१ नितीन चांदोरकर

ही २०१३ ची कविता आहे निर्वाण किंवा मोक्ष हा जोवर तुम्ही निर्वाणीला पोहचत नाही तोवर प्राप्त होत नाही जो मरायला तयार होत नाही त्याला निर्वाण प्राप्त होत नाही ह्या काळात मी निर्वाण or डेथ ह्या इंटेंसिटीत मी होतो त्या इंटेन्सिटीची ही कविता आहे

२ सतीश तांबे

नितीन वाघ ह्यांनी योग्य ते स्पष्टीकरण दिले आहेच मी माझ्या कविता चार सिरीजमध्ये विभागल्या आहेत कोल्हापुरातील १९८२ ते ८६ अपवादात्मक ८७/८८ ह्या डेकॅथलॉन सिरीजमध्ये कोल्हापूर व प्रामुख्याने मुंबईतील १९८७ ते २००६ -७ ह्या दरम्यानच्या कविता चॅनेल सिरींजमध्ये फिल्म इंडस्ट्रीत  २४ तास दाखल झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये असतांना लिहिलेल्या कविता २००७ /८ ते २०१३ ह्या दरम्यानच्या कविता नेट सिरीजमध्ये आणि २०१३ ते सद्याच्या करंट कालखंडातल्या कविता ज्यावेळी निर्वाण वा मोक्ष हाच माझ्या जगण्याचा पूर्णच केंद्र झाला आहे त्या कालखंडातल्या कविता निर्वाण सिरीज मध्ये हे सर्व कालखंड त्यातल्या थीम्सच्या वा आशयाच्या आधारे वेगवेगळ्या फायलीत वा काव्यसंग्रहात क्लासिफाय केलेत . हे करतांना एक गोष्ट जी माझ्याही लक्ष्यात आली न्हवती ती तुम्ही  अधिक ठाशीवपणे लक्ष्यात आणून दिलीत ती म्हणजे ह्यातील प्रत्येक फाईल एक कादंबरी म्हणून वाचता येतो . तुम्ही नेहमीच माझ्या सोबत राहिला आहात त्याबद्दल धन्यवाद .

हे इंटरेस्टिंग होते  मला हे माहित न्हवते  माझा कविता लिहण्याचा वेग सर्वाधिक मंदावलाय मराठी कवीच्या भाषेत तो आता बरोबर झालाय  निर्वाण सिरीजच्या आत्ताच्या कविता ह्या फायलीत ह्या करंट कविता येत असतात मात्र पूर्वी एका बैठकीत छोट्या ३० /३५ कविता किंवा १ दीर्घ असा जो आवेगाचा कल्लोळ असायचा तो संपला मी कविता होऊ द्यायचो  माझ्यासाठी तेही एक मेडिटेशनच होते सद्या मी आहे आणि असण्याचा आनंद आहे

३ नितीन भारत वाघ

धन्यवाद खरेतर औपचारिक धन्यवाद द्यावे असे आपले नाते नाही तरीही !

४ निरुपमा शाह

मोक्ष वा निर्वाण हा आत्ता आणि आत्ताच मिळतो इथेच मिळतो आपण निर्वाणसुद्धा भूतकाळातून किंवा भविष्यकाळातून मिळवू  पाहतो आणि तोही एक ट्रॅप असतो अवयव हसतात तो मोक्ष न्हवे अवयवातित असणे म्हणजे मोक्ष वा निर्वाण धन्यवाद

५ प्रतिभा टेम्बे

तुम्ही पूर्ण वेगळ्या आणि सामाजिक अंगाने ही कविता पाहताय आणि कविता अशीही दिसते हे चांगलेच आहे


६ आनंद थत्ते धन्यवाद

७ बाळकृष्ण शिर्के

भीती कसली ? अंतिम सत्य नेहमीच तुम्हाला मदत करायला तत्पर असतं तुम्हीच अंतिम सत्याबाबत पुरेसे तत्पर नसतात बुद्धाच्या भाषेत तुम्ही धम्माची काळजी घ्या धम्म तुमची काळजी घेईल आपणच धम्माची काळजी घेत नाही म्हणून ही वाताहात आहे असणे आणि जगणे ह्यात असणे निवडाल तर जगणे सोपे आहे जगणे निवडाल तर असणे अकारण कठीण आहे बिनधास्त रहा

८ नितीन भरत वाघ
शून्याला अवयव नसतात मोक्ष समजून घेणे शक्य नाही तो असतो किंवा नसतो त्याला बुद्ध शून्य म्हणतो तर कुणी अनंत ही भाषिक वर्णने आहे ट्रोजन हॊर्स व्हायला मुळात ट्रॉय असावे लागते इथे ना ट्रॉय आहे ना घोडा ना योद्धा ना रणांगण इथे फक्त आहे समजून घ्यायला जाशील तर ट्रोजन हॉर्स का ट्रोजन घोडदळ तयार होईल मीही हा गाढवपणा केला होता असो शाब्दिक चर्चा म्हणजे साधना न्हवे

शून्याला मुद्रा आहेत सर्व शरीरे ह्या शून्याच्या किंवा अनंताच्या मुद्रा आहेत  ह्या सर्व मुद्रातुन तुम्ही निर्वाणानंतर शून्यात परतता /असता म्हणून शून्यात असणाऱ्यांची मुद्रा ही महामुद्रा अवयव हे मर्यादित प्रज्ञेला दिसतात परमप्रज्ञेला अवयव अवयव म्हणून दिसत नाहीत कारण सर्व अवयव हे स्वतःचेच भाग असतात हे अद्वैत असते हे सर्व शब्दात पकडता येत नाही जिथे भाषेचाच अंत तिथे चर्चा काय करणार भाषा म्हणजे अंगुलीनिर्देश आहे आता अंगुलीनिर्देशात किती गटांगळ्या खायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे

धारणांचा अंत म्हणजे मोक्ष होय






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट