इतिहास , निवडणूक आणि आत्ताचा काळ श्रीधर तिळवे नाईक
इतिहास हा नेहमीच उपलब्ध साधन सामुग्रीवर अवलंबून असतो आणि इतिहासकार हा नेहमीच काळाने जखडलेला असतो तो म्हातारा नसतो पण जख्ख असतो माझ्या आयुष्यात मी २०१० पर्यंत इतिहासाची साधना केली आणि त्यातून दोन इतिहास लिहिले
पहिला चिन्हकीचा जो माझ्या चौथ्या नवतेच्या संकल्पनेचा विस्तार होता जो १९९० ते १९९४ पर्यंत उपलब्ध असलेल्या रिसोर्सवर अवलंबून होता हा इतिहास इतिहास न्हवता तर चिन्हकीचा अभ्यास होता पण तो सादर करतांना त्याला इतिहासाचे स्वरूप आपोआप आले
दुसरा २००५ मधल्या माझ्या जेएनयू मधल्या निबंधसादरीकरणाने सुरु झालेल्या शैव पॅरॅडाईम्स अँड युरोपियन पॅरॅडाईम्स ह्याने सुरु झालेला जो २०१० पर्यंतच्या साधनसामुग्रीवर अवलंबून होता आणि ज्याचा मूळ फोकस शैव धम्म होता
आता मी तिसराही इतिहास लिहावा अशी अपेक्षा काही लोक व्यक्त करतायत ही अपेक्षा योग्य आहे पण हे शक्य नाही कारण २०१० पासून माझे सर्व लक्ष्य मोक्षावर केंद्रित आहे आणि मोक्षात इतिहासाला जागा नसते किंबहुना मोक्ष म्हणजे इतिहासाचा अंत आणि स्मृतींचा केवळ टेक्निकल वापर करण्याची क्षमता
नवीन पिढीत नितीन वाघ , प्रणव सखदेव , राहुल बनसोडे , राहुल कोसंबी , अभिजित रणदिवे , पंकज भोसले ह्यांच्यासारखे सारखे काही नव्या दमाचे लोक आहेत त्यांनी आता ही नवा इतिहास लिहण्याची जबाबदारी पार पाडावी साठोत्तरी नव्वदोत्तरी नंतर द्विसहस्त्रोत्तरी इतिहास लिहिला जाण्याची आत्यंतिक आवश्यकता आहे साठोत्तरीच्या सबाल्टर्न , पोस्टकलोनियल देशीवादी इतिहासाला आम्ही चॅलेंज केले मराठीत साठोत्तरी इतिहासाने वैष्णवांचे आणि बौद्धांचे पुनर्जीवन केले बौद्ध , इस्लामिक , वैष्णव (महानुभाव आणि वारकरी ), हिंदू ( हरहरीएक वाद ) लोकायति ( विशेषतः मार्क्सवादी )इतिहासाचा अजेंडा पुढे आणला त्यातून भारतकेंद्रित हिंदुत्ववाद फोफावला अरबकेंद्रित वहाबीजम टेररिस्ट झाला आणि नवयान प्रस्थापित झाला आम्ही त्याला चॅलेंज करत शैवांचा अजेंडा पुढे आणला हे बरोबर कि चूक हे ठरवणं अवघड झालंय कारण शैव अजेंड्यातून पुढे आलेल्या नरेंद्र मोदींनी ह्या देशाचं भलं केलं कि वाईट हे ठरवणं अवघड झालंय दक्षिण भारताचे जग्गी वासुदेव असोत कि कर्नाटकातल्या लिंगायत शैव धर्माचे आचार्य असोत कि गुजरातमधले लकुलीश स्कुलचे राजर्षी महाराज असोत कि काश्मिरी शैवागमचे आचार्य असोत कि उत्तर भारतातले रामदेवबाबा असोत सर्व शैवाचार्यांनी नरेंद्र मोदींना प्रचंड पाठिंबा देऊन सत्ताधारी बनवलं खरं पण ज्या कारणासाठी हे केलं गेलं ती कारणं मोदींनी फुलफील केली नाहीत वस्तुस्थिती अशी आहे कि सर्वच्या सर्व आचार्य आतून प्रचंड अस्वस्थ आहेत पण कोणीही बोलत नाहीयेत एक वर्णजातविरहित हिंदू राष्ट्रीय आयडेंटिटी केंद्रित नवा भारतीय समाज निर्माण करण्याचे स्वप्न ह्या सर्व शैवाचार्यांनी पाहिलेलं होतं ते पूर्ण झालेलं नाही शंकराचार्यांनी सर्व भारत शैवमय करण्याची प्रतिज्ञा केली होती प्रत्यक्षात वैष्णवाने त्यांना गिळून त्यांच्याच मठाद्वारे हिंदू धर्म स्थापन केला तेच नरेंद्र मोदींचे होणार कि काय अशी शंका मी फेसबुकवर फार पूर्वी व्यक्त केली होती ही शंका खरी ठरली असे वाटते आहे (योगी मुख्यमंत्री झाले तेव्हाही आयबीन लोकमतवर झालेल्या चर्चेत मी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली होती कुणीतरी स्वतःला नाथ संप्रदायी म्हणवतं म्हणून त्याच्यामागे आंधळं होणे मला जमणे शक्यच नव्हतं आणि नाही )
गणशाही ही शैव धम्माची कणा आहे लोकशाही ही ह्या गणशाहीची आजची आवृत्ती पण मोदींनी त्याचे पालन अधिक चांगल्या रीतीने करायला हवे होते निर्णयप्रक्रियेत लोकशाही मूल्यांची कसलीही कदर न केल्याने निर्णय अत्यंत एकांगी पद्धतीने घेतले गेले हे शैव गणशाहीला किंवा कल्याणमंडपाला साजेसे नाही
मी "शैवांनी निगम परंपरेत उभे राहू नयेत "अशी कायमच मांडणी करत आलो आहे एक शंकराचार्यांचा अनुभव पुरेसा आहे पण शैव बहुमत माझ्यामागे नाही ते शैवांना हिंदू परंपरेचा भाग मानणाऱ्यांच्या बाजूने आहे त्यामुळे वैचारिक पातळीवर मी एकटा आहे पण निगमांच्यात शैव उभे राहिले कि काय होते ह्याचे उत्तम उदाहरण नरेंद्र मोदींची राजवट आहे
निगमांत उभे राहिलेल्या राम आणि कृष्ण ह्या दोन्ही शैवांची शोकांतिका आणि नरेंद्र मोदींची शोकांतिका ह्यांच्यात फारसा फरक नाही रामाने सर्वकाही गमावले आणि शेवटी सीतेमागोमाग उडी घेतली कृष्णाने स्वतःच्याच यादव कुळाचा नाश घडवला राम कृष्ण आणि शंकराचार्य हे अंतिमतः ह्या देशातील श्रुतिस्मृतिपुराणोक्त ब्राम्हणी परंपरेचे वाहक होऊन बसले आहेत मोदींचेही हेच झाले आहे निगमांच्या चक्रव्यूहात प्रवेश करून निगमांना शैव करेन ही प्रतिज्ञा ज्यांनी ज्यांनी केली ते स्वतःच निगम धर्माचे प्रचारक म्हणून वापरले गेले मराठीत ज्ञानेश्वरांचे हेच झाले आहे
आर्यानी शैवांना कायमच म्लेंछ म्हंटले होते आणि स्वतःचे वैदिक , ब्राम्हण , जैन , बौद्ध धर्म वेगळे ठेवले होते ह्यातील बौद्धांनी अत्यंत मानवतावादी भूमिका घेऊन स्वतःचा धम्म नंतर सर्वांसाठी खुला केला आणि आर्य व अनार्य ह्यांचे संमीलन पर्व सुरु झाले ह्याला शैवांचा पहिला प्रतिसाद चण्डिकेचा भक्त असलेल्या चंड अशोकाचा होता हा पहिला सम्राट होता ज्याने आपला धर्म राजकीय पातळीवर बदलला हा शैवांनी आर्य धर्मांना दिलेला पहिला सकारात्मक प्रतिसाद होता अशोकाने स्वतः धर्मपरिवर्तन केले होते कि नाही हा वादाचा मुद्दा असला तरी त्याने बौद्ध धम्माचा नक्कीच आपल्या राजधर्मात समावेश केला होता बौद्धांची घोडदौड इथूनच सुरु झाली आहे पण बौद्धांनी शैवांचं काय केलं ? आख्खा भारत बौद्धमय करेन ह्या भीमप्रतिज्ञेचं काय झालं ? ही भीमप्रतिज्ञा पूर्ण होणे अशक्य आहे म्हणूनच मी शैव , जैन आणि बौद्ध ह्यांनी एकत्र येऊन नवीन सेटप उभा करावा अशी मांडणी केली तिला प्रतिसाद शून्य आहे उलट नवयान बौद्धाचे प्रतीक असलेले प्रकाश आंबेडकर चक्क इस्लामिस्ट ओवेसींना शामिल झाले आहेत ही वैचारिक आत्महत्या होती व आहे असो हा नवबौद्धांचा चॉईस आहे आणि तो त्यांनी केला ह्याचा अर्थ त्यांना हिंदू धर्मापेक्षा इस्लाम अधिक चांगला वाटतो असा होतो असे नवबौद्धांना का वाटते ह्या प्रश्नांची सखोल चर्चा होणे फार गरजेचे आहे
आम्ही निर्माण केलेले कायदे हे अंतिम ही आर्य मानसिकता आहे त्यामुळे स्मृतिवाद आणि संविधानवाद हा आता वाढत जाणे अटळ ! आत्ताचे संविधान हे अल्पसंख्याकांना प्रचंड फायद्याचे आहे त्यामुळे संविधानवादी होणे ही अल्पसंख्याकांची मूलभूत मान्यता होणे अटळ आहे त्यामुळे पुढची लढाई संविधानवादी आणि संविधानबदलवादी अश्या दोन ध्रुवावर लढली गेली तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही ओवेसी संविधानवादी असल्याचे भासवत असल्यानेच बहुदा प्रकाश आंबेडकर त्यांच्या मागे गेलेत . ज्याप्रमाणे ब्राम्हणी धर्म अंतिमतः स्मृतिवादी असतो त्याचप्रमाणे इस्लाम हाही अंतिमतः शरियतवादीच असतो हे कळायला त्यांना थोडा वेळ लागेल
अलीकडे कम्म्युनिस्टांना कमबॅक करण्याची स्वप्ने पडायला लागलेत पण भारतात कम्म्युनिझमची काळानुरूप नवी मांडणी होणे आवश्यक आहे ती जोवर होत नाही तोवर केरळडान्स पुरता कम्म्युनिझम मर्यादित राहणे अटळ आहे कम्युनिस्टांनी शबरमल प्रकरण फारच साचेबद्ध पद्धतीने हाताळले असं माझं मत आहे
निवडणुका जाहीर झालेत अनेकांना मोदींच्या पराभवाची स्वप्ने आता पडणे अटळ आहे हिंदुत्ववादी हिंदू धर्म हा स्वतःला वैदिक वैष्णव शैव आणि शाक्त ह्यांचं समग्र रूप म्हणून अलीकडे सादर करतो ह्यातील वैदिक जेव्हा हिंदुत्वामागे उभे होते तेव्हा भाजपला फक्त दोन सीटा मिळाल्या होत्या नंतर वैश्य आणि वैष्णव उभे राहिले तेव्हा भाजपने प्रथम ८५ स्कोर करत पुढे शंभरी पार केली आणि २०१४ ला शैव आणि शाक्त ह्यांचा पाठिंबा मिळाला तेव्हा भाजपने निर्विवाद बहुमत मिळवले ह्यातील वैष्णव हे पूर्वी काँग्रेसच्या मागे असत पण काँग्रेस जेव्हा अधिकाधिक ख्रिसचनधार्जिणी आणि मुस्लिमधार्जिणी बनत गेली तेव्हा त्यांनी आपला पाठिंबा काढून घ्यायला सुरवात केला पुढे शैव आणि शाक्त दोन्हीही हर हर महादेव सिरीयल (हिंदी १८ डिसेम्बर २०११ ते डिसेम्बर २०१४ ) नंतर अचानक (ह्या सिरियलचं रिटेलीकास्ट आता केलं गेलं आहे )लोकसभेसाठी आणि जय मल्हारनंतर महाराष्ट्र विधानसभेसाठी हिंदुत्ववादी झाले (विधानसभेच्या निवडणुकीवेळी हिचंही रिटेलिकास्ट होईलच ) आणि त्यांनी भाजपाला विजयी केलं काँग्रेसवाले आणि कम्युनिस्ट आजही हा बदल बघू शकलेले नाहीत टीव्ही आणि सोशल मीडिया ह्यांचा पुरेपूर वापर भाजपने केला आहे त्यात आमचे शैवाचार्य असलेले लोकही फसले आहेत मग सामान्य शैव जणांची काय अवस्था ?
मोदींनी जर आर्थिक भाग नीट पार पाडला असता तर मोदींनी सहजरित्या ही निवडणूक जिंकली असती पण असे झालेलं नाही त्यामुळे काट्याची टक्कर आता अटळ दुर्देवाची गोष्ट अशी कि अजूनही विरोधी पक्ष एकत्र येत नाहीत आज अवस्था अशी आहे कि प्रतिगामी पुरेसे प्रतिगामी नाहीत आणि पुरोगामी पुरेसे पुरोगामी नाहीत त्यामुळेच भाजपने राम मंदिर बांधले नाही फक्त टाईमपास केला तर समान नागरी कायदा खरेतर पुरोगामी लोकांचा अजेंडा असायला हवा त्यांनीही सत्तर वर्षे टाईमपास केला त्यातच कधी न्हवे तो मीडियाही प्रथमच दोन पार्ट्यात विभागला गेला त्यामुळे मीडियात विचार कमी प्रचार जास्त झाला . इलेक्शनमध्ये हा प्रचार वाढण्याचीच शक्यता जास्त असो
वैयक्तिक पातळीवर सर्वच धर्मांचा आणि धम्मांचा अस्त व्हावा आणि फक्त मोक्ष वा निर्वाण वा कैवल्यप्राप्ती शिल्लक राहावी असे माझे मत आहे पण सद्याच्या व्यवस्थेत हे शक्य दिसत नाही सर्वात वाईट गोष्ट आपले राजकारण अर्थकारण व समाजकारण हे धर्मकेंद्रित बनवण्यात इस्लामला यश आले आहे आणि आता हिंदूही इस्लामच्या वाटेने जाण्याच्या प्रयत्नात आहेत हळूहळू ख्रिश्चन आणि बौद्ध जर का ह्या उत्तरधार्मिक वावटळीत सापडले तर सगळ्या जगाचा सत्यानाश व्हायला वेळ लागणार नाही अशावेळेला द्विसहस्त्रोत्तरी पिढी आपला इतिहास कसा लिहिणार हा प्रश्न मला पडला आहे
श्रीधर तिळवे नाईक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा