भारतीय प्रबोधनाचा पहिला प्रवर्तक बसवेश्वर श्रीधर तिळवे नाईक
आरंभ
मोक्षक लोक पुन्हापुन्हा राजसत्तेकडे का जातात हा एक कळीचा प्रश्न आहे ह्या कृतीची सुरवात प्रथम कपिलने मग महावीराने मग आजीविक गोशालने आणि शेवटी गौतम बुद्धाने केली ह्यातील गोशालक हा राजपुत्र न्हवता पण उरलेले तिघेही आर्य असुर गणांचे राजपुत्र होते आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म मध्ये कपिल हा गौतम बुद्धाचा गुरु असल्याचे म्हंटले आहे मुळात गौतम ज्या नगरीत वाढला ती कपिलने बांधलेली वास्तू होती आणि म्हणूनच तिचे नाव कपिलवास्तू होते राजपुत्र असल्याशिवाय एक नगरी वसवणे अशक्यच ! कपिलने प्रथम राजसत्तेकडे मुख केले तर ते समजण्यासारखे आहे पण तरीही प्रश्न उरतोच निर्वाण प्राप्त झाल्यानंतर राजसत्ता कशाला हवी ?
वस्तुस्थिती अशी आहे कि राजाचे हृदय परिवर्तन केले कि त्याच्या सगळ्या प्रजेचेही हृदयपरिवर्तन होते ह्याचा कपिलला आलेला अनुभव ! त्या काळाच्या ब्राम्हणी धर्माला शह देण्यासाठी कपिलने प्रथम शैव धम्म स्वीकारला आणि शैव भाषेचे असुरी भाषेत रूपांतर करून स्वतःचे सांख्य दर्शन मांडले प्रल्हादाने ब्राम्हणी दर्शन स्वीकारल्याने सगळी प्रजा वैदिक झाली होती कपिलमुळे सगळी प्रजा बदलली पुढे बुद्धानेही अनेक राजांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि महावीरानेही ! आजीविकांनाही अल्प यश मिळाले असावे कारण पुढील काळात बिंबिसारासारख्या सम्राटाने त्याचा पंथ स्वीकारलेला दिसतो
पुढे शंकराचार्यांनीही अनेक राजांना वेदांती बनवून आपला दिग्विजय साजरा केलेला दिसतो
जो धर्म राजाचा तोच प्रजेचा ! यथा राजा तथा प्रजा ह्या न्यायाने मोक्षक पुन्हा पुन्हा राजसत्तेकडे जातात जेणेकरून सर्वच प्रजा आपल्या दर्शनाची धर्माची वा धम्माची दीक्षा घेईल ह्याच न्यायाने मुस्लिम राजांच्या दरबारातील अनेक हिंदूंनी इस्लाम धर्म स्वीकारलेला दिसतो अगदी ज्याच्या शहाणपणाची मिसाल दिली जाते तो बिरबलही मुस्लिम झालेला दिसतो
एका अर्थाने हा शॉर्टकट आहे आणि अनेक मोक्षक तो घेतात
ह्या पार्श्वभूमीवर अलीकडचे काही मोक्षक सत्ताधारींच्या दरबारात जात असतील तर त्याला अडवणारे आपण कोण ?
प्रश्न इतकाच असतो कि हे मोक्षक सामाजिक अंग का बघत नाहीत मोक्ष वा निर्वाण म्हणजे मेंदूतल्या समाजाचा अस्त आणि सर्व जिंवासाठी मानवजातीसाठी मेंदू खुला असा असेलही पण त्या त्या दरबाराचे सामाजिक शास्त्र काय हे आपण विचारणार आहोत कि नाही जर एखादा राजदरबार वर्ण जात वंश ह्यासारख्या अमानवी गोष्टींचे समर्थन करत असेल तर त्याला ते स्पष्टपणे दाखवणार कि नाही ? कि आद्य शंकराचार्यांनीं केलेली चूक आपण रिपीट करणार आहोत ?
श्रीधर तिळवे नाईक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा