शैव फुले आणि राजकीय विचारप्रणाली श्रीधर तिळवे नाईक

शैव फुले आणि राजकीय विचारप्रणाली श्रीधर तिळवे नाईक

भारतीय प्रबोधनाचा प्रोजेक्ट बसवण्णांनी सुरु केला आणि शैवता सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमाला जोडली पुढे गुरु नानकांनी ती पंजाबमध्ये उत्तरेच्या संदर्भात शैव एकेश्वरवादाच्या संदर्भात मांडली आणि ईश्वराला ओंकार मानले शिवाजी महाराजांनी शैवांची राजकीयता पुन्हा अधोरेखित केली , पहिल्या बाजीरावाने तिचा विस्तार केला आणि पेशवाईने तिचे मातेरे केले

ह्याला काउंटर म्हणून वैष्णव लोकांनी वैष्णव भक्ती चळवळ उभी केली आणि इस्लामिक राजवटींना मदतच केली अपवाद रामदास

पुढे जेव्हा राजा राम मनोहर रॉय ह्यांनी पुन्हा वेदांत आणला तेव्हाच हिंदुत्ववादाचे बीज रोवले गेले होते त्याला व्यवस्थित पेरले आर्य समाजाने

ह्याला काउंटर म्हणून फुलेंनी पुन्हा एकेश्वरवाद  आणला खरा पण तो शैव कमी आणि ख्रिश्चन जास्त होता ते नको तितके ब्रिटिश शरण होते त्यातच ज्या बहुजन समाजासाठी त्यांनी हाडाची काडे केली त्याने त्यांच्याकडे शेवटच्या दिवसात  पाठ फिरवली आणि फुलेंचा मुत्यू औषधपाण्याविना तडफडून झाला सावित्रीबाई प्लेगने गेल्या आणि यशवंतही ! पुढे त्यांचा नातू देशोधडीला लागला आणि ज्योतिबा फुलेंची नातसून अक्षरशः भीक मागत मेली ब्रिटिशांनी आणि ब्राम्हणेतरांचं राजकारण खेळणाऱ्या एकाही नेत्याने फुले फॅमिलीला कसलीही मदत केली नाही

फुल्यांच्या ह्या शोकांतिकेला कारण होता त्यांचा ब्रिटिशधार्जिणा  राजकीय दृष्टिकोन ! फुल्यांच्या म्हातारपणीच त्यांचा सामाजिक सुधारणावाद आऊटडेटेड वाटायला सुरवात झाली होती लोकांना सामाजिक सुधारणाऐवजी राजकीय स्वातंत्र्य आता महत्वाचे वाटू लागले होते आणि फुले राजकीय पटलावरून दिसत न्हवते त्यामुळे ओबीसी समाज उघडपणाने गांधींच्याकडे वळला गांधी वैष्णव होते आणि गांधींच्यामुळे अनेक ओबीसी  वैष्णव झाले प्रबोधनकार ठाकरेंच्यासारखे कट्टर शाक्तही जय श्रीकृष्ण करायला लागले

वास्तविक ह्या काळात फुल्यांच्यानंतर जर कुणी ब्रिटिशविरोधी स्वातंत्र्यवादी शैव विचार मांडला असता तर हे घडलेच नसते पण फुल्यांच्या ब्रिटिश धार्जिणेपणामुळे शैवांचा राजकीय विचार खुंटला शिवाजी महाराजांनी व रणजित सिंगांनी अतिशय सुंदर सुरवात करून दिल्यानंतर पॉलिटिकल आयडियालॉजी मांडण्याचे काम फुल्यांनीच करायला हवे होते पण ते आर्य अनार्य ब्राम्हण ब्राम्हणेतर वादात इतके हरवून गेले कि सामान्य माणसाचा राजकीय आवाज त्यांना ऐकूच आला नाही तो पुढे ऐकला गांधीजींनी पण वैष्णव असल्याने त्यांनी एखाद्या संतांप्रमाणे आपली राजकीय चळवळ चालवली जे त्यांच्या वैष्णव दृष्टिकोनाला साजेसे होते

त्यामुळे विसाव्या शतकात वैदिक आणि ब्राम्हण हिंदुत्ववाद निर्माण करत होते वैष्णव नवीन काँग्रेस निर्माण करत होते इस्लाम  मुस्लिम लीग निर्माण करत होता ख्रिश्चन ब्रिटिश इम्पेरियलिझमला सपोर्ट देत होते आंबेडकर नवबौद्ध निर्माण करायला लागले होते तेव्हा शैव झोपले होते खुद्द आंबेडकरांनी आपल्या गुरुचेच राजकीय धोरण सौम्य पद्धतीने पुढे न्हेले ह्याचा एक परिणाम असा झाला कि ओबीसी आणि बीसी दोघेही काँग्रेसच्या तालावर डान्स करायला लागले १९९० नंतर भाजप उदयाला आल्यापासून भाजपच्या तालावर नाचायला लागले आंबेडकरवादातून पुढे काशीरामांचा दलित बहुजनवाद जन्मला खरा पण तो ओबीसींच्यात झिरपलाच नाही दलित माणसाचे नेतृत्व स्वीकारायला ओबीसी तयार नाहीत आणि हे बरोबर नाही मी एक गोष्ट नेहमीच सांगत आलोय कि आंबेडकरवाद ही भारतातून आलेली सर्वश्रेष्ठ आयडियालॉजी आहे ती केवळ दलितांने मांडली म्हणून धुत्कारणे बरोबर नाही शैव वर्णजात मानत नाहीत आणि त्यांनी ती मानू नये सुदैवाने उत्तर प्रदेशात ओबीसी मायावतींच्या बाजूने उभे राहिले दुर्देवाने मायावतींनी अत्यंत वाईट राज्यकारभार केला हा कारभार जर नीट केला असता तर  दलित बहुजन आघाडीला राष्ट्रीय पातळीवर प्रचंड यश मिळाले असते पण सुकर्म देते आणि कुकर्म न्हेते अशी अवस्था मायावतींची झाली असो

 मी स्वतः  शैवांची स्वतंत्र राजकीय प्रणाली निर्माण करण्यासाठी आगमवादाची मांडणी केली आहे पण एका माणसाचे हे कामच न्हवे अनेकांची मांडणी यायला हवी


श्रीधर तिळवे नाईक
(शैव पॅरेडाईम्स अँड यूरोअमेरिकन पॅरेडाईम्स ह्या इंग्रजी ग्रंथातील फुले अँड शैव प्रकरणातील एका भागाचे  संक्षिप्तीकरण )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट