सावरकर

स्वातंत्रवीर सावरकर फिक्शन आणि वास्तव

आरंभ

भारतीयांसारखे भ्रष्ट आणि व्यवहारी लोक जगाच्या पाठीवर कुठं नसतील मात्र ह्या लोकांना तत्वज्ञ मात्र आदर्शवादी तत्वज्ञान सांगणारा लागतो बहुदा त्यामुळेच सावरकरांसारखा प्रॅक्टिकल तत्वज्ञ भारतीयांना पचनी पडत नाही सावरकर ना धर्माची गोळी देतात ना अहिंसेची बढाई मारतात ते जग नालायक असं स्पष्ट सांगतात आणि अशा जगात शस्त्रसज्ज असाल तरच वाचाल असं ते सांगतात ते उघड उघड भारताने अणुबॉम्ब बनवला पाहिजे असं सांगतात भारतीयांना शांतीचा संदेश देत अणुबॉम्ब बनवणाऱ्या इंदिरा गांधी चालतात पण अणुबॉम्ब बनवा असं थेट बोलणारा चालत नाही पाकिस्तान आणि चीन आपले शत्रू आहेत आणि ते भारतावर हल्ला करणारच असं स्पष्ट सांगणारे सावरकर आपणाला चालत नाहीत पण चायनाच्या घशात तिबेट घालणारे नेहरू मात्र आपणाला महान वाटतात सावरकरांशी माझे मतभेद आहेत पण सावरकरांना मान न देणारे लोक मला उथळ वाटतात . सावरकरांचं स्वतःच एक प्रॅगमॅटिक व्हिजन आहे ते किमान समजून घेणे आवश्यक आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट