माध्यमांचा आरंभ आणि धर्माचा प्रभाव श्रीधर तिळवे नाईक

माध्यमांचा आरंभ आणि धर्माचा प्रभाव श्रीधर तिळवे नाईक

माणसाला जेव्हा मौखिक भाषा आणि आदिम चित्रकला सापडली तेव्हा त्याच्या कल्पनाशक्तीने अद्वितीय झेप घेतली आणि कल्पनाकेंद्रित धर्मराज्ये सर्वत्रच उदयाला आली धर्मग्रंथ  हे त्यावेळचे फेसबुक होते आणि धार्मिक चर्चा ह्या चॅटिंग शो ! ह्या राज्यांनी राजा व प्रमुख ह्यांना देवाचा अंश वा देव मानून हजारो वर्षे राज्य केले ह्याबाबत सर्वात मागासलेले असल्याने लेटकमर होते अरबस्थान ! सर्वात उशिरा आलो म्हणून सर्वाधिक अक्कल आपल्याला आहे अशी दर्पोक्तीही अरबांनी केली आणि आपल्या प्रेषिताला अंतिम प्रेषित केले लेटकमर असल्याने अरबी आणि त्यांना फॉलो करणारे अनुयायी हे अद्यापही धर्मात बागडतायत

छपाईचा शोध लागून नव्या माध्यमाचे अवतरण झाले यूरोपात छपाई गुटेनबर्गने मुख्य बनवली  आणि संपूर्ण यूरोप दीडशे वर्षे प्राचीन ग्रीक व बायबल मध्ये झोपला सुदैवाने प्राचीन ग्रीक ग्रंथात विज्ञानाच्या शक्यता प्रचंड होत्या आणि त्यांची स्थापना नव्याने झाली

१८६० साली हळूहळू रेकॉर्डिंग नावाचे नवे माध्यम आले आणि १९१० ते १९४० पुन्हा एकदा धर्माने उचल खाल्ली चित्रपटांनी धार्मिक विषयांचा हैदोस घातला त्यातूनच हिटलर उदयाला आला लोक पुन्हा अंधश्रद्धेने भारावून जाऊ लागले आर्यन वंशावर विश्वास ठेऊ लागले

१९८५ साली पुन्हा रेकॉर्डिंगचे नवे तंत्र  आले धार्मिक कॅसेटचा उच्छाद आला मंत्रांच्या कॅसेटचा डिंडिम पेटला आणि १९८७ साली रामायण आले सगळा हिंदुस्थान रामभक्त झाला ह्यातूनच रामजन्मभूमीच्या प्रश्नाला जिवन्त करण्याची राजकीय संधी भाजपने साधली

२०१० नंतर फेसबुक व्हाटसप वैग्रे आले आणि पुन्हा धार्मिक माहोल तयार होऊन मोदी निवडून आले

सांगण्याचा मुद्दा एकच आहे प्रत्येकवेळी नवे माध्यम धार्मिक लोक पुरोगामीच्यापेक्षा प्रभावीपणाने वापरतात धार्मिक उन्माद तयार करतात नवे माध्यम = धार्मिक उन्मादाची एक्स वर्षे असे हे गणिती समीकरण आहे

NM = R . X  ह्यात NM म्हणजे नवीन मीडिया R म्हणजे उन्माद आणि X म्हणजे प्रभावाची उन्मादवर्षे आहे

ह्यातील X हा घटत चालला आहे त्यामुळेच मौखिक R . X   =३००००० वर्षे
लिखित R . X = ३०००वर्षे
छापील R . X =३००वर्षे
मुद्रित R . X =३०वर्षे
डिजिटल R . X =३वर्षे मूल्य आहे

शोले फिल्मचा महिमा फक्त ३० वर्षे टिकला आणि ओसरला मग दिलवाले जास्तीतजास्त २०२६ पर्यंत टिकेल ह्यानंतर मुद्रित R टिकणार नाही

मोदींना नेमक्या वेळी फेसबुक व पुढे व्हाटसप हे नवे माध्यम सापडले आणि त्यांनी ते हुशारीने वापरले राहुल गांधींना हे जमले नाही स्वतःला पुरोगामी म्हणवणारे लोक तंत्रज्ञान वापराबाबत धार्मिक लोकांच्यापेक्षा इतके मागासलेले कसे ?

ह्याची कारणे पुढीलप्रमाणे

१ बहुतेक पुरोगामी हे आईडियालॉजीत अडकलेले असतात त्यांना तंत्रज्ञानापेक्षा बौद्धिक छटापटीत अधिक रस असतो

२ धर्म हा फक्त मिथ्या गोष्टींचा प्रचार आहे हे सत्य धार्मिक नेत्यांना अधीक स्पष्टपणे माहित असते त्यामुळे प्रचाराची अपरिहार्यता त्यांना अधिक पटलेली असते त्यामुळे नवीन धार्मिक माध्यमे ते ताबडतोब वापरतात

३ मिथ्समुळे काल्पनिक गोष्टींची इतकी सवय झालेली असते कि कुठलेही तत्वज्ञान त्यांना सहज शक्य वाटते रावणाच्या काल्पनिक विमानांची सवय झालेली असल्याने विमानाच्या शोधाचे फार अगत्य त्यांना वाटत नाही त्यामुळे कुठलेही तंत्रज्ञान खळखळ न करता ते सहज स्वीकारतात

४ पुरोगाम्यांना धर्माबाबत सत्य आपल्या बाजूने आहे ह्याची इतकी खात्री पटलेली असते कि प्रचार न करता आपण विजयी होऊ असा त्यांना भ्रम असतो अर्थात धर्म विजयी झाला कि मग पुरोगामी लोकांना जाग येते

५ पुरोगामी लोक इतके बुद्धिमान असतात कि त्यांच्यात वादविवाद होतात त्यामुळे त्यांचा प्रचार कधीच संघटित नसतो त्याउलट धार्मिक लोकांचे भले काल्पनिक असल्याने असेल पण धार्मिक सत्याबाबत किमान काही एकमत असल्याने त्यांचा प्रचार अधिक सुसंघटित रीतीने होतो आणि पुरोगामी लोकांपेक्षा त्यामुळे तो अधिक प्रभावी होतो

ह्याचा अर्थ मग धार्मिक लोक सर्वकाळ राज्य करणार का ? तर नाही कारण

१ मिथ्स मुळे जगण्याचे खरे प्रश्न सुटत नाहीत एकदा धार्मिक उन्माद ओसरला कि आपला एकही ऐहिक खराखुरा प्रश्न सुटलेला नाही हे जनतेच्या लक्ष्यात येते आणि मग जनता पुन्हा पुरोगामी लोकांच्याकडे वळते किंवा ऐहिक प्रश्न सोडवणाऱ्या धार्मिक पुरुषाकडे वा स्त्रीकडे वळते ह्याबाबत शिवाजी आणि अकबर ही दोन उत्तम उदाहरणे आहेत

२ पुरोगामी लोकांना धार्मिक उन्मादाचा पाडाव कसा करायचा हे कळू लागते व ते त्यांची नवीन तंत्रे शोधण्यात यशस्वी होतात

मोदींच्या मिथ्सचा अंत झाला तर मोदी ह्यावेळी १९० च्या आसपास रेंगाळतील राहुल गांधीही १७० -८० च्या आसपास पोहचतील आणि सर्व खेळ आघाड्यांचा होईल

आणि मोदी मिथ अजूनही जिवन्त असेल तर मोदींना काठावरचे बहुमत असेल व मोदींना शिवाजी वा अकबर बनण्याची ही शेवटची संधी असेल ती त्यांनी गमावली तर त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही

( शैव पॅरेडाईम्स अँड यूरोअमेरिकन पॅरेडाईम्स ह्या ग्रंथातील एका भागाचा विकास करून )

श्रीधर तिळवे नाईक





प्रबोधन अचानक का थांबले श्रीधर तिळवे नाईक



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट