हिंदुत्व ,
हिंदुत्व
१
माझे स्वतःचे एक धोरण असे कि आधी कोणी त्या विषयावर काम करतं का त्याची वाट पाहायची आणि जर कोणी आपणाला अभिप्रेत काम करत नसेल तर स्वतः करून टाकायचं . चौथी नवता असो शैव धम्म असो आगमवाद असो इतिहास असो मी कायमच कुणी काम करतं का ह्याची वाट पाहात आलोय आणि जेव्हा ही कामं झाली नाहीत तेव्हा मी ती स्वतःच केलीत गेली २ वर्षे मोदींच्या अर्थशास्त्रावर नीट समजून घेऊन कोणी त्याची खोल चिकित्सा करेल म्हणून वाट बघत होतो पण कुणीही हे काम केले नाही म्हणून साधारण ४० -४५ मिनिटांची सात व्याख्याने मी गुगल प्लस वर टाकली १९८० नंतर ज्याला अर्थशास्त्रात बिग हाऊस इकॉनॉमी म्हणतात तिची स्थापना करायचा प्रयत्न मोदींनी चालवला भारतीय मातीत व अवकाशात हा मूर्खपणा होता आणि तो नीट उत्खनन करून दाखवणे गरजेचे होते म्हणून मी कधी न्हवे ते अर्थशास्त्रावर व्याख्याने दिली नितीन वाघांचा अपवाद बघता कोणी गूगल प्लस वर फिरकलेही नाही अर्थात माझे लिखाण कधीच वाचकांच्यावर मी अवलंबून ठेवलेले नाही आता मी हिंदुत्वादाची सविस्तर चिकित्सा करावयाचे ठरवले आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे करणे आवश्यक आहे मोक्षु व मुमुक्षुने सत्यवादी असावे उगाच राजकारणी लोकांच्या व पत्रकारांच्या प्रचारकी वैचारिकतेत फसू नये असे माझे ठाम मत आहे त्यामुळेच राजकीय टिपण्या करून लोकप्रियता मिळवण्यापेक्षा मूळचेच समजून घेऊन लिहिणे मला आवडते
हिंदुत्ववाद हा काहीतरी बहुविधता नसलेला प्रकार आहे अशी आपल्याकडच्या अनेक विचारवंतांची न वाचताच ठाम समजूत झालेली दिसते वास्तविक हिंदुत्व विचार हा जन्मस्थानीच तीन नद्यांनी उमलला
अनेकांचा गैरसमज असा कि हिंदुत्व सावरकरांनी मांडले प्रत्यक्षात सावरकरांच्या आधी किंवा लगोलग ते प्रथम महाराष्ट्रात प्रबोधनकार ठाकरे व बंगालमध्ये मुखर्जीनीं मांडले त्यामुळेच हिंदुत्वाचे
१ सावरकर
२ ठाकरे
३ मुखर्जी
असे तीन चेहरे आहेत ह्या तिघांच्या मांडणीचा मी सविस्तर विचार करणार आहे भाषा मराठी आणि हिंदी असतील
श्रीधर तिळवे नाईक
२
कल हमने प्रबोधनकार ठाकरेजीकी हिंदुत्व लाइन जाननेकी कोशिश की १९१५ से आकार लेनेवाली और १९१९ में प्रकाशित ये लाइन शायद हिंदुत्व की आद्य लाइन हैं ! इसीसमय अंदमानमे एक और मराठी शख्स हिंदुत्वकी लाइनपे चलनेका प्रयास कर रहा था ! उनकी लाइन ठाकरेकी तरह सोशल नहीं थी वे पॉलिटकल एंगल से ज्यादा सोच रहे थे उनका नाम था विनायक दामोदर सावरकर ! भारतीय इतिहासका शायद सबसे उपेक्षित महानायक !
आज उन्हें जाननेकी कोशिश करते हैं
3
ह्या देशाचं हिंदुत्वाबाबतचं सर्वात मोठं दुर्देव जर कुठलं असेल तर हिंदुत्वाचे ह्या देशात एकतर भक्त असतात ज्यांना सावरकरांनी काय लिहलंय ते वाचायचं नसतं आणि वाचलं तरी त्याचं कठोर विश्लेषण करायचं नसतं किंवा मग एकदम सावरकरांचे द्वेष्टे असतात ज्यांना फक्त सावरकर सोयीस्कररीत्या वाचायचे असतात आणि ह्यांनाही विश्लेषण करायचं नसतं त्यांना सावरकर कसे प्रतिगामी , गांधींचे खुनी , मुस्लिमांचे द्वेष्टे आहेत ते सांगायचं असतं ह्याला अपवाद फक्त नरहर कुरुंदकर होते तर पुरोगामी लोकांनी त्यांची इतकी उपेक्षा केली कि बोलता सोय नाही आज पुरोगामी लोक कुरुंदकरांना घेऊन डान्स करतायत पण ते हयात असतांना तुम्ही त्यांच्या उपेक्षेखेरीज काय केलं ? माझी सावरकरांच्याविषयीची लाईन ही कुरुंदकरांच्या लाईन सारखी आहे पण त्यांच्या काळात न्हवता इतका आता जग मुसलमान बनवण्याचा अजेंडा पसरलेला आहे अरबी लोक इराण इराक अफगाणिस्तान पाकिस्तान आणि भारतातील मुसलमानांना " मवाली " म्हणतात ही अरबांनी हिंद मुसलमानांना दिलेली शिवी आहे आणि आजही आपण व्यवहारात हा मवाली शब्द शिवी म्हणूनच वापरतो पाक मुस्लिम हे इतके फॅनॅटीक कि त्यांनी अलीकडे हदीस मोडून तोडून प्रेषिताच्या नावाने एक मेसेज सांगितलाय तो म्हणजे " ह्यापुढे अरब मुसलमान फक्त भोगवादात रमेल आणि इस्लामचे नेतृत्व मवाली लोकांच्या ताब्यात येईल हे मवाली हिंदुस्थान आणि चायनाच्या वझीरे आझमला युद्धात हरवून त्यांना खिलाफतच्या पुढे बेड्या घालून पेश करेल आणि मग सगळे जग मुस्लिम होईल " पाकिस्तानला असं वाटतं कि त्यांच्याकडे एक विशेष रोल आहे कारण मवाली म्हणावयाला ते सर्वाधिक लायक आहेत . सावरकरांनी जो धोखा सांगितलाय त्याचे खरे स्वरूप हे आहे पुरोगामी लोकांनी डोळे बंद केले म्हणून काही तो गायब होणार नाही जैशे महम्मद वैग्रे सर्व संघटना ह्या अजेंड्याखाली काम करतायत त्यांना आपण सगळं जग मुस्लिम बनवण्याचं नेक काम करणार आहोत असं वाटतं हे वेड एव्हढं कि पाकने स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेचं पुरे मातेरे केले आहे त्यामुळे अशा प्रकारचं मातेरं भारताचं होता कामा नये असे वाटत असेल तर हिंदुत्ववाद्यांना अटकाव करावाच लागेल पण दारुल ए हिंदचा फॅनेटिक मुस्लिमवादाचा बंदोबस्तही करावा लागेल डोळे मिटून ओंजारण्याचे गोंजारण्याचे पुरोगामी उपाय फेल गेलेत उलट सुशिक्षित मुसलमानांचा दहशतवादी कृत्यातला सहभाग वाढतो आहे अशावेळी करायचे तरी काय हिंदुत्वाचा अभ्यास हा त्यामुळे अटळ आहे सेक्युलर उपाय फेल गेलेत म्हणून लोक हिंदुत्ववादी उपायाकडे गेले अशावेळी हिंदुत्ववादी उपायांची परखड मीमांसाच आपण करणार नसू तर आपल्यासारखे मूर्ख आपणच !
४
हिंदुत्वाची मांडणी करतांना मी शैव पॅरॅडाईम्स अँड युरोअमेरिकन पॅरॅडाईम्स ह्या माझ्या इतिहासावरील बृहदग्रंथाचा आधार घेतला आहे मी मुद्दामच ऑडियो रूपात हे सादर करतोय कारण हिंदुत्ववादी लोक हे अनेकदा ऐकतात वाचत नाहीत हा माझा अनुभव ! ठाकरे नेमकं काय म्हणतात सावरकर नेमकं काय म्हणतात हेच अनेकदा लोकांना माहित नसतं हा माझा अनुभव
हे पहिले व्याख्यान प्रबोधनकार ठाकरेंच्यावर दिले
दुसरे व्याख्यान सावरकरांच्यावर आहे सावरकरांच्या वैचारिकतेचा माहोल नेमका काय होता हे स्पष्ट करणे आवश्यक होते
तिसरे व्याख्यान सावरकरांच्या बालपणाशी निगडित घटनांशी आहे कारण १८९३ साली मुंबईत झालेला दंगा आणि सावरकरांनी बालपणातच प्रतिशोध म्हणून नाशिकमध्ये मशिदीवर केलेला हल्ला ह्यात हिंदुत्ववादाची बीजे आहेत असं मला वाटतं "हिंदू असण्याचा शोध हिंदू होनेका मतलब " त्याकाळात टिळक गांधी आंबेडकर आणि सावरकर असे चौघेही घेत होते असे माझे म्हणणे आहे
चौथ्या व्याख्यानात सावरकरांची ज्ञानमीमांसा चर्चेला घेतलेली आहे सावरकरांचा विश्व , विश्वातील माणूस , ज्ञान आणि ज्ञानांची प्रमाणे ह्यांच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे त्याची सविस्तर चर्चा मी केली आहे त्या काळातील मार्गी आणि महामार्गी ह्या दोन ध्रुवात फक्त सावरकर आणि गांधीच आहेत जे थेट भारतीय धारेत उभे आहेत हे त्यांचे वैशिष्ट्य अधोरेखित केले आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा