इतिहासाचे मूळ रूप आणि हिंदुत्ववाद
इतिहासाचे मूळ रूप हे कल्पइतिहासाचे आहे आणि रामायण महाभारत पुराणे हे सर्व कल्पइतिहास आहेत आणि कल्पनेच्या साहाय्याने रचलेले आहेत भारतीय मानसिकता कधीही कल्पइतिहासातून बाहेर पडली नाही पुढे तर्कशास्त्राचा उदय झाल्यावर तर्कइतिहासाचा उदय झाला ज्याला आज आपण इतिहास म्हणतो ह्यात कल्पना आणि तर्क ह्या दोन्हींचा वावर असला तरी भर तर्कावर होता पुढे आधुनिकचा उदय झाल्यावर इतिहासविज्ञानाचा उदय झाला आणि वैज्ञानिक प्रमाणे प्रमाण मानून प्रत्यक्ष पुराव्याच्या आधारे इतिहास लिहिला गेला हा दावा खोडून काढला तो पोस्टमॉडर्न इतिहासमीमांसेने ! इतिहास ऑब्जेक्टिवली लिहिण्याची अशक्यता ह्या प्रतिइतिहासांनी सिद्ध केली आणि आज अवस्था अशी आहे कि भारतातले सर्व इतिहास हे स्वतःचे स्वतःच्या वर्णाचे स्वतःच्या समूहाचे स्वतःच्या वर्गाचे हितसंबंध प्रमोट करणारे होते हे आता स्पष्ट होत चालले आहे हे इतिहास रचणारे लोक समाजात आदराचे स्थान पटकावून बसल्याने त्यांच्याविरुद्ध अवाक्षरही न काढण्याची रूढी आता रूढ झाली आहे भारतीय प्रबोधनात लिहिले गेलेले सर्व इतिहास हे प्रामुख्याने स्ववर्णीय वा मित्रवर्णीय हितसंबंध सांभाळत लिहिले गेल्याने सर्वच इतिहास अंतिमतः खोटे आणि कारस्थानी ठरत आहेत अशावेळी भारतात खरा इतिहास लिहिणे हे अशक्य होऊन बसले आहे एखादी व्यक्ती खरोखर काय म्हणते ते मूळ लेखन वाचून ठरवण्याऐवजी तोडलेली मोडलेली विधाने घेऊन त्या व्यक्तीला धुणे हा अनेकांचा अजेंडा होऊन बसला आहे जो न्याय स्वतःला प्रिय असलेल्या व्यक्तीला लावायचा तो न्याय स्वतःला प्रिय नसलेल्या व्यक्तीला न लावणे हाही एक कॉमन फण्डा होऊन बसला आहे त्यातच राजकीय गुंडांनी इतिहास आपल्या ताब्यात ठेवायचा कट रचल्यापासून इतिहासाची अवस्था जिगोलोसारखी झाली आहे
अशा ह्या वातावरणात मी इतिहास लिहिण्याचा प्रयत्न तोही दोनवेळा का केला ? कुठलं कुत्रं आपल्याला चावलं होतं ? असे प्रश्न निर्माण झाले तर आश्चर्य ते काय ?
मोदींचे अपयश हे सावरकरांच्या विचारांचे अपयश आहे कि सावरकरांच्यापासून फारकत घेतल्यामुळे मिळालेले अपयश आहे ह्या प्रश्नांचा मागोवा घ्यावा म्हणून हिंदुत्ववादाच्या समुद्रात पुन्हा उडी मारली हा समुद्र जसा बाहेरून दिसतो तसा एका चेहऱ्याचा नाही
१ टिळकांचा ब्राम्हणी हिंदुत्ववाद
२ टिळकांच्या ब्राम्हणी हिंदुत्ववादाविरुद्ध उभा ठाकलेला प्रबोधनकार ठाकरेंचा क्षात्र ब्राम्हणेतरवादी हिंदुत्ववाद ३ एस मुखर्जीचा शाक्त हिंदुत्ववाद आणि
४ सावरकरांचा विज्ञानकेंद्री हिंदुत्ववाद
असे चार ठळक चेहरे हिंदुत्ववादाचे दिसतात हे कॉंग्रेसवादासारखेच आहे
काँग्रेसमध्ये
१ टिळकवादी काँग्रेसवाद
२ गांधीवादी काँग्रेसवाद
३ समाजवादी काँग्रेसवाद
४ मिश्रवादी काँग्रेसवाद
असे चार चेहरे आहेतच
प्रश्न इतकाच आहे कि ह्या सर्वांना आताच्या काळाच्या संदर्भात कसं पाहायचं ?
अटलबिहारी वाजपेयींच्या बाबत असं म्हंटल जायचं कि चुकीच्या पार्टीतला बरोबर नेता ! मोदींच्याबाबत भारतीय जनता पक्षात असलेला काँग्रेसी नेता असं म्हणता येईल का ? सत्तासाधुवाद हे स्वातंत्र्योत्तर काँग्रेसचे वैशिष्ट्य आहे मोदींच्यात ते शिगोशीग दिसतं . फरक असलाच तर सत्ता प्राप्त करण्याच्या शैलीत आहे काँग्रेसची सत्ता प्राप्त करण्याची शैली मवाळ होती मोदींची जहाल आहे
काँग्रेसने कसलाही आवाज न करता सावरकरांना अभ्यासक्रमातून नाहीसं केलं हिंदुत्ववाद नावाचा एक वाद भारतात अस्तित्वात आहे हे सत्यच यूपीएससी ते पोलिटिकल सायन्स च्या अभ्यासक्रमातून उखडलं भाजपने मोठ्याने आवाज करत सिलॅबस बदलला मांत्रिक आपला मंत्र प्रभावी आहे हे ठसवण्यासाठी मोठ्याने मंत्र म्हणतो तसे हे आहे काँग्रेस आवाज न करता दुसऱ्याचा आवाज दाबण्यात निष्णात आहे
आपण अशा दोन फ्रण्टमध्ये जगतो आहोत
तिसरा फ्रंट हा त्यावर उपाय होता पण तो फक्त नेहमीप्रमाणे फक्त कागदावर अस्तित्वात आहे कागद फाटला कि जेवढा आवाज होतो तेवढाच आवाज ह्या फ्रंटचा होतो आणि आता तर त्याला ओवेसींचा हिरवा रंगही देण्यात आलाय मग प्रश्नच नाही हिंदूंनी एकत्र यावे अशी सर्वांचीच इच्छा आहे असं दिसतं

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा