शैव आणि दर्शने : ईश्वर दर्शन

मोक्ष हा तीन मुख्य जीवनार्थापैकी एक जीवनार्थ सर्व जीवांना लागू होतो तो जीवार्थ आणि मनुष्याला लागू होतो तो जीवनार्थ होय शिवांनी मोक्षाचे ११४ मार्ग सांगितले त्यातील प्रत्येक मार्गातून एक दर्शन जन्मले आहे अगदी ऋषभ दर्शन व बौद्ध दर्शन ही दर्शने शिवांनी सांगितलेल्या एका मेडिटेशन टेक्निकमधून जन्मली आहेत ऋषभानी  त्याला जीन तर बुद्धाने विपश्यना म्हंटले आणि ती अधिक विकसित केली

ईश्वर हेही दोन तंत्रांनी बनलेले आहे
१ योगी
२ भक्ती

भगवान शिवांनी प्रथम ईश्वर हा शब्द वापरला तो मोक्ष मिळवण्याचा एक उपाय सांगतांना हा उपाय काय होता ?

" ईश्वर म्हणजे विश्वाचा प्राण ह्या प्राणावर जर सर्व आयाम केंद्रित केला तर प्राणायाम साध्य होऊन मोक्ष मिळतो "

मोक्ष मिळवण्याच्या अनेक उपायांपैकी हा एक उपाय ! ह्यात कुठेही ईश्वर निर्माता म्हणून नाही स्वर्ग नरक नाही कि धर्म देणारा म्हणून नाही ह्या प्राणाचा प्रणव आहे ओम 

गुरु नानकांनी ह्या प्रणवाला केंद्रस्थान देऊन नव्याने शैव ईश्वरवाद मांडला जो भक्तीचा आयाम घेऊन आला म्हणूनच मी शिखांना शैव मानतो गुरुनानक सर्व शैवांच्याप्रमाणे वर्णजाती व्यवस्था मानत नाहीत शिखांच्या अमृतसरच्या सुवर्णमंदिराला हरमंदिर म्हंटले जाते हे लक्ष्यात घ्यायला हवे त्याला हरिमंदिर म्हणण्याची भरकस कोशिश आर्यांनी चालवली आहे तिला जेव्हा जेव्हा यश मिळालंय तेव्हा तेव्हा शिखांच्यात वर्णजातिव्यवस्थेचा आरंभ झाला आहे ह्यामुळे शिखांनी सावध राहणे आवश्यक आहे 

शीख ईश्वराला ओम म्हणतात आणि वर्णव्यवस्था मानत नाहीत ही व्यवस्था जन्माने क्षत्रिय व कर्माने वैश्य असलेल्या प्रॉफेटने चालवली असल्याने हे घडले आहे साहजिकच शीख व्यापारात स्वाभाविकरीत्या पडतात आणि युद्धभूमीवर जबरदस्त लढतात 

दुर्देवाने ही व्यवस्था दहाव्या गुरूंनी मीच शेवटचा म्हणून बंद केली आणि शीखधारेला बंदिस्त केले हा इस्लामचा चुकीचा प्रभाव होता इस्लामने कुराण पूजनीय केले तर शिखांनी गुरूग्रंथसाहिब !इस्लामच्या आंधळ्या प्रभावाने अनेक चांगल्या गोष्टींचा सत्यानाश झाला .

माझे स्वतःचे स्पष्ट मत आहे कि हा प्रभाव झुगारून पुन्हा एकदा शिखांनी दहाव्या गुरूंना प्रमाण मानण्याऐवजी गुरुनानकांना प्रमाण मानावे व आपला धर्म ग्रंथाबाहेर आणावा अन्यथा कर्मठपणा वाढत जाऊन कडवेपणा येणे अटळ आहे नानकांना जर ग्रंथच प्रमाण मानायचा असता तर त्यांनी मोहम्मदाप्रमाणे आपलाच ग्रंथ अंतिम असं सांगितलं असतं पण त्यांनी असं सांगितलेलं नाही ह्याचा अर्थच एक ओपन व्यवस्था त्यांना अभिप्रेत असावी हे स्पष्ट दिसतं दहाव्या गुरूंची मजबुरी अशी होती कि त्यांना कुणी मोक्ष मिळालेला वारसदार सापडलाच नाही अशावेळी जे योग्य वाटले ते त्यांनी केले आणि त्या काळात ते योग्यच होते पण आता जर का कुणी मोक्ष मिळवलेला शीख शिष्य निर्माण झाला तर त्याला ही व्यवस्था खुली असणे आवश्यक आहे 

(शैव पॅरॅडाईम्स अँड यूरोअमेरिकन पॅरॅडाईम्स ह्या अप्रकाशित ग्रंथातून )

श्रीधर तिळवे नाईक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट