राजकारणात विचारवंताचा रोल काय हा एक कळीचा प्रश्न आहे आणि त्याची चर्चा प्राचीन काळापासून आपल्याकडे झाली आहे ह्याच प्रश्नाचा अधिक व्यापक भाग म्हणून राज्यकारणात मुमुक्षु आणि मुक्षु ह्यांचा रोल काय असा प्रश्न निर्माण होतो
हा प्रश्न प्रथम शैवांनीच निर्माण करून त्याचे उत्तर मोक्षुने राजगुरू व्हावे असे दिले होते त्यामुळेच विष्णुगुप्त जो मुमुक्षु आहे धनानंद आणि पुढे चंद्रगुप्त मौर्य ह्या दोघांचाही राजगुरू बनून काम करतो ( चाणक्य आणि विष्णुगुप्त हे दोन वेगळे पुरुष आहेत )
राजगुरूंची ह्याबाबतीतली भूमिका स्पष्ट होती समग्र जनतेला अध्यात्म शिकवायचे असेल तर प्रथम राजालाच अध्यात्मिक बनवावं जेणेकरून जनता राजाची गोष्ट मानत असल्याने राजाच अध्यात्मिक झाला तर जनताही अध्यात्मिक होईल जर राजाच साधक झाला तर जनताही साधक होईल म्हणूनच सिद्ध लोकांनी राजगुरू होणे स्वीकारले सत्य अहिंसा अपरिग्रह संयमित काम आणि अचौर्य ह्याचा आधार समाजगाड्याला प्राप्त व्हावा अशी ह्यामागे कळकळ होती
वैदिकांनी ह्याला छेद देत दोन संकल्पना निर्माण केल्या १ राजर्षी २ राजपुरोहित राजर्षी म्हणजे मोक्षाची साधना करणारा पण प्रत्यक्षात राजकारणात असणारा ऋषी आणि राजपुरोहित म्हणजे राजाच्या धार्मिक कामाचे पौराहित्य करणारा ब्राम्हण
ह्यातील पुरोहितांनी राजे लोकांची चमचेगिरी करणे सुरु केले आणि राजे लोकांनी केवळ लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पुरोहितांना वापरायला सुरवात केली काही पुरोहित तर इतके सत्तालालसी होते कि त्यांनी स्वतःच राजेपद वा राजा आपल्याकडे ठेवायला सुरवात केली ह्यातून बजबजपुरी माजणे अटळ होते
ह्यातून सुटका केली ती कपिल महावीर आणि बुद्ध ह्यांनी ! जेव्हा महावीर आणि गोतम निर्वाणाला उपलब्ध झाले तेव्हा अनेक राजेरजवड्यांनी त्यांना राजगुरू होण्याची ऑफर दिली पण त्यांनी ते पद स्वीकारण्याऐवजी त्यांचे अध्यात्मिक मार्गदर्शक होणे स्वीकारले
महावीर आणि बुद्धाचा ह्यामागचा हेतू स्पष्ट होता ते निर्वाण हे इतके अंतिम मानत होते कि राजांनी शक्य असेल तर भिखु बनून संघात सामील व्हावं अशी सूचना ते देत ह्याचाच पुढे अधिक विकास होऊन जैनांनी चंद्रगुप्त मौर्याला जैन बनवून आपल्या संघात आणले बिंबीसारला आजीविकांनी अजिविक बनवून आपल्या संघात आणले तर अशोकाला बौद्धानी आपल्या संघात आणायचा प्रयत्न केला
आधुनिक काळात पक्षात एखाधा राजगुरू आणण्याची परंपरा सुरु केली ती काँग्रेसने महात्मा गांधी हे काँग्रेस पक्षाचे मुमुक्षु राजगुरू होते त्यामुळेच काँग्रेसचे सभासद न होताही ते काँग्रेसचा गाडा हाकत राहिले
स्वातंत्र्यानंतर राजगुरू गायब झाले आणि राजपुरोहित बोकाळले अगदी इंदिरा गांधींनीही धीरेंद्र ब्रह्मचारी नावाचा एक भुक्कड माणूस राजपुरोहित म्हणून आणला
भारतीय जनता पक्षाने मात्र पूर्णपणे एक नवे मॉडेल आणले त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे प्रत्येक राज्यात पक्षाचा एक प्रादेशिक राजगुरू वा राजपुरोहित आणायला सुरवात केली आणि ह्या राजपुरोहितांची संख्या प्रचंड वाढावी ह्याची यथास्थित काळजी घेतली
१ उत्तर प्रदेश बिहार झारखंड : रामदेवबाबा मुमुक्षु साक्षी महाराज आदित्यनाथ योगी
२ पंजाब : रामरहिमबाबा इन्सा हे प्रकरण अंगाशी आलं
३ गुजरात राजस्थान : राजर्षी महाराज पांडुरंग शास्त्री आठवले व आसारामबापू
४ महाराष्ट्र :पांडुरणशास्त्री आठवले अनिरुद्धबापु
५ दक्षिण भारत : जग्गी वासुदेव रविशंकर
६ मध्य प्रदेश : उमा भारती
७ गोवा : सनातन संस्था
८ दिल्ली : आखाडा
ह्यांच्या साहाय्याने जेव्हा भाजप आपला मतदारांचा बेस तयार करत होता तेव्हा काँग्रेस झोप काढत होती मी ह्याकाळात अनेक काँग्रेसवासीयांना काय चाललंय ह्याची कल्पना देण्याचा प्रयत्न केला पण नेहरूंवियन स्वप्नरंजनात लिप्त काँग्रेसवासीयांना अजूनही आपल्या भवती काय घडतंय ह्याचा अंदाज आलेला नाही धर्मवादी वेड हे समस्त दाक्षिणात्य आशियाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याला कंट्रोल करणारा महात्मा गांधी नावाचा रिमोट तुमच्याजवळ शिल्लक नाही कम्म्युनिस्टांच्या भाकरी माणसाला महत्वाची ह्या आशियाई वास्तवात न आढळणाऱ्या गृहीतकाला काँग्रेस नेहरूकाळापासून भुलली आहे पाक बांगला देश सारख्या ठिकाणी धार्मिक राजवटी आलेल्या असूनही अनेकांच्या झोपा संपतच नाही भारतात अशी राजवट येणे कुणालाच परवडणारी नाही पण ती येऊ नये म्हणून काय करायला हवं ह्याचा साधा विचारही नव्या युगाप्रमाणे करायला हवा हे कुणाच्या गावी नाही हिंदुत्ववादी लोकांना घराघरात जाऊन काय सांगतात हे जाणून घेण्याची साधी उत्सुकताही अनेकांच्या ठायी नाही हिंदूंच्यावर एक समुदाय म्हणून होणाऱ्या अन्यायाची कसलीही फिकर ह्या लोकांना नाही अनेक सेक्युलर ज्ञानेश्वरांचे रूपांतर सेक्युलर रेड्यात झालंय १९ व्या शतकातील सेक्युलॅरिज्मची पोपटपंची आता लोकांना कंटाळा आणते कारण आसपासचे अल्पसंख्याक काय करतायत हे त्यांना दिसत असते वस्तुस्थिती अशी आहे कि हिंदू घाबरलेला आहे आणि घाबरलेला मनुष्य निकराच्यावेळी उठतोच आणि ह्याचा फायदा घेऊन उन्माद पसरवणारे लोक पुरोहितशाहीत असतातच पुरोहितशाही ही स्वभावतः ट्रोलिंग करण्यात एक्सपर्ट असते जे लोक आपण केलेले खूनही कनविन्सीगली पटवतायत त्यांच्या ट्रोलपॉवर बद्दल शंका कोण घेणार ?
अशा वातावरणात जेव्हा सर्व मोक्षु आणि मुमुक्षु भाजपच्या बाजूने उभे आहेत जेव्हा सर्व राजपुरोहित भाजपच्या बाजूने उभे आहेत तेव्हा ज्यांना सर्वधर्मसमभाव मान्य आहे अशा माझ्यासारख्याला एक भूमिका घ्यावी लागते ज्यांना धर्माचा धंदा करायचा आहे असे लोक भाजपकडून उतरले तर ते नैसर्गिक आहे पण प्रत्यक्षात जग्गी वासुदेव सारखा अत्यंत सेन्सिबल मनुष्य मोदींना समर्थन द्यायला लागतो तेव्हा तेव्हा मग स्वतःच्या घरात बसण्यात काही अर्थ उरत नसतो दोन्ही बाजूंच्यातलं सत्य पाहून निदान एक मांडणी तरी करावी लागते धर्म नीट नसेल तर मोक्षाचा रस्ता अधिकच अरुंद बनत जातो हे आपण औरंगजेबाच्या राजवटीत अनुभवले आहे गोविंदसिंग आणि
सर्मद कशानी सारख्या मोक्ष मिळवलेल्या लोकांची हत्या करतांना औरंगजेबाला लाज वाटली नाही धर्म अनेकदा मोक्षाची हत्या करतो अशावेळी आर्थिक प्रश्न मागे पडतात औरंगजेब आपला अख्खा खजिना धर्मवेडापायी रिकामा करतो धार्मिक वेडाने पागल झालेले लोक त्याचा जयजयकार करतात फक्त शैव असलेले शिवाजी महाराज औरंगजेबाला अकबराची आठवण करून देतात पण औरंगजेबाला अकबर आठवत नाही उलट शिवाजीच्या मुलाला मुस्लिम बनवण्यासाठी तो त्याचे डोळे काढतो सालटी काढतो संभाजी धर्मासाठी मरतात आणि आपले पुरोगामी संभाजीचे हे बलिदान विसरून औरंगजेबाच्या समर्थनाच्या पोस्ट्स टाकत आपली विश्वासार्हता संपवतात
एकीकडे संभाजीला मारले म्हणून समस्त मुसलमानांना दोष देणारे प्रतिगामी लोक हे विसरतात कि शिवाजींच्या लष्करात ४० टक्के लोक मुस्लिम होते आग्र्याच्या सुटकेत स्वतःचा प्राण जाणार हे माहित असूनही शिवाजीचा डुप्लिकेट म्हणून उभा राहणारा हिरोजी फर्जंद मुस्लिम होता दुसरीकडे औरंगजेबाच्या धर्मनिरपेक्षतेची ग्वाही देणारे पुरोगामी लोक हे विसरतात कि ह्या बादशहाने संभाजी महाराजांना हाल करून मारले आहे
सत्य म्हणजे प्रचार न्हवे सत्य म्हणजे पुराव्याच्या आधारे प्रयोगसिद्धतेच्या आधारे घेतलेला शोध !
हिंदुत्ववाद हा इस्लामत्वाला काउंटर रिऍक्शन म्हणून जन्माला आला आणि राजपुरोहितांनी त्याचा परिपोष केला पाकिस्तान व बांगला देश ह्यांच्यात इस्लामिक स्टेट आले नसते आणि हिंदुस्थानातल्या काहींनी हिंदुस्तानात इस्लामिक स्टेट आणण्याची स्वप्ने पाहिली नसती तर अलीकडचा हिंदुत्ववाद वाढलाच नसता . आज अवस्था अशी आहे कि इस्लामत्वाला काउंटर म्हणून खुद्द ख्रिसचनांच्यात ख्रिस्तत्ववाद जन्माला येतो आहे न्यूझीलंडमधील घटना त्याची द्योतक आहे हे सर्व असंच वाढत राहील तर पुन्हा एकदा क्रुसेड्स उभी राहणं अटळ आणि हे कुणालाच परवडणार नाही
माणसाने जे वैभव आजवर प्राप्त केलंय ते शाबूत राहावं असं वाटत असेल तर हिंदूंच्या ठसठसत्या जखमा कुठं आहेत ते नीट समजून घ्यायला हवं त्याऐवजी हिंदूंच्यावरच तुम्ही डाफरत राहणार असाल तर तुमच्या पुरोगामित्वाचे शेण होणे अटळ . हिंदूंचा मूर्खपणा वारंवार दाखवायला हवा पण पुरोगामीपणा म्हणजे हिंदू लोकांची टर उडवणे आणि मुस्लिमांच्या कर्मठ गोष्टींची भलावण करणे असं होणार असेल तर अंतिम फायदा पुरोहितशाहीला होणं अटळ आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा