मनोहर पर्रीकर गेले होते मनोहर तरी श्रीधर तिळवे नाईक

होते मनोहर तरी श्रीधर तिळवे नाईक

मनोहर पर्रीकर गेले ज्या प्रकारची माणसे राजकारणात आवश्यक आहेत असं मला वाटतं त्या प्रकारात मोडणारा राजकारणी गेला . १९८० नंतर अविनाश धर्माधिकारी आणि मनोहर पर्रीकर ही हिंदुत्ववादी गटातील दोन अशी माणसे उदयाला आली होती जी राजधर्माला जाणणारी आणि जपणारी होती त्यातील अविनाश धर्माधिकारिंच्या पोटेंशियलचा  सत्यानाश मराठीच्या करंट्या राजकारणाने केला सुदैवाने आम्हां गोवेकरांनी पर्रीकरांचा अविनाश धर्माधिकारी होऊ दिला नाही

मी पर्रीकरांच्याविषयी प्रथम सविस्तर ऐकलं ते माझे मामा माजी आमदार रोहिदास नाईक ह्यांच्याकडून ! त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राजकारणात भाग घ्यायला सुरवात केली तेव्हा ! अत्यंत स्वच्छ चारित्र्याचा तरुण नेता अशी त्यांची त्याकाळात इमेज होती

प्लेन बुशशर्ट , ट्राउझर आणि सॅन्डल  ह्या वेषात हिंडणारी त्यांची मूर्ती गोवेकरांना आपलीशी वाटली बायसिकलवरून विधानसभेत जाणारा आणि पब्लिक ट्रान्सपोर्टमधून हिंडणारा उच्च विद्याभूषित असा हा नेता लवकरच गोवेकरांचा लाडका झाला १९९४ ला त्यांनी पहिली विधानसभा जिंकली आणि अपेक्षेप्रमाणे ते पुढे मुख्यमंत्रीही झाले

गोव्यातल्या पाडापाडीच्या राजकारणाने त्यांचाही बळी घेतला पण तरीही ते जेव्हा जेव्हा अधिकारपदावर आले तेव्हा तेव्हा त्यांनी अव्वल दर्जाचे काम केले इतके की सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांचा सन्मानही त्यांना मिळाला

माझे घर हे कडक महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे पण तरीही पर्रीकरांच्या बद्दल असलेला सॉफ्ट कॉर्नर कधी गेला नाही कारण त्यांची सुसंस्कृत वृत्ती घराच्या गांधीवादी पॅटर्नमध्ये ते भाजपवादी असूनही बसत होते मगोप भाजपबरोबर युतीत सत्तेत असल्याने पुरोगामी लोकांची टीका बोकांडी बसलेली असली तरी काम करत रहायचे हा पॅटर्न मगोपने स्वीकारला काँग्रेसचा ख्रिश्चनधार्जिणेपणा हा गोव्यात जेवढा उघड्यावर पडला तेवढा तो कुठल्याच राज्यात पडला नाही आणि त्याने भाजपच्या उदयाला आणि वाढीला प्रचंड मदत केली  मगोपने शक्य असूनही ह्याबाबत काहीच केले नाही आणि गोवा हळूहळू मगोपच्या हातातून भाजपच्या हातात गेला

मात्र गोव्यातला हिंदुत्ववाद परीकरांच्यामुळे कधीच हार्ड झाला नाही मी पर्रीकरांना हिंदुत्ववादातील स्निग्धता  म्हणे मात्र निर्णय घेतांना मात्र ते तर्ककठोर असत अर्थात ह्याचा अर्थ सर्व काही आलबेल होते असे नाही हायकमांडच्या प्रेशरपुढे ते निष्ठावंतांच्या सारखे झुकत कोकणीबाबत त्यांनी केलेली चालढकल माझ्या पुतण्याला
म्हणजे सुरेल तिळवेला चांगलीच खटकलेली ! भ्रष्टाचाराकडे पर्रीकर हळूहळू कानाडोळा करतायत कि काय अशीही शंका यायला लागलेली ! पुढे त्यांच्या प्रकृतीविषयी कळल्यावर सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या

आणि मग ती काळीकुट्ट रात्र आली मोदींना मंत्रिमंडळात पर्रीकरांची वाढत चाललेली लोकप्रियता खटकायला लागलीये अशी गपशप हवेत होती आणि नेमक्या त्याचवेळी गोव्यातली विधानसभा त्रिशंकूला पुन्हा एकदा लटकली आणि गोवेकरांनीच आपल्या सर्वोच्च नेत्याचे पाय कापले पर्रीकर मुख्यमंत्री होणार असतील तरच आम्ही साथ देऊ अशी अट घातली गेली अमित शाहनी नितीन गडकरींच्यावर गोवा हाताळण्याची जबाबदारी टाकली आणि पुन्हा एकदा मराठी माणसाने कच खाल्ली पर्रीकरांनी संरक्षणमंत्री पदावरून पायउतार व्हायला ठाम नकार द्यायला होता पण त्यांनी संरक्षणमंत्रीपद सोडले आणि त्यांचा शरद पवार झाला राष्ट्रीय राजकारण खेळण्याची मराठी लोकांची अपात्रता पुन्हा सिद्ध झाली

पर्रीकर गोव्यात आले मुख्यमंत्री झाले पण नियतीने पटावर अनारोग्याच्या खेळ्या सुरु केल्या आणि आज एका उमद्या नेतृत्वाचा अंत झाला

माझी पर्रीकरांना हृदयापासून श्रद्धांजली

श्रीधर तिळवे नाईक






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट