर्वच लोक इंग्लंडमधील लिबरलीझमने भारावून गेलेले होते परंपरेने ते वैष्णवीझमशी निगडित होते मात्र जन्मानुसार वर्ण कि कर्मानुसार वर्ण ह्याबाबत ते वैष्णव संतांच्याप्रमाणे काहीसे गोंधळलेले होते वैष्णवीझम ही एक मोठी छत्री होती जी वैष्णव संतांच्या भक्ती चळवळीमुळं खूप खोलवर रुजली होती काँग्रेसने तिला राजकीय केले परंपरा मोडायची पण कुणाला न दुखावता क्रांतीचा आवाज न करता मोडायची ही वैष्णव परंपरा काँग्रेसने आत्मसात केली आणि आजूबाजूला असलेले सर्व देव गिळायची अजगरी वृत्तीही जोपासली वैष्णवीझमचे सर्वात मोठे वैशिष्ठ म्हणजे तो परंपरावाद्यांना परंपरावादी वाटतो तर सुधारकांना सुधारणावादी त्यामुळे आंबेडकरही रानडे गोखलेंच्याविषयी आस्थेने लिहतात आणि धर्मातर करतांना " मी गांधींना आश्वासन दिले आहे कि मी हिंदू हितसंबंधांना धोका पोहचेल असा धर्म स्वीकारणार नाही म्हणून मी बौद्ध धर्म स्वीकारत आहे जो हिंदूंच्या हिताचाच आहे " असे म्हणतात हिंदुत्ववाद आणि काँग्रेसवाद ह्यामध्ये चॉईस करायची वेळ आली तर आंबेडकर काँग्रेसच निवडतात कारण त्यांना कायमच हिंदुत्ववाद मनुस्मृतीचे पुनर्जीवन करेल असे भय वाटत होते नवबौद्धांनाही हेच भय वाटते आहे जे नैसर्गिक आहे
काँग्रेसच्या ह्या वैष्णव छत्रीत आणि हिंदुत्ववादाच्या ह्या हिंदू छत्रीत काय फरक आहे ह्याची यथावकाश चर्चा मी पुढे करेनच मात्र एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे टिळक सुरवातीला हिंदू छत्रीखाली उभे होते आणि काँग्रेस ही वैष्णव छत्री घेऊन उभी होती
प्रश्न असा आहे कि टिळकांनी स्वतंत्र हिंदुत्ववादी संघटना का काढली नाही ?
ह्या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसच्या तत्कालीन परिस्थितीत आहे टिळकांना सुरवातीला ब्रिटिशांशी थेट पंगा नकोच होता त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काढलेली काँग्रेस संघटना ही सेफ बेट होती
दुसरी गोष्ट टिळकांचे दादाभाईंच्यावर असलेले प्रेम दादाभाई हळूहळू जहाल बनत चाललेले होते आणि त्यामुळे टिळकांना हे स्पष्ट व्हायला लागले कि काँग्रेसमध्ये जहालवादाला चांगले दिवस येतील तसे संकेत खुद्द दादाभाई नौरोजी देत होते
तिसरी गोष्ट काँग्रेस ही काही वैष्णववादी लोकांनी स्वतःहून काढलेली संघटना न्हवती ती शेवटी ब्रिटिश ऑफिसर्संनी काढलेली संघटना होती आणि ती वैष्णवांच्याप्रमाणे हिंदुत्ववाद्यांनाही खुली होती किंबहुना पुढेही अनेक हिंदुत्ववादी काँग्रेसमध्ये काम करत राहिले त्यामुळे टिळकांना ती त्याकाळात खुली वाटली तर त्यात आश्चर्य काय ?
चौथी गोष्ट ब्रिटिशांनी पाठिंबा दिलेली काँग्रेस ही एकमेव राजकीय संघटना होती बाकी अनेक संघटना ह्या प्रामुख्याने सामाजिक व सांस्कृतिक वा धार्मिक होत्या टिळकांना राजकारणात अधिक रस होता आणि त्यासाठी काँग्रेस हा एकमेव राजकीय पर्याय त्याकाळात उपलब्ध होता
पाचवी गोष्ट होती ह्याकाळात काँग्रेस संस्थापक ऍलन ह्यूमला आलेले फ्रस्टेशन ! इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर काँग्रेस जशी अचानक गोंधळली होती तसेच काहीसे गोंधळाचे वातावरण १८९० साली काँग्रेसमध्ये निर्माण झाले होते काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात पास केलेल्या नऊ ठरावापैकी एकालाही नीट दाद मिळाली न्हवती कायदे मंडळात एतद्देशीय लोकप्रतिनिधी घ्यावा ह्या मागणीला सरकारने कचऱ्याची टोपली दाखवली होती १८९२ च्या लॉर्ड क्रॉसच्या इंडियन कौन्सिल बिलनुसार सरकारचे सरकारनियुक्त प्रतिनिधी स्वराज्यसंस्थात येणार हे स्पष्ट झाले
काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनातच ह्यूमने ,"सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आम्ही केला पण सरकारने जागे होण्याचे नाकारले आहे "अशी टीका केली "आता प्रत्येक हिंदू मनुष्य सैनिक बनला पाहिजे" असेही ते म्हणाले साहजिकच काँग्रेसच्या चौथ्या अधिवेशनाला सरकारने जागा देण्याचे नाकारले व काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर राहणे दुर्वर्तन आहे असे जाहीर करून चांगल्या वर्तनाची हमी मागितली काँग्रेसचे कार्य करणाऱ्या दहा हजार कार्यकर्त्यांना सरकारने हद्दपार केले पण ह्यूम दबले नाहीत त्यांनी आपले काम व त्यासंदर्भातील पत्रव्यवहार सरकारकडे नेटाने लावून धरला ह्या काळात उमेशचंद्र बॅनर्जी ह्यांनी चार्ल्स ब्रॅडलॉ ह्या ब्रिटिश सांसद द्वारा ब्रिटिश संसदेत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला मात्र एतद्देशीय काँग्रेसच्या नेतृत्वाकडून ज्या कार्याची ह्यूम ह्यांना अपेक्षा होती ती पुरी होईना त्यांना हळूहळू सर्व एतद्देशीय काँग्रेस पुढारी फक्त बोलघेवडे पुढारी आहेत असे वाटू लागले जेवढा जहालपणा ह्यूम दाखवत होते त्याच्या पन्नास टक्केही जहालपणा हे लोक दाखवत न्हवते सरकारने काँग्रेसच्या पाचव्या अधिवेशनात सरकारी अधिकाऱ्यांच्यावर भाग घेण्यास बंदी घातल्यावर हे सगळे बोलघेवडे अधिवेशनातून गायब झाले ह्या पार्श्वभूमीवर आगरकरांनी ह्या पळपुट्यांचे वाभाडे काढले ह्यात नवल ते काय ? ह्यूम ह्यांनी काँग्रेसचे एतद्देशीय नेते बेफिकीर व निष्काळजी आहेत असा थेट आरोप केला व काँग्रेसचे कार्य इंग्लंडमधून चालवण्याचा निर्णय घेतला आणि एकच गोंधळ उडाला काँग्रेस चालू ठेवावी कि बंद करावी असा प्रश्न निर्माण झाला
अशा पार्श्वभूमीवर टिळक आणि आगरकर काँग्रेस ही चालूच राहिली पाहिजे अशी ठाम भूमिका घेऊन उभे राहिले दोघांच्यात कितीही सामाजिक मतभेद असले तरी दोघेही राजकीय पातळीवर जहालच होते
काँग्रेसमधील ह्या सर्व घडामोडींवर टिळक व आगरकर नजर ठेऊन होते आगरकरांनी एतद्देशीय काँग्रेस नेत्यांच्यावर टीकेची राळ उडवली टिळकांनी ह्यूम ह्यांच्या सर्क्युलरमधील "हिंदुस्तानातील गरीब माणूस फ्रेंच राज्यक्रांतीप्रमाणे नेत्यांना डावलून स्वतःच राज्यक्रांती करू शकतो" ह्या मताला पाठिंबा दिला ह्यूमने ह्या सर्क्युलरमध्ये स्पष्ट म्हंटले होते कि काँग्रेसमधील पुढाऱ्यांना जी प्रतिष्ठा पद संपत्ती प्राप्त झाली आहे ती ब्रिटिश राज्यामुळे प्राप्त झाली आहे आणि जर ब्रिटिश राज्य टिकले नाही तर काँग्रेस नेत्यांचीही ही प्रतिष्ठा पद संपत्तीही टिकणार नाही जर ह्या गोष्टी टिकाव्यात असे वाटत असेल तर ह्या नेत्यांनी पळपुटेपणा सोडून ब्रिटिश राज्याला इथल्या एतद्देशीय प्रजेची जी दैना व वाताहत झाली आहे ती काँग्रेसतर्फे कळवलीच पाहिजे
एका अर्थाने देशासाठी नाही तर निदान स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या पद प्रतिष्ठा व संपत्तीच्या रक्षणासाठी तरी किमान काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहा असे आवाहन ह्यूम करत होता आणि काँग्रेसचे नेते त्याच्या ह्या आवाहनाला प्रतिसाद देण्याऐवजी ब्रिटिश शासनाच्या दहशतीला घाबरून वाटाण्याच्या अक्षता लावत होते साहजिकच काँग्रेसच्या प्रांतिक कमिट्यांनी ह्यूमचे सर्क्युलर डिस्ट्रिब्युट केलेच नाही . काँग्रेसच्या नेत्यांची वृत्ती सुरवातीपासूनच कशी थर्ड क्लास होती हे ह्यावरून स्पष्ट व्हावे
अशा ह्या काँग्रेसच्या निर्नायकी अवस्थेत लोकमान्य टिळकांना काँग्रेसच स्वतःच्या नेतृत्वासाठी योग्य वाटली तर आश्चर्य ते काय ?

लोकमान्य टिळक आणि सांस्कृतिक अस्मितेचा प्रश्न
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती २६ श्रीधर तिळवे नाईक
भारतीय आर्यांच्या ज्या काही गैरसमजुती आहेत त्यातील एक म्हणजे जगभर पसरण्याची लायकी असलेली एकमेव संस्कृती ही आर्यांची आहे आणि तिचा आधार धर्म आहे साहजिकच भारतीय राष्ट्रवाद हाही धार्मिक राष्ट्रवाद म्हणूनच उभा राहू शकतो आणि तो आर्य राष्ट्रवाद असणे अटळ आहे हा आर्य राष्ट्रवाद कसा असावा ह्याची विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी जी काही रूपरेखा दिली तिचा लोकमान्य टिळकांनी राजकीय नकाशा बनवला आणि पुढे स्थापत्य डिझाईन केले
भारतीय आर्यांचा ह्याकाळात जो क्लॅश झाला तो इस्लामिक संस्कृतीशी आणि मराठ्यांनी इस्लामिक संस्कृतीला जवळ जवळ हरवून हिंदू पादशाही उभी केली जी दुर्देवाने फार काळ टिकली नाही कारण समोर तिच्यापेक्षा सबळ संस्कृती ठाकली जी आर्यांचीच होती जिचे नाव ब्रिटिश संस्कृती होते चिपळूणकरांच्या मते ब्रिटिश हे आर्यच होते त्यामुळे हा संघर्ष भावाशी होता ह्याचा एक परिणाम असाही झाला कि भारतीय संस्कृतीत भावाला नेहमीच समजावले जात असल्याने ब्रिटिश भावाला तो बिघडलेला असल्याने व सत्तेने मस्तवाल झालेला असल्याने ह्या जीर्ण शीर्ण भावाच्या अहंकाराने समजवण्याचा प्रयत्न केला तो थेट गांधीजीच्या हत्येपर्यंत ! ब्रिटिशांनी मुळात आर्य सिद्धांताला खतपाणी घातले तेच मुळी ब्रिटिशांच्याविषयी एतद्देशीयांना परकेपणा वाटू नये खिश्यात हात घालून सगळा पैसा काढून घ्यायचा आणि वर ब्रदरहूड फिलिंग द्यायचे ही एक कमालीची इमोशनल स्ट्रॅटेजी होती जिच्यात सगळेच फसले होते साहजिकच ह्यूमने चळवळ तीव्र करायचे ठेवल्यावर काँग्रेसच्या एतद्देशीय नेत्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली काहींनी तर डेक्कन संस्था स्वतंत्रपणे चालू केली ह्या काळात ह्या काँग्रेसी नेत्यांना सरळ सरळ भित्रे व डरपोक म्हणणारे दोनच विचारवंत होते आगरकर आणि टिळक एखादा दादागिरी करणारा मनुष्य घरात घुसला कि भित्रा मनुष्य अरे तू माझा भाऊ वैग्रे अशी भाषा सुरु करतो तसा प्रकार ह्या काळात मवाळवाद्यांनी सुरु केला नेमक्या ह्याच काळात आगरकरांचे निधन झाले आणि टिळक एकटे पडले आता त्यांना एकट्याने निर्णय घ्यायचा होता
नेमक्या ह्याच काळात सर सैय्यद अहमद व इस्लामिक संस्कृतीला ब्रिटिशांनी हिंदू संस्कृतीच्या विरोधात क्लॅश असल्यासारखे उभे केले आपण दोघेही ज्युडायिक असल्याने मित्र आहोत व आपला कॉमन शत्रू हिंदू आहे हे पटवण्यात ब्रिटिशांना यश मिळू लागले आणि मुस्लिम विचारवंत ह्या जाळ्यात अडकत गेले भारतातील बहुसंस्कृतीवादाला नेमका कसा तडा द्यायचा हे ब्रिटिशांना नेमके माहित होते व त्यासाठी त्यांनी धर्म वर्ण व जातीचा यथेच्छ वापर करायला सुरवात केली काँग्रेसच्या विरोधात एक मुस्लिम काँग्रेससारखी संघटना आवश्यक आहे हे मुस्लिमांना पटवण्याची धडपड सुरु झाली ज्यातून पुढे मुस्लिम लीग उदयाला आली
डार्विनचा प्रभाव पडून १८७० नंतर आलेल्या ब्रिटिशांनी सर्वायवल ऑफ फिटेस्ट आणि ब्रिटिश स्पेसीज ही निसर्गतः हिंदू स्पेसीज व मुस्लिम स्पेसीज पेक्षा श्रेष्ठ आहेत हे स्वीकारायला सुरवात केली होती ह्या कमअस्सल लोकांच्यावर राज्य करण्याचा अधिकार निसर्गतः आपल्याला आहे असे मानणारे अधिकारवादी व ह्या कमअस्सल स्पेसीजचा उध्दार करण्यासाठी आपण आलो आहोत असे मानणारे उद्धारवादी दोघेही डार्विनच्या कृपेने हिंदू स्पेसीजला कमअस्सलच समजत होते आधुनिक रेसिझमची सुरवात डार्विनमुळे झाली व ती भारतात पोहचली तिला काउंटर म्हणून चिपळूणकरांचा हिंदुत्ववाद जन्मला होता
टिळकांना एकीकडे ह्यूमचे धैर्य दिसत होते व हिंदूंचे भित्रेपण ! ब्रिटिशांना वेगळे काढण्यासाठी त्यांनी आर्य सिद्धांत स्वीकारला खरा पण त्यांना थेट उत्तर ध्रुवावरून स्थलांतरित करवून इंडियात आणले आणि इंडियन आर्य प्रथम सुसंस्कृत होते व युरोपियन आर्य त्यांना पाहून सुसंस्कृत झाले अशी मांडणी केली हे ब्रिटिशांचे डार्विनियन ओझे फेकून देणे होते ही डी -डार्विनायझेशनची प्रक्रियाच टिळकांना इंग्रजांच्याविरुद्ध लढायचे बळ देऊन गेली पण त्याच बरोबर आर्य धर्म श्रेष्ठ असल्याची जाणीवही ! भारतात ह्या निमित्ताने प्रथमच जीवशास्त्र , साम्राज्यवाद आणि इतिहास ह्यांची युती झाली
लढा अटळ आहे हे उमजलेले टिळक आता हिंदूंना कसे संघटित करता येईल ह्याचा विचार करू लागले ब्रिटिशांनी स्वतःच जागतिक साम्राज्य उभं केलं होतं मुस्लिमांचे आटोमन साम्राज्य अद्याप जिवंत होते आणि ह्या प्रतिसृष्टीय सृष्टीय संमिश्र जागतिकीकरणात फक्त हिंदूच असे होते जे स्वतःच्या देशात घायाळ आणि गुलाम होऊन पडले होते अमूर्त जागतिक संस्कृती जन्माला घालण्याची सुरवात शैवांनी केली असली तरी आणि बौद्धांनी ह्या सुरवातीचा चांगला विस्तार केला असला तरी हा विस्तार मोक्षाचे जागतिकीकरण होता ह्याला काटशह म्हणून ज्यू ख्रिश्चन आणि इस्लाम ह्यांनी धर्माच्या जागतिकीकरणाची सुरवात करून जगभर धार्मिक धुमाकूळ घातला टिळकांच्यापुढे ह्या दोन्ही धर्मांचे ज्युडायिक जागतिकीकरणाचे मॉडेल उभे होते एक मागासलेले व कालबाह्य तर दुसरे अर्थवादाने भारावले गेलेले पण आधुनिक ! टिळकांना ह्या दोन्हींचा मध्य हवा होता
ख्रिश्चन मॉडेल व इस्लामिक मॉडेल दोघेही स्थलांतर करून व एतद्देशीयांना बाटवून धार्मिक जागतिकीकरण साजरे करत होते पण ब्रिटिशांचा मुख्य रस आर्थिक होता आणि धर्म केवळ प्राचीन हाथियार होते त्याउलट कॅथॉलिकांच्या दृष्टीने ब्रिटिश साम्राज्य हे केवळ धर्मांतरासाठी लोकसंख्या उपलब्ध करून देणारे हाथियार होते धर्मशाही आणि भांडवलशाही ह्यांचे हे अजिबोगरीब साटेलोटे होते जे अंतिमतः हिटलरी जर्मनीत ज्यूंचे बळी घेऊन काहीकाळ थांबले टिळकांनी आर्यांचे स्थलांतर व बाहेरून येणे स्वीकारले कारण इसवी सन १००० नंतर बाहेरून येणारा हा आतमध्ये असणाऱ्यांच्यापेक्षा बलवान असतो असा समज रूढ झाला होता हा आऊटसायडर इज बेटर फिटेस्ट दॅन इन्सायडर चा सिद्धांत ह्या काळात ब्राम्हणांना आपण बाहेरचे आहोत हा खोटा भ्रम स्वीकारायला लावणारा ठरला ब्राम्हणांच्यासाठी मुद्दा कधीच बाहेरचा कि आतला हा नसतो मुद्दा सत्ता कुणाला मिळेल हा असतो सत्ता बाहेरच्याला मिळणार असेल तर ब्राम्हण ताबडतोब ह्या देशात आउटसायडर व्हायला तयार असतात आणि सत्ताप्राप्तीसाठी आतील रहिवासी असणे गरजेचे असेल तर ब्राम्हण ताबडतोब इन्सायडर होतात टिळकांनी त्यांच्या काळानुरूप आउटसायडर होणे पसंत केले कारण आउटसायडरनेस त्यांना ब्रिटिशांच्या तुलनेत ब्रिटिशांच्यासमोर ब्रिटिशांच्याबरोबरचा इक्वलपणा बहाल करत होता
जनेटिक लेव्हलला आपण सगळे बरेचसे एकसारखे असलो तरी सांस्कृतिक अस्मितेवर आजही आपली श्रद्धा आहे टिळकांनी ही सांस्कृतिक अस्मिता आर्य हिंदू अस्मितेत शोधली मात्र हे करतांना मुस्लिम सांस्कृतिक अस्मितेचे काय करायचे हा प्रश्नही बाकी होता जो वाटेवरच उभा होता ह्या देशाने पन्नासदा आपली सांस्कृतिक अस्मिता बदलली होती आणि तिला एका सूत्रात गोवणे फार कठीण होते ब्रिटिशविरोध हे ह्या गोवणीचे निगेटिव्ह सूत्र होते पण पॉझिटिव्ह सूत्राचे काय ? चिपळूणकरांनी टिळकांना हे सूत्र दिले ज्याचे नाव हिंदुत्व होते जे परंपरा आणि इतिहास ह्याच्या आधारे उभे होते टिळकांच्या सुरवातीच्या कर्मठपणाचे रहस्य ह्या सूत्रात आहे ओळख व अस्मिता धर्माच्या आधारे उभी करायची ठरली कि माणूस धार्मिक बाबतीत योग्य-अयोग्य विवेक गमावतो टिळकांचे हेच झाले आणि आजच्या हिंदू ज्यू ख्रिश्चन इस्लामिक नेत्यांचाही हाच प्रॉब्लेम आहे
अस्मितेचा हत्ती पकडायचा कसा हा टिळकांच्यापुढचा खरा प्रश्न होता कारण सात आंधळ्यांची कथा टिळकांनाही माहीत होती धर्मयुगात धर्म तर मोक्षयुगात दर्शन तुम्हाला अस्मिता पुरवत असे सृष्टीय युगात अस्मिता पुरवण्याची जबाबदारी राष्ट्रावर , विज्ञानावर , विचारप्रणालीवर व विचारप्रणालीच्या आधारावर उभ्या असलेल्या संविधानावर आली होती आणि भारतीयांची मग ते हिंदू असोत कि गैरहिंदू शोकांतिका हीच होती कि त्यांच्या ताब्यात त्यांचे राष्ट्र न्हवते राष्ट्र निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांना हाकलून देणे सर्वाधिक गरजेचे होते त्यामुळेच टिळकांनी सामाजिक सुधारणा साईडलाईन केल्या आणि ब्रिटिशांना हाकलून देणे हा आपला अजेंडा बनवला टिळकांच्या दृष्टीने किती राष्ट्रे बनवायची हाही मुद्दा दुय्यम होता ब्रिटिशांना प्रथम हाकलून लावू मग आपण एकत्र बसून ठरवू असे त्यांचे म्हणणे होते जे बरोबर व काळाशी सुसंगत होते कारण राष्ट्रसत्तेशिवाय आणि राजसत्तेशिवाय सुधारणा अशक्यच किंवा लुटुपुटीच्या होतात भारताची सर्वात मोठी शोकांतिका हीच आहे कि ज्यावेळी राष्ट्रवाद आवश्यक होता त्या काळात भारतातील विचारवंत सामाजिक सामाजिक करत बसले तर १९४७ नंतर धार्मिक पूर्णपणे गाडून सामाजिक सामाजिक वैज्ञानिक वैज्ञानिक करणे आवश्यक होते तेव्हा सामाजिक वैज्ञानिक आर्थिक करण्याऐवजी ते धार्मिक धार्मिक राजकीय राजकीय करत बसले त्यामुळे ना धड सामाजिक सुधारणा झाल्या ना राष्ट्र उभारणी नीट झाली टिळक आणि गांधी हे दोनच नेते असे झाले ज्यांनी काळाची गरज ओळखली होती आणि त्यांना त्यामुळे जनतेचा पाठिंबाही भरपूर मिळाला
राष्ट्रीय अस्मिता अनेक गोष्टींनी बनतात
१ प्रमुख नेत्यांची ओळख जशी कि गांधी वैष्णव होते व मोक्षक होते टिळक वैदिक वैष्णव धार्मिक व मोक्षक होते
२ राष्ट्राविषयीच्या भविष्यकालीन व भूतकालीन कल्पना
३ राष्ट्र ज्या स्थितीतुन चालले आहे ती स्थिती मग ती भौगोलिक , वर्तमानकालिक असो कि भावनिक व बौद्धिक असो
४ त्या त्या राष्ट्रातील नागरिकांचा त्या त्या राष्ट्रातील संविधानावर असलेला विश्वास व संशय
५ त्या त्या राष्ट्रातील नागरिकांची क्रियाशीलता , कृतिविवेक , कर्तव्याची जाण आणि कर्तव्याशी असलेली निष्ठा
६ त्या त्या राष्ट्रातील नागरिकांची शक्ती तिची जागृती व निद्रा वा बेशुद्धी
ब्रिटिशांनी दिलेल्या संविधानावर सुरवातीच्या काळात हिंदवासीयांचा विश्वास होता पण १८७० नंतर तो ढासळू लागला कारण ब्रिटिश साम्राज्यवादाच्या वृक्षाखाली पनपणारा हा राष्ट्रवाद तकलादू व एकतर्फी होता आणि त्यात प्रजेचा सहभाग नाकारला होता एका अर्थाने डेमोक्रेटिक किंगशिप वा क्वीनशिप चालू होती आणि भारताला लुटणे हाच एककलमी कार्यक्रम चालू होता आणि हे शोषण हळूहळू वैश्य व शूद्रांना कळू लागले होते टिळक तेल्यातांबोळ्याचे पुढारी म्हणून उदयाला आले ते ह्या पार्श्वभूमीवर !
काँग्रेसमधले नेते जेव्हा स्वतःची प्रतिष्ठा नौकरी पद पैसे सांभाळण्यात मग्न होते तेव्हा टिळक जनतेशी थेट संपर्क साधू पाहत होते
योनीव्यवस्थेनुसार ब्राम्हण व क्षत्रिय ह्यांचे साटेलोटे असणे अटळ होते आणि टिळकांनी तसा प्रयत्नही केला त्यातूनच त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजींची बाजू घेतली पण त्यात त्यांचे हात चांगलेच पोळले पुढे सयाजीराव व शाहू ह्यांच्याशी त्यांचे जे भांडण झाले त्यात एक महत्वाची गोष्ट हीच होती कि टिळकांना हे साटेलोटे मान्य होते पण सयाजी व शाहू महाराज दोघेही ह्या योनिव्यावस्थेत अडकायला तयार न्हवते ते ब्राम्हण ब्राम्हणेतर ह्या नव्या व्यवस्थेत प्रवेश करायला उत्सुक होते कारण त्यामुळे समाजाचे नेतृत्व त्यात क्षत्रियांच्याकडे येण्याची अधिक शक्यता होती त्यांना ब्राम्हणांचे मांडलिकत्व मान्य न्हवते त्यांना समान दर्जा हवा होता जो वेदोक्त मंत्र नाकारल्यामुळे नाकारला गेलाय असे त्यांना वाटत होते
टिळकांचा प्रॉब्लेम हाच होता कि त्यांना कोणत्याच अर्थाने हे लोक पुरेसे क्षत्रिय वाटत न्हवते इंग्रजांची गुलामी पत्करणारे व त्यांच्या तैनाती फौजेच्या आधारे जगणाऱ्या लोकांना क्षत्रिय कसे मानावे हा त्यांच्यापुढचा प्रश्न होता पुढे ह्या दोघांचीही बाजू व मजबुरी त्यांच्या लक्ष्यात आली आणि त्यांचे ह्या दोघांशीही असलेले संबंधही सुधारले पांडवही शेवटी काहीकाळ दास होते ह्याचा अर्थ गीताधर्मानुसार ते क्षत्रियच नाहीत असा होऊ शकत न्हवता
ह्यातून एक गोष्ट घडली ती म्हणजे टिळकांनी सुरवातीला आपली राजकीय लढाई चालवतांना ब्राम्हणांच्यावर मदार ठेवली ह्याबाबत त्यांचा आदर्श नाना फडणवीस होते हे लक्ष्यात घेण्याजोगे आहे त्यांच्या लिखाणात नाना फडणवीसांचा गौरव त्यामुळे वारंवार होतो तो ह्यामुळेच !पण ह्यामुळेच ब्राम्हण एकसंध ठेवणं ही त्यांची राजकीय गरज बनली पण ह्या राजकीय गरजेमुळे ब्राम्हणांची एकी तुटू नये म्हणून त्यांनी सामाजिक सुधारणांना विरोधही केला
कर्म बुद्धी आणि भक्ती ह्या तिन्हींमधील विरोध नाहीसा होऊन सर्व आयुष्य यज्ञमय करणे ह्यातच गीताधर्माचे सकळ वैदिक धर्माचे सार आहे असे ते मानत सर्वभूताहितार्थ झटणे हे त्यांना कर्तव्य वाटत होते असे सर्वभूताहितार्थ झटणारे लोक कमी झाले म्हणून हिंदूंचे पतन झाले अशी त्यांची श्रद्धा होती अलीकडे ब्राम्हण असला कि त्याच्या राष्ट्रभक्तीविषयी संशय घेतलाच पाहिजे अशी काही ब्राम्हणेतरांची समजूत झालीये मला वाटतं टिळकांची राष्ट्रभक्ती अस्सल सोन्यासारखी होती संशय कुठे आणि किती ताणवावा ह्याचा विवेक जितका ब्राम्हणांना आवश्यक आहे तितकाच ब्राम्हणेतरांनाही आवश्यक आहे
प्रश्न लढ्याचा होता
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळकांना
आणि तिसऱ्या अधिवेशनानंतर ह्यूमनी तिला चळवळीचे स्वरूप देण्याचे ठरवलेश्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती लेखक : श्रीधर तिळवे -नाईक
प्रस्तावना
इतिहास हा गेली अनेक सहस्रके पौराणिक , वृत्तांतिक अशी वाटचाल करत आधुनिक झाला आधुनिकने वैज्ञानिक बुद्धिप्रामाण्यवादी इतिहास जसा लिहिला तास रोमँटिक भावनाशील इतिहासही लिहिला पुढे आधुनिकता आली तिने तंत्रज्ञानिक वस्तुनिष्ठ इतिहास लिहण्याचा प्रयत्न केला पण तो अशक्य बनत गेला आणि उत्तराधुनिकतेने इतिहास रचला जातो निर्माण केला जातो प्रॉडक्ट म्हणून कल्चरल इंडस्ट्रीत मॅनुफॅक्चर केला जातो अशी इतिहासाबाबत खरीखुर्री भूमिका मांडली
वास्तविक उत्तरआधुनिक इतिहासाचा वापर करून १८३० ते १९६० पर्यंत जो इतिहास रचला गेला त्याची सालटी सोलून काढायला हवी होती पण हा इतिहास रचणारे लोक राजकीय असल्याने त्यांच्याशी पंगा घेणे टाळले गेले
एकमेकांच्या महापुरुषांच्याविषयी अफवा पेरत त्यांची बदनामी करणे एव्हढाच उत्तराधुनिक इतिहास आपल्याकडे झाला वा चाललाय इंग्रजांनी कसा आपला खोटा इतिहास रचला हे दाखवून देण्याचे काम आपल्याकडच्या अनेक पोस्टकलोनियल अकादमीक इतिहासकारांनी पार पाडले तरी ह्या भित्र्या लोकांनी इंग्रजांच्या कह्यात भारतीय राष्ट्रपुरुष कसे फसत गेले ते काही दाखवून दिले नाही
भारतात काल्पनिक इतिहास रचणाऱ्या पौराणिक इतिहासकारांची परंपरा फार जुनी आहे आणि आजच्या उत्तराधुनिक इतिहासकारांची ती पणजोबा म्हणता येईल भारतात उत्तराधुनिक इतिहासकारांनी आपले काम नीट केले नाही आणि आपल्याकडे ह्या भंपक पौराणिक इतिहासाने पुन्हा उचल खाल्ली म्हणजेच इंग्रजांच्या कलोनियल इतिहासाकडून आपण पुन्हा उत्तरपौराणिक इतिहासात उडी मारली आहे भाजपने ह्या उत्तरपौराणिक इतिहासाला खतपाणी घालून सत्तेचे राजकारण खेळले आणि आता सर्वांकष सत्ताही प्राप्त केली आहे
भाजपच्या ह्या प्रवासाचे नीट राजकीय आकलन करण्याऐवजी आत्ताच्या उत्तराधुनिक सोशल मीडियाच्या दरीत कोसळून पुरोगामी लोकांनी आपला अजेंडा मोदींची टिंगल आणि टवाळी असा सरफेसवर रेंगाळत ठेवला आहे परिणामी भाजपवादी लोक तेच करतायत जे मोदींना अपेक्षित आहे पण आश्चर्यकारकरित्या विरोधकही तेच करतायत जे मोदींना अपेक्षित आहे
अशा प्रकारची खेळी इंग्रजांनी काँग्रेस स्थापन करून केली होती म्हणजे सत्ताधारी आम्ही आणि विरोधकांनी कसे वागायचे तेही आम्हीच काँग्रेसद्वारे नियंत्रित करणार असा हा गेम होता ब्रिटिशांचा डबल गेम ज्याला कळला असा पहिला नेता म्हणजे लोकमान्य टिळक गंमत म्हणजे टिळकांचे नेतृत्व चक्क हिंदुत्ववादी होते आणि ते ज्या तथाकथित काँग्रेसी उदारमतवादी लोकांच्या विरोधात लढत होते ते चक्क ब्रिटिशवादी होते व नकळतपणे ब्रिटिश साम्राज्यवादाच्या बुद्धिबळ पटावर ब्रिटिशांचे प्यादे म्हणून लढत होते मी टिळकांचे समग्र आकलन त्यामुळेच आवश्यक मानतो
लोकमान्य टिळक आणि भारताचा राजकीय विचार ह्यांचा अन्योनसंबंध आहे पारंपरिक विचार हा टिळक व अन्य काँग्रेसचे राजकारण चालवत असल्याने टिळकांचा व इतरांचा समावेश काँग्रेसी राजकीय विचारात करत असला तरी प्रत्यक्ष ह्या लोकांचे लेखन व आचरण स्पष्टपणे ते कोणत्या धारेशी निगडित आहेत हे सांगत असतात
मी इथे टिळकांना आद्यहिंदुहृदयसम्राट म्हणून सादर करतोय आणि त्यामुळे इतिहासलेखनाची पारंपारिक , आधुनिक व उत्तराधुनिक विचारांची चौकट हलवतोय ह्याची मला कल्पना आहे चौथी नवता इतिहासाकडे इतिहास म्हणून न पाहता भूतकालीन व वर्तमानकालीन नेटवर्क म्हणून पाहते आणि हिंदू नेटवर्क कसे ह्या देशात एक नेटवर्क म्हणून फंक्शन म्हणून काम करते ह्याचा धांडोळा घेते पक्ष वा पार्टी आमच्यासाठी महत्वाचे नाहीत नेटवर्क आयडियालॉजी मॅनेजमेंट प्रोग्राम आणि सादरीकरण ह्या चारी गोष्टींचे फ़ंक्शनल युनिट म्हणून काम करते आणि ह्या फ़ंक्शनल युनिटचे राजकीय पक्ष हे केवळ सबयुनिट आहे
गेली काही दशके मी हिंदू म्हणजे
१ वैदिक धर्म
२ ब्राम्हणी धर्म
३ वैष्णव धर्म
४ वेदांत धर्म
ह्या चार धर्माचे एक फंक्शनल नेटवर्क आहे आणि ह्या नेटवर्कची हिंदू नेटवर्क म्हणून स्थापना आद्यशंकराचार्यानी केली अशी मांडणी करतो आहे वैष्णव भक्ती चळवळ ही ह्या नेटवर्कचीच कन्या आहे
ह्या नेटवर्कने पूर्वी विष्णू ह्या देवतेद्वारा जैन आणि बौद्ध ह्यांना हुसकावून लावण्यासाठी व गिळण्यासाठी वैष्णव धर्माची पुराणे व महाकाव्ये ह्यांच्या द्वारे स्थापना केली व पुढे शैव धर्म गिळण्यासाठी वेदांत धर्माद्वारे हिंदू नेटवर्क उभे केले अशी माझी मांडणी आहे
चिपळूणकर , इतिहासाचार्य राजवाडे आणि लोकमान्य टिळक हे ह्या नेटवर्कचे आधुनिक निर्माण कर्ते असून टिळक हे ह्या हिंदू नेटवर्कने निर्माण केलेले पहिले राष्ट्रीय नायक आहेत हे मी इथे सिद्ध केलेले आहे
मी पडलो हाडाचा कवी त्यामुळे चौथ्या नवतेचा इतिहास लिहिण्याची माझी कधीच इच्छा न्हवती पण कोणी इतिहासकार पुढे न आल्याने मला ही जबाबदारी घ्यावी लागली ह्या इतिहासाचे मराठी व्हर्जन तयार करायला कोणी तयार न्हवते त्यामुळे जमेल तश्या फेसबुकी पोस्ट्स टाकणे असा उद्योग मी केला ह्या उद्योगाचा उद्देश फक्त पायाभरणी करणे एव्हढाच आहे नंतरची बिल्डिंग पुढील पिढ्यातील इतिहासकार रचतील अशी आशा आहे
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती १ श्रीधर तिळवे नाईक
१वास्तविक उत्तरआधुनिक इतिहासाचा वापर करून १८३० ते १९६० पर्यंत जो इतिहास रचला गेला त्याची सालटी सोलून काढायला हवी होती पण हा इतिहास रचणारे लोक राजकीय असल्याने त्यांच्याशी पंगा घेणे टाळले गेले

हिंदुत्ववाद महाराष्ट्रातच का जन्मला आणि टिळकांचे गुरु आद्य हिंदुत्वकार विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांनी हिंदुत्ववाद महाराष्ट्रातच कसा जन्माला घातला ?
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती २० श्रीधर तिळवे नाईक
टिळक हे आद्यहिंदुहृदयसम्राट आहेत हे आपण पाहतोच आहोत प्रश्न असा कि हिंदुत्ववादाने महाराष्ट्रातच मूळ का धरले
१ सर्वात पहिली गोष्ट म्हणजे इंग्रजांची टक्कर ज्यांच्याशी झाले ते मराठा हिंदू होते इंग्रजांना सर्व निर्णायक लढाया मराठ्यांशी लढाव्या लागल्या ह्या लढायात मराठा एकसंध होऊन लढलेच नाहीत शिंदे होळकर गायकवाड पेशवे परस्पर विरुद्ध तोंड करून लढले
२ इंग्रज आले तेव्हा दिल्ली मराठ्यांच्या ताब्यात होती अगदी दिल्लीत प्रवेश करण्यासाठीसुद्धा मराठ्यांच्या चेकपोस्ट पार करूनच जावे लागे साहजिकच हिंदुस्थानभर मराठ्यांचा दरारा होता आणि त्यांना हरवूनच इंडिया जिंकता येणे शक्य होते
३ मराठ्यांनी सुरु केलेली तैनाती फौजेची व्यवस्था बादशहाला संरक्षण देत असे आणि त्याबदल्यात मराठे बादशहाला आवश्यक ते खर्चापुरते पैसे देत ह्यापासून हिंदुस्थान कसा चालवायचा ह्याची एक पद्धत इंग्रजांच्या डोक्यात तयार झाली व वेलस्लीने पुढे ती तैनाती फौजेची व्यवस्था म्हणून राबवली
४ महाराष्ट्रात स्वराज्याची जी स्थापना झाली होती तीच मूळी बेदिलीत झाली होती कोणीही सरदार कुठल्याही राजाकडे शिफ्ट होत असे निष्ठा नावाची गोष्ट मराठ्यांनी गमावली होती शिवाजी महाराजांनी ती पुन्हा स्थापित केली उत्तर पेशवाईत ही बेदिली पुन्हा माजली त्यात सगळ्यांचीच राज्ये गेली पेशवे फक्त एकटे गेले नाहीत होळकरही गेले शिंदेही गेले आणि गायकवाडही गेले ह्याबाबत फुल्यांनी पूण्यापलीकडे पाहीले नाही नाहीतर त्यांना पेशवाईबरोबर गायकवाडशाही होळकरशाही(यशवंतराव होळकरांनी तर स्वराज्य स्थापन केले होते आणि राज्याभिषेकही करवून घेतला होता ) आणि शिंदेशाहीही दिसली असती ह्या सर्वांना आता आत्मपरीक्षण करणे गरजेचे वाटू लागले त्यातूनच पुढे सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज भोंसले हे दोन राजे पुढे आले आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यावेळी महात्मा फुले शिवाजी महाराजांना कुळवाडीभूषण म्हणत होते त्यावेळी भोसल्यांच्या घरात पुत्र जगत नाहीत कारण तुमचे विधी वेदोक्त पद्धतीने होतात ते जर पुराणोक्त झाले तर तुमचे पुत्र जगतील असे ब्राम्हण पुरोहित सांगत होते आणि राजा विचार करून हो म्हणायला लागला होता म्हणजे स्वतःहून क्षत्रियत्वाचा त्याग करून शूद्रांना असणारे पुराणोक्त मंत्र स्वीकारत होता ह्यातूनच पुढील वेदोक्त प्रकरण घडले मराठे कर्मकांडात किती गुंततात ह्याचा अंदाज ब्रिटिशांना आला होता आणि त्यांची बेदिलीही लक्ष्यात आली होती त्यातूनच पुढे त्यांनी डिव्हाइड अँड रुल पॉलिसी डेव्हलप केली
५ त्यामुळे इंग्रजांना मुस्लिम हे आपले मुख्य शत्रू आहे असं वाटत न्हवतं त्यांच्यादृष्टीने त्यांचा खरा शत्रू हा मराठाच होता तर मराठ्यांना आपला खरा शत्रू इंग्रज आहेत हे कळायला सुरवात झाली
६ मराठ्यांनी पुन्हा बंड करायचे नसेल तर त्यांना सर्वच बाजूंनी ठेचायला हवं ही इंग्रजांची हळूहळू धारणा बनली होती शेवटी काही झाले तरी त्यांनी काही लढायांत इंग्रजांना हरवले होते आणि मराठे संघटित झाले तर पुन्हा आपल्याला हरवू शकतात ह्याची त्यांना कल्पना होती म्हणूनच आपली राजवट सुरळीत चालवायची असेल तर मराठ्यांचे नामोनिशाण राहता कामा नये ह्या उद्देशाने मराठ्यांच्या किल्ले तटबंदी पाडायला इंग्रजांनी सुरवात केली आणि नंतर वेळ अशी आली कि खुद्द शिवाजी महाराजांची समाधी शोधावी लागली
७ प्रत्यक्ष खुणा नष्ट करून भागणार न्हवतेच म्हणून मग इंग्रजांनी मराठ्यांना अभ्यासक्रमातून पूर्ण उखडले शिवाय शिवाजी महाराजांना दरोडेखोर म्हणायला सुरवात केली जो शिवाजी महाराजांचाच नाही तर समस्त मराठ्यांचाच अपमान होता भारतभर अभ्यासक्रमातून मराठ्यांची बदनामी केली गेली जेम्स मिलसारखा माणूसही इतक्या टोकाला गेला कि त्याने अजंठा वेरूळची लेणी ही महाराष्ट्रीयांनी तयार केली नसून ती जमिनीतून उगवलेत असं म्हणायला सुरवात केली एक प्रचंड खोटेपणा मराठ्यांच्याविरुद्ध इंग्रजांनी उभा केला आणि इंग्रज स्पॉन्सर्ड इतिहास शिकलेले नेहरूंसारखे लोक मराठ्यांचा द्वेष करायला शिकले आणि खुद्द मराठेही न्यूनगंडाने ग्रासले गेले
८ इतर प्रांतांनी मुळात आधीच स्वातंत्र्य गमावले होते त्यांच्यादृष्टीने मराठेही परके होते आणि इंग्रजही त्यामुळे एक परकीय राजा जाऊन दुसरा परकीय राजा आला अशीच भावना अनेक ठिकाणी होती मराठ्यांचे तसे न्हवते त्यांनी राज्य गमावले होते हीच गोष्ट शिखांचीही होती आणि हीच गोष्ट बंगालची होती त्यामुळेच हिंदुत्ववादाचे पहिले तीन धारकरी हे ह्या प्रांतातून बाल लाल पाल म्हणून पुढे आले ह्यातील टिळकांनी स्वतःचे नेतृत्व हे राष्ट्रीय नेतृत्व म्हणून प्रस्थापित करण्यात कमालीचे यश मिळवले
९ थोडक्यात काय अत्रे म्हणायचे तसे इतरांना भूगोल होता व ह्या तीन प्रांतांना स्वराज्याचा इतिहास होता जो इंग्रजांनी धुळीस मिळवला
१० ह्यातूनच दोन गोष्टी घडल्या
अ आपण इंग्रजांच्यापुढे का हरलो ?
आ आपण इंग्रजांना हरवू कसे शकतो ?
इ आणि हिंदूंना इंग्रजांविरुद्ध कसे संघटित करायचे
असे तीन मुख्य प्रश्न उभे ठाकले
महाराष्ट्रात आपण इंग्रजांच्यापुढे
का हरलो ? ह्याची मीमांसा भास्कर पांडुरंग तर्खडकर , लोकहितवादी , नाना शंकर शेठ , बाळशास्त्री जांभेकर अशा अनेकांनी केली पुढे यात रानडे , दादाभाई नौरोजी आणि गोखले ह्यांनी मोलाची भर टाकली सध्या इंग्रजांना हरवता येणे शक्यच नाही असा एक दृष्टिकोन प्रस्थापित झाला व त्यातूनच पुढे नेमस्त काँग्रेसवाद जन्मला
ह्याउलट आपण इंग्रजांना त्यांच्याच मैदानात त्यांच्या पद्धतीने हरवू शकतो असा दुर्दम्य आत्मविश्वास काहींना वाटायला लागला ह्या लोकांच्यापुढे एकच प्रश्न होता तो म्हणजे हा आत्मविश्वास लोकांच्यात कसा निर्माण करायचा ? आणि त्यांना संघटित कसे करायचे
चिपळूणकरांना ह्या प्रश्नाचे उत्तर सापडले इतिहासात ! आणि ह्यातूनच हिंदुत्ववाद्यांचा पणजोबा जन्मला चिपळूणकर हे टिळकांचे गुरु होते तर टिळक सावरकरांचे ! म्हणजेच हिंदुत्ववादाची मांडणी करायची असेल तर
१ विष्णुशास्त्री चिपळूणकर व स्वामी दयानंद सरस्वती पणजोबा
त्यांचे चुलत भाऊ इतिहासाचार्य राजवाडे
२ लोकमान्य टिळक आजोबा
त्यांचे चुलतभाऊ लाला लजपत राय व बिपीनचंद्र पाल
३ विनायक दामोदर सावरकर वडील वा बाप
त्यांचे चुलतभाऊ प्रबोधनकार ठाकरे व ए मुखर्जी
अशी मांडणी करावी लागते
विष्णुबुवांनी पणजोबाचे कार्य कसे पार पाडले?
तर त्यांनी निबंधमालेत
सर्वात प्रथम हिंदुत्व हा शब्द वापरला ( निबंधमाला पान क्र १०४) आपल्या सर्वांची समजूत हा शब्द सावरकरांनी वापरला अशी असते म्हणून हे इथे सांगतो आहे
त्यांनी हे हिंदुत्व प्रथम इतिहासात " इतिहास " हा दीर्घ निबंध लिहून उभे केले आणि भाषेची चर्चा करून त्याला एक चिन्हीय स्वरूपही दिले हिंदुत्ववादाच्या इतिहासात चिन्हांना जे कमालीचे महत्व प्राप्त झाले आहे त्याचे कारण चिपळूणकरांनी चिन्हांना दिलेले महत्व होय महात्मा फुले एकीकडे बळीवंश निर्माण करत होते तर चिपळूणकर हिंदुत्ववादी वंश आणि ह्यातूनच पुढची प्रातःस्मरणीय लोकांची यादी बनत गेली
१८७४ साली त्यांनी निबंधमाला लिहायला सुरवात केली मराठीत एकहाती मासिक चालवण्याचा आद्य मान चिपळूणकरांना जातो पुढे मग नाना जोशी व विश्वास पाटील ह्यांनी नवे क्षितिजचे काही अंक असे सिंगल हँडेड काढले आहेत मलाही सौष्ठवचे काही अंक असे काढावे लागले आहेत
चिपळूणकरांनी लॉक वैग्रे लोक चाळले असावेत तसा उल्लेख त्यांच्या इतिहास ह्या निबंधात आहे (निबंधमाला पान क्र ७०)माणसाचे मन जन्मतः आरशासारखे कोरे असते ही लॉकची मांडणी ते सादर करतात
त्यांच्याप्रमाणेच आणखी एक गुजराती स्वामी दयानंद सरस्वती हेही हिंदुत्ववादाचे पणजोबा होते असे सहज म्हणता येईल मोदी व भागवत हे गुजराती मराठी कॉम्बिनेशन फार पूर्वीपासूनच आहे दयानंद सरस्वती आणि चिपळूणकर ह्या दोघांनीही आमची संस्कृती ही पाश्चात्य संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ आहे अशी मांडणी सुरु केली इतिहासावरील निबंधात जॉन माल्कम व कोलब्रुक ह्यांची साक्ष चिपळूणकर काढतात हिंदू पराभूत झाल्याने हिंदूंच्याविषयी वाटेल ती मते युरोपियन व्यक्त करतात पण त्यांच्या प्राचीन ग्रंथात मात्र हिंदुस्तानविषयी आदरच दिसतो असे ते म्हणतात मेकॉलेची जेवढी टर चिपळूणकरांनी उडवली आहे तेव्हढी क्वचितच कुणी उडवली असावी जेम्स मिलच्या इतिहासात हिंदूंची केवळ निंदानालस्ती कशी आहे तेही ते दाखवतात वेरूळची लेणी ही जमिनीतून उगवलेली असावीत वा आकाशातून टपकली असावीत ह्या मिलच्या मताला ते झोडपतात मॉरिसच्या इतिहासाचीही अशीच चिरफाड ते करतात आणि एन्साय्क्लोपीडियाचेही वाभाडे काढतात
हिंदूंच्या दैदिप्यमान इतिहासात वर्णाश्रम संस्थेचा काय परिणाम आहे ह्याची चर्चा न करताच ते पूर्वजांची ग्वाही देत तिचे समर्थन करतात जेव्हा तुम्हाला समाजव्यवस्थेविषयी प्रश्न टाळायचे असतात तेव्हा तुम्ही आपोआपच इमोशनल मुद्दे उभे करू पाहता चिपळूणकर हेच करतात
चिपळूणकरांच्या मते समाजव्यवस्था दुय्यम असून कुठल्याही राष्ट्रात जोम किती आणि राष्ट्राविषयी प्रेम किती हे महत्वाचे ! आरएसएस उठसुठ जोश का निर्माण करते त्याचे मूळ चिपळूणकरांच्यात आहे चिपळूणकर वर्णाश्रम व्यवस्थेचे समर्थक आहेत पुढे इतिहासाचार्य राजवाडे त्यांना येऊन मिळाले आणि ह्या दोघांनी वर्णाश्रमधर्म हाच महाराष्ट्रधर्म असा अपप्रचार सुरु केला इतिहासाच्या आधारे देशप्रेम जागृत करण्याचा खेळ चिपळूणकर यशस्वीरीत्या खेळतात असे दिसते
इतिहासाने व राष्ट्रप्रेमाने आंधळ्या झालेल्या माणसाला स्वतःच्या समाजरचनेचे प्रश्न दिसत नाहीत चिपळूणकरांचेही हेच होते .
थोडक्यात काय
१इतिहासाचा गौरव करणे
२ राष्ट्रभक्तीचा जोश सर्वात महत्वाचा मानणे
३ वर्णाश्रम व्यवस्थेचे समर्थन करणे
ही हिंदुत्ववादाची स्ट्रॅटेजी प्रथम चिपळूणकर डिझाईन करून देतात
इतिहासाच्या आधारे देशप्रेम जागृत करण्याचा खेळ चिपळूणकर यशस्वीरीत्या खेळतात .
म्हणूनच मी म्हणालो टिळक जर हिंदुत्ववादाचे आजोबा असतील तर चिपळूणकर हिंदुत्ववादाचे पणजोबा आहेत
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
घोड्यावर बसायचे ठीक आहे पण घोडा जाणार कुठे चिपळूणकरांचा घोडा व टिळक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती २१श्रीधर तिळवे नाईक
विशेष टीप :तुम्ही मोदींच्याविषयी काय विचार करता त्याच्या आधारे इतिहास रचला जाऊ शकत नाही किंवा तू अडचणीत असतांना हे लिखाण कोण करतंय नक्की तूच ना ? असा संशयही व्यक्त करून फायदा नाही मी मोदींच्या अर्थव्यवस्थेवर ६ व्याख्याने टाकली होती व ठाकरे , मुखर्जी व सावरकर ह्यांच्या हिंदुत्ववादावर ६ कारण ह्या देशात हिंदुत्ववाद सत्तेवर आहे आणि इथे त्यामागील त्याची पाळेमुळे मांडणे हे माझे मिशन आहे पण हे करतांना हिंदुत्ववादी म्हणजे कोणी मूर्ख हे गृहीतक मला मान्य नाही राहिली गोष्ट वेळेची तर अडचणीत असलो तरी आणि तिकडेच लक्ष्य असले तरी मागे सांगितलेलीच गोष्ट सांगतो मी २००५ ते २०१० हा कालखंड इतिहासाला दिला होता व शैव पॅरेडाईम्स अँड यूरोअमेरिकन पॅरेडाईम्स हा ग्रंथ सिद्ध केला होता तोच मी इथे संक्षिप्त करून इंग्रजीतला मजकूर मराठी करून मांडत असतो व मांडत आहे त्यामुळे ग्रंथ वा कागदपत्रे वाचन करण्याची मला गरज नसते जे सर्वात वेळखाऊ काम आहे त्यामुळे मी माझी कामे करून मगच हा लेखनप्रपंच करत असतो हिंदुत्ववादाची वैचारिक मीमांसा टाळून आणि काही मूर्ख भाजप कार्यकर्त्यांच्या वाचाळ कृतीच्या आधारे हिंदुत्ववादाचे मूल्यमापन करायचे ठरवले तर हिंदुत्ववाद कधीही कळणे व हरणे शक्य नाही हिंदुत्ववादातलं सर्वच चुकीचं हेही मला मान्य नाही मी खरं खोटं पाहतो उगाच फिक्शनच्या आहारी जाण्याची माझी तयारी नसते माझा इतिहास हा खुद्द हिंदुत्ववाद्यांच्याही पचनी पडत नाही पण जर चिपळूणकर हिंदुत्व हा शब्द वापरत असतील तर त्याकडे आपण लक्ष्य देणार आहोत कि नाही ? मी टिळकांना आद्यहिंदुहृदयसम्राट म्हणतो म्हणून काही जणांना मिरच्या झोंबल्या आहेत त्यांना असे वाटते कि मी हे करून काँग्रेसला अडचणीत आणत आहे वस्तुस्थिती अशी आहे टिळक आपल्या अडचणीचे आहेत हे काँग्रेसने फार पूर्वीच ओळखले होते त्यामुळेच महाराष्ट्र सदनात सर्वांचे पुतळे होते पण टिळकांचा न्हवता तो देवेंद्र फडणवीसांनी बसवला हा काही योगायोग न्हवे हा इतिहासगत न्याय आहे दुसरी गोष्ट आपण आता एकविसाव्या शतकात आलो आहोत बहुजन समाजातील राजवटीचे काय झाले ते आपण डोळ्यांनी पहात आहोत १९६० पासून भारतात बहुजनांची सत्ता होती ती जवळ जवळ २०१४ पर्यंत आता वेळ आलीये हिशेब तपासण्याची खरोखर काय साधले हे आता आपण बघायला नको काय ? ब्राम्हणांनी काय केलं ह्याची झाडाझडती घेतांना बहुजन समाजानेही काय केले ह्याचीही झाडाझडती घ्यायला नको काय ? हिंदुत्ववाद्यांचे वेद पूजनीय तसे बहुजनांचे फुले आंबेडकरांचे ग्रंथ आपण वेद बनवणार आहोत काय फुल्यांच्या मर्यादा आंबेडकरांच्या मर्यादा आपण तपासणार आहोत कि नाही कि बहुजनसमाजही ह्यांच्या लेखनाचे रूपांतर वेदात करणार आहे ?
------------------------------------------------------------------------------------------------------------------
मागील प्रकरणात आपण विष्णुशास्त्री चिपळूणकर व टिळक व हिंदुत्व ह्यांची लिंक मांडली प्रश्न असा आहे कि टिळकांनी चिपळूणकरांच्याकडून नेमके काय घेतले ? त्यासाठी चिपळूणकरांचा दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक आहे
१८५७ च्या सरंजामवादी स्वातंत्र्ययुद्धामुळे भारतातील राजकीय परिस्थिती बदलली
१८५७ च्या युद्धाला घाबरून काढलेल्या राणीच्या जाहीरनाम्याला मॅग्ना चार्ट समजून रानडेंचे राजकारण सुरु झाले जे चिपळूणकरांना अमान्य होते चिपळूणकरांचा प्रॉब्लेम हा होता कि ते रोग सांगत होते पण उपचार सांगत न्हवते आमच्या देशाची सद्यस्थिती ह्या निबंधात त्यांनी त्याचे समर्थनही केले होते त्यांनी ह्या निबंधात
१ आमच्या राज्यकर्त्यांची स्थिती
२ एत्तद्देशीय राजवाड्यांची स्थिती
३ सामान्य लोकांची स्थिती
अश्या तीन स्थित्यांची मांडणी केली होती इंग्लंडमध्ये ग्लॅडस्टन पंतप्रधानपदी आल्याने काही बदल व्हावेत ह्या आशेने हा निबंध लिहिला आहे ह्या निबंधावर पुढे ब्रिटिश सरकारने बंदी घातली जी १९०८ नंतर काँग्रेस सरकारने उठवली कारण त्याकाळी चिपळूणकर टिळकांचे गुरु होते हे काँग्रेसला माहीत होते
फारुखसियर बादशहाला डॉकटर मिल्टनने कसे बरे केले आणि पदरी मद्रासमधील तीन गावे जमीन कशी पाडून घेतली व कलकत्त्यात ३७ गावे खरेदी करण्याची परवानगी कशी मिळवली जिथे पुढे वखारी झाल्या इथून सुरवात करून चिपळूणकर इतिहास मांडत जातात यूरोपियनांची विद्या त्यांना हवीच आहे पण राज्य नको आहे ग्रीक रोमन विद्येमुळे जसे युरोपचे चैतन्य त्यांना प्राप्त झाले तसेच संस्कृतविद्येमुळे होईल असे त्यांना वाटत होते इंग्रजांच्याकडे ते एक जात म्हणून पाहत होते आर्यांनाही ते एक जात म्हणून पहात होते हे इंटरेस्टिंग आहे कि एकीकडे चिपळूणकर राजवाडे आर्यवादी तर दुसरीकडे फुले अनार्यवादी ! मात्र फुले जसे दंतकथात इतिहास शोधत होते तसे चिपळूणकरांचे न्हवते ते पुराण रामायण महाभारत ह्यांच्यातील कथांना काल्पनिक मानत होते हे लक्ष्यात घेण्यासारखे आहे ह्या काल्पनिक गोष्टी यंत्रविद्येमुळे आता प्रत्यक्ष येत आहेत असे ते मानत होते असे दिसते त्यांच्याच शब्दात सांगायचे तर पूर्वी खरा देव बाजूला पडून खोटे देव माजले होते इंग्रजांच्या आगमनामुळे लोक खऱ्या देवाकडे वळण्याची जास्त शक्यता आहे असे त्यांना वाटे इंग्रज लोक अंतर्ज्ञान पावले तर रेल्वे इंजिन तयार करणाराही किंवा तारायंत्र जुळवणाराही ह्या देशात मिळेल कि नाही ह्याची त्यांना शंका आहे
चिपळूणकर म्हणतातच कि कुठल्याही स्वदेशी राजापेक्षा अधिक स्वातंत्र्य इंग्लिश राजवटीत आहे कारण प्रत्येकजण आपला विचार मांडू शकतो जे पूर्वी अशक्य होते राजे लोकांची ते खिल्लीच उडवतात बुद्धिबळात जेव्हढे सैन्य तेवढेच आणि तसेच ह्यांचे सैन्य असे ते वर्णन करतात हे लोक आत्ताच्या सरकारच्या मुठीत आहेत त्यामुळे ह्यांच्याकडून त्यांच्या अपेक्षाच नाहीत समस्त प्रजा इंग्रजांची बैल बनली आहे आणि इंग्रजांच्या कायद्याप्रमाणे सर्व मुल्क सर्व झाडे इंग्रजांचीच आहेत
इंग्रज काही संत न्हवते किंवा भारतीय जनतेचे भले करण्याचा कोणताही ध्यास त्यांना न्हवता लुटायला आलेल्या दरोडेखारांच्यासारखेच ते होते ह्याची जाणीव ते वारंवार करून देतात इंग्रज भारतीयांच्या व हिंदुस्तानच्या लोककल्याणासाठी आलेत आणि असे लोककल्याण झाले कि ते निघून जाणार ही दंतकथा ते वेगवेगळ्या तर्काने नामशेष करतात फुले इंग्रजी राजवटीकडे देवाचा कृपाप्रसाद म्हणून पहात होते तिला तसे समजत होते तसे चिपळूणकर समजत नाहीत
जर का इंग्रज आले नसते तर मराठ्यांनी संपूर्ण देशच निर्यवन केला असता असा दावा ते करतात आम्ही त्या स्थितीत आलो होतो पण इंग्रजांनी फाटाफुटीचे व भाऊबंदकीचे राजकारण करून मराठ्यांचे मिशन थांबवले असे ते दर्शवू पाहतात डबक्यातल्या बेडकांना जसा देवाने राजा म्हणून ओंडका पाठवून दिला तसे इंग्रज आहेत असे ते म्हणतात
इंग्रजच्याशिवाय आमचे काय पूर्वी चालत न्हवते काय असा प्रश्न ते विचारतात त्यामुळेच आम्ही स्वातंत्र्याला लायकच नाही आहोत व पारतंत्र्यातच आमचे कल्याण आहे हीत आहे ही तत्कालीन दोन्ही मते ते नाकारतात पुढची दिशा ठरवता येत नाही त्यामुळे पुढे काय हे सांगणे कठीण आहे . आधी घोड्यावर तरी बसा असा त्यांचा आग्रह आहे आणि जे बसणार नाहीत त्यांना ते रडतराउ म्हणतात
आज आपण हे सर्व नीट वाचले कि स्पष्ट दिसते कि ते रोग दाखवतात आणि उपचार गुप्त ठेवतात कारण उपचार पेशवाई आणणे हाच आहे नाहीतर मग वर्णाश्रमधर्माची इतकी तरफदारी का ? चिपळूणकर म्हणतात कि कायदे होते पण काय लायकीचे कायदे होते ह्याची ते चर्चा करत नाही एक प्रकारची गंडवागंडवी ह्यात दिसते आणि फुल्यांसारखे लोक ह्याला फसले नाहीत ते बरेच झाले असे वाटते तुम्ही जेव्हा इतिहासातून एखादी विचारप्रणाली उभी करू पाहता तेव्हा इतिहासातील काय तुम्ही स्वीकारता आणि काय नाकारता हे तर तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता आणि जर आर्यावर्त आणि वर्णाश्रम तुम्ही स्वीकारता असे म्हणता तर त्याचा अर्थ स्पष्टच असतो कि तुम्ही वर्णजातिव्यवस्था आणणार मग एव्हढी तुमची विदवत्ता काय चाटायची आहे ? तुम्ही जर समतांच स्वीकारत नसाल तर स्वातंत्र्य काय कामाचे ? तुम्ही बंधुता मानत नसाल तर मग तुमच्या धर्माची लायकी काय ? तुम्ही उत्तरपेशवाईतील अस्पृश्यतेविषयी एक शब्द बोलत नाही ह्याचा अर्थ तुम्हाला ती नष्ट करायचीच नाहीये असाच होत नाही काय ?
टिळकांच्यावर चिपळूणकरांच्यावर पडलेला सर्वात पॉझिटिव्ह परिणाम म्हणजे ज्यावेळी लोक आपली स्वातंत्र्य व्हायची लायकीच नाही म्हणत होते त्यावेळी टिळक ठामपणे आपली स्वराज्याची लायकी आहे असे म्हणत आले हम भी कुछ कम नहीं ही जाणीव पसरवण्यात टिळकांचा जेव्हढा हात आहे त्या हाताला इतिहासप्रधान मीमांसेचा आधार आहे आणि तो चिपळूणकरांच्यापासून सुरु होतो जेव्हा वर्तमानात अंधार असतो तेव्हा इतिहासातच दिवे शोधावे लागतात चिपळूणकरांनी असे दिवे शोधण्याची जी परंपरा सुरु केली ती टिळकांनी कंटिन्यू केली आहे
मात्र कुठे जाणार ह्याबाबत टिळकांचे सगळे राजकारण १९१४ पर्यंत चिपळूणकरी पद्धतीने चाललेले दिसते मात्र एक फरक आहे टिळकांना राजकीय कृती काय करायची हे नीट माहित होते म्हणजे युद्धात लढायचे कसे हे त्यांना माहीत होते पण स्वराज्याचा घोडा कुठे जाणार हे तेही सांगत न्हवते मंडाले मधून बाहेर आल्यावर त्यांच्या बऱ्याच भूमिका बदलायला लागल्या कर्माप्रमाणे वर्ण ही तर ठाम भूमिका होत गेली म्हणून त्यांचे बाकी सगळे ब्राम्हण सहकारी काँग्रेसवासीय विरोध करत असतांना गांधींना त्यांनी प्रवेश दिला पाहिजे अशी भूमिका घेतली आणि गांधींनी घेतलेल्या कार्यक्रमाला मीही हेच केले असते म्हणत पाठिंबाच दिला म्हातारपणी तत्वज्ञ अधिक आधुनिक होत जातात तर विचारवंत कर्मठ ! भारतात हे टिळक , गांधी , आंबेडकर ह्या तिघांच्याबाबतीतही घडलेले दिसते पण आश्चर्याची गोष्ट अशी कि त्यांच्या अनुयायांना व विरोधकांना हे बदल मानवलेले दिसत नाहीत दोघांनाही ह्या नेत्यांच्या कर्मठ चेहऱ्यात इंटरेस्ट आहे कारण त्यातच ह्यांचे राजकीय व सामाजिक फायद्याचे हितसंबंध गुंतलेले आहेत
श्रीधर तिळवे नाईक
टिळक आणि काँग्रेसचे अध्यक्षपद
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती २२ श्रीधर तिळवे नाईक
भारतीय राजकारणात एक उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग टाईपची लीडरशिप असते दुसरी एक लीडरशिप असते ह्या जन्मात नाहीतर पुढील जन्मात मोक्ष मिळवू अशी लांबणीखोर आणि तिसरी जिला आज स्पिरिट म्हंटले जाते जिला मी बधिरता म्हणतो ती जी १८५० नंतर चिकट म्हणून उदयाला आली होती ती ! ह्या जमातीचा ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर विश्वास होता
ब्रिटिशही असे दूर्लक्ष्यखोर कि त्यांनी कायदे करायचे पण अंमलबजावणी करायची नाही असा एक महामंत्र शोधून काढला जो आजही भारतीय शासनव्यवस्थेचा महामंत्र आहे साहजिकच १८३३ ला बनवलेल्या कायद्यानुसार ज्या जागा भारतीयांना प्रशासनात द्यायला हव्या होत्या त्यातील एकही जागा १८५३ पर्यंत भरली गेली नाही तरीही रानडे व दादाभाई नौरोजी ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर विश्वास ठेवून होते दादाभाईंच्या शब्दात ह्या काळात मौन पाळले तर इंग्रज राजवटीबाबत तुम्ही समाधानी आणि आवाज उठवलात तर देशद्रोही अशी भारतीयांची अवस्था होती
जगात फक्त कधीच वर्गसंघर्ष वा वर्णसंघर्ष वा जमातसंघर्ष वा लिंगसंघर्ष वा जातसंघर्ष असत नाही ह्यांच्या बरोबरीने एक राष्ट्रसंघर्ष व राज्यसंघर्षही अस्तित्वात असतो विशेषतः जेव्हा एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला दास बनवते तेव्हा तर हा संघर्ष टोकाला पोहचलेला असतो हा संघर्ष फक्त राजकीय रहात नाही तर तो हळूहळू धार्मिक , आर्थिक सांस्कृतिक होत जातो आणि पराजितांना धार्मिक , आर्थिक , राजकीय ,सामाजिक आणि सांस्कृतिक न्यूनगंड देत जातो भारतीय ह्या काळात अशा न्यूनगंडात सापडलेले दिसतात प्रथम मुस्लिमांनी हे न्यूनगंड दिले जे शीख मराठा आणि लिंगायतांनी झुगारले मग ब्रिटिशांनी दिले आणि त्यांना प्रथम चिपळूणकरांनी झुगारले पण चिपळूकर अपवाद होते एरव्ही सगळीकडे ब्रिटिशांशी सलोखा ठेऊन हक्क मागून घ्यायची वृत्ती होती कारण भारत १८५७ ला वाईट तऱ्हेने हरला होता फक्त चिपळूणकरच होते जे ह्या पराभवातले छोटे छोटे जयाचे तुकडे दाखवून विजयी होऊ शकतो असं दाखवत होते
ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा राष्ट्रीय सभा काँग्रेस स्थापन झाली तेव्हा ती एक मोजक्या मवाळ लोकांची चळवळ होती जिला कायद्याची अंमलबजावणी हवी होती आणि राज्यकारभारात वाढीव सहभाग हवा होता हे लोक इंग्रज आणि हिंदवी ह्यांच्यात सख्य घडेल अशी आशा बाळगून होते कारण मुस्लिमांच्याबाबतीत हे पूर्वी घडले होते ह्या लोकांच्या लक्ष्यात एक गोष्ट येत न्हवती ती म्हणजे मुस्लिमांना दळणवळणाच्या त्या सोयी प्राप्त झाल्या न्हवत्या ज्या इंग्रजांना प्राप्त झाल्या न्हवत्या मुस्लिमांना घोड्यावर बसून पुन्हा माघारी जाणे परवडणारे न्हवते आणि मुळात अनेकांना माघारी फारसे काही न्हवतेच ज्यांना होते ते तैमुरलींग गझनी सारखे निघूनही गेले इंग्रजांना मात्र भारतापेक्षा अधिक संपन्न असा देश उपलब्ध होता आणि दळणवळणाच्या सोयीही ! त्यामुळे ह्या दोन वेगळ्या केसेस होत्या आणि हेच सख्ख्यवाद्यांच्या लक्ष्यात येत न्हवते आगरकरांनी तर अधिकारी -अनाधिकारी कांचन -निष्कांचन स्वतंत्र व परतंत्र ह्यांच्यात मैत्री होऊच शकत नाही असे प्रतिपादन केले होते शेवटी भारतातच दोन राष्ट्रे निर्माण झाली होती ब्रिटिश इंडिया आणि इंडियन भारत आणि ह्या दोन्हीत संघर्ष अटळ होता मुख्य म्हणजे शेतकऱ्यांची दैना आणि भारतीय व्यापाराची वाताहत दोघांना एकत्र आल्याशिवाय थांबणार नाही ह्याची जाणीव व्हायला लागली होती स्वतःतले वर्णसंघर्ष व जातिसंघर्ष बाजूला ठेऊन राष्ट्रसंघर्ष करावा असे काहीजणांना वाटत होते वासुदेव फडक्यांच्या बंडात काही रामोशी सामील झाले होते
शेवटी जेव्हा १८५७ ते १८७५ -८० ह्या राणीच्या अठरा -तेवीस वर्षाच्या कालखंडात काहीच घडलं नाही तेव्हा चिपळूणकर आगरकर आणि टिळक ह्या तिघांच्याही लक्ष्यात आलं कि संघर्ष अटळ आहे आणि त्याची सुरवात स्वराज्यानेच होऊ शकते राजकीय हक्क कोणी भीक म्हणून घालत नाही त्यासाठी चळवळ उभी करावी लागते हे ह्यांना उमगले होते त्यासाठी वेळप्रसंगी तुरुंगात जाण्याची ह्या दोघांची तयारी होती प्रश्न होता कायदेशीर चौकटीत चळवळ कशी उभी करायची त्याचे उत्तर लोकहितवादींनी दिले होते आणि दादाभाई नौरिजींनी कन्फर्म केले होते ते होते बहिष्कार
टिळकांनी ह्यासाठी लोकांना शिक्षण देण्यासाठी शिक्षणसंस्था मग केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे आणि पुढे लॉचे क्लासेस काढले पण राजकीय जागृतीसाठी ह्यापेक्षा काहीतरी अधिक हवे होते आणि त्यावेळीच काँग्रेस स्थापन झाली ह्या तिघांतील चिपळूणकरांचे निधन झाले पण नंतर टिळक आगरकर दोघेही काँग्रेसवर बारकाईने नजर ठेऊन होते
डोंगरीच्या तुरुंगात असतांना हे दोघेही तुरुंगात आता येणे कसे टाळावे आणि अशा कोणत्या अपरिहार्य गोष्टी आहेत कि ज्यामुळे तुरुंग मिळाला तरी चालेल ह्यावर चर्चा करत होते
सरकार ही संस्थाच अशी आहे कि ती तुम्हाला स्वर्ग देऊ शकत नाही पण नरक मात्र निश्चितच निर्माण करू शकते ब्रिटिश सरकार ह्याला अपवाद न्हवते ह्या सरकारविरुद्ध वासुदेव बळवंत फडके ह्यांनी केलेलं बंड फसले होते आणि दुसरीकडे राष्ट्रीय सभा होती ह्या दोन्हीचा समतोल काढणे आवश्यक होतं .
ह्या वर्षात काँग्रेसमध्ये काय चालले होते?
काँग्रेस ही आर्टिफिशियल पीस अँड स्टॅबिलिटी मेकर म्हणून ह्यूमनें जन्माला घातली होती हे आपण पाहिले आहेच आणि ब्रिटिश ऑफिसर्संनी ती जन्माला घातली होती म्हणूनच सरकारने ती बंद पाडली न्हवती हेही खरं होतं . काँग्रेसचे १८८५ ते १८९० ह्या कालखंडातले अध्यक्ष त्यामुळे गैरहिंदू होते तीन ख्रिश्चन दोन पारशी व एक मुस्लिम सातवे अध्यक्ष होते दक्षिण भारतीय रायबहादूर आनंद चारळु ! मुंबईतल्या ह्या राष्ट्रीय संघटनेत मराठी माणसाला अध्यक्षपद मिळाले ते तब्बल २० वर्षानंतर १९०५ साली कारण तो सर्वाधिक ह्या पदासाठी लायक होता त्याचे नाव बॅरिस्टर गोखले त्यांना टाळता येणे शक्यच न्हवते न्यायमूर्ती रानडेंना त्यांच्या हयातीत अध्यक्षपद मिळालेच नाही रघुनाथ मुधोळकर ह्यांना एकदा ते १९१२ साली मिळाले त्यानंतर मराठी माणसाला तब्बल २०१९ पर्यंत ते मिळालेले नाही म्हणजे १०० हुन अधिक वर्षे काँग्रेसने मराठी माणसाला अध्यक्षपद दिलेले नाही आश्चर्य म्हणजे लोकमान्य टिळकांना कधीही काँग्रेसचे अध्यक्षपद एकदाही मिळालेले नाही काँग्रेस नेहमी सांगते कि गांधी हत्येमुळे हे घडले पण त्याआधीही काँग्रेस मराठी माणसांच्याबाबतीत नालायकगिरी करतच होती लोकमान्य टिळकांना काँग्रेसने कधीही आपला नेता म्हणून मनापासून मान्यता दिलेली नाही तरीही टिळकांनी टिळकयुग निर्माण केले आणि काँग्रेसने केवळ स्वतःचा फैलाव व्हावा म्हणून टिळकांना वापरले टिळकांना हा अंतर्गत विरोध माहित असूनही त्यांनी स्वराज्याचा लढा चालूच ठेवला एका अर्थाने टिळक हे बाहेरूनच आउटसायडर म्हणूनच काम करत होते
ह्याची कारणे काय होती ?
श्रीधर तिळवे नाईक
काँग्रेसच्या आऊट सायडर कंट्रोलचे पायोनियर : लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग २३ श्रीधर तिळवे नाईक
मागील भागात लोकमान्यांना काँग्रेसने एकदाही अध्यक्षपद दिले नाही हे आपण पाहिले तरीही लोकमान्यांनी कधीही काँग्रेस सोडली नाही ह्यामागे काय कारण होते ?
काँग्रेस कशीही असली तरी तिच्यामागे प्रशासकीय अधिकारी होते त्यामुळे टिळकांना मते मांडण्यासाठी आवश्यक असलेला फ्लॅटफॉर्म पुरवत होती साहजिकच पुन्हा नवीन संस्था काढून त्यात वेळ खर्च करणे टिळकांच्या गणितात बसले नाही
दुसरी गोष्ट मुळात काँग्रेसची स्थापना हीच आऊटसायडर ब्रिटिश ऑफिसर्स लोकांनी केली होती टिळकांनी ह्यूमचे नेतृत्व रिप्लेस करून स्वतःचे नेतृत्व पुढे आणले गोखले ह्या काळात
काँग्रे स
गीतेतील योनीव्यवस्था आणि टिळक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग २४ श्रीधर तिळवे नाईक
मागील भागात आपण पाहिले कि भगवान श्रीकृष्णांनी योनिविचार कसा मांडला ?
वैदिकांनी आडवी कर्मकेंद्री वर्णव्यवस्था मांडली तर ब्राम्हण धर्माने उभी जन्मवादी वर्णव्यवस्था ह्या दोन्हींना छेद देत श्रीकृष्णांनी दिलेली योनिव्यावस्था वैष्णवांनी स्वीकारली ही योनीव्यवस्था काय होती ?
वैष्णवांनी जी योनीव्यवस्था मांडली ती जन्मवादी आणि कर्मवादी ह्यांचे त्रांगडे होती म्हणजे जन्म झाला तो योनीनुसार पण ह्या जन्मी पुण्यकर्म केले तर पुढच्या जन्मी पुण्ययोनी मिळणार असा हा सिद्धांत होता ह्या योनीव्यवस्थेत कर्माचे फळ मिळणार पण ते पुढील जन्मात मात्र ह्या जन्मात तुमचा वर्ण जन्मानुसार असणार होता त्यामुळेच व्रतवैकल्य यज्ञ उपासतापास पूजा अर्चना दान पान करून पुढील जन्मात पुण्ययोनी प्राप्त करण्याची सोय होती त्यामुळे साहजिकच पुढील जन्मात पुण्ययोनी प्राप्त करण्याच्या व पुण्य संपादन करण्याच्या कामात वैश्य व शूद्र गुंतून पडले आणि ह्यातून मिळणाऱ्या दक्षिणेवर ब्राम्हण गब्बर झाले ह्या योनिव्यावस्थेमुळेच कर्ण ह्या जन्मानुसार सूतपुत्र होता व कुंतीने रहस्य सांगितल्यावर ताबडतोब ह्या जन्मी क्षत्रिय ठरून राज्य करायला लायक झाला
वैष्णव संतांचे तर्कशास्त्रही ह्या योनिव्यावस्थेनुसार चालते मात्र मोक्ष मात्र जर तुम्ही विष्णू राम कृष्ण ह्यांना किंवा ह्यांच्या अवतारांना शरण गेलात कि मिळतो कारण तशी गॅरंटी खुद्द भगवान कृष्णांनी भगवद्गीतेत दिलेली आहे
जिच्या आधारे वारकरी चळवळ उभी होती व आहे म्हणजे ह्या जन्मात वर्ण जन्मानुसार व पुढील जन्मात वर्ण कर्मानुसार मात्र मोक्ष तुमच्या भक्तीनुसार वा साधनेनुसार अशी ही व्यवस्था आहे ती आपल्याकडच्या विचारवंतांना कधीच कळली नाही हे दुर्देव ! म्हणूनच पुन्हा एकदा तिची चर्चा केली असो
ब्रिटिशांच्या आगमनानंतर ब्राम्हणांचा हा पुण्ययोनी व पुण्य कमावून देण्याचा उद्योग घसरणीला लागला कारण क्षत्रिय मांडलिक झाले तर पापयोनीतले वैश्य बुडाले तर शूद्र देशोधडीला लागले तर अयोनिज अंत्यजांना ब्रिटिश सत्तेने अचानक शिक्षण व फौजेची दारे खुली केली
आता योनीव्यवस्थेवर उपजीविका चालणे अशक्य होते ब्राम्हणांनी पर्याय शोधायला सुरवात केली कारण ब्रिटिशांनी ब्राम्हणांची राज्ये व वतने हिसकावून घ्यायला सुरवात केली तर जे दक्षिणेवर अवलंबून होते असे ब्राम्हण कायमस्वरूपी दरिद्रीनारायण झाले साहजिकच ह्या दोन्ही प्रकारच्या ब्राम्हणांनी पर्याय शोधणे सुरु केले ह्यातील एक पर्याय बहुजन शैव पुजाऱ्यांना हाकलून देऊन शैवांची श्रीमंत देवस्थाने बळकावणे हा होता जो मुस्लिम काळात अतिशय प्रभावीपणे अंमलात आणला गेला होता आणि ब्रिटिश पोर्तुगीज काळात ज्याची व्याप्ती वाढवणे सुरु झाले दुसरा पर्याय ब्रिटिश शासनात नोकऱ्या शोधणे हा होता आणि काँग्रेसची पहिली मागणी शासकीय नोकऱ्या एतद्देशीयांना म्हणजे त्याकाळात अधिकतर ब्राम्हणांना खुल्या व्हाव्यात अशी होती शासन विशेषतः न्याय खाते तिसरा पर्याय स्वतःच्या शिक्षणसंस्था , प्रकाशनसंस्था , मीडियासंस्था सुरु करणे हा होता तर चौथा वैदिक धर्म अधिकाधिक सुधारून व व्यापक बनवून सर्वांसाठी खुला करून पौराहित्य व्यापक बनवून उत्पन्न कमावणे हा होता आणि पाचवा वैश्यिकरण स्वीकारून वैश्य होत डीकास्ट होत व्यापार करणे हा होता (ह्या पर्यायाची सुरवात रविंद्रनाथ टागोरांच्या आजोबांनी केली होती )
नेमकी ह्याचवेळी लॉर्ड डफरिनसारखी व्यक्ती भारतात आली होती जिला भारतीयांना राजकीय पातळीवर जाणून घेण्यात रस होता त्यामुळेच ऍलन ह्यूमनें जेव्हा सामाजिक संस्था म्हणून काँग्रेससारखी संघटना काढण्याची योजना डफरीनपुढे चर्चेला घेतली तेव्हा डफरीनने तिला सामाजिक बरोबर राजकीय करण्याच्याही सूचना केली जी ह्यूमनें स्वीकारली व २८ डिसेम्बर १९८५ ला काँग्रेस स्थापन झाली
परिणामी ब्राम्हणी प्रबोधनाची व सुरवातीच्या काँग्रेसची आख्खी चळवळ ह्या पाच पर्यायात व ब्रिटिश चौकटीत घुटमळत होती
टिळकही ह्या योनिव्यावस्थेत व पाच पर्यायात कैद होते पण त्यांनी शासकीय नोकरीचा पर्याय शोधला नाही आणि इथेच त्यांचे व आगरकरांचे वेगळेपण दिसते महात्मा फुलेंनी ब्रिटिश सत्तेकडून गुणवत्तेच्या जीवावर बांधकामाची काँट्रॅक्टस मिळवली व भक्कम बांधकामे करून दाखवली टिळकांनी हाही पर्याय नाकारला आहे
टिळकांना शासकीय नोकरी किंवा कॉन्ट्रॅक्ट न्हवे तर शासनच आपल्या ताब्यात हवे होते त्यामुळेच त्यांनी स्वशासित शाळा व महाविद्यालये सुरु केली व शासकीय अनुदान नाकारले
टिळकांची स्वशासनावरची निष्ठा सुरवातीपासूनच दिसते आणि ह्याबाबत कथनी आणि करणी ह्यात अंतर दिसत नाही त्यातूनच ब्राम्हणांना पुढे सहावा पर्याय खुला झाला तो म्हणजे पेशव्यांच्याप्रमाणे राज्यकर्ता वर्ग होणे देवेन्द्र फडणवीसांनी व नेहरूगांधी फॅमिलीने टिळकांना कायमच मुजरा करायला हवा कारण ते आज जिथे आहेत त्याचे श्रेय टिळकांना जाते
प्रश्न असा आहे कि मग ह्या आद्यहिंदुहृदयसम्राटाला राज्यकर्ता होण्यासाठी काँग्रेसमध्ये एन्ट्री मिळाली कशी ?
श्रीधर तिळवे नाईक
============================================================
काँग्रेसच्या आऊट सायडर कंट्रोलचे पायोनियर : लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग २३ श्रीधर तिळवे नाईक
मागील भागात लोकमान्यांना काँग्रेसने एकदाही अध्यक्षपद दिले नाही हे आपण पाहिले तरीही लोकमान्यांनी कधीही काँग्रेस सोडली नाही ह्यामागे काय कारण होते ?
काँग्रेस कशीही असली तरी तिच्यामागे प्रशासकीय अधिकारी होते त्यामुळे टिळकांना मते मांडण्यासाठी आवश्यक असलेला फ्लॅटफॉर्म पुरवत होती साहजिकच पुन्हा नवीन संस्था काढून त्यात वेळ खर्च करणे टिळकांच्या गणितात बसले नाही
दुसरी गोष्ट मुळात काँग्रेसची स्थापना हीच आऊटसायडर ब्रिटिश ऑफिसर्स लोकांनी केली होती टिळकांनी ह्यूमचे नेतृत्व रिप्लेस करून स्वतःचे नेतृत्व पुढे आणले दादाभाई नौरोजी व गोपाळ गोखले ह्या काळात काँग्रेसचे इन्सायडर पुढारी होते पण ताबा ब्रिटिश लोकांच्याकडेच होता
प्रश्न असा आहे कि ही आउटसायडर थेरी आली कुठून ?
तिचा उगम महाभारतात आहे गीतेत आहे नवव्या अध्यायात हा श्लोक पुढीलप्रमाणे आहे
मां हि पार्थ व्यपाश्रित्य
येऽपि स्युः पापयोनयः ।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि
यान्ति परां गतिम् ॥९- ३२॥
त्याचा अर्थ जरी स्त्रिया , वैश्य व शूद्र हे पापयोनी असतात तरी त्यांना मला शरण आल्यावर परम गती प्राप्त होते
किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या
भक्ता राजर्षयस्तथा ।
अनित्यमसुखं लोकमिमं
प्राप्य भजस्व माम् ॥९- ३३॥
आणि मग जे ब्राम्हण व राजर्षी आहेत त्या पुण्यभक्तांना काय सांगावे ?त्यांनाही मला शरण आल्यास परमगती प्राप्त होते
सर्वसाधारण निगम समाजात ह्या काळात जे जन्मजात वर्ण होते त्यांच्या श्रीकृष्णांनी तीन योनी बनवल्या होत्या
१ पुण्य योनी : ह्यात ब्राम्हण व क्षत्रिय वर्ण होते भगवान श्रीकृष्णानीं गीतेत म्हंटल्याप्रमाणे ह्या पुण्य योनी होत्या
२ पाप योनी : ह्यात वैश्य , स्त्री आणि शूद्र होते भगवान श्रीकृष्णांनी म्हंटल्याप्रमाणे ह्या पाप योनी होत्या
३ अयोनी : ह्यात अतिशूद्र आणि आदिवासी होते ज्यांना योनीचा दर्जाचं न्हवता म्हणजे ह्या अयोनी होत्या त्यांचा उल्लेख करण्याची गरज भगवान कृष्णांना वाटली न्हवती
मागील जन्मी पाप केल्याने पाप योनींना पाप योनी प्राप्त झाली होती तर पुण्य केल्याने पुण्य योनीवाल्यांना पुण्य योनी प्राप्त झाली होती ही निगमांची वर्गव्यवस्था होती आणि तिच्याकडे विचारवंतांनी कायमच दुर्लक्ष केले
भारतातील प्रस्थापित व्यवस्था ही पुण्य योनीवाल्यांची व्यवस्था आहे तर पाप योनीवाल्यांना पुण्य संपादन करून पुढील जन्म पुण्य योनीचा संपादन करण्याचा चान्स आहे त्यासाठी अनुष्ठाने व्रतवैकल्ये यज्ञ वैग्रे मार्ग होते व आहेत अतिशूद्र आणि आदिवासी हे गीतेनुसार मनुष्य योनीत मोडत नाहीत
भगवान श्रीकृष्णाने मांडलेल्या ह्या योनी सिद्धांताने सातव्या आठव्या शतकात धुमाकूळ घालायला सुरवात केली आणि वैष्णवानी सर्व व्यवस्था आपल्या ताब्यात घ्यायला सुरवात केली ह्या वैष्णवांनी प्रथम आउटसायडरची थेरी जन्माला घातली
ह्या थेरीनुसार मुख्य नेता युद्धभूमीवर नेतृत्व करतो युक्तीच्या चार गोष्टी सांगतो काय धर्म काय अधर्म ते ठरवतो थोडक्यात भगवान श्रीकृष्ण हा भारतातील निगम समाजाचा (म्हणजे वैदिक , ब्राम्हणी , वैष्णव व हिंदू ) पहिला आउटसायडर नेता आहे जो युद्धभूमीवर आहे आणि मुख्य नेताही आहे पण पक्षात नाहीये सत्तेत नाहीये तो अनऑफिशियल अध्यक्ष आहे पण पंतप्रधान नाहीये
पुढे पेशव्यांच्या काळात हेच रोल बदलले गेले जिथे छत्रपती श्रीकृष्ण आहेत तर बाळाजी व बाजीराव पेशवे अर्जुन आहेत तर उत्तर पेशवाईत छत्रपती बाजूला गेलेत आणि खुद्द पेशवे व त्यांचे शहाणे श्रीकृष्णाच्या रोलमध्ये आहेत तर शिंदे होळकर गायकवाड भोसले आणि खुद्द छत्रपती असे पाच पांडव आहेत
ह्या आउटसायडर थेरीचा नंतर इतका परिणाम झाला कि खुद्द शिवाजी महाराजांच्यासाठी दादोजी कोंडदेव नावाचा एक काल्पनिक श्रीकृष्ण विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी तयार केला तर चंद्रगुप्त व विष्णुगुप्त ह्या काका पुतण्या जोडीला चंद्रगुप्त आणि चाणक्य असे काल्पनिक स्वरूप देण्यात आले
टिळकांच्यावर चिपळूणकरांचा इतका प्रभाव इतका होता कि खुद्द काँग्रेसमध्ये टिळकांनी स्वतःचा रोल श्रीकृष्णांनुसार बेतून आउटसायडर असा केला आणि दादाभाई नौरोजी व अँनी बेझेन्ट ह्यांना अर्जुन बनवून पाठीमागून काँग्रेसचे सारथ्य केले
टिळकांच्या ह्या आउटसायडर स्टान्सचा प्रभाव महात्मा गांधींच्यावर इतका पडला कि खुद्द गांधीही काँग्रेसमध्ये आउटसायडर म्हणून श्रीकृष्णाचा रोल करत राहिले आणि पंडित नेहरू , सरदार पटेल , मौलाना आझाद , सुभाषचंद्र बोस व विनोबा भावे ह्या आपल्या पांडवांना ब्रिटिशांच्या विरुद्ध लढवत राहिले आणि लढतही राहिले .त्यांच्याही दृष्टीने काँग्रेस ही स्वातंत्र्यासाठी स्थापन झालेली एक सर्वसमावेशक संघटना होती पक्ष न्हवता
हे चिपळूणकर टिळक मॉडेल पुढे हिंदुत्ववाद्यांनी गिरवले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ श्रीकृष्ण आणि हिंदू महासभा जनसंघ व भाजप हे पक्ष अर्जुनासारखे काम करत राहिले
ह्या मॉडेलमध्ये पुण्य योनीतील दोघांचेही हितसंबंध शाबूत ठेवले जातात राजा हा विष्णूचा अवतार असल्याने त्याला थेट देवाचा दर्जा मिळतो आणि तो फार भाग्यवान असेल तर त्याला राम व कृष्णाइतकी अफाट लोकप्रियता प्राप्त होते तर ब्राम्हण हा भूदेव असल्याने आणि राजा त्यालाही नमस्कार करत असल्याने त्याचेही देवत्व अबाधित राखले जाते दोघेही एकमेकांचे देवत्व शाबूत ठेवून पद्धतशीरपणे पापयोनीज व अयोनिज लोकांच्यावर राज्य करत राहतात आणि मनू ब्राम्हण होता कि क्षत्रिय होता ह्यावर वाद घालत राहतात
आजही हे मॉडेल ऑन आहे मोदी अर्जुन आहेत तर संघ व भागवत आउटसायडर नेते आहेत
श्रीधर तिळवे नाईक
गीतेतील योनीव्यवस्था आणि टिळक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग २४ श्रीधर तिळवे नाईक
मागील भागात आपण पाहिले कि भगवान श्रीकृष्णांनी योनिविचार कसा मांडला ?
वैदिकांनी आडवी कर्मकेंद्री वर्णव्यवस्था मांडली तर ब्राम्हण धर्माने उभी जन्मवादी वर्णव्यवस्था ह्या दोन्हींना छेद देत श्रीकृष्णांनी दिलेली योनिव्यावस्था वैष्णवांनी स्वीकारली ही योनीव्यवस्था काय होती ?
वैष्णवांनी जी योनीव्यवस्था मांडली ती जन्मवादी आणि कर्मवादी ह्यांचे त्रांगडे होती म्हणजे जन्म झाला तो योनीनुसार पण ह्या जन्मी पुण्यकर्म केले तर पुढच्या जन्मी पुण्ययोनी मिळणार असा हा सिद्धांत होता ह्या योनीव्यवस्थेत कर्माचे फळ मिळणार पण ते पुढील जन्मात मात्र ह्या जन्मात तुमचा वर्ण जन्मानुसार असणार होता त्यामुळेच व्रतवैकल्य यज्ञ उपासतापास पूजा अर्चना दान पान करून पुढील जन्मात पुण्ययोनी प्राप्त करण्याची सोय होती त्यामुळे साहजिकच पुढील जन्मात पुण्ययोनी प्राप्त करण्याच्या व पुण्य संपादन करण्याच्या कामात वैश्य व शूद्र गुंतून पडले आणि ह्यातून मिळणाऱ्या दक्षिणेवर ब्राम्हण गब्बर झाले ह्या योनिव्यावस्थेमुळेच कर्ण ह्या जन्मानुसार सूतपुत्र होता व कुंतीने रहस्य सांगितल्यावर ताबडतोब ह्या जन्मी क्षत्रिय ठरून राज्य करायला लायक झाला
वैष्णव संतांचे तर्कशास्त्रही ह्या योनिव्यावस्थेनुसार चालते मात्र मोक्ष मात्र जर तुम्ही विष्णू राम कृष्ण ह्यांना किंवा ह्यांच्या अवतारांना शरण गेलात कि मिळतो कारण तशी गॅरंटी खुद्द भगवान कृष्णांनी भगवद्गीतेत दिलेली आहे
जिच्या आधारे वारकरी चळवळ उभी होती व आहे म्हणजे ह्या जन्मात वर्ण जन्मानुसार व पुढील जन्मात वर्ण कर्मानुसार मात्र मोक्ष तुमच्या भक्तीनुसार वा साधनेनुसार अशी ही व्यवस्था आहे ती आपल्याकडच्या विचारवंतांना कधीच कळली नाही हे दुर्देव ! म्हणूनच पुन्हा एकदा तिची चर्चा केली असो
ब्रिटिशांच्या आगमनानंतर ब्राम्हणांचा हा पुण्ययोनी व पुण्य कमावून देण्याचा उद्योग घसरणीला लागला कारण क्षत्रिय मांडलिक झाले तर पापयोनीतले वैश्य बुडाले तर शूद्र देशोधडीला लागले तर अयोनिज अंत्यजांना ब्रिटिश सत्तेने अचानक शिक्षण व फौजेची दारे खुली केली
आता योनीव्यवस्थेवर उपजीविका चालणे अशक्य होते ब्राम्हणांनी पर्याय शोधायला सुरवात केली कारण ब्रिटिशांनी ब्राम्हणांची राज्ये व वतने हिसकावून घ्यायला सुरवात केली तर जे दक्षिणेवर अवलंबून होते असे ब्राम्हण कायमस्वरूपी दरिद्रीनारायण झाले साहजिकच ह्या दोन्ही प्रकारच्या ब्राम्हणांनी पर्याय शोधणे सुरु केले ह्यातील एक पर्याय बहुजन शैव पुजाऱ्यांना हाकलून देऊन शैवांची श्रीमंत देवस्थाने बळकावणे हा होता जो मुस्लिम काळात अतिशय प्रभावीपणे अंमलात आणला गेला होता आणि ब्रिटिश पोर्तुगीज काळात ज्याची व्याप्ती वाढवणे सुरु झाले दुसरा पर्याय ब्रिटिश शासनात नोकऱ्या शोधणे हा होता आणि काँग्रेसची पहिली मागणी शासकीय नोकऱ्या एतद्देशीयांना म्हणजे त्याकाळात अधिकतर ब्राम्हणांना खुल्या व्हाव्यात अशी होती शासन विशेषतः न्याय खाते तिसरा पर्याय स्वतःच्या शिक्षणसंस्था , प्रकाशनसंस्था , मीडियासंस्था सुरु करणे हा होता तर चौथा वैदिक धर्म अधिकाधिक सुधारून व व्यापक बनवून सर्वांसाठी खुला करून पौराहित्य व्यापक बनवून उत्पन्न कमावणे हा होता आणि पाचवा वैश्यिकरण स्वीकारून वैश्य होत डीकास्ट होत व्यापार करणे हा होता (ह्या पर्यायाची सुरवात रविंद्रनाथ टागोरांच्या आजोबांनी केली होती )
नेमकी ह्याचवेळी लॉर्ड डफरिनसारखी व्यक्ती भारतात आली होती जिला भारतीयांना राजकीय पातळीवर जाणून घेण्यात रस होता त्यामुळेच ऍलन ह्यूमनें जेव्हा सामाजिक संस्था म्हणून काँग्रेससारखी संघटना काढण्याची योजना डफरीनपुढे चर्चेला घेतली तेव्हा डफरीनने तिला सामाजिक बरोबर राजकीय करण्याच्याही सूचना केली जी ह्यूमनें स्वीकारली व २८ डिसेम्बर १९८५ ला काँग्रेस स्थापन झाली
परिणामी ब्राम्हणी प्रबोधनाची व सुरवातीच्या काँग्रेसची आख्खी चळवळ ह्या पाच पर्यायात व ब्रिटिश चौकटीत घुटमळत होती
टिळकही ह्या योनिव्यावस्थेत व पाच पर्यायात कैद होते पण त्यांनी शासकीय नोकरीचा पर्याय शोधला नाही आणि इथेच त्यांचे व आगरकरांचे वेगळेपण दिसते महात्मा फुलेंनी ब्रिटिश सत्तेकडून गुणवत्तेच्या जीवावर बांधकामाची काँट्रॅक्टस मिळवली व भक्कम बांधकामे करून दाखवली टिळकांनी हाही पर्याय नाकारला आहे
टिळकांना शासकीय नोकरी किंवा कॉन्ट्रॅक्ट न्हवे तर शासनच आपल्या ताब्यात हवे होते त्यामुळेच त्यांनी स्वशासित शाळा व महाविद्यालये सुरु केली व शासकीय अनुदान नाकारले
टिळकांची स्वशासनावरची निष्ठा सुरवातीपासूनच दिसते आणि ह्याबाबत कथनी आणि करणी ह्यात अंतर दिसत नाही त्यातूनच ब्राम्हणांना पुढे सहावा पर्याय खुला झाला तो म्हणजे पेशव्यांच्याप्रमाणे राज्यकर्ता वर्ग होणे देवेन्द्र फडणवीसांनी व नेहरूगांधी फॅमिलीने टिळकांना कायमच मुजरा करायला हवा कारण ते आज जिथे आहेत त्याचे श्रेय टिळकांना जाते
प्रश्न असा आहे कि मग ह्या आद्यहिंदुहृदयसम्राटाला राज्यकर्ता होण्यासाठी काँग्रेसमध्ये एन्ट्री मिळाली कशी ?
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळकांनी आद्यहिन्दूहृदयसम्राट असूनही काँग्रेस का स्वीकारली व स्वतंत्र हिंदुत्ववादी संघटना का काढली नाही
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती २५ श्रीधर तिळवे नाईक
काँग्रेसची विचारसरणी ही दादाभाई नौरोजी न्यायमूर्ती रानडे गोपालकृष्ण गोखले ह्यांनी घडवली होती आणि हे सर्वच लोक इंग्लंडमधील लिबरलीझमने भारावून गेलेले होते परंपरेने ते वैष्णवीझमशी निगडित होते मात्र जन्मानुसार वर्ण कि कर्मानुसार वर्ण ह्याबाबत ते वैष्णव संतांच्याप्रमाणे काहीसे गोंधळलेले होते वैष्णवीझम ही एक मोठी छत्री होती जी वैष्णव संतांच्या भक्ती चळवळीमुळं खूप खोलवर रुजली होती काँग्रेसने तिला राजकीय केले परंपरा मोडायची पण कुणाला न दुखावता क्रांतीचा आवाज न करता मोडायची ही वैष्णव परंपरा काँग्रेसने आत्मसात केली आणि आजूबाजूला असलेले सर्व देव गिळायची अजगरी वृत्तीही जोपासली वैष्णवीझमचे सर्वात मोठे वैशिष्ठ म्हणजे तो परंपरावाद्यांना परंपरावादी वाटतो तर सुधारकांना सुधारणावादी त्यामुळे आंबेडकरही रानडे गोखलेंच्याविषयी आस्थेने लिहतात आणि धर्मातर करतांना " मी गांधींना आश्वासन दिले आहे कि मी हिंदू हितसंबंधांना धोका पोहचेल असा धर्म स्वीकारणार नाही म्हणून मी बौद्ध धर्म स्वीकारत आहे जो हिंदूंच्या हिताचाच आहे " असे म्हणतात हिंदुत्ववाद आणि काँग्रेसवाद ह्यामध्ये चॉईस करायची वेळ आली तर आंबेडकर काँग्रेसच निवडतात कारण त्यांना कायमच हिंदुत्ववाद मनुस्मृतीचे पुनर्जीवन करेल असे भय वाटत होते नवबौद्धांनाही हेच भय वाटते आहे जे नैसर्गिक आहे
काँग्रेसच्या ह्या वैष्णव छत्रीत आणि हिंदुत्ववादाच्या ह्या हिंदू छत्रीत काय फरक आहे ह्याची यथावकाश चर्चा मी पुढे करेनच मात्र एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे टिळक सुरवातीला हिंदू छत्रीखाली उभे होते आणि काँग्रेस ही वैष्णव छत्री घेऊन उभी होती
प्रश्न असा आहे कि टिळकांनी स्वतंत्र हिंदुत्ववादी संघटना का काढली नाही ?
ह्या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसच्या तत्कालीन परिस्थितीत आहे टिळकांना सुरवातीला ब्रिटिशांशी थेट पंगा नकोच होता त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काढलेली काँग्रेस संघटना ही सेफ बेट होती
दुसरी गोष्ट टिळकांचे दादाभाईंच्यावर असलेले प्रेम दादाभाई हळूहळू जहाल बनत चाललेले होते आणि त्यामुळे टिळकांना हे स्पष्ट व्हायला लागले कि काँग्रेसमध्ये जहालवादाला चांगले दिवस येतील तसे संकेत खुद्द दादाभाई नौरोजी देत होते
तिसरी गोष्ट काँग्रेस ही काही वैष्णववादी लोकांनी स्वतःहून काढलेली संघटना न्हवती ती शेवटी ब्रिटिश ऑफिसर्संनी काढलेली संघटना होती आणि ती वैष्णवांच्याप्रमाणे हिंदुत्ववाद्यांनाही खुली होती किंबहुना पुढेही अनेक हिंदुत्ववादी काँग्रेसमध्ये काम करत राहिले त्यामुळे टिळकांना ती त्याकाळात खुली वाटली तर त्यात आश्चर्य काय ?
चौथी गोष्ट ब्रिटिशांनी पाठिंबा दिलेली काँग्रेस ही एकमेव राजकीय संघटना होती बाकी अनेक संघटना ह्या प्रामुख्याने सामाजिक व सांस्कृतिक वा धार्मिक होत्या टिळकांना राजकारणात अधिक रस होता आणि त्यासाठी काँग्रेस हा एकमेव राजकीय पर्याय त्याकाळात उपलब्ध होता
पाचवी गोष्ट होती ह्याकाळात काँग्रेस संस्थापक ऍलन ह्यूमला आलेले फ्रस्टेशन ! इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर काँग्रेस जशी अचानक गोंधळली होती तसेच काहीसे गोंधळाचे वातावरण १८९० साली काँग्रेसमध्ये निर्माण झाले होते काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात पास केलेल्या नऊ ठरावापैकी एकालाही नीट दाद मिळाली न्हवती कायदे मंडळात एतद्देशीय लोकप्रतिनिधी घ्यावा ह्या मागणीला सरकारने कचऱ्याची टोपली दाखवली होती १८९२ च्या लॉर्ड क्रॉसच्या इंडियन कौन्सिल बिलनुसार सरकारचे सरकारनियुक्त प्रतिनिधी स्वराज्यसंस्थात येणार हे स्पष्ट झाले
काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनातच ह्यूमने ,"सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आम्ही केला पण सरकारने जागे होण्याचे नाकारले आहे "अशी टीका केली "आता प्रत्येक हिंदू मनुष्य सैनिक बनला पाहिजे" असेही ते म्हणाले साहजिकच काँग्रेसच्या चौथ्या अधिवेशनाला सरकारने जागा देण्याचे नाकारले व काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर राहणे दुर्वर्तन आहे असे जाहीर करून चांगल्या वर्तनाची हमी मागितली काँग्रेसचे कार्य करणाऱ्या दहा हजार कार्यकर्त्यांना सरकारने हद्दपार केले पण ह्यूम दबले नाहीत त्यांनी आपले काम व त्यासंदर्भातील पत्रव्यवहार सरकारकडे नेटाने लावून धरला ह्या काळात उमेशचंद्र बॅनर्जी ह्यांनी चार्ल्स ब्रॅडलॉ ह्या ब्रिटिश सांसद द्वारा ब्रिटिश संसदेत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला मात्र एतद्देशीय काँग्रेसच्या नेतृत्वाकडून ज्या कार्याची ह्यूम ह्यांना अपेक्षा होती ती पुरी होईना त्यांना हळूहळू सर्व एतद्देशीय काँग्रेस पुढारी फक्त बोलघेवडे पुढारी आहेत असे वाटू लागले जेवढा जहालपणा ह्यूम दाखवत होते त्याच्या पन्नास टक्केही जहालपणा हे लोक दाखवत न्हवते सरकारने काँग्रेसच्या पाचव्या अधिवेशनात सरकारी अधिकाऱ्यांच्यावर भाग घेण्यास बंदी घातल्यावर हे सगळे बोलघेवडे अधिवेशनातून गायब झाले ह्या पार्श्वभूमीवर आगरकरांनी ह्या पळपुट्यांचे वाभाडे काढले ह्यात नवल ते काय ? ह्यूम ह्यांनी काँग्रेसचे एतद्देशीय नेते बेफिकीर व निष्काळजी आहेत असा थेट आरोप केला व काँग्रेसचे कार्य इंग्लंडमधून चालवण्याचा निर्णय घेतला आणि एकच गोंधळ उडाला काँग्रेस चालू ठेवावी कि बंद करावी असा प्रश्न निर्माण झाला
अशा पार्श्वभूमीवर टिळक आणि आगरकर काँग्रेस ही चालूच राहिली पाहिजे अशी ठाम भूमिका घेऊन उभे राहिले दोघांच्यात कितीही सामाजिक मतभेद असले तरी दोघेही राजकीय पातळीवर जहालच होते
काँग्रेसमधील ह्या सर्व घडामोडींवर टिळक व आगरकर नजर ठेऊन होते आगरकरांनी एतद्देशीय काँग्रेस नेत्यांच्यावर टीकेची राळ उडवली टिळकांनी ह्यूम ह्यांच्या सर्क्युलरमधील "हिंदुस्तानातील गरीब माणूस फ्रेंच राज्यक्रांतीप्रमाणे नेत्यांना डावलून स्वतःच राज्यक्रांती करू शकतो" ह्या मताला पाठिंबा दिला ह्यूमने ह्या सर्क्युलरमध्ये स्पष्ट म्हंटले होते कि काँग्रेसमधील पुढाऱ्यांना जी प्रतिष्ठा पद संपत्ती प्राप्त झाली आहे ती ब्रिटिश राज्यामुळे प्राप्त झाली आहे आणि जर ब्रिटिश राज्य टिकले नाही तर काँग्रेस नेत्यांचीही ही प्रतिष्ठा पद संपत्तीही टिकणार नाही जर ह्या गोष्टी टिकाव्यात असे वाटत असेल तर ह्या नेत्यांनी पळपुटेपणा सोडून ब्रिटिश राज्याला इथल्या एतद्देशीय प्रजेची जी दैना व वाताहत झाली आहे ती काँग्रेसतर्फे कळवलीच पाहिजे
एका अर्थाने देशासाठी नाही तर निदान स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या पद प्रतिष्ठा व संपत्तीच्या रक्षणासाठी तरी किमान काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहा असे आवाहन ह्यूम करत होता आणि काँग्रेसचे नेते त्याच्या ह्या आवाहनाला प्रतिसाद देण्याऐवजी ब्रिटिश शासनाच्या दहशतीला घाबरून वाटाण्याच्या अक्षता लावत होते साहजिकच काँग्रेसच्या प्रांतिक कमिट्यांनी ह्यूमचे सर्क्युलर डिस्ट्रिब्युट केलेच नाही . काँग्रेसच्या नेत्यांची वृत्ती सुरवातीपासूनच कशी थर्ड क्लास होती हे ह्यावरून स्पष्ट व्हावे
अशा ह्या काँग्रेसच्या निर्नायकी अवस्थेत लोकमान्य टिळकांना काँग्रेसच स्वतःच्या नेतृत्वासाठी योग्य वाटली तर आश्चर्य ते काय ?
काँग्रेसच्या आऊट सायडर कंट्रोलचे पायोनियर : लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग २३ श्रीधर तिळवे नाईक
मागील भागात लोकमान्यांना काँग्रेसने एकदाही अध्यक्षपद दिले नाही हे आपण पाहिले तरीही लोकमान्यांनी कधीही काँग्रेस सोडली नाही ह्यामागे काय कारण होते ?
काँग्रेस कशीही असली तरी तिच्यामागे प्रशासकीय अधिकारी होते त्यामुळे टिळकांना मते मांडण्यासाठी आवश्यक असलेला फ्लॅटफॉर्म पुरवत होती साहजिकच पुन्हा नवीन संस्था काढून त्यात वेळ खर्च करणे टिळकांच्या गणितात बसले नाही
दुसरी गोष्ट मुळात काँग्रेसची स्थापना हीच आऊटसायडर ब्रिटिश ऑफिसर्स लोकांनी केली होती टिळकांनी ह्यूमचे नेतृत्व रिप्लेस करून स्वतःचे नेतृत्व पुढे आणले दादाभाई नौरोजी व गोपाळ गोखले ह्या काळात काँग्रेसचे इन्सायडर पुढारी होते पण ताबा ब्रिटिश लोकांच्याकडेच होता
प्रश्न असा आहे कि ही आउटसायडर थेरी आली कुठून ?
तिचा उगम महाभारतात आहे गीतेत आहे नवव्या अध्यायात हा श्लोक पुढीलप्रमाणे आहे
मां हि पार्थ व्यपाश्रित्य
येऽपि स्युः पापयोनयः ।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि
यान्ति परां गतिम् ॥९- ३२॥
त्याचा अर्थ जरी स्त्रिया , वैश्य व शूद्र हे पापयोनी असतात तरी त्यांना मला शरण आल्यावर परम गती प्राप्त होते
किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या
भक्ता राजर्षयस्तथा ।
अनित्यमसुखं लोकमिमं
प्राप्य भजस्व माम् ॥९- ३३॥
आणि मग जे ब्राम्हण व राजर्षी आहेत त्या पुण्यभक्तांना काय सांगावे ?त्यांनाही मला शरण आल्यास परमगती प्राप्त होते
सर्वसाधारण निगम समाजात ह्या काळात जे जन्मजात वर्ण होते त्यांच्या श्रीकृष्णांनी तीन योनी बनवल्या होत्या
१ पुण्य योनी : ह्यात ब्राम्हण व क्षत्रिय वर्ण होते भगवान श्रीकृष्णानीं गीतेत म्हंटल्याप्रमाणे ह्या पुण्य योनी होत्या
२ पाप योनी : ह्यात वैश्य , स्त्री आणि शूद्र होते भगवान श्रीकृष्णांनी म्हंटल्याप्रमाणे ह्या पाप योनी होत्या
३ अयोनी : ह्यात अतिशूद्र आणि आदिवासी होते ज्यांना योनीचा दर्जाचं न्हवता म्हणजे ह्या अयोनी होत्या त्यांचा उल्लेख करण्याची गरज भगवान कृष्णांना वाटली न्हवती
मागील जन्मी पाप केल्याने पाप योनींना पाप योनी प्राप्त झाली होती तर पुण्य केल्याने पुण्य योनीवाल्यांना पुण्य योनी प्राप्त झाली होती ही निगमांची वर्गव्यवस्था होती आणि तिच्याकडे विचारवंतांनी कायमच दुर्लक्ष केले
भारतातील प्रस्थापित व्यवस्था ही पुण्य योनीवाल्यांची व्यवस्था आहे तर पाप योनीवाल्यांना पुण्य संपादन करून पुढील जन्म पुण्य योनीचा संपादन करण्याचा चान्स आहे त्यासाठी अनुष्ठाने व्रतवैकल्ये यज्ञ वैग्रे मार्ग होते व आहेत अतिशूद्र आणि आदिवासी हे गीतेनुसार मनुष्य योनीत मोडत नाहीत
भगवान श्रीकृष्णाने मांडलेल्या ह्या योनी सिद्धांताने सातव्या आठव्या शतकात धुमाकूळ घालायला सुरवात केली आणि वैष्णवानी सर्व व्यवस्था आपल्या ताब्यात घ्यायला सुरवात केली ह्या वैष्णवांनी प्रथम आउटसायडरची थेरी जन्माला घातली
ह्या थेरीनुसार मुख्य नेता युद्धभूमीवर नेतृत्व करतो युक्तीच्या चार गोष्टी सांगतो काय धर्म काय अधर्म ते ठरवतो थोडक्यात भगवान श्रीकृष्ण हा भारतातील निगम समाजाचा (म्हणजे वैदिक , ब्राम्हणी , वैष्णव व हिंदू ) पहिला आउटसायडर नेता आहे जो युद्धभूमीवर आहे आणि मुख्य नेताही आहे पण पक्षात नाहीये सत्तेत नाहीये तो अनऑफिशियल अध्यक्ष आहे पण पंतप्रधान नाहीये
पुढे पेशव्यांच्या काळात हेच रोल बदलले गेले जिथे छत्रपती श्रीकृष्ण आहेत तर बाळाजी व बाजीराव पेशवे अर्जुन आहेत तर उत्तर पेशवाईत छत्रपती बाजूला गेलेत आणि खुद्द पेशवे व त्यांचे शहाणे श्रीकृष्णाच्या रोलमध्ये आहेत तर शिंदे होळकर गायकवाड भोसले आणि खुद्द छत्रपती असे पाच पांडव आहेत
ह्या आउटसायडर थेरीचा नंतर इतका परिणाम झाला कि खुद्द शिवाजी महाराजांच्यासाठी दादोजी कोंडदेव नावाचा एक काल्पनिक श्रीकृष्ण विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी तयार केला तर चंद्रगुप्त व विष्णुगुप्त ह्या काका पुतण्या जोडीला चंद्रगुप्त आणि चाणक्य असे काल्पनिक स्वरूप देण्यात आले
टिळकांच्यावर चिपळूणकरांचा इतका प्रभाव इतका होता कि खुद्द काँग्रेसमध्ये टिळकांनी स्वतःचा रोल श्रीकृष्णांनुसार बेतून आउटसायडर असा केला आणि दादाभाई नौरोजी व अँनी बेझेन्ट ह्यांना अर्जुन बनवून पाठीमागून काँग्रेसचे सारथ्य केले
टिळकांच्या ह्या आउटसायडर स्टान्सचा प्रभाव महात्मा गांधींच्यावर इतका पडला कि खुद्द गांधीही काँग्रेसमध्ये आउटसायडर म्हणून श्रीकृष्णाचा रोल करत राहिले आणि पंडित नेहरू , सरदार पटेल , मौलाना आझाद , सुभाषचंद्र बोस व विनोबा भावे ह्या आपल्या पांडवांना ब्रिटिशांच्या विरुद्ध लढवत राहिले आणि लढतही राहिले .त्यांच्याही दृष्टीने काँग्रेस ही स्वातंत्र्यासाठी स्थापन झालेली एक सर्वसमावेशक संघटना होती पक्ष न्हवता
हे चिपळूणकर टिळक मॉडेल पुढे हिंदुत्ववाद्यांनी गिरवले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ श्रीकृष्ण आणि हिंदू महासभा जनसंघ व भाजप हे पक्ष अर्जुनासारखे काम करत राहिले
ह्या मॉडेलमध्ये पुण्य योनीतील दोघांचेही हितसंबंध शाबूत ठेवले जातात राजा हा विष्णूचा अवतार असल्याने त्याला थेट देवाचा दर्जा मिळतो आणि तो फार भाग्यवान असेल तर त्याला राम व कृष्णाइतकी अफाट लोकप्रियता प्राप्त होते तर ब्राम्हण हा भूदेव असल्याने आणि राजा त्यालाही नमस्कार करत असल्याने त्याचेही देवत्व अबाधित राखले जाते दोघेही एकमेकांचे देवत्व शाबूत ठेवून पद्धतशीरपणे पापयोनीज व अयोनिज लोकांच्यावर राज्य करत राहतात आणि मनू ब्राम्हण होता कि क्षत्रिय होता ह्यावर वाद घालत राहतात
आजही हे मॉडेल ऑन आहे मोदी अर्जुन आहेत तर संघ व भागवत आउटसायडर नेते आहेत
श्रीधर तिळवे नाईक
गीतेतील योनीव्यवस्था आणि टिळक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग २४ श्रीधर तिळवे नाईक
मागील भागात आपण पाहिले कि भगवान श्रीकृष्णांनी योनिविचार कसा मांडला ?
वैदिकांनी आडवी कर्मकेंद्री वर्णव्यवस्था मांडली तर ब्राम्हण धर्माने उभी जन्मवादी वर्णव्यवस्था ह्या दोन्हींना छेद देत श्रीकृष्णांनी दिलेली योनिव्यावस्था वैष्णवांनी स्वीकारली ही योनीव्यवस्था काय होती ?
वैष्णवांनी जी योनीव्यवस्था मांडली ती जन्मवादी आणि कर्मवादी ह्यांचे त्रांगडे होती म्हणजे जन्म झाला तो योनीनुसार पण ह्या जन्मी पुण्यकर्म केले तर पुढच्या जन्मी पुण्ययोनी मिळणार असा हा सिद्धांत होता ह्या योनीव्यवस्थेत कर्माचे फळ मिळणार पण ते पुढील जन्मात मात्र ह्या जन्मात तुमचा वर्ण जन्मानुसार असणार होता त्यामुळेच व्रतवैकल्य यज्ञ उपासतापास पूजा अर्चना दान पान करून पुढील जन्मात पुण्ययोनी प्राप्त करण्याची सोय होती त्यामुळे साहजिकच पुढील जन्मात पुण्ययोनी प्राप्त करण्याच्या व पुण्य संपादन करण्याच्या कामात वैश्य व शूद्र गुंतून पडले आणि ह्यातून मिळणाऱ्या दक्षिणेवर ब्राम्हण गब्बर झाले ह्या योनिव्यावस्थेमुळेच कर्ण ह्या जन्मानुसार सूतपुत्र होता व कुंतीने रहस्य सांगितल्यावर ताबडतोब ह्या जन्मी क्षत्रिय ठरून राज्य करायला लायक झाला
वैष्णव संतांचे तर्कशास्त्रही ह्या योनिव्यावस्थेनुसार चालते मात्र मोक्ष मात्र जर तुम्ही विष्णू राम कृष्ण ह्यांना किंवा ह्यांच्या अवतारांना शरण गेलात कि मिळतो कारण तशी गॅरंटी खुद्द भगवान कृष्णांनी भगवद्गीतेत दिलेली आहे
जिच्या आधारे वारकरी चळवळ उभी होती व आहे म्हणजे ह्या जन्मात वर्ण जन्मानुसार व पुढील जन्मात वर्ण कर्मानुसार मात्र मोक्ष तुमच्या भक्तीनुसार वा साधनेनुसार अशी ही व्यवस्था आहे ती आपल्याकडच्या विचारवंतांना कधीच कळली नाही हे दुर्देव ! म्हणूनच पुन्हा एकदा तिची चर्चा केली असो
ब्रिटिशांच्या आगमनानंतर ब्राम्हणांचा हा पुण्ययोनी व पुण्य कमावून देण्याचा उद्योग घसरणीला लागला कारण क्षत्रिय मांडलिक झाले तर पापयोनीतले वैश्य बुडाले तर शूद्र देशोधडीला लागले तर अयोनिज अंत्यजांना ब्रिटिश सत्तेने अचानक शिक्षण व फौजेची दारे खुली केली
आता योनीव्यवस्थेवर उपजीविका चालणे अशक्य होते ब्राम्हणांनी पर्याय शोधायला सुरवात केली कारण ब्रिटिशांनी ब्राम्हणांची राज्ये व वतने हिसकावून घ्यायला सुरवात केली तर जे दक्षिणेवर अवलंबून होते असे ब्राम्हण कायमस्वरूपी दरिद्रीनारायण झाले साहजिकच ह्या दोन्ही प्रकारच्या ब्राम्हणांनी पर्याय शोधणे सुरु केले ह्यातील एक पर्याय बहुजन शैव पुजाऱ्यांना हाकलून देऊन शैवांची श्रीमंत देवस्थाने बळकावणे हा होता जो मुस्लिम काळात अतिशय प्रभावीपणे अंमलात आणला गेला होता आणि ब्रिटिश पोर्तुगीज काळात ज्याची व्याप्ती वाढवणे सुरु झाले दुसरा पर्याय ब्रिटिश शासनात नोकऱ्या शोधणे हा होता आणि काँग्रेसची पहिली मागणी शासकीय नोकऱ्या एतद्देशीयांना म्हणजे त्याकाळात अधिकतर ब्राम्हणांना खुल्या व्हाव्यात अशी होती शासन विशेषतः न्याय खाते तिसरा पर्याय स्वतःच्या शिक्षणसंस्था , प्रकाशनसंस्था , मीडियासंस्था सुरु करणे हा होता तर चौथा वैदिक धर्म अधिकाधिक सुधारून व व्यापक बनवून सर्वांसाठी खुला करून पौराहित्य व्यापक बनवून उत्पन्न कमावणे हा होता आणि पाचवा वैश्यिकरण स्वीकारून वैश्य होत डीकास्ट होत व्यापार करणे हा होता (ह्या पर्यायाची सुरवात रविंद्रनाथ टागोरांच्या आजोबांनी केली होती )
नेमकी ह्याचवेळी लॉर्ड डफरिनसारखी व्यक्ती भारतात आली होती जिला भारतीयांना राजकीय पातळीवर जाणून घेण्यात रस होता त्यामुळेच ऍलन ह्यूमनें जेव्हा सामाजिक संस्था म्हणून काँग्रेससारखी संघटना काढण्याची योजना डफरीनपुढे चर्चेला घेतली तेव्हा डफरीनने तिला सामाजिक बरोबर राजकीय करण्याच्याही सूचना केली जी ह्यूमनें स्वीकारली व २८ डिसेम्बर १९८५ ला काँग्रेस स्थापन झाली
परिणामी ब्राम्हणी प्रबोधनाची व सुरवातीच्या काँग्रेसची आख्खी चळवळ ह्या पाच पर्यायात व ब्रिटिश चौकटीत घुटमळत होती
टिळकही ह्या योनिव्यावस्थेत व पाच पर्यायात कैद होते पण त्यांनी शासकीय नोकरीचा पर्याय शोधला नाही आणि इथेच त्यांचे व आगरकरांचे वेगळेपण दिसते महात्मा फुलेंनी ब्रिटिश सत्तेकडून गुणवत्तेच्या जीवावर बांधकामाची काँट्रॅक्टस मिळवली व भक्कम बांधकामे करून दाखवली टिळकांनी हाही पर्याय नाकारला आहे
टिळकांना शासकीय नोकरी किंवा कॉन्ट्रॅक्ट न्हवे तर शासनच आपल्या ताब्यात हवे होते त्यामुळेच त्यांनी स्वशासित शाळा व महाविद्यालये सुरु केली व शासकीय अनुदान नाकारले
टिळकांची स्वशासनावरची निष्ठा सुरवातीपासूनच दिसते आणि ह्याबाबत कथनी आणि करणी ह्यात अंतर दिसत नाही त्यातूनच ब्राम्हणांना पुढे सहावा पर्याय खुला झाला तो म्हणजे पेशव्यांच्याप्रमाणे राज्यकर्ता वर्ग होणे देवेन्द्र फडणवीसांनी व नेहरूगांधी फॅमिलीने टिळकांना कायमच मुजरा करायला हवा कारण ते आज जिथे आहेत त्याचे श्रेय टिळकांना जाते
प्रश्न असा आहे कि मग ह्या आद्यहिंदुहृदयसम्राटाला राज्यकर्ता होण्यासाठी काँग्रेसमध्ये एन्ट्री मिळाली कशी ?
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळकांनी आद्यहिन्दूहृदयसम्राट असूनही काँग्रेस का स्वीकारली व स्वतंत्र हिंदुत्ववादी संघटना का काढली नाही
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती २५ श्रीधर तिळवे नाईक
काँग्रेसची विचारसरणी ही दादाभाई नौरोजी न्यायमूर्ती रानडे गोपालकृष्ण गोखले ह्यांनी घडवली होती आणि हे सर्वच लोक इंग्लंडमधील लिबरलीझमने भारावून गेलेले होते परंपरेने ते वैष्णवीझमशी निगडित होते मात्र जन्मानुसार वर्ण कि कर्मानुसार वर्ण ह्याबाबत ते वैष्णव संतांच्याप्रमाणे काहीसे गोंधळलेले होते वैष्णवीझम ही एक मोठी छत्री होती जी वैष्णव संतांच्या भक्ती चळवळीमुळं खूप खोलवर रुजली होती काँग्रेसने तिला राजकीय केले परंपरा मोडायची पण कुणाला न दुखावता क्रांतीचा आवाज न करता मोडायची ही वैष्णव परंपरा काँग्रेसने आत्मसात केली आणि आजूबाजूला असलेले सर्व देव गिळायची अजगरी वृत्तीही जोपासली वैष्णवीझमचे सर्वात मोठे वैशिष्ठ म्हणजे तो परंपरावाद्यांना परंपरावादी वाटतो तर सुधारकांना सुधारणावादी त्यामुळे आंबेडकरही रानडे गोखलेंच्याविषयी आस्थेने लिहतात आणि धर्मातर करतांना " मी गांधींना आश्वासन दिले आहे कि मी हिंदू हितसंबंधांना धोका पोहचेल असा धर्म स्वीकारणार नाही म्हणून मी बौद्ध धर्म स्वीकारत आहे जो हिंदूंच्या हिताचाच आहे " असे म्हणतात हिंदुत्ववाद आणि काँग्रेसवाद ह्यामध्ये चॉईस करायची वेळ आली तर आंबेडकर काँग्रेसच निवडतात कारण त्यांना कायमच हिंदुत्ववाद मनुस्मृतीचे पुनर्जीवन करेल असे भय वाटत होते नवबौद्धांनाही हेच भय वाटते आहे जे नैसर्गिक आहे
काँग्रेसच्या ह्या वैष्णव छत्रीत आणि हिंदुत्ववादाच्या ह्या हिंदू छत्रीत काय फरक आहे ह्याची यथावकाश चर्चा मी पुढे करेनच मात्र एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे टिळक सुरवातीला हिंदू छत्रीखाली उभे होते आणि काँग्रेस ही वैष्णव छत्री घेऊन उभी होती
प्रश्न असा आहे कि टिळकांनी स्वतंत्र हिंदुत्ववादी संघटना का काढली नाही ?
ह्या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसच्या तत्कालीन परिस्थितीत आहे टिळकांना सुरवातीला ब्रिटिशांशी थेट पंगा नकोच होता त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काढलेली काँग्रेस संघटना ही सेफ बेट होती
दुसरी गोष्ट टिळकांचे दादाभाईंच्यावर असलेले प्रेम दादाभाई हळूहळू जहाल बनत चाललेले होते आणि त्यामुळे टिळकांना हे स्पष्ट व्हायला लागले कि काँग्रेसमध्ये जहालवादाला चांगले दिवस येतील तसे संकेत खुद्द दादाभाई नौरोजी देत होते
तिसरी गोष्ट काँग्रेस ही काही वैष्णववादी लोकांनी स्वतःहून काढलेली संघटना न्हवती ती शेवटी ब्रिटिश ऑफिसर्संनी काढलेली संघटना होती आणि ती वैष्णवांच्याप्रमाणे हिंदुत्ववाद्यांनाही खुली होती किंबहुना पुढेही अनेक हिंदुत्ववादी काँग्रेसमध्ये काम करत राहिले त्यामुळे टिळकांना ती त्याकाळात खुली वाटली तर त्यात आश्चर्य काय ?
चौथी गोष्ट ब्रिटिशांनी पाठिंबा दिलेली काँग्रेस ही एकमेव राजकीय संघटना होती बाकी अनेक संघटना ह्या प्रामुख्याने सामाजिक व सांस्कृतिक वा धार्मिक होत्या टिळकांना राजकारणात अधिक रस होता आणि त्यासाठी काँग्रेस हा एकमेव राजकीय पर्याय त्याकाळात उपलब्ध होता
पाचवी गोष्ट होती ह्याकाळात काँग्रेस संस्थापक ऍलन ह्यूमला आलेले फ्रस्टेशन ! इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर काँग्रेस जशी अचानक गोंधळली होती तसेच काहीसे गोंधळाचे वातावरण १८९० साली काँग्रेसमध्ये निर्माण झाले होते काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात पास केलेल्या नऊ ठरावापैकी एकालाही नीट दाद मिळाली न्हवती कायदे मंडळात एतद्देशीय लोकप्रतिनिधी घ्यावा ह्या मागणीला सरकारने कचऱ्याची टोपली दाखवली होती १८९२ च्या लॉर्ड क्रॉसच्या इंडियन कौन्सिल बिलनुसार सरकारचे सरकारनियुक्त प्रतिनिधी स्वराज्यसंस्थात येणार हे स्पष्ट झाले
काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनातच ह्यूमने ,"सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आम्ही केला पण सरकारने जागे होण्याचे नाकारले आहे "अशी टीका केली "आता प्रत्येक हिंदू मनुष्य सैनिक बनला पाहिजे" असेही ते म्हणाले साहजिकच काँग्रेसच्या चौथ्या अधिवेशनाला सरकारने जागा देण्याचे नाकारले व काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर राहणे दुर्वर्तन आहे असे जाहीर करून चांगल्या वर्तनाची हमी मागितली काँग्रेसचे कार्य करणाऱ्या दहा हजार कार्यकर्त्यांना सरकारने हद्दपार केले पण ह्यूम दबले नाहीत त्यांनी आपले काम व त्यासंदर्भातील पत्रव्यवहार सरकारकडे नेटाने लावून धरला ह्या काळात उमेशचंद्र बॅनर्जी ह्यांनी चार्ल्स ब्रॅडलॉ ह्या ब्रिटिश सांसद द्वारा ब्रिटिश संसदेत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला मात्र एतद्देशीय काँग्रेसच्या नेतृत्वाकडून ज्या कार्याची ह्यूम ह्यांना अपेक्षा होती ती पुरी होईना त्यांना हळूहळू सर्व एतद्देशीय काँग्रेस पुढारी फक्त बोलघेवडे पुढारी आहेत असे वाटू लागले जेवढा जहालपणा ह्यूम दाखवत होते त्याच्या पन्नास टक्केही जहालपणा हे लोक दाखवत न्हवते सरकारने काँग्रेसच्या पाचव्या अधिवेशनात सरकारी अधिकाऱ्यांच्यावर भाग घेण्यास बंदी घातल्यावर हे सगळे बोलघेवडे अधिवेशनातून गायब झाले ह्या पार्श्वभूमीवर आगरकरांनी ह्या पळपुट्यांचे वाभाडे काढले ह्यात नवल ते काय ? ह्यूम ह्यांनी काँग्रेसचे एतद्देशीय नेते बेफिकीर व निष्काळजी आहेत असा थेट आरोप केला व काँग्रेसचे कार्य इंग्लंडमधून चालवण्याचा निर्णय घेतला आणि एकच गोंधळ उडाला काँग्रेस चालू ठेवावी कि बंद करावी असा प्रश्न निर्माण झाला
अशा पार्श्वभूमीवर टिळक आणि आगरकर काँग्रेस ही चालूच राहिली पाहिजे अशी ठाम भूमिका घेऊन उभे राहिले दोघांच्यात कितीही सामाजिक मतभेद असले तरी दोघेही राजकीय पातळीवर जहालच होते
काँग्रेसमधील ह्या सर्व घडामोडींवर टिळक व आगरकर नजर ठेऊन होते आगरकरांनी एतद्देशीय काँग्रेस नेत्यांच्यावर टीकेची राळ उडवली टिळकांनी ह्यूम ह्यांच्या सर्क्युलरमधील "हिंदुस्तानातील गरीब माणूस फ्रेंच राज्यक्रांतीप्रमाणे नेत्यांना डावलून स्वतःच राज्यक्रांती करू शकतो" ह्या मताला पाठिंबा दिला ह्यूमने ह्या सर्क्युलरमध्ये स्पष्ट म्हंटले होते कि काँग्रेसमधील पुढाऱ्यांना जी प्रतिष्ठा पद संपत्ती प्राप्त झाली आहे ती ब्रिटिश राज्यामुळे प्राप्त झाली आहे आणि जर ब्रिटिश राज्य टिकले नाही तर काँग्रेस नेत्यांचीही ही प्रतिष्ठा पद संपत्तीही टिकणार नाही जर ह्या गोष्टी टिकाव्यात असे वाटत असेल तर ह्या नेत्यांनी पळपुटेपणा सोडून ब्रिटिश राज्याला इथल्या एतद्देशीय प्रजेची जी दैना व वाताहत झाली आहे ती काँग्रेसतर्फे कळवलीच पाहिजे
एका अर्थाने देशासाठी नाही तर निदान स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या पद प्रतिष्ठा व संपत्तीच्या रक्षणासाठी तरी किमान काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहा असे आवाहन ह्यूम करत होता आणि काँग्रेसचे नेते त्याच्या ह्या आवाहनाला प्रतिसाद देण्याऐवजी ब्रिटिश शासनाच्या दहशतीला घाबरून वाटाण्याच्या अक्षता लावत होते साहजिकच काँग्रेसच्या प्रांतिक कमिट्यांनी ह्यूमचे सर्क्युलर डिस्ट्रिब्युट केलेच नाही . काँग्रेसच्या नेत्यांची वृत्ती सुरवातीपासूनच कशी थर्ड क्लास होती हे ह्यावरून स्पष्ट व्हावे
अशा ह्या काँग्रेसच्या निर्नायकी अवस्थेत लोकमान्य टिळकांना काँग्रेसच स्वतःच्या नेतृत्वासाठी योग्य वाटली तर आश्चर्य ते काय ?
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती २६ श्रीधर तिळवे नाईक
भारतीय आर्यांच्या ज्या काही गैरसमजुती आहेत त्यातील एक म्हणजे जगभर पसरण्याची लायकी असलेली एकमेव संस्कृती ही आर्यांची आहे आणि तिचा आधार धर्म आहे साहजिकच भारतीय राष्ट्रवाद हाही धार्मिक राष्ट्रवाद म्हणूनच उभा राहू शकतो आणि तो आर्य राष्ट्रवाद असणे अटळ आहे हा आर्य राष्ट्रवाद कसा असावा ह्याची विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी जी काही रूपरेखा दिली तिचा लोकमान्य टिळकांनी राजकीय नकाशा बनवला आणि पुढे स्थापत्य डिझाईन केले
भारतीय आर्यांचा ह्याकाळात जो क्लॅश झाला तो इस्लामिक संस्कृतीशी आणि मराठ्यांनी इस्लामिक संस्कृतीला जवळ जवळ हरवून हिंदू पादशाही उभी केली जी दुर्देवाने फार काळ टिकली नाही कारण समोर तिच्यापेक्षा सबळ संस्कृती ठाकली जी आर्यांचीच होती जिचे नाव ब्रिटिश संस्कृती होते चिपळूणकरांच्या मते ब्रिटिश हे आर्यच होते त्यामुळे हा संघर्ष भावाशी होता ह्याचा एक परिणाम असाही झाला कि भारतीय संस्कृतीत भावाला नेहमीच समजावले जात असल्याने ब्रिटिश भावाला तो बिघडलेला असल्याने व सत्तेने मस्तवाल झालेला असल्याने ह्या जीर्ण शीर्ण भावाच्या अहंकाराने समजवण्याचा प्रयत्न केला तो थेट गांधीजीच्या हत्येपर्यंत ! ब्रिटिशांनी मुळात आर्य सिद्धांताला खतपाणी घातले तेच मुळी ब्रिटिशांच्याविषयी एतद्देशीयांना परकेपणा वाटू नये खिश्यात हात घालून सगळा पैसा काढून घ्यायचा आणि वर ब्रदरहूड फिलिंग द्यायचे ही एक कमालीची इमोशनल स्ट्रॅटेजी होती जिच्यात सगळेच फसले होते साहजिकच ह्यूमने चळवळ तीव्र करायचे ठेवल्यावर काँग्रेसच्या एतद्देशीय नेत्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली काहींनी तर डेक्कन संस्था स्वतंत्रपणे चालू केली ह्या काळात ह्या काँग्रेसी नेत्यांना सरळ सरळ भित्रे व डरपोक म्हणणारे दोनच विचारवंत होते आगरकर आणि टिळक एखादा दादागिरी करणारा मनुष्य घरात घुसला कि भित्रा मनुष्य अरे तू माझा भाऊ वैग्रे अशी भाषा सुरु करतो तसा प्रकार ह्या काळात मवाळवाद्यांनी सुरु केला नेमक्या ह्याच काळात आगरकरांचे निधन झाले आणि टिळक एकटे पडले आता त्यांना एकट्याने निर्णय घ्यायचा होता
नेमक्या ह्याच काळात सर सैय्यद अहमद व इस्लामिक संस्कृतीला ब्रिटिशांनी हिंदू संस्कृतीच्या विरोधात क्लॅश असल्यासारखे उभे केले आपण दोघेही ज्युडायिक असल्याने मित्र आहोत व आपला कॉमन शत्रू हिंदू आहे हे पटवण्यात ब्रिटिशांना यश मिळू लागले आणि मुस्लिम विचारवंत ह्या जाळ्यात अडकत गेले भारतातील बहुसंस्कृतीवादाला नेमका कसा तडा द्यायचा हे ब्रिटिशांना नेमके माहित होते व त्यासाठी त्यांनी धर्म वर्ण व जातीचा यथेच्छ वापर करायला सुरवात केली काँग्रेसच्या विरोधात एक मुस्लिम काँग्रेससारखी संघटना आवश्यक आहे हे मुस्लिमांना पटवण्याची धडपड सुरु झाली ज्यातून पुढे मुस्लिम लीग उदयाला आली
डार्विनचा प्रभाव पडून १८७० नंतर आलेल्या ब्रिटिशांनी सर्वायवल ऑफ फिटेस्ट आणि ब्रिटिश स्पेसीज ही निसर्गतः हिंदू स्पेसीज व मुस्लिम स्पेसीज पेक्षा श्रेष्ठ आहेत हे स्वीकारायला सुरवात केली होती ह्या कमअस्सल लोकांच्यावर राज्य करण्याचा अधिकार निसर्गतः आपल्याला आहे असे मानणारे अधिकारवादी व ह्या कमअस्सल स्पेसीजचा उध्दार करण्यासाठी आपण आलो आहोत असे मानणारे उद्धारवादी दोघेही डार्विनच्या कृपेने हिंदू स्पेसीजला कमअस्सलच समजत होते आधुनिक रेसिझमची सुरवात डार्विनमुळे झाली व ती भारतात पोहचली तिला काउंटर म्हणून चिपळूणकरांचा हिंदुत्ववाद जन्मला होता
टिळकांना एकीकडे ह्यूमचे धैर्य दिसत होते व हिंदूंचे भित्रेपण ! ब्रिटिशांना वेगळे काढण्यासाठी त्यांनी आर्य सिद्धांत स्वीकारला खरा पण त्यांना थेट उत्तर ध्रुवावरून स्थलांतरित करवून इंडियात आणले आणि इंडियन आर्य प्रथम सुसंस्कृत होते व युरोपियन आर्य त्यांना पाहून सुसंस्कृत झाले अशी मांडणी केली हे ब्रिटिशांचे डार्विनियन ओझे फेकून देणे होते ही डी -डार्विनायझेशनची प्रक्रियाच टिळकांना इंग्रजांच्याविरुद्ध लढायचे बळ देऊन गेली पण त्याच बरोबर आर्य धर्म श्रेष्ठ असल्याची जाणीवही ! भारतात ह्या निमित्ताने प्रथमच जीवशास्त्र , साम्राज्यवाद आणि इतिहास ह्यांची युती झाली
लढा अटळ आहे हे उमजलेले टिळक आता हिंदूंना कसे संघटित करता येईल ह्याचा विचार करू लागले ब्रिटिशांनी स्वतःच जागतिक साम्राज्य उभं केलं होतं मुस्लिमांचे आटोमन साम्राज्य अद्याप जिवंत होते आणि ह्या प्रतिसृष्टीय सृष्टीय संमिश्र जागतिकीकरणात फक्त हिंदूच असे होते जे स्वतःच्या देशात घायाळ आणि गुलाम होऊन पडले होते अमूर्त जागतिक संस्कृती जन्माला घालण्याची सुरवात शैवांनी केली असली तरी आणि बौद्धांनी ह्या सुरवातीचा चांगला विस्तार केला असला तरी हा विस्तार मोक्षाचे जागतिकीकरण होता ह्याला काटशह म्हणून ज्यू ख्रिश्चन आणि इस्लाम ह्यांनी धर्माच्या जागतिकीकरणाची सुरवात करून जगभर धार्मिक धुमाकूळ घातला टिळकांच्यापुढे ह्या दोन्ही धर्मांचे ज्युडायिक जागतिकीकरणाचे मॉडेल उभे होते एक मागासलेले व कालबाह्य तर दुसरे अर्थवादाने भारावले गेलेले पण आधुनिक ! टिळकांना ह्या दोन्हींचा मध्य हवा होता
ख्रिश्चन मॉडेल व इस्लामिक मॉडेल दोघेही स्थलांतर करून व एतद्देशीयांना बाटवून धार्मिक जागतिकीकरण साजरे करत होते पण ब्रिटिशांचा मुख्य रस आर्थिक होता आणि धर्म केवळ प्राचीन हाथियार होते त्याउलट कॅथॉलिकांच्या दृष्टीने ब्रिटिश साम्राज्य हे केवळ धर्मांतरासाठी लोकसंख्या उपलब्ध करून देणारे हाथियार होते धर्मशाही आणि भांडवलशाही ह्यांचे हे अजिबोगरीब साटेलोटे होते जे अंतिमतः हिटलरी जर्मनीत ज्यूंचे बळी घेऊन काहीकाळ थांबले टिळकांनी आर्यांचे स्थलांतर व बाहेरून येणे स्वीकारले कारण इसवी सन १००० नंतर बाहेरून येणारा हा आतमध्ये असणाऱ्यांच्यापेक्षा बलवान असतो असा समज रूढ झाला होता हा आऊटसायडर इज बेटर फिटेस्ट दॅन इन्सायडर चा सिद्धांत ह्या काळात ब्राम्हणांना आपण बाहेरचे आहोत हा खोटा भ्रम स्वीकारायला लावणारा ठरला ब्राम्हणांच्यासाठी मुद्दा कधीच बाहेरचा कि आतला हा नसतो मुद्दा सत्ता कुणाला मिळेल हा असतो सत्ता बाहेरच्याला मिळणार असेल तर ब्राम्हण ताबडतोब ह्या देशात आउटसायडर व्हायला तयार असतात आणि सत्ताप्राप्तीसाठी आतील रहिवासी असणे गरजेचे असेल तर ब्राम्हण ताबडतोब इन्सायडर होतात टिळकांनी त्यांच्या काळानुरूप आउटसायडर होणे पसंत केले कारण आउटसायडरनेस त्यांना ब्रिटिशांच्या तुलनेत ब्रिटिशांच्यासमोर ब्रिटिशांच्याबरोबरचा इक्वलपणा बहाल करत होता
जनेटिक लेव्हलला आपण सगळे बरेचसे एकसारखे असलो तरी सांस्कृतिक अस्मितेवर आजही आपली श्रद्धा आहे टिळकांनी ही सांस्कृतिक अस्मिता आर्य हिंदू अस्मितेत शोधली मात्र हे करतांना मुस्लिम सांस्कृतिक अस्मितेचे काय करायचे हा प्रश्नही बाकी होता जो वाटेवरच उभा होता ह्या देशाने पन्नासदा आपली सांस्कृतिक अस्मिता बदलली होती आणि तिला एका सूत्रात गोवणे फार कठीण होते ब्रिटिशविरोध हे ह्या गोवणीचे निगेटिव्ह सूत्र होते पण पॉझिटिव्ह सूत्राचे काय ? चिपळूणकरांनी टिळकांना हे सूत्र दिले ज्याचे नाव हिंदुत्व होते जे परंपरा आणि इतिहास ह्याच्या आधारे उभे होते टिळकांच्या सुरवातीच्या कर्मठपणाचे रहस्य ह्या सूत्रात आहे ओळख व अस्मिता धर्माच्या आधारे उभी करायची ठरली कि माणूस धार्मिक बाबतीत योग्य-अयोग्य विवेक गमावतो टिळकांचे हेच झाले आणि आजच्या हिंदू ज्यू ख्रिश्चन इस्लामिक नेत्यांचाही हाच प्रॉब्लेम आहे
अस्मितेचा हत्ती पकडायचा कसा हा टिळकांच्यापुढचा खरा प्रश्न होता कारण सात आंधळ्यांची कथा टिळकांनाही माहीत होती धर्मयुगात धर्म तर मोक्षयुगात दर्शन तुम्हाला अस्मिता पुरवत असे सृष्टीय युगात अस्मिता पुरवण्याची जबाबदारी राष्ट्रावर , विज्ञानावर , विचारप्रणालीवर व विचारप्रणालीच्या आधारावर उभ्या असलेल्या संविधानावर आली होती आणि भारतीयांची मग ते हिंदू असोत कि गैरहिंदू शोकांतिका हीच होती कि त्यांच्या ताब्यात त्यांचे राष्ट्र न्हवते राष्ट्र निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांना हाकलून देणे सर्वाधिक गरजेचे होते त्यामुळेच टिळकांनी सामाजिक सुधारणा साईडलाईन केल्या आणि ब्रिटिशांना हाकलून देणे हा आपला अजेंडा बनवला टिळकांच्या दृष्टीने किती राष्ट्रे बनवायची हाही मुद्दा दुय्यम होता ब्रिटिशांना प्रथम हाकलून लावू मग आपण एकत्र बसून ठरवू असे त्यांचे म्हणणे होते जे बरोबर व काळाशी सुसंगत होते कारण राष्ट्रसत्तेशिवाय आणि राजसत्तेशिवाय सुधारणा अशक्यच किंवा लुटुपुटीच्या होतात भारताची सर्वात मोठी शोकांतिका हीच आहे कि ज्यावेळी राष्ट्रवाद आवश्यक होता त्या काळात भारतातील विचारवंत सामाजिक सामाजिक करत बसले तर १९४७ नंतर धार्मिक पूर्णपणे गाडून सामाजिक सामाजिक वैज्ञानिक वैज्ञानिक करणे आवश्यक होते तेव्हा सामाजिक वैज्ञानिक आर्थिक करण्याऐवजी ते धार्मिक धार्मिक राजकीय राजकीय करत बसले त्यामुळे ना धड सामाजिक सुधारणा झाल्या ना राष्ट्र उभारणी नीट झाली टिळक आणि गांधी हे दोनच नेते असे झाले ज्यांनी काळाची गरज ओळखली होती आणि त्यांना त्यामुळे जनतेचा पाठिंबाही भरपूर मिळाला
राष्ट्रीय अस्मिता अनेक गोष्टींनी बनतात
१ प्रमुख नेत्यांची ओळख जशी कि गांधी वैष्णव होते व मोक्षक होते टिळक वैदिक वैष्णव धार्मिक व मोक्षक होते
२ राष्ट्राविषयीच्या भविष्यकालीन व भूतकालीन कल्पना
३ राष्ट्र ज्या स्थितीतुन चालले आहे ती स्थिती मग ती भौगोलिक , वर्तमानकालिक असो कि भावनिक व बौद्धिक असो
४ त्या त्या राष्ट्रातील नागरिकांचा त्या त्या राष्ट्रातील संविधानावर असलेला विश्वास व संशय
५ त्या त्या राष्ट्रातील नागरिकांची क्रियाशीलता , कृतिविवेक , कर्तव्याची जाण आणि कर्तव्याशी असलेली निष्ठा
६ त्या त्या राष्ट्रातील नागरिकांची शक्ती तिची जागृती व निद्रा वा बेशुद्धी
ब्रिटिशांनी दिलेल्या संविधानावर सुरवातीच्या काळात हिंदवासीयांचा विश्वास होता पण १८७० नंतर तो ढासळू लागला कारण ब्रिटिश साम्राज्यवादाच्या वृक्षाखाली पनपणारा हा राष्ट्रवाद तकलादू व एकतर्फी होता आणि त्यात प्रजेचा सहभाग नाकारला होता एका अर्थाने डेमोक्रेटिक किंगशिप वा क्वीनशिप चालू होती आणि भारताला लुटणे हाच एककलमी कार्यक्रम चालू होता आणि हे शोषण हळूहळू वैश्य व शूद्रांना कळू लागले होते टिळक तेल्यातांबोळ्याचे पुढारी म्हणून उदयाला आले ते ह्या पार्श्वभूमीवर !
काँग्रेसमधले नेते जेव्हा स्वतःची प्रतिष्ठा नौकरी पद पैसे सांभाळण्यात मग्न होते तेव्हा टिळक जनतेशी थेट संपर्क साधू पाहत होते
योनीव्यवस्थेनुसार ब्राम्हण व क्षत्रिय ह्यांचे साटेलोटे असणे अटळ होते आणि टिळकांनी तसा प्रयत्नही केला त्यातूनच त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजींची बाजू घेतली पण त्यात त्यांचे हात चांगलेच पोळले पुढे सयाजीराव व शाहू ह्यांच्याशी त्यांचे जे भांडण झाले त्यात एक महत्वाची गोष्ट हीच होती कि टिळकांना हे साटेलोटे मान्य होते पण सयाजी व शाहू महाराज दोघेही ह्या योनिव्यावस्थेत अडकायला तयार न्हवते ते ब्राम्हण ब्राम्हणेतर ह्या नव्या व्यवस्थेत प्रवेश करायला उत्सुक होते कारण त्यामुळे समाजाचे नेतृत्व त्यात क्षत्रियांच्याकडे येण्याची अधिक शक्यता होती त्यांना ब्राम्हणांचे मांडलिकत्व मान्य न्हवते त्यांना समान दर्जा हवा होता जो वेदोक्त मंत्र नाकारल्यामुळे नाकारला गेलाय असे त्यांना वाटत होते
टिळकांचा प्रॉब्लेम हाच होता कि त्यांना कोणत्याच अर्थाने हे लोक पुरेसे क्षत्रिय वाटत न्हवते इंग्रजांची गुलामी पत्करणारे व त्यांच्या तैनाती फौजेच्या आधारे जगणाऱ्या लोकांना क्षत्रिय कसे मानावे हा त्यांच्यापुढचा प्रश्न होता पुढे ह्या दोघांचीही बाजू व मजबुरी त्यांच्या लक्ष्यात आली आणि त्यांचे ह्या दोघांशीही असलेले संबंधही सुधारले पांडवही शेवटी काहीकाळ दास होते ह्याचा अर्थ गीताधर्मानुसार ते क्षत्रियच नाहीत असा होऊ शकत न्हवता
ह्यातून एक गोष्ट घडली ती म्हणजे टिळकांनी सुरवातीला आपली राजकीय लढाई चालवतांना ब्राम्हणांच्यावर मदार ठेवली ह्याबाबत त्यांचा आदर्श नाना फडणवीस होते हे लक्ष्यात घेण्याजोगे आहे त्यांच्या लिखाणात नाना फडणवीसांचा गौरव त्यामुळे वारंवार होतो तो ह्यामुळेच !पण ह्यामुळेच ब्राम्हण एकसंध ठेवणं ही त्यांची राजकीय गरज बनली पण ह्या राजकीय गरजेमुळे ब्राम्हणांची एकी तुटू नये म्हणून त्यांनी सामाजिक सुधारणांना विरोधही केला
कर्म बुद्धी आणि भक्ती ह्या तिन्हींमधील विरोध नाहीसा होऊन सर्व आयुष्य यज्ञमय करणे ह्यातच गीताधर्माचे सकळ वैदिक धर्माचे सार आहे असे ते मानत सर्वभूताहितार्थ झटणे हे त्यांना कर्तव्य वाटत होते असे सर्वभूताहितार्थ झटणारे लोक कमी झाले म्हणून हिंदूंचे पतन झाले अशी त्यांची श्रद्धा होती अलीकडे ब्राम्हण असला कि त्याच्या राष्ट्रभक्तीविषयी संशय घेतलाच पाहिजे अशी काही ब्राम्हणेतरांची समजूत झालीये मला वाटतं टिळकांची राष्ट्रभक्ती अस्सल सोन्यासारखी होती संशय कुठे आणि किती ताणवावा ह्याचा विवेक जितका ब्राम्हणांना आवश्यक आहे तितकाच ब्राम्हणेतरांनाही आवश्यक आहे
प्रश्न लढ्याचा होता
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळकांना
आणि तिसऱ्या अधिवेशनानंतर ह्यूमनी तिला चळवळीचे स्वरूप देण्याचे ठरवलेश्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर तिळवे नाईक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा