नितीन वाघ
अंगुलीनिर्देश धारणा न्हवे अंगुलीनिर्देश शून्यातून जन्मतो तो ज्या भाषेतून जन्मतो ती भाषा म्हणजे सामाजिक धारणा असते त्यामुळे अंगुलीनिर्देश धारणा वाटतो आणि कालांतराने बनतोही बुद्ध जेव्हा पाली भाषेत बोलतो तेव्हा तो शून्यातून आलेला असतो म्हणूनच तो पाली भाषेतून अनेक भाषांत भाषांतरित होतो अंगुलीनिर्देश हा नेहमी बोलणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या भाषांतून जन्मतो कारण तो कळावा म्हणून तशी योजना असते त्यामुळेच बुद्ध इंग्लिश किंवा मराठी भाषेतून अंगुलीनिर्देश करत नाही आता तो संस्कृतमधून अंगुलीनिर्देश करत न्हवता म्हणून त्याला मोक्ष प्राप्त न्हवता असे समजणारे पंडित असतातच कि ! पंडितांना बौद्धिक अहंकाराच्या साहाय्याने समोरच्याची कोंडी करायची असते कारण त्यांना त्यातून अहंकार शांत होतो पण बुद्धांना अंगुलीनिर्देश करायचे असल्याने ते समोरच्या माणसांनुसारच अंगुलीनिर्देश करतात हे अंगुलीनिर्देश धारणा नसतात म्हणूनच त्यांचे भाषांतर शक्य होते पण ते ज्या भाषेतून होतात ती भाषा धारणा असते आणि पंडित ह्या अंगुलीनिर्देशांची धारणा बनवतात आणि त्यातूनच पुरोहितगिरी जन्मते पंडित मोक्षांचीही धारणा बनवतात पण ती धारणा म्हणजे मोक्ष वा निर्वाण न्हवे मोक्षाविषयीची पंडिती धारणा हा कल्पनाविलास आहे म्हणूनच साधना करतांना असा कल्पनाविलास प्राप्त होतो तेव्हा भुक्कड अध्यात्मिक पुढारी तयार होतात खरा साधक हा कल्पनाविलास ओळखतो आणि पुढे सरकतो जगातला सर्वात मोठा भ्रम मोक्ष वा निर्वाण असू शकतो स्वतःला फसवून लाखो करोडो अनुयायी मिळवायचे कि हा भ्रम ओळखून पुन्हा साधना करायची हे ज्याने त्याने ठरवायचे असते
मोक्ष किंवा निर्वाण किंवा कैवल्यप्राप्ती तुला जे काही म्हणायचं आहे ते तर ते नाकारायचे तुझे स्वातंत्र्य मला मान्य आहे आपल्याकडे चार्वाक लोकायतवाल्यांनी ते ठामपणे केले आहे धर्म आणि मोक्ष ह्यांना ठाम नकार हे त्यांच्या तत्वज्ञानाचे वैशिष्ट्य पण मग तुला बौद्ध धर्म वा धम्म तुला ठामपणे नाकारावे लागतील त्याला तुझी तयारी आहे का ? दुसरी गोष्ट ते नाकारायलाही तुला साधना करावी लागेल प्रयोग करावा लागेल आणि निष्कर्ष काढावा लागेल कि हे सर्व भंपक आहे माझ्या घरात माझे वडील असे होते ते अचानक बदलले ते माझ्याबरोबर बसलेले असतांना अचानक आलेल्या अनुभवामुळे त्यांनी माझं शिष्यत्व स्वीकारायचा प्रयत्न केला आणि मी कुणालाच शिष्यत्व देत नसल्याने ठाम नकार दिला पण वयाच्या सत्तरीनंतर त्यांची साधना सुरु झाली स्वतंत्रपणे तर आज तू नकार दिलास म्हणून कायमच नकार देशील असं नाही मीही १२ वीला असतांना अनुभवामुळे सुरु झालो हे सांगण्याचे कारण हेच कि निर्वाणाचा वा मोक्षाचा प्रवास हा अनुभवाने सुरु होतो तेव्हा तो अधिक व्हॅलिड असतो केवळ झेन बौद्ध शिवसूत्र वैग्रे वाचून बौद्धिक सुरवात झाली तर ती अनेकदा पोकळ असते जोवर प्रत्यय येत नाही तोवर मोक्ष वा निर्वाणावर काडीचाही विश्वास ठेवू नये
आणि केवळ शाब्दिक खेळच खेळायचे असतील तर --- लेखकांना हा हक्क आहेच शब्दांचा रवा पाडत जगणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहेच
तुझा निर्देश मी समजू शकतो आणि त्याने सत्यात फरक पडत नाही समज उलटा निर्देश असेल तर तीही अंधश्रद्धाच केवळ पॉझिटिव्ह म्हणून तोही निर्देश सत्यात फरक पाडू शकत नाही
निर्देश तुच्छता वाटू शकतो पण ज्या संदर्भात तो केला गेलाय त्या संदर्भात तो आवश्यक आहे रोमँटिक लोकांच्या कवितांची अध्यात्मिक भुक्कडगिरी ह्यापेक्षा अधिक कठोर भाषेत दाखवण्याची वेळ आलीये ज्यांना शिष्य बनवायचे आहे त्यांनी केलेले कौतुक मी समजू शकतो ओशोंच्या प्रवचनात आपला विनोद वा कविता यावी म्हणून लाळ गाळणाऱ्यांचे किस्से मला माहित आहेत अपवाद आहेत उदा शिरीष पै त्या खरोखरच सिरिअस होत्या दारूवर मी एक व्याख्यान दिले आहे ती किती धार्मिक राजकारण व वॉर राजकारणाचा भाग होती ह्याचे स्पष्ट पुरावे मला आँखोंदेखी माहित आहेत
===
निरुपमा शहा
बुद्धत्वाबाबत जे अनेक भ्रम आहेत त्यातील एक भ्रम म्हणजे बुद्धशरीरे भौतिक जगापासून मुक्त असतात नाही बुद्धत्व प्राप्त झाले म्हणून तुम्ही काही प्राणवायूशिवाय जगता असं नाही त्यामुळे शारीरिक वेदनांच्यापासून सुटका नाही मात्र त्यांना तुम्ही हसत हसत बघू शकता पण ह्याचा अर्थ तुम्ही आसक्त्यापासून मुक्त झाला असा नसतो जोवर आत्मा किंवा मी नाहीसा होऊन केवळ व्याकरण होत नाही तोवर मोक्ष वा निर्वाण प्राप्त झाले असे होत नाही
प्रवास अनुभवाने सुरु झाला तर थोडा व्हॅलिडिटीने सुरु होतो पण ज्ञानाने वा माहितीने सुरु झाला तर निर्णय त्या त्या साधकालाच करावा लागणार आणि साधकाने कुणावरच विश्वास ठेऊ नये मग कोणी कितीही मोठा असो जोवर प्रत्यय येत नाही तोवर मोक्षावर किंवा निर्वाणावर अजिबात विश्वास ठेऊ नये चोजन वन ही भंपकगिरी आहे मोक्ष कुणालाही कधीही घडू शकतो
====
मराठीत घनगंभीर कवी खूप आहेत पण मोक्षगंभीर कवी मला एकही भेटलेला नाही संध्याकाळी सहा वाजता मोक्षावर चर्चा करून आठ वाजता दारूबाबत कासावीस होणारेच अनेक आहेत धन्यवाद
=====
सभ्यतेची भाषा डेड (मृत ) झाली ह्या शतकात ! जे कृष्णमूर्ती सभ्य भाषेत बोलून समजाऊन शेवटी मी काय म्हणतोय ते कळतंय का असा प्रश्न विचारून निघून गेले तरी त्यांच्या आसपासचा एकही शिष्य मोक्षाला उपलब्ध झाला नाही बुद्धाच्या कालखंडात लोक इतके बधीर न्हवते सध्याच्या युगात बोधीधर्माची उग्रता आणि शिवाचे तांडव कदाचित काम करेल कदाचित झेन मास्टरांचा दंडुका अंगुली निर्देशातली अंगुली मुक्तच असते निर्देश मात्र समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असतो आणि समोरची व्यक्ती तिच्या युगात उभी असते . तुझं लक्ष्य ना अंगुलीकडं आहे ना निर्देशित कडे आहे ते निर्देशाकडेही नाहीये निर्देशाच्या भाषेकडे आहे आणि ही आजच्या युगाची शोकांतिका आहे प्रत्येक व्यक्ती वेगळी तिचा मोक्षही वेगळा आणि त्या मोक्षाची अंगुलीनिर्देशताही वेगळी
साहित्यिक समोर असतील तर अंगुलीनिर्देशता साहित्याच्या संदर्भातच असणार भगवान शिव तंदूशी बोलताना नाट्यशास्त्र डिस्कस करतात तर तू त्यांचं काय करणार ? बोधीधर्म तर मास्टर आर्ट्सचा चायनातला पायोनियर त्याच्या उग्रतेची वर्णनं कवटाळणारे काही कमी नाहीत तुकारामानंतर एकही मराठी साहित्यिक मोक्षाला उपलब्ध नसेल तर त्याचा अर्थ साहित्यिक मोक्षापासून कोसो दूर आहेत असा होतो राहिली गोष्ट व्यवहाराची तर तो पार पाडत जगावे सर्वांनी बुद्धासारखं रिटायर होऊन धम्म स्थापन करत हिंडलं पाहिजे असं नाही बसवेश्वर मंत्री म्हणून मोक्षानंतरही काम करत राहिले ते राजाला महाराजच म्हणत त्यावेळीही हे खटकणारे लोक होतेच बुद्ध असा असावा तसा असावा असे ढाचे तयार करणारे लोक ह्या जगात कायमच झालेत आणि अशाच लोकांनी बुद्धांचे खून केलेत त्यांना सुळावर चढवलंय तरीही प्रत्येक बुद्ध स्वतःची स्वयंसिद्ध शैली घेऊन वावरला ज्यांना पटला त्यांनी स्वीकारला ज्यांना पटला नाही त्यांनी नाकारला तुला पटला नाही नाकार सिम्पल आहे
============
मोक्ष असतो जे असतं ते मोक्ष मोक्ष प्राप्त झालेला देह बघता येतो फेसबुक वर तर तेही शक्य असत नाही तिथे फक्त चिन्हे त्यामुळे अंगुलीनिर्देश आणि निर्देशच चालला आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा